You are on page 1of 6

मराठी (द्‌वितीय भाषा) अक्षरभारती इयत्ता दहावी

² इयत्ता दहावीच्या प्रस्तावित आराखड्यानुसार नमुना उत्तरपत्रिका क्र.१


वेळ- ३ तास एकूण गुण-१००

विभाग - १ : गद्य
पठित गद्य
प्र.१. (अ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) कोण ते लिहा. ०२
(i) नारायण सुर्वे
(ii) रा. ग. जाधव
(iii) पु. ल. देशपांडे व सुनीताबाई
(iv) बाई
(प्रत्येकी १/२ गुण)
(२) का ते लिहा. ०२
(i) बाळ रडत होते कारण ते थंडीने कुडकुडत होते.
(ii) लेखकाने सुटकेसमधील ‘पुलकित’ शाल काढली कारण थंडीने कुडकुडणाऱ्या बाळाला त्यांना
ती द्यायची होती.
(प्रत्येकी १ गुण)
(३) खालील शब्दांसाठी उताऱ्यात आलेले विरुद्ध अर्थाचे शब्द शोधून लिहा. ०२
(i) खाली    (ii) शालीन
(iii) भरती   (iv) अधिक 
(प्रत्येकी १/२ गुण)
(४) स्वमत- प्रश्न समजून आशयानुरूप विचार, निरीक्षण यांवर आधारित स्वमत मांडणीस गुणदान करावे. ०२
प्र.१. (अा) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ०२
(१) कारणे लिहा.
(i) लेखकाच्या वडिलांना त्यांच्या मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्य नव्हते कारण ते त्यावेळी पोलीसखात्याच्या
तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते.
(ii) लहानपणी लेखकाच्या पाठीवर घरातल्यांकडून धम्मकलाडू व चापटपोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा कारण
दिवसभर खेळून संध्याकाळी घरी येईपर्यंत त्यांच्याबद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानावर आलेल्या
असायच्या. (प्रत्येकी १ गुण)

1
(२) आकृती पूर्ण करा. ०२

लहानपणी लेखकाचा असलेला दिवसभराचा कार्यक्रम

विटीदांडू खेळणे पतंग उडवणे कॅनॉलमध्ये कैऱ्या, पेरू पाडून


चाेरून पोहणे यथेच्छ स्वाद घेणे.
(प्रत्येकी १/२ गुण)
(३) खालील शब्दांसाठी उताऱ्यात आलेले समान अर्थाचे शब्द शोधून लिहा. ०२
(i) दीन-गरीब (ii) निद्रा-झोप (iii) श्रम-कष्ट (iv) हस्त-हात
(प्रत्येकी १/२ गुण)
(४) स्वमत- प्रश्न समजून आशयानुरूप विचार, निरीक्षण यांवर आधारित स्वमत मांडणीस गुणदान करावे. ०२
अपठित गद्य
प्र.१. (इ) उताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. ०२
(१) कोण ते लिहा.
(i) जलालुद्‌दीन
(ii) एस्‌. टी. आर. माणिकन् ‌
(iii) अब्दुल कलाम
(iv) शमसुद्दीन
(प्रत्येकी १/२ गुण)
(२) परिणाम लिहा. ०२
घटना परिणाम
(i) दुसरे महायुद्ध पेटले. पंबनहून येणारी गाडी रामेश्वरमला थांबेनाशी झाली.
(ii) कलाम वृत्तपत्रे गोळा कलाम यांना पहिली कष्टाची कमाई झाली.
करण्याच्या कामात मदत करू लागले.
(प्रत्येकी ०१ गुण)
(३) विशेषण-विशेष्य यांच्या जोड्या जुळवा. ०२
विशेषण विशेष्य
नवे शोध
दुसरे महायुद्ध
दुरचा भाऊ
लोकप्रिय वृत्तपत्र
(प्रत्येकी १/२ गुण)
(४) स्वमत- प्रश्न समजून आशयानुरूप विचार, निरीक्षण यांवर आधारित स्वमत मांडणीस गुणदान करावे. ०२

2
विभाग २ पद्य
प्र. २. (अ) कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा.
(१) चौकटी पूर्ण करा. ०२
(i) योगी पुरुष
(ii) पाणी
(iii) चकोर
(iv) पंख
(प्रत्येकी १/२ गुण)
(२) तुलना करा. ०२
योगीपुरुष पाणी
(i) योगी पुरुष अंतर्बाह्य स्वच्छता करतो. (i) पाणी वरवरचा मळ स्वच्छ करतो.
(ii) योगी पुरुष स्वानंदतृप्ती देतो. (ii) पाण्यामुळे तात्पुरती तहान भागते.
(iii) योगी पुरुष सर्व इंद्रियांना तृप्त करतो. (iii) पाण्याचा गोडवा जीभेपुरता मर्यादित राहतो.
(iv) योगी सर्वकाळ सुखदाता आहे. (iv) पाणी ठरावीक काळापुरते सुख देते.
(३) काव्यसौंदर्य ०२
कृतीचा अर्थ समजून त्यांतील भाव/विचार/अर्थ यांची स्वभाषेत मांडणी.
(४) -’’- ०२
प्र. २. (अा) ‘‘औक्षण’ व ‘स्वप्न करू साकार’ या दोन कवितांपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील ०८
मुद्‌द्यांना अनुसरून कृती सोडवा.
(१ ते ४ मुद्‌द्यांना प्रत्येकी ०१ गुण)
(५ ते ६ या मुद्‌द्यांना प्रत्येकी ०२ गुण)
प्र. २. (इ) रसग्रहण ०४
कवितेचा अर्थ/आशय समजून योग्य उत्तर, भाषाशैली, काव्यवैशिष्ट्ये इ. लक्षात घेऊन एकत्रित
गुणदान करणे अपेक्षित.

विभाग ३- स्थूलवाचन
प्र.३. खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा. ०६
संपूर्ण पाठाचे आकलन व पाठातील मध्यवर्ती विचार कृतींच्या उत्तरात येणे अपेक्षित.

3
विभाग ४- भाषाभ्यास

प्र.४. (अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती


(१) समास
खालील तक्ता पूर्ण करा. ०२
सामासिक शब्द विग्रह समासाचे नाव
(i) दारोदार प्रत्येक दारी अव्ययीभाव
(ii) भाजीपाला भाजी, पाला वगैरे समाहार द्‌वंद्‌व
(प्रत्येकी १/२ गुण)
(२) अलंकार ०२
खालील उदाहरण वाचून कृती करा.
आभाळागत माया तुझी आम्हांवरी राहूदे!
वरील उदाहरणातील i) उपमेय-माया
ii) उपमान-आभाळ
iii) साधर्म्यवाचक शब्द- गत
iv) अलंकार- उपमा
(प्रत्येकी १/२ गुण)
(३) वाक्यरूपांतर ०२
कंसातील सूचनेनुसार कृती करा.
(i) हा खूप मोठा साप आहे.
(ii) रोज व्यायाम करा.
(प्रत्येकी ०१ गुण)
(४) सामान्यरूप ०२
अधोरेखित शब्दांचे सामान्यरूप व विभक्ती प्रत्यय लिहून तक्ता पूर्ण करा.
सर्वांच्या डोळ्यांतील कौतुकाचे भाव पाहण्यासाठी माझी मान अभिमानाने वर आली.
शब्द सामान्यरूप विभक्ती
(i) कौतुकाचे कौतुका षष्ठी
(ii) अभिमानाने अभिमाना तृतीया
(५) वाक्प्रचार ०२
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यांत उपयोग करा.
(i) थक्क होणे-आश्चर्यचकित होणे.
दिव्यांग मुलांनी काढलेली चित्रे पाहून सर्वजण थक्क झाले.
(ii) भारावून जाणे- प्रभावित होणे.
स्नेहसंमेलनात प्रमुख पाहुण्यांनी केलेले भाषण ऐकून मुले प्रभावित झाली.
(अर्थ- १/२ गुण वाक्यात उपयोग-१/२ गुण)

4
प्र.४. (अा) भाषासौंदर्य
(१) शब्दसंपत्ती
(i) खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा. ०१
(अ) वक्ता/व्याख्याता
(अा) गीतकार
(प्रत्येकी १/२ गुण)
(ii) खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. ०१
(अ) दोष
(अा) निराशा
(प्रत्येकी १/२ गुण)
(iii) गटात न बसणारा शब्द ओळखा. ०१
(अ) रवी
(आ) सलिल
(प्रत्येकी १/२ गुण)
(iv) खालील शब्दांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. (‘बाल’ व ‘भारती’ हे शब्द सोडून) ०१
बालभारती- भार, तीर
(प्रत्येकी १/२ गुण)
(२) लेखननियमांनुसार लेखन
(i) खालील वाक्य लेखननियमांनुसार लिहा. ०१
आमच्या हायस्कूलमध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे.
(प्रत्येकी १/२ गुण)
(ii) अचूक शब्द ओळखा. ०१
(१) पुनर्वसन
(२) आशीर्वाद
(प्रत्येकी १/२ गुण)
(३) विरामचिन्हे ०१
(१) खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
(i) केवढी उंच इमारत ही!
(ii) माझे विचार मी कसे व्यक्त करू?
(प्रत्येकी १/२ गुण)
(२) खालील वाक्यांतील विरामचिन्हे ओळखून लिहा.
रेहाना, जुई, जॉन सगळ्यांनी खेळायला या.
स्वल्पविराम व पूर्णविराम (प्रत्येकी १/२ गुण)
(४) पारिभाषिक शब्द ०१
(i) कार्यालय
(ii) विभाग

5
(५) अकारविल्हे ०१
कागद, दोर, पतंग, बाग
विभाग ५ उपयोजित लेखन
प्र.५. (अ) (१) पत्रलेखन ०५
इ-मेलच्या स्वरूपात मायना/विषय/शेवट भाषाशैली
(२) सारांशलेखन ०५
उताऱ्याचा संपूर्ण आशय नेटक्या शब्दांत मांडणे. स्वभाषेत सारांशलेखन अपेक्षित.
प्र.५. (अा) खालील कृती सोडवा.
(१) बातमीलेखन
तटस्थपणे लेखन, अचूक तपशील, समर्पक शब्दरचना
(२) कथालेखन
काळ, कथाबीज, पात्रे, संवाद, आकर्षक मांडणी
प्र.५. (इ) लेखनकौशल्य ०८
खालील लेखनप्रकारांपैकी कोणतीही एक कृती सोडवा. (शब्दमर्यादा १०० ते १२० शब्द)
(१) प्रसंगलेखन
-संवेदनशील लेखन, सुरुवात/मध्य/शेवट, नावीन्यपूर्ण कल्पना.
(२) आत्मवृत्त
-भाषा (प्रथमपुरुषी एकवचनी) विषयानुरूप, सुसूत्र मांडणी.

You might also like