You are on page 1of 18

1

चरित्र वाङ्मय प्रकार


- डॉ. राजाभाऊ भैलुमे

या पुस्तकातील मजकुराशी प्रकाशक सहमत असतीलच असे नाही. तसेच सदर


पुस्तकातील मजकूर कॉपी करणे किं वा इतरत्र वापरणे हा कायदे शीर गुन्हा आहे

Pustakmarket.com
$$$$$
 Language : Marathi /मराठी

 Charitra Vadmay Prakar : Dr. Rajabhau Bhailume


 चरित्र वाङ्मय प्रकार : डॉ. राजाभाऊ भैलुमे

 © Mrs. Vidya Bhailume


F-07 Jayraj Residence, fez
One, Priyadershani,
Juni Sangvi Pune-27

 Publisher
MK INFOEDUTECH PVT. LTD
Pustakmarket.com
Vrundavan Park, Anandwadi, Narayangaon

2
Tal - Junner, Dist – Pune - 410504
73854868332
pustakmarket2020@gmail.com

 DTP & Proof reading


-Santosh Bhujbal

 Cover design
- Buddhabhushan salve

 Ebook Edition
july 2021

 Pages: 28
 Price: 15 /-
 ISBN : 978-91250-61-4

$$$$$
मनोगत

साहित्य आणि त्यातील बाङ्मय प्रकार सातत्याने बदलताना दिसतात. नवनवीन वाङ्मय प्रकारांची भर पडते आहे आणि काही
काळानुसार निर्माण होणे बंद झालेले आहेत. काळ आणि ते ते वाङ्मय प्रकार यांचा अनुबंध काही प्रमाणात लावता येतो. काही वाड्मय प्रकार
थोड्याफार कारणांमुळे वेगवेगळे कल्पिले गेलेले आहे. तर एकाच वाङ्मय प्रकाराचेही अनेक उपप्रकार कल्पिले गेलेले आहेत. उदा. चरित्र,
चरित्रात्मक कादंबरी, चरित्रात्मक कविता, (अभंग) चरित्रात्मक कथा, चरित्रात्मक लेख इ. याचा अर्थ वाङ्मयीन समीक्षा अधिक चौकस, परिपूर्ण
होत चालली आहे. म्हणून एखाद्या वाङ्मय प्रकाराची संकल्पना व्यवस्थित समजून घेणे आज गरजेचे झाले आहे. साहित्याचा समाजाच्या अंगाने
आज मोठ्या प्रमाणात विचार होत असल्यामुळे त्या-त्या वाङ्मय प्रकाराची संकल्पना स्पष्ट करताना वाङ्मयीन वेगळेपणा बरोबरच ज्ञानशाखांशी
त्याचा असणारा संबंध ही पाहणे आज गरजेचे झालेले आहे. त्यानुषंगाने 'चरित्र' ही वाङ्मयीन संकल्पना वाङ्मयीन व इतर वेगवेगळ्या अंगाने पाहणे
मला गरजेचे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.
ही पुस्तिका तयार करण्यासाठी अनेक व्यक्तिं नी मला प्रेरणा, सहकार्य के लेले आहे.आमच्या शिरुर शिक्षण संस्थेचे सहसचिव
मा.नंदकु मार निकम, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के . सी. मोहिते, माझे विभाग प्रमुख प्रा.डॉ.बाळकृ ष्ण ललित, सहकारी
प्रा. क्रांती गोसावी/पैठणकर, प्रा .डॉ .विकास नायकवडी, प्रा.डॉ.सुरज सावत, प्रा.डॉ.सिद्धार्थ कांबळे इतर सर्वच महाविद्यालयातील प्राध्यापक
व प्राध्यापके तर कर्मचारी यांची प्रेरणा व सहकार्य मला लाभले. माझे वडिल आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार विजेते आ. विनायक खेमाजी भैलुमे
(तात्या) माझी माते (आई) सौ. शकुं तलविनायक भैलुमे, सासरे आ. अशोक बाबुराव शिंदे, सासू (मम्मी) सौ. कल्पना अशोक शिंदे (मामी),
थोरले बंधु आ.चंद्रशेखर भैलुमे, आ.संजय भैलुमे, वहिणी सौ. स्नेहलता भैलुमे, सौ. अनिता भैलुमे, बहिणी सौ. मीनाक्षी मिसाळ, सौ. सुनिता
गजरमळा, थोरले मेव्हणे प्राचार्य डॉ. आर. एम. मिसाळ, आ.धनंजय गजरमळा माझी सौभाग्यवती सौ. विद्या राजाभाऊ भैलुमे, कन्या राई व पूर्णा
या सर्वांची प्रेरणा मला सतत मिळाली. या पुस्तकाचे प्रकाशन पती-पत्नी श्री. व सौ. नेरकर या सर्वांचे आभार.
या पुस्तकाचे ईबुक करून हजारो वाचकांसमोर पोहचवण्याचे महत्वाचे काम पुस्तकमार्के ट डॉट कॉम या वेब पोर्टलने के ले साठी
त्यांचे आभार .

-प्रा डॉ. राजाभाऊ भैलुमे

$$$$$

3
चरित्र वाङ्मय प्रकार

सामान्यतः चरित्र हा वाङ्मय प्रकार सर्व जागतिक भाषा समूहांमध्ये प्रस्थापित झालेला आहे. त्यामुळे त्या त्या भाषेमध्ये चरित्र वाङ्मयाच्या
निकषांची चर्चा ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे. भारतीय भाषांमध्ये चरित्र वाङ्मयाचा विचार करण्यासाठी स्थूलमानाने इंग्रजी भाषेतील चर्चा
ग्राह्य मानली गेलेली आहे. त्याला मराठी भाषा ही अपवाद नाही. मराठीमध्ये चरित्र वाङ्मयाची संकल्पना व स्वरूप स्पष्ट करणाऱ्या ग्रंथांची संख्या
अतिमर्यातीत असल्याचे दिसून येते व. रा. बोरगावकर, स. दा. कऱ्हाडे, अ. म. जोशी, स. ग. मालशे, प्र. ना. परांजपे अशा महत्त्वाच्या काही
विचारवंतानी मराठीत चरित्र वाङ्मयाविषयी चर्चा करून ग्रंथ निर्मिती के लेली आहे. परंतु या संपूर्ण ग्रंथातून ही चरित्र वाङ्मयाची स्पष्ट अशी संकल्पना
अधोरेखित होत नाही. त्यामुळे इंग्रजी, संस्कृ त, हिंदी आणि मराठीतील 'चरित्र' या संकल्पनेचा मूळातूनच शोध घेणे आवश्यक आहे. त्यामुळेच
इंग्रजी, संस्कृ त, हिंदी व मराठी या विकासक्रमाने चरित्र या संकल्पनेचा विचार के ला आहे.

 इंग्रजी भाषा :
इंग्रजीमध्ये चरित्र या शब्दाला पर्यायी शब्द म्हणून Biography हा शब्द प्रमाण मानला गेलेला आहे. त्यामुळे biography या
इंग्रजी शब्दाची व्युत्पत्ती पहाता हा शब्द bio आणि graphy या दोन शब्दांच्या संयोगातून बनला आहे. या दोन्ही शब्दांचे अर्थ Oxford
Dictionary मध्ये खालीलप्रमाणे दिलेले आहेत, "bio + Comb form i) life (biography) ii) Biological of
living things (Greek bios life) (i जीवन ii सजीव) brogh'y = Comb form forming nouns denting iii)
descriptive science (geography) ii) Technique of producing images (photography) )Style or
method of writing etc. (Calligraphy)२ उपरोक्त इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीत (१. वर्णनात्मक शास्त्र, २. प्रतिमा विकसित करण्याचे तंत्र
३ लिखाणाची पद्धत ) Oxford शब्दकोशात दिलेल्या या वरील शब्दांचा अर्थ पाहता blo हा शब्द Greek birs life या शब्दापासून
आलेला आहे आणि याचा मराठीत सर्वसामान्य अर्थ जीवन व सजीव असा आहे. तर graphy या शब्दाचा मराठीत अर्थ आलेखन असा आहे.
म्हणजे biography या समग्र शब्दाचा मराठीत साररुपी अर्थ मराठीत जीवनलेख असा प्रतीत होतो. म्हणजेच व्यक्ती जीवनाचा संपूर्ण
जीवनक्रम आणि अनेकविध महत्त्वाच्या घटना व प्रसंगाना या ठिकाणी सामान्यतः जीवन आलेख म्हणता येईल. असे असले तरी इंग्रजी
शब्दकोशकारांनी biography या शब्दाचे दिलेले अर्थ पाहिले असता या शब्दाचा अर्थ स्पष्ट होईल The Oxford Dictionary and
thesaorus biography शब्दाचा अर्थ ) a written account a person's life usually by another. ii) such
writing as a branch of literature. iii) the course of a living (usuvauly human beings life.३ असे अर्थ
दिले असून त्याचे मराठी भाषेत अर्थ १) एखाद्या व्यक्तीचा व्यक्तीगत जीवनपट दुसऱ्या व्यक्तीने मांडणे म्हणजे चरित्र होय. २) ही एक साहित्याची
शाखा आहे. ३) ही एक जीवन जगण्याची शैली आहे, असे होतील. त्याचप्रमाणे collms cobuild English hunguage
Dictionary या शब्द कोशात biography = A
$$$$$
biography is an account of someone's life that has been written by someone else. 4 असा अर्थ दिलेला
आहे. याचा मराठीत अर्थ, 'एखाद्या व्यक्तीचा व्यक्तिगत जीवनपट दुसऱ्या व्यक्तीने मांडणे असा होतो.' इंग्रजी शब्दकोश The Oxford
English Dictionay यामध्ये biography = sb-2 an earlier form of (inematogroph introduced from
the U.S(CE. ANIMATOGRARH)S असा अर्थ दिला आहे. याचा मराठीत अर्थ - अमेरिकन दृष्टिकोनानुसार चरित्र लिखान
म्हणजे चित्रपट निर्मितीच्या अगोदरची पायरी होय, असा होतो. तर वीरकर कृ ष्णाजी भास्कर यांनी आपल्या Thelittle modern
dictionary biography = written life of a person .6 असा दिला आहे. Eneyclopaedia Britannica या
शब्दकोशात biography या शब्दाचा अर्थ विस्तारीतपणे दिलेला आहे. चरित्र बाङ्मय प्रकार समजून घेण्यासाठी तो अत्यंत उपयुक्त ठरणारा
आहे. यामध्ये Biography या शब्दाविषयी म्हटले आहे की, "A narrative which seeks consciously and
artistically to record the action and recreate the personality of an individual life unlike history
it deals with individual unlike fiction is records a life that actually has been lived. At the same
time the biographer shares with historian a concern for truth and he shares with the novelist
the ambition to create a work of art. Thus the great biographies of the world are those which
have gone beyond the mere collection of facts to the creation of a living portrait biography is
of perennial interest partly because it deals with famous or notorious or interesting
personalities, but more importantly because its subject matter is human nature. Hence
biography an art may legitimately deal with any individual life, no matter how humble
provided it is made the vehicle for apenetrating analysis of human passions and human
motives. It is in such biography that Samuel Johnson saw the greatest value, those." which
tell not how any man became great but how he was made happy, not how he lost the favor of
his prince, but how he become discontent with himself."7 विवेचनाचा सारांश मराठीत सांगताना असे म्हणता येईल

4
की, चरित्रामध्ये व्यक्तिमत्त्वाची पुनर्निमिती करण्यात येते. ही पुनर्निमिती करताना त्या व्यक्तीचे व्यक्तिगत जीवन, त्याचा चांगला, वाईट इतिहास
अशा सर्व गोष्टींची दखल घेतली जाते. गतकाळातील घटना प्रसंग सांगण्याच्या अनुषंगाने हे चरित्रलेखन इतिहासाच्या जवळ जाते. तर घटना
प्रसंग कलात्मकपणे मांडण्याच्या अनुषंगाने हे लेखन कादंबरी लेखनाच्याजवळ जाते. चरित्र वाड्मय हे के वळ वस्तुस्थितीची सूची असत नाही. तर
ते एक जिवंत चरित्र असते. अशा चरित्र वाङ्मयाविषयी मानवाने सातत्याने रूची दाखवलेली आहे. कारण त्या चरित्राचे कें द्रबिंदू असलेले लोक हे
मानवाच्या विविध भाव-भावनांचे, उर्मीचे प्रतिक असतात. इंग्रजी शब्दकोशामध्ये चरित्र (Biography) या शब्दाचे दिलेले अर्थ महत्त्वाचे
असून चरित्र वाङ्मय प्रकाराचे नेमके मर्म उलगडू न दाखविण्यास त्यांचे साहाय्य होते. सामान्यतः इंग्रजी शब्दकोशातून दिलेल्या अर्थातून पुढील

$$$$$

निष्कर्ष हाती येतात.


१.Biography हा शब्द इंग्रजीतील Bio आणि graphy या दोन शब्दांच्या संयोगातून बनला आहे.
२.Bio म्हणजे जीवन अथवा सजीव व graphy म्हणजे आलेख अथवा वर्णनशास्त्र किं वा लिखानाची पद्धती. ३.Biography म्हणजे
जीवन आलेखन पद्धती.
४.व्यक्ती जीवनाचा वस्तुनिष्ठ मांडलेला जीवनपट म्हणजे चरित्र.
५.अमेरिकन दृष्टीकोनानुसार तर चरित्र म्हणजे चित्रपट निर्मितीच्या अगोदरची पायरी होय.
६चरित्र म्हणजे व्यक्तिमत्वाची पुनर्निमिती होय.
७. व्यक्तिच्या जीवनातील चांगल्या व वाईट घटनांचा ऐतिहासिक दृष्ट्या के लेली मांडणी म्हणजे चरित्र.
८. एखाद्या व्यक्तिचे व्यक्तिगत जीवन कलात्मक पद्धतीने मांडताना कादंबरीच्याजवळ जाणारे लेखन म्हणजे चरित्र.
९. मानवाच्या विविध भावभावनांचे साक्षात अथवा निबंध रुप म्हणजे चरित्र.
१० . साहित्याची एक शाखा म्हणजे चरित्र.
११. एका व्यक्तिने दुसऱ्या व्यक्तिचा जीवनपट मांडणे म्हणजे चरित्र. या सर्व चरित्र या शब्दाच्या अर्थावरून हे लक्षात येते की, इंग्रजी
शब्दकोशांमध्ये चरित्र या शब्दाचा अर्थ प्रामुख्याने साहित्याच्या अंगानेच दिला आहे.

संस्कृ त भाषा :
इंग्रजी भाषेप्रमाणेच भारतातील प्राचीन ग्रंथभाषा संस्कृ त यातील 'चरित्र' शब्दाची व्युत्पत्ती व अर्थ पाहणे महत्वाचे आहे. संस्कृ तमधील
'चरित्र' या शब्दाची व्युत्पती चर+इत्र या धातूंपासून झालेली आहे.' चर म्हणजे हलवणारे, जंगम, सजीव असे त्याचे अर्थ आहेत.९' 'चरित्र' या
शब्दाचे अर्थ संस्कृ त शब्दकोशकारांनी कोणते दिले आहेत ते आपण येथे पाहू.
संस्कृ त शब्दकोशकार वि.आ.आपटे यांनी आपल्या 'संस्कृ त-मराठी' शब्दकोशात चरित्र या शब्दाचा अर्थ 'चरितम = (न) के लेले,
चरित्र वागणूक१० - असे दिलेले आहेत. वासुदेव गोविंद आपटे यांनी आपल्या संस्कृ त-मराठी शब्दकोशात 'चरित्र = (न) आचरण, अतिहास'
असे अर्थ -दिलेले आहेत.११ कै . जनार्दन विनायक ओक यांनी ही चरित= १. करणे, पाळणे, २. वर्तन, ३. स्वभाव, ४. चरित्र, इतिहास, ५.
कर्तव्य, ६. सदाचरण१२ असे विविध अर्थ दिलेले आहेत. तर वामन शिवराम आपटे यांनी आपल्या संस्कृ त-हिंदी शब्दकोशात 'चरितम=
(चर+इत्र) १. व्यवहार, आदत, चालचलन, अभ्यास, कृ त्य, कर्म, २. अनुष्ठात, पर्यवेक्षण, ३. इतिहास, जीवनचरित्र, आत्मकथा, वृत्तांत,
साहसकथा, ४. प्रकृ ति स्वभाव, ५. कर्तव्य अनुमोदित नियमों का पालन१३ " असे अर्थ दिले आहेत तर शर्मा द्वारका प्रसाद यांनी आपल्या
'संस्कृ त शब्दार्थ-कौस्तुभ' या कोशात 'चरित्र = (न) (चर+इत्र) आचरगा', व्यवहार, चालचलन, कर्तव्य, कर्मकलाप, शील, स्वभाव, सदाचार
जीवन वृत्त१४" असे अर्थ दिले आहेत. सूर्यकान्त यांनी ही आपल्या संस्कृ त शब्दकोशात 'चरित्र=न. चरित्र' व्यवहार, जीवनी" असे अर्थ दिले
आहेत. 'संस्कृ त-मराठी', 'संस्कृ त-हिंदी शब्दकोशांचा आढावा घेतला असता संस्कृ तमध्ये चरित्र या शब्दाचे अर्थ
$$$$$
१. वागणूक, २. व्यवहार, ३. इतिहास, ४. स्वभाव, ५. जीवनी ६. वर्तन, ७. कर्तव्य, ८.शील, ९, सदाचरण, १०. आत्मकथा, ११.
साहसकथा १२. वृत्तांत, १३. चालचलन, १४. अनुष्ठान, १५. जीवनचरित्र १६. पर्यवेक्षण असे दिले आहेत. हे सर्व अर्थ पहाता संस्कृ त
चरित्रकारांनी 'चरित्र' या शब्दाचा अर्थ प्रामुख्याने मानवाचे चांगले वाईट व्यवहार, कर्तव्य, भूतकालीन व वर्तमानकालीन माहिती यांच अंगाने दिले
आहेत. यातुन चरित्र वाङ्मयाची संकल्पना स्पष्ट होत नाही. कारण चरित्र या संकल्पनेकडे संस्कृ तमध्ये मानवी वर्तनाच्या अंगानेच पाहिले गेले
आहे. त्यामुळे मानवी भाषिक व्यवहाराच्या अंगानेच चरित्र ही संकल्पना संस्कृ तमध्ये प्रामुख्याने अभिप्रेत आहे. लिखित स्वरुपाच्या अंगाने याकडे
पाहण्यात आलेले दिसत नाही.

हिंदी भाषा :

5
संस्कृ तप्रमाणे भारताची राष्ट्रीय भाषा असलेल्या हिंदी भाषेमध्ये सुध्दा चरित्र या शब्दाचा अर्थ कोणते दिले आहते हे पाहणे आवश्यक
आहे. हिन्दी शब्दकोशकार चातक गोविन्द यांनी आपल्या 'आधुनिक हिन्दी शब्दकोश' या कोशात चरित्र या शब्दाचा अर्थ 'चरित= पु.स.
आचरण, व्यवहार, जीवनकी घटनाओं का विवरण, जीवनी, जीवनकथा, वृत्तांत जीवनवृत्त' असे दिले आहेत.१६ " बाहरी हरदेव आपल्या हिन्दी
शब्दकोशात चरित्र या शब्दाचा अर्थ चरित-सं. (पु) आचरण और व्यवहार, रहन-सहन, अनुचित काम निंदनीय कर्म, करतूत. (जैसे इनके चरित
की तो बात मत कीजिऐं) असे देतात१७. श्याम सुंदरम यांनी आपल्या हिंदी शब्दकोशात चरित्र या शब्दाचा अर्थ 'चरित संज्ञा पु(स) स्वभाव, वह
जो किया जाय कार्य, करनी करतूत१८, असे दिले आहेत.
हिंदी शब्दकोशकारांनी चरित्र या शब्दाचे अर्थ १. स्वभाव, २. व्यवहार, ३. जीवनचरित्र, ४. राहणीमान, ५. निंदनीय कृ त्य, ६.
कृ त्य, असे विविध अर्थ दिले आहेत. यामध्ये ही व्यक्तीची वागणूक-जी शिलाशी निगडित आहे. याच मानवी वर्तनाला, व्यवहाराला डोळ्यासमोर
ठेवून चरित्र या शब्दाचा अर्थ दिलेला दिसतो. त्यामुळे हिंदीमधील चरित्र या शब्दांच्या अर्थामध्ये चरित्र वाड्मय ही संकल्पना प्रामुख्याने नसलेली
दिसते.

मराठी भाषा :
मराठी भाषेतील शब्दकोशात 'चरित्र' या शब्दाचा काय अर्थ दिला आहे. हे पाहणेसुद्धा इतर भाषांमधील अर्थभिन्नतेच्या पार्श्वभूमीवरून
पहाता महत्त्वाचे ठरते. यासाठी मराठीच्या व्युत्पतिकोशात चरित्र या शब्दाची व्युत्पत्ती कशी के ली हे पाहणे महत्त्वाचे आहे. कृ .पा. कु लकर्णी
आपल्या 'मराठी व्युत्पतिकोशा'त चरित्र या शब्दाची व्युत्पति-'चरित्र=न-आचरण, जीवनयात्रा, कृ ति, पराक्रम (स.चर, चरित्र, चरित. ही चरित,
पं. हि चरितण, सिंह सिरित= चालरीत, उदरनिर्वाह, चरित्र चरित्र इतिहास, कथा.)१९" अशी दिली आहे. तर प्र.न.जोशी आपल्या 'आदर्श मराठी
शब्दकोशात चरित्र या शब्दाचा अर्थ 'चरित्र = (न)चरित, कृ त्य, आचरणा, वर्तन, अवस्था, स्थिती, प्रकार, देवांचे, वीरांचे पराक्रम, इतिहास
कथा, गोष्ट, प्रकार, व्यक्तीचा आयुष्यक्रम सांगणारा ग्रंथ (स)" असे दिलेले आहेत. आपटे वा.गा. यांनी ही आपल्या 'विस्तारित शब्दरलाकर' या
कोशात
$$$$$
चरित्र शब्दाचा अर्थ 'चरित्र (स.न) बर्तन, इतिहास, कथाचरित्र;२१ असा दिला आहे. तर अग्निहोत्री यांनी आपल्या'अभिनव मराठी-
मराठी शब्दकोशात' चरित्र या शब्दांचा अर्थ, चरित्र= अय, त्रे, सा. (र.सं. चरित्र) आचरणा वर्तन, अवस्था स्थिती, देव, वीर इत्यादींचे पराक्रम,
इतिहास कथा, एखाद्या व्यक्तींचा आयुष्यक्रम२२" असे दिले आहेत. महाराष्ट्र शब्दकोशात ही चरित्र या शब्दाचा अर्थ -न-चरित, कृ त्य क्रिया,
आचरण, वर्तन देवांचे वीरांचे पराक्रम, महत्कृ ये, मुर्दूमकीची कामे, इतिहास, कथा, गोष्ट प्रकार, विशिष्ट व्यक्तीचा आयुष्यक्रम तो वर्णन करणारा
ग्रंथ (सं. चरित्र)२३" असे दिलेले आहेत. तसेच सदा कऱ्हाडे ही चरित्र या शब्दाच्या व्युत्पत्ती विषयी म्हणतात. की, - "चरित अथवा चरित्र हे
शब्द संस्कृ त चर या धातूपासून सिद्ध झालेले आहेत. या धातूचे जे अनेक अर्थ आहेत त्यात करणे (To do), सिद्धीस नेणे (To
perform), कृ ती (To Act), वर्तणे (behave) हे अर्थ महत्त्वाचे आहेत. 'चरित' या शब्दाचा अर्थ ही आचरलेले (Acted
behaved) असा आहे आणि 'चरित' या शब्दाचाही अर्थ चालचलणूक किं वा वागण्याची तऱ्हा (Behaviour), र्तन(Condoct), तरी
संपादणूक
( Performance) असे आहेत.२४
मराठी शब्दकोशकारांनी चरित्र या शब्दाचे अर्थ १. आचरण, २. चरित, ३. कृ त्य, ४.वर्तन, ५.देवांचे वीरांचे पराक्रम, ६. इतिहास,
७. व्यक्तीचा आयुष्यक्रम सांगणारा ग्रंथ, ८. कथा, ९. आयुष्यक्रम, १०. अवस्था, ११. स्थिती असे विविध दिलेले आहेत. हे अर्थ देताना या
कोशकारांनी प्रामुख्याने वीरांचे, पराक्रमी पुरुषांचे, देवांचे वर्तन, आचरण, महत्कृ ये व मुर्दूमकी यावर भर दिलेला आहे. म्हणजे व्यक्तीच्या विशिष्ट
वर्तनालाच या शब्दकोशकारांनी महत्त्व दिलेले आहे. यावरून मराठीमध्ये चरित्र या शब्दाचा अर्थ वाङ्मयाच्या अंगाने दिला असला तरी चरित्रनायक
व घटना प्रसंग याविषयी या कोशकारांनी काही बंधने घातलेली दिसतात. अशा प्रकारे इंग्रजी, संस्कृ त, हिंदी, मराठी शब्दकोश पहाता वरील
'चरित्र' या शब्दाचे त्या-त्या भाषेत दिलेले दिसतात. या शब्दाचे त्या-त्या भाषेत दिलेले दिसतात. यातून चरित्र या शब्दाकडे,संकल्पनेकडे त्या
त्या भाषिक समाजाचा पहाण्याचा, भाषिक व्यवहारात वापरण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो. संस्कृ तमध्ये व्यक्तीची चांगली वाईट वागणूक, त्यातून
व्यक्त होणारा स्वभाव व व्यक्तीचा इतिहास या गोष्टींचा विचार 'चरित्र' या संकल्पनेत के ला आहे. हिंदी भाषेत ही संस्कृ तमधील वरील 'चरित्र' या
शब्दाचा अर्थ अभिप्रेत आहे. परंतु त्याचबरोबर व्यक्तीचे निंदनीय वर्तन जे शिलाच्या चारित्र्याच्या अंगाशी निगडीत आहे. अशा वर्तनाच्या अंगाने
चरित्र या शब्दाचा अर्थ घेतलेला दिसतो. संस्कृ त व हिन्दी शब्दकोशातील या अर्थावरून या भाषेत किं वा भाषिक समाजाने 'चरित्र' या शब्दाचा
अर्थ साहित्याच्या अंगाने घेतलेला नाही. तर इंग्रजी शब्दकोशात मात्र चरित्र या शब्दाचा अर्थ साहित्याच्या अंगाने घेतलेला आहे. मराठी
शब्दकोशात ही काही मर्यादित अंगाने 'चरित्र' या संकल्पनेचा साहित्याच्या अंगाने विचार के लेला आहे. संस्कृ त, हिंदी, मराठी, भाषिक समाजाने
चरित्र या शब्दाकडे प्रामुख्याने साहित्याच्या अंगाने पाहिलेले दिसत नाही. इंग्रजीच्या प्रभावाने साहित्याच्या अंगाने आता जरी ही समाज काही
प्रमाणात चरित्र या शब्दाकडे, संकल्पनेकडे पहात असला तरी मूळ दृष्टिकोन मात्र साहित्याच्या अंगाने विचार करणारा नाही. कदाचित वाड्मय व
त्याचा व्यवहार यासंबंधी हा भाषिक समाज जागृत नसल्यामुळे व के वळ धार्मिकतेच्या अंगानेच साहित्याकडे पहात असल्यामुळे 'चरित्र' या
शब्दाचा अर्थ या भाषिक समाजाने साहित्याच्या अंगाने घेतलेला नसावा. हे या भाषिक समाजाच्या वाङ्मयाचा इतिहास पाहिले असताही लक्षात
येते.
$$$$$

6
हिंदी भाषेतही संस्कृ तमधील वरील अर्थ अभिप्रेत आहे. परंतु त्याचबरोबर व्यक्तीचे निंदनीय वर्तन जे शिलाच्या चरित्र्याच्या अंगाशी
निगडीत आहे. या वर्तनाच्या अंगाने चरित्र या शब्दाचा संकल्पनेचा अर्थ जास्त प्रमाणात घेतलेला दिसतो. संस्कृ त व हिन्दी शब्दकोशातून हे
स्पष्ट होते की, 'चरित्र' या शब्दाचा अर्थ या भाषेत किं वा या भाषिक समाजाने व्यक्तीच्या वागणुकीविषयी व इतिहासाविषयी घेतलेला आहे.परंतु
चरित्र या शब्दाचा संकल्पनेचा अर्थ साहित्याच्या अंगाने संस्कृ त व हिंदी शब्दकोशात घेतलेला दिसत नाही. तर इंग्रजीच्या शब्दकोशात चरित्र
(biography) या शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेला जीवन इतिहास या अंगाने किं वा साहित्याची एक शाखा या
अर्थाने घेतलेला आहे. म्हणजे इंग्रजी भाषेत प्रामुख्याने साहित्याच्या अंगाने चरित्र ही संकल्पना वापरलेली आहे. तसेच व्यक्तीचा लिखित
इतिहास असे म्हणत असताना विशिष्ट प्रकारचा इतिहास या इंग्रजी भाषिक समाजाला अभिप्रेत आहे. हे ही या इंग्रजी शब्दकोशात चरित्र या
शब्दाचा अर्थ देताना स्पष्ट होते. तर मराठी शब्दकोशात प्रामुख्याने व्यक्तीची वागणूक, इतिहास तसेच साहित्याच्या अंगाने लिखित स्वरूपातील
व्यक्तीची माहिती, हा अर्थ चरित्र या शब्दासाठी वापरलेला दिसतो. परंतु त्याचबरोबर ती व्यक्ती कोण असावी, त्या व्यक्तीचा कोणता इतिहास,
माहिती सांगावी, लिहावी याविषयी मराठी भाषिक समाजात काही नियम आहेत की विशिष्ट व्यक्तीचे म्हणजे देव, वीर यांचे चरित्र लिहावे, सांगावे
व ते ही त्यांच्या वीरपणाच्या घटना सांगणारेच असावे. म्हणजे व्यक्तीचे वर्तन, इतिहास या अंगाने मराठी भाषेत चरित्र हा शब्द वापरला जातो.
साहित्याच्या अंगाने विचार करताना मात्र व्यक्ती कोण व वर्तन कोणते याचे बंधन घालून चरित्र ही संकल्पना वापरलेली आहे. म्हणजे चरित्र या
संकल्पनेचा, शब्दाचा मराठी भाषेत व्यवहारासंबंधी व साहित्यासंबंधी अर्थभिन्नता आहे.
वरील सर्व शब्दकोशांचा विचार करता 'चरित्र' या शब्दाचा अर्थ साहित्याच्या अंगाने इंग्रजी भाविकांनी घेतलेला आहे. तर संस्कृ त,
हिंदी व मराठी या भाषिक समाजाने मात्र दैनंदिन भाषिक व्यवहारातील अर्थ उदा. चालचलन, आचरण, स्वभाव इत्यादी असे प्रामुख्याने घेतलेले
दिसतात. कदाचित वाड्मयासंबंधी हा भाषिक समाज जागृत नसल्यामुळे व धार्मिकतेच्या अंगानेच साहित्याकडे पहात असल्यामुळे चरित्र या
शब्दाचा अर्थ सुद्धा या भाषिक समाजाने साहित्याच्या अंगाने घेतलेला दिसत नाही. या भाषिक समाजाचा वाड्मयीन इतिहास पहाता चरित्र
वाड्मयाची परिपूर्ण अशी साहित्य विषयक संकल्पना ही इंग्रजी विचारवंतांनीच मांडलेली आहे. ती या समाजाने पूर्वीपासून विचारात घेतलेली
दिसत नाही. चरित्र वाड्मयाची संकल्पना 'चरित्र' या संकल्पनेचा, शब्दाचा अर्थ इंग्रजी शब्दकोशकारांनी सुरुवातीपासून साहित्याच्या अंगाने
घेतल्यामुळे त्यांनी दिलेले चरित्र या शब्दाचे अर्थ स्पष्ट अर्थबोध करणारे दिसून येतात. त्या तुलनेत संस्कृ त, हिंदी व मराठी शब्दकोशकार 'चरित्र'
शब्दाची सखोल माडणी न करता के वळ शब्दांचे अर्थ स्पष्ट करणे वा दृष्टिकोन दिसतात. इंग्रजी शब्दकोशकार मात्र शब्दांचे अर्थ स्पष्ट
करण्याबरोबरच 'चरित्र वाङ्मय संकल्पना अधिक स्पष्ट करण्यावर देतात. त्यामुळे इंग्रजी (biography) आणि संस्कृ ती, हिंदी व मराठी
"चरित्र" या संकल्पनेचा शब्दाचा आढावा घेता 'चरित्र' म्हणजे व्यक्तींचा संपूर्ण जीवनालेख की ज्यामध्ये जीवन इतिहास सांगताना
चरित्रनायकाच्या जीवनात घडलेल्या महत्वाच्या घटनाप्रसंगाचा समावेश हवा जेणे करून त्यामुळे ती व्यक्ती, तो काळ, तो समाज आपल्या लक्षात
येईल. या गोष्टींचा समावेश हवा. तर व्यक्तीचित्रण करताना चरित्रनायकाचे वर्तन, स्वभाव, आचार, विचार,
$$$$$
व्यवहार, चारित्र्य या गोष्टी स्पष्ट होणाऱ्या गोष्टींचा समावेश हवा असे म्हणता येईल.
चरित्र वाङ्मय प्रकार :

चरित्र शब्दाच्या संदर्भात मान्यवर कोशकारांचे अर्थ विचारात घेतल्यानंतर चरित्र या वाड्मय प्रकाराची अभ्यासकांनी के लेली मांडणी
विचारात घेणे आवश्यक ठरते. म्हणजेच 'चरित्र' या शब्दाचा अर्थ पाहिल्यानंतर चरित्र वाड्मय संकल्पनेची व्याख्या अभ्यासणे हा पुढील
विवेचनाचा उद्देश आहे.
इंग्रजी, संस्कृ त, हिंदी व मराठी शब्दकोशातील 'चरित्र' या शब्दाचे अर्थ पहाता 'चरित्र' या संकल्पनेत व्यक्तीविषयी सविस्तर माहितीची
अपेक्षा आहे व या संकल्पनेत व्यक्ती ही कें द्रबिंदू आहे. म्हणजेच चरित्र या संकल्पनेनुसार ती व्यक्ती सर्वांगाने स्पष्ट झाली पाहिजे असा गर्भित अर्थ
यातून स्पष्ट होतो. असे असले तरी चरित्र या वाङ्मय प्रकाराचा विचार करणारे अभ्यासक चरित्र वाड्मयात प्रामुख्याने इतिहासावरच किं वा
व्यक्तिचित्रणावरच भर देवून, चरित्र लेखन करण्यास सांगताना दिसतात. यातून चरित्र वाङ्मय प्रकाराच्या व्याख्या करणाऱ्या अभ्यासकांचे दोन गट
पडलेले जाणवतात. एक गट इतिहास या अंगाने चरित्र वाङ्मयाचे विवेचन करणारा तर दुसरा गट व्यक्तिचित्रणाच्या अंगाने चरित्र वाङ्मयाचे विवेचन
करणारा.

१. चरित्र : इतिहास दृष्टिकोन :

इतिहास क्रम दृष्टिकोन विचारात घेवून चरित्राची मांडणी करण्यामध्ये बॉनेट, जॉन गॅरेंटी, जॉन ड्रायटन, सदा कऱ्हाडे व वि. का.
राजवाडे यांचा अंतर्भाव होतो. त्यांनी के लेला चरित्र वाड्मयाचा विचार स्थूलमानाने पुढीलप्रमाणे आहे. चरित्र वाड्मयाचा इतिहासाच्या अंगाने
विचार करताना बॉनेट म्हणतात "चरित्र म्हणजे नुसताच तपशीलवार इतिहास नव्हे तर अचूक तपशिलवार इतिहास आणि माणसाचा असा अचूक
तपशिलवार इतिहास देताना माणसाच्या के वळ जीवित कार्यावरच लक्ष देवून चालणार नाही. तर त्याचे जीवितविषयक विचार आणि त्याच्या
सभोवतालची स्थिती यांचाही समावेश त्या इतिहासात असला पाहिजे२५" बॉनेट यांना चरित्र या वाड्मय प्रकारामध्ये त्या चरित्रनायकाचा
तपशिलवार इतिहास की ज्यामध्ये इतिहास त्या व्यक्तीचे जीवित कार्य व जीवनविषयक विचार ही अभिप्रेत आहेत.जॉन गॅरेंटी "मानवी जीवनाचा

7
इतिहास म्हणजे चरित्र२६'' अशी व्याख्या करून जीवन इतिहासाला महत्त्व देतात. परंतु जीवन इतिहासाचे स्वरुप स्पष्ट करत नाहीत. अशीच
व्याख्या जॉन ड्रायटन करताना म्हणतात. "चरित्रलेखन हा विशिष्ट व्यक्तिजीवनाचा इतिहास होय'२७ ऑक्सफोर्ड शब्दकोशात ही "कलेच्या दृष्टीने
लिहिलेल्या विशिष्ट व्यक्तिजीवनाचा इतिहास म्हणजे चरित्र होय”२८ अशी व्याख्या करून के वळ चरित्रनायकाच्या जीवनातील ऐतिहासिक
घडामोडींवरच अधिक भर देतात.इतिहास क्रम, दृष्टकोन विचारात घेवून चरित्राची मांडणी करणाऱ्यांमध्ये सदा कऱ्हाडे आपल्या व्याख्येत
म्हणतात, "चरित्र म्हणजे इतिहास सत्याच्या आधारे घडविलेले एखाद्या व्यक्तीचे विश्वसनीय व अस्सल व्यक्तिदर्शन होय.२९ या ठिकाणी सदा
कऱ्हाडे इतिहासाच्या आधारे चरित्र लिखाण करत असताना त्यामध्ये सत्यता, अस्सलता व विश्वसनीयता असण्यावर भर देतात. यामुळे असे
चरित्र लिखाण समाजमान्य व वस्तुनिष्ठ होण्यास मदत होईल. परंतु चरित्रनायक ही व्यक्ती एक व्यक्ती म्हणून कशी आहे किं वा तिचे आचारविचार,
व्यवहार, चारित्र्य कसे आहे. हे यामुळे अधिकांशाने स्पष्ट होणार नाही. हे स्पष्ट होण्यासाठी त्या व्यक्तीची आवड निवड, विचार, मानसिकता ही
चित्रित करावयास हवी. ही चित्रित करण्यासाठी तार्कि कता व मानसशास्त्र $$$$$
अशा गोष्टींची आवश्यकता असल्यामुळे यासाठी काहीप्रमाणात कल्पकतेलाही वाव द्यावा लागेल. म्हणजे व्यक्तिदर्शनासाठी फक्त
इतिहासाचाच आधार घेवून चालणार नाही. वि. का. राजवाडे आपल्या विवेचनात म्हणतात, "लहान व्यक्तींची चरित्रे व मोठ्या व्यक्तींची चरित्रे
मिळून समाजाचा इतिहास होतो३०." " या ठिकाणी राजवाडे व्यक्तिच्या कौटुंबिक, व्यक्तिगत घटना, प्रसंगाना व व्यक्तीच्या स्वभावाला,
चारित्र्याला विचाराला चरित्र लेखनात महत्व देत नसल्याचे दिसते. म्हणजे राजवाडे चरित्र लिखानामध्ये सामाजिक इतिहास चित्रित करण्यावर
भर देतात. इतिहासाच्या अंगाने चरित्र लिखाण करण्यावर भर देणाच्या विचारवंतांच्या विचारामधून सामान्यतः पुढील निष्कर्ष निघतात.
१. मानवी जीवनाचा इतिहास चरित्र वाङ्मयात महत्त्वाचा असावा.
२. व्यक्तीचा जीवन इतिहास म्हणजे चरित्र.
३. जीवन चरित्रात चरित्रकाराचे जीवनविषयक विचार कार्य व त्याच्या भोवतालची परिस्थिती यांची परिपूर्ण माहिती हवी.
४. जीवन इतिहास कलात्मक पद्धतीने मांडावा.
५. इतिहासाच्या अंगाने मांडणी करताना सत्यता, अस्सल व विश्वसनीयता या गोष्टी ज्या इतिहास लेखनास आवश्यक असतात. तशाच या गोष्टी
चरित्रलेखनास आवश्यक आहेत. सामाजिक ऐतिहासिक घडामोडींचा या इतिहासात अंतर्भाव असावा. म्हणजेच या अभ्यासकांच्या मते
चरित्रलेखनात इतिहास लेखनाला प्राधान्य द्यावे हे प्राधान्य देताना तो इतिहास त्या व्यक्तींचा जीवन इतिहास असावा. तसेच त्या व्यक्तींच्या
सामाजिक, राजकीय व ऐतिहासिक घडामोडी व त्या व्यक्तीच्या जीवनविषयक विचारप्रणाली यांचा समावेश असावा व हे करत असताना ह्या
इतिहासात सत्यता, अस्सलता व विश्वसनीयता असावी. म्हणजे पुराव्यानिशी स्पष्टीकरण करावे. शेवटी हे सर्व लिखाण कलेच्या दृष्टीने लिहिलेले
असावे, असे या अभ्यासकांना वाटते. त्यामुळे इतिहास म्हणजे फक्त जीवन इतिहास अशी वरवरची संकल्पना न घेता या इतिहासात वरील
गोष्टींचा समावेश असावा. हे सांगून या अभ्यासकांनी चरित्र लेखनातील इतिहासाचे स्वरुप व चरित्रलेखनाचा उद्देश या दोन्ही गोष्टी स्पष्ट करण्याचा
प्रयत्न के ला आहे .

२. चरित्र : व्यक्तिचित्रणात्मक दृष्टिकोन :

चरित्र लेखनात चारित्रकाराचे व्यक्तीचित्रण झाले पाहिजे हा विचार घेवून चरित्राची मांडणी करण्याचा प्रयत्न व. रा. बोरगावकर,
बेक्सन, डब्ल्यू एच. एन. इत्यादी अभ्यासकांनी के लेला दिसतो. या दृष्टीने आपल्या विवेचनात व रा. बोरगावकर म्हणतात, "एखाद्या विशिष्ट
म्हणजे आगळे जीवन जगलेल्या व्यक्तीच्या जीवनातील घटनांचे कालानुक्रमाने निवेदन करीत असताना व्यक्ती जीवनाचा व त्या व्यक्तिमत्त्वाचा
साकल्याने जिवंत प्रत्यय देणाऱ्या लेखनाला चरित्रलेखन म्हणता येईल३१. बोरगावकर चरित्र लेखनात चरित्रनायकाच्या व्यक्तिजीवनाला व जिवंत
व्यक्तिमत्त्वाला महत्त्व देतात. तसेच बोरगावकर ती चरित्रनायक व्यक्ती असामान्य किं वा आगळे जीवन जगलेली असावी. या गोष्टीवरही भर देतात.
त्यामुळे चरित्रलेखनात, बोध, निती, पराक्रम, चमत्कार अशा गोष्टी बोरगावकरांना अपेक्षित असलेल्या दिसतात. यातून त्यांनी फक्त वाचकांच्याच
अंगाने चरित्र लेखनाकडे पाहिल्यासारखे वाटते. बेक्सन आपल्या व्याख्येत म्हणतात, "Biography is an account of the life of
a person ३२” यातून बेक्सन हा चरित्रलेखनात व्यक्तीच्या व्यक्तिगत जीवन वृत्तांताला महत्त्व दिले पाहिजे, अशी अपेक्षा धरताना दिसतो. डब्ल्यू
एच.एन. याविषयी म्हणतात, "चरित्र विषय होणाऱ्या व्यक्तीच्या बाह्य जीवनाचा अचूक वेध घेताना चरित्रलेखन $$$$$
तिच्या स्वभावाचे रेखीव चित्र रेखाटते आणि व्यक्तिमनाच्या विकासाच्या विविध अवस्था उलगडू न दाखविते. व्यक्तीजीवनांची स्मृती
सुरक्षित ठेवण्याच्या मानवी स्वयंप्रेरणेतून चरित्रलेखन जन्माला येते.३३" " डब्ल्यू एच. एन. या ठिकाणी चरित्र नायकाच्या व्यक्तिमत्त्वाला व
व्यक्तिमत्त्वाच्या विकासांच्या अवस्थाना महत्त्व देतात. व्यक्तिचित्रणाच्या अंगाने चरित्र लेखन करणाऱ्या या अभ्यासकांच्या विवेचनातून सामान्यतः
पुढील निष्कर्ष हाती येतात.
१. चरित्रात त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा जिवंत प्रत्यय यावा.
२. व्यक्तीचा जीवनवृत्तांत द्यावा.
३. व्यक्तिचित्रण करत असताना ह्या व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वात झालेले बदल किं वा विकास किं वा अवस्था उलगडू न दाखवाव्यात. म्हणजे
चरित्रनायकांच्या जीवनातील घडामोडींची कारणमीमांसा करुन त्या व्यक्तीचे व्यक्तिचित्रण करावे. या साऱ्या निष्कर्षातून आपणास असे म्हणता
येईल की, चरित्र लेखनात व्यक्तिचित्रणाला महत्त्व द्यावे. परंतु हे व्यक्तिचित्रण करत असताना ते व्यक्तिमत्त्व वाचकांच्या समोर जिवंत उभे के ले
पाहिजे व हे करत असताना त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात झालेले बदल किं वा व्यक्तिमत्त्वाच्या अवस्थाही उलगडू न दाखविल्या पाहिजेत, याचा अर्थ

8
ह्या व्यक्तीच्या जीवनातील घडामोडींचा स्वभावाचा आधार कलात्मकपणे मांडणी करुन जिवंत व्यक्तिमत्त्व साकार के ले पाहिजे, असे या
अभ्यासकाच्या विवेचनाचा एकत्रित विचार के ल्यावर स्पष्ट होते.
चरित्रलेखनाच्या वरील सर्व व्याख्या व विवेचन पहाता चरित्रलेखनाचा हेतू व उद्देश यांनाच या अभ्यासकांनी प्राधान्य दिलेले दिसते.
चरित्र लेखनाचे स्वरुप कसे असावे यावर मात्र प्राधान्याने कु णीही विवेचन के लेले दिसत नाही. जोसेफ शिल्ले मात्र चरित्रलेखनाच्या स्वरुपाविषयी
विवेचन करताना म्हणतात, "चरित्र हे विवक्षित माणसाच्या जीवनाचे दप्तर (Record) असते. चरित्राचे आदर्श स्वरूप म्हणजे वस्तुतः
व्यक्तिजीवनाचा जाणीवपूर्णक इतिहासच असावा आणि त्यात माणसाच्या संपूर्ण आयुष्यक्रमाचा किं वा निदान आयुष्यक्रमाच्या काही महत्त्वाच्या
भागांचा तरी समावेश त्यात असावा कारण याच गोष्टी सोईस्कररित्या चरित्राचे साहित्यरुप निश्चित करतात. कित्येकदा व्यक्तिपेक्षाही व्यक्तीचे
विचार किं वा तत्त्वज्ञान हेच महत्त्वाचे दिसतात आणि व्यक्ती ही वैयक्तिक जीवनातील सुख दुःखात्मक घटनांनी परिचित होण्यापेक्षा विचारतत्त्वामुळे
परिचित होणे शक्य व संभवनीय असते. अशावेळी चरित्रात नेमके कशाचे दर्शन घडवायचे हे लेखकावरच अवलंबून असते.”३४ " जोसेफ शिल्ले
यांचे हे चरित्र वाङ्मय विषयक विचार चरित्र वाङ्मयाचा हेतू, उद्देश व स्वरूप स्पष्ट करणारे आहे. तसेच चरित्रनायकावरुन चरित्रलेखन कसे करावे हे
अचूकपणे सांगणारे आहे. चरित्र वाङ्मयात चरित्रकाराचा चरित्रलेखनामागील दृष्टीकोन, भूमिका ही पाहणेसुद्धा किती महत्त्वाचे आहे, याची जोसेफ
शिल्ले यांनी जाणीव करुन दिली आहे.
चरित्रालेखना विषयीचे विवेचन व व्याख्या पहाता यातून हेच स्पष्ट होते की, चरित्रलेखनात इतिहास हवा. परंतु या इतिहासात त्या
व्यक्तीचा जीवनविषयक विचार, सामाजिक, राजकीय, एतिहासिक घडामोडी यांचा अंतर्भाव हवा. अशा इतिहासामुळे त्या व्यक्तीविषयी व
काळाविषयी सविस्तर माहिती या चरित्रातून मिळू शके ल, परंतु ती व्यक्ती एक व्यक्ती कशी होती. किं वा तो काळाचे, समाजाचे अपत्य असले तरी
तिचे म्हणून जे काही अस्तित्व आहे ते या ठिकाणी स्पष्ट होणार नाही. तर व्यक्तिचित्रणाला चरित्र लेखनात प्राधान्य दिल्यास ती व्यक्ती, तिचे
व्यक्तिमत्त्व सर्व अंगांनी स्पष्ट होणार नाही व व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा भाग या दोन गोष्टीच घडवत असल्यामुळे यांना दुर्लक्षून के लेले व्यक्तिचित्रण
हे नक्कीच एकांगी होईल. असे असले तरी चरित्रलेखनाविषयीचे विवेचन व व्याख्या पहाता यातून हेच स्पष्ट होते की, चरित्रलेखनात इतिहास हवा.
परंतु या इतिहासात त्या व्यक्तीचा जीवनविषयक विचार, सामाजिक, राजकीय, ऐतिहासिक घडामोडी यांचा अंतर्भाव हवा. अशा इतिहासामुळे त्या
व्यक्तिविषयी व त्या
$$$$$
काळाविषयी सविस्तर माहिती यादोन्ही बाजूंच्या अभ्यासकांनी हे चरित्रलेखन सत्याची, विश्वसनियतेची कास धरणारे असावे व याचे
लिखान कलेच्या दृष्टीनेच व्हावे यावर मात्र भर दिलेला दिसतो यातून हेच स्पष्ट होते की, चरित्र वाड्मय ही संकल्पना पूर्णांशाने सिद्ध होण्यासाठी
फक्त इतिहासाची किं वा फक्त व्यक्तिचित्रणाची गरज भासत नाही तर दोन्हीं गोष्टींचा एकत्रित परस्परपूरक असा मिलाफ कलेच्या माध्यमातून
व्हावयास हवा. तेव्हाच चरित्र बाड्मय ही संकल्पना पूर्णांशाने सिद्ध होईल. यासाठी चरित्रकाराच्या हेतूला व भूमिके लाही यादृष्टीने खूप महत्त्व आहे.
हे जोसेफ शिल्ले यांच्या विवेचनातून स्पष्ट होते.
चरित्र वाड्मयाच्या व्याख्यांचा व विवेचनांचा स्थूल स्वरुपात आढावा घेतल्यानंतर चरित्र वाङ्मयाचे स्वरूप चरित्रनायकाच्या जीवनातील
घटना प्रसंग, विचारप्रणाली यांना अनुसरून असावे. तर हेतू व उद्देश त्या चरित्रनायकाचा जीवन इतिहास व त्यानुरूप त्यांचे व्यक्तीचित्रण स्पष्ट
करणारा असावा, असे दिसते. त्यामुळे चरित्रनायकाचे जीवन सामाजिक चळवळीत अग्रभागी असणारे व विचारप्रणाली ही त्याच दृष्टीने असेल तर
अशा व्यक्तीचे चरित्र लिहिताना चरित्रकाराला समाजशास्त्रीय दृष्टीने चरित्रनायकाच्या एकू ण जीवनाचा विचार करावा लागेल. परंतु एखादा
चरित्रनायक एकाचवेळी सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, सांस्कृ तिक चळवळी करणारा, त्यानुसार तत्त्वज्ञान मांडणारा व हे करत
असतानाच एक इतिहासकार, विधितज्ञ, अर्थतज्ञ, समाजतज्ञ, संसदपटू , वास्तूशास्त्रज्ञ, शिक्षणतज्ञ, पत्रकार, भाषातज्ञ, संशोधक,
साहित्यरसिक अशा विविध व्यक्तिमत्त्वांमध्येही तेवढ्याच ताकदीने वावरत असेल तर अशा चरित्रनायकांचे चरित्रलेखन करणाऱ्या चरित्रकाराजवळ
सुद्धा एवढीच वैचारिकता व एवढेच व्यक्तिमत्त्वाचे पैलूही त्याच्या व्यक्तिमत्त्वात असणे गरजेचे आहे. तरच या प्रत्येक पैलूचा सूक्ष्मपणे अभ्यास
करून त्यावर तो चरित्रकार चरित्रलेखन करु शके ल. त्यामुळे कमीत कमी त्या चरित्रकाराच्या अंगी एक इतिहासकार, समाजशास्त्रज्ञ, राजकीय
विचारवंत, अर्थतज्ञ संशोधक व एक साहित्यरसिक असे पैलू असणे आवश्यक आहे. कारण कोणतीही व्यक्ती इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र
या शाखांच्या व्यापकतेमध्ये येत असल्यामुळे किमान या शाखांची व्यवस्थित माहिती तर त्या चरित्रकाराला हवी. त्या दृष्टिकोनातून पुढील
विवेचनात आपण चरित्र व या शास्त्रांचा परस्परपूरक संबंध व त्यातील विरोधाभास यांचा विचार अपरिहार्य असल्याने या शास्त्राचे व चरित्राचे
तुलनात्मक विवेचन पुढे के ले आहे.

चरित्र वाङ्मय प्रकाराचे घटक :


१.व्यक्तिचित्रण(स्वभाचित्रण)
चरित्रलेखनात इतर गोष्टींबरोबरच चरित्रनायकाच्या व्यक्तिमत्त्वाच्या दर्शनालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. सिडने लॉ तर चरित्राची
व्याख्या ही याच अंगाने करतो. ते म्हणतात, "A truthful transmission of personality" ३५" मानवी व्यक्तिमत्त्वाचे सत्यपूर्ण
व कलात्मक दर्शन म्हणजे चरित्र होय.”

9
तसेच मानवी जीवन हाच चरित्राचा प्रधान विषय असल्यामुळे व्यक्तिचित्रण हा चरित्राचा गाभा ठरतो. चरित्रात इतिहासालाही महत्त्वाचे
स्थान असले तरी इतिहास म्हणजे 'व्यक्तीचा इतिहास' ही गोष्ट इथे महत्त्वाची आहे, म्हणून कार्लाईल म्हणतो, “चरित्र म्हणजे एका व्यक्तींचा
इतिहास आणि अनेक चरित्रे म्हणजे राष्ट्राचा इतिहास३६”. याठिकाणी व्यक्तीचा इतिहास म्हणत असताना या इतिहासात व्यक्तीला $$$$$
महत्त्वाचे३७” स्थान कार्लाईन देतो. म्हणजे इतिहासाच्या अंगानेही चरित्राचा विचार करता 'व्यक्ती' महत्त्वाची आहे. याविषयी प्रा. अ. म. जोशी
म्हणतात, “व्यक्तीला जणू सूक्ष्मदर्शक यंत्राखाली धरुन तिची तपासणी करणे हे चरित्रात जास्त महत्त्वाचे."" यामुळे चरित्रात व्यक्तीचित्रणाला
कें द्रवर्ती स्थान असून इतर गोष्टी त्याला अनुसरुनच येतात हे यातून स्पष्ट होते. चरित्रात व्यक्ती चित्रणाला अधिक महत्त्व असल्यामुळे
चरित्रनायकाचा वभाव, व्यक्तिमत्त्व व त्याचे पैलू, अंतर्मन व बहिर्मन उलगडू न दाखविण्यावरच अधिक भर दिलेला असतो. म्हणजे या माध्यमातून
चरित्रनायक जिवंत उभा चाच प्रयत्न के ला जातो. चरित्रनायकाचे व्यक्तिचित्रण करून तो जर चरित्रकाराला जिवंत करता आला तरच ते चरित्र
वाचनीय, आदर्शवत होते, अन्यथा नाही. कारण चरित्र लिखाण करताना चरित्रकार व चरित्र वाचताना वाचक हे दोघेही चरित्रनायक
डोळ्यासमोर ठेवून आप-आपले कार्य करत असतात. त्यामुळे चरित्र वाङ्मयात चरित्र नायकाचे व्यक्तिचित्रण हा खूप महत्त्वाचा घटक आहे

२. घटना आणि प्रसंग वर्णन :


चरित्रलेखनात व्यक्तिचित्रणाला महत्त्व असले तरी हे व्यक्तिचित्रण चरित्रनायकाच्या जीवनातील घटना प्रसंगाशिवाय पूर्ण होत नाही.
त्यामुळे चरित्रलेखनात घटना प्रसंगांना ह्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून चरित्रात चरित्रनायकाच्या जीवनातील किं वा समाजातील घटना
प्रसंग देत असताना त्या घटना प्रसंगांचा व चरित्रनायकाचा जो संबंध आहे. त्यावर अधिक भर देणे महत्त्वाचे आहे. म्हणजेच चरित्रात घटना-प्रसंग
हे सुटे सुटे न येता चरित्रनायकाच्या अंगानेच घटना-प्रसंग चरित्रात आले पाहिजेत. तरच त्या घटना प्रसंगांना महत्त्व आहे. नाहीतर चरित्रात
नुसतेच घटना-प्रसंग सांगितले गेले तर ते चरित्र वाड्मय संकल्पनेला छेद दिल्यासारखे होईल.

३. निवेदन शैली :
चरित्र वाड्मयात निवेदनाला महत्त्वाचे स्थान आहे. कारण चरित्रकाराला चरित्रनायकाच्या जीवनातील ऐतिहासिक, सामाजिक,
राजकीय, धार्मिक, आर्थिक व कौटुंबिक घडामोडी. त्या संबंधीचे त्यांचे वर्तन, भूमिका, विचार यांचा व चरित्रनायकाचे लिखित साहित्य अशा
विविध साधनाच्या आधारे चरित्रकाराचा जीवन इतिहास, व्यक्तित्त्व, व्यक्तिमत्त्व विकास स्पष्ट करावयाचा असतो. यावेळी चरित्रकाराला या
साधनाच्या साहाय्याने निवेदन करुन हे सर्व साधायचे असते. त्यामुळे चरित्रलेखनात निवेदन शैलीला खूप महत्त्व आहे. चरित्रात चरित्रनायक
जिवंत करावयाचा असतो व हा चरित्रनायक घटना-प्रसंग देत जिवंत करता येत नाही तर यांच्या साहाय्याने निवेदनाच्या माध्यमातून चरित्रनायक
जिवंत करता येतो. म्हणून चरित्र लिहीत असताना चरित्रलेखनास उपयुक्त साधनेच जमवून चालणार नाही किं वा नुसत्या घटना-प्रसंगाच्या
माध्यमातून चरित्रनायकांविषयी उपयुक्त माहिती देऊन चरित्र पूर्णत्वास येत नाही तर यांचा कलात्मकपणे उपयोग करून निवेदनाच्या साहाय्याने
चरित्रनायकाचा जीवन इतिहास व व्यक्तिमत्त्व स्पष्ट करावयाचे असते. यावरुन चरित्रलेखनात निवेदनाला किती महत्त्व आहे हे स्पष्ट होते.

$$$$$
४. भाषा :
कोणत्याही साहित्यप्रकार भाषेशिवाय संभवत नाही. तसेच भाषेच्या माध्यमातूनच कोणत्याही साहित्य प्रकाराला उठावदारपणा,
बहारदारपणा, जिवंतपणा आणण्याचे काम ही भाषेच्या माध्यमातूनच के ले जाते. चरित्र वाङ्मयातही भाषेला खूप महत्त्व आहे. कारण चरित्र वाङ्मयात
तटस्थपणा, सत्यता व वस्तुनिष्ठता आवश्यक असून तपशिलासह सर्व नोंदी द्यावयाच्या असल्यामुळे चरित्र वाङ्मय हा प्रकार शास्त्र व कला या
दोन्ही शाखांच्या सीमारेषेवरील प्रकार ठरतो. त्यामुळे चरित्रलेखन करताना भाषेचा जपूनच, तारतम्यानेच वापर करावा लागतो. नाहीतर चरित्र
वाङ्मयाची संकल्पना नष्ट होते. कारण भाषेचा जर कलात्मकतेच्या अंगाने जास्त वापर के ला तर त्या चरित्राला चरित्रात्मक कादंबरीचे स्वरूप येते
व शास्त्राच्या अंगाने भाषेचा वापर के ला तर त्याला वृत्तपत्रलेखनाचे किं वा इतिहासलेखनाचे स्वरूप प्राप्त होते. म्हणून चरित्रलेखनात भाषेला
किं बहुना भाषेच्या वापराला खूप महत्त्व आहे.

५. सत्यता किं वा ऐतिहासिक वस्तुनिष्ठता :


चरित्र वाङ्मयाची सर्वधूरा ही सत्यता व ऐतिहासिक वस्तुनिष्ठता यावर अवलंबून आहे. कारण जर चरित्रात या गोष्टी नसतील तर ते
चरित्र एक ललित साहित्यकृ ती ठरेल. म्हणून चरित्रलेखन करताना चरित्रलेखनासाठी आवश्यक साधनसामुग्री गोळा करून व त्यातील सत्य-

10
असत्यता पडताळून त्या सामुग्रीच्या साह्याने चरित्रलेखन करावयाचे असते. तरच ते चरित्र विश्वसनीय असे होते. चरित्राच्या मूल्यमापनाच्या
दृष्टीने विश्वसनीयता, सत्यता व ऐतिहासिक वस्तुनिष्ठता खूप महत्त्वाची आहे. जर या गोष्टी चरित्रात नसतील तर त्या चरित्राला आपोआपच शून्य
किं मत येते. चरित्रलेखनासाठी वरील घटकांची उपयुक्तता पहाता चरित्र वाङ्मयातील या घटकांचे महत्त्व स्पष्ट होते

 चरित्र व इतिहास :
चरित्र लेखनात जीवन इतिहासाला व ऐतिहासिक घडामोडींना महत्त्वाचे स्थान असल्यामुळे ‘चरित्र' व 'इतिहास' या दोन्ही शाखांचा
संबंध कसा व कु ठे येतो हे पाहणे महत्त्वाचे ठरते. यादृष्टीने कार्लाइल व.रा. बोरगावरक, निकोल्स अशा अभ्यासकांनी आप-आपली मते मांडलेली
आहे. याविषयी कालांइल म्हणतो की "चरित्र म्हणजे एका व्यक्तिचा इतिहास आणि इतिहास म्हणजे अनेक व्यक्तींची चरित्र”,३८ “ यातून इतिहास
आणि चरित्र या वाङ्मयाची एकरूपता स्पष्ट होते. इतिहासात व्यक्ती येतात परंतु त्या व्यक्ती त्या काळाची अपत्ये म्हणून येतात. त्यामुळे त्या व्यक्ती
व तो काळ वेगळा करता येत नाही. म्हणून चरित्रलेखनासाठी ऐतिहासिक दृष्टिकोन आवश्यक व पूरक ठरणारा आहे. असे असले तरी इतिहास
लेखनामध्ये कालखंडात झालेल्या बदलाचा व्यापक पट मांडलेला असतो. व्यक्तीचे जीवन त्या व्यापक कालखंडाने घडविलेले असले तरी
चरित्रलेखनात चरित्रनायकाच्या व्यक्तिगत अनुभवांचा व व्यक्तिमत्वांचा, अनेक पैलूंचाही विचार के लेला असतो. म्हणजेच इतिहास एका व्यापक
व्यवस्थेची मांडणी करतो तर चरित्रलेखन व्यक्तिगत जीवनातील घटनाक्रमांच्या आधारे चरित्रनायक ही त्या कालखंडातील एक व्यक्ती म्हणून कशी
आहे हे स्पष्ट
$$$$$
करतो. म्हणजे इतिहास व्यक्तीपेक्षा काळाला महत्त्व देतो आणि चरित्रकार व्यक्तीला महत्त्व देतो. त्यात काळाचे चित्र पार्श्वभूमी म्हणून के वळ
महत्त्वाचे असते. याविषयी व.रा. बोरगावकर म्हणतात की "इतिहासात आरंभ व शेवट ही दोन्ही टोके निश्चित असत नाहीत. त्यामुळे त्यात
व्यक्तींच्या लौकिक, सामाजिक जीवनाचाच विचार करावा लागतो. व्यक्तींचा व्यक्ती म्हणून विचार इतिहासात काळाच्या संदर्भात होतो.
इतिहासकाराला एखाद्या विशिष्ट कालखंडात होऊन गेलेल्या व्यक्तींशी एकाच वेळी व तौलनिकदृष्ट्या समरस व्हावयाचे असते. इतिहासात
व्यक्तींची गर्दी असते. शिवाय इतिहासलेखक व्यक्तिनिरपेक्षपणे लिहित असतो त्या लेखनात तर्काला महत्त्व येते."३९" काळाच्या चरित्रात
व्यक्तिविशिष्टत्वाला महत्त्व नसते. तर चरित्रात इतिहासाच्या अंगाने व्यक्तिविशिष्टत्वच प्रकट होत असते व त्यानुरुपच कथनाची, निवेदनाची,
भाषाशैली वापरली जाते. त्यामुळे चरित्राला वाङ्मयीन स्वरूप प्राप्त होते. हेरॉल्ड निकोल्सच्या मते "इतिहास, व्यक्तिविशिष्टता व वाङ्मयीनता
यांपैकी कोणत्याही एका तत्त्वाला बाधा आली किं वा अनुचित प्रमाणात या तत्त्वांची सरमिसळ झाली तर ते चरित्र अशुद्ध स्वरूपाचे होते","
हेरॉल्ड निकोल्सच्या मतानुसार चरित्र लेखनात, इतिहास व्यक्तिविशिष्टता व वाङ्मयीनता या गोष्टींना समतोल प्राधान्य द्यायला हवे. म्हणजे
चरित्रातील आशय इतिहासाकडू न, चरित्राची अभिव्यक्ती वाङ्मयाकडू न व या दोघांच्या साह्याने व्यक्तिविशिष्टता स्पष्ट के ली तरच ते चरित्र चांगले
दोषमुक्त होऊ शकते. त्यामुळे 'चरित्र' हा नुसताच स्वतंत्र वाङ्मय प्रकार आहे, असे नव्हे तर ललित वाङ्मय व ललितेवर वाङ्मय यांच्या सीमारेषेवर असणारा हा
चरित्र वाङ्मय प्रकार आहे, असेच म्हणावे लागेल.
चरित्रलेखन सामुग्रीचा विचार करता ही सामुग्री इतिहास लेखनाच्या सामग्रीपेक्षा भिन्न स्वरूपाची आहे. चरित्रलेखनासाठी ऐकीव
माहिती, दंतकथा, आख्यायिका, रूप, बोलणे, चालणे, दिनचर्या, सवयी, लकबी, छंद, व्यक्तीचे व्यवसाय, कौटुंबिक जीवन, संबंधाचे स्वरूप,
सुख दुःखे, भावविश्वे, छायाचित्रे वृत्तपत्रांतीलनोंदी,पत्रव्यवहार, दैनंदिनी इत्यादी सामुग्री उपयोगी ठरते. इतिहासलेखनाची भूमिका सिद्ध
होण्यासाठी बराच कालावधी जावा लागतो. त्यामुळे इतिहास लेखनासाठी समकालीनत्व उपकारक ठरत नाही. याउलट चरित्रलेखन करताना मात्र
समकालीनत्व विश्वसनीयत्वाच्या दृष्टीने उपकारक ठरते. तसेच व्यक्तिनिरपेक्ष वस्तुनिष्ठतेच्या अंगाने इतिहास लिहिला जातो. तर चरित्रलेखन
व्यक्तिनिष्ठ अंगाने के ले जाते व हे करताना निवेदनाच्या ओघात चरित्रविषयक झालेली व्यक्ती, तिचे जीवन ह्यांची सर्जनाच्या प्रक्रियेतून नवनिर्मिती
कारत असते तर इतिहासात अगणित घटनांची साखळी जोडायची असते.

 चरित्र आणि राज्यशास्त्र :


सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा अपरिहार्यपणे राजकारण आणि राज्यासंस्थेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सबंध येत
असतो. कारण राजकारण आणि राजसत्ता ही मानवी जीवनाच्या स्थगितीचीशी कमी अधिक प्रमाणात निगडीत असते.राजसत्तेने घेतलेला निर्णय
मानवी जीवनाच्या विकासक्रमाला काही वेळा गती देणारा तर काही वेळा गती देणारा तर काही वेळा गतिरोधक ठरू शकतो. त्यामुळे हे संबंध स्पष्ट
करण्यासाठी राज्यशास्त्र ही संकल्पना समजून घेणे अत्यावश्यक ठरते. राज्यशास्त्राची व्याख्या करताना ब्लंटश्ली म्हणतो की, "राज्यशास्त्र हे
असे शास्त्र आहे की, ज्यामध्ये राज्याचे स्वरूप, आधारभूत राज्याची अभिव्यक्ती आणि विकास यांचा विचार के ला जातो." तर गेटेल म्हणतात
की, "ऐतिहासिक दृष्टिकोनातून भूतकाळात राज्य कसे होते, वर्तमानकाळात राज्य कसे आहे आणि नैतिकदृष्ट्या भविष्यकाळात राज्य कसे
असावे, यासंबंधीचा अभ्यास करण्याच्या शाखाला 'राज्यशास्त्र' असे म्हणतात " $$$$$
तर पॉल जेनेट म्हणता की, "राज्यशास्त्र हा सामाजिकशास्त्राचा असा भाग आहे की, ज्यामध्ये राज्याची आधारभूत तत्त्वे आणि शासनसंस्थेची
तत्वे यांचा अभ्यास के ला जातो४१”. यातून हेच स्पष्ट होते की, भूतकाळातील राज्यव्यवस्था कशी होती आता वर्तमानात अशी आहे व

11
भविष्यकाळात कशी असावी याविषयी तात्त्विक विचार करणारी व नैतिकतेच्या दृष्टीने समाजहित पाहणारी व्यवस्था म्हणजे राज्यशास्त्र होय. ही
शाखा एवढी व्यापक असल्यामुळे कोणत्याही स्तरातील चरित्रनायकाचा व राज्यशास्त्राचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संबंध येतो.राज्यशास्त्रात तिन्ही
काळातील समाजाचा विचार होत असल्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा अपरिहार्यपणे राजकारण आणि
राज्यसंस्थेशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या संबंध येत असतो. कारण राजकारण आणि राज्यसत्ता ही मानवी जीवनाच्या स्थितीगतीशी कमी अधिक
प्रमाणात निगडीत असते. राजसत्तेने घेतलेला निर्णय मानवी जीवनाच्या विकासक्रमाला काही वेळा गती देणारा तर काही वेळा गतीरोधक ठरू
शकतो. त्यामुळे हे संबंध स्पष्ट करण्यासाठी राज्यशास्त्र ही संकल्पना समजून घेणे राज्यशास्त्राचा अभ्यास करताना चरित्र वाङ्मयाचा खूप उपयोग
होत असल्याचे दिसते. कारण सुरुवातीच्या
काळामध्ये पराक्रमी वीर, अशा व्यक्तींची किं वा राजांची चरित्रे लिहिली जात. अशा या चरित्रामध्ये राजाच्या जीवनवृत्ताबरोबरच त्या
राजाची राज्याविषयीची भावना ही कळत नकळत व्यक्त
झालेली आहे. त्यामुळे पूर्वी राज्यव्यवस्था कशी होती व त्यात बदल कसे झाले हे सर्व पाहण्यासाठी राज्यशास्त्रातील संशोधकाला चरित्र
वाङ्मयाचाच आधार घ्यावा लागतो. तसेच ज्या व्यक्तीचे चरित्र लिहावयाचे आहे ती व्यक्ती कोणत्या राज्यातील आहे. त्या राज्यातील राजकीय
घडामोडींचा त्या व्यक्तीवर काय परिणाम झाला, हे पाहण्यासाठी त्याकाळातील राजकीय परिस्थिती, घडामोडी पाहणे महत्वाचे ठरते. तसेच ज्या
व्यक्तींचे जीवन राजकारणाशी निगडीत आहे. अशा व्यक्तीच्या जीवनातील घडामोडी पाहत असताना किं वा स्पष्ट करताना त्या व्यक्तीची राजकीय
विचारप्रणाली, त्या काळातील इतर राजकीय प्रणाली व राजकीय व्यवस्था कशा होत्या हे पाहणे महत्वाचे ठरते. अशा राजकारणात सक्रीय
असणाऱ्या व्यक्तींची चरित्रे ही त्या काळातील राजकीय विचारप्रणाली व राजकीय व्यवस्था, घडामोडी समजून घेण्यास फार महत्त्वाच्या ठरतात.
यादृष्टीने डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी यांची चरित्रे सांगता येतील. यातून चरित्र वाङ्मय व राज्यशास्त्र यांचे परस्परपूरक संबंध स्पष्ट होतात.

चरित्र आणि धर्म :


धर्म ही खूप व्यापक अशी संकल्पना आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर, व्यक्तिमत्वावर याचा परिणाम हा झालेला असतो,
असे असल्यामुळे चरित्रनायकाचे व्यक्तिमत्व स्पष्ट करत असताना त्या व्यक्तीवर कोणत्या धर्मविचारांचा पगडा आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरते. तसेच
त्या नायकाच्या इतर घटना प्रसंगाचे स्वरूप स्पष्ट करताना किं वा संबंध स्पष्ट करत असतानाही 'धर्म' या संकल्पनेचा विचार हा करावा लागतो. हा
विचार चरित्रनायकाचा जन्म ते मृत्युपर्यंतच्या काळापर्यंत करावा लागत असल्यामुळे चरित्र वाङ्मयाचा अभ्यास करत असताना धर्म ही संकल्पना
अपरिहार्यपणे विचारात घ्यावीच लागते. तसेच धर्म ही संकल्पना व्यक्तीच्या जीवनावर कशी परिणाम करते, किं वा व्यक्तीचे जीवन कसे व्यापते हे
पाहण्यासाठी किं वा धर्मतत्त्वज्ञान, आचारसंहिता, नितीतत्वे या सर्वांचा माणसांच्या सामाजिक, कौटुंबिक व वैयक्तिक जीवनावर कसा परिणाम
होतो हे पाहण्यासाठी चरित्र वाङ्मयाची मदत होते. तसेच माणसाला स्वातंत्र्य, $$$$$
समता, बंधुभावाने जगण्यास धर्म किती सोयीस्कर आहे किं वा अडचणींचा आहे. हे चरित्रातील नायकाच्या धर्मशील जीवनदर्शनातून स्पष्ट होते.
त्यामुळे धर्म या संकल्पनेची समीक्षा करण्याची पाळी ही यासारख्या घटनाप्रसंगावरून येवू शकते. म्हणजेच धर्माची चांगली व वाईट अशा दोन्ही
बाजू पडताळण्यासाठी चरित्र ग्रंथाचा उपयोग होवू शकतो. अशा प्रकारे धर्म व चरित्र यांचा परस्पर पूरक संबंध आपणांस दाखवता येतो. यातून
दोघांचेही महत्त्व दृष्टिपथास पडते.

चरित्र आणि समाजशास्त्र :


समाजशास्त्रात समाजासंबंधीच्या अनेक घटकांचा अभ्यास करण्यात येतो. याविषयी समाजशास्त्रज्ञ किम्बाल यंग म्हणतात,
"समाजशास्त्र हा समाजात राहणाऱ्या मानवांचा पद्धतशीर आणि व्यवस्थित अभ्यास होय. म्हणजे मानवाच्या सामूहिक जीवनाशी आणि
सांस्कृ तिक जीवनाशी संलग्न असलेल्या रूढी, परंपरा, संस्था आणि आचार विचारांचे प्रकार यांचा अभ्यास होय." तर गिदिमा म्हणतात की,
"समाजशास्त्रात संपूर्ण समाजाचे व्यवस्थितरित्या वर्णन आणि स्पष्टीकरण करण्यांत येते.”४२ माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्यामुळे किं वा
त्यानुसार आपले वर्तन करत असल्यामुळे त्याच्या रूढी, परंपरा, आचार, विचार याचा समाजशास्त्रामध्ये विचार के ला जातो. त्यामुळे व्यक्ती व
समाजशास्त्र यांचा घनिष्ठ संबंध आहे. सामाजिकता ही माणसाची मानसिक, आर्थिक, जैविक गरज आहे. त्यामुळे समाजाच्या उत्कर्षासाठी,
संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या समाजशास्त्राचा व्यक्तिजीवनावर परिणाम होतो. समाजाच्या दैनंदिन गरजा आणि मानवी समस्यांची सोडवणूक
करण्यासाठी समाजशास्त्राच्या अभ्यासातून एक दृष्टी मिळते.
प्रत्येक व्यक्तीला एक सामाजिक स्तर असतो. या स्तराच्या रूढी, परंपरा, सामाजिक संस्था यांच्याशीही त्यांचे ऋणानुबंध असतात.
त्यामुळे चरित्रकाराला चरित्रलेखन करताना चरित्रनायकाची समाजसापेक्षता विचारात घ्यावी लागते. म्हणजेच समाजशास्त्राचा आधारातून
चरित्रनायकाचा सामाजिक दृष्टिकोन स्पष्ट व्हावा किं वा चरित्रनायक सामाजिक स्थितीगतीला काही नवीन दृष्टिकोन देवू शकलेला असेल तर ते
चरित्र अधिक विशाल व व्यापक होऊ शके ल. चरित्र हे अशाच व्यक्तींचे लिहिले जाते ज्या व्यक्तीने किमान पातळीवरती समाजहितासाठी काही

12
विचार व कृ ती के ली असेल. तात्पर्य चरित्रकर्ता समाजशास्त्रीय विषयांचा अभ्यासक असेल तरच अशा सामाजिक व्यक्तीचे चरित्र लिहिताना त्याला
न्याय देवू शके ल. याचाच अर्थ असा की, चरित्रकाराला किमान समाजशास्त्री यबैठक असणे आवश्यक आहे.

चरित्र आणि शिक्षणशास्त्र :


शिक्षण आणि साहित्य यांचा अन्योन्य असा संबंध आहे. शिक्षणाच्या माध्यमातून, ज्ञानदानाचे, संस्कार करण्याचे, जाणीव उत्पन्न
करण्याचे कार्य के ले जाते. त्यामुळे समाज परिवर्तनाचे शिक्षण एक महत्त्वपूर्ण साधन आहे, असे असले तरी बहुतांशी शिक्षण हे साहित्याचा
माध्यमातून दिले जाते.त्यामुळे शालेय शिक्षणात साहित्याची निवड ही विद्यार्थ्याचा वयोगट आणि अनुभावग्रहण क्षमता यावर जशी अवलंबून
असते, त्याचाप्रमाणे एकू ण शिक्षण व्यवस्थेचे सामाजिक उद्दिष्ट काय आहे, यावर ही साहित्याची निवड अवलंबून असते. म्हणजेच साहित्य व
शिक्षणशास्त्र हातात हात घालूनच आपले कार्य व उद्देश सिद्ध करत असतात. साहित्य आणि शिक्षणशास्त्र याचा संबंध जसा आहे. तशाच
स्वरूपाचा संबंध चरित्र आणि $$$$$
शिक्षणशास्त्र यांचा आहे. कारण चरित्र निर्मितीही तेव्हाच होते जेव्हा चरित्रकाराला चरित्रनायकाचे व्यक्तिमत्त्व, जीवनकार्य भावते, स्फू रते, अशी
भावनीक, वैचारिक क्रिया झाल्याशिवाय चरित्रकार चरित्रलेखन करत नाही. त्यामुळे चरित्रकाराला भावलेली व्यक्ती ही सामान्य किं वा असमान्य
असली तरी तिच्याकडू न घेण्यासारखे किं वा भावण्यासारखे नक्कीच काही ना काही असते. चरित्रकार नेमक्या याच गोष्टींना आपल्या लिखानात
प्राधान्य देत असल्यामुळे अशा चरित्रातून दिशा, बोध, स्फू र्ती देण्याचे काम कळत-नकळत के ले जाते. साहित्यातील कथा, कादंबरी, नाटक,
कविता, अशा ललित कृ तींतून शिक्षण दिले जात असले तरी त्या साहित्य प्रकारांची विश्वसनीयता व सत्यता याबाबत मात्र शंका उपस्थित होत
असल्यामुळे व चरित्र लेखनात सत्याला, विश्वसनीयतेला महत्त्व असल्यामुळे चरित्रातून शिक्षण दिल्यास ते अधिक परिणामकारक ठरू शकते.
तसेच चरित्रनायकाने शिक्षण घेतले आहे. का? असल्यास कोणत्या शिक्षणशाखेमध्ये त्याचे शिक्षण झालेले आहे हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण
यावरही त्याची नोकरी, आचार, विचार बहुतांशी अवलंबून असतात. त्यामुळे चरित्रकाराला शिक्षणशास्त्रांची चांगली जाण असणे महत्त्वाचे ठरते.

चरित्र आणि अर्थशास्त्र :


अर्थव्यवस्थेचा देश, समाज, कु टुंब यावर परिणाम होत असतो. व्यक्तिजीवनावर ही अर्थव्यवस्थेचा परिणाम होत असतो. मार्क्स तर
सर्व समाजव्यवस्था अर्थव्यवस्थेच्या पायावर उभी असल्याची सांगतो. माणसाची समाजात पत प्रतिष्ठा ही बहुतांशी त्याच्या अर्थव्यवस्थेवर
अवलंबून असते. व्यक्ती ही आपआपल्या अर्थव्यवस्थेनुसार राहण्याचा प्रयत्न करते. किं बहुना त्यांना त्यांच्या अर्थव्यवस्थेमुळे तसे जगावे लागते.
यामुळे व्यक्तीचे आचार, विचार व व्यवहार यांच्यावर अर्थव्यवस्थेचा परिणाम होतो व या आचारविचार, व्यवहाराशिवाय कोणत्याही व्यक्तीचे
व्यक्तिमत्व सिद्ध करता येत नसल्यामुळे व चरित्रात व्यक्तिमत्व सिद्ध करावयाचे असल्याने कळत-नकळत चरित्रलेखन करताना त्या व्यक्तीच्या
अर्थव्यवस्थेचा व या अर्थव्यवस्थेमुळे त्याच्यावर झालेल्या परिणामांचा विचार करावा लागतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीचे चरित्र लिहावयाचे
म्हटले तरी चरित्रकाराला अर्थशास्त्राची पुरेपुर जाण असणे आवश्यक आहे. कारण या अनुषंगाने त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व व सामाजिक, कौटुंबिक
घटना-प्रसंग याचा उलगडा करण्यास त्यामुळे मदत होते.

चरित्र आणि आत्मचरित्र :


चरित्र आणि आत्मचरित्रात व्यक्तीचे व्यक्तिचित्रण, जीवन इतिहास सांगावयाचा असला तरी हे दोन्ही वाङ्मय प्रकार भिन्न भिन्न आहेत.
ही भिन्नता या दोन्ही वाङ्मय प्रकाराची रचना, स्वरूप व हेतूनुसार दाखवता येते. “एखाद्या व्यक्तीचा जीवन इतिहास व व्यक्तिमत्व दर्शन दुसऱ्या
व्यक्तीने रेखांकित करणे म्हणजे चरित्रलेखन होय,” अशी चरित्राची ढोबळ व्याख्या आपण करतो. परंतु आत्मचरित्रात चरित्रासारख्याच गोष्टी
लिहावयाच्या असल्या तरी ते स्वतः लिहावयाचे असते. त्यामुळे “लेखकाने आपल्या व्यक्तिगत जीवनाची स्वतःच्याच शब्दात सांगितलेली कहाणी
म्हणजे आत्मचरित्र होय,” अशी स्थूलपणे आत्मचरित्राची व्याख्या करता येवू शकते. याठिकाणी स्वतः स्वतःविषयी लिहिणे व इतरांनी इतरांसाठी
$$$$$
लिहिणे हा मूलभूत फरक चरित्र आणि आत्मचरित्र यांच्यामध्ये दिसतो. स्वतःची व्यक्तिगत कहाणी स्वतः सांगणे या गोष्टीवर आत्मचरित्रात भर
असल्यामुळे चरित्रापेक्षाही अधिक प्रभावीपणे, सूक्ष्मपणे मानवी स्वभावाचे, व्यक्तिमत्त्वाच्या पैलूंचे दर्शन घडविण्यास आत्मचरित्र समर्थ ठरते. तसेच
अनुभवांची तीव्रताही स्वानुभव असल्यामुळे चरित्र वाङ्मयापेक्षा, आत्मचरित्रात अधिक असते. त्यामुळे डॉ. जॉन्सन आत्मचरित्राविषयी म्हणतात.
"माणूस स्वतःस जितके ओळखतो तितके त्यास अन्य कु णीही ओळखू शकत नाही. विशेषतः त्याचे व्यक्तिमत्व जीवन आणि अंतरंग हे त्याच्या
स्वतःकडू नच अधिक यशस्वीपणे व प्रभावीपणे प्रगट होणे शक्य आहे.”४३ त्यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचे रूप, आत्मचरित्रात सत्यतेच्या
पातळीवर असते तर चरित्रात तर्काच्या पातळीवर असते. सत्यता, अस्सलता व विश्वसनीयता ही चरित्रात आवश्यक असते. म्हणून चरित्रकाराला
पुराव्यांचा, तर्क शास्त्राचा आधार घ्यावा लागतो. तरी सत्यता, विश्वसनीयतेबद्दल चरित्राविषयी शंका उत्पन्न होऊ शकते. परंतु आत्मचरित्रात मात्र
सत्यता, अस्सलता व विश्वसनीयतेच्या बाबतीत, स्वानुभवाच्या भूमिके त हे लिखाण असल्यामुळे शंका उत्पन्न होत नाही, असे असले तरी काही
आत्मचरित्रकार काही माहिती लपविण्याची किं वा खोटी माहिती देण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही. चरित्र लेखनापेक्षा आत्मचरित्र लिहिणे
अवघड असते. कारण चरित्रलेखनात नायकाच्या जीवनाशी समरस होऊन लिखाण करणे एक वेळ जमू शकते. परंतु स्वतःच्याच जीवनाकडे,

13
घटना-प्रसंगाकडे आणि स्वतःकडे तटस्थपणे पाहून कठोर आत्मपरिक्षण करणे अवघड असते. आत्मचरित्र लेखनाचा हेतू हा चरित्रलेखनापेक्षा
वेगळा असतो.
१. आयुष्याचे सिंहावलोकन करणे.
२. आयुष्यातील सर्व घटना-प्रसंग कु णाला सांगणे प्रत्यक्षात शक्य नसल्यामुळे
आत्मचरित्र लिहिणे.
३. आपल्या जीवनातील अनुभवांचा इतरांनी बोध घ्यावा.
४. आठवणींना उजाळा देण्यासाठी. असे काही हेतू आत्मचरित्राचे सांगता येतील.
चरित्र-आत्मचरित्र वरीलप्रमाणे काही मूलभूत फरक असल्यामुळे हे दोन वाङ्मय प्रकार भिन्न मानले जातात. तद्वतच स्वानुभवाशी निगडीत ललित
निबंध, प्रवास वर्णन आणि आत्मचरित्रात्मक कादंबरी हे सर्व वाङ्मय प्रकार व आत्मचरित्र यांच्यामध्ये ही मोठ्या प्रमाणात फरक आहे. चरित्र,
आत्मचरित्र यातील भिन्नता व काही गोष्टींमधील चरित्रापेक्षा आत्मचरित्राची श्रेष्ठता पहाता आत्मचरित्र हा प्रकार काही गोष्टींबाबत मात्र नक्कीच चरित्र
वाङ्मयापेक्षा वरचढ वाटतो.

चरित्र आणि मानववंशशास्त्र :


मानवी जीवनांचा आदिम अवस्थेपासून तो आजपर्यंतचा मानवी विकास आणि त्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानववंशशास्त्र
होय. या शास्त्राच्या कार्यकक्षेत मानवी जीवनाची जैविक जडण-घडण जशी विचारात घेतली जाते. त्याचप्रमाणे त्या मानवी समाजाची सामाजिक,
धार्मिक, आर्थिक, सांस्कृ तिक, भाषिक, विकास क्रमाची मांडणी करत अनुवंशिकता, शारीरिक क्रिया यांचाही अभ्यास के ला जातो. त्यामुळे सर्व
सामाजिक शास्त्राच्या कार्यकक्षेत येणारे विषय मानववंशशास्त्राच्या कक्षेत येतात. मानवी संस्कृ तीचा उगम, विकास ह्याचे सामाजिक, आर्थिक,
राजकीय संबंध, तत्त्वज्ञान, भाषा, साहित्य कला यांचा विचार कमी अधिक प्रमाणात मानववंशशास्त्रात के ला जात असल्यामुळे चरित्रलेखन
करण्यासाठी
$$$$$
मानववंशशास्त्राचा उपयोग होतो. याची जाणीव चरित्रकाराला असेल तर चरित्रलेखनाचा बराच मार्ग मोकळा होतो. किं बहुना स्पष्ट
होतो. त्यामुळे चरित्रकाराला मानववंशशास्त्राची माहिती असणे महत्त्वाचे ठरते.

चरित्र आणि मानसशास्त्र :


मानव जीवनाची शारिरीक आणि मानसिक जडण-घडण या दोन स्वतंत्र प्रक्रिया आहेत. शरीर आणि मन यांच्या संतुलित विकासानेच
मानवाच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. मानसशास्त्रात व्यक्तींचे मन त्यांची जडण घडण, विकास याचा अभ्यास के ला जातो. विल्यम
मॅकडू गल हे मानसशास्त्रज्ञ मानसशास्त्राची व्याख्या करताना म्हणतात, "मानसशास्त्र हे जिवंत प्राण्यांच्या वर्तनाचे विधायक शास्त्र
होय.”४४यावरून मानसशास्त्रात मानवी वर्तनाचा अभ्यास के ला जातो हे स्पष्ट होते. मानवी वर्तनातील रंग, रूप, सवयी, वेदना आणि संवेदना
यांच्या आधारे माणसाच्या व्यक्तिमत्वाची निश्चिती या शास्त्रात के ली जाते. त्यामुळे चरित्रनायकाच्या व्यक्तिमत्वाची वस्तुनिष्ठ मांडणी करण्यासाठी
मानसशास्त्राचा अभ्यास पूरक ठरू शकतो. सामान्यतः प्रत्येक व्यक्तीला आत्मप्रौढी प्रिय असते. या आत्मप्रौढीतूनच आपल्या व्यक्तिमत्त्वाचे
उदात्तीकरण करण्याचा हव्यास दृढ होत जातो. अशावेळी ह्या व्यक्तीच्या.जीवनातील अनेक घटनाक्रमांची, सवयींची मानसशास्त्रीय पद्धतीने
सुसंगती लावून सत्यता शोधता येते. तात्पर्य चरित्रलेखकाला मानसशास्त्रीय अभ्यासाची बैठक असणे आवश्यक आहे.
उपरोक्त शास्त्रांप्रमाणे भूशास्त्र, तत्त्वज्ञान, भाषाविज्ञान आणि संस्कृ ती यांचा ही सूक्ष्म अभ्यास चरित्रकाराला असणे महत्त्वाचे आहे.
कारण ती व्यक्ती ज्या भूप्रदेशात घडली त्या भूप्रदेशातील संस्कार त्याच्या व्यक्तिमत्त्वात आकारबद्ध झालेले असतात. तसेच ती व्यक्ती ज्या
संस्कृ तीत वाढली त्या संस्कृ तीतील संस्काराची बैठक ह्यांच्या सामाजिक व्यवहारात आलेली असते. तद्वतच सदर व्यक्तिच्या जीवनाची
जडणघडण कोणत्या ना कोणत्या तत्वज्ञाच्या कक्षेत झालेली असते. त्यामुळे भूशास्त्र, तत्त्वज्ञान आणि संस्कृ ती यांचा ही अभ्यास चरित्रकाराला
असणे आवश्यक आहे.
भौतिकशास्त्राच्या कार्यकक्षेत अलिकडे अनेक नवे शोध लागलेले आहेत. या शास्त्रज्ञांचे चरित्रलेखन करावयाचे झाल्यास त्या
चरित्रकाराला त्या-त्या शास्त्राच्या कार्यकक्षांचा सखोल अभ्यास असणे गरजेचे आहे. नाहीतर त्यांचे चरित्रलेखन करणे अशक्य आहे.
भौतिकशास्त्राच्या कार्यकक्षेत लावलेले शोधसुद्धा सामाजिक उत्थानाच्या गरजेतूनच प्रस्थापित के लेले असल्यामुळे चरित्रकाराला एकाचवेळी
चरित्रनायकाचा एक व्यक्ती म्हणून जसा अभ्यास करावा लागतो. तसेच इतर सामाजिक शास्त्रे व भौतिकशास्त्रे याचाही सखोल अभ्यास करावा
लागतो.
चरित्र आणि इतर सामाजिकशास्त्रे आणि भूशास्त्र, तत्त्वज्ञान, संस्कृ ती, भौतिकशास्त्र आणि मानसशास्त्र यांच्या अभ्यासातून नवा
दृष्टिकोन मिळतो व वस्तुनिष्ठता आणि विश्वसनियतेच्या दृष्टीने चरित्र अधिक सकस होते. त्यामुळे चरित्रलेखन करणे म्हणजे के वळ एखाद्या
व्यक्तीच्या आयुष्यक्रमाची मांडणे करणे एवढाच सीमित अर्थ घेवून चरित्र लिहिले तर ते कसे एकांगी, वरवरचे होऊ शकते हे उपरोक्त सामाजिक

14
शास्त्रांचा, भौतिकशास्त्रांचा व संस्कृ ती, तत्वज्ञान अशा शास्त्रांच्या तुलनात्मक अभ्यासातून स्पष्ट होते. सामान्यतः चरित्रलेखन करण्यासाठी ही
अशाच व्यक्तींची निवड के ले जाते की ज्या व्यक्तींनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सामाजिक किं वा भौतिक कार्य के लेले असते. तसेच सामान्य
व्यक्तीचे चरित्र लेखन के ल्यास त्या चरित्राला बहुतांशी फक्त व्यक्तिचित्रणात्मक रूपच प्राप्त होते. त्यामुळे चरित्रलेखन करताना वरील सर्व शास्त्रांचा
अभ्यास चरित्रकाराला असणे आवश्यक आहे.
$$$$$
चरित्रकार व त्याचा चरित्रलेखनाचा हेतू :
चरित्रलेखनाचे स्वरूप बऱ्याचवेळा चरित्रकारावर व त्याच्या चरित्रलेखनाच्या हेतूवर अवलंबून असते. त्यामुळे चरित्रकार कसा असावा,
त्याने चरित्रलेखन कोणत्या भूमिके तून करावे ते कसे करावे, याविषयी अनेक विचारवंतांनी आपआपली मते मांडलेली आहेत. याविषयी क्लोफोर्ड
म्हणतात "चरित्रकाराची भूमिका ही वृत्तपत्रकारापेक्षा श्रेष्ठ दर्जाची असते.”४५ म्हणजेच निर्भयपणे सत्यवृत्तकथन करणे हे जसे वृत्तपत्रकारांचे प्रमुख
कार्य असते. तसेच चरित्रकारनेही चरित्रविषयाचे सत्यवृत्तकथन करावे, असे क्लोफोर्ड यांना वाटते. परंतु असे असले तरी चरित्रकार हा कलावंत
असतो. वृत्तपत्रकार हा कलावंत नसतो. म्हणजेच चरित्राचे स्थान हे शास्त्र व कला यांच्या पारदर्शक मिश्रणात आहे. त्यामुळे चरित्र वाङ्मय हे
शास्त्र व कला यांच्या सीमारेषावरील वाङ्मय ठरते. बॉनट यांच्या मते- ‘‘चरित्र म्हणजे व्यक्तीचा तपशिलवार इतिहास असून चरित्रकाराने
वस्तुस्थितीला धरूनच असले पाहिजे, म्हणजे बॉनेंट ही चरित्रकाराला सत्याचीच कास धरावयास लावतात. तर आन्द्रे मोवी यांच्या मते
"चरित्रकाराने हे उपदेशांचे पाठपांडित्य प्रचूर करावयाचे नसतात आणि चरित्र बोध प्रवचनांनी शिळेपोक ही करावयाचे नसते. पण चरित्रकाराला
चरित्र नायकाविषयी आदर असेल तर तितकाच आदर चरित्रकाराविषयी वाचकांच्या मनात निर्माण झाला पाहिजे आणि असा आदर हा
'सत्यकथना'तूनच निर्माण होणे शक्य आहे.”४७यातून ही हेच स्पष्ट होते की आन्द्रे मोदी यांना सुद्धा समतोलपणा व सत्यता पाळण्याची गरज
चरित्रकाराला आहे, असे वाटते. तर प्र.ना. परांजपे याविषयी म्हणतात की, “चरित्रातील व्यक्तिदर्शन जिवंत होण्यासाठी चरित्रकाराला एखाद्या
कादंबरीकाराप्रमाणे अंतर्विश्वाचा ठाव घेणारी सहभावना व कल्पकता यांचीही गरज असते.”४८ म्हणजे प्र.ना.परांजपे यांना चरित्रकार हा कलावंत
असावा असे वाटते. कारण जेणेकरून चरित्रनायक जिवंत करता येईल. व वाचकालाही त्याविषयी रूची निर्माण होईल. तर आधुनिक चरित्राचा
प्रवर्तक मानलेल्या लिटन स्टॅची याविषयी म्हणतो की, “चरित्रकाराने अमूक एक व्यक्ती चांगली की वाईट हे सांगण्याच्या भानगडीत न पडता
चरित्रविषयाची, चरित्रनायकाच्या गुणदोषांची त्याच्या कृ तिउक्तीद्वारे अप्रत्यक्ष चिकित्सा करावयाची असते.”४९ म्हणजेच चरित्रकार हा सत्यप्रिय,
समतोल दृष्टीचा व सहृद्यी न्यायीवृत्तीचा असावा, असे लिटल स्टॅचीला वाटते. या सर्व चरित्रा काराच्या भूमिके तून चरित्र वाङ्मयाविषयी विचार
मांडणाऱ्या विचारवंतांची मते लक्षात घेता चरित्र वाङ्मय ही संकल्पना चरित्रकाराच्या हेतूवर, भूमिके वर बऱ्याच प्रमाणात अवलंबून आहे, हे स्पष्ट
होते, या विचारवंतांच्या मते बऱ्याच अंशी चरित्रकार हा वृत्तपत्रकाराप्रमाणे, न्यायीवृत्तीप्रमाणे तटस्थ लेखन करणारा हवा असला तरी चरित्रातील
चरित्रनायक, जिवंत करण्यासाठी चरित्रकाराला सहृदय कलावंताची भूमिका वठवावी लागणार आहे व चरित्रनायकाच्या जीवन इतिहासातील
सत्य-असत्य घटना निवडण्यासाठी त्यांचा शोध घेण्यासाठी संशोधकांचीही भूमिका पार पाडावी लागणार आहे. तसेच घटना प्रसंगांविषयी विवेचन
करताना हे चांगले, हे वाईट असे मत मांडू न चालणार नाही. तर यासाठी त्याला फक्त वस्तुस्थिती परखडपणे मांडावी लागणार आहे. अशा या
साऱ्या चरित्रकाराच्या महत्त्वाच्या भूमिका पहाता चरित्रकार हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा असावा हेच यातून स्पष्ट होते. चरित्रकाराच्या भूमिके बरोबरच,
चरित्रकाराच्या चरित्रलेखनामागील हेतू विषयी ही अनेक विचारवंतानी आपआपली मते नोंदवलेली आहेत. कारण ज्या हेतूने चरित्रकार चरित्रलेखन
करतो त्या हेतूमुळे चरित्राचे स्वरूप सिद्ध होत असते. म्हणून चरित्र वाङ्मयाच्या बाबतीत विचार करताना चरित्रलेखकाचा लेखन हेतू पाहणे
महत्त्वाचे असते.
$$$$$
याविषयी हेरॉल्ड निकोल्सन म्हणतात की, "प्रसिद्ध थोर पुरुषांचे स्मरण करणे या मूलभूत इच्छेत मूलत: चरित्रलेखनाची प्रेरणा आहे.
यातून हे स्पष्ट होते की, फक्त थोर व्यक्तींची चरित्रे त्यांच्या पराक्रमामुळे, विचारांमुळे लिहावीत. यामध्ये बऱ्याचवेळा त्या व्यक्तीपेक्षा तिचे थोरपण
असणाऱ्या गोष्टीवरच अधिक भर दिला जातो. त्यामुळे खऱ्या अर्थाने ती व्यक्ती सत्यांशाने स्पष्ट होत नाही. याविषयी बोलताना आधुनिक
चरित्रलेखनाचा जनक असलेल्या प्लुटार्क आपल्या चरित्रलेखन हेतूविषयी म्हणतो की, “तरूणांपुढे सद्गुण व दुर्गुणांचे नमुने असलेल्या व्यक्तींचे
व्यक्तिचित्रण आपण के ले. "५१ यातून हेच स्पष्ट होते की, प्लुटार्क यांनी फक्त चांगल्या-वाईट गुणांवरच अधिक लक्ष कें द्रित करून लिखाण के लेले
आहे. परंतु वाईट माणूस वाईटच असतो व चांगला माणूस चांगलाच असतो, असे ठामपणे म्हणता येणार नाही किं वा याच अंगाने रंगविलेले
व्यक्तिचित्रण किं बहुना चरित्र हे नक्कीच एकांगी होईल. थॉमस फु लर याने सुद्धा चरित्रलेखनाचे चार हेतू सांगितलेले आहेत.
१ .परमेश्वराचा गौरव प्राप्त करून देणे.
२. मृतांच्या आठवणी जतन करून ठेवणे.
३.जिवंत माणसांना आदर्श घालून देणे.
४. वाचकांचे मनोरंजन करणे व त्यांना आल्हाद देणे.५२ या चार हेतूमध्येही प्रामुख्याने वाचकांच्याच अंगाने चरित्र लेखनाचा विचार के लेला आहे.
या हेतूमुळे चरित्र वाङ्मय ही संकल्पना पूर्णांशाने स्पष्ट होत नाही. तर सर सिडने ली या विषयी म्हणतात की, “आपल्यामध्ये ज्या व्यक्तींनी
स्वतःच्या कर्तृत्वाने आणि व्यक्तिमत्वाने इतरांहून आगळे श्रेष्ठ जीवन जगले आहे. अशांची स्मृती चिरंतर राहावी या तीव्र इच्छेतून चरित्रलेखन
जन्माला येते.''५३’ या कारणांव्यतिरिक्त इतरही काही चरित्रलेखनाचे दुय्यम प्रयोजने आहेत. उदा. आदरणीय व्यक्तींची स्तुती करणे तिचे आदर्श
रूप चितारणे, त्या व्यक्तीचे तत्वज्ञान समजावून सांगणे इत्यादी. अशा प्रकारे विविध विचारवंतांची चरित्र लेखनामागील हेतूविषयी मते पाहिली

15
असता सर सिडने ली. यांचा अपवाद वगळता इतर विचारवंत बोधवादी किं वा आदर्शवादी दृष्टिकोनातून चरित्रलेखन करण्यास सांगतात. अशा
दृष्टीकोनामुळे हा चरित्र वाङ्मय प्रकार बोधवादी, ठिसूळ व सत्यापासून दूर जाणारा होतो आणि यातील साहित्यमूल्यही मरून जाते.
चरित्रलेखनामागील हेतूच्या संदर्भात सर सिडने ली यांनी मांडलेली भूमिका आजच्या चरित्रलेखनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचे दिसून
येते. कारण आजचे चरित्रकार साहित्य, सामाजिक, भौतिक, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र अथवा संस्कृ तीच्या कर्तृत्वाशी निगडीत व्यक्तीचेच चरित्र
लिहिताना दिसतात. मानवी जीवनाच्या बदलत्या स्वरूपाबरोबर चरित्रलेखनाचा हेतू ही बदलेला दिसतो. या बदलामुळेच चरित्र वाङ्मयाचा समर्थ
वाङ्मयीन प्रवाह निर्माण झालेला आहे. तात्पर्य चरित्रलेखनामागील हेतू, काळ आणि परिवर्तन यांच्याशी सुसंवाद असणे आवश्यक आहे. चरित्र
वाङ्मयाच्या हेतूच्या संदर्भात आणखी एका बाबीचा निर्देश करणे आवश्यक वाटते. चरित्र हे कोणासाठी ह्या हेतूशी निगडीत असेल तर चरित्राच्या
अंतस्वरूपात अमूलाग्र बदल करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ लहान मुलांसाठी लिहिलेले चरित्र आणि इतर चरित्रे यामध्ये आमूलाग्र बदल असू
शकतो. लहान मुलाची मानसिक जडण-घडण, त्याना पेलवेल अथवा रुचेल या गोष्टीशी चरित्रकाराला बंदिस्त रहावे लागते. चरित्रातील ढोबळ
घटना सोप्या भाषेत आणि सुटसुटीत वाक्यात मांडणी करावी लागते. इतर चरित्र त्याच्या रचना तंत्राला अशा कोणत्याही स्वरूपाच्या मर्यादा
असण्याचे कारण नाही. त्यामुळेच चरित्रलेखन कोणासाठी हा हेतू बाळगल्याच्यानंतर चरित्राचा रचनाबंध बदलणे आवश्यक ठरते.

$$$$$

संदर्भ ग्रंथ :
The pocket Oxford pictionary of Current English - first edited by F.G. and H.W.Fowler, Page
No. ७८
उपरोक्त, पान नं. ३८१
३. The Oxford Dictionary and thesavaus page no. 138
४. Collms Cobuld English hunguage Dictionary page no. 131
५.The Oxfor English Dictionary Volume IA-4 page no.266
६.वीरकर कृ ष्णाजी भास्कर The little modern Dictionary page
पे. ९७
७. Encyclopaedoa-Britannica, Volume-3 Balfour Fo page no. 636
८. शर्मा द्वारका प्रसाद 'संस्कृ त शब्दार्थ कौस्तुभ' पृ.क्र. ४२५
९.कै . जनार्दन विनायक ओक, गीर्णाणलघुकोश संस्कृ त-मराठी',
तिसरी आवृत्ती, पृ.क्र. २००
१०. आपटे वि. आ. 'संस्कृ त-मराठी-इंग्रजी' लघुकोश पृ.क्र ९६
११. आपटे वासुदेव गोविन्द -संस्कृ त मराठी कोश', पृ .क्र .७६
१२.ओक गीर्णाणलघुकोश पृ.५५
१३. आपटे वामन शिवराम - 'संस्कृ त हिंदी कोश' पृ.क्र. ३७४
१४. शर्मा द्वारका प्रसाद संस्कृ त शब्दार्थ कौस्तुभ', पृ.क्र. ४२५
१५. सूर्यकान्त - "संस्कृ त – हिंदी इंग्लिश कोश', पृ.क्र. १९९
१६. चातक गोविन्द 'आधुनिक हिन्दी शब्द कोश', पृ.क्र. २०२
१७. बाहरी हरदेव शिक्षार्थी हिन्दी कोश पृ.क्र. २४९
१८ श्याम सुंदरदास - हिंदी शब्दसागर' - तृतीय भाग, पृ.क्र.१४८३
१९.कु लकर्णी कृ .पा. 'मराठी व्युत्पत्तिकोश' (ऐतिहासिक, तौलनिक), पृ.क्र. २७०
२०. जोशी प्र.न. - 'आदर्श मराठी शब्दकोश - पृ.क्र. २९७
२१.आपटे बा.गा. -'विस्तारित शब्दरलाकार', पृ.क्र. १९८
२२. अग्निहोत्री 'अभिनव मराठी-मराठी शब्दकोश' भाग २
पृ. क्र. ३७४
२३. महाराष्ट्र शब्दकोश खंड तिसरा पृ. क्र. ११५०
२४. कऱ्हाडे सदा - 'चरित्र आणि आत्मचरित्र' पृ.क्र. ६२५. उपरोक्त, पृ. क्र. २५
२६. जोशी अ.म., 'चरित्र आत्मचरित्र' पृ. क्र. २६
२७. उपरोक्त, पृ.क्र. २६.
२८. कन्हऱ्हाडे सदा 'चरित्र आत्मचरित्र' पृ. क्र. २९
२९. उपरोक्त,
३०. बोरगावकर ब.दा. प्राचीन मराठीतील चरित्रलेखन, प्रथमावृत्ती-१९७८,

16
कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे. पृ. क्र. ६.
३१.उपरोक्त, पृ. क्र. २५६
३२.जोशी अ.म. 'चरित्र आत्मचरित्र', पृ. क्र. २७
३३. उपरोक्त
३४.उपरोक्त
३५. प्रा. देसाई, प्रा. लिमये- 'चरित्रे आणि आत्मचरित्र' फडके बुक
सेलर्स, कोल्हापूर, प्रथमावृत्ती १९७६, पृ.क्र. ३
३६.उपरोक्त. पृ.क्र. ४
३७. उपरोक्त
३८. जोशी अ.म. 'चरित्र आत्मचरित्र' पृ.क्र. १३
३९. बोरगावकर व.दा. 'प्राचीन मराठीतील चरित्रलेखन' पृ.क्र. ६
४०.कऱ्हाडे सदा 'चरित्र आणि आत्मचरित्र' पृ.क्र. १९, २०
४१. प्रा. पाटील बी.बी. 'राज्यशास्त्र' पृ.क्र. ४
४२.डॉ. आगलावे प्रदीप 'समाजशास्त्र' श्री. साईनाथ प्रकाशन, नागपूर,
प्रथामावृती १जून१९९९.पृ.८
४३.प्रा. देसाई, प्रा. लिमये 'चरित्र आणि आत्मचरित्र एक अभ्यास'
पृ.क्र. ५४
४४. प्रा. पंडित र.वि. 'प्रारंभिक मानसशास्त्र' पृ. १२
४५. कऱ्हाडे सदा, 'चरित्र आणि आत्मचरित्र' पृ.क्र. २४
४६. उपरोक्त, पृ.क्र. २५
४७. उपरोक्त, पृ.क्र. ३५
४८.मालशे स.ग. 'मराठी विश्वकोश' पृ.क्र. ६७६
४९.कऱ्हाडे सदा 'चरित्र आणि आत्मचरित्र' पृ.क्र. ३३
५०. उपरोक्त, पृ.क्र. २९
५१. उपरोक्त, पृ.क्र. ३०
५२. उपरोक्त
५३. बोरगावकर व. दा. 'प्राचीन मराठीतील चरित्रलेखन' पृ.क्र. २८५

$$$$$

17
18

You might also like