You are on page 1of 9

'उपक्रमच्या' दिवाळी अंकामधला, 

'भारतातील मळ
ू रहिवासी' हा माझा लेख वाचनू , श्री. आल्हाद देशपांडे यांनी मला ई-मेल द्वारे त्यांचा प्रतिसाद पाठवला आहे. हा
प्रतिसाद मला फार महत्वाचा वाटला आणि सत्य सांगायचे तर गोंधळात टाकणारा वाटला. प्रस्ततु लेखामधे मी गेल्या आठ किंवा नऊ हजार वर्षात, सिंधु नदीच्या खोर्‍यात
उदयास आलेल्या मोहजं ो-दाडो संस्कृ तीच्या कालापासनू ते आर्यांच्या आगमन कालापर्यंतच्या कालखंडातील कालदर्शक रे षा (TimeLine) कशी असेल याचा उल्लेख
के ला होता. त्याचा संदर्भ घेऊन श्री. आल्हाद यांना अशी रास्त शंका आहे की आपले महत्वाचे धर्मग्रंथ या कालखंडात कसे बसवायचे?
या विषयावरचे माझे काही विचार मी खाली माडं ण्याचा प्रयत्न के ला आहे. या धर्मग्रथं ाचं ी टाइमलाईन ठरवण्यात खरे म्हणजे अडचणी खपू च आहेत. एकतर यातला कोणताही ग्रथं
एकाच विविक्षित कालखंडात लिहिला गेलेला नसावा. त्या कालात सर्व ग्रंथ मौखिक असल्याने मळ
ू ग्रंथाचे स्वरूप काय होते हे आज सांगणे फार कठिण आहे. आज आपल्याला
ज्ञात असलेल्या प्रतीत, मळ
ू भाग किती व नंतर घसु डलेला भाग किती हे ही सांगणे अशक्यच आहे. त्यामळ
ु े आपण जास्तीत जास्त थोडेफार Educated Guesses
फक्त करू शकतो. या शिवाय संस्कृ त भाषेच्या माझ्या संपर्णू अज्ञानामळ
ु े हे ग्रंथ मी अनवु ादित स्वरूपातच वाचलेले आहेत. त्यामळ
ु े या ग्रंथांमधे, ते मळ
ू ज्या कालात लिहिले
गेले, त्याच्या कालखंडाबद्दल काय लिहिले गेले आहे हे मला माहिती नाही. परंतु माझ्या या अज्ञानामळ
ु ेच कदाचित मला जास्त तटस्थ भमि
ू का घेणे शक्य होईल असेही मला
वाटते. म्हणनू च माझ्या या विचार शृख
ं लेत जर काही तृटी किंवा विसगं ती आढळल्या तर त्याचं ा वाचकानं ी जरूर निर्देश करावा.
कालनिर्देश रेषा
वरती निर्देश के लेल्या माझ्या लेखात मी म्हटल्याप्रमाणे, इडं ोनेशिया मधील टोबा या ज्वालामख
ु ीच्या उद्रेकामळ
ु े , इ.स.पर्वू 74000 वर्षे या नंतर एक सहस्त्र वर्षे, भारतात
कोणताही आधनि
ु क मानव अस्तित्वात नव्हता. त्यामळ
ु े या आधीचे कोणतेही धर्मग्रंथ कोणी रचले असले तरी आता ज्ञात असणे अशक्यप्रायच आहे.
सिंधु नदीच्या खोर्‍यातील सर्वात जनु े अवशेष, पाकिस्तानमधल्या मेहरे गड या गावाजवळ सापडले आहेत.. या अवशेषांचे वैशिष्ट्य म्हणजे हे पाषाणयगु ातील आहेत (सापडलेली
हत्यारे दगडापासनू बनवलेली आहेत.) कार्बन डेटिंग प्रमाणे हे अवशेष इ.स.पर्वू 5500 या कालातील असावेत. म्हणजेच आपली कालनिर्देश रे षा या कालापासनू सरू
ु होते.
आपल्या कोणत्याही धर्मग्रंथात, दगडापासनू बनवलेल्या शिकारीच्या किंवा लढाईच्या कोणत्याही हत्यारांचा कुठे ही उल्लेख नसल्याने, हे सर्व धर्मग्रंथ इ.स.पर्वू 5500 या
कालखंडानंतरच लिहिले गेले असले पाहिजेत याबद्दल शंका वाटत नाही.

यानंतरचा महत्वाचा कालखंड सरू


ु होतो इ.स. पर्वू 3300 ते 1700 मधे. या कालातच सिंधच्ु या खोर्‍यातली संस्कृ ती पर्णू बहरास आली होती. नगर रचना, शेती,
व्यापार उदीम, वाहने (बैलगाडीचा आराखडा जो आपण अजनु ही वापरतो) या सर्व बाबतीत ही सस्ं कृ ती अत्यतं पढु ारलेली होती असे म्हणता येते. या कालातली सर्वात
महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रॉन्झ या धातचू ा सरू
ु झालेला उपयोग. यामळ
ु े अर्थातच हत्यारांच्या गणु वत्तेत प्रचंड सधु ारणा झाली. सिंधु खोर्‍यातली ही संस्कृ ती इ.स.पर्वू 1700 ते
1300 या कालात अचानक नष्ट पावली. सिंधमधील इतिहास संशोधकांच्या मताप्रमाणे या संस्कृ तीवर जास्त चांगली हत्यारे असलेल्या परदेशी आक्रमणामळ
ु े हे घडले. या
संस्कृ तीचे उत्खननातले अवशेष हे सिद्ध करतात असे त्यांचे म्हणणे आहे.

या पढु चा महत्वाचा टप्पा म्हणजे याच कालखंडात झालेले आर्यांचे आक्रमण. या कालखंडातच लोखंडी हत्यारांचा शोध लागला होता व त्यामळ
ु े आर्य योद्धे त्यांच्या शत्रंपू क्ष
े ा
कितीतरी जास्त प्रभावी ठरू शकत होते. पढु च्या हजार बाराशे वर्षात आर्य संस्कृ ती भारताशी इतकी एकजीव झाली की त्या संस्कृ तीलाच मळ
ू भारतीय संस्कृ ती म्हणण्याची वेळ
आली.

यानंतर इ.सनाच्या पहिल्या शतकात कुषाण व नंतर हुण आक्रमणे झाली. परंतु या कालदर्शक रे षेचा अखेरचा टप्पा इ.सनाच्या सातव्या शतकात इस्लामच्या झालेल्या उदयानंतर,
आठव्या शतकात महु मं द बिन कासिम याच्या सिधं मधल्या आक्रमणाच्या कालात येतो. यानतं र भारतात इस्लामचे प्राबल्य वाढत गेले.

थोडक्यात सांगायचे म्हणजे आपले तीन महत्वाचे धर्मग्रंथ इ.स. पर्वू 3300 ते इ.स. 700 या कालातच रचले गेले असावेत. असे (Exclusion Principle)
ने म्हणता येते. हे विधान करणे जरी सोपे असले तरी ते सिद्ध करणे अशक्य कोटीतीलच काम वाटते. तरीसद्ध
ु ा आपले हे तीन धर्मग्रंथ म्हणजे रामायण, ऋवेद व महाभारत या
कालखंडात बसवणे शक्य आहे का याचा विचार पढु ील भागात करूया.

वाल्मिकी रामायण

गंगा नदीच्या खोर्‍यात असणार्‍या कोसल या राज्याचा राजा श्रीराम याची कथा किंवा रामायण ही भारतीय संस्कृ तीचा मानबिंदू आहे असे म्हटले तरी चालेल. आपल्या संस्कृ तीत जे
जे उत्तम, उदात्त आणि आदर्श म्हणनू मानले जाते ते सर्व या राम या व्यक्तीरे खेत एकवटले आहे यात शंकाच नाही. ज्या काली रामायणाची मळ
ू कथा घडली असावी त्या
कालातील समाजापढु े काय आदर्श होते हे रामचरित्रावरून समजू शकते. पित्याच्या आज्ञेवरून, या राजपत्रु ाने राज्यत्याग करून वनवास पत्करला. स्वत:च्या पित्याला तीन राण्या
होत्या तरी रामाने एकपत्नीव्रत अंगिकारलेले आहे. तो कुशल योद्धा, सेनानी आणि राज्यकर्ता आहे. आलेल्या परिस्थितीपढु े अगतिक न होता त्या परिस्थितीचा सामना तो करत
राहतो व शेवटी यश मिळवतो. या सगळ्या गोष्टींमळ
ु ेच रामकथेला भारतीय जनमानसात अनन्यसाधारण महत्व मिळालेले आहे.

रामायण ही एक अगदी साधी व सरळ कथा आहे.कोसल राज्याचा राजपत्रु असलेल्या रामाचा विदेह राज्याची राजकन्या सीता हिच्याशी विवाह होतो. रामाच्या सावत्र आईची
तिच्या मल
ु ाला राज्य मिळावे अशी इच्छा असल्याने ती कारस्थानाने रामाला चौदा वर्षे वनवासाला पाठवते.भारतीय द्वीपकल्पाच्या (Peninsula) मध्यवर्ती भागात
असलेल्या, विंध्य पर्वताजवळच्या, दाट जंगलांच्यात राम, सीता व त्याचा धाकटा भाऊ लक्ष्मण हे अरण्यवासी जनांसारखे राहू लागतात.लंकेचा राक्षस राजा रावण हा सीतेचे
हरण करतो. राम एक सैन्य उभे करतो. त्यासाठी तो वानरांचा एक नेता हनमु ान याची मदत घेतो. रामाचे रावणाबरोबर तंबु ळ यद्ध
ु होते. त्यात रावण व त्याचे सैन्य हे मारले
जातात. चौदा वर्षाचा वनवास संपल्याने राम, सीता व लक्ष्मण कोसल राज्यात परततात. त्यांचे तेथे स्वागत होते. व शेवटी रामाचे राज्यारोहण होते. कथेच्या या
आराखड् यावरून हे लक्षात येते की ही कथा एखाद्या लोक कथेसारखीच आहे. यातल्या नायकाला अडचणी येतात तो त्यावर मात करण्यासाठी असिम शौर्य गाजवतो व
आपल्यापढु च्या सर्व अडचणी सोडवतो.

प्रसिद्ध इतिहासतज्ञ श्रीमती रोमिला थापर यांच्या मताप्रमाणे वाल्मिकी या कवीने, मौखिक परंपरे ने चालत आलेल्या, रामाबद्दलच्या निरनिराळ्या लोककथा व लोकगीते यांच्या
आधाराने, इ.स.पर्वू 500 या कालखंडाच्या आसपास वाल्मिकी रामायण हे महाकाव्य रचले असावे (संदर्भ 1). श्रीमती थापर यांच्याच शब्दात सांगायचे तर " रामायण हे
महाकाव्य, महाभारताच्या आधीच्या कालखंडात रचले गेले असावे असा सर्व साधारण समज आहे. तरीही त्याची भाषाशैली अतिशय Polished आहे. नंतरच्या
कोणत्याही कालखंडातल्या समाजाच्या, नीतिमत्तेच्या कल्पनांशी ते एकरूप होऊ शकते. हे महाकाव्य म्हणजे जाणीवपर्वू क रचलेली अशी संस्कृ तमधील पहिली साहित्यिक
कलाकृ ती आहे." श्रीमती थापर पढु े म्हणतात की "राम आणि रावण यांच्यातील यद्ध
ु हे गंगेच्या खोर्‍यातील एक राज्य व भारतीय द्वीपकल्पाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या,
विंध्य पर्वताच्या परिसरातल्या, अरण्यवासी गिरीजनांचे राज्य, यांच्यामधल्या स्थानिक स्वरूपाच्या झगड् याचे अतिरंजित स्वरूप वाटते. कोसल राज्य, गंगेच्या खोर्‍यात उदयास
येणार्‍या नवीन राज्यांचे प्रतिनिधी आहे तर रावणाचे राक्षस राज्य हे जगं लांच्यात रहाणार्‍या गिरीजनांच्या टोळ्यांचे अवास्तव व अतिरंजित स्वरूप आहे. मळ
ू स्वरूपात, गावात
वसाहत करून रहाणारे नगरवासी व जंगलात वास्तव करणार्‍या गिरीजन टोळ्या यातला हा संघर्ष आहे." "पढु च्या कालात, भारतीय द्वीपकल्पात मानवी वसाहती जसजशा वाढत
गेल्या तसतशी रामायणाची भौगोलिक व्याप्तीही वाढत गेली. व याचाच परिणाम म्हणनू लंका व तिथली अमाप श्रीमंती यांचा या महाकाव्यात समावेश झाला.”

रामायण, ऋग्वेद व महाभारत या तिन्ही ग्रंथावर अगदी धावती नजर टाकली तरी ऋग्वेद व महाभारत या दोन्ही ग्रंथांपेक्षा, रामायणाची नैतिक व सामाजिक मल्ू ये वेगळी असल्याचे
लगेच लक्षात येते. रामायणात राम आणि त्याचे तीन भाऊ यांच्यात प्रेम आहे. वडीलांची आज्ञा राम शिरसावंद्य मानतो तर दर्यो
ु धन वडिलांच्या आज्ञेला झगु ारून देतो. भावाचे
राज्य स्वीकारण्यास भरत नकार देतो तर पांडव व कौरव राज्यासाठी भांडत रहातात. रामायणातला राम मर्यादा परुु षोत्तम आहे. नीतिमल्ू यांची बंधने तो पाळतो. ऋग्वेदातला इद्रं
नीतिमत्तेचे कोणतेच बधं न पाळत नाही.रामायणात लैंगिक सबं धं ाबद्दलचे उल्लेख किंवा चर्चा नाही. ऋग्वेदात(सदं र्भ 2) ते अनेक ठिकाणी आहेत. (उदा.10.86,
10.95) राज्यकर्ता निष्कलंकच असला पाहिजे प्रसंगी त्याने त्याची गर्भवती पत्नी व राज्याचा वारस गमावला तरी चालेल अशा विचारांचा रामायणातला राम हा आहे.
महाभारतातील राजे पत्रु प्राप्ती होत नाही म्हणनू पत्नीला परपरुु षासाठी संबंध ठे वायला सांगतात. रामायणात कोणतीही व्यक्ती दिवास्वप्ने (Hallucinations) दाखवणारी
पेये पीत नाहीत. ऋग्वेद ज्या वनस्पतीपासनू हे पेय तयार के ले जाते त्या वनस्पतीलाच देवरूप देतो(संदर्भ 2) त्याची प्रार्थना करतो(8.79).

श्रीमती रोमिला थापर यांची वर निर्देश के लेली मते मान्य के ली तर रामायणातील काही विसंगतींचा (apparent contradictions) उलगडा होऊ शकतो.
रामायणाच्या मळ
ू कथेशी संबंध नसणारी वसिष्ठ किंवा विश्वामित्र ही पात्रे राम कथेत कशी आली? अयोध्या नगरीची निर्मिती, मनु या वेदकालीन व्यक्तीने कशी के ली? किंवा
भटक्या टोळीवाल्यांचा (Pagan) अश्वमेध यज्ञ हा विधी रामायणात कसा आला? ही पात्रे किंवा हे विधी इ.स.पर्वू 500 या शतकानंतर रामकथेत आले असावेत असा
अंदाज करता येतो.

थोडक्यात सागं ायचे म्हणजे रामायण हा नागरीकरण होणारा समाज व जगं लात रहाणार्‍या, शिकारीवर जगणार्‍या जगं ली टोळ्या याच्ं यातला कलह किंवा सघं र्ष आहे. रामकथेला,
वाल्मिकीने इ.स.पर्वू 500 च्या समु ारास महाकाव्याचे स्वरूप दिले. त्याच्या आधी ही कथा, लोक कथा किंवा लोक गीते या स्वरूपात होती.या मळ
ू कथेच्या कालाचा काही
अंदाज करता येतो का हे पढु च्या भागात बघ.ू

चद्रं शेखर

संदर्भ:-
1.Early India by Romilla Thaper pp.102-104
2.The Rig Veda by Wendy Doniger O' Flaherty

ज्या मळ
ू लोककथेवरून वाल्मिकीने रामायण हे महाकाव्य रचले ती कथा, मळ
ू कधी घडली असेल किंवा आख्यायिका म्हणनू रूढ झाली असेल याचा काही अदं ाज बांधता
येण्याची शक्यता अजमावण्याआधी काही मद्यु ांचा परामर्श घेणे योग्य ठरे ल असे मला वाटते.
1.य़द्ध
ु ाची हत्यारे :- राम लक्ष्मण यांचे मख्ु य हत्यार धनष्ु य-बाण हेच होते. रामाच्या वानर सेनेकडे असलेली प्रमख
ु हत्यारे म्हणजे मोठे पाषाण खंड व झाडांच्या तोडलेल्या फांद्या
हे होते. वानर सेना दगड व झाडे शत्रच्ु या अंगावर फे कून त्याला जायबंदी करत. राम लक्ष्मण वापरत असलेल्या बाणांची अग्रे धातंचू ी होती असा उल्लेख मला तरी कुठे आढळला
नाही.
2.सीतेची पैंजणे तिला रावणाने पळवल्यावर गळून पडली किंवा रामाने त्याची मद्रि
ु का हनमु ानाजवळ दिली. असे उल्लेख कथेत सापडतात. यावरून सोने किंवा चांदी या धातंचू ा
उपयोग करण्याची कला लोकांना ज्ञात होती असे वाटते. परंतु हत्यारे बनवण्यास उपयक्त
ु असे ब्रॉन्झ किंवा लोखंड या सारखे धातू ज्ञात नसावेत.
3.गावे किंवा नगरे आणि अरण्ये ही एकमेकापासनू फारशी दरू नसावीत. नगरांच्या सीमेवरच अरण्ये चालू होत असावीत. सीतेचा त्याग के ल्यावर रामाने तिला वनात सोडून ये
म्हणनू सांगितल्यावर, आपल्याला रामाने वनविहाराला पाठवले असावे या कल्पनेने सीता आनंदली होती. यावरून अरण्ये व नगरे ही एकमेकापासनू फारशी दरू नसावीत असे
वाटते.
4.फक्त रामायणातच, मनष्ु येतर प्राणी, कथानकातील प्रमख
ु पात्रे म्हणनू येतात. हनमु ान, वाली, सग्रु ीव, जांबवु तं व जटायु ही याची उदाहरणे आहेत. यांच्याशी कथेतले
मानव सल
ु भतेने बोलू शकतात. गिरीजन (Tribal) संस्कृ तीच्या खपू दाट प्रभावाखाली या कथेचा उगम झाला असावा असे वाटते.
5.कोसल सारखी नगर राज्ये व किष्किंधेसारखी गिरीराज्ये ही तल्ु यबळ असावीत असे वाटते.

इ.स.1870-74 या कालात, राल्फ ग्रिफिथ (RALPH T. H. GRIFFITH,) या संस्कृ ततज्ञाने, रामायणाचे पहिले भाषांतर प्रसिद्ध के ले. या
भाषांतराच्या Book I chapter XIX मधे रामज्माच्या वेळचे वर्णन आहे. या वर्णनात रामजन्मकाली आकाशातील प्रमख
ु ग्रह कोणत्या नक्षत्रसमहु ाच्या
समोर दिसत होते त्याचे वर्णन आलेले आहे. या वर्णनावरून, नवी दिल्ली येथील एक अभ्यासक श्री भटनागर यांनी रामायण काल निश्चिती करता येईल का याचा एक प्रयत्न के ला
आहे(पस्ु तक संदर्भ 1). कोणत्याही कालातील कोणत्याही दिवसाच्या कोणत्याही क्षणी, आकाशातील ग्रह व तार्‍यांची स्थाने काय असतील हे अतिशय अचक
ू पणे सांगणार्‍
या संगणक प्रणाली आता उपलब्ध आहेत अशाच एका प्रणालीचा उपयोग करून श्री भटनागर यांनी असा एक दिवस शोधनू काढला आहे की त्या दिवशी आकाशातील ग्रहांची
नक्षत्रांच्या सापेक्ष असलेली स्थाने, वाल्मिकी रामायणातील, वर्णनाशी अचक
ू पणे मिळत जळ
ु त आहेत. श्री. भटनागर यांच्या या प्रयत्नांचे पर्णू वर्णन वर दिलेल्या संदर्भ ग्रंथात
दिलेले आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी ते जरूर वाचावे. श्री भटनागर यांच्या या पस्ु तकाप्रमाणे, रामजन्माचा हा दिवस, इ.स.पर्वू 10 जानेवारी 5013 हा येतो.

श्री. भटनागर यांनी शोधनू काढलेला हा दिवस, सरळपणे मान्य करणे खपू अवघड दिसते. ग्रिफिथ साहेबाने ज्या मळ
ू संस्कृ त प्रतीचे भाषांतर के ले ती एकतर आता उपलब्ध आहे
असे वाटत नाही. तसेच त्या प्रतीची विश्वासार्हता काय आहे हे ही सांगणे कठीण आहे.

परंतु ज्या बारकाईने हे वर्णन के लेले आहे, त्यावरून एक गोष्ट मात्र दिसते की हे वर्णन Authentic असलेच, तर ते निश्चितच लोककथेच्या स्वरूपात वाल्मिकीकडे पोचले
असावे. काही सहस्त्र वर्षांनंतर कोणाही कवीला असे अचक
ू वर्णन स्वत:च्या नसु त्या कल्पनेने करता येईल असे वाटत नाही. त्यामळ
ु े इ.स.पर्वी
ू 5000 वर्षे हा रामकथेचा काल
असू शके ल का? असे पडताळून बघण्यासाठी तरी निदान हा काल गृहित धरावा असे मला वाटते.

ग्रिफिथच्या भाषांतरातील वर्णनाप्रमाणे, भरताचा जन्मकाल हा रामजन्माच्या अकरा महिने नंतरचा येतो. हा जन्मकाल, मान्य के ला तर रामकथेत सांगितलेले, भरताचे
रामाबद्दलचे बधं प्रु ेम, त्याची रामाबद्दलची भक्ती वगैरे गोष्टी जास्त सयक्ति
ु क वाटतात पण त्याच वेळी दशरथाने के लेला यज्ञ, त्याला अग्नीने दिलेला प्रसाद आणि सर्व राण्या एकाच
वेळी गरोदर राहून त्यांना झालेली पत्रु प्राप्ती, या सारख्या गोष्टी रामकथेत नंतर घसु डल्या असाव्यात असेच मानावे लागेल.

इ.स.पर्वू 5000 या कालात भारतीय द्वीपकल्पातील तात्कालिक परिस्थिती रामकथा घडण्यासारखी होती का याचा विचार पढु ील लेखात करूया.

सदं र्भ ग्रथं 1:- Dating Era of Lord Ram by Pushkar Bhatanagar

इ.स.पर्वू 5000 वर्षे या कालात, भारतीय द्वीपकल्पात असलेल्या मानवी वसाहतींची तात्कालिक परिस्थिती कशा प्रकारची होती हे आपल्याला जाणनू घ्यायचे असेल तर
आपल्याला गंगेचे खोरे सोडून, पश्चिमेकडे सिंधू नदीचे खोरे ही ओलांडून, बलचि
ु स्तानपर्यंत जावे लागेल. बलचि
ु स्तान-अफगाणिस्तान सीमेवर, बोलन खिंड म्हणनू अजनू ही
वापरात असलेली एक खिडं आहे. बोलन नदी, या खिडं ीच्या जवळ असलेल्या पर्वतराजींमधे उगम पावनू , बलचि
ु स्तानमधनू वाहत जाते व शेवटी अरबी समद्रु ाला जाउन मिळते.
या बोलन नदीच्या खोर्‍यात मेहरे गड म्हणनू एक गाव आहे. या गावाजवळ अदमासे 300 हेक्टर एवढ्या भप्रू देशात, प्राचीन काळातील परु ाण वस्तू व अवशेष सापडतात.
1976 ते 1986 या कालात, Guimet Musee या फ्रेन्च संशोधकाने मेहरे गडमधे व्यापक प्रमाणात उत्खनन के ले. या उत्खननात, अर्धवट पडलेल्या
घरांपासनू मानवी सांगाड् यांपर्यंत अनेक परु ाण वस्तु सापडल्या. या वस्तंचु े कार्बन डेटिंग के ल्यावर असे लक्षात आले की मेहरे गडच्या सभोवतालच्या भप्रू देशात, इ.स.पर्वू 7000
ते इ.स.पर्वू 3500 या प्रदीर्घ कालखडं ात मानवी वसाहती सतत होत्या. हा परिसर मानवी वस्तीसाठी अतिशय उत्तम होता. बोलन नदीमळ
ु े पाण्याची व्यवस्था होती.
आजबु ाजल
ु ा पसरलेल्या झडु पांच्या जंगलामळ
ु े , शिकारीसाठी जंगली प्राण्यांचे अस्तित्व भरपरू होते. मख्ु य म्हणजे हा भाग इराण व अफगाणिस्तान येथनू येणार्‍या नैसर्गिक
मार्गांच्यावर होता त्यामळ
ु े मेहरे गड भागात स्थायिक होण्यासाठी भटक्या टोळ्या येत राहल्या.
मेहरे गडमधे सापडलेल्या वस्तंवू रून येथील मानवी वसाहतीचे स्वरूप काय होते याची चांगली कल्पना येते. एकाच नमन्ु याच्या व मातीच्या विटांच्या घरात हे लोक रहात होते.
काही घराच्ं या बाह्य भितं ी चित्रानं ी सजवलेल्या होत्या. बार्ली व तादं ळ
ू या सारखी पिके हे लोक घेत होते व तयार धान्य साठवण्यासाठी मोठी गोदामे होती. हरणे, रानटी बकर्‍या,
मेंढ्या, नीलगाई, म्हशी वगैरे सारख्या प्राण्यांची शिकार करून त्यांचे मांस हे लोक खात असत. झेबू किंवा वशिंड असलेली गाय, बकर्‍या हे प्राणी पाळले जात होते.
इ.स.पर्वू 5000 पासनू पढु च्या कालखंडातील ज्या परु ाणवस्तू सापडल्या आहेत त्यांच्यावर सरु े ख कलाकुसर के लेली आहे. नीलमणी, Oxidized तांब्याचे मणी व इतर
Semiprecious stones चे मणी यात आहेत. एक महत्वाचा शोध म्हणजे काही मणी सतु ात ओवलेले सापडलेले आहेत. यावरून कापसापासनू सतू तयार
करण्याची कला या लोकांना माहिती होती असे दिसते. या काळातील परु ाण वस्ततू , तांब्याचे खनिज वितळवण्यासाठी लागण्यार्‍या मश
ु ी व भट् या सापडल्या आहेत.
सापडलेल्या मानवी सांगाड् यांच्या गळ्याभोवती माळा सापडल्या आहेत. या माळांच्यात तांब्याचे मणी सापडले आहेत. यावरून इ.स.पर्वू 5000 मधले मेहरे गडचे लोक ताम्र
यगु ात (chalcolithic) होते हे सिद्ध होते. त्याशिवाय एक पाषाणापासनू बनवलेले कुर्‍हाडीचे पाते मिळाले असल्याने हे लोक अजनु पाषाणाची हत्यारे ही वापरत होते हे
दिसते. मेहरे गडमधल्या उत्खननात एका विशिष्ट, के श आणि शरीर रचनेच्या व भाजलेल्या मातीपासनू (Terracotta) किंवा चिनी मातीपासनू (Ceramic)
बनवलेल्या, अनेक मर्ती
ू सापडलेल्या आहेत. ही मर्ती
ू या लोकांची महत्वाची देवी होती व तिची हे लोक आराधना करत असत असे मानले जाते. ही देवी म्हणजे अदिती असावी
असे काही संशोधकांचे म्हणणे आहे.
सिधं ु खोर्‍यातली सस्ं कृ ती, फक्त बलचि
ु स्तान-सिधं या भागापरु तीच मर्यादित नसनू , ती गगं ेच्या खोर्‍यापर्यंत पसरलेली होती हे सिद्ध झालेले आहे. त्यामळ
ु े मेहरे गड मधे
सापडलेल्या परु ाणवस्तू इ.स.पर्वू 7000 ते इ.स.पर्वू 3500 या कालामधल्या, संपर्णू भारतीय द्वीपकल्पामधील मानवी वसाहतींचे प्रातिनिधित्व करतात असे म्हटले तरी
वावगे ठरू नये.
या लेखमालेच्या मागच्या भागात आपण रामाची कथा ज्या कालात घडली असेल त्या कालाची वैशिष्ट्ये दर्शवणारे काही मद्दु े विचारात घेतले होते. मेहरे गड मधल्या लोकांची
इ.स.पर्वू 5000 मधली जीवनशैली कोसल राज्यातल्या रामकथेतील जीवनशैलीशी बर्‍यापैकी जळ
ु ते आहे असे मला तरी वाटते. निदान एवढे तरी नक्की म्हणता यावे की मळ

रामकथा या काळात घडलेली असू शकते.
मागच्या भागात निर्देश के लेला व श्री भटनागर यानं ी अभ्यासाने काढलेला, रामजन्माचा कालखडं (इ.स.पर्वू 5000) हा बरोबर असण्याची बरीच शक्यता आहे असे माझे तरी
वैयक्तिक मत झाले आहे. ही रामकथा, मौखिक परंपरे ने, लोककथा. लोकगीते यांच्या माध्यमातनू पढु े जात राहिली. त्यात अनेक गोष्टी, उपकथानके घसु डली गेली.
वाल्मिकीने इ.स.पर्वू 500 मधे या रामकथेवर आधारित वाल्मिकी रामायण रचले असावे. यज्ञांसारखी संपर्णू आर्य विचारसरणीची कर्मकांडे, त्याने किंवा इतर कोणीतरी, या
रामकथेत कधीतरी घसु वली.
आपला दसु रा महत्वाचा धर्मग्रंथ म्हणजे ऋग्वेद. हा ग्रंथ कधी रचला गेला असेल याचा विचार आपण पढु च्या भागात करू.

ऋग्वेद काल

ऋग्वेद हा ग्रंथ आपल्या धर्मग्रंथांपैकी एक महत्वाचा ग्रंथ मानला जातो. ऋग्वेद हा जरी धर्मग्रंथ असला तरी तो जमिनीवर घट्ट पाय रोवनू असलेला धर्मग्रंथ आहे. हे भौतिक जग
सोडून पारमार्थिक सख
ु ाचा मार्ग, भक्ती किंवा साधनेच्या मार्गाने आचरावा असे हा ग्रंथ कोठे ही सचु वत नाही. किंबहुना भौतिक सख
ु े मिळवण्यासाठीच धर्माचा मार्ग आहे असेच हा
ग्रथं सचु वतो. (पस्ु तक सदं र्भ 1). आरोग्य, सपं त्ती, दीर्घ आयष्ु यमान व पत्रु पौत्रप्राप्ती या भौतिक सख
ु ाच्ं या प्राप्तीसाठीच हा ग्रथं देवाचं ी प्रार्थना किंवा आराधना करण्याचे
सचु वतो. रामायण आणि महाभारत या दोन्ही ग्रंथांपेक्षा, ऋग्वेद हा ग्रंथ संपर्णू पणे भिन्न आहे. अनेक ऋषींनी के लेल्या रचनांचा हा एक संग्रह आहे असे म्हणता येईल. ऋग्वेदात,
एक मख्ु य कथासत्रू किंवा नायक, खलनायक वगैरे काहीही आढळत नाही. मख्ु यत्वे, आर्यांची कर्मकांडे करण्याची पद्धत व त्यावरील टीपाटिप्पणी सांगणारे हे एक
Manual आहे. जाताजाता, विश्वाची निर्मिती कशी झाली असेल हे सांगणार्‍या (10.129) ऋचेपासनू किंवा विश्वपरुु षाच्या अवयवांच्या हविर्भागातनू झालेली
विश्वनिर्मिती (परुु षसक्त
ु 10.90) या सारख्या अतिगहन विषयांपासनू ते बिनधोक गर्भावस्था व प्रसतु ी होण्यासाठी जपण्याच्या मंत्रापर्यंतचे(10.184) कोणतेही विषय या
धर्मग्रथं ात येतात.

या धर्मग्रथं ाची भाषा अतिशय रागं डी आहे. अर्वाचीन वाड़्मयामधल्या सभ्यतेच्या मर्यादा मनात ठे वनू हा ग्रथं वाचला तर या ग्रथं ाबद्दल मनात सभ्रं म निर्माण झाल्याशिवाय रहात
नाही. एकच उदाहरण देतो. पहाटेच्या सर्यू बिंबाचे वर्णन करताना ऋग्वेदातला कवी त्याला उषेच्या अनावृत्त वक्षस्थलाची उपमा देतो(1.92). स्त्रीपरुु ष संबंध हे पत्रु पौत्रप्राप्तीचा
मार्ग असल्याने, लैंगिक संबंधांचे या ग्रंथाला वावडे नाही. सख्या बहिणीने तिच्या भावाकडे तिला बहिण न समजता स्त्री म्हणनू समजावे ही के लेली मागणी(10.10) किंवा
परुु रवा आणि उर्वशी यांच्यातील संभाषण (10.95)ही याची काही प्रातिनिधिक उदाहरणे आहेत. ऋग्वेदातले मख्ु य देव म्हणजे इद्रं , वरूण, मरुत, अग्नी आणि सोम. या
देवांना, माणसासारखेच राग, लोभ, विषयवासना, हे गणु -अवगणु असल्याचे या ग्रंथात दिसते. दिवास्वप्ने दाखवणारा (Hallucinations) सोमरस यातले देव व
त्याचं े आराधक पितात. हे पिण्याने त्याचं ी काय अवस्था होते याचेही वर्णन(8.48, 10.136) या ग्रथं ात आहे.
हा ग्रंथ अतिशय दर्बो
ु ध आहे. यातल्या कित्येक ऋच्यांचा अर्थ तर ज्ञानी पंडितांनाही लावणे जमलेले नाही. ज्या ठिकाणी अर्थ सोपा वाटावा तिथे अत्यंत गहन अर्थ निघतो. या
बाबतीत एकच उदाहरण देतो. इद्रं , इद्रं ाणी, वृक्षकपी नावाचा वानर व त्याची पत्नी यांचे संभाषण असलेली एक ऋचा (10.86) आहे. अत्यंत प्राथमिक पातळीवर, हे
संभाषण चार व्यक्तींमधील वाटते. या संभाषणातील काही पंक्ती तर अश्लील म्हणता येतील अशा स्वरूपाच्या आहेत. परंतु याच ऋचेचा आणखी तीन पातळ्यांच्यावर विचार
के ला तर नवेच अर्थच नजरे समोर येतात.(पस्ु तक संदर्भ 1 पृष्ठ 258).
लोकमान्य टिळकानं ी 1893 मधे ओरायन (पस्ु तक सदं र्भ 2) नावाचा एक अभ्यासपर्णू ग्रथं लिहून प्रसिद्ध के ला. या ग्रथं ासबं धं ी जास्त माहिती आपण पढु े पहाणार आहोत.
या ग्रंथात लोकमान्यांनी एक संपर्णू प्रकरण या ऋचेवर लिहिले आहे. (पृष्ठ क्रमांक 166). या ऋचेचा एक नवीन आणि अतिशय महत्वाचा अर्थ लोकमान्यांनी या प्रकरणात
विशद के ला आहे.
ऋग्वेदातल्या काही ऋच्यांच्यात कोड् यांचा प्रभावी उपयोग के लेला दिसतो. त्याचा अर्थ लावणे अतिशय कठिण कार्य वाटते. उदाहरणार्थ अदिती आणि देवांचा जन्म (10.72)
या ऋचेत असे म्हटले आहे की "अदितीपासनू दक्षाचा जन्म झाला आणि दक्षापासनू अदितीचा जन्म झाला”. याचा अर्थ लावणे हे येरागबाळ्याचे काम नोहे.

ऋग्वेदाइतके आव्हानात्मक पस्ु तक माझ्यातरी पहाण्यात आलेले नाही. या ग्रंथाचे प्रत्येक वाचन तम्ु हाला नवनवीन आनंद मिळवनू देते यात शंकाच नाही. थोडक्यात असे म्हणता
येईल की मानवी आयष्ु य हा जीवनाचा एक आनंदोत्सव आहे व हा आनंदोत्सव जास्त जास्त कसा प्रभावीपणे साजरा करता येईल हे सांगणे हेच ऋग्वेदाचे प्रमख
ु सत्रू आहे.

ऋग्वेदाच्या निर्मितीकालाचा काही अंदाज बांधता येतो का हे पढु ील भागात बघ.ू

संदर्भ
1.Rig-Veda by Wendy Doniger O' Flaherty
2.Orion by B.G.Tilak

ऋग्वेदकाल- (क्रमश:)

इ.स 1893 मधे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी एक पस्ु तक लिहून प्रसिद्ध के ले. या पस्ु तकाचे नाव होते 'ओरायन'(Orion). आपण मराठीत ज्याला मृगनक्षत्र
म्हणतो त्या तारकासमहु ाचे हे यरु ोपियन नाव आहे. आपल्या सर्वांना हे माहिती आहे की पृथ्वी स्वत:च्या अक्षाभोवती सतत फिरत राहून सर्या
ू भोवती प्रदक्षिणा घालते. पृथ्वीच्या
या दोन गतींमळ
ु े निर्माण झालेल्या व सर्वसामान्यांना ज्ञात असलेल्या कक्षेशिवाय, आणखी एका कक्षेमधे, पृथीचा उत्तर धृव सतत फिरत असतो. पृथ्वीच्या या अतिरिक्त गतीला,
पराचं न गती (Precession) असे नाव आहे. या पराचं न गतीमळ
ु े आपल्याला आकाशात जे दृष्य परिणाम दिसतात त्याचं ा आधार घेऊन, काही जन्ु या आर्य ग्रथं ाचं ा काल
ठरवण्याचा, लोकमान्यांनी 'ओरायन' या पस्ु तकात प्रयत्न के ला आहे. अतिशय शास्त्रशद्ध
ु पद्धतीने लिहिलेले हे पस्ु तक, आजमितीला सद्ध
ु ा कालार्पण(Obsolete)
झालेले नाही.

परांचन गती(पस्ु तक संदर्भ 1)

स्वत:भोवती फिरणारी पृथ्वी, सर्या


ू भोवती वर्षभरात एक प्रदक्षिणा करते. या प्रदक्षिणेमळ
ु े , आपल्याला एका वर्षभरात, सर्यू आकाशातील तारकामं धनू प्रवास करताना दिसतो.
सर्या
ू च्या या मार्गाला आयनिक वृत्त असे म्हणतात. आयनिक वृत्ताची पातळी ही विषवु वृत्ताच्या पातळीशी 23.5 अंश एवढी कललेली आहे. वर्षभराच्या या परिभ्रमणात फक्त
दोन बिदं श
ंू ी ही दोन्ही वृत्ते एकमेकाला छे दतात. या बिंदनंू ा संपातबिंदू (Equinoxes) म्हणतात. यापैकी 21 मार्च ला होणार्‍या संपाताला, वसंत संपात (Spring
Equinox) असे म्हणतात तर 23 सप्टेंबरला होणार्‍या संपाताला, शरद संपात (Autumn Equinox)म्हणतात. या दोन्ही दिवशी दिवस आणि रात्र हे समान
कालावधीचे म्हणजे 12 तासाचे असतात.

मल
ु ांच्या खेळण्यातला भोवरा आपण सर्वांनी बघितलेला आहे. हा भोवरा फिरत असताना त्याच्या माथ्याकडे जर लक्ष दिले तर असे लक्षात येते की हा माथा त्या भोवर्‍याच्या
उर्ध्व-अधर अक्षाभोवती (Vertcal Axis) अगदी अल्प गतीने प्रदक्षिणा घालत असतो. स्वत:भोवती एखाद्या भोवर्‍याप्रमाणे फिरणार्‍या पृथ्वीचा उत्तर धृव, याच पद्धतीने
पृथ्वीच्या मध्यातनू जाणार्‍या व आयनिक वृत्ताला काटकोनात असणार्‍या एका अक्षाभोवती प्रदक्षिणा घालत रहातो. या एका प्रदक्षिणेचा काल 26000 वर्षे एवढा असतो.
उत्तर धृवाच्या या गतीलाच परांचन गती असे नाव आहे.

या परांचन गतीमळ
ु े पृथ्वीच्या उत्तर धृवाच्या ख-स्वस्तिक बिंदजू वळ दिसणारा तारा, कायम रहात नाही. आज या ठिकाणी धृव तारा दिसत असला तरी 5000 वर्षांपर्वी
ू या
ठिकाणी ठुबान हा तारा दिसत असे तर इ.स. 14000 मधे अभिजित हा तारा धृवतारा म्हणनू दिसेल. परांचन गतीमळ
ु े आणखी एक विलक्षण दृष्य परिणाम दिसतो. दोन्ही
संपात बिंद,ू नक्षत्रांच्या संदर्भात, मागे मागे जाताना दिसतात. (सर्यू निरनिराळ्या नक्षत्रांसमोर दिसतो) या मागे जाण्याची गती दर वर्षी 50" एवढी असते. आजमितीला,
वसंत संपात बिंदच्ू या वेळी, सर्यू उत्तर भाद्रपदा या नक्षत्रा समोर दिसतो आहे तर 7000 वर्षांपर्वी
ू तो पनु र्वसू किंवा आर्द्रा नक्षत्रासमोर दिसत होता. या विलक्षण दृष्य
परिणामाला, संपात बिंदचंू े परांचन (Precession of the Equinoxes) असे नाव आहे.

अगदी वराहमिहिर (इ.स.505-585) या भारतीय गणितज्ञाच्या कालापर्यंत, भारतीय तत्ववेत्ते व गणिती, संपात बिंदच्ंू या परांचनाबद्दल अनभिज्ञच होते(पस्ु तक संदर्भ 2).
स्वत: वराहमिहिरानेच त्याच्या पंचसिद्धांतिका या ग्रंथात आश्चर्य व्यक्त के ले आहे की सर्यू रे वती नक्षत्रासमोर असताना वसंत-संपात, व सर्यू पनु र्वसु नक्षत्रासमोर असताना
Summer Solstice (21 June) होत असल्याचे प्रत्यक्ष दिसत असताना (अर्थातच वराहमिहिराच्या कालात), जन्ु या ग्रंथात हा Summer
Solstice (21 June) , सर्यू आश्लेशा नक्षत्रासमोर असताना होतो असे कसे काय म्हटले आहे?

लोकमान्य टिळकांचे संशोधन


जन्ु या आर्य ग्रथं ाचे वाचन करत असताना लोकमान्याच्ं या हे लक्षात आले की आर्यांचे यज्ञयाग विधी व देवानं ा हविर्भाग देण्याचे विधी हे अतिशय काटेकोरपणे त्याच्ं या पचं ागं ाप्रमाणे
चालत असत. आर्यांनी वर्षाचे दोन भाग के ले होते. पहिला भाग वसतं -सपं ात दिनापासनू चालू होऊन शरद सपं ात दिनाला( ज्याला विशवु न असे नाव होते.) सपं त असे. या
कालात सर्यू विषवु वृत्ताच्या उत्तरे ला असतो. या कालाला देवायन असे नाव आर्यांनी ठे वले होते. वर्षाचा दसु रा भाग, जेंव्हा सर्यू विषवु वृत्ताच्या दक्षिणेला असतो, हा पितरायन
म्हणनू ओळखला जात असे. आर्यांचे यज्ञयाग व हविर्भाग देण्याचे विधी फक्त देवायन कालात होत असत. व हे सर्व विधी वसंत-संपात दिनापासनू सरू
ु होत.

पढु च्या कालात,(कें व्हापासनू ते माहिती नाही.) नववर्षाचा प्रथम दिन, वसंत-संपात दिवसापासनू हलवनू काहीतरी अज्ञात कारणास्तव, Winter Solstice (22
December) या दिवशी मानला जाऊ लागला. त्यामळ
ु े वर्षाचे उत्तरायण व दक्षिणायन असे दोन नवीन भाग पडले. असे जरी असले तरी यज्ञयाग व हविर्भाग देण्याचे
विधी, जन्ु या पंचांगाप्रमाणेच(वसंत- संपात दिनापासनू ) चालू राहिले.

लोकमान्यांनी आपल्या अभ्यासासाठी तीन ग्रंथ निवडले. ऋग्वेद, तैत्तरिय संहिता व वेदांग ज्योतिष हे ते ग्रंथ होते.
या तिन्ही ग्रंथात, देवांना हविर्भाग देण्याचे विधी, सर्यू कोणत्या नक्षत्रसमोर असताना आरंभ करावयाचे हे सांगितलेले आहे. म्हणजेच वसंत-संपात दिन (21 मार्च) हा या
तीन्ही ग्रथं ाप्रं माणे, सर्यू निरनिराळ्या नक्षत्रासं मोर येत असताना येत होता.

याचा अर्थ अगदी स्पष्ट होता. हे ग्रथं पर्णू पणे निरनिराळ्या कालखडं ात रचले गेले असल्याने, वसतं -सपं ात बिदं च्ंू या पराचं नामळ
ु े सर्यू निरनिराळ्या नक्षत्रसमहु ासमोर असल्याचे
निरिक्षण त्या त्या ग्रंथकारांनी के लेले होते व ते त्यांनी ग्रंथात नमदू के ले होते. ज्योतिर्विद्येच्या सहाय्याने लोकमान्यांनी या तिन्ही ग्रंथांचा काल निश्चित के ला.
ऋग्वेद - इ.स.पर्वू 4000
(वसंत संपात दिन, सर्यू मृगशीर्ष किंवा अग्रहायन नक्षत्रासमोर असताना.)
तैत्तरिय संहिता - इ.स.पर्वू 2350
( वसतं सपं ात दिन, सर्यू कृ त्तिका नक्षत्रासमोर असताना.)
वेदांग ज्योतिष - इ.स. पर्वू 1269-1181( वसंत संपात दिन, सर्यू भरणी नक्षत्रासमोर असताना.)

हे अदं ाजे कालखडं त्या त्या ग्रथं ाच्ं या सर्वात जन्ु या ऋचा जेंव्हा रचल्या गेल्या तेंव्हाचे असावेत. पढु ची अनेक शतके या ग्रथं ानं ा पढु च्या पिढीतील कवींचा हातभार लागत गेला.

वृक्षकपि व इद्रं

या लेखाच्या सरु वातीला (लेखमाला भाग 5) मी एका समजण्यास अतिशय कठिण असलेल्या अशा ऋचेचा उल्लेख के ला होता(10.86). लोकमान्यांनी या ऋचेचा अर्थ
अत्यंत सल
ु भपणे विशद के ला आहे. या ऋचेचा गोषवारा असा आहे.
(वृक्षकपि हे शरदकालीन सर्या
ू चे नाव आहे व तो इद्रं ाचा जिवलग मित्र आहे.)

"इद्रं ाचे घर उत्तरे ला असताना हा वृक्षकपि खाली (दक्षिणेला) नाहीसा झाला आहे व त्याने मृगाचे रूप धारण के ले आहे. सर्यू दक्षिणेला गेल्याने आर्यांनी इद्रं ाला हविर्भाग देणे व
सोमरस गाळणे बदं के ले आहे. त्यामळ
ु े इद्रं ाणी संतप्त होऊन तिने मृग बनलेल्या वृक्षकपिचे डोके उडवनू , कुत्र्याने त्याचे कान खावे म्हणनू त्याला सोडले आहे. इद्रं आपल्या
मित्राला इद्रं ाणीने अशी वागणक
ू देऊ नये म्हणनू विनवतो व तिची स्ततु ी करतो. इद्रं ाणी ते मान्य करते. इद्रं व इद्रं ाणी, सर्या
ू ची त्याने परत उत्तरे ला यावे म्हणनू विनवणी करतात."

या ऋचेत काही अतिशय महत्वाच्या गोष्टी सागि


ं तल्या गेल्या आहेत.
1.सर्यू विषवु वृत्ताच्या दक्षिणेला गेल्याने आर्यांचे बंद झालेले हविर्भाग.
2.शरद काली रात्री आकाशात मृग नक्षत्र दिसते आहे. म्हणजेच त्याच्या सहा महिने, आधी वसंत संपाताच्यावेळी, सूर्य मृगनक्षत्रासमोर आहे.
3. व्याध तार्‍याला व्याध न म्हणता इद्रं ाणी कुत्रा म्हणते आहे. या नक्षत्राचे यरु ोपियन नाव कुत्रा हेच ( Canine Major) आहे.
4. सर्यू परत विषवु वृत्ताच्या उत्तरे ला आल्यावर, आर्यांचे सरू
ु होणारे हविर्भाग.

लोकमान्य टिळकांनी संशोधित के लेला हा ऋग्वेदकाल, आपल्या कालदर्शक रे षेत कसा काय बसवता येतो हे पढु च्या भागात बघयू ा.

ऋग्वेदकाल (क्रमश :)

लोकमान्य टिळक यांच्या संशोधनाप्रमाणे, ऋग्वेदाच्या सर्वात जन्ु या ऋचा, इ.स.पर्वू 4000 च्या आसपास रचल्या गेल्या असाव्यात. याच कालखंडात भारतीय
द्वीपकल्पामधे, सिंधु संस्कृ ती विकसित होत होती. त्यामळ
ु े साहजिकच असा प्रश्न समोर उभा रहातो की या सिंधु संस्कृ तीच्या कोणत्याच पाऊलखणु ा ऋग्वेदात कशा दिसत
नाहीत? मेहरे गड किंवा हडप्पा येथे सापडलेली त्या कालातली घरे (अर्थात अवशेष या स्वरूपात), इमारती, धान्य साठवण्याच्या जागा, पाण्याच्या टाक्या याचा कुठे च
ऋग्वेदात उल्लेख नाही. हडप्पाला मिळालेल्या भाजलेल्या मातीच्या टाइल्सवर, चित्ररूपात दिसणार्‍या गेंडा या प्राण्याचा ऋग्वेदात कोठे ही उल्लेख सद्ध
ु ा नाही. सिधं ु सस्ं कृ तीत
अदिती किंवा मातृत्वाचे पजू न करण्यात येत होते. त्याला ऋग्वेदात स्थान नाही. ऋग्वेद हा मौखिक आहे त्याच्या रचनाकारांना कोणत्याही लिपीचे ज्ञान होते की नाही हे सांगता येत
नाही. सिंधु संस्कृ तीत चित्रलिपीच्या स्वरूपात लिपी अस्तित्वात होती. या उलट, ऋग्वेदात अत्यंत महत्वाचे स्थान पटकवणार्‍या घोडा या प्राण्याचे अस्थि अवशेष किंवा साधे
चित्र सद्ध
ु ा सिंधु संस्कृ तीत सापडलेले नाही. ऋग्वेदातील यज्ञाच्या वेदी, अत्यंत बारकाईने वर्णन के लेली यज्ञयागाची भांडी-कंु डी, सिंधु संस्कृ तीच्या अवशेषात कुठे च सापडत
नाहीत.

खरे म्हणजे या प्रश्नाचे उत्तर अगदी सरळ आहे. ऋग्वेदातील जन्ु या ऋचा रचल्या गेल्या तेंव्हाचे त्याचे रचनाकार किंवा आर्य, हे भारतीय द्वीपकल्पात त्यावेळी मळ
ु ी रहातच नव्हते.
परंतु ते कोठे रहात होते? या प्रश्नाचे उत्तर देणे मात्र कठिण आहे. कारण एकतर ते भटके टोळीवाले (Nomads) होते. त्यांच्या गरु ाढोरांना, घोड् यांना जिथे भरपरू
चारापाणी मिळेल अशा ठिकाणी त्याचं े स्थलातं र सतत चालू होते. त्यामळ
ु ेच ऋग्वेद किंवा काही इतर ग्रथं ातनू मिळालेल्या माहितीवरून इतिहासतज्ञानं ी काही अदं ाज बाधं ले
आहेत. यापैकी काही प्रमख
ु मद्दु े असे आहेत.

1.भाषा - आज प्रचलित असलेली संस्कृ त ही भाषा भारतीय-यरु ोपियन भाषागटापैकी एक समजली जाते. एका मळ
ू भाषेपासनू (Proto Indo Aryan
language) संस्कृ त, प्राचीन इराणी व यरु ोपियन भाषा उगम पावल्या असे मानले जाते. ही भाषाजननी, मध्य एशिया मधे कोठे तरी रहाणार्‍या लोकांची भाषा असावी असे
मानले जाते.

2.आर्यांच्या मध्य एशिया मधल्या अस्तित्वाबद्दल एक परु ावा उपलब्ध आहे.(पस्ु तक संदर्भ 1, पृष्ठ क्रमांक 107) सिरिया या देशाच्या उत्तर भागातील दोन टोळ्यात
(Hittites & Mitannis) इ.स.पर्वू 1400 च्या आसपास एक संधी झाला होता. या करारासाठी काही देवांनी साक्षीदार म्हणनू यावे असे आवाहन या करारात
के लेले आहे. या देवांची नावे अशी. INDARA(इद्रं ), MITRAS(IL) (मित्र), URVANAS(IL) (वरूण). या परु ाव्यावरून आर्य सिरियामधे वस्ती
करून होते असे जरी म्हणता आले नाही तरी त्या भागात आर्यांचा प्रभाव होता हे नक्की.

3.ऋग्वेद आणि पर्शियन धर्मग्रथं अवेस्टा हे ज्या भाषाच्ं यात रचले गेले आहेत त्या दोन्ही भाषा परु ातन इडं ो-यरु ोपियन भाषेपासनू च् जन्मलेल्या आहेत. या दोन्ही रचनाच्ं यात
अनेक साम्यस्थळे  आढळतात. ऋग्वेदातला 'स' हा अवेस्टा मधे 'ह' बनला आहे. ही विसंगती ध्यानात घेतली तर या दोन्ही रचनांच्यात अनेक नावे सारखीच असल्याचे
आढळून येते. उदाहरणार्थ, होम-सोम, दाह-दास, हेप्त हिदं -ु सप्त सिंध.ु अहुर-असरु . सगळ्यात विलक्षण गोष्ट म्हणजे ऋग्वेदातले इद्रं व देव हे अवेस्टामधे खलनायक बनले
आहेत तर असरु हा नायक आहे. या फरकामळ
ु े अशी एक विचारधारा पढु े आली आहे की पर्शियन व भारतीय आर्य हे विचारांच्यातील मतभेदामळ
ु े एकाच गटातनू फुटून निघालेले
असावेत.
4.सरस्वती - असे मानले जाते की आर्य टोळ्यानं ी सरस्वती नदीच्या काठी आपल्या पहिल्या वस्त्या भारतीय द्वीपकल्पात स्थापन के ल्या. ही नदी सप्त सिधं ु या भभू ागात होती व
सध्याची घग्गर नदी याच नदीचा एक भाग होती. परंतु याच आख्यायिके सारखी एक आख्यायिका अवेस्टा मधेही दिलेली आहे. या आख्यायिके प्रमाणे हरह्वती (स च्या ऐवजी ह)
ही नदी हारा (सारा) नावाच्या एका काल्पनिक पर्वतावरून वाहत येते. ती अनेक सरोवरे असलेल्या भागातनू वाहते. ऋग्वेदातली सरस्वती वृत्र या सर्पाबरोबर लढाई करते तर
अवेस्टामधल्या हरह्वतीच्या वाहण्यात दष्टु असलेल्या देवांचा एक साथीदार, अंग्र मैन्य ू हा अडथळे निर्माण करतो. या दोन्ही आख्यायिकांचा विचार के ला तर सरस्वतीची
आख्यायिका आर्य टोळ्या भारतीय द्वीपकल्प किंवा पर्शिया यांच्यात वस्ती करण्याच्या आधीची असली पाहिजे हे लगेच लक्षात येते. आर्य मध्य एशियातनू आले असावेत या
अदं ाजाला या आख्यायिके मळ
ु े पष्टु ीच मिळते.
5.कॅ निस मेजर (व्याध ) तारकासमहू - मागच्या भागात ऋग्वेदातील वृशकपी व इद्रं या ऋचेत इद्रं ाणीने के लेला कुत्र्याचा उल्लेख आपण बघितला आहे. लोकमान्य टिळकांनी
(पस्ु तक संदर्भ 2) हा कुत्रा म्हणजे कॅ निस मेजर हा तारकासमहू असल्याचे स्पष्ट के ले आहे. भारतीय ज्योतिर्विद्याशास्त्राप्रमाणे आयनिक वृत्ताच्या आसपास जे तारकासमहू आहेत
त्यांनाच नक्षत्रे म्हटले जाते व ही 27 आहेत. या व्यतिरिक्त कोणत्याही तारकासमहु ाशी (Constellations) भारतीय ज्योतिर्विद्याशास्त्र परिचित नाही. त्यामळ
ु ेच या
तारकासमहु ात असलेला सर्वात ठळक तारा व्याध हाच फक्त आपल्याला परिचित आहे. असे असनू ही ऋग्वेदातील कॅ निस मेजरचा उल्लेख, ही रचना भारतीय द्वीपकल्पाच्या बाहेर
रचलेली असल्याचे दर्शवते. अवेस्टा आणि ग्रीक परु ाणाच्ं यात मात्र या तारकासमहु ाचा कुत्रा म्हणनू च उल्लेख आहे. हा तारखासमहू साधारणपणे आकाशात शरद सपं ातापासनू
दिसू लागतो. अवेस्टामधे आणि ग्रीक परु ाणांच्यात असलेल्या या कुत्र्याबद्दलच्या आख्यायिका एकाच धर्तीच्या असल्याचे लोकमान्यांनी नमदू के ले आहे.

वरील मद्दु े लक्षात घेतले तर आर्य टोळ्या मध्य एशियामधेच इ.स.पर्वू 2000 पर्यंत तरी रहात असाव्या असा अंदाज करता येतो. वर म्हटल्याप्रमाणे, आर्य टोळ्या आपल्या
गरु ाढोरांना व घोड् यांना अन्नचारा मिळेल अशी ठिकाणे शोधण्यासाठी सतत फिरत असत. त्यांची एक शाखा गांधारमधे(पर्शिया) स्थिरावली व दसु री शाखा, अफगाणिस्तान व
इराण मार्गे येऊन सप्तसिंधु प्रदेशात स्थिरावली. यामळ
ु ेच अवेस्टा आणि ऋग्वेद यात अनेक साम्यस्थळे आढळतात. आर्यांनी सिंधु संस्कृ तीवर आक्रमण के ले असे म्हटले जाते पण
त्यात फारसे तथ्य नसावे असे आता मानले जाते.

भारतीय द्वीपकल्पात स्थलांतर के लेल्या आर्यांच्याकडे भारतात आधी स्थायिक झालेल्या लोकांच्यापेक्षा जास्त प्रगत तंत्रज्ञान, लोकांना आकर्षित करणारी नवी धार्मिक विचारसरणी
व सत्ता प्राप्त करण्याची तीव्र लालसा असली पाहिजे. त्यामळ
ु े थोड् याच शतकात त्यांनी आपल्या व्यावहारिक कल्पना भारतीय द्वीपकल्पात रुजवल्या व रूढ के ल्या. भारतीय
सस्ं कृ तीला आर्य सस्ं कृ ती असेच नाव रूढ झाले.

या नंतरच्या कालात, रामायणातील आदर्शवाद, हडप्पामधली मधली प्रगत समाजरचना व आर्यांची व्यावहारिक (Practical) विचारसरणी या तिन्हींचा मिलाफ होऊन त्या
पक्या एकजीव झाल्या व एक नवीच भारतीय संस्कृ ती उदयास आली असे म्हणता येते. या भारतीय विचारसरणीवर इ.स.600 च्या आसपास, गौतम बद्ध
ु ाच्या जन्मानंतर,
मोठाच परिणाम झाला. परंतु भारतीय संस्कृ तीचे मळ
ू जनमानसात इतके रुजले होते की बौद्ध विचारसरणी मर्यादितच राहिली.

पढु च्या लेखात आपण महाभारतकालाचा विचार करू.

संदर्भ

1.Early India by Romilla Thapar

महाभारतकाल

आपल्या सर्व धार्मिक ग्रथं ामं धे, महाभारत हा ग्रथं अद्वितीय आहे यात शक
ं ाच नाही. अदं ाजे 18 लाख शब्द असलेल्या या ग्रथं ात नव्वद हजार श्लोक व अनेक गद्य पक्त
ं ी आहेत.
या ग्रंथाचे लघरू
ु पच 24000 श्लोकांचे होते व मळ
ू स्वरूपात हा ग्रंथ 'जय' या नावाने लिहिला गेला व तो 8800 श्लोकांचा होता असे मानले जाते. महाभारतात काय आहे
असे विचारण्यापेक्षा महाभारतात काय नाही? असे विचारणे सयक्ति
ु क ठरे ल.या महाकाव्याची मख्ु य कथावस्तू अतिशय प्रभावी आहे. अनेक सरु स व चमत्कारीक उपकथांमळ
ु े हा
ग्रंथ वाचताना काही वेळेस गोंधळल्यासारखे सद्ध
ु ा होते. या ग्रंथाच्या सहाव्या पर्वात, भारतीय किंवा हिदं ु संस्कृ तीचे संपर्णू तत्वज्ञान किंवा नैतिक अधिष्ठान, भगवद‌ग् ीतेच्या
माध्यमातनू प्रत्यक्ष श्रीकृ ष्णाने सांगितले आहे.

असा हा सर्वांग परिपर्णू ग्रंथ एका रचनाकाराने थोड् याश्याच कालावधीत रचला असेल हे संभवनीयच नाही. त्यामळ
ु े महाभारताचा कालखंड काय असू शके ल हेच बघावे लागेल.
महाभारताच्या कथेत दोन महत्वाचे संदर्भ कालनिश्चितीच्या दृष्टीने आढळतात.
या सदं र्भांचा विचार आपण प्रथम करू.
1.उत्तरायण लागण्याची वाट पहात भीष्माचार्यांचे शरपंजरी पडून रहाणे.
2.गीतेच्या अकराव्या अध्यायात, मार्गशीर्ष हा सर्व महिन्यांमधे श्रेष्ठ असा महिना असल्याचे श्रीकृ ष्णाचे कथन.

आपण मागच्या भागात(भाग 6) हे बघितले आहे की ऋग्वेदकालात, आर्यांचे वर्ष वसंतसंपात दिनापासनू चालू होत असे व पहिल्या सहा मासांना देवायन असे म्हणत व उरलेल्या
सहा मासांना पितरायन असे म्हटले जाई. पढु े कधीतरी हा वर्षारंभदिन, Winter Solstice च्या दिवशी, अज्ञात कारणास्तव हलवण्यात आला व यानंतर पहिल्या सहा
मासांना उत्तरायण व पढु च्या सहा मासांना दक्षिणायन असे म्हटले जाऊ लागले.
महाभारत कथेत उत्तरायणाचा उल्लेख असल्याने साहजिकच असे अनमु ान काढता येते की वर्षारंभाचा दिन, 22 सप्टेंबर रोजी हलवण्यात आल्यानतं रच, महाभारताची रचना
झाली. यावरून अर्थ एवढाच काढता येतो की ऋग्वेदकाल आणि महाभारतकाल यांच्यामधे बराच मोठा कालखंड गेला असला पाहिजे.
गीतेतील उल्लेखाप्रमाणे, सर्व महिन्यांत मार्गशीर्ष हा श्रेष्ठ महिना आहे. याचा अर्थ जर मार्गशीर्ष हा प्रथम मास आहे असा घेतला तर तो वर्षारंभाच्या दिवसापासनू म्हणजे 22
डिसेंबर च्या आसपास सरू
ु होत असला पाहिजे. भारतीय महिन्यांची नावे, त्या महिन्यात सर्यू अस्ताला गेल्याबरोबर पर्वू क्षितिजावर जे नक्षत्र दिसू लागते त्यावरून बहुतांशी आली
आहेत. महाभारतातील इद्रं प्रस्थ म्हणजे आजची दिल्ली. या शहराजवळ, 22 डिसेंबरच्या जवळपास, सर्या
ू स्ताची वेळ झाल्यानंतर, कोणत्या कालखंडात, पर्वू
क्षितिजावर, मृगशीर्ष नक्षत्र दिसत असले पाहिजे याचा शोध संगणकाच्या सहाय्याने घेणे कोणालाही सहज शक्य आहे. असा शोध घेतला तर हा कालखंड इ.स.पर्वू 500 ते
इ.स.500 असा असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. महाभारताची रचना, या कालखडं ात झाली असल्याची शक्यता आपण इतर काही मद्यु ाच्ं या आधारे तपासू शकतो.

1.कच्छ्मधील द्वारका हे शहर श्रीकृ ष्णाच्या यादव राज्याची राजधानी मानली जाते. या ठिकाणी भारतीय परु ाणवस्तू संशोधन खाते व गोवा येथील समद्रु ासंबंधी संशोधन करणारी
National Institute of Oceanography यांनी समद्रु ात व जमिनीवर बरे च उत्खनन के लेले आहे. या संस्थेने प्रथम द्वारका येथील काही अवशेषांचे
Dating इ.स.पर्वू 1500 एवढे के ले होते. परंतु आता नवीन अभ्यासाप्रमाणे हे आधीचे निष्कर्ष चक
ु ीचे असल्याचे आढळून आले आहे. या नवीन अभ्यासात असे
आढळून आले आहे की द्वारका हे व्यापाराचे मोठे कें द्र हडप्पा कालापासनू म्हणजे इ.स.पर्वू 2500 या कालापासनू च होते. व येथे या कालापासनू सतत वस्ती होती. या
संशोधनात मातीच्या भाजलेल्या भांड्यांचे जे तक
ु डे सापडले आहेत ते प्रामख्ु याने दोन कालखंडांतील आहेत. इ.स.पर्वू 2500 ते 200 व इ.स.पर्वू 50 ते 10. हा
कालखंड एवढा दीर्घ आहे की यावरून महाभारत कालाला पष्टु ी देणारा काही परु ावा येथे सापडला आहे हे म्हणणे धाडसाचेच ठरे ल.
2.गगं ेच्या खोर्‍यात सापडलेल्या परु ाणवस्तंच्ू या Dating बद्दल असेच म्हणावे लागते की या ठिकाणी सतत इतकी सहस्त्र वर्षे वस्ती आहे की उत्खननात सापडलेल्या कोणत्याही
वस्तचू ा महाभारत कालाशी सबंध जोडण्याचा प्रयत्न बादरायणीच ठरे ल.

3.या वरील दोन मद्यु ावं रून लक्षात येऊ शकते की महाभारत कालाचा अदं ाज हा के वळ Exclusion Principle नेच करता येणे शक्य आहे.
4.आर्य टोळ्या भारतात इ.स.पर्वू 1500 च्या आसपास आल्या हे मानले तर महाभारत रचनेचा वर उल्लेख के लेला काल सयक्ति
ु क वाटतो. आर्य संस्कृ ती, भारतीय
द्वीपकल्पात सस्ु थापित होण्यासाठी एक सहस्त्राहून आधिक वर्षांचा काल परु े सा वाटतो.
5.वाल्मिकी रामायणात, महाभारतातील कोणतीच पात्रे दिसत नाहीत. मात्र महाभारतात हनमु ान आहे तसेच जाबं वु ंत आहे. यावरून महाभारत, वाल्मिकी रामायणानंतर
लिहिले गेले असावे असे अनमु ान काढले तर हाच कालखंड इ.स.पर्वू 300 ते इ.स.500 असावा असे म्हणता येणे शक्य आहे.
6.इ.स.600(मौर्य घराण्याचा काल) मधे बौद्ध धर्माचा भारतात उगम झाला. या नतं र महाभारताची रचना झाली असल्याचे कठिण वाटते.
या चर्चेवरून महाभारताचा मळ
ू ग्रंथ 'जय' व त्याचे एका महाकाव्यात रूपांतर हे इ.स.पर्वू 300 ते इ.स.500 या कालखंडात पर्णू झाले असावे असे वाटते.

कालदर्शक रेषा

या लेखमालेच्या सरु वातीला मी एका कालदर्शक रे षेचा उल्लेख के ला होता. ही कालदर्शक रे षा अशी असू शके ल.

1. इ.स.पर्वू 74000 - भारतीय द्वीपकल्पामधील सर्व मानव प्रजाती टोबा ज्वालामख


ु ीच्या उद्रेकाने नष्ट झाल्या.
2.इ.स.पर्वू 60000- मळ
ू दक्षिण भारतीयांचे अंडमान द्वीपाकडून आगमन

3.इ.स.पर्वू 40000- मळ
ू उत्तर भारतीयांचे अफगाणिस्तान-इराण कडून आगमन

4.इ.स.पर्वू 6000- भारतीय द्वीपकल्पातील सरु वातीचे नगरीकरण

5.इ.स.पर्वू 5000- रामायणाची आख्यायिका

6.इ.स.पर्वू 4000- ऋग्वेदाची रचना (मध्य एशिया मधे)

7.इ.स.पर्वू 1500- आर्यांचे सप्तसिंधु प्रदेशात स्थलांतर

8.इ.स.पर्वू 500 - वाल्मिकी रामायणाची रचना

9.इ.स.पर्वू 300 ते इ.स.500 - महाभारताची रचना

You might also like