You are on page 1of 89

एक थोर तत्त्ववेत्ता

सॉक्रे टिस

डॉ. सौ. नीता पांढरीपांडे


एक थोर तत्त्ववेत्ता
सॉक्रे टिस
डॉ. सौ. नीता पांढरीपांडे

प्रकाशन क्रमांक – 1550

प्रकाशक
साके त बाबा भांड,
साके त प्रकाशन प्रा. लि.,
115, म. गांधीनगर, स्टेशन रोड,
औरंगाबाद - 431 005,
फोन- (0240)2332692/95.
www.saketpublication.com
info@saketpublication.com

पुणे कार्यालय
साके त प्रकाशन प्रा. लि.,
ऑफिस नं. 02, ‘ए’ विंग, पहिला मजला,
धनलक्ष्मी कॉम्प्लेक्स, 373 शनिवार पेठ,
कन्या शाळेसमोर, कागद गल्ली, पुणे -411 030
फोन- (020) 24436692
चि. अनुष्का, चि. अन्वेषीस,
ज्यांच्या अस्पष्ट; पण अकृ त्रिम बोबड्या बोलांनी
आयुष्य जगण्याचे नवे तत्त्वज्ञान, आत्मभान समजावले
त्या दोन्ही चिमुकल्या नातींस...
परिचय
नाव : डॉ. सौ. नीता पांढरीपांडे
शिक्षण : एम.ए., बी.एड., बी.पी.एड., एम.फिल., पीएच.डी., हिंदी साहित्यरत्न.
☐ शाळा व महाविद्यालयीन स्तरावर खेळांत विशेष प्रावीण्य, राज्यस्तरावर सुवर्णपदक,
राष्ट्रीयपातळीवर टेबल-टेनिस व बास्के टबॉलमध्ये सहभाग.
☐ शालेय व महाविद्यालयीन स्तरावर अध्यापन कार्य.
☐ प्रशासकीय स्तरावर अकॅ डमिक कोऑर्डिनेटर म्हणून भारत इन्स्टिट्यूट ऑफ
इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, हैदराबादमध्ये कार्य.
☐ विविध वृत्तपत्र, मासिकांतून ललित लेखन, संत वाङ्मयावर लेख, अनुवादित कथा
प्रसिद्ध.
☐ आकाशवाणीवर मराठी-हिंदीतून विविध विषयांवर भाषण.
☐ ‘शिक्षाप्रणाली व शिक्षा समस्या’ पुस्तक प्रसिद्ध.
प्रस्तावना
‘एक थोर तत्त्ववेत्ता सॉक्रे टिस’ हे डॉ सौ. नीता पांढरीपांडे यांचे पुस्तक वाचताना माझ्या
काही गृहीतकास बळकटी मिळाली. एक, सॉक्रे टिस व तशाच प्रकारची माणसे निर्माण
होण्यासाठी Vibrant socitetyअर्थात समाज अभिसरण प्रक्रियेत असला पाहिजे.
अभिसरणामुळे सुवर्णकण वर येतात, दखलपात्र होतात. याचा अर्थ हा समाज चुका करीत
नाही असे नाही; पण त्या समाजाची ती दखल घेण्याची रीत असते. नरहर कु रुं दकरांच्या
मते, असा समाज चुका करूनदेखील मोठा असतो. सॉक्रे टिसला मृत्युदंडाची शिक्षा देणारा
अथेन्सचा समाज आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जीवनमूल्यांशी तडजोड न करता
‘मृत्युदंड’ स्वीकारणारा सॉक्रे टिसदेखील मोठा! समाज मोठा; कारण तो सॉक्रे टिसच्या
विचाराने हादरला. त्याने विचारांची दखल घेतली. सॉक्रे टिस मोठा, कारण त्याने ‘मूल्य’ श्रेष्ठ
मानले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्याने टोकाचे बलिदान के ले. सामान्यांसाठी हे अवघड
आहे; पण सॉक्रे टिससाठी तेच स्वाभाविक होते, कारण ज्या व्यक्ती तत्त्वज्ञान जगत
असतात, त्याच वेळी ते मृत्यूची तयारी करीत असतात. समाज अभिसरणात आणि त्यातून
निर्माण होणारा ‘सॉक्रे टिस’ संवेदनशील असेल तरच इतिहासाची पुनरावृत्ती होते.
भारताच्या बाबतीत हेच झाले. स्वातंत्र्य आंदोलनात भारतीय समाजात अभिसरण सुरू
झाले; साचलेपण संपत चालले होते. यामुळेच भारतीय समाजमन एका आकारात व्यक्त
झाले व तो अतिशय संवेदनशील आकार म्हणजे ‘महात्मा गांधी’ होय.
दोन, समाजाला योग्य दिशा देणारे, मानवी नैतिक उत्क्रांतीला चालना देणारे हे महात्मे
धर्मपरायण होते. ‘धर्म म्हणजे सत्याचा शोध’ हा त्यांच्यासाठी धर्माचा अर्थ होता. सत्य
शोधताना ‘मन के ले ग्वाही’, ‘आतला आवाज’, ‘न्यायासाठी तर्क ’ हे त्यांच्या विचारांचे,
संवादाचे मुख्य आधार होते. जागतिक पातळीवर या अभिजनातील सुरुवातीची कडी
म्हणजे सॉक्रे टिस, जी इ.स.पूर्व होती. धर्म म्हणजे ‘सत्याचा शोध’ हा अर्थ डावलल्या जातो,
तेव्हा ‘धर्म म्हणजे विश्वास’ हा अर्थ रूढ होतो आणि तेव्हाच धर्मचिकित्सा थांबते,
समाजातील मानसिक गुलामगिरी सुरू होते, समाजाचे कन्डिशनिंग (बंदिस्त विचार समाज)
होते. विचारांचे साचलेपण होते. यास विरोध करण्यास कु णी सहसा पुढे येत नाही; पण
यापेक्षाही वाईट स्थिती होते, जेव्हा धर्माचा अर्थ के वळ ‘ओळख’ म्हणून होते. या वेळी
धर्माची गतिमानता गळून पडते. कर्मकांड, विशिष्ट प्रकारची जीवनपद्धती म्हणजे धर्म, अशी
स्थिती निर्माण होते. उत्सव व धर्मतत्त्व यांच्यातील सीमारेषा समाप्त होते. या
स्थितीतदेखील सत्यशोधनास प्राधान्य देणारा सॉक्रे टिसच किंमत मोजत असतो ही गोष्ट
लेखिके ने ठळकपणे मांडली आहे.
तीन, शाश्वत परिवर्तन के वळ भावनिक चळवळीने होत नाही. त्या चळवळीला विवेकी,
नैतिक विचारांचे व तसेच आचारांचे अधिष्ठान असले पाहिजे. हे अधिष्ठान सॉक्रे टिससारखी
माणसे देत असतात. ही माणसे तत्कालीन समाजाच्या अनेक शतके पुढे असतात, त्यामुळे
त्यांचा समकालीन समाज त्यांना समजण्यास असमर्थ असतो. असा न समजणारा समाज
त्यांना ‘विष पाजून तरी मारतो’ किंवा ‘गोळ्या घालून मारतो’. हे मारणे म्हणजे एका
टोकाची सेन्सॉरशिप असते. या सेन्सॉरशिपला कधी धार्मिकतेचा तर कधी राष्ट्रवादाचा
मुलामा दिला जातो. सॉक्रे टिसला धर्मविरोधी तर गांधींना मारताना राष्ट्रासाठी, अशी
भूमिका मारणारे घेतात. सॉक्रे टिस ते गांधी यांच्या बाबातीत हे घडले याचा उल्लेख करून
लेखिके ने याविषयी एक सूत्र अतिशय सूचकपणे मांडले आहे.
चार, सॉक्रे टिस ते महात्मा गांधी, धर्मपरायण असणाऱ्या या व्यक्ती Talk with care
listen with respect and differ with decency या अर्थाने लोकशाही वृत्तीच्या होत्या.
सॉक्रे टिसला ‘संवाद’ लोकशाहीचा आत्मा वाटत होता. तार्किकता त्याला मान्य होती; पण
शुष्कतर्क -कर्क शता त्याला अमान्य होती. न्यायासाठी, सत्यशोधनासाठी विवेकाधिष्ठित तर्क
त्याला मान्य होता. लोकशाहीच्या कर्मकांडाचा नव्हे तर लोकशाहीच्या आत्म्याचा तो
भोक्ता होता. ‘‘लोकशाही म्हणजे के वळ बहुमताचे राज्य नसून मानवी हक्काच्या
रक्षणासाठी ती एक संस्थात्मक चौकट आहे. सुसंस्कृ त समाजाने मानवी नैतिक
उत्क्रांतीसाठी के लेली ती रचना आहे.’’ ही रचना समाजाच्या जीवनपद्धतीचा व विचार
करण्याचा भाग व्हावा, यासाठी सॉक्रे टिसचे ‘संवाद’ प्रयोजन होते. सॉक्रे टिस, येशू ख्रिस्त,
थोरो, टॉलस्टॉय, महात्मा गांधी यांच्यात हे साम्य पहावयास मिळते. लोकशाहीच्या
आत्म्यासाठीच सॉक्रे टिसने सर्वप्रकारच्या कर्मकांडाला विरोध के ला. औपचारिक पूजेद्वारे
के ले जाणारे धार्मिक कर्मकांड असो किंवा हात वर करून निर्णय घेणे म्हणजे लोकशाहीचे
राजकीय कर्मकांड असो, त्यास सॉक्रे टिसचा विरोध होता. धार्मिक कर्मकांड करणाऱ्यांनी
सॉक्रे टिसला ईश्वरविरोधी घोषित के ले, तर लोकशाहीचे कर्मकांड करणाऱ्यांनी त्यास
देशद्रोही घोषित के ले. धार्मिक, राजकीय क्षेत्रातील या दोन प्रवृत्तींचा संघर्ष अद्यापही
संपलेला नाही. ‘एक थोर तत्त्ववेत्ता सॉक्रे टिस’ त्यासाठीच आहे.
पाच, ‘माणूस : सर्व विकासाचे मोजमाप’ हा विचार सॉक्रे टिस ते गांधी या धर्मपरायण
व्यक्तींना मान्य नाही. सॉक्रे टिसने हा विचार मांडताना म्हटले आहे की, माणूस
विकारानेदेखील भरलेला आहे. त्यास विकासाचा मापदंड लावल्यास अनेक नकोशा गोष्टी
होतील.
सॉक्रे टिसच्या या विचाराची गंभीर दखल घेतली गेली नाही. ‘माणूस : सर्वार्थाने विकासाचे
मोजमाप’ हा विचार विकारासहित स्वीकारला गेला. पर्यावरण, अन्य प्राणी यांचा विचार
के ला गेला नाही. त्याचाच परिणाम म्हणजे आजचा चंगळवाद. आज जगण्याच्या साधनांचा
फक्त विचार होतो, जगण्याच्या प्रयोजनांचा नाही. इंद्रियसुखास प्राधान्य हा विचार आज
महत्त्वाचा झाला आहे. हे होणार असे सॉक्रे टिसला वाटत होते म्हणूनच माणूस हा
विकासाचे मोजमाप नको, असे तो द्रष्टा म्हणत होता. माणूस मोजमापामुळे जीवनातून
नैतिकतेची फारकत होईल, हे कित्येक वर्षांपूर्वी त्याने सांगितले. माणूस हा मापदंड कल्पून
मांडणीत निसर्ग व माणूस यात द्वैत कल्पिले आहे. निसर्गास अंकित करणे त्यात आहे.
गेल्या चारशे वर्षांत हा माणूस ‘गोरा’ होता. त्याने उत्पादनावर भर दिला. पृथ्वीवरील व
भूगर्भातील संपत्ती लुटली. निसर्गात नको तितका हस्तक्षेप के ला. त्यासाठी विज्ञान,
तंत्रज्ञानाचा वापर के ला. आशिया-आफ्रिके तील लोकांना शोषणासाठी रानटी घोषित के ले.
‘जागतिक समाज’ विचारातून हद्दपार झाला. यासाठीच सॉक्रे टिसने माणूस नव्हे तर ‘ईश्वर’
अर्थात ‘सत्य’, ‘सद्वर्तन’ हाच विकासाचा मापदंड असावा, असा आग्रह धरला.
आजचा पर्यावरणाचा, प्रदूषणाचा, पाण्याचा तसेच निसर्गात निर्माण झालेल्या
असमतोलाचा प्रश्न, विचित्र जीवनपद्धतीमुळे निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न, हा
सॉक्रे टिसने मांडलेल्या विचाराकडे दुर्लक्ष के ल्याचा परिणाम आहे. ‘माणूस’ के वळ
मोजमाप नको म्हणून मांडलेल्या विचारांचा परिणाम पाहिल्यानंतर हजारो वर्षांनी महात्मा
गांधी यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ‘हिंद-स्वराज्य’मध्ये तोच विचार मांडला.
पाश्चात्त्य संंस्कृ तीला चंगळवादाने पूर्णत: काबीज के ले आहे, तेव्हा भारताने ती स्वीकारू
नये हा विचार मांडला. सॉक्रे टिसप्रमाणेच गांधींनीदेखील ‘ईश्वर’ म्हणजे सत्य, सद्वर्तन हाच
विचाराचा कें द्रबिंदू असावा, असे म्हटले.
सहा, ‘एक थोर तत्त्ववेत्ता सॉक्रे टिस’ वाचताना एक गोष्ट जाणवली व ती म्हणजे जगातील
सॉक्रे टिससारखी मोठी माणसे असे मानतात की, ‘‘ज्ञानाची एकच अट, नेणतेपण सोडू
नये’’ काही ‘न इति, न इति’ म्हणतात. सॉक्रे टिस ‘‘मला काय कळत नाही एवढेच मी
जाणतो’’ तर ‘‘मला प्राप्त झालेले ज्ञान, ज्ञानवृक्षाचे एक पान आहे’’ असे गौतम बुद्धांस
वाटते. ‘ज्ञान समुद्राप्रमाणे आहे आणि मला प्राप्त झालेले ज्ञान अंघोळीच्या वेळी लागलेल्या
पाण्याइतके च आहे’ असे आद्य शंकराचार्यांना वाटते. ज्ञानाच्या संदर्भातील हे महत्त्वाचे सूत्र
या पुस्तकाच्या माध्यमातून मिळते, हे या पुस्तकाचे योगदान आहे.
सॉक्रे टिसची अन्यायास विरोध करण्याची पद्धती नैतिक, अहिंसक आणि विवेकास चालना
देणारी आहे. तरुणांशी त्यांचा संवाद त्यासाठीच होता. आधुनिक लोकशाही सिद्धांतास
लागू होतील असेच त्यांचे विचार होते; पण हे विचार सॉक्रे टिसने फक्त विचारासाठी मांडले
नाही; ते त्याने अथेन्स आणि अथेन्समधील जनतेच्या हितासाठी मांडले. सॉक्रे टिसच्या वेळी
अथेन्समध्ये शौर्य, बुद्धिचातुर्य, लष्करी डावपेच यास महत्त्व आले होते. लष्करी
वातावरणाचे कौतुक होत होते. याचा परिणाम माणुसकी, चांगुलपणा, संवेदनशीलता,
परमसहिष्णुता, संवादाने प्रश्न सोडविण्याची पद्धती व अशाच प्रकारची सर्व अंकु रे स्पार्टात
लष्करी संस्कृ तीने जाळली होती. अथेन्स त्या दिशेने वाटचाल करीत होते. सॉक्रे टिसला
अथेन्सची ही वाटचाल दु:खद वाटत होती. यात नैतिक उत्क्रांतीचा आत्मा संपेल, असे
त्यास वाटत होते. हे होऊ नये यासाठी तो ‘संवाद’ करीत होता, तरुणांतील विवेक जागवत
होता.
सॉक्रे टिसला जे वाटत होते ते इतके सार्थ होते की, सॉक्रे टिसनंतर कित्येक शतकांनी
टॉयनबी या जागतिक कीर्तीच्या इतिहासकाराने लिहिले आहे की, लष्कराबद्दलची
आत्यंतिक आवड Arrested Civilization’ निर्माण करते. तेथे शूर लोक निर्माण होतात;
पण सुसंस्कृ त लोक निर्माण होत नाहीत, कारण लष्करी वृत्तीस समाजमान्यता असते.
उदारमतवादी विचार समाजात रुजू दिले जात नाहीत. द्वेष, वैरबुद्धी, तुच्छवृत्ती याचीच
पेरणी होते. अथेन्सवर प्रेम करणाऱ्या सॉक्रे टिसला हे होऊ द्यावयाचे नव्हते. तरुणांमध्ये
मिसळून संवाद करण्याचा त्यांचा प्रयत्न ’Arrested person’ आणि ’Arrested
Civilization’ आणि अथेन्समध्ये होऊ नये, यासाठीच होता. यासंदर्भात ‘स्टडी ऑफ
हिस्ट्री’ या ग्रंथात टॉयनबी यांनी एक महत्त्वाचे उदाहरण दिले आहे. टॉयनबी लिहितात की,
फिल्ड ब्लुचर हा रशियाचा उत्कृ ष्ट दर्जाचा सेनापती होता. असे सांगितले जाते की, तो
एकदा लंडन शहरात फिरत असताना तेथील लोकांची श्रीमंती पाहून एकदम उद्गारला, ‘लूट
करावी ती येथेच.’ त्याचे उद्गार लष्करी संस्कृ तीची देण होती. लष्करी संस्कृ तीत सर्व
सांस्कृ तिक अंकु र खुरटून नष्ट होतात.
येशू ख्रिस्त, थोरो, टॉलस्टॉय ते महात्मा गांधी यांनी मूल्यांना, नैतिकतेला यासाठीच महत्त्व
दिले. त्यांनी अन्यायास विरोध करण्याच्या त्या मार्गास महत्त्व दिले. ज्यातून ’Arrested
action ’ आणि ’Civlizartion’ निर्माण होणार नाही. ’Direct Action’ आणि ‘मिठाचा
सत्याग्रह’ यांचा तुलनात्मक अभ्यास के ल्यास पाकिस्तान व भारताच्या संदर्भात आपणास
दिसून येते की, ’Direct Action’ ची निर्मिती पाकिस्तानातील वर्तमान लष्करी संस्कृ ती
आहे, हे त्यासाठी अतिशय बोलके उदाहरण आहे.
सॉक्रे टिस लिखित शब्दातून कधीच व्यक्त झाला नाही, कारण त्याचे आचरणच त्याची
अभिव्यक्ती होती. महात्मा गांधीदेखील संदेश देताना म्हणत, ‘‘माझे जीवनच माझा संदेश
आहे’’. या व्यक्तींनी सुंदर कथा, कविता, साहित्य लिहिले नाही, त्यांची त्यांना गरज
भासली नाही; कारण त्यांचे जीवनच कविता, चित्र किंवा एखाद्या साहित्यासारखे सुंदर
होते. त्यांच्याबाबत लिहिलेल्या गोष्टी ‘सुंदर’ असतात, म्हणूनच शतकानुशतके त्या वाचल्या
जातात. अन्यथा सुंदर आचरणाशिवाय के वळ शब्दाद्वारे जी रचना व्यक्त होते, ती सुंदर
असते, आशयगर्भ असते; पण ती आत्मा नसलेल्या शरीरासारखी असते के वळ शब्द
अभिव्यक्ती सुंदर असणाऱ्यांची रचना सोडल्यास त्यांचा शरीररूपी सदरा मात्र आत्म्यास
घातलेला महारोगाने जर्जर व विरलेला, ओंगळ असतो.
याव्यतिरिक्त ‘सॉक्रे टिस ते गांधी’ या व्यक्तांत नम्रपणा होता. विचारांना गोठवून त्याचा वाद
(ism) ते निर्माण करीत नाहीत. सॉक्रे टिसला विशिष्ट विचारांची माणसे निर्माण करावयाची
नव्हती. विशिष्ट विचारांची माणसे निर्माण करणे म्हणजे मोठ्या माणसांच्या सावल्या
निर्माण करणे होय. स्वत:चे अस्तित्व नाकारणे हेच त्या सावलीचे संचित असते. अशी
माणसे त्यांना निर्माण करावयाची नव्हती. यासाठीच ते स्वत:ला गुरू म्हणून घेत नसत.
कशा पद्धतीने विचार करावा हे सॉक्रे टिसने सांगितले नाही, तर विचार करण्याचा अधिकार
असला पाहिजे याचाच त्याने आग्रह धरला. गांधींनी हीच परंपरा पुढे नेली. ‘ईश्वर सत्य
आहे’ असे म्हणणारे गांधी नंतर ‘सत्यच ईश्वर आहे’ असे म्हणाले. मानवी नैतिक उत्क्रांती
त्यांना सर्वांत महत्त्वाची वाटत होती, त्यासाठीच त्यांचा नम्रपणा होता.
इ.स.पूर्व सॉक्रे टिसच्या माध्यमातून निर्माण झालेली ही नैतिक उत्क्रांती महात्मा गांधींपर्यंत
येते. या विचारांच्या साखळीतील एक महत्त्वाची कडी समजून घेण्यासाठी ‘एक थोर
तत्त्ववेत्ता सॉक्रे टिस’ वैचारिक, नैतिक सामाजीकरण निश्चित करेल.
‘एक थोर तत्त्ववेत्ता सॉक्रे टिस’ या पुस्तकाद्वारे डॉ. सौ. नीता पांढरीपांडे यांनी ‘समाजातील
संवाद’ संपला की, किती मोठी किंमत मोजावी लागते याची सुरुवातीला के लेली मांडणी
सॉक्रे टिसच्या उदयाची गरज प्रतिपादन करते. ‘ग्रीक इतिहासा’मध्ये युनानी लोकांत लष्करी
संस्कृ तीचा प्रभाव विशद के ला आहे. त्याचा परिणाम लोकशाही व्यवस्था व लोकशाही वृत्ती
संपण्यात कसा झाला व अथेन्सच्या जीवनावर त्याचा कसा विपरीत परिणाम झाला, हे
लेखिके ने परिणामकारकपणे मांडले आहे. ‘ग्रीक तत्त्वज्ञानाचा पाया’ (Evangelist) मध्ये
अथेन्सच्या तात्त्विक वैचारिक वाटचालीचा आलेख आहे. या काळात वैज्ञानिक
दृष्टिकोनाची सुरुवात झाली होती. अगम्य, अमूर्त अशा आध्यात्मिकतेकडून वास्तवाच्या
अभ्यासाची, निरीक्षण पद्धतीने सुरुवात झाली होती. प्रस्तुत पुस्तकात लेखिके ने
सॉक्रे टिसचे योगदान विचारवंत सिसेरोच्या शब्दांत व्यक्त के ले आहे. सिसेरो म्हणतो,
‘‘सॉक्रे टिसने तत्त्वज्ञान स्वर्गातून खाली आणले, नगरातून त्याची स्थापना के ली, घरात
त्यास प्रवेश दिला आणि मानवी जीवन, नीती, सदाचार, विवेक यांच्या परस्परसंबंधांची
गरज प्रतिपादन के ली.’’
सॉक्रे टिसचे जीवन रेखाटताना त्याचा इंद्रियांवर ताबा होता. विचारमग्नता त्याचा स्थायिभाव
होता. तो मूर्तिकार होता म्हणजे त्यात एक कलाकार कार्यरत होता, परिणामत: तो
संवेदनशील होता हे न लिहिताही लेखिके ने उत्कृ ष्टपणे सांगितले आहे. सॉक्रे टिसची विद्वत्ता
लक्षात घेऊन मासिडोनियाच्या राजाने दरबारासाठी त्याला आमंत्रित के ले होते; पण त्यास
त्याने नाकारले. सॉक्रे टिस, त्याच्या (व्यक्तिमत्त्वाच्या) महान वस्त्राची चिंधी करून
मासिडोनियाच्या राजाला फडकविण्यासाठी देऊ इच्छित नव्हता. सॉक्रे टिसला बंदिस्त
विचार समाज (Conditioning) निर्माण करावयाचा नव्हता, तर ज्ञानपिपासूवृत्तीचा समाज
निर्माण करावयाचा होता, तोदेखील संवादाच्या माध्यमातून, हे लेखिके ने सुंदरपणे मांडले
आहे.
‘युदिफ्रो’ या धर्मशास्त्रज्ञाबरोबर झालेला संवाद लेखिके ने कौशल्यपूर्ण मांडला आहे.
युदिफ्रोबरोबर चर्चा करताना, उपासना पद्धतीस महत्त्व म्हणजे ‘सौदेबाजी’ आहे, तर
आचरणात नैतिकता म्हणजे ‘धर्मपरायणता’, या चर्चेअंती काढलेल्या निष्कर्षातून
लेखिके चे कसब प्रदर्शित होते.
‘क्रिटो’ हा सॉक्रे टिसचा मित्र. जेलमधून पळून जाण्याची योजना तो सॉक्रे टिसला सांगतो.
त्यावेळी क्रिटो व सॉक्रे टिस यांच्यात झालेला संवाद वाचनीय आहे. आत्मा हा शरीराचा दास
असतो; पण सदाचरण ठे वले तर शारीरिक विकारावर नियंत्रण ठे वता येते व आत्म्यास
मुक्त करता येते. मृत्यूच्या काही तासांपूर्वी मांडलेला सॉक्रे टिसचा हा विचार जीवनाच्या
प्रयोजनाबद्दल बरेच काही सांगून जातो.
सॉक्रे टिसवर खटला चालला, त्यात आरोप व त्यास सॉक्रे टिसने दिलेल्या उत्तरांची माहिती
‘सॉक्रे टिसवर खटला’ या प्रकरणात आहे. खटला चालवणारे व सॉक्रे टिस यांच्यातील
फरक यात सॉक्रे टिसच्याच शब्दात मांडला आहे. तो असा ‘‘माझ्याइतके च खटले
चालवणारे अज्ञानी आहेत. फरक इतकाच की, मला माझ्या अज्ञानाची माहिती आहे व ते
त्या अज्ञानासच ज्ञान समजत आहेत. ’’ ‘‘मी मृत्यूला घाबरत नाही; कारण जे मृत्यूला
घाबरतात तेच अज्ञानाचे प्रदर्शन करतात.’’ ‘‘मी मृत्यूला वरदान समजतो’’ ग्रंथातील अशी
वाक्ये जीवनाचे चिरंतन सत्य सांगतात.
सॉक्रटिसचे ‘आत्मसमर्थन’ वाचनीय आहे. त्यात सत्याच्या शोधासाठीच त्याने ‘मृत्युदंड’
स्वीकारला; पण स्वीकारलेल्या मूल्यांशी त्याने तडजोड के ली नाही. मूल्यांसाठी जगणारी
माणसे निर्माण व्हावीत, या अर्थाने मृत्युदंड शुभ व दैवी संके त आहे असे तो मानत असे.
पुस्तकात याची के लेली मांडणी विचारांना गती देते.
‘सॉक्रे टिसचे तत्त्वज्ञान’ या प्रकरणात हे पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा स्पष्ट होते.
चंगळवाद, भौतिकवाद, अनैतिकता व त्यातून निर्माण झालेली जीवनशैली स्वत:च्या
मालकीच्या वस्तूंच्या उंचीद्वारे स्वत:ची उंची दाखवण्याची स्पर्धा, Subhuman ते In-
humanअसा सुरू झालेला प्रवास लेखिके ने मांडला आहे. यास के वळ सॉक्रे टिसच्याच
विचाराने थांबवता येऊ शकते, असा काढलेला निष्कर्ष व त्यासाठी के लेली मांडणी विचार
करण्यास भाग पाडते.
अनेक लेखक सॉक्रे टिसच्या विचारांना फु टकळ स्वरूपात मांडत असतात; पण सॉक्रे टिस
व्यक्ती, आचरण, विचार, प्रासंगिकतेसहित अनेकांना माहीत नसतो. या पुस्तकाने ही
उणीव दूर के ली आहे. जॉन रस्किनचे ‘अन टू धीस लास्ट’, टॉलस्टॉयचे ‘गॉडस् किंगडम
विदीन यू’’ आणि महात्मा गांधी यांचे ‘‘हिंद-स्वराज्य’ या सर्व नैतिक उत्क्रांत विचारांची
पहिली कडी म्हणजे सॉक्रे टिसचे चिंतन. हे चिंतन मराठी वाचकांसाठी डॉ. सौ. नीता
पांढरीपांडे यांनी समर्थपणे या पुस्तकात मांडले आहे. जगण्याची साधने गोळा करताना
जगण्याच्या प्रयोजनाचाही विचार व्हावा, या विचाराचा अर्थ हे पुस्तक सांगते. ही या ग्रंथाची
जमेची बाजू आहे.
प्रा. बी. वाय. कु लकर्णी
जालना
मनोगत
सॉक्रे टिसवर मी पुस्तक लिहील असं कधीकाळी कोणी मला सांगितलं असतं, तर मी
त्याला नक्कीच वेड्यात काढलं असतं; कारण महाविद्यालयात सॉक्रे टिस शिकल्यानंतर
परत माझा सॉक्रे टिसच्या विचारांशी कधीही संबंध आला नाही. सॉक्रे टिसवर लिहिलेले
पुस्तक काही वर्षांपूर्वी आमचे स्नेही डॉ. हर्डीकर यांच्याकडे वाचले होते. वसंत पळशीकरांचे
ते पुस्तक होते. त्यानंतर इतक्या वर्षांत कधी सॉक्रे टिसविषयी वाचण्यात आले नाही.
काही महिन्यांपूर्वी साके त प्रकाशनच्या सौ. प्रतिमा भांड यांनी मला सॉक्रे टिसवर लिहिलेले
एक पुस्तक अनुवादासाठी आणून दिले. ते वाचल्यानंतर मला असे वाटले की, त्या
पुस्तकाचा अनुवाद करण्यापेक्षा आपण स्वतंत्र पुस्तक लिहावे. ही कल्पना सौ. प्रतिमा भांड
यांनादेखील आवडली आणि त्या दृष्टीने मी अभ्यास सुरू के ला. एक-एक पुस्तक जसं-जसं
मी वाचत गेले तसं-तसं मनाला तीक्रतेने जाणवलं की, सॉक्रे टिसचे जीवन, त्याचे तत्त्वज्ञान
हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत गरजेचे आहे. आज हजारो वर्षांनंतरही आपल्या
संतांप्रमाणेच त्याचे तत्त्वज्ञान, जीवनाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा
आहे.
सॉक्रे टिसचे जीवनचरित्र वाचताना मला तुकोबांचे जीवनचरित्र आठवले. किती साम्य आहे
दोघांच्या जीवनात! दोघांची साधी राहणी, पैशाविषयी उदासीनता, जीवनाकडे बघण्याचा
उदात्त दृष्टिकोन. अहो, एवढेच नव्हे तर दोघांच्या बायकाही खाष्ट, नवऱ्याचा पदोपदी उद्धार
करणाऱ्या अन् तेवढेच त्यांच्यावर प्रेमदेखील करणाऱ्या. या बायकांमुळेच कदाचित या
दोघांमध्ये स्थितप्रज्ञता आली होती की काय?
या पुस्तकामुळे वाचकांना सॉक्रे टिसची थोडीफार ओळख होईल. त्याच्याविरुद्ध करण्यात
आलेल्या आरोपांतील फोलपणा जाणवेल. त्याची जीवनपद्धती, त्याचे विचार, त्याचे
तत्त्वचिंतन याचादेखील परिचय होईल.
सॉक्रे टिस हा ज्ञानाच्या शोधात निघालेला अनंताचा प्रवासी होता. आपल्या उमेदीच्या
काळात त्याला नावीन्याचा, नव्या-नव्या कल्पना, संकल्पनांना जन्म देण्याचा ध्यास होता.
त्याची श्रद्धा होती की, त्याने हाती घेतलेले कार्य एक उदात्त अन् दैवी उद्दिष्ट आहे, जे
परमेश्वराने त्याच्यावर सोपविले आहे. चिंतन-मननातून समस्यांची उकल करणे आणि
अवती-भवतीच्या लोकांशी संवाद साधणे, हे तो स्वत:चे आद्य कर्तव्य समजत असे. त्याला
भौतिक सुखाचे फारसे आकर्षण नव्हते. आयुष्यातील त्याच्या गरजा फार मर्यादित
स्वरूपाच्या होत्या. कोणतेही वैचारिक ध्येय गाठण्यासाठी फारशा लवाजम्याची,
सुखसुविधांची गरज नसते. ‘साधी राहणी अन् उच्च विचारसरणी’ या सिद्धांताप्रमाणे
माणूस आपले वैचारिक क्षितिज गाठू शकतो, अशी सॉक्रे टिसची धारणा होती.
सॉक्रे टिस अतिशय साधे जीवन जगला. त्याची आकलनशक्ती अतिशय तीक्र होती.
सत्याचा शोध आणि न्याय-नीतिची चाड, याबद्दल तो अतिशय जागरूक होता. सदाचारी
आणि सुखी जीवनासाठी नैतिकता आणि बौद्धिक क्षमता महत्त्वाची असते, अशी त्याची
धारणा होती. आपल्या याच विचारांवर श्रद्धा ठे वून ज्ञानसाधनेद्वारे त्याने समाजाच्या जवळ
जाण्याचा प्रयत्न के ला. आपल्या सुखापेक्षा, स्वार्थापेक्षा सामाजिक कल्याण त्याला जास्त
महत्त्वाचे वाटत होते. जेव्हा समाजातील प्रत्येकजण सुशिक्षित अन् सुसंस्कारित होईल
तेव्हाच आपण एका सशक्त, सुंदर विश्वाची संकल्पना साकार करू शकतो अशी त्याची
धारणा होती.
माणसासाठी काय आवश्यक आहे? त्याला सुखाची प्राप्ती कशी होईल? जीवन कसे
जगावे? जीवनात कोणती गोष्ट प्राप्त करण्याचा प्रयत्न करायला हवा? या प्रश्नांची उत्तरे
हवी असतील तर त्याने मानवी स्वभाव, माणसाची खरी प्रकृ ती समजण्याचा ध्यास
घ्यायला हवा. त्याने असे के ले नाही, माणसासाठी काय चांगले हे जाणून घेण्याचा प्रयत्न
के ला नाही, तर अनेक प्रयत्न करूनदेखील त्याच्या हाती काहीही लागणार नाही.
सुखापर्यंत तो कधीच पोहोचू शकणार नाही.
सॉक्रे टिसचे सारे चिंतन माणसाने जीवन कसे जगावे, याभोवती होते. नंतरच्या शतकांत
बुद्धिमत्ता व प्रेम अधिक सैद्धांतिक अन् अव्यावहारिक होत गेले अन् लोकांच्या दैनंदिन
जीवनाच्या समस्यांपासून दूर होत गेले. बदलत्या काळाबरोबर बौद्धिक अन् भावनिक
विचार अव्यावहारिक होत होते. परिणामस्वरूप सॉक्रे टिसच्या वेळी दैनंदिन जीवन
अधिकाधिक असंवेदनशील झाले होते. या कोरडेपणाला ओलावा देण्याचे काम सॉक्रे टिसने
के ले.
पारंपरिक विचारांना फाटा देत सत्याचा शोध घेण्याची सॉक्रे टिसची अभ्यासू वृत्ती
विस्मयकारक होती. प्रश्न, जिज्ञासा, शंका याद्वारे पाठपुरावा करीत तात्त्विक संकल्पनांची
उकल करण्याची त्याची अभ्यासूवृत्ती ही प्रज्ञावंताला शोभेल अशीच होती.
सद्गुण, सद्विचार म्हणजे नेमके काय, नैतिकतेच्या पायावर जीवन समृद्ध करण्यासाठी नेमकं
काय करता येईल, एक चांगला संस्कारित समाज निर्माण होण्यासाठी नेमकं काय करता
येईल, त्यासाठी नेमक्या कु ठल्या नैतिक मूल्यांची कास धरायला हवी, अशा मूलभूत
प्रश्नांचा शोध घेण्याचा सॉक्रे टिसने यशस्वी प्रयत्न के ला. सॉक्रे टिसच्या या सर्व गोष्टी
माणसाचे जीवन संपन्न करण्यास आजदेखील मदत करू शकतात.
सॉक्रे टिसचे चिंतन अन् त्याचे तत्त्वज्ञानाचे विवेचन म्हणजे ज्ञानाचा शोधप्रवासच होता,
अज्ञाताकडून ज्ञाताकडे जाणारा प्रवास होता. आपल्या वैचारिक मतांचे प्रतिपादन तो
अतिशय सावधगिरीने करीत असे. आपण फार मोठे विद्वान आहोत, आपल्याला सगळं
समजतं असे न मानता अतिशय नम्रपणे तो आपल्या मर्यादा जाणून घेत असे.
आपल्या जीवनप्रवासात त्याने अनेक शत्रू निर्माण के ले. त्याच्या विचारधारेशी सहमत
नसणाऱ्यांनी त्याला दोषी ठरविले. त्याच्यावर भरपूर टीका झाली. टीका करणाऱ्यांचा
सत्ताधारी मंडळींशी जवळचा संबंध होता. त्यामुळे त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यापर्यंत
सत्ताधाऱ्यांची मजल गेली.
आज जवळपास अडीच हजार वर्षांचा काळ लोटला आहे; परंतु आजदेखील सॉक्रे टिसने
स्वत:च्या आत्मसमर्थनासाठी के लेले भाषण लोकांची मने जिंकू न घेत आहे. दु:ख हेच की,
ते भाषण ज्युरींची (तत्कालीन न्यायमंडळ) मने जिंकण्यास असमर्थ ठरले अन् सॉक्रे टिसला
आपले प्राण गमवावे लागले.
आज आवश्यकता आहे ती आत्मपरीक्षणाची, स्वत:ला पारखण्याची आणि आपापल्या
क्षमतेनुसार भविष्याकडे विवेकपूर्ण वाटचाल करण्याची. समाजातील विविध वर्गातील
जातिभेद, धर्मभेद दूर सारून सामंजस्याने संवाद साधण्याची.
जोपर्यंत आपले विचार बौद्धिक कसोटीवर उतरत नाहीत आणि आपले विचार आपल्या
कृ तींशी अन् विचारांशी सुसंगत राहत नाहीत, तोपर्यंत आपल्या तात्त्विक भूमिके ला अर्थ
उरत नाही. जोपर्यंत आपण सॉक्रे टिसच्या विचारांपासून काही शिकत नाही, तोपर्यंत
आपल्या अध्ययनाला काही अर्थ उरणार नाही. तत्त्वज्ञानाच्या अध्ययनातून जीवनात चांगले
बदल होणे गरजेचे आहे. चांगले काय, वाईट काय, सुख अन् समाधान म्हणजे नेमके काय?
या प्रश्नांचा शोध घेत जीवन जगले तरच ते सार्थक झाल्याचे समाधान आपल्याला मिळू
शकते. कोणत्याही गोष्टीच्या प्राप्तीसाठी के वळ प्रयत्न महत्त्वाचे नसतात- महत्त्व असते ते
शिखर गाठण्याचे, क्षितिजापर्यंत पोहोचण्याचे. तुम्ही अंतिम ध्येयापर्यंत पोहोचला नाहीत
तर तुमचे प्रयत्नदेखील निरर्थक ठरतात. ज्यावेळी आपल्या अस्तित्वाविषयी महत्त्वपूर्ण
शिकवण घेतली जाईल, तेव्हाच सॉक्रे टिसच्या विचारांचे अध्ययन अधिक उपयोगी अन्
सार्थक ठरेल.
मला खात्री वाटते की, हे पुस्तक वाचकांना मार्गदर्शक ठरेल. सॉक्रे टिसच्या विचारांनी प्रेरित
होऊन सकारात्मक जीवन जगण्याची प्रेरणा त्यांना मिळेल. जीवनात कठीण परिस्थितींना
तोंड देण्याचे सामर्थ्य त्यांच्यात येईल अन् आपल्या उद्देश्यविहीन, प्रेरणाहीन जीवनाला
सकारात्मक दिशा देता येईल.
सॉक्रटिसचे प्रामाणिक मत होते की, सुंदर जग प्रस्थापित करायचे असेल तर त्या देशांतील
जनता बुद्धिमान अन् समजूतदार असायला हवी. त्यांनी प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी न
स्वीकारता आलोचनात्मक दृष्टीने त्याचा विचार करून तर्क -वितर्काच्या कसोटीवर पारखून
घेऊन नंतरच त्याचा स्वीकार करायला हवा.
सॉक्रे टिसच्या विचारांचे चिंतन-मनन, अध्ययन होणं आज गरजेचं, अधिक उपयोगी अन्
प्रासंगिक झालं आहे.
हे पुस्तक जीवनाच्या विषम, कठीण परिस्थितींना तोंड देण्यासाठी, अत्यंत कु शलतेने
संकटांना सामोरे जाण्यासाठी उपयोगाचे ठरेल असा पूर्ण विश्वास वाटतो. सॉक्रे टिसच्या
विचारांनी प्रेरणा घेऊन आपण तशी वागणूक ठे वली, तर आपलेच नव्हे तर समाजाचे
जीवनदेखील नंदनवन होऊ शके ल.
प्लेटोने सॉक्रे टिसविषयी, त्याच्या विचारांविषयी, तत्त्वज्ञानाविषयी लिहून आपल्या गुरूचे
ऋण फे डले. त्या प्लेटोविषयी कृ तज्ञता व्यक्त करण्याचा हा अल्पसा प्रयत्न. तो कितपत
यशस्वी झाला, हे वाचकच ठरवतील.
या पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिण्याची तयारी दाखवून प्रा. बी. वाय. कु लकर्णी सरांनी जे
परिश्रम घेतले ते अत्यंत मोलाचे आहेत. त्यांच्या ऋणात राहणेच मला आवडेल.
‘साके त प्रकाशन’च्या सौ. प्रतिमा भांड अन् त्यांच्या संपूर्ण विभागाने जे परिश्रम घेतले
त्यासाठी त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. सर्वांच्या परिश्रमाने वाचकांसमोर एक
देखणे पुस्तक ठे वता आले, त्याचा अत्यंत आनंद होत आहे.
डॉ. सौ. नीता पांढरीपांडे
1. ग्रीक इतिहास
वैभवाचा खरा मार्ग म्हणजे सद्गुणी दिसणे
हा नसून सद्गुणी बनणे, हा होय.
प्राचीन ग्रीक कालखंड
ग्रीक अर्थात युनानमध्ये (हेलिना) प्राचीनतम वस्ती अन् सामाजिक जीवनाच्या विकासाला
इ.स.पूर्व 30,000 ते 10,000 च्या दरम्यान सुरुवात झालेली आढळून येते. त्यानंतर तेथे
गतीने विकासाला सुरुवात झाली अन् ग्रीक उत्तरोत्तर उन्नतीच्या शिखराकडे झेप घेऊ
लागला. जवळच्या पूर्व भागांतून विशेषत: अनातोलियामधून लोक ग्रीकमध्ये येऊन
वास्तव्य करू लागले. मध्य युरोपमधूनही लोकांचे तांडे या क्षेत्रात वास्तव्याला आले.
इ.स.पूर्व 3,500 ते 3000 च्या मध्यात निर्माण झालेल्या मोठ्या वस्तीकडे बघता हे स्पष्ट
दिसून येते की, त्या काळातील समाजाचे स्वरूप अत्यंत जटील होते. एक विशिष्ट अन्
शक्तिशाली वर्ग तेथे वेगाने स्थिर होत होता. त्यानंतरच्या काही काळातच सामाजिक
व्यवस्थेचे, जनजातीय संघटनेचे स्वरूप नष्ट होऊन त्याची जागा मुख्य प्रधानाने घेतली. या
काळात जनसंख्यावृद्धीचे प्रमाण फार कमी होते, असे दिसते. इ.स.पूर्व दुसऱ्या
सहस्राब्दीमध्ये मुख्यत: दोन शक्तिशाली युनानी संस्कृ तींचा उदय झाला. क्रिटे द्वीप समूहात
‘मिनोआन’ आणि मुख्य भूभाग युनानमध्ये ‘माइकीनेअन’ संस्कृ ती. प्रारंभिक कांस्य युगात
इ.स.पूर्व 3000-2000 क्रिटे अन् मुख्य क्षेत्र युनानमध्ये (ग्रीक) मोठी परिवर्तने घडून आली.
दोन्ही ठिकाणी जनसंख्येमध्ये मोठी वृद्धी झाली व एजियन सागराच्या पार अनातोलियाच्या
जवळ पूर्व भागापर्यंत व्यापारसंबंध प्रस्थापित झाले. याच काळात क्रिटे अन् मुख्य क्षेत्र
युनानमध्ये ‘किकलेडस् द्वीप’ समूह तयार झाला. हा द्वीप समूह युरोप अन् एशियाच्या
प्रगतीत साहाय्यक सेतूच्या रूपाने उदयास आला. किकलेडस् द्वीप समूह अन् युनान
दोन्हींकडे मिश्रित समाजाचा विकास झाला. यात कु शल कारागीर अन् राजनैतिक वर्ग
मोठ्या प्रमाणात दिसून येतो.
क्रिटेमध्ये विकास पावलेल्या संस्कृ तीला पौराणिक राजा मिनोसच्या नावाने ‘मिनोआन’
म्हटले जाते. इ.स.पूर्व 2000 काळात मिनोआनच्या लोकांनी राजवाडे बांधायला सुरुवात
के ली. पुढे हेच राजवाडे त्यांचे व्यापारचिन्ह (Trade mark) झाले. राजवाड्यांच्या निर्मितीचे
कार्य इ.स.पूर्व 1450 पर्यंत चालले. याच काळात आर्थिक, राजकीय अन् सामाजिक
संघटनेच्या क्षेत्रातील काम अत्यंत वेगाने होऊ लागले, अन् पूर्व भूमध्य सागरात व्यापार
सक्रिय झाला. याच काळात युनानमध्ये हस्तलिपीचे पहिले दर्शन झाले, याच काळाच्या
उत्तरार्धात मिनोआनचे व्यापारी पश्चिम क्षेत्रात दूरपर्यंत जाऊन स्पेनपर्यंत पोहोचले. तेथील
मोठमोठ्या राजवाड्यांची बनावट विशिष्ट धर्तीची होती. हे राजवाडे अधिक वस्तीच्या क्षेत्रात
होते अन् तेथे मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रम आयोजित के ले जात असत. एका भीषण
भूकं पात येथील अनेक राजवाडे उद्ध्वस्त झाले आणि तेव्हापासून र्‍हासाला सुरुवात
झाली. माइकीनेअन सभ्यतेने क्रिटेच्या भूमध्य सागरीय वाणिज्य क्षेत्रावर अधिकार मिळवून
ते काबीज के ले व 1200 इ.स.पूर्व पर्यंत मिनिआन सभ्यता पूर्णपणे विलयाला गेली.
इ.स.पूर्व आठव्या शताब्दीच्या काळात राज्यांना उभारण्याची संधी मिळाली.
पेलोपोनेसकच्या पूर्व किनारपट्टीवर अग्रोस अन् कोरिथ पतन (Port) या दोन्हींचा वेगाने
विकास झाला. समीपवर्ती पूर्वीय क्षेत्रांबरोबर व्यापार संबंध उदयाला आले. व्यापाराचे
मुख्य आकर्षण विलासी वस्तूंची आयात करणे हेच होते. या प्रक्रियेत स्वाभाविकच ग्रीक
लोकांचा संबंध फोनिशियाई लोकांशी आला. लोक तेथील भाषा शिकू लागले आणि ग्रीक
संस्कृ ती-सभ्यतेमध्ये बदल घडू लागला. हळूहळू येथे माइकोनिअन सभ्यता उदयाला येऊ
लागली आणि बघता-बघता त्याचा चरमोत्कर्ष झाला.
इ.स.पूर्व 1250 ते 1150च्या दरम्यान शेतकरीवर्गाचा विद्रोह अन् आंतरिक संघर्षाने जोर
पकडला या विद्रोहाने माइकोनियाचा पाया हादरला. काही इतिहासकारांचे म्हणणे असे
की-
‘‘या विनाशाचे बीज उच्चस्तरीय व्यवस्थेत आहे. या व्यवस्थेने सैन्य शक्तीचा आधार घेऊन
सत्ता टिकवून ठे वण्याचा प्रयत्न चालविला होता.’’
यानंतरच्या काळ्या युगात ग्रीसचे जवळच्या देशांशी असलेले संबंध जवळजवळ संपुष्टात
आले. त्यांच्याबरोबर असलेले व्यापारसंबंधही थांबले. याचा परिणाम म्हणून जास्तीत
जास्त लोक दूरच्या भागात जाऊन राहू लागले. आपल्या उदरनिर्वाहासाठी ते शेती करू
लागले.
ग्रीक सामाजिक, राजकीय संस्कृ तीचा पाया
इ.स.पूर्व 750 व 500च्या दरम्यानच्या काळात ग्रीक लोकांनी भूमध्य सागर खाडी अन्
काळा सागर यांच्या अनेक भागांत वस्त्या स्थापित करून सांस्कृ तिक प्रभाव पाडायचा
प्रयत्न सुरू के ला. इ.स.पूर्व 730 इटलीच्या तटवर्ती नगरांमध्ये इस्किया आणि
पिथेकु लईमध्ये धातूंचा व्यापार करण्याचा; तसेच त्यातल्या त्यात सुपीक जमिनी असलेल्या
आसपासच्या भूभागांवर कब्जा करून तेथे वसाहती निर्माण के ल्या. हळूहळू त्यांनी पाय
पसरायला सुरुवात के ली. त्यामुळेच दक्षिण इटली व सिसली क्षेत्रांना लोक मैग्ना गे्रशिया
(ग्रेट ग्रीक) म्हणू लागले.
मुखियाप्रधान व्यवस्था लोप पाऊन हळूहळू कु लीन घराण्यांची संस्कृ ती उदय पावली व
नागरी संस्कृ ती उदयाला आली. या स्पर्धेमुळे ज्या वंशाचे लोक प्रबळ असत त्यांच्याच हाती
सत्ता असे, त्या व्यक्तीची हुकू मशाही चाले. त्यामुळे सत्ता हा जन्मसिद्ध अधिकार नसून
‘योग्यतेच्या बळावर शासन’ हा मानदंड तयार झाला. राज्याच्या विकासाच्या दृष्टीने ही
महत्त्वपूर्ण घटना होती. तेव्हा हा निर्णय घेतला गेला की, नगरराज्य राजकारणाच्या दृष्टीने
एक संघटित समुदाय असायला हवा. प्रत्येक भूभाग जवळपास दोनशे वर्ग किलोमीटर
असेल व या छोट्या भागाला एखाद्या शहराशी जोडण्यात येऊन ते शहर कें द्र बनविले
जाईल. ही व्यवस्था तीन पिढ्यांपर्यंत चालली. नंतर या हुकू मशाही व्यवस्थेचा तख्ता
पालटला गेला अन् स्थापित व्यवस्था पूर्णपणे धुळीला मिळाली.
इ.स.पूर्व 8 व्या व 7 व्या शतकाच्या आरंभी स्पार्टाचा विकास एका लढाऊ राज्याच्या
रूपात झाला. या कठोर सामाजिक व्यवस्थेमध्ये एक सरकार अन् त्यात सगळ्या
नागरिकांचे प्रतिनिधित्व करणारी एक सभा होती. या काळात अथेन्स सर्वांत मोठे राज्य
म्हणून समोर आले.
त्यात एटिक द्वीपाचे काही क्षेत्रही जोडले गेले होते. उच्चकु लीन घराण्यातील सोलोनच्या
नेतृत्वाखाली अथेन्समध्ये एक नवीन व्यवस्था उदयास आली. ज्यामध्ये ‘‘राजकीय सत्ता
घरंदाज, कु लीन घराण्यांच्या हाती न राहता संपत्ती हा सत्तेचा आधार झाला. म्हणून स्पार्टा
आणि अथेन्स दोन्हींकडे वेगवेगळ्या तर्‍हेने राज्ये निर्माण झाली. असे करीत असताना
त्यांनी राजकीय कामात समाजाच्या व्यापक क्षेत्रांना सामील करून घेतले व लोकतंत्रांची
नीव ठे वली.’’
यापूर्वी असे कधीही घडलेले नव्हते.
ग्रीकांची लष्करी संस्कृ ती
इ.स.पूर्व 490 मध्ये फारसी साम्राज्यवादी लोकांनी जवळजवळ 20,000 पायदळ व 800
घोडेस्वारांनिशी अथेन्सवर आक्रमण के ले. युनानी लोकांनी 10,000 सैन्यांशी एटिक
प्रायद्वीपाच्या पश्चिमी किनाऱ्यालगत म्हणजे मैरायनच्या मैदानावर चिवट झुंज दिली.
युनानी रणकौशल्य, नवी व्यूहरचना निर्णायक ठरली. फारसी सैन्याची पिछेहाट झाली.
अथेन्सचा संदेशवाहक फिडीपिंडसन याने सलग दोन दिवसांत 240 कि.मी. अंतर कापून
विजयाची वार्ता दिली; पण अत्याधिक श्रमामुळे बातमी देतादेताच तो मरण पावला.
युनानी लोकांच्या जीवनात युद्ध ही गोष्ट खोलवर मुरलेली होती. पराभवाची तमा न
बाळगता फारसीयांनी ग्रीकवर पुन्हा स्वारी करण्याची तयारी के ली. त्यांची युद्धाची
खुमखुमी जिरली नव्हती. इ.स.पूर्व 481-479 चे फारसी युद्ध काहीसे वेगळे होते. फारसी
राजा खशयार शाह याने यावेळी 1 लाखापेक्षा अधिक फौजफाटा घेऊन ग्रीकवर आक्रमण
के ले. धर्मोपिलईत स्पार्टाच्या सैनिकांचा पराभव करून त्यांनी मध्य युनान काबीज के ले.
युनानी सेनेची पेलोपोनेसकच्या दक्षिण भागात पिछेहाट झाली. एटिक द्वीपसमूहावर
अधिकार करून अथेन्समध्ये लूटमार झाली. समुद्रीलढ्यात मात्र सेलेसिसच्या खाडीत
युनानी लढाऊ जहाजांनी फारसीयांचे बेडे पूर्णपणे नष्ट के ले त्यामुळे खशयार शाहला
ताबडतोब मागे वळावे लागले. मागे वळून तो एशियाला गेला. पुढील वर्षी प्लातयाच्या
युद्धात त्याची प्रचंड हार झाली.
या युद्धात युनानी सैन्याची कु शल रणनीती अन् राजकीय श्रेष्ठता निर्णायक ठरली. त्यानंतर
परत कधीही फारसीयांकडून युनानला आक्रमणाचे भय उरले नाही; परंतु या युद्धामुळे
फोनिशिया, लिडिया, मिस्र (इजिप्त) येथील जिवंत सांस्कृ तिक क्षेत्र नष्ट झाले. पुढील
शताब्दीपर्यंत या दुराव्याला जोडता आले नाही. परिणामत: एक विभाजित एशिया अन्
युरोपची धारणा निश्चित झाली.
प्राचीन ग्रीकच्या इतिहासात इ.स.पूर्व 480-479 ही वर्षे फार महत्त्वाची आहेत. इ.स.पूर्व
480 मध्ये सिसिलियन ग्रीकांनी कार्थेजचा पराभव के ला, तर इ.स.पूर्व 479 ला ग्रीकच्या
मुख्य भूप्रदेशातील ग्रीकांनी बलाढ्य इराणी (पर्शियन) साम्राज्याचा पराभव के ला. या दोन
विजयांनी ग्रीकच्या उत्कर्षाला मोठी चालना मिळाली. यानंतरच अथेन्स नगर राज्याच्या
उत्कर्षाला सुरुवात होऊन अथेन्सने आपले साम्राज्य स्थापित के ले.
पर्शियाविरुद्ध लढाईसाठी ग्रीक नगर राज्यांनी विशाल संघ स्थापित के ले. सैनिक तयार
के ले. अथेन्सने मुख्यत: साधनसामग्रीचे कारखानदारी उत्पादन करणारे उद्योजक,
कं त्राटदार, व्यापारी अन् एकं दर लढाईचे नेतृत्व करणारे पुढारी या भूमिका वठविल्या. धन,
सत्ता व प्रतिष्ठा यांनी अथेन्स समृद्ध झाले. येथील लोकसंख्या वाढली. या काळात ग्रीकच्या
भरभराटीचा उत्कर्ष पाहून आसपासच्या जगातून उद्यमी लोक, कारागीर, कष्टकरी लोक
आकृ ष्ट झाले. अथेन्सने आपल्या फायद्यासाठी सर्वांना नागरिकत्व प्रदान के ले.
फारसी धोका दूर झाल्यावर युनानी संघातील सदस्यांत ताळमेळ कमी झाला, नियमित
भांडणे होऊ लागली. स्पार्टाचा मुख्य उद्देश युनानी संघात फू ट पाडण्याचा होता. आपला
उद्देश पूर्ण झाल्याचे लक्षात आल्यावर स्पार्टाने हळूच संघटनेतून आपले अंग काढून घेतले
व अथेन्सने लीगवर आपला अधिकार स्थापित के ला व हळूहळू युनानी संघाचे निजी
साम्राज्यात रूपांतर झाले.
पर्शियाशी युद्ध करीत असताना आरंभी अनेक ग्रीक राज्ये, वसाहती बरोबरीच्या संबंधाने
एकत्र आल्या होत्या. स्पार्टाने त्यांचे नेतृत्व बराच काळापर्यंत के ले होते. युद्धाच्या अखेरच्या
पर्वात अथेन्सने पार्शिया साम्राज्याच्या आक्रमणविरुद्ध ग्रीक नगरराज्याच्या संघाचे नेतृत्व
के ले व जिंकले. या आलेल्या सामर्थ्यामुळे गाफील होऊन त्यांची वृत्ती अन् धोरणे
साम्राज्यवादी बनली. त्या काळात आसपासच्या राज्यांकडून संपत्तीचा ओघ येऊ लागला
होता. पार्थिनानसारख्या महान वास्तुशिल्पाने अथेन्स नटले. इ.स.पूर्व 478 नंतरच्या
अर्धशतकाचा काळ हा अथेन्सच्या वैभवाचा अन् सर्जनतेच्या उत्कर्षाचा काळ होता.
लोकशाहीचा पाया
ग्रीक कलात्मक अन् बौद्धिक संस्कृ तीचा उत्कर्षबिंदू म्हणून अथेन्सचा नावलौकिक होऊ
लागला. याच अहंकारामुळे इथल्या सत्ताधारी वर्गाला सत्ता आणि संपत्तीचा माज चढला.
प्रारंभीची ध्येयवादी वृत्ती मावळून सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचार माजला. स्वार्थी व
धनलोलूप राजकारणाची कीड अथेन्सच्या लोकशाहीत पसरली. लोकशाहीची झुंडशाही
बनली. लोकांना यशस्वीपणे झुकवणारे पुढारी सत्ता काबीज करू लागले.
इ.स.पूर्व 461 नंतर राज्यकारभारातील गोपनीयता कमी झाली. लोकांचा सहभाग वाढला.
त्यांना अनेक अधिकार प्राप्त झाल्यामुळे साहजिकच त्यांचा वचक वाढला. निर्णयप्रक्रिया
सार्वजनिक झाली. नगरराज्यसभेचे महत्त्व वाढले, ज्यात सर्व नागरिक हक्काने भाग घेऊ
शकत होते. कामकाजासाठी विविध समित्यांची स्थापना झाली. त्यामुळे प्रशासनात
नागरिकांचा सहभाग वाढला. पद सांभाळण्यासाठी व जबाबदारी स्वीकारण्यासाठी वेतन
देण्याची प्रथा सुरू झाली. त्यामुळे साहजिकच निवडक लोकांची मत्तेदारी हळूहळू संपुष्टात
येऊ लागली.
इ.पू. 461 ते 429 पर्यंतचा काळ पर्शियन वर्चस्वाखालून ग्रीक लोकांना मुक्त करण्यात,
स्वातंत्र्य, नीतिमत्ता यांचे राज्य स्थापित करण्यात गेले. यावेळी पेरिक्लिसने अथेन्सचे नेतृत्व
के ले. हळूहळू अथेन्सचा कायापालट झाला. कलागुणांचा विकास झाला, यामुळे दूरच्या
देशातून निपुण लोक येथे आकृ ष्ट झाले व तेथेच स्थायिक झाले. खरेपणा आणि नीतीचे
राज्य प्रस्थापित करण्यात पेरिक्लिसचे नेतृत्व लाभले. हेच अथेन्सचे वैशिष्ट्य आहे, तिचे
जीवितकार्य आहे असे म्हटले जाते.
इतिहासात पेरिक्लिसचे नाव लोकशाहीवादी पक्षाचा समर्थ नेता म्हणून अजरामर आहे.
‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’ ही त्याची अनुभवसिद्ध धारणा होती. आपल्या
कर्तृत्वाच्या, वत्तृत्वाच्या जोरावर त्याने लोकांची मने जिंकली. स्वत:च्या क्षमतेवर व
कर्तृत्वावर त्याला सार्थ आत्मविश्वास होता. इ.स.पूर्व पाचव्या शतकातील अथेन्स
नगरराज्यांमध्ये, विशेषत: पेरिक्लिसच्या नेतृत्वाखाली ग्रीक संस्कृ तीच्या सर्वांगीण
विकासाला चालना मिळाली.
ढासळती लोकशाही
अथेन्स नगरराज्याच्या वैशिष्ट्यपूर्ण राज्यघटनेमुळे झुंडशक्ती हे लोकशाहीवादी
राजकारण्यांच्या हातातील अत्यंत प्रभावी हत्यार बनले, तसेच तेथील महाजनवादी
शक्तींना ग्रीकमधील अन्य नगरराज्य, तसेच पर्शियासारख्या साम्राज्यवाद्यांच्या मदतीवर
अवलंबून राहणे भाग पडले आणि दोन्ही पक्षांनी नैतिकतेचा बळी घेतला. अथेन्सच्या
लोकशाहीवादी पक्षाने भ्रातृभाव व एकजुटीची भाषा करीत ग्रीकांवरच हुकू मशाही स्थापित
के ली. पक्षबाजीला उत्तेजन दिले आणि ग्रीसच्या भूमीवर स्पार्टाशी स्पर्धा करून, त्यांची
नाके बंदी करून आपल्या वर्चस्वाचा विस्तार करण्यास सुरुवात के ली.
इ.स.पूर्व 461 साली स्पार्टाविरुद्ध मोहीम उघडली. या युद्धाला ‘पेलोपोन्नोशियनवॉर’ असे
नाव आहे. या युद्धात आरंभीच्या काळात अथेन्सची सरशी होत गेली. या यशाने त्यांना
उन्माद आला. राजकारण्यांमध्ये व्यक्तिगत जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. अथेन्स
नगरराज्याचे रूपांतर साम्राज्यसत्तेत झाल्यामुळे सत्ता, पैसा व अधिकारातही स्वाभाविक
वाढ होत गेली. त्याचे नागरिकांमध्ये विकें द्रीकरण व्हावे, हा मुद्दा उपस्थित झाला. त्यामुळे
स्वाभाविकच स्वतंत्र नागरिक समाजाचे सर्वांगीण नैतिक अध:पतन मोठ्या प्रमाणावर व
झपाट्याने होत गेले. अथेन्समध्ये बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या व्यक्तींच्या हाती
औद्योगिक, व्यापारी उलाढाली कें द्रित होत गेल्या.
अथेन्सची न्यायालये व तेथील न्यायनिवाडा करणे, हे लोकशाहीवादी पक्षांच्या हातातील
हत्यार होते; कारण ही लोकन्यायालये होती. 500 व्यक्तांचा जमाव न्यायनिवाडा करीत
असे. त्यात सत्य-असत्य, विवेक याला तेवढे महत्त्व नव्हते. कोणीही आपल्या वत्तृत्वाच्या
जोरावर या जमावाला मंत्रमुग्ध करून आपल्याला हवा तो निर्णय करायला या लोकांना
प्रवृत्त करू शके .
ग्रीकांची फाटाफू ट
अथेन्सच्या वाढत्या लोकसंख्येमुळे अन्नधान्याच्या गरजा वाढल्या होत्या. काळ्या
समुद्राभोवतीच्या (Black sea) भागातून मोठ्या प्रमाणावर अन्नाची ने-आण होत असे.
बाकीही आवश्यक सामग्रीची आयात करावी लागे. या गोष्टीचा फायदा घेऊन स्पार्टाने
उचल खाल्ली आणि याच्या विरोधात पर्शियाच्या मदतीने नाविक दल उभारले. पर्शियाच्या
सम्राटाची अथेन्सला वेसण घालण्याची इच्छा होतीच. यामुळेच त्याने पूर्णपणे स्पार्टाची
मदत के ली. स्पार्टाच्या नेतृत्वाखाली अथेन्सला विरोध करीत अथेन्सबाहेरील राज्यांमध्ये
परंपरागत महाजनशाहीवादी पक्ष स्पार्टाभोवती संघटित झाला. याच सुमारास म्हणजे
इ.स.पूर्व 429 साली साथीच्या रोगात पेरिक्लिसला मरण आले. अथेन्सच्या कोंडीबरोबरच
त्यांचे अंतर्गत राजकीय व सार्वजनिक जीवनही अधिक पक्षपाती, निर्घृण, बेबंद आणि
अत्याचारी होत गेले. स्पार्टाचा दबाव दिवसेंदिवस वाढत गेला. इ.स.पूर्व 413 मध्ये
सायराक्युजवरील मोहिमेत शेवटी अथेन्सचा पराभव झाला व ग्रीक जगतात स्पार्टा वरचढ
ठरले.
इ.स.पूर्व 411 मध्ये संपूर्ण उलथापालथ झाली; परंतु तरीही पूर्णार्थाने परंपरागत
महाजनसत्ता प्रस्थापित होऊ शकली नाही. इ.स.पूर्व 404 मध्ये अथेन्सने स्पार्टापुढे सपशेल
शरणागती पत्करली. बहुमानाने अथेन्समध्ये तिसांची अस्मानी-सुलतानी महाजनशाही
(Regime of Tyrants) प्रस्थापित झाली; परंतु वर्षभरात पुन्हा लोकशाही पक्षाने ही
तीसभाईंची सत्ता उलथून टाकली.
❖❖❖
2. ग्रीक तत्त्वज्ञानाचा पाया
कष्टांवाचून जे मिळते, त्यात मौल्यवान असे काहीच नसते.
ग्रीकांची उत्सुकता
प्राचीन काळी ग्रीक लोकांना आपला देश सोडून इतर देशात वसाहती कराव्या लागल्या,
याचा ग्रीकच्या प्रगतीला फार उपयोग झाला. परदेशी लोकांसोबत त्यांचे दळणवळण सुरू
होऊन त्यांच्या संस्कृ तीचा परिणाम ग्रीक लोकांवर झाला.
परिणामत: त्यांच्या भोळसट कल्पना, अंधविश्वास दूर होऊन त्यांच्या आचारविचारांत,
व्यवहारात डोळस वृत्ती आली. बुद्धी आणि विचारांना चालना मिळाल्यामुळे जिज्ञासूवृत्ती
जागृत झाली.
तत्त्वज्ञानाचा उगम मानवाच्या जिज्ञासेतून होतो. त्यामुळे निर्सगातील सौंदर्य, चमत्कार,
अवकाश या साऱ्या गोष्टींवर माणूस विचार करायला आकृ ष्ट झाला. विश्वाच्या विविध
घटनांमागे त्यांच्यावर वर्चस्व गाजवणारा परमेश्वर असावा व त्यांच्या सत्तेने हे जग चालत
असावे हा विचार फार काळ टिकला नाही. कारण विश्वरचनेत विविधता असूनही त्यात
एकसूत्रता आहे किंवा अनपेक्षितपणे त्या घडून येतात, हा प्रश्न त्यांच्या मनात उत्पन्न झाला.
या विचाराने त्यांचे लक्ष दृश्यपदार्थांकडे गेले. भोवतालच्या अनेक पदार्थांचे मूलतत्त्व कोणते
असावे, त्यांची उत्पत्ती कशी झाली असावी, याचा ते विचार करू लागले.
तत्त्वज्ञानाचा जनक
ग्रीक तत्त्ववेत्ता थेलीस हा प्रश्न सोडविण्याच्या प्रयत्नात पहिला तत्त्वज्ञ होता, म्हणूनच
त्याला ‘तत्त्वज्ञानाचा जनक’ (Father of Pilosophy) हा मान मिळाला.
भोवतालच्या अनेक प्रकारच्या पदार्थांचे मूलतत्त्व कोणते, त्यांची उत्पत्ती कोणत्या मूळ
पदार्थांतून झाली असावी, याचा तत्त्वज्ञ विचार करू लागले. या प्रश्नाचे उत्तर सर्वप्रथम
आयोनिअन प्रांतातील मायलेटस् नगरात जन्म घेतलेल्या दार्शनिक थेलिस (इ.स.पूर्व 624-
548) याने दिले. या ब्रह्मांडात जे आहे ते सर्व जलातून निर्माण होते व जलात विलीन होते,
असे त्याचे म्हणणे होते. त्या दार्शनिकाने एक क्रांतिकारी पाऊल उचलले. प्राकृ तिक स्रोताचे
वर्णन करताना त्याने त्यात देवी-देवतांना दूर ठे वले. विशेष म्हणजे त्याने आपले विचार
कोठे ही नमूद करून ठे वले नाहीत.
‘‘ब्रह्मांडात जे आहे ते सर्व जलातून निर्माण होते व जलातच विलीन होते. या प्राकृ तिक
गोष्टी आहेत. यात देवी-देवतांचा काहीही संबंध नाही.’’
अनॉक्सिमँडर
थेलिसनंतर अनॉक्सिमँडर (इ.स.पूर्व 611-547) या तत्त्ववेत्त्याला थेलिसचा विचार पटला
नाही. त्याने या विषयावर सखोल विचार के ला. त्याच्या मतानुसार सर्व वस्तूंचा स्रोत पाणी
असू शकत नाही. पाण्याला अग्नीशिवाय अस्तित्व नाही. मग के वळ एकाच तत्त्वातून भिन्न
रंगांचे, रुचीचे, गुणांचे पदार्थ कसे निर्माण होऊ शकतील? त्यांचा एकाच तत्त्वांशी कसा
काय संबंध जोडायचा? हा सगळ्यात मोठा प्रश्न त्याला जाणवला; कारण घनपदार्थाचा द्रव
होण्यास उष्णतेची आवश्यकता असते. तसेच द्रवपदार्थावर अग्नीचा परिणाम झाला म्हणजे
त्याचे वायूत रूपांतर होते. अर्थात शीत, उष्ण किंवा शीतलता, उष्णता निर्माण झाली की,
त्यांच्या योगाने मूलभूत तत्त्वात विभक्तीकरण होते. (शीत, उष्ण, शुष्क, आर्द्र हे आपण
पदार्थांचे गुण मानतो; पण त्या काळात लोकांना पदार्थांच्या गुणांची, के वळ भाववाचक
गुणांची कल्पना नव्हती. द्रव्य व द्रव्याचा गुण असा भेद त्यांना माहीत नव्हता. अनेकदा
गुणांना ते पदार्थच मानीत असताना दिसून येते.)
अनाक्सिमँडरच्या पूर्वीच्या ग्रीक लोकांचे असे मत होते की, सूर्य, चंद्र, तारे रात्री समुद्रात
बुडून त्यातून सकाळी ती पूर्वेस उगवतात. हे मत अर्थातच अनॉक्सिमँडरला मान्य नव्हते.
त्याचे म्हणणे होते की, चंद्र, सूर्य, तारे वगैरे सर्व खगोल रात्रंदिवस एकसारखे फिरत
असतात. आपल्याला फक्त अर्धा खगोल दिसतो. दुसऱ्या अर्ध्याच्या आड पृथ्वी आलेली
असते. पृथ्वीचा आकार तबकडीसारखा असतो, हे थेलिसचे मत त्याला मान्य नव्हते. पृथ्वी
सर्व बाजूंनी आकाशाच्या समांतर आहे म्हणूनच ती स्थिर आहे. पृथ्वी विश्वाच्या मध्यभागी
निराधार अशी अधांतरी लोंबत आहे. विश्व गोलाकार असून, पृथ्वी त्याच्या कें द्राशी
असल्याकारणाने अधांतरी राहू शकते. पृथ्वीची लांबी उंचीच्या तिप्पट असल्यामुळे ती
खाली पडत नाही, असे तो म्हणे. त्याचे हे विधान आज अंशत: सत्य ठरलेे आहे.
पृथ्वीवर प्राणिवर्ग कसा निर्माण झाला असावा, या प्रश्नाकडे अनॉक्सिमँडरचे लक्ष वेधले
गेले. त्याच्या मतानुसार, आरंभी पृथ्वी जलरूपात होती. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ
होऊन जमीन व समुद्र उत्पन्न झाले. समुद्रात मासे उत्पन्न झाले. जलचर प्राण्यांपासून
जमिनीवरील प्राण्यांची उत्पत्ती झाली. मानवाच्या उत्पत्तीविषयी तो म्हणतो, शार्क मासा
अंडे फोडून पिल्लू बाहेर आले की, त्याला गिळून पोटात ठे वतो व आळीपाळीने बाहेर
काढतो. त्याच तर्‍हेने मानवाचे पूर्वज माशांच्या पोटात होते. नंतर सशक्त, स्वावलंबी
झाल्यावर ते जमिनीवर वावरू लागले. बॅबिलिऑन लोकांची अशीच समजूत होती की,
अति प्राचीन काळी मानव मत्स्य-मानव होता. या समजुतीवरून कदाचित त्याने
मानवोत्पत्तीविषयीचे मत बनविले असावे. अनॉक्सिमँडरची कल्पना अतिशय काल्पनिक
आहे; पण त्याने जगाच्या उत्पत्तीचे रहस्य शोधण्याचा प्रयत्न के ला, हेही तितके च खरे.
थेलिस अन् अनॉक्सिमँडर दोघेही पदार्थ शास्त्रज्ञ होते. दोघांचेही मत होते की, प्रत्येक वस्तू
भौतिक तत्त्वापलीकडे नाही.
पायथागोरस
सॅमॉसच्या पायथागोरसने (इ.स.पूर्व 580-507) बुद्धिमान गणिती, ज्योतिर्विज्ञानाचा
मार्गदर्शक अशी कीर्ती मिळविली होती. गायन-वादनातील सप्तस्वरांचे प्रमाण शोधताना
त्याला अंकवादाची कल्पना सुचली सर्व पदार्थांचे मूलतत्त्व अंक आहे, असे त्याने मानले.
या आधीच्या तत्त्ववेत्त्यांच्या दृष्टीने अग्नी, जल व वायू ही तीन तत्त्वे होती. पायथागोरसच्या
मताने ही तत्त्वे नसून इतर पदार्थांप्रमाणे ते भौतिक, नाशवंत, विनाशी आहेत व त्यांची
निर्मिती अंकापासून झाली आहे. पायथागोरियन तत्त्वज्ञ अंकाच्या गुणांपेक्षा त्याच्या
आकाराला अधिक महत्त्व देत. त्यांचे म्हणणे असे की, प्रत्यक्ष पुढे असलेल्या एखाद्या
पदार्थापेक्षा त्या पदार्थांचे काल्पनिक चित्र (Conception) अधिक शुद्ध असते. हे चित्र
प्रत्यक्षापासून जितके दूर असेल तितके ते सरस, शुद्ध व सत्य असते. पायथागोरसने
दृश्यपदार्थ अपूर्ण म्हणून त्यांना सत्य मानण्याचे सोडून दिले आणि त्यांचे स्थान अंकांना
दिले.
हेरॉक्लिटस्
सॉक्रे टिस युग प्रारंभ होण्याआधीच्या काळातील प्रसिद्ध दर्शनिकांमध्ये एफिससचा
हेरॉक्लिटस्चे (Heraclities) (इ.स.पूर्व 535-480) नाव महत्त्वपूर्ण आहे. हेरॉक्लिटस् हा
सर्वत्र मान्यता पावलेला विचारी पुरुष होता. प्रतिभासंपन्न अशी त्याच्याइतकी ख्याती
त्यावेळी अन्य कोणाचीही नव्हती.
मानवस्वभावाविषयीचे त्याचे विचार निराशाजनक असल्यामुळे त्याला रडका तत्त्ववेत्ता
(The Weeping Philospher) हे नाव पडले होते. त्याचे विचार रहस्यात्मक होते.
पायथागोरसने जरी द्वितत्त्ववादाला (Dualism) प्रारंभ के ला, तरीही थेलिस व
अनॉक्सिमँडरच्या एकतत्त्ववाद (Monoism) बंद पडला नव्हता. एकतत्त्ववादाचा विचार
चालू असताना दुसरा प्रश्न समोर आला. तो म्हणजे मूलतत्त्व जर एकच, तर त्यातून विविध
प्रकारचे अनेक पदार्थ कसे उत्पन्न झाले? आतापर्यंतच्या तत्त्वज्ञांनी मानलेली अग्नी, जल,
वायू वगैरे सर्व तत्त्वे भौतिक होती; पण एवढ्याने ग्रीक तत्त्वज्ञांचे समाधान झाले नाही. ते
खोल विचार करू लागले. के वळ दृश्यपदार्थांचा विचार न करता ते आता मनाच्या क्षेत्रात
शिरून त्याचा विचार करण्यात गुंतले.
तेव्हा हेरॉक्लिटस्ने अग्नीपासून सर्व पदार्थ उत्पन्न होतात व अग्नीत विलीन पावतात, असे
म्हटले. हेरॉक्लिटस्चा अग्नी म्हणजे उष्णता, जळत असलेला दृश्यअग्नी नव्हे. तो म्हणतो,
‘‘अग्नी हे अत्यंत शुद्ध व पूर्ण तत्त्व आहे. हे अत्यंत स्वयंभू तत्त्व सर्व दृश्य सृष्टीच्या मुळाशी
आहे. हे तत्त्व सतत नियमित प्रमाणात जळत असते. पदार्थाच्या जीवनाला आवश्यक
तेवढ्या प्रमाणात अग्नी वाढत किंवा कमी होत असतो. पदार्थमात्रात अग्नी उत्पन्न होऊन
त्यातून दुसरे पदार्थ निर्माण होतात व त्यातच ते विलीन होतात. ही रूपांतरे होताना अग्नीचे
जल, जलाची पृथ्वी (माती) व पृथ्वीचे पुन्हा जल व जलाचेे तेज म्हणजे अग्नी अशी ही
स्थित्यंतरे होत राहतात.
हेरॉक्लिटस् म्हणतो, ‘‘अग्नीचा हा विश्वनिर्मितीचा खेळ एखाद्या लहान मुलाच्या
गारगोट्यांचा किंवा समुद्रकिनाऱ्यावर वाळूचे किल्ले बांधण्याच्या खेळाप्रमाणे आहे. मुलगा
खेळाच्या शेवटी गोट्या फे कू न देतो किंवा वाळूचे किल्ले मोडून टाकतो. त्यातलाच हा
अग्नीचा खेळ आहे. जोड-मोड, मोड-जोड हाच नियम विश्वातील सर्व लहान-मोठ्या
घटनांच्या नियमांच्या मुळाशी आहे. या मूलभूत तत्त्वापासून निर्माण झालेले सबंध विश्व
जोडमोडीच्या नियमित कार्याने, के वढ्याही दीर्घ कालांतराने का होईना, पूर्वस्थितीला येणार
व पुन्हा उत्पत्ती व लय या चक्राने सतत असेच फे रे करीत राहणार.’’
We are rather taught to regard him (fire) as a boy at play amusting himself
with Counters and building castles on the seashore for the sake of throwing
them down again Construction is the principle which regulates all the
circles of natural life from the smallest to the gratest Cosmos itself which
spring from the primary fire is bound to return do it again by a double
process in fixed periods and will constantly repeat its duration operation.’’
(Greek Thinkers Vol I by prof Theodar Goperz.)
अग्नी हा शरीरातील आत्म्यासारखा आहे. हा अग्निरूपी आत्मा सर्वांत सुज्ञ व ज्ञानी आहे.
आत्म्याचे शुद्धत्व अग्नीच्या शुद्धत्वावर अवलंबून असते. अत्यंत शुद्ध अग्नीचा आत्मा
अत्यंत शुद्ध, उच्च कोटीतला व सर्वज्ञ असतो, असे हेरॉक्लिटस् म्हणतो. जग या तत्त्वावर
चालते. विश्वाचा प्रलय होऊ शकतो; पण हे तत्त्व नष्ट होत नाही. अग्नी व आत्मा भिन्न
नाहीत.
जड द्रव्य हे अनादी व अनंत आहे, असा थेलिसपासून हेरॉक्लिटस्पर्यंत सर्व भौतिकवाद्यांचा
सिद्धांत आहे. हेरॉक्लिटस्च्या मताची प्रतिक्रिया होऊन हा सर्वसामान्य विशेष सिद्धांत पुढे
आला व त्यात इतर तत्त्ववेत्त्यांच्या विचारांची भर पडून त्यात सुधारणा झाली.
ग्रीक तत्त्ववेत्त्यांमध्ये अनॉक्सिमँडर व हेरॉक्लिटस् हे दोन तत्त्ववेत्ते, त्यांची स्वतंत्रपणे विचार
करण्याची शक्ती, त्यांच्या पद्धती, त्यांनी निर्भयपणे मांडलेले सिद्धांत व त्यांचे तर्क शुद्ध
विचार सर्वच अफलातून होते. म्हणूनच प्राचीन तत्त्ववेत्त्यांमध्ये त्यांना मानाचे स्थान प्राप्त
झाले.
पार्मिनिडीस
यानंतर महत्त्वाच्या तत्त्ववेत्त्यांमध्ये इलियाच्या पार्मिनिडीसचे (Parmenides)
(इ.स.पूर्व540-470) नाव प्रामुख्याने घेतले जाते. पार्मिनिडीसला पायथागोरस व
हेरॉक्लिटस्चे विचार मान्य नव्हते. त्याच्या मते, अनंतत्व (Infinity), अनेकत्व (Plurality)
आणि बदल (Change) यांना अस्तित्व नाही. सत् (Being), सर्वस्वी एकरूपी (Pluraly),
अविकारी (Change) असा एक गोल असून, तो अविभक्त आहे. हे गोलाकार सत्
बुद्धिमान, अचल व अविकारी आहे. पदार्थाचा रंग पालटला किंवा तो एका जागेवरून
दुसरीकडे गेला तर त्या ठिकाणी नवा येईल, असे मानणे आवश्यक आहे. अन्यथा सत्
आणि असत् यात फरक राहणार नाही. दोन्ही एकच होतील व अस्तित्वाच्या मूळ नियमांचा
भंग होईल. सत् हे कें द्रापासून सर्वत्र पसरलेले आहे, म्हणजे सत् हे भौतिक आहे.
पार्मिनिडीस जडवादी व आदर्शवादी होता. पार्मिनिडीस्चे मूलभूत तत्त्व सत् (Being)
असून, त्याच्या मताप्रमाणे ते अवकाश (Space) व्यापून आहे व गोल आहे. त्याचा अर्थ ते
जड आहे. दुसरे असे की, त्याच्या मताने सत्चे ज्ञान इंद्रियांनी होणे शक्य नाही. हे ज्ञान
बुद्धीचे होते. उदाहरणार्थ एखाद्या वस्तूचा आकार, रंग-रूप वगैरे विशेष इंद्रियांना दिसणारे
आभास आहेत. त्यांच्यामागे त्या वस्तूचे जे जाती-निदर्शक वैचारिक चित्र राहील, तेच फक्त
सत् होय. यालाच चित् (Being किंवा Idea) म्हणतात. या दृष्टीने त्याला आदर्शवाद म्हणावे
लागेल.
पार्मिनिडीस्ने सत्विषयीचे विचार मांडताना हे जग पूर्ण गोलाकार आहे, ते कें द्रापासून सर्वत्र
सारखे पसरलेले आहे, असे म्हटले आहे. त्याचे हे मत दृश्यविश्वाला लागू पडते. त्याच्यानंतर
येणाऱ्या तत्त्ववेत्त्यांवर या मताचा परिणाम होऊन तेदेखील विश्वाला गोलाकार मानू लागले.
पृथ्वी गोल आहे आणि गोल एक असा आकार आहे, ज्यात भिन्न प्रकार निर्माण होणे शक्य
नाही. त्याला आरंभ किंवा अंत नाही. म्हणजेच तो पूर्ण आहे.
हेरॉक्लिटस् व पार्मिनिडीस इंद्रियजन्य ज्ञानावर विश्वास ठे वत नाहीत. त्यांना ते भ्रामक
वाटते. सत्यज्ञान विचारांच्या अन् तर्काच्या कसोटीवर खरे उतरणे आवश्यक आहे, असे
त्यांचे प्रामाणिक मत होते.
डेमोक्रिटस्
डेमोक्रिटस् (Democritus) (इ.स.पूर्व 460-370) हा एक विद्वान पंडित होता.
संशोधनकार्यात त्याने मानवी अनुभवाची व्यावहारिक बाजू पाहून तिचा उपयोग के ला.
डेमोक्रिटस्ने सर्वप्रथम नीतीची पद्धतशीरपणे मीमांसा के ली. त्या आधीचे तत्त्ववेत्ते मूलभूत
तत्त्व, सतत्त्व शोधण्याच्या मागे होते. डेमोक्रिटस्च्या काळात मानवी आचारविषयक
संशोधनास सुरुवात झाली. त्याने विचारांचे एक नवे क्षेत्र सुरू के ले. ज्ञानप्राप्तीच्या
मार्गातील अडचणी व मानवी आचारांचे (वैयक्तिक, सामाजिक व राजकीय) प्रश्न पुढे
घेतले.
डेमोक्रिटस्ने अणूंची युगप्रवर्तक व्याख्या के ली. तो म्हणतो, ‘‘गोड-कडू, उष्ण-थंड हे गुण
सांके तिक आहेत. तसेच रंगही सांके तिक आहेत. सत्य म्हणजे फक्त अणू व अवकाश’’
(According to Convention there are a sweet and bitter a hot and a cold and
according to Convention there is colour in truth there are atoms and a void
Greek Thinkers VoI1)
संके त व नैसर्गिक गुण मानवनिर्मित, परिस्थितीतून निर्माण झालेले असून, ते सापेक्ष
असतात. आजारी माणसाच्या तोंडाला चव नसते. चविष्ट पदार्थदेखील त्याला बेचव
लागतात; पण दुसऱ्याला ते तसे वाटत नाहीत. एखादा पदार्थ कोणाला खूप आवडू शकतो,
तर दुसऱ्याला तो अजिबात आवडत नाही. याचा अर्थ असा होतो की, पदार्थांचे गुण
व्यक्तीवर अवलंबून आहेत. ते पदार्थाचे गुण नव्हेत, तर ते व्यक्तिनिष्ठ आहेत, वस्तुनिष्ठ
नाहीत. डेमोक्रिटस्ने एक नवीन आणि अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत लोकांपुढे मांडला.
ज्ञानप्राप्ती कशी होते, याविषयी आपले विचार मांडताना तो म्हणतो, ‘‘अत्यंत गतिमान
अणूमुळे मनातील वैचारिक घटना घडतात. माणसाचे विचार हे अत्यंत वेगवान
असल्याकारणाने त्यांना अणूदेखील तसेच गतिमान लागतात. त्या अणूंचा उपयोग
जीवधारणेसाठी होतो. कारण शरीरात सारखा बदल चालू असतो. या सर्वाला कारण
म्हणजे आत्मा (Soul) व प्राण (Vital Force) एकच.
आत्म्याची क्रिया करविणारे अणू अत्यंत सूक्ष्म, गोल व मृदू असतात. त्याच्या तीक्र गतीमुळे
ते शरीराच्या बाहेर पडण्याचा संभव असतो. त्यांना अडथळा उत्पन्न करण्याकरिता
श्वासोच्छ्वासाची योजना आहे. श्वासाने अणू बाहेर न पडता आत खेचले जातात.
उच्छ्वासाने अणू सतत कार्यक्षम राहतात. श्वासोच्छ्वासाची क्रिया थांबली की, ते स्खलित
होतात व त्यामुळे मृत्यू येतो.
डेमोक्रिटस् इंद्रियज्ञान व बुद्धी यात फरक मानतो. संवेदनांचा संबंध पदार्थाच्या गुणांशी
असतो व ज्ञानाचा संबंध अणूंच्या मूलत: असणाऱ्या विशेषांशी येतो, असे त्याचे मत होते.
ज्ञान दोन प्रकारचे असते. एक निश्चित किंवा सत्य ज्ञान व दुसरे संदिग्ध, अस्पष्ट ज्ञान. पाच
इंद्रियांचे ज्ञान हे संदिग्ध ज्ञान. सत्य ज्ञान हे इंद्रियांच्या पलीकडचे असते. कारण इंद्रियांचा
अत्यंत सूक्ष्म सत्शी, अणूंशी संबंध येणे अशक्य आहे. म्हणूनच सत्यज्ञानाची कसोटी बुद्धी
आहे, असे डेमोक्रिटस् म्हणतो.
‘‘ज्या विश्वात अविनाशी अणू आहेत, जेथील घटना यांत्रिक नियमांनी होतात तेथे परमेश्वर
त्याच्याकडून होणारी विश्वनिर्मिती, त्याचे अमरत्व या विचारांना स्थान राहत नाही. देवी-
देवता म्हणजे नैसर्गिक घटनांचे प्राथमिक अवस्थेतील मानवाने के लेले मानवीकरण
(Personification) होय,’’ असे डेमोक्रिटस् म्हणतो.
‘‘मानवजीवन अत्यंत क्षुद्र आहे. मानवाचा ज्या पृथ्वीवर वास आहे त्या पृथ्वीचे निसर्गत:
असलेले वैशिष्ट्य हिरावून घेऊन त्याने पृथ्वीचे असामान्य महत्त्व गमवावयास लावले व
मानवाच्या दृष्टीने अनंताच्या किनाऱ्यावर ती एक वाळूचा कण घेऊन बसली तर मानव
किती क्षुद्र दिसेल? जिवाचे रान करून ज्या ध्येयाच्या मागे आपण लागतो, ते कवडीमोल
ठरतील. मानवाचा विनय व नम्रता यांना कवडीमोल महत्त्व उरेल व त्याचा उद्धटपणा व गर्व
किती क्षुद्र वाटतील?
How petty must man appear how worthless his aims pursued by most of us
with such breathless haste how grate his modesty and humility how small
his arrogance and pride if it losed all its claim to unique distinction and
becomes in his eyas a grain of sand ao the shore of the infine p.368 नवाने
समाधानी वृत्तीने राहून आत्मिक शांती ढळू न देणे श्रेयस्कर आहे. क्षणभंगुर सुखाच्या मागेे
न धावता आत्म्याला शांती मिळून आनंदप्राप्ती होईल हे ध्येय माणसाने डोळ्यासमोर
ठे वावे, असे त्याला वाटे. नैतिक शिक्षण किंवा शिकवण कायद्याने किंवा कोणावर
जबरदस्ती करून बळजबरीने अंगी उतरवता येत नाही. शिक्षेच्या भीतीने दुष्कृ त्ये
टाळण्यापेक्षा दुष्कृ त्ये टाळून सत्कृ त्य करणे, हेच त्याचे कर्तव्य आहे असे समजून वागणे
योग्य. दुष्कृ त्ये न करणे यात चांगुलपणा नाहीच. त्याला नैतिक महत्त्वही नाही, तर मुळात
वाईट काम करण्याची इच्छा न होणे हाच खरा चांगुलपणा, हीच खरी नीती असे तो मानीत
असे.
दुसरा कालखंड
ग्रीक तत्त्ववेत्त्यांचा पहिला कालखंड डेमोक्रिटस् अखेर संपतो. ग्रीक तत्त्वज्ञानाची मजल
मूलभूत तत्त्व शोधण्यापलीकडे गेली नव्हती. विश्वाचा उलगडा करण्याकरिता ते प्रयत्नशील
होते. याच अनुषंगाने देवी-देवता, परमेश्वर, आत्म्यासंबंधीचे विचार त्यांनी मांडले.
सोफिस्टांच्या काळात तात्त्विक प्रश्नापेक्षा व्यावहारिक प्रश्नांचा विशेष विचार झाला. सत्य व
असत्य यातील अंतर कसे ठरवायचे अशा प्रश्नांवर विशेष विचार झाला व या अनुषंगाने
स्वाभाविकपणे शिक्षण, त्याचे स्वरूप, कला, मीमांसा यांचा विचार झाला. व्यावहारिक
शिक्षणाचे नियम ठरविण्याचा प्रयत्न झाला.
प्रोटागोरस (Protagoras) या काळातील अतिशय बुद्धिमान व प्रतिभासंपन्न सोफिस्ट
तत्त्ववेत्ता होता. इ.स.पूर्व 480-411 हा त्याचा काळ. त्याचा जन्म थे्रस प्रांतातील अ‍ॅब्डिरा
नगरात झाला. त्याने शिक्षणाविषयी बराच विचार के ला असावा असे दिसते. तो म्हणतो,
‘‘अध्यापनाला मनुष्याचा स्वाभाविक कल व प्रत्यक्ष अध्यापन-कार्य यांची जोड आवश्यक
आहे. त्याची सुरुवात तरुण वयातच व्हायला हवी. प्रत्यक्ष कार्याशिवाय शास्त्र किंवा
शास्त्राशिवाय कार्य यांचा काहीच उपयोग होणार नाही.’’
Teaching requires natural disposition and exercise and must be begun in
youth Neither thory without practice nor practice theory avails at all.
प्रोटागोरसचा संघटित समाजव्यवस्थेवर फार भर होता. संघटित संस्था व सामाजिक संके त
(Conventions) यांनी मानवाला पशुकोटीतून बाहेर काढले, असे त्याचे मत होते.
बालपणीच शिक्षण सुरू करून सदाचरणाचे धडे विद्यार्थ्यांना द्यावे, असे त्याचे म्हणणे असे.
सोफिस्ट पंडितांच्या काळात सॉक्रे टिसचा जन्म झाला. तत्त्वदर्शनाचा शास्त्रशुद्ध पाया कसा
असावा, हे त्याने दाखविले. म्हणूनच त्याच्या तत्त्वज्ञानाला ‘तत्त्वज्ञानाचे तत्त्वज्ञान (
Philosphy of philosopy) म्हणतात. तर्क शुद्ध ज्ञान हेच सत्यज्ञान व ज्ञानाची कसोटी
तर्कावरच लागली पाहिजे, असा सॉक्रे टिसचा आग्रह होता. त्याच्या मताप्रमाणे ही कसोटी
लावायची म्हणजे प्रथम आपण योजित असलेल्या शब्दांचा अर्थ निश्चित करणे आवश्यक
आहे, शब्दांच्या व्याख्या ठरविणे गरजेचे आहे. ज्ञानप्राप्तीचा मार्ग शोधताना त्यांच्यात
व्याख्या करण्याची प्रवृत्ती उत्पन्न व्हायला हवी.
सॉक्रे टिसचे मत होते की, भौतिक सृष्टीचे सत्य सापडणे अशक्य गोष्ट आहे. तेव्हा त्या
संशोधनात वेळ घालवू नये. मानवी आचारविचार, व्यवहारचारित्र्य हीच सत्यशोधनाची क्षेत्रे
आहेत. पदार्थ व घटना पाहून त्यांचे मनात पडणारे प्रतिबिंब म्हणजे त्याचे सत्य ज्ञान नव्हे.
जोपर्यंत त्या प्रतिबिंबाचा मनाच्या कार्याशी, विचारांशी संबंध येत नाही तोपर्यंत सत्याचे
ज्ञान होणे के वळ अशक्य आहे. ज्ञान हे बाह्य गोष्टीत नसते. शुद्ध तर्क बुद्धीने पदार्थांचा
विचार करून त्याचे ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न के ला तरच ज्ञानप्राप्ती होईल, असे तो म्हणे.
त्याला माणसाच्या अज्ञानाचे कारण त्याचे शब्दार्थांचे अज्ञान वाटे.
सॉक्रे टिसने निसर्गाच्या सर्वांगांचा विचार कधी के ला नाही. त्याचे लक्ष्य नैतिक मूल्यांकडे
होते. नैतिक मूल्यांचा प्रश्न सोडविताना सर्वव्यापी सिद्धांत शोधण्याचा त्याने प्रयत्न के ला.
त्याला नैतिक गुणांपलीकडे, मानवी आचारांपलीकडे इतर कोणत्याही गोष्टींचा विचार
करायचा नव्हता. विश्वाचे व त्यातील पदार्थांचे सत्यत्व शोधणे अशक्य आहे. विश्वाचे गूढ
शोधण्याचा प्रयत्न करणे म्हणजे परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागण्यासारखे आहे, असे त्याचे
म्हणणे असे. सॉक्रे टिस मानवी जीवनाचा विचार करू लागला तेव्हा त्याच्या विचारांना एक
नवी दिशा मिळाली. तेव्हापासून तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात एक नवीन शाखा निर्माण झाली.
न्याय किंवा लॉजिक हीच ती शाखा होय.
सोफिस्टांनी तरुणांना विचार करण्यास शिकविले. तथापि त्यांचे हे कार्य अपूर्ण व अशुद्ध
होते; कारण त्यात तर्क शुद्ध विचार करण्याची शक्ती नव्हती. सॉक्रे टिसने आपल्या तात्त्विक
विचाराने ही उणीव भरून काढली व बुद्धिवाद पूर्णत्वाला नेला. या बुद्धिवादात विचार अन्
विचारांची तर्क शुद्धता हे विशेष होते. सिसिरो सॉक्रे टिसविषयी बोलताना म्हणतो,
‘‘सॉक्रे टिसने तत्त्वज्ञान स्वर्गातून खाली आणले. नगरातून त्याची स्थापना के ली. घरातून
त्याला प्रवेश करून दिला व मानवी जीवन, नीती, सदाचार यांचा विचार करताना त्याची
आवश्यकता उत्पन्न के ली.’’
3. सॉक्रे टिसचा उदय
काही शब्दांचे सामर्थ्य असे असते की, ते ज्यांना ठाऊक आहे त्यांचा उच्चार के ला असता,
लोक त्यावर प्रेम करू लागतात.
बालपण
ग्रीक संस्कृ ती ही पाश्चिमात्य संस्कृ तीच्या वाटचालीतला एक अत्यंत महत्त्वाचा मानबिंदू
आहे. पेरिक्लिसच्या नेतृत्वाखाली अथेन्सची साम्राज्यसत्ता विस्तारत आणि बळकट होत
होती. त्याच वेळी सॉक्रे टिसचा जन्म शालिवाहन शकाच्या इ.स.पूर्व 469 साली झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव सोफ्रोनिक्स. ते शिल्पकार होते. त्यांची आई फे नारिटी ही सुइणीचे
काम करीत असे. सॉक्रे टिसला आपल्या आई-वडिलांच्या व्यवसायाची कधीच लाज वाटली
नाही. उलट लोकांशी बोलताना तो आपल्या आई-वडिलांचे उदाहरण देत म्हणे-
‘‘मूर्तिकार मोठ्या प्रयत्नाने निर्जीव पाषाणाला मनुष्याचे मूर्त रूप देतो आणि माणसे
ज्ञानादी प्राप्त करून घेऊन पाषाणाचे मूर्त रूप घालविण्याविषयी मात्र कधीच प्रयत्न करीत
नाहीत. ही के वढी आश्चर्याची बाब आहे. म्हणूनच मला माझ्या वडिलांच्या व्यवसायाचा
अभिमान वाटतो. माझी आई सुइणीचे काम करते, तसेच मी लोकांच्या मनाचा सुईणपणा
करून माणसांमधील सुप्त गुण बाहेर आणायला मदत करतो’’. यावरून एक गोष्ट स्पष्ट
होते की, पुरुषाची प्रतिष्ठा व थोरपण हे तो कु ठल्या कु ळात जन्मला यावरून होत नसते.
तसेच त्याच्या योग्यतेच्या कधीही आड येत नसते अगदी प्रतिकू ल परिस्थितीतही आपल्या
योग्यतेच्या, ध्येयाच्या बळावर मात करून सॉक्रे टिसने आपली कीर्ती जगात अजरामर
के ली.
सॉक्रे टिस हळूहळू वडिलांकडून मूर्ती घडवायला शिकला. अथेन्सच्या गढीच्या
प्रवेशद्वाराजवळ ‘गे्रसेस’ म्हणून नावाजलेल्या ‘अ‍ॅग्लेआ’, ‘थेलिआ’, ‘युफ्रासिनी’ या
देवतांच्या आणि ‘मर्क्युरी’ ही देवीची एक मूर्ती सॉक्रे टिसने घडविल्या होत्या, असे म्हणतात.
त्याअर्थी तो एक चांगला मूर्तिकार असावा; परंतु त्याचे मन या कामात कधीच रमले नाही.
शिक्षण
ग्रीस देशातील शिक्षणक्रमात चांगले नागरिक तयार करण्यासाठी मल्लविद्या, गणित,
तत्त्वज्ञान, ज्योतिष, नीतिशास्त्र, वत्तृत्वकला अशा सर्व विषयांचा समावेश होता.
पैशाच्या अभावामुळे सॉक्रे टिसचे वडील त्याला फक्त मल्लविद्या आणि गणिताचे शिक्षण
देऊ शकले. गणितामध्ये त्याची खूप प्रगतीसुद्धा झाली; पण ‘तत्त्वज्ञान’ हा अत्यंत
आवडीचा विषय शिकण्याची त्याची इच्छा उपेक्षितच राहिली. त्यानंतर तो वडिलांच्या
हाताखाली शिल्पकलेचे काम शिकायला लागला.
एक दिवस शिल्पशाळेत काम करीत असताना क्रीटो नावाचा एक श्रीमंत गृहस्थ तेथे आला.
सॉक्रे टिसबरोबर त्याचे बराच वेळ बोलणे चालले. क्रीटोला त्याची बुद्धिमत्ता दिसून आली व
त्याने सोफ्रोनिक्सची परवानगी घेऊन सॉक्रे टिसला आपल्याबरोबर नेले. पुढे सॉक्रे टिसच्या
बुद्धीने तो इतका प्रभावित झाला की, त्याने सॉक्रे टिसचे शिष्यत्व पत्करले.
सॉक्रे टिस दिसायला अतिशय कु रूप होता. त्याचा चेहरा बराचसा ओबडधोबड होता.
त्याच्या भुवया जाड अन् के साळ असून, त्याचे डोळे अतिशय बटबटीत होते. जाड ओठ,
दाढी सदैव वाढलेली, असा त्याचा अवतार होता. आडव्या बांध्याचा सॉक्रे टिस अंगापिंडाने
मजबूत होता. कष्ट करण्याची, खस्ता खाण्याची विलक्षण ताकद त्याच्यात होती.
प्रथमदर्शनी विचित्र वाटावे असे व्यक्तिमत्त्व असणाऱ्या, नेहमी अनवाणी चालणाऱ्या
सॉक्रे टिसची चाल मात्र ऐटबाज होती. शरीराचे हाल करावे या मताचा तो नव्हता. गरिबीने
राहावे; पण स्वावलंबी राहावे असं तो मानत होता.
लष्करी सहभाग
ग्रीक संस्कृ तीने रणांगण हीदेखील गुणोपासनेची प्रथम जागा आहे असे मानले होते अन्
म्हणूनच अथेन्सच्या प्रजासत्तात्मक राज्यांतील सर्व पुरुषांनी लष्करी शिक्षण घेणे आवश्यक
होते. प्रत्येक पुरुषाला काही काळापर्यंत मोहिमेवर हजर असलेच पाहिजे, असा सक्त
कायदा असल्यामुळे सॉक्रे टिसने अनेक लढ्यांत भाग घेतला होता.
अ‍ॅल्सिबायडिस सॉक्रे टिसच्या वर्तनासंबंधी बोलताना म्हणतो, ‘‘पोटिडाच्या लढाईत मी
आणि सॉक्रे टिस बरोबर होतो. लढाईत नेहमीच अन्नाच्या तुटवड्याचे प्रसंग येतात.
आमच्यावरही त्यावेळी तसा प्रसंग आला होता. काही दिवस आम्हाला अन्नावाचून काढावे
लागले. त्याप्रसंगी सॉक्रे टिसने दाखविलेली सहनशीलता आम्हा कोणालाच दाखविता
आली नाही. अन्नाचा तुटवडा असताना त्याला भुके चा उपद्रव कधी झाला नाही. मनाच्या
सर्व वृत्तींवर, इंद्रियांवर त्याचा ताबा होता.
पोटिडाचा हिवाळा भयानक होता. प्रत्येक दिवशी हिमवृष्टी होत असे. अशा वेळी
कामाव्यतिरिक्त कोणीही बाहेर पडण्याची हिंमत करीत नसे. अगदीच जाणे जरुरी
असल्यास पायाला लोकरीचे पट्टे गुंडाळून, चांगले मजबूत बूट घालून, शरीर पुष्कळशा
कपड्यांनी वेढून घेऊन बाहेर पडत असू; पण सॉक्रे टिस बर्फ पडत असतानादेखील
आपल्या साध्या पोशाखात अनवाणी बर्फावरून चालत जात असे. असा एकही माणूस
आमच्याच नव्हे तर कोणत्याही सैन्यात सापडणार नाही.’’
रणांगणावर उभे राहून शत्रूशी दोन हात करीत असता त्याने दाखविलेले प्रसंगावधान, धैर्य
हे एखाद्या सेनानायकाला शोभेल असेच होते. त्याच्या मुद्रेवर सदैव शांत भाव असत.
रणांगण हीदेखील गुणोपासनेची जागा आहे, यावर त्याची श्रद्धा होती.
रणांगणातही सॉक्रे टिसचे विचारप्रवण मन शांत बसत नसे. त्याचे विचारचक्र चालूच राही.
अशाच एका प्रसंगाचे वर्णन अ‍ॅल्सिबायडिसने के ले आहे. तो म्हणतो, ‘‘पोटिडाचा वेढा
पडला होता. एके पहाटे सॉक्रे टिसची तंद्री लागून तो एके ठिकाणी उभा असलेला आम्ही
बघितला. सकाळची सगळी कामे उरकू न दुपारी परत आल्यानंतरही आम्ही त्याला त्याच
समाधी अवस्थेत पाहिले. दिवसभर तो तसाच उभा होता. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे
रात्रीचे जेवण घेऊन आम्ही सर्वजण बाहेरच झोपलो होतो. तरीही सॉक्रे टिस त्याच ठिकाणी
विचारमग्न अवस्थेत उभा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघतो तर सॉक्रे टिस तेथेच
उभा असलेला आम्हाला दिसला. सकाळी सूर्योदयानंतर सूर्याला नमस्कार करून तो तेथून
निघून गेला.’’
सॉक्रे टिसने आपली राहणी साधी ठे वून आपल्या विकारांचा क्षय के ला होता. मनाच्या
अनिवार वृत्तींवर त्याचा पूर्ण ताबा होता. म्हणूनच युद्धात अन्नाचा तुटवडा पडला असला
तरीही त्याला भुके ने कधीही व्याकू ळ के ले नाही किंवा थंडीचा त्रास त्याला कधीही
जाणवला नाही. इतर सैनिकांपेक्षा काटकपणा, कष्ट सोसण्याची तयारी, निर्भयता, करारी
स्वभाव इत्यादी गुण त्याच्यामध्ये होते. या निधड्या छातीच्या सैनिकाने पोटिडाच्या वेढ्यात
दाखविलेला काटकपणा व सहनशीलता नि:संशय उल्लेखनीय आहे. जे मिळते ते
उपभोगावे; परंतु न मिळाल्यास त्यासाठी अडून राहू नये, असे त्याचे मत असे. खायला
मिळाल्यास तो सपाटून खात असे; पण वेळ पडल्यास उपाशी राहिला, तरी त्याबद्दल त्याची
तक्रार नसे. सुखोपभोगात पाप नाही; पण माणसाने त्याचे गुलाम बनू नये, असे त्याचे स्पष्ट
मत होते.
न्यायप्रिय सॉक्रे टिस
सॉक्रे टिसला कु शाग्र बुद्धीची देणगी होती. सत्याची चाड आणि अन्यायाची चीड हे गुण
त्याच्या अंगी भिनले होते. मनुष्यस्वभावाची त्याला उत्तम पारख होती. त्याचा स्वभाव
अत्यंत शांत होता. त्याने संपूर्ण आयुष्यात आपला अभिमान कधीही ढळू दिला नाही.
त्याला सत्याची आसक्ती होती. सत्यान्वेषणाचे काम म्हणजे ईश्वराचे कार्य, असेच तो मानी
व त्याच भावनेने कार्य करी. त्याचा सर्वश्रेष्ठ गुण म्हणजे विचाराप्रमाणे उच्चार अन्
उच्चाराप्रमाणे कृ ती अर्थात ‘बोले तैसा चाले’ ही म्हण त्याला पूर्ण लागू पडत होती.
त्याच्या न्यायप्रियतेची एक घटना येथे नमूद करायचा मोह होतो आहे. -ख्रि.पू. 406 मध्ये
अर्गिन्यूअसीच्या युद्धात अथेन्सच्या आरमाराने स्पार्टाच्या आरमाराचा पूर्ण पराभव के ला;
परंतु त्या लढाईत कामी आलेल्या सैनिकांची प्रेते अथेन्सला आणली गेली नाहीत. त्यांना
जलसमाधी मिळाली. हे कळल्यावर अथेनिअन जनतेला सेनापतीचा राग आला अन् त्यांनी
अधिकाऱ्यांना ‘लोकसभे’पुढे खेचले. अचानक वादळ आल्यामुळे आम्हाला काही करता
आले नाही, असे समर्थन करण्याचा अधिकाऱ्यांनी प्रयत्न के ला. त्यांचे म्हणणे खरेच होते;
पण या अधिकाऱ्यांवर खटला भरला.
(अथेन्समध्ये जनसभेचा अध्यक्ष, ज्यास ‘एपिस्टेटिस’ म्हणत असत, प्रत्येक दिवशी वेगळी
व्यक्ती असे.) या खटल्याच्या दिवशी सॉक्रे टिस अध्यक्ष होता. त्याला कै द करण्याची,
प्रक्षुब्ध लोकांनी जिवे मारण्याची धमकी दिली. लोकांच्या धमकावणीला दाद न देता
सॉक्रे टिसने आपले मत दिले. सर्व अधिकाऱ्यांवर सामुदायिक आरोप न ठे वता प्रत्येक
व्यक्तीचा खटला वेगळा चालवावा, असा निकाल त्यांनी दिला. त्या दिवशी सॉक्रे टिसच्या
धैर्यामुळे सेनापतींनाही न्याय मिळाला.
देशप्रेम
सॉक्रे टिसचा तरुणपणीचा काळ वरकरणी तरी स्वातंत्र्य, खरेपणा व नीती यांचे राज्य
प्रस्थापित करण्याचा होता. अथेन्सनगरीचा त्याच्या डोळ्यांदेखत कायापालट होत गेला अन्
म्हणूनच सॉक्रे टिस अथेन्सच्या प्रेमात पडला. त्याने आपली सर्व निष्ठा अथेन्सच्या चरणी
वाहिली. अथेन्स हेच त्याचे सर्वस्व बनले. सॉक्रे टिस बहुधा स्वत:च्या तरुणपणी
पेरिक्लिसच्या व्यक्तिमत्त्वाने आणि त्याच्या वक्तव्यांनी भारावून गेला असावा. कारण
पेरिक्लिसचे म्हणणे त्याने इतके मनावर घेतले की, तनमनाने तो अथेन्सनगरीशी एकरूप
झाला होता. सत्तर वर्षांच्या आयुष्यात युद्धकाळ वगळता तो कधीही अथेन्सच्या हद्दीबाहेर
गेला नाही. नागरिक म्हणून जगायला जास्तीत जास्त पात्र ठरणे हे त्याचे ध्येय होते, असे
म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अथेन्सनगरीवरील असीम निष्ठा असल्यामुळे त्याचे
जीवितकार्य, ध्येय, मूल्ये जपण्यासाठी, ते आपले कर्तव्य समजून, त्या भूमिके तून त्याने
योद्ध्याचा पेशा स्वीकारला आणि म्हणूनच कठीण परिस्थितीतही पराभवाच्या प्रसंगीदेखील
त्याने हार मानली नाही. आपले स्वत:चे वर्तन अथेन्सच्या सन्मानाला व प्रतिष्ठेला साजेसे
असले पाहिजे, ही त्याची धारणा होती.
नीतिवान सॉक्रे टिस
सॉक्रे टिस लोकांना उपदेश करीत असे; पण तो स्वत:देखील त्याचप्रमाणे वागे. आधी के ले,
मग सांगितले, या कोटीत बसणारा तो होता. एखादी गोष्ट अहितकारक, अयोग्य किंवा
पापाची आहे असे कळल्यावर तो निग्रहाने ती गोष्ट करणे टाळीत असे. नीतिमत्ता त्याच्या
अंगी इतकी बाणली होती की, वाईट गोष्टी करण्याची त्याची वृत्तीच होत नसे. संभाषणशैली
अन् विचारमाधुर्य या दोन गुणांनी सॉक्रे टिसने ग्रीक देशातील युवकांची मने भारावून सोडली
होती. त्याला गुरुजी म्हटलेले आवडत नसे. तो म्हणे, रोज नवी नवी माणसे माझ्याकडे
येणार, ती माझ्याकडून काही शिकणार अन् मीदेखील त्यांच्याकडून काही शिकणार. अशा
स्थितीत मी त्यांचा गुरू कसा व ते माझे शिष्य कसे? आम्ही एकमेकांपासून काहीतरी
शिकत आहोत.
‘अहंमान्य व उद्दाम लोकांच्या समोर सॉक्रे टिस नम्रतेचा आव आणत असे आणि
लोकांसमोर त्यांचे अज्ञान उघडकीस आणून त्यांची फजिती करीत असे. स्वत:ला महान
समजणाऱ्या या लोकांच्या डोळ्यांत अंजन घातल्याशिवाय त्यांचा अहंकार कमी होणार
नाही, अशी त्याची खात्री होती. सॉक्रे टिस चारित्र्यवान व निर्व्यसनी होता. विनय अन्
प्रामाणिकता या गुणांपुढे आनंद आणि सुख त्याच्यासमोर दुय्यम होते. सर्व कामे तो
विचारपूर्वक करीत असे. तो इतका न्यायी होता की, कधीही कोणाचे नुकसान तो करीत
नसे. लोकांच्या दुर्गुणाबद्दल त्यांची कानउघाडणी करून तो त्यांना सदाचरणास प्रवृत्त करीत
असे. विनोदबुद्धीने एखादी विसंगती दाखवून तो श्रोत्यांना हसवीतही असे. मला काही
समजत नाही, असे म्हणत दुसऱ्याची चूक दाखवायची व त्याला शालजोडीतले द्यावयाचे,
या कामी त्याचा हातखंडा होता. अनेकदा तो लोकांची निर्भर्त्सनादेखील करीत असे; पण
त्यामागे त्या माणसाच्या कल्याणाशिवाय दुसरा कोणताच हेतू त्याच्या मनात नसे.
राजकीय दृष्टिकोन
सॉक्रे टिसला अनिर्बंध प्रजासत्ता मान्य नव्हती. अधिकाऱ्यांची निवड चिठ्ठ्या टाकू न
करण्याच्या पद्धतीला त्याचा कडाडून विरोध होता. अधिकाऱ्यांची नेमणूक त्यांच्या
गुणांनुसारच व्हायला हवी, असे त्याचे प्रामाणिक, पण ठाम मत होते. तसेच राजकीय
सभांच्या सदस्यांना पगार देणे सॉक्रे टिसला बिलकू ल पसंत नव्हते. जी गोष्ट त्याला पटत
नसे त्याचा तो कडाडून विरोध करीत असे व आपल्या प्रश्नोत्तर पद्धतीने तो त्यांच्यावर
सडकू न टीकाही करीत असे.
अथेन्समध्ये संस्कृ तीचा र्‍हास फार वेगाने होत असल्याचे सॉक्रे टिसला जाणवले. आपल्या
स्वभाव व जीवननिष्ठा यांना अनुसरून त्याने अतिशय सक्रिय अशी भूमिका घेतली व
जाहीर संवादाचे माध्यम त्याने निवडले. त्यावेळी सोफिस्ट पंडितांचा एक विशिष्ट वर्ग
निर्माण झाला होता. हे पंडित गुरुदक्षिणा घेऊन शिष्यांना विविध प्रकारचे शिक्षण देत
असत. सॉक्रे टिसही पंडितगिरी करू शकला असता; पण विचारपूर्वक त्याने ही भूमिका
नाकारली. कारण पैसे घेऊन शिक्षण देणे त्याच्या बुद्धीस मान्य नव्हते अन् म्हणूनच
आयुष्यभर तो दरिद्रीच राहिला.
सॉक्रे टिससारखा विद्वान, त्याच्यासारखे नवरत्न आपल्या दरबारी असावे असे वाटून
मासिडोनियाचा राजा आर्चिलेअस याने मोठा नजराणा आपल्या वकिलाकरवी सॉक्रे टिसला
पाठविला. तसेच सॉक्रे टिसला सन्मानपूर्वक आणण्याविषयी आदेश दिला. सॉक्रे टिसने त्या
नजराण्याला हातदेखील लावला नाही. राजाची ताबेदारी पत्करण्याचे नाकारून त्या
नि:स्पृही माणसाने राजाच्या वकिलाला परत पाठविले.
सॉक्रे टिसच्या स्वभावविशेषांबद्दल लिहिताना ग्रीक तत्त्ववेत्ता अल्फ्रे ड बेन म्हणतो- ‘‘मनात
उद्भवणाऱ्या चांगल्या विचारांना अत्यंत संयमाने तो आचरणात आणे. कोणत्याही
आमिषाला बळी न पडता बाळगणारा संयम, संकटकाळी न डगमगता दाखविणारे धैर्य,
स्वार्थी विचारांना थारा न देणारी न्यायबुद्धी, शब्द अन् अर्थ, अर्थ अन् विचार आणि विचार
तसाच आचार याचे काटेकोरपणे पालन करणारा तो अवलिया होता. सत्यवचन, विरोधाला
वाव न देणारी तर्क शुद्धता, चुकीचे विधान (तर्काविरुद्ध) झुगारून लावताना लागणारा
आत्मविश्वास.... सर्वत्र सुसंगतपणा राखण्याचा बौद्धिक आग्रह या गुणांनी सॉक्रे टिसने एवढे
मोठे नाव कमावले.’’
सॉक्रे टिसच्या काळात लोकशाहीवादी पक्ष सत्तेवर होता. या पक्षाचे पुढारी, समाजधुरीण
मंडळी ही सर्व सॉक्रे टिसच्या टीके चे प्रधान लक्ष्य होते. या सर्वांना अथेन्समध्ये चालणाऱ्या
काव्यशास्त्रविनोदाची, वत्तृत्वकलेची जोपासना करण्याचा गर्व होता. या गोष्टींच्या
नैतिकतेविषयी, औचित्याविषयी, सत्यत्वाविषयी प्रश्न विचारून सॉक्रे टिस त्यांना बेजार
करीत असे. त्याला कोणाचीही पर्वा नव्हती. माणसाच्या तोंडावरच तो स्पष्टपणे बोलून
टीकाटिप्पणी करून, प्रश्नांचा भडिमार करून त्यांना सळो की पळो करून सोडत असे.
त्याची बुद्धी भेदक होती. विचारांच्या मुळापर्यंत जाऊन अगदी बारीकसारीक मुद्द्यांवर
अंतर्मुख होऊन, विचार करून एकाग्र चित्ताने त्याने मनन-चिंतन के लेले असे. तो कमालीचा
तत्त्वनिष्ठ व मूल्यनिष्ठ होता.
सत्य व ज्ञानाची आसक्ती
सॉक्रे टिसचे धारिष्ट्य, सत्याविषयीचा आग्रह हे त्याचे प्रमुख गुण होते. सत्य जाणण्याची
त्याच्यात प्रबळ इच्छा होती. सत्य कळाल्यावर त्याप्रमाणे आचरण करणे, हे त्याचे ब्रीद
होते. नीतिविवेक, चांगुलपणा, सद्वर्तन आणि न्याय यावर सॉक्रे टिसचा भर होता. व्यक्ती
ज्ञानी असून तिच्यात सदाचार मात्र नाही, ही गोष्ट त्याला अशक्य वाटत असे. कारण डोळे
उघडे ठे वून वाईट गोष्ट करण्याइतका कोणीही मूर्ख नसतो, असे त्याचे म्हणणे असे. या
तत्त्वभक्तीमुळे व सत्य प्रेमामुळे तो लोकांना प्रत्यक्ष नीतिमत्ता न शिकवता त्यांचे विचार
स्पष्ट व यथातथ्य करण्याचा प्रयत्न करीत असे. विशिष्ट ज्ञानावर भर न देता तो लोकांची
विचारबुद्धी जागृत व कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करीत असे. सामान्य लोकांना सदाचाराचे
ज्ञान अन् त्यांचे वळणही आवश्यक आहे, असे तो म्हणे. ज्ञानाला कर्माची जोड पाहिजे.
कर्माने ज्ञान अंगी भिनते आणि कार्यक्षम होते व ज्ञानाने कर्म सन्मार्गाला लागून शुद्ध होते.
तसेच ज्या गोष्टी नैतिक अध:पतन घडवून आणीत असतील त्या सर्व गोष्टी त्याज्य आहेत,
असे त्याचे मत होते.
जी व्यक्ती अथेन्स राज्याच्या जीवनात (मग ते राजकीय, सामाजिक अथवा सार्वजनिक
असो) तन-मन-धनाने सहभागी होत नाही, आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे, चोखपणे पार
पाडीत नाहीत, तो या देशाचा नागरिक म्हणवण्यास पात्र नाही, असे त्याचे स्पष्ट मत होते.
समाजाची धारणा करणाऱ्या ‘धर्माची’ सॉक्रे टिसची शिकवण, प्रस्थापित व्यवस्थेच्या
मुळावर येणारी आहे, असे सत्ताधाऱ्यांना वाटत होते. सत्ता आणि संपत्ती यांचा माज
अथेन्सच्या सत्ताधारीवर्गाला चढला होता. सुरुवातीची ध्येयवादी वृत्ती हळूहळू मावळू
लागली. सार्वजनिक जीवनात भ्रष्टाचार माजला. या सामाजिक स्थित्यंतरामुळे सॉक्रे टिस
अस्वस्थ झाला. अथेन्सची नैतिक अवनती बघून त्याचे मन बेचैन झाले. तो अथेन्सच्या
लोकांत मिसळून मोकळेपणाने त्यांच्याशी चर्चा करू लागला. नीतीचे खरे स्वरूप काय?
जीवनात नीतीचे काय महत्त्व आहे? माणसाने नीतीने का वागायला हवे, अशा अनेक
प्रश्नांवर विचार करायला तो लोकांना भाग पाडू लागला. सॉक्रे टिसच्या कर्तव्यपालनाच्या,
धर्मशीलतेच्या, सरळमार्गीपणाच्या आग्रही भूमिके मुळे सार्वजनिक व राजकीय जीवनात
त्याचा सहभाग हा लोकांना तापदायक ठरू लागला.
सॉक्रे टिस हा तत्त्ववेत्ता नसून तत्त्वजिज्ञासू होता. त्याने अथेनिअन लोकांना एखादे तात्त्विक
‘दर्शन’ दिले नाही तर त्याने लोकांना विचार करण्याची वृत्ती कशी असावी, हे शिकविले.
त्याच्यापासून लोकांना ज्ञानाचा सागर मिळाला नाही, तर ज्ञानप्राप्तीची दिशा मिळाली.
त्यांचे अज्ञानपटल सॉक्रे टिसने दूर के ले नाही, तर अज्ञान आहे ही जाणीव उत्पन्न के ली. तो
तत्त्वज्ञानी नसला, तरीही ‘ज्ञान म्हणजे काय हे तो जाणत होता. हे ज्ञान कोणत्या मार्गाने व
कोणत्या पद्धतीने मिळेल, याचा त्याने पूर्ण विचार के ला होता. ज्ञान मिळविण्याकरिता व
लोकांत ज्ञानलालसा पसरविण्याकरिता प्राणांची आहुती देण्यासाठीदेखील तो तयार होता.
तो जरी दार्शनिक तत्त्ववेत्ता नव्हता तरी त्याची तीक्र तत्त्वजिज्ञासा, तत्त्वप्रेम, सत्यनिष्ठा,
दृढकर्तव्यनिष्ठा या गुणांनी तो सत्यान्वेषी व सत्यप्रिय लोकांना नेहमीच आदरणीय वाटत
असे. राजकारणात, सार्वजनिक जीवनात रूढार्थाने अजिबात सक्रिय नसलेल्या एका
व्यक्तीच्या अंगी धन अथवा पद, प्रतिष्ठा नसतानादेखील राज्यसत्तेला हादरवून टाकणारे
सामर्थ्य प्राप्त झाले होते.
राजकीय कट
लोकशिक्षणाच्या त्याच्या कार्यामुळे सत्ताधारी लोक भयभीत झाले. त्यांच्या प्रस्थापित
व्यवस्थेला धोका निर्माण झाला अन् म्हणूनच त्याच्याविरुद्ध कट रचून त्याच्यावर खटला
भरण्यात आला. न्यायासाठी त्याने सत्तारूढ अधिकारीवर्गालाही भीक घातली नाही.
प्राणसंकट ओढवले तरीही अनीतीचे आचरण त्याने के ले नाही. सत्याकरिता प्राण त्यागले;
पण अन्यायापुढे मान झुकवली नाही. लोकशाहीवादी पक्षाच्या राजकारणी मंडळींचे वर्तन
दिवसेंदिवस उन्मत्त, बेलगामपणाचे होत चालले होते. सत्तेचा माज, पैशाची मस्ती वाढत
चालली होती. याविरुद्ध सॉक्रे टिसने आवाज उठविला. त्याच्या क्रियाशीलतेमुळे
राजकारण्यांची दुष्कृ त्ये चव्हाट्यावर येऊ लागली. त्यामुळे सॉक्रे टिसची मुस्कटदाबी कशी
करावी, या विचाराने ते बेचैन झाले. त्या काळी ग्रीकमधील कायद्यानुसार राजकीय
कृ त्यांसाठी कोणावरही खटला भरता येत नव्हता. त्यामुळे नगरराज्याची निष्ठा ज्या
देवदेवतांवर आहे त्यांच्यावर सॉक्रे टिस अविश्वास दाखवितो व आपल्या पदरचे/पद्धतीचे
नवनवीन देवदेवता उत्पन्न करतो, असा आळ त्याच्यावर लावण्यात आला. दुसऱ्या
नगरांतील तरुणांना चिथावतो, त्यांची मने भ्रष्ट करून त्यांना भटकवतो, असे आरोप करून
इ.स.पूर्व 399 मध्ये सॉक्रे टिसवर खटला भरण्यात आला. अ‍ॅनिटस नावाच्या राजकारण्याने
सॉक्रे टिसची राजवटीला वाटणारी अडचण दूर करण्यासाठी मेलिटस् अन् लिकॉन यांच्या
मदतीने त्याला देहान्ताची शिक्षा देण्याचा कट रचला. विचार हेच ज्याचे शस्त्र व संभाषण
हेच ज्याचे तंत्र होते, अशा सॉक्रे टिसला संपवण्यासाठी त्याच्यावर खटला भरण्यात आला.
देहान्ताची सजा ठोठावण्यात आल्यावरही तो पळून गेला नाही. नागरिक म्हणून अथेन्स
राज्याशी असलेल्या निष्ठेशी द्रोह करणे, त्याला पाप वाटले. नागरिक या नात्याने कायद्याचे
पालन करून पंचाला सामोरे जाणे हे त्याला आपले कर्तव्य आहे, असे वाटले. पंचासमोर
जाऊन त्याने दृढतेने आत्मसमर्थनही के ले. शेवटी पंचाने दिलेली देहान्ताची शिक्षा हसत-
हसत स्वीकारली व देशासाठी प्राण अर्पण के ले. ही इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण
घटना म्हणावी लागेल.
4. धर्माची मीमांसा
तर्क शुद्ध विचार हाच ज्ञानाचा खरा मार्ग आहे.
युदिप्रो
हा प्लेटोच्या सुरुवातीच्या संवादातील एक महत्त्वाचा संवाद मानला जातो. साधारण
इ.स.पूर्व 399 च्या आसपास हा संवाद लिहिला गेला आहे. या संवादात सॉक्रे टिस व
युदिफ्रो नामक व्यक्ती आहेत. युदिफ्रो धर्मशास्त्राचा विशेषज्ञ म्हणून प्रसिद्ध आहे. हा तरुण
बराच अहंमन्य होता व धर्मतत्त्वे आपणास चांगली समजली आहेत, असा त्याला गर्व होता.
धर्मज्ञान आणि शिष्ट आचार अर्थात पवित्र धर्माचरण अशी त्याची समजूत होती; पण रूढ
आचारांचा त्याने खोलवर विचार के ला नव्हता. युदिफ्रो नामक या तरुणाची व सॉक्रे टिसची
‘किंग आर्क न’ (अथेन्स शहरातील धार्मिक बाबींविषयीचे खटले ज्याच्यासमोर चालत
असत तो अथेनिअन अधिकारी) सभागृहाजवळ भेट झाली व दोघांमध्ये संवाद सुरू झाला.
युदिफ्रो- ‘‘सॉक्रे टिस, आज लायशीअमला (ही अथेन्समधील शहराबाहेरील जागा आहे,
जेथे बरीच मंडळी एकत्र जमून वादविवाद करीत असत. सॉक्रे टिस तेथे नियमितपणे हजेरी
लावत असे.) न जाता तुम्ही येथे कसे? तुमच्यावर कोणी फिर्याद के ली आहे का? कारण
तुम्ही कोणावर फिर्याद के ली असेल, असे शक्यच नाही.’’
सॉक्रे टिस- ‘‘माझ्यावर मेलिटस् नावाच्या एका व्यक्तीने फिर्याद के ली आहे की, माझी
जुन्या देवी-देवतांवर श्रद्धा नाही. मी नवनवीन देव पदरचे काढतो व युवकांना पथभ्रष्ट
करतो.’’
युदिफ्रो- ‘‘मला वाटते या खटल्यातून काहीएक निष्पन्न होणार नाही. या दाव्यात तुम्ही
निर्दोष सुटाल. तुम्हाला यश येईल व माझ्या दाव्यात मलादेखील यश येईल.’’
सॉक्रे टिस- ‘‘तुम्ही कोणावर खटला भरला आहे?’’
युदिफ्रो- ‘‘मी माझ्या वडिलांविरुद्ध फिर्याद के ली आहे. देशातील कायदा धाब्यावर बसवून
माझ्या वडिलांनी एका मजुराचा बळी घेतला. म्हणून मी त्यांच्यावर खटला दाखल
करण्यासाठी आलो आहे. नक्सासमधल्या एका कर्मचाऱ्याने शेतावर काम करीत असताना
आमच्या एका गुलामावर दारूच्या धुंदीत वार करून त्याला ठार मारले. माझ्या वडिलांनी
या कारणास्तव त्याचे हातपाय बांधले व त्याला एक खळग्यात फे कू न दिले. त्याचे पुढे काय
करायचे याबद्दल विचारणा करण्यासाठी ते अधिकाऱ्याकडे गेले. या काळात वडिलांनी त्या
खुनी माणसाची मुळीच वास्तपुस्त के ली नाही. त्यामुळे भुके ने व थंडीने आणि बांधलेल्या
साखळ्या तसेच तोंड बांधून ठे वल्याने तो माणूस मृत्यू पावला.’’
सॉक्रे टिस आपल्या वडिलांना कोर्टात खेचणाऱ्या युदिफ्रोविषयी आश्चर्य व्यक्त करतो व
व्यंगात्मक भाषेत म्हणतो- ‘‘युदिफ्रो, धर्माचरण म्हणजे काय? व पावित्र्याचे तत्त्व काय?
पवित्र-अपवित्र कशास म्हणतात? कारण माझ्यावर जे आरोप ठे वले गेले आहेत, त्याने मी
बावचळलो आहे. खरोखरच जर माझ्या हातून अधर्म होत असेल, तर माझी चूक मला
सुधारायला हवी. देवांच्या चरित्र व चारित्र्याविषयी असणाऱ्या गैरसमजाविषयी,
देवदेवतांच्या लोककथांविषयी मी शंका घेतो म्हणून मला पाखंडी, नास्तिक ठरविले जात
आहे, असे तर नसेल ना?
असा प्रश्न मला पडलेला आहे. तेव्हा पावित्र्य म्हणजे काय व अपवित्र म्हणजे काय, हे
जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. तुम्ही धर्मशास्त्राचे विशेषज्ञ म्हणवता. तेव्हा
तुमच्याकडून माझ्या प्रश्नाचे उत्तर मला निश्चित मिळेल, अशी मला खात्री आहे.’’
युदिफ्रोला हा प्रश्न अगदीच सोपा वाटला. तो म्हणाला,-‘‘मी आता जसे आचरण करीत
आहे, तशा आचरणाला पवित्र आचरण म्हणावे. गुन्हा करणारा बाप असो किंवा सख्खे
नातलग किंवा आणखी कोणीही असो, त्याच्या दुष्कृ त्याबद्दल त्याला शासन करविणे यातच
पावित्र्य आहे.’’
सॉक्रे टिस ही गोष्ट अमान्य करतो आणि म्हणतो- ‘‘पापी माणसाला शासन करणे हे पवित्र
आचरणाचे उदाहरण आहे; पण ‘पावित्र्य’ म्हणजे काय? त्याचे तत्त्व काय? हा आपला
मुख्य प्रश्न आहे. याचे समाधानकारक उत्तर तुम्ही मला दिलेले नाहीच.’’
युदिफ्रो दुसरी परिभाषा करीत म्हणतो,- ‘‘देवांना जे प्रिय असेल, आनंददायक वाटेल ते
पवित्र आणि त्यांना जे आनंददायक वाटणार नाही ते अपवित्र.’’
यावर सॉक्रे टिसने त्याची प्रशंसा के ली की, अतिशय सोप्या शब्दांत त्याने आपले विचार
प्रकट के ले,
‘‘पण माझ्या प्रश्नाचे उत्तर मात्र मला मिळालेले नाहीय’’ अन् युदिफ्रोच्या म्हणण्याचा विरोध
करीत सॉक्रे टिस अशी कोटी करतो की, ‘‘जी गोष्ट एखाद्या देवाला आनंददायी वाटेल ती
दुसऱ्या देवाला कदाचित वाटणार नाही आणि मग अशी गोष्ट पवित्र किंवा अपवित्र हे
ठरविणे जड जाईल.
दुसरी गोष्ट अशी की, देवदेवता अनेक आहेत. त्यांच्यातील मतभिन्नता, भांडणे,
परस्परविरोधी कथा, अनेक समजुती प्रचलित आहेत. तेव्हा एकच वर्तन काही देवदेवतांना
प्रिय व काहींना अप्रिय असे होईल. तेव्हा कोणते वर्तन हे धर्मपरायण समजायचे?’’ नंतर
सॉक्रे टिस म्हणतो.
‘‘देवांना जे प्रिय ते पवित्र, की पावित्र्य हे जात्याच इष्ट असते म्हणून ते देवांना प्रिय असते?
देवांना प्रिय असते म्हणून ते पवित्र असते, असे नव्हे.’’
युदिफ्रोने मग आपली व्याख्या जरा बदलली अन् ‘‘सर्व देवांना जे आनंददायक, प्रिय ते
पवित्र अशी तिसरी व्याख्या के ली.’’
यावर सॉक्रे टिसने अशी शंका काढली की, देवांना पवित्र गोष्टी आनंददायक वाटतात याचे
कारण त्या पवित्र आहेत, हे म्हणणे म्हणजे कार्यकारणांची उलटापालट करण्यासारखे
होईल. पावित्र्य हे प्रेमार्ह आहे म्हणूनच ते आनंददायक आहे. तेव्हा हे पावित्र्याचे कारण
नसून कार्य आहे. तो त्याचा एक गुण आहे. दुसरी गोष्ट अशी की, सर्व देवांचे एकमत आहे हे
समजायचे कसे? आपले जे वर्तन आहे ते निरपवादपणे सर्व देवांना प्रिय आहे किंवा नाही हे
जाणायचे कसे? आपण चूक आहोत की बरोबर, हे आपल्याला कोण सांगणार?
विचारविमर्श करता करता सॉक्रे टिसने नंतर पावित्र्य हे एक प्रकारचे न्यायाचे आचरण आहे,
असे म्हटले. पावित्र्य हे एक प्रकारचे उचित, योग्य किंवा न्याय्य आचरण आहे.
नंतर सॉक्रे टिस युदिफ्रोला विचारणा करतो की, ‘‘अशी कोणती गोष्ट आहे, ज्यामुळे
‘पावित्र्य’ अन्य गोष्टींपासून वेगळे आहे?’’ सॉक्रे टिसचे काही सूचक प्रश्न ऐकल्यावर
युदिफ्रोने पावित्र्याचे लक्षण सांगितले की, ‘‘देवांची उचित आराधना करण्यासंबंधाचे जे
न्यायाचे आचरण, ते पावित्र्य.’’
हे लक्षण ऐकू न सॉक्रे टिसने तत्काळ उलटतपासणी करीत म्हटले - आराधना म्हणजे सेवा,
हा युदिफ्रोने लावलेला अर्थ मानला तर या सेवेपासून देवांचा काय फायदा होतो? ही सेवा
के ल्याने आपणास काय मिळते, हा प्रश्न उभा राहतो.
सेवा करणारा काही हेतू मनात धरून सेवा करतो व सेवा घेणाराही त्या सेवेच्या योगाने
आपला काहीतरी फायदा करून घेतो. हे उघड असल्यामुळे या पावित्र्यरूपी देवघेवीत
देवांचा फायदा आहे का? असा प्रश्न सॉक्रे टिसने काढला.
यानंतर युदिफ्रो एक दुसरी व्याख्या करतो. ‘‘पावित्र्य म्हणजे एकप्रकारचा त्याग, आराधना
आणि प्रार्थना.’’ आपण देवांना आराधनेद्वारे सन्मान देतो, त्यांचे श्रेष्ठत्व कबूल करतो व
त्यांना प्रिय असलेल्या इतर गोष्टी देतो, याबद्दल देव आपणाला धनधान्यादी सर्व इष्ट फळे
देतात. तेव्हा आराधनेपासून देवांचा फायदा काय होतो? असा प्रश्न सॉक्रे टिसने विचारला.
देवांना आपल्या सेवेपासून फायदा करून घ्यायचा नसतो, ही सेवा त्यांच्याबद्दल आदर-
कृ तज्ञता दाखविण्यासाठी आपण देतो. देवाची प्रार्थना कशी करावी, भोग कसे चढवावेत,
देवाची मर्जी कशी संपादन करावी, त्यांना संतुष्ट कसे करावे हे ज्याला कळते तो
धर्मपरायण माणूस आहे. देवांना संतुष्ट करूनच कु टुंब, समाज व राज्याची भरभराट होऊ
शकते. देवांची उपेक्षा करणारे वर्तन म्हणजे पाखंड, अधर्म होय. त्यामुळे देशाचे नुकसान
होते, असे युदिफ्रो म्हणतो.
स्वत:च्या ठायी सद्गुणांची जोपासना करणे, स्वत: अंत:शुद्धी करणे या स्वरूपात देवास
भजणे, चांगुलपणाचे राज्य प्रस्थापित करण्याचे, देवाचे कार्य पार पाडण्यास हातभार
लावणे व स्वत:ची अंत:शुद्धी करीत राहणे, ही धर्मपरायणतेची सॉक्रे टिसची व्याख्या
युदिफ्रोला समजत नाही. कारण माझे वर्तन, माझ्या आकांक्षा पूर्ण करणारे वर्तन तेच
नीतिदृष्ट्या योग्य आहे, असा त्याचा समज असतो.
देवांविषयक प्रस्थापित असलेल्या या धारणेला धर्मपरायणतेच्या के लेल्या व्याख्यांना
सॉक्रे टिसने ठाम नकार देऊन देवत्वाचे एक वेगळे परिपूर्ण, विशुद्ध रूप लोकांसमोर
साकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न के ला. देवदेवतांच्या विशिष्ट रूपांच्या मुळाशी जे पूर्ण, नित्य
आणि विशुद्ध रूप आहे, त्याला अभिप्रेत अशी जी नियमित प्रमाणबद्ध व्यवस्था आहे, जी
देवरूपाने मूर्तिमंत साकारली आहे. तिचे ज्ञान होणे गरजेचे आहे. हे ज्ञान झाले की देवाशी
एकात्मता साधण्यासाठी मानवाने स्वत:ची शुद्धी व सद्गुणांची जोपासना, सदाचार करीत
राहावे व देवदेवतांच्या कृ पाप्रसादाची प्रार्थना करणे हेच सेवेचे सर्वस्व सार आहे, असा
वादविवाद चालू असताना युदिफ्रोची घमेंड, ताठा बराच उतरला होता; परंतु तरीही आपले
अज्ञान कबूल करण्याइतका प्रांजळपणा व उदारता त्याच्यामध्ये नव्हती.
सॉक्रे टिस युदिफ्रोला म्हणतो की, माझ्या प्रश्नांची खरी उत्तरे द्या. कारण मला माहीत आहे
की, जर कोणाला ज्ञान असेल, तर ते तुम्हाला आहे. कारण पवित्रता म्हणजे काय व
अपवित्रता म्हणजे काय, या गोष्टींचा मनाशी पूर्ण विचार के ल्याशिवाय तुम्ही आपल्या वृद्ध
पित्यावर खुनाबद्दल खटला दाखल के ला नसणार. आपले आचरण चुकीचे आहे, असे
तुम्हाला वाटले असते तर देवाच्या कोपाची भीतीही तुम्हाला वाटली असती. लोक काय
म्हणतील हे भय तुम्हाला वाटले असते; पण पावित्र्य म्हणजे काय, हे तुम्हाला चांगले
समजते असे तुम्हाला वाटते, याची मला पूर्ण खात्री आहे. तुम्ही माझे मित्र आहात तेव्हा
माझ्या शंकांचे समाधान करावे; परंतु त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याचे टाळून आपणाला
कामाची घाई आहे, असे सांगून युदिफ्रो लगबगीने तेथून निघून गेला.
सॉक्रे टिसचे विचार
तत्कालीन अथेनियन समाजाची धर्मपरायणता म्हणा किंवा भाविकता म्हणा ही देवाशी
सौदेबाजी होती. देवांबरोबर के लेल्या सौदेबाजीत समाज देवांनाही स्वत:च्या अधर्माचरणात
सामील करून घेत होता, असे या संवादाच्या आधाराने स्पष्ट होते. स्वत:च्या स्वार्थासाठी,
आकांक्षापूर्तीसाठी करणारे वर्तन हेच नैतिकदृष्ट्या योग्य आहे, असा समज त्यांच्या अंगी
बाणला होता व युदिफ्रोसारख्या तथाकथित धर्मज्ञाचे, विद्वान पंडितांचे समर्थन त्यांना प्राप्त
होते. या प्रवाहाविरुद्ध सॉक्रे टिस उभा राहिला. त्याने या शिष्टमान्य व्याख्यांचा ठाम विरोध
के ला. त्रिकाल ज्ञान, चांगुलपणा व सद्गुण अन् विशुद्ध नीतिविवेक हेच देवदेवतांचे खरे
स्वरूप असते, असे म्हटले. यावरून सॉक्रे टिसची धर्मभावनेविषयीची, भाविकतेची
जातकु ळी आपल्या लक्षात येते. सॉक्रे टिसच्या मताप्रमाणे ‘‘ज्ञानी माणूस चुकीचे, अयोग्य,
अनैतिक वर्तन करूच शकत नाही. ज्ञान हे नेहमीच सत्यविषयक ज्ञान असते. ‘‘ज्ञानी
माणूस शहाणा व नीतिमान असतो, जे सत्य असते तेच शिव अन् सुंदर असते.’’
या संवादात सॉक्रे टिसची विशिष्ट संभाषणपद्धती आपल्या दृष्टीस पडते. स्वत:ला बुद्धिमान
समजणाऱ्या व्यक्तीच्या विचारात किती अस्पष्टता, अनिश्चितता, विसंगती असते हे स्पष्ट
दिसते. अशा लोकांना त्यांचे अज्ञान दाखवून, त्यांच्या डोळ्यांत अंजन घालून, त्यांचे दात
त्यांच्याच घशात घालण्याचे काम सॉक्रे टिस करीत असे. त्यासाठी अनेकदा उपरोधिक
कठोर पद्धतीचा अवलंब करावा लागला तरीही हरकत नाही; पण त्यांच्या अज्ञानाचे माप
त्यांच्या पदरात घालण्याचे काम सॉक्रे टिस चोखपणे बजावीत असे.
युदिफ्रो एक दार्शनिक रचना आहे. याला शोधप्रबंध म्हणता यायचे नाही. कारण यातून
काहीही निष्कर्ष निघालेले नाहीत किंवा त्यातून कोणत्याही सिद्धांताचे प्रतिपादनसुद्धा
झालेले दिसून येत नाही.
‘‘कोणत्याही दार्शनिक रचनेचे लक्ष फक्त निष्कर्ष काढणे हेच नसून स्वत:ला ओळखून,
आपल्या अंतरंगात डोकावून बघण्यास मदत करणे हे असते.’’
सॉक्रे टिसच्या मतानुसार, कोणतीही दार्शनिक रचना निष्कर्षाप्रत पोहोचण्याची चेष्टा करीत
नाही किंवा शोधप्रबंधाप्रमाणे कोणत्याही गोष्टीची पुष्टी करत नाही. त्याचे मुख्य काम
स्वत:ची व दुसऱ्यांची मते, विचार यांना तावून सुलाखून, त्याची कसोटी लावून, मनातल्या
शंका-कु शंकांचे निरसन करून, त्यांना खरी दिशा दाखविण्यास मदत करणे हे होय. ज्या
अनुषंगाने माणूस आपल्या अंतरंगाचा शोध घेऊ शके ल.
हे वाचल्यावर आपल्या असे लक्षात येईल की, तर्क शास्त्र म्हणजे दोन किंवा काही विद्वान
व्यक्ती एकत्र येऊन आपापसातील चर्चा, वादविवादाद्वारे वास्तविकता जाणून घेण्याचा
प्रयत्न करणे होय. याचा अर्थ एकमेकांवर कु रघोडी करणे कदापि नव्हे, हे लक्षात घ्यायला
हवे.
एखादा वक्ता काही प्रश्न उपस्थित करतो. त्या परिकल्पनेवर पूर्ण विचारविमर्श करून
विद्वान मंडळी आपले विचार ठे वतात. जोपर्यंत त्यातील गर्भितार्थ स्पष्ट होत नाही तोपर्यंत
हे चर्चासत्र सुरू असते. प्रत्येक परिकल्पनेचा सर्व बाजूने विचार झाल्यानंतर संशोधन
करून त्याला विद्वानांसमोर प्रस्तुत के ला जातो किंवा त्या प्रस्तावाला पूर्णपणे नाकारले
जाते व त्या अनुषंगाने दुसरा प्रस्ताव पुढे येतो. पूर्ण दक्षता घेऊन कार्य के ल्यामुळे व दक्षतेने
निरीक्षण-परीक्षण झाल्यामुळे सत्याच्या निकट जाण्याचा मार्ग खुला होतो. युदिफ्रो ही याच
प्रकाराची एक रचना आहे.
☐☐☐
5. सॉक्रे टिसवर खटला
आपल्या अंगी पूर्णत्व येण्यासाठी जो झटणार नाही आणि
जो आपणास निरुपयोगी समजेल, त्याचे आयुष्य व्यर्थ आहे.
सॉक्रे टिसविरुद्ध षड्यंत्र
आपल्या कु टिल, दुष्ट, आपमतलबी राजकारणामुळे इ.स.पूर्व 399 साली देवावर निष्ठा
नसल्याचा, तसेच तरुणांची मनं भ्रष्ट के ल्याचा आरोप सॉक्रे टिसवर झाला. सॉक्रे टिसवरील
हे आरोप त्याच्या दृष्टिकोनातून गंभीर स्वरूपाचे होते. या आरोपांवरून त्याची अथेन्सच्या
जनसभेपुढे चौकशी झाली. त्याने आपल्या समर्थनार्थ भाषण करून आपल्यावर
लावलेल्या आरोपांचा फोलपणा सिद्ध के ला व त्याला दिलेली देहान्ताची शिक्षा त्याने मंजूर
के ली.
‘अपॉलॉजी’ एक अतिशय दुर्मीळ अशी रचना आहे. त्यात लेखकाने तत्त्वज्ञान व साहित्य
यामधील दुवा साधण्याचा प्रयत्न के ला आहे. तत्त्वज्ञानाचा दावा न करता एक आदर्श
तत्त्वज्ञानी व्यक्तीचे चरित्र चित्रण म्हणून या पुस्तकाकडे बघणे अधिक योग्य वाटते.
या गंभीर आरोपात सॉक्रे टिसच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता; पण तरीही त्याने उदात्त
आचरण के ले, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे हे भाषण तत्त्ववेत्त्यांसाठी एक
पे्ररणास्रोत व अत्यंत कु शल भाषण म्हणून त्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
500 लोकांच्या पंचांसमोर सत्य उलगडून दाखवून सॉक्रे टिसला ते त्यांना पटवून द्यायचे
आहे. पंचांतील अनेक मंडळी त्याच्याविषयी वेगवेगळ्या कारणांवरून राग बाळगून आहेत.
सॉक्रे टिस म्हणतो, ‘‘मी आज माझ्या नेहमीच्या पद्धतीनेच तुम्हा सर्वांशी संवाद साधणार
आहे. फिर्यादी पक्षाने के लेला युक्तिवाद, त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे असत्य
आहेत. विशेषत: ‘सॉक्रे टिस हा अत्यंत निपुण व प्रभावी वक्ता आहे, तेव्हा त्याच्या शब्दांना
भुलून जाऊ नका,’ असा त्यांनी दिलेला इशारा धादांत खोटा आहे. सत्य बोलणे व नेहमी
सत्य तेच सांगणे यालाच जर फिर्यादी पक्ष प्रभावी वत्तृत्व म्हणत असतील तर मात्र मी
उत्तम वक्ता आहे, हे मी आनंदाने कबूल करतो.’’
सॉक्रे टिसवर खटला भरला तो काळ लोकशाहीवादी पक्षाच्या वर्चस्वाचा काळ होता.
तिथल्या समाजधुरीण, राजकारणी, स्वत:ला विद्वान समजणाऱ्या अनेक व्यक्तींना त्याने
चारचौघांत तोंडघशी पाडले होते. सॉक्रे टिस आपल्या भाषणचातुर्याने प्रतिष्ठितांचा
दांभिकपणा, खोटेपणा, स्वार्थीपणा सार्वजनिक ठिकाणी उघडकीस आणीत असे. त्यामुळे
ही मंडळी साहजिकच त्याच्यावर खार खाऊन होती. जोपर्यंत सॉक्रे टिस मोकळा फिरत
आहे तोपर्यंत आपण स्वस्थ झोपू शकत नाही, हे त्यांना चांगलेच ठाऊक होते अन् म्हणूनच
सत्ताधारी लोकांनी त्याला संपविण्याचा कट रचला
त्या काळच्या अथेन्समधील खटल्याविषयी जाणून घेणे गरजेचे आहे. त्या काळी 500
लोकांचा पंच न्यायनिवाडा करीत असे. ज्या कारणावरून खटला भरला जात असे तो
अपराध किती मोठा, त्याचे कारण खरे की खोटे हा मुद्दा नसे. प्रभावी वत्तृत्वाने, नाट्यपूर्ण
भाषणाने, रडूनभागून अपराध्याने पंचाचे मन जिंकावे ही अपेक्षा असे खटला नावाचे नाटक
होऊन ज्याचा अभिनय उत्कृ ष्ट, त्याच्याकडून निकाल दिला जाई. 500 पैकी निम्म्यापेक्षा
जास्त पंच लोकांचे मन वळविण्यात यश मिळण्याला महत्त्व होते. अनेकदा खटला भरणार
हे कळल्यावर ती माणसे अथेन्समधून परागंदा होत असत व परिस्थिती पालटल्यावर परत
येत असत. पंचांना आपली नेमणूक ही खऱ्याखोट्याचा निवाडा करण्यासाठी झाली आहे,
ही गोष्ट विसरल्यासारखे झाले होते.
सॉक्रे टिसला दोन प्रकारच्या आरोपांसंबंधी समर्थन करायचे होते. पूर्वीपासून त्याच्यावर
खोटे आरोप करण्यात आले होते की, सॉक्रे टिस म्हणून जो शास्त्रनिपुण व्यक्ती आहे, तो
अवकाशात काय आहे, याबद्दल तर्क वितर्क करीत असतो आणि पाताळात कोणत्या गोष्टी
आहेत, त्यांचा विचारपूर्वक शोध घेत असतो. दुसरा आरोप तरुणांची नीतिमत्ता
बिघडविण्याचा अन् राज्यातील लोकांची ज्या देवदेवतांवर श्रद्धा आहे, त्याचा विरोध करून
सॉक्रे टिस नवीन देवदेवता आणू पाहत आहे.
सॉक्रे टिसचे पंचांसमोर भाषण
सॉक्रे टिस म्हणतो, ‘‘माझ्यावर लावलेल्या जुन्या आरोपांचे उत्तर देणे मला गरजेचे वाटत
नाही. कारण वर्षानुवर्षे त्याविषयी चर्चा सुरू आहे. मला वाटते, फक्त माझ्यावर जळणाऱ्या
लोकांनी हा प्रश्न निर्माण के ला आहे.’’ सॉक्रे टिस अनौपचारिक आरोप औपचारिक
कायद्याच्या भाषेत मांडतो. ‘‘सॉक्रे टिस हा पापकर्मे करणारा आहे, तो अवकाशात काय
आहे आणि पाताळात काय आहे, याविषयीचा शोध लावण्याचा प्रयत्न करीत असतो.
लोकांनाही तो असल्या गोष्टींचे प्रशिक्षण देत असतो.’’
तुम्ही लहान होता तेव्हापासून त्यांनी तुमचे कान भरले आहेत, खोटी विधाने करून मी दोषी
आहे, असे दाखविण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. माझ्यासंबंधी अशा अफवा पसरवून
मला बदनाम करण्याचा अविरत प्रयत्न ते करीत आहेत. ही सर्व मंडळी माझा द्वेष करतात
हास्यकवी एरिस्टोफें सशिवाय मी इतरांची नावे घेऊ इच्छित नाही.’’ (एरिस्टोफें सने आपल्या
‘द क्लाउडस्’ नाटकात सॉक्रे टिस नावाचा एक माणूस टोपलीत बसून हेलकावे खात येऊन
‘मी हवेत चालतो’ अशा प्रकारचा अनीश्वरवादी, वैज्ञानिक कु तर्क देऊन त्याची टर उडवली
होती )
त्यानंतर सॉक्रे टिस हा तरुण लोकांना बिघडवणारा पापी मनुष्य आहे, याविषयी तर्क देत
सॉक्रे टिस म्हणतो की, ‘‘बुद्धिपुरस्सर कोणत्याही व्यक्तीला बिघडविता येत नाही.’’
‘‘समाजात माझे नाव बदनाम का झाले, याचे मूळ कारण आता मी तुम्हाला सांगतो.
कॅ रेफॉन हे तुम्हा सर्वांच्याच माहितीतले आहेत. एखादी गोष्ट मनात आणली की, त्याचा
पाठपुरावा करून ती तडीस नेण्याची त्यांची वृत्ती तुम्हा सर्वांस परिचयाची आहे. एकदा ते
डेल्फायला गेले असता तेथील देवाला त्यांनी कौल लावला (आपल्याकडे देवाला फू ल
किंवा सुपारी लावून कौल, प्रश्न विचारतात. त्याप्रमाणे ग्रीक नागरिक डेल्फाय येथील
देवळात अ‍ॅपोलोला प्रश्न विचारीत असत. या वेळी तेथील भाविणीच्या अंगात येऊन
तिच्याकरवी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर मिळत असे.) व विचारले की, ‘सॉक्रे टिसपेक्षा
अधिक शहाणा असा कोणी आहे का?’ तेव्हा उत्तर आले की, ‘नाही, सॉक्रे टिसपेक्षा अधिक
शहाणा कोणी नाही.’ या देववाणीचा मी आपल्याशीच मनोमन विचार करू लागलो, ‘देवाने
असा कौल दिला, याचा अर्थ काय असावा? देव खोटे बोलणे अशक्य, कारण तो देव आहे.
मग या देववाणीचा अर्थ काय असावा? कित्येक दिवस मला काहीएक उलगडा होईना
म्हणून मी त्याचा अर्थ काय असावा, याचा छडा लावायचे ठरविले.’’
‘‘ही देववाणी खोटी आहे हे सिद्ध करणे गरजेचे असेल तर ‘शहाणा’ म्हणून नावलौकिक
असलेल्या एखाद्या गृहस्थाकडे जायला हवे, असे ठरवून मी एका मोठ्या राजकारणी
पुरुषाकडे गेलो. त्याच्याशी संभाषण करताना मला असे दिसून आले की, लोक जरी त्यांना
शहाणे म्हणत असले व तेदेखील स्वत:ला तसे समजत असले तरीही त्यांच्यात थोडाही
शहाणपणा नाही.’’
‘‘तिथून निघून आल्यावर मी एका कवीकडे गेलो. माझी कल्पना अशी की, त्यांच्याकडे
गेलो म्हणजे त्यांच्या मानाने मी किती अज्ञानी आहे हे स्पष्ट होईल; पण लवकरच माझ्या
असे लक्षात आले की, कवी जी काव्ये लिहितात ती ज्ञानपूर्वक लिहितातच असे नाही, तर
त्यांच्यामध्ये एकप्रकारची सहज स्फू र्ती असते म्हणून.’’
हा अनुभव आल्यावर मी विचार के ला की, राजकारणी पुरुषांपेक्षा ज्या बाबतीत मी श्रेष्ठ
आहे त्याच बाबतीत मी कवीपेक्षाही श्रेष्ठ आहे. नंतर मी माझा मोर्चा दुसरीकडे वळविला.
राजकारणी व कवीनंतर मी शिल्पकार अन् कारागीर लोकांकडे वळलो. त्यांना पुष्कळ
चांगल्या-चांगल्या गोष्टींचे ज्ञान असेल अशी मला खात्री होती. मला ज्या विषयींचे ज्ञान
नाही, त्यांचे ज्ञान त्यांना माझ्यापेक्षा जास्त असणार. आपल्या विशिष्ट कलेमध्ये आपण
प्रवीण आहोत म्हणून इतर महत्त्वाच्या बाबतींचेही आपणास फार ज्ञान आहे, असे प्रत्येक
शिल्पकार कारागिराला वाटत होते. त्यांच्या या प्रमादामुळे त्यांचे खरे ज्ञानदेखील विनाश
पावले होते.
शेवटी मी या निर्णयावर पोहोचलो की, मी या सर्व गृहस्थांपेक्षा खचितच शहाणा आहे.
कारण आम्हा दोघांनाही श्रेयस्कर ज्ञान नाही; पण त्यांना ते ज्ञान नसूनही आहे असे वाटते
अन् मला नाही हे मी जाणतो, हाच काय तो फरक.
ज्या शहाण्या समजल्या जाणाऱ्या लोकांकडे सॉक्रे टिस गेला ते लोक अंगी असलेल्या
शहाणपणापेक्षा स्वत:ला अधिक शहाणे समजत होते आणि तो स्वत: अगाध ज्ञानी
असतानाही आपणाला काही समजत नाही, असे मानत होता आणि म्हणूनच तो सर्वांपेक्षा
शहाणा होता.
सॉक्रे टिसने डेल्फायची भविष्यवाणी याच अर्थाने खरी आहे, अशी आपली समजूत करून
घेतली.
‘‘आपणास जे समजत नाही तेही समजते, असे मला वाटत नाही. या बाबतीत मी
त्यांच्याहून निश्चितच अधिक शहाणा आहे, हे मला पटले व मला कळून चुकले, की देवच
सर्वांत ज्ञानी आहे.’’
‘‘माझ्याइतके च लोकांचे अज्ञान आहे. त्यांच्याप्रमाणेच मी अज्ञानी आहे. फरक एवढाच की,
मला काय माहीत नाही हे मला समजते. माझ्या अज्ञानाची मला जाणीव आहे. इतरांना
त्यांच्या अज्ञानाची जाणीव नाही, एवढ्यानेच मी त्यांच्यापेक्षा अधिक शहाणा ठरलो. माझ्या
अज्ञानाच्या ज्ञानाने मी श्रेष्ठ ठरलो.’’
‘‘अशाप्रकारे मी अनेक लोकांची परीक्षा घेतल्यामुळे अनेक लोक माझे शत्रू झाले. माझ्या
जीवनाचे लक्ष्य एकच, विश्वात देवच खरा काय तो ज्ञानी आहे. त्यांच्यासमोर मानवाच्या
बुद्धीला कु ठे ही स्थान नाही, असे सांगून सॉक्रे टिस आपल्यावर लावलेल्या दुसऱ्या
आरोपांना सामोरा जातो.
मेलिटस्ने लावलेल्या आरोपाचे उत्तर देताना सॉक्रे टिस तर्क ठे वतो की, ‘‘बुद्धिपुरस्सर मी
तरुणांना भ्रष्ट करतो असे तुमचे म्हणणे आहे काय? मी त्यांना जाणूनबुजून भ्रष्ट के ले तर
एक दिवस ते माझ्याविरुद्ध उभे राहतील, ही साधी गोष्टही न समजण्याइतका मी मूर्ख आहे
असे तुम्हाला वाटते का? आपल्या ग्रामदेवतांवर श्रद्धा ठे वू नका व दुसऱ्या नव्या देवतांवर
श्रद्धा ठे वा, असे मी तरुण मंडळींना शिकवतो, असा तुमचा आरोप आहे. तेव्हा या मार्गाने
मी त्यांना बिघडवितो हे उघड दिसते. अपरिचित देवतांवर श्रद्धा ठे वण्यास मी शिकवतो,
असाच ना याचा अर्थ?
हाच जर तुमचा भावार्थ असेल तर एवढी एक गोष्ट यावरून निर्विवाद सिद्ध होते की, माझी
देवतांवर श्रद्धा आहे तेव्हा मी नास्तिक आहे, हा गुन्हा काही माझ्यावर सिद्ध होत नाही.
तेव्हा तुमच्या बोलण्यातील फक्त अंतर्विरोध येथे स्पष्ट होत आहे, असे मला वाटते.
मृत्यूचे भय मला अजिबात नाही. मला काळजी आहे ती ही की, मी सत्याच्या मार्गावर आहे
किंवा नाही. जे मृत्यूला घाबरतात तेच अज्ञान प्रदर्शित करतात. मृत्यू हे एक वरदान आहे.
कोणतेही कृ त्य करताना ते सत्य किंवा असत्य आहे, सज्जनाला शोभण्यासारखे आहे
किंवा नाही, याचा मी विचार करतो. याशिवाय अवांतर गोष्टीचा म्हणजे मरणावह किंवा
प्राणरक्षणासाठी उपयोगी अशा गोष्टींचा विचार करणे योग्य नव्हे. आपखुशीने स्वीकारलेले
असो किंवा कायद्याने नेमून दिलेले असो, त्याचे पालन हे माणसाचे आद्यकर्तव्य आहे.’’
आत्मसमर्थन
‘‘लोक हो! मी या देशातील एक कर्तव्यदक्ष नागरिक आहे. एका नागरिकाचे कर्तव्य मी
नेहमीच पार पाडले आहे. युद्धात मला दिलेली कामे चोखपणे पार पाडली. मी कोणत्याही
आज्ञेची आजपर्यंत अवहेलना के ली नाही. देश अन् ईश्वराने के लेली आज्ञा मोडण्याचा
अधिकार मला नाही. ईश्वराने मला ज्ञानाचा शोध करण्याविषयी आणि आत्मनिरीक्षण व
दुसऱ्याचे परीक्षण करण्याची आज्ञा दिली आहे, अशी माझी ठाम समजूत आहे. ही आज्ञा
मोडून मी जर स्वकर्मत्याग के ला तर ते योग्य होणार नाही. ही ईश्वरी आज्ञा मोडण्यास
नास्तिक म्हणून माझ्यावर फिर्याद करण्यात आल्यास ते योग्यच ठरेल.
मरणाच्या भीतीने या आज्ञेचे उल्लंघन करणे म्हणजे अंगी शहाणपण नसताना स्वत:ला
शहाणा समजण्याचा मूर्खपणा करणे आहे, हे विसरून चालणार नाही. तेव्हा ईश्वराच्या
आज्ञेचे पालन मला करावेच लागणार. शेवटपर्यंत मी अथेन्सवासीयांना नैतिकतेचा मार्ग
अवलंबविण्याविषयी सांगतच राहणार. आत्म्याची पूर्ण उन्नती करून घेण्याविषयी
खबरदारी घेण्यास व सावध राहण्याविषयी सांगणार.
धनाने सद्गुण प्राप्त होत नाहीत; परंतु सद्गुणाने मात्र इतर सर्व चांगल्या गोष्टी प्राप्त होतात.
तेव्हा जीवन परिपूर्ण बनविण्यासाठी साधेपणा, सच्चेपणा अन् समजूतदारीने वागा. धन,
कीर्ती, मान याला आपण हपापलेले आहात, या गोष्टींची तुम्हाला लाज वाटत नाही का?
ज्ञान, सत्य किंवा आत्मोन्नती यांची चाड आपणाला के व्हा वाटू लागणार? यातून बाहेर
आल्याशिवाय आत्मोन्नती अशक्य आहे, ही गोष्ट सदैव ध्यानात असू द्या.
अपॉलॉजीच्या एका खंडात सॉक्रे टिस गमतीने म्हणतो की, आपले अथेन्स शहर हे एखाद्या
उमद्या; परंतु अस्ताव्यस्त माजलेल्या घोड्यासारखे आहे. या उमद्या; अस्ताव्यस्त अन् सुस्त
झालेल्या घोड्याची सुस्ती घालविण्यासाठी एखाद्या डासाची गरज होती. या सुस्त नगराला
सतावून, त्रास देऊन जागविण्याचे डासांचे काम ईश्वराने माझ्यावर सोपविले आहे. कारण
डासांप्रमाणे मी दिवसभर गुणगुण करून सर्वांना सतावून सोडतो आहे. सर्वांना जागे
करून, वेळ पडल्यास त्यांची निंदा करूनही त्यांना उपदेश करतो आहे. माझ्या या कामात
मी तसूभरही मागे फिरणार नाही.
अनेक वर्षे मी लोकांना उपदेश करीत आलो आहे; पण लक्षात ठे वा, माझी भूमिका ही
शिक्षकाची भूमिका नाही. माणसाचे आचरण, त्याचे कल्याण करण्यासाठी मी तयार
असतो; पण उद्या जर एखादा नागरिक भ्रष्ट निघाला तर त्यासाठी मला जबाबदार धरणे
योग्य होणार नाही. हे अथेन्सवासीयांनो, या शहरात जर मी कोणाला भ्रष्ट के ले असेल तर ते
समोर का येत नाहीत किंवा त्यांच्या वतीने त्यांचे नातेवाईक का पुढे येत नाहीत? सॉक्रे टिस
स्पष्टपणे सांगतो की, आजही येथे असे अनेक तरुण उपस्थित आहेत जे न्यायालयासमोर
त्याचे समर्थन करतील.
माझ्या समर्थनार्थ मला याहून जास्त काहीही सांगायचे नाही. आपणापुढे डोळ्यांतून आसवं
गाळून, गयावया करून किंवा स्वत:च्या मुलांना आपणासमोर आणून आपल्या
सहानुभूतीची व दयेची भीक मला मागायची नाही. तसं के ल्यास आपल्या दोघांनाही
काळिमा लागेल. असं वर्तन करून मला अथेन्स शहरात बदनाम व्हायचं नाही. गैरवर्तनाने
मी हा खटला जिंकण्याचा प्रयत्न कधीही करणार नाही. आपली करुणा भाकू न
आपल्याकडून काहीही सवलत मला नको आहे. मी मरणाला घाबरत नाही. मी माझ्या
धर्माच्या विपरीत कोणतेही काम करणार नाही. आपले समर्थन करण्यासाठी के ल्या
जाणाऱ्या भाषणांतून मी आपली मते मांडीन. माझे म्हणणे कितपत खरे आहे किंवा नाही
ते तुम्हीच बघा. वक्तृत्व व गुणांच्या अंगाने बघू नका. पंच म्हणून सत्याचा पक्ष कोणाचा
आहे, हे बघणे तुमचे कर्तव्य आहे. तेव्हा सत्याने वागा.
त्याकाळी अथेन्समध्ये अशी प्रथा होती की, आरोपी दोषी ठरल्यावर त्याला कोणती शिक्षा
देण्यात यावी, याबद्दल फिर्यादीची जी सूचना आहे ती आणि आरोपी जी शिक्षा मागत
असेल ती, या दोन्हींचा विचार करून मग न्यायसभा शिक्षा ठोठावीत असे. या नियमाप्रमाणे
शिक्षा कमी किंवा कमी सक्तीची करून घेण्याविषयी बहुतेक आरोपी विनंती करीत.
खटल्याचा निर्णय
सॉक्रे टिसवर आरोप ठे वल्यानंतर सुरुवातीस जेव्हा मतदान झाले होते तेव्हा फक्त 1/5 मते
मिळवून मेलिटस् विजयी झाला होता. के वळ 30 मते अधिक मिळाल्यामुळे सॉक्रे टिसला
दोषी ठरविण्यात आले होते; पण सॉक्रे टिसच्या भाषणानंतर ज्यावेळी जनसमितीची मते
घेतली गेली तेव्हा 280 मते ‘दोषी’ व 220 मते निर्दोष म्हणून पडली व बहुमताने सॉक्रे टिस
दोषी ठरला. लोकांचे मत असे की, आपल्या भाषणाने, स्पष्टवत्तेपणामुळे सॉक्रे टिसने
पंचांच्या सदस्यांना नाराज के ले अन् म्हणूनच नंतर त्याला पहिल्यापेक्षा कमी मते मिळाली.
सॉक्रे टिसला शेवटी कारावास अथवा अथेन्स सोडून दुसऱ्या कु ठल्यातरी देशात निघून जाणे
या दोन पर्यायांवर विचार करण्यास प्रवृत्त होतो, कारण त्याच्याकडे भुर्दंड भरण्यासाठी
अथेन्सचे के वळ 100 चलन होते. न्यायाधीशांनी सांगितलेल्या रकमेपेक्षा ही रक्कम खूपच
कमी होती. देश सोडून जाण्याची सॉक्रे टिसची तयारी नव्हती अन् म्हणूनच मृत्युदंडाशिवाय
दुसरा कोणताही पर्याय त्याच्याकडे नव्हता. त्याच्या मित्रांनी ताबडतोब सॉक्रे टिसला 3000
डे्रकमा (अथेन्सचे चलन) देण्याचे मंजूर करण्यास सांगितले; परंतु पंचाने हा विकल्प मंजूर
के ला नाही व निर्णय दिला की, विषाचा पेला ग्रहण करून त्याने मरणाला सामोरे जावे.
दिलेल्या निर्णयावर शेवटी सॉक्रे टिस आपली प्रतिक्रिया व्यक्त करतो व म्हणतो- लोकहो!
माझ्या शिक्षेचे कारण सयुक्तिक कारणांचा अभाव हे नसून माझ्यामध्ये निलाजरेपणा किंवा
खालच्या पातळीवर उतरणे हे गुण नाहीत. देहांताची शिक्षा झालेली व्यक्ती बहुतेक वेळा
भावनाविवश होते. मृत्यूच्या भीतीने चुकीच्या मार्गाचा अवलंब करते; परंतु मी मृत्यूच्या
भीतीने खऱ्या मार्गाचा, सचोटीने वागण्याचा मार्ग सोडू शकत नाही. माझ्यानंतर येणारी
तरुण पिढीदेखील हाच सत्याचा मार्ग स्वीकारतील अन् तुम्हाला माझ्यापेक्षाही अधिक
कठोर कसोटीवर पारखतील. त्यांची देखरेख तुम्हाला अधिक जाचक होईल. कारण
कितीही झाले तरी तारुण्याचे रक्त त्यांच्या अंगात माझ्याहून जास्त सळसळत आहे.
पंच सभासदांनो, माझ्या मृत्यूचा आनंद साजरा करा; पण लक्षात ठे वा की, चांगल्या
माणसाचे तो जिवंत असेपर्यंत किंवा मृत्यूनंतरही काहीही वाईट होत नाही. ईश्वर आपल्या
भक्तांचे कधीही वाईट होऊ देत नाही. माझा मृत्यूदेखील अकस्मात नाही. मला स्पष्ट
कळाले होते की, माझा अंत आता जवळ आला आहे. तेव्हा या संसाराचा निरोप घेऊन सर्व
कष्टांपासून मुक्ती मिळवून हे जग सोडून जाणेच आता इष्ट आहे, उचित आहे.
☐☐☐
6. सॉक्रे टिसचा उपदेश
धीराचे आणि कष्टाळू लोकच अधिकार स्वीकारायला योग्य आहेत, तर याचा गंधही
नसणाऱ्या लोकांनी आपण या अधिकाराला पात्र आहोत असे म्हणणे म्हणजे मूर्खपणाच
होय.
इ.स.पूर्व399 साली अथेन्समध्ये मेलिटस्, अ‍ॅनिटस् व लिकॉन या तिघांनी सॉक्रे टिसवर
खटला भरला. या खटल्यात त्याच्यावर अथेन्सनगरीच्या देवतांची अनास्था पसरविणे व
तरुणांना पथभ्रष्ट करून त्यांना बिघडविण्याच्या आरोपावरून त्याला देहान्ताची शिक्षा
ठोठावण्यात आली. फिर्यादीतर्फे भाषणे झाल्यावर आपल्या आत्मसमर्थनार्थ अथेनिअन
लोकांसमोर सॉक्रे टिसने भाषण के ले-
अथेनिअन लोकहो! माझ्यावर ज्यांनी आरोप ठे वला आहे, त्यांची भाषणे ऐकू न तुम्हाला
काय वाटले असेल ते मला माहीत नाही; पण ते ऐेकू न माझे मन विशेष क्षुब्ध झाले नाही.
तुमचा निर्णयही तुम्ही दिला आहे. तुम्ही मला दोषी ठरवणार, याबद्दल माझी खात्री होती.
मला ती लक्षणे स्पष्ट दिसतच होती. खरं सांगायचं म्हणजे तुम्ही मला दोषी ठरविले,
त्यापेक्षाही तुमच्यापैकी अनेक जणांनी मला अनुकू ल मते दिलीत हे पाहून मला अत्यंत
आश्चर्य वाटले. प्रतिकू ल मताधिक्य इतके अल्प असेल असे मला मुळीच वाटले नव्हते;
परंतु झालेल्या प्रकारावरून असे दिसते की, फक्त तीन जणांनी आपले मत बदलले असते
तर मी दोषमुक्त झालो असतो. मेलिटस्च्या दृष्टीने जरी मी दोषी असलो तरीही असे स्पष्ट
दिसते आहे की, जर अ‍ॅनिटस् आणि लिकॉनने त्यांना साहाय्य के ले नसते तर त्यांना 1/5
मते मिळण्याची मारामार झाली असती आणि माझ्यावर आरोप के ल्याबद्दल त्यांना 1000
ड्रेक्मा (अथेन्सचे चलन) दंड भरावा लागला असता (फिर्यादी पक्षास जर 1/5 मतांपेक्षा
कमी मते मिळाली तर त्याला 1000 ड्रेक्मा भुर्दंड भरावा लागत असे, असा त्यावेळी
अथेन्सचा कायदा होता. उगीच कोणी सूडबुद्धीने दुसऱ्यावर आरोप ठे वू नये म्हणून हा
कायदा के ला होता.)
मेलिटस् यांची सूचना आहे की, मला देहान्ताची शिक्षा द्यावी. अथेनिअन लोकहो! मला
काय शिक्षा मिळावी याबद्दल मी काय सूचना करणार? मी शारीरिक शिक्षा भोगावी की
आर्थिक शिक्षा? मुळात मी शिक्षा भोगावी का?
मी आपले आयुष्य कधीही चैनीत घालविले नाही. येथील बहुसंख्य लोक द्रव्य, कु टुंबाचा
फायदा, सैन्यातील मोठमोठ्या नोकऱ्या, उच्च पद या सर्व गोष्टींच्या मागे धावत असतात.
दंडाधिकार, गटबंदी, षड्यंत्र आणि आपल्या या शहरात असलेले अनेक मतभेद या सर्व
गोष्टींना लोक फार महत्त्व देतात; पण या सर्व गोष्टी माझ्यासाठी तुच्छ आहेत. कारण मला
असे वाटते की, मी या कारभारात पडलो तर आपल्या सदसद्विवेकबुद्धीला सांभाळून जगणे
अशक्य होईल. म्हणूनच अशा भलत्या कामात न पडता मी तुमच्यापैकी प्रत्येकाकडे जाऊन
भेटत असे आणि त्यांना अथेन्स शहराच्या नानाविध कारभाराविषयी सांगत असे.
कोणताही निर्णय घेण्यापूर्वी, आपले अनुकू ल किंवा प्रतिकू ल मत देण्यापूर्वी शहराचे हित
कशात आहे याविषयी प्रत्येकाने विचार करावा आणि अशाच इतर सर्व गोष्टींमध्येही या
दिशेने प्रयत्न करावा, असा माझा निरंतर प्रयत्न असे. अशाप्रकारे वागून मी त्यांची मोठी
सेवाच करीत होतो, तेव्हा खरंच मला कशी वागणूक मिळायला हवी होती?
अथेनिअन लोकहो! माझ्यासारखा माणूस जी लोकसेवा करतो ती सेवा ज्या कोणालाही
जशी जमेल तशी, जशी सवड मिळेल तशी के ल्यास मला एवढा आनंद होईल जेवढा
‘प्रेथिनिअममध्ये’ (या नावाचे अथेन्समध्ये एक सभागृह असून, येथे नामांकित नागरिकांचे,
पाहुण्यांचे सार्वजनिकरीत्या उचित आदरातिथ्य करण्यात येत असे.) ऑलिम्पिक खेळांमध्ये
घोड्यांच्या शर्यतीत विजयी झालेल्या व्यक्तीला आनंद होतो. शिवाय त्यांना द्रव्याची गरज
नसते. मी दरिद्री आहे, हे तुम्हास ठाऊक आहे. तेव्हा मला कोणता दंड उचित आहे, असे
विचारले तर मी म्हणेन की, मला ‘प्रेथिनिअम’मध्ये ठे वावे व सार्वजनिक खर्चाने तुम्ही
माझा भार उचलावा.
कदाचित तुम्हाला वाटेल की, ज्या अदबीने, आदराने मी न्यायसभेत बोललो तसेच
तुमच्यासमोर बोलत आहे; पण लोकहो! तसं मुळीच नाहीच. एवढी गोष्ट मात्र खरी आहे
की, मी हेतुपुरस्सर कोणाचेही अनहित के लेले नाही; पण याबद्दल इतक्या थोडक्या
भाषणात मी तुम्हाला खात्री कशी करून देऊ? अनेक देशांत असा कायदा आहे की, ज्या
खटल्यांमध्ये प्राण जाण्याचा प्रसंग असतो, ते खटले एका दिवसाच्या बैठकीत कधीही
संपवू नयेत. आपल्या अथेन्स शहरात असा कायदा असता तर फार बरे झाले असते, मग
मला तुमची खात्री करून देण्यास बराच अवधी मिळाला असता व मी तुमची खात्रीही
करून दिली असती. माझी खात्री आहे की, मी कोणाचा काही अपराध के लेला नाही आणि
अशी खात्री असल्यामुळे ‘मला अमुक दंड करा’ अशी सूचना देऊन मी आपले आपणच
शत्रुत्व कधीही संपादन करून घेणार नाही.
मेलिटस् यांनी जी शिक्षा सुचविली आहे ती फक्त मला त्रास होईल म्हणूनच; पण ती शिक्षा
योग्य आहे की अयोग्य हे मला ठाऊक नाही. तेव्हा त्या शिक्षेला विनाकारण घाबरून जी
गोष्ट वाईट आहे असे मला पूर्णपणे ठाऊक आहे, तीच गोष्ट मी दंडादाखल का मागून घेऊ?
मेलिटस् यांनी सुचविलेल्या शिक्षेऐवजी कै देची शिक्षा मी मागून घ्यावी असे जर तुम्ही
म्हणाल तर मी तुम्हाला विचारतो की, उरलेले आयुष्य मी का म्हणून तुरुं गात खितपत
घालवावे. या अकरा अधिकाऱ्यांचे दास्य मी का पत्करावे? मी काहीतरी एक दंडाची रक्कम
सुचवावी आणि ती रक्कम भरेपर्यंत कै द भोगण्यास तयार व्हावे, असे म्हणाल तर ते मला
मान्य नाही. कारण हा दंड भरण्यासाठी लागणारी रक्कम माझ्यापाशी नाही. पैसा
नसल्यामुळे मला जन्मभर तुरुं गात खितपत पडावे लागेल.
राहता राहिली हद्दपारीची सूचना; ही सूचना तुम्हाला मान्य होण्याची शक्यता आहे. तुम्ही
माझे नगरबांधव असतानादेखील तुम्हाला माझी विचारपद्धती व माझ्याशी होणारे
वादविवाद खपत नाहीत. या गोष्टी तुम्हाला तिरस्करणीय व दु:सह वाटतात, म्हणूनच त्या
बंद करण्याचा तुमचा खटाटोप चालला आहे. या सर्व गोष्टी स्पष्ट दिसत असताना परकीय
लोक माझी विचारपद्धती, माझे संभाषण आनंदाने मान्य करतील अशी अपेक्षा करणे
वेडेपणाचे ठरेल.
अथेनिअन लोकहो! हद्दपारीची गोष्ट बोलूच नका. माझ्या या वयात मी जर आपली
जन्मभूमी सोडून या नगरातून त्या नगराला भटकत राहिलो आणि जागोजागी हद्दपारीची
शिक्षा होऊन माझी हकालपट्टी होऊ लागली, तर माझे उतारवय चांगलेच जाईल म्हणायचे.
कारण येथे जशी माझ्याभोवती तरुण मंडळी जमतात, तशी मी जेथे जाईन तेथील तरुण
मंडळी माझे भाषण ऐकण्यास जमणार. त्यांना मी दूर सारले तर ते आपल्या वाडवडिलांना
सांगून त्यांच्याकडून आपल्या शहरातून माझी हकालपट्टी करतील. मी त्या तरुण मंडळींना
दूर सारले नाही तर त्यांचे वाडवडील व नातेवाईक हे आपली मुले बिघडू नयेत म्हणून मला
अर्धचंद्र देण्यास चुकणार नाहीत.
यावर कदाचित कोणी म्हणेल की- ‘सॉक्रे टिस, तुम्ही अथेन्स सोडून इतरत्र जाऊन स्वस्थ
का बसत नाही?’’
लोकहो! अशाप्रकारे स्वस्थ बसणे मला शक्य नाही. कारण ईश्वराची आज्ञा मोडायची
नसल्यामुळे मूग गिळून बसणे मला शक्य नाही, असे मी म्हणालो तर मी मनापासून बोलत
नाही, असे तुम्हाला वाटेल आणि तुम्ही माझे बोलणे खरे मानणार नाही.
सद्गुणाविषयी व अशाच प्रकारच्या अनेक गोष्टींविषयी मी नेहमी संभाषण करीत असे आणि
तुमची परीक्षा घेत असे. त्या गोष्टींविषयी रोज चर्चा करीत बसणे यापेक्षा मनुष्यजातीस
अधिक श्रेयस्कर गोष्ट दुसरी कोणतीही नाही, असे मी सांगितले किंवा असे म्हटले की, ‘‘जो
आत्मपरीक्षण करीत नाही तो जगला काय किंवा मेला काय, सारखाच,’’ तर हे म्हणणे
तुम्हाला विश्वसनीय वाटणार नाही; पण माझ्या मित्रांनो, तुम्ही काहीही म्हणालात तरी ते
पूर्णपणे सत्य आहे. आता तुमची याबद्दल खात्री करून देणे हे सोपे नाही, हे मी कबूल
करतो. मी जर श्रीमंत असतो तर जेवढा दंड देणे मला शक्य आहे तेवढा दंड मला खुशाल
करावा, असे मी आनंदाने म्हटले असते. कारण दंडादाखल पैसे भरून माझे फार काही
नुकसान झाले नसते; पण श्रीमंती माझ्या घरी पाणी भरत नसल्यामुळे जास्त दंड देणे मला
शक्य नाही.
माझ्या ऐपतीप्रमाणे दंड ठरविण्यास तयार असलात तर गोष्ट निराळी. मला जर तुम्ही
विचारलेत, तर चांदीचा एक माइना मला दंड करावा असे मी म्हणेन; पण लोकहो, येथे
हजर असलेले माझे मित्रमंडळी प्लेटो, क्रिटोबुलस आणि अपोलोडोरस असे म्हणत आहेत
की, दंडादाखल मी तीस माइना देण्यास तयार व्हावे, या रकमेबद्दल ते जामीन देण्यास
तयार आहेत. तेव्हा त्यांच्या मताप्रमाणे मी तीस माइना दंड करावा असे सुचवितो. या
रकमेची भरपाई करण्यासंबंधाने माझ्या या मित्रमंडळींची जामीन पुरेशी आहे, असे मला
तरी वाटते.
यानंतर पुढील कार्यवाही करून न्यायाधीशाने सॉक्रे टिसला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली.
तेव्हा सॉक्रे टिस म्हणतो, बंधुजनहो! माझ्या मृत्यूच्या काही वेळानंतरच जे लोक तुमच्या
नगराची निंदानालस्ती करण्यास टपलेली असतात, तेच लोक तुमच्या तोंडावर थुंकतील
आणि ‘या लोकांनी सॉक्रे टिससारख्या सुज्ञ माणसाला ठार मारले’ असे म्हणून तुमची
बदनामी करतील. मी सुज्ञ असो किंवा नसो; पण त्यांना जर तुमची बदनामी करायची
असेल तर ते मला सुज्ञ म्हणतील.
तुम्ही जर थोडे दिवस धीर धरला असता तर सृष्टीक्रमानुसार लवकरच तुमची इच्छा पूर्ण
झाली असती. कारण मी उतारवयाचा आहे. मृत्यूच्या समीप आलो आहे, हे तुम्ही पाहत
आहाच. मी आता जे बोललो ते अर्थात सर्वांना उद्देशून नाही. ज्या-ज्या कोणी मला
देहान्ताची शिक्षा देण्यास अनुकू ल मत दर्शविले असेल, त्यांना उद्देशून आहे. दोषमुक्त
होण्यासाठी मी सबळ व सयुक्तिक कारणे दाखवू शकलो नाही, असे कदाचित तुम्हाला
वाटत असेल. हे सर्व मी के ले असते, तरीदेखील माझी बाजू युक्तीदृष्ट्या लंगडीच पडली
असती, असे काही लोकांना वाटत असेल
मित्रहो, तुमची अशी जर खरोखरच समजूत असेल, तर ती अगदी चुकीची आहे. कारण
सयुक्तिक कारणांचा अभाव हे माझ्या अपयशाचे कारण नाही, तर धारिष्ट्य आणि
शिरजोरपणा या गुणांचा माझ्यापाशी अभाव आहे, हेच त्याचे खरे कारण आहे. तुम्हाला
आवडेल असे भाषण मी के ले नाही. मी येथे तुमच्यासमोर आसवे गाळली नाहीत किंवा
गयावया करून रडून तुम्हाला अडविले नाही. म्हणून मला अपयश आले, ही वस्तुस्थिती
आहे. असले प्रकार करणे माझ्यासारख्या माणसाला शोभण्यासारखे नाही, असे मला
वाटते; पण इतर लोकांनी आपल्या वर्तनाने के लेले हे प्रकार पाहण्याची तुम्हाला सवय
झाली आहे. असे असले तरी मी आपले समर्थन करताना भावी संकटाकडे दुर्लक्ष के ले अन्
माणुसकीला न शोभणारे हे वर्तन आपण तरी करू नये, असा मनाशी निश्चय के ला व तो
अद्यापही कायम आहे. पुन्हा: जर तसा प्रसंग आला तरीदेखील तुम्हाला जसे हवे आहे,
तशा रीतीने वागून मी तुमच्यापुढे आपला जीव वाचवून घेणार नाही. आताप्रमाणेच मी
तेव्हाही स्वत:चे समर्थन करीन; मग त्यापायी मला मरण आले तरी चालेल.
मला मृत्यूची शिक्षा देणाऱ्या अथेनिअनवासीयांनो, मी तुम्हाला भविष्य सांगतो की, मला
तुम्ही जी निष्ठु र शिक्षा दिली आहे, तिच्यामुळे मी मृत्यू पावेल, बरोबर; पण त्याहीपेक्षा
अधिक निष्ठु र शिक्षेच्या जबड्यात तुम्ही अडकले जाल. शिक्षा देताना तुम्हाला असे वाटले
असेल की, आपला आयुष्यक्रम कसा चालला आहे. याबद्दल जाब देण्याच्या त्रासातून
आपण आता मोकळे झालो आहोत; पण दुर्दैवाने तुमची ही अपेक्षा खोटी ठरणार आहे.
मला जरी मृत्यू आला तरीही माझ्या जागी दुसरे लोक येतील व ते तुम्हाला तुमच्या दुष्ट
कृ त्यांचा जाब विचारतील. इतके दिवस मी त्यांना थोपवून धरले होते, म्हणून ही गोष्ट
तुमच्या लक्षात आली नाही. माझ्यापेक्षाही त्यांची देखरेख तुम्हाला अधिक त्रासदायक व
जाचक होणार आहे. कारण ही तरुण मंडळी आहेत व निश्चित त्यांच्या मनगटात
माझ्यापेक्षा जास्त ताकद आहे.
नवीन दमाची ही मंडळी तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाहीत. तुम्हाला जर वाटत असेल की,
आपली निंदानालस्ती करणाऱ्यांना आपण संपवून टाकले की, आपल्याला हवे तसे
वागायला आपण मोकळे आहोत; तर तुमची ही चूक होईल. कारण या लोकांच्या हातून
निसटून जाणे अशक्यप्राय आहे अन् हा मार्गदेखील चुकीचा आहे. निंदेची मुस्कटदाबी
करण्यापेक्षा तुम्ही आपल्यात बदल करा. स्वत:मध्ये निर्दोषत्व आणायचा प्रयत्न करा. वाईट
कृ त्य करून कट रचण्यापेक्षा चांगल्या मार्गाने जाणे अधिक सोपे अन् चांगले आहे. मला
दोषी ठरवणाऱ्या लोकांचा शेवटचा निरोप घेण्यापूर्वी त्यांना जे सांगायचे होते ते सर्व मी
सांगितले आहे. आता मी तुमचा निरोप घेतो.
आता ज्या सद्गृहस्थांनी मी निर्दोष आहे असे मत दिले आहे, त्यांच्याशी झालेल्या
प्रकाराबद्दल मला थोडेसे बोलायचे आहे. कारण सध्या अधिकारी महोदय आपल्या कामात
व्यस्त आहेत. जोपर्यंत ते आपल्या कामात मग्न आहेत व मला मृत्युसदनात पाठविण्याची
तयारी सुरू आहे तोपर्यंत तुमच्याशी बोलायला मला वेळ आहे.
तुम्हा सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की, मला येथून नेईपर्यंत तुम्ही सर्व
माझ्यासोबत राहावे, तोपर्यंत आपण संवाद साधूया. या गोष्टीला कोणत्याही प्रकारची
हरकत नसावी, असे मला वाटते. मित्रहो! माझ्यावर जो प्रसंग आला आहे, त्यातील मर्म
काय ते तुम्हाला सांगावे, असे मला वाटते आहे. तुम्हाला सांगण्याची एक गोष्ट आज माझ्या
अनुभवास आली आहे.
न्यायाधीशहो! (आतापर्यंतच्या भाषणात सॉक्रे टिसने न्यायाधीश या शब्दाने कोणालाही
संबोधले नव्हते, हे तुम्हा सर्वांच्या लक्षात आलेच असेल. सर्वांसमोर भाषण करताना त्याने
अथेनिअन लोकहो! असे संबोधन के ले होते.) जी दैवी सूचना मला क्षुल्लक बाबतीतही
माझे चुकतेवेळी मला सावध करीत असे, ती सूचना मला या घटके पर्यंत सदैव मिळत
आली आहे. असे असूनही, माझ्यावर प्राण गमावण्याची वेळ आली असतानादेखील भावी
संकटांचा इशारा देणाऱ्या या ‘दैवी सूचनेने’ आज एकदाही माझा निषेध के ला नाही. मी
घराबाहेर पडलो तेव्हा मला कोणताही इशारा मिळाला नाही. या न्यायसभेत येतानाही नाही
व भाषण करतानादेखील एखाद्या मुद्द्याच्या प्रसंगीही नाही; पण यापूर्वी मात्र मी
बोलण्याच्या भरात असतानादेखील कित्येक वेळा या दैवी वाणीने मला अडवले आहे; पण
आजच्या या प्रकरणात मी एखादी गोष्ट बोलत असताना मला तिच्याकडून काहीच सूचना
मिळाली नाही. याचे कारण काय असावे?
माझ्या मते याचे कारण असे आहे की, माझ्यावर हा जो प्रसंग आला आहे तो अशुभ नव्हे,
तर शुभ आहे आणि मृत्यू म्हणजे आपत्ती ‘असे जे आपण समजतो तेच मुळात चुकीचे
आहे. या गोष्टीला माझ्याजवळ सबळ पुरावा आहे. तो हा की, माझे अकल्याण होण्याचा
संभव असता तर मला सदैव अनुभव आलेल्या दैवी वाणीने मला वेळीच सावध के ले
असते, मला विरोध के ला असता.’
दुसऱ्याएका दृष्टीने विचार के ला तर मृत्यू ही एक कल्याणकारी गोष्ट आहे, असे म्हटल्यास
हरकत नाही. कारण मृत्यूनंतरची स्थिती पुढील दोन्हांमधून एक प्रकारची असली पाहिजे.
एक, अस्तित्व नाहीसे झाल्यामुळे आणि दुसरी, कशाचेही भान राहिले नाही अशी किंवा
सामान्यपणे जसे मानण्यात येते, त्याप्रमाणे आत्म्याने के वळ स्थित्यंतर के ले आहे अशी.
मरण म्हणजे इंद्रियज्ञानाभाव. असे असेल व मेलेल्या माणसाची स्थिती स्वप्नशून्य व निर्घोर
झोप घेणाऱ्या माणसासारखी असेल, तर मरण ही एक मोठी इष्ट गोष्टच आहे, असे म्हटले
पाहिजे. कारण ज्या रात्री माणसाला स्वप्नशून्य व गाढ झोप लागली असेल त्या रात्रीशी इतर
रात्री तसेच दिवसांत मिळवलेल्या आनंदाची, सुखाची सर येत नाही. अगदी राजालादेखील
इतर दिवसाच्या किंवा रात्रीच्या मानाने ही संख्या मोजण्यास फार श्रम पडणार नाही.
मरणाचे स्वरूप जर अशाच प्रकारचे असेल, तर निदान मला तरी ते वाईट असे वाटत नाही.
कारण या दृष्टीने विचार के ला तर अनंतकाळ हा एका रात्रीसारखाच होतो.
मरण म्हणजे एक प्रकारचा प्रवास आहे, असे आपण मानले आणि या जगातील जी माणसे
मृत्यू पावली आहेत, ती अद्यापही अन्य लोकांत जिवंत आहेत अशी जी सामान्यत: समजूत
आहे ती आपण खरी मानली तर न्यायाधीश हो, मरणाहून अधिक फायद्याची गोष्ट कोणती
आहे? परलोकाचा हा प्रवास खरोखरीच करून पाहण्यासारखा आहे, असे मला तरी वाटते.
कारण या जगात जे लोक आपणाला न्यायाधीश म्हणवितात, अशा लोकांच्या तडाख्यातून
कायमचे निसटून परलोकांत या पदवीस खरोखरीच लायक आहेत अशा मायनॉस व
रादामेथस् डमायनॉस हा ग्रीक देशाचा राजा व ज्युपिटर आणि युरोपा यांचा पुत्र होता.
त्याला न्यायाधीश करण्यात आले होते, तसेच रादामेंथस् हाही एक न्यायाधीश होता. हे
दोघेही अतिशय शिस्तीचे व कठोर न्यायाधीश होते, अशी त्यांची ख्याती होती. आणि
फे कस्, ट्रिप्टोलससारखे जे कोणी धर्मात्मे परलोकी गेले असतील त्यांच्याबरोबर या
प्रवासाच्या अंती मला जायचे असेल, तर यापेक्षा आनंदाची गोष्ट ती कोणती? ही मंडळी
परलोकांत न्याय-अन्यायाचा निवाडा करीत असतील, हे म्हणणे खरे असेल तर परलोकांत
जाण्याने हितच होईल. शिवाय ऑरफे यस, म्यूझियस, हेसियॉड आणि होमर यांच्याशी
संभाषण करण्याची संधी जर मिळत असेल तर त्याकरिता मोबदल्यादाखल तुम्ही कोणती
गोष्ट देणार नाही? या सर्वांची परलोकांत जर गाठ पडणार असेल तर त्यांना भेटण्यासाठी,
त्यांची गाठ घेण्यासाठी मला हजारदा मरावे लागले, तरी त्यासाठी मी तयार आहे.
माझ्यापूर्वी अन्यायाने देहान्ताची शिक्षा झालेले पालमेनिडीज, टेलेमॉॅनचा पुत्र अपॉक्स,
तसेच पुरातनकाळातील लोक यांना भेटण्याविषयी आणि एकमेकांचे अनुभव ऐकण्याचे
मला विलक्षण औत्सुक्य वाटत आहे.
त्यांची भेट घेऊन, त्यांच्याशी विचारविनिमय करणे ही एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे अन्
यापेक्षाही अधिक आनंदाची गोष्ट अशी की, तेथे जे लोक असतील त्यांची मला
इथल्यासारखी तेथेही परीक्षा घेता येईल. त्यापैकी खरोखरीच कोण बुद्धिमान अन् शहाणे
आहेत व कोण शहाणपण नसताना स्वत:ला शहाणे समजत आहेत, हेदेखील मला शोधून
काढता येईल.
त्यांच्याशी संभाषण करणे, त्यांच्या सहवासात राहणे आणि प्रश्न विचारून त्यांची कसोटी
पाहणे या गोष्टी करायला मिळाल्या तर त्यात मला अतिशय आनंद मिळेल, तसेच परलोकी
कोणी कोणासही देहान्ताची शिक्षा करीत नाही. ही गोष्ट निश्चित. कारण ते आपल्यापेक्षा
ज्या बाबतीत अधिक सुखी आहेत त्यापैकी ही एक गोष्ट आहे की, त्यांना मरण येत नाही.
अर्थात याविषयी जी सामान्य समजूत आहे ती खरी समजून मी हे सर्व बोलत आहे.
न्यायाधीशहो! मरणाला धैर्याने तोंड देणे तुमचेही कर्तव्य आहे, हे ध्यानात ठे वा. सज्जनाला
या आयुष्यात काय किंवा मेल्यानंतर काय के व्हाही संकट येणार नाही, हे तत्त्व सत्य मानून
चला, त्याच्यावर कोणते प्रसंग येतात, याविषयी देव कधीही निष्काळजी नसतात.
माझ्यावर आज जो प्रसंग आला आहे, तो आकस्मिकरीत्या आला आहे, असे नाही. माझी
तरी अशी समजूत आहे की, मी आता मेलो आणि अनेक प्रकारच्या त्रासातून मुक्त झालो,
म्हणजे त्यातच माझे कल्याण आहे. म्हणूनच कदाचित दैवी सूचनेने मला आज कोणत्याही
कर्मापासून परावृत्त के ले नाही, ही माझी ठाम समजूत आहे.
तेव्हा माझ्यावर आरोप ठे वणाऱ्या लोकांवर किंवा ज्यांनी मला दोषी ठरवून देहान्ताची
शिक्षा दिली आहे, त्यांचाही मला राग आला नाही. तरीही त्यांनी सद्बुद्धीने माझ्यावर आरोप
ठे वून मला दोषी ठरविले, असे मात्र मुळीच नाही. त्यांचा हेतू माझे अकल्याण व्हावे हाच
होता तेव्हा ते दोषी आहेत, असे म्हणायला काहीच हरकत नाही.
तथापि त्यांना एक विनंती करावीशी वाटते, माझी मुले मोठी झाल्यावर त्यांची सद्वर्तनापेक्षा
द्रव्याकडे किंवा दुसऱ्या एखाद्या वाईट गोष्टीकडे अधिक ओढ आहे, असे तुम्हाला आढळून
आले तर त्यांना तुम्ही शिक्षा द्या. कवडीची योग्यता नसताना ते जर स्वत:ला शिष्ट समजू
लागले, तर ज्या गोष्टींबद्दल दक्षता बाळगणे जरुरी आहे, त्या गोष्टींची पर्वा न करण्याबद्दल
आणि योग्यता नसतानादेखील स्वत:ला मोठे आहोत असे समजल्याबद्दल मी तुमची
कानउघाडणी के ली, तशीच तुम्ही माझ्याही मुलांची कानउघाडणी करा. तुम्ही तसे के ले तर
मला स्वत:ला व माझ्या मुलांना योग्यतेनुसार तुमच्याकडून फळ मिळाले, असे होईल.
आता वेळ झाली आहे. आपणाला आता येथून आपापल्या मार्गाने गेले पाहिजे. मला
मरणाची वाट धरायची आहे आणि तुम्हाला जगायचे आहे. मरण चांगले की जगणे चांगले,
हे ईश्वरालाच ठाऊक!
☐☐☐
7. देहान्ताची शिक्षा
माणसाचे हित दिखाऊ शिक्षणात नसून खऱ्या ज्ञानप्राप्तीत आहे. आपले खरे हित कशात
आहे, याची जाणीव त्याला होणे अत्यंत गरजेचे आहे.
प्लेटोने सॉक्रे टिसच्या शेवटच्या दिवसांचे वर्णन क्रिटोमध्ये के ले आहे. कारागृहात मरणाची
प्रतीक्षा करतानाही सॉक्रे टिस गंभीर विषयावर त्याच शांतचित्ताने आपले विचार मांडीत
असे, जसे त्याच्या स्वतंत्र जीवनात परिलक्ष्यीत होत असत. अथेन्सच्या न्यायमंडळाद्वारे
त्याच्यावर प्रत्यक्ष अन्याय होत असूनही सॉक्रे टिसच्या मनात त्यांच्याविषयी काही कटू
भावना किंवा राग उत्पन्न झाला नव्हता. सॉक्रे टिसला कारागृहातून सोडविण्यासाठी मित्र
क्रिटो एक अत्यंत सोपी योजना घेऊन त्याच्याकडे येतो. अथेन्स सोडून कु ठे तरी जाऊन
सॉक्रे टिस मुक्तपणे जगू शके ल, असे त्याला वाटते.
क्रिटो प्रकरणात सॉक्रे टिसच्या चरित्राची एकच बाजू दाखविण्याचा प्लेटोचा प्रयत्न होता
म्हणूनच या प्रकरणात सॉक्रे टिसला ईश्वरावर श्रद्धा ठे वणाऱ्या एखाद्या दार्शनिकाच्या रूपात
न दाखविता के वळ एक सच्चरित्र, श्रेष्ठ-धारिष्ट नागरिकाच्या रूपात प्रस्तुत के ले आहे.
सॉक्रे टिसला अन्यायपूर्ण ढंगाने शिक्षा ठोठाविण्यात आली होती. असे असूनही राज्याचे
नियम धाब्यावर न बसवता त्याचे पालन करणे, हे आपले आद्यकर्तव्य मानून आपल्या
जीवनाची आहुती देण्यास तो तत्पर होता.
सॉक्रे टिसला देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा झाली होती; परंतु ग्रीक लोकांमधील समजुतीमुळे
ती लांबणीवर पडली होती. ती समजूत अशी की, एका धार्मिक विधीकरिता अथेन्ससहून
जे जहाज डेलॉस येथे जात असे ते परत येईपर्यंत गुन्हेगाराला देहान्ताची शिक्षा दिली जाऊ
नये, त्यामुळे ते जहाज परत येईपर्यंत गुन्हेगाराला कै देत ठे वण्यात येत असे व ते जहाज
परतल्यानंतर शिक्षेची अंमलबजावणी के ली जात असे.
सुटके चा प्रयत्न
सॉक्रे टिस तुरुं गात असताना त्याच्या मित्रांनी त्याच्या सुटके साठी प्रयत्न चालविले होते;
परंतु तो तुरुं गातून पळून जायला तयार नव्हता. याचे कारण त्याला कशाचीतरी भीती वाटत
होती म्हणून असे नव्हे, तर नैतिकदृष्ट्या त्याला पळून जाणे योग्य वाटत नव्हते; तरीही
प्रयत्न करण्यासाठी क्रिटो त्याला भेटून सनियमहून जहाज रवाना झाल्याचे सांगतो.
स्वप्नातही सॉक्रे टिसला चेतावनी मिळाली असती की, तिसऱ्या दिवशी त्याला या संसारातून
प्रयाण करावे लागणार आहे.
क्रिटो उजाडण्यापूर्वीच सॉक्रे टिसचे मन वळविण्यासाठी जातो. ‘सकाळच्या आत येथून
निसटला नाही, तर मग सुटण्याची आशा नाही,’ असे त्याने सॉक्रे टिसला सांगितले.
‘अधिकारी वगैरे वश करून घेतले आहेत, बेत फसण्याची भीती नको,’ असे म्हणून
आताच्या आता पळून जाण्याबद्दल तो सॉक्रे टिसला गळ घालतो. ‘‘आमची काळजी करू
नका, कारण बेत फसणार नाही; पण जर का आम्ही तुम्हाला इथेच मरू दिले, तर आमची
मान लाजेने खाली जाईल.
तुम्हाला आपल्या मुलाबाळांविषयीदेखील विचार करायला हवा. शत्रूच्या हातातील बाहुला
बनू नका. पैशाची सोय मी व सिमिआस तथा दुसऱ्या अनेक मित्रांनी के लेली आहे.
अथेन्सच्या बाहेर थिसलीला जाऊन मित्र शोधायला तुम्हाला काही कष्ट होणार नाही, याची
खात्री बाळगा.’’
सॉक्रे टिसला वाटते की, हे क्रिटोचे मत नाही. दुसऱ्यांचे शब्द त्याच्या तोंडून येत आहेत.
संपूर्ण आयुष्य विवेकाने, विचारविमर्श करून त्याने निर्णय घेतलेले आहेत. त्याने नेहमी
बुद्धिमान आणि कु शल व्यक्तींचे अनुकरण के लेले आहे.
सॉक्रे टिस क्रिटोला म्हणतो, ‘‘क्रिटो, माझा प्राण घेतला म्हणजे माझे अकल्याण के ले असे
होत नाही. नेहमीच एका चांगल्या, न्यायोचित व सन्माननीय जीवनाला महत्त्व द्यायला हवे.
अहंकार दुखावला गेला किंवा मुलांचे नुकसान झाले या सर्व गोष्टी दुय्यम आहेत. महत्त्वाची
गोष्ट ही की, मी पळून जाण्याचा प्रयत्न करणे योग्य आहे का?
क्रिटो व सॉक्रे टिस यांचे पूर्वी अनेकवेळा संभाषण झाले होते तेव्हा त्यांच्यात असा प्रश्न
अनेकवेळा आला होता की, अन्याय हा के व्हाही झाला तरी तो वाईटच असतो.
बुद्धिपुरस्सर कोणतीही वाईट, चुकीची गोष्ट करू नये. ही तत्त्वे यापूर्वीदेखील क्रिटोने मान्य
के ली होती.
पळून जाण्यास नकार
सॉक्रे टिस विचारतो की, ‘‘मी आता कै देत आहे म्हणून ही तत्त्वे सोडायची की काय?
थोड्याच दिवसांपूर्वी कबूल के लेली सर्व तत्त्वे इतक्यातच झुगारून द्यायची काय?
क्रिटो मान्य करतो की, ही तत्त्वे तशीच आहेत.
‘‘मग तुरुं गातून पळून गेल्याने ती तत्त्वे, ते सिद्धांत रसातळास जाणार नाहीत का?’’ असा
प्रश्न सॉक्रे टिस विचारतो.
क्रिटो या प्रश्नाचे उत्तर द्यायला असमर्थ ठरतो.
पुढे सॉक्रे टिस सुंदर रूपकाचा आधार घेऊन आपले मत मांडतो. तो म्हणतो, ‘‘आपल्या
देशाचे धर्मशास्त्र अर्थात कायदा मूर्त देह धारण करून माझ्याजवळ येऊन, माझ्या पळून
जाण्याच्या बेताबद्दल माझ्याशी वाद घालीत आहे. असे समजा की, कायदा म्हणत आहे
सॉक्रे टिस तू हे काय पाप आरंभिले आहेस? सर्व नागरिक जर असे करू लागले तर समाज
तरी कसा चालेल? समाजात धर्माने विवाहव्यवस्था घालून दिलेली होती म्हणून तुझ्या आई-
वडिलांना विवाह करून सुखाने नांदता आले व तुझा जन्म झाला. तू सावकाश राजीखुशीने
येथील कायद्याच्या सर्व गोष्टी मान्य के ल्या आहेस. आपल्या इच्छेने तू इतकी वर्षे के व्हाही
अथेन्स सोडून जाऊ शकला असतास; परंतु गेली 70 वर्षे पूर्ण एकनिष्ठेने तू येथे राहत
आहेस. येथील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करीत आहेस, आपल्या वागण्याने तू
दाखवून दिले आहेस की, तुला हा कायदा मान्य आहे. तेव्हा आता देशाचे नियम तोडून
आणि नीती-नियमांचे अतिक्रमण करून के वळ तुझ्याच नावाला काळिमा लागणार आहे,
एवढेच नाही तर त्यात तुझ्या मित्रांचेही नुकसान होईल.
दुसरी गोष्ट अशी की, जेव्हा शिक्षेविषयी मूळ विचारणा के ली होती तेव्हादेखील तू
हद्दपारीची शिक्षा मागू शकला असतास; पण तेव्हा मात्र तू मोठ्या अभिमानाने हद्दपारीच्या
शिक्षेपेक्षा देहान्ताची शिक्षा स्वीकार के ली. मग आता तू आपला निर्णय कसा काय बदलू
शकतोस?
येथून कोणत्याही सुराज्यरम्य देशांत तू पळून गेलास तरीही तेथील सरकार व देशाभिमानी
लोक तुला शत्रूच समजतील. थेसालीसारख्या अराजकता माजलेल्या एखाद्या देशात
जाऊन राहिलास तर तू आपला जीव वाचवशील हे खरे; पण जेव्हा त्यांना तुझ्या पळून
जाण्याविषयी कळेल तेव्हा त्यांची घटकाभर करमणूक होईल. तेव्हा मात्र तुझे जगणे अगदी
लाजिरवाणे होईल. समजा, तेथील लोकांचे मन सांभाळून राहिलास, तर सहसा कोणी असे
म्हणणार नाही; पण असे गुलामासारखे जगण्यात काय अर्थ आहे? मग तुझ्या सदाचार,
न्याय इत्यादीबद्दलच्या विचारांचे काय होणार?
आपल्या मुलांना तू आपल्याबरोबर थेसालीला घेऊन गेलास तर त्यांचा विशेष फायदा
होईल असे नाही. अथेनिअन नागरिकत्वाचे त्यांचे हक्क बुडवून त्यांचा काय फायदा होणार
आहे? बरे! त्यांना अथेन्समध्ये ठे वलेस तर तुला असे वाटते का की, ‘मी थेसालीला राहिलो
तरच माझे मित्र माझ्या मुलाबाळांकडे लक्ष ठे वतील, मी परलोकी गेलो तर त्यांच्याकडे
कोणी लक्ष देणार नाही.’ अशी जर तुझी कल्पना असेल तर ती साफ खोटी आहे. तुझे मित्र
भोजनभाऊ मित्र असतील तर असा प्रकार कधीही घडणार नाही. हा विश्वास बाळग.
शेवटी सॉक्रे टिस उपदेश देताना म्हणतो की, तुम्ही फक्त धर्माचा, न्यायाचा विचार करा.
माझ्या जीवनाचा, मुलाबाळांचा विचार नंतर करा आणि हा पळून जाण्याचा योजलेला
पापात्मक विचार सोडून द्या. मी शांतीने या जगाचा निरोप घेईन. तुमच्या सांगण्याप्रमाणे
जर मी वागलो तर या जगात किंवा परलोकातदेखील सुख लाभेल असे नाही; पण
चारित्र्यहीनता मात्र पदरात येईल. जशास तसे या न्यायाने वागलो आणि स्वधर्म व स्वदेश
यांच्यावर जर उठलो तर धर्माचे आणि माझे इहलोकी व परलोकीही वैर होईल.
प्रत्यक्ष धर्म येऊन मला या सर्व गोष्टी सांगत आहे, असे सॉक्रे टिसने सांगितल्यावर क्रिटो
निरुत्तर होतो.
अशा तर्‍हेने सॉक्रे टिसचे अंतर्मन नेहमी त्याच्याशी संवाद साधत असे.
अशाप्रकारचे संवाद लिहिण्यात प्लेटोचा उद्देश आपल्या गुरूची तात्त्विक मते के वळ
अथेन्सच्या लोकांना अवगत करून द्यावीत असा नसून भावी पिढीसाठी आणि संपूर्ण
जगासाठी होता. आपल्या गुरूच्या धीरोदात्त चारित्र्याचे चित्र वाचकांसमोर उभे करावे हाच
त्याचा हेतू दिसतो.
या घटनेविषयी कोणताही निश्चित पुरावा सापडत नाही की, क्रिटोने सॉक्रे टिसला
सोडविण्याचा प्रस्ताव ठे वला होता; पण प्लेटो हा लेखक कल्पक जादूगारासारखा होता.
त्याने कल्पनेच्या जोरावर क्रिटोसारख्या अतिशय योग्य व्यक्तीची निवड के ली. कायद्याने
अन्यायपूर्ण निर्णय दिला म्हणून सॉक्रे टिससारख्या तत्त्ववेत्त्याने अशाप्रकारे पळून जाणे
कितपत योग्य आहे, हा वादाचा विषय ठरू शकतो. धर्म-अधर्माचा विचार करण्यासाठी हा
परस्परविरोधी निर्णय ठरू शकतो.
गद्यलेखक शैलीचे मत असे होते की, सॉक्रे टिसने मरण पत्करले हे उचित के ले; पण प्लेटोने
दिलेली कारणे विशेष तर्क पूर्ण वाटत नाहीत. खरं म्हणजे सॉक्रे टिसला आपली बाजू मांडून
जिवंत राहता आले असते व आपले चांगले कार्य तो सुुरू ठे वू शकला असता. चांगले कार्य
करीत असता त्याला मरण आले असते तर फार चांगले होते; पण प्लेटोचा उद्देश धर्म-
अधर्माची व्याख्या करणे हा नव्हता.
सॉक्रे टिस हा ‘‘के वळ विवादप्रिय, वादकु शल बुद्धिमान पुरुष नव्हता, तर त्याची
न्यायप्रियता फार जाज्वल्य होती व नैतिक धैर्य हेही अत्यंत उच्च दर्जाचे होते’’ हे त्याला
दाखवायचे होते, असे या संवादावरून स्पष्ट दिसून येते.
माणसाला आपल्या प्राणांपेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट प्रिय नसते; पण प्राणांपेक्षाही मला
सदाचरण अधिक प्रिय आहे, असे सॉक्रे टिस म्हणत असे व हे म्हणणे त्याने आपल्या
आचरणाने खरे करून दाखविले. शिक्षा अन्यायाने झालेली असतानादेखील त्याने ती
शिरसावंद्य मानली. का? तर ‘एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये.’
प्रत्येक राज्याचे आपले काही नियम असतात. म्हणून ते जर लोक स्वहितासाठी मोडू
लागले तर त्याचे पावित्र्य नष्ट होऊन सर्वत्र अराजकता माजेल. म्हणून शहाण्या माणसाने हे
पावित्र्य नष्ट करू नये हा उपदेश सॉक्रे टिसने आपल्या वर्तनाने सर्व जगाला के ला आहे.
त्याची अशी अनन्यसाधारण भावना होती की, ‘‘दुष्ट व्यक्ती कोणाचेही चांगले करू शकत
नाही किंवा कोणाचे वाईटदेखील करू शकत नाही.’’ नैतिक अर्थाने यावर विचार के ला तर
याचा अर्थ सॉक्रे टिसच्याच शब्दांत सांगायचा तर- दुष्ट व्यक्ती कोणालाही बुद्धिमान किंवा
मूर्ख बनवू शकत नाहीत.
हा छोटासा संवाद तर्क शास्त्राचे एक आदर्श उदाहरण आहे. त्यात सामान्य सिद्धांताच्या
दृष्टीने निष्कर्षाची गरज राहत नाही.
मृत्यूची चाहूल
सॉक्रे टिस आपल्या काळकोठडीत पडून आहे. क्रिटो आल्याचे त्याला समजते अन्
तेव्हापासून संवादाला सुरुवात होते.
क्रिटो सॉक्रे टिसचा एक श्रीमंत मित्र अन् त्याचा शिष्य आहे. त्याला बघून सॉक्रे टिस आश्चर्य
व्यक्त करतो की, यावेळी इतक्या पहाटे तुम्हाला तुरुं गाच्या अधिकाऱ्याने आत कसे काय
सोडले?
क्रिटो सांगतो की, ‘‘त्या अधिकाऱ्याची व माझी चांगली ओळख आहे. मी त्याच्यावर
उपकार के लेले आहेत.’’
क्रिटोला एक वाईट बातमी सॉक्रे टिसला सांगायची असते. ती म्हणजे सुनियमहून काही
लोक2 आले आहेत. त्यांनी सांगितले की, जहाज डेलॉसहूला परतले आहे. तेव्हा उद्याचा
दिवस तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस होणार असे दिसते. (थेसिअनने सात कु मार
आणि सात कु मारिकांना एका नौके मधून क्रिट येथे पोहोचवले व त्यांचे प्राण वाचविले. ही
जी कथा आहे ती या नौके बद्दल आहे, असे अथेनिअन लोक मानतात. याविषयी अशी एक
गोष्ट सांगितली जाते की, आपण जर वाचलो तर डेलॉस येथील अपॉलोची वारी करून
येण्याकरिता आपल्यातर्फे एक शिष्टमंडळ पाठवायचे, असा त्यावेळी अथेनिअन लोकांनी
अपॉलोस उद्देशून शपथपूर्वक संकल्प के ला होता. हा संकल्प त्यावेळेपासून आजतागायत
त्यांनी पाळला व दरवर्षी अपॉलोकडे या नौके ची रवानगी नेमाने होत आहे आणि अपॉलोची
यात्रा करण्याचा या मंडळाने प्रस्थान के ल्यापासून आपले नगर अत्यंत शुद्ध ठे वायचे व
डेलॉसची यात्रा संपवून येईपर्यंत कोणतीही देहान्ताची शिक्षा अमलात आणायची नाही
असा त्यांनी कायदाच के ला होता. ज्यादिवशी नौके ची पूजा होते त्या दिवशी शिष्टमंडळ
प्रस्थान करते.
सॉक्रे टिसवर खटला भरण्याच्या एक दिवस आधी या नौके ने प्रस्थान के ले होते अन् म्हणूनच
इतके दिवस त्याला तुरुं गवास भोगावा लागला होता. या काळात दिवसभर तो आपल्या
मित्रमंडळींशी चर्चा करीत असे.)
सॉक्रे टिस क्रिटोचे म्हणणे डावलतो अन् म्हणतो - उद्या जहाज येईल असे मला वाटत नाही.
कारण मला काल एक स्वप्न पडले. स्वप्नात मी शुभ्र वस्त्र परिधान के लेल्या एका स्त्रीला
बघितले. तिने मला सांगितले की, सॉक्रे टिस आजपासून तिसऱ्या दिवशी तुला मृत्यूला
सामोरे जावे लागणार आहे. याचा अर्थ, स्पष्ट आहे. याबद्दल काही शंकाच नाही की,
आजपासून तीन दिवसांनी जहाज येणार व मला या संसारातून प्रयाण करावे लागणार.
क्रिटोची याचना
क्रिटो सॉक्रे टिसला स्वप्नांच्याबाबतीत बोलू न देता त्याला दैत्याची उपमा देतो व म्हणतो,
सॉक्रे टिस, तुम्हाला जर शिक्षा झाली तर लोक म्हणतील की, क्रिटो आणि त्याचे मित्र
आपल्या मित्राचा जीव वाचविण्यासाठी पैशाची व्यवस्था करू शकले नाहीत. मित्राच्या
जिवापेक्षा क्रिटोला पैसा अधिक महत्त्वाचा होता, असे लोकांना वाटावे यापेक्षा अपकीर्ती
ती कोणती? सॉक्रे टिसच्या पलायनाची व्यवस्था मी के ली होती; पण त्याने ही गोष्ट कबूल
के ली नाही, असे सांगितले तरी कोणीही त्यावर विश्वास ठे वणार नाही.
क्रिटोच्या या बोलण्यावरून असे दिसते की, चिरीमिरी देऊन कारागृहातून पळून जाणे
सहज शक्य होते. ही गोष्ट सर्व लोक जाणत होते. लोकही या गोष्टीसाठी नाराज होत नसत.
ते असे समजून चालत की, असे होणारच. त्यामुळे सॉक्रे टिस पळून गेला असता तरीही
कोणाला नवल वाटले नसते.
यानंतर साधारण माणसाचे नैतिक कर्तव्य काय आहे, हे सांगताना क्रिटो म्हणतो की,
आपल्या मुलांचे संगोपन करणे हे एका पित्याचे कर्तव्य असते. तुम्ही असे वागलात तर
मुलाबाळांना उघडे टाकू न त्यांचा तुम्ही त्याग के ला असे होईल. येथून सुटलात तर
पालनपोषण करून त्यांना तुम्हाला शिक्षण देता येईल; पण असे न करता त्यांना अनाथ
करण्याच्या तयारीत तुम्ही आहात; पण क्रिटो असे म्हणत नाही की, मी तुमच्या
मुलाबाळांची काळजी घेईन.
पुढे क्रिटो म्हणतो की, आधी मुळात खटला उपस्थित होऊ दिला ही एक चूक झाली अन्
तो चालविण्याची दुसरी घोडचूक झाली. आता तुम्हाला कै देतून सोडविता आले नाही तर
आमच्यासाठी हा मूर्खपणाचा कळस होईल. ही गोष्ट आम्हा सर्वांना, तुमच्या मित्रांना
लांच्छनास्पद होईल.
सॉक्रे टिसचे उत्तर
सॉक्रे टिस क्रिटोला म्हणतो की, मला सदैव सदसद्विवेकबुद्धीने काम करायला हवे.
अविवेकी बुद्धीने वागून चुकीचे काम करणाऱ्या लोकांचा मी तिरस्कार करतो. न्यायाने
वागणाऱ्या लोकांचे मत माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. तूच सांग, जाणूनबुजून
चुकीचे काम करणे योग्य आहे का? कोणी कितीही उपकार करो, त्याचा सूड उगवून किंवा
त्याच्याशी जशास तसे या न्यायाने वागण्याची इच्छा आपण कधीही धरू नये. माझे हे मत
बहुजनांना कधीही मान्य झाले नाही व पुढेही होईल असे वाटत नाही. हे एक मूलभूत तत्त्व
आहे. हे तत्त्व ज्यांना मान्य नसेल ते निश्चितच एकदुसऱ्यांचा तिरस्कार, हेवा करीत
असणार.
समजावून सांगण्याव्यतिरिक्त अन्य प्रकाराने वाइटाचा प्रतिकार करणे हेदेखील वाईटच
असते. ज्या कायद्यांनी नियमन होते त्या कायद्यांविरुद्ध माणसाने जायचे नसते.
कायद्यासमोर नागरिकाची स्थिती म्हणजे आई-वडिलांसमोर लहान मूल. बापाने किंवा
तुमच्या धन्याने तुला जसे वागविले तसेच वागायला हवे.
जगाच्या समोर आज मी उभा आहे, तो के वळ या राज्यामुळे. या देशाने मला जीवनात जी
वाट दाखविली आहे त्या मार्गानेच मला जायला हवे. कारण प्रत्येक नागरिकांवर त्या
देशातील कायदा लागू होतो, मग तो विवाह असो, मुलांचे पालन-पोषण असो किंवा त्यांचे
शिक्षण असो.
सॉक्रे टिस हा ज्या राज्याची प्रजा आहे त्या अथेन्स राज्याचा तो गुलाम आहे. ज्या देशात
त्याचे इतके हित झाले ज्या अथेन्समध्ये त्याने वयाची 70 वर्षे सुखा-समाधानात घालविली,
त्या देशाची अवज्ञा करून त्या देशाचा अपमान, अवमान करण्याचा त्याला काहीही
अधिकार नाही.
सॉक्रे टिसचे हे बोलणे ऐकू न क्रिटोचे शब्दच खुंटले व तो तेथून निघून गेला.
☐☐☐
8. अखेरचा प्रवास
माणसाचा आचार व त्याचे शील ही मूल्यमापनाची क्षेत्रे आहेत. कृ ती जेव्हा स्वतंत्र बुद्धीने,
स्वेच्छेने झालेली असेल तेव्हाच त्याला नैतिक मूल्य प्राप्त होते.
सॉक्रे टिसच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच विषप्राशनाच्या दिवशी घडलेल्या सर्व घटना
जाणून घेण्याची उत्सुकता एखिक्रे टसला होती. पुढे त्या दिवशीची हकिकत आपल्या
मित्राला सांगताना फिडो म्हणाला- आम्ही सर्व मित्रमंडळी रोज सॉक्रे टिसला भेटायला जात
असू. विषप्राशनाच्या दिवशी आम्ही सर्व मी, क्रिटो, सिबेस, सिमियास, अपोलोडोरस वगैरे
मित्रमंडळी सकाळपासूनच तुरुं गात गेलो होतो. खरं सांगतो मित्रा, मृत्युसमयीदेखील
सॉक्रे टिसच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान, त्याची नेहमीची आनंदी वृत्ती तशीच होती.
अखेरचा संवाद
सॉक्रे टिस हा सिबेस, सिमिआस या मित्रांना म्हणाला, ‘‘मृत्यूची शिक्षा झाल्यामुळे मी
अधिकाऱ्यांवर अजिबात रागावलेलो नाही. तुम्हा सर्व मित्रांना सोडावे लागते आहे या
गोष्टीचेदेखील मला दु:ख नाही. मला या गोष्टीचा विश्वास वाटतो की, परलोकात
गेल्यानंतरदेखील मला तुमच्यासारखेच चांगले मित्र भेटतील.’’
यावर सिबेसने म्हटले, ‘‘माणसाच्या मृत्यूबरोबर त्याचा आत्माही नष्ट होतो, असा अनेक
लोकांचा समज आहे. याला तुम्ही काय उत्तर द्याल?’’
सॉक्रे टिस - ‘‘ठीक आहे. आधी आपण आत्मे हे मृत्यूनंतर परलोकी राहतात की नाही याचा
विचार करूया. मरणाने आत्म्याचे अस्तित्व संपत नाही. मृत्यूनंतर ते परलोकी वास करतात,
असा पूर्वापार चालत आलेला समज आहे. तेच आत्मे पुन्हा इहलोकी परत येतात. अर्थात
जर ते मृतांपासून जन्मत: असतील तर ते आत्मे तत्पूर्वी परलोकांत वास करीत असणार हे
खरे ना?’’ सिबेसला हे म्हणणे पटले.
सॉक्रे टिस पुढे म्हणाला - के वळ माणसांविषयी विचार न करता आपण प्राणी, झाडे-झुडपे
व इतर सर्व घटनांचा विचार करायला हवा. रात्रीतून दिवस, दिवसांतून रात्र, निद्रा व जागृती,
उष्ण व थंड तसेच जीवित व मृतही प्रतिद्वंद्वी आहेत. असे असूनही त्यांची उत्पत्ती
परस्परांपासून झाली असली पाहिजे. यावरून असे दिसते की, सर्व गोष्टींचा उद्भव अशाच
प्रकारे होतो.... म्हणजे विरोधी वस्तूपासून तत्त्वविरोधी वस्तू उत्पन्न होतात. एका
प्रतिद्वंद्वीपासून दुसरे प्रतिद्वंद्वी निघते व दुसऱ्यापासून पहिल्याचा उद्भव होतो आणि
अशाप्रकारे प्रत्येक विरोधी द्वंद्वीमध्ये दोन प्रकारची उत्पत्ती दृश्यमान होते. अशाप्रकारे
सजीवतेतून मृत्यू व मृत्यूपासून जन्म अर्थात सजीवतेतून निर्जीवता व निर्जीवतेतून
सजीवता हे चक्र चालत असले पाहिजे.
हे बरोबर आहे. (सिबेस म्हणाला,) मृत्यू झालेल्यांचे आत्मे नाश पावत नाहीत. मृतांपासूनच
जीव उत्पन्न होतो, जन्म होतो, ज्यांना आपण मृत समजतो तेच पुनर्जन्म घेतात. तसेच
सज्जनांना मरण आल्यावर त्यांच्या आत्म्यांना सद्गती प्राप्त होते, असेच ना?
सॉक्रे टिस - हो, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे.
संभाषण पुढे चालवीत सिबेस म्हणाला.
दुसरे असे की, ज्ञान होणे म्हणजे विस्मरण झालेल्या गोष्टींचे स्मरण होणे, असे तुम्ही नेहमी
म्हणता. ते जर खरे असेल तर मला वाटते आपणाला ज्या गोष्टी विस्मृत झाल्या असतात व
नंतर त्यांचे स्मरण होते त्या गोष्टी पूर्वी के व्हातरी आपल्याला अवगत असल्या पाहिजेत. हा
मनुष्यदेह धारण करण्यापूर्वी जर आपला आत्मा अस्तित्वात नसेल तर ही गोष्ट शक्य
होणार नाही. तेव्हा या पुराव्यावरून आत्म्याचे अमरत्व सिद्ध होते, खरे ना?
अन् हो, याशिवाय एक अत्यंत सबळ पुरावा आहे. एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही कोणत्याही
गोष्टींबद्दल योग्य दिशेने प्रश्न विचारले तर ती व्यक्ती कोणाच्याही शिकवणीशिवाय त्या
प्रश्नांची योग्य उत्तरे देऊ शकते, हा आपला अनुभव आहे. या प्रश्नांच्या उत्तरांचे ज्ञान त्यांच्या
मनात सुप्तावस्थेमध्ये नसेल तर तो योग्य अशी उत्तरे देऊ शकत नाही. निर्णायक बुद्धी
त्याला नसेल तर उत्तर देणे शक्य नाही.’’
हे ऐकू न सिमिआसचा चेहरा प्रश्नार्थक झाला. ते पाहून सॉक्रे टिस म्हणाला-‘‘सिमिआस’
ज्ञान म्हणजे स्मृती, याबद्दल तुमच्या मनात शंका आहे असे वाटते. असे बघा, एखाद्या
माणसाला एखादी गोष्ट आठवली तर ती गोष्ट त्याला पूर्वी कधीतरी ठाऊक असली पाहिजे,
नाही का?
सिमिआस- नि:संशय!
सॉक्रे टिस- स्मृती म्हणजे एखादी गोष्ट माणूस जेव्हा ऐकतो, पाहतो किंवा आपल्या
इंद्रियांद्वारे अनुभवतो तेव्हा त्यावेळी त्याच्या मनात दुसऱ्या एखाद्या वस्तूची प्रतिमा उभी
राहते. पहिल्या गोष्टीचे ज्ञान या दुसऱ्या गोष्टीपेक्षा भिन्न असते. ज्या गोष्टींची प्रतिमा त्या
माणसाच्या मनात उभी राहते त्या गोष्टीची स्मृती त्या व्यक्तीला झाली असे आपण म्हणतो.
एखाद्या व्यक्तीला बघून आपल्याला दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची आठवण होणे शक्य आहे
की नाही?
सिमिआस - हो, अनेकदा आपल्याला एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूला बघून दुसऱ्या व्यक्ती
किंवा वस्तूची आठवण होते. अनेकदा त्या दोघांमध्ये साम्य असते म्हणून किंवा अनेकदा
साम्य नसूनही आपल्याला त्या दुसऱ्या व्यक्ती किंवा वस्तूंची आठवण होते, हे खरे आहे
सॉक्रे टिस - हे ज्ञान जर आपणाला जन्माच्या आधी प्राप्त झाले होते तर जन्माच्या वेळी
आपणास त्या गोष्टी ठाऊक असल्या पाहिजेत, नाही का?
सिमिआस - हो सॉक्रे टिस, तुमचे म्हणणे बरोबर वाटते आहे.
सॉक्रे टिस - आपण जर मिळालेले ज्ञान विसरलो नसलो तर जन्म घेतल्याबरोबर हे ज्ञान
आपल्याबरोबर असणार व मरेपर्यंत ते आपल्या सोबत आपल्याबरोबर राहणार. कारण
ज्ञान होणे याचा अर्थ ज्ञान प्राप्त करून घेऊन ते न विसरणे असा आहे. विस्मृती म्हणजे
प्राप्त झालेले ज्ञान विसरणे असा आहे.
सिमिआस - यात काही शंका नाही. मला हे पूर्णपणे पटते; परंतु मला वाटते की, जन्म
घेण्यापूर्वी मिळालेले ज्ञान जन्म घेताना आपण विसरतो. नंतर तेच ज्ञान हळूहळू इंद्रियांद्वारे
आपण परत प्राप्त करून घेतो. ही गोष्ट जर खरी असेल तर शिकणे म्हणजेच पूर्वीपासून
आपल्याजवळ असलेले ज्ञान पुन्हा प्राप्त करून घेणे असाच होईल. अर्थात शिकणे म्हणजे
स्मरण करणे असाच याचा अर्थ होतो, खरे ना?
सॉक्रे टिस - तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. एखाद्या वस्तूचे ज्ञान आपण आपल्या
इंद्रियांद्वारे प्राप्त के ले असता त्या वस्तूशी संबंधित असलेल्या तत्सम किंवा भिन्न वस्तूची
आपणास कल्पना करता येते. म्हणून मी म्हणतो की, या दुसऱ्या वस्तूचे ज्ञान आपणास
उपजत असते ते आपल्यापाशी जन्मभर राहते, असे तरी म्हणावे किंवा जन्म झाल्यावर
शिकत आहे असे जे आपण म्हणतो त्याचा अर्थ स्मरण करीत आहे. अर्थात ज्ञान म्हणजे
स्मरण असे तरी म्हणावे लागेल. सांगा सिमिआस, तुमचे काय मत आहे, कोणता पक्ष
तुम्हाला योग्य वाटतो?
सिमिआस - या प्रश्नाचे उत्तर मला आत्ताच देता येणार नाही.
सॉक्रे टिस - सिमिआस, मला सांगा, ज्या गोष्टींविषयीचा आपण ऊहापोह मांडला आहे,
त्याचे सगळ्या लोकांना विवेचन करता येईल का?
सिमिआस - मला वाटते या गोष्टींची चर्चा जशी व्हायला हवी तशी करू शकणारा एक तरी
माणूस मला सापडेल की नाही याबद्दल शंकाच आहे.
सॉक्रे टिस - याचा अर्थ असा होतो की, त्यांना या गोष्टी पूर्वी माहीत होत्या आणि नंतर त्यांना
या गोष्टीचे विस्मरण झाले आहे, होय ना?
सिमिआस - असे वाटते खरे.
सॉक्रे टिस - मग आपल्या आत्म्याला हे ज्ञान कधी प्राप्त झाले असावे? जन्म झाल्यावर तर
नक्कीच नाही.
सिमिआस - हो, नंतर खासच नाही. अर्थात जन्म घेण्यापूर्वीच!
सॉक्रे टिस - याचा स्पष्ट अर्थ असाच होतो सिमिआस की, आपले आत्मे या देहांत येण्यापूर्वी
अस्तित्वात असले पाहिजेत. मनुष्यदेह प्राप्त करण्यापूर्वी त्यांना बुद्धीदेखील असली
पाहिजे.
सिमिआस- हो, हा जन्म घेण्यापूर्वी आपले आत्मे अस्तित्वात होते याबद्दल आम्हा सर्वांची
खात्री पटली आहे.
सिबेस - पण सॉक्रे टिस, मरण आल्यावरदेखील आपले आत्मे जिवंत राहतील हे तुम्ही कोठे
सिद्ध के ले. मरण आले म्हणजे आत्मा हवेत मिळून चारी दिशांंमध्ये विकीर्ण होऊन
मरणाबरोबर नष्ट होतो, असे अनेक लोकांचे मत आहे.
सिमिआस - आत्मा हा काही तत्त्वांपासून उत्पन्न होतो. मनुष्य देहांत शिरण्यापूर्वी त्या
वस्तूला महत्त्व असते, हे जरी आपण धरून चाललो तरीही शरीरात शिरल्यानंतर त्या
शरीराला मरण आले तर आत्म्याचा अंत किंवा नाश होणार नाही हे कशावरून?
सिबेस - हो, जन्म घेण्यापूर्वी आपले आत्मे अस्तित्वात होते, हे जरी सिद्ध झाले असले
तरीही मरणानंतरदेखील आत्म्याचे अस्तित्व असते, हे आपण सिद्ध करून दाखविलेले
नाही.
सॉक्रे टिस - ठीक आहे. सिबेस, मला सांगा जगात दोन प्रकारच्या वस्तू असतात. काही दृश्य
व काही अदृश्य स्वरूपात असतात. दृश्य वस्तू सदैव विकार पावतात व अदृश्य वस्तू
अविकारी असतात. ही गोष्ट तुम्हाला मान्य आहे का?
सिमिआस - हो, तुमचे म्हणणे बरोबर आहे.
सॉक्रे टिस - मनुष्य म्हणजे शरीर व आत्मा यांच्या संयोगाने बनलेला प्राणी आहे. शरीराचे
साम्य दृश्य वस्तूंशी असते अन् आत्म्याचे साम्य अदृश्य वस्तूंशी असते.
‘‘आत्मा जेव्हा शरीराचा उपयोग करून विकारवश गोष्टींकडे आकर्षित होतो तेव्हा अनित्य
गोष्टींशी संबंध येत राहतो. त्यामुळे आत्मा भटकत राहतो; पण जेव्हा आत्मा आपल्या
शक्तीने नित्य, अविकारी गोष्टींकडे आकर्षित होतो व त्यांच्याशी तादात्म्य पावतो तेव्हा
त्याचे भ्रमण संपून तो विश्रांती पावतो. आत्म्याच्या या स्थिर वृत्तीलाच आपण ‘ज्ञान’ असे
म्हणतो.
सिमिआस - सॉक्रे टिस, तुम्ही किती सुंदररीत्या प्रतिपादन के ले आहे. आता सिद्ध झाले की,
आत्म्याचे साधर्म्य अविकारी वस्तूंशी व शरीराचे साधर्म्य विकारी वस्तूंशी आहे. अर्थात
आत्मा दिव्य वस्तूसारखा आहे व शरीर हे मर्त्य वस्तूंसारखे आहे. मी म्हणतो ते बरोबर आहे
ना? सिमिआसने विचारले.
सॉक्रे टिस - एखादा माणूस मरण पावल्यानंतर त्याचे शरीर अर्थात प्रेताचा विनाश एकदम
होत नाही. मरणाच्या स्थितीत बराच काळ प्रेत तसेच राहते. इजिप्त देशात ज्याप्रमाणे प्रेते
मीठ घालून ठे वतात, त्यामुळे आहे त्या स्थितीत प्रेत बराच काळपर्यंत राहते. शरीर जरी
विनाश पावले तरीही अस्थी तशाच राहतात, असे म्हणतात.
मग आत्म्याचे शरीरबंधन तुटल्यावर, तो परलोकी गेल्यावर, ईश्वराच्या संगतीचा लाभ
घेतल्यावर, वाऱ्याबरोबर वाहून जाऊन विनाश पावेल, असे शक्य आहे का? या आत्म्यांना
त्यांचा जीवनक्रम पूर्वजन्मी ज्या प्राण्यासारखा असेल त्या प्राण्याच्या योनीत त्याला प्रवेश
करावा लागतो, असे मला वाटते.
होय, हे बरेच संभवनीय आहे असे मला वाटते. सिमिआस म्हणाले.
( इतका वेळ शांतचित्ताने ऐकत असलेल्या सिबेसनी शंका काढली. )
सिबेस - ‘‘सॉक्रे टिस, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपले आत्मे परलोकांत कोठे तरी असतात.
एवढेच नव्हे तर मरणानंतर ते परत परलोकांत जातात, म्हणजे या जन्मामरणाचा फे रा
अनंतकाळ चालू असतो, असे तुम्हाला म्हणायचे आहे काय? मग मला सांगा, या जन्म-
मरणाच्या फे ऱ्यातून आत्म्याला कसलीही इजा होत नाही का? त्याला कधीही शीण येत
नाही का?
शरीराचा नाश झाला की, आत्म्याचा नाश होणारच नाही, अशी शाश्वती कोणीही देऊ शकत
नाही. कारण आत्मा हा अविनाशी व अमर आहे, हे सिद्ध करणे ही अत्यंत कठीण गोष्ट
आहे.’’
सॉक्रे टिस - ठीक आहे सिबेस. आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. त्याची उत्तरे द्या; मात्र
मी जो प्रश्न विचारीन त्यातलेच शब्द घेऊन उत्तर देऊ नका.
सिबेस - तुमच्या म्हणण्याचा अर्थ माझ्या लक्षात आला नाही. जरा अधिक स्पष्ट करून
सांगितले तर बरे होईल.
सॉक्रे टिस - ठीक आहे. एक उदाहरण देऊन मी माझे म्हणणे स्पष्ट करतो. आपले शरीर
उष्ण कशामुळे होते. या प्रश्नाचे उत्तर ‘उष्णतेमुळे’ असे न देता ‘अग्नी’ हे अधिक सुसंस्कृ त
उत्तर तुम्ही द्या. कळले?
सिबेस - हो, तुमच्या बोलण्यातील मथितार्थ माझ्या ध्यानात आला.
सॉक्रे टिस - तर मग आता मला सांगा की, शरीर सजीव आहे असे आपण म्हणतो, तेव्हा
कोणत्या आधारावर आपण असे म्हणतो.
सिबेस - आत्मा जेव्हा शरीरात वास करीत असतो तेव्हा आपण त्या शरीराला सजीव
म्हणतो.
सॉक्रे टिस - हा नियम सगळ्यांना लागू होतो ना?
सिबेस - अर्थात!
सॉक्रे टिस- याचा अर्थ असा की, ज्या शरीरामध्ये आत्मा असतो तो सजीव. आता मला
सांगा की, याला विरोधी शब्द आहे का? अन् असला तर तो काय आहे?
सिबेस - याला विरोधी शब्द म्हणजे ‘निर्जीव’, अर्थात मरणे.
सॉक्रे टिस - आणि आत्मा आपल्याबरोबर जे गुण आणतो त्याच्याविरुद्ध गुणांबरोबर ते
कधीही एकत्र राहू शकत नाही हे तुम्ही मान्य करता?
सिबेस - होय.
सॉक्रे टिस - समत्वाच्या स्वरूपाला ज्यामध्ये स्थान नाही, त्याला आपण काय म्हणतो.
सिबेस - विषम.
सॉक्रे टिस - आणि न्यायाला जेथे स्थान नाही, थारा मिळत नाही त्याला आपण काय म्हणू?
सिबेस - अन्याय.
सॉक्रे टिस - ठीक आहे. आता मला सांगा की, मरणाचे साहचर्य ज्याच्याबरोबर होत नाही,
त्याला काय म्हणाल?
सिबेस - अमरत्व.
सॉक्रे टिस - आत्म्याचे आणि मरणाचे साहचर्य नाही, हे खरे आहे ना?
सिबेस - होय.
सॉक्रे टिस - अमर असलेली वस्तू अविनाशी असेल तर मरण आल्यानंतरदेखील आत्म्याचा
नाश होणे शक्य नाही. तीन ही संख्या विषम आहे. ती कधीही समत्वाचा स्वीकार करणार
नाही. तसेच आत्मा हादेखील मरणाला आपल्या मार्गात येऊ देत नाही किंवा तो मृतावस्थेत
राहत नाही.
सिबेस - होय, याबद्दल वाद असणे शक्यच नाही.
सॉक्रे टिस - बरे! जे अमर असते ते अविनाशी असते, हे जर आपणाला कबूल असेल तर
आत्मा हा के वळ अमर आहे असेच नव्हे तर तो अविनाशीदेखील आहे, हेदेखील कबूल
करणे गरजेचे आहे.
सिबेस - हो, निदान या सिद्धांताबद्दल तरी वाद नको. कारण जी अमर म्हणजे नित्य असते
तिचा नाश होतो. असे मानले तर मग कोणाचा नाश होत नाही, हा प्रश्न उभा राहील.
यावर सॉक्रे टिस म्हणाला, मग अमर हे अविनाशी आहे आणि आत्मा हा अमर आहे हे दोन
सिद्धांत कबूल के ल्यावर आत्मा हा अविनाशी आहे, हे नको का कबूल करायला.
सिबेस - हो, ही गोष्टदेखील कबूल करायलाच हवी, नाही का?
सॉक्रे टिस - म्हणजे यावरून ही गोष्ट सिद्ध होते की, माणूस मेल्यानंतर त्याचे शरीर नाश
पावते. कारण ते मर्त्य आहे; परंतु मरणानंतरही अविनाशी अंश अर्थात आत्मा सुरक्षितपणे
नाश न होता मृत्यूपासून दूर जातो.
सिबेस - हो, असे दिसते खरे.
सॉक्रे टिस - तर मग सिबेस, आत्मा हा नि:संशय अमर आणि अविनाशी आहे. आपले आत्मे
निश्चितच परलोकात वास करतील, नाही का?
सिबेस - हो, तुमचे म्हणणे बरोबर आहे.
सिमिआस - सॉक्रे टिस, तुमचे बोलणे ऐकू न मलादेखील आक्षेप घेण्याला काही आधार
दिसत नाहीच. तुमचे म्हणणे मलादेखील मान्य आहे.
सॉक्रे टिस - मित्रहो! या गोष्टीचा आपण फार गांभीर्याने विचार करायला हवा की, आत्मा हा
जर खरोखरीच अमर असेल तर त्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. कारण आत्मा
अमर्त्य आहे. तेव्हा सुज्ञ व निर्दोष झाल्याशिवाय त्याची अनिष्ट गती टळायची नाही. शिक्षण
आणि संस्कार या दोन गोष्टींशिवाय दुसरे काही आत्म्यासोबत परलोकात जात नाही
म्हणूनच अनंतकाळातील त्याच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तेव्हा सर्वांनी
आत्म्याच्या उन्नतीकडे लक्ष द्यायला हवे. आत्मा हा शरीराचा पूर्णपणे दास असतो; परंतु
ज्ञानी माणूस आत्मनिग्रहाने वागून विकार-वासनांवर विजय प्राप्त करतात. त्यामुळे त्यांच्या
आत्म्यांना एक वेगळ्या प्रकारचे वळण लागते अन् मग ते सहजासहजी मोहवश होत
नाहीत. (एवढे बोलून सॉक्रे टिस शांत बसला.)
क्रिटो - सॉक्रे टिस, आपल्या मित्रांना काही आज्ञा असल्यास सांगा. आपल्या
मुलाबाळांविषयी किंवा दुसऱ्या कशाबद्दल सांगायचे असेल तर ते सांगा. तुम्हाला जास्तीत
जास्त आनंद मिळेल यासाठी आम्ही काय करावे?
सॉक्रे टिस- दुसरे काही नको. मी नेहमी जे सांगत आलो आहे तसेच वागा. प्रत्येकाने
आपल्या आत्म्याच्या उन्नतीसाठी दक्ष राहावे. नीतीच्या मार्गाने वाटचाल करीत राहिलात
की, तुम्ही जे काही कराल त्याने मला संतोषच होईल.
क्रिटो - सॉक्रे टिस, आम्ही आपल्याकडून शिकस्त करू, बरे! पण तुम्हाला पुरावे कसे?
सॉक्रे टिस हसून - तुम्हाला हवे तसे करा. फक्त हा सॉक्रे टिस तुमच्या हातून पळून जाणार
नाही याकडे मात्र लक्ष द्या की झाले
(असे म्हणून सॉक्रे टिस उठून स्नानासाठी आतल्या खोलील गेला. त्यांच्याबरोबर
क्रिटोदेखील उठून आत गेला. आत जाताना आम्हा सर्वांना त्यांनी थांबायला सांगितले.
स्नान करून तो बाहेर आला. काही वेळ आपल्या मुलांबाळांबरोबर घालवून पत्नी रडायला
लागल्यावर त्याने क्रिटोला सर्वांना बाहेर नेण्यास सांगितले व तो पुन्हा मित्रांमध्ये येऊन
बसला.)
ते अखेरचे क्षण
उन्हे कलली. सूर्यास्ताची वेळ होत आली. थोड्याच वेळानंतर तुरुं गाचा अधिकारी आला.
सॉक्रे टिससमोर उभा राहून तो म्हणाला- सॉक्रे टिस, आपण
समंजस आहात. इतर कै दी माझ्यावर तोंडसुख घेतात, शिव्या घालतात; पण मी तरी काय
करणार? मी हुकु माचा ताबेदार आहे. त्यांच्या सांगण्यावरून मी हे काम करतो. इतके दिवस
मी तुम्हाला बघतो आहे. सर्व कै द्यांंपेक्षा तुम्ही श्रेष्ठ, थोर, धैर्यवान आहात. वेळ झाली आहे
हे सांगण्यासाठी आल्याबद्दल तुम्ही माझ्यावर रागावणार नाही याची खात्री आहे. मी आता
निरोप घेतो. मन शक्य तेवढे घट्ट करून आलेल्या भोगाला स्थिरचित्ताने सामोरे जाण्याचा
प्रयत्न करा. (एवढे बोलून त्याला रडू कोसळले. पाठ फिरवून तो खोलीबाहेर निघून गेला.)
सॉक्रे टिस - (त्याच्याकडे वळून)- फार चांगला माणूस आहे हा. येथे आल्यापासून त्याची
अनेकदा भेट झाली. बघा ना, माझ्यासाठी कसे अश्रू गाळले त्याने. सॉक्रे टिस (क्रिटोकडे
वळून) - जा क्रिटो, विषाचा प्याला घेऊन ये. उगाचच त्या बिचाऱ्याला त्रास नको.
क्रिटो - एवढी कोणती घाई आहे? सूर्य मावळायला अजून थोडा अवकाश आहे. मी
अनेकवेळा पाहिलेय की, विषप्राशन करायची वेळ झाली तरीही लोक मनसोक्त खातात-
पितात. आपल्याला प्रिय असलेल्या व्यक्तींशी रममाण होतात. तेव्हा उगाचच घाई
करायला नको.
सॉक्रे टिस - ज्या लोकांबद्दल तू बोलतो आहेस त्यांचे तसे वागणे स्वाभाविक आहे. त्यांची
वृत्ती मौजमजा करण्याची असते. मृत्यूनंतर सगळं संपणार. मृत्यूनंतरचे कोणी बघितले
आहे, अशी त्यांची विचारसरणी असते. माझे तसे नाहीच. विषप्राशन लांबवून मला काही
लाभ पदरात पाडून घ्यायचा नाहीच. उलट उगाचच उशीर के ला तर माझे मन खात राहील,
तेव्हा कोणतीही सबब न सांगता विषाचा पेला घेऊन ये, माझे म्हणणे नाकारू नको.
क्रिटोच्या सांगण्यावरून काही वेळाने एक माणूस विषाचा पेला घेऊन आला. विषाचा पेला
हातात घेऊन सॉक्रे टिसने विचारले की, यातून अर्घ्य देऊन प्रार्थना करायची माझी इच्छा
आहे. तसे के ले तर चालेल का?
मृत्यू येण्यासाठी आवश्यक तेवढंच विष आम्ही देतो, असं उत्तर नोकराने दिल्यामुळे
परलोकाची यात्रा सुखाने पार पडावी यासाठी सॉक्रे टिसने देवाची प्रार्थना के ली. प्रार्थना
के ल्यावर शांतपणे त्याने विषाचा पेला उचलला व आनंदाने पिऊन टाकला.
या वेळेपर्यंत सर्वांनी मोठ्या कष्टाने स्वत:ला आवरले होते; पण जेव्हा त्यांनी सॉक्रे टिसला
विषाचा पेला ओठाला लावताना बघितला तेव्हा त्यांचे धैर्य खचले. सिबेसने तोंड झाकू न
घेतले. क्रिटो उठून बाहेर गेला. अपोलोडोरसने हंबरडा फोडला व तो ओक्साबोक्शी रडू
लागला.
सगळ्यांचा आक्रोश बघून सॉक्रे टिस म्हणाला, मित्रांनो, हे काय मांडले आहे तुम्ही?
मरणाऱ्या माणसाला शांतपणे मरू द्यावे. मृत्यूच्या क्षणी त्याच्या मनात किंवा आसपास
कोणतीही खळबळ नको. तेव्हा सर्वांनी शांत व्हा.
पाय जड होईपर्यंत चालायला सांगितले होते. पाय जड होईपर्यंत सॉक्रे टिस फिरत होते.
पाय जड झाल्यावर ते तोंडावर पांघरूण घेऊन झोपले, मग काही आठवले म्हणून
तोंडावरील पांघरूण काढून ते क्रिटोला म्हणाले, क्रिटो अ‍ॅक्स्लीपिअसला मी एक कोंबडा
देणे लागतो. तो त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवून दे, विसरू नकोस.
काळजी करू नका. नेऊन देईन, क्रिटो म्हणाला. आणखी काही इच्छा? त्यांने विचारले.
पण काहीच उत्तर आले नाही. थोड्या वेळानंतर शरीर किंचित हलल्यासारखे झाले.
नोकराने तोंडावरचे पांघरूण दूर के ले. पाहिले तर डोळे निश्चल झालेले होते.
सॉक्रे टिस या आपल्या मित्राचा मृत्यू हा असा झाला. त्याच्यासारखा न्यायप्रिय, सच्छिल
माणूस दुसरा शोधूनदेखील सापडणार नाही. आपण एक चांगला मित्र गमावला याचे दु:ख
आयुष्यभर राहील.
☐☐☐
9. सॉक्रे टिसचे तत्त्वज्ञान
ज्ञानी माणसे आत्मनिग्रहाने वागून विकार-वासनांवर विजय प्राप्त करतात. त्यामुळे त्यांच्या
आत्म्यांना एक वेगळ्या प्रकारचे वळण लागते अन् मग ते सहजासहजी मोहवश होत
नाहीत.
सॉक्रे टिसने स्वत: एकही शब्द लिहून ठे वलेला नाही. त्याच्याभोवती रचलेल्या आख्यायिका
अन् त्याच्या म्हणून म्हटल्या जाणाऱ्या साहित्यकृ तींच्या स्वरूपात ही अलौकिक व्यक्ती
आपल्या समोर येते. याआधारेच सॉक्रे टिसला समजून घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो.
समाजात जेव्हा एखाद्या नवीन विचारांची लाट उसळते तेव्हा ते अनेक लोकांचे विचार
असतात. लोकांच्या मनात नवीन विचार उठू लागतात; पण ते उच्चारण्याचे धैर्य, आपले
विचार लोकांसमोर मांडण्याचे धैर्य त्यांना होत नसते. जनतेची त्यांना भीती वाटत असते.
अशावेळी एखादा स्पष्टवक्ता, कर्तृत्ववान पुरुष पुढे येऊन या विचारांना वाचा फोडतो.
धुमसणाऱ्या आगीला बळ मिळते अन् ही आग पेट घेते व त्याच्या ज्वाला समाजाला दिसू
लागतात. ही ज्वाला एकाच व्यक्तीच्या मनातून उठणारी नसून ती एकं दर सामाजिक
विचारांच्या क्रांतीची द्योतक असते. हे काम सॉक्रे टिसने मोठ्या निष्ठेने के ले.
सॉक्रे टिसचे धार्मिक तत्त्वज्ञान
देवाची आराधना करायची म्हणजे काय? धर्माचरणाचा खरा अर्थ कोणता? देवांविषयी
लोकांमध्ये जे बोलले जाते, ज्या समजुती समाजात रूढ झालेल्या आहेत त्या कितपत
योग्य आहेत? असे अनेक प्रश्न सॉक्रे टिस करीत असे. देवदेवतांना माणसाच्या पातळीवर
आणून ठे वण्याने भाविकता नष्ट होते, ही धर्मपरायणतेत बाधा आणणारी गोष्ट आहे, असे
सॉक्रे टिसचे म्हणणे असे. माणसासारखेच देवही वासना-विकारयुक्त स्त्री-पुरुष असतात.
देव अनेकानेक असतात. त्यांच्यात भांडणे, हेवेदावे असतात. ते मत्सरग्रस्त असतात.
अशाप्रकारे मानवी रूपातच देवांची कल्पना तत्कालीन ग्रीक संस्कृ तीमध्ये अन्
धर्मविचारांमध्ये रुजलेली होती. अशावेळी मूर्तिमंत चांगुलपणा, सद्गुण, त्रिकाल ज्ञान,
नीतिविवेक हेच देवाचे खरे स्वरूप असते ही गोष्ट लोकांच्या मनात बिंबविण्याचा प्रयत्न
सॉक्रे टिस करीत होता. देवतांच्या खऱ्या स्वरूपाबद्दल सॉक्रे टिस जे प्रश्न विचारीत होता
त्यात ईश्वराविषयीची अनिष्ठा नव्हती. होती ती फक्त धर्मचिकित्सा. पण त्याची भावना न
जाणून घेता त्याच्यावर देवदेवतांविषयी अनास्था दाखविण्याचा आरोप ठे वला गेला.
त्या काळात धर्मव्यवहाराला एक बाजारू स्वरूप आले होते. धार्मिक व्यवहारातही फायदा-
नुकसान बघितले जाऊ लागले देऊळ, उत्सव, पूजाअर्चा, तीर्थयात्रा व तीर्थस्थाने यांचे प्रस्थ
खूप वाढले. वरकरणी भाविकता, धर्मपरायणतेचा मुखवटा ओढून होणारी दुर्दशा
भारतानेदेखील अनुभवली आहे. प्रभू रामचंद्राच्या जीवनापासून घ्यायची नैतिकता,
आज्ञाधारकपणा, एकवचनी, त्यागी वृत्ती सोडून, तिच्याकडे कानाडोळा करून त्याचे
राजकारण खेळले जाते, हे दृश्य भारतासाठी नवीन नाही. असेच काहीसे दृश्य
सॉक्रे टिसच्या काळात अथेन्समध्ये होते.
निसर्गावरील विचार
सॉक्रे टिसच्या मते, निसर्गाचा अभ्यास गौण होता. निसर्गाचे नियम बदलणे अशक्य आहे.
त्याला ताब्यात घेता येणार नाही, असे त्याचे मत होते. आज मानवाने निसर्गावर मात के ली
आहे. बऱ्याच प्रमाणात निसर्गावर ताबा मिळविला आहे. त्यामुळे मानवाचे ऐहिक सुख
वाढले असले तरीही त्याच्या आत्मसुखात काही बदल झाला आहे, असे म्हणता येणार
नाही.
निसर्गाचे ज्ञान हे दुधारी हत्यार आहे. या ज्ञानाचा सदुपयोग व्हायचा असेल तर त्याचा
उपयोग करणाऱ्याला त्याचे शुद्ध ज्ञान हवे. तो सच्छिल अन् समाजाचे हित जपणारा
असायला हवा. असे असेल तरच तो मानवाला ईश्वरापर्यंत घेऊन जाईल; पण तसे नसेल
तर मात्र देशाचे, मानवाचे नुकसान करून तो हिंसक-विध्वंसक व्हायला वेळ लागणार
नाही. मानवी जीवन म्हणजे काय व ते कसे जगायचे, याच्या ज्ञानाशिवाय माणसाला
हितकर जीवन जगता येणार नाही. भौतिकशास्त्रे हे ज्ञान देऊ शकत नाही.
अनुकरणीय सॉक्रे टिस
ग्रीकमध्ये सुसंस्कृ तीचा र्‍हास, लोप आणि षड्विकारांचे राज्य वेगाने होत असल्याचे
सॉक्रे टिसच्या लक्षात आले. त्याहीपेक्षा भयावह म्हणजे विकारांवर पांघरूण घालण्यासाठी
अन् विकारी वागण्याचे समर्थन होईल अशाप्रकारे सद्गुणांची परिभाषा के ली जाऊ लागली.
समाजातील विचारांची ही अराजकता बघून सॉक्रे टिस बेचैन झाला. आपल्या
स्वभावानुरूप, आपल्या जीवननिष्ठेला धरून त्याने अतिशय सक्रिय अशी भूमिका घेतली.
विचाराच्या पातळीवर माजलेला भ्रष्टाचार, त्याविषयीची एक नीतिभ्रष्ट व कोडगी वृत्ती
यांच्या विरोधात त्यांची समीक्षा करण्याचे महान काम त्याने हाती घेतले.
समाजाच्या धारणेसाठी प्रत्येक नागरिकाची वागणूक ही न्यायसंगत, धर्माला अनुसरून
अशी असायला हवी, अशी सॉक्रे टिसची भूमिका होती. त्याचे स्वत:चे वागणेही या
भूमिके ला धरूनच होते. म्हणूनच आपल्यावर लावल्या गेलेल्या आरोपाने तो अस्वस्थ
झाला होता. कोणता नागरिक धर्मपरायण आहे, कोणता नाही याची उठाठे व तो कधीच
करीत नसे.
सॉक्रे टिसच्या तत्त्वांपासून आपणास अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आज आपले
ज्ञान आपण विसरलो आहोत. आज आपण धर्मजागृत्ती, भक्ती, प्रेम, देशाभिमान,
देशभक्तीविषयी बोलतो, भाषणे ठोकतो, लेख लिहितो, वाचतो. शिक्षण हवे, देशप्रेम
पाहिजे, नीती सुधारायला हवी, देशाची सेवा करायला हवी, असे नेहमी ऐकतो-वाचतो-
बोलतो; पण हे बोलण्या-लिहिणाऱ्यांपैकी किती लोकांना धर्म कशास म्हणतात? धर्म अन्
नीती यामध्ये फरक काय? शिक्षण म्हणजे नेमके काय? देशाची सेवा करायची म्हणजे काय
करायचे, या प्रश्नांची उत्तरे देता येतील? सॉक्रे टिसच्या पद्धतीने या व असल्या प्रश्नांचा
ऊहापोह होणे आज अत्यंत गरजेचे आहे. या प्रश्नांची मीमांसा आपल्यामधून किती लोकांनी
के ली असेल?
वर्तमानकाळात विचार व आचार यांच्या संबंधाकडे दुर्लक्ष करण्याकडे, त्यांची हेळसांड अन्
हेटाळणी करण्याकडे लोकांचा कल अधिक आहे असे स्पष्ट दिसते. सॉक्रे टिसप्रमाणे ते
विचारांकडे जरा अधिक लक्ष देतील तर बरे होईल. मानवी संस्कृ तीत जे जे उत्कृ ष्ट,
मूल्यवान आहे, ते ते या अशा लोकांच्या आचरणाने र्‍हास पावण्याच्या धोक्यात पडले आहे.
सॉक्रे टिस त्याच्या पुरस्कर्त्यांना नेहमी सांगे, आग्रह करे की, ‘‘धन-संपत्ती, मान-प्रतिष्ठा,
प्रसिद्धी-ऐश्वर्य या गोष्टींच्या मागे धावू नका. स्वत:च्या आत्मोन्नतीवर लक्ष द्या आणि
निग्रहाने त्याला नेहमी चांगल्या मार्गावर घेऊन चला.’’ माणूस नेहमीच नश्वर गोष्टींकडे
आकर्षित होतो. मोहाला बळी जाऊन दूर मार्गावर जाणं सहज शक्य असतं. सॉक्रे टिसचा
हा उपदेश जर माणसाने ग्रहण के ला तर एक चांगला समाज घडू शके ल. एका चांगल्या
देशाच्या निर्मितीच्या दिशेने हे एक महत्त्वाचे व मोलाचे पाऊल असेल.
सद्गुणांचे महत्त्व
सद्गुणांचा उपयोग हा सर्व कार्यांत होतो. संगीत, कला, गणित, विज्ञान, तंत्रज्ञान, लेखन या
कार्यांत अनेक सन्मान, पुरस्कार व प्रसिद्धी प्राप्त होते. दुसऱ्या क्षेत्रातील ज्ञानदेखील प्राप्त
होऊ शकते. या कार्यात रममाण होणाऱ्या व्यक्तीला आदर, सामाजिक प्रतिष्ठा, पैसा मिळू
शकतो; पण या सर्व बाह्य गोष्टी आहेत. सद्गुणांना जोडणाऱ्या गोष्टी माणूस आपल्या
योग्यतेने, क्षमतेने अन् अंतर्दृष्टीने प्राप्त करीत असतो. या कार्यांत राहूनदेखील व्यक्ती
आपल्या श्रेष्ठतेने सद्गुण प्राप्त करू शकते. सद्गुणांचे भांडार कधीही रिकामे होत नाही.
सद्गुणी माणूस स्वत: तर चांगला असतोच; पण त्याच्या गुणाने त्याच्याबरोबर राहणारे
लोकदेखील लाभान्वित होत असतात.
अनेकदा माणूस चांगल्या गोष्टींच्या मागे लागतो; परंतु त्याच्या हातून श्रेष्ठ काम होऊ शकत
नाही. तरीही तसे करताना अनेक चांगल्या गोष्टी माणूस शिकतो. एक गोष्ट खरी आहे की,
अधिकांश लोक नेहमी वरवरच्या फायद्याच्या गोष्टींकडे आकर्षित होतात. जटिल मानवीय
कार्य अन् प्रयत्नांना ते फायद्याच्या गोष्टी प्राप्त करण्याचे एक साधन मानतात. सद्गुणांची
इच्छा ठे वून सद्गुणांचा ध्यास घेतलेले लोक विरळच असतात.
सद्गुण आणि श्रेष्ठतेची धारणा सॉक्रे टिसच्या विचारशैलीचे एक महत्त्वपूर्ण अंग आहे. यात
व्यक्ती हा कें द्रस्थानी आहे. स्वत: कठोर होऊन, स्वत:वर नियंत्रण ठे वून, स्वत:चा विकार-
परिष्कार करण्याचा प्रयत्न तो करीत असतो. आपल्या अंगी सद्गुण बाळगण्यासाठी आधी
सद्गुणांची ओळख असणे गरजेचे असते; पण त्या आधी माणसाला स्वत:ला हा निर्णय घेणे
गरजेचे असते की, आपल्यात सद्गुणांची कमी आहे का? किंवा आपणच ती व्यक्ती आहोत,
ज्यात सद्गुणांचा पुरेपूर वास आहे. अर्थात माणसाला जेव्हा ‘स्व’ची जाणीव होईल, माणूस
जेव्हा स्वत:ला ओळखेल तेव्हा आपोआपच तो आत्मोन्नती करू शके ल. माणसाची उन्नती
हीच समाज अन् देशाची उन्नती असते.
सॉक्रे टिसची नीतिपूरक अंतर्दृष्टी पहिल्याइतकीच आजदेखील अतिशय प्रभावशाली अन्
उपयोगी आहे. सॉक्रे टिसचा प्रतिवाद, नैतिक विचारशैलीला अनेक प्रकारे सुदृढ अन् निर्मळ
करू शकतो. ही गोष्ट माणसाच्या जीवनातदेखील लागू होते. आपले विचार, कार्य आणि
अनुभूती यांच्या साहाय्याने पूर्वधारणांना जाणून घेण्याची प्रेरणा आपल्याला मिळते.
आपल्या नैतिक मान्यतामध्ये असलेल्या विसंगतीला बाहेर काढण्यास याची मदत होऊ
शकते.
अशाप्रकारचे आत्मपरीक्षण आपल्या नैतिक जीवनाला सुखकर करण्याला मदत करू
शकते. जेथे नैतिक मूल्य अन् मान्यता या दोघांमध्ये सामंजस्य नसते, ज्यांनी आपल्या
मान्यता पारखलेल्या नसतात, अशा व्यक्ती जीवन अन् कार्य करण्याच्या योग्य पद्धतीला
परिचित नसतात. अशा लोकांची नैतिक मूल्ये परस्परविरोधी व असंगत असतात. अशा
व्यक्ती दुसऱ्यांपेक्षा अधिक आत्मवंचना करतात व अधिकांशत: आपली स्वार्थसिद्धी
करून घेतात. अशी माणसे आपल्याला योग्य वाटते तेच कार्य करतात अन् नंतर आपल्या
के लेल्या कार्याला तर्क संमत बनवण्याचा प्रयत्न करतात किंवा या ना त्या प्रकारे त्या
कार्याला तर्क संमत बनवतात.
शुद्ध आचरण
सॉक्रे टिसने सांगितल्याप्रमाणे माणसाने उत्तम मानवीय गुण विकसित करायला हवेत.
उदाहरणार्थ- निष्पक्षता, चांगुलपणा, आत्मसंयम, समजूतदारपणा, न्यायप्रियता, देशप्रेम,
शालीनता इत्यादी. या सर्व गुणांना माणसाने आपल्या जीवनात आत्मसात करायला हवे.
कारण हे गुण माणसाला संयोगाने किंवा सहजासहजी प्राप्त होत नाहीत. या गुणांना
आत्मसात करण्यासाठी कोणतेही आर्थिक नुकसान सोसावे लागत नाही. या सर्व गोष्टी
आमच्या अगदी जवळ असतात; पण आम्ही त्यांना बघण्याचे टाळतो किंवा त्यांना
जाणूनबुजून ओळखत नाही. प्रत्येक माणसाने डोळे उघडून चांगले गुण ओळखून, ते
आत्मसात करून नंतर आचरणात आणण्याचे प्रयत्न करायला हवेत.
प्रत्येक माणसाने आपली तुलना दुसऱ्या चांगल्या माणसाशी करून, नि:पक्षपणे आलोचना
करून आपली योग्यता काय आहे हे ठरविले पाहिजे. हे ठरविणे ही अत्यंत अवघड गोष्ट
आहे. कोणीही असे करण्याचे धाडस करीत नाही; परंतु प्रत्येक व्यक्तीसाठी, आपल्या
व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्यासाठी, मानसिक रूपाने समर्थ बनण्यासाठी, स्वत:मध्ये
आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, एक उत्तम नागरिक बनण्यासाठी हा एक अचूक मार्ग
आहे.
नैतिकतेचा अर्थ दुसऱ्यावर आरोप करणे हा नव्हे. नैतिकता आम्हाला गंभीरतापूर्वक विचार
करायला भाग पाडते की आम्ही कसे आहोत? आमचा स्वभाव कसा आहे? आमच्यामध्ये
नैतिक गुण आहेत की नाहीत? नसतील किंवा विशेष नसतील तर आम्ही स्वत:ला नैतिक
गुणांच्या अनुरूप कसे बनवू शकतो?
‘‘सामाजिक जीवनापासून माणसाला जर हित साधायचे असेल, मानवी संस्कृ ती
टिकवायची असेल तर सॉक्रे टिसच्या तर्क शुद्ध विचारसरणीचा स्वेच्छाचाराच्या परंपरागत
कल्पना नष्ट करण्यास चांगला उपयोग होईल, याचा समाजाने विचार के ल्यास ते हितावह
होईल.’’ या ग्रीक तत्त्ववेत्त्या मार्गारेट ई. जे. टेलरच्या विचारापासून आपण
भारतीयांनीदेखील आज धडा घेण्यासारखा आहे.
स्त्रियांचा सन्मान
सॉक्रे टिसने त्या काळातही स्त्रियांची योग्यता मान्य के ली होती. ‘‘स्त्रियांना योग्य शिक्षण
मिळाल्यास पुरुषांची सर्व कामे पार पाडण्यास त्या समर्थ होतील अन् त्यांच्या अंगी
पुरुषांइतकीच योग्यता येईल. पुरुष व स्त्रिया यात निसर्ग यत्किंचितही पक्षपात करीत
नाही,’’ असे सॉक्रे टिस म्हणायचा. त्या काळात सॉक्रे टिसने सांगितलेली गोष्ट आज खरी
ठरते आहे. देशातील सर्वांनी जर सॉक्रे टिसप्रमाणे ही गोष्ट मान्य के ली व स्त्रियांना शिक्षण
दिले तर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर हवी तेवढी प्रगती न झालेल्या स्त्रियांची प्रगती होऊ शके ल अन्
सर्व स्त्रियादेखील पुरुषांप्रमाणे सर्व कामे करून आत्मनिर्भर होऊ शकतील.
सदाचारी सॉक्रे टिस
‘‘ईश्वराने नेमून दिलेले स्थान सोडून देण्याचे पाप माझ्या हातून होणार नाही,’’ या
सॉक्रे टिसच्या विधानातून त्याचे चारित्र्य स्पष्ट होते. जे आपले कर्तव्यकर्म आहे ते
नियमितपणे करीत राहायचे. त्यापासून सुख प्राप्त होवो किंवा दु:ख त्याची काळजी
करायची नाही. जीव गेला तरी चालेल; पण आपल्या कर्तव्यात चुकायचे नाही. याप्रमाणे
प्रत्येक माणूस वागला तर पृथ्वीवर स्वर्ग निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. सॉक्रे टिसची
सदाचार वृत्ती इतक्या शिगेला पोहोचलेली होती की, आपण मेल्यावर आपल्या
कार्यकर्तृत्वाच्या बळावर मुलाबाळांना सुख मिळावे अशी इच्छा त्याने प्रदर्शित के ली नाही.
उलट आपल्या मुलांनी सदाचार कधीही सोडू नये, धन-संपत्तीच्या मागे लागून ती वाईट
मार्गाला लागली तर त्यांची हयगय न करता त्यांना शिक्षा देऊन वठणीवर आणावे, असे
नि:संकोचपणे सांगितले. मुलाने अपराध के ला असता खोटे बोलूनदेखील त्यावर पांघरूण
घालणारे, त्यांना पाठीशी घालणारे, त्यांचे व्यर्थ लाड करणारे आजकालचे पालक कोठे अन्
सदाचाराचा मार्ग चुकल्यास त्यांना कठोर शिक्षा करावी, असे सांगणारा सॉक्रे टिस कोठे .
सॉक्रे टिस : आजची गरज
आज आपल्या देशात सॉक्रे टिससारखा एखादा डोळ्यात अंजन घालणारा व विराट विचार
करायला लावणारा तत्त्ववेत्ता जन्माला येण्याची गरज आहे. प्राण गेला तरी मी आपली
प्रामाणिक मते बोलून दाखवीन, अशा निर्धाराचा माणूस ही आज आपल्या देशाची गरज
आहे. स्व टिकवून ठे वून बोले तैसा चाले, हे आपले ध्येय समोर ठे वून जो काम करतो
त्याच्या जीवनाला पूर्णत्व प्राप्त होते. सत्त्व टिकले नाही तर जीवनाची इतिकर्तव्यता
संपुष्टात येते. प्रक्षुब्ध अन् अजाण जनतेला, तसेच जुलमी सत्तेला न जुमानता आपल्या
न्यायबुद्धीने वागणाऱ्या सॉक्रे टिसची आज भारताला गरज आहे.
आपले मरण समोर दिसत असूनही स्वखुशीने हसत-हसत विषाचा पेला तोंडाला लावणारा
सॉक्रे टिस म्हणूनच जगात अजरामर झाला. पळून जाण्याचा मार्ग मोकळा असूनही
न्यायदेवतेचा अनादर होईल अशी कोणतीही गोष्ट सॉक्रे टिस करीत नाही. वैचारिक टीके ला
वैचारिक प्रत्युत्तर देण्यात असमर्थ असलेले लोक आज मनगटाच्या जोरावर अरेरावी
करताना दिसतात. झुंडीने येऊन आपल्या ताकदीचे प्रदर्शन करून टीका करणाऱ्या किंवा
सत्ताधारी लोकांच्या जिवास धोका उत्पन्न करतात. आजकाल अशी वर्तणूक आपणास
नेहमी बघायला मिळते.
लोकशाहीच्या नावाने अयोग्य शब्दांचा प्रयोग करून लोकांच्या टाळ्या मिळवून त्यांना खूश
करण्यासाठी नको ती धोरणे जाहीर करीत फिरणारे राजकारणी आज भारतात सर्व पक्षात,
सर्व पातळीवर सर्वांना बघायला मिळतात. लोकशाही असूनही त्याला मारक असा व्यवहार
करण्याचे कौशल्य आज सर्व राजकारणी लोकात प्रामुख्याने आढळून येते.
भारतात लोकशाहीचे होत असलेले अध:पतन गेल्या 40-50 वर्षांपासून आपण उघड्या
डोळ्यांनी बघत आहोत, अनुभवत आहोत. औपचारिकदृष्टीने देशात लोकशाही
असतानादेखील सत्तेेवर असणाऱ्या नेत्यांना त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांची तोंडे बंद करणे
गरजेचे वाटते हा अनुभव आणीबाणीच्या काळात आपण भारतीयांनीदेखील घेतला आहे.
म्हणूनच आज जवळजवळ अडीच हजार वर्षे झाल्यानंतरदेखील या एकविसाव्या शतकात
सॉक्रे टिसचे तत्त्वज्ञान मार्गदर्शक वाटते. भारतात पुढच्या वाटचालीच्या दृष्टीने त्याचा
युक्तिवाद, त्याचे वर्तन हे सत्याचे दर्शन घडविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
☐☐☐
10. सॉक्रे टिसच्या बोधकथा
सर्व माणसांत गुण आणि दुर्गुण असतात; परंतु विवेक जागा ठे वला तर योग्य-अयोग्य ते
निवडून जीवन सार्थक करता येते. फक्त विवेक जागा असणे गरजेचे असते.
संतुष्टता म्हणजे सुख
एकदा एक गृहस्थ सॉक्रे टिसला म्हणाला, ‘‘सार्वजनिक हौदातले पाणी अलीकडे बरेच गरम
असते. तेच गरम पाणी आजकाल पिणे भाग पडते, याला काय करावे?’’
सॉक्रे टिस म्हणाला, ‘‘ही तर मोठी समाधानाची गोष्ट आहे. कारण आता स्नानाकरिता
निराळे पाणी गरम करण्याची गरज नाही. जेव्हा वाटेल तेव्हा जावे आणि स्नान करावे.’’
गृहस्थ म्हणाला, ‘‘हौदातील पाणी गरम असते खरे; पण स्नान करण्यासारखे गरम नसते.’’
सॉक्रे टिस म्हणाला, ‘‘तुमच्या चाकरांना-गुलामांना ते पाणी पिण्यास किंवा त्या पाण्याने
स्नान करण्यास काही गैरसोयीचे वाटते का?’’
गृहस्थ - ‘‘नाही; पण त्यांना ते कसे चालते, याचे मला मोठे नवल वाटते.’’
सॉक्रे टिसने विचारले की, ‘‘आजारी माणसाला तरी ते पाणी पिण्यास काही गैरसोयीचे
वाटेल काय?’’
त्या गृहस्थाने आजारी माणसाला त्या पाण्यापासून उलट समाधान वाटेल असे उत्तर दिले.
त्यावर सॉक्रे टिस म्हणाला, ‘‘सामान्य लोक किंवा आजारी माणसे यापेक्षाही आपले
समाधान होणे अवघड जावे हे आपल्यासाठी मोठे लांच्छन आहे.’’
आळसाचा कळस
ऑलिम्पिया येथे इतक्या दूर कोण जातो, असे म्हणणाऱ्या आपल्या एका मित्रास सॉक्रे टिस
म्हणाला, ‘गावात इकडे-तिकडे फिरण्यात सर्व दिवस घालविणाऱ्या तुला ऑलिम्पियाला
जाणे इतके अवघड का वाटावे, हेच मला समजत नाही. हा प्रवास तुला तर के वळ
सहलीसारखा वाटला पाहिजे. सकाळी निघून जेवणाची वेळ होईपर्यंत चालायचे. नंतर
जेवणाकरिता मुक्काम करून जेवण झाल्यावर परत निघायचे, ते संध्याकाळपर्यंत
चालावयाचे. असे के लेस तर फारसे श्रम न होता तू ऑलिम्पिया या ठिकाणी जाऊन
पोहोचशील. पाच-सहा दिवसात गावातल्या गावात तू जितका चालतोस तितके ही तुला
अथेन्सहून ऑलिम्पियाला जाण्यासाठी चालावे लागणार नाही.’
आणखी एक गोष्ट तुला सांगतो. जलदीने प्रवास करून त्रास सोसण्यापेक्षा प्रवासाला
निघण्याची घाई करून इच्छित ठिकाणी एक दिवस आधी जाऊन पोहोचणे हे के व्हाही
चांगले नाही का?
कष्टाळू वृत्ती कधीही चांगली
बराच प्रवास करून आल्यामुळे आपण फारच दमलो आहोत, असे म्हणणाऱ्या एका
गृहस्थास सॉक्रे टिसने विचारले, ‘तुझ्याजवळ काही ओझे वगैरे होते की काय?’
गृहस्थ - ‘अंगातल्या झग्याशिवाय माझ्याकडे आणखी काहीही ओझे नव्हते.’
सॉक्रे टिस - ‘तुमच्याबरोबर दुसरा कोणी गृहस्थ होता काय?’
यावर त्या गृहस्थाने उत्तर दिले की, ‘माझ्याबरोबर माझा एक गुलाम होता.’
सॉक्रे टिस - ‘बरे, त्या गुलामाजवळ तरी काही बोजा होता किंवा नाही?’
गृहस्थ - ‘होय, माझे सर्व सामान त्याच्याकडेच होते.
सॉक्रे टिस - ‘प्रवासात तुमची बरीच तारांबळ उडालेली दिसतेय. तुमच्या गुलामाचा प्रवास
कसा काय झाला?’
गृहस्थ - ‘त्याचा प्रवास माझ्यापेक्षा पुष्कळ चांगला झाला. त्याची काही अशी तारांबळ
उडाली नाही.’
सॉक्रे टिस - ‘बरे! त्याच्याजवळचे सामान जर तुमच्याजवळ दिले असते, तर तुमची कशी
काय अवस्था झाली असती?
गृहस्थ - ‘अरे बापरे! मग काय विचारता, आम्हाला वाटेतच कोठे तरी बसावे लागले असते.
आपल्याच्याने ती मजल निश्चितच झेपली नसती.’
सॉक्रे टिस म्हणाला - ‘‘अरे हे काय? तू तालीमबाज असून असे म्हणतोस. ही गोष्ट
तुझ्यासाठी निश्चितच अतिशय लज्जास्पद आहे. आपल्या अंगात आपल्या गुलामाइतकीही
ताकद नसणे हे मोठे लज्जास्पद आहे.’’
लगीनघाई
एकदा एक तरुण सॉक्रे टिसकडे गेला व म्हणाला - ‘गुरू, मला लग्न करायचं आहे. तुमचा
सल्ला द्याल?’
सॉक्रे टिस म्हणाला, ‘तुला लग्न करायचं आहे ना, तर अवश्य कर. सद्गुणी, चांगली पत्नी
तुला लाभली तर तुझा संसार सुखाचा होईल आणि जर आक्रस्ताळी, भांडकु दळ बायको
मिळाली तर तू माझ्यासारखा तत्त्ववेत्ता होशील. एकू ण काय दोन्हीकडे सुखच सुख आहे.’
विवेकाची कसोटी
के वळ चेहऱ्यावरून भविष्य वर्तविणाऱ्या एका ज्योतिष्याला ग्रीसचा महान तत्त्वज्ञ
सॉक्रे टिसची भेट घेण्याची इच्छा होती. एका मित्राने त्याला सॉक्रे टिसकडे नेले. त्यावेळी
सॉक्रे टिसचे बरेच मित्र जमलेले होते आणि त्यांच्यात बौद्धिक चर्चा सुरू होती. सॉक्रे टिस
दिसायला अत्यंत कु रूप होता. असे म्हणतात की, त्याच्या भांडखोर बायकोने त्याच्या
डोक्यावर गरम पाणी ओतल्याने त्याचा चेहरा कु रूप झाला होता.
ज्योतिष्याने चेहरा पाहून सॉक्रे टिसचे भविष्य सांगायला सुरुवात के ली. तो म्हणाला, हा
माणूस अत्यंत रागीट आहे, हे याच्या नाकपुड्यांच्या ठे वणीवरून दिसते. ते ऐकताच
सॉक्रे टिसच्या शिष्यांना अत्यंत संताप आला. ते काही बोलणार तेवढ्यात सॉक्रे टिसने त्यांना
शांत राहण्याचा इशारा के ला. ज्योतिषी पुढे म्हणाला, यांचे मस्तक पाहून हा अतिशय लोभी
माणूस आहे असे स्पष्टपणे कळते. याच्या आविर्भावावरून हे सनकी आहेत असे वाटते.
यांच्या ओठ व दातांकडे पाहून कळतेकी, हा देशद्रोही आहे. आपले सर्व भविष्य शांतपणे
ऐकू न घेऊन सॉक्रे टिसने त्या ज्योतिषाला त्याचा योग्य मोबदला देऊन निरोप दिला.
आपल्या गोंधळात पडलेल्या शिष्यांकडे पाहून सॉक्रे टिस शांतपणे म्हणाला- ज्योतिषाने
सांगितलेले सर्व दुर्गुण माझ्यात आहेत; पण त्या ज्योतिष्याचे माझ्या विवेकावर लक्ष गेले
नाही. मी माझ्या विवेकाने माझ्या सर्व दुर्गुणांवर नियंत्रण ठे वतो, हे त्याला कदाचित दिसले
नाही.
सर्व माणसात गुण आणि दुर्गुण असतात; परंतु विवेक जागा ठे वला तर योग्य-अयोग्य ते
निवडून जीवन सार्थक करता येते. फक्त विवेक जागा असणे गरजेचे असते.
श्रीमंतीचा उपास
एकदा एक माणूस सॉक्रे टिसला म्हणाला, ‘‘काय करू हो, मला चांगली भूक लागत नाही
आणि काहीही खावं वाटत नाही.’’
सॉक्रे टिस म्हणाला - ‘‘काही दिवस उपास करा. म्हणजे खात्रीने तुमची तब्येत सुधारेल.
तुम्हाला कमी खर्च लागेल, त्यामुळे तुमचा पैसाही वाचेल. पुढे काही दिवसांनी आपोआपच
तुम्हाला भूक लागेल. अन्नाला चांगली चव येईल व अशा जेवणापासून तुम्हाला निश्चितच
समाधान लाभेल.’’
आलेला माणूस तो पाडून सॉक्रे टिससमोरून चालता झाला.
आत्मज्ञानी सर्वज्ञानी
एकदा एका विद्वान म्हणविणाऱ्या व्यक्तीला सॉक्रे टिसने विचारले- तुम्ही कधी डेल्फायला
गेला होता का?
‘‘होय! मी दोनदा तेथे गेलेलो आहे.
सॉक्रे टिस - तेथील देवळाच्या पुढच्या अंगाला ‘आत्मविचार करा’ हे वाक्य कोरलेले तुम्ही
पाहिले आहे का?
गृहस्थ - ‘‘हो, हे वाक्य वाचलेले मला आठवते आहे ’’
सॉक्रे टिस - ‘‘नुसते वाचून उपयोगी नाही. त्या वाक्यातील उपदेशाचा लाभ घेऊन आपल्या
स्वत:ची ओळख तुम्ही करून घेतली आहे का?’’
गृहस्थ - ‘‘मी माझी पूर्ण ओळख करून घेतलेली आहे. माझी ओळख मला नाही तर
दुसऱ्या कशाचीही ओळख करून घेण्याला मी पात्र नाही, असे मला वाटते.’’
सॉक्रे टिस - ‘‘तुमचे नाव तुम्हाला सांगता आले म्हणजे तुमची ओळख तुम्हाला पटली असे
नाही. घोड्याची ओळख पटायची म्हणजे जसे त्यावर बसून तो तापट आहे, अडेल आहे,
की सरळ आहे वगैरे त्याच्या अंगच्या सर्व गुणावगुणांची माहिती करून घ्यावी लागते; तसेच
आपल्या स्वत:ची ओळख करून घ्यावयाची म्हणजे आपण कोणत्या योग्यतेचे आहोत
आणि आपल्याला काय करता येईल व काय करता येणार नाही, हे आत्मनिरीक्षण करून
ठरवायचे असते.’’
गृहस्थ - ‘‘तुमचे म्हणणे खरे आहे. ज्याला आपली योग्यता काय हे समजले नाही त्याने
कसला आत्मविचार के ला आणि कशाचे आत्मज्ञान करून घेतले?’’
सॉक्रे टिस - आत्मज्ञान किती हितकारक आहे आणि ते नसणे किती घातक आहे, हे
समजले पाहिजे. आपणाला काय करता येईल आणि काय येणार नाही, हे समजले म्हणजे
मनुष्य आपल्या आटोक्यात असेल तेच करून आपला उदरनिर्वाह चालवितो आणि
आनंदात राहतो. आवाक्याबाहेरील गोष्टी करण्याच्या नादात लागून पश्चात्ताप करण्याची
वेळ त्याच्यावर येत नाही.
आत्मज्ञान झाल्याने दुसऱ्याचेही ज्ञान सहज होते. त्याचा उपयोग आपल्या फायद्यासाठी
किंवा संरक्षणाकरिता कसा करून द्यावा हे समजते. याच्या उलट ज्यांना आत्मज्ञान नसते ते
लोक आपल्या सामर्थ्याच्या बाहेर काम करायचा प्रयत्न करून अपयशी होतात. आयुष्यात
यश आणि कीर्ती संपादन करण्यास आत्मज्ञानावाचून दुसरा मार्ग नाही.
राष्ट्राचेही असेच होते. ज्या राष्ट्राला आपल्या शक्तीची खरी कल्पना नसते ते अधिक
शक्तिमान देशाशी लढा देतात व आपला नाश ओढवून घेतात. अशाने त्यांचे स्वातंत्र्य नष्ट
होऊन त्यांना विजयी देशाचे कायदे पाळावे लागतात.
गृहस्थ - आत्मज्ञानावर पुष्कळ गोष्टी अवलंबून असल्यामुळे ते फार महत्त्वाचे आहे हे मला
आता समजले. मला आत्मज्ञान नाहीच, हेदेखील लक्षात आले. तेव्हा आता आत्मज्ञान
करून घेण्यास आरंभ कसा करावा, हे मला आपण कृ पया सांगावे.
यशाचे रहस्य
एकदा एका तरुणाने सॉक्रे टिसकडे जाऊन त्याला विचारले की, तुमच्या यशाचे रहस्य
काय?
सॉक्रे टिस त्या तरुणाला नदीकिनारी घेऊन गेला. पाण्यात उतरून त्याने त्या तरुणाचे डोके
पाण्याखाली दाबून धरले. त्या तरुणाने डोके बाहेर काढण्यासाठी खूप धडपड के ली; पण
व्यर्थ. शेवटी अगदी त्याचा जीव जाण्याच्या बेतात असताना सॉक्रे टिसने त्याचे डोके
पाण्याबाहेर काढले.
त्या तरुणाला सरळ करत सॉक्रे टिसने विचारले- ‘‘पाण्यात असताना तुला सर्वाधिक गरज
कशाची वाटली?’’
त्या तरुणाने उत्तर दिले ‘‘हवेची.’’
त्यावर सॉक्रे टिस त्या तरुणाला म्हणाला, ‘‘पाण्याखाली असताना ज्या तीक्रतेने तुला हवेची
गरज भासत होती त्याच तीक्रतेने जेव्हा तुला यशाची ओढ लागेल तेव्हा यश
मिळविण्यासाठी फारसे वेगळे प्रयत्न तुला करावे लागणार नाहीत. त्या परिस्थितीत तू जे
काही करशील ते तुला यशच देऊन जाईल.
यशाची अशी तीक्र ओढ ज्यांच्यात निर्माण होत नाही ते कधीच यशस्वी होत नाहीत. अशी
माणसे सदैव आशाळभूतपणे वाट पाहण्यातच आपले आयुष्य गमावतात आणि त्यांच्या
वाट्याला यशस्वी लोकांनी अनावश्यक म्हणून मागे सोडलेल्या गोष्टीव्यतिरिक्त काहीही येत
नाही.
फजिती न्याय-अन्यायाची
एकदा सॉक्रे टिस व युथिडिमस यांची चर्चा चालू असताना सॉक्रे टिस म्हणाला की,‘‘न्याय-
अन्याय अथवा प्रामाणिकपणाची व्याख्या करणे अतिशय कठीण आहे.’’
त्यावर हसून युथिडिमस म्हणाला, ‘‘न्यायाची अथवा प्रामाणिकपणाची कृ त्ये कोणती आणि
अन्यायाची अथवा अप्रामाणिकपणाची कृ त्ये कोणती, याची व्याख्या करणे मुळीच अवघड
नाही.’’
सॉक्रे टिस म्हणाला, मग अशी व्याख्या करून मला दाखवा, असे म्हणून त्याने एका
कागदावर दोन भाग करून एकात न्यायगोष्टी व दुसऱ्या सदरात अन्याय असे लिहिले. नंतर
त्याने घात करणे, खोटे बोलणे, माणसाला गुलाम म्हणून विकणे या सर्व गोष्टी कोणत्या
सदरात येतील ते लिहा, असे युथिडिमसला सांगितले.
युथिडिमसने त्या सर्व गोष्टी अन्यायाखाली घातल्या. तेव्हा सॉक्रे टिस म्हणाला- बरे! आता
अशी कल्पना करा की, एखाद्या सेनापतीने शत्रूच्या शहरावर स्वारी करून ते लुटले व
शहरवासी लोकांना गुलाम म्हणून विकले तर त्याचे हे कृ त्य अन्यायाचेच म्हणावे का?
युथिडिमस म्हणाला- ‘छे! छे! मुळीच नाही.’
सॉक्रे टिस - तर मग हे कार्य न्यायाचे आहे असे म्हणायला हरकत नाही.युथिडिमस-
बिलकू ल नाही.
सॉक्रे टिस - बरे! त्या सेनापतीने जर आपल्या शत्रूशी दगाबाजी करून, त्याच्याशी खोटे
बोलून त्याचा घात के ला, त्याच्या शेतीभातीचा धुव्वा उडविला आणि त्याची गुरेढोरे व
दाणागोटा पळविला तर त्याच्या या कृ त्याला काय म्हणायचे? अन्यायच ना?
युथिडिमस - नाही, यालाही न्यायाचेच म्हणायचे. मी जेव्हा खोटे बोलणे, दगाबाजी वगैरे
गोष्टी अन्यायाखाली येतात असे म्हटले तेव्हा माझा उद्देश जर कोणी आपल्या मित्राशी तसे
वर्तन के ले तर तो अन्याय, असे म्हणण्याचा होता.
सॉक्रे टिस - तर मग आता ज्या गोष्टी तुम्ही अन्यायाच्या सदराखाली लिहिल्या आहेत, त्या
सर्व गोष्टी सॉक्रे टिसने युथिडिमसला न्यायाच्या सदरात लिहिण्यास सांगितले व पुढे असा
शेरा मारला की, असे वर्तन शत्रूंशी के ले असताना न्यायाचे होते आणि मित्रांशी के ले असता
अन्यायाचे होते. कारण प्रत्येकाने आपल्या मित्रांशी प्रामाणिकपणे वागले पाहिजे.
ठीक! आता अशी कल्पना करा की, ऐन लढाईच्या धामधुमीत हताश झालेल्या सैन्यास
आपणास मदत येत आहे, अशी थाप मारून एखाद्या सेनापतीने जर उत्तेजन दिले तर त्याचे
हे खोटे बोलणे अन्यायाखालीच घालायचे ना?
युथिडिमस - भलतेच काय सांगता? अशाप्रसंगी खोटे बोलणेदेखील न्यायाचेच म्हटले
जाईल.
सॉक्रे टिस - मुलगा औषध घेत नसला म्हणजे बाप त्यात साखर घालून, साखर म्हणून ते
मुलाला खायला घालतो. मुलगा ते औषध खाऊन बरा होतो. अशावेळी बाप मुलाशी जे
कपट करतो त्याला काय म्हणायचे? न्याय की अन्याय?
युथिडिमस - ‘‘यात बाप मुलाशी अप्रामाणिकपणा करतो, असे म्हणता यायचे नाही. त्याचे
वागणे येथे न्याय्य आहे.’’
सॉक्रे टिस - आपला मित्र तलवारीने आत्मघात करणार असे कळताच जो त्याची तलवार
चोरी करतो किंवा बळजबरीने त्याच्याकडून हिसकावून घेतो, त्या व्यक्तीच्या वागण्याला
काय म्हणशील. अन्यायाचे वागणे असेच ना?
युथिडिमस - त्या मित्राच्या वागण्याला अन्यायाचे वागणे कसे म्हणता येईल?
सॉक्रे टिस - तुमच्या या उत्तरांवरून काय निष्पन्न होते ते पाहा. तुम्ही पूर्वी म्हणालात की,
आपण आपल्या मित्रांशी प्रामाणिकपणे वागले पाहिजे. तसे न वागणे म्हणजे अन्याय.
आता तुम्ही म्हणता की, प्रसंगी मित्रांशी, आप्तांशी खोटे बोलणे, कपट करणे न्याय्य आहे.
युथिडिमस - हो! असे निष्पन्न होते खरे. मी माझे बोलणे चुकीचे आहे हे कबूल करतो व
मान्य करतो की, खरोखरच न्याय-अन्यायाची परिभाषा करणे हे फारच अवघड आहे.
संयमाचा पराक्रम
सॉक्रे टिसच्या पत्नीचे नाव झांटिपी. ती अत्यंत तापट व छांदिष्ट स्वभावाची बाई होती. तिची
कर्क शा म्हणून प्रसिद्धी होती. तिचा असा स्वभाव सॉक्रे टिसला चांगलाच माहिती होता.
जाणूनबुजून त्याने झांटिपीशी लग्न के ले होते. त्याचे म्हणणे असे की, जी व्यक्ती अशा
स्वभावाच्या स्त्रीबरोबर राहू शके ल, संसार करू शके ल, तिनेे के लेला अपमान जर त्याच्याने
सोसवला जाईल तर तो माणूस जगातील कु ठल्याही माणसांबरोबर बिनदिक्कत राहू
शकतो, चांगला वागू शकतो.
एकदा ही कजाग बाई सॉक्रे टिसवर चिडली रागाच्या भरात तोंडाला येईल त्या शिव्या तिने
घातल्या. संतापाने बेभान होऊन उभ्या रस्त्यात तिने सॉक्रे टिसची वस्त्रे फाडली. कोणताही
उपद्रव करायचा ठे वला नाही. शेवटी तिने सॉक्रे टिसच्या डोक्यावर घाणेरड्या पाण्याची
घागर ओतली. इतके होऊनही सॉक्रे टिस शांतपणे काहीही न बोलता उभा होता.
पाणी डोक्यावर पडल्यावर तो हसून इतके च म्हणाला- असा कडकडाट झाल्यावर पाऊस
पाहिजेच होता. छान के लेस हं झांटिपी!
निरर्थक बाताड्या
प्रसिद्ध तत्त्ववेत्ता सॉक्रे टिसकडे एकदा एक माणूस आला व त्याला सांगू लागला, ‘‘तुम्हाला
माहीत आहे का, तुमच्या जिगरी दोस्ताबद्दल मी आज काय ऐकलंय ते?
‘एक मिनिट थांब’ सॉक्रे टिस म्हणाला. ‘‘तू जे काही मला सांगणार आहेस त्यापूर्वी मी तुझी
एक छोटीशी परीक्षा घेऊ इच्छितो. ट्रिपल फिल्टर टेस्ट. माझ्या मित्राबद्दल आणि तेही मला
माहिती नसलेली अशी गोष्ट तू सांगतो आहेस, तुझा हेतू कदाचित चांगलाही असेल; पण ते
शब्द आपण अगोदर गाळून घेऊ, म्हणजे चांगलं तेवढंच आपल्या पदरात पडेल.
पहिल्या चाचणीचं नाव आहे सत्य. ’’
सॉक्रे टिसने त्या गृहस्थाला विचारलं की, तू जे काही मला सांगणार आहेस ते सत्य आहे
अशी तुझी शंभर टक्के खात्री आहे का?
‘नाही, खरंतर ही गोष्ट फक्त माझ्या कानावर आली आहे. आणि...
सॉक्रे टिस- ठीक आहे, म्हणजे जे काही सांगतो आहेस ते के वळ ऐकीव आहे. त्यातली
सत्यता तुलाच ठाऊक नाहीये.
आता आपण दुसरी चाचणी घेऊया. या चाचणीचे नाव आहे चांगुलपणा.
माझ्या मित्राबद्दल जी गोष्ट तू मला सांगणार आहेस ती चांगली आहे का? सॉक्रे टिसने
विचारले.
‘‘नाही, उलट मी तर... त्या गृहस्थाचे पुढचे शब्द तोंडातच अडकले. तो उत्तर देऊ शकला
नाही.
‘‘पुढे जायचं की नाही हे ठरविण्यासाठी आपल्याकडे आणखी एक चाचणी आहे.
उपयोगिता.’’ सॉक्रे टिस म्हणाला ‘‘मला सांग माझ्या मित्राविषयी तू जे सांगणार आहेस,
त्याचा मला काही उपयोग होणार आहे का?’’ सॉक्रे टिसने त्याला विचारले.
‘‘नाही, खात्रीने नाही.’’ तो गृहस्थ म्हणाला.
‘दोस्ता, माझ्या मित्राबद्दल मला तू जे सांगणार आहेस त्याच्या सत्यतेबद्दल तुला स्वत:लाच
खात्री नाहीय. ते चांगलं नाहीच अन् त्याची उपयोगितादेखील जर शून्य आहे, तर मग मला
तू ते कशासाठी सांगतो आहेस? कृ पा करून तुझी ती गोष्ट तू स्वत:कडेच ठे व. मला त्याचा
काहीएक उपयोग नाहीय.
हे ऐकताच त्याच क्षणी त्या गृहस्थाचा चेहरा उतरला व मान खाली घालून तो गृहस्थ आल्या
पावली परत गेला.
सुखाची लालसा
एकदा युथिडिमस सॉक्रे टिसला म्हणाला- ज्या सुदैवाच्या गोष्टी आहेत त्या सदैव चांगल्याच
असतात त्याबद्दल काही वाद नाही, ही गोष्ट तुम्हालादेखील मान्य आहे ना?
सॉक्रे टिस - तुमचे म्हणणे कबूल के ले तर शक्ती, संपत्ती, सौंदर्य आणि सन्मान अन् अशाच
दुसऱ्या कित्येक गोष्टी दुर्दैवाच्या आहेत, असे म्हणावे लागेल.
युथिडिमस - माणसाच्या सुखाला तर या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेेत.
सॉक्रे टिस - अहो! शक्तीच्या घमेंडीमुळे भलत्याच कामात हात घालून कित्येकांनी आपला
नाश करून घेतला आहे. संपत्तीमुळे विविध व्यसनांच्या कचाट्यात सापडून कित्येकांनी
आपला सर्वस्वी घात करून घेतला आहे आणि कित्येक जण लबाडांच्या जाळ्यात सापडून
सर्वस्वाला मुकले आहेत. सौंदर्याला भाळून कित्येक माणसे स्वत: भ्रष्ट होऊन दुसऱ्यास
भ्रष्ट करण्यास कारणीभूत झाली आहेत. सन्मानाचे तर असे आहे की, लोक तो
मिळविणाऱ्याच्या हात धुऊन पाठीस लागतात आणि त्याचा फडशा उडवून टाकतात.
युथिडिमस - हे सर्व ठीक आहे; पण अहो सॉक्रे टिस, मग देवाजवळ मागणे तरी काय
मागायचे, हे तरी कृ पा करून सांगा.
सॉक्रे टिस - देवाजवळ काय मागावे हे आपणास समजते, असे समजून तुम्ही या गोष्टीचा
विचारच के ला नाही, असे दिसते.
पूर्वजांचा आदर्श
अथेन्सच्या पराभवानंतर एकदा पेरिक्लिसने सॉक्रे टिसला विचारले - ‘‘गतवैभव
मिळविण्याचा काही मार्ग असल्यास सांगा, ते मिळविण्यासाठी आपण काय करायला
हवे?’’
सॉक्रे टिस म्हणाला - ‘दुसरे काही करू नये. फक्त आपले पूर्वज कशा रीतीने वागत होते,
त्यांचा नित्यक्रम काय होता, कसा होता, कठीण परिस्थितीत ते कसे वागत होते, त्यांचे
आचरण कशा प्रकारचे होते वगैरे गोष्टींची नीट माहिती करून घ्यावी व त्याप्रमाणे आपले
आचरण ठे वावे म्हणजे गतवैभव आपल्यापुढे हात जोडून उभे राहील.
तुम्हाला जर ही गोष्ट कठीण वाटत असेल, अवघड वाटत असेल तर सध्या ऊर्जितावस्थेत
असलेल्या, प्रगतशील राष्ट्रांकडे पाहावे आणि त्यांच्याप्रमाणे वागावे, म्हणजे अगदी
सहजपणे आपल्याला त्यांच्यापेक्षा चांगले जरी नाही तरी निदान त्यांच्यासारखे तरी
निश्चितच होता येईल.’
☐☐☐
This le was downloaded from Z-Library project

Your gateway to knowledge and culture. Accessible for everyone.

z-library.se singlelogin.re go-to-zlibrary.se single-login.ru

O cial Telegram channel

Z-Access

https://wikipedia.org/wiki/Z-Library
ffi
fi

You might also like