You are on page 1of 4

संस्कृ त बालकथा : एक तौलनिक अभ्यास

विषय: संस्कृ तभाषेतील बालसाहित्याचे अध्ययन


देशपांडे ऋग्वेद रविंद्र
हं.प्रा.ठा. कला व रा.य.क्ष. विज्ञान
महाविद्यालय, नाशिक-

संस्कृ त भाषेमध्ये असणाऱ्या बालसाहित्यामध्ये कथांचा शिक्षण, उपदेश, कल्पनाविलास, व


मनोरंजनादि बाबींमध्ये मोठा वाटा आहे. काळाच्या ओघात लुप्त झालेल्या गुणाढ्याच्या बृहत्कथा ते
आज विविध सदरांत प्रसिद्ध होणाऱ्या वा अनुवादित के ल्या जाणाऱ्या कथा यांत काळाप्रमाणे साधारण
अभिजात व अलीकडील ( १९व्या शतका पासून पुढे ) असे दोन प्रकार पाडता येतील. बदलत्या
काळानुसार कथांचे बदलते स्वरूप मुख्यतः त्यांची भाषिक शैली; ज्यात व्याकरण, भाषिक रचना व कथा
प्रवाह यांचा समावेश प्राधान्याने होतो, तो अभ्यासण्याची आवश्यकता भासते.
सदरील अभ्यासात काही निवडक अभिजात व नूतन बालसाहित्यातील मोजक्या कथांचा
तौलनिक अभ्यास के ला आहे. तसेच २० वे शतक आणि २१ वे शतक यांतील कथांची बदलती शैली व
त्यावरील जागतिक आधुनिकतेच्या बदलांचा परिणाम इ. चा अभ्यास के ला गेला आहे. नवीन संज्ञांसाठी
वापरण्यात आलेले शब्द, आधुनिकतेनुसार त्यांत होत जाणारे बदल नोंदविले आहेत. अभिजात व सद्य-
काळातील कथांना जोडणारा अथवा न आढळणारा दुवा; आधुनिकतेचा कथेच्या शैलीवर जाणवणारा
प्रभाव इ. या निबंधाची संभाव्य उद्दिष्टे होत. नवीन कथा साहित्य रचना आणि/वा अनुवाद त्याचप्रमाणे
आधुनिक कथा शैलीमध्ये बदल अथवा सुधारणांसाठी या निबंधाचा उपयोग होऊ शकतो.
संस्कृ त भाषेला साहित्याची एक फार मोठी परंपरा लाभलेली असून तिची मुळे ही वैदिक
संहितांमध्ये आढळतात. सामान्यतः वैदिक साहित्य तसेच लौकिक साहित्य या दोन भागांत विभाजित
के लेला संस्कृ त साहित्याचा इतिहास प्रचंड विस्तृत व व्यापक स्वरूपात उपलब्ध आहे. साहित्यामध्ये
विविध प्रकारांचा समावेश होतो, यथा वेद, वेदांग, महाकाव्य, कथा, रूपकादि. यातील कथा साहित्याची
सुरुवात साधारणपणे वेदांतील ब्राह्मण कथांपासून मानता येईल. पुरोहितांच्या वैदिक सूक्तांचा अर्थ जाणून
घेणे संबंधी किं वा इतर चर्चा या कथा स्वरूपात आपल्या समोर उपलब्ध आहेत. लौकिक वाङ्मयात
आढळणाऱ्या कथांचे विभाजन ढोबळमानाने दोन गटांत के ले जाऊ शकते ते लोककथा व नीतिकथा.
मनोरंजन, प्रबोधन, मुल्याधारित शिक्षण, रूढी-परंपरांच्या माहितीपर इ. कारणांसाठी या कथांची निर्मिती
झालेली आपणास दिसते. कथा हे माध्यम आबाल प्रौढां पर्यंत सर्वांचेच अतिशय रोचक व सोपे मध्यम
होय. नीतिकथा या प्रामुख्याने पुढील काळात मोठ्या प्रमाणात रचल्या गेल्या व आज बालसाहित्यामध्ये
त्यांचा समावेश के ल्या जातो. बदल ही एकमेव स्थिर प्रवृत्ती आहे या उक्तीप्रमाणे, शेकडो वर्षांपूर्वी
रचल्या गेलेल्या कथा व साधारण आताच्या काळात रचल्या जात असलेल्या किं वा अनुवादादि
माध्यमांतुन संस्कृ त भाषेमध्ये येत असणाऱ्या कथा साहित्यात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपणास
दिसून येतो. हा बदल मुख्यतः कथांचा उद्देश, त्यांची भाषिक शैली, कथेच्या रचना, व्याकरणरूप प्रयोग,
इ. अशा बऱ्याच प्रकरांत झालेला दिसतो.
कथासरित्सागर, पंचतंत्र, हितोपदेश, वेताल पंचविंशति या अभिजात साहित्यातील काही निवडक कथा
आणि संभाषण संदेश, सप्तवर्णा, चंदामामा, बालसंस्कृ तम् यांसारखी आधुनिक मासिके , तसेच
बालनीतिकथामाला, कथाकु सुमम् यांतील काही निवडक कथांचा अभ्यास साहित्यिक आढावा पद्धतीने
करून या निबंधात मांडलेला आहे.
सर्वप्रथम 'बाल' या पारिभाषिक शब्दाची व्याख्या करणे आवश्यक आहे. बाल हा मुख्यतः
वयवाचक शब्द असून त्याचे इतरही विविध अर्थ होतात. बालः (बलतीति । बल प्राणने + “ज्वलि-
तिकसन्तेभ्यो णः ।)1 बालस्तु स्यान्माणवको वयस्थस्तरुणो युवा । प्रवयाः स्थविरो वृद्धो जीनो जीर्णो
जरन्नपि ॥2 अन्य एका व्याख्येनुसार वयाच्या १३ व्या वर्षापर्यंत चे सर्व- बालक असे भारतीय कायदा
मानतो.3 या प्रकारे बालांसाठी सामान्यपणे करण्यात आलेले साहित्य म्हणजे बाल साहित्य होय.
तर्क संग्रह या शास्त्र ग्रंथाचा अधिकारी बाल होय असे त्याचे मंगलाचरण सांगते4 किं तु तो बाल हा अर्थ
येथे ग्राह्य नव्हे. बाल साहित्यामध्ये सामान्यपणे कथा, गाणी, बडबड गीत, स्तोत्रे इ. चा समावेश होतो.
अन्य साहित्याच्या तुलनेने सोपी वाक्यरचना, निसर्गातील विविध प्राणी- पक्षी यांच्या प्रयोगाने करण्यात
आलेली रंजक शैली ही यांची वैशिष्टे मानता येतील.
1
शब्दकल्पद्रुमः
2
अमरकोशः
3
https://www.thehindu.com/news/national/who-is-a-child/article3528624.ece/amp/#amp_tf=From
%20%251%24s&aoh=16791238528935&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com
4
निधाय हृदि विश्वेशं विधाय गुरुवन्दनम्।
बालानां सुखबोधाय क्रियते तर्क सङ् ग्रहः।।
उद्देश – अभिजात साहित्यातील पंचतंत्र, हितोपदेश, आदि कथांचा उद्देश हा राजनीतीचे धडे तसेच
नीतिमत्ता शिकवण्यासाठी होता असे पंचतंत्राचे कथामुख व हितोपदेशाचे मंगलाचरण सांगते.5 प्राचीन
काळापासून बालकांस शिक्षणाच्या सुरुवातीस नीतिमत्तेचे धडे देणे हे आवश्यक समजले जायचे कारण
नीतिमत्ता ही सर्वच क्षेत्रात उपयुक्त ठरते. त्यामुळेच या कथांचा समावेश हा बाल साहित्यामध्ये के ला
गेला असावा. अन्य कथांचा उद्देश हा ठोसपणे सांगता येणे शक्य नाही, बालकांचे मनोरंजन व शिक्षण हा
त्यामागील हेतू असावा. आधुनिक कथा साहित्याचा उद्देश हा बालगटामध्ये संस्कृ त भाषेचा प्रचार होणे,
नवनवीन, अनुवादित संस्कृ त साहित्याची निर्मिती करणे तसेच, भाषिक कौशल्य सुधारणे हे होत असे
आढळते.
रचना – अभिजात साहित्यातील कथांची रचना ही एकमेकात गुंतलेल्या स्वरूपाची आढळते. जसे
पंचतंत्र व हितोपदेश यांत प्रत्येक तंत्रातील सर्व कथा या एकमेकांस जोडलेल्या दिसतात, एका कथेतून
अन्य कथेची सुरुवात होते. किं वा वेताल-पंचविंशति वा सिंहासन-द्वात्रिंशिका यांसारख्या ग्रंथांतील कथा
या एका मुख्य पात्राभोवती फिरणाऱ्या असतात. जसे वेताळाने राजा विक्रमास सांगितलेल्या कथा अथवा
राजा भोजास सांगितलेल्या गेलेल्या बत्तीस कथा. या कथांच्या भाषिक रचनेमध्ये प्रामुख्याने विविध
सामासिक शब्दांचा, अनेकविध धातुंचा, अलंकारिक शब्दांचा योग्य वापर के लेला दिसतो. शब्दांचे
अनेक पर्यायी शब्द वापरून भाषिक सौंदर्य अधिक प्रमाणात खुलवलेले दिसते. गरजेनुसार
व्याकरणातील विविध लकारांचा प्रयोग आढळतो. काही अभिजात कथांचे वैशिष्ट्य हे प्राणी-पक्षी
आदिंचे प्राकृ तिक स्वभाव ओळखून त्यांच्याशी जुळत्या मानवी स्वभावास त्याची उपमा देऊन के लेले
यथार्थ वर्णन होय. आवश्यकतेनुसार विविध सुभाषितांची, पद्यांची रचना बोध देऊन जाते. सदर कथांचा
भाषा ही आधुनिक कथांच्या तुलनेत अधिक प्रगल्भ दिसते.
आधुनिक कथा साहित्यात कथा संग्रहांऐवजी प्रामुख्याने सुट्या सुट्या कथा आढळतात. या कथांचे
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील व त्या नंतरील असे दोन गटांत पुनः वर्गीकरण करता येईल. पहिल्या
गटातील कथांत अभिजात साहित्या प्रमाणे भाषिक वैशिष्ट्ये जसे, विविध लकार, अलंकार, अनेकविध
धातुप्रयोग, सामासिक शब्द व भाषिक प्रगल्भता दिसून येते. दुसऱ्या गटातील कथांचा भाषा ही 'सरल
संस्कृ त’ या प्रकाराची होय.

5
श्रुतो हितोपदेशोऽयं पाटवं संस्कृ तोक्तिषु। वाचां सर्वत्र वैचित्र्यं नीतिविद्यां ददाति च।।

You might also like