You are on page 1of 5

।। श्री हरि ।।

श्री ज्ञानेश्वर महाराजकृ त श्रीहरी पाठाचे अभंग

(1) देवाच्या दारात एक क्षण उभे राहिले असता ( सेवेत तत्पर झाले असता ) सलोकतावादी चार मुक्ती
साध्य होतात भगवंताच्या नामाचा उच्चार करणे हीच हरीची सेवा होय. म्हणुन “ हरिमुखे म्हणा
हरिमुखे म्हणा ” असे म्हटले आहे. तर नामस्मरण हेच देवाचे दार. तेच ज्ञान होय. वास्तव त्या
ज्ञानरूपी दारात क्षणभर उभे राहिल्याने पुण्याची गणना कोणीही करू शकणार नाही. यास्तव संसारात
राहून जिव्हेने हरीनाम उच्चारावे, असे वेदशास्त्रें हात वर करून सांगतात. ज्ञानदेव म्हणतात की, - “
नामस्मरणाचे व्यसन पांडवांनी आपणास लावून घेतल्या मुळेच द्वारके चा राणा श्रीकृ ष्ण त्यांच्या घरी
राबत होता असे व्यासांचे महाभारतात वचन आहे. ”

(2) चार वेद सहा शास्त्रें व अठरा पुराणे ही हरीचे गुण गातात. ज्या प्रमाणे दही घुसळून लोणी काढू न
घेतात, त्याप्रमाणे वावग्या कथांचा मार्ग सोडू न अनंतास भजावे. जीव-शिव-आत्मा हे एक हरीच आहेत,
यास्तव त्यावाचून भलतीकडे मन लावू नको. ज्ञानदेव म्हणतात, - “ हरी, हाच वैकुं ठ होय, त्यातच हरी
घनदाट भरलेला दिसतो. ”

(3) त्रिगुणातीत जग अशाश्र्वत व असार आहे. असार हे त्रिगुण व सार हे निर्गुण यांतील सारासार विचार
हरी. सगुण, निर्गुण व गुण यांचा अगुण एक हरीच होय. ह्याच्या शिवाय दुसरीकडे मन जाऊ देऊ नये.
जे अव्यक्त असून अमूर्त आहे, ज्याला आकार नाही व ज्याच्यापासून चर व अचर अशा उभय
भेदात्मक जगाची उत्पत्ती झाली, त्या हरीचे तू भजन कर. ज्ञानदेव म्हणतात, - “ माझ्या ध्यानात व
मनात निरंतर रामकृ ष्ण आहे म्हणून या जन्मात अनंत पुण्याईची जोड होत आहे. "

(4) भाव नसल्यामुळे भक्ती होईल व भक्तीवाचून मुक्ती मिळेल असे जे म्हणणे, ते आपल्या अंगात काही
एक बळ नसता मी अगुक एक गोष्ट करीन या म्हणण्या प्रमाणे व्यर्थ होय. म्हणून तसे बोलू नये. देव
कशाने लवकर प्रसन्न होईल, असा जर प्रश्न असेल तर व्यर्थ शीण न करता आपले मन विषय वासने
पासून सोडवून, स्धिर करून निजबोधाने शांत रहा. रात्रंदिवस प्रपंचाचे खटाटोप करतोस, पण हरीचे
भजन करीत नाहीस ते का बरे ? यास्तव ज्ञानदेव म्हणतात, - “ हरीचे भजन कर, म्हणजे तू’ या
संसारातून तत्काळ तरून जाशील अर्थात प्रपंचाचे बंधन तुटेल. ”

(5) अष्टांगयोग व यज्ञविधि यांमुळे हरीची प्राप्ती होणार नाही, कारण ही हरिप्राप्ती विषयीची दुरची साधने
आहेत. अनुष्ठान करणाऱ्यांत मी मोठा योगी - याज्ञिक आहे, माझी ख्याती सर्वत्र व्हावी, अशी इच्छा
उत्पन्न होते, ती पूर्ण होण्यास योग, यज्ञ वगैरे करतो; पण तो खरा धर्म न होऊन, पीडा करणारा व्यर्थ
दांभिक धर्म होतो. देव भावावांचून नि:संशय कळत नाही. म्हणजे वेद वचनावर व गुरुवचनावर दृढ
विश्वास नसल्यामुळे देवाचे ज्ञान होणार नाही. कारण देवस्वरूपाचा अनुभव गुरुवाक्याने होत असतो.
तपावाचून दैवत प्रसन्न होत नाही व दिल्यावाचून काही मिळणार नाही; अर्थात् कर्म करावे तसे फळ
मिळेल, गुजावांचून ( प्रेमावाचून ) हित कोणी सांगणार नाही; म्हणून ज्ञानदेव म्हणतात, - “ जिवास
संसारातून तरण्याचा उपाय ‘साधूची संगत करणे’ हा असून तो माझ्या अनुभवास आला आहे. ”
(6) साधूंचा बोध होऊन तो न उरून जरी राहिला, तरी कापराच्या पेटलेल्या नातीची ज्योत ज्याप्रमाणे
जागच्या जागी शांत होते, त्या प्रमाणे जागचे जागी जिरून जातो. त्याच प्रमाणे साधूच्या अंकीत
झालेल्या हरिभक्तांची विद्या व अविधा याही निवृत्त होऊन तो मोक्षरूप सुशोभित होतो. ज्ञानदेव
म्हणतात, - “मला साधुंच्या संगतीतच गोडी वाटते, त्यामुळे आत्मतत्वांत जनावनांत हरीच दिसत आहे.
"

(7) जे पर्वता सारखी मोठमोठी पातकें करून हरिभक्तिविषयी विन्मुख आहेत, त्या अभक्तांचे पातक
कोणत्याही अन्य उपायांनी जाणार नाही, ज्याला हरीची प्रेमभक्ती नाही, तो अभक्त करंटा हरीचे भजन
कसे करील ? जे वायफळ बडबड करितात त्यांस दीन दयाळ हरी कसा प्राप्त होईल ? ज्ञानदेव
म्हणतात, - “ देहातील आत्मा हाच ठे वा, सर्व घरांत नांदत आहे. ”

(8) साधूच्या संगतीने मनाच्या मार्गाला गती मिळते, त्या गतीने श्रीपतीला वश करून घ्यावा. जिवाचा भाव
वाचेने रामकृ ष्ण नामाचा उच्चार करावा हा होय. शंकराचा आत्माही रामनामाचा जप करीत होता. एक
तत्वी नाम साधनाने हैत बंधन तुटू न जाते. वैष्णवांना नामामृताच्या गोडीची जशी आवड आहे, तशीच
योग्यांना सतराव्या जीवन कलेची आवड आहे. प्रल्हादास बाळपणीच हरिनामाचा छं द लागला, उद्धवाला
कृ ष्णासारखा ज्ञानदाता मिळाला. ज्ञानदेव म्हणतात, - “ हरिनामाचे साधन सोपे आहे, पण ते मनुष्यास
दुर्लभ वाटते. कारण नामोच्चार कोणी करीत नाही. नामाची योग्यता व सोपेपणा जाणून निरंतर नाम
घेणारा पुरुष विरळाच आहे. ”

(9) रामकृ ष्णनामी मन नसणे व विष्णुवाचून जप करणे, हे व्यर्थ-ज्ञान होय. जन्माला येऊन जो अद्वैताजा
(परमात्म्याला) जाणत नाही, तो करंटा जाणावा. त्याचा रामकृ ष्णी भाव कसा बसेल? ज्याला गुरुज्ञान न
होऊन द्वैताची झाडणी कळली नाही, त्याचे नामकीर्तनी मन कसे बसेल ? ज्ञानदेव म्हणतात, - “ मी
हरीच्या सगुण स्वरूपाचेच ध्यान निरंतर करीत असून प्रपंचातीळ गोष्टींचे भौन धरले आहे.”

(10) गंगा, यमुना, सरस्वती संगमी जो गेला व नाना तीर्थे फिरला, त्याचे हरिनामी जर चित्त नाही; तर
त्यांचे ते करणे व्यर्थ होय, हरिचे नाम न घेणारा मनुष्य पापी. त्याला पापातून सोडविण्यास हरीवाचून
कोणी धावणार नाही. नामामुळे पातकापासून त्रैषोक्याचा उद्धार होतो, असे बाष्मीकी रामायणात
सांगतात, म्हणून ज्ञानदेव म्हणतात, - “ जो हरिनामाचा जप करतो, त्याच्या वंशाचा उद्धार होतो. ”

(11) हरिनाम उच्चाराने अनंत पापांच्या राशि क्षणात लयाला जातात. गवत अग्नीच्या संयोगाने ज्याप्रमाणे
अग्निरूप होते, त्याच प्रमाणे हरिनाम जपणारा हरिरूपच होतो. हरिनाम मंत्राने भूतबाधा नाहीशी होते,
ज्ञानदेव म्हणतात, – “ माझा हरी माझा समर्थ आहे, त्याच्या स्वरूपाचा निर्णय उपनिषदांसही झाला
नाही.”
(12) जनहो ! तीर्थे-व्रतें-नेम कितीही के लेत तरी हरीवर दृढ विश्वास असल्यावाचून ती सफल होत नाहीत,
मग व्यर्थ शीण कां करुन घेता ? भावबळाने तळहातावरील आवळ्या प्रमाणे श्रीहरी हस्तगत होतो,
पाण्याचे कण जमिनीवर असता त्यास नमविण्यास पुष्कळ प्रयास पङतात. ज्ञानदेव म्हणतात, - “ माझे
गुरू निवृत्तिनाथ हे निर्गुण असून; त्यांनी हरिस्वरूपाचा पूर्ण बोध माझ्या हातात दिला, अर्थात् बोध
होऊन अनुभवास आला. ”

(13) एकरूपी हरीचे समबुद्धीने ग्रहण के ले असता आत्म-स्थिती प्राप्त होते. भेदात्मबुद्धीने समाधी कधीही
प्राप्त होणार नाही. के शन (आत्मा) जाणणे, हे बुद्धीचे ऐश्वर्य आहे. त्यानेच सर्व सिद्धींचा लाभ होतो.
ऋद्धी आदी आठ प्रकारच्या सिद्धींचा जरी ठे वा प्राप्त झाला, तरी तो हरीच्या ठायी मन नाही तो पर्यन्त
त्या पीडादायक होतात, ज्ञानदेव म्हणतात, - “ प्राणिमात्राला रमविणारे समाधान माझ्यात स्थिर झाले
असून हरीचे चिंतन निरंतर चालले आहे. ”

(14) हरिनामाचा निरंतर जप करणऱ्या कडे कळिकाळ दृष्टीनेही पाहत नाही. "रामकृ ष्ण" नाम जपाने
तपाच्या अनंतराशी घडू न त्यायोगे पापाचे समुदाय पुढे पळत सुटतात. 'हरि, हरि, हरि' हा शिवाचा नित्य
जपमंत्र आहे. या मंत्राच्या नित्य स्मरणाने मोक्ष-प्राप्ती होईल. ज्ञानदेव म्हणतात, - “ मी नारायण जय
निरंतर करतो. त्यायोगे आत्मस्वरूप स्थानाची प्राप्ती झाली आहे. ”

(15) जो एका हरीचे नाम जाणतो, ज्याला दुसऱ्या नामाची ओळख नाही; असा सर्व सृष्टीत हरिरूप पाहून
हरिनामच ओळखणारा एखादाच असतो. समबुद्धीने श्रीहरीस समान मानणार शमदमाचा वैरी म्हणजे
शमदमाच्या बंधनातून सोडविणारा जो श्रीहरी, त्याच्या रूपा सारखा होतो. सर्व घटांत व सर्व देहांत राम
एकच आहे व सहस्र किरणांचा प्रकाशक सूर्य एकच आहे. ज्ञानेश्र्वर म्हणतात, - “ मी निरंतर हरिचिंतन
करण्याचा नेम के ला, म्हणूनच मी मागच्या जन्मात मुक्त झालो. ”

(16) वाचेने सुलभ असे रामकृ ष्ण नाम व हरिनाम जपणारा मनुष्य दुर्लभ असतो. रामकृ ष्ण नामाने उन्मनी
साधणारा सर्व सिद्धीची प्राप्ती करितो. सिद्धी बुद्धी व धर्म हरिचिंतनाने प्राप्त होतात. प्रापंचिकांच्या
जिवाची शांती साधुसंगतीने होते, ज्ञानदेव म्हणतात, - “ माझ्या हृदयात रामकृ ष्ण नामाचा उसा
उमटलेला आहे, तेणे करून दाही दिशा आत्मारामाने भरलेल्या दिसतात. ”

(17) वाणीने हरिनामाची कीर्ती गाणाऱ्याचा देह पवित्र होतो. हरिनाम उच्चाराचे अगणित तप करणारा
वैकुं ठात कल्पपर्थंत चिरंजीव राहतो व त्याचे आईबाप, भाऊबंद व गोत्रज चतुर्भुज होऊन वैकुं ठी राहतात.
ज्ञानदेव म्हणतात, - “ निवृत्तिनाथ गुरुजींनी गुप्त आत्मज्ञान मला दिले, त्या योगेच मी बानसंपन्न
झालो. ”

(18) हरिवंशपुराण वाचणारा, हरिनामाचे कीर्तन करणारा व हरीवाचून दुसरे न जानणारा वैकुं ठी वास करितो
व त्याला सर्व तीर्थ यात्रा के ल्याचे पुण्य लाभते, मनोकृ तीने चालणारा असळ्यास लाभास मुकलो,
हरिभजनात निमग्न झाला, तोच धन्य जाणावा. ज्ञानदेव म्हणतात, - “ हरिनामाचीच मला गोडी असून
रामकृ ष्ण नामाचे ठायी सर्वकाळ आवड आहे. ”
(19) सर्वांचे सार जे नारायण नाम त्याचा जप करावा, असे वेदशास्त्रांचे वचन प्रमाण आहे. इतर जप, तप
करणे हे हरिभजनावाचून व्यर्थ जाणावे, फु लाचे कळीत जसा भ्रमर गुंतून राहतो, तसा हरिनामात रत
झालेला हरि स्वरूपी लीन होतो. (प्रपंचात येत नाही.) ज्ञानदेव म्हणतात, - “ माझा मंत्र व शस्त्र
हरिनाम आहे, त्याच्या भीतीने यमाने आमच्या कु लगोत्राचा त्याग के ला आहे. ”

(20) वैष्णवांच्या जोडीने हरिनामाचे कीर्तन करावे. त्या योगे अनंतकोटी पातकें भस्म होतात. अनन्त जन्मी
के लेल्या जपाचे फळ म्हणजेच हरीचे नामस्मरण होय. योगयाग, क्रिया, धर्म, अधर्म हे सारे हरिचिंतनाने
ल्यास जातात. ज्ञानदेव म्हणतात, - “ आमच्या साठी यज्ञयाग, क्रिया, धर्म इत्यादी हरीच आहे.
त्याच्यावाचून दुसरा काही नेमधर्म नाही. ”

(21) हरिचे नाम हवे तेव्हा घ्यावे, त्यास काळ वेळेची जरूर नाही, त्यायोगे आईच्या व बापाच्या कु ळांचा
उद्धार होतो. रामकृ ष्ण नामोच्चाराने सर्व दोष हरण होतात. जडजिवांस तारणारा एक हरीच आहे.
हरिनाम साराची गोडी ज्याच्या जिभेला लागली. त्यांचे दैवास उपमा कोणी घावी ? ज्ञानदेव म्हणतात, -
“ माझे हरिचिंतन यथासांग झाले, त्यामुळे माझ्या पूर्वजांना वैकुं ठी जाण्याचा मार्ग सुलभ झाल आहे. ”

(22) हरीचे नाम नेमाने घेणारे प्राणी दुर्मीळ आहेत. त्यांच्या जवळ विष्णुपती वास करितो. ' नारायण हरि
नारायण हरि ' या नामाचा जो नेहमी जप करितो, त्याच्या घरी चारी मुक्ती राबतात. जन्मास येऊन
ज्याला हरीची ओळख नाही, त्याचा जन्म नरकच समजावा. तो प्राणी यमलोकी जाताच यम त्याला
शिक्षेचा पाहुणचार देतो. ज्ञानदेवाने निवृत्तिनाथास हरीचे नाम के वढे आहे-असा प्रश्न के ला; तेव्हां
निवृत्तिनाथाने “ नाम आकाशापेक्षा मोठे आहे असे सांगितले. ”

(23) संसार हा सात, पाच, तीन, दहा तत्त्वात्मक आहे असे मानतात, किं वा ७/५/३/१० मिळून पंचवीस
तत्वात्मक मानतात, ही तत्त्वे हरि आपल्या एका चैतन्य तत्वावर दाखवितो, असा तत्वविचार
करण्यापैकी हरीचे नाम नाही, ते साधनांत वरिष्ठ आहे. ते घेण्यास कष्ट पडत नाहीत. अजपाजप
म्हणजे रात्री व दिवसा मिळून २९६०० वेळा सोडहं असे आपल्या हृदयात प्राणाच्या वर जाण्यात व
अपानाच्या खाली जाव्यात श्र्वास होतात त्याला अजपा म्हणतात. सकाळी झोपेतून उठल्यावर या
जपाचा संकल्प सोडल्यास वरील श्र्वास जपाचे श्रेय मिळते. असे करण्याकडे कित्येक साधकांच्या मनाचा
निश्र्चय असतो. ज्ञानदेव म्हणतात, - “ नाम उच्चारावाचून जिणे व्यर्थ आहे, म्हणूनच मी रामकृ ष्णनाम
निरंतर उच्चारीत असतो. ”

(24) जप, तप, कर्म, क्रिया, नियम, धर्म ज्या भावनेने करावे; त्या भावनेपेक्षा सर्व देहांत एक आत्मारामच
आहे, असे पाहणे हा भाव शुद्ध आहे. त्या भावाचा त्याग करू नये, भावात बिघाड करणाऱ्या संशयास दूर
कर आणि रामकृ ष्ण नामाचा एकसारखा टाहो फोडीत राहा. जातीच्या, वित्ताच्या, गोत्राच्या, कु ळाच्या
स्वभावाच्या भानगडीत न पडता शुद्ध भावाने हरीचे भजन कर, ज्ञानदेव म्हणतात, - " मी ध्यानी-मनी
रामकृ ष्णाचें चिंतन करतो, म्हणूनच वैकुं ठात घर के ले आहे. ”
(25) भक्त ज्ञानी आहे, किं वा अज्ञानी आहे, हे देव पहात नाही. नाम उच्चाराने दोघांसही सारखी मुक्ती
मिळते. 'नारायण हरी' असा उच्चार करणाऱ्याकडे कळिकाळाचा प्रवेश होत नाही. हरीचे स्वरूप वेदां सही
कळत नाही. ते सामान्य जिवांना कसे कळेल ? ज्ञानदेव म्हणतात, - “ हरिस्मरणानेच मृत्युलोक
वैकुं ठासारखा भासत आहे. ”

(26) हरिनाम हेच तत्त्व, त्याचे चिंतन करीत राहा. त्यायोगे हरीला तुझी दया येईल. 'राम कृ ष्णगोविंद' हे
सोपे नाम प्रेमाने घेत जा. हरिनामा सारखे साधन नाही. यास्तव दुसऱ्या साधना कडे जाऊ नकोस.
ज्ञानदेव म्हणतात, - “ मी मौन धरून मनात हरिनामाच्या जपमाळेचा जप करीत आहे. ”

(27) सहा शास्त्रांनी हरिनामात सुख आहे; असे निवडलेले आहे, यास्तव अर्धघटकाही रिकामा राहू नको.
संसार व्यवहार लटका आहे, म्हणून हरिनाम सोडू न संसाराच्या मोहात पडशील, तर तुझे जन्ममरण
व्यर्थ होईल. यास्तव नाममंत्राचा जप कर, म्हणजे अनंत पापांचा नाश होईल. रामकृ ष्ण नामाचा निश्र्वय
धरून राहा तीन व तीन गुण यांहून जो वेगळा, जो आत्मा; जो मौंड अशी वृत्ती धरून मायाजाळांचा
नाश कर. इंन्द्रियांच्या तादात्म्यात लपून राहू नको. तीर्थषतांवर विश्र्वास ठे वून दया बाळग; कारण
शांती- दयेच्या ठायी देव वसतो, यास्तव हृदयात शांती - दया ठे वून हरी वस्तीला येईल, असे कर.
ज्ञानदेव म्हणतात, - “ निवृत्तिनाथांपासून मला जे ज्ञान मिळाले, तो हा हरिपाठ समाधि - संजीवन,
म्हणजे जिवंत करणारा आहे, असे मला अनुभवाने कळले. ”

(28) हरिपाठाचे अठ्ठावीस अभंग आहेत. श्रीज्ञानदेव यावर विश्र्वासूनच तरून गेले. इंद्रायणीचे काठी याचे
नियमित पठण करणारा मुक्तीचा संपूर्ण अधिकारी होतो. स्थिरचित्ताने मनाची एकाग्रता करून उत्साहने
नामस्मरण करावे. अत्यंत कठीण असा जो अंतकाळ, त्या वेळी, सर्व संकटांत नामस्मरण करणाऱ्याला
श्रीहरी तारतो. याची प्रचिती संतांनी घेतली आहे. नामस्मरणा विषयी आळशी असणारा के व्हाही तरणार
नाही. श्रीज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात, - “ माझे गुरू श्री निवृत्तिनाथ यांनी प्रेमाने मला हे ज्ञान दिले,
त्यामुळे मी तत्काळ संतुष्ट झालो. ”

(29) हे घर कोणाचे आहे व हे शरीर कोणाचे आहे, हे आत्मस्वरूपाचा अनुभव आल्यावर कळेल. मी कोण
आहे, दूसरा कोण आहे, याचा शोध विवेकाने घ्यावा, शुद्ध प्रेम प्रकट करून या शरीराच्या माध्य-मानून
ईश्र्वराची प्राप्ती करून घ्यावी. ध्याता, ध्येय व ध्यान या त्रिपुरी पेक्षा तो वेगळा आहे. सहस्र किरणांनी
सूर्य जसा उगवला आहे, तसा तो अनन्त किरणांनी पसरलेला आहे. संत श्री ज्ञानेश्र्वर महाराज
म्हणतात, - “ डोळ्यांत ज्यामुळे बघण्याचे सामर्थ्य प्राप्त होते, त्याला तुम्ही निरनिराळ्या प्रकारच्या
वस्तूत व रूपांत जाणावे. ”

इति श्री ज्ञानेश्र्वर महाराजकृ त श्री हरिपाठाचे अभंग

You might also like