You are on page 1of 4

देवक

मराठे आणि इतर क्षत्रिय यांच्यात परंपरेने मानली जाणारी ही एक देवकल्पना आहे. प्राचीन काळापासून अनेक अनार्य जाती जमाती आणि
द्रविड वंशातील लोकांनी आपल्या कु ळांना पशुपक्षी, वनस्पती किं वा एखादी वस्तू यांची नावे दिली. त्या कु ळांना त्या त्या वस्तूवरून ओळखले जाऊ
लागले. तेच त्या कु ळाचे देवक झाले. एकं दरीत त्या पशू, वनस्पती किं वा वस्तूला देवाचे स्थान दिले. देवकाचा त्या त्या कु ळाशी रक्तसंबंध किं वा काही
गूढ संबंध असावा. त्यामुळे प्रत्येक कु ळाला आपल्या देवकाविषयी प्रचंड आदर आणि भक्ती निर्माण झाली. मराठी विश्वकोशात देवकाविषयी पुढील मत
मांडण्यात आलेले आहे, देवक कल्पनेची उत्पत्ती बरीचशी गूढ आहे. विशिष्ट वस्तूंना देवक मानण्यामागे कोणत्या समजुती व कारणे होती, याविषयी
विविध मते मांडली जातात. प्रत्येक कु लातील लोक विशिष्ट वनस्पती किं वा प्राणी यांच्यावर उदरनिर्वाह करीत आणि त्यांचा व्यापार करीत. सर्वांना
लागणारे अन्न जपण्याची अथवा घातक वस्तूचा नाश करण्याची जबाबदारी विशिष्ट कु लावर असे. जादूटोणा मोठ्या प्रमाणावर चालत असे, विशिष्ट
वस्तूत व्यक्तीचा आत्मा असतो, मृताचा आत्मा विशिष्ट वस्तूत जातो. आदिम स्त्रीला ती प्रथम गर्भवती राहिल्याची जाणीव होई, तेव्हा एखाद्या वस्तूने
उदरात प्रवेश के ल्याची जाणीव होई, अशा वेगवेगळ्या परिस्थितीत ती ती वस्तु देवक म्हणून मानल्याची शक्यता दिसते. एखाद्या व्यक्तिला किं वा
कु ळाला नाव देण्याच्या गरजेतून किं वा दोन कु ळाचे वेगळेपण दाखविण्यासाठी त्यांना वस्तूंची किं वा प्राण्यांची नावे दिली असावीत असाही एक
मतप्रवाह आहे.
“आदिवासी अवस्था ही मानवी जीवनाची प्रारंभिक अवस्था मानली जाते. अनादि काळापासून मानवाच्या मनात निसर्गाविषयी
एकप्रकारची अनामिक भीती, आदर, कु तूहल अशा समिश्र भावना होत्या. आपल्या भोवती घडणार्‍या सर्वच घडामोडींचा कार्यकारणभाव मानवी मन
जाणून घेऊ शकत नाही. त्यामुळे त्या घटनाबद्दल पशुपक्षी, वृक्ष, नद्या, पर्वत, डोंगर याबद्दल आदरमिश्रीत भीती व कु तूहल मानसाच्या मनात होते.
त्यातूनच निसर्गातील उपयुक्त वस्तूंची, घटकांची पुजा, प्रार्थना करणे मानवाने प्रारंभ के ले.”
‘ नॉर्थ अमेरिकन इंडियन’ या जमातीचा अभ्यास करताना जे लॉन्ग यांनी ‘ देवक म्हणजेच ‘Totem’ ही संकल्पना पुढे आणली.
त्यातूनच देवक किं वा कु लचिन्ह या संकल्पनेच्या व्याख्या तयार झाल्या. कु ळाशी संबंधित असणार्‍या प्राणी, वनस्पती किं वा इतर वस्तु यांना देवक
किं वा कु लचिन्ह असे म्हणतात. कु लाची उत्पत्ती अशा नैसर्गिक वस्तूपासून झालेली असते व त्या विषयांच्या रितीरिवाजाला कु लचिन्हवाद किं वा
देवकवाद म्हणतात.
देवक संकल्पना भारतापुरती मर्यादित नाही. तर अमेरिका, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आशिया आणि ईस्ट, फिजी, न्यू गिनिया, आयर्लंड
आणि वेस्ट इंडिज इत्यादी बेटे याठिकाणी त्यांनी मानलेल्या सजातीयाचे नाव ठेवले जाते, त्यास टोटेम ( Totem ) असे म्हणतात. देवक हे त्याच्या
जन्मावरून ठरते. टोटेम हा शब्द अमेरिके तील ओजिब्वे ( Ojibwe) नावाच्या आदिवासी जमातीच्या भाषेतील ‘ ओतोतेमन’ ( Ototeman )
शब्दावरून घेतलेला आहे. यातील ओते ( ote ) शब्दाचा अर्थ होतो, एकाच आईचे, रक्ताचे. जगभर ज्याठिकाणी आदिवासीचा वावर राहिलेला आहे
तेथे टोटेम ही संकल्पना अस्तित्वात असल्याचे दिसून येते. उत्तर अमेरिके तील काही आदिवासीच्या ( हैडा, टिलीकिट, क्वाकीटुल ) बोली भाषेत
‘ओडम’ किं वा ‘डोडम’ हा शब्द प्रचलित असून त्यातूनच ‘टोटम’ शब्दाचा जन्म झाला. या आदिवासींचा विश्वास आहे की, त्यांचा विशिष्ट पशुपक्षी,
वृक्ष अथवा एखादी विशिष्ट वस्तु यांच्याशी खास संबंध आहे. त्यामुळे टोटेम आपले अदृश्य शक्तीपासून संरक्षण करते तर आपणही टोटेमविषयी
आदरभाव बाळगून त्याचे रक्षण के ले पाहिजे. एकं दरच टोटेमला समाजाच्या नैतिकतेशी जोडल्यामुळे त्याला अलौकिक शक्ती मानून त्यामुळे सामाजिक
जीवन नियंत्रित होते.
देवक या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून Totem हा शब्द वापरला जात असलातरी धार्मिक बाबतीत दोन्हीच्या वापरात खूप फरक आहे.
देवकला पर्याय म्हणून Totem शब्द तंतोतंत नसलातरी दोन्ही शब्दात एक मुख्य साम्य आहे की, दोन्ही शब्दाचा अर्थ सारखाच असून यात आपला
पूर्वज एखाद्या ठराविक वस्तूला मानतो आणि आयुष्यभर त्याचे पालन करतो. त्यामुळे के वळ भारतातच देवकाच्या माध्यमातून आपल्या पूर्वजांना
मानतात असे नाहीतर अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फिजी, इजिप्त अशा अनेक देशात Totem च्या माध्यमातून लोक आपल्या पूर्वजांना आठवण करतात.
देवकाबद्दल असलेला विश्वास व श्रद्धेतून वाईट वागल्यास देवक शिक्षा करेल किं वा चांगले वागल्यास देवक वरदान देईल अशी भूमिका
आदिवासींच्या मनात तयार होते. यातून पाप पुण्य ही संकल्पना निर्माण होऊन देवकाच्या पुजा प्रार्थना व विधीसाठी कु ळातील सर्व सदस्य एकत्रित
येतात. त्यामुळे समूह एका विशिष्ट बंधनात बांधला जाऊन परस्पर नियंत्रीत के ला जातो. देवक एक असणारी मंडळी आपण एकाच वंशाचे असल्याचे
मानत असल्याने एकमेकांच्या सुख-दु:खात सामील होतात. त्यातूनच माणसाला सामाजिक आणि मानसिक सुरक्षा प्राप्त होते. एकच देवक असलेले
कु लसदस्य परस्परांना बंधुभगिनी मानतात. त्यामुळे देवक एक असेलतर विवाह होऊ शकत नाही. म्हणून आदिवासी समाजामध्ये देवक बहिर्विवाहाचे
प्रचलन दिसून येते.कु ळांतर्गत व एकच देवक असलेल्या कु टुंबाअंतर्गत विवाह निषिद्ध मानला जातो.
व्यक्तीचा जन्म ज्या कु ळात झाला असेल त्या कु ळाचे सदस्यत्व त्याला प्राप्त होते. व ते त्या कु ळाचे देवक असते. या देवकामुळे लहान
मुलांचे पालनपोषण, संरक्षण होते. देवकाच्या आराधनेमुळे अपत्यप्राप्ती होते. एकं दरच देवकाच्या पवित्र्यामुळे आपणाला अनेक अनिष्ट प्रवृतीपासून मुक्ति
मिळते अशाप्रकारची भावना निर्माण होते.
काही लोकांच्यामते देवक म्हणजे समुदायाची खूण. त्यानुसार पुर्वी माणूस गुहेत रहात असे. पुढे जशी त्याची प्रगती व्हायला लागली तसे
त्याचे रहाणे समुदायाने एखाद्या सुरक्षित जागी व्हायला लागले. शिकार करून आपली उपजिविका करणे हे त्याचे महत्वाचे काम होते. शिकारीसाठी
समुदायाने गेलातर त्याला आणखी फायदा व्हायला लागला. शिकारीसाठी कितीही दूर गेलातरी तो आपल्या एका निश्चितजागी परत यायला लागला.
परंतु त्याकाळी घनदाट जंगले असल्याने त्याला आपले वस्तीस्थान सापडणे कठीण व्हायला लागले. त्यामुळे शिकारीला जाताना उंच झाडावर किं वा
आपल्या वस्तीच्याठिकाणी काहीतरी खूण अडकावून ठेवायला लागला. लोकांच्या वस्त्याही वाढायला लागल्या. त्यामुळे पुन्हा अडचणी निर्माण सुरू
झाल्या, आपले घर कोणते हे सहज ओळखता यावे ही धडपड सुरू झाली. त्यातच ज्या प्राण्याची शिकार के ली त्याचे डोके तो आपल्या निवार्‍याच्या
वरच्या बाजूला अडकावयाला लागला. ती त्याची खूण झाली. पुढे वस्ती वाढली तशी खूण म्हणून आणखी वस्तूची गरज निर्माण व्हायला लागली.
त्यातूनच मग विविध प्राण्याचे डोके , पाने, फु ले,शंख, शिंगे व त्यानंतर धातूचा शोध लागल्यानंतर त्याच्यापासून बनविलेल्या वस्तू अडकवयाला
लागला. यामुळे त्याचा निवारातर समजला परंतु त्याचवेळी त्याने वस्तीवर लावलेल्या वस्तूमुळे त्याची विशिष्ट ओळख व्हायला लागली. ही वस्तुच
त्याचे देवक तयार झाले. लोकसंख्या वाढलीतरी त्याचा कु ळाची ओळखमात्र त्या त्या वस्तूमुळे कायम राहिली. त्यामुळे तो कोठेही गेलातरी त्या त्या
कु ळाचे देवक तेच राहिले.
देवकाशी कु ळाचा रक्तसंबंध किं वा काही गूढ ऋणानुबंध असावा अशी कल्पना आहे. प्रत्येक कु ळाला आपल्या देवकाविषयी आदर व भक्ती
असते. ज्या प्राण्याला कु ळाने देवक मानले असेल, त्याचे मांस त्या कु ळातील माणसे खात नाहीत. एवढेच नव्हेतर त्याला आपल्या उपयोगासाठी
राबवूनही घेत नाहीत. तसेच देवक मानलेल्या वृक्षाची पाने, फळे, फु ले व लाकू ड यांचा उपयोग करीत नाहीत किं वा त्या वृक्षाच्या सावलीतही बसत
नाहीत. देवक मानलेला प्राणी मरण पावला की, त्याचे सुतक पाळतात. त्याचे कातडे विशेष समारंभात अंगावर घेतात. काही लोक अशा प्राण्याची चित्रे
अंगावर गोंदवून घेतात किं वा सर्व देह त्याच्यासारखा रंगवतात. देवकाचे तीन भागात वर्गीकरण करता येईल.
1.प्राणी देवके - घोडा, गरुड, रेडा, हत्ती, वानर, चितळ, डु क्कर, कासव, कासव, मोर, लांडगा,
बकरा,सांबर
2. वनस्पती देवके – आंबा, चिंच, बेल, निंब, बाभूळ, बोर, कदंब, शमी, वड, उंबर इत्यादी
3. वस्तू देवके – कु र्‍हाड, फुं कणी, सूरी, चिमटा, तलवार, तेलघाणा, मीठ, भात, लोखंड इत्यादी.
याचा अर्थ असा नाही की, कु ठल्याही वृक्षाची पुजा के ली म्हणजे ते त्याचे देवक होईल. कारण भारतात पुष्कळ लोक पशू, पक्षी, वनस्पती
किं वा काही वस्तू यांची पूजा करतात ते त्यांचे देवका असतेच नाही. हिंदू लोक तुळस, वड. नाग, गाय, शस्त्रे यांची पूजा करतात त्यानुसार ती त्यांची
देवकपूजा नाही.
‘ आदिवासी कौन’ या पुस्तकात वेगळेच मत मांडलेले असून त्यात ते म्हणतात की, ‘ भगवान शिवाचे देवक नंदी आहे. संपूर्ण जमिनीचा
पालनकर्ता म्हणून बैल हा त्याचा मुख्य आधार म्हणून नंदी हे त्याचे देवक असावे. पुढे हनुमान, बाली, सुग्रीव, अंगद यांचे देवक वानर असल्याने
त्यांनाही माकड म्हटले असावे. याच पुस्तकात लेखकाने ‘ भारत मे आर्य’ या पुस्तकाचा आधार देत रावणाच्या देवकाचा उल्लेख करताना म्हटले आहे
की, रावण या शब्दाचा अर्थ होतो, रा = ताड ( तामिळ शब्द) आणि वन = जंगल. त्यामुळे ताडाच्या जंगलात राहणारा तो रावण. वास्तविक रावण हे
त्याचे खरे नाव नसून त्याची ती उपाधी आहे. रावणाचे मूळ नाव हे “ राऊजानेर वरेन्दू नरेंदर” असे आहे. ताड हे त्याचे देवक असल्याने त्याला रावण
हे पडले. त्यामुळे देवक किं वा टोटेम ही संकल्पना प्राचीन आहे. भारतात अनार्यात म्हणजे आजचा भारत देश व मुख्यत्वे द्रविड लोकात देवकप्रथा
होती असे दिसून येते. वाघ, नाग व वानर या मूळच्या देवकांची देव म्हणून पुजा करणे हा हिंदूंचा प्रभाव आहे.
प्रत्येक अपत्याला देवक हे आई किं वा बापाकडू न मिळते. किमान महाराष्ट्रात ते बापाकडू न मिळते.वैदिक कालखंडापासून हिंदू धर्मात पितृ
परंपरा मोठ्या प्रमाणात राहिलेली आहे. तरीपण समाजशास्त्रीनी मानव समाजाला दोन भागात घातले आहे. 1. पितृसत्ताक 2. मातृसत्ताक
काही आदिवासी जमाती सोडल्या तर सर्वत्र पितृसत्ताक परिवाराची परंपरा प्रचलित आहे. देवकाचा विचार के लातर मराठाच नाहीतर
अनेक अठरापगड जातीतील लोकांचे देवकही अगदी मराठ्याप्रमाणेच आहेत. देवकपद्धतीच्या धार्मिक आणि सामाजिक प्रकारात विलक्षण संबंध आहे.
वंशपरंपरागत चालत आलेल्या आपल्या देवकाचे नाव जर दुसर्‍या मनुष्याच्या देवकास असेल तर, त्याच्याशी लग्न करायचे नाही, ही सामाजिक चाल
काटेकोरपणे पाळली जाते. शास्त्र पुढे यायच्या अगोदर एक रक्तगट व त्यातून होणारे दुष्परिणाम वगैरे कल्पना आदिम मानवाने अनुभवातून आत्मसात
के लेल्या होत्या हेच यावरून दिसून येते. त्यामुळे आपले देवक मारायचे नाही किं वा खायचे नाही हे पाळले जाते. त्यातूनच त्याच्याविषयी आदरभाव
निर्माण झाला. याच बाबीला धर्माची जोड दिली. त्यामुळे देवक ही संकल्पना शास्त्रावर आधारित आहे हेच यावरून दिसून येते.
इरावती कर्वे यांनी ‘मराठी लोकांची संस्कृ ति’ या पुस्तकात देवक आणि त्यानुषंगाने होणारे विवाह याबाबत लिहिले आहे की, “मराठीत
पितृकु लाचे नाव लावतात, कानडीमध्ये लग्नाच्या नात्याचे सर्व शब्द रक्ताच्या नातेवाईकांना लावतात. तर उत्तरेत कु लंनामाची चाल नाही. त्यामुळे
जोपर्यंत नातेवाईकांची आठवण पोहोचते, किमान तेथपर्यंत पितृकु लात लग्न न करण्याचा नियम पाळतात. शे पाचशे उंबर्‍याचे गाव असलेतरी एका
जातीची एकाच गावातली घरे ही आपल्याच कु ळातील मानून गावातल्या गावात मुलगी करत नाहीत. विदर्भातील यदूवंशी गवळी किं वा अहिर गवळी
यांच्यातही गावातल्या गावात मुलगी करत नाहीत. गंगेच्या दक्षिणेला देवके प्राचीन काळापासून होती. तर पश्चिमेकडे रजपूत, काठी या लोकात कु ळे
होती. यावरून असे दिसून येते की, देवकाची चाल प्राचीन असून कु ळाचे जे देवक होते तेच कू लनाव पडले असावे. त्यानंतर निरनिराळ्या
कारणावरून आडनावे पडली असावीत.
उत्तर भारतात देवके नाहीत. त्यामुळे पितृ सावर्ण्य ठरविण्याची पद्धत म्हणजे एका गावातील वस्ती. अब्राम्हण्यात देवकाचे जे कार्य तेच
ब्राम्हणात गोत्राचे. उत्तरेत पितृ कु ळात तर के रळात मातृकु ळात लग्न होत नाही. उत्तरेत सापिंड्याची मर्यादा पाळतात. त्यामुळे मामाची व आत्त्याची
मुलगी करत नाहीत. याउलट दक्षिणेत त्यांना भिन्न कु ळाचे मानून हे विवाह होतात. साहजिकच कु लाबाहेर किं वा देवकाबाहेर मुलगी देण्याची चाल
दक्षिणेकडची व सापिंड्यांची ( आई बापाची मुले ती आपली भावंडे आपलीच भावंडे समजून लग्न न होणे ) चाल उत्तरेकडची आहे.
आपली मुलगी उच्च कु ळात जावी ही प्रत्येकाची भावना, या उलट हुंडा घेऊन खालच्या कु ळातील मुलगी करण्याकडे कल दिसतो. जी जात
किं वा कु ल श्रेष्ठ त्यांच्या मुलीला सुयोग्य वर मिळणे कठीण जाते. म्हणून राजस्थानातील शिसोदिया कु ल सर्वश्रेष्ठ असल्याने त्यांना दोन चार
कु लाव्यतिरिक्त मुलींचे विवाह करता येत नाहीत म्हणून त्यांच्या अनेक मुली अविवाहित राहतात. तर पंजाबात ही चाल असण्याने उच्च कु ळात
बहुपत्नीत्व दिसते तर मुलींची संख्या कमी असल्याने त्यांना जबर हुंडा द्यावा लागत असल्याने खालच्या जातीत बहुपतित्व म्हणजे दोन चार भावात
मिळून एक बायको असा प्रघात अस्तीत्वात असल्याचे दिसते. मराठ्यांनी आपली संस्कृ ति जपत दक्षिण आणि उत्तर यांच्यातला मध्य साधला.
एकं दर अब्राम्हण किं वा क्षत्रियात कु लनामे आणि देवके दोन्ही प्रकार आढळतात. देवक हे त्या कु ळाचे चिन्ह आहे. ते पशु, पक्षी, वनस्पती
किं वा निर्जीव वस्तूही असू शकते. शक्यतो एकाच आडनावाचे एकच देवक असते. किं बहुना बरीच आडनावे ही देवकावरूनच आलेली आहेत.
तर काही आडनावे त्या त्या कु ळाने तशीच स्वीकारली आहेत. शिलाहार – शेलार, कदंब – कदम, चालुक्य, शिंद – शिंदे. मराठ्यातील
काही देवके इतर जातीतही आढळतात. गरुडाचा पंख, डु क्कर, कट्यार, कु र्‍हाड, पंचपालवी वगैरे. विशेष म्हणजे अशाप्रकारची देवके तेलगू आणि
तामीळ यांच्यातही आढळतात. अनेक संदर्भ ग्रंथांचा अभ्यास के ल्यानंतर कु ठल्याही लेखकाने देवकाच्या उत्पत्तीवर ठामपणे आपले मत मांडल्याचे
दिसत नाही.

You might also like