You are on page 1of 8

मराठी (द्‌वितीय भाषा) अक्षरभारती इयत्ता दहावी

² इयत्ता दहावीच्या प्रस्तावित आराखड्यानुसार नमुना कृतिपत्रिका क्र.२


वेळ- ३ तास एकूण गुण-१००

कृतिपत्रिकेसाठी सूचना
(१) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात.
(२) आकृत्या पेननेच काढाव्यात.
(३) उपयोजित लेखनातील प्रश्नांसाठी (सूचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच हे प्रश्न
लिहून घेऊ नयेत.
(४) विभाग ५- उपयोजित लेखन प्र.५ (अ) (२) सारांशलेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्र.१ (इ) अपठित
उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
(५) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.
विभाग - १ : गद्य
पठित गद्य
प्र.१. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कारण लिहा. ०२
(i) लेखकाचे वडील त्यांना खेळात नेहमीच प्रोत्साहन देत असत कारण...
(ii) लेखकाच्या आई-वडिलांना आनंद वाटत असे कारण...
पुढच्या आयुष्यात क्रिकेट खेळाडू होण्याची खूणगाठ मी इथेच मनाशी बांधली. प्रॅक्टिस संपल्यावर चेंडू गोळा
करू लागणे, दुसऱ्या दिवसासाठी ग्राऊंडवर पाणी मारणे इत्यादी कामांत मी ग्राऊंड्‌समनला आनंदाने मदत करत
असे. हे सर्व होत असता, रात्रीचे ६ ते ८ वाजता माझे काका सर्व मुलांना एकत्र बसवून प्रार्थना शिकवत व
अभ्यासाला बसवत.
त्यानंतर एक आनंदाची गोष्ट घडली. माझ्या वडिलांची बदली परत पुण्यास झाली. माझ्या आई-वडिलांना
वाय. एम. सी. ए. मधील खेळाडूंकडून माझ्या खेळाबाबत स्तुतीपर उद्‌गार ऐकू येऊ लागले, ते ऐकून त्यांना
आनंद वाटे. माझे वडील स्वत: व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. त्यामुळे ते मला खेळात नेहमीच प्रोत्साहन देत. एकदा
दुपारी त्यांना जेवणाचा डबा घेऊन गेलो असताना त्यांनी मला दुकानात नेले व सहा रुपयांस एक जुनी बॅट विकत
घेऊन दिली. ती बॅट पाहून माझा आनंद गगनात मावेना. मी तसाच ती बॅट घेऊन मित्रांना दाखवत सुटलो. त्या
वेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा चोवीस रुपये होता. माझे वडील अभ्यास व शाळा यांबाबतीत फारच
कडक असत. एकदा मी शाळा चुकवून ग्राऊंडवर क्रिकेटचा एक मित्रत्वाचा सामना पाहत बसलो होतो. वडील
घरी आले तेव्हा त्यांनी मला पाहिले व संतापाने छड्या मारत शाळेत नेऊन बसवले. त्या क्षणापासून मी शाळा मात्र
कधीच चुकवली नाही.

1
(२) आकृतिबंध पूर्ण करा. ०२
ग्राउंडस
्‌ मनला लेखकांनी केलेली मदत

........... ...........

(३) व्याकरण
खालील वाक्याच्या आधारे तक्ता पूर्ण करा. ०२
‘माझे वडील उत्तम खेळाडू होते.’
नाम सर्वनाम विशेषण क्रियापद
............... ............... ............... ...............
(४) स्वमत- लेखकांनी खेळ व अभ्यास यांचे संतुलन कसे राखले ते तुमच्या शब्दांत लिहा. ०२
प्र.१. (अा) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) (i) का ते लिहा.
वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत लेखकाला अनवाणी राहावे लागले कारण .... ०१
(ii) आकृतिबंध पूर्ण करा. ०१

लेखकाच्या शाळेची वैशिष्ट्ये

................... ...................

आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले. माझे मामाही याच गावातले.
तिथल्या एका मैदानावर खेळल्याच्या आणि पिंपळकट्ट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटशा
आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारख्या येत असतात. माझ्या वयाच्या सहाव्या वर्षी माझे
वडील वारले आणि आम्हांला उदरनिर्वाहासाठी आमचे माशेल हे गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई
मुंबईत येऊन पोहोचलो. गिरगावातल्या खेतवाडीतील देशमुख गल्लीमध्ये ‘मालती निवासा’तील पहिल्या
माळ्यावर छोट्याशा खोल्यांमध्ये आम्ही मायलेक राहात होतो. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली.
दारिद्र्याशी संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई आणि शिक्षणासाठी आसुसलेला; पण कोणतीच फी भरणे
शक्य नसल्याने ‘शाळेत कसा जाऊ?’ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारा मी. त्यावेळचं वातावरण हे असं होतं!
पण माझ्या आईनं धीर सोडला नाही. ती खचली नाही. वेगवेगळी कष्टाची कामं ती करत होती. त्यातच
माशेलहून मुंबईत आलेले माझे मामाही मदतीला आले. त्यांच्यामुळे मला खेतवाडीतील प्राथमिक शाळेत
प्रवेश मिळू शकला. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणेच शाळेचीही परिस्थिती बेताचीच होती; पण
इथले शिक्षक मात्र मनानं खूप श्रीमंत होते. पायात चप्पलही घालायला नव्हती अशा परिस्थितीत माझी शाळा
सुरू होती. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मला अनवाणीच राहावं लागलं.

2
(२) चौकटी पूर्ण करा. ०२
(i) लेखकाने केलेले आईचे वर्णन-
(ii) लेखकाची आर्थिक परिस्थिती-
(iii) लेखकाचे मूळ गाव-
(iv) लेखकाच्या कुटुंबाच्या मदतीसाठी आलेले-
(३) खालील वाक्यांतील अधोरेखित अव्ययांचे प्रकार ओळखा. ०२
प्रवेश फी भरणे शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले; पण माझ्या आईने धीर सोडला
नाही.
(४) स्वमत-‘डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या यशामध्ये त्यांच्या आईचा मोठा वाटा आहे.’ हे विधान स्पष्ट करा.०२
प्र.१. (इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) भाषाविकासाचा ओघतक्ता तयार करा. ०२
भाषाविकासाचे टप्पे

भाषा ही मानवाला मिळालेली सर्वोत्तम देणगी आहे. भाषा हे परस्परसंवादाचे एक प्रभावी माध्यम आहे.
आपले भाषेचे शिक्षण घरापासूनच सुरु होते. जन्माला आल्यापासून कानांवर पडणारी भाषा आपण आपल्याही
नकळत सहजपणे आत्मसात करतो. श्रवणाच्या या टप्प्याकडून आपण हळूहळू भाषणाच्या टप्प्याकडे वळतो.
आजीच्या तोंडून ऐकलेली गोष्ट आपण स्वत: सांगू लागतो, ऐकलेली गाणी गुणगुणू लागतो. यानंतरचा टप्पा
म्हणजे वाचन. याचे शिक्षण आपल्याला शाळेतून मिळते. एक एक अक्षर मग शब्द, छोटी वाक्ये असे वाचन
हळूहळू जमू लागले की वाचनात रुची निर्माण होते आणि मग याच क्रमाने आपण लेखनाचा टप्पाही सहज पार
करतो. वाचनात समृद्‌धता असेल तर लेखनात कसदारपणा येतो. तसेच लेखन उत्तम असेल तर वाचकाचा
आनंद दुणावतो. चांगल्या लेखनासाठी उत्तम हस्ताक्षर हवे, लेखन शुद्ध हवे, दोन शब्दांत योग्य अंतर हवे आणि
मुख्य म्हणजे विरामचिन्हे, अर्थदर्शक चिन्हे यांचा योग्य वापर करायला हवा. लेखन अर्थपूर्ण व दर्जेदार असावे.

(२) आकृतिबंध पूर्ण करा. ०२


चांगल्या लेखनाची वैशिष्ट्ये

............. ............. ............. .............

3
(३) खालील शब्दांचे समानार्थी शब्द उताऱ्यातून शोधून लिहा. ०२
(अ) आवड-
(आ) हर्ष-
(इ) मुख-
(ई) कथा-
(४) स्वमत- लेखनामध्ये असलेली विरामचिन्हांची आवश्यकता स्पष्ट करा. ०२
विभाग २ पद्य
प्र. २. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) नावे लिहा. ०१
(i) अनोखी तुष्टी मिळण्याचे ठिकाण-
(ii) यंत्रांच्या संगतीत मिळणारे-  
(२) संकल्पना स्पष्ट करा. ०१
(i) काळी आई-
(ii) हिरवं मन-

फुलाफुलांचे दाट ताटवे, जिथे पोचते दृष्टी


रंग मजेचे, रंग उदयाचे, जपून ठेवू सृष्टी...

धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू


मातीमध्ये जे हात राबती, तयांस देऊ पुष्टी...
रंग मजेचे, रंग उदयाचे

उधळू, फेकू बिया डोंगरी, रुजतील देशी झाडे


गच्च माजतील राने, होईल आभाळातून वृष्टी...
रंग मजेचे, रंग उदयाचे
डोंगरातून वाहात येते, खळाळते हे पाणी
फेनधवलशा तुषारांमध्ये, राहाल कैसे कष्टी?
रंग मजेचे, रंग उदयाचे
मिळेल पैसा, मिळेल दौलत, यंत्रांच्या संगती
आभाळाच्या छत्राखाली, एक अनोखी तुष्टी...
रंग मजेचे, रंग उदयाचे

हिरवी हिरवी मने भोवती, किती छटा हिरव्याच्या


गर्भरेशमी सळसळण्याच्या जगास सांगू गोष्टी...
रंग मजेचे, रंग उदयाचे

4
(३) परिणाम लिहा. ०२
घटना परिणाम
(i) बिया डोंगरावर फेकणे. .....................
(ii) आभाळातून वृष्टी होणे. .....................
(४) ‘धान्य देईना संगणक हा, काळी आई जगवू’ या ओळींतील विचारसौंदर्य स्पष्ट करा. ०२
(५) वसुंधरेचे हिरवेपण जपण्यासाठी तुम्हांला माहित असलेले उपाय सुचवा. ०२
प्र. २. (अा) दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती पूर्ण करा. ०८
अंकिला मी दास तुझा
किंवा
योगी सर्वकाळ सुखदाता
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (०१) गुण
(२) कवितेचा रचनाप्रकार (०१ गुण)
(३) कवितेचा काव्यसंग्रह (०१ गुण)
(४) कवितेचा विषय (०१ गुण)
(५) कवितेतील आवडलेली ओळ (०२ गुण)
(६) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे (०२ गुण)
प्र. २. (इ) खालील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. ०४
अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण;
दीनदुबळ्यांचे असें
तुला एकच औक्षण.

विभाग ३- स्थूलवाचन
प्र.३. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. ०६
(१) ‘कॅक्टस’ झाडांनी अवर्षणात टिकून राहण्यासाठी पैदा केलेल्या तंत्रांविषयी माहिती लिहा.
(२) सूर्य आणि पणती यांच्यातील संवाद स्वत:च्या कल्पनेने लिहा.
(३) ‘प्रत्यक्ष अनुभवांतून शिकणे हे अधिक परिणामकारक असते’, हे विधान ‘मोठे होत असलेल्या मुलांनो...’ या
पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
विभाग ४- भाषाभ्यास

प्र.४. (अ) (१) तक्ता पूर्ण करा. ०२


सामासिक शब्द समासाचा विग्रह समासाचे नाव
(i) आईवडील ............... ...............
(ii) ............... प्रत्येक पावलावर ...............
5
(२) (i) खालील वाक्यातील अलंकार ओळखा. ०२
पावडेकाकांची पावले लोण्यासारखी आहेत.
(ii) खालील लक्षणावरून अलंकार ओळखा.
उपमेय हेच उपमान आहे अशी कल्पना केलेली असते.
(३) कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. ०२
(i) भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? (विधानार्थी करा.)
(ii) सुट्टीत भरपूर वाचन करावे. (आज्ञार्थी करा.)
(४) तक्ता पूर्ण करा. ०२
शब्द मूळ शब्द सामान्यरूप
(i) आचाऱ्याने ............... ...............
(ii) शाळेला ............... ...............
(५) खालील वाक्प्रचारांचा वाक्यांत योग्य जागी वापर करून वाक्ये पुन्हा लिहा. ०२
(आर्जव करणे, खूणगाठ बांधणे, भुरळ पाडणे)
(i) सहलीला जाण्यासाठी मुग्धाने वडिलांना अनेकदा विनंती केली.
(ii) मोठेपणी गायक होण्याचा अथर्वने ठाम निश्चय केला होता.
प्र.४. (अा) (१) भाषिक घटकांवर आधारित कृती.
(१) शब्दसंपत्ती
(i) गटात न बसणारा शब्द ओळखा. ०१
(अ) माता, माऊली, जनक, जननी
(आ) गगन, मेघ, आकाश, नभ
(ii) खालील शब्दाचे दोन भिन्न अर्थ लिहा. ०१
मित्र
(iii) खालील शब्दांतील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. (‘डोंगर’ व ‘पायथा’ हे शब्द सोडून) ०१
डोंगरपायथा- ............... ...............
(iv) विरुद्धार्थी शब्द लिहा. ०१
(अ) समर्थ Ï
(आ) सन्मान Ï
(२) लेखननियमांनुसार लेखन
(i) खालीलपैकी अचूक शब्द ओळखा. ०१
(अ) वैशिष्ट/वैशिष्ट्य/विशिष्ट्य/वैषिश्ट्य
(आ) सुर्यकिरण/सूर्यकीरण/सूर्यकिरण/सुर्यकीरण

6
(ii) खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा. ०१
वाघीणीनं नाला पार करून बांबुच्या गंजीत पाय ठेवला.
(३) विरामचिन्हे
(i) खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. ०१
बाबा, तुम्ही मला ओळखले
(ii) खालील वाक्यातील विरामचिन्हांची नावे लिहा. ०१
‘‘मग कसलं वजन उतरवणार तुम्ही?’’
विरामचिन्हे विरामचिन्हांची नावे

(४) पारिभाषिक शब्द ०१


खालील इंग्रजी शब्दांसाठी प्रचलित मराठी शब्द लिहा.
(i) Footprints (ii) Joke
(५) खालील शब्द अकारविल्हे लावा. ०१
पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण
विभाग ५ उपयोजित लेखन
प्र.५. (अ) (१) पत्रलेखन ०५

‘नवभारत विद्यालय’ आयोजित


वक्तृत्व स्पर्धा-२५ सप्टेंबर
कलानगर, गोरेगाव (पू), मुंबई-४०००६३
परीक्षक- श्री. सुबोध पवार
योगानंद सोसायटी, बोरिवली (प.),
मुंबई-४०००९२

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने


वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक वक्तृत्व स्पर्धेसाठी परीक्षक
म्हणून उपस्थित राहण्याची किंवा म्हणून उपस्थित
विनंती करा. राहिल्याबद्दल आभार माना.

(२) सारांशलेखन
विभाग - १ गद्य विभागातील प्र.१ इ मधील अपठित उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा. ०५

7
प्र.५. (अा) खालील कृती सोडवा.
(१) खालील शब्दांवरून आकर्षक जाहिरात तयार करा. ०६
l संगणक वर्ग l खास सवलत
l काळाची गरज l तंत्रज्ञानाशी मैत्री
l प्रवेश मर्यादित

(२) कथालेखन ०६
खालील मुद्‌द्यांच्या आधारे कथालेखन करा.
दोन बोके-लोण्याचा गोळा मिळणे-वाटणीवरून भांडण-माकडाचे तराजू घेऊन येणे-वाटणी करून
देण्याच्या निमित्ताने स्वत:च लोणी खाणे-दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ.
प्र.५. (इ) लेखनकौशल्य. ०८
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा.
(१) प्रसंगलेखन

‘दिव्यदृष्टी अंध विद्यालय’ पुणे


‘वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा’
दि.२० डिसेंबर
‘अंध विद्यार्थ्यांचा अनुपम
कलाविष्कार सोहळा’
l वाद्यवादन l गायन l नृत्य

वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून या प्रसंगाचे लेखन करा.

(२) आत्मकथन

कार्य दु:ख

सूर्य
अनुपस्थितीचे
महत्त्व
धोके

वरील घटक तुमच्याशी बोलत आहे अशी कल्पना करून दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे त्या घटकाचे आत्मवृत्त लिहा.

You might also like