You are on page 1of 4

निसर्ग कधीच संपत नाही.

जी.ए.इ.टी
वसंत विहार हायस्कू ल आणि कनिष्ठ महाविद्यालय
विषय – मराठी – द्वितीय भाषा
पाठ नियोजन (२०२४-२५)
इयत्ता – पाचवी पाठाचे नाव --- नाच रे मोरा

LEARNING OBJECTIVES : १)मुलांमध्ये आत्मविश्वास वाढवणे.

२)वाचन लेखन काम करणे.

३)विद्यार्थ्यांना निखळ आनंद मिळवून देणे.

SET INDUCTION: (प्रस्तावना) प्रश्न विचारून पाठाची प्रस्तावना करणे.


१)पाऊस सुरू झाला की कोणाला आनंद होतो?

२)पाऊस सुरू होण्यापूर्वी वातावरण कसे असते?

३)सरस्वती देवीचे वाहन कोणते आहे?

PRESENTATION: ( सादरीकरण)

SHOULD DO: (KNOWLEDGE)


1) वाचन कौशल्य विकास
2) शब्द ओळख
3) लेखन कौशल्य विकास
4) मराठी शब्द भंडारात वाढ

MUST DO: ( UNDERSTANDING)


1) मुलांना विविध ऋतूंचे ज्ञान आहे.
2) मुले विविध ऋतूतील बदलांचे निरीक्षण करतील.

CAN DO:
मुले विविध ऋतूंची निसर्ग चित्रे काढतील.

MAY DO :
मुले स्वतःचा अनुभव आपल्या शब्दात मांडतील.

PROCESS :
शिक्षक प्रश्न उत्तरे विचारून कवितेची प्रस्तावना करतील. कवितेचे गायन
करतील स्पष्टीकरण करतील. मुलांच्या गायनातील चुका सुधारतील. समानार्थी
शब्द विरुद्धार्थी शब्द कठीण शब्दांचे अर्थ सांगून मुलांचे शब्द भांडार विकसित
करतील. प्रश्न उत्तरावर चर्चा करतील.

कवितेचा सारांश -- नाच रे मोरा ---- काळा काळा कापूस पिंजला---- फु लव


पिसारा नाच---- पावसाचा न्हाऊ---- काहीतरी गाऊ---- पावसाच्या रेघात खेळ
खेळू दोघांत---- पावसाची रिमझिम थांबली---- तुझी माझी जोडी जमली---
सातरंगी कमानीखाली त्या नाच.

EVALUATION:
शब्दार्थ :
सौंगडी – मित्र, सवंगडी वन – जंगल
इरली – ऊन-पावसापासून बचाव करणारे डोक्यावर घेण्याचे वस्त्र
आभाळ – आकाश न्हाणे – आंघोळ करणे पुकारणे - हाक मारणे
कमान – अर्धगोल, धनुष्याकृ ती आकार

समानार्थी शब्द
आंबा – आम्र वन – जंगल,कानन वारा – पवन,अनिल झाड- वृक्ष तरू
आकाश – गगन, अंबर मोर - मयूर ढग - जलद वीज –
दामिनी
पाऊस - पर्जन्य नाच -नृत्य तळे - तलाव पान – पर्ण

विरुद्धार्थी शब्द:
काळा x पांढरा ,गोरा भिजली x सुकली खाली x वर

एक ते दोन शब्दात उत्तरे लिहा.


१.टाळी कोण देते ? वीज
२.तळ्यात कोण नाचत आहेत ? थेंब
३.वारा कोणाशी झुंजला आहे ? ढगांशी

एका वाक्यात उत्तरे लिहा.


१.मोर कोठे नाचत आहे ?
उ. मोर आंब्याच्या वनात नाचत आहे.
२.मोर कसा नाचत आहे ?
मोर पिसारा फु लवून नाचत आहे.
३.सात रंगी कमान कोठे दिसत आहे ?
उ.सात रंगी कमान आभाळात दिसत आहे.
निळा सौंगडी कोणाला म्हटले आहे ?
उ.निळा सौंगडी मोराला म्हटले आहे.
४.सात रंगी कमान म्हणजे काय ?
उ.सात रंगी कमान म्हणजे आकाशात येणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य होय.
५.काळा कापूस कोणाला म्हटले आहे ?
उ.काळा कापूस पावसाच्या ढगाला म्हटले आहे

खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.


प्र.१.कवीने पावसाळ्यातील वातावरणाचे वर्णन कसे के ले आहे ?
उ.वरील प्रश्न नाचरे मोरा या कवितेतील असून याचे कवी ग.दि.माडगूळकर
आहेत. यात पावसाळ्याचे सुंदर वर्णन के ले आहे.तसेच एक लहान मुलगी मोराला
पावसात पिसारा फु लवून आनंदाने नाचायला सांगत आहे.
आकाशात काळे काळे ढग जमले आहेत. वारा सुटला आहे. वीज चमकत आहे.
झरझर पावसाची धार पडत आहे. झाडांची इरली भिजली आहे व पावसाचे थेंब
तळ्यात नाचत आहेत. पावसाच्या थेंबांचा पानावर पडू न टपटप आवाज येत आहे.
आकाशात सात रंगी इंद्रधनुष्य दिसत आहे. अशाप्रकारे कवीने पावसाळ्यातील
वातावरणाचे वर्णन के ले आहे.
प्र.२.प्रस्तुत कवितेत आभाळाचे वर्णन कवीने कसे के ले आहे ?
उ.वरील प्रश्न नाचरे मोरा या कवितेतील असून याचे कवी ग.दि.माडगूळकर
आहेत. यात पावसाळ्याचे सुंदर वर्णन के ले आहे.तसेच एक लहान मुलगी मोराला
पावसात पिसारा फु लवून आनंदाने नाचायला सांगत आहे.
पाऊस सुरू होण्यापूर्वी आभाळात काळा काळा कापूस पिंजावा असे काळे ढग
जमले आहेत व वीज कडाडते आहे. तसेच पावसाची रिमझिम थांबल्यावर
आभाळात सात रंगी इंद्रधनुष्य दिसत आहे. अशाप्रकारे कवितेत आभाळाचे वर्णन
के ले आहे.

SUPW -------------------------------------------------

LIFE SKILL: मुले निसर्गात होणारे बदल अनुभवतील.

ACTIVITY: पावसात आनंदाने नृत्य करणाऱ्या मोराचे सुंदर चित्र काढा व वर्गात
लावा.

You might also like