You are on page 1of 4

।। श्री हरि ।।

श्री एकनाथ महाराज कृ त श्रीहरि पाठाचे अभंग

श्रीहरीच्या सेवकाला दाही दिशांना हरी दिसतो. जसा भाव तसा देव होतो. मुखाने हरीचे नाम घेणाऱ्याची चिंता
दूर होते. त्याला पुन्हा जगात यावे लागत नाही. वासनेच्या संगतीमुळे जन्म घ्यावा लागतो. तीच वासना हरिरूपी
मिळते. हरिरूप झाल्यावर जाणणे व मी-तूपण हरीचे ठायी लीन होते. एकनाथ म्हणतात, - “ हरीचे रूप ध्यानी
मनी धरून हरिस्मरण करीत जा. ”

हरी हरी बोला, नाहीतर उगाच गलबला करू नका. अभिमान न धरिता मी-तूपणा सोडील तोच सुखी होईल.
ज्यांनी सुखी व्हावे, त्यांनी अज्ञानी जनांससन्मार्गास लावावे. ज्याला मार्ग कळतो, त्याचा भक्तिभाव उजळून
जगातील प्रकार दिसत नाहीत. एकनाथ म्हणतात, - " मी जगात व प्रत्यक्ष डोळ्यांत हरिरूप ओळखले आहे.

संसारात ज्याने हरी ओळखला तो धन्य जाणावा. त्याच्या घरी मोक्ष सिद्धीसह येतो. पण सिद्धी वेड लावले तेथे
त्याला कोण विचारतो ? संशयाने निर्गुण कळत नाही, ते ज्ञानाने सगुण होते. जे कर्म के ले ते भोगावे लागते. असे
किती तरी जन्मले व मरून गेले. एकनाथ म्हणतात, - " यातायाती नकोत, मी हरीच्या संगतीने सुखाचा विसावा
घेतला आहे."

जे-जे पहावे, ते ते हरिरूप दिसू लागले. म्हणजे त्या रूपाची पूजा, ध्यान व जप करावयास नको. वैकुं ठ, कै लास,
तीर्थे, क्षेत्रे येथे देव आहे. त्याच्यावाचून रिकामी जागा कोठे नाही. वैष्णवांचे गुत्प्य व मोक्षाचा एकांत असा अनंत
त्याचा अंत लागत नाही. आदि-मध्य-अंती हरी एकच असून, एकाचे अनेक हरीच करितो, म्हणून दोन्ही जिवांचा
एक आकार एकनाथानी के ला आहे.

नामावाचून जे तोंड, ते सर्पाचे बीळ. ली जिव्हा नव्हे काळसर्प आहे. त्याची वाचा नसून लांब जाणावी - अशा
व्यक्तीचे जिणे जळो. जीभ काळसर्प व वाचा लांब जाणावी, अशाचे वाचणे व्यर्थ असून तो यम यातना भोगील.
तो यम यातना भोगील. त्याला हरिवाचून कोणी सोडविणार नाही. मुलगा, भाऊ, बायको संपत्तीची आहेत. अंत
काळाचा कोणी सोबती नाही. साधूच्या संगतीने हरीची प्राप्ती होईल. ‘हरी’ ही दोन अक्षरे कोटी कु ळांचा उद्धार
करतात. ती एकनाथांनी पाठ के ली.

आई पुण्याचे फळ प्रसवून धन्य झाली, तरी ते फळ हरी वाचून निर्फ ळ होय. वेदाचे बीज ‘ हरि हरि ’ अक्षरे हेच
सुलभ साधन आहे. योग, याग, व्रत, नेम, धर्म, दान ही साधने हरिजपास नकोत. ‘सर्व साधनांचे सार हरि हरि
नाम'. त्याचा उच्चार तोंडाने के ला असता. कार्यसिद्धी होते. जो नित्य मुक्त, तोच एक ब्रह्मज्ञानी जाणावा, यास्तव
हरि-हरी बोला असे एकनाथ सांगतात.

बहुत पुण्याच्या साठ्याने जरी नरदेह प्राप्त झाला, तरी तो भक्ती वाचून अधोगतीस गेला, असे जाणावे. अरे मूढा,
पापकर्म कसे सरेल व भाग्य कसे येईल, याचे वर्म तुला कळत नाही. अनंत पुण्य ज्याच्या गाठी असेल, त्याच्या
तोंडी नेहमी हरिस्मरण असेल. राजा असो, गरीब असो, अथवा उच-नीच जातीचा कोणीही असो, भक्ती वाचून
त्याच्या मुखात मातीच पडेल. एकनाथ म्हणतात, - " हरि-हरि म्हटल्याने सायुज्यता मुक्ती प्राप्त होते.
हरीचे नाम हेच अमृत, त्याचे सावकाश सेवन करणाऱ्याच्या नेमापुढे मोक्ष भूसा प्रमाणे दिसते. ज्याच्या घरात
नेहमी हरिनामाचा घोष होत असतो, ते घर काशीपुरी क्षेत्र जाणावे, वाराणशी तीर्थक्षेत्राचा नाश होतो, पण
अविनाशी नामाचा नाश होत नाही. एका तासात कोटी वेळा सृष्टी झाली व लयास गेली, असे दृष्टीने पाहणारा
एकनाथ, हरिनामाचे स्मरण करून धन्य झाला.

भक्तीवाचून जो मनुष्य, तो पशू जाणावा. तो कशाला वाढला ? त्याला सटवीने कसा नेला नाही ? अरे मूर्खा, तुझी
आई भूताजवळ गेली होती काय ? म्हणून तुझ्या मुखाने हरिनामाचा उच्चार होत नाही. पापे करतोस, त्याबद्दल
पुढे विचारणारा आहे, त्याला तू काय उत्तर देशील ? यम अनेक यातना भोगायला लावील, तेथे तुला कोण
सोडवील ? एकनाथ म्हणतात "हे तोंडाने सांगताना, गहिवर येतो. "

आपल्या हितास्तव भक्तिभावाने साधूची संगत धरली असता हरीची भेट होईल. ज्या ठिकाणी हरी, त्या ठिकाणी
संत व ज्या ठिकाणी संत तेथे हरी असतो. - असे चार वेद सांगतात. जेथे डोळस ब्रह्म्यास जर वेदाचा अर्थ
समजत नाही, तेथे आंधळ्यास तो कसा कळेल ? वेदार्थाचा गोंधळ करून ब्रह्मदेवाने कन्येची अभिलाषा के ली !
पण वेदांत असे सांगितले नाही. "हरि" ही दोन अक्षरें वेदांची बीजाक्षरे आहेत. तीच अक्षरे बोला - असें एकनाथ
सांगतात.

सत्पद ब्रह्म व चित्पद माया, या दोहोंचा जो एकानंद त्यालाच हरी म्हणतात. सत्पद निर्गुण रूप व चित्पद
सगुणरूप हे दोन्ही हरिचरणीच आहेत. पालिकडील वस्तूवर 'तत्सदिती' असे हरीने गीतेत सांगितले आहे.
हरिचरणाची प्राप्ती भोळ्या भाविकांस होते व अभिमान्यास गर्भवास भोगावा लागतो. अस्ती, भाती व प्रियता ही
तिन्ही पदे एकनाथ पूर्ण जाणत होते.

जे समजत नाही, ते समजणे, व समजते ते न समजणे आणि जे वळते, ते न वळणे हे ज्ञान गुरु वाचून
कळणार नाही. सगुणरूपाचे भजन के ले, तरी ते निर्गुण रूपास पावते याबद्दल विकल्प धरला तर जीभ झडेल.
बहुरूप्याने संन्याशाचा वेष घेतलेला पाहून, त्याला धन देतात, ते सन्याशाला दिले नाही, बहुरूप्याला दिले
म्हणतात, पण ते निर्गुणालाच पावते. असा हा अद्वैताचा गुण्य व गुणाचा खेळ एकनाथांनी मनात ओळखला
आहे.

ज्याने श्रीहरीची ओळख पटवून, हृदयात नामोच्चारण चालविले आहे; त्याची भेट झाल्यास दुःख दूर होईल.
स्त्रीपुरुष दुराचारी असोत, त्यांनी हरिनाम नित्य गायले असता, ते पवित्र होतात. त्यांची आई धन्य व कु ळ पवित्र
जाणावे. ज्याचे मनात काम, क्रोध, लोभ वास करतो; तो नामाचा अधिकारी होत नाही. " वैष्णवांचे गुप्त ज्ञान
निवडू न काढ‌लेले आहे, यास्तव हरिनाम घ्या. " असे एकनाथ सांगतात.

"हरी हे नाम देताना घेताना, हसताना, , खेळता- - ना, गाताना, खाताना, सर्व कार्ये करताना बोलत जा. ‫ و‬तसेच
एकांत स्थानी, लोकांत असता, देह सोडताना बोलताना, भांडताना, कांडताना उठताबसता जनात बनात ,
हरिनामाचा उच्चार करीत जा, असे एकनाथ सांगतात,

एक, तीन, पाच, पंचवीस यांचा मेला व छत्तीस तत्व या सर्वांचे मूळ हरीच आहे, कल्पना, अविधा त जीव गुंतला
आहे. त्याला मायेच्या उपाधी मुळे शिव म्हणतात, ० जीव शीव हे दोन्ही हरिरूपाचे तरंग असून त्या तरंगाचा
समुद्र हरि अभंग आहे, शिंपल्यातील सफे त रंग रुप्यासारखा दिसणे, अथवा दोरीचा सर्प भासणे; हे मायेमुळे होते.
ते मायाजाल ज्ञानी क्षेत्र क्षेत्रज्ञाप्रमाणे सांगतात. म्हणून हरि स्मरण करा

असे एकनाथ सांगतात. (१६) कल्पनेपासून जो ठे वा कल्पिला, तेणे करून भ्रम पडू न दृष्टीचा विसर पडला,
दिल्यावाचून फळाची प्राप्ती कशी होईल ? बापा ! कल्पनेची इच्छा फु कट आहे. श्री हरीच्या चरण प्राप्तीची इच्छा
के ल्यामुळे नारायण सर्व काही देईल. कल्पना अभिमानाची गाठ जरी कोटी जन्म घेतले, तरी सुटणार नाही; मग
हरीची भेट कशी होईल? एक नाथ म्हणतात, "मत्या खूण सापडली, म्हणूनच कल्पना अभिमान तोडू न हरी
झालो."

पद्मिनीने पंढाचे सोथळे करणे, वांझेस डोराळे होवे, अंधापुढे दिवा (गवणे, गाढवास चंदन मारवणे, सर्पास दूध
पाजणे, क्रोधी व अविश्वासीयांस उपदेश करण्यासाठी वाचेस शीण देणे; हे सर्व व्यर्थ आहे, दुष्यच्चा संगतीचा
उपयोग न होता आपणास दुःख होते, असे वैष्ववांनी जाणून कु पथ्याचा त्याग के ला आहे. तेच भले होत, असे एक
नाथसांगतात.

आपल्या अंगातील उर्मटपणा न घालविता नेहमी खटाटोप करणारे बेड काप्रमाणे वटवट करणारे जाणावे.
प्रेमावाचून भजन, नाका वाचून मोती घालणे व अथवाचून पोथी वाचणे व्यर्थ जाणावे. जसा कुं कवाचा ठिकाणा
नाही, व 'मी सुवासीण' म्हणणे, तसा भाव नाही व 'देवा मला पाव' म्हणणे, हे व्यर्थ आहे होय, अनुतापा वाचून
भाव नाही, हे अनुभवाने शोधून पाहावे, पाहता-पाहता पाहणेच गेले. अशा बद्दल एकनाथांनी अनुभव घेतला आहे.

फु लाचा वास नाहीसा झाल्या‌वर ते देवास असून व्यार्थ, तसा आयुष्य संपल्यावर प्रा०क्र के ल्यावर देह जाणावा.
काळ घर को घर को अजून किती अवकाश आहे, म्हणून बाउ पहात असतो. भास्तव सावध होऊन मनाजा
काहीतरी बोध 4 करावा खट्कं ग राजाच्या मरणास एक तस ठरला होता, इतक्यात त्याला भाग्य दशा प्राप्त
होऊन हरीची भेट झाली; म्हणून एकनाथ सांगतान, "हरीनामाचे मनन करा "

बापांनो, इतर करणीचे साधन न करिता हरिप्राप्तीचे साधन करा. ज्याच्या योगे रामाच्या यातना चुकाव्या व
जन्ममरण चुकावे. सर्व साधनांचे सार बीजमंत्र तरी. तोचि एक आत्मा तत्वात धरावा. ज्याचा नित्यनेम कोटी-
कोटी यश करणे, तो एक हरिनाम जपल्याने घडतो. एकनाथ म्हणतात-" मनात संशय न धरना निश्चय करा,
म्हणजे हरिरूप प्राप्त होईल.

बारा (सूर्य) सोळा (कला) जणी हरिता ओळखत नाहीत, म्हणून रात्रदिवस फे रे स्वात आहेत. हजार मुखांचा शेष,
तोही गुणवर्णन करता करता दमला व हरीचा पलंग झाला. चार वेदही मौन झाले, हरि प्राप्तीचे गुल्य ज्ञान तुला
प्राप्त कसे होईल ? पूर्वजन्मीच्या पुण्या- - ईचा व पूर्व अभ्यासाचा सद्‌गुरूचा से वक असेल, तोच हरीला जाणील,
हरीचे ठिकाणी जाणणारे व न जाणणारेही असतात म्हणून एकनाथ सांगतात, " नित्य हरी बोलत जा,"

पिंड देहाची स्थिती व ब्रह्मांडातील पसाना हा सर्व हरी वाचून "अर्थ भ्रमाचा आहे. शुक, याज्ञवल्लभ, स्तात्रेय
कपिलमुनी हे हरीस जाणूनच हरीरूप झाले. यास्तव हरिनामाचे तारू घरू या, म्हणजे संसारसागर तरून जाऊन
भय दूर होईल. साधूसंत आनंदात राहून हरि- नामाच्या योगे कृ तार्थ होऊन गेले, त्याचप्रमाणे एकनाथ दुकान
मांडू न सर्व वस्तू मोलावाचून देत आहेत.
श्रीहरीचे नाम आवडीने व भावनेने घेशील, तर त्या हरीला तुझी चिंता आहे. तू कोणत्याही गोष्टीचा खेद करू
नकोस तो लक्ष्मीचा पती सर्व काही जाणतो आहे. तोच सर्व जिवांचा सांभाळ करतो, तो तुझा आहेर करीब असे
होणार नाही. तुझी जशी स्थिती आहे, तसाच राहून नशिबाचे कौतुक पाहा. एकनाथ म्हणतात, "प्रारब्धाच्या
भोगावचा हरीच्या कृ पेनेच नाश होल असतो.

गरीबाची मुलगी थोराने के ल्यावर ती मुलगी दारिद्र‌याची अवदसा असली, तरी ती जाऊन शेोरासारखी होते. हरीची
कृ पा झाल्याने भक्तांची पोटे मोठी वाढू न ते हरिरंगात आनंदाने नाचू लागतात. देवांचे एकरूप होताच ते
मुळातच जसेच्या तसे साठते. काय- व भक्तांचे राच्या वातीची ज्योत पाजळून आरती ओवाळल्या कर ज्याप्रमाणे
काही उरत नाही, त्याचप्रमाणे एकनाथाचे ठायी कल्प मुरून तो बलरूप हारे झाला.

एक लक्ष्य ठे वून पाचवी (खेचरी) मुद्रा लावून आत्मा पाहणायास, प्रत्यक्ष हरी दिसतो. जे कानांनी ऐकले व
डोळ्यांनी पाहिले, ते हरीचे रूप सर्वन्न व्यापून राहिले आहे. कर्म, उपासना ज्ञानमार्गादी सर्व मार्ग हरिपाठात आले
असून, जो नित्य भावाने हरिपाठ गातो. त्याच्यावर हरीची कृ पा होते; तेथे हरिपाठांचे बोलणे संपले म्हणून 'हरि
बोला नित्य हरि बोला' असे एकनाथ सांगतात.

11 इति श्री एकनाथ महाराज कृ त श्रीहार पाठाचे अभंग ।।

You might also like