You are on page 1of 4

घोड्याचा इतिहास असा दौडत गेला

मानवाच्या उत्पत्तीपासन
ू उपयोगी असणार्‍या प्राण्यात घोडा अग्रभागी असन
ू लाखो

वर्षापासून त्याचे अस्तित्व आहे . ऋग्वेदातील माहिती त्याच्या प्राचीनत्वासाठी पूरक ठरते.

त्यानस
ु ार वसन
ू ामक दे वांनी घोड्याला सर्या
ू पासन
ू तयार केले, वायन
ू े त्याला रथाला जंप
ु ले, गंधर्वांने

लगाम धरला तर इंद्र प्रथम त्याच्यावर आरुढ झाला. कोलमुंडा भाषेत घोड्याला घोटक,

तामिळमध्ये कुडीरै , संथालीत सादोम म्हणतात. घोड्याचे शास्त्रीय नाव ‘ईक्कस कॅबॅलस’ असन


घोडेविज्ञानाला हिप्पोलॉजी म्हटले जाते. ऋग्वेदात घोडदळाला आजी म्हटलेले आहे . जन्मताच

सिंगराला दोन दाढा असतात. 210 हाडाचा सांगाडा असलेल्या या प्राण्याचे आयुर्मान 25 ते 30

वर्षे असून दाताच्या रं गावरूनच घोड्याचे वय कळते. घोडीलामात्र सुळे दात नसून डोळ्यावरील

वाढत्या केसावरून व कपाळावरील हाडावरून तिचे वय कळते. घोड्याला 40 तर मादीला 36 दात

असतात. दातावरून 1 ते 2 वर्षाच्या घोड्याला नाकन, 2 वर्षाच्या दव


ु ल, 4 वर्षाच्या चौसन तर 5

वर्षाच्या पक्व घोड्याला शुरुपंज म्हणतात. पथ्ृ वीवरील सर्व प्राण्यात घोड्याचे डोळे मोठे असून

360 डिग्रीत ते फिरवू शकतो. इंग्रज घोड्याला स्टॅ लिन तर मादीला मेर म्हणतात.

भारतातील घोड्याचे मख्


ु य प्रकार म्हणजे काठे वाडी, राजस्थान परिसरातील या घोड्याचा

रं ग तांबस
ू करडा असून त्यावर पांढरे ठिपके असतात. मारवाडी घोडा जोधपूर भागात असून तो

फिक्कट किंवा गडद तांबस


ू असतो, याचा सर्क शीत वापर होतो. मणीपरु ी घोडा लष्कर, पोलो आणि

शर्यतीसाठी वापरला जातो. यासोबतच भुतानी, स्पिती, चुमुरती आणि थरोब्रेड हे प्रकार असून

महाराष्ट्रात भिमथडी आणि गंगथडी जातीचे घोडे वापरले जायचे. मराठी माणसात अबलक म्हणजे

मुख्य रं ग पुर्णपणे पांढरा किंवा काळा असून त्यावर काळे किंवा पांढरे चट्टे असतात. तर

पंचकल्याण घोड्याचा रं ग पुर्णपणे काळा असून त्याचे गुडघ्यापासून पाय पांढरे तसेच कपाळावर

पांढरा ठिपका असतो.


दे वापासून मानवापर्यंत घोड्याचा शौक असून इंद्राचा घोडा उच्चे :श्रवस, श्रीकृष्णाच्या रथाला

शैद्य, सुग्रीव, मेघपूज्य आणि बलाहक नावाचे घोडे होते. मराठ्यांच्या कुलदै वतांना घोड्यावरचे दे व

म्हटले जाते. मस्लि


ु म कथेत बर्रा
ु ख तर बायबलमध्ये इक्कस घोड्याचा उल्लेख ये तो. गौतम

बुद्धाचे घोडे कंथक, सिकंदरचा बुसेफॅलस, शिवरायांकडे कृष्णा घोडा आणि कल्याणी घोडी,चालुक्य

विक्रमादित्यांचा घोडा चित्रकंठ, राणाप्रतापचा चेतक, दर्गा


ु दास राठोडचा अर्बुद, बाजीरावाचा सारं गा,

राणी लक्ष्मीबाईचा पवन आणि बादल, नानासाहे ब पेशव्यांचा वारू, माधवरावांचा मतवाली तर

नारायणराव पेशव्यांचा चंद्रकला याप्रमाणे घोडे सांगता येतील. मुस्लिम राज्यकर्त्यांनी भारतावर

जे राज्य केले तेच मळ


ु ी घोडदलाच्या बळावर, म्हणून शिवरायांच्या फौजेत घोडदळाला विशेष

महत्व असून त्याच्या प्रमुखाला सरनोबत म्हटले जायचे. छत्रपतीबरोबरच नेताजी पालकर,

प्रतापराव गुजर, हं बीरराव मोहिते असे अनेक तरबेज घोडेस्वार स्वराज्यासाठी दौडत राहिले.

स्वराज्यात स्वत:चा घोडा असेलतर तो शिलेदार आणि सरकारातला असेलतर बारगीर म्हटले

जायचे. मोगलांच्या घोड्याला संताजी धनाजी पाण्यात दिसायला लागले हे सर्वज्ञात आहे . तर

घोड्यावरील सरकारी अधिकाराच्या अंगरक्षकाला खासदार, टे हाळणीच्या घोड्यास हुस्सार तर

राखीव घोडदलास भालाईत म्हटले जायचे. गनिमी कावा शब्द घोड्यापासन


ू च आला, घोड्याने

अचानक घेतलेल्या गिरकीला कावा आणि गनिम म्हणजे शत्रू असा त्याचा अर्थ होतो.

औरं गजेबाच्या फौजेत घोड्याला तपासणे आणि डागण्याकरिता दाघ व तश्हीहा नावाचे खाते होते.

तर शिवरायांच्या फौजेत घोड्यांच्या मागील चौकावर यू आकाराचा डाग दिला जायचा.

वायूप्रकोपासाठी ही डागणी दिली जायची.

घोड्याच्या शरिरावर एकंदर 96 भोवरे असून त्यातील 20 शभ


ु तर 76 अशुभ मानले

जातात. कपाळावर एक भोवरी शभ


ु , दोन भोवरीला चिमुट म्हणतात विशेष आक्षेप नाही,

चिमटीवर तिसरा भोवरा बासिंग शभ


ु , तीन भोवरे एकाखाली एक म्हणजे उतरं ड हे फलदायी तर
कपाळावरच्या भोवर्‍या विखुरलेल्या असतीलतर ते बेडाफोड जे अशभ
ु , दोन डोळ्याच्यामध्ये

खालील बाजूची भोवरी असुढाळ तर वरची भोवरी गद्धभोवरी यापण अशुभ मानतात. दाढे खालील

दोन भोवरी दाढसांखळ असन


ू ती शभ
ु . गालावर भोवरी गालगोम शभ
ु , कानावर भोवरी कर्णमळ

शभ
ु , गळ्याखाली कंठावर भोवरीला दे वमन म्हणतात ती अतिशय शुभ मानतात, तंगाखाली लांबट

भोवरा म्हणजे गोम जो अशभ


ु , पढ
ु च्या पायाच्या गढ
ु घ्याखालील भोवरीला खंट
ु ीगाढ जी शभ
ु ,

कपाळावर तुटक पांढरा पट्टा म्हणजे तुटपट्टा जो शभ


ु , कपाळावरील पांढर्‍या पट्टय
् ावर लाल केस

असतीलतर त्याला दलभंजन म्हणतात जे अशभ


ु , एकरं गी घोड्याचा एकच पाय पांढरा असेलतर

तो अरजल असून विशेषत: मुस्लिम याला फार अशुभ मानतात. एकआंडी घोडे शुभ मानतात.

शनिकृपेसाठी घोड्याच्या नालाची पज


ू ा करतात, इंग्लंड आणि जर्मनीत स्वप्नात घोडे आल्यास

मत्ृ युसूचक समजतात.

घोड्यावरून काही शब्द कायमस्वरूपी प्रचलित झाले. घोड्याला तोंड वर करता येऊ नये

म्हणून बांधलेला बंद म्हणजे जेरबंद, घोड्यास्वाराचा रात्रीचा पहारा म्हणजे छबिना, घोडेस्वाराची

पलटण म्हणजे रिसाला, घोड्यावर बसण्याची गादी म्हणजे गाशा, त्याचे उधळणे म्हणजे तफ
ु ान.

घोडे सांभाळणारा तो मोतदार तर शिकविणारा चाबूकस्वार. भरचौक, सात्रक, खुदकी, छात्रक,

चवडचाल या त्याच्या चाली आहे त. गाडीला एकामागे एक असे दोन घोडे जोडले तर त्याला टन्डम

म्हटले जायचे त्यावरूनच टमटम शब्द आला असावा.

घोडा आणि योध्याचे नातेही अनोखे आहे . राणाप्रतापचा जीव वाचविणारा चेतकघोडा

अजरामर झाला. घोड्याच्या रिकीबीत पाय अडकल्यामुळेच शहाजीराजेंचे निधन झाले तर

शिवरायांना झालेला अॅन्थ्रोफॉक्स नावाचा आजारही घोड्याच्या संसर्गामुळेच झाला, पानिपतात

भाऊसाहे ब पेशवे हत्तीवरून उतरून घोड्यावरून लढायला लागला हे ही पराजयाचे एक कारण ठरले .

संताजी धनाजीची दहशत त्यांच्या उत्तम घोडेस्वारीचा भाग होता. घोड्यावर स्वार असणारा
पूर्णाकृती पुतळा बसविताना योद्धयाचे मरण जर युद्धभूमी सोडून जखमी अथवा आजाराने झाले

असेलतर पुतळ्याच्या घोड्याचा एक पाय दम


ु डलेला दाखवितात. उदा. राणाप्रताप, छत्रपती

शिवाजीमहाराज. आणि योद्धयाचे मरण जर यद्ध


ु भमू ीत झाले असेलतर त्यावेळी घोड्याचे पढ
ु ील

दोन्ही पाय हवेत दाखवितात, झाशीची राणी वगैरे.

घोडदळाच्या ताकदीची जाणीव झाल्यानेच इंग्रजांनी पुनाहॉर्स नावाने घोडदलाची फलटण

काढली. घोड्यावरून अनेक म्हणीही आल्या. उदा. घोडामैदान जवळच आहे , वरातीमागन
ू घोडे,

घरचे झाले थोडे आणि व्याहयाने धाडले घोडे, कागदी घोडे नाचविणे, घोडं मेले ओझ्याने आणि

ं रू मेले येरजार्‍याने, गंगेत घोडे न्हाले. यावरून घोड्याची उपयुक्तता समजते. प्राचीनकाळी
शिग

राजसूय यज्ञासाठी पांढराशभ्र


ु आणि ज्याच्या कानावर एक ठिपका आहे असा घोडा वापरत. जग

जिंकण्याची अपेक्षा बाळगताना यज्ञ संपल्यानंतरमात्र तोच घोडा यज्ञाला समर्पित करून त्यालाच

प्रसाद म्हणून खात होते. त्यावरून घोडा जातो जिवानिशी आणि खाणारा म्हणतो वातट ही म्हण

पडली. बदलत्या जगातही अकलज


ू आणि सारं गखेडा येथे घोड्याच्या मोठ्या यात्रा भरतात, ज्यात

30 लाखापर्यंत किंमतीचा घोडा पाहायला मिळतो. घोड्याच्या ताकदीवरूनच जेम्सवॅटने शक्तीच्या

एककाला हॉर्सपॉवर म्हटले. शब्दमर्यादे मुळे लेखाची घौडदौड ही इथेच आवरणे क्रमप्राप्त आहे .

You might also like