You are on page 1of 6

प्रवीण भोळे

१२ मे २०१९

लोककलेचा बािवशी सापळा


१. लोक : संस्कृती, परंपरा, रुढी, कला, इत्यादी

कलांचा आजवरचा प्रवास पाहता िकंवा कलांचं विगर् करण करता - लोक(कला) हा एक महत्त्वाचा टप्पा िकंवा

वगर् संवभतो. आज वेगळं असं नागर जीवन उपलब्ध असल्यामुळे कदािचत त्याला आपण कलेच्या पिरघात गणतो,

पण खरं तर तो जीवनाचा िकंवा संस्कृतीचा अिभन्न असा िहस्सा असतो. आज कलेकडे वेगळं क्षेत्र, वेगळा व्यवसाय

म्हणून पािहलं जातं पण परंपरेनुसार रोजचं आयुष्य जगता-जगता, काम करता-करता श्रमपिरहायर् िकंवा आं तिरक

उमीर्पोटी जो व्यवहार झाला, करणार्‍यांना ते मािहतही नसतं की त्यांच्याकडू न कलेची िनिमर् ती होत्येय पण आज

त्याला सरार्स कला म्हणून संबोधण्यात येतं. खेड्यांमध्ये िकंवा शहरांमध्ये रहाणारे, परंपरेनं चालत आलेलं जीवन

जगणारे िकंवा परंपरेनं चालत आलेल्या संस्कृतीचं दशर्न घडवणारे ते - लोक असं आपण म्हणू शकतो. लोकांमध्ये

जन्म घेतलेल्या, िवकास पावलेल्या आिण एका िपढीकडू न दुसर्‍या िपढीकडे संक्रिमत होणार्‍या रंगभूमीला

लोकरंगभूमी असे म्हणता येईल. लोकरंगभूमी ही प्रदेशिविशष्ट, जातीिविशष्ट, भाषािविशष्ट अशी अनेक प्रकारची असू

शकते.

लोकरंगभूमी ही अथार्तच मनोरंजन तर करतेच, पण त्याच बरोबर ती त्या त्या समाजातील लोक-संस्कृतीचं

प्रितिनिधत्व करणारी असते. एका िपढीपासून दुसर्‍या िपढीपयर्ंत जोपासल्या गेलेल्या गोष्टी, गाणी, म्हणी, उखाणे,

िचत्र, िशल्प, नृत्य, आजारांवरील उपाय, पोषाख, खाद्य-पदाथर् अशा आिण अशांसारख्या अनेक बाबींचा समावेश

ितच्या पिरघात होतो. परंपरेनं मौिखक िकंवा अिलिखत स्वरुपात चालत येणं हे लोकरंगभूमीचं एक महत्त्वाचं वैिशष्ट्य

आहे.

मुख्यतः समुहमनाच्या प्रेरणेतूनच लोकरंगभूमीची िनमीर्ती, संगोपन आिण संवधर्न होत असतं. नागर

रंगभूमीवरील नाटकांच्या तुलनेत बहूतेक सवर् लोकनाट्यप्रकारांना िलखीत संिहता नसते. प्रमाण-भाषेच्या ऐवजी ती

लोककलेचा बािवशी सापळा "1


नाटकं कोणत्यातरी बोलीभोषेत असतात. त्यात संगीत-नृत्याचा अंतभार्व असतो. बंिदस्त नाटकघरात ही क्विचतच

सादर व्हायची, अलीकडे होऊ लागली आहेत. एरवी पारावर, तंबूत, अंगणात, रस्त्याच्या कडेला, बाजारातल्या

कोपर्‍यात, जत्रेत तात्पुरत्या बांधलेल्या ओट्यावर ती सादर होतात. नेपथ्य-प्रकाशासारख्या नाट्यघटकांना दुय्यम

ठरवून अिभनयावर प्रमुख मदार असते. या नाटकांच्या औपचािरक तालमी होतात िकंवा होत नाहीत, परंतु प्रयोगात

नटांच्या उत्स्फूतार्िवष्कारावर आिण तत्कालस्फूतीर्वर भर असतो. अिभजात परंपरांमधील नाटकांमधल्या िनयमबद्धता,

संकेतबद्धता आिण औिचत्य-संकेत या वैिशष्ट्यांच्या मानाने मोकळे ढाकळे पणा, रांगडेपणा आढळतो.

लोकरंगभूमीवरील बहुतेक सगळी नाटकं आिण त्यातील अिभनय िबनवास्तववादी असतो.

२. प्रादेिशक रंगभूमी
प्राचीन भारतीय रंगभूमीचा दाखला इसवीसनाच्या अिलकडे-पलीकडे िलिहल्या गेलेल्या संस्कृत-प्राकृत

नाटकांवरून तसंच त्याच काळात िलिहल्या गेलेल्या नाट्यशास्त्र ह्या ग्रंथावरून िमळतो. नाट्यशास्त्रात नाटकांच्या

ज्या दहा प्रकारांचं वणर्न केलेलं आहे, त्यांपैकी समावकार, भाण, प्रहसन अशा बर्‍याचशा प्रकारांचं मूळ

लोकनाट्यांमध्येच असावं, अशी कल्पना त्यांच्या स्वरुपावरून करता येते.

दहाव्या शतकानंतर उदयाला आलेल्या भक्ती चळवळीमुळे प्रादेिशक भाषांमध्ये धािमर् क वाङ् मय िनमार्ण

झालं. आिण त्यातूनच प्रदेशिविशष्ठ लोकरंगभूमीचा उगम झाला.

लोकरंगभूमी ही िविशष्ठ समूहात िनिमर् त आिण िवकसीत झालेली असल्यामुळे त्या त्या समुहातील

लोकजीवनाचे प्रितिबंब ितच्यात िदसून येत.े म्हणूनच भारतातल्या िविवध लोकपरंपरांमध्ये बोली भाषा, सांगीतीक

रचना, पोषाख, पदन्यास, इत्यािद घटकांची िविवधता िदसून येत.े

भारतीय लोकरंगभूमी असा कोणताही एकिजनसी वेगळा प्रकार अिस्तत्वात नाही, तर भारतातील िविवध

प्रांतात असलेल्या तमाशा, दशावतार, यक्षगान, भागवत मेळे, कुडीअट्टम, तैय्यम, भवई, नौटंकी, स्वांग, छाऊ, जात्रा,

इत्यािद िविवध लोकपरंपरांना सोयीसाठी एकित्रतपणे भारतीय लोकरंगभूमी अशी संज्ञा वापरली जाते. भारतातील

िविवध प्रांतात आढळणार्‍या या िविवध लोकपरंपरांमध्ये कमालीचं वैिवध्य आहे, तरी देखील या परंपरांमधून

सादरीकरणाची, अिभनयाची काही समान वैिशष्ट्यं मात्र आढळून येतात.

३. समान वैिशष्ट्यं
भारतातील वेगवेगळ्या लोकनाट्य-परंपरांचा आढावा घेतल्यास, बहुतेक सवर् लोकनाट्यप्रकारांमध्ये पुढील

पाच घटकांचा समावेश िदसतो : िवधी, सूत्रधार, िवदूषक, संगीत आिण नृत्य. प्रत्यक्ष पूजा, मंगलाचरण, ईश्वराचं

स्तवन, प्राथर्ना, इत्यािद बाबींचा िवधींमध्ये समावेश होतो. वेगवेगळ्या नाट्यपरंपरांमध्ये मुख्य सादरकत्यार्ला

लोककलेचा बािवशी सापळा "2


वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं. यक्षगानात त्याला भागवत म्हणतात, थेरुकुट्टूमध्ये त्याला कट्टीआकरन म्हणतात,

तर तमाशात सरदार म्हणतात. गद्यातून, पद्यातून िकंवा गाण्यातून गोष्ट सांगणं हे त्याचं काम. तमाशातला सोंगाड्या,

दशावतारामधला शंकासूर, भवईतला रंगळो, यक्षगानातला हनुमान्नायक, थेरुकुट्टूमधला कोमली ही िवदुषकाची

िविवध रुपं आहेत. िवनोदिनिमर् तीसोबतच तत्कालीन घटनांवर उपरोधीक भाष्य करणं हे त्याचे कायर् असतं. बहुतेक

सवर् लोकनाट्यांमध्ये संगीत, नृत्याचा समावेश असतो. या पाच घटकांच्या उपिस्थतीत लोकरंगभूमावरील अिभनय

अशा प्रकारे िसद्ध होतो –

लोकरंगभूमीवरील नट कथन करतो, कथनाची िक्रया पिरणामकारक होण्यासाठी तो िवनोद, नृत्य, संगीत,

वेशभूषा, िचत्र, बाहुल्या, इत्यादींची मदत घेतो. कथन शक्यतो बोलीभाषेत असतं, परंतु बर्‍याचदा ते लययुक्त,

तालयुक्त, क्विचत मंत्रोच्चारासमान असतं. लोकरंगभूमीवरील नट शारीिरक हालचाली, बोलणं, िचत्रिविचत्र रंग-

वेशभूषा, इत्यािद घटकांच्या मदतीने िवनोदिनिमर् ती करतो. अनेक लोकपरंपरांमध्ये सोंगे काढली जातात. यात रंग-

वेशभुषा, हालचाली आिण बोलणे, इत्यािद घटक अनुकरणात्मक पद्धतीने वापरले जातात.

४. अिभनयाची लोक-शैली
भारतातील िविवध लोकपरंपरांमधून पुढीलप्रमाणे अिभनय-कौशल्ये िदसून येतात –

बव्हंशी लोकपरंपरा या िनवेदनपर आहेत. िनवेदन करताना, गोष्ट सांगताना लोककलाकार वेगवेगळ्या

साधनांचा उपयोग करत असतात. संगीत, नृत्य, िवनोद, रंग-वेशभुषेतील घटक, मुखवटे, िचत्रे, बाहुल्या, इत्यािद ही

ती साधनं. या साधनांचा उपयोग करुन लोककलाकार आपली िनवेदनं अधीक पिरणामकारक पद्धतीनं प्रेक्षकांपयर्ंत

पोचवत असतात. या साधनांचा उपयोग हे लोकशैलीच्या अिभनयाचं एक महत्त्वाचे वैिशष्ट्य आहे.

लोकरंगभूमीवर िवधीनाट्यातल्या अनेक घटकांचा उपयोग असतो. पुनरावृत्ती, संकेतबद्धता, प्रतीकांचा वापर,

इत्यािद घटकांचा त्यात समावेश होतो. बोलणं, शारीिरक कृती, रंगभूषा, वेशभूषा आिण मंचवस्तूंचा वापर,

इत्यादींमधून हे घटक िदसून येतात.

समयपटू त्व िकंवा टायिमंग हे लोकरंगभूमीवरील महत्त्वाचं वैिशष्ट्य आहे. िवशेषतः मनोरंजनपर िवनोदी

पद्धतीच्या प्रकारांमध्ये हे वैिशष्ट्य अिधक प्रमाणात वापरलेलं िदसतं. बोलणं आिण शारीिरक कृती या दोन्हींमधून ते

िदसतं. पिरणामकारकता हे त्याचं सगळ्यांत महत्त्वाचं फिलत असतं.

लोकरंगभूमीवरील अिभनयात अितशयोक्तीचा वापर असतो. हा वापर बर्‍याच वेळा िवनोदी पद्धतीने होतो.

बोलणं, हालचाल, कृती, शारीिरक व्यंग िकंवा तकार्चे खेळ (संवादामधील कपोलकल्पीत, काहीशा अतािकर्क

लोककलेचा बािवशी सापळा "3


भरार्‍या) इत्यादींमधून अितशयोक्ती िदसून येत.े हालचालींचं, आवाजाचं आिण शरीरातील एकूणच उजेर्चं वधर्न हा

अितशयोक्तीचाच एक प्रकार आहे.

लोकरंगभूमीवरील अिभनयात शारीिरकतेचा आिवष्कार िदसतो. अिभनयात नृत्य, पदन्यास आिण नृत्यवजा

हालचालींचा समावेश असतो. लोकरंगभूमीवरील नट आपल्या शरीरात उजार् साठवून ठे वत असतो आिण त्या उजेर्चा

योग्य उपयोग करत असतो. नटाच्या हालचालींमधून तसंच आवाजामधून ती उजार् प्रकट होत असते. त्या उजेर्चा

योग्य, नेमका आिण पिरणामकारक वापर करण्यासाठी नटानं आपल्या शरीराच्या हालचालींमध्ये आिण

बोलण्याच्या पद्धतीत िविशष्ठता आणलेली असते.

लोकरंगभूमीवरील अिभनयात काही लोकोत्तर िकंवा अलौिकक तत्त्वे िदसून येतात. काही िवधींमध्ये नटात

देवावतरण होतं, असा समज असतो. वैज्ञािनक दृिष्टकोनातून हे अथार्तच चुकीचं आहे. अतीव िवश्वास िकंवा श्रद्धेच्या

जोरावर नट तंद्रीच्या म्हणजेच ट्रान्सीडेन्टल अवस्थेत प्रवेश करतात. या अवस्थेत त्यांचं स्वतःवरचं िनयंत्रण कमीत

कमी असतं. आपले संपूणर् शरीर त्यांनी जणू ज्याचं सोंग आणलेलं असतं त्याला बहाल केलेलं असतं. नट आिण

त्याची भूिमका, तसंच नटाचं शरीर आिण त्याचं मन यांच्यात एकतानता िनमार्ण झालेली असते.

लयतत्व हा लोकरंगभूमीवरील अिभनयाचाच एक भाग आहे. संगीत, नृत्य, हालचाली, यमक-अनुप्रासयुक्त

बोलणं या सवार्ंमधून लय जाणवत असते.

उत्स्फूतर्ता हे लोकरंगभूमीवरील अिभनयाचे सवार्ंत मोठं वैिशष्ट्य होय. जवळजवळ सगळ्या

लोककलाप्रकारांना िलखीत संिहता नसते. गाणी िकंवा पद्यभाग ठरलेला असतो. गद्य िनवेदने आिण संवाद हे उत्स्फूतर्

असतात. बर्‍याचदा तत्कालीन स्थािनक घडामोडींवर उत्स्फूतर्पणे भाष्य केलं जातं. बोलण्याप्रमाणेच काही कृती,

हातवारे आिण लकबीदेखील उत्स्फूतर्पणे सादर केल्या जातात. कथानकाची चौकट आिण त्यातील गीत व पद्यभाग

ठरलेला असतो. बाकी सवर् भाग प्रेक्षकांशी सुसंवाद साधत उत्स्फूतर्पणे सादर केला जातो. छोटे िकस्से, बतावण्या,

वणर्नं, शेरे, इत्यािद गोष्टी उत्स्फूतर्पणे सादर केल्या जातात.

गाणी गाणारा, नृत्य करणारा, िवनोद करणारा, गोष्टी सांगणारा, वेगवेगळी सोंगे घेणारा भारतीय

लोकरंगभूमीवरील नट एका अथार्नं सवर्समावेशक सादरकतार्, टोटल परफॉमर्र असतो. भारतीय लोकरंगभूमीवरील

बहूसंख्य कलावंत बाह्य-संस्कारांपासून तसेच औपचािरक िशक्षणाच्या प्रभावापासून वंिचत असतात. परंपरेनं चालत

आलेल्या त्यांच्या अिभव्यक्तीला काही अपवाद वगळल्यास कोणत्या शास्त्रांचा िकंवा ग्रंथांचा कोणताही आधार

नसतो. सवर्समावेशकता, रांगडेपणा आिण उत्स्फूतर्ता ही भारतीय लोकरंगभूमीवरील नटाची महत्त्वाची वैिशष्ट्यं होत.

५. आजची िस्थती

लोककलेचा बािवशी सापळा "4


वसाहतवादाच्या काळात भारतात युरोपीय नाटक आलं, ते त्याचा त्या वेळचा कमानी मंच, नाट्यलेखन शैली

आिण अिभनय-शैली घेऊन आलं. समाजातील सुिशिक्षत आिण उच्च वगार्नं हे युरोपीय नाटक आपलंस करून

मराठी भाषेतून मांडलं. समाजातल्या बहूजन वगार्कडू न सादर होणार्‍या आिण आस्वाद घेतल्या जाणार्‍या

लोकरंगभूमीला रांगडी, अिशष्ठ, ओबडधोबड, अश्लील अशी िवशेषणं बहाल झाली. मावळतीच्या देशांप्रमाणे

लोकरंगभूमी मूख्यधारेत परावितर् त झाली नाही, तर उलट क्षीण झाली. भारतातील समाजव्यवस्था आिण जातवास्तव

हे त्या मागचं महत्त्वाचं कारण होय, कारण भारतातला लोकरंगभूमीचा जवळजवळ प्रत्येक प्रकार हा िविशष्ट जातीला

िचकटलेला आहे, आिण बहुसंख्य लोककलावंत हे जातीच्या उतरंडीतील खालच्या वगार्ंतले आहेत.

भारतातल्या कला राजाश्रयी असल्यामुळे समाजातील दांिभकता रंगमंचावर आणण्याऐवजी, दुदैर्वानं भारतीय

लोकरंगभूमी हेजेमनीला बळी पडली. वरच्या वगार्ंचा अनुनय करत पातीव्रत्य, स्वामीिनष्ठा अशा मुल्यांचा रंगमंचावरुन

अनुनय झाला. समाजातील िवषमतेवर टीका झाली, पण ती केवळ िटप्पणीतून. िकंवा समस्या मांडल्या गेल्या त्या

वरवरच्या, ढोबळ पद्धतीने. जहरी मािमर् कता त्यात अभावानेच आली.

स्वातंत्र्यानंतर लोकरंगभूमीच्या समस्या अजूनच वाढल्या. आधुिनक जािणवा मांडण्यासाठी लोकरंगभूमीचा

खेळण्यासारखा उपयोग होऊ लागला. ‘लोकांची रंगभूमी ती लोकरंगभूमी’ न राहता, िशष्ट लोकांची, महोत्सवी नाटकं

करणारी लोकरंगभूमी ठरली. याखेिरज िवद्यािपठीय संशोधकांना देखील डॉक्टरेट िमळवण्यासाठी लोकरंगभूमीचं

कुरण उपलब्ध झालं. गिरब-िबचार्‍या लोककलावंतांच्या मुलाखती घेऊन, त्यांची छायािचत्रे घेऊन प्राध्यापकांच्या

पगारवाढी झाल्या असतील, लोककलांच्या-लोककलावंतांच्या पिरस्थीतीत मात्र या संशोधनाने काय फरक पडला

हा संशोधनाचाच िवषय ठरावा.

६. बािवशी सापळा
जोसेफ हेलर ह्या लेखकानं १९६१ मध्ये ‘कॅच २२’ नावाची कादंबरी िलिहली. ह्या कादंबरीमध्ये सैिनकी

नोकरशाहीच्या काही िविचत्र परस्परिवरोधी िनयमांमुळे िनमार्ण होणार्‍या पिरिस्थतीचं वणर्न केलेलं आहे. दलदलीत

फसलेला प्राणी ज्याप्रमाणं हातपाय मारायला लागला की अिधकािधक खोलात जाऊ लागतो, पण त्यानं काहीही

प्रयत्न केले नाहीत तरी तो बुडतोच अशा पद्धतीच्या दुष्टचक्र पिरिस्थतीला तेव्हापासून कॅच २२ पिरिस्थती असं नाव

िमळालं. ह्या दुिवधेच्या िकंवा सुटकाच नसलेल्या पिरिस्थतीत सापडलेल्यांची अवस्था फारच िबकट असते कारण

त्याच्या सुटकेच्या मागार्मुळेच नवा सापळा रचला जात असतो. आपल्या अिधकारांचा गैरवापर करण्यासाठी िकंवा

आपली गुिपतं लपवण्यासाठी सत्तासंस्था नेहमीच अशा पद्धतीने कॅच २२ पिरिस्थती िनमार्ण करत असते असे

इितहासातात अनेक दाखले िमळतात.

लोककलेचा बािवशी सापळा "5


आज मनोरंजनाचं क्षेत्र, त्यातील आिथर् क गिणते पूवीर्च्या मानाने अमूलाग्र बदलले आहेत. लोककला संपत

चालल्यात, नामशेष होत चालल्यात अशी ओरड आपल्याला सवर्दरू ऐकायला िमळतं. मनोरंजनाचं स्वरुप बदललंय,

व्याप्ती मोठ्या प्रमाणात िवस्तारलीय. पूवीर् व्यावसायीक नाटक मग िचत्रपट त्यानंतर दूरिचत्रवाणी, उपग्रह वािहन्या

आिण आता इं टरनेट, यू-ट्युब, बेविसिरज ह्या बदलत जाणार्‍या आिण लोकांना स्वस्तात आिण सुलभपणे उपलब्ध

होणार्‍या मनोरंजन माध्यमांनी लोकरंगभूमीसमोर आव्हानं उभी केली आहेत. बदललेल्या काळानुरुप आपल्या

सादरीकरणात काहीच बदल केला नाही तर प्रेक्षकांना मुकावं लागणार आिण समजा तसे बदल केले तर मूळ स्वरूप

नाहीसे होणार, अशी कॅच २२ पिरिस्थती लोकरंगभूमीसमोर उभी राहीली आहे. परंपरेने चालत आलेल्या आपल्या

कलेचे जतन करावे िक पिरस्थीतीनुसार आपल्या कलेत बदल करावा, अशा कात्रीत आजचा लोककलावंत सापडला

आहे. आपल्या मातीत जन्म घेतलेल्या आिण आपल्या पूवर्जांचे मनोरंजन केलेल्या लोकरंगभूमीसमोर आज

अिस्तत्वाचाच प्रश्न िनमार्ण झालेला आहे आिण ह्या प्रश्नांची उत्तरं शोधणारे मागर् नवे प्रश्न उपिस्थत करत आहेत

असा बािवशी सापळ्यात लोककला आज सापडली आहे आिण ह्या सापळ्यातून कशी सुटका करून घ्यावी हे खरं

आव्हान आहे.

प्रवीण भोळे 

प्राध्यापक आिण िवभागप्रमुख

लिलत कला केंद्र, गुरुकुल

सािवत्रीबाई फुले पुणे िवद्यापीठ, पुणे ४११ ००७

praveen@unipune.ac.in

लोककलेचा बािवशी सापळा "6

You might also like