You are on page 1of 10

मराठी (द्‌वितीय भाषा) अक्षरभारती इयत्ता दहावी

² इयत्ता दहावीच्या प्रस्तावित आराखड्यानुसार नमुना कृतिपत्रिका क्र.३


वेळ- ३ तास एकूण गुण-१००

कृतिपत्रिकेसाठी सूचना
(१) सूचनेनुसार आकलनकृती व व्याकरण यामधील आकृत्या काढाव्यात.
(२) आकृत्या पेननेच काढाव्यात.
(३) उपयोजित लेखनातील प्रश्नांसाठी (सूचना, निवेदन) आकृतीची आवश्यकता नाही. तसेच हे प्रश्न
लिहून घेऊ नयेत.
(४) विभाग ५- उपयोजित लेखन प्र.५ (अ) (२) सारांशलेखन या घटकासाठी गद्य विभागातील प्र.१ (इ) अपठित
उतारा वाचून त्या उताऱ्याचा सारांश लिहावयाचा आहे.
(५) स्वच्छता, नीटनेटकेपणा व लेखननियमांनुसार लेखन यांकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे.
विभाग - १ : गद्य
पठित गद्य
प्र.१. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कारणे लिहा. ०२
(i) निरंजन भडसावळे गुरुजींचा लाडका विद्यार्थी होता कारण....
(ii) निरंजन वार लावून जेवायचा कारण...

निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्‌धा होती. तसं गुरुजींचंही निरंजनवर खूप प्रेम होतं. तो त्यांचा लाडका विद्यार्थी
होता, कारण तो अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा आणि अभ्यासही. या जगात त्याचं असं कुणी नव्हतंच.
दूरदूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा. गावापासून दूर
डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. आईवडील लहानपणीच वारले. काही दिवस मामाने सांभाळ केला
आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला
तो कायमचाच. जाताना मोलाचा सल्ला मात्र देऊन गेला- ‘रडत बसू नको. शेण, गोठा वगैरे जी पडतील ती सारी
कामं कर. मावशी देईल ते खा आणि इथंच रहा. मावशी तुला शाळेतही घालणार आहे.’
मामा गेला तो पुन्हा परतला नाही मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. घरातल्या
सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन
वार लावून जेवायचा. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरामोठ्यांच्या
घरी वार लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा, मग तिथून शाळेत.
त्याच्या वह्या-पुस्तकांचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे.

1
(२) आकृतिबंध पूर्ण करा. ०१
(i) भडसावळे गुरुजींनी निरंजनला केलेली मदत

........... ...........

(ii) अचूक विधान लिहा. ०१


(अ) निरंजन सख्या मावशीकडे राहत होता.
(अा) निरंजनचा मामा कामासाठी मुंबईला आला होता.
(इ) निरंजनची गुरुजींवर अपार श्रद्‌धा होती.
(ई) निरंजनचा मामा वारंवार भेटायला येत होता.
(३) व्याकरण
खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे लिंग बदलून वाक्ये पुन्हा लिहा. ०२
(i) तो त्यांचा लाडका विद्यार्थी होता.
(ii) काही दिवस मामाने सांभाळ केला.
(४) स्वमत-निरंजनच्या जडणघडणीत भडसावळे गुरुजींचा मोलाचा वाटा अाहे, पाठाच्या आधारे ०२
स्पष्ट करा.
प्र.१. (अा) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) (i) सहसंबंध जोडा. ०१
(अ) लेखक वि. वा शिरवाडकर :: कवीवर्य :
(अा) यमक : शब्दालंकार :: उत्प्रेक्षा :
(ii) आकृतिबंध पूर्ण करा. ०१
कविता

कवितेचे रुप कवितेची शब्दरचना

................... ...................

(२) आकृती पूर्ण करा. ०२


काळानुसार कवितेची बदललेली रूपे

............. ............. ............. .............

2
कविता : सुश्रुत, ओळखलंस मला? अरे, मी आहे कविता. आपली तर फार पूर्वीपासून चांगलीच ओळख आहे,
नाही का? तुमच्या पाठ्यपुस्तकांतल्या सगळ्या कविता तुम्ही तालासुरांत म्हणता.
सुश्रुत : हो ताई! मला आठवतंय. ‘ही आवडते मज मनापासुनी शाळा’ आणि ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ या
माझ्या आवडत्या कविता.
कविता : छान हं. सुश्रुत, माझं रूप छोटंसं, आटोपशीर. मोजक्या शब्दांत मोठ्ठा आशय व्यक्त करणं हे माझं
वैशिष्ट्य. यमक, अनुप्रास अशा शब्दालंकारांनी माझं बाह्यरूप आणि उपमा, उत्प्रेक्षा, रूपकासारख्या
अर्थालंकारांनी माझं अंतरंग सजवून कवी मला अधिक आशयगर्भ करतात.
सुश्रुत : मॅडम नेहमी सांगतात कवितेची शब्दरचना अर्थपूर्ण व चपखल असते. कल्पनांचा सुंदर आविष्कार
कवितेत असतो, हे बरोबर ना?
कविता : अगदी बरोबर! आणखी काय माहीत आहे सुश्रुत तुला?
सुश्रुत : ताई, मला असं वाटतं संगीतकारांनी स्वरराज चढवला, की तुझं गाण्यात रूपांतर होतं, कारण तुला मी
पाठ्यपुस्तकात वाचताे आणि सीडीमध्ये, चित्रपटात ऐकतोसुद्धा.
कविता : छान निरीक्षण आहे हं तुझं. बरं, मला एक सांग तुझ्या शाळेत मराठी दिन साजरा करतात का?
सुश्रुत : हो, करतात ना.
कविता : कोणत्या तारखेला करतात?
सुश्रुत : अंऽऽऽ, २७ फेब्रुवारीला.
कविता : अगदी बरोबर. तो कोणाचा जन्मदिवस आहे, माहीत आहे तुला?
सुश्रुत : नाही ग.
कविता : ‘नटसम्राट’ नाटकाचे लेखक वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कवीवर्य कुसुमाग्रज यांचा. त्यांच्या
‘विशाखा’ या काव्यसंग्रहाला मानाचा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाला आहे.
सुश्रुत : खरंच?
कविता : संतकाव्यापासून पंतकाव्य, मध्ययुगीन काव्य, शाहिरी काव्य अशी वळणे घेत आधुनिक काळात मी
मुक्त छंदाचे रूप धारण केले आहे.
(३) व्याकरण
खालील तक्ता पूर्ण करा. ०२
दिलेला शब्द विभक्ती प्रत्यय
(i) अर्थालंकारांनी ..................
(ii) कवितेची ..................
(iii) पाठ्यपुस्तकात ..................
(iv) प्रतिभेने ..................
(४) स्वमत- तुम्हांला आवडणाऱ्या कोणत्याही एका साहित्यप्रकाराची माहिती लिहा. ०२
प्र.१. (इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कोण ते लिहा. ०२
(i) चैतन्य निर्माण करणारा-
(ii) कष्टाचे महत्त्व सांगणारी-
(iii) प्रगतीचा संदेश देणारी-
(iv) पृथ्वीला जीवनदान देणारे-
3
निसर्ग हा उत्तम शिक्षक आहे. निसर्गाकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकता येतात. सूर्य, चंद्र, समुद्राची
भरती, ओहोटी यांचे वेळापत्रक पाहिले तर आपल्याला त्यात नियमितपणा आढळतो. मधमाशी आपल्या वर्तनातून
भविष्यासाठी बेगमी करण्याचा संदेश देते तसेच कष्टाचे महत्त्व सांग. एका रांगेत चालत आपल्या कामासाठी
जाणाऱ्या मुंग्या आपल्याला शिस्तप्रियतेचे धडे देतात. अखंड खळाळणारा झरा आपल्यात चैतन्य निर्माण करते.
सतत पुढे वाहणारी नदी प्रगती साधण्याचा संदेश देत असते. आपल्या वर्षावाने पृथ्वीला जीवनदान देणारे ढग आणि
अनेक प्रकारे इतरांच्या मदतीला येणारे वृक्ष आपल्याला परोपकार वृत्ती शिकवतात. उंचच उंच पर्वत अभिमानास्पद
कामगिरी करून यशाचे शिखर गाठण्याची प्रेरणा देतात. विशाल, अथांग असा सागर म्हणजे तर रत्नांची खाण.
आपल्या गुणांची मिजास न बाळगणाऱ्या धीरगर्भ अशा या सागराकडून परिपक्वता शिकावी. अशा विविध प्रकारे
‘निसर्ग’ नावाचा महान गुरु आपल्यात अनेक गुणांची रुजवणूक करत असतो. एक एक गुण वेचत स्वत:चे
व्यक्तिमत्त्व घडवणे आपल्या हातात असते.

(२) आकृतिबंध पूर्ण करा. ०२

निसर्गाकडून शिकता येण्यासारखे गुण

............. ............. ............. .............

(३) व्याकरण
पुढील शब्दांच्या जाती ओळखा. शब्द जाती ०२
(अ) निसर्ग- (i) निसर्ग ..................
(ii) आपल्या ..................
(आ) आपल्या-
(iii) धीरगंभीर ..................
(इ) धीरगंभीर-
(iv) शिकावी ..................
(ई) शिकावी-
(४) स्वमत- ‘वृक्ष परोपकार शिकवतात’ या वाक्याचा तुम्हांला कळलेला अर्थ उदाहरण देऊन स्पष्ट करा. ०२
विभाग २ पद्य
प्र. २. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) चौकटी पूर्ण करा. ०२
(i) डोळे भरून पाहावे असे दृश्य-
(ii) शौर्यगाथेपुढे लहान वाटणारी गोष्ट-

(iii) सैनिकाचे पाऊल-


(iv) दीनदुबळ्यांकडे नसलेलेल सामर्थ्य-

4
नाही मुठीमधे द्रव्य
नाही शिरेमध्ये रक्त,
काय करावें कळेना
नाही कष्टाचे सामर्थ्य;
जीव ओवाळावा तरी
जीव किती हा लहान;
तुझ्या शौर्यगाथेपुढे
त्याची केवढीशी शान;
वर घोंघावे बंबारा,
पुढे कल्लोळ धुराचे,
धडाडत्या तोफांतून
तुझें पाऊल जिद्दीचें;
तुझी विजयाची दौड
डोळे भरून पहावी;
डोळ्यांतील आसवांची
ज्योत ज्योत पाजळावी
अशा असंख्य ज्योतींची
तुझ्यामागून राखण;
दीनदुबळ्यांचे असें
तुला एकच औक्षण.

(२) आकृतिबंध पूर्ण करा. ०२

कवयित्रीने वर्णन केलेली युद्‌धजन्य परिस्थिती

........... ...........

काव्यसौंदर्य
(३) ‘डोळ्यांतील आसवांची ज्योत ज्योत पाजळावी’ या ओळीतील आशयसौंदर्य स्पष्ट करा. ०२
(४) सैनिकांबद्दलच्या तुमच्या भावना स्वत:च्या शब्दांत व्यक्त करा. ०२

5
प्र. २. (अा) दिलेल्या मुद्‌द्यांच्या आधारे पुढीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी कृती पूर्ण करा. ०८
दोन दिवस
किंवा
हिरवंगार झाडासारखं
(१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (०१) गुण
(२) कवितेचा रचनाप्रकार (०१ गुण)
(३) कवितेचा काव्यसंग्रह (०१ गुण)
(४) कवितेचा विषय (०१ गुण)
(५) कवितेच्या कवीची/कवयित्रिची लेखनवैशिष्ट्ये (०२ गुण)
(६) कवितेतील आवडलेली ओळ (०२ गुण)
प्र. २. (इ) पुढील काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. ०४
उदकाची जे मधुरता । ते रसनेसीचि तत्त्वतां ।
योगियांचे गोडपण पाहतां । होय निवविता सर्वेंद्रिय ।।

विभाग ३- स्थूलवाचन
प्र.३. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. ०६
(१) सूर्यास्ताच्या दर्शनाने मनात निर्माण होणाऱ्या मानवी भावभावना शब्दबद्ध करा.
(२) ‘आधी केले मग सांगितले’, या उक्तीची यथार्थता स्पष्ट करा.
(३) पुढील मुद्‌द्यांच्या आधारे ‘सग्वारो कॅक्टस’ या विषयावर टीप लिहा.
(i) सग्वारो कॅक्टसचे दिसणे
(ii) सग्वारो कॅक्टसचे उपयोग
विभाग ४- भाषाभ्यास

प्र.४. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती


(१) समास ०२
समास आणि सामासिक शब्दांच्या जोड्या लावा.
सामासिक शब्द समास
(i) खतपाणी वैकल्पिक द्‌वंद्‌व समास
(ii) पितापुत्र अव्ययीभाव समास
(iii) खरेखोटे समाहार द्‌वंद्‌व समास
(iv) आमरण इतरेतर द्‌वंद्‌व समास

6
(२) अलंकार ०२
खालील उदाहरण वाचून कृती करा.
‘डोळे बारीक करिती लुकलुक
गोल मणी जणू ते’
(i) उपमेय-
(ii) उपमान-
(iii) साधर्म्यवाचक शब्द-
(iv) अलंकार-
(३) कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा. ०२
(i) भारद्‌वाज पक्षी फारच सुंदर दिसतो. (उद्‌गारार्थी करा.)
(ii) विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करायला हवा (प्रश्नार्थक करा.)
(४) सामान्यरूप ०२
खालील वाक्याच्या आधारे तक्ता पूर्ण करा.
वाळवंटी प्रदेशात झाडांना काटे असतात.
शब्द मूळ शब्द सामान्यरूप
(i) प्रदेशात ........................ ........................
(ii) झाडांना ........................ ........................
(५) वाक्प्रचार ०२
खालील वाक्यांतील वाक्प्रचार ओळखून त्यांचे अर्थ लिहा.
(i) संपूर्ण वर्गासमोर शिक्षकांनी सानिकाच्या निबंधलेखनाचे कौतुक केल्यामुळे सानिकाच्या अंगावर मूठभर
मांस वाढले.
(ii) पर्यावरणरक्षण ही आपली जबाबदारी आहे. याचे प्रत्येकाने भान ठेवले पाहिजे.
प्र.४. (अा) (१) भाषिक घटकांवर आधारित कृती
(१) शब्दसंपत्ती
(i) खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. ०१
(अ) नदी- (आ) माणूस-
(ii) सहसंबंध जोडा. ०१
(अ) मंद : जलद : : दाट :
(अा) प्रश्न : उत्तर : : सोपे :
(iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. ०१
(अ) ठरवलेले व्रत मध्येच सोडणे-
(अा) पायात चप्पल न घालता-

7
(iv) खालील शब्दाचे दोन भिन्न अर्थ लिहा. ०१
पात्र
(२) लेखननियमांनुसार लेखन
(i) खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा. ०१
अमरावतीहून आलेली निमंत्रीत मंडळी मोटारीतुन जाणार होती.
(ii) खालीलपैकी अचूक शब्द ओळखा. ०१
(अ) भिष्मप्रतीज्ञा/भीष्मप्रतिज्ञा/भिश्मप्रतिज्ञा/भीष्मप्रतीज्ञा
(अा) निसर्गसौंदर्य/नीसर्गसौंदर्य/निर्सगसौंदर्य/निसर्गसौदर्य
(३) विरामचिन्हे
(i) खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा. ०२
(अ) अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे.
(अा) लाल हिरव्या निळ्या बांगड्याकडे त्याने बघितले
(४) पारिभाषिक शब्द ०१
खालील इंग्रजी शब्दांसाठी प्रचलित मराठी शब्द लिहा.
(i) Event (ii) Verbal
(५) खालील शब्द अकारविल्हे लावा. ०१
गंगा, यमुना, कावेरी, नर्मदा

8
विभाग ५ उपयोजित लेखन
प्र.५. (अ) (१) खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर पत्रलेखन करा. ०५

मराठी वाङ्‌मय मंडळ,


ज्ञानगंगा विद्यालय,
प्रायोजक- ज्ञानगंगा प्रकाशन
रूईपथ, ठाणे (प.). आयोजित
मराठी निबंध स्पर्धा
२७ फेब्रुवारी २०१९
विषय- माझा आवडता कवी
आकर्षक बक्षिसे- पुस्तकस्वरूपात

विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने

स्पर्धेसाठी वर्गखोल्या उपलब्ध स्पर्धेतील प्रथम क्रमांक विजेत्या


करून देण्याची विनंती करणारे स्पर्धकाचे अभिनंदन करणारे
किंवा
पत्र ज्ञानगंगा विद्यालयाच्या पत्र लिहा.
मुख्याध्यापकांना लिहा.

(२) सारांशलेखन ०५
विभाग - १ गद्य विभागातील प्र.१ इ मधील अपठित उताऱ्याचा १/३ एवढा सारांश तुमच्या शब्दांत लिहा.
प्र.५. (अा) खालील कृती सोडवा.
(१) बातमीलेखन ०६

२२ नोव्हेंबर २०१८
महिला टी-२०
क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिला
संघाचा उपांत्य फेरीत प्रवेश.

वरील विषयावर समर्पक शब्दांत बातमीलेखन करा.

9
(२) जाहिरातलेखन ०६
खालील शब्दांच्या माध्यमातून एक आकर्षक जाहिरात तयार करा.
l विद्यानिधी प्रकाशन, लातूर l भव्य पुस्तक प्रदर्शन व विक्री

l २५ डिसें.२०१८ ते १ जाने.२०१९ l १० टक्के सवलतीत

l टाऊन हॉल मैदान नागपूर l ग्राहकांचे समाधान

प्र.५. (इ) लेखनकौशल्य. ०८


खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा.
(१) प्रसंगलेखन
खालीलप्रसंगी तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून प्रसंगलेखन करा.

‘प्रयोग’ विज्ञान मंडळ,


र्फे ोय

प्रव ०/-



शा ची स भोपाळ आयोजित,

१०
ेश श रु.

्या

ुल्क
जाण ‘आकाशदर्शन सोहळा’
शनिवार १३ जानेवारी संध्या.७.३०
ते रविवार १४ जानेवारी पहाटे ४.३० वाजेपर्यंत
ग्रहांबद्दलची माहिती सांगणारी व्हिडिओफिल्म

(२) आत्मवृत्त

सौंदर्य मी झाड बोलतोय... वृक्षसंवर्धन उपाय

उपयोग/फायदे वृक्षतोडीचे परिणाम

10

You might also like