You are on page 1of 8

१.

जिजाऊं चे वडील लखुजी जाधवरावांचे गाव-

1. सिंदखेडराजा 2. पुणे 3. वेरूळ 4. देऊळगाव राजा

२.शिवरायांच्या वडील बंधूंचे नाव

1. राजाराम 2. संभाजी 3. विठोजी 4. शरीफजी

३.शिवरायांच्या पूर्वजाकडे जहागिरीतील गाव

1. वेरूळ 2. सिंदखेडराजा 3. औरंगाबाद 4.अहमदनगर

४.शिवरायांची जन्मतारीख

1. 19 फे ब्रुवारी 1630 2. 19 फे ब्रुवारी 1629 3. 19 फे ब्रुवारी 1627 4. 19 फे ब्रुवारी 1645

५.मालोजीराजेंचे निधन या गावात झाले

1. पंढरपूर 2. इंदापूर 3. वाई 4. भातोडी

६.शहाशरीफ दर्गा या ठिकाणी आहे.

1. अहमदनगर 2. श्रीगोंदा 3. खुलताबाद 4. अजमेर

७.मालोजीराजेंच्या भावाचे नाव

1. खंडोजी 2. विठोजी 3. संभाजी 4. राजाराम


८.शिवरायांचे चुलते शरीफजी यांचे निधन झालेले गाव

1. भातोडी 2. कांचनबारी 3. होदीगेरे 4. रायगड

९.मलिक अंबर या राज्याचा सेनापती होता

1. निजामशाही 2. मोगल 3. कु तुबशाही 4. आदिलशाही

१०.शिवरायांच्या जन्माच्यावेळी शिवनेरीचे किल्लेदार

1. फिरंगोजी 2. विजयराव सिधोजी विश्वासराव 3. दिलेरखान 4. मुरारबाजी

११.शिवभारत ग्रंथाचे लेखक

1. कवी भूषण 2. कवी परमानंद 3. कवी कलश 4. कवी कालीदास

१२. असे होते मोगल या ग्रंथाचे लेखक

1. निकोलाय मनूची 2. कवी कलश 3. भीमसेन सक्सेना 4. परमानंद

१३.कनकगिरीच्या युद्धात ठार झालेला योद्धा

1. व्यंकोजी 2. संभाजी 3. शाहू 4. बाजीप्रभू

१४.'तारिखे दिल्कु शा' ग्रंथाचा लेखक भीमसेन सक्सेना हा कोणाकडे चाकरीस होता
1. मोगल 2. आदिलशहा 3. छत्रपती शिवाजी 4. संभाजी

१५.स्वराज्याची पहिली राजधानी

1. कोंढाणा 2. राजगड 3. रायगड 4. पुरंदर

१६.चंद्रराव मोरे यांचे वसतिस्थान

1. कारी 2. जावळी 3. पन्हाळा 4. पुरंदर

१७.महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर या जिल्हयात आहे

1. पुणे 2. नाशिक 3. अहमदनगर 4. सुरत

१८. सुपे परगण्याची जहागिरी यांच्याकडे होती

1. संभाजी कावजी 2. संभाजी मोहिते 3. हंबीरराव मोहिते 4. प्रतापराव गुजर

१९.छत्रपती संभाजीराजांचा जन्म या किल्ल्यावर झाला.

1. पुरंदर 2. कोंढाणा 3. पन्हाळा 4. प्रतापगड

२०.शिवाजीमहाराज-अफजलखान भेट या किल्ल्यावर झाली

1. पुरंदर 2. प्रतापगड 3. विशालगड 4. वाई


२१.पन्हाळ्याचा वेढा देणारा सेनापती

1. सिद्धी अंबर 2. सिद्धी जौहर 3. मलिक अंबर 4. इब्राहीम खान

२२.शिवाजी-अफजलखान भेटीतील शिवरायांचा वकील

1. कृ ष्णाजी भास्कर 2. पंताजी गोपीनाथ 3. दौलतखान 4. नानाजी प्रभू

२३.कान्होजी जेधे या गावचे वतनदार होते

1. कारी 2. जावळी 3. तळबीड 4. नेसरी

२४.येसाजी कं क या दलाचे सेनापती होते

1. घोडदळ 2. पायदळ 3. हत्तीदल 4. अंगरक्षक

२५.पन्हाळा वेड्यात सिद्धी जौहरला प्रत्यक्ष मदत करणारा इंग्रज अधिकारी

1. रेविंग्टन 2. मार्टिन 3. गिलफर्ड 4. मनूची

२६.पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका झाल्यानंतर महाराजांनी या किल्ल्याकडे प्रयाण के ले

1. प्रतापगड 2. विशाळगड 3. रायगड 4. जिंजी

२७.बाजीप्रभू देशपांडे हे यांचे सरनौबत होते.

1. बांदल 2. जेधे 3. भोसले 4. खोपडे


२८.उंबरखिंडीच्या युद्धात शाहिस्तेखानाकडू न लढणारी मराठी सेनानी

1. रायबागीन 2. रमाबाई 3. रानी लक्ष्मीबाई 4. ताराबाई

२९.शहाजीराजांचा मृत्यू येथे झाला

1. होदिगेरे 2. बेंगलोर 3. तंजावर 4. कनकगिरी

३०. हे स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख होते.

1. बहिरजी बोहरा 2. बहिर्जी नाईक 3. यसाजी कं क 4. नेताजी पालकर

३१.सुरतेवरील स्वारीप्रसंगी सुरतेचा सुभेदार

1. फौलादखान 2. इनायतखान 3. इम्ब्राहीमखान 4. दौलतखान

३२.'वेडात वीर मराठे दौडले सात' हे गाणे यांच्या बलिदानावर आधारित आहे.

1. नेताजी पालकर 2. प्रतापराव गुजर 3. संताजी घोरपडे 4. उदाजी चव्हाण

३३.मुस्लिम धर्माची दीक्षा दिल्यानंतर नेताजी पालकर यांचे ठेवण्यात आलेले नाव

1. कु लीखान 2. खवासखान 3. सिद्धी मसूद 4. काजी हैदर

३४.पुरंदर युद्धात बलिदान देणारा सेनापती


1. बाजीप्रभू 2. मुरारबाजी 3. फिरंगोजी नरसाळा 4. बाजी जेधे

३५.आग्र्याच्या कै देत शिवरायांचा जामीन राहिलेला रजपूत

1. जसवंतसिंग 2. किरतसिंग 3.दुर्गादास 4. रामसिंग

३६.आग्र्याहून सुटका झाल्यानंतर संभाजीराजांना येथे ठेवून शिवराय स्वराज्यात परत आले.

1. मथुरा 2. उज्जैन 3. भोपाळ 4. जयपूर

३७.सिंहगडाच्या मोहिमेत तानाजीसोबत लढणारा मोगली सेनापती

1. रामसिंग 2. उदयभान राठौर 3. जसवंत सिंग 4. जयसिंग

३८.१६७० साल्हेरच्या युद्धात शिवरायांचे हे बाल मित्र शहिद झाले.

1. सूर्यराव काकडे 2. सूर्याजी कं क 3. बाजीप्रभू 4. बाबाजी मुदगल

३९.कन्हेरगडाच्या पायथ्याशी दिलेरखानासोबत लढताना बलिदान दिलेला सेनापती

1. येसाजी कं क 2. रामाजी पांगेरा 3. खंडो बल्लाळ 4. बाजीप्रभू

४०.शिवराज्याभिषेकाला उपस्थित असणारा इंग्रज

1. हेंरी ऑक्झिडेन 2. रेव्हिंगटन 3. मार्टिन 4. स्मिथ


४१.जिजाबाईंचे निवासस्थान येथे होते.

1. महाबळेश्वर 2. पाचाड 3. वाई 4. पुरंदर

४२.अष्टप्रधान मंडळातील हे स्वराज्याचे पहिले न्यायधीश होते.

1. निराजी रावजी 2. अण्णाजी दत्तो 3. कृ ष्णाजी भास्कर 4. रावजी पंडित

४३.शिवरायांचा दुसरा राज्यभिषेक यांनी के ला.

1. गागा भट्ट 2. निश्चलपुरी 3. रघुनाथ पंत 4. कवी भूषण

४४.राज्यभिषेकानंतर महाराजांनी हे चलन सुरू के ले

1. होन 2. अश्रफा 3. रुपये 4. टका

४५.शिवरायांनी हा सागरी किल्ला बांधला

1. मुरुड जंजिरा 2. सिंधुदुर्ग 3. जिंजी 4. रायगड

४६.रायगडाच्या पाडावानंतर छत्रपती राजारामांनी आपली राजधानी येथे नेली.

1. जिंजी 2. जिंती 3. राजगड 4. पन्हाळा

४७.ममलकत-मदार हा किताब कोणाला होता.

1. धनाजी जाधव 2. संताजी घोरपडे 3. सूर्यराव काकडे 4. बाजी पासलकर


४८.हा काही काळ स्वराज्याचा वकील होता.

1. दर्यासारंग 2. दौलतखान 3. इब्राहीम खान 4. मार्टिन

४९.महाराणी ताराबाई या घराण्यातील होत्या

1. मोहिते 2. शिर्के 3. गुजर 4. पासलकर

५०.छत्रपती शाहूंनी या ठिकाणी आपली राजधानी निर्माण के ली.

1. सातारा 2. पन्हाळा 3. रायगड 4. राजगड

You might also like