You are on page 1of 10

शुभ दीपावली

दीपोत्सव, दिव्यांचा सण, आपला अतिशय आवडता, आणि प्रेमळ सण.


आज आपण या सणाबद्दल थोडं जाणून घेऊया.

माझ्या मते, देव ही संकप्लना व्यक्तिगत आहे. कोणाचा मूर्त्यांवर विश्वास असतो, तर कोणाचा त्या
कल्पनेवर विश्वास असतो. कोणी नैसर्गिक शक्तीवर विश्वास ठे वतं, तर कोणी अगदीच नास्तिक
असतं. व्यक्ती तितक्या प्रकृ ती. पण सण म्हंटलं की सगळ्यांना आवडतात कारण माणूस
सामाजिक प्राणी आहे. भेटीगाठी, मजामस्ती, आणि गोडधोड या सगळ्यांमुळे वातावरण
प्रफु ल्लित होतं.

हे लिहिण्याचं कारण हे की, आपण प्रगत होत आहोत, तंत्रज्ञान कमाल गोष्ट आहे पण कु ठे तरी
काहीतरी हरवतंय. पौराणिक कथा आपल्या संस्कृ तीचा अविभाज्य भाग आहेत. आपण सणांकडे
फक्त सुट्टी आणि कार्य म्हणून न बघता त्याच्या मागच्या कहाण्या उजळल्या पाहिजेत.

Techy_Marathi
आपण सगळ्यावर तंतोतंत विश्वास ठे वला पाहिजे का? नाही. पण गोष्टी सांगण्यात एक आनंद
आहे. त्याने शब्दभांडार वाढते, कल्पनाशक्ती प्रबळ होते, आणि सणाला एक छान छटा येते. घराची
साफसफाई आणि सजावट म्हणजे भांडण आणि धिंगाणा आलाच. पूजा करताना फु लांची सजावट,
दिवे, फराळ, हे सगळं आल्हाददायक वाटतं. आपली संस्कृ ती संपन्न असल्याचा अभिमान वाटतो.

हे सर्व करणं म्हणजेच सण साजरं करणं आहे का? तर नाही. प्रत्येकाची पसंत वेगळी असू शकते
आणि त्याप्रमाणे सणाचा आनंद लुटणं सुद्धा वेगळं असू शकतं. ज्यामध्ये आपल्याला समाधान
मिळतं, ते करावं. दुसऱ्याला त्रास न देता, आपण जर आपली मजा करत असू, तर सगळंच अत्युत्तम!

मला वाटतं, ही प्रस्तावना पुरेशी आहे नाहीतर मुद्दा भरकटत वेगळी कलाटणी घेऊ शकतो. चला, एक
प्रयत्न सणांबद्दल जाणून घेण्याचा.

Techy_Marathi
पहिला दिवस: धनत्रयोदशी

या दिवसाशी संबंधित तीन हिंदू लोककथा फार लोकप्रिय आहेत. पौराणिक कथांमधून ऐकिवात
असलेल्या काही आख्यायिका.

धन्वंतरी: आयुर्वेद आणि वैद्यकशास्त्रामध्ये नैपुण्य असलेला देव. असं मानलं जातं की या देवाने
आयुर्वेदाचं ज्ञान जगताला दिलं. प्राचीन हिंदू पौराणिक कथा सांगतात की धन्वंतरी हा विष्णूचा
अवतार आहे आणि तो समुद्र मंथनामधून उदयाला आला. धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरीची पूजा
करून निरोगी जीवनाची प्रार्थना के ली जाते.

लक्ष्मी: समुद्र मंथनामधून कमळावर विराजमान होऊन आलेली आणि सोन्याने ओसंडून वाहणारं
पात्र हातात असणारी देवी म्हणजे लक्ष्मी. भाग्य, समृद्धी, आनंद, आणि संपत्तीचं प्रतीक. रांगोळी
काढून हिचं स्वागत के लं जातं. काही विधींमध्ये मुली आणि सुनांच्या पायाला कुं कू लावून त्यांची
पाऊलं उंबरठ्यापुढे उमटवली जातात कारण त्यांना घराची लक्ष्मी मानलं जातं.

Techy_Marathi
यमदेवता: ही गोष्ट मनोरंजक आहे. हिम राजाच्या मुलाच्या पत्रिके त भाकीत के लं होतं की, त्याच्या
लग्नाच्या चौथ्या दिवशी सर्पदंशाने त्याचा मृत्यू होणार. हे कळताच त्या मुलाच्या पत्नीने हे भाग्य
बदलवण्याचं ठरवलं. तो जागा राहावा म्हणून ती रात्रभर गोष्टी सांगत राहिली. सापाला फसवण्यासाठी तिने
त्यांच्या खोलीबाहेर, दाराजवळ तिच्याकडे असलेल्या सर्व नाण्यांचा ढीग रचला आणि खूप दिवे लावले.
यम सापाचं रूप घेऊन आला पण धातू आणि दिव्यांच्या प्रखर प्रकाशामुळे त्याला काहीच दिसत नव्हते. तो
रात्रभर थांबला आणि सकाळी निघून गेला. याच कारणासाठी काहीजण धनत्रयोदशीला 'यमदीपन' असेही
म्हणतात. मातीचे दिवे लावून आपल्या कु टुंबाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात.

तिन्ही कथांचं सार: धन्वंतरीची पूजा म्हणजे आपण आपल्या आरोग्याची कटाक्षाने काळजी घेतली
पाहिजे. नियमित व्यायाम आणि पोषक आहार घेतला पाहिजे. आपण निरोगी राहिलो तरच आपल्याला जे
हवं ते करू शकतो आणि आपल्या कमाईचा आनंद उपभोगू शकतो. लक्ष्मीची पूजा म्हणजे स्त्रियांचा आणि
कमावलेल्या पैशाचा आदर. पुरुषप्रधान संस्कृ ती असलेल्या आपल्या देशात, स्त्रियांना बरोबरीचा दर्जा
मिळायला हवा. आपण त्या क्षेत्रात बरीच प्रगती के ली आहे पण अजूनही बऱ्याच ठिकाणी “हे काम म्हणजे
स्त्रियांचंच” असा समज असतो. घर दोघांचं तर घराची काळजी पण दोघांची आणि आदरही दोघांचा.
आणि यमाची पूजा म्हणजे आपण निरोगी राहिलो तर आजार होणार नाहीत आणि झाले तरी त्यातून बाहेर
पडण्याची शारीरिक आणि मानसिक शक्ती आपल्यात असेल. मृत्यू अटळ आहे पण जे जीवन आहे ते
समाधानाचं असेल, हे आपले प्रयत्न असायला हवेत.
Techy_Marathi
दुसरा दिवस: नरक चतुर्दशी

नरकासुराने इंद्राचा पराभव के ल्यानंतर अदिती देवतेचे दागिने चोरून नेले आणि तो प्रग्ज्योतिषपूर
ह्या राज्याचा राजा बनला. त्याने अनेक देव आणि ऋषीमुनींच्या १६००० मुलींना कै द के लं होतं.
श्रीकृ ष्णाने ह्या दिवशी नरकासुराचा पराभव करून १६००० मुलींची मुक्तता के ली आणि अदिती
देवतेचे दागिने सुद्धा आणले. म्हणून हा दिवस साजरा के लं जातो. रामायण कथेप्रमाणे ह्या दिवशी
हनुमानाने बातमी आणली की राम-सीता-लक्ष्मण वनवास संपवून परतत आहेत. हा दिवस विविध
भागांत विविध पद्धतीने साजरा करतात. दक्षिण भारतात ह्या दिवशी पहाटे लवकर उठून कुं कू आणि
तेलाचं मिश्रण बनवतात. ह्या मिश्रणाला 'उबटन' म्हणतात. हे उबटन कपाळाला लावून आंघोळ
करतात.

कथांचे सार: थोडक्यात आपले बरेच सण 'वाईटावर चांगल्याचा विजय' ह्या संकपल्पनेभोवती
आहेत. दसरा, होळी, इत्यादी. आपण ह्यातून काय घेऊ शकतो तर दिवे लावून वाईट प्रवृत्तींचा त्याग
करू शकतो. प्रत्येक माणसात चांगले आणि वाईट गुण असतात. आपण कोणत्या गुणांना वाव देतो,
त्यानुसार आपलं व्यक्तिमत्त्व ठरतं. तर आपण दिव्यांच्या प्रकाशाने आपल्यातील वाईट गुणांना
ओळखून ते कमी करण्याचा प्रयत्न करायला हवा.

Techy_Marathi
तिसरा दिवस: लक्ष्मीपूजन

महालक्ष्मीचे आठ पैलू आहेत - आदी लक्ष्मी, धनलक्ष्मी, विद्या लक्ष्मी, धान्य लक्ष्मी, संतान लक्ष्मी,
धैर्य लक्ष्मी, विजय लक्ष्मी, आणि भाग्य लक्ष्मी. याव्यतिरिक्त, ती आध्यात्मिक संपत्तीचं प्रतीक आहे
जी माणसाचं तीन जगतामध्ये कल्याण करते - आदिभौतिक, आदिदैविक, आणि आध्यात्मिक.

तिथीप्रमाणे हा अमावास्येचा दिवस आहे आणि म्हणून अंधारलेल्या रात्री दिव्यांनी उजळून
काढायच्या.

कथेचे सार: संपत्ती ही फक्त पैशाची नसते तर ती आरोग्य, आचार, विचार, धान्य, विद्या, ह्या
सगळ्यांची असते. मला वाटतं आपण तेव्हा समृद्ध असतो जेव्हा आपल्याला समाधान वाटतं. मग ते
एखाद्या बंगल्यात असो वा पत्र्याच्या घरात. महत्त्वाकांक्षा असाव्यात पण कधीतरी नम्र होऊन
आपल्याकडे जे आहे त्याची पण कदर के ली पाहिजे.

Techy_Marathi
चौथा दिवस: बलिप्रतिपदा

बली हा असुर होता. तो विष्णूचा हौशी भक्त प्रल्हादाचा मुलगा होता. तो दानवशाली आणि न्यायी
होता. पण स्वर्गलोकामध्ये त्याची लुडबुड देवांन पटली नाही. देवांनी विष्णूकडे प्रार्थना के ली. विष्णू
वामन रूपात आला. त्याने बलीकडे अशा जमिनीची मागणी के ली ज्यावर विष्णू तीन मोठी पाऊले
ठे वेल. वामन रूपात असलेल्या विष्णूच्या थोरवीची बलीला कल्पना नव्हती. त्याच्यासाठी वामन
म्हणजे एक बुटकी व्यक्ती. पहिल्या पावलात विष्णूने पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलात स्वर्ग व्यापले.
बलीला विष्णूच्या महिमेचा अंदाज आला आणि त्याने विष्णूला तिसरं पाऊल त्याच्या डोक्यावर
ठे वण्याची विनंती के ली. बलीच्या शरणागतीमुळे हा दिवस वामनाचा बळीवर विजय म्हणून
ओळखला जातो. फक्त दीपावली मध्ये त्याला जगामध्ये फिरण्याची आणि विष्णूच्या प्रेम, करुणा,
आणि ज्ञान ह्या संदेशाचा प्रसार करण्याची परवानगी आहे.

कथेचे सार: मला ह्या गोष्टीवरून हे घ्यावंसं वाटतं की कोणालाही बाह्यांगावरून कमी लेखू नये.
माणूस म्हणून आपण कसे आहोत हे महत्त्वाचं!

Techy_Marathi
पाचवा दिवस - भाऊबीज
पौराणिक मान्यतेनुसार सूर्यदेव आणि त्यांची पत्नी छाया यांना यमराज आणि यमुना ही दोन मुले
होती. दोघांमध्ये खूप प्रेम होते. बहीण यमुनेला यमराजाने आपल्या घरी भोजनासाठी यावे असे नेहमी
वाटत असे. मात्र यमराज त्यांची विनंती टाळत असत. एकदा कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या
द्वितीया तिथीला दुपारी यमराज यमुनेच्या घरी पोहोचले. यमुना आपल्या भावाला दारात पाहून
आनंदित झाली. यानंतर यमुनेने बंधू यमराजाला ओवाळले आणि भोजन दिले. बहिणीची ममता
पाहून यमदेवांनी तिला वरदान मागायला सांगितले. यानंतर यमुनेला यमराजांना दरवर्षी कार्तिक
महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितीया तिथीला भोजनासाठी यावे असे वचन मागितले. तसेच या दिवशी
आपल्या भावाशी आदराने व आदरातिथ्य करणाऱ्या बहिणीला यमराजांनी भयमुक्त करावे असे
वरदान मागितले. तेव्हापासून दरवर्षी या दिवशी भाऊबीज साजरी के ली जाते.

अजून एक कथा अशी की नरकासुराचा वध करून श्रीकृ ष्ण त्याची बहिणीकडे, म्हणजेच सुभद्राकडे
येतो आणि ती त्याचं स्वागत टिळा लावून करते. म्हणून हा दिवस 'भाऊबीज' म्हणून साजरा के ला
जातो.

कथेचे सार: मला वाटतं 'पाडवा' आणि 'भाऊबीज' हे पती-पत्नी आणि भाऊ-बहीण ह्या नात्यांना
साजरं करण्याची गोड निमित्तं आहेत.

Techy_Marathi
तर असे हे पाच दिवस. संपूर्ण भारतात वेगवेगळ्या विधींनी साजरी के ली जाणारी 'दिवाळी'
खूप भरभराटीची आणि मंगलमय वाटते. शरद ऋतूला सुरुवात होते आणि दिवाळी येते.
त्यामुळे हवेत एक प्रसन्न गारवा असतो आणि म्हणूनच आपण तेलकट पदार्थ (चकल्या,
करंजी, चिवडा, लाडू, इत्यादी) खातो ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. तसेच ही अमावस्या
काळ्याकु ट्ट अंधाराची असते म्हणून दिव्यांनी आपण प्रकाश निर्माण करतो. तर हा होता
प्रयत्न दिवाळीचं सांस्कृ तिक, भावनिक, नैसर्गिक, आणि वैज्ञानिक महत्त्व सांगण्याचा.

फटाके फोडणे म्हणजे दिवाळी नाही. हवा आणि ध्वनी प्रदूषण हे मुद्दे आहेतच पण त्याचे
धोके सुद्धा गंभीर आहेत. कोणी म्हणेल करमणूक आहे ती, पण जी करमणूक पर्यावरणाला
घातक ठरेल ती करमणूक कशी? असो, प्रत्येकाची मतं वेगळी असू शकतात. आपण
मुलांबरोबर, नातेवाईकांबरोबर, मित्रमैत्रिणींबरोबर विविध खेळ खेळू शकतो जसं पणत्या
सजवणे, कं दील बनवणे, फराळ करणे, रांगोळ्या काढणे, हस्तकला, चित्रकला, वृक्षारोपण,
आणि बरंच काही.

Techy_Marathi
आपण दैनंदिन जीवनात एवढे गुंतलेले असतो की भेटायची फु रसत नसते. पण हे सण ती संधी
उपलब्ध करून देतात आणि आपण तिचा लाभ घेण्याचा मनापासून प्रयत्न के ला पाहिजे.

तुम्हाला आणि तुमच्या कु टुंबाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! दिव्यांच्या प्रकाशाने तुमचं
आयुष्य उजळून निघू दे आणि आव्हानात्मक परिस्थितीबरोबर लढण्याचं बळ तुम्हाला मिळू दे.

प्रिती आणि धंनजय

Techy_Marathi

You might also like