You are on page 1of 4

अनाजीपंताचे मूळ गाव मराठवाड्यातील वसमत

टीव्हीवरील छ्त्रपती संभाजी मालिकेतील गाजलेल्या अनाजीपंताच्या भमि


ू केने वेगळा रं ग

आणला. छ्त्रपती संभाजीराजे त्याला कधी शिक्षा दे णार ? त्याचे पढ


ु े काय होणार वगैरे ... यातील

अनाजीपंत म्हणजे अण्णाजी दत्तो कुलकर्णीच्या मूळ गावाविषयी इतिहासाला फारशी माहिती

नाही. तरीपरं तु अनाजी हा साधारणपणे इ. स.1646 च्या आसपास शहाजीराजेंच्या तालमीत तयार

होऊन छ्त्रपती शिवरायांच्या सेवेत दाखल झाला. शिवरायांच्या अनेक मोहिमात त्याने भाग

घेतलेला आहे . विशेष म्हणजे अफजलखान चालन


ू आला त्यावेळी राजे प्रतापगडाकडे गेले . तेव्हा

पाठीमागे जिजाऊ साहे ब आणि संभाजी राजे यांच्या दे खरे खीसाठी महाराजांनी अनाजीची नेमण ूक

केली होती, पढ
ु े कोंडाजी फर्जन्दने ज्यावेळी अतिशय कमी सैन्याच्या जोरावर पन्हाळा जिंकून

घ्यायचा बेत आखला तेव्हा हाच अनाजी स्वारीच्या पाठीमागची फळी सांभाळत होता. तर छत्रपती

शिवाजीराजे शंभूराजासह ज्यावेळी औरं गजेबाच्या भेठीसाठी आग्र्याला गेले तेव्हाही

जिजाऊसाहे बांच्या दे खरे खीखाली स्वराज्याची जबाबदारी सांभाळण्याचे काम अनाजीने केले .

अनाजीला संगमेश्वरचे कुलकर्णीपद दे ण्यात आले होते. पुढे 6 जून 1674 रोजी शिवाजीराजांनी

राज्याभिषेक केला तेव्हा याच अनाजीला आपल्या अष्टप्रधान मंडळातील एक मं त्रिपद दे ऊन

त्याच्यावर मोठा विश्वास टाकला होता. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात पढ


ु ील मंत्री होते.

1. पंतप्रधान (पेशवा): मोरोपंत त्रिंबक पिंगळे शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील प्रथम क्रमांकाचे

सर्वोच्च मंत्री. पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन, पगार मिळत असे. 2. पंत अमात्य (मजुमदार) :

रामचंद्र नीलकंठ मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. पंत अमात्यांना वार्षिक १२ हजार होन

पगार होता. 3. पंत सचिव (सुरनीस) : अण्णाजीपंत दत्तो. हा सुद्धा एक महत्त्वाचा मंत्री असून सर्व

जाणार्‍या येणार्‍या पत्रव्यवहारावर लक्ष ठे वणे हे त्याचे काम होते . पंत सचिवांना वार्षिक १० हजार

होन पगार होता. 4. मंत्री (वाकनीस) : दत्ताजीपंत त्रिंबक यांच्याकडे महाराजांच्या खाजगी
कारभाराकडे लक्ष ठे वण्याचे काम असे . 5. सेनापती (सरनौबत) : हं बीरराव मोहिते. शिवाजी

महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रम ुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे

सेनापती. 6. पंत सम
ु ंत (डबीर) :रामचंद्र त्रिंबक. हे स्वराज्याचे परराष्ट्र मंत्री होते. परराष्ट्रातन
ू हे रांच्या

साहाय्याने बातम्या काढण्याचे जबाबदारीचे काम त्यांना करावे लागे . 7. न्यायाधीश (काझी-उल-

ऊझत) : निराजीपंत रावजी. हे स्वराज्याचे सरन्यायाधीश होते. 8. पंडितराव दानाध्यक्ष (सद्र-

मुहतसिव) : मोरे श्वर पंडित. हे धर्मखात्याचे प्रमुख होते. वरील प्रत्येकाला वार्षिक १० हजार होन

पगार मिळत असे.

अशारीतीने अनाजीपंत अर्थात अण्णाजी दत्तो याच्यावर सचिव म्हणजे अतिशय महत्वाची

जबाबदारी पडली. अनाजीपंताचा शिक्का पुढीलप्रमाणे होता. “ श्रीशिवचरणी तत्पर दत्तसुत अणाजी

पंत निरं तर”

आजच्या भाषेत अनाजीपंत म्हणजे महाराजां चे पीए. शिवरायांच्या हयातीत अनाजीपंताने

राजेंचा विश्वास संपादन


ू अतिशय छान काम केले. 3 एप्रिल 1680 ला शिवरायांचे निधन झाल्यानंतर

स्वराज्याचा छत्रपती कोण नेमायचा यावरून अनेक खलबत होवून अनाजीपंताने थोरले असुनही

संभाजीराजांना डावलन
ू राजारामाला छत्रपती म्हणन
ू बसविले. आणि पढ
ु े अडचण नको म्हणन

पन्हाळ्यावर कैदे त असणार्‍या संभाजीराजांना अटक करण्यासाठी सेनापती हं बीरराव मोहीतें ची

नेमणक
ू केली. हं बीरराव राजेंच्या बाजल
ू ा गेल्याने हा कट फसला आणि पहिल्यांदा अनाजीपंत उघडे

पडले. तरीपण संभाजीराजांनी मोठ्या मनाने त्यांना माफी दे ऊन पूर्ववत आपल्या कामावर घेतले.

पुढे औरं गजेबाचा मुलगा अकबर बंड करून संभाजीराजेंच्या आश्रयाला आला. यावेळी

संभाजी राजांवर विषप्रयोग झाला. यामध्येही अनाजीचा हात होता. दस


ु र्‍यांदा राजांनी माफी दिली.

परं तु कुठल्याहीप्रकारे राजेंना गादीवरून दरू करायचेच असा चंग बांधलेल्या मंत्र्यांनी आता थेट

अकबराशी संधान बांधले. त्याकरिता अनाजीपंताने अकबराला पत्र लिहून संभाजी राजांना कट
करून ठार मारण्यात यावे अशाप्रकारची गळ घातली. या प्रकाराने अकबरसुद्धा घाबरून गेला. त्याला

वाटले हे पत्र मुद्दाम संभाजीराजांनी माझी परीक्षा घेण्याकरिता पाठविले असावे . म्हणून त्याने ते

पत्र सरळ संभाजीराजाकडे पाठविले. यातील अक्षर हे आपला सचिव अनाजी पंताचे असल्याची

त्यांना खात्री पटली. त्यानुसार शेवटी ऑगस्ट 1681 साली संभाजी राजांनी अनाजीपंताला आपल्या

हत्तेचा कट केल्याबद्दल हत्तीच्या पायाखाली दिले.

अनाजीपंताला शिक्षा केलीतरी त्याचा मुलगा रघुनाथपंताला राजांनी पन्


ु हा एकदा आपल्या

सेवेत सामावून घेत संगमेश्वर, थेरगाव आणि बुंदेलखंडातील अनेक गावचे कुलकर्णीपद दिले.

अशारितीने स्वराज्याचे मोठे पद सांभाळलेले व शेवटी चुकीचे वागलेले मराठ्यांच्या

इतिहासात गाजलेले व्यक्तिमत्व मूळचे मराठवाड्यातील असल्याचे वाचल्यानंतर आश्चर्य वाटायला

लागते. त्यानुसार अनाजीपंत म्हणजेच आण्णाजी दत्तो यांचा मळ


ू पुरुष हा दत्तो त्रिंबक कुलकर्णी

हे मूळचे मराठवाड्यातील वसमतचे रहिवाशी असून त्यांचाच मुलगा म्हणजे अण्णाजी. त्याकाळी

नाव लिहिताना आपल्या नावापढ


ु े आडनाव लिहिण्याची पद्धत नसल्याने ऐतिहासिक कागदपत्रात

अनाजीचे नाव अण्णाजीदत्तो याप्रमाणे सापडते. आदरपूर्वक त्यांना अनाजीपंत म्हटले जाते.

“ शिवाजी निबंधावली भाग 2” या दर्मि


ु ळ पस्
ु तकात इतिहासकार दत्तोवामन पोतदार यांनी

याविषयी नव्याने माहिती प्रकाशित केली असून याकरिता त्यांनी अस्सल साधनाचा आधार

घेतलेला आहे . त्यानस


ु ार अनाजीपंताची वंशावळ खालीलप्रमाणे दिलेली आहे .

1. दत्तो त्रिंबक कुलकर्णी (मूळ पुरुष, वसमत, जि. हिंगोली) मुलगा एक 2. अण्णाजी दत्तो उर्फ

अनाजीपंत ( अष्टप्रधान मंडळातील सचिव ) मुलगा एक 3. रघुनाथ अण्णाजी ( संभाजीराजेंच्या

काळात संगमेश्वर, थेरगाव आणि बुंदेलखंडातील अनेक गावचे कुलकर्णी पद ) मुलगा एक 4.

आवजी रघुनाथ मुले तीन – रामचंद्र , लक्ष्मण आणि आबाजी ( पहिल्या दोघांना मूल नाही ) 5.

आबाजी आवजी ( मुलगा एक ) 6. विठ्ठल आबाजी ( मुलगा एक ) 7. त्रिंबक विठ्ठल 8. गणेश त्रिंबक (
मुले दोन ) – शंकर आणि त्र्यंबक पैकी त्र्यंबक गणेश कुलकर्णी हे पण्
ु याच्या शेतकी कॉलेजमध्ये

नोकरीला असल्याचे समजते. अशारितीने मराठवाड्यातील आजच्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत

गावचा रहिवाशी असलेल्या अनाजीपंताने आपल्या नावाभोवती जखडून ठे वलेले आहे .

You might also like