You are on page 1of 4

मराठ्यांच्या इतिहासातील नवीन संदर्भ

प्रा. डॉ. सतीश कदम

यशवंतराव चव्हाण महा. तुळजापूर

9422650044 satishkadam28@gmail.com

कु ठल्याही विषयात कधीच परिपूर्णता असूच शकत नाही. त्यातच आपण जेव्हा इतिहासाचा अभ्यास करतो त्यावेळी आपणास
असे दिसून येते की, एखादी नवीन सापडलेली चिटोरीसुद्धा मागचा संपूर्ण इतिहास बदलू शकते. त्यामुळे संशोधन ही एक अखंड चालणारी
प्रक्रिया आहे. संशोधनातून अनेक नवीन पैलू बाहेर येत असतात. मराठ्यांचा इतिहास त्याला अपवाद नाही. रोज अनेक नवीन कागद सापडत
असतात, नवीन ऐतिहासिक स्थळांचा शोध सुरूच असतो. अशा नवीन सापडलेल्या साधंनांचा आपण इतिहासात खुबीने वापर के ल्यास
संबंधित विषयाच्या संदर्भ साधनात नव्याने मोठी भर पडण्यास मदत होत असते.

मराठ्यांचा इतिहास म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या लढाया याप्रमाणे त्याला आपण मर्यादित करून
ठेवले आहे. परंतु आज आपणास त्यापुढे जावून त्यांच्या अनेकविध पैलूंचा विचार करावा लागेल. त्यातच आपणाकडे स्थानिक इतिहासाला
पाहिजे त्याप्रमाणात अभ्यासात नाही, त्यामुळे आपल्या जवळच्या अनेक बाबींचा उलगडा होत नाही. या संशोधन पेपरच्या माध्यमातून अशाच
काही नवीन संदर्भाचा आढावा घेऊन मराठ्यांच्या इतिहासात नवीन संदर्भाची भर घालण्याचा प्रयत्न के लेला आहे.

1. न्याहरीदेवीचा डोंगर

छत्रपती शिवरायांच्या नेतृत्वाखाली सेनापती प्रतापराव गुजर यांनी 3 आक्टोंबर 1670 १ साली सुरतेवर दुसर्‍यांदा सवारी के ली
होती. सुरतेची स्वारी करून त्याठिकाणाहून भरमसाठ लूट घेवून स्वराज्यात परत येत असताना शिवरायांचा मुक्काम हा नाशिक जिल्ह्यातील
दिंडोरी गावाजवळ पडला होता. याची बातमी मोगलांच्या फौजेला लागल्याने त्यांनी मराठ्यांच्या फौजेला चारही बाजूने घेरण्याची योजना
आखली होती.

शिवरायांचा मुक्काम यावेळी तेथील एका डोंगरावर पडलेला होता. शत्रू आपणाला चारही बाजूने घेरणार आहेत याची कल्पना
असूनही शिवाजी महाराज अगदी निश्चिंत होते. शिवरायांनी यासाठी अगोदरच आपली रणनीती आखल्याने त्यांनी आपल्या धोरणात कु ठलाही
बदल के ला नाही. शिवाजी महाराज रात्रभर त्या डोंगरावर थांबून होते. ज्या डोंगराला मोगलांनी घेरले होते त्यांच्या पाठीमागे मराठ्यांची फौज
तयार होती. त्यामुळे मोगलांचा नाईलाज झाला. त्यामुळे तेथून त्यांना काढता पाय घ्यावा लागला. मात्र शिवाजी महाराज ज्या डोंगरावर थांबले
होते, तेथे त्यांनी मुक्काम के ला, सकाळी न्याहरी के ली आणि त्यानंतर तेथून त्यांनी प्रस्थान के ले. एका रात्रीसाठी महाराज ज्या डोंगरावर थांबले
त्या डोंगराला “ न्याहरी देवीचा डोंगर ” असे म्हटले जाते. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी हे तालुक्याचे ठिकाण असून वणीची सप्तश्रुंगी देवीचे
ठिकाण येथून अगदी जवळच आहे. त्यानुसार आजही या डोंगरावर एक देवीचे मंदिर असून अनेक भक्तगण दर्शनासाठी येत असतात.

2. रामराजेंचे तुळजापूर आणि पानगावातील वास्तव्य


छत्रपती शाहूंच्या निधनानंतर मराठ्यामध्ये ज्यावेळी गाडीचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळी वेगवेगळे तर्क वितर्क लावले जाऊ
लागले. त्यातून शाहूराजांना मुलगा नसल्याने वारसाविषयी अनेक खलबते होवू लागली. शाहूंच्या पत्नीची ईच्छा होती की, आपल्याच
नात्यातील कोणालातरी दत्तक घेवून मराठ्यांची गादी पुढे चालवावी, त्यानुसार पुढे हालचाली सुरू झाल्या. अशावेळी महाराणी ताराराणी यांनी
सातरच्या दत्तक विधान राजकरणात उडी घेतली. त्यानुसार ताराबाईनी सर्वांना समजावून सांगितले की, आपल्या घरातील वारसदार असताना
बाहेरील मुलगा घेण्याचे कारण काय ?

ताराबाईंच्या या उत्तराने सर्वचजण अगदी चक्रावून गेले. त्यांनी सांगितले की, आपला मुलगा दुसरे शिवाजी यांचा मुलगा रामराजे
अजूनही जीवंत असून कोल्हापूरच्या गादीवर बसणारे तारबाईंच्या सवत राजसबाईचा मुलगा दुसरे संभाजी आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई
यांच्यापासून त्याच्या जीविताला धोका असल्याने आपणच त्यांना आपली नात दर्याबाई निंबाळकर यांच्याकडे पानगाव वैराग ( ता. बार्शी जि.
सोलापूर ) याठिकाणी ठेवलेले आहे. त्त्यानुसार सातारा गादीवर छत्रपती म्हणून बसणारे रामराजे यांना कोणालाही न कळता तुळजापूरच्या
नारोजी भुते कदम यांच्या हवाली के ले. वास्तविक पाहता त्यावेळी रामराजेंचे वय अतिशय कमी म्हणजे आठ दहा वर्षाचे होते. ताराबाईंचा आदेश
मानून तुळजापूरच्या नारोजीबाबांनी या भावी छत्रपतींचा जिवापाड सांभाळ के ला. तुळजापूरपासून पानगाव हे अगदी जवळ म्हणजे 25 -30
किमी वर असल्याने रामराजे कधी तुळजापूर तर कधी पानगाव याठिकाणी इ. स. 1745 ते 1750 असे पाच वर्षे मुक्कामाला होते.२ पुढे
सर्वानुमते सल्लामसलत होवून रामराजे यांना सातारच्या गादीवर छत्रपती म्हणून बसविण्यात आले. याच छत्रपती रामराजेंच्या काळातच 1761
साली मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यात पानिपताचे तिसरे युद्ध झाले. आजही तुळजापूरातील मुख्य मंदिराच्या समोर भगवतीबाईंची
विहीर असून रामराजे राहिलेला वाडा कोल्हापूर संस्थानच्या ताब्यात असून पानगाव येथील अष्टकोनी हत्ती तलाव छत्रपतीच्या वास्तव्याच्या
पावूलखुणा सांगत आजही अतिशय मजबूत स्थितीत आहे. इतिहासात हा संदर्भ दुर्लक्षित राहिलेला आहे.

3. अफजलखानाच्या पत्नीच्या 64 कबरी

अफजलखान हा विजापूरच्या आदिलशाही दरबारातील एक बलशाही सरदार असून तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत
झालेल्या प्रतापगडच्या युद्धामुळे३ प्रकाशझोतात आला. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशाही दरबारातून
अफजलखानाची नियुक्ती करण्यात आली. मराठ्यावर चालून येण्यासाठी तो विजापूरातून निघाला. तत्पूर्वीच त्याला आपल्या भविष्याची चाहूल
लागली होती. शिवरायासोबत होणार्‍या युद्धात आपले बरेवाईट झालेतर पाठीमागे आपल्या 64 बायकांचे काय होईल ? ही भीती त्याच्या मनात
घर करून उभी राहिली होती. त्यामुळे आपल्या पाठीमागे त्यांची कु चंबणा होऊ नये म्हणून त्या सर्व 64 बायकांना जवळच असणार्‍या विहिरीत
बुडवून मारले. व त्याच्याच बाजूला त्यांच्या समाध्या बांधण्याचा आदेश देण्यात आला. आजही आपण विजापूरात गेलो म्हणजे शहरापासून 5
किमी अंतरावर हा भाग पाहण्यास मिळतो. त्याला साठ कबर नावाने ओळखले जाते.

1880 साली भारतीय पुरातत्व खात्याने हेंरी कझन यांच्या नेतृत्वाखाली सर्वेक्षण करून याची माहिती उपलब्ध करून देण्यात
आली. विशेष म्हणजे त्यावेळी काढण्यात आलेली छायाचित्रे आजही आपणास British Library त पाहण्यास उपलब्ध होतात. विजापूरात
आल्यानंतर देश परदेशातील या ठिकाणाला भेट देत असतात. परदेशी लोक या ठिकाणाला Dark tourists Spot ४ म्हणतात. अगदी
अलीकडे The Hindu ५ या दैनिकाने 18 जानेवारी 2013 रोजी याविषयी माहिती प्रसिद्ध के लेली आहे.
मी स्वत: संबंधित स्थळाला भेट देऊन याविषयी माहिती करून घेतली असता त्या परिसरात एका मोठ्या चबुतर्‍यावर
व्यवस्थितपणे एका ओळीत या कबरी आपणास पाहण्यास मिळतात. तेथील गाईडच्या सांगण्यानुसार या कबरी 63 असून खानाच्या एकू ण 64
बायकापैकी एक बाई तेथून पळून जाण्यात यशस्वी झाली. प्रत्यक्षात या भागाला 60 कबर म्हणूनच ओळखले जाते.

4. शरीफजीराजांची भातोडी गावातील समाधी

भोसले घराण्याचा इतिहास छत्रपती शोवरायांच्या दैदीप्यमान यशाने सर्वमुखी झालेला आहे. तत्पूर्वी त्यांच्या पूर्वजांनीही
तेवढ्याच तोलामोलाची कामगिरी के लेली आहे. त्यानुसार शहाजी आणि शरिफजी हे दोघे भाऊ नगरच्या निजामशाहीकडू न लढत असताना
मोगल आणि आदिलशाहाच्या संयुक्त फौजेने महमद लारी६ याच्या नेतृत्वाखाली अहमदनगरवर आक्रमण के ले. या संयुक्त फौजेचा मुक्काम नगर
जवळच्या भातोडी गावाजवळ एका तळ्याखाली पडलेला असताना मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली शहाजी आणि शरीफजीराजांनी गनिमी
काव्याचा वापर करत भातोडी गावच्या वरच्याबाजूला तलाव फोडू न टाकला. त्यामुळे शत्रूची एकच दाणादाण उडाली. निजामाच्या फौजेने शत्रूवर
चोहोबाजूंनी हल्ला चढविला. यावेळी शरिफजी राजांनी पराक्रमाची शर्थ के ली. मात्र सेनापति लारीसोबत त्यांनाही वीर मरण आले. या युद्धाला
भातोडीचे युद्ध म्हटले जाते.

या शब्दाचा अपभ्रंश होवून इतिहासकारांनी याला भातवडीचे युद्ध म्हटलेले असलेतरी प्रत्यक्षात ते भातोडी आहे. भातोडी हे
नगर जामखेड रस्त्यावर असून गावाची लोकसंख्या 2 हजार असून गावात हिंदू आणि मुस्लिमांची बरीच घरे आहेत. गावात जाऊन माहिती
घेतली असता शरीफजी राजेंच्या समाधीचे काही अवशेष आजही बाकी असल्याचे गावातील तरुण ज्ञानेश्वर कदम यांनी सांगितले. ते
एवढ्यावरच थांबले नाहीत तर गावातील सर्व तरुण एकत्र येऊन त्यांनी शरीफजी राजांच्या समाधीचे पुनर्जीवन के लेले आहे.

अशरीतीने इतिहासातील उपेक्षित असणारी बरीच ठिकाणे उपेक्षित आहेत. इतिहासकारांनी त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन
त्याचे संवर्धन करून प्रसिद्ध के ले पाहिजे. त्याआधारे इतिहासाला एक नवीन संदर्भ प्राप्त होऊ शकतो.

संदर्भ ग्रंथ

1. Deopujari M. B. Shivaji and the Maratha Art Of War, Vidarbh

sanshodhan Mandal, Nagapur, 1973, P. 23

2. सरदेसाई गो.स. मराठी रियासत खंड 4, पॉप्युलर प्रकाशन, पुणे, 2010 पृ. 235

3. देशमुख विजय, शककर्ते शिवराय, सन पब्लिके शन, पुणे, 1986, पृ. 757

4. WWW. Goggle – Bijapur Fort , Wikipedia the free encyclopedia

5. The Editor, The Hindu, 13 January 2013


6. बेंद्रे वा. सी. मालोजीराजे आणि शहाजी महाराज यांची चिकित्सक चरित्रे, वा. सी. बेंद्रे,

मुंबई, 1976, पृ. 66

You might also like