Professional Documents
Culture Documents
Old Fort
Old Fort
शिवाईमंदिर, शिवनेरी
शिवनेरीवर जन्
ु या वास्तू फार थोड्या आहे त. किल्ल्याची भक्कम तटबंदी, पाच प्रमुख दरवाजे व बुरुज
लक्ष वेधून घेतात. किल्ल्यात पाण्याची अनेक टाकी असून एक मशीद, इदगाह, शिवाईचे मंदिर,
अंबरखाना व अदम सुभेदाराची कबर या अवशिष्ट वास्तू आहे त. मशिदीचे बांधकाम पाणथळ दगडी
खाणीवर केलेले असून तिचे दोन मनोरे एका आकर्षक कमानीने जोडले आहे त. तटबंदीच्या डोंगर
उतारावर काही गुंफा आहे त. शिवरायांच्या जन्मस्थानाचा जीर्णोद्धार केला असून दरवर्षी शिवजयंती
उत्सव येथे दिमाखात साजरा होतो. अलीकडे बालशिवाजी-जिजाबाई यांचे मंदिर येथे उभारण्यात आले
आहे .