You are on page 1of 5

NAYAK'S TUTORIALS

Std.: 10 (English) Marathi Marks: 80


Date: 09-Oct-2021 1st Terminals Time: 3 hrs
Chapter: Ch 1,3,4,6,9,10 & Grammar
Q.1 पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा : 7
1 A1) i) आकृ ती पूर्ण करा 1  

ii) चौकटी पूर्ण करा 1  


i. या पाठात जिचा उल्लेख झाला आहे ती नदी -              
ii.विश्वकोशाचे अध्यक्ष म्हणून लेखक येथे गेले -              

           एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात
होतो; तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, ‘‘तुम्हाला शाल दिली तर चालेल काय?’’

          मी एका पायावर ‘हो’ म्हटले. पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी, हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल
मी माझ्या खोलीतल्या सुटके समध्ये ठे वून दिली. वापरली मात्र कधीच नाही.

पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहात असे.
खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृ ष्णानदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या
खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठे वून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे
बाळ कडाक्याच्या थंडीने कु डकु डत रडत होते; पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी
सुटके समधील ‘पुलकित’शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते
सर्व खाली दिले आणि म्हटले, ‘‘त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारीत बैस.’’ या घटनेची ऊब पुलकित
शालीच्या उबे पेक्षा अधिक होती.

A2) i) खालील प्रसंगी लेखकाने के लेली कृ ती 1  


बाईचे बाळ कडाक्याच्या थंडीने कु डकु ड्त होते
ii) कारणे लिहा 1  
बाईच्या बाळासाठी शाल दिल्याच्या घटनेची उब पुलकित शालीच्या उबेपेक्षा जास्त होती कारण -
A3) स्वमत 3  
तुम्ही गरजू व्यक्तीला के लेली मदतीचे वर्णन करा
Q.2 पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा : 4
1 A1) तक्ता पूर्ण करा 2  

      अर्थव्यस्थेमध्ये गरीब अधिक  गरीब  आणि श्रीमंत अधिक  श्रीमंत होत आहेत. समाजातील  विषमतेमुळे  असंतोष,
गुन्हेगारी, चो-या यांचे  प्रमाण वाढते आहे. विज्ञानातील प्रगतीमुळे नानाप्रकारची सुख-साधने उपलब्ध आहेत. ती
मिळवण्याचे लालसा वाढते आहे. मग या गरजा पूर्ण करायच्या तर भरपूर पैसा हवा. तो सन्मार्गाने मिळत नाही मग संपत्ती
मिळवण्याचे झटपट अवैध मार्ग शोधले जातात. रोजगारासाठी  घरदार, आपली माणसे  सोडू न शहरात  राहणारी निम्न
आर्थिक स्तरातील माणसे  संसारसुखापासून वंचित राहतात. कारण  शहरात राहण्यासाठी जागा नाही. मग स्त्रियांवरील
अत्याचारासारख्या गंभीर समस्या उद्भवतात. यातून कु ठलाही कायदा राबविणे, शिस्त पाळणे, गुन्हेगारीला आळा घालणे या
गोष्टी प्रचंड लोकसंख्येमुळे प्रशासनाच्या हाताबाहेर जाताना दिसतात. त्यामुळे अशा अनेक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे
लागते. माणसाचे सरासरी आयुर्मान वाढल्यामुळे वृद्धांचे प्रश्र वाढत  आहेत. शिक्षणामुळे
संततीनियमनाचा  विचार  सुशिक्षितांमध्ये रुजतो आहे; पण गरीब, अशिक्षित समाजात  हा विचार  रुजलेला  नाही.
अभ्यासकांनी २०१५ पर्यंत भारताची लोकसंख्या वाढत वाढत जाऊन ती क्रमांक एकवर जाण्याची शक्यता वर्तविली आहे. 
A2) ओघतक्ता तयार करा. 2  

Q.3 पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनांनुसार कृ ती करा. 8


1 A1) i) एका वाक्यात उत्तर लिहा 1  
डोळे भरून पाहावे,असे दृश्य कोणते?
ii) योग्य पर्याय निवडा 1  
कवितेतील ‘दीनदुबळे’ म्हणजे ............... 

i. कष्टाचे, पैसे नसलेले

ii. शारिरिकदृष्टया सक्षम नसलेले

iii. सैनिकबरोबर लढणारे

iv. सैनिकांच्या कार्याचा अभिमान बाळगणारे देशवासीय

नाही मुठी मध्ये द्रव्य धडाडत्या तोफांतून

नाही शिरेमध्ये रक्त, तुझे पाऊल जिद्दीचे;

   

काय करावें कळेना तुझी विजयाची दौड

नाही कष्टाचे सामर्थ्य; डोळे भरून पहावी;

   

जीव ओवाळावा तरी डोळ्यांतील आसवांची

जीव किती हा लहान; ज्योत ज्योत पाजळावी

   

तुझ्या  शौर्यगाथेपुढे अशा असंख्य ज्योतींची

त्याची के वढीशी शान; तुझ्यामागुन राखण;

   

वर घोंघावे बंबारा, दीनदुबळयांचे असें

पुढे कल्लोळ धुराचे, तुला एकच औक्षण.

A2) i) योग्य पर्याय निवडा 1  


i. तुझी ............... दौड डोळे भरून पाहावी. (अजयाची / विजयाची  / जयाची)
ii.तुझ्या ............... त्याची के वढीशी शान. (शौर्यकथा / शौर्यगाथा / शौर्यगोष्ट)
ii) सहसंबंध लिहा. 1  
i. कल्लोळ : धुराचे : : पाऊल : ……………
ii.मुठीमध्ये : द्रव्य : : शिरेमध्ये : ...............
A3) प्रस्तुत कवितेतील शब्दांचा अर्थ लिहा. 2  
i. गाथा -

ii. शान -

iii. घोंघावणे -

iv. बंबारा -
A4) स्वमत 2  
‘देशसेवा हीच ईश्वर सेवा’ असे समजून कार्य करणार्‍
या सैनिकांसाठी तुम्हाला कार्य करावेसे वाटते?
Q.4 पुढीलपैकी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृ ती सोडवा. 8
1 औक्षण कवितेसंबंधी खालील मुद्द्यांना अनुसरून कृ ती सोडवा.
१) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री (०१ गुण)
२) कवितेचा विषय (०१ गुण)
३) खालील ओळींचा अर्थ लिहा.
(०२ गुण)
जीव ओवाळावा तरी, जीव किती हा लहान

तुझ्या शौर्यगाथेपुढे त्याची के वढीशी शान. 


४) कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे (०२ गुण)
५) कवितेतून मिळणारा संदेश (०२ गुण)
Q.5 पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा. 4
1 i. काही खेळाडू आनंदाने स्वाक्ष-या देत.

ii. पक्षी झाडांचे कु णीच नसतात.

2 i. शाळेत कसा जाऊ?

ii. बाळाला शालीत गुंडाळ.

Q.6 कं सातील सूचनेनुसार वाक्यरुपांतर करा.उद्गारार्थी / आज्ञार्थी ... 1


1 ही पिल्ले खूपच गोंडस आहेत. (उद्द्गारार्थी करा)

Q.7 खालील वाक्यप्रचारांचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा. 2


1 भास होणे →

Q.8 पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 2


1 i. संघर्ष - ...............​

ii. काटा - ...............

2 i. दिवस - ...............

ii. ठिकाण - ...............​

Q.9 पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 2


1 i. क्षय × ...............

ii. दुर्दैव ×...............

2 i. सावध × ...............

ii. जमा × ...............

Q.10 शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. 1


1 i. मनाला प्रसन्न करणारे → ...............

ii. लहान मुलांची काल्पनिक दैवी स्त्री → ...............

Q.11 वचन बदला. 1


1 गुन्हा - ...............

गोळा - ..............

Q.12 लिंग बदला. 1


1 पुत्र   - ...............

पिता - ...............

Q.13 अचूक शब्द ओळखा. 1


1 i. अ. निणर्ये          ब. नीर्णय          क. निर्णय          ड. निणर्य
ii.अ. तालमिला ब. तालमीला क. ताल्मीला ड. ताल्मिला​
Q.14 विरामचिन्ह 1
1 विरामचिन्हांचा योग्य वापर करा.

एकमेकांचा पाठलाग करणं मारामारी करणं पाण्यात उडया घेणं असे खेळ सुरू झाले

Q.15 पत्रलेखन 6
1 खालील निवेदन वाचा व त्याखालील कोणतीही एक कृ ती सोडवा. 

Q.16 जाहिरातलेखन 5
1

Q.17 बातमी लेखन 5


1 नवजीवन विद्यामंदिर, समतानगर, पुणे येथे १५ ऑक्टोबर ए.पी.जी अब्दुल कलाम यांच्या वाढदिवसानिमित्त वाचन प्रेरणा
दिन सोहळा संपन्न झाला.

Q.18 कथालेखन 5
1 पुढील शब्दांच्या आधारे कथा लिहा.

कोल्हा – आजी – आंबट द्राक्षे

Q.19 निबंध (आत्माकथन) 8


1

Q.20 निबंध ( वैचारिक ) 8


1 महाभयंकर पूर - 

मुद्दे -

अतिवृष्टी - नदीला पूर येणे - मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट - लोकांचे स्थलांतर - माणसे, गुरे पाण्यात वाहत जाणे -
घरांची, झाडांची पडझड, नुकसान - मन दुःखी होणे.

You might also like