You are on page 1of 11

काय सांगों देवा ज्ञानोबाची ख्याती । वेद म्हैशामुखीं बोलविलें ॥१॥

कोठवरी वानूं याची स्वरूपस्थिती । चालविली भिंती मृत्तिके ची ॥२॥


अविद्या मायेचा लागों नेदी वारा । ऐसें जगदोद्धारें बोलविलें ॥३॥
नामा ह्मणे यांनीं तारिले पतित । भक्ति के ली ख्यात ज्ञानदेवें ॥४॥
भारुड
जोशी
तेथूनि पुढे बरे होईल । भक्‍तिसुखें दोंद वाढेल । फे रा चौऱ्यांशीचा चुके ल । धनमोकासी ॥१॥
मी आलो रायाचा जोशी । होरा ऐका दादांनो ॥धृ॥
मनाजी पाटील देहगांवचा । विश्वास धरु नका त्याचा । हा घात करील नेमाचा । पाडील
फशी ॥२॥
वासना बायको शेजारीण । झगडा घाली मोठी दारूण । तिच्या पायी नागवण । घर बुडविसी
॥३॥
एकाजनार्दनी कं गाल जोशी । होरा सांगतो लोकांसी । जा शरण सद्‍गुरुसी । फे रा चुकवा
चौऱ्यांयशी ॥४॥
बहिरा
बहिरा झालो या या जगी ॥धृ॥
नाही ऐकिले हरिकीर्तन । नाही के ले पुराण श्रवण । नाही वेदशास्त्र पठण । गर्भी बधिर झालो
त्यागूने ॥१॥
नाही संतकीर्ती श्रवणी आली । नाही साधुसेवा घडियेली । पितृवचनासी पाठ दिधली । तीर्थे
व्रते असोनि त्यागिली ॥२॥
माता माऊली पाचारिता । शब्द नाही दिला मागुता । बहिरा झालो नरदेही येता ।
एकाजनार्दनी स्मरेन आता ॥३॥
मुका
मुका झालो वाचा गेली ॥धृ॥
होतो पंडित महाज्ञानी । दशग्रंथ षड्‍शास्त्र पुराणी । चारी वेद मुखोद्‍गत वाणी । गर्वामध्ये
झाली सर्व हानी ॥१॥
जिव्हा लांचावली भोजना । दुग्ध घृत शर्क रा पक्वान्ना । निंदिले उपान्ना । तेणे पावलो
मुखबंधना ॥२॥
साधुसंतांची निंदा के ली । हरिभक्‍तांची स्तुती नाही के ली । तेणे वाचा पंगू झाली ।
एकाजनार्दनी कृ पा लाधली ॥३॥
दादला
मोडकें से घर तुटके से छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥
मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटके च लुगडे तुटकीसी चोळी । शिवाया दोरा नाही ॥२॥
जोंधळ्याची भाकर आंबाडयाची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतीचे मोती गुळधाव सोने । रांज्यात लेणे नाही ॥५॥
एकाजनार्दनी समरस झाले । तो रस येथे नाही ॥६॥

कु टुंबव्यवस्थेतील रुपके वापरून संत एकनाथांनी अनेक रचना के ल्या. त्यातील ‘दादला’
ही अशीच एक शतकानुशतके लोकप्रिय रचना. या भारुड रचनेतला एकानाथांचा
‘दादला’म्हणजे एका कु टुंबवत्सल स्त्रीची अपेक्षा-इच्छा-वासना अशा अवगुणांनी युक्त
अविवेकी वृत्ती. आपल्या संसारात सुखाचा शोध घेणारी अशाच अविवेकी वृत्तीची ही
कु टुंबवत्सल तरीही असमाधानी महिला या भारुडाची नायिका आहे. या भारुडातील हेच
पात्र फार महत्त्वाचे रुपक आहे. तिच्या मनाची स्थिती तिच्या एकटीची नाही. अविवेक हे
सर्व समाज मनातील दुखणे आहे, या जाणिवेने संत एकनाथांची ही रचना वैयक्तिक आणि
समाज मनाच्या दुखऱ्या व्याधीवरील शस्त्रक्रियेचेच काम करते. यातील मूलभूत वास्तव
आणि त्यासाठी वापरलेली द्वयार्थी रुपके -प्रतीके त्यांच्या गूढार्थांचा आणि सूक्ष्मार्थांचा अर्थ
आणि परिणाम, लौकिकाच्या सीमा पार करून वैश्विक ज्ञानाचा अनुभव देते. यातील काही
रुपके , अखिल मानवसृष्टीच्या लौकिक संकल्पांना आहेत, तर त्याबरोबरच येणाऱ्या काही
संकल्पना अमूर्ताकडे जाणाऱ्या वैश्विक संकल्पना आहेत. याचा विस्तार या लेखात के ला
आहे.
‘दादला’
मोडकें से घर तुटके सें छप्पर । देवाला देवघर नाही ॥१॥ मला दादला नलगे बाई ॥धृ॥
फाटकें च लुगडे तुटकीच चोळी । शिवाया दोरा नाही । मला दादला नलगे बाई ॥२॥
जोंधळ्याची भाकर आंबाडीची भाजी । वर तेलाची धार नाही ॥३॥
मोडका पलंग तुटकीसी नवार । नरम बिछाना नाही ॥४॥
सुरतींचे मोतीं गुळधाव सोनें । राज्यांत लेणें नाहीं ॥५॥
एका जनार्दनीं समरस झालें । तो रस येथे नाहीं ॥६॥
भारुडाची ही रचना प्रत्येक मराठी मनांत कायम घर करून असते. या रचनेतले ‘मोडकें से घर
तुटके सें छप्पर’ या पहिल्या चार शब्दांत ‘मोडके से घर’ हे पहिले दोन शब्द म्हणजे आपल्या
नश्वर पार्थिव देहासाठी एकनाथांनी वापरलेले रुपक आहे. या देहाचे आरोग्य आपल्याला
सांभाळता येत नाही हे याचे वास्तवातील लौकिक रुपकमूल्य आहे. शरीराची निगा ठेवता
न येण्याचे प्रमुख कारण शिक्षणाचा, साक्षरतेचा अभाव अर्थात अविद्या. फक्त लिहिता-
वाचता आले की, त्याला साक्षरता म्हणता येणार नाही, जीवनमूल्यांची साक्षरता हवी,
असा स्पष्ट सल्ला ‘तुटके सें छप्पर’ या पुढच्या दोन शब्दांत आहे. विद्या-अविद्या ही अमूर्त
संकल्पना आहे. कारण, ती एखाद्या वस्तूसारखी दाखवता येत नसते. पहिल्या चार
शब्दांतील ही लौकिक आणि अलौकिक रुपके आणि त्याचे रुपकमूल्य ही फार विलक्षण
मांडणी आहे.
पहिल्या चरणातील पुढच्या दोन ओळी ‘देवाला देवघर नाही’ अशा आहेत. इथे
‘देव’ म्हणजे श्रद्धा आणि भक्ती या मानवी जीवनातल्या अगदी प्राथमिक गुणवत्ता. या
गुणवत्तांना ‘देवघर नाही’ म्हणजे या दोन गुणवत्तांना आपल्या मनात-अंत:करणात जागा
नाही. कारण, विद्येचा -प्राथमिक मानवी मूल्यांच्या परिचयाचा अभाव आहे. या चार-सहा
शब्दांतील चिह्न-प्रतीकांचा -रूपकांचा इतका प्रभावी प्रयोग, ही फार मोठी प्रतिभा आहे.
‘मला दादला नलगे बाई’ हे ध्रुवपदातले चार शब्द मात्र आशेचा किरण दाखवतात. हिचा
‘दादला’ म्हणजे तिच्यातील विवेकवृत्तीचा पूर्ण अभाव याचे रुपक आहे. ध्रुवपदातील या
चार शब्दांत ही कु टुंबवत्सल स्त्री चक्क मला ‘दादला’ नको अशा निर्णयाप्रत येते. कारण,
तिलाही स्वत:च्या कमतरतेची जाणीव झालेली आहे. दादल्याचा म्हणजे अविवेकाचा
त्याग करून तिला विवेकवृत्ती आत्मसात करायची आहे. मग बदललेल्या दादल्याबरोबर
आपला संसार बहरेल याची तिला खात्री असावी. नर्म विनोदाचा असा वापर श्रोत्यांना
निश्चितपणे आकर्षित करतो. ‘फाटकें च लुगडे तुटकीच चोळी’ हे दुसऱ्या चरणातील पहिले
चार शब्द अशीच दोन अनपेक्षित तरीही समर्पक रुपके आहेत. फाटके लुगडे आणि तुटकी
चोळी हे स्त्रीच्या नैसर्गिक लज्जा भावनेला झाकू शकत नाहीत. मात्र, एकनाथांच्या या
चरणातील लज्जा तिच्या शरीराची नसून तिच्या बुद्धीची-कु वतीची, तिला जाणवणारी
लज्जा आहे. साक्षरता आणि विवेक नाही म्हणून आपल्याला बुद्धी वापरता येत नाही,
याचीच तिला भ्रांती आहे. हेच तिचे ‘फाटके लुगडे’ आहे. दुर्बुद्धी झाल्याने मनात येणारे भ्रष्ट
विचार म्हणजेच तिची ‘तुटकी चोळी’ आहे. हे फाटके लुगडे आणि तुटकी चोळी तशीच
राहते. कारण, पुढे तिची तक्रार आहे ‘शिवाया दोरा नाही.’ अशा सगळ्या अवगुणांमुळे या
स्त्रीच्या आयुष्यात शिस्त नाही. या दोऱ्याचे रुपक या स्त्रीच्या अशाच शिस्त आणि
नियमांच्या अभावाला उद्देशून एकनाथांनी वापरले आहे. एकनाथांच्या मते, हळूहळू या
स्त्रीला आपल्यातील अभावांची जाणीव होऊ लागली असावी. कारण, पुढच्या तिसऱ्या
चरणात तिचा नूर म्हणजे स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलताना दिसतो. ‘जोंधळ्याची
भाकर आंबाडीची भाजी, वर तेलाची धार नाही’ असं म्हणणारी ही स्त्री पहिल्या चार
शब्दांतच समजून चुकली आहे की, माझ्या अपेक्षा वास्तव नाहीत. त्या मायावी आहेत.
मला सतत चुकीचे वागायला भाग पडत आहेत. वासना-विषयाच्या अपेक्षांची भाकर
आणि भाजी मला नको. त्याऐवजी मला यातून बाहेर पडण्यासाठी साहाय्य हवे आहे. मला
‘तेलाची धार’ म्हणजे कु णाचा तरी उबदार स्नेह हवा आहे.
‘मोडका पलंग तुटकीसी नवार, नरम बिछाना नाही’ असा स्वत:चाच उपहास करताना
तिला म्हणायचे आहे, मला नरम बिछाना हवाय. संसारातील आनंदाचा-सुखाचा दिनक्रम
मला अपेक्षित आहे. या तिच्या अपेक्षेचे ‘नरम बिछाना’ हे रुपक आहे. पण, तिच्या शाश्वत
सुखाचा हा अपेक्षित बिछाना मात्र मोडका आहे. त्याच्या नवारीची वीण तुटलेली आहे.
अविवेकामुळे तिच्या अपेक्षेतील असा ‘नरम बिछाना’ मोडलेला आहे. संसारातील तिचे
शाश्वत सुख म्हणजे ‘सुरतींचे मोतीं गुळधाव सोनें’ असे आहे. ‘सुरतीचे मोतीं’ म्हणजे
दिसायला सुंदर मोती आणि ‘गुळधाव सोने’ म्हणजे लखलखीत सोन्याचे आकर्षक दागिने.
‘सुरती’ या शब्दाचे दोन अर्थ आहेत. सुरत म्हणजे सौंदर्य आणि सुरती म्हणजे रुपयाचे नाणे.
गेली काही शतके ‘ज्याचे खिशात सुरती तो मंगलमूर्ती’ अशी म्हण प्रचलित आहे. यातला
सुरती म्हणजे पैसे. वरचे हे दोन्ही अलंकार तिच्या ज्ञानाचे रुपक आहेत. मात्र, हेच ज्ञान
तिच्याकडे नाही म्हणून ती खंतावली आहे. माझ्या संसाराच्या छोट्याशा राज्यात मला असे
काही ल्यायला (अलंकार वापरणे) मिळत नाहीत, अशी खंत ती ‘राज्यांत लेणें नाहीं’ असे
म्हणताना व्यक्त करते आहे. ‘एका जनार्दनीं समरस झालें, तो रस येथे नाहीं’ असं शेवटच्या
चरणात म्हणताना संत एकनाथ तिच्या माध्यमातून आपल्या गुरूला वंदन करतात आणि
अशा अविवेकामुळेच तिच्या अपेक्षेतील आत्मिक सुख तिला मिळत नसल्याचे तिचे
गाऱ्हाणे पुन्हा एकदा श्रोत्यांसमोर ठेवतात. ही भारुडाची रचना संत एकनाथ स्वत:
नाट्यमय आवेशात सादर करत असावे, ज्यामुळे ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याची प्रतिक्रिया
त्यांना समजत असावी. मराठी संत- महंतांनी कित्येक शतकांपासून समाज प्रबोधन आणि
मूल्यवृद्धी संवादाचे महत्त्वाचे काम यशस्वीपणे के ले आहे. त्यातील रुपके आणि
मूल्यसंके त याचा अभ्यास आपण पुढेही करणार आहोत.

वाघ्या
अहं वाघा सोहं वाघा प्रेमनगारा वारी । सावध होऊनी भजनी लागा देव करा कै वारी ॥१॥
मल्लारीची वारी माझ्या मल्लारीची वारी ॥धृ॥
इच्छा मुरळीस पाहू नका पडाल नरकाद्वारी । बोध बुधली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी ॥२॥
आत्मनिवेदन रोडगा निवतील हारोहारी । एकाजनार्दनी धन्य खंडेराव त्यावरी कुं चा वारी ॥
३॥

विंचू चावला -पार्श्वभूमी


खरं सांगायचं तर सर्वसामान्य मराठी माणसाला संत एकनाथ महाराज आणि त्यांची भारुडे
हा अपरिचित विषय नाही. त्यातून “विंचू चावला” हे भारूड तर न माहित असणं अत्यंत
विरळाच. पण हा माझा समज दुर्दैवाने दूर झाला, जेव्हा एका तरुणीने सांगितले की तिला हे
माहीतच नव्हते की “विंचू चावला” हे एक अध्यात्मिक काव्य आहे. आणि मग लक्षात
आलं की, विंचू चावला हे भारूड आणि त्याचा साधारण अर्थ नवीन पिढीला पूर्णपणे
माहित नसावा. अर्थात सगळ्यांबद्दल असं नाही म्हणता येणार पण, त्या प्रसंगाने माझा
गैरसमज तरी निश्चित दूर के ला. त्यामुळे थोडा सोप्या शब्दात या भारुडाचा भावार्थ
तुमच्यासमोर मांडत आहे.

रिमिक्स आणि बीभत्स गाण्यांच्या जमान्यात या भारूडाचेही विद्रुपीकरण झाले. लोक


त्यालाच खरे काव्य समजू लागले. आणि आता आपण या काळात आलेलो आहोत की,
लोकांना मूळ काव्याचा विसर पडला आहे. कृ पया तुम्ही देखील हा भावार्थ वाचा आणि
ज्यांना माहित नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आपल्या संत साहित्याबद्दल जर आपल्यालाच
आस्था नसेल तर दुसऱ्यांना असण्याचे काहीच कारण उरत नाही.

मूळ काव्य आणि भावार्थ


विंचू चावला वृश्चिक चावला ।
कामक्रोध विंचू चावला ।
तम घाम अंगासी आला ॥ धृ ॥

विंचू, विंचू चावला म्हणजे काय झालं? इथून सुरुवात करूया. हा विंचू नेहमीचा विंचू नसून
काम (कोणत्याही वस्तूबद्दल किं वा व्यक्तीबद्दल हाव निर्माण होणे) आणि क्रोध यांनी
उत्पन्न झालेला अधर्मी, विनाशकारी आणि अहंकारी भाव आहे. हे तमस् म्हणजे अंधःकार.
अज्ञानाचा आणि अहंकाराचा विनाशकारी अंधःकार. एकदा काम आणि क्रोधाचा विंचू
चावला की माणसाला तमाचा घाम येतो, जणू माणूस खरोखरीच विंचू चावल्यासारखा
बेभान होतो, विचित्र वागू लागतो, चुकीचे निर्णय घेऊ लागतो आणि शेवटी अधर्माच्या
वाटेवर चालू लागतो. पंचप्राण व्याकु ळ झाला । त्याने माझा प्राण चालिला ।
सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
अशा विंचू चावलेल्या मनुष्याला जेव्हा या दंशाची जाणीव होते तेव्हा लक्षात येतं की, या
तामसी दोषांमुळे पंचप्राण (पाच प्रकारचे प्राणवायू, याबद्दल अधिक माहिती इथे देणं
क्रमप्राप्त ठरणार नाही. पण या ठिकाणी चांगली माहिती दिलेली आहे.) आणि त्यांचा
प्रवाह दोषरहित होतो. त्याचा परिणाम फक्त शरीरावरच नव्हे तर माणसाच्या वृत्तीवर,
विचारांवर आणि शेवटी आचारांवर देखील होतो. हे प्राणवायू व्याकु ळ होतात, जीव किं वा
आत्मा (परमेश्वराचा अंश) गुदमरतो. असं वाटू लागतं आता प्राण जावू लागले आहेत.
आयुष्य अनिर्बंध मार्गावर जात आहे, भरकटत आहे. पाप आणि अधर्माने बरबटलेले आहे.
आणि आता यातून मुक्तता नाही! सर्वांगाचा दाह, हा दाह दोन प्रकारचा असू शकतो काम
आणि क्रोधामुळे किं वा या निरुपयामुळे.

मनुष्य इंगळी अति दारुण ।


मज नांगा मारिला तिने ।
सर्वांगी वेदना जाण ।
त्या इंगळीची ॥ २ ॥

या सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट संत एकनाथ महाराज सांगतात की, या सगळ्या त्रासाचे
मूळ कु ठे आहे? तर मनुष्यामध्ये. शेवटी कर्म मनुष्यच करतो. त्यामुळे या रोगाचे मूळ म्हणजे
मनुष्य हिटर इंगळी आहे. इंगळी म्हणजे मोठा विंचू. हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे
कारण, ज्याच्या त्याच्या अवस्थेला ज्याचे त्याचे कर्म जबाबदार असते हे जोपर्यंत मनात
ठसवून घेणार नाही तोपर्यंत मनुष्य आपल्या दुःखासाठी नेहमी दुसऱ्याला दोष देण्यात गर्क
राहतो. या मनुष्य इंगळीने नांगी मारली म्हणजे आपल्या कर्मावर आणि आपल्या विचारांवर
जर मनुष्याचा ताबा राहिला नाही तर त्याची परिणीती दुःखात होणं अगदी स्वाभाविक
आहे. हेच महाराज इथे सांगतात.

ह्या विंचवाला उतारा ।


तमो गुण मागे सारा ।
सत्वगुण लावा अंगारा ।
विंचू इंगळी उतरे झरझरा ॥ ३ ॥

आत्तापर्यंत आपण विंचू म्हणजे काय, दाह कशाचा असतो आणि मूळ कु ठे आहे हे पाहिलं.
पण या सगळ्या दुःखाला आणि अवस्थेला उत्तर काय? जोपर्यंत या रोगाचे निवारण होणार
नाही तोपर्यंत माणूस असाच तडफडत राहणार. मग या रोगाला औषध काय? या
विंचवाच्या विषाला उतारा काय? तर महाराज सांगतात, तमोगुण मागे सारा, थोडक्यात
असा कोणताही विचार आणि कृ ती जी तुम्हाला अज्ञानाकडे ढकलेल त्यांचा त्याग करा.
क्रोध, काम, अहं भाव, लालसा, ईर्षा इत्यादी भाव मनात येत असतील तर त्यांना
प्रयत्नपूर्वक टाळा. म्हणजेच तमोगुण मागे सारा. त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. सत्वगुण
अंगाऱ्यासारखा लावा. सत्वगुण म्हणजे सत् उत्पन्न करणारा गन. सत् म्हणजे सत्याचे मूळ.
सत्याच्या मार्गावर चाला. ज्ञान मिळवा. थोडक्यात अर्ध्या हळकुं डाने पिवळे होऊ नका.
सतःला पुनःपुन्हा विचारा की ‘जे मी करतोय ते सत्याला आणि धर्माला अनुसरून आहे की
नाही. यात माझ्यातले तमोगुण तर डोकावत नाही ना?’ सत्त्वगुण अंगी लावण्याचा
आणखीन एक सोपा उपाय म्हणजे स्वतःला हे सतत सांगत राहणे की ‘जी गोष्ट माझी नाही
त्याला स्पर्ष करायचा नाही’ मग ती गोष्ट सजीव असो वा निर्जीव. जिथे तुमचा अधिकार
नाही तिथे तुमचा स्पर्ष नसलाच पाहिजे. एवढं के लं की, इंगळी म्हणजेच हे तमाचे विष
झरझर उतरून जाईल.

सत्व उतारा येऊन ।


अवघा सारिला तमोगुण ।
किं चित्‌राहिली फु णफु ण ।
शांत के ली जनार्दने ॥ ४ ॥

हा सत्त्व उतारा एकदा घेतला की तमोगुण मागे जाईल. पण तरीही माणसाची वृत्ती अशी
असते की तो तमोगुण अधुनमधुन डोकावतोच. त्यालाच माझ्या मते संत एकनाथ महाराज
फु णफु ण म्हणतात. पण आता या फु णफु णीला उतारा किं वा औषध काय? तर परमेश्वराची
भक्ती. कारण दरवेळेस फक्त माणसाचे कर्म उपयोगी नसते, त्याला परमेश्वराच्या
आशीर्वादाची – कृ पेची सुद्धा जोड लागते. त्यामुळे तुम्ही परमेश्वराची भक्ती करा म्हणजे ही
फु णफु ण सुद्धा निघून जाईल!

विंचू
विंचू चावला वृश्चिक चावला । कामक्रोध विंचू चावला । तम घाम अंगासी आला ॥धृ॥
पंचप्राण व्याकु ळ झाला । त्याने माझा प्राण चालिला । सर्वांगाचा दाह झाला ॥१॥
मनुष्य इंगळी अति दारुण । मज नांगा मारिला तिने । सर्वांगी वेदना जाण । त्या इंगळीची ॥
२॥
ह्या विंचवाला उतारा । तमोगुण मागे सारा । सत्वगुण लावा अंगारा । विंचू इंगळी उतरे
झरझरा ॥३॥
सत्व उतारा देऊन । अवघा सारिला तमोगुण । किं चित् राहिली फु णफु ण । शांत के ली
जनार्दने ॥४॥
एडका
एडका मदन तो के वळ पंचानन ॥धृ॥
धडक मारिली शंकरा । के ला ब्रह्मयाचा मातेरा । इंद्रचंद्रासी दरारा । लाविला जेणे । तो
के वळ पंचानन ॥१॥
धडक मारिली नारदा । के ला रावणाचा चेंदा । दुर्योधना मारिली गदा । घेतला प्राण । तो
के वळ पंचानन ॥२॥
भस्मासुर मुकला प्राणासी । तेचि गती झाली वालीसी । विश्वामित्रासरिखा ऋषी । नाडिला
जेणे ।
तो के वळ पंचानन ॥३॥
शुकदेवांनी ध्यान धरोनी । एडका आणिला आकळोनी । एकाजनार्दनी चरणी । बांधिला
जेणें । तो के वळ पंचानन ॥४॥
आजकाल समाजात जे काही चालले ते ऐकू न शांतिब्रह्म एकनाथ महाराज यांनी लिहिलेला
एक भारूड आठवलं .
महाराज म्हणतात .
एडका मदन तो के वळ पंचानन ।।धृ ।।
धडक मारिली शंकरा । के ला ब्रह्मयाचा मातेरा । इंद्र चंद्राशी दरारा । लाविला जेणे तो के वळ
पंचानन.
एडका मदन म्हणजे स्त्री विषयी काम आणि मद. अशी ही काम वासना कु णाकु णाला
झाली आणि त्यांना या मदन रुपी एडक्याने कशी धडक दिली ते या भारुडातून सांगिंतला
आहे. समुद्र मंथनाच्या वेळी भगवान विष्णूंनी घेतलेल्या मोहिनीच्या रूपावर शंकर भाळले
आणि तिच्या मागे लागले हो. त्यांना या गोष्टीचा बराच पश्चाताप झाला. या मदन रुपी
एडक्याने इंद्रचंद्राला देखील सोडला नाही. इंद्रदेवांनी के लेल्या अप्सरेच्या चेष्टेमुळे त्यांच्या
अंगाला भगे पडली असा शास्त्रात सांगितलं आहे .
धडक मारिली नारदा के ला रावणाचा चेंदा
दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण तो के वळ ।। १।।
नारदांनी जेव्हा भगवान श्री कृ ष्णाकडे थट्टेने एका स्त्रीची मागणी के ली तेव्हा देवांनी रागवून
नारदांनाच स्त्री के ले व ६० मुले झाली त्यावर नारद मुनींची बरीच फजिती झाली तसाच
रावणाने सीतामाईंना हरण करून नेले त्यावेळी रामप्रभूंनी त्याचा वध के ला एवढा ज्ञानी
रावण त्यालाही या मदन रुपी एडक्याने सोडले नाही. दुर्योधनाने भर सभेमध्ये द्रौपदी
आईसाहेबांना निर्वस्त्र करून मांडीवर बसण्याची आज्ञा के ली त्यामूळेच भीमांनी त्याची
मंडी फोडून त्याचा जीव घेतला पुढे महाराज म्हणतात
भस्मासुर मुकला प्राणाशी तेचि गती गती झाली वालीची
विश्वामित्रासारिखा ऋषी नाडीला जेणे तो के वळ ।। 2।।
भस्मासुराने शंकरांची एकनिष्ठेने सेवा के ली शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला वर मागण्यास
सांगितले तेव्हा त्याने असा वर मागितला कि मी ज्या गोष्टीवर हात ठेवीन ती जाळून भस्म
झाली पाहिजे शंकरांनी वर दिला पण भस्मासुर शंकरांनाच भस्म करण्यासाठी त्यांच्या मागे
लागला तेव्हा भगवान महाविष्णूनी मोहिनी रूप धारण करून शंकरांचा बचाव के ला व
भस्मासुर मोहिनीच्या रुपाला भाळून नाचू लागला व नाचता त्याने स्वतःच्या डोक्यावर हात
ठेवला व जळून भस्म झाला ,वालीला आपल्या शक्तीचा गर्व झाला त्याने स्वतःच्या
वहिनीलाच हरण के ले व सुग्रीव ला मारण्याचा प्रयत्न के ला त्यामुळे त्याला प्रभू
रामचंद्रांच्या हातून मरावे लागले कित्येक वर्षे तपश्चर्या करणारे विश्वामित्र ऋषी मेनके च्या
नाचला भुलले व त्यांची तपश्चर्या भंग पावली आपण पाहिलाच आहे मोठे मोठे बाबा या
मदन रुपी एडक्या पासून वाचू शकले नाहीत
शेवटी महाराजांनी म्हंटलं आहे
शुकदेवांनी ध्यान धरुनी एडका अनिल अकलोनि
एका जनार्धचे चरणी वाहिला जेनेतो के वळ ||3||
शुकदेवांनी श्री विठ्ठलाचं ध्यान करून या मदन रुपी एडक्या पासून आपली मुक्ती करून
घेतली व त्याला विठ्ठल चरणी वाहिला हाच आदर्श घेऊन आपण समाजात वावरल
पाहिजे. शत्रूच्या स्त्री ला मातेसमान मानून तिला सन्मानाने तिच्या घरी पाठवणाऱ्या
महाराजांचे आपण मावळे आहोत चारित्र्य हनन करण्यास आलेल्या वेश्येस देखील आई
मानणाऱ्या तुकोबारायांचे आपण अनुयायायी या गोष्टींचा आपण विचार के ला पाहिजेत
असं मला वाटत

पुण्यवंत पाताळ लोकीं नेला । दरिद्री तो भाग्यवंत के ला । चोरटयाचा बहुमान वाढविला ।


कीर्तिवानाचा अपमान के ला ॥१॥ धुंद झाला तुझा दरबार ॥धृ०॥
वैरियासी दिधली मोक्षसिद्धि । कपटिया दिधली महानिधी ।
सेवकाच्या ढुंगा न मिळे चिंधी । चाळकासी त्रैलोक्य भावें वंदी ॥२॥
पतिव्रता ती वृथा गुंतविली । वेश्या गणिका ती सत्यलोका नेली ।
कळी स्वकु ळा लावियेली । यादववृंदा ही गोष्‍ट बरी नाहीं के ली ॥३॥
सत्त्ववानाचा बहु के ला छळ । कीर्तिवानाचें मारियेलें बाळ ।
सखा म्हणविसी त्याचें नासी बळ । जनी म्हणे मी जाणें तुझे खेळ ॥४॥
नाथाच्या घरची
नाथाच्या घरची उलटी खूण । पाण्याला मोठी लागली तहान ॥१॥
आंत घागर बाहेरी पाणी । पाण्याला पाणी आले मिळोनी ॥२॥
आजी म्या एक नवल देखिले । वळचणीचे पाणी आढ्या लागले ॥३॥
शेतकऱ्याने शेत पेरिले । राखणदाराला तेणे गिळिले ॥४॥
हांडी खादली भात टाकिला । बकऱ्यापुढे देव कापिला ॥५॥
एकाजनार्दनी मार्ग उलटा । जो तो गुरुचा बेटा ॥६॥
भूत
भूत जबर मोठे ग बाई । झाली झडपड करु गत काई ॥१॥
सूप चाटूचे के ले देवऋषी । या भूताने धरिली के शी ॥२॥
लिंबू नारळ कोंबडा उतारा । त्या भूताने धरिला थारा ॥३॥
भूत लागले नारदाला । साठ पोरे झाली त्याला ॥४॥
ऊत लागले ध्रूवबाळाला । उभा अरण्यात ठेला ॥५॥
एकाजनार्दनी भूत । सर्वांठायी सदोदित ॥६॥
भवानी
सत्वर पाव गे मला । भवानीआई रोडगा वाहिन तुला ॥१॥
सासरा माझा गावी गेला । तिकडेच खपवी त्याला ॥२॥
सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ॥३॥
जाऊ माझी फडफड बोलती । बोडकी कर ग तिला ॥४॥
नणंदेचे पोर किरकिर करिते । खरूज होऊ दे त्याला ॥५॥
दादला मारुन आहुती देईन । मोकळी कर गे मला ॥६॥
एकाजनार्दनी सगळेचि जाऊं दे । एकटीच राहू दे मला ॥७॥
जोगवा
अनादि निर्गुण प्रगटली भवानी । मोह महिषासूर मर्दना लागुनी ।
त्रिविध तापाची कराया झाडणी । भक्‍तांलागोनी पावसी निर्वाणी ॥१॥
आईचा जोगवा जोगवा मागेन । द्वैत सारुनी माळ्व मी घालीन ।
हाती बोधाचा झेंडा मी घेईन । भेदरहित वारीसी जाईन ॥२॥
नवविध भक्‍तिच्या करीन नवरात्रा । करुनी पोरी मागेन ज्ञानपात्रा।
धरीन सद्‍भाव अंतरीच्या मित्रा । दंभ संसार सांडिन कु पात्रा ॥३॥
पूर्ण बोधाची घेईन परडी । आशा तृष्णेच्या पाडीन दरडी ।
मनोविकार करीन कु र्वंडी । अद्‍भूत रसाची भरीन दुरडी ॥४॥
आता साजणी जाले मी नि:संग । विकल्प नवऱ्याचा सोडियला संग ।
कामक्रोध हे झोडियेले मांग । के ला मोकळा मारग सुरंग ॥५॥
ऐसा जोगवा मागुनी ठेविला । जाउनी महाद्वारी नवस फे डिला ।
एकपणे जनार्दन देखिला । जन्ममरणाचा फे रा चुकविला ॥६॥
फकिर
हजरत मौला मौला । सब दुनिया पालनवाला ॥१॥
सब घरमो सांई बिराजे । करत है बोलबाला ॥२॥
गरीब नवाजे मै गरीब तेरा । तेरे चरणकु रतवाला ॥३॥
अपना साती समजके लेना । सलील वोही अल्ला ॥४॥
जीन रूपसे है जगत पसारा । वोही सल्लाल अल्ला ॥५॥
एकाजनार्दनी निजवद अल्ल। आसल वोही बिटपर अल्ला ॥६॥
संसार
सांगते तुम्हां वेगळे निघा । वेगळे निघून संसार बघा ॥१॥
संसार करिता शिणले भारी । सासुसासरा घातला भरी ॥२॥
संसार करिता शिणले बहू । दादला विकू न आणले गहू ॥३॥
गव्हाचे दिवसे जेविली मावशी । मजला वेडी म्हणता कै शी ॥४॥
संसार करिता दगदगलें मनी । नंदा विकिल्या चौघीजणी ॥५॥
एकाजनार्दनी संसार के ला । कामक्रोध देशोधडी गेला ॥६॥

You might also like