You are on page 1of 3

कदम कुळाचा इतिहास

प्राचीन काळी चेर, चोल, पांडत्र, सातवाहन, वाकाटक, पल्लव, कदं ब, चालुक्य, राष्ट्रकूट यासारख्या दिग्गज
घराण्यांनी राज्यकारभार केला. यातील कदं ब घराण्याने सुमारे एक हजार वर्षे कर्नाटक, गोवा आणि ओरिसा

ु क्षित राहिले.
याठिकाणी सत्ता गाजवूनही ते इतिहासात दर्ल

त्रिलोचनला कदम घराण्याचा मूळ पुरूष मानला जातो. त्यांच्या उत्पत्तीचा संबंध कदं ब वक्ष
ृ ाशी लावला
जातो. त्यामुळे कदं ब कुळ म्हटले जाते. कदं बांची राजकीय कारकीर्द ही इ.स. ३५३ मध्ये मयुरवर्माने कर्नाटकातील
उत्तर कनाडा जिल्ह्यातील बनवासी या ठिकाणी स्थापन केलेल्या राजधानीपासून होते. पल्लव दरबारात अपमान
झाल्यानंतर कदं बाचे स्वतंत्र राज्य निर्माण केले, मयूरवर्मानंतर पुढे कंगवर्मा, भगीरथ, रघू, काकुस्थवर्मा, शांतीवर्मा,
कृष्णवर्मा, कुमारवर्मा यासारखे पराक्रमी राजे होऊन गेले. या राजांनी पढ
ु े हळशी, उच्छं गी या स्वतंत्र
ू बेळगांव, खानापरू , संपगाव, सिरसी, सावनरू , शिमोगा, हुबळी या परिसरावर राज्य केले . या दरम्यान
राजधान्यातन
कदं बांनी प्रथमच कन्नडला प्रशासकीय भाषेचा दर्जा दिला. इ. स. ५४३ मध्ये बदामीचा चालुक्य राजा पुलकेशीने

ु रा याचा पराभव करून राज्य जिंकले. तरी कर्नाटकातील बनवासी, हनगल,


कदं बाचा शेवटचा राजा कृष्णवर्मा दस
हळशींगे, सांतलिगे येथे कदं बांची छोटी राज्ये १२ व्या शतकापर्यंत कायम होती. कदं ब घराण्याची माहिती दे णारा
सर्वात मोठा संदर्भ कर्नाटकातील तालगुंड येथील शिलालेख असून अशाप्रकारचे अनेक शिलालेख सापडले आहे त.

कर्नाटकप्रमाणेच गोव्यातही कदं बांनी इ.स. १००७ ते १२३७ पर्यंत साम्राज्य गाजवले. षष्ठीदे व हा
गोव्यातील कदं ब वंशाचा संस्थापक असून त्यानंतर पुढे जयकेशी , गुहल्लदे व, पेर्माडी यासारखे राजे होऊन गेले .
आज गोव्यात दिसणारी ग्रामव्यवस्था ही कदं बांनी दिलेली दे णगी आहे . गोव्याची ग्रामदे वता सप्तकोटे श्वराची
उभारणी कदं ब राजांनी केली. याचाच पढ
ु े छत्रपती शिवरायांनी जिर्णोद्धार केला. गोव्याच्या कदं बांचे आरमार
भक्कम असून त्यांना कोकण चक्रवर्ती ही पदवी होती.

गोपिकापट्टण म्हणजे गोवा ही कदं बांची राजधानी असून या घराण्यात जयकेशी, पेरमाडी यांच्या उज्वल
कारकिर्दीबरोबरच कमलादे वी, महादे वी, लक्ष्मीदे वी यासारख्या कतर्त्व
ृ वान स्त्रियाही होऊन गेल्या. याच पेरमाडीच्या
पत्नी कमलादे वींनी संपगाव तालुक्यातील दे गावे (कर्नाटक) याठिकाणी इ. स. ११४७ मध्ये कमलनारायण आणि
महालक्ष्मीचे सुंदर असे बांधलेले आहे .

आपल्या कार्यकाळात कदं बांनी गोव्यामध्ये गद्याना, होन्न,ू बेले, व्हाईज, हगा यासारखी आपल्या नावानी
नाणी पाडली होती. ज्यावर कमळ आणि सिंहाचे चित्र असून कदं बांनी सोन्याची नाणी पाडली होती हे विशेष
आहे . गोव्याच्या अनेक भागात कदं बांचे शिलालेख, ताम्रपट सापडतात. गोव्याला वैभव प्राप्त करून दे ण्याचे काम
कदं ब राजांनी केल्यामुळेच तेथील बस वाहतुकीला कदं बा ट्रान्सपोर्ट हे नाव दे ऊन सरकारने या घराण्याचा गौरव
केला आहे .
कर्नाटक आणि गोव्यानंतर कदं ब घराण्याने ओरिसा राज्यातही प्राचीन काळापासून आपली सत्ता
प्रस्थापित केली. त्यानस
ु ार धर्मखेडी, प्रतापदे व यासारख्या राजांनी ओरिसात कदं बांची सत्ता निर्माण केली.
त्यानुसार पुढे पुरी, अंगूल, अथम्लीक, मांडपा या परिसरात कदं बांची सत्ता होती. इंग्रजांच्या काळात ओरिसात
कदं ब जमीनदार म्हणून छोट्या छोट्या संस्थानात विभागला होता. या संस्थानांना तेथे १९ तोफांची सलामीचा
मान होता. आजही तेथे कदं बांची मोठी जमीनदार घराणी आहे त.

खर तर कदं ब म्हणजे कदम असून ते मूळचे सुर्यवंशीय, मानव्य गोत्री, सिंह हे त्यांचे लांच्छन, लाल
रं गाचे निशाण, झेंड्यावर अर्जुनाप्रमाणे वानर होते. कर्नाटक, गोव्यानंतर कदम सर्वत्र विखुरले गेले त्यावेळी
प्रसंगानुरूप त्यांना भिसे, भोग, कोकाटे , राजगुरू, नुसपत
ु े, महाले, डोके, कोरडे, बोबडे, सातपत
ु े, धुमाळ इत्यादी
आडनावे मिळाली.

ु ीन कालखंडातही कदमांनी विविध सत्तामध्ये आपले नाव राखले . बहामनी कालखंडात (१४२१)
मध्ययग
फक्रुद्दीन निजामी यांनी 'कदमराव पदमराव' नावाचे काव्य लिहून पद्मराव राजाविषयी माहिती दिली आहे . तर
गोव्यांमध्ये कदं बाच्या अगोदर बहामनी सत्तेचे मुख्य सेनापती म्हणून खुष कदम हे मुख्य सेनापती होते. तर
विजापूरच्या आदिलशाहीत बंकापूरच्या पर्वतराव कदमांनी आदिलशाही विरोधात केलेले बंड मोठे गाजलेले .
छत्रपती शिवरायांच्या कालखंडात अनेक कदमांनी स्वराज्याची सेवा केली . राजांनी काढलेल्या कर्नाटक मोहिमेत
तामिळनाडूचा बलगंडापूरमचा किल्ला जिंकल्यानंतर त्याची किल्लेदारी शहाजी कदम यांच्याकडे दिली होती. पुढे
शिवरायांच्या निधनासमयी सर्वत्र संशयाचे वातावरण निर्माण झाले होते . अशावेळी राजगडावर राजांसोबत जी
जाणकार मंडळी उपस्थित होती त्यात बाजी कदमांचा समावेश होता. याची बाजीने पुढे छत्रपती राजारामांना
सावलीप्रमाणे सोबत राहून मोठी मदत केली.

स्वराज्यात दोन-तीन बाजी कदम होऊन गेले . पैकी इ. स. १७२० च्या संदर्भानुसार मोगलांच्यावतीने
रावरं भा निंबाळकरांची जहागिरी सांभाळतांना पुणे आणि बारामतीची आठ वर्षे जहागिरी ही बाजी कदमांकडे
होती.

ृ राव कदमबांडे यांची फार मोठी मदत झाली होती.


छत्रपती शाहूंच्या कारकिर्दीला सुरूवात होताना अमत
त्यामुळे शाहुंनी या घराण्याला विशेष सन्मान दे त अमत
ृ रावाचा पुतण्या मल्हाररावांचा विवाह आपली कन्या
गजराबाईसोबत केला होता. कदमबांडे घराण्यात अमत
ृ रावासोबत संताजी, रघूजी, कंठाजी, गोजानी यांनी मोठी
कामगिरी केली. कंठाजी कदमांची गज
ु रात प्रांतात मोठी दहशत होती.

या त्रिंबकरावांची मुलगी बडोद्याच्या पहिल्या सयाजीराव गायकवाडांना दिली होती . कदमबांडे घराण्याकडे
नंदरू बार, रनाळा, तोरखेड, कोपर्ली, ठाणे, धुळे या ठिकाणची जहागिरी होती. याचसोबत अहमदनगर जवळील
े ी मोठी गढी आहे .
आळकुटी याठिकाणीही कदमबांडच

छत्रपती शाहूंच्या काळात सापचे इंद्रोजी कदमांची कारकिर्द खूप गाजली. तुळजाभवानीचे मुख्य पुजारी
म्हणून कदम कार्यरत असून याच घराण्यातील आनंदरावांची मुलगी महादजी शिंदेंना दिलेली होती. ग्वाल्हे रच्या
शिंदे घराण्याचा कारभार याच कदमांनी चालविला. आजही तेथे डंकेवाले कदम आणि हत्तीवाले कदम यांच्या
नावाने बाजार आहे त.

ु चे किल्लेदार होते. तर पानिपतात भगवंतराव व पर्वतराव कदम यांनी मोठी


बुवाजी कदम हे गोपालदर्ग
कामगिरी केली. फलटणजवळील गिरवीचे कदमांचे बडोद्याच्या गायकवाडाशी सोयरिक असून यादवराव तुकाजी
कदमांना सयाजी गायकवाडांची मल
ु गी रडूबाई दिली होती तर बाळासाहे ब कदम यांच्या मल
ु ीचा विवाह
बडोद्याच्या शिवाजीराव गायकवाडांसोबत झाला होता.

एकंदर प्राचीन कालखंडापासून कदम घराण्याचा इतिहास उज्वल असून या घराण्यातील एखाद्याने

ू नाही. आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात कदम विखरु लेले असन


कुठे ही गद्दारी केल्याचे इतिहासात नमद ू
कर्नाटक, गोवा, ओरिसा या राज्यामध्ये कदम कुलाचा अभ्यास शिकविला जातो. मात्र चालुक्य, पल्लव, वाकाटक
यांना अभयदान दे णाऱ्या कदं बांचा इतिहास महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात नाही. मल्हारराव होळकरांच्या
झंेड्यातील लालरं ग त्यांना कदमाप्रती आदरभाव म्हणून ठे वला होता. कर्नाटक सरकार बनवासी येथे दरवर्षी
करोडो रूपये खर्चुन कदं ब महोत्सव भरविते. २००५ साली राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी एका नौसेनिक तळाचे
नाव आय.एन.एस कदं बा ठे वले आहे . उडिया भाषेतील कदं ब गाथा, तेलगूतील कदं बकुल, कन्नडमधील कावेरी
महात्म्य यासारख्या ग्रंथात या घराण्याचा इतिहास पहायला मिळतो. जॉर्ज मोरिससारख्या इंग्रजाने कदमकुळावर
संशोधनात्मक लिखाण केलेले आहे . एक हजार वर्षे सत्तेत राहिलेल्या कदं ब घराण्याचा इतिहास महाराष्ट्राला
अनभिज्ञ असावा हे आश्चर्यकारक आहे .

You might also like