You are on page 1of 8

मराठी (द्‌वितीय भाषा) अक्षरभारती इयत्ता दहावी

² इयत्ता दहावीच्या प्रस्तावित आराखड्यानुसार नमुना कृतिपत्रिका क्र.१


वेळ- ३ तास एकूण गुण-१००

कृतिपत्रिकेसाठी सूचना
(१) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात.
(२) आकृत्या पेननेच काढाव्यात.
(३) उपयोजित लेखनातील प्रश्नांसाठी (सूचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच हे प्रश्न
लिहून घेऊ नयेत.
(४) विभाग ५- उपयोजित लेखन प्र.५ (अ) (२) सारांशलेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्र.१ (इ) अपठित
उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
(५) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.
विभाग - १ : गद्य
पठित गद्य
प्र.१. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कोण ते लिहा. ०२
(i) सभा, संमेलने गाजवणारे कवी-
(ii) विश्वकोशाचे अध्यक्ष या नात्याने वाईला जाणारे-
(iii) लेखकाचा शाल देऊन गौरव करणारे-
(iv) मासे पकडण्याचा उद्योग करणारी-

एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या
बेतात होतो; तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, ‘‘तुम्हांला शाल दिली तर चालेल काय?’’
मी एका पायावर ‘हो’ म्हटले. पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी, हा मला मोठा गौरव वाटला.
ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही.
पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत
असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई
माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात
होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले
नाही. मी सुटकेसमधील ‘पुलकित’शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक
मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, ‘‘त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत
बैस.’’ या घटनेची ऊब पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती.
कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा, संमेलने गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामत:
त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राही.
एकदा ते मला म्हणाले, ‘‘या शाली घेऊन घेऊन मी आता ‘शालीन’ बनू लागलो आहे.’’
1
(२) का ते लिहा. ०२
(i) बाळ रडत होते कारण ....
(ii) लेखकाने सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली कारण....
(३) खालील शब्दांसाठी उताऱ्यात आलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधून लिहा. ०२
(i) वर Ï 
  (ii) उद्ध‌ ट Ï 
(iii) ओहोटी Ï  (iv) कमी Ï 
(४) स्वमत- ‘‘शाल व शालीनता’ यांचा पाठाच्या आधारे तुम्हांला कळलेला अर्थ स्पष्ट करा. ०२
प्र.१. (अा) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ०२
(१) कारणे लिहा.
(i) लेखकाच्या वडिलांना त्यांच्या मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्य नव्हते कारण ...........................
(ii) लहानपणी लेखकाच्या पाठीवर घरातल्यांकडून धम्मकलाडू व चापटपोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा
कारण ..................................

माझ्या बालमित्रांनो, मी तुमच्याएवढा होतो तेव्हा अगदी तुमच्यासारखाच खेळकर, खोडकर व


उपद्‌व्यापी होतो! माझा जन्म पुण्यातच एका गरीब कुटुंबात झाला. माझे वडील त्या वेळेस
पोलीसखात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. तेव्हा साहजिकच गरीब कुटुंबाच्या वाट्याला
येणारे सारे कष्ट व दु:खे आम्ही भोगत होतो. अशा परिस्थितीत वडिलांना आम्हां मुलांसाठी खेळणी
विकत घेणे शक्यच नव्हते. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून आम्हांला त्यांचा हेवा वाटत असे.
तरी पण गल्लीतील मुलांना जमा करून उन्हातान्हात विटीदांडू खेळणे, पतंग उडवणे, कधीमधी
कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे; कैऱ्या, पेरू पाडून त्यांचा यथेच्छ स्वाद घेणे, घरात जळणासाठी
आणलेल्या लाकडांतूनच बॅट व स्टंप तयार करणे व कुठून तरी जुना पुराणा बॉल पैदा करून क्रिकेट
खेळणे असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्याबद्दल बऱ्याच
तक्रारी आईच्या कानांवर आलेल्या असायच्या. दिवसभराच्या खेळाने भूक तर खूपच लागलेली
असायची. घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्मकलाडू व चापटपोळ्यांचा यथेच्छ वर्षाव
व्हायचा. मग मी घरात एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचा! तिथेच झोप लागायची आणि जाग
यायची ती आईच्या प्रेमळ कुशीत.

(२) आकृती पूर्ण करा. ०२


लहानपणी लेखकाचा असलेला दिवसभराचा कार्यक्रम

(३) खालील शब्दांसाठी उताऱ्यात आलेले समान अर्थाचे शब्द शोधून लिहा. ०२
(i) दीन (ii) निद्रा (iii) श्रम (iv) हस्त
(४) स्वमत- लेखकाच्या बालपणीच्या आठवणींवरून त्यांच्यातील तुम्हांला जाणवलेल्या ०२
गुणवैशिष्ट्यांविषयी मत लिहा.

2
अपठित गद्य
प्र.१. (इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ०२
(१) कोण ते लिहा.
(i) रामेश्वरम बेटावरील इंग्रजी जाणणारा एकमेव माणूस-
(ii) कलाम यांना वाचनासाठी उत्तेजन देणारे-
(iii) रामनाथपुरमला जाण्यासाठी वडिलांकडे परवानगी मागणारे-
(iv) रामेश्वरम येथील वर्तमानपत्रांचे वितरक-
जलालुद्‌दीन फारसा शिकला नाही पण त्याने अब्दुल कलामना मात्र शिकण्यासाठी सदैव प्रोत्साहन
दिले. रामेश्वरम बेटावर इंग्रजी जाणणारा तो एकटाच माणूस होता. त्यानेच अब्दुल कलामना नवनव्या
वैज्ञानिक शोधांबद्दल, साहित्याबद्दल, आधुनिक उपचारपद्धतीबद्दल ओळख करून दिली. त्यांच्या
गावात एस. टी. आर माणिकन्‌ नावाचे एक माजी क्रांतिकारक राष्ट्रभक्त राहत होते. त्यांच्याकडे पुस्तकांचा
संग्रह होता. त्यांनी कलाम यांना पुस्तक वाचण्यासाठी सदैव उत्तेजन दिले. शमसुद्दीन नावाच्या दूरच्या
भावाचा कलामवर प्रभाव होता. तो रामेश्वरममध्ये वर्तमानपत्राचा वितरक होता. रेल्वेने पंबन गावाहून
वर्तमानपत्रांचे गठ्ठे येत. पुढे शमसुद्दीन त्याचे वाटप करी. दिनमणी हे सर्वात लोकप्रिय तमीळ वृत्तपत्र
होते. १९३९ मध्ये दुसरे महायुद्ध पेटल्यावर पंबनहून येणारी गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली. चालत्या
गाडीतून ते गठ्ठे फेकले जात. ते गोळा करण्याच्या कामात शमसुद्दीनला कलाम मदत करू लागला.
अब्दुल कलामच्या आयुष्यातील ती पहिली कष्टाची कमाई! दुसरे महायुद्ध संपल्यावर रामेश्वरम सोडून
जिल्ह्याच्या ठिकाणी, रामनाथपुरमला शिक्षण घेण्यासाठी कलामांनी वडिलांकडे परवानगी मागितली.
वडील म्हणाले, ‘‘अब्दुल, तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून शिक्षणासाठी बाहेर जायला हवे.’’
शमसुद्दीन आणि जलालुद्दीन कलामबरोबर रामनाथपुरमला गेले. कलामने कलेक्टर व्हावे अशी त्यांच्या
वडिलांची इच्छा होती. जलालुद्दीन म्हणाला, ‘‘मनामध्ये नेहमी आशावादी, भविष्याबद्दल चांगलेच
विचार आणत जा. त्यामुळे आपल्या विचारांच्या शक्तीचा भविष्यावर चांगला परिणाम होईल.’’

(२) परिणाम लिहा. ०२


(i) दुसरे महायुद्ध पेटले.
(ii) कलाम वृत्तपत्रे गोळा करण्याच्या कामात मदत करू लागले.
(३) विशेषण-विशेष्य यांच्या जोड्या जुळवा. ०२

दुसरे नवे विशेषण विशेष्य


शोध
दूरचा वृत्तपत्र ............. .............
लोकप्रिय
............. .............
महायुद्ध भाऊ
............. .............
............. .............
(४) स्वमत- पाठाच्याआधारे आशावादी विचारांचे महत्त्व तुमच्या शब्दांत लिहा. ०२

3
विभाग २ पद्य
प्र. २. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) चौकटी पूर्ण करा. ०२
(i) सर्वकाळ सुखदाता-
(ii) तात्पुरती तहान भागविणारे-
(iii) अभंगात वर्णन केलेला, चंद्रकिरण पिऊन जगणारा पक्षी-
(iv) पिलांना सुरक्षितता देणारे-

जेवीं चंद्रकिरण चकोरांसी । पांखोवा जेवीं पिलियांसी ।


जीवन जैसे कां जीवांसी । तेवीं सर्वांसी मृदुत्व ।।
जळ वरिवरी क्षाळी मळ । योगिया सबाह्य करी निर्मळ ।
उदक सुखी करी एक वेळ । योगी सर्वकाळ सुखदाता ।।
उदकाचें सुख तें किती । सवेंचि क्षणें तृषितें होती ।
योगिया दे स्वानंदतृप्ती । सुखासी विकृती पैं नाही ।।
उदकाची जे मधुरता । ते रसनेसीचि तत्त्वतां ।
योगियांचे गोडपण पाहतां । होय निवविता सर्वेंद्रियां ।।
मेघमुखें अध:पतन । उदकाचें देखोनि जाण ।
अध:पातें निवती जन । अन्नदान सकळांसी ।।
तैसे योगियासी खालुतें येणें । जे इहलोकीं जन्म पावणें ।
जन निववी श्रवणकीर्तनें । निजज्ञानें उद्‌धरी ।।

(२) तुलना करा. ०२


योगीपुरुष पाणी

(३) योगी पुरुषाचे श्रेष्ठत्व तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. ०२


(४) ‘सर्वकाळ सुखदाता’ असे योगी पुरुषास म्हणण्याची कोणती कारणे असावीत,
असे तुम्हांस वाटते? ०२

4
प्र. २. (अा) ‘‘औक्षण’ व ‘स्वप्न करू साकार’ या दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील ०८
मुद्‌द्यांना अनुसरून कृती सोडवा.
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री- (०१ गुण)
(२) कवितेचा रचनाप्रकार- (०१ गुण)
(३) कवितेचा विषय- (०१ गुण)
(४) कवितेतून व्यक्त होणारा भाव (स्थायी भाव)- (०१ गुण)
(५) कवितेतून व्यक्त होणारा विचार- (०२ गुण)
(६) कवितेतील आवडलेली ओळ- (०२ गुण)
प्र. २. (इ) खालील ओळींचे रसग्रहण करा. ०४
दुनियेचा विचार हरघडी केला,
अगा जगमय झालो
दु:ख पेलावे कसे, पुन्हा जगावे कसे,
याच शाळेत शिकलो.

विभाग ३- स्थूलवाचन
प्र.३. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. ०६
(१) ‘स्काय इज द लिमिट’ ही परिस्थिती केव्हा निर्माण होऊ शकते ते ‘मोठे होत असलेल्या मुलांनो....’ या
पाठाच्या आधारे लिहा.
(२) वाळवंटी प्रदेशातील झाडांना काटे असण्याची कोणकोणती कारणे असावीत, असे तुम्हांला वाटते ते लिहा.
(३) टीप लिहा.
व्युत्पत्ती कोशाचे कार्य
विभाग ४- भाषाभ्यास

प्र.४. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती


(१) समास
खालील तक्ता पूर्ण करा. ०२
सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
(i) दारोदार
(ii) भाजीपाला

5
(२) अलंकार ०२
खालील उदाहरण वाचून कृती करा.
आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहूदे!
वरील उदाहरणातील i) उपमेय-
ii) उपमान-
iii) साधर्म्यवाचक शब्द-
iv) अलंकार-
(३) वाक्यरूपांतर ०२
कंसातील सूचनेनुसार कृती करा.
(i) अबब! केवढा हा साप! (विधानार्थी करा.)
(ii) रोज व्यायाम करावा. (आज्ञार्थी करा.)
(४) सामान्यरूप ०२
अधोरेखित शब्दांचे सामान्यरूप व विभक्ती प्रत्यय लिहून तक्ता पूर्ण करा.
सर्वांच्या डोळ्यांतील कौतुकाचे भाव पाहण्यासाठी माझी मान अभिमानाने वर आली.
शब्द सामान्यरूप विभक्ती
(i) कौतुकाचे
(ii) अभिमानाने
(५) वाक्प्रचार ०२
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.
(i) थक्क होणे-
(ii) भारावून जाणे-
प्र.४. (अा) भाषासौंदर्य
(१) शब्दसंपत्ती
(i) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. ०१
(अ) व्याख्यान देणारा-
(अा) गीत रचणारा-
(ii) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. ०१
(अ) गुण Ï
(अा) आशा Ï
(iii) गटात न बसणारा शब्द ओळखा. ०१
(अ) शशी, रवी, हिमांशू, सोम-
(आ) वात, समीर, पवन, सलिल-
(iv) खालील शब्दांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. (‘बाल’ व ‘भारती’ हे शब्द सोडून) ०१
बालभारती ............ , ............

6
(२) लेखननियमांनुसार लेखन
(i) खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा. ०१
आमच्या हायस्कुलमध्ये दर शनिवारी चाचणी परिक्षा घेण्यात येत असे.
(ii) अचूक शब्द ओळखा. ०१
(१) पुर्नवसन/पूनर्वसन/पुनर्वसन/पुनरवसन
(२) अशीर्वाद/आशिर्वाद/आर्शिवाद/आशीर्वाद
(३) विरामचिन्हे
(१) खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा. ०१
(i) केवढी उंच इमारत ही
(ii) मी कसे व्यक्त करणार
(२) खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून लिहा. ०१
रेहाना, जुई, जॉन सगळ्यांनी खेळायला या.
(४) पारिभाषिक शब्द ०१
पारिभाषिक शब्दांचा अर्थ प्रचलित मराठी भाषेत लिहा-
(i) Section- (ii) Office-
(५) अकारविल्हे ०१
खालील शब्द अकारविल्हे लावा.
बाग, पतंग, दोर, कागद
विभाग ५ उपयोजित लेखन
प्र.५. (अ) (१) पत्रलेखन
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती सोडवा. ०५

जनता विद्यालय, कामथडी


स्मृति-पारितोषिक वितरण समारंभ
दि. २६ डिसेंबर दुपारी-४.००
प्रमुख पाहुणे- श्री. अमर चव्हाण
अध्यक्ष- श्री. राेहित एरंडे
मुख्याध्यापक

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने

पारितोषिकप्राप्त विद्यार्थी- पारितोषिकप्राप्त विद्यार्थ्यांच्या


चि. ईशान/चि.इरा गोखले याचे/ किंवा पालकांना समारंभासाठी उपस्थित
हिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा. राहण्याची विनंती करणारे पत्र लिहा.

7
(२) सारांशलेखन ०५
विभाग - १ गद्य विभागातील प्र.१ इ मधील अपठित उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
प्र.५. (अा) खालील कृती सोडवा.
(१) बातमीलेखन (६० ते ८० शब्द) ०६
नगर वाचन मंदिर
मंगळवार पेठ, वाई, जि. सातारा
वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष व्याख्यान
दि.१५ ऑक्टोबर दु.४.००
वक्ते- मा. श्री. अरविंद चौगुले (प्रसिद्ध लेखक)
अध्यक्ष- मा. श्री. रवींद्र पाटील
प्रवेश विनामूल्य
सर्वांना सस्नेह निमंत्रण
वाचन प्रेरणा दिनानिमित्त वरील कार्यक्रमाची बातमी तयार करून लिहा.
(२) कथालेखन (८० ते १०० शब्द) ०६
खालील अपूर्ण कथा वाचा. तुमचा विचार व कल्पकतेने ती कथा पूर्ण करा.
(दिलेली अपूर्ण कथा लिहून घेण्याची आवश्यकता नाही.)
रोझी मन लावून अभ्यास करत होती. सभोवती सगळा वह्या-पुस्तकांचा पसारा होता. अभ्यास करता-
करता तिचे लक्ष तिच्या आवडत्या फिकट निळ्या रंगाच्या वहीकडे गेले. वहीच्या पानातून मोरपिसाचे टोक
डोकावत हाेते. तिने हातातले अभ्यासाचे पुस्तक मिटवले आणि ..................
प्र.५. (इ) लेखनकौशल्य ०८
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (शब्दमर्यादा १०० ते १२० शब्द)
(१) प्रसंगलेखन
एकसष्टी सत्कार समारंभ
नातेवाईकांची उपस्थिती धरमपेठ,नागपूर येथील राहते घर
आजीच्या कार्यकर्तृत्वाचा
आढावा दि.२९ ऑगस्ट
आजीचा एकसष्टावा वाढदिवस दु.११.००
सत्कार
औक्षण
वरील प्रसंगी तुम्ही उपस्थित होता अशी कल्पना करून या प्रसंगाचे लेखन करा.

‡
(२) आत्मवृत्त

वरील घटक तुमच्याशी बोलतो आहे अशी कल्पना करून त्या घटकाने आत्मवृत्त लिहा.
8

You might also like