You are on page 1of 7

मराठी (द्‌वितीय भाषा) अक्षरभारती इयत्ता दहावी

² इयत्ता दहावीच्या प्रस्तावित आराखड्यानुसार नमुना उत्तरपत्रिका क्र.३


वेळ- ३ तास एकूण गुण-१००

विभाग - १ : गद्य
पठित गद्य
प्र.१. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कारणे लिहा. ०२
(i) निरंजन भडसावळे गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता. कारण....
तो अतिशय प्रामाणिकपणे काम आणि अभ्यास करायचा.
(ii) निरंजन वार लावून जेवायचा, कारण...
मावशीची परिस्थिती यथातथाच होती.
(प्रत्येकी ०१ गुण)
(२) आकृतिबंध पूर्ण करा. ०१
(i) भडसावळे गुरुजींनी निरंजनला केलेली मदत

वार लावून दिले वह्या-पुस्तकांचा


खर्च उचलला
(ii) निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्धा होती. ०१
(प्रत्येकी १/२ गुण)
(३) व्याकरण
पुढील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्ये पुन्हा लिहा. ०२
(i) ती त्यांची लाडकी विद्यार्थिनी होती.
(ii) काही दिवस मामीने सांभाळ केला.
(प्रत्येकी ०१ गुण)
(४) स्वमत- प्रश्न समजून आशयानुरूप विचार, निरीक्षण यांवर आधारित स्वमत मांडणीस गुणदान करावे. ०२
प्र.१. (अा) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) (i) सहसंबंध जोडा. ०१
(अ) लेखक : वि. वा शिरवाडकर :: कवीवर्य : कुसुमाग्रज
(अा) यमक : शब्दालंकार :: उत्प्रेक्षा : अर्थालंकार
(प्रत्येकी १/२ गुण)

1
(२) (i) आकृतिबंध पूर्ण करा. ०१

कविता

रुप शब्दरचना

छोटंसं, आटोपशीर अर्थपूर्ण, चपखल


(प्रत्येकी १/२ गुण)
(ii) आकृती पूर्ण करा. ०२

काळानुसार कवितेची बदललेली रूपे

............. ............. ............. .............


(प्रत्येकी १/२ गुण)
(३) खालील तक्ता पूर्ण करा. ०२
दिलेला शब्द विभक्ती प्रत्यय
(i) अर्थालंकारांनी नी
(ii) कवितेची ची
(iii) पाठ्यपुस्तकात त
(iv) प्रतिभेने ने
(प्रत्येकी १/२ गुण)
(४) स्वमत- प्रश्न समजून आशयानुरूप विचार, निरीक्षण यांवर आधारित स्वमत मांडणीस गुणदान करावे. ०२
प्र.१. (इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कोण ते लिहा. ०२
(i) चैतन्य निर्माण करणारा- खळाळणारा झरा
(ii) कष्टाचे महत्त्व सांगणारी- मुंगी
(iii) प्रगतीचा संदेश देणारी- नदी
(iv) पृथ्वीला जीवनदान देणारे- ढग
(प्रत्येकी १/२ गुण)
(२) आकृतिबंध पूर्ण करा. ०२
निसर्गाकडून शिकता येण्यासारखे गुण

परोपकारी वृत्ती परिपक्वता नियमितपणा शिस्तप्रियता


(प्रत्येकी १/२ गुण)

2
(३) पुढील शब्दांच्या जाती ओळखा. ०२
(अ) निसर्ग- नाम
(आ) आपल्या- सर्वनाम
(इ) धीरगंभीर- विशेषण
(ई) शिकावी- क्रियापद
(प्रत्येकी १/२ गुण)

(४) स्वमत- प्रश्न समजून आशयानुरूप विचार, निरीक्षण यांवर आधारित स्वमत मांडणीस गुणदान करावे. ०२
विभाग २ पद्य
प्र. २. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) चौकटी पूर्ण करा. ०२
(i) डोळे भरून पाहावे असे दृश्य- सैनिकाच्या विजयाची दौड
(ii) सैनिकाच्या शौर्यगाथेपुढे लहान वाटणारी गोष्ट- जीव

(iii) तोफा धडाडताना पडणाऱ्या सैनिकाचे पाऊल- जिद्दीचे


(iv) दीनदुबळ्यांकडे नसलेलेल सामर्थ्य- कष्टाचे
(प्रत्येकी १/२ गुण)
(२) आकृतिबंध पूर्ण करा. ०२
कवयित्रीने वर्णिलेली युद्धजन्य परिस्थिती

तोफगोळ्यांचा धुराचे कल्लोळ


भडिमार/घोंघावणारा
बंबारा
(प्रत्येक मुद्‌द्याला प्रत्येकी ०१ गुण)
(४) काव्यसौंदर्य ०२
कृतीचा अर्थ समजून त्यांतील भाव/विचार/अर्थ यांची स्वभाषेत मांडणी.
(५) -’’- ०२
प्र. २. (अा) दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती पूर्ण करा. ०८
दोन दिवस
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री- नारायण सुर्वे (०१) गुण
(२) कवितेचा रचनाप्रकार- मुक्तछंद (०१ गुण)
(३) कवितेचा काव्यसंग्रह- ऐसा गा मी ब्रह्म (०१ गुण)
3
(४) कवितेचा विषय- जीवनाचे वास्तव चित्रण भीषण जीवनसत्य सांगून रेखाटले आहे. (०१ गुण)
(५) कवितेच्या कवीची/कवयित्रिची लेखनवैशिष्ट्ये- निवेदनात्मक, संवादाचा वापर प्रभावीपणे करणारी,
बोलीभाषेशी जवळीक असणारी व गद्याच्या अंगाने जाणाऱ्या भाषेत कामगार जीवनाची सुखदु:खे
मांडण्याची हातोटी ही कवींची लेखनवैशिष्ट्ये होत. (०२ गुण)
(६) कवितेतील आवडलेली ओळ (०२ गुण)
(योग्य उत्तराला ०२ गुण द्यावेत.)
किंवा
हिरवंगार झाडासारखं

(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री- जॉर्ज लोपीस (०१) गुण
(२) कवितेचा रचनाप्रकार- मुक्तछंद (०१ गुण)
(३) कवितेचा काव्यसंग्रह- पूर्ण झाले आहे (०१ गुण)
(४) कवितेचा विषय- सहनशीलता, दातृत्व, सहकार्याची वृत्ती, खंबीरपणा हे झाडाचे गुण अंगी
बाणवून माणसाने झाडासारखे आनंदी जीवन जगावे. (०१ गुण)
(५) कवितेच्या कवीची/कवयित्रिची लेखनवैशिष्ट्ये- संवेदनशीलता, निरीक्षणशक्ती व माणसाने अानंदी
राहण्यासाठी उपदेश करण्याची हातोटी. (०२ गुण)
(६) कवितेतील आवडलेली ओळ (०२ गुण)
(योग्य उत्तराला ०२ गुण द्यावेत.)
रसग्रहण
कवितेचा अर्थ/आशय समजून योग्य उत्तर, भाषाशैली, काव्यवैशिष्ट्ये इ. लक्षात घेऊन एकत्रित ०४
गुणदान करणे अपेक्षित.

विभाग ३- स्थूलवाचन
प्र.३. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. ०६
संपूर्ण पाठाचे आकलन व पाठातील मध्यवर्ती विचार कृतींच्या उत्तरात येणे अपेक्षित.
विभाग ४- भाषाभ्यास

प्र.४. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती


(१) समास ०२
समास आणि सामासिक शब्दांच्या जोड्या लावा.
सामासिक शब्द समास
(i) खतपाणी समाहार द्‌वंद्‌व समास
(ii) पितापुत्र इतरेतर द्‌वंद्‌व समास
(iii) खरेखोटे वैकल्पिक द्‌वंद्‌व समास
(iv) आमरण अव्ययीभाव समास
(प्रत्येकी १/२ गुण)

4
(२) अलंकार ०२
खालील उदाहरण वाचून कृती करा.
‘डोळे बारीक करिती लुकलुक
गोल मणी जणू ते’
(i) उपमेय- डोळे
(ii) उपमान- गोल मणी
(iii) साधर्म्यवाचक शब्द- जणू
(iv) अलंकार- उत्प्रेक्षा
(प्रत्येकी १/२ गुण)
(३) कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. ०२
(i) किती सुंदर दिसतो भारद्वाज पक्षी!
(ii) विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करायला नको का?
(प्रत्येकी ०१ गुण)
(४) सामान्यरूप ०२
खालील वाक्याच्या आधारे तक्ता पूर्ण करा.
वाळवंटी प्रदेशात झाडांना काटे असतात.
शब्द मूळ शब्द सामान्यरूप
(i) प्रदेशात प्रदेश प्रदेशा
(ii) झाडांना झाड झाडा
(प्रत्येक योग्य शब्दांस १/२ गुण)
(५) वाक्प्रचार ०२
खालील वाक्यांतील वाक्प्रचार ओळखून त्यांचे अर्थ लिहा.
(i) मूठभर मांस वाढणे- स्तुतीने हुरळून जाणे.
(ii) भान ठेवणे- जाणीव ठेवणे.
(वाक्प्रचार ओळखणे- १/२ गुण, योग्य अर्थ लिहिणे- १/२ गुण)

5
प्र.४. (अा) (१) भाषिक घटकांवर आधारित कृती
(१) शब्दसंपत्ती
(i) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. ०१
(अ) नदी- सरिता (आ) माणूस- मानव
(प्रत्येकी १/२ गुण)
(ii) सहसंबंध जोडा. ०१
(अ) मंद : जलद : : दाट : विरळ

(अा) प्रश्न : उत्तर : : सोपे : कठीण
(प्रत्येकी १/२ गुण)
(iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. ०१
(अ) ठरवलेले व्रत मध्येच सोडणे- व्रतभंग
(अा) पायात चप्पल न घालता- अनवाणी
(प्रत्येकी १/२ गुण)
(iv) खालील शब्दाचे दोन भिन्न अर्थ लिहा. ०१
लायक पात्र व्यक्तिरेखा
(भांडे, नदीचे पात्र ही उत्तरेही योग्य आहेत.)
(प्रत्येकी १/२ गुण)
(२) लेखननियमांनुसार लेखन
(i) खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा. ०१
अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती.
(प्रत्येकी १/२ गुण)
(ii) खालीपैकी अचूक शब्द ओळखा. ०१
(अ) भीष्मप्रतिज्ञा
(अा) निसर्गसौंदर्य
(प्रत्येकी १/२ गुण)
(३) विरामचिन्हे
(i) खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.
(अ) ‘‘अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे.’’ ०१
(प्रत्येकी योग्य चिन्हास १/२ गुण)
(अा) लाल, हिरव्या, निळ्या बांगड्याकडे त्याने बघितले. ०१
(प्रत्येकी योग्य चिन्हास १/२ गुण)

6
(४) पारिभाषिक शब्द ०१
पुढील इंग्रजी शब्दांसाठी प्रचलित मराठी शब्द लिहा.
(i) Event- घटना (ii) Verbal- शाब्दिक, तोंडी
(प्रत्येकी १/२ गुण)
(५) पुढील शब्द अकारविल्हे लावा. ०१
कावेरी, गंगा, नर्मदा, यमुना
(प्रत्येकी १/२ गुण)
विभाग ५ उपयोजित लेखन
प्र.५. (अ) (१) पत्रलेखन ०५
इ-मेलच्या स्वरूपात मायना/विषय/शेवट, योग्य भाषाशैली
(२) सारांशलेखन ०५
उताऱ्याचा संपूर्ण आशय नेटक्या शब्दांत मांडणे. स्वभाषेत सारांशलेखन अपेक्षित.
प्र.५. (अा) खालील कृती सोडवा.
(१) बातमीलेखन ०६
तटस्थपणे लेखन, अचूक तपशील, समर्पक शब्दरचना अपेक्षित.
(२) जाहिरातलेखन ०६
अचूक तपशील, आकर्षक मांडणी, कल्पकता अपेक्षित.
प्र.५. (इ) लेखनकौशल्य ०८
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (शब्दमर्यादा १०० ते १२० शब्द)
(१) प्रसंगलेखन
-संवेदनशील लेखन, सुरुवात/मध्य/शेवट, नावीन्यपूर्ण कल्पना अपेक्षित.
(२) आत्मवृत्त
-भाषा (प्रथमपुरुषी एकवचनी) विषयानुरूप, सुसूत्र मांडणी अपेक्षित.

You might also like