You are on page 1of 3

डॉ.

सदानंद मोरे
-27% -28% -20%

परिचय
Rs. 549 Rs. 1,790 Rs. 999

-23% -27% -29%

Rs. 12,990 Rs. 5,490 Rs. 699


           महाराष्ट्राच्या राजकारण,समाजकारण व धर्मकारणाचे अभ्यासक, भाष्यकार, संशोधक आणि
विचारवंत असलेले डॉ सदानंद मोरे यांचा जन्म तुकाराम महाराजांच्या वंशात झाला. वडील श्रीधरबुवा
मोरे संत साहित्याचे अभ्यासक आणि आई संस्कृ त शिक्षिका. या कौटुंबिक पार्श्वभूमीवर देहू येथे
अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण के ल्यावर पुढील शिक्षणासाठी सर पुण्यात आले. एस पी कॉलेज मधून
तत्वज्ञान विषयात एम ए पदवी संपादन के ली. पुढे अहमदनगर येथे न्यू आर्टस कॉमर्स अँड सायन्स
कॉलेज मध्ये व्याख्याता म्हणून काम करत असतानाच प्राचीन भारतीय संस्कृ ती व इतिहास हा विषय
घेवून पुणे विद्यापीठाची एम ए पदवी मिळवली. १९८२ मध्ये पुणे विद्यापीठाची तत्वज्ञान विषयात पीएचडी
पूर्ण के ली. त्यांच्या प्रबंधाचा विषय होता गीता -कर्माची उपपत्ती (‘ गीता – थेरी ऑफ ह्युमन अँक्शन ‘ )
.या प्रबंधाला त्या वर्षीचा सर्वोत्कृ ष्ट प्रबंधाचा पुरस्कार मिळाला. कृ ष्ण व्यक्ती आणि कार्य यायुजीसी
करिअर अँवार्ड अंतर्गत शोधप्रकल्पात सहभाग घेतला. १९८५ मध्ये पुणे विद्यापीठात तत्वज्ञान विभागात
व्याख्याता व प्रपाठक म्हणून रुजू झाले. पुढे प्राध्यापक झाल्यावर काहीकाळ तत्वज्ञान विभागाच्या विभाग
प्रमुख पदाचा कार्यभार ही सांभाळला.

विद्यापीठामधील व बाहेरील विविध संस्था व समित्यांवर काम करत असतानाच राजकारण, समाजकारण,
धर्मकारण विषयक विविध विषयावरील लेखन, व्याख्याने, चर्चासत्रात सहभाग चालूच होता. साप्ताहिक
सकाळ मध्ये तुकारामांवर लिहिलेले लोकप्रिय सदर १९९६ मध्ये तुकाराम दर्शन या नावाने पुस्तक रूपाने
प्रकाशित झाले. या पुस्तकाला साहित्य अकादमी सह अन्य अनेक पुरस्कार मिळाले. या पुस्तकाने
महाराष्ट्राला संततुकारामांची आणि वारकरी संप्रदायाची नव्याने ओळख झाली. .

यानंतर शिवधनुष्य समजला गेलेल्या लोकमान्य ते महात्मा या प्रकल्पाला सुरवात झाली. बहुशाखीय आणि
अनेक जणांनी एकत्र येवून पूर्ण करणे अपेक्षित असलेला हा प्रकल्प सरांनी एकट्याने पूर्ण के ला. राष्ट्रीय
स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्वांतरण टिळकांकडू न गांधीजींकडे होत असताना या बदलाला महाराष्ट्र कसा
समोर गेला याचा पट साप्ताहिक सकाळ मधून दोन वर्ष चाललेल्या लेखमालेतून मांडला. हि लेखमाला
पुढे लोकमान्य ते महात्मा या नावाने दोन खंडात ग्रंथ रूपाने प्रकाशित झाली. हा ग्रंथ राजकीय सामाजिक
इतिहासाचा एकसंदर्भ ग्रंथ ठरला असून इथून पुढे महाराष्ट्राच्या या कालखंडातीलराजकीय,सामाजिक
इतिहासावर भाष्य करायचे असल्यास या ग्रंथाचा परामर्ष घेणे अनिवार्य ठरलेआहे.

सध्या महाराष्ट्राच्या प्रकृ तीची विविधांगी चिकित्सा करणारी ‘ गर्जा महाराष्ट्र माझा ‘ नावाची लेखमाला
साप्ताहिक सकाळ मध्ये चालू आहे .

या शिवाय अनेक पुस्तकांचे लेखन ,सहलेखन ,संपादन ,सह्संपादन सरांनी के ले आहे .अनेक पुस्तकांना
प्रस्तावना लिहिल्या आहेत .अनेक जणांना माहित नसलेली अशी सरांची अजून एक ओळख आहेती
म्हणजे – नाटककारवकवी . ‘संदर्भाच्याशोधात , बखर, वाळू चे किल्ले हे तीन कविता संग्रह प्रकाशित
झालेले असून ‘ उजळल्यादिशा ‘ हे बौध्द तत्वज्ञानावर आधारित नाटकही लिहिले आहे .

हे सर्व करत असताना कोणत्याही वाद (isam) अथवा गटाला धरून न रहाता स्वताला जाणवलेले सत्य
सर प्रांजळपणे मांडत राहिले. त्यामुळे संघाच्या विवेक पासून साने गुरुजींच्या साधना पर्यंत नेक
नियतकालिकातून सर प्रसंगोत्पात लिहित असतात. विविध प्रकारच्या लेखन प्रकारांबरोबरच वक्तृत्वाचेही
विविध प्रकार सरांनी हाताळले आहेत. सरांचे वक्तृत्व अवघड गोष्टी सहज करून मांडणारे आहे. त्यांची
शैली श्रोत्यांशी संवाद साधत विषय हळु वार उलगडत नेते. त्यामुळे अवघड ,क्लिष्ट विषयातही लोक रमून
जातात. हि शैली वारकरी कीर्तन प्रकाराशी मिळती जुळती आहे .विविध व्यासपीठावरून व्याख्यान ,
निबंधवाचनापासून कीर्तन ,प्रवचनापर्यंत अनेकमाध्यमातून सर व्यक्त होत रहातात .लेखन , वक्तृत्वाचे
आणि प्रतिपाद्य विषयांचे इतके वैविध्य असलेले असे व्यक्तिमत्व म्हणजे एक आश्चर्यच आहे

या नंतर सरांना महाराष्ट्राचा स्वातंत्र्योत्तर इतिहास खुणावतोय असे त्यांनी एका ठिकाणी म्हटले होते .
वाचकांनाही या विषयावरील सरांच्या लेखनाचे वेध लागले आहेत . वाचकांची हि इच्छा लवकरच पूर्ण
होईल हि अपेक्षा .

  (https://sadanandmore.files.wordpress.com/2011/01/lp0813.jpg)

Advertisements
REPORT THIS AD

2 thoughts on “परिचय”

1. chandrashekhar narayan more says:


June 25, 2013 at 1:48 pm
APAN SANT TUKARAM MAHARAJANCHI SANT SAHITYA PARAMPARA PUDHE CHALU THEVALYA
BADDAL ADAR AHE
ME PAN MORE PARIVARATIL ASUN JAVLI
SATARA YETHUN AMCHE PURVAJ NASIK YETHE STAIK ZALE’ TASECH MORE PARIVARANE
GHANKAR LANE NASIK YETHE TULAJA BHAVANI MANDEER 1857
SALI BANDHALE AHE TYACHE JIRNODHWAR ATTA KELA AHE’APLYALA BHETAYACHI ICHHA AHE

REPLY
2. ग्रंथमित्र नईमखान पठाण says:
May 28, 2021 at 9:02 am
मला सरांचा पत्रव्यवहाराचा पत्ता हवा आहे
कृ पया देण्याची विनंती आहे

REPLY

Blog at WordPress.com.

Advertisements

REPORT THIS AD

You might also like