You are on page 1of 5

1.

Parrot : झाडाच्या ढोलीत अथवा भोकांत, घरांच्या भिंतीमधील भोकांत अथवा कधीकधी खडकांच्या
कपारीत पोपट घरटी करतात. बहुतेक जाती घरट्याकरिता बाहे रच्या कोणत्याही पदार्थाचा उपयोग करीत
नाहीत. मादी भोकाच्या आतल्या मोकळ्या जागेत अंडी घालते. काही जाती तर वाळवीच्या वारुळात अंडी
घालतात. ऑस्ट्रे लियातील रानटी बजरीगार मात्र ढोलीत किं वा भोकात थोडेसे गवत घालून घरटे बनवितात.
अर्जेंटिनातील एका जातीचे हिरवे पोपट प्रजोत्पादनाच्या काळात झाडांवर मोठी सामाईक घरटी बांधतात.
वसाहतीच्या स्वरूपाच्या या घरट्यात प्रत्येक जोडप्याकरिता एक स्वतत्र खोली असते. सर्वसाधारणपणे तीन
आठवड्यानंतर अंडी फुटून पिल्ले बाहे र पडतात. ती केवळ मासांच्या गोळ्यांसारखी असून दब
ु ळी असतात.
आईबाप आपल्या अन्नपट
ु ातले अर्धवट पचलेले शाकान्न बाहे र ् काढून त्यांना भरवितात. पोपट संघचारी
(गटाने एकत्र राहणारे ) असून सगळ्या पक्ष्यांमध्ये अतिशय गोंगाट करणारे पक्षी आहे त. त्यांचा आवाज
कर्क श, किं चाळल्यासारखा आणि कर्णकटू असतो; परं तु पाळून शिकविल्यानंतर यांच्या कित्येक जाती
माणसासारखे शब्दोच्चार करु शकतात इतकेच नव्हे , तर दोनचार वाक्ये बोलू शकतात. यामळ
ु े पष्ु कळ
लोक पोपट पाळतात. आफ्रिकेतील काही जातींचे पोपट (उदा., सिटॅ कस एरिथॅकस) फार स्पष्ट शब्दोच्चार
करतात. इतकेच नव्हे , तर निरनिराळ्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करतात.
पोपट ३० ते ४० वर्षे जगतात. काही पोपट ८० वर्षे जगल्याचीही नोंद आहे .

2. Cock: जगात सर्वत्र मोठ्या संख्येने असलेला पाळीव पक्षी. प्रामख्


ु याने मांस आणि अंडी
मिळविण्यासाठी हे पक्षी जगभर पाळले जातात. पक्ष्यांच्या फॅजिअ‍ॅनिडी कुलात त्याचा समावेश होत असून
शास्त्रीय नाव गॅलस डोमेस्टिकस आहे . गॅलस गॅलस या रानटी कोंबड्यांच्या जातीपासून ही पाळीव जात
निर्माण झाल्यामुळे या प्राण्याचे नाव गॅलस गॅलस डोमेस्टिकस आहे . कोंबडा म्हणजे नर (कॉक) आणि
कोंबडी म्हणजे मादी (हे न) असे म्हटले जाते.
इतर सर्व पक्ष्यांप्रमाणे कोंबड्याला डोके, मान, चोच, पंख आणि पाय हे मख्
ु य अवयव असतात. यांखेरीज
याच्या शरीरावर खास मांसल भाग (अवयव) वाढलेले असतात. याच्या डोक्यावर लालभडक तरु ा असून तो
एका बाजूस पडलेला असतो. कोंबड्याच्या डोक्यावर सरळ, उभा लालभडक तुरा असतो,  तर चोचीच्या
खाली लालभडक कल्ला असतो. यांमळ ु े हा पक्षी इतर पक्ष्यांहून वेगळा दिसतो. पर्ण
ू वाढ झालेल्या
कोंबड्याचे वजन ०.५ ते ५ किग्रॅ. असते. इतर सर्व पक्ष्यांप्रमाणे याच्या अंगावर पिसे असतात. पायाचा
खालचा भाग वगळता पूर्ण शरीर पिसांनी झाकलेले असते. थंड हवामानात पिसांमुळेच याचे शरीर उबदार
राहते.

3. Peacock: मोर कुक्कुटवर्गीय पक्षी आहे . या आकर्षक रं गाच्या सुंदर पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षी


म्हणून मान्यता दिली आहे . विणीच्या हं गामात मोर नराला पिसारा असतो व विणीचा कालावधी संपताच
तो झडून जातो. जंगलात वावरणाऱ्यांना ही पिसाऱ्याची पिसे सापडू शकतात. मोराचा विणीचा हं गाम
पावसाळ्याच्या सुरुवातीला असतो. त्यामुळे साधारणपणे मे महिन्यापासून ते जून अखेरीपर्यंत लांबसचक
पिसारा असणारे . मोराचा नाच हा प्रेशणीय असतो.

मोराचे एकूण मुख्य तीन प्रकार आढळतात; दोन आशियाई प्रजाती, भारतीय उपखंडातील भारतीय
मोर आणि दक्षिणपूर्व आशियातील हिरवा मोर; तसेच आफ्रिकेच्या काँगो खोऱ्यातील आफ्रिकन मोर.

महाराष्ट्रात बऱ्याच गावांजंलगत मोरांचा वावर आढळतो. मोर हा पक्षी सरस्वती दे वीचे वाहन आहे अशी
मान्यता आहे . अर्थात अनेक प्राण्यांना विशिष्ट दे वतांशी वा दै वतांशी जोडून त्यांचे जतन केले जावे व
नैसर्गिक जीवसाखळी अबाधित राखावी असा विचार त्यापाठी असावा. या श्रद्धेपोटी गावकरी मोरांना
[१]
नेहमी खाद्य व पाणी दे त असतात. पुणे जिल्ह्यात शिरूर तालुक्यातल्या 'मोराची चिंचोली'  नावाच्या
गावात मोरांच्या झुंडी आढळतात. इतर क्षेत्रातही मोर मोठ्या प्रमाणात आढळतात.सोलापूर जिल्ह्यातील
काही गावांमध्ये मोरांचा मक्
ु त संचार आहे .झंड
ु ीने आढळतात तसेच मोरांसाठी प्रसिद्ध असलेले बीड
जिल्ह्यातील नायगाव मयरु अभयारण्य हे भारतातीत/महाराष्ट्रातील एकमेव मयुर अभयारण्यात भरपरु
प्रमाणात मोर अढळतात व या मोरांचे संरक्षण व संगोपणासाठी वन्यजीव विभागा मार्फ त विविध उपक्रम
द्वारे मोरांच्या वाढीसाठी दिवसरात्र प्रयत्न सरू
ु आहे त.

4. Owl: ऑउल्स क्रिग्निफोर्म्सच्या क्रमात आहे त, ज्यामध्ये प्रामुख्याने एकटे व रात्रीच्या जवळजवळ 200
प्रजातींचा समावेश आहे जो प्रत्यक्ष दृश्याद्वारे , मोठ्या, विस्तत
ृ डोक्यावर, दरू बीन दृश्यासाठी, बायनॉरल
ऐकणे, तीक्ष्ण ताकद आणि मूक फ्लाइटसाठी अनुकूल पंख. अपवादांमध्ये दप
ु ारचे उत्तरी हॉक-उल्लू आणि
ग्रॅग्रीअस बोरोइंग उल्लू समाविष्ट आहे . घुबड हा शिकारी पक्षी वर्गातील प्रमुख पक्षी आहे . घुबडे
बहुधा एकाकी आणि निशाचर असतात (अपवाद:बरोविंग घब
ु ड). घब
ु डाच्या जवळजवळ २०० प्रजाती आहे त.
घुबडे प्रामुख्याने सस्तन प्राणी, कीटक आणि पक्षी यांची शिकार करतात तरी काही
प्रजातींनी मासे मारण्यात कौशल्य प्राप्त केले आहे . या पक्ष्यांचा अधिवास स्मशानात सर्वाधिक असतो.
कारण ढोली असलेली, स्थानिक प्रजातींची मोठी झाडं तेथे असतात. त्यांचे डोळे लाल गडद असतात
म्हणून लोक भितात. तसेच त्यांच्याबद्दल अंधश्रद्धा पसरवतात. घुबडाला मारण्याचे प्रकार होतात. घुबड हे
अशुभाचे प्रतीक आहे , ही अंधश्रद्धा थांबवली पाहिजे.

5. Pigeon: कबूतर हा शांत स्वभावाचा पक्षी आहे . कबूतर सर्व ठिकाणी वेगवेगळ्या आकाराचे
असतात. कोलंबिडे कुटुंबातील पक्ष्यांच्या शेकडो प्रजातींपैकी (गण कोलंबीफॉर्मेस) लहान आकाराच्या
पक्ष्याला कबत
ू र म्हणतात आणि मोठ्या पक्षाला कबत
ू र म्हणतात. याला अपवाद म्हणजे 'शांती कपोत'
म्हणून ओळखले जाणारे पांढरे घरगुती कबूतर. कबूतर थंड प्रदे श आणि दर्ग
ु म बेटांशिवाय जवळजवळ
संपूर्ण जगात आढळतात. कबूतर सौम्य, पंख असलेले, लहान चोचीचे पक्षी आहे त. त्यांची चोच आणि
कपाळ यांच्यामध्ये त्वचेचा पडदा असतो. सर्व कबत
ू र विचित्र पद्धतीने त्यांचे डोके पढ
ु े मागे
हलवतात. त्यांच्या लांब पंख आणि मजबूत उड्डाणाच्या स्नायूंमुळे ते मजबूत आणि कार्यक्षम फ्लायर्स
आहे त. ते एकपत्नी आहे त. त्यांचे आयष्ु य काही दिवसांचे असते. भारतात कबुतरांच्या ३४ पेक्षा जास्त
जाती आढळतात . निळे  , रॉक कबत
ू र, हिरवे रॉयल कबत
ू र, जंगली आणि हिरवे कबत
ू र या त्याच्या
सामान्य प्रजाती आहे त . हिमालयातील स्नो कबूतर , तिबेट पठारावरील पर्वतीय कबूतर आणि पर्वतीय
प्रदे शातील रॉयल आणि जंगली कबूतर, अंदमानचे जंगली कबूतर, निकोबारचे पाईड इम्पीरियल कबूतर,
पिवळे कबत
ू र आणि निकोबारी कबत
ू र आता या पथ्
ृ वीवर दर्मि
ु ळ झाले आहे त.

6. Crow: कावळा हा एक काळ्या रं गाचा सहज आढळणारा पक्षी आहे . भारतीय कावळ्याचे मुख्य दोन
प्रकार आहे त,एक गाव कावळा आणि दस
ु रा डोमकावळा.
कावळा हा रं गाने काळा असतो. कावळा माणसाच्या वसाहतीजवळ राहणारा पण घरात न येणारा, परिचित
पक्षी आहे . हा पक्षी चलाख, सावध, चपळ खाण्यासाठी विशिष्ट आवड नसलेला, मत
ृ भक्षी आहे .

गह
ृ कावळा हा सम
ु ारे १७ इं. (४२ सें. मी.) आकाराचा,मानेजवळचा भाग राखाडी रं गाचा तर उर्वरीत काळ्या
रं गाचा एक पक्षी आहे . नर-मादी दोन्ही दिसायला सारखेच असतात. तर संपूर्ण काळ्या रं गाच्या
कावळ्याला डोमकावळा असे म्हणतात. तसेच याला हुशार पक्षी म्हणून ओळखतात.कावळ्याला दोन डोळे
असतात. हिंद ू संस्कृतीत माणसाच्या मत्ृ यूपश्चात तेराव्या दिवशी व प्रत्येक श्राद्धाच्या वेळेस कावळ्याला
केळ्याच्या पानात जेवण दे ण्याची प्रथा आहे . तसेच रोजच्या अन्नातील एक घास कावळ्यासाठी काढून
ठे वण्याची प्रथा आहे .यास काकबली असे म्हणतात. ज्ञानेश्वरीत कावळ्याचा उल्लेख आहे . पैं चंद्रोदया
आरौते | जयांचे डोळे फुटती असते | ते काउळे केवी चंद्राते |ओळखती ||४.२४ || तसेच पैल तो गे काऊ
कोकताहे सुद्धा ज्ञानेश्वरांची रचना प्रख्यात आहे . व्यकंटे श स्तोत्रात 'काकविष्ठे चे झाले पिंपळ ' असे म्हटले
आहे . कारण पिंपळ, वड यांसारख्या झाडांची फळे कावळे खातात. त्यांच्या विष्ठे तन
ू त्यांच्या बीया बाहे र
पडतात आणि त्या रुजतात. 'कावळा म्हणे मी काळा , पांढरा शुभ्र तो बगळा दिसतसे' ही आठवणीतील
कविता एके काळी शालेय क्रमिक पुस्तकात होती. कावळ्याच्या घरटे बांधाण्याच्या जागेवरून वर्षात होणाय्रा
पावसाचा अंदाज बंधाला जातो.

7. Duck: बदक हा एक उभयचर पक्ष्यांचा वर्ग आहे . हे पक्षी पाणी आणि जमीन दोन्ही ठिकाणी संचार
करू शकतात.बदक हा पक्षी ॲनॅटिडी पक्षिकुलाच्या ॲनॅटिनी या उपकुलात याचा समावेश केलेला आहे . या
उपकुलात सुमारे १२० जाती असून दक्षिण ध्रुव-प्रदे श सोडून जगाच्या निरनिराळ्या भागांत त्या आढळतात.
बदक हा पाणपक्षी आहे . काही जाती केवळ गोड्या पाण्याच्या जवळपास राहणाऱ्या असतात, तर काही
केवळ समुद्री असून त्यांची वीण नदीमुखाजवळ किं वा समुद्र-किनाऱ्यावर होते.

बदक हं सापेक्षा लहान आणि शरीराने स्थल


ू असते. मान आणि पाय आखड
ू असतात. पाय शरीराच्या
बऱ्याच मागच्या बाजूला असतात. त्यांचा रं ग पिवळा असून त्यांच्यावर पुढे तीन व मागे एक बोट असते;
पुढची बोटे पातळ कातडीने जोडलेली असतात. चोच मोठी, रुं द, चापट व पिवळी असते; ती पातळ त्वचेने
झाकलेली असते. चोचीच्या दोन्ही कडांवर बारीक दात असतात.सामान्यतः नर व मादी यांच्या शरीराची
रं गव्यवस्था वेगळी असते. पाळीव बदकांचा रं ग सामान्यपणे पांढरा असतो;पण काहींचा काळा किं वा
तपकिरी असून त्यात हिरवट चमक असते; काहींचे धड पांढरे पण डोके व मान काळी असते. अंगावरील
पिसे अतिशय दाट असून शेपटीच्या बुडाशी असलेल्या तेलग्रंथीचा स्त्राव बदके आपल्या चोचीने पिसांना
नेहमी चोपडतात; त्यामुळे पाण्यात पोहताना ती पाण्याने भिजत नाहीत. शरीरावरील कातडीला चिकटून
सगळ्या शरीरावर मऊ पिसांचे आवरण असल्यामुळे थंडीपासून निवारण होऊन शरीराची उष्णता कायम
रहाते. पिसे दर वर्षी गळून पडून नवी येतात.

8. Cuckoo: उन्हाळ्याची चाहूल लागताच सर्वत्र कोकीळ पक्ष्याचा कुहू-कुहू-कुहू आवाज ऐकू येतो. हा
आवाज. हिवाळ्याची सरु
ु वात होत असता मात्र हा एकदम गडप झाल्यासारखा वाटतो.हा नरपक्ष्याचा आवाज
असतो. याच्या मादीचा आवाज किक-किक-किक असा असतो. हा पक्षी आपले एकुलते एक अंडे
कावळ्याच्या किं वा डोमकावळ्याच्या घरट्यांत घालतात.

वर्णन

साधारणपणे कावळ्याएवढा (१७ इंच) आकारमानाचा हा पक्षी असन


ू शेपटी लांब असते. नराचा मख्
ु य रं ग
काळा, डोळे गडद लाल रं गाचे चोच फिकट पोपटी रं गाची असून मादीचा मख्
ु य रं ग गडद तपकिरी व
त्यावर पांढरे -बदामी ठिपके-पट्टे असतात. याच्या किमान तीन उपजाती आहे त

वसतिस्थान

कोकीळ पक्षी मुख्यत्वे झाडावरच राहणारा (Arboreal) असून तो दाट पाने असलेल्या झुडपी जंगलात,
बागेत, शेतीच्या भागात राहणे पसंत करतो.

खाद्य

कीटक, फुलपाखरे , सुरवंट, फळे , मध पक्ष्याची अंडी हे यांचे खाद्य आहे . म्हणजेच हे पक्षी मांसाहार व
शाकाहारही पाळतात.

9. Eagle: हिंद ू मान्यतेनुसार, गरुड हा पक्ष्यांचा राजा आणि भगवान विष्णूचे वाहन आहे . गरुड हा


प्रजापती कश्यप आणि त्याची पत्नी विनता यांचा मल
ु गा आणि अरुणचा धाकटा भाऊ आहे . त्रेतायग
ु ात
गरुडाने रामाचा धाकटा भाऊ आणि राजा दशरथाचा दस
ु रा मुलगा भरत म्हणून अवतार घेतला. गरुड
आणि अरुण यांचे वर्णन गरुड पक्षी म्हणून प्रसिद्ध आहे

गरुडाच्या आईचा शाप [ संपादन ]

दक्ष प्रजापतीला 84 मुली होत्या, त्यापैकी 17 मुलींचे लग्न महर्षी कश्यप यांच्याशी झाले होते, त्या सतरा
पत्नींपैकी कद्र ू आणि विनता कश्यपच्या होत्या .नावाच्या दोन बायकाही होत्या. वरदानाचा परिणाम म्हणून
कद्रन
ू े एक हजार अंडी दिली आणि विनताने दोन अंडी दिली. कद्रच
ू ी अंडी फुटल्यावर तिला एक हजार
सर्पपत्र
ु मिळाले. पण तोपर्यंत विनताची अंडी उबली नव्हती. घाईघाईत विनताने अंडे फोडले. त्यातन
ू बाहे र
येणारे मूल अरुण होते आणि त्याचे वरचे अंग पूर्ण होते पण खालचे अंग तयार होऊ शकले
नव्हते. मुलाला राग आला आणि त्याने आईला शाप दिला की आई! तू कच्चं अंडं मोडलंस म्हणून तुला
पाचशे वर्षं त्याच बहिणीची आणि बायकोची दासी म्हणन
ू जगावं लागेल जिचा तू खप
ू तिरस्कार
करतोस. दस
ु री अंडी स्वतःच फुटू नये याची काळजी घ्या. त्या अंड्यातून एक अतिशय तेजस्वी मूल आणि
माझा धाकटा भाऊ जन्माला येईल आणि तो तुम्हाला या शापातून सोडवेल. असे म्हणतअरुण नावाचा
मुलगा आकाशात उडाला आणि सूर्यनारायणाच्या रथाचा सारथी झाला .

10. Sparrow: भारतात सर्वात जास्त संख्या असणारा पक्षी म्हणन


ू  चिमणी (नर- चिमणा, मादी-
चिमणी) परिचयाची आहे . नर चिमणीच्या कपाळाचा, शेपटीवरचा आणि पार्श्वभाग राखाडी, कानाजवळ
पांढरा, चोच काळी, कंठ ते छातीच्या भागावर मोठा काळा भाग, डोक्यापासून खाली पोटाचा भाग पांढरा
असून पाठीवर तपकिरी काळ्या तुटक रे षा असतात. मादी मातकट तपकिरी रं गाची असून तिच्या अंगावर
काळ्या तपकिरी रं गाच्या तुटक रे षा असतात. तिची चोच फिकट तपकिरी रं गाची असते.तीला भारतात
तपकीर असेही म्हटले जाते.

हा पक्षी हिमालयाच्या २००० मी. उं चीपर्यंत, तसेच भारतभर सर्वत्र आढळतो .


तसेच बांगलादे श, पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमारसह इतरही दे शांत आढळतो. भारतात काश्मिरी आणि
वायव्यी अशा हिच्या किमान दोन उपजातीही आढळतात.

माणसाच्या अगदी जवळच राहणारा हा पक्षी असून कीटक, धान्य, मध, शिजवलेले अन्न, सुर्यफुलाच्या
बिया असे सर्व प्रकारचे खाद्य खातो. विणीचा हं गाम वर्षभर असू शकणारा पक्षी अशी ओळखही या
पक्ष्याची आहे . गवत, कापूस, पिसे, मिळतील त्या वस्तू वापरून घराचे छत, वळचणीच्या जागा, दिव्यांच्या
मागे, झाडांवर असे कुठे ही घरटे बांधतो. मादी फिकट हिरव्या पांढऱ्या रं गाची, त्यावर तपकिरी ठिपके
असलेली ४ ते ५ अंडी दे ते. अंड्यांच्या रं गात स्थानिक बदलही आहे त. नर-मादी घरटे बांधण्यापासून, अंडी
उबविणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे सर्व कामे मिळून करतात. चिमण्यांचे आयुष्य सहा महिने ते तीन
[१]
वर्षांपर्यंत असते. ज्ञात असलेली सर्वात वयस्कर वन्य चिमणी जवळपास दोन दशके जगली.  त्याचबरोबर
[२]
नोंद असलेली सर्वात वयस्कर कैदे तील चिमणी २३ वर्षे जगली.

चिमण्यांच्या बाबतीत अशी एक वदं ता आहे की, एखाद्या चिमणीला माणसाने पकडले आणि परत सोडले,
तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला त्यांच्यामधे घेत नाहीत व चोचीने मारतात किं वा तिला बहिष्कृत
[ संदर्भ हवा ]
करतात; प्रसंगी,जीव दे खील घेतात.

अलीकडे वाढत्या शहरीकरणामुळे वक्ष


ृ ांची तोड खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे .परिणामी चिमण्यांची संख्या
झपाट्याने कमी होत आहे . विशेषतः शहरांमध्ये मोबाईल टॉवर्समधून होणारे विद्युत ् चुंबकीय उत्सर्जन,
[३]
 आधुनिक प्रकारच्या घरबांधणी पद्धतीमुळे घरट्यांच्या जागांची अनुपलब्धता, अन्नाची अनुपलब्धता,
शहरांमधील वाढते प्रदष
ू ण तसेच शेतात होणारा रासायनिक खते व कीटकनाशक यांचा वापर यांसारख्या
[४][५]
अनेक कारणांमुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे .

You might also like