You are on page 1of 2

नाव- वैष्णवी जयंत संत

वर्ग – तृतीय वर्ष कला

रोल नं. १०२३४

विषय- संस्कृ त

 सामवेदावर विस्तृत टीप लिहा.


 व्युत्पत्ति – सा + अमः = सामः
 व्याख्या – १. सा च अम्श्चेती तत् साम्नः सामत्वम् । (बृहदाराण्यक उपनिषद) – म्हणजेच सा म्हणजे ऋग्वेदातील ऋचा व अम
म्हणजे गान्धार, षड्ज इत्यादि संगीतातील स्वर हे दोन्ही मिळून जे तयार होते त्याला साम असे म्हणतात.
२. साम सम्मितं ऋचा । म्हणजेच साम हे ऋचांनी परिमित असते.
 सामवेदाची विलक्षणता म्हणजे भारतीय संगीताचा पाया म्हणजेच मूलस्त्रोत म्हणून सामवेदाकडे पाहिल्या जात असल्यामुळे ह्या
सामवेदाचे एक वेगळं स्थान वेदांमध्ये आहे. श्रीकृ ष्णाने देखील ‘वेदानां सामवेदोऽस्मि’ असे म्हणून सामवेदाचा गौरव के लेला दिसून
येतो.
 सामवेदाचे स्वरूप पाहिले तर संपूर्ण ऋग्वेदातल्याच सुमारे ७०% ऋचा ह्या सामवेदात आढळतात. त्याचे कारण म्हणजे सामवेद हा
पूर्ण गानात्मक असल्यामुळे ऋग्वेदातल्याच ज्या ऋचांवर गान के लं जातं त्यालाच साम असे म्हणतात.
 या वेदाच्या ऋत्विजाला उद्गाता असे म्हणतात. त्याचे कारण म्हणजे उद्+गै म्हणजेच उद् म्हणजे उच्च व गै म्हणजे गाणे थोडक्यात
उच्च किं वा तारस्वरात गाणे. मंत्र म्हणताना हा ऋत्विज उच्च किं वा तारस्वरात गातो म्हणून त्याला उद्गातृ असे म्हणतात. सामाचे ५ भाग
संभवतात. ते म्हणजे प्रस्ताव, उद्गीथ, प्रतिहार, उपद्रव, निधन. त्यातील प्रस्तोता हा ऋत्विज प्रस्ताव म्हणतो, उद्गाथा उद्गीथ गातो.
प्रतीहर्ता प्रतिहार हा भाग म्हणतो. उद्गातृ उपद्रव म्हणतो आणि निधन हा भाग सगळे जण मिळून म्हणतात.
 सामगायनात कं ठातून स्वर काढू न त्यांचे निर्देश बोटांनी के ले जाते.
 सामसंगीतात सात स्वर आहेत – कृ ष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, मंद्र, अतिस्वार्य. असे ७ स्वर आहेत जे उतरत्या क्रमाने
असतात.
 सामगायनाचे ४ प्रकार आहेत. १. ग्रामगेयान ज्यास प्रकृ तीगान व वेयगान असेही म्हणतात.
२. आरण्यगान ३. ऊहगान ४. ऊह्य किं वा रहस्यगान.

 सामवेदाच्या प्राचीनकाळी १००० शाखा होत्या असा उल्लेख आढळतो. सहस्त्रवर्ताः सामवेदः। (व्याकरण महाभाष्य) पण ९९७ शाखा
लुप्त झाल्या व ३ च शाखा शिल्लक राहिल्या त्या म्हणजे कौथुम ,जैमिनीय,राणायनीय.
 कौथुम या शाखेत प्राधान्याने २ भाग आहेत. १. पूर्वार्चिक २ उत्तरार्चिक.
 आर्चिक म्हणजे ऋचेशी संबद्ध असलेला भाग. ह्या पूर्वार्चिका मध्ये ५८५ हून अधिक ऋचा आहेत व त्या प्रपाठकांमध्ये विभागलेल्या
आहेत प्रत्येक प्रपाठकांमध्ये त्या ऋचा विभागल्या गेल्या आहेत प्रत्येक प्रपाठकांमध्ये १० ऋचांचा एक समूह असे वर्ग के लेले आहेत.
ह्यामध्ये अग्नि, इंद्र, वरुण, अश्विन अशा देवतांनुसार त्या त्या ऋचांची वेगवेगळी विभागणी के लेली दिसते.
 व उत्तरार्चिकामध्ये यज्ञ विधीत जे साम म्हटले जातात त्या यज्ञ विधीनुसार सामाची विभागणी दिसून येते.
 आलाप गायनाची पद्धत असल्यामुळे या गायनाला स्तोभ असे देखील म्हणतात. म्हणजेच लयबद्ध गान करणे
 सामवेदाची ब्राह्मणे – आर्षेय, देवताध्याय, प्रौढ, षड्विंश
 संहिता – वंश, जैमिनीय.
 आरण्यके - तवल्कार (जैमिनीयोपनिषद् ब्राह्मण), छांदोग्य इत्यादी.
 उपनिषदे – के न, छांदोग्य.

You might also like