You are on page 1of 3

तांदळ

ु ज्याच्या लढाईला उदगीरचे नाव

भारताच्या इतिहासात जेथे लढाई झाली त्या ठिकाणाचे नाव त्या लढाईला दिले जाते.
याला अपवाद म्हणजे 1760 ची उदगीरची लढाई असन
ू वास्तविक पाहता ही लढाई तांदळ
ु जा
ता.जि. लातूर या गावात झालेली असून ओघात झालेल्या लिखाणाची बाकीच्यांनी री ओढली. याचे
समकालीन अस्सल संदर्भ पहात असताना दिल्लीतील मोगल दर्ब
ु ल झाल्याने 1724 ते 1818
यादरम्यान दक्षिणेत है द्राबादचा निजाम आणि सातारचे छत्रपती यांच्यात सत्तासंघर्ष सुरू होता.
कुरघोडीच्या राजकारणामळ
ु े यांच्यात वारं वार लढाया झाल्या. त्यामळ
ु े 1758 -60 लातर मराठे
दक्षिण आणि उत्तर अशा दोन्ही आघाड्यावर लढताना दिसन
ू येतात. एकदा का निजामाचा
बंदोबस्त झाला म्हणजे उत्तरे त राजकारण करायला मोकळे झालो या भावनेने पेशव्यांनी निजाम
प्रांतावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्यानुसार बिदर, भालकी, सिंदखेडवर आक्रमण करत
मराठ्यांनी नगरचा किल्ला जिंकून घेतला. मराठ्यांच्या सत्तेत ज्याप्रमाणे बाळाजी बाजीराव उर्फ
नानासाहे ब पेशवे असन
ू या आक्रमणात त्यांचे भाऊ सदाशिवरावभाऊ आघाडीवर होते त्याचवेळी
निजामाच्या गादीवर सलाबतजंग असून त्याची आघाडी त्यांचा भाऊ निजामअली सांभाळत होता.

दरम्यानच्या काळात निजामाच्या तोफखान्याचा प्रमख


ु इब्राहीमखान गारदी मराठ्यांना
येऊन मिळाला. यावेळी मराठ्यांच्या फौजा अखिल हिंदस्
ु थानच्या भभ
ु ागावर दौडत होत्या. उत्तरे त
शिदं े होळकर तर निजाम राजवटीत सदाशिवभाऊच्या नेतत्ृ वाखाली नगरपासून बिदरपर्यंत
मराठ्यांनी निजामाला जेरीस आणायला सरु
ु वात केली. 10 नोव्हें बर 1759 ला भाऊने नगरचा
किल्ला घेऊन जन्
ु नर, त्रिंबक, औरं गाबादचा टापूही मारल्याने निजाम खडबडून जागा झाला.
नगरच्या धडाक्याने निजामाला त्वेष निर्माण होऊन तोही फौजेची तयारी करून धारूरच्या रोखाने
निघाला. यावेळी सदाशिवराव, रघुनाथदादा, विश्वासराव, दमाजी गायकवाड, विठ्ठल शिवदे व,
यशवंतराव पवार, अंताजी माणकेश्वर, बाबूजी नाईकबारामतीकर आघाडीवर असून त्यांच्याकडे 40
हजार फौजेसह केशवराव पानसे आणि इब्राहीमखान गारद्याचा तोफखाना होता. निजामाचे
जहागीरदार हणमंतराव आणि जानोजी निंबाळकर, लक्षमणराव खंडागळे आतून मराठ्यांना सामील
होते मात्र व्यंकटराव निंबाळकर धारूरजवळ मराठ्यांना रोखण्याकरिता सज्ज होते . निजामाची
फौज उदगीरमध्ये दाखल होऊन ती आता धारूरच्या रोखणे निघाली त्यांची मागची फळी सुर्यराव
निर्मळकर आणि मेडकची दे साईन शंकरआम्मा सांभाळीत होती. याचवेळी मराठे आणि निजाम
यांच्यात औसा, बिदर ते उदगीरनजीक चकमकी सुरू झाल्या. 9 जानेवारी 1760 ला सदाशिवराव
भाऊच्या सैन्याचा मुक्काम परळीत असून पुढे ते गिरवली, सारसामार्गे तांदळ
ु ज्याला पोहोचले.
दिनांक 2 आणि 3 फेब्रव
ु ारी 1760 रोजी दोन्ही सैन्य तांदळ
ु ज्याच्या मैदानावर आमनेसामने उभे
राहिले.

काव्येइतिहास संग्रहात याचे वर्णन याप्रमाणे आहे , तो भाऊसाहे ब यानी तांदळ


ु ज्याच्या
मुक्कामी नबाब निजामअली यांसी लढाई केली. मराठ्यांच्या इतिहासाची साधने या ग्रंथात ,
उदगीरचे अलीकडे सहा कोसावर मोगल आहे . त्यास भाऊसाहे ब चौगिर्द फौजा बसवून उतरले
आहे त, माघ शद्ध
ु प्रतिपदे स व द्वितीयस ऐशी दोन रोज यद्ध
ु झाली, मराठी रियासत खंड क्रमांक
4, पेशव्याची बखर, मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड 7 या मराठी साधंनाबरोबरच तज
ु क
ु े
आसफिया, हदिकतुल आलम या फारसी साधंनातही या लढाईचे वर्णन आढळते. सेतुमाधवराव
पगडी यांनी आपल्या मराठे व निजाम या ग्रंथात 3 फेब्रव
ु ारी 1760 रोजी परगणे आंबा तांदळ
ु जा
गावी मुख्य लढाई झाल्याचे म्हटलेले आहे . या लढाईत निजामाला सपशेल हार पत्करावी लागली.
तांदळ
ु ज्याच्या मैदानावर इब्राहीमखान आणि पानसेच्या तोफखान्याने आग ओकताना स्वत:
केशवराव पानसे आणि इब्राहीमखानाचा भाऊ शहीद झाले. सोबतच बर्ु ‍हाणजी मोहिते, भगवंतराव
शिदं े , महादजी साळुंखे, सखोजी घाटगेही वीरगतीस गेले. निजामाकडील नणकू पंडित, सुर्यराव,
कादरखान, शौकतजंग, रायबसवंतराय, इस्माईलखान इत्यादींना मरण आले.

या लढाईचे स्थळवर्णन करत असताना ज्याठिकाणी हे युद्ध झाले त्याभागास शिरखंडी


म्हटले जाते. सातबार्‍यावर तशी नोंदपण आहे . यावेळी निजामाकडील 200 - 250 आणि
मराठ्यांचे 25 गारदी मारले गेल्याची नोंद असल्याने या भागाला खंडीने शिर पडले म्हणून
शिरखंडी म्हटले गेले. शिरखंडीच्या जमिनीचा तांदळ
ु ज्यातील गट नंबर 165, 166 तर लगतच्या
टाकळगाव शिवारातील जमिनीचा गट नंबर 421 आहे . प्रत्यक्षात आज तेथे एक पीर सोडून इतर
कुठलेही स्मारक नाही. 3 फेब्रव
ु ारीला तांदळ
ु ज्याच्या मैदानावर मोठा विजय मिळाला आणि
त्याचवेळी भाऊसाहे ब पेशव्यांना पानिपतावर पाठविण्याचा निर्णय झाला. तांदळ
ु जा लढाईने
निजामाला मोठी हार पत्करावी लागल्याने त्याने आपला वकील शेरजंगला बोलणीसाठी पेशव्याकडे
पाठविले. त्यानस
ु ार मराठे आणि निजाम यांच्यात तांदळ
ु जा येथील नाईक बावणे यांच्या गढीत
तहाची बोलणी होऊन त्यात मराठ्यांना 62 लाखाचा मुलूख अहमदनगर, दे वगिरी, जन्
ु नर,
आशिरगड किल्ले, विजापूर आणि बुर्‍हानपूर ही दोन शहरे दे ण्याचे कबल
ू करण्यात आले.
या लढाईचे बारकाईने निरीक्षण केल्यास निजाम फौज ही उदगीरवरुन धारूरच्या
किल्ल्याकडे जाण्याच्या बेतात होती असे दिसते कारण मराठ्यांनी औरं गाबादहून धारूरपर्यंत
उच्छाद मांडला होता. या लढाईचे नेतत्ृ व करणारे सदाशिवरावभाऊ हे उदगीरकडे गेलेच नाहीत.
याउलट लढाई झाल्यानंतर त्यांना अब्दालीसोबत लढण्याकरिता पानिपतकडे जाण्याचे असल्याने
भाऊसाहे ब पेशवे पढ
ु े काहीकाळ परतरू ला थांबले, त्याठिकाणी नानासाहे ब पेशवे आल्यानंतर सल्ला
मसलत होऊन मराठ्यांची फौज पानिपतकडे रवाना झाली. एकंदर कुठल्याही संदर्भग्रंथाचा अभ्यास
केल्यानंतर स्पष्टपणे जाणवते की, उदगीरच्या लढाईला तांदळ
ु ज्याची लढाई म्हणणे उचित ठरे ल.
यात कुठल्याही संदर्भाची मोडतोड नाही किंवा उदगीरसारख्या अतिशय समद्ध
ृ ऐतिहासिक गावाचा
उपमर्द करण्याचा हे तू नाही.

ही लढाई तांदळ
ु जा येथेच का झाली, याचा परामर्श घेत असताना तांदळ
ु जा आणि गिरवली
ही दोन सर्वत्र निजाम राजवट असूनही स्वराज्यात होती हे विशेष आहे . संभाजीपुत्र छत्रपती शाहू
महाराजांनी 1743 साली ही गावे सरदार जानोजीराव नाईक बावणेंना इनाम दिलेली होती. विशेष
म्हणजे तांदळ
ु जा आणी गिरवली या गावात बावणेच्या अतिशय भव्य अशा गढया असून स्वत:
बावणे हे अक्कलकोटचे फत्तेसिहं भोसले यांच्या सैन्याच्या घोडदळाचे प्रमुख असल्याने त्यांच्याकडे
मोठ्या प्रमाणावर घोड्याची पागा आणि इतर रसद असणे स्वाभाविक आहे , त्यामुळे संपूर्ण
मराठवाड्यात तांदळ
ु जा म्हणजे मराठ्यांच्या फौजेचा लष्करी तळ असल्याने तेथे भले मोठे मैदान
असणे स्वाभाविक आहे . त्यामळ
ु े च मराठ्यांची फौज तांदळ
ु जा याठिकाणी थांबली. निजामाच्या
फौजेला एका बाजूला धारूर आणि दस
ु र्‍या बाजूला उदगीरहून लढवत लढवत तांदळ
ु ज्याच्या
मैदानावर ढकलत आणले. आजही तांदळ
ु जा येथील बावणेंच्या वंशजाकडे अनेक ऐतिहासिक
दस्तावेज उपलब्ध असून त्यात पितळी दर्बि
ु ण लक्ष वेधून घेते. अशारितीने तांदळ
ु ज्याच्या
लढाईमळ
ु े निजामाला हरवन
ू मराठ्यांनी दक्षिणेत एकहाती सत्ता निर्माण घेण्याची तयारी सरु
ु वात
केली होती. उत्तरे त दत्ताजी शिदं ें च्या निधनामळ
ु े पानिपतकडे जाण्याची निकड झाली. अन्यथा
है द्राबादवरही मराठ्यांचा जरीपटका फडकला असता.

You might also like