You are on page 1of 4

छत्रपतींच्या कुलदे वतेची राज्याबाहेरील प्रतीके

छत्रपती शिवरायांचे भोसले घराणे महाराष्ट्रात स्थिरावल्यानंतर त्यांचे आजोबा मालोजीराजापासन


तुळजाभवानीच्या भक्तीचे दाखले अनेक संदर्भ ग्रंथात सापडतात. विशेषत: बखरीमध्ये याबाबत मोठ्या विस्ताराने

लिखाण आढळून येते. त्यानुसार मालोजीराजे महाराष्ट्रात स्थिरावत असताना तुळजाभवानीच त्यांना साक्षात्कार झाला

वगैरे माहिती यात आहे . हा भक्तीचा एक भाग म्हणून गहि


ृ त धरलेतरी 16 व्या शतकापासून भोसले घराण्याने श्री

तुळजाभवानीला आपले कुलदै वत माणल्याचे यातून स्पष्ट होते. एवढे च कायतर शिवरायांच्या नावासाठीसुद्धा

शिवाईदे वीचा संदर्भ दिला जातो. छत्रपती शिवाजी महाराज आणि आई तुळजाभवानी यांच्या भक्तीचे नाते अतूट होते.

परमल
ु खात असणार्‍या आपल्या कुलदे वतेला वारं वार येणे होत नाही म्हणन
ू त्यांनी किल्ले प्रतापगडावर तळ
ु जाभवानी

मंदिराची निर्मिती केली. पुढे त्यांच्या वंशजांच्या सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्या तयार झाल्यातरी त्यांनी

आपली परं परा कायम ठे वली. तुळजाभवानीच्या सेवेसाठी आजही कोल्हापूर संस्थांनची जमीन आणि जागा

तुळजापूरात कायम असून संस्थानच्यावतीने रोज तीन वेळा तुळजाभवानीला नेवैद्य दिला जातो. एकंदरच श्री

तुळजाभवानी ही भोसले घराण्याची कुलदे वता असल्याने ते कुठे ही स्थिरावलेतरी त्यांनी आपली तुळजाभवानी भक्ती

सोडली नाही. त्यामळ


ु े महाराष्ट्रच नाहीतर परराज्यातही या घराण्याने केलेली दे वीभक्ती सर्वश्रत
ू असन
ू त्यामळ
ु े

आजही राजस्थानमधील चित्तोड गड, कर्नाटकातील होदीगेरे, चेन्नईतील कालीकांब मंदिरातून त्यांच्या भक्तीचे दाखले

आढळून येतात. दलणवळणाची तेवढी साधने उपलब्ध नसताना हे संदर्भ वेगळी माहिती दे वून जातात हे निश्चित

आहे .

चित्तोडगडावरील श्री तुळजाभवानी मंदिर – शिवछत्रपतींच्या भोसले घराण्याचे मूळ हे राजस्थानमधील

चित्तोडचे सिसोदियावंशीय असल्याचे संदर्भ वा.सी. बेंद्रेसह अनेक इतिहासकारांनी दिलेले आहेत. चित्तोडचा किल्ला

म्हणजे संघर्षाचे प्रतीक असून 700 एकरवर पसरलेल्या या किल्ल्यावर अनेक मंदिरे आहेत. तरीपरं तु या किल्ल्यावर

तुळजाभवानीचे मंदिर असणे हे वेगळे पण आहे . गडाला असणार्‍या सात दरवाज्यापैकी रामपोल दरवाज्यातन
ू आत

ृ , अर्धमंडप आणि
गेल्यानंतर डाव्या हाताला हे माडपंती शैलीतील श्री तुळजाभवानी मंदिर असून त्याची रचना गर्भगह

ृ ात तुळजाभवानीची अष्टभूजा मूर्ति असून ती महिषमर्दिनी आहे . त्याच्यापुढे


मंडप याप्रमाणे केलेली असून गर्भगह

शिवलिंग आहे .
या मंदिराची निर्मिती इ.स. 1536 ते 40 या दरम्यान राणा बणबीरने केलेली असून आपल्या राज्याला

स्थिरता मिळावी म्हणून त्याने याठिकाणी तुलादान केले. तेव्हा तुळजाभवानी दे वीच्या मंदिराची उभारणी केली.

वास्तविक पाहता तेथे काली, सती अशाप्रकारची इतर दे वी मंदिरे असताना तुळजाभवानीचे मंदिर असावे हे वेगळे पण

आहे . त्यामुळे छत्रपतींचे मूळ हे राजस्थान की, दक्षिणेतील त्यांचाच एखादा वीरपुरुष राजस्थानात गेला असावा का

असा प्रश्न पडतो. ते काही असो शिवरायांच्या कुळाचे अस्तित्व जेथे जेथे राहिले तेथे तुळजाभवानीचा वास राहिला

हे च यावरून दिसून येते.

होदिगेरे गावातील तुळजाभवानी मंदिर

स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज आदिलशाहीकडे गेल्यानंतर त्यांचे वास्तव्य हे मुख्यत्वेकरून बंगळूरमध्ये

राहिले. आदिलशाहीमध्ये एक स्वतंत्र जहागिरदार म्हणन


ू काम करत असताना त्यांनी स्वत:ची एक वेगळी छाप

सोडली होती. याचवेळी आपला मल


ु गा मराठी मल
ु खात एका स्वतंत्र्य राज्याची निर्मिती करतोय याचा त्यांना

अभिमान असून त्यासाठी ते शिवरायांना शक्य त्याप्रमाणात मदत करत होते. दर्दैु वाने मध्येच 23 जानेवारी 1664

साली होदिगेरे ता. चन्नगिरी जि. दावनगेरे येथे त्यांचे अपघाती निधन झाले. यावेळी शहाजीराजे होदिगेरेत ज्या

वाड्यात राहिले तो दे सायांचा वाडा आणि इतरही काही पाऊलखुणा आजही तेथे कायम आहेत. मात्र कर्नाटकातील या

छोट्याशा गावात श्री तुळजाभवानीचे एक मंदिर आहे , याकडे विशेषत: कोणाचे लक्ष गेलेले नाही. कर्नाटकात यलम्मा,

चणम्मा यासारख्या नावाची अनेक मंदिरे आहे त. मात्र याठिकाणी तुळजाभावणीचे मंदिर असल्याने त्याची स्थापना

शहाजीराजांनी केलेली असावी असे दिसते. अतिशय छोटे खानी असणार्‍या या मंदिरात तुळजाभवानीची अष्टभूजा

महिषासुरमर्दिनीच्या स्वरुपातील मूर्ति आहे . मूर्तीकडे पाहिल्यानंतर अतिशय आक्रमक स्वरुपातील ही मूर्ति

घडविण्यासाठी वापरलेला काळा पाषाण बाहे रून आणल्याचे स्पष्टपणे जाणवते. दे वीला रोज सकाळी अभिषेक करून

नैवेद्य दाखवितात. नवरात्र महोत्सव आपल्याप्रमाणेच असून सीमोल्लंघनाच्यादिवशी दे वीच्या उत्सवमूर्तिला पालखीत

बसवून नगर्‍याच्या जयघोषयात जंगी मिरवणूक काढतात.

ू चे वैशिष्ट म्हणजे या मूर्तीला कधीही वस्त्रे घालत नाहीत. त्याऐवजी


होदिगेरेतील तुळजाभवनीच्या मर्ती

ू ला विविध रं गाची फुले चिटकावली जातात. होदिगेरेचे वैशिष्ट म्हणजे गावात


सकाळचे पूजाविधी झाल्यानंतर मर्ती
शंभरटक्के वस्ती लिंगायत समाजाची असून या परिसरातील लोकांना शहाजीराजे आणि तुळजाभवानीविषयी प्रचंड

आदर आहे . मात्र या ू 10 -20 किमीवर तळ


गावपासन ु जाभवानीविषयी लोकांना काहीही माहिती नाही. साहजिकच

होदिगेरे हे शहाजीराजेंच्या जहागिरीतील गाव असून आपल्या कुळाची कुलदे वता म्हणून त्यांनीच या मंदिराची स्थापना

करून परमुलूखात असूनही त्यांनी तुळजाभवानीची भक्ति कायम ठे वली.

चेन्नईतील कालीकांब मंदिरातील शिवरायांचा शिलालेख

तामिळनाडची राजधानी चेन्नई याठिकाणी थंबूचेट्टी मार्गावर कालीकंब कामेश्वराचे प्राचीन मंदिर असून पूर्वी

ु किनारी होते. 1640 ला ते याठिकाणी स्थलांतरित केले गेले. कालिकांब मंदिर पाहताना निश्चितपणे श्री
ते समद्र

ु जाभवानी मंदीराची आठवण येते. कारण दोन्ही मंदिराच्या शिखरावरील शिल्प आणि रं गसंगती ही जवळपास
तळ

सारखीच आहे . दक्षिणेतील कुठल्याही मंदिरात दे वदे वतांचे जवळून दर्शन होत नाही. या मंदिरातील मर्ति
ू अष्टभज
ु ा

असून ते कालीचे रूप आहे . सकाळी 5 ते रात्री 12 पर्यन्त भाविकांना दे वीच्या दर्शनाचा लाभ घेता येतो.

आपल्याप्रमाणेच येथेही विविधप्रकारचे होमहवन आणि पूजाविधी केले जातात.

मराठ्यांच्यादृष्टीने कालिकांब मंदिराचे वैशिष्ट म्हणजे कर्नाटक दिग्विजयामध्ये स्वारीवर असणार्‍या छत्रपती

शिवाजी महाराजांनी 3 आक्टोंबर 1677 यादिवशी येथील मंदिरात येवून अंनुष्ठान केलेले आहे . कदाचित यावेळेला

नवरात्र असावी. छत्रपती शिवाजी महाराज कालिकांब मंदिरात येवून गेल्याची आठवण म्हणून मंदिरात प्रवेश

केल्यानंतर डाव्या बाजच्


ू या भिंतीवर एक शिलालेख कोरला असन
ू त्यात शिवराय येथे येथे येवन
ू गेल्याची तारीखवार

नोंद केलेली आहे . सदरचा शिलालेख भलेही शेपन्नास वर्षापर्वी


ू चा असलातरी येथील तामिळ लोकांना छत्रपती शिवराय

येथे आल्याचा मोठा अभिमान वाटतो. महाराजाविषयी ते फार उत्सुकतेने बोलताना आढळून येतात. शिलालेखाच्या

वरच्या बाजूला छत्रपती शिवरायांचा पूर्णाकृती फोटो असून या फोटोचे वैशिष्ट म्हणजे महाराष्ट्रातील फोटोप्रमाणे

येथील फोटोतही कालीकांबदे वी छत्रपती शिवरायांना तलवार भेट दे ताना दाखविलेले आहे .

चेन्नईमध्ये मराठी माणसांची संख्या ही जवळपास दहा हजार असून कालिकांब ही त्यांच्यासाठी प्रेरणास्त्रोत

आहे . त्यामळ
ु े च शिवजयंतीच्यावेळी या मंदिरामध्ये अन्नदान व इतर कार्यक्रम घेतले जातात. मंडळाचे अध्यक्ष रवींद्र

ु ाकार घेतात. चेन्नई येथील शिवजयंतीच्या मिरवणक


कदम यासाठी आवर्जून यासाठी पढ ु ीची सरु
ु वात याच मंदिरापासन

केली जाते. अशारितीने छत्रपतीची कुलदे वता आणि त्यांची भवानीभक्त ही सर्वदरू पसरलेली होती हे च यावरून दिसून

येते.

You might also like