You are on page 1of 7

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे

प्रथम वर्ष कला (ऐच्छिक मराठी)


(सत्र २)

विषय : कविता - एक साहित्यप्रकार


(अभ्यासपत्रिका I)
कवितेची व्याख्या, घटक...

घटक : एक
डॉ. प्रज्ञा दया पवार
कवितेविषयी
‘ कविता हा अतिशय प्राचीन असा साहित्यप्रकार आहे. माणसाला जेव्हा
माणूसपण प्राप्त झाले आणि त्या माणुसपणाचा आविष्कार करावा असे त्याला वाटू
लागले तेव्हा त्याने पहिल्यांदा जी अभिव्यक्ती के ली ती कवितेमध्येच असली
पाहिजे असे मानले जाते.
सर्वच भाषांमध्ये कविता या साहित्यप्रकाराला प्रदीर्घ आणि अखंड अशी
परंपरा असल्याचे दिसून येते. याचे कारण म्हणजे आदिमानवाने सर्व प्रथम ज्या
भावना प्रकट के ल्या असतील त्या त्याने गाऊन आणि नाचूनच प्रकट के ल्या
असणार.
लिपीचा शोध लागण्यापूर्वी किं वा लेखन रूढ होण्यापूर्वी मौखिक रूपात
असंख्य आविष्कार झाले होते आणि या आविष्कारातील सर्वात प्रधान आविष्कार
गीताचा म्हणजेच पद्याचा म्हणजेच कवितेचा होता.
कवितेच्या व्याख्या

 कवितेच्या विविध व्याख्या आजवर मांडल्या गेल्या आहेत.

1. लयबद्ध रचना म्हणजे काव्य होय.


2. रसात्मक वाक्य म्हणजे काव्य होय.
3. रीती म्हणजे शैली हाच काव्याचा आत्मा आहे.
4. रमणीय अशा अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजे काव्य होय.
कवितेच्या व्याख्या

5. काव्य म्हणजे सौंदर्याची लयबद्ध निर्मिती.


6. काव्य ही कल्पना आणि भावना यांची भाषा होय.
7. उत्कट भावनेचा उत्स्फू र्त आविष्कार म्हणजे काव्य होय.
8. नादवती, अर्थवती, ध्वनीवती शब्दरचना म्हणजे कविता होय.

 काव्याच्या उपरोक्त व्याख्यांमधून कवितेचे वेगवेगळे विशेष व्यक्त झालेले दिसतात. कवितेची
संपूर्ण अशी एकमेव व्याख्या करता येणे अवघड आहे. परंतु कविता कशाला म्हणता येईल हे
वरील व्याख्यांवरून स्पष्ट होते.
कवितेचे घटक
1. कवितेत शब्द असतात.
2. त्या शब्दांचा काही क्रम निश्‍चित के लेला असतो.
3. शब्द योजून तयार के लेल्या ओळी गद्यासारख्या कर्ता, कर्म, क्रियापद असलेल्या
ओळींसारख्या नसतात, त्या मध्ये तोडलेल्या असतात.
4. शब्दांना नाद असतो.
5. ओळींमध्ये लय असते, एकापुढे एक ठेवलेल्या शब्दांच्या उच्चारात संगीतमयता आढळते.
6. कवितेत रचनेचे काही नियम पाळलेले दिसतात.
कवितेचे घटक

7. कवितेत लय असते किं वा छंद किं वा वृत्त यांची बंधने पाळलेली असतात.
8. अशी वृत्ताची बंधने नसलेल्या मुक्तछंदात अथवा मुक्त शैलीतही कवितेची रचना होत असते.
9. कवितेत ‘काही’ सांगितलेले असते, ‘भावना’ किं वा ‘विचार’ व्यक्त झालेला असतो.
10. कवीचा स्वर कवितेतून ऐकू न येतो. हा स्वर शांत, संतप्त, खिन्न, मिश्किल, उदास, तटस्थ
यापैकी कोणताही असू शकतो.
11. लयबद्धता, सूचकत्व, अनेकार्थक्षमता, अल्पाक्षरत्व, व्यापक जीवनाशयक्षमता, सेंद्रिय
एकात्मता आणि संवेद्यता हे कवितेचे महत्त्वाचे घटक म्हणता येतील.
धन्यवाद…!!

शुभेच्छा...!!

You might also like