You are on page 1of 2

जगातील विविध देशातील विविध संस्कृ तींमध्ये सर्पपूजा प्रचलित आहे हे आपण जाणतोच, भारतीय संस्कृ ती

हि मूलतः निसर्ग प्रधान असून वृक्ष, प्राणी इतर निसर्गाच्या रुपांना पूजनीय मानून उपासना के ली जाते.
नागपूजा ही देखील भारतीय संस्कृ तीमध्ये प्राचीन मानली जाते. हडप्पा संस्कृ तीमध्ये सापडलेल्या काही
मुद्रांमध्ये नागांचे अस्तित्व आपल्याला दिसून येते. ऋग्वेदामध्ये देखील या नाग लोकांचा उल्लेख अहि तसेच
काही ठिकाणी वृत्र असा उल्लेख करण्यात आलेला आहे. यजुर्वेदात रुद्रास अहिसत्र म्हणजे सर्पाच्या सानिध्यात
राहणारा असे म्हटले आहे. अथर्ववेदात देखील तक्षक, धृतराष्ट्र असा सर्प म्हणून उल्लेख असून सर्पवेद हा
अथर्ववेदाचा उपवेद आहे. काठक संहिता तसेच ऐतरेय ब्राह्मण या ग्रंथात सर्पाचा पंचजनात समावेश के लेला
आहे. तैतरीय संहितेत सर्पांना नमस्कार करावा असा उल्लेख आहे.

रामायण आणि महाभारतात देखील नागराजांचे वर्णन निरनिराळ्या रूपात आढळते. विविध साहित्याचा आणि
स्रोतांचा विचार के ल्यास अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालीय या नऊ
प्रकारच्या नागांच्या नावांचा उल्लेख आलेला आहे. जैन आणि बौद्ध साहित्यात देखील नागांचा उल्लेख आलेला
असून या धर्मांमध्येही सर्पपूजेला महत्व आहे. तथागतांच्या जन्मानंतर नंद व उपनंद नावाच्या नागांनी
तथागतांना स्नान घातले, अशी एक कथा आहे. जैन तीर्थंकर पार्श्वनाथ यांना संकटातून वाचविण्यासाठी नागाने
ज्या ठिकाणी त्याच्यावर फणा धरला, त्या स्थानाला अहिच्छत्रा असे नाव पडले..

भारतीय संस्कृ तीचा विचार के ल्यास आपल्या देशातील सर्वाधिक सण-उत्सव हे कृ षी संस्कृ तीशी निगडीत
आहेत.

नागपंचमी हा सण देखील कृ षी संस्कृ ती आणि निसर्गाशी निगडीत आहे. शिवाच्या गळ्यात कायम नाग असतो,
हा नाग म्हणजे शिवाशी जवळीक असणाऱ्या माणसांचे प्रतिक आहे. वासुकी नाग शिवभक्त आहे. शेष या
नागाच्या हातात नांगर आणि कोयता आहे तर शिवाचे वाहन नंदी असणे ही सर्व प्रतिके कृ षी संस्कृ तीशी
निगडीत आहेत. शिवाला नागेश, नागेंद्रकुं डल, नागेंद्रहार, नागेंद्रवलय इत्यादी विशेषणाने संबोधित के ले आहे.
नागाची माता कद्रु ही पृथ्वीचे प्रतीक आहे असे शतपथ ब्राह्मण सांगते तर काही कथांमध्ये सुरसा ही नागमाता
हि असून तिलाही पृथ्वी अर्थात भूमाता म्हटलेले आहे..

नाग व नांगर हे पुरुष तत्वाचे प्रतीक मानले जातात. नाग आणि सापाशी संबंधी पौराणिक कथा तर प्रचलित
आहेतच. काही कु लदेवतांच्या आणि इतर मंदिरात आपल्याला नागशिल्प आढ़ळुन येतात तर काही ठिकाणी
स्वतंत्र नागदेवतांचे मंदिरे देखील आहेत यावरून नागाचे प्राचीन नाते स्पष्ट होते. भारतीय साहित्यात काही
उल्लेखानुसार नाग हे क्षेत्रदेवता असून ते जमिनीच्या विशिष्ट भागाचे रक्षण करतात. नाग, साप यांच्याबद्दल
समाजात असणाऱ्या दंतकथा, लोककथा या त्यांच्याबद्दल भितीदायक आदर व्यक्त करतात तर काही ठिकाणी
निर्मळ भक्ती. नाग हा शेतकऱ्यांचा मित्र म्हणून सर्वपरिचित आहे. सर्प, नाग यांच्याविषयी समाजात असलेल्या

अंधश्रद्धा, भीती दूर होवो हीच अपेक्षा. ☺


संदर्भ -

१) Ancient Indian Festivals- Dr. Sudha Singh

२) Nagas and Ophiolatry In Hindu Culture- Adam Begin

३) Nagas: The Religious Pantheon of Ancient India

४) श्रावण भाद्रपद - डॉ. सरोजिनी बाबर

५) मराठा क्षत्रियांचा इतिहास - के . बी. देशमुख

६) मराठी विश्वकोश

- राज जाधव

You might also like