You are on page 1of 2

श्रीरामाची आरती:

श्रीराम जयराम जय जय राम


आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥
कनकाचे हाट करी धनुष्यबाण ।
मारुती हा पुढे उभा हात जोडू न ।
राम । श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर मेघश्याम
भरत शत्रुघन दोघे चवर्‍या ढाळीती ।
सिंहासनी आरुढले जानकीपती ॥ २ ॥
राम । श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥
लक्षुमणाने सेवा के ली रामचंद्राची ।
चौदा वर्षे आहार निद्रा नाही तयासी ॥ ३ ॥
राम । श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥
विष्णुदासनामा म्हणे मागणे हेची ।
अखंडित सेवा घडो रामचंद्राची ॥ ४ ॥
राम । श्रीराम जयराम जय जय राम
आरती ओवाळू पाहू सुंदर घनश्याम ॥

आरती हनुमंताची
आरती अंजनी तनयाची, वायुसुत राम सेवकाची l
महाबलशाली कपीनाथा, प्रणत आम्ही ठेवीतसे माथा ll
ऐकु नी घेई सकल वृता, पाठविले त्वरीत रामदुता lll
म्हणुनिया त्वरीत संकटी धाव, घेई प्रभुठाव जाणुनी भाव llll
भक्ती ही दिन बालकाची वायुसूत राम सेवकाची - १
भावे प्रभुपद कमलासी, सेविले पुर्ण अहर्णिशी l
सीता शोधास्तव देहासी, झीजविले राघव कार्यासी ll
ताडू नी बहूत राक्षसासी, दशमुखा लाविले फाशी lll
खरोखर धन्य जगी हनुमंत, महाबलवंत दयेचा अंत llll
कळेना संत मंडळासी, वायुसूत राम सेवकाची - २
आरती अंजनी तनयाची वायुसूत राम सेवकाची .

You might also like