You are on page 1of 172

Am°JñQ> 2020

‘yë¶ … 70 én¶o

Mukta Shabd : ISSN 2347-3150


जो आज साहिबे मसनद िैं,
कल निीं िोंगे,
हकरायेदार िैं,
जाती मकान थोडी िैं।

सभी का ख़ून िै शाहमल,


यिां की हमट्ी में,
हकसी के बाप का हिनदसदु तान
थोडी िैं।

- राित इं दौरी

अलहिदा, राित इं दौरी


df© AH$amdo, A§H$ Mm¡Wm ISSN 2347-3150
Am°JñQ 2020 ‘yë¶ : 70 én¶o
g§nmXH$ - ¶emoYZ (¶oey) nmQ>rc
g§nmXH$s¶ gëcmJma ‘§S>i - h[aü§Ð WmoamV
amhþc H$mogå~r
Ho$ed dmK‘mao
d§XZm ^mJdV
CX¶ amoQ>o
g§nmXZ gmhmæ¶ - àmO³Vr ~jr
{deof ghH$m¶© - gVre Omoer
AjaOwiUr d ‘m§S>Ur - F${fHo$e Am§J«o
‘wÐH$ - {gÕr{dZm¶H$ AmQ>©²g
¶m A§H$mVrc ‘OHw$amer ‘mcH$, àH$meH$, g§nmXH$
gh‘V AgVrcM Ago Zmhr.
"‘w³V eãX' ho ‘m{gH$ ‘wÐH$, àH$meH$ Am{U ‘mcH -
¶emoYZ nmQ>rc ¶m§Zr {gÕr{dZm¶H$ AmQ>g²© , XþH$mZ Z§. 3,
amO {H«$ñQ>c {~pëS>¨J, am°¶c H$m°åßco³g, E³ga amoS>,
~moardcr (n.), ‘w~§ B© 91 ¶oWo N>mnyZ E/203, OZH$ë¶mU,
d{Pam ZmH$m, ~moardcr (npíM‘), ‘w~§ B© 400 091 ¶oWZy
à{gÕ Ho$co.
nÌì¶dhma Am{U dJ©UrgmR>r nÎmm :
"eãX npãbHo$eZ', E/201, OZH$ë¶mU, d{Pam ZmH$m,
~moardcr (npíM‘), ‘w§~B© 400 091
‘mo~mBc : 86575 15804 / 98201 47284
Email : muktashabd@gmail.com
Bank Accounts -
Shabd Publication : Punjab & Sind Bank
(Borivali, Mumbai)
(IFSC Code : PSIB0000647)
A/c. No. : 06471100038291
‘w³V eãX Am°JñQ> 2020 & 3
AZwH«$‘
l संपादकीय : उदय रोटे / ५
l आ म्हणजे आणखी काय? ः
आशुतोष पोतदार /१०
l वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा :
रूपबंध आणि आशयसूत् रे
हरिश्चंद्र थोरात / २९
l ‘समकालीन सामाजिक पर्यावरणाचा चिंतनात्मक
दस्तऐवज'ः ‘धूळपेर' ः डॉ. विनायक येवले /८२
l २००० नंतरच्या काळात स्त्रियांनी लिहिलेल्या
मराठी कादंबऱया ः माया पंडित / १०७
l ओढाळ काळ ः चित्रा नित्सुरे / १३६
l नव्वदोत्तर स्त्रीकाव्यातील नैतिक मूल्यसंकल्पनांची
नवी घडण ः सरिता सोमाणी / १५२
l प्रतिक्रिया ः गोपाळ आजगांवकर / १६१
l प्रतिक्रिया ः दत्तप्रसाद दाभोळकर / १७०

4 & ‘w³V eãX Am°JñQ 2020


mebheeokeâerÙe
शिक्षणाची शाळा
- उदय रोटे

दरवर्षी नव्या वह्या-पुस्तकांचा कोरा करकरीत स्पर्श


अनुभवत, त्यांचा उत्साहवर्धक वास नाकात भरून घेत
मुक्तपणे शाळामहाविद्यालयात दाखल होणाऱ्या
विद्यार्थ्यांच,े शिक्षकांचे आणि पालकांचे जग यावर्षी
अजूनही अनिश्चिततेच्या चिंतांनी झाकोळून गेले आहे.
अशा परिस्थितीत परस्परसंपर्कांच्या माध्यमांना, माहिती-
तंत्रज्ञानाच्या उपयोगाला शिक्षणाच्या क्षेत्रात कें द्रवर्ती
महत्त्व येणे स्वाभाविकच आहे. या साधनांच्या आश्रयानेच
नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे.
मागच्या काही वर्षांपासून संगणकाच्या किंवा
स्मार्टफोनच्या पडद्यावरच्या शाळेची महती पटवून द्यायचा
प्रयत्न करणारे तंत्रज्ञानप्रेमी आवाज भोवताली होतेच,
गेल्या काही महिन्यांत त्यांची उपस्थिती अधिक ठळक
झालेली दिसते. भविष्यातले जीवन आणि शिक्षण
अपरिहार्यपणे असेच स्पर्शविरहित असेल असे ठासून
सांगितले जाते आहे. आज जे सुरू आहे ते संकट नसून
भविष्यकाळाचा प्रशिक्षणवर्गच आहे अशा थाटात
पडद्यावरचे जीवनशिक्षण देणाऱ्या तज्ज्ञांची झुंबड उडाली
आहे. आता जणू शाळामहाविद्यालयांच्या आणि
विद्यापीठांच्या इमारतींची आवश्यकताच नसल्याच्या
थाटात पडद्यावरच्या आभासी वर्गखोल्यांची आणि
व्याख्यानकक्षांची उभारणी जोरात सुरू आहे. कालपर्यंत
माहिती तंत्रज्ञान हे शिक्षण प्रभावी करण्यासाठी वापारावयाचे
पूरक साधन मानले जात असे आता जणू ते संबंध
शिक्षणव्यवस्थेला पर्याय ठरू लागले आहे. रेल्वेचे
प्लॅटफॉर्म जेंव्हा ओस पडले आहेत तेव्हा आंतरजालावरील
संपर्क सांधणाऱ्या मध्यस्थीयंत्रणांचे प्लॅटफॉर्म ओसंडून

‘w³V eãX Am°JñQ> 2020 & 5


वाह ू लागले आहेत. सर्वंकष आर्थिक मंदीने ग्रासलेल्या
या काळातही व्हर्च्यूअल शिक्षणयंत्रणांचे नफ्याचे आकडे
नवनवे विक्रम नोंदवू लागले आहेत. या क्षेत्रातली
आंतरराष्ट्रीय गुंतवणूक व सरकारी व्यवस्थांसोबतची
घोषित-अघोषित भागीदारी लक्ष वेधन ू घेते आहे.
समाजमाध्यमांनी आणि लोकसहभागातून उभ्या
राहिलेल्या महाजालावरच्या व्यवस्थांनी
शिकण्याशिकवण्याच्या पद्धतींवर खोलवरचा परिणाम
केलाय ही गोष्ट कुणीही नाकारणार नाही. सर्व स्तरांवरची
विपुल दृक्श्राव्य अध्ययनसाधने, नियतकालिकांचे,
अभ्यासग्रंथांचे खुले संग्रह, जगभरातल्या विद्यापीठांतली
व्याख्याने व चर्चासत्रे त्यातला मुक्तप्रवेश यांमळ ु े
कोणत्याही गंभीर अभ्यासक-विद्यार्थ्याला महाजाल हे
वरदानच वाटत आले आहे. परं तु हेच तंत्रज्ञान आणि
त्यामागच्या शक्ती जेव्हा समग्र शिक्षणव्यवस्था आपल्या
कह्यात ओढू पाहतात तेव्हा नवे प्रश्न उभे राहतात.
कोणतेही तंत्रज्ञान अर्थकारणमुक्त आणि पर्यायाने
राजकारणमुक्त असू शकत नाही. वरवर मुक्तिदायी
वाटणाऱ्या तंत्रज्ञानाच्या या सर्वंकष उपयोगातून शिक्षणाच्या
लोकशाहीवादी गाभ्याचे रक्षण कितपत होते आहे हा
महत्त्वाचा प्रश्न आहे. झापडबंद नवमध्यमवर्गीय
मानसिकतेला सोयीच्या व सहजप्राप्य वाटणाऱ्या या
स्पर्शरहित ऑनलाइन व्यवस्थेची दारे अनेकांसाठी आजही
बंदच आहेत. त्यात दाखल होण्यासाठी लागणारी किमान
आर्थिक-भौतिक पात्रताही नसलेला मोठा समाज या
डिजिटल पडद्याच्या चौकटीबाहेर आहे. या स्पर्शरहित
व्यवस्थेत तो शिक्षणाच्याच स्पर्शापासून वंचित राहण्याची
शक्यता अधिक आहे. दसरीकडे ु तंत्रज्ञानाच्या तथाकथित
सर्वसामावेशकतेची महती सांगत असतानाच त्याच्या
नियंत्रक सर्वेक्षणक्षमतेचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा
ठरणार आहे. राहत्या घराचे शाळेच्या वर्गखोलीत रूपांतर
करताना विद्यार्थ्यी, पालक व शिक्षक साऱ्यांच्याच खाजगी
अवकाशाचा संकोच होतो आहे. तंत्रज्ञान पुरवणाऱ्या
6 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
यंत्रणांच्या हातात माहितीच्या संकलनाचे आजवर कधी
दिले नव्हते इतके अधिकार आपण देऊन टाकले आहेत.
त्याचा उपयोग करून घेत आपल्याच घरांचे उद्या डिजिटल
तुरुंग होणार नाहीत याची काहीच खात्री देता येत नाही.
पडद्यावरच्या तंत्रज्ञानाधारित शिक्षणासंबंधी उपस्थित
केल्या जाणाऱ्या या आणि अशा अनेक वैध शंकानी व
संशयांनी क्षीणपणे का होईना शिक्षणक्षेत्रातला ऑनलाइन
कार्पोरेट शिरकाव आजवर रोखून धरला होता.
कोरोनासंकटनाने झटक्यासरशी हे दृश्य बदलून टाकले.
ऑनलाइन शिक्षणाची व्याप्ती केवळ तात्पुरत्या
संकटकाळावर मात करण्यासाठीच्या सोयीपुरती मर्यादित
न ठे वता भविष्यात तिला कायमस्वरूपी व्यवस्थेत
रूपांतरित करण्याचा प्रयत्न हळूहळू जोर धरू लागला
आहे.
कॅनडाच्या कार्यकर्त्या विदषी
ु नयोमी क्लेइन गेली
अनेक वर्षे डिझास्टर कॅपिटलिझमची जगभर दिसणारी
विविध रूपे उघड करीत आहेत. त्यांच्या मते संकटकाळात
अनेक अशक्य वाटणारे बदल अचानक चमत्कार
झाल्यासारखे शक्य वाटू लागतात. वेगवेगळ्या कल्पना
भोवताली असतातच. त्यांची चिकित्सा करणाऱ्या, त्यांना
थोपवून धरणाऱ्या शक्ती संकटकाळात विकल होतात,
गोंधळून जातात. नेमका या परिस्थितीचा फायदा घेत
सर्वंकष भांडवलशाही यंत्रणा शासनाला हाताशी धरून
तिला दीर्घकाळ नफा मिळवून देऊ शकतील अशा गोष्टी
समाजाला विनातक्रार स्वीकारायला भाग पाडते.आजच्या
रोगसंक्रमणसंकटाचा शिक्षणक्षेत्रावरचा परिणाम याच
आकृतिबंधाला अनुसरताना दिसतो आहे.
भारतातही गेली काही दशके सार्वजनिक
शिक्षणयंत्रणेला विषम स्पर्धेत लोटणाऱ्या शिक्षणाच्या
खाजगी बाजाराची उभारणी पद्धतशीरपणे होत आली
आहे. सार्वजनिक व्यवस्थांचे दीर्घकाळ कुपोषण
केल्याशिवाय नफेखोर खाजगी पर्याय लोकप्रिय करता
येत नाहीत. हे काम इथल्या व्यवस्थेने दीर्घकाळ व
‘w³V eãX Am°JñQ> 2020 & 7
निष्ठापूर्वक केले आहे. आज लहानशा गावातही
पालकांच्या समाजिक प्रतिष्ठेचे मोजमाप ठरवणाऱ्या
आणि व्यक्तीच्या जडणघडीतच विषमतेचा नैसर्गिक
संस्कार रुजवणाऱ्या चकचकीत श्रीमंती आंतरराष्ट्रीय
शाळांपासून ते अभावग्रस्ततेने गांजलेल्या जिल्हापरिषदेच्या
शाळांपर्यंतची नवी जातिव्यवस्था स्पष्टउभी आहे.समाजिक
अभिसरणाचे मूल्ययुक्त साधन ठरणाऱ्या शिक्षणाऐवजी
आर्थिक ऐपतीनुसार विकत मिळणारे उपयुक्त क्रयवस्तूरूप
शिक्षण ही संकल्पना नवमध्यमवर्गाच्या आश्रयाने उत्तरोत्तर
घट्ट झाली आहे. पालकांकडून मिळणारे भरघोस शुल्क
आणि असंघटित कामगाराच्या पातळीवर वावरणारा,
सतत असुरक्षित असल्याने अल्प मोबदल्यात हवा तसा
राबवता येणारा अध्यापकवर्ग आणि बाजारात खपतील
अशा उपयुक्त कौशल्यांवर आधारलेले अभ्यासक्रम हे
नव्या शिक्षणयंत्रणेच्या नफ्याचे त्रैराशिक आज सर्वमान्य
झाले आहे. संकटकाळाचा फायदा घेत अधिकच परिणत
केले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृत्रिम
बुद्धिमत्तेवर आधारलेल्या नवतंत्रज्ञानाने स्वस्त व प्रशिक्षित
अध्यापकवर्गाच्या उपस्थितीचा प्रश्नही निकाली काढायला
घेतला आहे. नफ्यात अडसर ठरणाऱ्या या प्रत्यक्ष मानवी
श्रमाला पर्याय देण्याची किंवा त्याचे अवमूल्यन करण्याची
योजना स्पर्शाच्या आणि संपर्काच्या भयाचे निमित्त शोधून
पुढे रेटली जाते आहे.विद्यार्थ्याच्या आवडीनुसार व
क्षमतांनस ु ार आंतरक्रियात्मक पद्धतीने शिकवत असल्याचा
दावा करणारी शैक्षणिक सॉफ्टवेअर्स संपूर्ण शिक्षणानुभव
देऊ शकतात का? शिक्षणात अभिप्रेत असणारा बुद्धीचा,
भावनेचा आणि प्रत्यक्ष शारीरिक कृतिकौशल्यांचा विकास
मोबाईलच्या किंवा संगणकाच्या पडद्याशी चाललेल्या
आंतरक्रियांतन ू संभवतो का? या आखीव खेळात
सर्जनशीलतेला, चौकटीबाहेर विचार करणाऱ्या
कल्पकतेला आणि सामाजिक संवेदनशीलतेला कितपत
जागा करून देता येईल? कोरोनाकाळाआधीही व मागील
काही महिन्यांच्या अनुभवानंतरही प्रश्नांची उत्तरे
8 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
नकारात्मकच आहेत.अर्थात या प्रश्नांना महत्त्व देणारी
शिक्षणकल्पनाच नाकारणारी धोरणे दिवसेंदिवस अधिक
प्रतिष्ठित होत आहेत. माणसाला सर्व प्रकारच्या
भेदाभेदांच्या बंधनातूनमुक्त करणारी, आपल्या
भोवतालाशी जोडून घेणारी शिक्षणाचीसंकल्पना टाकून
त्याऐवजी वर्गवर्णभेदांनी उभारलेल्या भिंतींपलीकडचा
स्पर्श नाकारणारी व्यवस्था कळत नकळत प्रस्थापित होते
आहे. हे आजचे तात्कालिक रोगसंक्रमणाचे स्पर्शभय
नाही. दीर्घकाळ जोपासलेली ही अस्पृश्यता नवनव्या
रूपात आपल्यासमोर येते आहे.
केवळ शिक्षणाच्याच नव्हे तर सर्वच क्षेत्रात या
तात्कालिक स्पर्शभयाचे दीर्घकालीन भांडवलात रूपांतर
करण्याचा प्रयत्न दिसतो आहे. या मानसिकतेच े प्रतीक
म्हणूननयोमी क्लेईन यांनीच अनुजा सोनाळकर या
स्पर्शरहित स्वयंचलित कार पार्किं गची व्यवस्था निर्माण
करणाऱ्या कंपनीच्या अधिकारी बाईंचे अवतरण अनेक
ठिकाणी उद्धृत केले आहे. त्यांच्या मते ‘माणसांपासून
जैवधोका आहे, यंत् रे सुरक्षित आहेत.’ आपल्या
भोवतालच्या माणसांना धोकादायक ठरवत तंत्रज्ञानाला
त्याजागी प्रस्थापित करणारा हा दृष्टिकोण नजिकच्या
भविष्यकाळात वेगवगळ्या निमित्ताने समोर ठाकणार
आहे. अंतिमतः कोणतेही तंत्रज्ञान मानवी श्रमाला आणि
स्पर्शाला पर्याय ठरू शकत नाही या जाणिवेची पुनःस्थापना
म्हणूनच आवश्यक आहे.
नव्या शैक्षणिक वर्षात भयमक्त होऊन खऱ्याखुऱ्या
शाळेत विद्यार्थी लवकरच दाखल होतील अशी आशा
आहे. तोवर शिक्षणाच्या नावाखाली वेगळीच ‘शाळा’
करणाऱ्या धोरणांना आणि शक्तींना चिकित्सकपणे सामोरे
जाण्यासाठी आपण तयार आहोत का?

- उदय रोटे
संपर्क ः ९६१९४८५६१४

‘w³V eãX Am°JñQ> 2020 & 9


कथा

आ म्हणजे आणखी काय?

आशुतोष पोतदार

सकाळ झालीय. तो उठलेला नाही. म्हणजे, जागा झाला


आहे. पण, उठून बसलेला नाही. उठून बसण्यापेक्षा त्याला
अंथरुणातच बसून राहावंसं वाटतय. अंगातली थंडीच जात
नाही. खरं तर एकूणच थंडी संपतच नाही. सगळेच जण
म्हणतायत किती महिने थंडी वाजत आहे. वर्तमानपत्रातून,
टीव्हीवरून बातम्या आदळतायत नुसत्या : ‘इस साल मौसम
का जाद ू खतमही नहीं होगा’ ‘थंडीचा काळ असाच चालू
राहाणार’. ऋतुमान चित्रविचित्ररित्या बदलतेय. आधी पाऊस
संपतच नाही असे वाटले. त्या आधी, उन्हाळा संपत नाही
असे वाटले. सगळेच आळीपाळीने, अव्याहत सुरू आहे असे
वाटतेय. ऋतूंमधलं अंतर नाहीसं होत चाललंय. सकाळ
आणि दपार ु एकमेकांना मिठी मारून बसल्यात. सकाळ
संपतच नाही. थंडी आवरत नाही. काल तर पाऊसही पडला.
10 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
अजूनही थंडी अंगाला धरून बसलीय. तो अजूनही घरीच
आहे. अंथरुणात पडलेला. तो कूस बदलतो. पाय पसरतो.
अखेरीस उठून बसतो. बेडशेजारच्या खुर्चीत बसतो. खुर्चीची
दिशा बदलून पाहातो. मग बाहेर जाऊन कोचवर बसतो.
बसण्याची पोझिशन बदलतो. उठतो आणि खिडकीतून
डोकावतो. वरच्या मजल्यावरून खालीपर्यंत एकटक बघत
राहातो. लांबवर येणारे आवाज कानावर परत परत पडत
राहातात. कान जागे राहातात. कुठूनतरी ड्रीलिंग मशिनने
खणण्याचे आवाज येत राहातात. कोणीतरी जमीन खणतंय.
माती ओढतंय. तो बेडवर येऊन बसतो. मोबाईलवर मेसज े
येऊन पडल्याचा आवाज येतो. तो मोबाईल उघडून पाहातो.
कुठूनतरी लांबवरून कसले-कसले आवाज येत राहातात.
आवाजाची धरपकड करून त्यांना मोबाईलमधे बंदिस्त करावे
असे त्याला वाटून राहाते. खिडकी लावून आवाज बंद होणार
नाही तरीही त्याला खिडकी बंद करावीशी वाटते. पण,
त्याला उठवत नाही. तो गप्प बसून राहातो. कान देऊन
बाहेरच्या आवाजाला ऐकतो. आवाजाला कान देतो. कानाचे
भोक देतो. कानाचा पडदा देतो. आवाज घेत राहातो. कानात
आवाज येत राहातात. आवाज येत राहातात. झोपेतले तोंड
तसेच आहे अजून, चिकट. बिलगलेले ओठ आणि टाळूला
चिकटलेली जीभ ओढून बाजूला काढू पाहातो. चिकट
टाळूवरून जीभ निसटल्याचा आवाज येतो. बाहेरचा आवाज
काही वेळानंतर कधीतरी बंद होतो. आवाज बंद होतो की
त्याचे कान बंद करून घेतात आवाजांना की आवाज सवयीचा
होऊन आवाज बंद होतात? त्याची जीभ टाळूला चिकटते.
आतला, तोंडातला आवाज तोंडातच राहातो. घशातून कानात
शिरतो. कानाच्या पडद्यामागून डोक्यात शिरतो.
तो आरशाकडे जातो. आरशासमोर उभा राहातो. आरशात
स्वतःला पाह ू लागतो. तोंड मोठे करतो. जबडा डाव्या
बाजूला वळवतो. जबडा उजव्या बाजूला वळवतो. नाक
दाबतो. जीभेवर नाक दाबून बघतो. नाकावर आलेले काही
केस उचकटून काढतो. काही दिवसांपर्वी ू कुणीतरी त्याचे
नाक किती चांगले आहे असे बोलले होते. तेव्हापासून तो
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 11
आपल्या नाकाची विशेष काळजी घेऊ लागला आहे.
अंघोळीपूर्वी नाकावर लिंबूची फोड घासणे, रात्री झोपायच्या
आधी नाकावर आणि नाकाच्या आत तूप लावून ठे वणे असे
प्रकार करून तो नाकाचे कोडकौतुक करण्याची संधी दवडत
नाही. आता कुणीतरी कान चांगले आहेत किंवा पाय चांगले
आहेत असे म्हणण्याची वाट तो बघत असावा. म्हणजे,
त्याच्या मनात असा विचार आला की आपण एवढे चांगले
आहोत तर आपल्याला या इतर अवयवांबद्दल कुणी कसं
काही म्हटलं नाही. कुणी काही म्हटले नसले तरी येत्या
काळात नक्की म्हणणार याची त्याला खात्री आहे. त्यामुळेच,
गेले काही दिवस रात्री झोपताना बॉडी लोशन लावून झोपतो.
आठवडय़ातून एक दिवस अंगभर तेल लावतो. मग, गरम
पाण्यात यु द कोलोन घालून त्या पाण्याने अंघोळ करतो.
शिवाय, आठवडय़ातून एकदा चेहऱ्यावर हळद लावून चेहरा
साफ करतो. सिनेमात काम करणाऱ्या नटांच्या तोडीसतोड
आपण दिसतो याचा त्याला अभिमान आहे. स्वतःवरच्या
प्रेमाने त्याने आपल्या डोक्यावरून हात फिरविला. कानामागचे
केस दोऱ्यासारखे खरखरीत झाले होते. कानामागच्या
केसांवर पुन्हा एकदा हात फिरवतो. दोन दिवसांपर्वीचू शॅम्पू
वापरला होता तरी केसातला राठपणा तसाच होता.
काल रात्री त्याला छान झोप लागली. सकाळपासून तो
उत्साहाने घर आवरू लागला आहे. आवरता आवरता आज
एकादशी आहे की अमावस्या की पौर्णिमा याचा तो विचार
करत होता. आपल्याला वार आठवत नाहीत पण एकादशी
आणि अमावस्या आठवतेय. याचे त्याला आश्चर्य वाटून
राहिले. पण, सोमवार म्हटल्यावर आपण काहीतरी
व्हिज्युअलाईज करू शकतो. जसे की रविवारनंतर येणारा
दिवस. ज्या दिवशी रस्त्यावर गर्दी दिसते असा तो दिवस
म्हणजे सोमवार. पण, तसे एकादशी म्हटल्यावर होत नाही.
एकादशी म्हणजे त्याला खाणे आठवते. पण, सोमवार
म्हटल्यावर रस्त्यावरची गर्दी दिसते. आजी असताना
एकादशीला शेंगदाण्याची आमटी, साबुदाण्याची खिचडी
आणि वरीची सोजी व्हायची. आजकाल हे पदार्थ आपण
12 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
कुठल्याही दिवशी खाऊ शकतो. मग आजच का आठवली
एकादशी? मागच्या आठवडय़ात वर्ष सुरू झाल्यावर त्याने
नवीन कॅलेंडर आणलं. तेच कॅलेंडर तो कालही पाहात होता
बराच वेळ. त्याला कॅलेंडर वाचायला आवडतं. तो खोलवर
शिरुन विचार करू लागला. काळ कितीतरी पद्धतीने मापता
येतो. पण, सोमवार ते रविवार या आठवडी वारात आपण
काळाला अडकवून टाकलय. मान तिरकी करून सरळ रेषेत
पाह ू लागला. मनात काहीतरी खोलवर चालू असेल तर तो
मान तिरकी करून सरळ रेषेत पाह ू लागतो. मान तिरकी
करून पाहाण्याचा प्रकार त्याच्या भावाला आश्चर्यचकित
करतो. भावाला का आश्चर्य वाटते एवढे? कुणाला तरी का
आश्चर्य वाटावे एवढे? त्या दिवशी, भाऊ आणि त्याचा
मुलगा आला होती तेव्हा आलाच हा मुद्दा.
‘‘आता तू असाच एकटा किती दिवस राहाणार आहेस?'',
भाऊ.
‘‘माहीत नाही.'', तो.
‘‘माहीत होईपर्यंत घरी चल''
‘‘इथे छान आहे.''
‘‘आईला काय वाटेल?''
‘‘आई नाही आता.''
‘‘आम्ही तुझे कुणी नाही आहोत काय?''
या प्रश्नाचे काय उत्तर त्याने काही दिले नाही. दोघांच्यात
एक अस्वस्थ अशी शांतता पसरली. तो मान तिरकी करून
सरळ रेषेत पाहात राहिला. भावाला काय करावे हे समजेना.
तो खिडकीकडे पाहात राहिला. खिडकीला पडदा लावला
होता. पडद्यावर फुले रेखाटली होती. खिडकीवर ठे वलेल्या
कं ु डीतले फुल वाळत चालले होते. हे फुल कधी आणून
कं ु डीत ठे वलेय हे तो आठवत राहिला. आठवत राहिला,
खिडकीकडे पाहात राहिला. खिडकीच्या पडद्यावरची फुले
आणि कं ु डीतले फूल एकात एक मिसळून राहिले.
‘‘मला इथेच राहावेसे वाटते''. तो भावाला म्हणाला.
गेले सहा महिने तो वेगळ्या घरात एकटाच राहात आहे.
त्याची आई गेली तेव्हापासून त्याला त्या घरात स्वतःला
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 13
जोडून घ्यावे असे काही वाटत नव्हते. त्याचा भाऊ, त्याची
बायको आणि चार वर्षाचा मुलगा त्याच्याशी चांगले वागत.
त्यांनी कधी त्याला त्रास दिला नाही. घरही मोठे होते. अडचण
व्हायला नको म्हणून आई असतानाच त्यांनी घर दोनमजली
करून घेतले होते. खाली तीन खोल्या आणि वरच्या
मजल्यावर दोन खोल्या. त्याच्यासाठी वेगळी खोली होती.
पण, आता त्याला आपले आपले राहायला आवडते.
दररोजच्या घडामोडीत कुणीही असू नये असे त्याला वाटते.
आपले आपण उठावे, चहा घ्यावा, नेटफ्लिक्स पाहावे. वाटले
तर जेवण करावे. नाही वाटले तर बाहेरून मागवुन घ्यावे.
उरलेल्या वेळात फ्रीलािन्संगचे काम करावे. आई-वडलांनी
त्याच्या नावावर बऱ्यापैकी पैसे आणि प्रॉपर्टी ठे वली आहे.
पण, त्याने अजूनतरी त्या प्रॉपर्टीतले स्वतःसाठी काही
वापरलेले नाही.
‘‘पण एकटा का राहातोस?" त्याच्या भावाने त्याला
परत विचारले होते.
त्याने लॅपटॉप उघडला. पण तो समोरच्या खिडकीकडे
पाहात राहिला. त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा चारपाच वर्षांनी
मोठा असेल. त्याच्या भावाशी तो कधी थेट बोलू शकत
नाही. ते एकमेकांच्या अंगाखांद्यावर कधी असे खेळलेच
नाहीत. पण, तरीही त्यांना एकमेकांबद्दल काही वाटत नाही
असे म्हणता येणार नाही.
भावाबरोबर आलेल्या चार वर्षांच्या मुलाने आपल्या
वडलांना विचारले होते. ‘‘कुठं पाहातोय काका?"
‘‘त्यालाच विचार.", भाऊ.
मुलगा पुढे गेला. त्याने आपल्या त्याच्या हाताला हात
लावला.
‘‘काका, कुठे बघतोय तू?"
‘‘विहिरीत." मग तो हसत सुटला.
‘‘बाबा, हा काय बोलतोय?", मुलगा.
‘‘तू त्यालाच विचार." बाबा.
मुलगा काही बोलला नाही. त्याच्याकडे एकटक पाहात
राहिला. तो एकटक खिडकीकडे पाहात राहिला. मुलाने
14 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
त्याच्या हातावरचा आपला हात काढून घेतला.

**

तो आपल्याच विचारात तळमळत पडला होता. विचार


मनात येत होते जात होते. अंथरुणात तो तसाच तळमळत
पडला होता. कधी काळी घडय़ाळात किती वाजले असतील
हा विचार मनात येत नसे. झोप ही झोप असे. ती सहज येत
असे. ती सहज संपत असे. लहानपणी कधी कधी घाबरून
जाग यायची. पण त्या वेळी, कशामुळे झोप मोडली हा
विचार तो करत नसे. तसाच आईच्या कुशीत सरकत असे.
झोप नाही आली तरी किती वाजले असतील असा काही
विचार यायचा नाही. तसाच डोळे उघडे ठे वन ू , अधूनमधून
मिटलेले ठे वनू घराच्या मागच्या परसुदारात काय चालले
असेल? तिथे मनी झोपली असेल की त्या भयानक
सापाबरोबर खेळत असेल? असे विचार त्याच्या मनात येत
असत. मनीला कितीदा सांगितलेले असते नको खेळत जाऊ
त्या सापाबरोबर म्हणून. पण ती ऐकतच नाही. आता तिला
घरातच बांधून ठे वायला हवे. आपण, फक्त तिलाच बांधून
ठे वू शकतो. कारण सापाला कसे बांधून ठे वणार?
त्याला मग कधीतरी झोप लागे. तिला सकाळी आईच्या
हाकेने जाग येई.
मोठा होत गेला तसे झोप येत नसेल तर विचारांची
चक्रीवादळं मनात तयार होतात.
आताही तसेच झाले. झोप मोडल्याचे लक्षात आल्यावर
विचारांच्या चक्रीवादळाला सुरुवात होणार हे त्याला कळून
चुकलं. तो उठून बसला. त्याने डोळे चोळले. पायावरचे
पांघरूण बाजूला केले. मनाशी काही विचार केला. डोळ्यांत
खोल शिरणारी रात्र त्याच्या डोळ्यांत चांगलीच खुपसत
होती. तो अंधारातल्या प्रत्येक कणाकडे तो पाहात राहिला.
निरखून डोळे फोडून मोठे करून पाहात होता. तो सारखा
कशाचा तरी विचार करत असतो. येणारी प्रत्येक रात्र
त्याच्यासाठी काय देत असेल? हरएक दिवस, न चुकता
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 15
दरवेळी ही रात्र येते. दररोज येते. सकाळच्या बातम्या
लागतातच लागतात. आपल्या पंतप्रधानांचा फोटो दररोज
दिसतोच दिसतो. तसा दिवस होतो तशी रात्रही होते. पण,
कधी कधी रात्र संपतही नाही. दिवस होऊनही दिवस झालेला
नसतो. म्हणजे काही दिवस तो काहीच करत नसतो. रात्र
तशीच चालू राहाते. सुंदाडभाऊसारखा तो पडून असतो.
रेलून राहातो भिंतीला. पाठ टेकून राहातो मिळेल त्या
जमिनीला किंवा खुर्चीला. त्याला दिवसाचा प्रकाश दिसत
नाही. बाहेर दिवस उगवलेला असतो. त्याच्यासाठी मात्र तो
कोलगेटच्या पेस्टसाठी तो उगवलेला असतो. कमोडच्या
फ्लशसाठी. गोष्टीतल्या कोंबडय़ाच्या आरवासाठी.
वाघबकरीच्या चहासाठी. मग, उजवा पाय उचलू की डावा
पाय उचलु हा विचार करण्यातच सकाळ निघून जाते.
रात्रीच्या कभिन्न काळोखात तो कोण असतो? त्याला
स्वतःचे काय दिसत असते या रात्रीत? त्याला स्वतःकडे
पाहाण्यासाठीच रात्रीचा जन्म झाला असावा. त्या रात्री
पडलेल्या स्वप्नात एक आरसा त्याच्या समोर आणि दसरा ु
आरसा त्याच्या पाठीशी होता. समोरच्या आरशावर ‘आ’
असे लिहिले होते पण मागच्या आरशावर काहीच लिहिले
नव्हते. तो संभ्रमात पडला. एकाच आरशावर काहीतरी
लिहिलेय पण दसऱ्या
ु आरशावर काहीच कसे लिहिले नाही.
जे काही लिहिलेय ते कुणी लिहिलेय. ‘आ’ म्हणजे काय?
तो विचार करत राहिला. मान तिरकी तिरकी होत राहिली.
आ म्हणजे आयेगा. आ म्हणजे ये, आ आओ. आ म्हणजे
जांभई की आ म्हणजे आणखी काय? रात्रीची वेळ म्हणजे
स्वतःशी बोलण्याची वेळ. ‘‘माझ्याकडेच चकमकून पाहात
राहातोस तू आणि आ करतोस माझ्यावर. मलाच माझे जग
दाखवतोस. खरे जग दाखवतोस की मला हवे ते जग
दाखवतोस की माझ्यातले काळे जग घेऊन येतोस मला
दाखवयाला? तू हवा आहेस की नको आहेस हेच मला
कळत नाही. मीच तुला ‘आ’ म्हणतोय म्हणून ‘आ’
दाखवतोस की तु मला ‘आ’ म्हणतोयस म्हणून मला आ
दाखवतोयस?'' यापुढे तो काय बोलत होता याची काही
16 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
त्याला लिंक लागेना. आपण किती वेळ स्वतःशी बोलतोय
याचा विचार करत त्याने डोळे मिटून घेतले. अंथरुणात
लोळत पडल्या-पडल्या समोरच्या आरशात त्याला आपला
पाय दिसू लागला. किती काळे झालेत पायाचे तळवे. आपण
स्लीपरशिवाय तर कधी घरात चालतही नाही. तरी एवढे
काळे. हॉलमधे कधीतरी बिनस्लीपरचे फिरतो आपण. हा
आरसा सारं काही काळं तेच दाखवतोय. त्यामुळे, आपल्याला
पाय काळा दिसतोय. आरसा आपण जसे आहोत तसे
दाखवतो की त्यापेक्षा आपल्या मनातले काही दाखवतो. की
आपल्याला पाहिजे त्याच्या बरोबर उलटे दाखवतो. मनात
विचारांचा कल्लोळ सुरू झाला. आरसा बेभरवशाचा ठरू
शकतो हे त्याला कळून चुकले होते. पण त्याची जाणीव
झाली नव्हती. आपण सहसा कधी कुणापासून दगा खात
नाही. तरीही सावध राह्यला हवे. पण, आरशाकडे
पाहिल्यावाचून त्याला करमत नाही. तो बेडवर उठून बसला.
स्वतःच्या बसलेल्या मूर्तीकडे पाहनू त्याला छान वाटत
राहिले. आपले पोट किती छान आहे. वाढलेले नाही. पण,
वाढू शकते या भीतीने तो पोटावर हाताने थापटू लागला.
जिममधले वर्क आऊट वाढवायला हवे. आरशाकडे पाहनू तो
खुदकन हसला. केसावरून अलवार हात फिरवला. त्याच्या
कानामागच्या केसांचा पुंजका वाढून तो राठ झाला होता.
मान वळवून वळवून आपल्या कानामागे काही दिसत नव्हते.
पण त्याला त्या केसांच्या पुंजक्याचं काय झालंय हे दिसत
नव्हतं. मोबाईल घेऊन मागून सेल्फी घेतली. त्यात काही
नीटसं दिसत नव्हतं. या मोबाईल कंपन्या कसले हँडसेट्स
काढतात. फुकट पैसे द्यायचे. साल्यांना, फासावर
लटकवायला हवं. तो रागाने मनातल्या मनात बोलला.
शेवटी दोनचारदा प्रयत्न केल्यावर एकदाची चांगली सेल्फी
मिळाली. केसांचा पुंजका छान दिसत नव्हता. उद्याच्या उद्या
हेअर सलूनमधे जाऊन पुंजका कापून टाकायचं ठरवलं
आणि तिरका होत तो आरशात पाहात राहिला.

**
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 17
लहानपणापासून तो केस फारसे वाढवत नसे. वाढवलेच
तर केस डोक्याच्या वरवर वाढत. काही दिवसांत केसांची
टोपी होत असे. अशा वेळी केसात कंगवा फिरविणे अशक्य
होई. त्याच्या लहानपणी टोपीसारखे केस दिसेपर्यंत त्याला
कुणी केस वाढवू देत नसत. थोडे तरी केस वाढू लागले की
त्याची रवानगी केशकर्तनालयात होत असे. केशकर्तनालय
हे दकानाच्या
ु पाटीवर लिहिलेले नाव. अन्यथा, त्या दकानाला

न्हाव्याचे दकानु म्हणत. के स कापणारे मामा म्हणजे
दिलखुलास व्यक्ती. गावभराच्या बातम्या ऐकवुन
केशकर्तनालयात येणाऱ्या लोकांचे मन खूश ठे वण्याचे काम
मामा करत असत. ज्या गतीने डोक्यावर मामांची कात्री फिरे
त्याच गतीने त्यांच्या तोंडातुन शब्द बाहेर पडत. त्यांच्या
बोलण्यात कात्रीचा आवाजही ऐकू येईनासा होई. घरचे असे
सांगत की त्याचे जावळ याच मामांनी काढले. पण, जावळ
काढताना त्याने कोणताही त्रास दिला नाही. जावळ काढताना
मनापासुन तो शांत राहिला आणि त्याने जावळ काढतानाचा
फोटोही काढून दिला. अगदी अलीकडेपर्यंत हा फोटो आई
सर्वांना दाखवायची. आता आईच नसल्याने कुणाला त्याच्या
त्या फोटोचे कौतुक वाटणे शक्य नाही. जसे वय वाढत गेले
तसे त्याला बरेच छंद लागले. पण, केस वाढवायचा छंद
काही लागला नाही. दाढी वाढवुन पािहली पण केस काही
वाढवू शकला नाही. केस वाढु लागले की त्याला विचित्र
भावना यायची आणि तो पटदिशी हेअर सलूनमधे जाऊन
केस कापून यायचा.
रात्री हाताला लागणारा केसांचा पुंजका असा का लागत
आहे हा विचार करत तो झोपी गेला. झोपी गेल्यावर त्याच्या
मनात काय यावे यावर काही त्याचा ताबा नसे. कुणाचा
असतो म्हणा; पण त्याच्या मनात विचारांची शृंखला असते
तशी त्याच्या मनात स्वप्नांची शृंखला तयार होते. कधीकधी
सकाळी उठल्याउठल्या आपल्याला कुठले स्वप्न पडले होते
याचा विचार करण्यात त्याची सकाळ संपून जाते. आज
त्याच्या मनात विहिरीचे विचार येत राहिले. अलीकडच्या
18 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
काळात त्याने विहीर पाहिलेलीही नाही. जी काही पाहिली
आहे ती लहानपणी. पण विहीर त्याला नितांत आवडते.
लहानपणी अनेक तास त्याने विहिरीवर घालवले होते. आड,
बाव, कूप, गोल विहीर, चौकोनी विहीर, पुष्करिणी, बारव,
भुडकी, वाव अशी नाना नावं विहिरीला असली तरी दोनच
नावांच्या विहीरी त्याला माहिती होत्या: पाणी ओढायसाठीचा
आड आणि पोहायसाठीची विहिर. पाणी ओढायसाठी आडावर
घागर सोडली की त्या पाण्यात पडतानाचे दृश्य त्याला खेचन ू
घ्यायचे. विहिरीच्या कठडय़ावर बसल्या बसल्या त्याला
स्वतःला पाहात येत असे. पाण्याबरोबर आपणही त्यात का
शिरू नये असा प्रश्न पडायचा. पण, घागर पडून आडातले
पाणी डचमळले की त्याचा आडातल्या पाण्यातला इंटरेस्ट
संपून जायचा. मग, तो आडाभोवती चिमण्यांनी बांधलेल्या
घरटय़ांकडे बघत राहायचा. सकाळ संध्याकाळ तो
पोहण्यासाठीच्या विहिरीवर जाऊन बसायचा. रविवारची
शाळा नसायची तेव्हा तो विहिरीवरून संध्याकाळपर्यंत घरी
यायचा नाही. दहावीला गेल्यावर रविवारीही सकाळची शाळा
असायची. ती एक्स्ट्राच्या क्लासेसची शाळा असायची. त्याला
शाळा काही आवडायची नाही. एक्स्ट्राचे क्लासेसही
आवडायचे नाहीत. मग, तो सकाळचे क्लासेस बुडवून
पोहायच्या विहिरीवर जाऊन पाण्यात पडायचा. शाळेतली
हशु ार मुले त्याला किती पाण्यात पडतोस म्हणून चिडवायची.
एकदा रविवारचे पोहायला गेला पण जाताना बदलण्यासाठी
दसरी
ु चड्डी घेऊन जायचा विसरला. त्याला पोहायचे तर
होते. मग, आहे त्या चड्डीवर पाण्यात उतरला. पोहनू
झाल्यावर ओली चड्डी विहिरीवरच्या पम्पिंग मोटरच्या
खांबावरल्या कपाटावर वाळत टाकली. विहिरीत बघत
बसला. चड्डी वाळत राहिली. पण, पूर्ण चड्डी काही वाळली
नाही कारण एक्स्ट्राच्या क्लासला जायचे होते. शेवटी, जेवढी
काही वाळली होती तेवढी चड्डी घालून तो क्लासला
पळाला. वर्गात शिरताना त्याची अजूनही ओली असलेली
चड्डी पाहनू काही जण फिदीफिदी हसले. शिक्षकही
त्याच्याकडे एकटक पाहातच राहिले. तो मागच्या बाकावर
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 19
जाऊन बसेपर्यंत त्याच्याकडेच बघत राहिले. सर्व जण
त्याच्याकडे पाहातच राहिले. ‘‘आलात थेट विहिरीवरून
राहिलात उपकार करून. आता जा वेळ असेल तेव्हा
केशकर्तनालयात आणि राहा आईबापावर उपकार करून."
शिक्षक त्याच्याकडे पाहात बोलले. राग आला की ते
यमकात बोलत. पण कधी मारत नसत. त्याने आपल्या
डोक्यावर हात फिरवला. पाणी ओघळत होते. हात वर
करून दंडावरच्या शर्टाने त्याने डोके पुसले. लाजलेला तो
खाली बसला.

**

केसांची स्वप्ने का पडत आहेत आपल्याला? शिवाय


लहानपणीची स्वप्ने पडतायत. भूतकाळ आठवतोय. आपण
नॉस्टाल्जिक होतोय. वर्तमानात काही नसेल तर भूतकाळ
आठवतो. असे कुणी म्हणाले होते की त्याने तसे कुठे तरी
वाचले होते हे त्याला आठवेना झाले होते. तो डोळे चोळत
राहिला. चार दोन मेसज े ेस वॉट्सअॅपवर येऊन पडले होते.
मेसज े ेस त्याने उघडून पाहिले. त्यात, एक रघूचा आणि दसरा ु
पायलचा होता. बाकीचे दोन तीन असेच फॉरवर्ड्‌स होते. रघू
विचारत होता डिझाईन तयार झाले काय; तर, पायल
विचारत होती वीकें ड ट्रिप करायची काय. रघूने विचारलेल्या
प्रश्नाला त्याने उत्तर दिले पण पायलने विचारलेल्या प्रश्नाला
तो काही उत्तरला नाही. त्याला पायल बोअर करते. तो
तिच्यापासनं शक्य तेवढा लांब राहातो. एकूणच, कुणी फार
जवळ आलेले त्याला पसंत नसते. जवळ आले की तो काय
खातो, कुठे जातो, त्याची गर्लफ्रें ड काय करते असल्या
चौकश्या येतात. ते त्याला आवडत नाहीत. रघू कामापुरतेच
बोलतो ते त्याला आवडते. अर्थात, त्याला मैत्रिणी वैगरे
आवडत नाहीत असं नाही. त्याची खूप छान मैत्रीण होती. ती
लांब केसांची आणि तिचे नाव लैला होते. लैलाची आणि
आईची ओळखही करून दिली होती. आईलाही लैला
आवडायची. तिचे नाव आईला आवडायचे. पण त्याच्या
20 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
भावाला आणि त्याच्या बायकोला लैला हे नाव आवडायचे
नाही. आई तिला सालपापडय़ा तळून पाठवायची. मग ती
त्याच डब्यातून आईला मफिन्स करून पाठवायची. त्याला
डबे देवाणघेवाण करायला आवडायचे. तिला त्याची आई
आवडत असे. ती म्हणायचीही, ‘‘तुझी आई तुझ्यापेक्षा छान
आहे. उसकोही मेरी गर्लफ्रें ड बनाऊ." ती एकटीच राहायची.
तिची रूम पार्टनरही होती. रूम पार्टनर नसायची तेव्हा तो
तिच्या खोलीवर जाऊन आला होता. तिने त्याला आपल्या
केसांची वेणी घालायला शिकविले होते. पहिल्या दमात
त्याला केसांचे पेरही पकडता येत नव्हते. दोनदा प्रयत्न
केल्यावर तिची वेणी झाली. वेणी घातल्यावर ती वेणी त्याने
सोडून केस मोकळे केले. त्याला राहावले नाही. त्याने तिच्या
ओठांचे चुबं न घेतले. तिलाही राहावले नाही. तिनेही चुबं न
घेतले. दोघांनी एकमेकांच्या पाठीवर हात फिरवला.
एकमेकांच्या कुशीत शिरले.
आई गेली तेव्हा तिनेच त्याला खुप सपोर्ट दिला.
आई गेल्यानंतरच्या आठवडय़ात तो तिच्या घरी गेला
होता. त्याला आईच्या आठवणीने इमोशनल व्हायला झाले
होते. त्याने तिचे केस मोकळे केले. तिने त्याच्या डोक्यावरून
मायेने हात फिरवला. दोघांनी एकमेकांची चुबं ने घेतली.
त्याने तिचे कपडे काढले. तिने त्याचे कपडे काढले. पण,
त्याच्याकडे कंडोम नसल्याचे तिच्या लक्षात आले. मनाविरुद्ध
जाऊन त्यांनी परत कपडे चढवले.
खोलीत तिची रूम पार्टनर नसे तेव्हा ते खोलीवर भेटत
असत. फार नाही, क्वचित. इतर वेळेला, बाहेर एखाद्या
कॉफी हाऊसमधे पॅटर्न ठरला होता. या पॅटर्नचा तिला कंटाळा
आला होता. तिला हे सगळं बोअर व्हायला लागलं. त्याला
कळेचना आपल्यात असं काय झालं की तिला बोअर
व्हायला लागला. त्याचे त्याला आश्चर्य वाटायचे. ‘‘तुला
वर्षभरात कसं काय बोअर व्हायला लागलं?", त्याने एक
दिवस तिला विचारले.
‘‘माहीत नाही, यार." ती.
‘‘मी बोअर करतोय?" तो
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 21
‘‘नो यार. इट्स नॉट युवर फॉल्ट." ती.
‘‘देन?" तो.
‘‘ओव्हर थिंकींग मत करो." ती.
‘‘ये क्या आन्सर है?", तो.
‘‘तुमसेही सिखा है." ती
‘‘क्या? ऐसा आन्सर देना?" तो.
‘‘नही, ओवर थिकिं ग."
माझ्याकडून शिकतेही म्हणते आणि माझ्याबरोबर बोअरही
होते याची त्याला चिडचिड झाली. आपले आणि लैलाचे असे
का झाले याचा विचार करून त्याची मान तिरकी होत
राहिली. त्याच्यासाठी लैला महत्त्वाची होती. ती नसल्याची
पोकळी जाणवत होती. स्वतःच्या मनात स्वतःबद्दल राग
राग होत होता. कारण आपण आपण तिचे मन समजू शकलो
ही भावना. त्याचे मन हेही सांगत होते की काही दिवसांनी
ती पहिल्यासारखी होईल. पण, पुढचे पंधरा दिवस काही
तिचा मेसज े आला नाही. तिला मेसज े पाठवण्यासारखे
नव्हते. शिवाय, त्याची आई गेल्यावर त्याच्या
आयुष्यासंबधातल्या जनरल गप्पा मारणारे कुणीच राहिले
नाही. त्याच्याशी ती जनरल बोलू शकायची नाही. दोघांच्या
भेटीगाठी संपल्या. कधी कधी त्याला तिची खूप आठवण
येते. तिलाही त्याची आठवण येत असणार. पण,
तेवढय़ापुरतीच. मधे, राहवले नाही म्हणून त्याने तिला
‘Thinking of you' असा मेसज े पाठवला. वॉट्सअॅपवरून
दोघांचे खूप प्रेमाप्रेमा चाललेले असे. पण, या वेळी
‘Thinking of you' ला तिने तो त्या दिवसभरात मेसज े
पाठवला नाही. तो अस्वस्थ होता. उगीच मेसज े पाठवल्याची
गिल्ट दिवसभर राहिली. आरशासमोर उभारून त्याचे
स्वतःशी बोलूनही झाले.
एक मन : कशाला रे तुला नस्ती उठाठे व. बसावे
थोडे शांत.
दसरे
ु मन : शांत बसवत नाही. जीव लावलाय.
एक मन : तिचाही जीव आहे.
दसरे
ु मन : जीव असता तर मेसज े पाठवला असता.
22 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
एक मन : कामात असेल. धीर धर.
दसरे
ु मन : आणि तिने सांगितलेय की तुला तू बोअरिं ग
आहेस.
एक मन : मी बोअरिं ग आहे असं नाही. पॅटर्न बोअरिं ग
आहे.
दसऱ्या
ु दिवशी तिचा मेसज
े आला. ‘‘I really miss
Kaku."

**

रघूच्या मेसज
े ला उत्तर पाठवून चार तास उलटून गेल.े
त्याने पोहे करून खाल्ले. दोनदा चहा झाला. घराच्या
मालकाला फोन करून झाला. फेसबुकवर फोटो बदलून
झाले. आता उठून काम करायला हवे याची त्याला जाणीव
झाली. ठरवून तो उठला. लॅपटॉप उघडला. खिडकीचा पडदा
सरकवला. खुर्ची टेबलाजवळ ओढली. टेबल हलवून घट्ट
बसवून घेतले. समोर ठे वलेल्या बाटलीत पाणी आहे काय ते
पाहिले. त्यात थोडे पाणी होते. बाटली नंतर भरून घेऊ असा
विचार करून त्याने आपल्या लॅपटॉपकडे नजर वळवली.
लॅपटॉप सुरू केला आणि काम करावे म्हणून बसला. पण
लगेचच बाजूला सरकवला. त्याला काही सुचने ा. का कुणास
ठाऊक त्याचे लक्ष लागेना. त्याचे लक्ष खिडकीकडे गेल.े तो
उठला आणि खिडकीकडे चालत गेला. खिडकीबाहेर सारं
ओलं ओलं दिसत होतं. रात्रभर पाऊस पडला असावा.
पाऊस कधीही पडतो याची त्याला चिडचिड झाली. रस्त्यावर
जागा मिळेल त्या दिशेने पाणी आपल्यासाठी जागा करून
घेताना त्याला दिसले. दिसेल तिथे लग्नाच्या जेवणानंतर
विसकटलेले अन्न बघावे तसे पाणी आजुबाजूला साठले
होते. जागा मिळेत तिथे दाटीवाटीने ओघळ तयार झालेत.
यातूनच आपल्याला भाजी वैगरे सामान आणायला जायला
लागणार. त्याच्या अंगावर काटाच आला. आपण ओघळावरनं
पाय नाचवत पाण्याला पाय न लावता उडत जाऊ असे
त्याला वाटते. आपण भाजी आणायला उडत चाललोय असे
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 23
आपल्याच मनाला सांगितले. मनातल्या मनात तो चालत
राहातो. अधेमधे उडत राहातो तर आता समोर T आकाराचे
वळण दिसते. डाव्या बाजूला जाणारा रस्ता बाजाराकडे जातो
तर उजव्या बाजूला जाणारा टपरीकडे. डाव्या बाजुला गेलं
की भाजी मिळते तर उजव्या बाजुला हेअर सलून, टपरीवर
चहा आणि सिगरेट. बस झाले मनातल्या मनात बोलणे.
हेअर सलूनमधे जावे आणि सिगरेट मारून चहा पिऊन
यावा म्हणून तो लॅपटॉपचे तोंड मिटवून ठे वतो.
पॅन्ट घालून आवरायला आत आरशासमोर उभा राहातो.
आरशासमोर काहीतरी विचित्र वाटायला लागते. आपण असे
का झालोय हेच त्याला कळेना. आपल्या डोक्यावर हे काय
नवीन आलेय याचे काही त्याला कोडे उलगडेना. आरशात
आपल्या डोक्याला भिंतीवरल्या कोळ्याच्या जाळ्यासारखे
केस दिसू लागतात. जागोजाग पिंजारलेले केस त्याच्या
कपाळावर रुळत होते. रुळत होते म्हणायला खूप काही रेलून
बसले नव्हते. तर, काहीतरी अनाकलनीय. उंच डोंगरावरून
खाली दिसणाऱ्या झुडपासारखं त्याचं डोकं दिसत होतं.
केसांची वेणी घालायला तो शिकलाय. पण त्याला अशा
केसांची वेणीही घालता येणार नाही. कसे केस दिसतायत?
हातात कंगवा घेतो. केस विंचरू लागतो. पण, कंगव्याचे
दात केसातून निघतच नाहीत. मग दसरा ु कंगवा घेतो. तोही
केसात अडकून बसतो. मग अजून एक कंगवा घेतो. तोही
केसात अडकून बसतो. आता काय करावे हेच त्याला
कळेनासे होते. त्याला एक आयडिया सुचते. तसेच केस
आणि कंगवे घेऊन तो बाथरूममधे जातो आणि केसांवर
पाणी मारून घेतो. केस भिजवून बघतो आणि केसांतन ू
कंगवा फिरवतो. केस फक्त हलल्यासारखे वाटतात.
हेअर सलूनकडे वळतो.
हेअर सलूनमधे केस कापणारे वेगळे आणि नंबर लावून
घेणारे गृहस्थ वेगळे. ते गृहस्थ समोर आले.
‘‘सर, बैठो नां. एक ही नंबर है.''
‘‘ ओके. मेरा थोडाही काम है''
‘‘शेव्हिंग करनी है?''
24 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
‘‘ नहीं बाल करने है.''
‘‘ हो जाएगा, सर. ये लिजिए पेपर.''
हेअर सलूनमधे एका बाजूला तीन आणि दसऱ्या ु बाजूला
तीन अशा सहा खुर्च्या मांडल्या होत्या. गर्दी तुरळकच. तरी
दोघे जणच रांगेत होते. रविवार असता तर अजून गर्दी
असती आणि बराच वेळाचे वाट पाहाणे असते. त्याच्याशिवाय
दसरे
ु गि-हाईक होते ते मोबाईलवर बिझी होते. मोबाईलमुळे
वाट पाहाण्यातला त्रास कमी झाला होता. वाट पाहाण्यापेक्षा
बिझी राहाण्याने माणसाची अनेक त्रासांतन ू सुटका होत
असेल. त्याच्याजवळही मोबाईल होता. पण, त्याला
मोबाईलमधे कमीच इंटरेस्ट होता. अर्थात, त्याला लोकांशी
बोलण्यातही कमीच इंटरेस्ट असतो. त्याला विचार करण्यात
जास्त इंटरेस्ट असतो. कसला विचार करण्यात असतो किंवा
विचार खूप महत्त्वाचे असतात काय असले विचार त्याच्या
मनात येत नसतात. विचारांच्या मालिकांत राहाण्यात त्याने
स्वतःला गुंतवून घेतलेले असते. विचार करणे प्रयत्नपूर्वक
होत नसते. ते सहज होत असते. उदाहरणार्थ, आता या
दकानात
ु आरशात पाहनू त्याच्या मनात विचार येत आहेत..
सहा खुर्च्यांवर बसलेली सहा माणसे त्यांच्या भवताली
असलेल्या आरशांत पाहातातय. इतके आरसे असताना
प्रतिबिंबांची प्रतिबिंबे असे होऊन एकूण दिसणाऱ्या प्रतिबिंबांची
मोजणी तो करत आहे. आरशात दिसणारी प्रतिबिंबे सोडून
एकमेकांच्या डोळ्यांत दिसणारी प्रतिबिंबे वेगळीच. इतक्या
साऱ्या प्रतिबिंबांतन ू खरे कुठले प्रतिबिंब मानायचे?
‘‘सर, आपका नंबर आया है." नंबर लावून घेणारे
गृहस्थ त्याच्याकडे पाहनू बोलले.
‘‘हां."
तो इकडे तिकडे पाहात खुर्चीकडे पोहोचला. आरशात
पाहात या सगळ्यांच्यात आपण किती उंच आहोत याचा
त्याला अभिमान वाटत होता. केस कापणाऱ्या गृहस्थाने
खुर्ची वळवून त्याला बसायला जागा दिली. त्याच्या डोक्यावर
हात फिरवत त्याने विचारले, ‘‘कितना कट करना है?"
‘‘छोटे बाल करने है."
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 25
‘‘अभी तो छोटे है. और छोटे करें गे तो बहतु छोटे दिखेंगे
आप."
‘‘कान के पिछे तो कितने बडे हय ु े है बाल"
‘‘नहीं तो. देखिये." त्याने त्याच्या डोक्याच्या मागे
आरसा धरून त्याला दाखवले.
‘‘अरे, ऐसे कैसे हो सकता है? मेरे आरसे में तो दिख
रहा था."
‘‘नहीं सर ऐसा कुछ बडा हआ ु नहीं है. प्लेनही है."
‘‘पर मुझे तो दिखा. मैंने फोटो भी निकाला है. ये देखो
ये फोनपर."
त्याने दाखवायला फोन काढला. क्षणात त्याच्या लक्षात
आले की आपण काढलेले फोटो डिलिट केले आहेत. फोन
बाजूला ठे वला.
‘‘मुझे कलही दिखा आरसे में. कमालही हआ ु ."
"हा सर. मै आरसे के साथही होता हं ू आरसे कमाल के
होते है. फस सकते हो आप."
‘‘बाल काटने के लिये मै बाद मे आता हं"ू , तो तुटक
बोलला. अंगावर घातलेले फडके बाजूला केले. दाबून खुर्ची
वळवली. भरदिशी बाहेर निघून आला.

**

भाजी घेतली नाही. टपरीवर जाऊन सिगरेटचे पाकीट


विकत घेतले. आपला दिवस कसा विचित्र चालला आहे
याचा विचार करत सिगरेटचे झुरके मारले. रस्त्यावरचे
पाण्याचे ओघळ आपापल्या जागी स्थिरावरले होते. सिगरेटच्या
धुराला विचित्र चव होती. टपरीवाल्याला विचारलेही
‘‘सिगरेटच्या तंबाखूत भेसळ असते काय हो भाऊ?" पुडीने
तोबरा भरलेला टपरीवाला नुसताच हसला. असे नुसतेच
हसणाऱ्या लोकांचा त्याला राग येतो. राग दाखवायचा काही
मार्ग नव्हता. सिगरेट विझवून बाजूच्या डब्यात टाकली.
पाण्याच्या ओघळावर दोन उडय़ा मारत तो चालू लागला.
पण, उडय़ा मारतोय हे कुणी बघेल म्हणून तो लाजला आणि
26 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
नेहमीच्या गतीत चालू लागला. मनातला वैताग काही
संपलेला नव्हता.

घरी आल्याआल्या बेडवर अंग टाकले. पसरलेले पाय


समोरच्या आरशात अधिकच काळे दिसू लागले होते. आई
असताना तिला आनंद दिला नाही म्हणून हे काळे होत आहे
की भावाच्या छोटय़ा मुलाबरोबर नीट वागत नाही म्हणून हे
पाय काळे दिसत आहेत की आपण स्वतःचे पाय साफ ठे वत
नाही? आपण स्वतःतच इतके मश्गुल असतो की आजुबाजूच े
काहीच दिसत नाही नीट आपल्याला? उठून सिगरेट प्यायची
इच्छा होतेय पण उठवत नाही. उठून वॉशरूमला जायचंय
पण उठवत नाही. त्याला त्याचा स्वतःचाच राग येऊ लागला
होता. आपल्याला गर्लफ्रें डलाही नीट जपता आलं नाही.
स्वतःलाही नाही जपता येत. मग, आरसा दाखवतो
आपल्यातलेच काळे जग. तो स्वतःशी बोलत राहिला.
स्वतःला सांगत राहिला. पडल्यापडल्याच सिगरेट काढली,
पेटवली आणि कुशीवर वळून झुरके सोडू लागला. सिगरेटचा
धूर खोलीभर पसरून गूढ असे वातावरण तयार झाले होते.
छतावर गप्प लटकणारा पंखा डोळे फोडून बघत होता.
विजेची बटने, कोळिष्टके, बाजूला लावलेले शो-पिस सगळेच
एकामागोमाग एक करून त्याच्याकडे संशयाने पाहात होते.
सिगरेटची राख टाकायला पाह्यजे म्हणून अनिच्छेनेच तो
उठला आणि आरशाजवळ ठे वलेला अॅश ट्रे उचलला आणि
त्यात उरलीसरली सिगरेट विझवली.

आरशासमोर उभा राहनू तो स्वतःकडे पाह ू लागला.


आपल्याला स्वतःचा एवढा अभिमान वाटतो पण मग,
लैलाला का आपला कंटाळा आला? आपण तिच्या
सेन्सिबिलिटीला समजून घेतले नाही की तिच्याबरोबर फक्त
कामापुरते राहिलो? तिच्या केसांची वेणी घालून द्यायला
कुणीही येईल. मग आपण काय फरक पाडला तिच्या
आयुष्यात? आपल्याशिवायचे आयुष्य ती इतक्या सहजतेने
कसे आपलेसे करू शकते?
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 27
खोलवरच्या अस्वस्थतेने त्याने स्वतःच्या डोक्यावरून
हात फिरवला. हाताला लागणारे कानामागचे केस आता
वाढलेले होते. आरशात पाहनू तो डोक्यावरून पुन्हा हात
फिरवू लागला तर राठ केस डोक्यावर सगळीकडे वाढलेले
हाताला लागले. केसांची टोके हाताला बोचू लागली होती.
एखाद्या जनावराचे डोके वाटावे तसे त्याला स्वतःचे डोके
वाटू लागले. तरीही त्याला स्वतःच्या डोक्यावरून हात
फिरवावासा वाटत होता. स्वतःच्या डोक्यावर प्रेमाने हात
फिरवत होता पण केस टोकदार होत चालले होते. अंग गरम
होत होते. अंगातून वाफा बाहेर पडू लागल्याचा भास होऊ
लागला. अस्वस्थेतेने त्याने अंगातला शर्ट काढून टाकला.
पॅन्टही नको आणि घातलेली बॉक्सीची चड्डी नको म्हणून
काढून टाकली. आता तो स्वतःच्या उघडय़ा देहाकडे पाह ू
लागला. आरशावरचे ‘आ’ हे अक्षर वटारलेल्या डोळ्यांनी
आपल्याकडे पाहातेय असे वाटू लागले. ‘आ’चे डोळेही
आपलेच डोळे असल्याचा भास होऊ लागला. आपलेच डोळे
त्याला थकवत राहिले. त्याची उभं राहाण्याची ताकदही संपत
चालली होती. त्याला पडावेसे वाटते होते. त्याने घामाळलेले
शरीर बेडवर झोकून दिले. अंधुक होत चाललेल्या पंख्याकडे
पाहात तो स्वतःशी बोलत होता की कुठल्या स्वप्नात होता
हे त्याचे त्यालाच कळत नव्हते.

- आशुतोष पोतदार
संपर्क : 7387005358
इ मेल ः potdar.ashutosh@gmail.com

28 & ‘w³V eãX Am°JñQ 2020


वरनभातलोन्चा
नि कोन नाय कोन्चा :
रूपबंध आणि आशयसूत्रे

हरिश्चंद्र थोरात

‘w³V eãX Am°JñQ 2020 & 29


१.
मराठीतील महत्त्वाच्या समकालीन कथालेखकांमध्ये
जयंत पवारांचा उल्लेख आवर्जून केला जातो. पवार
मोजक्याच, दीर्घतेकडे झुकणाऱ्या, सकस कथा लिहितात.
त्यांच्या नावावर फिनिक्सच्या राखेतन ू उठला मोर आणि
वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा हे दोन कथासंग्रह
आहेत. पहिल्या संग्रहामध्ये सात कथा आहेत, तर दसऱ्या ु
संग्रहामध्ये पाच कथा आहेत. कथालेखक म्हणून त्यांची
प्रतिष्ठा या बारा कथांवर प्रामुख्याने आधारलेली आहे.
अर्थातच कथालेखक म्हणून पवारांची मूल्ययुक्तता व
अधिमान्यता ठरण्यासाठी या बारा कथा निश्चितच पुरेशा
आहेत. वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा! ही कथा
‘मुक्त शब्द’मध्ये २०१२ साली प्रकाशित झाल्यानंतर
पवारांशी झालेल्या इमेलवरील चर्चेमध्ये ‘मराठीमधल्या उत्तम
कथा एकत्र करायच्या ठरवल्या तर त्यात या कथेचा समावेश
खात्रीने करावा लागेल’ असे मी जयंत पवार यांना लिहिले
होते (थोरात, २०१२,पृ. ६६). हा इ-संवादही ‘मुक्त
शब्द’मधून प्रकाशित झालेला असल्यामुळे पवारांच्या विशिष्ट
कथेविषयी मला काय वाटते हे दाखविणारे त्यातील वाक्य
येथे समाविष्ट केले आहे. ही कथा आणि आणखी चार दीर्घ
म्हणता येतील अशा कथा एकत्र येऊनवरनभातलोन्चा नि
कोन नाय कोन्चा हा पवारांचा दसरा ु संग्रह आकाराला
आलेला आहे. तो २०१५ साली प्रकाशित झाला आहे.
येथील विवेचन या संग्रहावरच रोखलेले असले तरी गरज
पडेल तेथे त्यांच्या पहिल्या संग्रहाचा संदर्भही घ्यायचा, असे
धोरण ठे वले आहे. येथील विवेचन मराठी कथेच्या परं परेमधील
जयंत पवारांच्या कथेच े स्थान स्पष्ट करण्याच्या हेतन ू े
करण्यात आलेले नाही. तसा भाग कुठे आल्यास तो
आनुषंगिक आहे असे म्हणता येईल. हे विवेचन वरनभातलोन्चा
नि कोन नाय कोन्चा या संग्रहात समाविष्ट झालेल्या कथांचे
स्वरूप स्पष्ट करण्याच्या आकांक्षेने प्रेरित झाले आहे.
सर्वसाधारणपणे कथासंग्रहाविषयी लिहिताना कथाकाराच्या
वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाची थोडक्यात मांडणी करून
30 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
कथासंग्रहाच्या आशयसूत्रांची, त्यांना असलेल्या ऐतिहासिक
संदर्भांची, कथांच्या पृष्ठस्तराखाली दडलेल्या सामाजिक-
राजकीय परिस्थितीच्या गतिशीलतेची, तिच्या स्थानिक वा
जागतिक स्वरूपाची, तिच्याविषयीच्या लेखकाच्या भूमिकेची,
तिला असलेल्या तात्त्विक परिमाणांची चर्चा केली जाते. ही
चर्चा कथांच्या संपर्कात आणणे म्हणजे प्रामुख्याने
कथासंग्रहाविषयी लिहिणे होय. हे महत्त्वाचे काम झाल्यावर
किंवा चालू असताना कथांच्या रूपबंधांची, संभाषितांच्या
हाताळणीची, पात्रचित्रणाच्या पद्धतीची, कथकाच्या
स्वरूपाविषयीची, घटनांना लाभलेल्या अनेक परिमाणांची,
काळाच्या संरचनेची चर्चा जमलीच तर केली जाते. या
गोष्टींच्या आशयसूत्रांशी असलेल्या संबंधांचा परामर्श घेण्याचे
अथवा न घेण्याचे स्वातंत्र्य कथासंग्रहाचे परीक्षण लिहिणाऱ्याला
असते. उदाहरणार्थ, जयंत पवारांच्या कथेविषयी लिहिताना
मुंबई हे महानगर, या महानगरातील श्रमिकांचे जग,
तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे बदलत गेलल े े श्रमाचे स्वरूप,
जागतिकीकरणाची चाहल ू लागताना बदलत गेलले ्या
उत्पादनपद्धती, विविध क्षेत्रांत त्यामुळे घडून आलेली
रूपांतरणे, श्रमिकांची ससेहोलपट, त्यांचे अमानुष शोषण, या
शोषणाने बदलवून टाकलेली जगण्यामरण्याचीसहन
करण्याची, भिडण्याची, भांडण्याची विविध रूपे,
जागतिकीकरणाची संधी प्राप्त होताच स्वतःचा विकास
करवून घेण्यास उत्तरोत्तर तत्पर होत गेलल े ा मध्यमवर्ग,
परिसरांनी धारण केलेली नवी लोभस रूपे, राजकारणाचे
बदललेले स्वरूप, मूल्यव्यवस्थेची व पर्यायाने संस्कृ तीची
झालेली पुनर्रचना यांसारख्या अनेक गोष्टी पुढे येतात.
त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत ही गोष्ट खरी आहे. पण
कथा निर्माण होण्यासाठी या गोष्टी पुरेशा नाहीत. कथा
निर्माण व्हायची असेल तर संहिता निर्माण करावी लागते.
त्यासाठी भाषेचा बरावाईट उपयोग करावा लागतो.
वेगवेगळ्या संभाषितांचे परस्परसंबंध जोडावे लागतात.
त्यांतून एक बंध उभारावा लागतो. या बंधामधून एक
कल्पिताच्या पातळीवरचे विश्व उभारावे लागते. या व
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 31
यांसारख्या परिमाणांनी युक्त असलेली संहिता वाचकाच्या
वाचनाचा विषय ठरतो. वाचकाच्या वाचनाच्या अनुभवाचा
तो एक महत्त्वाचा आधार असतो. त्याच्या अर्थनिर्णयनप्रक्रियेवर
तो महत्त्वाचा परिणाम घडवून आणत असतो. संहितानिर्मितीचा
हा जो उपक्रम आहे त्याच्या विविध अंगांचा परामर्श
घेतल्याशिवाय कथासंग्रहाविषयी बोलणे पुरेसे ठरत नाही.
वास्तववादाने भारून टाकलेल्या मराठी साहित्याच्या
समकालीन पर्यावरणामध्ये आशयसूत्रांच े अंग विशेष महत्त्वाचे
ठरत जाते. रूपबंधांचे अंग ही योगायोगाने, विशेष जागरूक
नसताना घडलेली, गौण महत्त्वाची गोष्ट मानली जाते.
तिच्याविषयी कोणी बोलू लागले तर रूपवाद रूपवाद असा
ओरडा सुरू होतो. तिच्याकडे जाता जाता उरकायची गोष्ट
म्हणून विवेचनाच्या शेवटी कृपेचा किंचित दृष्टिक्षेप टाकायचा
असतो, असेही मानले जात असावे असे वाटते. मुळात
आशयसूत् रे असतात, लेखकाच्या दृष्टिकोणातून ज्यांना पर्याय
असत नाहीत आणि लेखक त्यांना पुढे रूप देतो, ज्याला
पर्याय असू शकतो, अशी एक कालरचनाही अनेकदा गृहीत
धरली जाते.
जयंत पवारांच्या वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा चे
विवेचन करताना आपण वरील दृष्टी व तिच्याशी निगडित
कालक्रम उद्ध्वस्त करून प्रथम रूपबंधाविषयी चर्चा करायला
हरकत नाही. रूपबंध व त्याचे अनेक विशेष या निर्मितिप्रक्रियेत
शेवटी निर्माण झालेले असतात असे न मानता आपण त्यांना
विवेचनाच्या प्रारं भी सामोरे जाऊ शकतो. मात्र त्यांविषयी
बोलताना हे विवेचन आशयसूत्,रे मूल्यव्यवस्था, भूमिका
इत्यादिकांकडे रोखलेले ठे वणे गरजेच े असते. रूपबंधाच्या
विशेषांची आशयसूत्रांच्या परिमाणांशी अशी जोड घालता येते
की ज्यामुळे आशय आणि रूप यांच्यातील कालक्रम नष्ट
होतो आणि त्या ठिकाणी रूप व आशय यांच्यातील
डायलेक्टिक अवतरू लागते. असे झाले की आशय रूप
होण्याचा प्रयत्न करू लागतो आणि रूप आशय ठरू लागतो.
दोन्ही एका सतत चालणाऱ्या द्वंद्वात्मकतेचा भाग होतात.
एकमेकांवर परिणाम करू लागतात. कथेला अशा द्वंद्वाच्या
32 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
पातळीवर नेता येणे तिच्या दृष्टीने विशेष अर्थपूर्ण ठरते. हे
जमले नाही तर आशयसूत् रे व रूपबंध हे घटक सुटेसटु े
राहतात आणि कथेला खऱ्या अर्थाने समग्रता प्राप्त होत
नाही.
रूपबंधाचे आशयसूत्र म्हणून कथेच्या संहितात्मकतेविषयी
आपल्याला बोलता येईल. हे बोलताना पवारांच्या पहिल्या
संग्रहाचा या दृष्टिकोणातून थोडक्यात परामर्शही घेता येईल.
पहिला संग्रह विचारात घेतल्यामुळे विवेचनविषय असलेल्या
दसऱ्या
ु संग्रहाच्या विश्लेषणासाठी आवश्यक असलेली
पार्श्व भूमीही तयार होईल.
कथा निर्माण व्हायची असेल तर संहिता निर्माण करावी
लागते, असे वर म्हटले आहे. फिनिक्सच्या राखेतन ू
उठलामोर या पहिल्या कथासंग्रहात संहितानिर्मितीचे सूत्र
अनेकदा प्रवेश करताना दिसते, हा योगायोग नाही. या
संग्रहातील त्यांचा कथक किंवा कथेतील एखादे पात्र
संहितानिर्मितीच्या उपक्रमात गुंतलेले असते आणि ही प्रक्रिया
वास्तवातील व्यामिश्रतेला पुढे आणण्यासाठी, वाचकाला
अर्थनिर्णयनासाठी अधिकीचा बिंद ू उपलब्ध करून देण्यासाठी
बहध ु ा वापरली जाते. संहितालेखनाचे हे सूत्र पवारांनी अधिक
तपशिलात जात विकसित केले आहे असे म्हणता येणार
नाही. पण त्याचे अस्तित्व भाषेला व ती लिहिली जाण्याला,
कथा रचली जाण्याच्या प्रक्रियेला महत्त्व असते याचे भान
अधोरेखित करते. भाषा किंवा कथा म्हणजे वास्तवासमोर
धरलेला आरसा नाही याची नेमकी जाणीव पवारांच्या पहिल्या
संग्रहातील कथेलाही आहे. टें गशें च्या स्वप्नात ट्रेन...या
कथेतील सिद्धिविनायक टेंगशे स्वप्नाच्या तडाख्यातून
सुटण्यासाठी ते स्वप्न लिहनू काढतो आहे, संहितेमधून
स्वप्नाची पुनर्रचना करतो आहे. साशे भात्तररूपयांचा
सवाल अर्थात युद्ध आमचे सुरू! या कथेमध्ये लिहिण्याची
प्रक्रिया नाही. तथापि, तिच्याऐवजी जे घडते त्याचे चित्रण
करणारा एका वृत्तवाहिनीचा कॅमेरा आहे. तो एक दृक्परिमाण
असलेली संहिताच निर्माण करतो आहे. जन्म एक व्याधी...
मध्ये आयुष्यात जे काही घडले त्यावर नाटक लिहायला
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 33
घेतलेला, पण ते पूर्ण करता न आलेला नाटककार आहे.
चंद ूच्या लग्नाची गोष्ट अर्थात सड्डममे टढ्ढूममध्ये
संहितानिर्मिती विशेष महत्त्वाची नसली तरी इतिहास आणि
कोचरेकर कुलवृत्तांत अशा दोन अधिकृत संहितांचा साभिप्राय
उल्लेख आहे. एका रोमहर्षक लढय़ाचागाळीव इतिहास
या कथेमध्ये इतिहासलेखनाची प्रक्रिया कें द्रस्थानी आहे आणि
तिची संहिता म्हणजे ‘खालून इतिहास लिहिण्या’चा एक
प्रयत्न आहे. छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र ही कथा
या दृष्टीतून अधिक क्रांतिकारक म्हणावी लागेल, कारण ती
एका रहस्यप्रधान व गुन्हेगारी कथालेखकाने लिहिलेली
संहिता आहे. ती येथे जशीच्या तशी सादर करण्यात आली
आहे, हे आपल्याला संहितेच्या तळाशी असलेल्या
तळटीपेवरून समजते. या तळटीपेच्या निमित्ताने जयंत
पवारांच्या कथेमध्ये रूपरचनेच्या एका नव्या सूत्राने प्रवेश
केला आहे. या सूत्राचा निर्देश स्वसंदर्भयुक्तता असा करता
येतो. जे सादर होते आहे ती संहिता आहे, खरे जग नव्हे
याचे भान जेव्हा कल्पितकथेच्या संहितेमधून होऊ लागतो,
तेव्हा ती स्वसंदर्भयुक्त झाली आहे असे म्हणता येते. अशा
संहितेमध्ये वास्तवातल्या जगावरचा संहितेचा सरळ रोख
नष्ट होतो आणि तो संहितेवर रोखला जातो. संहितेने
वास्तवाचे प्रतिरूपण करण्याऐवजी ती संहितेच्या
निर्मितिप्रक्रियेच े प्रतिरूपण करू लागते, स्वतःवरच भाष्य
करू लागते. या भाष्यामधून तिचा संकेतव्यूह उघडा पडत
जातो. वास्तवाच्या संहितानिरपेक्ष अस्तित्वाची संकल्पना बाद
होते.
छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र या कथेचा अपवाद
वगळला तर फिनिक्सच्या राखेतन ू उठला मोर या संग्रहातील
बहतु ेक कथांमध्ये संहितात्मक असण्याचे उल्लेख खास
वास्तववादी धारणेतन ू केले गेले आहेत, हे आवर्जून सांगितले
पाहिजे. वास्तववाद ही खूप गुंतागुंतीची संकल्पना आहे याचे
भान ठे वन ू ही, वास्तव काय आहे हे लेखकाला किंवा
कथकाला ठाऊक आहे. ते तसे आणि तसेच आहे याची
त्याला पूर्ण कल्पना आहे.ते सहज आकळत नसले तरी
34 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
प्रयत्न केल्यास त्याच्यापर्यंत पोहोचता येते याविषयी त्याला
शंका नाही. त्याला काही पर्याय असतात, किंवा त्यामध्ये
सापेक्षतेचा संचार असल्यामुळे वास्तव सादरीकरणाच्या
पलीकडे राहते असे या कथांमध्ये अभिप्रेत नाही. जे वास्तव
आहे ते लेखकाच्या मनाच्या बाहेर, त्याच्या निर्मितिप्रक्रियेच्या
निरपेक्षतेने अस्तित्वात असते आणि त्याचे सादरीकरण
करण्याचा प्रयत्न लेखकाला करता येतो असे गृहीत धरून
या कथा लिहिल्या गेल्या आहेत. एका परीने या कथा
इतिहासाचा एक प्रकार आहेत. इथली गिरणी गिरणीच आहे,
ट्रेन ट्रेनच आहे आणि चाळ चाळच आहे. या अवकाशांमधल्या
माणसांच्या जगण्याच्या शैलीविषयीचे आणि त्यामागे
दडलेल्या शोषणाचे आणि संघर्षाचे तथ्य किंवा सत्य लेखकाने
आपल्या सहानुभवाने जाणले आहे आणि ते त्याला आपल्या
कथेमधून व्यक्त करायचे आहे. संहितात्मकतेचक े ल्पिताचे जे
आविष्कार आपल्याला या कथांमध्ये आढळतात, ते वास्तवाचे
परिणामकारक सादरीकरण करण्यासाठी तसेच वास्तवाला
असलेली अनेक परिमाणे स्पष्ट करण्यासाठी अस्तित्वात
आलेले आहेत. त्यांच्या अस्तित्वामुळे वास्तवाची किंवा
सत्याची अपरिहार्यता धोक्यात येत नाही.
संग्रहाच्या शेवटी आलेल्या आणि लेखनकाळाच्या
दृष्टिकोणातूनही बहध ु ा सर्वांत शेवटी असलेल्याछटाकभर रात्र
तुकडातुकडा चंद्र या कथेचा व्यवहार मात्र या पूर्वपरं परेला
धरून नाही. तिथे वास्तवाची जागा पूर्णपणे संहितेने घेतली
आहे. कुणा एका रहस्यकथा लेखकाने लिहिलेली कथा
बहध ु ा तिच्यात काही फेरफार न करता येथे सादर करण्यात
आली आहे. सादरीकरणाचा विषयच येथे मुळापासून
बदललेला आहे. कुठल्या तरी वास्तव किंवा कल्पित जगाचे
सादरीकरण येथे केले जात नाही, तर विशिष्ट संहितेच े जग
इथे सादर होते आहे.
गंमत अशी की या संहितेमध्ये एक जग अवतरले आहे
असे दिसते. या जगात बरेच काही घडते आहे. ते वेगवेगळ्या
दृष्टिकोणातून पाहिले जाते आहे. तिथे वेगवेगळी पात्रे आहेत.
त्यांनी केलेल्या कृती आहेत आणि इतरांनी केलेली त्या
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 35
कृतीची केलेली अर्थनिर्णयनेही आहेत. इथे अवतरलेल्या
जगातील व्यवहारामागे काही सूत् रे सापडतात का? या
जगाच्या व्यवहारांचे समर्थन किंवा स्पष्टीकरण या सूत्रांच्या
सहाय्याने करता येतो का?
जगाच्या आपल्या अनुभवाच्या साहाय्याने इथे अवतरलेल्या
जगाचे आकलन करून घेणे अवघड ठरते हे उघड आहे. हे
जग अत्यंत संदिग्ध आहे. आहे नाहीच्या सीमारेषांवर ते
वावरते आहे. त्यांत मृत व्यक्ती पात्रे म्हणून वावरतात आणि
पात्राची प्रचलित संकल्पना उद्ध्वस्त करू पाहतात. या
जगात पात्र किंवा व्यक्ती विवक्षित व अपरिहार्यपणे एकवचनी
आहेत, असे दिसत नाही. इथे व्यक्तींच्या अनेक प्रती आहेत
आणि त्या वेगवेगळ्या ओळखीने वेगवेगळ्या ठिकाणी भेटत
राहतात. इथे माणसांचे जगणे आणि मरणे विशेष महत्त्वाचे
आहे असे दिसत नाही कारण मेल्या आहेत अशा व्यक्ती
आपल्याला पुन्हा भेटण्याची शक्यता असते. वाचकाच्या
व्यवहाराशी हा असा लपंडाव ही संहिता खेळते आहे. असा
लपंडाव खेळणे हे रहस्यकथेच े खास वैशिष्टय़ आहे आणि या
कथेचा लेखक रहस्यकथा लेखक आहे. तो या फँटॅस्टिक
जगाचा भाग आहे. तो शहरात आलेल्या तापाच्या साथीत
मरण पावला आहे, असे सांगितले गेले असले तरी पुढच्या
एखाद्या वळणावर तो आपल्याला भेटणार नाहीच, असे
सांगता येणार नाही. पर्यायी आणि फँटॅस्टिक जगाची निर्मिती
हेरूपबंधाचे आणखी एक नवे सूत्र आपल्याला येथे भेटते.
स्वसंदर्भयुक्ततेबरोबरच या पर्यायी व फँटॅस्टिक जगाचा
उपयोग जयंत पवार यांच्या पुढल्या कथालेखनाने मोठय़ा
प्रमाणात केला आहे.
स्वसंदर्भयुक्तता आणि पर्यायी जग या दोहोंच्या प्रभावातून
एक तात्त्विक भूमिका आणि या भूमिकेच्या अनेक छटा पुढे
येऊ शकतात. छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्रमध्ये ही
तात्त्विक भूमिका पहिल्यांदा पवार यांच्या कथेमधून समोर
येते. ती सत्याच्या संदर्भातील आहे. छटाकभर रात्र...
मधील पर्यायी जग सत्याच्या किंवा सत्याशी जोडलेल्या
वास्तवाच्या संकल्पनेपढु े प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे.
36 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
त्यामध्ये अनेकविध घटना घडत आहेत, मात्र त्या घटनांना
जोडणारे सांधे निखळून गेलल े े आहेत. संपूर्ण कथा बारमध्ये
नृत्य करणाऱ्या मुलीवर किंवा मुलींवर कें द्रित झालेली आहे.
कथेच्या प्रारं भीच नेपियन सी रोडच्या पुलाखाली या मुलीचे
प्रेत पोलिसांना सापडले आहे. रहस्यकथालेखक असलेल्या
कथकाने ते पाहिले आहे. कथेच्या शेवटी आणि पहिली घटना
घडून बराच काळ उलटून गेल्यावर कथक तिच्या प्रियकरानेच
तिचा खून केला असणार या निष्कर्षापर्यंत येऊन त्या
प्रियकराच्या घरी जातो, तेव्हा तो त्या मुलीशी होणाऱ्या
त्याच्या लग्नाला निघण्याच्या तयारीमध्ये असतो. घटना
घडली असे दाखवून तिचे घडलेपण खोडण्याची प्रयुक्ती येथे
वापरली गेली आहे. ती सत्याच्या संकल्पनेला बाधित करते.
ही मुलगी शबनम आहे. हिलाच एका विशिष्ट बारमध्ये
पायल म्हटले जाते. पायल हे तिचे दसरे ु नाव नाही. तिची
वेगळी ओळख आहे. तीच लक्ष्मी आहे, तीच सुशीला आहे,
तीच अंजली आहे. कथेने व्यक्तीच्या विवक्षिततेच्या ठिकऱ्या
उडण्याची प्रक्रिया समोर मांडली आहे व त्यातून अस्मिता ही
केवळ रचलेली गोष्ट असते हे सिद्ध होते. किंवा असेही
म्हणता येईल की या अनेक मुलींमधील भेदांना काहीही अर्थ
नाही. या परिस्थितीत सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर
ते हाती येणार नाही. एक सापडले तर दसरे ु थोडय़ा
अंतरावरून वाकुल्या दाखवत राहणार, हे उघडच आहे.
अनेक पर्यायी सत्यांनी आकाराला आलेले हे जग विखुरध्वंस
झालेले जग आहे. त्यात एकमेकांना पर्याय असलेली पण
एकमेकांचा संबंध तुटलेली अनेक सत्ये एकाच वेळी
वेगवेगळ्या अवकाशात वावरत असण्याची शक्यता आहे.
त्यामुळेच या जगात शबनमचा खून झाला आहे आणि ती
जिवंतही आहे. बबलूने तिचा खून केला आहे आणि तो
तिच्याशी लग्नही करणार आहे. डान्सबारमधल्या मुलींचे
आयुष्य व त्यातील शोषण या किंवा आणखी कुठल्या
वास्तवावर कथा आपले लक्ष कें द्रित करणार नाही. कथेचा
हा उद्देश आहे असे दिसत नाही.
ती कशासाठी अवतरते आहे? तिचा पर्यायी जगाचा
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 37
रूपबंध काय सांगतो आहे? तो सांगतो आहे की सत्य
सापेक्ष असते. ते एकमेव नसते. ते अंतर्विरोधाने युक्त
असते. ते मानवी बुद्धीच्या, विवेकाच्या पलीकडे राहते.
त्याच्याविषयी बोलता येणे अशक्य व्हावे, ते भाष्याशिवाय
राहावे, ते असण्यानसण्याचा पाठशिवणीचा खेळ खेळणारे
असावे, असेच त्याचे स्वरूप असते. सत्याच्या या
स्वरूपामुळेच ज्याविषयी काही विधानच करता येत नाही
अशा पोकळीने युक्त अशा अवस्थेमध्ये या कथेचा
रहस्यकथालेखक असलेला कथक सापडला आहे. तो
सांगतो त्याप्रमाणे तो कुठे ही पोहोचतो तेव्हा तिथे काहीतरी
गोष्ट घडून गेलल े ी असते किंवा घडायची असते. काहीतरी
घडत असताना तो ते घडते तिथे पोहोचू शकतच नाही,
कारण वास्तवाच्या वर्तमानकाळी अस्तित्वाने त्याचे सत्य
असणे अधोरेखित करता येते. कथकासाठी ही शक्यता नष्ट
झालेली असल्यामुळे त्याचा अवकाश काही न घडण्याचा
अवकाश आहे. तो योगायोगावर अधिष्ठित अवकाश आहे.
तो कार्यकारणसंबंधांच्या पलीकडचा आहे. जिथे काहीही
घडत नाही असा तो अस्सल अनैतिहासिकतेचा अवकाश
आहे.
स्वसंदर्भयुक्तता, पर्यायी फँटॅस्टिक जग, सत्याची सापेक्षता
ही तिन्ही सूत् रे प्रथमच छटाकभर रात्र... या कथेमध्ये
अवतरतात आणि अगोदरच्या कथांपासून तिला वेगळे
करतात. ही कथा हा पवारांच्या कथालेखनाने घेतलेले नवे
वळण आहे, असे खात्रीने म्हणता येते. पवारांच्या पुढल्या
कथा या वळणानंतरची वाटचाल आहे असे म्हणता येईल
का?
सत्याविषयीचा सापेक्षताभाव, पर्यायी जगाची संकल्पना
आणि स्वसंदर्भयुक्तता ही सूत् रे जयंत पवारांच्या पुढल्या
संग्रहावर कोणता परिणाम घडवतात हे पाहणे यामुळेच
गरजेच े ठरते.
२.
सत्याविषयीच्या भूमिकेच्या या अगत्यामुळेच जयंत
पवारांना रहस्यकथा या साहित्यप्रकाराविषयी विशेष आकर्षण
38 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
वाटत असावे, असे म्हणता येते. कारण रहस्य म्हणजे
सर्वसाधारण नजरांना न जाणवणारे आणि जाणीवपूर्वक शोध
घेतले जाणारे सत्य असते. दडलेले रहस्य किंवा सत्य
उघडकीला आणण्यासाठी रहस्यकथेचा जन्म होत असतो.
फिनिक्सच्या राखेतनू उठला मोरमधील छटाकभर रात्रतुकडा
तुकडा चंद्रचा कथक रहस्यकथा व गुन्हेगारकथा लिहिणारा
लेखक आहे. तो शबनम किंवा पायल किंवा लक्ष्मी यांच्या
खुनाचा आणि पर्यायाने त्यांच्या अस्मितेच्या जडणघडणीचा
शोध घेऊ पाहतो आहे. वरनभातलोन्चा नि कोन नाय
कोन्चामधली तर्काच्या खुंटीवरून निसटलेलेरहस्य ही
कथाही रहस्यकथा या साहित्यप्रकाराला कें द्रस्थानी ठे वणारी
आहे. तिच्यात रहस्यकथेची पात्रयोजना व संविधानकाच्या
रचनेसहची निर्मितिप्रक्रिया, क्रमशः रहस्यकथेतील गूढाजवळ
पोहोचणे, त्या गूढाने हल ु कावण्या देणे आणि या सर्व
प्रक्रियेमध्ये रहस्यकथेच्या लेखकांनीच नव्हे तर पात्रांनीही
अहमहिकेने भाग घेणे अशा अनेक गोष्टी आलेल्या आहेत.
स्वसंदर्भयुक्तता आणि पर्यायी जग ही आपण सांगितलेली
पवारांच्या कथेच्या रूपबंधामागील इतर दोन सूत्हरे ी या
कथेमध्ये घुसली आहेत.
वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चामधील इतर चार
कथांचा रहस्यकथा या प्रकाराशी सकृद्दर्शनी संबंध जोडता
येत नाही, ही गोष्ट खरी आहे. तरीही नीट निरीक्षण केले
आणि रहस्य या संकल्पनेला थोडे आधिभौतिक पातळीवर
नेले तर या कथांचा रहस्यकथा या प्रकाराशी संबंध जोडून
दाखवता येतो. बाबलच्या आयुष्यातील धादांत सत्य...
मध्ये सत्याच्या संरचनेचा संहितात्मक प्रयत्न आहे. सत्याची
किमान दोन एकमेकांना पर्याय ठरणारी रूपे आहेत. ती
कल्पिण्यामागचा हेतू हे या कथेत उलगडायचे गूढ आहे.
सर निघाले सप्तपाताळाकडे...मध्ये ज्याच्या स्वरूपाचा
उलगडा करता येत नाही असे पोहोचू न शकलेल्या पत्रांचे
अधोविश्व आहे. सर तिकडे का खेचले जात आहेत, त्यांचे
काय होते आहे हे उलगडायचे गूढ आहे. वरनभातलोन्चा
नि कोन नाय कोन्चा! या कथेवर रहस्यकथेचा किमान
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 39
प्रभाव आहे, तरीही तिच्या संविधानकामधील विविध पात्रांच्या
हेतंच
ू ी गुंफण रहस्यकथेच्या जवळ जाते. तुझीच सेवाकरू
काय जाणेमध्येही गणेशाच्या होणाऱ्या किंवा न होणाऱ्या
पुनर्जन्माचे त्याच्या परिणामांचे अनिश्चित उत्तर असलेले
रहस्य आहेच.
पवारांच्या संहितांमध्ये रहस्यप्रधानकथा, गुन्हेगारी कथा,
रहस्यकथा अशादोनतीन वेगवेगळ्या संज्ञा वापरल्या गेलले ्या
असल्या तरी त्यांच्या कथेला नेमकेपणाने डिटेक्टिव
कल्पितकथा अभिप्रेत आहे, असे दिसते. आपण तिला
रहस्यकथा ही मराठीत रूढ झालेला शब्दच वापरू या. तर
या रहस्यकथेमध्ये काहीतरी गुन्हा घडलेला असतो. गुन्ह्याचा
तपास करणारी व्यक्ती म्हणजे डिटेक्टिव गुन्हा घडला आहे
हे शोधून काढतो. तो कोणी केला आहे हेही शोधतो. तो
गुन्हा का घडला आहे याचाही वेध डिटेक्टिव घेतो आणि
घडलेल्या घटनेच े संपूर्ण, विश्वासार्ह, वास्तवाधिष्ठित असे
तर्क शुद्ध स्पष्टीकरण करतो.थोडक्यात, रहस्यकथेला अभिप्रेत
असलेले सत्य सहज दिसणारे, सहज जाणवणारे सत्य नसते.
ते शोधावे लागते. ते खोलवर दडलेले असते. ते विशिष्ट
पद्धतीने शोधावे लागते. शोधाची ही प्रक्रिया विवेक, निरीक्षण
आणि अर्थनिर्णयन या प्रक्रियांवर आधारित असते. ती काही
मूलभूत गृहीतकांवर आधारलेली असते. आपल्या भोवतालचे
जग प्रत्यक्षात अस्तित्वात असते, त्यातील व्यवहार
कार्यकारणसंबंधांसारख्या काही सर्वसाधारण नियमांवर
आधारलेले असतात, त्यात मूलभूत यादृच्छिकता नसते, ते
जाणून घेता येते, ही ती मूलभूत गृहितके होत.
रहस्यकथेच्या घटनाक्षेत्रात प्रत्येक गोष्ट सकारण घडत
असते, काहीही योगायोगाने घडत नाही. मात्र प्रत्येक गोष्ट
सकारण घडत असली तरी घटनांमधील कार्यकारणसंबंध
उघड नसतो. तो दडलेला असतो. सकृद्दर्शनी जाणवेल असा
नसतो. तो घटनांच्या शृंखलांचे दवेु जळ ु वीत, कृती
करणाऱ्यांच्या हेतंन ू ा प्रकाशात आणत, प्रथमदर्शनी
जाणवणाऱ्या भ्रमांचा निरास करीत डिटे क्टिवाकडून पुढे
आणला जातो. डिटे क्टिवाला यासाठी विशिष्ट प्रकारची
40 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
शोधपद्धती वापरणे गरजेच े असते. ही शोधपद्धती एका
बाजूने तर्काला अनुसरणारी असते तर दसऱ्या ु बाजूला ती
वास्तवाच्या सूक्ष्म निरीक्षणावर आधारणारी असते. विवेकवाद
आणि अनुभववाद या दोन्ही दृष्टी तिच्यामध्ये एकत्र आलेल्या
असतात. ती विज्ञानाच्या शोधपद्धतीशी आंतरिक नाते
जोडणारी असते. ती विवक्षितांचे निरीक्षण करून घटनांमागचे
सर्वसाधारण नियम शोधते. गुन्ह्याचा शोध घेणारा डिटेक्टिव
हा निसर्गाचे नियम शोधणाऱ्या वैज्ञानिकाच्या नमुनारूपात
सहभागी होऊ शकेल असा आहे. रहस्यकथा या प्रकाराचा
हा सिद्धान्तव्यूह लक्षात घेतला तर तो खास प्रबोधनाच्या
जाणिवेतन ू शक्य झालेला, आधुनिकतेशी जोडता येईल असा
प्रकार आहे, असे म्हणता येते.
रहस्यकथेविषयीचा हा सिद्धान्तव्यूह घेऊन आपण जयंत
पवार यांच्या वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चाकडे आणि
अधिक नेमकेपणाने तर्काच्या खुंटीवरून निसटलेले
रहस्य या कथेकडे वळलो की त्यांच्या कथेतन ू जाणवणारे
रहस्यकथेविषयीचे आकर्षण अनुसरणाने युक्त नाही ही गोष्ट
लक्षात येते. रहस्यकथेचा संकेतव्यूह नीट जाणून घेऊन,
तिच्या मुळाशी असलेली गृहीतके समजून घेऊन, तिचे
तर्क शास्त्र तिच्यावरच उलटवण्याचा प्रयत्न तर्काच्या...
रहस्य या कथेमध्ये अभिप्रेत आहे. रहस्यकथा ज्यावर
विश्वास ठे वते त्या गोष्टींची अर्थशून्यता स्पष्ट करण्यासाठी
तिचाच उपयोग येथे केला जातो आहे.रहस्यकथा जिच्यावर
मूलभूत विश्वास ठे वते ती गोष्ट सत्य आहे. भले ती लोकप्रिय
पातळीवरची असो! सत्य असते आणि ते शोधण्यासाठी
डिटे क्टिवाचा आणि रहस्यकथेचा जन्म झालेला असतो.
तर्काच्या...रहस्यच्या कथकाला दोन नावे आहेत. एक
लोकप्रिय आहे ते बाबी. डिचोलकरांचा बाबी. पण लोकांना
फारसे ठाऊक नसलेल,े प्रचारात नसलेले त्याचे नाव
सत्यवान आहे हे विसरता येत नाही. प्रारं भापासून वेगवेगळ्या
पातळीवरची सत्ये शोधण्याचा प्रयत्न तो करतो आहे. पण
खूप प्रयत्न करूनही नाव सत्यवान असले तरी त्याच्या हाती
संदिग्धताच येते. ही संपूर्ण प्रक्रिया पवारांनी रहस्यकथा हा
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 41
प्रकार विरचित करीत साधली आहे.
रहस्यकथेला संदिग्धतेचा अंत घडवून आणायचा असतो.
तो घडवून आणायचा असेल तर ती ज्यात घडते ते जग
कार्यकारणाच्या, शक्यतेच्या, एकमेवतेच्या कक्षेत असणे
गरजेच े असते. तर्काच्या...रहस्यमध्ये रहस्यकथेविषयीची ही
मूलभूत अट नाकारली गेली आहे. तिच्यात एक नव्हे, तर
तीन तीन जगे आहेत. एक जग बाबी, बाबीचे कुटुंब, बाबीचे
कार्यालय ज्या जगात आहे ते प्रत्यक्षातले जग आहे. दसरे ु
जग डी. विश्वनाथ यांच्या म्हणजे बाबीच्या काकांच्या हा
दैवाचा खेळ निराळा या रहस्यकथेमधले आहे. तिसरे जग
भुतांचे किंवा आत्म्यांचे आहे, आणि ते कथक बाबीच्या
स्वप्नात अस्तित्वात आले आहे.ते भूतकाळात प्रत्यक्ष जगात
वावरून मृत झालेल्या काका, सरस्वती काकू यांच्या
अस्तित्वांच्या अवशेषांचे आहे. ही तीन जगे वेगवेगळी राहत
नाही. त्यांची स्वरूपे भिन्न असली तरी ती एकमेकांत
मिसळतात. बगाराम हे खरे तर काकांच्या रहस्यकथेतले
पात्र आहे. पण बगाराम बाबीच्या स्वप्नात येऊन रहस्यकथेच्या
संहितेबाहेर असलेल्या काका, सरस्वतीकाकू यांच्याविषयी
आणि रहस्यकथेतील निशाचर दिवाकराविषयी माहिती देऊ
शकतो. आत्म्याच्या जगातील बबन फड नावाचे एक नवेच
पात्र रहस्यकथेत घुसण्याचा प्रयत्न करते आहे. रहस्यकथेच े
लेखन स्वप्नात करणारा बाबी प्रत्यक्षातल्या जगातील
लौकिक संबंधांपासून तुटतो आहे. या तीन जगांमधील
सत्ताशास्त्रीय भेद एकमेकांच्या अस्तित्वाला छेद देणारा आणि
म्हणून सत्याची संकल्पना अशक्य करणारा आहे. सत्यवान
किंवा बाबी कितीही प्रयत्न करो, सत्य त्याला झुकांडय़ा देत
राहते. आपण ज्यांना काका म्हणतो तेच आपले खरे वडील
असावेत असे त्याला वाटत असले आणि शेवटी आपल्या
संपूर्ण नावात त्याने विश्वनाथ हे नाव वडिलांचे नाव म्हणून
घातले असले, तरी ते खरोखरच त्याचे वडील आहेत
याविषयी त्याची निःसंदिग्ध खात्री पटलेली नाही. मी तुमचा
मुलगा आहे या प्रश्नाचे नीट उत्तर काका त्याला देत नाहीत.
ते एकाच वेळी खरे आणि खोटे बोलताहेत असे बाबीला
42 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
वाटते. या वेळी काका सांगतात ते या कथेच्या दृष्टिकोणातून
अत्यंत महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, ‘बाबी आयुष्य जटिल
आहे. सगळीकडेच उजेड नसतो, जिथे उजेड नसतो तिथे
पुरेसा काळोखही नसतो. जिथे तिथे भुयारं मात्र असतात.
त्यांच्या आत काळोख असतो. आपल्याला वाटतं आत काही
तरी आहे. पण काही सापडेल म्हणून हात घालून रापत
बसलास तर झ्याट् काही सापडत नाही. प्रत्येक रहस्यामागे
एक सत्य उभं असतं. पण काळोखातून ते कधी आलंच
समोर तर भाजून काढतं भोसडीचं. डोळे फुटतात. गांडीला
बुडबुडे येतात. तेव्हा आपण त्याच्या नादाला लागू नये. पण
सत्य शोधायची खाज असतेच आपल्याला. तेव्हा रहस्यकथा
लिहावी. तिथे आपलेच कूटप्रश्न आणि आपलीच चलाख
उत्तरं ’ (पृ.).
या चलाखपणालाही मर्यादा असतात. चलाखपणा सत्याला
सामोरे जाणे टाळतो. सत्यापासून दरू पळतो. खरे तर त्याच्या
साहाय्याने प्रत्येक रहस्यामागे सत्य उभे असते, असे म्हणता
येत नाही. त्याच्या आधारे सत्य ही रहस्यकथेमधली एक
कलृप्ती असते एवढेच म्हणता येते. काकांनी आपल्या
व्यवहाराने रहस्यकथेची कल्पितता उघडी पाडत सत्य
अधोरेखित करण्याचा अधिकार गमावला आहे. तर्काच्या
खुंटीवरून रहस्य निसटलेले आहे.
रहस्यकथा या प्रकाराला जयंत पवारांनी आधिभौतिक
तत्त्वविवेचनाकडे वळवले आहे. ते वळवण्यासाठी आणखी
एका प्रयुक्तीचा उपयोग तर्काच्या...रहस्यमध्ये करण्यात
आला आहे. ही प्रयुक्ती म्हणजे रहस्यकथेचा रोख तिच्या
संहितेकडे वळवणे होय. ही प्रयुक्ती असे सुचवते की
उलगडायचे रहस्य संहितेमध्येच असते किंवा संहिताच
असते. रहस्यकथेमधील जगाच्या ठिकाणी संहिता आणि तिचे
विभ्रम आले की सत्याची संकल्पना अनावश्यक ठरू लागते
किंवा संहिता हेच सत्य ठरू लागते. संहितेची पारदर्शकता
तर्काच्या...रहस्यमध्ये नाकारली गेली आहे. रहस्यकथेमध्ये
घडलेल्या घटनांनी तयार झालेले जग आणि त्या घटनांचे
प्रतिरूपण करणारी संहिता या दोन गोष्टी वेगवेगळ्या
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 43
पातळ्यांवर असतात. घटनांच्या पातळींवर जे घडत असते
त्याचे सादरीकरण संहितेच्या पातळीवर होत असते. संहितेच्या
पातळीवर जे घडत असते त्याचे सादरीकरण संहितेच्या
पातळीवरून करायची गरज नसते. तसे केले तर संहिता
स्वसंदर्भयुक्त होते, तिचे जाणीवपूर्वक रचलेपण उघडे पडते.
रहस्यकथेला सांगावयाच्या सत्यापर्यंत पोहोचण्याचा
तपासवृत्तांताच्या पायाखालचा आधार यामुळे काढून घेतला
जातो. तर्काच्या...रहस्यने या अंगानेही वाटचाल केली आहे.
रहस्य असण्याची, गुंतागुंत असण्याची, अपुरेपणा असण्याची
रहस्यकथेसाठी अत्यावश्यक असलेली परिस्थिती भोवतालच्या
जगात नव्हे, तर डी. विश्वनाथांनी लिहिलेल्या हा दैवाचा
खेळ निराळा या रहस्यकथेच्या संहितेमध्ये आहे. जगात
घडायचे ते घडून गेले आहे. ते दरुस्त ु होणारे नाही. गुन्हेगार
असलेल्यांना नसलेल्यांना शिक्षा होऊन गेल्या आहेत. प्रश्न
उरला आहे तो संहितेमध्ये. तिच्यामध्ये सापडलेले सत्य
म्हणून जे काही मांडले गेले आहे, त्यातच मूलभूत चूक
झाली आहे हे डी. विश्वनाथांच्या लक्षात आले आहे. झालेल्या
चुकीची दरुस्ती
ु बाबीकडून करून घ्यावी म्हणून त्यांनी
बाबीला लिहिण्याच्या कामाला लावले आहे. दसऱ्यांना ु हवा
तसा वृत्तांत लिहनू देण्यात बाबी पटाईत आहे. त्याने स्वतः
रहस्यकथा लिहिल्या नसल्या तरी भावकथा हा लोकप्रिय
प्रकार हाताळला आहे. काकांचे म्हणणे ऐकून त्यांच्या
कादंबरीच्या संहितेच े पुनर्लेखन बाबी करू लागतो.
तर्काच्या...रहस्यच्या कें द्रस्थानी ही पुनर्लिखित संहितेच्या
निर्मितीची प्रक्रिया आहे.
संहितेच्या पुनर्निर्मितीची प्रक्रिया एव्हढी सोपी राहत नाही.
ही संहिता लिहिली जाऊ लागताच बाबीचे स्वातंत्र्य हरवू
लागते. तो जी काही मांडणी करत असतो तिला आव्हान
देणारी माणसे त्याच्या स्वप्नामध्ये घुस ू लागतात. यांत
निशाचर दिवाकरचा साहाय्यक बगाराम असतो. तो
फुलपगार म्हणजे दिवाकरविषयी व त्याच्याविषयी अनेक
गोष्टी सांगतो. काकांनी या दोघाबद्दल लिहिताना सत्य
लिहिले नाही हे त्याच्या निवेदनातून कळते. काकांनी निर्माण
44 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
केलेल्या लोकप्रिय जोडीच्या अस्तित्वाचा पाया असत्याने
भरला आहे हे बाबीच्या लक्षात येते. काकांच्या आयुष्याविषयीही
बगाराम बरेच सांगतो आणि काकांच्या आयुष्याचे अपरिचित
पैलू बाबीच्या लक्षात येतात. अर्थातच कळते तेही निरपवाद
सत्य नव्हे. त्याला आणखी काही वेगळे संदर्भ आहेत हे
सरस्वती आणि काका यांच्या बोलण्यातून लक्षात येते आणि
सत्य म्हणजे लोकांनी सत्य म्हणून स्वीकारलेली गोष्ट होय
हेही बाबीला कळते. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
आतापर्यंत चित्रात नसलेला बबन फड पुढे येतो. काकाने
त्याच्या संहितेमध्ये शेठजींच्या खुनाविषयी सत्य सांगितलेले
नाही हे तो पोटतिडिकेने सांगतो. शेठजींचा खून कामगारांनी
केला नाही हे कोर्टानेही मान्य केले होते. हा खून रामशरण
चौकीदाराच्या देखण्या मुलाने केलेला असतो असे काकांच्या
निशाचर दिवाकराने व बगारामाने शोधून काढलेले असते.
खून का झाला याचे भरभक्कम कारणही असते. पण फड
याचे म्हणणे असे की खून त्याने केला होता. कोणीही त्याच्या
म्हणण्याकडे लक्ष देत नाही. याचे कारण त्याच्याजवळ खून
करण्यासाठी आवश्यक असा हेतू नव्हता. गाडीने चिखलाचे
पाणी उडवण्याचे कारणही पुरेसे व समर्पक नसते. गाडीने
चिखल उडवण्याची घटना ही योगायोगाने घडलेली घटना
असते. तिच्यात खून होण्यासाठी आवश्यक असलेली
कार्यकारणसंबंधांची बळकट शृंखला नसते. बबनने खून
केला ही गोष्ट सत्य असते आणि हे सत्य यादृच्छिक असते
या निष्कर्षावर कथा येऊन थांबते. बबनचा आग्रह मानून
त्याला संहितेमध्ये प्रवेश द्यायचा असेल तर हेत,ू
कारणकार्यसंबंध, विश्वासार्हता या सर्व गोष्टींची पुनर्रचना
करावी लागेल, म्हणजे सत्य रचावे लागेल, असे बाबी
बबनला सांगतो. बबनला ते मान्य नाही. त्याला सत्य आहे
तसे संहितेमध्ये यावे असे वाटते आहे. संहितेमध्ये आले की
सत्य आहे तसे राहत नाही हे त्या बिचाऱ्याला माहीत नाही.
सत्याच्या रचलेपणाला पुढे आणत तर्काच्या...रहस्यचा शेवट
होतो.
शेवटाकडे येत असताना रहस्यकथा या प्रकाराला आणखी
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 45
एक प्राणांतिक झटका तर्काच्या...रहस्यने दिला आहे. गूढाची
किंवा रहस्याची उकल रहस्यकथेच्या शेवटी यायलाच हवी
हा रहस्यकथेचा अलिखित नियम येथे मोडला गेला आहे. या
कथेला यशस्वी समारोप नाही. ती काहीही निर्णय न घेण्याच्या
अवस्थेमध्ये संपते. कालानुक्रमाची पुनर्रचना आणि
कार्यकारणसंबंध ही सूत् रे नाहीशी झाल्यामुळे आणि
यादृच्छिकता सरसरून पुढे आल्यामुळे काहीही निष्कर्ष
काढता येणे शक्य नाही. असा निष्कर्ष काढायचा असेल तर
संहितेबरोबर सत्यालाही रचावे लागेल. सत्याची संहितात्मकता
आणि त्याचे रचलेपण अधोरेखित करत यशस्वी समारोपाची
अवस्था या कथेने निलंबित ठे वली आहे.
वस्तुतः कथेने तात्त्विक पातळीवर जाऊन सत्याच्या
स्वरूपाविषयी भूमिका मांडण्यास कुणाचीही हरकत असण्याचे
कारण नाही. पण तर्काच्या...रहस्यच्या या प्रवासात तिच्यातून
मांडला जाणारा रहस्यावगुंठित सत्यसंकोच जगाविषयीचे
कोणते भान व्यक्त करतो, त्याच्यामुळे जगण्याच्या
आकलनाचे कोणते पर्याय खुले राहतात, कोणत्या प्रणालींचे
आणि भूमिकांचे प्रतिपादन शक्य होते यांचा अंदाज घेणे
आवश्यक ठरते.
कथेच्या तत्त्वज्ञानात्मक, विशेषतः आधिभौतिक पातळीवर
जाण्याचा परिणाम तिच्यातील जगाच्या स्वरूपावरही होतो. ते
विशिष्ट काळातील, विशिष्ट ऐतिहासिक अवस्थेतील जग
राहत नाही. त्याचे सर्वसाधारणीकरण होते. त्याला असलेले
भौतिक संदर्भ अर्थपूर्णता व अपरिहार्यता घालवून बसतात.
प्रत्यक्ष जगाच्या संदर्भाचे विसर्जन होते आणि आधिभौतिक
सूत् रे मांडण्यासाठी आवश्यक असलेले एक साधन एवढेच
महत्त्व जगाच्या चित्रणाला प्राप्त होते. उदाहरणार्थ, तर्काच्या...
रहस्यमध्ये बाबी डिचोलकर विशिष्ट सामाजिक परिस्थितीमध्ये
जगतो आहे. त्याची मुळे बहध ु ा कामगारवर्गामध्ये असावीत.
त्याचे एकत्र कुटुंब आहे. जागा फारशी मोठी नाही. घर
बहध ु ा गिरणगावातले असावे. गिरण्या बंद पडल्यानंतरच्या
काळात बाबी जगत असावा. आजूबाजूला जुन्या इमारती
पाडून नव्या गगनभेदी इमारती उभ्या राहत असाव्यात. डी.
46 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
विश्वनाथ मात्र साठीच्या दशकात अस्तित्वात होता, असे
म्हणता येते. त्याला किंवा बाबीला जाणवलेला रहस्यावगुंठित
सत्यसंकोच त्यांच्या सामाजिक परिस्थितीवर अवलंबन ू आहे
असे दाखवता येत नाही. सत्य यादृच्छिक असते हे
कळण्यासाठी आणि त्याचे चित्रण करण्यासाठी पात्रे
कामगारवर्गातच जन्माला घालावी लागतात, असे म्हणता
येणार नाही. त्यांना झालेला हा सत्यविषयक साक्षात्कार
त्यांच्या सामाजिक परिस्थितीचा परिपाक आहे, असेही म्हणता
येणार नाही. आधिभौतिकतेची पातळी आकर्षक असली तरी
ऐतिहासिक संदर्भाशी ती तडकपणे जोडता येत नाही.
तर्काच्या...रहस्य ही अत्यंत काळजीपूर्वक लिहिलेली
कथा आहे. तिच्या बंदिशीमध्ये पराकोटीचा नेमकेपणा आहे.
ती अत्यंत सूचकतेने तिला जे सांगायचे आहे ते सांगते.
एका बाजूने यशस्वी समारोपाची प्रयुक्ती वापरण्यास ती
नकार देते, तरीही ती खुली संहिता आहे असे म्हणता येत
नाही. जे सांगायचे आहे त्यापासून ही कथा रेसभरही ढळत
नाही. सत्याची यादृच्छिकता ती अत्यंत काटेकोरपणे व्यक्त
करते, अशी की जणू काय ती अंतिम सत्य सांगते आहे.
सत्याच्या संदिग्धतेच े सत्य सांगताना ती बारीकसारीक
तपशील अशा रीतीने पेरून ठे वते की अर्थ लावताना ते
योग्य वेळी उगवून यावेत. सत्यसंकोचाची ही भूमिका
तत्त्वज्ञानाच्या पातळीवरून विचार केला तर
उत्तरआधुनिकतावादाशी जोडता येते. रहस्यकथा या खास
आधुनिक म्हणता येईल अशा प्रकाराचे विरचन ही कथा का
करते हेही तिच्या उत्तरआधुनिकवादी पवित्र्यावरून स्पष्ट
होते. छटाकभर रात्र...पासून सुरू झालेली कथित
आंतरराष्ट्रीय कथेवर प्रभाव टाकणारी उत्तरआधुनिकवादी
जाणीव तर्काच्या...रहस्यमध्ये परिणत स्वरूपात उत्क्रांत
झाली आहे. त्यामुळेच तर एके काळी खालूनचा इतिहास
लिह ू पाहणारे जयंत पवार सत्यसंकोचाच्या रहस्यकथा लिह ू
लागले आहेत. या मार्गाने गेले की वास्तवाशी असलेले नाते
खंडित होते. इतिहासाची संकल्पना जवळ जवळ नष्ट होते.
किमान त्याचे रूपांतर संहितेमध्ये होते. सत्य भ्रमामध्ये
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 47
रूपांतरित होते. संघर्षाच्या शक्यता नाहीशा होतात.
तर्काच्या...रहस्यमधून प्रकट होणारा हा पैलू वरनभातलोन्चा
नि कोन नाय कोन्चामधील कथांचा महत्त्वाचा पैलू आहे.
३.
वर झालेल्या चर्चेच्या पार्श्व भूमीवर सर निघाले
सप्तपाताळाकडे ही कथा लक्षणीय मानावी लागते.
संहितात्मकतेला प्राधान्य आणि जगांची अनेकता या
उत्तरआधुनिक कल्पितकथेमध्ये विशेष प्रभावी असलेल्या
दोन प्रक्रियांनी या कथेचा रूपबंध घडविला आहे. तसे पाहिले
तर तर्काच्या...रहस्यमध्येही तीन वेगवेगळी जगे आहेत, हे
आपण पाहिले आहे. पण तेथल्या जगांचा कथक बाबी
डिचोलकरच्या मानसिक अवस्थेशी संबंध जोडता येतो.
त्याला छळणाऱ्या काही प्रश्नांनी तो प्रचंड अस्वस्थ झाला
आहे आणि रात्री झोपेत असताना अहम्चे नियंत्रण शिथिल
झाले की त्याने दमन केलेल्या गोष्टी स्वप्नात जाणिवेच्या
पातळीवर येतात आणि एक फँन्टॅस्टिक जगाला घडवतात,
अशा फ्रॉयडियन मनोविश्लेषणाच्या भाषेत त्याच्या
अस्वस्थपणाचे वर्तन करता येते. सर निघाले
सप्तपाताळाकडेच्या बाबतीत असे करता येत नाही. त्या
कथेप्रमाणे या कथेमध्ये पात्रकथक नाही, त्यामुळे कथकाच्या
मानसिक अस्वस्थतेतन ू जगाची निर्मिती होते असे मानणे
अवघड आहे. संवादाचा शोध घेणारे सर सप्तपाताळाकडे
निघाले असले तरी कथेतील संहितांचे पाताळ जग सरांनी
किंवा सरांमळ ु े निर्मिलेले आहे, असेही म्हणता येत नाही.
या कथेमध्ये परस्परांहनू भिन्न असलेली दोन जगे आहेत.
त्यातले एक जग आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या नेहमीच्या
जगासारखे आहे. त्याची रचना करताना त्याच्या अस्तित्वाचे
अनेक भौगोलिक तपशील वाचकांपर्यंत पोहोचतील याची
काळजी घेतली गेली आहे. या जगाचा भारत देशातील
महाराष्ट्र या प्रांतामधील बहध ु ा मुंबई या महानगराशी संबंध
असावा असे खात्रीलायक रीतीने सांगता येते. या जगात
महाविद्यालये आहेत. प्राध्यापक व प्राचार्य आहेत. मराठीत
लिहिणारे लेखक म्हणजे सर आहेत, त्यांना मिळू शकणारे
48 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
ज्ञानपीठ पारितोषिक आहे. सरांचे घर आहे, त्यांना कुटुंब
आहे. त्यांच्याशी संवाद साधणारे लोक आहेत. हे जग
शक्यतेच्या कोटीतील जग आहे.
या कथेतील दसरे ु जग अद्ताच्या
भु पातळीवरचे आहे.
आपल्याला पत्रे का मिळत नाहीत याचा शोध घेण्यासाठी
पोस्टऑफिसमध्ये गेलले ्या सरांना या जगाचा योगायोगाने
शोध लागतो. हे जग न पोहोचवल्या गेलले ्या पत्रांच्या
संहितांनी आकाराला आले आहे आणि ते फक्त संहितेमध्येच
अस्तित्वात असू शकणारे जग आहे. ते केवळ वेगळे नाही,
तर ते वरल्या जगाच्या खाली, एखाद्या विराट तळघरासारखे
असावे असे सुचवले गेले आहे. हे जग वरच्या, खऱ्याखुऱ्या
जगाचा काळाच्या आणि अवकाशाच्या पातळीवरचा विस्तार
नाही. या जगाच्या चित्रणामध्ये ज्ञानशास्त्रीय प्रश्नांना थोडेही
महत्त्व नाही. हे जग मला कसे कळते आहे, त्याचा अर्थ मी
कसा लावतो आहे, मी त्याचा भाग आहे काय असे प्रश्न
सरांना पडत नाहीत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. हे आधुनिकवादी
कल्पितकथेला सतावणारे प्रश्न होते. सरांनी हे जग आहे तसे
स्वीकारले आहे. त्याला प्रश्न विचारण्याची, त्याची चिकित्सा
करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाही. ते त्या जगाचे अस्तित्व
विनातक्रार स्वीकारतात आणि त्यात आकर्षिले जाउन
उत्तरोत्तर खोल जात राहतात.
या कथेच्या कथकाचे स्वरूप वैशिष्टय़पूर्ण आहे. कथेच्या
रचनाबंधामध्ये तो अत्यंत महत्त्वाचे कार्य बजावतो आहे. तो
सर्वसाक्षीच नव्हे तर सर्वज्ञ आहे. कथेतल्या पात्रांपेक्षा त्याला
अधिक कळते. त्याची सर्वांवर नजर आहे. पत्रसंहितांच्या
पाताळजगात सर काय करत आहेत यावर तो लक्ष ठे वन ू
आहे. इकडे वास्तव जगात प्रकाशक, प्राचार्य, पंडित, बाई
काय करताहेत, गृहमंत्री काय निर्णय घेताहेत हेही तो समजून
घेतो आहे. त्याच्याजवळ स्वतःची अशी मूल्यव्यवस्था आहे.
तिच्या उपलब्धतेमळ ु े कथेतील काही घटनांविषयी तो तिरकस
सूर लावू शकतो. त्याचा अधिकार मात्र कुणाच्याही
प्रश्नांपलीकडचा आहे. या दोन जगांविषयी त्याच्या मनात
कोठलेही प्रश्न नाहीत, कोठल्याही शंका नाहीत. या
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 49
अधिकारामुळे, या सर्वज्ञतेमळु े त्याच्यापुढचे प्रश्न ज्ञानशास्त्रीय
नाहीत. तो या दोन जगांची सत्ताशास्त्रीय मांडणी करतो आहे.
या दोन्ही जगांचे सत्ताशास्त्रीय स्वरूप, त्यांच्यातील
परस्परसंबंध, त्यांचे अस्तित्व त्याच्यासाठी विवेचनाचा विषय
आहे. कल्पितकथेच्या रचनेमध्ये जगाच्या सत्ताशास्त्रीय
स्वरूपाला महत्त्व देणे ही खास उत्तरआधुनिक प्रवृत्ती मानली
जाते, हे येथे आवर्जून सांगणे गरजेच े आहे.
कथेचा कथक आलटूनपालटून वरच्या आणि खालच्या
दोन्ही जगात वावरतो आहे. दोन्हींकडे काय घडते आहे याचे
कथन करतो आहे. पात्रांच्या मनात डोकावतो आहे. त्यांना
काय जाणवते आहे, ती काय विचार करत आहेत, ती
कोणत्या कृती करत आहेत यांचे तपशील सांगतो आहे. ही
प्रक्रिया पार पाडत असताना कथेची आशयसूत्हरे ी उलगडतो
आहे. येथे दोन्ही जगांमधला भेद महत्त्वाचा ठरतो. या
जगांमध्ये परस्परविरोधांचा संबंध आहे, असे म्हणता येते.
आपल्याला चिरपरिचित असलेले वरचे जग हे व्यवस्थेच्या
स्वरूपाचे, व्यवस्थेने रचलेले आणि व्यवस्थेने नियंत्रित केलेले
जग आहे.म्हटले तर हे घडण्याचे, जोडण्याचे, निर्मितीचे जग
आहे. हे खरोखर असणारे, नकाशात दिसणारे, फक्त भाषाच
नव्हे तर भूगोल व इतिहासही असणारे जग आहे. हे सरांच्या
आणि तुमच्याआमच्या सवयीचे जग आहे. भूगोल
इतिहासाबरोबरच माणसामाणसांमध्ये असणारे हितसंबंध या
जगाच्या मुळाशी असतात. या जगात एकटय़ाला जगता येत
नाही. या जगात सरांना इतरांशी संवाद साधता येतो, वाद
घालता येतात, विचार पटवता येतात. तथापि, सरांचा हा
एकूण संवाद म्हणजे आत्मतुष्टीसाठी योजनापूर्वक रचलेला
व्यूह आहे, एक प्रकारची प्रतिष्ठा उंचावत नेण्याची रणनीती
आहे, हे कथकाने सांगितलेल्या त्याविषयीच्या तपशिलातून
लक्षात येते. त्यांत सरळपणा नाही. डावपेचांपलीकडचे
निर्व्याज माणूसपण नाही. संवाद साधण्याची सरांची ही कृती
वरवरची आहे, आत्मवंचनेची आहे. प्रतिष्ठा प्राप्त करून
देणारी आहे. संवाद साधण्याच्या या कृतीमधील अंतर्विरोध
सरांच्या लक्षात आलेला नाही. जगण्याच्या अधःस्तरावर
50 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
वावरणाऱ्या मूलभूत आशयसूत्रांकडे या संवादामुळे आपण
आपोआप दर्लक्ष ु करत आहोत, हे सरांच्या लक्षात आलेले
नाही. सरांचे या जगातील यशस्वी जगणे पृष्ठस्तरीय
संवादाच्या या कृतींवर आधारलेले आहे. त्यांच्या संदर्भातच
सरांचे आणि सर वावरत आहेत त्या जगाचे असणे अर्थपूर्ण
ठरते. त्यांत व्यवस्थेशी केलेल्या संगनमतातून निर्माण होणारी
देवाणघेवाण आहे. थोडक्यात, सर, सरांचे जगणे, सरांचे
संवाद साधणे, सरांचे प्रतिभावंत असणे, सरांनी लिहिणे,
सरांना वाचक व अनुयायी लाभणे, त्यांना ज्ञानपीठ पारितोषिक
मिळणे या साऱ्या गोष्टी व्यवस्थेने व्यवस्थेसाठी निर्माण
केलेल्या आहेत. म्हणूनच बाहेरच्या माणसांशी संपर्क तुटताच
सर एकाकी होतात. अस्वस्थ होतात.मात्र, सरांनी मूलभूत
एकाकीपणा अनुभवलेला नाही. सरांनी व्यवस्थेची दमनप्रक्रिया
अनुभवलेली नाही. सर आतापर्यंत चौकटीतला व्यवस्थामान्य
सर्जनशील व्यवहार करत आले आहेत. या व्यवहाराखाली
दडपलेली विनाशाची सूत् रे त्यांना अपरिचित आहेत.
जगण्याच्या मुळाशी असलेल्या मृत्यूचे भान त्यांना आलेले
नाही.
सर योगायोगाने पोहोचतात त्या अधोविश्वाचे वरच्या
जगाशी असलेले संबंध पाहणे अगत्याचे आहे. या संबंधांमधून
इतिहास, सत्य, विवेक, संघर्ष इत्यादिकांना स्पर्श करणारी
आशयसूत् रे कथेमध्ये घुसली आहेत. त्यामुळेच ही कथा
तात्त्विक दृष्टिकोणातून भ्रमाचे उपपादन करत नाही. हे जग
संहितांनी आकाराला आलेले आहे, हे खरे आहे. सरांनी ते
हेतपु र्व
ू क, निश्चित उपक्रम आखून शोधलेले नाही, ते त्यांना
योगायोगाने सापडते ही गोष्टही खरी आहे आणि ती या
जगाच्या स्वरूपाच्या संदर्भात विशेष अर्थपूर्ण आहे. या जगात
हेतपु र्व
ू क केलेल्या कृतीला, मानवी अभिकर्तृत्वाला थोडेही
मूल्य नाही. त्यामुळे त्यात काहीही नवे निर्माण होत नाही. हे
जग न पोहोचवल्या गेलले ्या पत्रांनी आकाराला आलेले
आहे. न पोहोचलेली पत्रे म्हणजे मानवी संबंध, हेत,ू
भावभावना, आविष्कार, इच्छा, वासना यांचा विनाश होय. न
पोहोचलेली पत्रे म्हणजे असफल कृती, जोडून घेण्यात
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 51
आलेले अपयश होय. या पत्रांना अभिप्रेत असलेल्या
ग्रहणकर्त्यापर्यंत पोहोचता येत नाही. संवादाचे वर्तूळ पूर्ण
होत नसल्यामुळे पत्रामागील सर्व हेतू अर्थशून्य ठरतात. ती
पाठवणारी आणि ज्यांना ती पोहोचायची ती माणसे एकाकी
होतात. त्यांना हवा तेथे, हवा तसा, हवा त्याच्याशी संपर्क
साधता येत नाही. एकाकीपणाचे हे आशयसूत्र व्यक्तीला
कें द्रस्थानी ठे वणारे आहे आणि त्याचा आधुनिकतेशी व
आधुनिकवादाशी संबंध आहे. सर निघाले...ने या
आशयसूत्राला स्थलांतरित केले आहे. एकाकीपणाऐवजी
दोन्ही जगांच्या स्वरूपांवर आणि त्यांच्यातील संबंधांवर ही
कथा भर देते. ही खेळी खेळन ू या कथेने वरच्या जगातील
व्यवस्थेने केलेल्या दमनाचे आणि खालच्या जगातील
विनाशप्रक्रियेच,े अशा दोन महत्त्वाच्या आशयसूत्रांना कथेत
प्रवेश दिला आहे.
पोस्टमन विशिष्ट पत्त्यावर पत्र घेऊन गेला. दिलेल्या
पत्त्यावर ग्रहणकर्ता उपस्थित आहे. पोस्टमन त्याला पत्र देतो.
पाठवणाऱ्याचे हेतू ग्रहणकर्त्यापर्यंत पोहोचतात. ते
पोहोचवण्याचे काम करण्यासाठी व्यवस्था अस्तित्वात
आलेली असते. या उदाहरणात ती तिचे कार्य नेमकेप्रमाणे
करते. पोस्टमन पत्र घेऊन गेल्यावर दिलेल्या पत्त्यावर
ग्रहणकर्ता उपस्थित नाही, असे आढळून येते. पोस्टमन ते
पत्र घेऊन परत येतो. ते पत्र काही काळ परागंदा ग्रहणकर्त्याची
वाट पाहत पोस्टऑफिसमध्ये पडून राहते. तो येत नाही असे
आढळून आल्यावर ते मृत पत्र ठरते. अशी मृत पत्रे वर्षसहा
महिन्यांनी नष्ट करून टाकली जातात. त्या पत्रांबरोबर
त्यांच्यातून व्यक्त झालेल्या भावना व संवादाच्या इच्छाही
नष्ट केल्या जातात. येथेही व्यवस्था तिचे कार्य नीट बजावते
आहे, पण त्यामुळे संवादाचे वर्तूळ खंडित होते.
संवादप्रक्रियेतील दोन्ही टोकांमध्ये संबंधच प्रस्थापित होत
नाहीत. ती एकाकीच राहतात. सर निघाले...मध्ये असे
होत नाही. येथील व्यवस्था वरील उदाहरणांत आहे त्याप्रमाणे
कार्यक्षम नाही. तिला गळती लागली आहे. व्यवस्थेच्या पोटी
असलेल्या माणसांविषयीच्या, त्यांच्या संवादाविषयीच्या
52 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
अनास्थेमुळे पत्रे पोहोचवण्याचे बरेचसे काम थांबले आहे.
येथे ग्रहणकर्ते त्यांच्या पत्त्यावर उपस्थित आहेत, पण त्यांना
इतरांशी जोडण्याचे काम करणे व्यवस्थेने नाकारले आहे.
दमनकारक व्यवस्थेचे प्रतीक म्हणून येथे पोस्ट ऑफिस
अवतरते आहे. हे दमनही फार जाणीवपूर्वक नव्हे तर
नाइलाजाने घडते आहे. व्यवस्थेतील कोणा किंवा काही
घटकांचा दोष म्हणून ही दमनप्रक्रिया अवतरत नाही. ती
व्यवस्थेच्या मूलभूत स्वरूपाशी निगडित आहे. जग
चालवण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्या व्यवस्थेकडून हे
अपरिहार्यपणे घडते आहे. निर्मितीच्या व्यवहारातून निर्माण
झालेले अतिरिक्त उत्पादन म्हणून येथे विनाशाची निर्मिती
होते आहे.
सर निघाले...मधील दोन जगांमध्ये परस्परविरोधाचे
नाते वरील विवेचनावरून सहज स्पष्ट व्हावे. कथेच्या
दृष्टिकोणातून हे नाते अत्यंत महत्त्वाचे आहेत. वरचे आणि
खालचे या शब्दांनाही त्यामुळे विशिष्ट अर्थ प्राप्त होतो. वरचे
जग अधिकृत आहे. प्रस्थापित आहे. समर्थ आहे. वरच्या
जगाने केलेल्या दमनातून खालचे जग निर्माण झाले आहे.
खालचे जग वरच्या जगाला विरचित करण्यासाठी अस्तित्वात
आले आहे. ही सतत एकमेकांशी संघर्ष करणारी जगे आहेत.
वरचे जग अनेक गोष्टींची रचना करते पण त्यांच्या पायात
अनेक हेतंन ू ा चिणून मारते. व्यवस्थेत यशस्वीपणे बसणाऱ्यांना
वरच्या जगात महत्त्वाचे स्थान मिळते आणि ज्यांना मिळत
नाही त्यांना विनाशाच्या विस्मृतीच्या अधोविश्वात ढकलले
जाते. तेथे त्यांच्या कुजण्याची, विनाशाची प्रक्रिया सुरू होते.
तिच्यामध्ये वरच्या जगाला नष्ट करण्याचे, त्याला विस्थापित
करण्याचे सामर्थ्य असते. कथेमध्ये कथकाने अत्यंत काव्यमय
भाषेत या प्रक्रियेच े स्वरूप स्पष्ट केले आहे. तो म्हणतो, ‘हे
सरपटणारे अनंत प्राणी कृमी कीटक अदृश्य अमीबा. यांच्या
वेदनांवर आनंदावर आक्रोश आणि उन्मादांवर उभं आहे
वरचं जग. स्वतःच्या मस्तीत धुंदीत जगणाऱ्यांना कल्पनाही
नाहीआपल्या इमारतीच्या पायात दाबून भरलेल्या रेतीमाती
सिमेंट वाळू चिखल पाण्याची. त्यांना ठाऊकही नसतं त्यातून
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 53
अगणित सूक्ष्म जीव चिवटपणे वर सरकत असतात आणि
पायांखाली अनंत छिद्रांची जाळी तयार करतात’(पवार,
२०१५, पृ. ५४).सामाजिक स्वरूपाच्या संघर्षाचे विराट
चित्र ही कथा समोर उभी करते. एकूणच, मानवी संस्कृ तीवरचे
हे तिखट भाष्य आहे. तिचे स्वरूप दहेु री आहे. तिचा वरचा
स्तर प्रस्थापित प्रतिष्ठेने आकाराला आला आहे, तर खालचा
स्तर दमनातून आकाराला आलेला आहे. मानवी कृतीच्या
तळाशी असलेल्या हिंसकतेने तो आकाराला आलेला आहे.
वरच्या आणि खालच्या जगातील संबंधांनी या कथेच्या
भाषिक घडणीवरही खोलवर परिणाम केला आहे. भाषेचा
संज्ञापनाचा मूलभूत हेतपू ढु े प्रश्नचिन्हे उभी करणारी ही कथा
वेगवेगळ्या संभाषितांचा विस्तीर्ण पट कथेमधून निर्माण करते
व या संभाषितांना वरच्या व खालच्या जगाचे संदर्भ देते.
एक रणनीती म्हणून सरांनी खरे तर आयुष्यभर संवाद
साधला आहे. आता ते न साधलेल्या संवादाला सामोरे चालले
आहेत. माणसांच्या संबंधांचे जग सोडून ते विनाशाने
आकाराला आलेल्या भूमिगत जगात येऊन पोहोचले आहेत.
पण तिथेही साध्यासुध्या माणसांनी साधू पाहिलेल्या संवादांतन ू
लिहिली गेलल े ी पत्रे आहेत. सर ख्यातनाम कादंबरीकार
आहेत. त्यांचे भाषिक उपयोजन अर्थातच साहित्यिक शैलीला
अनुसरणारे, दैनंदिन भाषेपक्षा े वरच्या पातळीवर ती आहे या
भूमिकेला अनुसरणारे असणार. येथे त्यांना भेटलेली पत्रे
साहित्यगुणांनी मंडित असलेल्या भाषेत लिहिली गेलल े ी
नाहीत. ती साध्यासुध्या भाषेत, संबंधांनी घडवलेल्या भाषेत,
बोलीचे बळ वापरत, शुद्धाशुद्धांच्या संकेतांपलीकडे जात,
दैनंदिन जीवनव्यवहाराच्या धबडग्याला सामोरी जात
लिहिलेली आहेत. सरांना ती अंतर्मुख करतात. त्यांच्या
मनात बालपणापासून दडून बसलेल्या मृत्यूच्या आशयसूत्राला
स्पर्श करतात. खालच्या जगाला वेढन ू असणारे सूत्र मृत्यूचेच
आहे. विनाशाचेच आहे. केवळ पत्रेच नव्हे, तर ते संपूर्ण जग
विनाशाला सामोरे चालले आहे.
या कथेतील दोन जगांमधील परस्परसंबंधांमध्ये अशा
प्रकारे सामाजिक संघर्षाची आशयसूत् रे दडलेली आहेत. वरचे
54 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
जग आणि खालचे जग यांच्यातील संबंध सामाजिक
स्तरीकरणाच्या व्यवस्थेकडे सूचकतेने अंगलिनिर्दे
ु श करीत
आहेत, असे म्हणता येते. वरचे प्रतिष्ठित, समृद्ध, भव्य असे
जग हे खालच्या जगाच्या आधारावर उभे आहे. दमन केलेले
हे जग कधी ना कधी, किंवा बघता बघता तरारून वर
येईलआणि वरची विनाशकारी संस्कृ ती गाडली जाईल, अशी
एक शक्यताही कथेत सुचवली गेली आहे. पण हे सारे खूप
गूढ आहे. खूप काव्यमय आहे. या जादईू वास्तवाचा प्रत्यक्ष
वास्तवाशी संबंध जोडताना अनेक अडचणी येत राहतात
आणि तळाशी असलेले अद्तभु जग स्वयंभू होत राहते.
सुरुवातीला संवादाच्या दमनाचे सूत्र असलेले हे अधोविश्व
कसर उं दीर वगैरेंच्या मार्फ त विनाशाच्या संकल्पनेजवळ का
पोहोचते हे कळत नाही. शिवाय दमनाच्या कल्पनेमध्ये
वरच्या जगाचा जसा संबंध दाखवता येतो तसा कसर आणि
उं दीर यांच्या विनाशकारी कृतींशी दाखवता येत नाही. हे
अधोविश्व आत्मविनाशी आहे. वरचे जगही विनाशकारी
आहे. थोडक्यात, दोन्ही जगे विनाशकारीच आहेत.
याचा एक अर्थ असा होतो की कथेमधून आदिम
विनाशाची, मृत्यूची सर्व मानवी संस्कृ तींना व्यापणारी
जगड्व्याळ कल्पना उभी राहत असली तरी ती तात्त्विक
पातळीवर राहावी एवढी सर्वसाधारण व म्हणून संदिग्ध आहे.
तिला ऐतिहासिक संदर्भ नाही. इतिहासाच्या वाटचालीची
दिशा नाही. तिच्यात कुठल्याही प्रकारची प्रत्यक्षाच्या संदर्भाने
येऊ शकणारी निश्चितता नाही. ही शतकोटी जाणिवांची
पाताळभैरवी की आदिम प्रेरणांचे नवे सर्ग असा प्रश्न सरांच्या
मनासमोर उभा आहे. शतकोटी जाणिवांच्या पाताळभैरवीला
सामाजिक संघर्षाचा संदर्भ असावा, तर आदिम प्रेरणांचे नवे
सर्ग इतिहासातीत पुनरावृत्तीचा निर्देश करत असावेत. या
पुनरावृत्तीला अनुसरतच ‘बघता बघता वरचं सारं गाडलं
जाईल जमिनीच्या खाली आणि खालचं हे हे विशाल जग
तरारून वर येईल. विनाशकारी संस्कृ त्या अशाच गाडल्या
जातात पृथ्वीच्या पोटातील उलथापालथीत आणि नव्या
उगवतात किंवा जुन्याच नव्याने उगवतात (तत्रैव, पृ. ५४)’
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 55
असे सरांना वाटते, तेव्हा त्यांच्या मुखातून चक्रनेमिक्रमाचे
गतानुगतिक तत्त्वज्ञान सांगितले जात असते. सरांना असे
वाटते तेव्हा इतरत्र तिरकस सूर लावणारा कथेचा कथक
कथनातील आपला सहभाग जवळपास पूर्णपणे काढून घेतो
आणि कथनाच्या कें द्रस्थानी अधिकृत भूमिका म्हणून सरांच्या
जाणिवेला आणतो, ही गोष्टही महत्त्वाची मानावी लागते.
कथेतील अद्तभु जादसदृश ू वातावरणामुळे ती आकर्षक
वाटते ही गोष्ट खरी आहे, तरी कथेच्या या अंगामुळेच तिचा
वर्तमानाशी व इतिहासाशी असलेला संबंध बाधित झाला
आहे. ती जणू काय कालातीत असलेल्या आशयसूत्रांविषयी
इतिहासापलीकडे उभी राहनू बोलते आहे.फिनिक्सच्या
राखेतनू उठला मोर या संग्रहातील बहतु ेक कथांना व्यापून
असणारे विशिष्ट ऐतिहासिक परिस्थितीचे सूत्र तर्काच्या…
रहस्यप्रमाणेच या कथेमधूनही निसटले आहे.
४.
अगदी पहिल्या कथासंग्रहापासून जयंत पवार यांच्या
कथेतील कथक हा घटक विशेष प्रभावी आहे. त्याचे
अस्तित्व, त्याची अशी मूल्यव्यवस्था, त्याला असलेली
कथनाच्या जबाबदारीची जाणीव, त्याची नैतिकता, त्याचा
जगाकडे आणि इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोण या सर्व
गोष्टींना पवारांच्या कथेत महत्त्वाचे स्थान असते.
फिनिक्सच्याराखेतनू ...या पहिल्या कथासंग्रहामध्ये कथेतील
जग आणि कथकाचा व्यवहार या दोन गोष्टी तुल्यबल
आहेत, असे म्हणता येते. तिथे कथक वाचकाच्या फारसे
डोळ्यावर येणार नाही अशा पद्धतीने आपले कामकाज
चालवतो आणि असे असूनही आपल्या दृष्टीचे विशेष
वाचकाच्या नजरेस आणतो. उदाहरणादाखल, या संग्रहामधील
कथांच्या कथकाला श्रमिकांविषयी ममत्व आहे. शोषणाविषयी
तो असंतुष्ट आहे. त्याला मानवी मूल्यांची चाड आहे. पण हे
सर्व तो प्रकटपणे सांगत नाही. हे सांगण्यासाठी त्याला कथेच े
कथन या आपल्या प्रमुख कामापेक्षा इतर उपक्रम रचावे
लागत नाहीत. मागे स्पष्ट केल्याप्रमाणे या संग्रहातील
कथकाला संहितानिर्मितीत रस आहे, तथापि, शेवटी कथन ही
56 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
प्रामुख्याने संहितानिर्मितीच असल्यामुळे ते खास कथकाचेच
क्षेत्र आहे आणि तो कथेतील घटनांना उठाव यावा म्हणून
संहितानिर्मितीमध्ये अनुस्यूत असलेली विविध संभाषिते वापरू
पाहत आहे, असे स्पष्टीकरण करता येते.
असे असले तरीही अगदी प्रारं भापासून पवारांची कथा
कथकाच्या व्यवहाराकडे आणि स्वरूपाकडे कथेतील एक
महत्त्वाचे सत्ताकें द्र म्हणून पाहते यात शंका नाही. दोन
अपवाद वगळता फिनिक्सच्या राखेतन ू मधल्या इतर कथा
कथाबाह्य सर्वसाक्षी कथकाने कथन केलेल्या आहेत. दोन
अपवादांपक ै ीछटाकभर रात्र...या कथेची आपण वर चर्चा
केली आहे. तिचा कथक एक लेखक आहे आणि त्याच्यामागेही
सर्वज्ञ असा आणखी एक कथक दडून बसला आहे. ही कथा
कोणी लिहिली आहे, ती लिहिणारा लेखक कोण होता, त्याचे
काय झाले, ही कथा का छापली गेली नाही या सर्व गोष्टी
त्याला माहीत आहेत. त्याचे अस्तित्व कथेत जाणवत नसले
तरी तिच्या सीमारेषेवर असलेली तळटीप या दसऱ्या ु कथकाने
लिहनू , कथेच्या सादरीकरणाचे अंतिम श्रेय आपल्याकडे
घेतले आहे. थोडक्यात, वरकरणी कथांतर्गत पात्रकथक
कथन करतो आहे असे चित्र उभी करणारी ही कथा कथाबाह्य
सर्वसमर्थ सर्वसाक्षी कथकाला शरण गेली आहे. याच
संग्रहामधील दसरा ु अपवाद जन्म एक व्याधी ही कथा आहे.
ती कथांतर्गत पात्रकथकाने कथन केलेली कथा आहे असे
वरकरणी दिसते. पण हा पात्रकथक आपल्या आयुष्यात
काही वर्षांपर्वी
ू घडून गेलले ्या आपल्या बालपणातील घटनांचे
सादरीकरण करू पाहतो आहे. घटनांच्या तत्कालीन
घडामोडींपासून तो दरू आलेला आहे. उघडपणे सर्वसाक्षी
कथाबाह्य कथक आणि पात्रकथक दिसणारा पण घटनांपासून
दरू आलेला कथक यांमध्ये तसे पाहिले तर तत्त्वतः विशेष
भेद उरत नाही.
वरनभातलोन्चा...मधल्या सर्व कथांचे कथन अशाच
कथाबाह्य सर्वसाक्षी कथकाने केले आहे, असे म्हणता येते.
या संग्रहातील काही कथांमध्ये कथांतर्गत पात्रकथक कथनाचे
कार्य करतो आहे, असा संशय घेता येतो. उदाहरणार्थ,
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 57
आपण अगोदर परामर्श घेतलेली तर्काच्या...रहस्य या
कथेचा कथक बाबी डिचोलकर आहे, पात्रकथक आहे असे
प्रथमदर्शनी वाटते. पात्रकथकाचा महत्त्वाचा विशेष हा की
त्याच्या दृष्टिकोणाला, त्याच्या आकलनाला आणि त्याच्या
कथनाला विशिष्ट पात्राशी निगडित अशा मर्यादा असतात.
त्याला सगळे कळत नाही. अनेक ठिकाणी त्याला पोहोचताच
येत नाही. तो जिथे असेल तिथेच काय घडते आहे हे तो
सांगू शकतो. त्याचे म्हणणे संशयास्पद वाटण्यास पात्र असते.
हा खरे तर आधुनिक कथक आहे. पात्रकथकाचे हे विशेष
तर्काच्या...रहस्यमधल्या कथकामध्ये आहेत असे दिसत
नाही. पात्रे आपापल्या कथा सांगतात, रहस्यकथेची संहिता
माहिती पुरवते अशा प्रयुक्त्या योजून बाबी डिचोलकरला
असलेल्या मर्यादा जमेल तेवढय़ा ताणण्यात आल्या आहेत.
त्यामुळे बाबी डिचोलकरच्या कथनामध्ये कथाबाह्य सर्वसाक्षी
कथकाचे गुण आले आहेत. एरव्ही, रायबहादरू आणि
राधाकिशन यांचे एकांतात काय चाले, राधाकिशन कसा
एकांतात रडत बसे, रायबहादरू शेठजींना यामिनी सरकार
कोवळी मुलं कशी पुरवत असे या सर्व गोष्टींचे कथन खास
सर्वसाक्षी कथाबाह्य कथकाप्रमाणे बाबीने केले नसते. तुझीच
सेवा करू काय जाणे या कथेचा कथकही म्हटले तर
पात्रकथक आहे. त्या कथेचा कथक कालपुरुष आहे.
कालपुरुषच तो! ईश्वराचे विराट स्वरूप! त्याला सर्व काही
समजते आणि दिसते. त्यामुळे कथेच्या सुरुवातीला आणि
शेवटी आपण कालपुरुष बोलतो आहोत असे सोंग तो आणत
असला तरी त्याचे खरे स्वरूप कथाबाह्य सर्वसाक्षी कथकाचेच
आहे यात शंका नाही.कथाबाह्य सर्वसाक्षी कथक हा खरे तर
पारं परिक कथक आहे. समग्र समाजाच्या आकलनाच्या
सीमारेषा आखणाऱ्या परं परेचे तो अधिकृत प्रतिनिधित्व करत
असतो. कथकाचा हा पवित्रा बदलला की कथनाची परं परेशी
भांडणे सुरू होतात. निदान या पातळीवर तरी पवारांच्या
कथेला परं परेशी भांडण उकरून काढायचे नाही असे दिसते.
या कथकाच्या हाती खूप अधिकार सोपवलेले असतात.
त्याच्या सामर्थ्याला मर्यादा नसतात. त्याला सर्व दिसते. सर्व
58 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
कळते. तो कुठे ही जाऊ शकतो. कोणाच्याही मनात उतरू
शकतो. कथेच्या अवकाशातील प्रत्येक तुकडा त्याला ज्ञात
असतो. त्याची भाषा ही अधिकाराची भाषा असते. ती जगाचे
विशिष्ट असणे आतूनबाहेरून प्रमाणित करत असते. या
भाषेविषयी शंका घेता येत नाहीत. त्याच्यावर विश्वास
ठे वतच कथनाचे वाचन शक्य असते. गंमतीची गोष्ट अशी
की या सर्व गोष्टी तो त्याचे अस्तित्व उघडपणे कोणाच्या
लक्षात येणार नाही अशा रीतीने करत असतो. थोडक्यात,
कथेच्या अर्थाच्या अनागोंदीवर नियंत्रण ठे वण्याचे कार्य असा
कथक करत असतो. तो विशेष प्रभावी असेल तर कथेमध्ये
अनेकार्थता, खुलपे णा, भूमिकांचा संघर्ष, तुल्यबलांचा संवाद
या गोष्टी प्रवेश करणे अवघड ठरते. पवारांच्या कथेमध्येही
कथेला संशयास्पद न करणारा ठामपणा आणि रूपाशी
निगडित असलेला गोळीबंदपणा आलेला आहे याचे एक
महत्त्वाचे कारण त्यांचा हा कथक आहे.
पारं परिक कथाबाह्य कथकावर पवारांच्या कथेने भर
दिलेला असला तरी अनेक अपारं परिक गोष्टी त्यांनी कथेच्या
परिघात आणल्या आहेत. त्यांतील सर्वांत महत्त्वाची गोष्ट
म्हणजे कथेची स्वसंदर्भयुक्तता होय.स्वसंदर्भयुक्तता म्हणजे
काय या विषयावरचे विवेचन मी अनेकदा केले आहे.
स्वसंदर्भयुक्ततेच्या सैद्धान्तिक तपशिलाला पुन्हा एकदा
पुसटचा स्पर्श करण्यास हरकत नसावी. कल्पितकथा जेव्हा
स्वतःच्याच प्रेमात पडू लागते तेव्हा ती स्वसंदर्भयुक्त होते.
भोवतालच्या खऱ्या किंवा कल्पित जगावरची नजर हटवून
ती स्वतःच्या रचनाविशेषांवर आणि रचलेले असण्यावर
भाष्य करू लागते तेव्हा ती स्वसंदर्भयुक्त होते. अशा वेळी
ती कथेवरची कथा होते. कादंबरीवरची कादंबरी होते.
स्वसंदर्भयुक्तता अर्थातच कल्पितकथेच्या संरचनेबाबत
प्रस्तुत ठरते. कथेच्या आशयाच्या आणि आकृतिबंधाच्या
काही नव्या शक्यता तिच्यातून सुचवल्या जातात. तथापि,
स्वसंदर्भयुक्तता म्हणजे कोणीही वापरण्यास खुला असलेले
केवळ विशिष्ट प्रयुक्तींचा समूह नव्हे. १९६०नंतरच्या
कालखंडात स्वसंदर्भयुक्ततेबरोबर जगाकडे पाहण्याची
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 59
विशिष्ट दृष्टीही येते. ती झटकून टाकता येत नाही.
स्वसंदर्भयुक्ततेच्या प्रवेशाबरोबर वाचकासमोर जे सादर
होते आहे ते खरे नसून ती रचून सांगितलेली गोष्ट आहे, हे
स्पष्ट होते. ही एक अशी खेळी आहे की ज्यामुळे लेखक/
कथक यांच्या जगाकडे जाऊ इच्छिणाऱ्या दृष्टीचा मंडलसंक्षेप
होतो आणि जगाच्या ऐतिहासिक व्यवहारांऐवजी कल्पितकथेचा
संकेतव्यूह हाच तिचा विषय ठरतो. या खेळीमुळे जगाचे
वस्तुनिष्ठ अस्तित्व लोपते. लेखक/कथकाच्या दृष्टीचा
मंडलसंक्षेप होतो कारण ती जाऊ पाहते ते वस्तुनिष्ठ जग
मुदलात अस्तित्वातच नसते असा एक अर्थही लावता येतो.
मग लेखक/कथकाजवळ काय शिल्लक उरते? त्याच्याजवळ
फक्त भाषा आणि भाषेची हाताळणी शिल्लक राहते. कथनाचा
संकेतव्यूह शिल्लक राहतो. पात्रे शिल्लक राहतात, पण
माणसे शिल्लक राहत नाहीत. ही भूमिका भाषा रचण्याशिवाय
किंवा भाषेकडून रचले जाण्याशिवाय माणसाकडे दसरे ु काही
पर्याय नसतात, असे सुचवते. कथेचा वास्तवाच्या
प्रतिरूपणाशी असलेला संबंध स्वसंदर्भयुक्ततेमळ ु े तुटतो.
जगाचे वास्तवात असणे बाधित करणारी ही दृष्टी आहे.
मानवी व्यक्ती, तिची अस्मिता, ती ज्यात वावरत असते ते
जग ही केवळ विशिष्ट संकेतांवर आधारलेली संरचिते आहेत
असे या दृष्टीमधून सुचवले जाते. उत्पादनाचे संबंध,
समाजातील वर्गविग्रह, सामाजिक न्याय, सामाजिक
परिवर्तनाचे प्रयत्न, समाजाची ऐतिहासिक गतिशीलता या
गोष्टी ज्यांना महत्त्वाच्या वाटतात, त्यांच्यासाठी स्वसंदर्भयुक्तता
हा एक मोठा चकवा ठरण्याची शक्यता असते, कारण या
सर्व वास्तवाचे रूपांतर स्वसंदर्भयुक्ततेमळ ु े केवळ
कल्पितकथेच्या संकेतव्यूहामध्ये होत असते. म्हणूनच
२०१२ साली वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा! ही
कथा प्रथम मुक्त शब्दमधून प्रकाशित झाली तेव्हा जयंत
पवार यांच्याशी झालेल्या ई-संवादात मी स्वसंदर्भयुक्तता
किंवा अधिकथनात्मता यांचा उल्लेख केला होता. मी तेव्हा
म्हटले होते, ‘एक भाग सतत खटकत राहिला. मी ज्याला
स्वसंदर्भयुक्तता म्हणतो ती प्रयुक्ती, गोष्ट गोष्ट असल्याचे
60 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
भान इतक्या सुस्पष्टपणे आले नसते, तर बरे झाले असते.
विशिष्ट प्रयुक्तीमागे काही कल्पनाप्रणाली दडलेल्या असतात.
तुमच्या कथेला या प्रयुक्तीची गरज होती असे वाटत नाही.
गोष्टीचा गोष्टपणा उघडा न पाडताही निवेदकाच्या संभाषिताचे
रं ग बदलत अधिक तरलतेने तुम्हाला हवे असलेले परिणाम
साधता आले असते असे मला वाटते’. पुढे मी हेही म्हटले
होते की ‘स्वसंदर्भयुक्ततेमळु े म्हणजे हे खरे नाही तर एक
कल्पित गोष्ट आहे हे सांगितल्यामुळे तुमच्या कथेचा
वास्तवाशी असलेला संबंध बाधित होतो...तुमच्या कथेतील
अनुभव जे सांगितले जातेय ते वास्तव आहे, खरे आहे असे
सांगण्याची आकांक्षा धरणारा आहे. अधिकथनात्म किंवा
स्वसंदर्भयुक्ततेचा बाज या आकांक्षेशी विसंगत आहे असे
वाटते’ (मुक्त शब्द, जून २०१२, पृ.६६).
स्वसंदर्भयुक्ततेचा अधिकार वरनभातलोन्चा…मधील
अनेक कथांवर चालत असला तरी बाबलच्या आयुष्यातील
धादांत सत्य ही कथा त्याचे सुस्पष्ट उदाहरण आहे.या
कथेतील कथक कालपुरुषासारखा किंवा ईश्वराच्या विराट
रूपासारखाच आहे. मात्र त्याने येथे कथक/लेखकाचे रूप
धारण केले आहे.या कथक/लेखकाला केवळ सगळे कळते
आणि सगळे दिसते असे नाही, तर तो त्याहनू ही अधिक
सर्जनशील होत स्वातंत्र्य घेताना दिसतो. तो पाहिले ते सारे
सांगत नाही. आहे ते थोडे आणि नव्याने तयार करून
अधिकीचे, स्वनिर्मिती असेही जोडून देताना दिसतो. यात तसे
काही खास नाही, कारण सर्व लेखक हे करतच असतात.
वेगळे हे आहे की, हे आहे ते नाही, तर कल्पनेने जोडून
दिलेले आहे, हे लेखकीय सत्य त्याने दडवून ठे वलेले नाही.
जे आहे तेच सांगतो आहे हा वास्तववादी भ्रम जपण्याची
त्याला गरज वाटत नाही. आहे ते रचलेले आहे हे तो स्पष्ट
करतो. बाबलच्या आयुष्यातील धादांतसत्य... ही कथा
यामुळे स्वसंदर्भयुक्त झाली आहे.
बाबलच्या आयुष्यातील धादांत सत्य...या कथेमध्ये
दोन कथक आहेत. त्यांतील एक कथक बाबलच्या
चरित्रकथेचा कथाबाह्य सर्वसाक्षी कथक आहे. या कथकाने
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 61
केलेल्या कथनातून या कथेचा एक भाग आकाराला आला
आहे. तो नेहमीच्या सर्वसाधारण उभ्या ठशात छापलेला
आहे. बाबलच्या आयुष्यात जे घडले ते नव्हे, तर बाबलच्या
आयुष्यातील काही घटनांवर संस्कार करून लिहिली गेलल े ी
ही कथा आहे. या भागामध्ये कथेचा संकेतव्यूह उघडी
पाडणारी स्वसंदर्भयुक्तता किंचितशीही आढळून येत नाही.
वास्तववादी कथनशैलीत सांगितली गेलल े ी ही एक कथा
आहे. तथापि, या निरुपद्रवी वाटणाऱ्या भागात असे काही
तरी आहे की ज्यामुळे स्वसंदर्भयुक्त प्रयोगशीलतेचा मार्ग
खुला झाला आहे. हा उभ्या ठशातला मजकूर जयंत
पवारांनीच लिहिलेला असला तरी तो एका कल्पित लेखकाने
लिहिलेली कथा म्हणून लिहिलेला आहे. हा कल्पित लेखक
हा पवारांच्या कथेतील एक पात्र आहे.
कथेचा तिरप्या ठशात छापलेला भाग म्हणजे या कल्पित
लेखकाने आपण लिहिलेल्या कथेवर ती लिहिता लिहिता
केलेले भाष्य आहे. हे भाष्य म्हणजे स्वसंदर्भयुक्ततेचा कथेत
झालेला प्रकट संचार आहे. प्रथम बाबलच्या कथेचा उभ्या
ठशातला थोडा भाग, नंतर त्यावरील भाष्याचा भाग, पुन्हा
कथेचा भाग, पुन्हा भाष्य अशा पद्धतीने बाबलच्याआयुष्यातील
धादांत सत्य...ही कथा रचली गेली आहे. थोडक्यात, या
कथेमधून कोण्या एका कल्पित लेखकाची दोन संभाषिते
जयंत पवारांनी सादर केली आहेत. ठशांच्या उपयोजनातून
कथेची संहितात्मकता जाणवत असली तरी ही प्रत्यक्ष
घडलेली घटना आहे अशी ग्वाही कल्पित लेखक आपल्या
भाष्यामधून सांगतो आहे. वास्तव काय आहे हे त्याला माहीत
आहे याचे कारण ते त्याने पाहिले आहे. कल्पित काय आहे
हेही त्याला माहीत आहे कारण ते त्यानेच लिहिले आहे.
प्रश्न असा आहे की कोण्या एका कल्पित लेखकाने
लिहिलेली कथा आणि त्याचेच स्वतःच्या कथेवरील भाष्य या
दोन्ही गोष्टी आपल्या कथेमधून जयंत पवार का सादर करीत
आहेत? त्यांना नेमके काय करायचे आहे? त्यांना बाबलच्या
आणि त्याच्या कुटुंबातील माणसांच्या आयुष्याची प्रस्थापित
व्यवस्थेमुळे कशी परवड झाली याची गोष्ट सांगायची आहे?
62 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
त्यासाठी कुणा तरी लेखकाची कल्पना करून आपणच
त्याचा मजकूर लिहिण्याची काही गरज नव्हती. तसेच, त्या
कथेवरील त्याच कल्पित लेखकाने लिहिलेल्या भाष्याची तर
मुळीच गरज नव्हती. आपणच सरळ (वास्तववादी शैलीत)
बाबलच्या आयुष्याची कथा सांगायचे सोडून जयंत पवार
कथालेखनाच्या अत्याधुनिक, आंतरराष्ट्रीय, लवचीक आणि
स्वसंदर्भयुक्त अशा शैलीकडे का वळले असावेत? त्यांना
बाबलच्या गोष्टीपेक्षा अर्थातच दसरे ु काही तरी सांगायचे
असावे, असा निष्कर्ष काढावा लागतो.
जयंत पवारांच्या या कथेला कथनाच्या सत्ताशास्त्राचा
संदर्भ आहे. त्यांत एखादी घटना आणि ती घटना घडली
असे सांगणारी दसरी ु घटना यांच्यात काय नाते असते, असा
प्रश्न त्याच्या कें द्रस्थानी आहे. घडलेल्या घटनांना पर्यायी
रूपबंध व अस्तित्व असते काय हाही त्या संदर्भात महत्त्वाचा
प्रश्न आहे. काय केले म्हणजे वास्तवाचे योग्य प्रतिरूपण
करता येते हा प्रश्नही येथे महत्त्वाचा ठरला आहे आणि त्याच
दृष्टिकोणातून पवारांनी आपण निर्माण केलेल्या लेखकाच्या
कथेवर एकही शब्द न लिहिता, त्याच्याच भाष्याचा उपयोग
करीत तिरकस टीका केली आहे.म्हणूनच वास्तवाच्या
रूपांतरणाची प्रक्रिया आणि त्याचा कथेशी असलेला संबंध हे
पवारांच्या कथेच े प्रमुख आशयसूत्र ठरते. या आशयसूत्राला
उठाव देण्यासाठी कथेच्या रूपबंधाकडे लक्ष वेधणाऱ्या,
स्वतःकडे टाकलेल्या दृष्टिक्षेपाला शक्य करणाऱया
स्वसंदर्भयुक्ततेचा मोठाच उपयोग झाला आहे. मात्र यामुळेच
बिचाऱ्या बाबलच्या आयुष्याची शोकात्मिका लोकरं जनासाठी
अतिरंजित अदभुतिका लिहिणाऱ्या लेखकाने लिहिलेल्या
गोष्टीमध्ये आणि त्यानेच लिहिलेल्या भाष्यामध्ये हेलकावत
राहिली आहे.
वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा! चा प्रारं भ या
दृष्टिकोणातून पाहण्यासारखा आहे. या भागात कथक
आपल्याला मुंबईचे वरून, कॅमेरा विमानातून जमिनीकडे
रोखला आहे अशा पद्धतीने विहंगम दर्शन घडवतो आहे असे
दिसते. हे बहश ु ः सर्वसाक्षी कथाबाह्य कथकाला शक्य असते.
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 63
या कथेचा कथक खरेतर असाच आहे. एरव्ही, ‘एके रात्री
लाईट घालवल्यावर त्याला बिछान्यावर मिठीत गच्च आवळत
सुप्रिया म्हणाली, आता मी हितनं कुठ्ठेच जाणार नाय.
म्हातारीला सांभाळीन मी’(तत्रैव, पृ. ६७), असे कथन
करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आलीच नसती. पण हा कथक
आपले स्वरूप दडवून पात्रकथक असल्याचे जाहीर करतो
आहे. तो निव्वळ कथन करत नाही, तर आपण कसे कथन
करतो आहोत याचेही तो कथन करतो आहे. ‘पण आता मी
जो एरिया लोकेट करतोय तिथे असा चमत्कार अद्याप
झालेला नाही(तत्रैव, पृ. ५८)’ असे तो जेव्हा सांगतो,
तेव्हाच कथेमध्ये स्वसंदर्भयुक्ततेच े बीज पडते. लोकेट
केलेल्या एरियाचे क्रमशः दर्शन घडवत तो कथेतील प्रमुख
पात्र बय हिच्याजवळ येतो आणि सांगतो की ‘मी बैदेवाल्या
बयपाशी थबकलो आहे (तत्रैव, पृ. ५८)’. दृष्टी कुठे
रोखायची, कॅमेरा कुठे रोखायचा हे त्याने नुसतेच निश्चित
केलेले नाही, तर ते त्याने वाचकांना सांगितलेही आहे. तो
कथनाच्या व्यवहारावर भाष्य करू लागला आहे. पुढे तो
सांगतो की त्याला ‘बय आणि डिग्याची गोष्ट सांगायची आहे
(तत्रैव, पृ. ५९)’. आपण सांगणार आहोत ती गोष्ट आहे
हेही त्याने सांगन
ू टाकले आहे. या गोष्टीमध्ये अनेक पात्रे
आहेत. ती पात्रे आहेत असे कथक अनेकदा अधोरेखित
करतो आहे. उदाहरणार्थ, बयच्या शेजाऱ्याविषयी बाबी
मुळिकविषयी तो प्रथम बोलतो तेव्हा ‘त्याच्याविषयी थोडं
सांगितलंच पाहिजे, कारण ह्या गोष्टीत त्याचा रोल महत्त्वाचा
आहे (तत्रैव, पृ. ६५)’ असे सांगतो. त्याचे गोष्टीत असणे
आणि त्या गोष्टीत त्याचा महत्त्वाचा रोल असणे या दोन्ही
गोष्टी त्याच्या संभाषिताचे स्वरूप स्पष्ट करतात. तो
वास्तवाचे प्रतिरूपण करण्याची भूमिका घेत नाही, तर
कल्पितकथेच्या निर्मितीची भूमिका घेतो आहे. कथेतल्या
माणसांचा उल्लेख तो अत्यंत जाणीवपूर्वक पात्र या संकल्पनेने
करतो आहे. भडकनाटय़, कथानक अशा संकल्पनाही
जाणीवपूर्वक आणि गंभीरपणे वापरतो आहे. ‘कथानकातली
चारही पात्रं एकाच वेळी घरी असण्याची वेळ आजकाल
64 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
क्वचित येई (तत्रैव, पृ. ९१)’ असे आवर्जून सांगतो आहे.
कथेच्या शेवटाकडे आल्यावरही ‘ही गोष्ट मी इथेच थांबवतो
(तत्रैव, पृ. ९७)’ असेही तो जाहीर करतो आहे. हे करताना
आपले कथक म्हणून असलेले अधिकार त्याने वापरलेले
आहेत.
या कथेच्या कथकाने केलेले वर सांगितलेले
स्वसंदर्भयुक्ततेच्या बाबतीतले उपक्रम बाजूला ठे वले आणि
त्याचा वास्तववादी चौकटीत विचार केला तर या कथकाचे
व्यवहार सिद्धीस जाण्यासाठी ती पुरेशी आहे, हे लक्षात येऊ
लागते. या कथकाचे आपल्या कथनविषयाशी म्हणजे
कथेतील घटना व पात्रे यांच्याशी विविध प्रकारचे संबंध
आहेत. या कथेतील कथक वेगवेगळ्या बदलत्या
दृष्टिबिंदंमू धून घटना व पात्रकृतींच्या जगाकडे पाहतो.
दृष्टिबिंदबरोबर
ू दिसणारे दृश्यच नव्हे, तर कथकाचे
संभाषितही बदलते. उदाहरणार्थ, घटना व कृतींच्या विश्वाकडे
खूप उंचावरून, मोठा प्रदेश कक्षेत घेण्याचा प्रयत्न हा कथक
अनेकदा करतो. अशा वेळी कथकाचे संभाषित अलिप्तपणे
भाष्य करणारे, बदलत्या परिस्थितीचे स्वरूप आणि दिशा
स्पष्ट करणारे, इतिहासकाराशी नाते सांगणारे आहे. पात्रे
आणि घटना यांच्यापासून जास्तीत जास्त दरू राहण्याचा
प्रयत्न येथे कथकाकडून गेला आहे. तसे पाहिले तर यातला
बराचसा भाग पारं परिक सर्वसाक्षी कथकाच्या संकल्पनेला
अनुसरणारा आहे. त्याचा आणि स्वसंदर्भयुक्ततेचा काहीही
संबंध नाही. त्याचा येथील वेगळेपणा सर्वसाक्षी कथकाला
वेगवेगळ्या संभाषिताशी जोडणे हा आहे. हा वेगळेपणा
वास्तववादी दृष्टीच्या प्रभावातून आलेला आहे.
हा कथक विहंगम दृश्य दाखवण्याच्या भूमिकेमध्ये
नेहमीच असत नाही. तो अनेकदा जमिनीवर उतरतो.
लालबाग-चिंचपोकळीची आतून माहिती असणारा, बय व
डिग्या यांना त्यांच्या सांस्कृतिक-सामाजिक परिसरासह
समजून घेणारा, त्यांच्या भाषेत सहजतेने बोलणारा होतो.
उदाहरणार्थ, पाहाः तिचा डिग्या तरी कसला महा पोहोचलेला,
बाराबोडय़ाचाच तो आज्जीच्या हातावर तुरी देऊन पशार
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 65
होतो नि कुठे कुठे खाचरात, गच्चीवर, कॉटनग्रीनच्या
कट्टय़ावर पतंगी शोधत मांजा गोळा फिरत असतो (पृ.
५८-५९). अशा वेळी बय, डिग्या आणि कथक यांच्यातील
अंतर किमान होतेच, शिवाय वास्तवाचे जवळून घेतलेले
दर्शन अधोरेखित होते.
सर्व पात्रांच्या बाबतीत कथक एकाच सुरात बोलत नाही,
हा त्याच्या संभाषिताचा आणखी एक विशेष आहे. तो बाजू
घेतो. जगाकडे पाहण्याचा त्याचा मूल्यविवेक इथे दिसतो. हा
मूल्यविवेक केवळ संहितात्मक जगाविषयीचा आहे, असे
म्हणता येत नाही. महादेव, शांताराम गावडे इत्यादिकांविषयी
बोलताना त्याच्या सुरात तिरकसपणा येतो. बय, बाबी,
डिग्या यांच्याविषयी बोलताना, वाचकाने नीट शोधली तर,
आत्मीयतेची भावना सापडू शकते. याचा अर्थ असा की
अपरिहार्यपणे पात्र नसलेल्या कथकाचे रूपांतर संभाषिताच्या
त्याच्या सुरामुळे पात्रात होते आहे असे वाटू शकते.
कथकाकडे प्रयुक्ती म्हणून न पाहता सर्वसाक्षी कथकाला
पात्राचे विशेष देणारा व्यवहार वास्तववादाशी नाते सांगणारा
आहे.
अनेकदा त्याचे कथन चलत्चित्रकॅमेऱ्याने पाहिलेल्या
दृश्याचे स्वरूप धारण करते. विवक्षित घटनेवर रोखलेला,
तिचे मूर्त, शारीर, भौतिक तपशील बारकाईने टिपत जाणारा
कॅमेरा ‘गोचर’ वास्तवाचे प्रतिरूपण करण्याचे अत्यंत समर्थ
असे साधन आहे. त्याचा परिणाम शब्दांमधून साधण्याचा
प्रयत्न या कथेचा कथक करताना दिसतो. विवक्षित घटनेवर
रोखलेला व सूक्ष्म तपशील टिपत जाणारा कॅमेरा, एकाच
प्रकारच्या अनेक घटना एकदम सांगण्याचा प्रयत्न करणारा
कॅमेरा, घटनांच्या कमीअधिक गतींची हाताळणी, जवळून
टिपलेली दृश्ये, दरून ु घेतलेली दृश्ये, स्वप्नदृश्ये अशा
कॅमेऱयाशी निगडित अनेक प्रकारांचा उपयोग कथकाने या
कथेत केला आहे. तो वास्तवाची प्रत्यक्षता प्रमाणित करणारा
आहे.
नेहमीच नव्हे तर अधूनमधून हा कथक सर्वसाक्षी असूनही
पात्राच्या दृष्टिक्षेत्रनियंत्रणातून बोलू लागतो. पात्राची भूमिका
66 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
आपल्या कथनाच्या व्यवहारात मुरवण्याचा, आणि पात्राच्या
दृष्टिकोणातून कथा सांगण्याचा हा प्रयत्न असतो. उदाहरणार्थ,
महादेवचा पहिला परिचय किंवा दोन मुलांच्या मरणाविषयीची
माहिती कथाबाह्य सर्वसाक्षी कथक देत असला तरी तो
बयच्या दृष्टिक्षेत्रनियंत्रणातून करून दिला जातो आहे. त्याच्या
कथनप्रक्रियेला यामुळे विशिष्ट पात्राच्या मानवी दृष्टीचे
परिमाण प्राप्त होते.
कथकाचे हे सर्व व्यवहार कथेकडे पाहण्याचा वास्तववादी
दृष्टिकोण पुढे आणतात. त्यांना अस्तित्वात येण्यासाठी
स्वसंदर्भयुक्ततेच्या चौकटीची थोडीही निकड भासत नाही, हे
पुन्हा एकदा आवर्जून सांगितले पाहिजे. जयंत पवारांच्या
कथेत अत्यंत मोक्याचे स्थान असलेला कथक जर
वास्तववादी धारणांकडे रोखलेला असेल तर वरनभातलोन्चा
निकोन नाय कोन्चा!या कथेतील स्वसंदर्भयुक्तता उपरी
ठरेल यात शंका नाही.
या कथेमधील स्वतःला जाळून घेणारी कोंगाटीण,
तिच्याविषयीचे किंवा एकूणच स्त्रीविषयीचे वाढाळू वयातील
डिग्याच्या मनातले आकर्षण, डिग्याच्या बापाचे अवतरण,
भूताखेतांच्या गोष्टी या सर्व गोष्टी डिग्याच्या मानसिक
अवस्थेशी व भोवतालच्या सांस्कृतिक परिसराशी जोडता
येतात आणि फॅन्टॅस्टिक जगाचे स्पष्टीकरण शक्य होते.
पर्यायी जगाची संकल्पना बाद झाल्यामुळे साहजिकच कथा
वास्तववादाकडे झुकते. हाच प्रकार स्वसंदर्भयुक्ततेच्या
बाबतीतही झाला आहे. या कथेमधली स्वसंदर्भयुक्तता खूपच
सौम्य अशी आहे. ती कथेच्या संकेतव्यूहाच्या हाताळणीवर,
त्यांतून उद्भवणाऱ्या समस्यांवर, तिच्यातील जगाच्या
सत्ताशास्त्रावर सतत भाष्य करत पूर्णांशाने अधिकथनात्म होत
नाही.पण त्यामुळेच ही सौम्य स्वरूपाची स्वसंदर्भयुक्तता या
कथेमध्ये का घुसली असावी असा प्रश्न निर्माण होतो. ती
कथेत आल्यामुळे कुठले नवे परिणाम कथेला प्राप्त होते
असा आणखी एक प्रश्नही निर्माण होतो. चारपाच ठिकाणी
आलेले स्वसंदर्भयुक्ततेच े उल्लेख काढून टाकले तर कथेच्या
परिणामकारकतेवर व तिच्या स्वरूपावर काही फरक पडतो
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 67
का असाही प्रश्न निर्माण होतो. या कथेतील स्वसंदर्भयुक्ततेच्या
मांडणीच्या जागा संख्येने अल्प असल्या ती त्यांच्यामुळे
कथेतील संपूर्ण जगाला अर्थपूर्णता देणारी चौकट उपलब्ध
होते असेही म्हणता येत नाही.
खरे म्हणजे केवळ कथकावरच नव्हे तर या संपूर्ण कथेवर
वास्तववादी चित्रणपद्धतीचा फार मोठा प्रभाव आहे. बय,
डिग्या, त्यांचा परिसर, त्यांची परिस्थिती, विशिष्ट ऐतिहासिक
परिस्थितीने आकार दिलेले मानवी संबंध, त्या परिसरातील
श्रमिकांची संस्कृ ती, माणसांचे उठणे बसणे, बोलण्याचा
लहजा, त्यांचे स्वप्ने पाहणे यांचे अत्यंत तपशिलातले
प्रतिरूपण या कथेमध्ये आले आहे. जागतिकीकरणाने चालना
दिलेल्या नव्या बदलांच्या जीवघेण्या उलाढालींमधून जाणारे
देशी दारूच्या बारसमोर उकडलेली अंडी विकून ताठपणे
जगणाऱ्या झुंजार बयचे दैनंदिन आयुष्य या कथेमध्ये सादर
केले गेले आहे. उदाहरणार्थ, कथेचा कथक सांगतो,
‘संध्याकाळी बय उकडलेल्या अंडय़ांचा डबा घेऊन निघाली.
डिग्या तिच्यापाठोपाठ बारकं स्टुल आणि खाकेत रद्दी पेपर
मारून निघाला. खत्री चाळीचा जिना उतरून ते खाली आले.
हनुमान भुवनच्या खाली असलेल्या जयहिंद देशी बारपाशी
येताच बारच्या पायरीशेजारचा चौकोनी दगड कागदाने पुसनू
बयने त्यावर बुड ठे वलं. डब्यात मोजून सत्तर अंडी ठे वलीवती
ती तिने झाकण उघडून परत बघून घेतली. एवढी सगळी
अंडी संपायची. बारमधून शंभर मिलि—दीडशे मिलि घेऊन
आलेल्या गिऱ्हाईकाला एक तरी अंडं लागायचंच’ (पृ.
६१). काल, अवकाश, भाषा, जाणिवा या सर्व पातळ्यांवर
कथा इथे बय आणि डिग्या यांचे खरोखरीची, हाडामांसाची
माणसे म्हणून प्रतिरूपण करते आहे. त्यांच्या कृतींचे
वास्तववादी तपशिलात जाऊन चित्रण करते आहे. बय
उकडलेल्या अंडय़ांचा डबा घेऊन निघाली आहे. डिग्या घेऊन
निघालेलं स्टुल बारके आहे. रद्दी पेपर त्याने खाकेत मारले
आहेत. या सगळ्या घटना खत्री चाळ ते जयहिंद बारच्या
आसापासच्या अवकाशात घडत आहेत. हा अवकाश
खराखुरा आहे, अंडी खरीखुरी आहेत, ती सत्तर आहेत,
68 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
पायरीशेजारचा दगड चौकोनी आहे हे सगळे तपशील
कथकाने ‘गोचर वास्तवा’चे यथातथ्य प्रतिरूपण करावे
अशाच शैलीत लिहिले आहेत. या कालावकाशात वावरणाऱ्या
माणसांच्या भाषेचा परिणामही कथकाच्या कथनावर झाला
आहे. बय चौकोनी दगडावर बूड ठे वते, तिने डब्यात सत्तर
अंडी ठे वलीवती, अशा स्थानिक छटा असलेल्या शब्दांचा
उपयोग करीत आपले प्रतिरूपण भाषिक पातळीवरही अस्सल
असल्याची ग्वाहीच जणू कथक देतो आहे. महत्त्वाची गोष्ट
अशी की या प्रतिरूपणामागची सांकेतिकता उघडी पडू नये
याची काळजी कथकाने घेतली आहे. संपूर्ण कथा बव्हंशी
वास्तवाचे असे घनदाट चित्रण करणाऱ्या तपशिलांनी भरलेली
आहे. त्यामध्ये विशिष्ट कालखंडाचे कथेतील आकलन
आणि त्यांचा मानवी संबंधावर झालेला परिणाम, त्यातून
निष्पन्न झालेल्या कृती समाविष्ट केल्या की या कथेतील
वास्तववादी दृष्टीची समग्रता सिद्ध होते. ही दृष्टीच कथेत
प्रभावी आहे आणि तिच्यातील स्वसंदर्भयुक्तता या दृष्टीला
भेद ू शकत नाही. वेगळ्या भाषेत बोलायचे झाल्यास या
कथेतील स्वसंदर्भयुक्ततेची सूचना देणारे थोडके उल्लेख
काढून टाकले तर फारसे काही बिघडणार नाही, पण
वास्तववादी दृष्टिकोणातून लिहिणारा भाग काढून टाकायचा
ठरवला तर बहतु ेक कथा बाद करावी लागेल. हा दृष्टिकोणच
कथेचा गाभा आहे असे यावरून म्हणता येते.
याचा अर्थ जयंत पवारांची ही कथा वास्तवाचे सरधोपट
वास्तववादी चित्रण करते आहे, असे मला म्हणायचे नाही.
वास्तववादाच्या मर्यादेतही अर्थपूर्ण लेखन करता येते,
वास्तववादातील क्षमता संपलेल्या नाहीत याचे प्रत्यंतर
त्यांच्या या कथेच्या हाताळणीवरून येते. उदाहरणार्थ, या
कथेतील पात्रचित्रण पाहा. पात्रचित्रण करताना वास्तववादाचे
संकेत या कथेत पाळले गेले आहेत. वास्तववादी दृष्टिकोणातून
पात्रचित्रणाचा मध्यवर्ती संकेत पात्राकडे माणूस म्हणून पाहणे.
सामान्य माणूस म्हणून पाहणे. त्याला कल्पितकथेच्या
संकेतव्यूहाच्या ठराविक भूमिकांच्या बाहेर ठे वणे. या कथेत
बय हे पात्र कें द्रस्थानी असले तरी ती या कथेची ती नायिका
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 69
आहे असे म्हणता येणे कठीण आहे. या पात्राच्या कृतींना
परिस्थितीच्या मर्यादा असणे हा आणखी एक वास्तवादी
संकेत म्हणता येईल. पात्र परिस्थितीवर स्वार होऊन तिला
हवा तसा आकार देऊ लागले की कल्पितकथा रोमॅटिक होऊ
लागते. बय शूर आहे. पण परिस्थितीपुढे ती अखेरीस नमते.
याचे कारण ती लढाऊ असली तरी एक सामान्य स्त्री आहे.
वास्तववादी दृष्टी माणसाच्या सामान्यपणाला पुढे आणत
राहते. या पात्रांच्या कृती व अनुभव यांना शक्यतेच्या
चौकटीत सर्वसाधारणपणे उभे केले जाते. असाधारण कृती,
अनुभव यांचे वास्तववादाला वावडे असते, असे म्हटले तरी
चालेल. यामुळेच दैनंदिन आयुष्यात प्रत्यही घडणाऱ्या
घटनांचा उपयोग पात्रचित्रणासाठी केला जातो. या कथेमधले
पात्रचित्रण या संकेतांना अनुसरणारे आहे हे सांगण्यासाठी
विशेष विश्लेषणाची गरज आहे असे वाटत नाही.
या चौकटीत वावरत असतानाही जयंत पवारांनी डिग्या
आणि इतर पात्रे यांच्यात एक महत्त्वाचा भेद चित्रित केला
आहे. बय, किंवा बाबी मुळीक, किंवा शांताराम गावडे,
किंवा महादेव हे परिस्थितीचा परिणाम झेलणारे फलाट
आहेत. बाह्य परिस्थितीच्या परिणामामधून त्यांचे आंतरिक
आयुष्य घडते आहे. परिस्थितीने घेतलेल्या वळणाप्रमाणे ही
पात्रे बदलत आहेत. त्यांच्या कृतीउक्तींमधून बदलत्या
परिस्थितीची गतिशीलता व्यक्त होते आहे. डिग्या या
सर्वांपक्षा
े वेगळा आहे. परिस्थितीच्या मर्यादा त्याला काचत
नाहीत. त्याचे शैशव त्याला स्वप्ने पाहण्याची क्षमता देते
आहे. त्याच्यामध्ये अफाट ऊर्जा आहे. त्यामुळे बाह्य
परिस्थितीच्या मर्यादा मानण्यास तो तयार नाही. म्हणूनच तो
सातत्याने नवनव्या कल्पितकथा निर्माण करतो आहे.
स्वतःला आवश्यक वाटणारे जग कल्पनेतन ू घडवतो आहे.
याविषयीची सामाजिक परिस्थितीचा दबाव तो मानत नाही.
त्याच्या इच्छा, वासना, गरजा सामाजिक परिस्थितीच्या
कचाटय़ात अजून सापडल्या नाहीत. त्यामुळे तिच्या
वजनाखाली तो मोडकळीस आलेला नाही. शेवटीही अत्यंत
उत्स्फूर्ततेने बाबी आणि धनू यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय
70 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
त्याने घेतला आहे. डिग्याच्या या उत्स्फूर्त व स्वैर
सर्जनशीलतेच्या पार्श्व भूमीवर इतर पात्रांचे परिस्थितीशरण
व्यवहार विरोधसंबंधाने अधिक सुस्पष्ट होत जातात.
वास्तववादी चौकटीतही अर्थपूर्ण पात्रचित्रणाच्या शक्यता
असतात, हेच यावरून दिसून येते.
मात्र तुझीच सेवा करू काय जाणे या संग्रहातील
शेवटच्या कथेमध्ये परिस्थिती अशी नाही. येथे गणेशभक्तांच्या
कथांच्या निमित्ताने खास देशी वळणाचे अद्तभु संपूर्ण कथेमध्ये
प्रभावी राखलेले आहे. ते अधिक गहिरे करण्यासाठी
कालपुरुषाला कथक म्हणून नेमले गेले आहे. स्वसंदर्भयुक्ततेचा
आणि अनुषंगाने आलेल्या कथनपद्धतीचा प्रभावही येथे गहिरा
झाला आहे आणि कथेचा वास्तववादी गाभा अत्यंत क्षीण
झाला आहे. गिरणगावातील गिरण्या, गिरण्यात होणारे संप,
मालकांची बदलती धोरणे, कामगारांची ससेहोलपट हाच या
कथेचा संदर्भ आहे. आप्पा मेस्त्री, त्याचा मुलगा अजा ऊर्फ
बाळा मेस्त्री आणि अजाचा मुलगा गजा अशी तीन पिढय़ांची
कहाणी या कथेमधून सांगितली गेली आहे. त्यांतील अजा
मेस्त्री याच्या काळात गिरण्यांचा चिघळलेला संप झाला आहे
आणि त्याच्या कुटुंबाची अन्नान्न दशा झाली आहे. या
ससेहोलपटीने अजा मेस्त्री यांच्या पुढच्या पिढीला म्हणजे
गजाला गारद केल्याचा कथाभागही या कथेत आला आहे.
तसे पाहिले तर या कथेमध्ये खास स्वसंदर्भयुक्ततेच्या
म्हणता येतील अशा खुणा आढळून येत नाहीत. या कथेत
कथेच्या संकेतव्यूहावर भाष्य केले जात नाही. तो जाणीवपूर्वक
उघडा पाडला जात नाही. ही कथा कथेवरची कथा कधीही
होत नाही. तरीही तिच्यामध्ये एका वेगळ्या मार्गाने
स्वसंदर्भयुक्तता प्रवेश करते. स्वसंदर्भयुक्ततेच्या व्यवहारात
कथक ही प्रयुक्ती विशेष महत्त्वाची ठरते, याचे कारण
कथकाच्या माध्यमातून कथेच्या एकूण संकेतव्यूहाचे नियंत्रण
साधले जात असते. कथक विशिष्ट पद्धतीने कथा सांगत
असतो. त्याची कथनपद्धती कथेच्या आशयात्म सामग्रीचे
रूपांतरण घडवून आणत असते. ही कथनपद्धती आणि तिच्या
माध्यमातून होणारे रूपांतरण आशयात्म सामग्रीच्या तुलनेत
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 71
अत्यंत स्पष्टपणे जाणवू लागले तर भाष्य न करताही कथेचा
संकेतव्यूह उघडा पडू लागतो. अशा वेळी कथनातून सिद्ध
होणारे रूप आणि कथनातूनच उभे राहणारे आशयाचे व्यूह
या दोन गोष्टींतील तुल्यबल देवाणघेवाण खंडित होते आणि
आशयात्म सामग्री ही कथनपद्धतीची गरज म्हणून कथेत
आली आहे, असे वाटू लागते. या कथेत असेच झाले आहे.
या कथेत दोन कथकांची योजना केली आहे आणि असे
का केले गेले असावे असा एक प्रश्न अत्यंत सहजपणे
आपल्यासमोर उभा राह ू शकतो. दोहोंपैकी एक कथक,
आपण पूर्वी ज्याचा उल्लेख केला तो कालपुरुष आहे. तो
कथेच्या प्रारं भी व शेवटी विशेष प्रभावी असला तरी
अध्येमध्येही तो कथनाचे कार्य करतो आहे. तो प्रमुख किंवा
सर्वोच्च पातळीवरचा कथक आहे. तो कथेच्या बाहेर
असलेल्या श्रोत्याशी संबंध साधतो. तो अधूनमधून प्रथमपुरुषी
भाषेत स्वतःविषयी बोलत असला तरी तो खरे पाहिले तर
कथाबाह्य सर्वसाक्षी कथक आहे. शिवाय तंत्रतः पात्रकथक
म्हणता येईल असा आणखी एक कथक कथेमध्ये आहे.
कथाभागाचे बहतु ेक कथन हा पात्रकथक म्हणजे अजा
मेस्त्रीचा मित्र तात्या पालकर नावाचा मित्र करतो आहे.
चिंटय़ा पावसकर नावाचा त्याचा पात्रश्रोताही कथेमध्ये आहे.
तात्या चिंटय़ाला जे सांगतो आहे ते कालपुरुष आपल्याला
सांगतो आहे अशी दमजली ु कथनाची रचना कथेत केली
आहे. तात्या पालकर वृद्ध आहे आणि तो त्याच्या तारुण्यातील
घटना सांगतो आहे हे लक्षात घेतले की तात्या कथक म्हणून
सर्वसाक्षी आहे याची जाणीव होते.
कथा अशी उलटय़ासुलटय़ा उडय़ा का घेते आहे याचा
शोध घेणे गरजेच े आहे. पारं परिक सर्वसाक्षी कथक आणि
आधुनिक पात्रकथक यांचे मिश्रण तर होतेच, शिवाय
पात्रकथकांच्या विशिष्ट निवडीमधून कथनाच्या संभाषिताचीही
निवड होते. सर्व जाणणाऱ्या कालपुरुषाची भाषा
सर्वसामान्यांसारखी असणार नाही. तिला फार दिसत
असणार. तिची जाणण्याची क्षमता अधिक असणार. दसरा ु
कथक गणेशभक्त आहे. त्याच्याकडे गणेशआख्यानांचे
72 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
भांडार आहे. गणेशाच्या कहाण्यांच्या कथनपद्धतीचे संस्कार
त्याच्यावर झाले आहेत. तो अर्थातच कोणाचीही कथा
सांगायची झाल्यास ती गणेशाख्यानाच्या आकृतिबंधात आणि
संभाषितात रूपांतरित करणार.येथे कथनाच्या विशिष्ट
पद्धतीच्या उपाययोजनेतन ू कथनविषयक संकेतव्यूह अधिक
प्रभावी होत पुढे आणला जातो व परिणामी तो उघडा पडतो.
या दृष्टिकोणातून या कथेमध्ये विशिष्ट प्रकारची
स्वसंदर्भयुक्तता प्रवेशली आहे, असे म्हणता येते.
तात्या पालकरजवळ फक्त गणेशाख्यानाची भाषा उरली
आहे.तो जेव्हा अजा मेस्त्री नावाच्या एका प्रसिद्ध गणेशभक्ताची
गोष्ट सांगू लागतो तेव्हा तो ती कथा जाणीवपूर्वक पारं पारिक
कहाण्यांच्या संभाषितामध्ये बसवतो. या प्रक्रियेमळ ु े समकालीन
वास्तवाला पौराणिक रूप दिले जाते. ही प्रक्रियाही चित्तवेधक
आहे. पौराणिक आख्यानांचा वास्तवलक्ष्यी अन्वयार्थ
सांगण्याचा प्रयत्न आधुनिकांनी केला आहे, तर
उत्तरआधुनिकांनी वास्तवाचे रूपांतर पौराणिक कथनांमध्ये
केले आहे. अजा मेस्त्रीच े आयुष्य असे काही असेल तर
त्याच्या कहाणीत किंवा गणेशाख्यानात केलेल्या रूपांतरणातून
ही कथा देह धारण करते. अजा मेस्त्री ज्या वास्तवात वावरतो
त्या वास्तवाचे पौराणिक कहाणीत रूपांतर करण्याची प्रवृत्ती
वास्तवाला प्रतिरूपणाचा न्याय देते का असा प्रश्नही उपस्थित
करता येतो.
आपण जिच्याविषयी पूर्वीच भरपूर चर्चा केली आहे त्या
तर्काच्या...रहस्य या कथेला मात्र स्वसंदर्भयुक्ततेच े सुस्पष्ट
परिमाण आहे. या कथेमध्ये कालपुरुषाची क्षमता असलेले
आणि लिहिण्याच्या प्रक्रियेत गुंतलेले आणि तिच्यावर भाष्य
करीत राहिलेले एकच नव्हे तर दोन लेखक आहेत. त्यांतील
एक म्हणजे ज्याने अनेक रहस्यमय कादंबऱ्या लिहिलेल्या
आहेत असा डी. विश्वनाथ होय. त्याचा पुतण्या किंवा मुलगा
बाबी डिचोलकर डी. विश्वनाथने लिहिलेल्या शेवटच्या
कादंबरीचे पुनर्लेखन करतो आहे. आपण कसे लिहिले आहे,
कसे लिहितो आहोत आणि कसे लिहायचे असते याची चर्चा
हे दोघेही सतत करत आहेत. या चर्चेमधून रहस्यमय कादंबरी
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 73
या साहित्यप्रकारावर आणि सत्य या संकल्पनेवर भाष्य होत
राहते. या चर्चेमध्ये मूळ कादंबरीमधील पात्रेही सहभागी
झाली आहेत. ही चर्चा केवळ विवक्षित कादंबरीच्या किंवा
विवक्षित साहित्यप्रकाराच्या मर्यादेत राहत नाही. तिच्या
कक्षेत तर्काच्या...रहस्य ही संपूर्ण कथा आणि तिच्याबरोबर
डी. विश्वनाथ आणि बाबी डिचोलकर या पात्रांची चरित्रेही
खेचली जातात. कथेच्या रिं गणात वास्तव आणि कल्पित,
जिवंत आणि मृत असे काही प्रदेश आखण्याची सोय कथेने
करून दिली आहे आणि हे प्रदेश परस्परांमध्ये मिसळूनही
टाकले गेले आहेत. त्यामुळे कथांतर्गत कादंबरीतील पात्रे
कथांतर्गत वास्तवातल्या व्यक्तींशी संवाद साधू शकली
आहेत. म्हणूनच येथे कल्पितकथेवरचे भाष्य वास्तवातील
आयुष्यावरचे भाष्य ठरतेआणि कल्पितकथेची यादृच्छिक
सांकेतिकता वास्तवातील आयुष्याचा भाग होते. कथेच्या या
व्यवहारामुळे ती स्वसंदर्भयुक्त होतेच शिवाय या तथाकथित
वास्तव आयुष्याचा समावेश व्यापक पातळीवरील
कल्पितामध्येच होत असल्यामुळे कथाबाह्य वास्तवासाठी
कथेच े दरवाजे बंद होतात. हे केवळ या विशिष्ट कथेपरु तेच
घडते असे येथे अभिप्रेत नाही.
५.
संहितात्मकता, पर्यायी जग, स्वसंदर्भयुक्तता अशा काही
संकल्पनांचा उपयोग करत आपण येथवर वरनभातलोन्चानि
कोन नाय कोन्चा या संग्रहामधील कथांचा, त्यांच्या रूपबंध
आणि आशयसूत् रे यांच्यातील परस्परसंबंधांचा वेध घेण्याचा
प्रयत्न केला आहे. तो करत असताना या तिन्ही संकल्पनांचे
स्वरूप ऐतिहासिक असते, ही गोष्ट सतत लक्षात ठे वणे
गरजेच े आहे. या संकल्पना ऐतिहासिक असतात याचे कारण
त्यांची प्रस्तुतता कालातीत नसते. विशिष्ट प्रकाराच्या
रूपबंधाला किंवा रूपबंध आणि आशयसूत्र यांच्या संबंधांना
कथनाविष्काराच्या एकूण विशिष्ट काळातील व्यवस्थेच्या
संदर्भात अर्थपूर्णता लाभलेली असते.
म्हणजे असे की कथनाचा संकेतव्यूह सतत बदलत
असतो. त्याचबरोबर त्याला काही प्रमाणात स्थैर्यही असते.
74 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
स्थैर्याच्या कालखंडात कथनाचा प्रस्थापित संकेतव्यूहस्पष्टपणे
जाणवू शकतो. या प्रस्थापित संकेतव्यूहाला आव्हान देणारे
बंडखोर प्रयत्न एकंदर संकेतव्यूहाला गतिशील करत
असतात. मात्र ही जी बंडखोरी असते तिचे स्वरूप
पूर्वप्रस्थापित संकेतव्यूहाच्या स्वरूपावरून निश्चित होते.
उदाहरणार्थ, स्वसंदर्भयुक्तता पाहा. एके काळी प्रस्थापित
संकेतव्यूहामध्ये सहजतेने ती सामावली जाई. हरी नारायण
आपटे ते नाथमाधव या काळातील मराठी कादंबरीकारांनी
लिहिलेल्या कादंबऱ्यांमधील कथक (इंग्रजी धर्तीवर)
वाचकहो, असे वाचकाला उघडपणे संबोधित, आपण सांगत
असलेल्या कथेवर भाष्य करीत. वाचकहो, चला तर आपला
कथानायक कोणत्या परिस्थितीत आहे ते आपण पाह ू या असे
कथक सांगे तेव्हा तो सांगत असलेल्या कल्पितकथेच े
कल्पित असणे, विशिष्ट संकेतव्यूहावर आधारित असणे
उघडे पडत असे. तथापि, त्यामुळे कादंबरीच्या
वास्तवाधिष्ठिततेवर काही संकट कोसळले असे त्या काळच्या
वाचकांस वाटत नसे. या प्रकारची स्वसंदर्भयुक्तता त्या
काळी वास्तववादी संभाषिताचा भाग म्हणून प्रस्थापित होती.
हळूहळू हे वास्तववादी संभाषित आधिकाधिक परिष्कृ त होऊ
लागले. ते अधिक नेमके होऊ लागले. कथात्मतेच े उघड
उल्लेख कथेच्या वास्तवसमक्षतेला बाधक आहेत ही कल्पना
वास्तववादी कल्पितकथेच्या संकेतव्यूहाचा भाग होऊ
लागली. या नव्या परिस्थितीच्या पार्श्व भूमीवरच
स्वसंदर्भयुक्तता ही नवी, लवचीक, बंडखोर प्रयोगशीलता
ठरू लागली. हाच प्रकार अद्तभु असलेल्या पर्यायी जगाचाही
आहे. आपली जुनी पुराणे, महाकाव्ये, नीतिकथा, रूपककथा,
कहाण्या यांमध्ये स्वसंदर्भयुक्तता तर असेच, शिवाय
अद्तताहीभु ठासून भरलेली असे. उदाहरणार्थ, देवलोक आणि
पृध्वीलोक यांच्यामध्ये विद्याधरांचे राज्य पसरलेले आहे ही
असंभाव्य कल्पना अत्यंत सहजतेने कथासरित्सागरात
आलेली आहे. विद्याधर ही माणसापेक्षा वरची पण देवांपक्षा े
खालची अशी एक कोटीही तिथे कल्पिली गेली आहे. तसेच
या कथा आहेत व त्या कोणी कोणाला सांगितल्या आहेत
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 75
आणि त्या कशा पसरत गेलले ्या आहेत याच्या हकिकती या
ग्रंथातून सांगितल्या गेल्या आहेत. या अद्तभु प्रदेशाच्या
आणि प्राणिजातांच्या कल्पितकथा माणसे आनंदाने वाचत
ऐकत आली आहेत. मात्र त्यामधील स्वसंदर्भयुक्ततेला आणि
पर्यायी जगाच्या कल्पनेला आजचे मूल्य नाही. मधल्या
काळात वास्तववादी संभाषिताला आधुनिक कथाकादंबरीमध्ये
प्रतिष्ठा प्राप्त झाल्यानंतर या अद्तभु पर्यायी जगाला वेगळ्या
परिप्रेक्ष्यामध्ये महत्त्व येऊ लागले आहे. या जगाचे केवळ
अद्तभु असणे आज महत्त्वाचे राहिले नाही, तर त्याचे
वास्तववादी संकेतव्यूहाच्या साहाय्याने केले गेलल े े चित्रण
मूल्ययुक्त ठरू लागले आहे. रूपबंध आणि आशयसूत् रे
यांच्या द्वंद्वात्मक संबंधांमळ ु े उपलब्ध तात्त्विक धारणाही
रूपबंधामध्ये प्रवेश करत असतात, आणि रूपबंध या
तात्त्विक धारणांना आकार प्राप्त करून देत असतो. म्हणूनच,
आधुनिकपूर्व, आधुनिक आणि उत्तरआधुनिक धारणांमध्ये
स्वसंदर्भयुक्ततेच े स्वरूप बदलते राहते. आधुनिकपूर्व
साहित्यात ते स्वीकृत प्रस्थापित संकेतव्यूहाशी निगडित
असते, आधुनिक साहित्यात ते व्यक्तीच्या मनाशी व
अस्मितेशी जोडलेले असते तर उत्तरआधुनिक जाणिवेमध्ये ते
जगाच्या सत्ताशास्त्राशी जोडलेले असते. रूपबंधाच्या
प्रयुक्त्यांची ही गतिशीलता, परिस्थितिसापेक्षता, नव्या
व्यवस्थेमध्ये नव्या रीतीने मूल्ययुक्त ठरण्याची क्षमता गृहीत
धरली नाही तर त्या विशिष्ट प्रयुक्ती ऐतिहासिकतेच्या
पकडीतून सुटनू कालातीत होतात. जयंत पवारांच्या
वरनभातलोन्चा...चा परामर्श घेताना असे होऊ नये याची
काळजी घेण्याचा येथे प्रयत्न केला आहे.
या विवेचनाच्या पार्श्व भूमीवर आपण जयंत पवारांच्या
यांच्या कथालेखनाच्या काळापासून थोडे मागे, म्हणजे
१९७५पर्यंत मागे गेलो की काळ मोठा धामधुमीचा आहे,
हे लक्षात येऊ लागते. १९७५नंतरचा काळ हा मराठीतील
वास्तववादाच्या पुन्हा एकदा झालेल्या प्रतिष्ठापनेचा कालखंड
आहे. भूतकाळातील थोडय़ाफार वास्तववादी लेखनाला
स्मरत या काळात पुन्हा एकदा वास्तववाद प्रस्थापित
76 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
करण्याचा प्रयत्न मराठी साहित्यात झालेला, विशेषतः
कल्पितकथेच्या क्षेत्रात झालेला दिसतो. रूपवाद, व्यक्तिवाद
या कथित पाश्चात्त्य उसनवाऱ्यांना नाकारीत खास देशी
वास्तव कथाकादंबऱ्यांमधून मांडण्याचा पुरस्कार देशीवादाच्या
भालचंद्र नेमाडे यांच्यासारख्या प्रवक्त्यांनी केलेला दिसतो.
याच काळात महानगरी मध्यमवर्गीय संकेतव्यूहाला नकार
देत या मातीतले वास्तव मांडणाऱ्या ग्रामीण साहित्याची
चळवळही निर्माण झालेली दिसते. हाच काळ दलित
साहित्याच्या प्रभावाचा कालखंडही आहे. मराठी साहित्याने
गावकुसाबाहेर ठे वलेल्या वास्तवाला साहित्यात जाणीवपूर्वक
आणण्याचे प्रयत्न दलित साहित्याने केलेले दिसतात. या
तिन्ही प्रवाहांनी आपापल्या परीने वास्तववादाला महत्त्व दिले
आणि ते बहश ु ः प्रामुख्याने कादंबरी आणि आत्मचरित्र या
वास्तववादी लेखनास अनुकूल साहित्यप्रकारांना पुढे आणत
दिले. लघुकथा हा साहित्यप्रकार वास्तववादाच्या या
जयजयकारात किरकोळ ठरला.
प्रस्थापित होऊ लागलेल्या या वास्तववादाचे स्वरूप कसे
होते, हे पाहणे गरजेच े आहे.
अलीकडच्या मराठीतील वास्तववादाचे मोठे प्रणेते
भालचंद्र नेमाडे आहेत. देशीवाद आणि नवनैतिकवाद यांच्या
जोडीला त्यांनी वास्तववादालाही बसवले. १९७५मधल्या
आपल्या एका प्रसिद्ध लेखामध्ये नेमाडे यांनी त्यांची
वास्तववादाची संकल्पना थोडक्यात मांडली आहे. नेमाडे
यांच्या वास्तववादावरची माझी प्रतिक्रियाही अनेकदा पुढे
आली आहे. त्यांतील एक अशी : नेमाडे यांना अभिप्रेत
असलेला वास्तववाद म्हणजे आपल्याशिवायही सृष्टीच े
अस्तित्व अशू शकते, हे सत्य (वास्तव) वस्तुनिष्ठेने जाणणे
होय. प्रत्यक्षवाद आणि तार्कि क अनुभववाद या पाश्चात्त्य
तत्त्वप्रणालींशी या व्याख्येचे जवळचे संबंध आहेत. बाह्य
जगाच्या अस्तित्वाविषयीच्या प्रत्यक्षवादी संकल्पनेला
समाजविषयक तपशिलांची जोड देऊन नेमाडे यांचा
कादंबरीतील वास्तववाद सिद्ध होतो. विवक्षित ज्ञात्याला
कक्षेबाहेर ठे वल्यामुळे या वास्तववादामध्ये सर्वसामान्य
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 77
दैनंदिन व्यवहारांच्या चित्रणाला आणि समूहजीवनाच्या
भानाला अंतिम महत्त्व येते. या दृष्टिकोणातून कादंबरी म्हणजे
समाजजीवनाची नोंद घेणारा, वास्तवाचे दस्तऐवजीकरण
करणारा साहित्यप्रकार ठरतो. या वास्तववादाने वास्तवाला
स्थिर व वस्तुवत् केलेले असल्यामुळे आणि सामाजिक
वास्तवाचे तपशिलात रूपांतर केलेले असल्यामुळे तो साधा-
सरळ, गुंता नसलेला आणि आचरणसुलभ झाला आहे
(थोरात, २०१८, पृ. ६२).ज्ञात्याच्या हस्तक्षेपाशिवायचे
बाह्य जग स्थिर स्वरूपात तिथे आहे, असे ही भूमिका गृहीत
धरते. ती वास्तवाविषयीच्या संकल्पनेत ऐतिहासिकतेला
कोठलेही स्थान देत नाही. वास्तवाची जडणघडण कशी होते,
हा प्रश्न त्यांच्या वास्तववादविषयक विवेचनाला पडत नाही.
त्यांना अभिप्रेत असलेले वास्तव फक्त असते आणि ते
वस्तुनिष्ठेने जाणायचे असते.
व्यवहारामध्ये हा वास्तववाद कसे काम करीत
होता?वास्तव तिथे बाहेर आहे, लेखकाने त्याचे प्रतिरूपण
करावे यासाठीच बहध ु ा ते अस्तित्वात आले आहे, लेखकाने
ते फक्त खोऱ्याने माती ओढावी तसे आपल्या कथानकाच्या
चौकटीत ओढून बसवायचे आहे, त्याच्यात काही फेरबदल
करणे हा अक्षम्य अपराध आहे, जे आहे आणि ते ज्या
परिस्थितीमध्ये आहे तसे ते आपल्याला स्वीकारायचे आहे,
असे या काळातील वास्तववादी कथा कादंबरी मानताना
दिसते आणि आजही ही प्रवृत्ती फार मोठय़ा प्रमाणात टिकून
आहे. संहितेमध्ये केल्या जाणाऱ्या जगाच्या प्रतिरूपणाचे
एकमेव कारण त्यातून पुढे येते. ते म्हणजे जे आहे त्याचे
आहे तसे चित्रण करावयाचे असते, ही दृष्टी होय. या
वास्तववादामध्ये लेखकाला आपली बुद्धी वापरण्याची विशेष
गरज पडत नाही, वास्तवामध्ये हस्तक्षेप करू पाहणाऱ्या
त्याच्या राजकीय-सामाजिक भूमिकेला काही महत्त्व उरत
नाही, त्याची साहित्यकृतीच्या रूपबंधाची संकल्पना ढोबळ
अनुकृतीच्या पुढे जात नाही. एकूणच लिहिणे ही गोष्ट अत्यंत
सोपी होऊन जाते आणि पिढय़ांनपिढय़ांचे जगण्याचे वृत्तांत
जाडजूड आत्मचरित्र,कथा-कादंबरीच्या रूपाने प्रतिष्ठा पावू
78 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
लागतात. देशीवाद, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य
यांच्यामध्ये खूप मतभेद असले आणि या मतभेदांमधून गेल्या
काही वर्षांतील साहित्यिक राजकारण आकाराला येत असले
तरी त्यांच्या वास्तववादाच्या संकल्पनेत फारसा भेद नाही,
या गोष्टीची नोंद घेणहे ी अगत्याचे आहे.
वास्तववादाच्या या सरधोपट संकल्पना आपल्या
साहित्याच्या दृष्टिकोणातून फारशा बऱ्या नाहीत याची जाणीव
विसावे शतक संपताना, दक्षिण अमेरिकन जादईु वास्तववाद
परिचयाचा होताना, उत्तर अमेरिकन स्वसंदर्भयुक्तता प्रभावी
होताना, जागतिकीकरणाने निर्माण केलेला नवा मध्यमवर्ग
फुगत जाताना, नव्या प्रकारचा भांडवलवाद रूढ होताना,
नवी तंत्रज्ञाने आयात होताना, मुंबईतील श्रमिकांची संस्कृ ती
परिघावर जाताना येथील साहित्याविषयी विचार करणाऱ्या
लोकांना होऊ लागली. १९९८ साली दस्तुरखुद्द नेमाडे
यांनी दिलेल्या एका मुलाखतीत वास्तववाद कालबाह्य
होण्याची, आणि फॉर्ममध्ये काही नवे होण्याची गरज
असण्याची भावना व्यक्त झाली आहे. ‘पण आता हा
वास्तववाद प्रस्थापित झाल्यानंतरची सर्जनशीलता जर काही
म्हणता येईल, तर आता तुम्हाला त्यापुढे थोडंतरी जाता आलं
पाहिजे. म्हणजे लेखक म्हणून तुम्हाला आता वास्तववादाच्या
पुढची काहीतरी मजल गाठता आली पाहिजे (नेमाडे,
२००८, पृ. १५६)’ हे नेमाडे यांचे विवेचन वास्तवादाच्या
पायाखालचा आधार काढून घेणारे आहे. २००० सालच्या
मुंबईतल्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात झालेल्या चर्चासत्राच्या
बीजभाषणात आपल्या कादंबरीकारांच्या रूपविषयक
संकल्पना स्पष्ट असल्याचा पुरावा दिसत नाही, अशी तक्रार
केली आहे. रूप असणे आणि रूपवादी असणे यामध्ये भेद
असतो असे सांगन ू नेमाडे यांनी १९७५ ते २००० या
कालखंडाविषयी बोलताना ‘रूपासाठी दर युगात ठासून
भांडावं लागतं. मराठीत रूपाची आवश्यकताच
साहित्यविचारातून नाहीशी झाली. गेल्या पंचवीस वर्षांत
रूपाविषयी चांगलं चर्चासत्रही झालं नाही. मागे वळून
पाहताना, गेल्या पन्नास वर्षांत मर्ढेकर-रेगे ह्यांच्यापासून
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 79
आजपर्यंत मराठी कवींनाच तेवढी रूपाची जाण असल्याचं
दिसतं. मात्र कादंबरीकारांना कितीही बरे दिवस आले तरी
रूपाची साधी जाणीवही दिसत नाही. हे मराठी कादंबरीचं
सर्वांत मोठं दर्दैु व म्हणता येईल’ (नेमाडे, २००९, पृ.
११८), असे उद्गार काढले आहेत. २०००च्या आसपासचे
मराठीतील कल्पितकथा लिहिणाऱ्या लेखकांना वास्तव आणि
रूप यांच्या द्वंद्वातून मार्ग काढावा लागत होता आणि हा मार्ग
काढत असताना चित्रण करण्याचे काही अपारं परिक मार्ग
शोधावे लागत होते. जयंत पवार हा कथालेखक याच
काळात आपले कथालेखन करू लागला होता.
मराठीतील अनेक लेखकांना सरधोपट वास्तववाद
अडचणीचा वाटू लागला होता. त्याला दसरे ु पर्याय शोधण्याची
गरज भासू लागली होती. वास्तववादाच्या पुढे जाण्यासाठी
जादईु वास्तववाद उपयुक्त ठरू शकतो असे नेमाडे यांनीही
सुचवले होते. त्यांत युरोप अमेरिकेमध्ये अवतरलेली
उत्तरआधुनिक अवस्था भारतामध्येही अवतरू लागली आहे,
असे अनेकांना कमीअधिक गंभीरपणे वाटू लागले होते.
जागतिकीकरणाचे परिणाम हेच सुचवत होते. या अवस्थेशी
संवादी असलेली पाश्चात्त्य उत्तरआधुनिक कल्पितकथा
आपल्याकडील आंतरराष्ट्रीय पातळीवरचे वाचन असलेल्या
वाचकांना आकर्षून घेऊ लागली होती. पारं परिक रूपबंधाच्या
विरोधात तिने केलेली बंडखोरी आपल्याकडील सरधोपट
वास्तववादावरचा अक्सीर इलाज आहे, असे बऱ्याच
लेखकांना वाटू लागले होते. जयंत पवार यांच्या
वरनभातलोन्चा...मधील कथालेखनावर या परिस्थितीचा
बराच परिणाम झाला आहे असे आपल्याला वर केलेल्या
त्याच्या विश्लेषणाच्या आधाराने म्हणता येते.
यात अर्थातच अवैध असे काहीही नाही. तथापि, विशिष्ट
प्रकारचे रूपबंध किंवा कथनशैली म्हणजे काहीतरी
आशयनिरपेक्ष साधनसामग्री नसते. रूपबंध सोबत त्याच्या
आशयाला घेऊन येत असतो. त्याच्यात बदल करायचा
असेल रूपबंधाला रूपांतरणाच्या प्रक्रियेतन ू न्यावे लागते.
त्याच्या अगोदरच्या व्यवहारापासून त्याला तोडावे लागते.
80 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
त्याच्यामध्ये काही नवे हेतू घुसवावे लागतात. त्याच्या
पूर्वसिद्ध रूपाची विरचना करावी लागते, किंवा हे काहीही न
करता त्याला असलेले आशयाचे संदर्भ स्वीकारावे लागतात.
म्हणूनच अनिल दामले यांच्या गौतमची गोष्टचा रूपबंध मला
अर्थपूर्ण वाटतो. कादंबरीतून व्यक्त होणाऱ्या जीवनभानाशी
त्याचे आंतरिक नाते आहे. मकरं द साठे यांच्या
कादंबरीलेखनाविषयीही असेच म्हणता येईल.श्याम मनोहरांची
कादंबरी आपल्या जीवनभानाशी सुसंगत रूपबंध शोधण्याचा
सतत प्रयत्न करते आहे. जयंत पवारांच्या वरनभातलोन्चा...
मधील कथांमध्ये जीवनभान आणि रूपबंध यांच्यात असे
आंतरिक नाते आहे असे दिसत नाही. तिचा गाभा
वास्तववादीच आहे. वास्तववादाचे अधिक प्रगत, सखोल,
व्यामिश्र व समर्पक रूप शोधण्याऐवजी आधाराला घेतलेली
वास्तवाची फांदी तोडण्याचा उपक्रम त्यांची अलीकडची
रूपविषयक जाणीव करू लागली आहे.मात्र जेव्हा त्यांची
कथा या मार्गाने जात नाही तेव्हा ती विशेष परिणामकारक
ठरते हे या संग्रहातील शीर्षककथेच्या आधाराने म्हणता येते.

संदर्भ :
थोरात हरिश्चंद्र आणि पवार जयंत, २०१२, हरिश्चंद्र
थोरात आणि जयंत पवार यांच्यातील ई-संवाद, मुक्त शब्द,
जून—२०१२.
थोरात हरिश्चंद्र, २०१८, मराठी कादंबरी : त्रेसष्ट ते
तेरा, शब्द पब्लीकेशन, मुंबई.
नेमाडे भालचंद्र, २००८, निवडक मुलाखती,
लोकवाङ्मय गृह, मुंबई.
नेमाडे भालचंद्र, २००९, सोळा भाषणे, लोकवाङ्मय
गृह, मुंबई.
पवार जयंत, २०१५, वरनभातलोन्चा नि कोन नाय
कोन्चा, लोकवाङ्मय गृह, मुंबई.

- हरिश्चंद्र थोरात
संपर्क -९८१९०९४२३६
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 81
‘समकालीन सामाजिक
पर्यावरणाचा चिंतनात्मक
दस्तऐवज'ः ‘धळ ू पेर'

डॉ. विनायक येवले

ll१ll
प्रत्येक काळाचे विशिष्ट असे समाजशास्त्र असते. तसेच
त्या काळाचा एक चरित्रपटही तयार झालेला असतो. ह्या
कालपटावर कार्यरत असलेली व्यवस्था आपल्या मनःपूत ISBN 978-93-82364-57
-3

धोरणानुसार जनमानसाचे मानसशास्त्रही घडवते. कालानुरूप


शासन बदलते, शासकही बदलतात, पण समाजातील प्रश्न 9 7893 82 3645 80

आणि व्यवस्थाप्रणित वटहक ु ू म मात्र कायम राहतात. फारतर


प्रश्नांचे स्वरूप बदलते; समाजाच्या जगण्याच्या पद्धती
बदलतात. शोषणाचे संदर्भ आणि रीती तेवढय़ाच बदललेल्या
असतात. सामान्यांच्या जगण्याला पोखरणाऱ्या

82 & ‘w³V eãX Am°JñQ 2020


शोषणव्यवस्थेचा आणि शोषल्या जाणाऱ्या सामान्य माणसांच्या
गलितगात्र जगण्याचा सखोल विचार केला तर
शोषणव्यवस्थेची मुळं किती खोलवर पसरली आहेत याची
प्रचिती येते. शोषणाच्या मुळाशी जातीचा युटोपिया जसा
कार्यरत आहे, तसेच धर्म, सत्ता, आर्थिक हितसंबंधांचाही
संदर्भ कार्यरत आहे. सध्याचा काळ परस्पर आंतर्विरोधांनी
ग्रासलेला असून संविधानप्रणित धर्मनिरपेक्षतेच े मार्गदर्शक

तत्त्व धोक्यात आले आहे. धार्मिक मूलतत्त्ववाद वेगाने


फोफावत असून धर्माची सत्ता की धर्मपूरक सत्ता असा संभ्रम
जनसामान्यांच्या मनात वाढत आहे. धर्मपुरस्कृ त राष्ट्रवादाचे
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 83
पुनरुज्जीवन करून धार्मिक मूलत्त्ववादाला खतपाणी घातले
जात आहे. जुन्याच प्रश्नांचे भांडवल करून भावनिक
आवाहनातून समाजमनात धार्मिक, जातीय अस्थिरतेच े विष
कालवले जात आहे. समाजातील प्रश्नांची प्राथमिकता
सत्ताधारी विसरले असून अस्मितांच्या माध्यमातून सामान्यांना
वेठीस धरण्याचे पाताळयंत्री षडयंत्र शासनस्तरावरून निष्ठेने
आखले जात आहे. निसर्गाचा प्रपाती कोप आणि असहकार,
सततचे दष्काळ ु व नापिकीमुळे होणाऱ्या शेतकऱ्यांच्या
आत्महत्या, कामगार, मजुरांची बेरोजगारीमुळे होणारी
उपासमार, सुशिक्षित बेकारांच्या नोकरीचा प्रश्न, स्त्रियांचे
चाकोरीबद्ध जगणे आणि स्त्रियांवरील वाढत्या अत्याचारामुळे
त्यांच्या सुरक्षिततेवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह, जातीय,
धार्मिक द्वेषातून वाढणाऱ्या हिंसाचारावरून लक्ष हटवून
अनुत्पादक गोष्टींवर लक्ष कें द्रित करणारी शासनव्यवस्था व
त्यांची उद्योजकधार्जिणी धोरणं अनेक नव्या प्रश्नांना जन्मास
घालत आहेत. पण याबद्दल फारसे कुणी बोलत नाही. जे
बोलतात त्यांचा हेतू ‘स्व' विकासकें द्री असतो. तथापि
सत्ताधाऱ्यांची मर्जी जोपासत वास्तवाला विपर्यासात्मक
पद्धतीने समाजासमोर आणण्यासाठी आपले कसब पणाला
लावणाऱ्यांचीच संख्या समाजात जास्त आहे. पण समाजातल्या
मूलभूत प्रश्नांना जाणीवनेणिवेने भिडणारे फार कमी लोक
आहेत. सभोवताल सारासार समजून घेऊन वर्तमानाची नाडी
तपासणे हे फार कमी लोकांना शक्य होते. सामान्यांची,
अभावग्रस्तांची बाजू घेऊन पोटतिडकीने बोलणाऱ्यांची संख्या
तशी कमीच आहे. त्यात डॉ. आसाराम लोमटे यांनी ‘धूळपेर'
या पुस्तकाच्या माध्यमातून समकाळाला भेडसावणाऱ्या
प्रश्नांच्या विचारविश्वाला चर्चेच्या कें द्रस्थानी आणले आहे.
एक सिद्धहस्त कथालेखक म्हणून मराठी साहित्यविश्वाने
आसाराम लोमटे यांचा यथोचित गौरव केला आहे. त्यांनी
आपल्या कथेतन ू सामान्यजनांच्या मूक जाणिवांना शब्द
नेमका दिला आहे. एक माणूस म्हणून, बांधिलकी जपणारा
चिंतक म्हणून आपल्या आस्थाविषयांना धूळपेर या पुस्तकातून
लोमटेंनी समर्थपणे हात घातला आहे. वास्तविकतः लोमटे
84 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
यांनी ‘धूळपेर' या पुस्तकातील लेखन २०१४ साली दै.
लोकसत्तामधून सदर पब्लिकेशनकडून केलेले आहे. पुढे या
लेखनाचे २०१७ साली शब्द प्रकाशनाकडून ‘धूळपेर' याच
शीर्षकाचे पुस्तक प्रसिद्ध झाले. ‘धूळपेर'मध्ये एकूण
सत्तेचाळीस लेख असून एकूण नऊ अंतर्गत विभाग कल्पिले
आहेत. प्रत्येक विभागाला जोडणारे एक अंतःसूत्र यात आहे.
प्रत्येक विभागाच्या प्रारं भी त्या त्या विभागाच्या चिंतनसूत्राचा
सूत्ररूप सारांश देऊन त्या विभागातील विचारांची दिशा
सूचित केली आहे. शिवाय ‘धूळपेर'मधील लेखनाला अधिक
परिणामकारक बनवण्यात बाळ ठाकूर यांच्या चित्रांची बरीच
मदत झाली आहे. हे लेखन सदररूपाने केलेले असले तरी
पारं परिक ‘सदर' लेखनात मोडत नाही. यातले विषयही
पारं परिक मूडला छेद देतात. वर्तमानात घडणाऱ्या घडामोडींची
माहिती पुरवणारे, लक्ष वेधन ू घेणाऱ्या घटनेला कोट करणारे,
सामाजिक, राजकीय वलय असलेल्या व्यक्तींच्या
कार्यकर्तृत्वाचे रसभरीत वर्णन करणारे, एखाद्या विशेष
बाबीवर साधकबाधक चर्चा घडवून आणणारे लेखन
वेगवेगळ्या सदरांच्या माध्यमातून नित्याने होत असते.
‘धूळपेर'मधील लेखन केवळ घटनेचा वृत्तांत पुरवणे
नाकारते.समकाळाला भेडसावणाऱ्या, सामान्यांना
उद्ध्वस्तीकरणाकडे खेचन ू नेणाऱ्या प्रश्नांना व प्रश्न निर्माण
करणाऱ्या भांडवली, सत्ताधारी धोरणीधुरीणांच्या मानसिकतेला
उघड करणारे हे मुक्तचिंतन आहे. काळ आणि भौगोलिक
परिसीमांच्या चाकोरीत हे चिंतन बसवता येत नाही कारण
एका मोठय़ा भौगोलिक व्यास-परीघाला चिंतनाच्या कक्षेत
आणले आहे. हे लेखन कुठल्याही तात्कालिक घटना-
घटितांचे रिपोर्ताजही देत नाही वा औचित्यपूर्णतेच्या खपावू
अभिरूचीला अनुकूल राहत नाही म्हणूनच हे लेखन उठून
दिसते.

ll२ll
पहिला विभाग लेखकाच्या हेतक
ू थनाचा असून त्यात
दोन लेख आहेत. ‘आम्ही लटिके ना बोलू' या लेखातून
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 85
‘धूळपेर' या शब्दाचे कृषिवलांच्या जीवनातील वेगवेगळे
संदर्भ उलगडून दाखवताना लेखकाने या लेखनामागील
प्रयोजनही नमूद केले आहे. ‘‘आजचे अस्वस्थ ‘वर्तमान'
त्यातल्या गुंतागुंतीसह समजून घेताना त्यातले बारकावे उघड
व्हावेत असाही हा प्रयत्न आहे... ‘धूळपेर'च्या माध्यमातून
अनागर अशा समाजव्यवस्थेतील वंचित समूहाचा आडवा
छेद मांडण्याचे प्रयोजन आहे. बालपणीचा काळ सुखाचा,
असे म्हणत स्मरणरमणीयतेत घेऊन जाणारे किस्से आणि
जुना गाव आठवण्यातला आनंद या ठिकाणी दिसणार नाही.
समकालीन जगणे हाच या लेखनाचा परीघ आहे. तीच या
‘धूळपेर'ची जमीन आहे." केवळ वर्तमान जगण्याला आणि
भयचकित करणाऱ्या प्रश्नांना चर्चास्थानी ठे वण्याची ही
भूमिकेतली स्पष्टता आणि लेखनाची प्रयोजनावर ठाम
राहणारी दिशा सबंध पुस्तकातून दृष्टि पथात येते.

ll३ll
दसऱ्या
ु विभागात आठ लेख असून समकाळातील
कृषीव्यवस्थेतील वास्तवाचे सूक्ष्म बारकावे टिपतात.
कृषकसमाजाच्या निसर्गाशी असलेल्या जैविक
नात्यांचाआदिबंध उसवून दाखवताना पेरणीच्या दिवसांमधील
शेतकऱ्यांची ओढाताण आणि त्यांनी पाहिलेल्या भविष्याच्या
सुखदायी स्वप्नांचे बीज जमिनीत रुजवण्याच्या धडपडीचे
शब्दचित्र ‘शुद्ध बीजापोटी' या पहिल्याच लेखातून दृष्टीस
पडते. ‘पेर्ते व्हा' ह्या लेखातील शेतकऱ्यांचे पावसावरील
अवलंबित्व आणि शेतकऱ्यांच्या भावस्वप्नांमधील सुप्त-
प्रकट संघर्षाची अधोरेखिते लक्ष वेधन ू घेतात. ‘काळ्या
आईची लाडकी मुल'े हा लेख खऱ्या आणि उपऱ्या
शेतकऱ्यांमधील फरक टोकाच्या उपरोधिकपणे अधोरेखित
करतो. यातील उपहास वस्तुस्थितीला मूळ रूपात आणतो
पण कडवटपणाचा लवलेशही यात डोकावत नाही, तसेच
वाचकाला वस्तुस्थितीच्या गाभ्यात डोकवायला भाग पाडतो.
पारं परिक शेती व शेतकरी देशोधडीला लागलेले असताना
शेतकऱ्यांचा एक नवा वर्ग उदयास आला आहे याकडे
86 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
निर्देश करणारा हा वेगळा लेख आहे. हा नवा शेतकरी
भाबडा नाही, देवभोळेपणही त्याच्याकडे नाही. तो व्यवहारवादी
आहे, चाणाक्षपणा त्याच्यात ठासून भरलेला आहे. तो
कावेबाज आहे. आपल्याकडे जमलेल्या मायेचा सदपयोग ु
म्हणून आणि दसरीकडे ु उपरी बांधिलकी म्हणूनही जमीन
घेणारा हा शेतकरी जेव्हा मूळ शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची
भाषा बोलायला लागतो तेव्हा परिस्थितीतील विरोधाभास
आणि गांभीर्य लक्षात घेण्यासारखे आहे याकडे लेखकाने
निर्देश केला आहे. ‘दो बिघा जमीन आणि किं गफिशर' हा
लेख गावपातळीवरील सावकारी व्यवस्थेवर प्रकाश टाकतो.
शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिढीला सावकारी व्याजाचा विळखा
पडत गेला आणि सावकारी कर्जापायी शेतकरी व
कृषीव्यवस्था मोडून पडली. कर्जमाफीसुद्धा शेतकऱ्यांना एक
चकवाच ठरतो तेव्हा या कर्जापायी, सावकारांच्या तगाद्यापायी
अनेक शेतकऱ्यांनी गळफास घेऊन स्वतःला संपवले. जोडे
झिजवूनही बँकांकडून कर्ज मिळत नाही तेव्हा खाजगी
फायनान्स आणि सावकारांकडून कर्ज घेण्याशिवाय
शेतकऱ्यांना, शेतमजूरांना दसरा ु पर्याय उरत नाही. तर
दसरीकडे
ु उद्योजकधार्जिणे शासन आणि बँका विजय
मल्ल्यासारख्यांना अमाप कर्ज देतात आणि माल्या बँकांचे
कर्ज बुडवून पसार होतो या विसंगतीला या लेखातून उजागर
केले आहे. ‘‘मोल नाकारणारा बाजार'' या अन्वयार्थक
शीर्षकाच्या लेखातून शेतकऱ्यांच्या मालाचा भाव ठरविणाऱ्या
बाजारातले संगनमतावर आधारलेले राजकारण उघड केले
आहे. खरेदी-विक्रीसंदर्भात केली जाणारी चलाखी हे
बाजारातले वास्तव भयाण आहे. शेतकरी प्रत्येक टप्प्यावर
गंडवला जातो आणि सगळ्यात मोठे दर्दैु व हे की त्याने
उत्पादित केलेल्या वस्तूंचा, शेतधान्याचा भाव ठरविण्याचे
अधिकार मात्र उत्पादनप्रक्रियेशी ज्यांचा अर्थाअर्थी संबंध
नाही अशांच्या हाती एकवटलेले असतात. आडत-व्यापारी
अन् बाजार समित्यांच्या मनःपूत खरेदीभावाने शेतकरी पुरता
नागवला जातो. शेतकऱ्यांची लुबाडणूक करणाऱ्या
बाजारकें द्री यंत्रणेतील षडयंत्राला हा लेख उघड पाडतो.
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 87
कथेचा बाज घेऊन आलेला ‘‘कापूस म्हणाला उसाला'' हा
लेख बागायती शेतीच्या परिसरातील लोकमानसाचा पोत
आणि कोरडवाह ू परिसरातील लोकमनाची सल प्रतीकात्मक
पद्धतीने विशद करतो. ऊस हा पश्चिम महाराष्ट्राची ओळख
आणि सुबत्ता ठसवतो तर कापूस हा मराठवाडा आणि
विदर्भाचे दरिद्री प्राक्तन ठळक करतो.
नव्याने येऊ घातलेल्या कुठल्याही गोष्टींकडे टोकाच्या
नकारात्मकतेने पाहण्याची पद्धत आहे. एकांगी चित्र रं गवून
एखाद्या नव्या बाबीला मोडीत काढण्याचा इथला शिरस्ता
आहे. बदलांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी कोत्या स्वरूपाची
राहिलेली आहे. ‘‘हिरव्या संस्कृ तीचे रक्षक'' या लेखातून
आसाराम लोमटे यांनी नव्या बदलांबाबतीत स्वागतशीलता
दाखवली आहे. घरातल्या, शेतातल्या कष्टाचा भार कमी
करणाऱ्या अनेक गोष्टी इथे स्थिरावल्या आणि श्रम कमी
आणि सुलभ होत गेल.े पण या यांत्रिक बदलांकडे स्वागतशील
वृत्तीने पाहिले गेले नाही, उलट या बाबतीत चुकीची मांडणी
केली गेली. याबाबतीत आसाराम लोमटे वेगळी भूमिका
घेतात. ते म्हणतात, ‘‘श्रमाला सुकर, सुलभ करणाऱ्या आणि
मजुरांनाही ढोरकष्टातून मुक्ती देणाऱ्या यांत्रिकीकरणाचे
स्वागतच करायला हवे. असे घडत मात्र नाही. तुम्ही
यांत्रिकीकरणाबद्दल बोलू लागलात म्हणजे तुम्ही लगेच
‘मजूरविरोधी' अशी भूमिका घेतली जाते. ज्यांना राबायचेच
नाही त्यांना असे बोलून मोकळे होता येते; पण ज्यांना
राबायचे आहे त्यांचा ताण कमी करणारी, कष्टाचा शीण
हलका करणारी यांत्रिकता जिथे कुठे असेल तिचा स्वीकारच
करायला हवा'' विधायक गोष्टींना डावलून खोटय़ा
संस्कृ तीरक्षणाचा खोटा आव आणणाऱ्या समाजाच्या
मनोविकारांवर प्रस्तुत लेख नेमके बोट ठे वतो. अस्मानी-
सुल्तानी संकटांनी मोडून पडलेला शेतकरी मरणाला जवळ
करताना दिसतो. दष्काळ, ु नापिकी, गारपीट अन् कर्जाच्या
डोंगरापुढे हतबल झालेला शेतकरी जीवनयात्रा संपवून
लेकरांना, कुटुंबाला पोरक्या अवस्थेत सोडून जातो.
शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणारा ‘‘थांब! जरा
88 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
मागे वळून बघ..'' हा लेख वाचून विसरून जावा असा
नाही. संकटं येतात पण आत्मिक बळ एकवटून संकटांचा
धीराने सामना करावा लागतो हे तथ्य मनात ठसवतो. जगाचा
पोशिंदा जगला पाहिजे ही कळवळ्याची परिभाषा मनबुद्धीत
बिंबवणारा सदरील लेख शेतकऱ्यांना भावनिक साद घालतो.

ll४ll
कायम समाजव्यवस्थेच्या काठावर उभे असलेल्या आणि
आपल्या जगण्याच्या संघर्षात स्वतःला झोकून देणाऱ्या
ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, बांधकाम मजूर,
विहीर खोदणारे, खदाण कामगार, झाडे तोडून कोळसा
बनवणारे आदिवासी, जळतण गोळा करणाऱ्या बायका,
सरकारी अनास्थेमुळे भरडले जाणारे मजूर, गुत्तेदार आणि
ठे केदारांच्या शोषणाला बळी पडलेले कामगार. रोजगार
हमीच्या योजनेवर अल्प मोबदल्यात राबणारे मजूर, खडी
कामगार इत्यादींच्या अभावग्रस्त जगण्याला, त्यांच्या
वाटय़ाला येणाऱ्या जीवघेण्या संघर्षाला आसाराम लोमटे यांनी
तिसऱ्या विभागातील लेखांमधून वाचा फोडली आहे. ‘‘मजूर
की मजबूर?'' या लेखातून ऊसतोड कामगारांच्या
हालापेष्टांच े संकीर्तन मांडतांना त्यांच्या मुलांच्या शिक्षणावर
उभे राहणारे प्रश्नचिन्ह व करपून जाणाऱ्या बालपणाच्या
सूक्ष्म नोंदी सापडतात. जगण्यासाठी वर्षानुवर्षे स्थलांतर
ज्यांच्या मानगुटीवर ठाम होऊन बसले आहे अशा स्थलांतरित
समाजाच्या विसकटलेल्या सामाजिक व आर्थिक परिस्थितीचा
हिशोब मांडतो. रखरखत्या उन्हात पोटासाठी खपणाऱ्या
मजूर कामगारांच्या दरिद्री जगण्याची दाहकता ‘‘ज्यांचे घर
उन्हात!'' या लेखातून चर्चिली आहे. शेतकऱ्यांच्या
आत्महत्या हा समकाळातला ज्वलंत प्रश्न म्हणून पुढे आला.
या आकडेवारीत दररोज भर पडताना दिसते. भरीस भर
म्हणून आता मजूर व कामगारही आपले जीवन संपवू लागले
आहेत. ‘‘शेवट नसलेली गोष्ट'' या लेखातून मजुरांच्या
आत्महत्या आणि त्याला कारणीभूत असलेल्या कारणांची
चर्चा आसाराम लोमटे यांनी केली आहे. रोजगार हमी या
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 89
शासकीय योजनेत काम करून त्या कामाचा मोबदला
मिळाला नाही, शिवाय आपल्या कष्टाचे मूल्य मिळावे म्हणून
हरत-हेचा संघर्ष करूनही हाती काहीच लागले नाही म्हणून
बुलडाणा जिल्ह्यातील पाच मजुरांनी स्वतःला संपवल्याची
बाब पुढे आली. वस्तुतः या मजुरांनी आत्महत्या केलेल्या
असल्या तरी त्यांना सर्वस्वी जबाबदार शासनाची अनास्थावादी
धोरणे आणि इथे बोकाळलेला असुरी भ्रष्टाचार आहे हे
दृष्टीआड करून चालणारे नाही. वस्तुतः या आत्महत्या
नसून हत्या असल्याचा निर्वाळा या लेखातून मिळतो.
‘‘घामाला सुगंध असतो?'' अशा प्रश्नार्थक वाक्याच्या
लेखात श्रमाला प्रतिष्ठेची लेबलं चढवणाऱ्या प्रचलित
व्यवस्थेने रूढ केलेली न्यायाची परिभाषा व आदर्शवादी
धारणांची मूलभूमी किती भुसभुशीत आणि कष्टकऱ्यांच्या
काबाडकष्टाचा संकोच करणारी आहे याची प्रचिती प्रस्तुत
लेखातून येते. उच्चभ्रू समाजाने राबणाऱ्यांच्या कष्टाला
वेगवेगळ्या परिकल्पनांमध्ये गुंफून त्यांच्या कष्टाचे
गौरवीकरण केले आहे. कष्टाला निरनिराळ्या सौंदर्यवादी
परिभाषेत गुंफून वस्तुस्थितीच्या विश्लेषणाचे पर्याप्त मार्गच
बंद करणाऱ्यांच्या धूर्त परिभाषेचा आदर्शवादी कांगावा लोमटे
यांनी उघड पाडला आहे. ते म्हणतात, ‘‘ज्यांना राबायचे
नाही तेही घाम गाळतात पण हा घाम वेगळा. त्यांचे घाम
गाळणे कोणी वापरून घेत नाही, हेही घामाने निथळतात पण
त्यावर त्यांचे पोट अवलंबन ू नाही. उष्मांक जाळण्यासाठी
घाम गाळणे आणि पोट जाळण्यासाठी घाम गाळणे यात मोठे
अंतर आहेच पण दोहोंत पूर्वापार संघर्षही आहे. तो संघर्ष
समजून घेतला तर ‘घामाला सुगंध असतो' असे म्हणण्याचा
भाबडेपणा कुणी करणार नाही.'' कष्ट करणाऱ्यांचा उदोउदो
करून त्यांचे शोषण करत राहण्याच्या इथल्या कूट
धारणांमागील सत्य समोर आणले आहे. सत्ताधीश आणि
सामान्य, सधन आणि निर्धन, व्यवस्थेचे म्होरके आणि
तळपातळीवरील कंगाल मजुरांना खाव्या लागणाऱ्या खस्ता
आणि प्रशासकीय व्यवस्थेपुढील त्यांच्या हतबलतेच े संदर्भ
मूळाबर उलगडून दाखवणारे हे चिंतनसूत्र भूमिगत वास्तवाचा
90 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
पाठपुरावा करते.
‘‘उन्हातल्या पूर्वजांचे सावलीतले वारस...'' या लेखात
आपल्या मुलांची आयुष्यभर ढोरकष्टात कुतरतोढ होऊ नये,
आपली हयात राबण्यात गेली तशी आपल्या मुलांची जाऊ
नये असे वाटणाऱ्या शेतकऱ्यांनी मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात
आणून सोडले. पदरमोड करून, खस्ता खाऊन मुलांना
शिकविले, पण शिकून मोठय़ा पदांवर गेलले ्या शेतकऱ्यांच्या
मुलांनी मात्र आपली कष्टकऱ्यांची पूर्वपरं परा सपशेल
विसरून ‘स्व' बांधवांनाच लुबाडण्याचा चंग बांधला; या
वास्तवाकडे लक्ष वेधले आहे. कष्टकऱ्यांच्या घरातून शिकून
मोठे झालेल्यांचा करं टेपणा, व्यवस्थेचे दलाल होऊन
आपल्याच भाऊबंदांना लुटणाऱ्यांचा भ्रष्ट चेहरा या लेखनातून
उजागर केला आहे. कृषिसंस्कृ तीत बैलाला महत्त्वाचे स्थान
असून त्याच्या कष्टाची उतराई म्हणून बैलपोळ्यालाही अनन्य
महत्त्व राहिलेले आहे, पण आधुनिकीकरणाच्या वेगवान
काळात, बदलत्या यांत्रिकीरणाच्या पार्श्व भूमीवर शेती
कसण्यासाठी बैलांची गरज राहिली नाही. पारं परिक पद्धतीने
शेती कसण्याच्या पद्धती बाद ठरत गेल्या आणि बैल
सांभाळणे वरचेवर अवघड होत गेल.े पण ‘‘बैलाची माती...
मातीचे बैल...'' या रूपकात्मक पद्धतीने लिहिलेल्या
लेखातून बदलत जाणाऱ्या सामाजिक परिस्थितीबरोबरच
मानवी वृत्ती-प्रवृत्तीची सांगोपांग चर्चा केली आहे. बैलांच्या
अनुषंगाने समाजमनात ठाम होऊन बसलेल्या मनोधारणांचाही
मागोवा घेतला आहे. आज खरेखुरे बैल दिसत नाहीत पण
आपला शेतीची असलेला आदिबंध जपण्याच्या असोशीतून
बैलपोळ्याला मातीच्या बैलाची पूजा करण्याचा प्रघात रूढ
होत आहे याकडे लेखक लक्ष वेधतात. दष्काळामु ु ळे केवळ
शेतकरी मोडून पडत नाही तर त्याच्या दावणीला असलेल्या
जित्राबाच्या जिवावरही दष्काळु उठतो. ‘‘मुकी बिचारी'' या
लेखातून दष्काळात
ु चारापाण्याअभावी खंगत चाललेल्या
मुक्या गुराढोरांचे हाल आणि शेतकऱ्यांच्या जनावरांशी
असलेल्या ऋणानुबंधाला चिंतनपटावर आणले आहे. दष्काळ ु
पडला की शेतकऱ्यांना गुरांचे होणारे हाल पाहवत नाहीत
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 91
अन् ही जनावरं खाटकाला विकायचे पातक त्यांच्याकडून
होत नाही, अशा वेळी दलाल शेतकऱ्यांना फसवून कमी
भावात जनावरं घेतात आणि या मुक्या जनावरांची रवानगी
खाटिकखान्यात होते. शेतकऱ्यांच्या विरोधी जाणारी परिस्थिती
या लेखाचे अंतःसूत्र आहे.

ll५ll
चौथ्या विभागात एकून तीन लेखांचा समावेश असून
त्यापैकी ‘‘असला नवरा नको गं बाई'', हा लेख आजच्या
गावपातळीवरील एका ज्वलंत समस्येकडे बोट दाखवतो.
खरे तर शहरातल्या मुली शेतकऱ्यांच्या मुलांशी संसार
थाटत नाही हे सिद्ध झालेले तथ्य आहे, पण आजघडीला
खेडय़ातील मुलींनाही शेतकरी नवरा नको आहे. शेतकीचे
कष्टप्रद जगणे आणि आयुष्यभराचा भोगवटा नाकारण्याकडे
खेडय़ातल्या मुलींचाही कल वाढला आहे. बेभरवशाची
शेतीव्यवस्था आणि कष्टाचा शिणवटा नको असणाऱ्यांना
शहरी नवरा आणि मासिक वेतनाचे सुख खुणावत आहे.
यातून शेतात राबणाऱ्या शेतकरी मुलांची लग्नं होत नाहीत
हे नागडे सत्य या लेखातून ठळक होते. स्त्री म्हणजे कष्ट
असे समीकरण बनलेले असताना ‘‘पोरी पळत आहेत
रानातून...'' या लेखाने बदलत्या काळ परिवेषाच्या
पार्श्व भूमीवर गावखेडय़ातील मुलींच्या शिक्षणाच्या वाढत्या
प्रमाणाचे चित्र रं गवण्याबरोबर मुलीच्या विस्तारणाऱ्या
भावविश्वाला मनस्वी शब्द दिला आहे.
‘‘झेपावणाऱ्या ठिणग्या'' हा लेख गावपातळीवरील
लढवय्या स्त्रियांची कर्तबगारी अधोरेखित करतो, तसेच
दसरीकडे
ु बदललेल्या कायद्याने स्त्रियांना प्रशासनात स्थान
तर मिळाले, पंचायतराज व्यवस्थेत ती स्थिरावली पण
निर्णयप्रक्रियेपासून मात्र जाणीवपूर्वक तिला अलिप्त ठे वले
गेल.े ती केवळ एक कठपुतळी म्हणूनच सत्ताकें द्रात
वावरताना दिसते. सहीची धनी असलेली स्त्री पॅसिव्हच
राहिली या वास्तवाकडेही लक्ष वेधतो. ग्रामीण भागातल्या
स्त्रियांचे परिस्थितीशरण जगणे आणि त्यांच्या भावविश्वाचे
92 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
अलक्षित कंगोरे उलगडून दाखवले आहेत. शहरी सुशिक्षित
स्त्रियांचे सुखभरे जगणे आणि गावखेडय़ातील कष्टकरी
समाजातील स्त्रियांच्या जगण्यामध्ये महदंतर आहे.
गावखेडय़ातील बायकांचे जगणे कष्टाशी कायम बांधले
गेलल े े आहे. परावलंबनाने जखडून टाकणारे, नैसर्गिक
जगणे हरवून बसलेल्या स्त्रिया प्रत्येक स्तरात, वयोगटात
आढळतात. पुरुषसत्ताक व्यवस्थेत तिचे असलेले गौणत्व
आणि परं परेने त्यांच्यावर लादलेल्या दैववादी धारणांमध्येच
स्त्रिया अडकून पडलेल्या आहेत. त्यांचे भावविश्व, आकांक्षा,
सुखकल्पना पुरुषप्रधान व्यवस्थेत आणि परिस्थितीच्या रेटय़ात
चक्काचूर होतात याच्या सूक्ष्म नोंदी वरील लेखांमधून
सापडतात.

ll६ll
पाचव्या विभागात एकूण सहा लेख असून त्यापैकी
‘‘ढगांचा गडगडाट आणि वांझोटे आभाळ'' हा लेख वगळता
इतर पाच लेख इथे सातत्याने पडणारे दष्काळ,
ु दष्काळामु
ु ळे
सामान्यजनांचे होणारे हाल, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा,
जनावरांवर ओढावणारे संकट, इकडूनतिकडून पिक आले
तर अनपेक्षित गारपिटीशी पडणारी गाठ आणि एकंदरीतच
अस्मानी-सुल्तानीच्या छळकपटाने गांजलेल्या ग्रामीण
समाजाच्या अनेकमितीय वास्तव संदर्भांना चिंतनपटावर
आणतात. ‘‘...अशी राहावी तहान'' या लेखातून शासनाच्या
धोरण लकव्यामुळे दरवर्षी निर्माण होणारी पाणीटंचाई आणि
सामान्यांच्या ताटातले राज्यकर्त्यांच्या ओरबाडण्याच्या
प्रवृत्तीवर प्रकाश पडतो. ‘‘बरी या दष्काळे
ु पीडा गेली'' हा
लेख दष्काळीु परिस्थितीतील सामान्यलोकांचे गलितगात्र
जगणे आणि दष्काळात ु शासकीय, राजकीय पातळीवर
चालणारे अभ्यासदौरे, पाहणी, दष्काळनिवारण
ु कार्यक्रमाचे
देखावे, बेगडी आस्था मनावर ठसवू पाहाणाऱ्या राजकीय
नेत्यांच्या भेटीगाठीचे फार्स आणि त्यामागील वास्तव
कारणांचा शोध घेताना आसाराम लोमटे महत्त्वाचे निरीक्षण
नोंदवतात. ते म्हणतात, ‘‘दष्काळ
ु नेहमीच येतो, ‘सिंहस्थ',
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 93
‘कं ु भमेळा' ही जशी पर्वणी तशीच आता दष्काळही ु एक
पर्वणी ठरू पाहातोय. दष्काळ
ु ‘पाहाणे' हाच मोठा ‘इव्हेंट'
ठरू लागला आहे. प्रचंड लवाजम्यासह, माध्यमांच्या
प्रतिनिधींसह आणि कॅमेऱ्याच्या लखलखाटात हे दष्काळी ु
पर्यटन चाललेले असते. या पर्यटनात दष्काळनिर्मूलनाच्या

उपाययोजनांबाबतचे गांभीर्य किती आणि दिखावा किती
यातल्या सीमारेषाच नष्ट झाल्या आहेत. कुठलाही गाजावाजा
न करता, फारसा डामडौल न दाखवता काही तरी उपाय
सातत्यपूर्ण आणि नियोजनातून केले जात आहेत हे चित्र
कधीच दिसत नाही. त्यामुळे दष्काळ ु ‘साजरा' करणे हीच
एक गोष्ट आता सर्वांच्या अंगवळणी पडली आहे.'' या
दष्काळनिवारणाच्या
ु दिखावू कार्यक्रमाच्या आड दर्लक्षित

राहणारे सामान्यांचे वास्तव जगणे आणि त्यांच्या पुढय़ात उभे
राहणारे प्रश्न अनुत्तरितच राहतात. शिवाय दष्काळ ु
निवारणाच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार कुणालाच थांबवता
येत नाही. दष्काळग्रस्त
ु लोकांच्या दारापर्यंत सरकारी योजना
पोहाेचत नाहीत तर त्या राजकीय लोकांकडे वळत्या केल्या
जातात. रोजगार हमीतील भ्रष्टाचार गुरांसाठीची चाराछावणी,
पाणी टँ करमागील लॉबी आदींवरही या लेखातून प्रकाश
पडतो. तोंडी आलेला घास ओरबाडून नेणारे अस्मानी संकट
‘‘आभाळानेच झोपेत धोंडा घातल्यावर..'' या लेखातून
चर्चिले आहे. गारपीटग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि बटईदार
यांच्या परिस्थितीवर भाष्य करताना सरकारी पंचनामा आणि
तुटपुंज्या आपत्तीनिवारणातील ठोकताळे वाचकांसमोर ठे वतो.
अलीकडे नैसर्गिक वातावरणात अामूलाग्र बदल झाले असून
त्याचा फटका शेती आणि शेतीवर विसंबून असलेल्यांना
बसत आहे. एवढेच नाहीतर खेडेगावातील दैनंदिन व्यवहार
कमालीचे गुंतागुंतीचे बनत चालले आहेत.पावसाचा
लहरीपणा आणि शेतकरी, कष्टकऱ्यांच्या दयनीय अवस्थेला
‘‘अंगावर येणारा कोरडय़ा आभाळाचा चांदवा'' या लेखातून
मुखर केले आहे. एकापाठोपाठ एक नक्षत्रे कोरडी जाऊ
लागली तर शेतकऱ्यांनी जमिनीत काय पेरावे हा प्रश्न उभा
राहतो. धूळपेर साधेलच याची शाश्वती नाही. सर्वबाजूंनी
94 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
परिस्थितीच्या कचाटय़ात अडकलेला शेतकरी प्रस्तुत
लेखातून उभा राहतो. शेतकरी आणि विठ्ठलाचे एक सुहृदयी
नाते राहिलेले आहे. आषाढ महिन्यात पंढरपूरच्या वारीची
आस शेतकऱ्यांना लागलेली असते. आपल्या इष्टदेवाला
भेटण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला असतो. दरवर्षी ही
वारी आनंददायी असतेच असे नाही. कारण मातीत बीज
रुजविण्यासारखा पाऊस पडला तर वारीत आत्मिक ऊर्जेसह
सामील होणारा शेतकरी पाहावयास मिळतो. पण आषाढ
कोरडा गेला तर मग वारीत मन लागत नाही. उदासपणे जड
अंतःकरणाने वारीत पावसाची आस मनी धरत शेतकरी
चालत राहतो. कष्टाचा शिणवटा घालवण्यासाठी, रोजच्या
जगण्यातली व्येवधानं विसरण्यासाठी, जीवघेण्या प्रपंचातून
क्षणभर विसावा मिळविण्यासाठी पंढरपुरच्या दिशेने वळलेल्या
असंख्य माणसांच्या भावस्थितीचा अन्वयार्थ लावणारा ‘थरारू
दे वीट!' हा लेख वाचकांच्या मनाचा ताबा घेतो.

ll७ll
‘धूळपेर'मधील पाचव्या विभागातील ‘ढगांचा गडगडाट
आणि वांझोटे आभाळ' हा लेख आणि सहाव्या विभागातील
चारही लेख समकालीन राजकीय परिस्थितीवर आणि
समाजाला आंतर्बाह्य कुरतडणाऱ्या राजकारणावर टोकदार
भाष्य करतात. विशेषतः मागील दशकभरापासून ग्रामीण
समाजात राजकारणाला नवे रं ग चढलेले पाहावयास
मिळतात. राजकीय पक्ष-संघटनांनी खेडोपाडी पाय रोवून
गावपातळीवरील राजकारणाला कमालीचा द्वेषभावनेवर
आधारलेला टोकदारपणा प्राप्त करून दिला. सत्तांधांच्या
सत्तास्पर्धेने गावपातळीवर सौहार्दाचे वातावरण गढूळ करून
टाकले. समाजकारण व विकासकारणाचे अंग वगळता
धार्मिक, जातीयतेवर आधारलेली हीणकस समीकरणे
गावखेडय़ात रूढ केली. तडजोडींवर तरं गणारे सत्तेचे
राजकारण सद्यकाळात चर्चेचा विषय झालेले दिसते.
राजकारणातून समाजकारण हद्दपार झाले असून केवळ
हितसंबंधाचे चिंगम चघळणाऱ्या नतद्रष्ट लोकांची बजबजपुरी
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 95
मात्र सर्वत्र माजली आहे. जनतेच्या प्रश्नांशी काडीचेही
घेणदे ेणे नसणारेच सत्तेच्या उबदार गादीवर पाय पसरून
बसलेले असतात. ‘ढगांचा गडगडाट आणि वांझोटे आभाळ'
या लेखामधून गावपातळीवरील हिणकस राजकारण आणि
नित्याने येणाऱ्या निवडणुकांच्या वास्तवनोंदी घेतल्या आहेत.
गावपातळीवरील वस्तुस्थिती फारच गुंतागुंतीची झाली आहे.
आजचा गाव राजकारणाने पुरता पोखरून टाकला आहे.
निवडणुकांपर्वीू सामान्य माणसांच्या तोंडावर आश्वासनांची
जी पळसपानं पुसली जातात, सुजलाम सुफलामच्या योजनांची
जी फसवी स्वप्नं डोळ्यांत पेरली जातात पण वास्तविक ते
प्रत्यक्षात कधीच उतरत नाहीत याकडे लोमटे लक्ष वेधतात.
‘सत्तेचे रं ग-रूप', ‘हा पान्हा कधी आटेल?', ‘रयत आणि
(आजचे) राजे!', ‘आखाडय़ातली आणि फडातली भाषा' या
लेखांमधून समकाळ कवेत घेताना सामाजिक परिघाला
पोखरणाऱ्या राजकीय पर्यावरणाचे चित्र लोमटे यांनी रेखाटले
आहे. "हा पान्हा कधी आटेल" या लेखातून ग्रामीण भागातील
राजकारणाचा पट मांडताना कालौघात ठाम होत गेलले ्या
सामाजिक ध् रुवीकरणाच्या राजकारण्यांच्या रणनीतीला
अलगद चिमटीत पकडले आहे. राजकारणाला नवी टोकदार
भाषा चिकटली पण समाजविकासाचा रकाना मात्र दर्लक्षितच ु
राहिला याबाबतची तथ्ये या लेखातून मांडली आहेत. ‘रयत
आणि (आजचे) राजे' हा लेख ग्रामीण महाराष्ट्रातील
राजकारणावर आणि भूतकालीन अस्मितांच्या नावाने सत्तेचे
गड अबाधित ठे वू पाहाणाऱ्या सरं जामी वृत्तीवर नेमके बोट
ठे वते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्ताबाजारात
फायद्याचे खाते गळ्यात पाडून घेणारे जनतेच े हरत-हेने
शोषण करताना दिसतात. निवडणुकांच्या तोंडावर सामान्यांचे
उं बरठे झिजवणारे सत्ता हातात पडली की जनतेकडे
सोयीस्करपणे पाठ फिरवतात; हे वास्तव या लेखातून
अधोरेखित होते. राजकारणात वापरली जाणारी विशिष्ट
भाषा आणि त्या भाषेमागे उभ्या असलेल्या समाजमानसशास्त्राचा
उलगडा ‘आखाडय़ातली आणि फडातली भाषा' या लेखातून
सूक्ष्मपणे केला आहे. राजकारणात आखले जाणारे डाव-
96 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
प्रतिडाव, कुरघोडी, कार्यकर्त्यांना ऊर्जा पुरवणारे घोषवाक्य,
सांकेतिकता, धमकी, चिथावणी, समयोचितपणे वापरल्या
जाणाऱ्या म्हणी, वाक्प्रचार या भाषेमधून डोकावणाऱ्या
वृत्तीप्रवृत्तीला हा लेख उजागर करतो. एकंदरीत लेखकाने
या लेखातून राजकीय बोलीभूगोल डोळ्यांसमोर साक्षात उभा
केला आहे.

ll८ll
सातव्या विभागात एकूण अकरा लेखांचा समावेश असून
समकाळाच्या पार्श्व भूमीवर सामाजिक मूल्यांची होणारी
पडझड, धारणा, अवधारणा, वैयक्तिक मूल्यांचा सामाजिक
अवकाश, व्यक्तीचे सामाजिक भानाचा पोत तपासणारे आणि
एकंदरीतच विचार करण्याच्या व जगण्याच्या विविध तऱ्हा
समजून घेणारे हे लेख आहेत. भौतिक सुखाच्या मागे वाहवत
जाणारा समाज, आत्मकें द्रित वृत्तीच े वाढते प्रस्थ, वेगाने वाह ू
लागलेले स्वार्थाचे दषित
ू वारे, त्याची अनियंत्रित दिशा आणि
यात सामान्य, वंचित, उपेक्षितांची व मानवतावादी तत्त्वांवर
चालणाऱ्यांची होणारी दमछाक याचे तटस्थ चिंतन मांडले
आहे. ‘नाद नाय करायचा' या लेखातून हरवत चाललेली
मानवी संवेदनशीलता आणि त्यातूनच जगण्यात वाढत
जाणारी चाकोरीबद्धता याचे चिंतन मांडले आहे. फेसबुक,
व्हॉट्सअपसारख्या नव्या माध्यमांमळ ु े सामाजिक जाणिवेला
कृतीची पालवी फुटावी अशी एक अपेक्षा होती पण उलटपक्षी
जगणे सवंग होत गेल.े संवाद दर्मीळ
ु होत जाऊन आत्मलुब्धता
ठळक होत गेली. सोयीचे तेवढेच पाहायचे हा जणू शिरस्ताच
बनला. सद्यकाळातल्या या आत्ममग्नतेवर भाष्य करणारा हा
महत्त्वपूर्ण लेख आहे.
काळ जसजसा बदलत गेला तसतशा समाजाच्या वृत्ती
आकंच ु न पावू लागल्या. आत्मविकासाचा मार्ग प्रशस्त बनत
गेला. विधायक गोष्टींसाठी प्रचलित असलेली मूल्यात्मक
भाषा आणि भाषातत्त्वांना दिखाऊपणाची बाधा झाली. हे
वर्तमान समाजाचे चित्र ‘सामाजिक बांधिलकीच्या नावाने...'
या लेखातून प्रकटते.. ‘गंगाखेड लुटणे आणि गंगेवर वाटणे'
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 97
अशी एक म्हण प्रचलित आहे. या म्हणीचा प्रत्यय प्रस्तुत
लेख वाचताना येतो. समाजात वावरताना अनेक लोक याच
तत्त्वाचा आधार घेताना दिसतात. समाजातूनच लुटलेली,
ओरबाडलेली धनमाया वाजतगाजत समाजात वाटत फिरतात,
वरतून सामाजिक बांधिलकीचा फेटा घालून मिरवतात. हा
लेख माणसांचे सार्वजनिक जीवनातले वर्तन आणि प्रत्यक्ष
कृतीतील तफावत उजागर करतो. ‘गर्दीत हरवली वाट...'
हा लेख सत्त्व हरवत चाललेल्या वर्तमानाची नाडी तपासतो.
दिलेल्या शब्दाला पाळणारे इमानी आणि स्वाभिमानी लोक
सद्यकाळात पाहावयास मिळत नाहीत. खरे बोलणारांचे तोंड
बंद केले जाते. शब्दाला जागणारा इथे टिंगलीचा विषय
ठरविला जातो, तर इतरांना बरे वाटेल असे बोलणाऱ्यांना
येथील समाज डोक्यावर घेऊन नाचतो. खरे बोलण्यापेक्षा
बरे बोलणारे दिवसेंदिवस वाढत चाललेत. पत म्हणून दिल्या
जाणाऱ्या शब्दांना चिकटलेले विश्वासार्हता हे मूल्य मलिन
झाले आहे. हितसंबंधाने माखलेली समूहाची भाषा आणि
बाजारू चलनी भाषा वरचढ ठरत असून ‘बोले तैसा चाले
त्याची वंदावी पाउले' हे वचन या बाजारी दनिये ु ने मोडीत
काढले आहे. तडजोडवादी सामाजिक पर्यावरणात स्वत्व
आणि सत्त्व जपू पाहणाऱ्यांना हा काळ विरोधी जाणारा आहे.
प्रस्तुत लेख वचन आणि वर्तन यातल्या विसंगतीला कोट
करतो. ‘अजातशत्रूंची वस्ती वाढत आहे..' मला काय त्याचे
अशी एक प्रवृत्ती समाजात वाढत चालली आहे. तटस्थ
असणे वेगळे आणि तटस्थतेच्या आड नामानिराळे असणे
वेगळे. कोषधारी मानसिकता कुठलीही सामाजिक जबाबदारी
पार पाडू शकत नाही, तथापि विधायक वा विघातक दृश्य
वास्तवासंदर्भात कुठलीही ठाम भूमिका वठवित नाही. अशा
बघ्या लोकांमळ ु े समाज मानवी सौहार्दाला पारखा होत आहे.
समाजात वाढत चाललेल्या कातडीबचावू लोकांच्या
मानसिकतेला प्रस्तुत लेखातून चिमटे काढले आहेत.
चळवळींना मूल्यात्मक चेहरा आणि विधायक दिशा देणाऱ्या
भाषेच े सामर्थ्य ‘आवाज कुणाचा' या लेखातून अधोरेखित
केले आहे. जनचळवळींना गतिमान बनवणारी, लोकमानसाला
98 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
जागृत करणारी भाषा सामाजिक उत्थानासाठी प्रेरकच ठरते
पण अलीकडे ही चळवळीची भाषा बोथट झाली असून
व्यवस्थेशी हात मिळवणारे वाढत चालले आहेत. तडजोडीवर
आधारलेल्या, हितसंबंध जोपासणाऱ्या चळवळी तेवढय़ाच
शिल्लक उरल्या आहेत ही खंतही या लेखातून व्यक्त झाली
आहे.
‘सत्वाचे शब्द' आणि ‘आस्थेचा परीघ' हे लेख
कलावंताच्या आतल्या आवाजाला आवाहन करतात. सुंदर
जगाचे स्वप्न पाहनू तशी प्रतिसृष्टी उभा करू पाहणारा
कलावंत जगाच्या दःखवे ु दनांचा वाहक असतो, तरीही तो
आपल्या आतल्या अपेक्षित जगाशी संवादी असतो. त्याला
वेळोवेळी आपले सत्त्व आणि स्वत्व तपासून घ्यावे लागते.
सम्यक दृष्टी आणि भूमिकेवरील निष्ठा हे त्याचे वेगळेपण
जनमानसाच्या मनावर ठसत असते, म्हणून कलावंताने
आपली जबाबदारी ओळखून भोवतालाचे यथातथ्य वास्तव
टिपून घ्यावे अशी अपेक्षा असते. आपल्या अनुभवांशी
एकनिष्ठ राहनू निर्मिती करणारा कलावंत समाजालाही
प्रेरकच ठरतो. ज्यांचा आवाज क्षीण आहे वा ज्यांचे हंदु के
बहिऱ्या व्यवस्थेपर्यंत पोचतच नाहीत अशा वेळी लेखक,
कवींनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून या वंचित,
पीडितांच्या अभावग्रस्त जगण्याशी स्वतःला जोडून घ्यावे.
आपले हस्तक्षेपाचे विधान व्यवस्थेच्या नाही तर मुक्यांच्या
बाजूने वापरावे. तथापि हा आस्थाभाव कोता, तात्कालिक
फायद्यांवर आधारलेला असू नये तर संवेदनेने तो शोषितांच्या
हक्कासाठी कृतिप्रवण असावा असे लेखक प्रस्तुत लेखातून
सुचवत आहेत. व्यवस्थेबाबतीत आणि लेखकाच्या
भूमिकेसंदर्भात आसाराम लोमटे महत्त्वाचे मत नोंदवतात.
‘व्यवस्था इतकी चतुर आणि तडजोडीच्या तत्त्वावर उभी
असते की, तिथे असा वेगळा शब्द उमटूच नये याची
खबरदारी घेतली जाते. व्यवस्थेला प्रश्न विचारणारे नको
असतात, हस्तक्षेप करणारे नको असतात, प्रतिवादी नको
असतात. व्यवस्थेत धडपडून उठू पाहणारा, वेगळे काही
सांगू पाहणारा बरोबर नेम धरून टिपला जातो. अशा वेळी
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 99
तळाच्या माणसाबद्दल बोलण्याची जोखीम उचलली पाहिजे,
हस्तक्षेपाचा शब्द उच्चारला गेला पाहिजे. तळाची वेदना
शब्दांत आली पाहिजे. आपण जे बोलू ते केवळ ‘मोले
घातले रडाया' असे नको, तर ज्याबद्दल बोलू त्याबद्दलची
जिवंत आस्था असली पाहिजे.' सामान्यांची बाजू घेऊन
बोलणे-लिहिणे हेच कवी, लेखकांचे कर्तव्य असल्याचे वरील
अवतरणातून सूचित होते.
एखाद्या विशिष्ट गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन रूढावला
की बाकीचे डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळेपणाने त्याच
मळवाटे वरून चालत राहणार. नव्या परिवर्तनवादी गोष्टींकडे,
वेगळ्या बाबींकडे स्वागतशीलपणे पाहण्याची दृष्टी गमावलेला
समाज आपले गुणदोष पाह ू शकत नाही. तो गतकाळातल्या
गौरवपूर्ण (?) बाबींना कुरवाळीत बसतो. ‘मळवाटा
नाकारताना' ह्या लेखातून आसाराम लोमटे समाजाच्या
पूर्वग्रहदषित
ू रूढीवादी चश्म्यावर साचलेली धूळ पुसनू
काढतात. जुन्या व्यवस्थेबाबतीतले अंधप्रेम व नव्या बाबींना
ठरवून मोडीत काढणाऱ्या मानसिकतेवर बोट ठे वतात.
खेडय़ांच्या उद्ध्वस्तीकरणाला आधुनिकीकरण कारणीभूत
आहे असा समज (गैर) करून समाज आत्मपरीक्षणापासून
सतत दरू पळत आला आहे. सतत दसऱ्यांवर ु खापर फोडून
स्वतः मात्र पळपुटेपणा करणारा समाज भोवतालात पसरला
आहे. शिवाय याच व्यवस्थेत परं परेने रुळलेल्या शोषणादी
व्यवस्थाप्रणित गोष्टींचा पुरस्कार करत आणलेल्या हिणकस
बाबींकडे आसाराम लोमटे लक्ष वेधतात. ग्रामीण खेडय़ाचे
विकृत आणि पूर्वग्रहाधारित चित्र निर्माण करण्यासाठी
ग्रामपातळीवरील समाजच नाही; तर लिहिणारे लेखकही
कारणीभूत आहेत, अशी स्पष्ट भूमिका लोमटे यांनी घेतली
घेतली आहे आणि ती वस्तुस्थितीला धरूनच आहे. साहित्यातून
गावखेडय़ाचे व तेथील समाजाच्या परस्परसंबंधाचे चित्र कसे
चुकीच्या पद्धतीने रेखाटले जाते याकडे निर्देश करताना
लोमटे म्हणतात ‘शेतकऱ्यांचे जगणे चित्रित करणाऱ्या
लेखनात शेतमजुराविषयीची अनास्था आणि शेतमजुरांच्या
जगण्याची व्यथा सांगणाऱ्या साहित्यात शेतकरी येतो तो
100 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
खलनायक म्हणून. वास्तवाच्या पातळीवर दोघेही शोषितच,
पण साहित्यात मात्र एकमेकांचे शत्रू. गावातल्या चार-दोन
धनदांडग्यांचा अपवाद वगळला तर बाकी सगळे एकाच
रेषेत जगतात, पण आपल्याकडे लेखक ज्या समूहातून येतो
तो त्याच समूहाची भाषा बोलतो. सगळ्या प्रकारची वर्गवारी
टाळून वास्तवाला भिडण्याचे प्रयत्न अपवादानेच घडतात.
आपल्या आस्था फक्त आपल्याच समूहाशी बांधलेल्या असणे
हे लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि त्याच्या साहित्याचाही
संकोच करणारे आहे.' पण दर्दैु व असे की या वास्तवाकडे
नितळपणे पाहण्याची निकोप दृष्टी विकसित होऊ शकलेली
नाही. ‘जमिनीला कान लावण्याची गोष्ट...' हा लेखही
लेखकाच्या आदिम प्रतिमेला आवाहन करणारा आहे. लेखक,
कवींनी अभावग्रस्तांच्या क्षीण आवाजाला, त्यांच्या उपेक्षित
हंदु क्यांना उजागर करण्याची निकड प्रतिपादित करणारा हा
लेख आहे. ‘या उजेडात थोडी आग असती तर...' या
लेखात सामान्य कष्टकरी माणसांकडे जन्मजात असलेल्या
प्रतिभेचा, आणि निर्मितीक्षम कलागुणांचा जागर मांडला
आहे. या लेखातून सामान्यांच्या जगण्यात विरघळून गेलले ्या
कलागुणांची आणि कौशल्याची दखल पुरेशा वृत्तीगांभीर्याने
शासन स्तरावर घेतली जात नाही याविषयीची खंतही व्यक्त
केली आहे. याच विभागातील शेवटचा लेख ‘भाषा ः
व्याकरणाची आणि अंतःकरणाची" हा काव्यात्म लेख आहे.
माणूस जगला तर माणसाची भाषाही जगेल, ती भाषा
बोलणारा समाज तगला तर त्या समाजाची भाषाही तगेल हे
मध्यवर्ती सूत्र डोळ्यासमोर ठे वनू लिहिलेला हा नितांत सुंदर
असा लेख आहे. भाषेला चिटकलेल्या, चिटकवलेल्या
शिष्ट-अशिष्ट धारणा, भाषेचा संकोच करणारे इथले
शिष्टसंमत कायदेकानून, भाषेला जखडून टाकणारे, बंदिस्त
करू पाहाणारे पंडिती नीतिनियम, भाषेशी बांधले गेलल े े
मानवी व्यवहार आणि तिची चकित करणारी अनेक रूपे-
प्रारूपे नोंदवताना या सगळ्यात महत्त्वाची असते ती
अंतःकरणातून अंकुरलेली संवेदनेची भाषा या मताला लोमटे
यांनी चिंतनाच्या कें द्रवर्ती ठिकाणी आणले आहे. समाज,
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 101
संस्कृ ती टिकवायची असेल तर माणसांना सन्मानाने
जगवण्याचा आग्रह आसाराम लोमटे यांनी धरला आहे.

ll९ll
आठवा विभाग केवळ दोन लेखांचा असून समकाळातील
जातव्यवस्थेसंदर्भात विचार प्रकट करणारा आहे. जातिव्यवस्था
ही इथल्या समाजव्यवस्थेतील काळी बाजू राहिलेली आहे.
भारताने विज्ञान-तंत्रज्ञानाच्या बळावर धर्मप्रणित रूढ कल्पना
मोडीत काढल्या. पण जातीवर आधारलेली दरी मात्र कमी
होऊ शकली नाही. वाढत जाणारी द्वेषभावनाही कमी करता
आली नाही. बदलत जाणाऱ्या काळात जातअस्मितेला
हितसंबंधावर आधारलेले नवे संदर्भ प्राप्त होत गेल.े
जातीजातीतील कटुता नष्ट झाली नाही; उलट जातवास्तव
अधिक टोकदार आणि नासूर बनत चालले आहे. जातीपातीच्या
आधारावर शोषण चालूच आहे. ‘खैरलांजी ते खर्डा,
निखाऱ्याची वाट...' या लेखात आजच्या जातीवर
आधारलेल्या समाजमानसिकतेतील विकृतीला उजागर
करणारे एक विधानवास्तव लोमटे यांनी लिहिले आहे. हे
विधान भूतकाळ आणि वर्तमानकाळातील जातधारणेच े
बदलते स्वरूप अधोरेखित करते. ते असे, ‘आधी लोक
शिवाशिव करू द्यायचे नाहीत, पण जगू द्यायचे, आता
शिवाशिव करू देतात, पण जगू देत नाहीत' विकासाच्या
कितव्याही मजल्यावर देश पोहोचला असला तरी जातीयतेच े
समूळ उच्चाटन मात्र करता आलेले नाही. उलट सत्ताकारणाच्या
गलिच्छ बाजारात जातीजातींमधील आंतर्विरोध वाढतच
गेलले े दिसतात याकडे लेखकाने निर्देश केला आहे.
मानवी जीवन एक प्रवास आहे असे आपण मानतो, पण
मानवाला स्थिर जीवन जगण्याची आस असते. असे असले
तरी बऱ्याचदा पोटासाठी आपले घर, गाव, परिसर सोडावा
लागतो. बहतु ेक वेळा विकास प्रकल्पांच्या नावानेही
भूमिपुत्रांना सक्तीने विस्थापित केले जाते. गावपातळीवर
वाढती जातीय विषमता आणि जातीय बेबनाव हाही
स्थलांतराला कारक घटक ठरतो. अशा स्थलांतरित,
102 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
विस्थापित, शोषित लोकांच्या मूकवेदनेला हात घालताना
त्यांच्या पुढय़ात परिस्थितीने आणि व्यवस्थेने वाढून ठे वलेल्या
प्रश्नांना उजाळा देणारा ‘गळून पडलेले मोरपिस' हा लेख
विचार करायला भाग पाडतो.

ll१०ll
‘धूळपेर'मधील शेवटच्या विभागात चार लेखांचा
समावेश केला असून हे लेख मानवी जीवनाच्या मानसिक-
भावनिक अंगांना स्पर्श करतात. ‘अंधार...आतला आणि
बाहेरचा', ‘वस्तीला अंधार नको कायमचा' हे लेख
रूपकात्मक असून अंधार आणि उजेड या जगण्याच्या दोन
बाजू आहेत. या दोन ध् रुवावरच आपण जगण्याची धडपड
करीत असतो. अंधार आणि उजेड हा जसा भौतिक
पातळीवरचा असतो तसाच तो मानसिक पातळीवरचाही
असतो. मनाची आणि प्रत्यक्ष जगण्याची काळी आणि उजळ
बाजू अधोरेखित करणाराही असतो. प्रत्येक जण आपल्या
वकुबानुसार जगण्याची धडपड करतो; याच न्यायाने प्रस्तुत
लेख मानवी जगण्याच्या विविध पैलंव ू र प्रकाश टाकतात.
‘उगवणाऱ्या प्रत्येक पहाटे साठी' हा लेख जगण्याच्या
धडपडीचे आणि जीवनपद्धतीचे तत्त्वज्ञान मनबुद्धीत ठसवतो.
गरिबीच्या, गुलामीच्या बेडय़ा माणसाला जखडून टाकतात.
स्वातंत्र्याच्या सगळ्या शक्यता अवरुद्ध होतात. परिस्थिती
विरोधी जाते तेव्हा नैराश्याचे मळभ मनबुद्धीला काळवंडून
टाकते, म्हणून आपले आयुष्य कसे जगायचे आणि कसे
सुंदर बनवायचे हे प्रत्येकाच्या हाती असते. भौतिक परावलंबन
असो वा मानसिक गुलामी दोन्हीही घातकच असतात.
जगण्याप्रतीचा सकारात्मक ध्यास आणि आश्वासकताच
प्रत्येकाला समृद्ध बनवते. नकारात्मक भाव व वास्तवापासून
पलायन करण्याची मनोवृत्ती ध्येयाच्या वाटेतला मोठा अडसर
ठरतो. मानसिक पराभव हा आपल्या स्वप्न, आकांक्षांचाही
गळा घोटतो. कुठल्याही विपरित परिस्थितीवर मात करून
आपणच आपले दार्शनिक होण्याची निकड नोंदवून
जीवनाप्रतीची सकारात्मकता मनात बिंबवणारा हा लेख
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 103
आहे. ‘अक्षरांचा श्रम केला' हा लेख या पुस्तकातील शेवटचा
लेख असून समारोपीय भावना व्यक्त करणारा आहे. या
लेखातून आसाराम लोमटे आपल्यातला माणूस मरू देऊ
नका अशी भावनिक साद घालतात. आपल्यातल्या
माणुसकीला आणि एकूणच मानवी संवेदनेला जागृतीचे
आवाहन करतात.

ll११ll
‘धूळपेर'मधील लेखन खूप तटस्थपणे केलेले आहे. ही
तटस्थता विषयांच्या निवडीपासूनच डोळ्यांत भरते. विशेषतः
ग्रामीण गावगाडय़ातील कष्टकरी समाजाच्या धारणा व
एकंदरीतच कृषिव्यवस्थेच्या परिघात स्वतःला झिजवणाऱ्या
समाजाचे चिंतन लक्षवेधी ठरते. हे चिंतन भूतकाळाच्या
भुयारांचे तळ धुंडाळीत नाही वा इतिहासाचे उत्खननही करीत
नाही. वर्तमानाला छळणाऱ्या समस्यांना हात घालून उपेक्षित
समाजाच्या छळवादाचे स्वरूप नमूद करते. वर्तमानकालीन
जगण्याला समकक्ष असलेल्या नोंदी या समकाळाचे
मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि अर्थशास्त्र उलगडून
दाखवतात. लेखकाचा पिंड हा गतकालीन बाबींना
कुरवाळणारा (नॉस्टाल्जिक) व भूतकालीन धारणांचा
पुरस्कार करणारा नाही तर वर्तमान जगण्याला प्रमाण मानून
व्यवहाराच्या पातळीवरील प्रश्नांचा उभा-आडवा छेद मांडू
पाहाणारी लेखकाची वास्तववादी दृष्टी इथे महत्त्वाची ठरली
आहे. विशेषतः कृषिसंस्कृ तीचा आदर्शवादी मुखवटा नाकारून
वर्तमानकालीन वस्तुस्थितीचा ताळेबंद मांडणे या लेखनामागे
प्रधानस्वर राहिलेला आहे. अभावात आपले आयुष्य
संपवणाऱ्या गावखेडय़ातील कष्टकऱ्यांच्या डोळ्यांवर
आदर्शवादी लेबलं चिकटवली गेली. त्यांना वस्तुस्थितीपासून
अलिप्त ठे वन ू सतत त्यांची दिशाभूल केली. अशी दिशाभूल
करणाऱ्या व्यवस्थेची यथायोग्य चिकित्सा लोमटे यांनी केली
आहे. ‘धूळपेर'मधील लेखन समकाळाच्या घुसमटीचे चरित्र
आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. समकाळातले
विविधांगी प्रश्न आणि प्रश्नांनी चहबु ाजूंनी वेढलेला माणूस या
104 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
लेखनाच्या गाभास्थानी एकवटला आहे. अभावग्रस्तांचा
हताश, पराभूत चेहरा जसा या लेखनातून ठळक होत राहतो
तशाच त्यांच्या धडपडीच्या अनेक संघर्षवाटाही या लेखनातून
सूचित होतात. आसाराम लोमटे यांनी निर्माण केलेली ही
वास्तवचित्रे वाचकांना अस्वस्थ करतात तसेच विचारप्रवृत्तही

आसाराम लोमटे

करतात. या लेखनातून समकाळाला जाळणाऱ्या वणव्याच्या


विविध प्रारूपांची लोमटे यांनी चिकित्सा केली आहे. शेती व
शेतीशी निगडीत विविध क्षेत्रांत वावरणाऱ्या अभावग्रस्त
माणसांना, त्यांच्या बहपु ड
े ी समस्यांना कें द्रस्थानी ठे वन
ू शोषक
व्यवस्थेच्या शोषणाधारित मनोधारणांचा पडताळा केला आहे.
‘धूळपेर'मधील लेख पारं परिक चाकोरीशी नाते सांगत
नाहीत. एका वेगळ्या आणि दर्लक्षित ु समाजमनाच्या मूक
आक्रोशाचे संवेदन टिपतात.
विचार मांडण्यासाठी तत्त्वबोजड भाषेचा व सांकल्पनिक
अभिनिवेशाचा अंगरखा असावा लागतो या रूढ सांकेतिकतेला
हे लेखन छेद देते. सामान्य माणसांच्या जगण्याला समांतर
असणाऱ्या भाषेचा लहेजा घेऊन विचारांचा सहज सुलभ
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 105
शिडकावा या लेखनातून लोमटे यांनी केला आहे. दैनंदिन
व्यवहाराच्या भाषेतन ू हे लेखन झालेले असल्याने ते
सामान्यांच्या मनबुद्धीचा नेमका ठाव घेते. या भाषेमळ ु े
विषयाचे गांभीर्य जसे अधोरेखित होते तसाच अपेक्षित
परिणामही साधला जातो. लोकमानसाला मूळ रूपात
आणण्यासाठी म्हणी, वाक्प्रचारांचा केलेला वापरही
उपकारकच ठरला आहे. उपहास व उपरोध या लेखनाला
टोकदार बनवते. या लेखनात काव्यात्मकतेच े अंश मिसळले
आहेत. कालमर्यादांपासून ते मुक्त राहते. ‘धूळपेर'मधून एक
लेखक म्हणून आसाराम लोमटे यांचे आस्थाविषय आणि
वैचारिक भूमिका तर स्पष्ट होतेच, शिवाय एक चिंतक
म्हणून लोमटे यातून अलिप्त राहत नाहीत तर संवेदनशील
माणूस आणि कथालेखकही वेळोवेळी डोकावत राहतो.
‘धूळपेर'मधील लेखन विचारप्रवृत्त जसे करते तसेच
अस्वस्थही करते. कधी विचारांना आवाहन करते तर कधी
भावनांना आवाहन करते. तळपातळीवरच्या वंचित,
अभावग्रस्त, शोषित, पीडित समूहाच्या जगण्या- भोगण्याचे
विविधायामी, बहसु ्तरीय वास्तव आणि शोषक व्यवस्थेच्या
स्वार्थकें द्रित धोरणांचा बुरखा टरकवणारे हे लेखन केवळ
प्रश्नांचे ओझे वाहत नाही तर पीडितांशी सहभावही व्यक्त
करते. दिलासा देते. नव्या दिशांचे सुतोवाच करून समोरच्या
प्रश्नांना उराउरी भिडण्याचे बळ पुरवते. नव्या पर्यायांचे
संसूचन करून मनात नव्या उमेदीची पखरण करते. म्हणून
‘धूळपेर'मधील लेखनाकडे समकालीन सामाजिक
पर्यावरणाचा चिंतनात्मक दस्तऐवज म्हणूनच पाहावे लागते.

डॉ. विनायक येवले


yewalevinayak@gmail.com
९०९६९९९८६५

106 & ‘w³V eãX Am°JñQ 2020


२००० नंतरच्या काळात
स्त्रियांनी लिहिलेल्या
मराठी कादंबऱया
माया पंडित

लेखांक : तीन

ब्र - कविता महाजन

कविता महाजन यांची ब्र ही कादंबरी मात्र देशपांडे आणि


बगे यांच्या मध्यमवर्गीय स्त्रीजीवनाच्या चित्रणाच्या व एकूणच
पारं परिक कथनात्मक सहित्याच्या परं परा मोडणारी ही या
२००० नंतरच्या कालखंडातली पहिलीच कादंबरी आहे.
एकीकडे नजुबाई गावीत यांच्या साहित्यातल्या आदिवासी
जीवनाकडे ती पहाते पण आतून नव्हे तर अक्षरश: बाहेरून
आलेल्या स्त्रीच्या नजरेतून. इतर कादंबऱ्यांसारखी घर,
कुटुंब, समाजाच्या मध्यमवर्गीय जीवनाच्या विहित चौकटीतले

‘w³V eãX Am°JñQ 2020 & 107


ताणतणाव ही कादंबरी मांडत नाही. घर, कौटुंबिक
जबाबदाऱ्या आणि करियर करू पहाणाऱ्या स्त्रियांच्या
आयुष्याची त्यात होणारी कुत्तरओढ आणि मानसिक हेळसांडही
ती मांडत नाही. तिचा पट खूप मोठा व व्यापक आहे. एका
स्त्रीच्या वैयक्तिक आयुष्याचे आलेख जरी ही कादंबरी मांडत
असली तरीही तिला घडवणारी संदर्भचौकट अतिशय व्यामिश्र
आहे आणि तिच्या कोन्याकोपऱ्यातल्याही अंगाउपांगांशी ती
जैव पध्दतीने निगडित आहे. जुलम ु ी पतीच्या दंडेलीत आपले
स्वत्व पार गमावून बसलेली एक साधी सरळ मध्यमवर्गीय
बाई कुटुंबव्यवस्थेतले पितृसत्ताक ताणतणाव व हिंसा
यांच्याशी सामना करत शून्यापासून सुरवात करते आणि मग
शारीरिक व मानसिक पातळीवर त्यांच्यावर मात करत एका
विलक्षण अनोख्या जीवनभानाची दृष्टी घेऊन कशी विकसित
होते याचा थक्क करणारा जीवनानुभव या कादंबरीत मांडला
आहे. ‘‘ज्यांना ब्र उच्चारता आल्या त्या सर्व जिभांना'' ही
कादंबरी अर्पण केली आहे.
आपल्या वैवाहिक जीवनातले शारीरिक, मानसिक,
कौटुंबिक आणि सांस्कृतिक पातळ्यांवरचे जुलम ु ी सत्ताकारण
कें द्रस्थानी असलेले घर सोडून ती त्या आयुष्याच्या चौकटीतून
सभोवतालच्या वास्तवात शिरत त्याच्याकडे व स्वत:कडे
पहायचा प्रयत्न करते आहे. या साऱ्या प्रवासाचा बहरु ेषीय
प्रवाही चढता आलेख कादंबरीच्या चार भागात मांडलेला
आहे. (भाग १ : १ ते ९२ भाग २: ९३ ते १५८, भाग
३: १५९ ते २६८, भाग ४; २६९-३३६) प्रफुल्ला
ज्यात शिरते ते वास्तव म्हणजे प्रचंड मोठे गुंतागुंतीचे जाळे
आहे. ते आहे स्वयंसेवी संस्थांचे, त्यांच्या स्वत:च्या व
आपापसातील सत्ताकारणाचे, विविध आदिवासी जीवनात
भारत सरकारच्या नवनव्या कायद्यांनी केलेल्या हस्तक्षेपांचे,
लोकशाही हक्कांसाठी चाललेल्या खऱ्या आणि त्या
नावाखाली चालवलेल्या खोटय़ा लढय़ांचे, त्यांच्या परिणामांचे
आणि या साऱ्या हस्तक्षेपांमधुन सुरू झालेल्या एका मोठय़ा
सामाजिक, राजकीय व आर्थिक अभिसरणाचे. त्याचा एक
आरं भबिंद ू १९९२ सालच्या घटनादरुस्ती ु नंतर १० लाख
108 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
स्त्रिया पंचायत राज्यव्यवस्थेत आल्या हा आहे. महाराष्ट्र
सरकारने १९९७ मध्ये आदिवासी स्वशासन कायदा केला,
त्याचा आणि आदिवासी स्त्रियांवर, एकून जनजीवनावर
काय परिणाम झाला आहे? आदिवासी स्त्रिया या सर्व
अभिसरणाच्या प्रक्रियेतल्या सगळ्यात मोठय़ा एजन्सी आहेत.
Personal is political अशी मांडणी स्त्रीवादात येते. इथे
Political is also Personal हे घडताना दिसते. प्रफुल्ला उर्फ
फुलाताई या साऱ्या व्यामिश्र प्रक्रियेतनू अंतर्बाह्य बदलते ती
कशी हे या चार भागात चढत्या भाजणीने मांडले आहे.
कादंबरी या रूपाच्या संरचनेतील हे व्यक्ती व सामाजिकता
यांच्या द्वंद्वात्मक समतोलाचे व एकरूपतेच े तत्व महत्वाचे
आहे.
कादंबरी सुरू होते ती प्रफुल्लाने तिचे घर मोडल्यानंतर
एका स्वयंसेवी संस्थेत सुरू केलेल्या कामापासून. हा
कादंबरीचा पहिला भाग आहे. तुटकपणे येणाऱ्या काही
तपशीलांमधून लक्षात येते की प्रफुल्ला ही एका सामान्य,
मध्यमवर्गीय, उच्चजातीय (बहध ु ा ब्राह्मण?), घरातली
‘सुमार’ मुलगी. चित्रकलेत बीए केले आहे आहे रं ग, रूप,
रेषांचे तिला विक्षण आकर्षण आहे. कुटुंबात . ४ बहिणी, १
भाऊ. २ विवाहित. त्यानंतर हिचा नंबर. पण भावाचं एका
मुलीवर प्रेम आहे. हिचे लग्न झाल्याशिवाय त्याला लग्न
करता येणार नाही. वडील मेल्यानंतर ही नोकरीला लागते
आणि १ महिन्याच्या आत ‘साहेब’ तिला मागणी घालतात.
मुलींच्या कुटुंबियांच्या अपेक्षा किती जुजबी असाव्यात?
‘हषु ार, चांगलं रूप, पैसा, एकुलते एक, काही जबाबदारी
नाही, हंड ु य़ाची अट नाही'' इतक्याच! ती टायपिस्ट म्हणून
नोकरी करते पण मग साहेब सोडायला लावतात. तिचं
सुमार असणं अधिकच ठसत जातं. मग साहेबांनी दसरं ु लग्न
करायचं ठरवलं. ही सारी कहाणी अत्यंत त्रयस्थपणाने
निवेदनातून कधीमधी तुटकतुटकपणे डोकावत रहाते. तिच्या
तुटलेल्या कौटुंबिक जीवनाचे हे निवेदनही तुटकतुटकच
आहे. निवेदनात अधूनमधून साहेब डोकावत राहतात.
हिंसाचार न बोलता आगीसारखा धुमसत तनामनात फुटत
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 109
रहातो. (५९) शिवीशिवाय हाक नाही कधी त्यांची हे तिला
सांगता येत नाही. तिची चित्रकला मरतेच. तिला लग्नाने
तिचा कसलाही काहीही ‘स्व’ शिल्लक ठे वलेला नाही. ती
निवेदनात मोकळी होते पण इतरांशी बोलताना तिचा हा
खाजगी ‘आवाज’ लुप्त होतो. मात्र वाचकाला विश्वासात
घेऊन प्रफुल्ला जे निवेदन करते आहे त्यातून ती वाचकांना
वेगवेगळ्या भूमिका घ्यायला भाग पाडते आहे.
सुरवातीला ती एका स्थित्यंतरातून जाते आहे. ‘‘मी
वर्षानुवर्षे एकाच रेषेवर, एकाच दिशेने, एकाच ऋतूत प्रवास
करत आले आहे. आणि सतत तीच तीच दृश्यं पाहनू ,
अनुभवून, जगून माझं जग मी त्या एकाच ओसाडीच्या
वर्तुळात नापीक करून ठे वलं आहे. आणि म्हणते आहे की
मैलोनमैल सारं जग असंच ओसाड आहे.'' (९) या
वेगळ्या कामात तिनं गुंतवून घेतलंय. जग समजून घेण्याच्या
निमित्त्नं वेगळ्या संपूर्ण अनोळखी वाटांवरचा प्रवास सुरू
केला आहे. हे जग आहे ‘‘प्रगत'' नावाची एक एन. जी.
ओ. ज्यांच्या अधिवासी क्षेत्रात काम करतेय त्या आदिवासींचं.
‘‘खूप रं गांनी माखलेलं नादांनी वेधावलेलं, आकारांनी
व्यापलेलं, वासांनी दरवळलेलं स्पर्शांनी लोभावलेलं एक
अत्यंत आकर्षक आदिम विश्व'' ती पहाते आहे. ‘‘माझ्याच
समकालीन असलेली आदिवासी म्हणून ओळखली जाणारी
माणसं तिथं एक निराळ्याच समृध्दीत जगताहेत. त्यांच्या
संघर्षांची, आनंदांची, वेदनांची, विचारांची पातळी पूर्णपणे
वेगळी आहे.'' (९) हे तिचं त्यांच्या आयुष्याचं वाचन आधी
थोडे रोमॅंटिक आहे. तिचं जुनं जग बुटातल्या पायांप्रमाणे
आक्रसलेलं आयुष्य जगतं. ‘‘अत्यंत नाजूक, एवढय़ातेवढय़ानं
दखावलं
ु जाणारं आणि हवाबंद राहनू कुजून सडून जाणारं
जगणं आपण पत्करतो; सुरक्षित, सुसंस्कृ त सभ्यतेचं निदर्शक
वाटतं म्हणून!'' (९) तिला आता एकटीला फिरावं लागणार
आहे, सोबती बगैरे नाटकं चालणार नाही त असें तिला
त्यांच्या संघटनेच्या सर्वेसर्वा सुमेध यानं सांगितलं आहे. हे
सारं तिला अनोळखी आणि अदभुत वाटतं. तिला तिच्या
विसरून गेलले ्या रं गकामाची आता सय होते. बोटांमधून
110 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
शिरशिरी उठते. निसर्ग, पक्षी, आणि नव्या कामाची उमेदवारी.
संस्थेचा प्रोजेक्ट आहे महाराष्ट्रातील ३७ जिल्हयातले
तालुके, त्यातल्या विभागनिहाय आदिवासी जमाती, त्यांचा
सविस्तर तपशील जमा करण्याचा. या कार्यक्षेत्रात काम
करणाऱ्या स्वयंसेवी संघटना, त्यातल्या किती सहकार्य करू
शकतील, हे पाहणे; त्यानंतर कामाची आखणी. मग
फील्डवर्क . पंचायतींमध्ये असलेल्या महिला सरपंचांचे
अनुभवकथन आणि प्रशिक्षण शिबिरे घेणे हाही त्यांच्या
कामाचा भाग आहे.
सुरवातीच्या काळात तिला येणारे अनुभव तिच्या मुंबईच्या
नागर कोत्या जीवनापेक्षा विलक्षण वेगळे आहेत. बिबळ्यानं
खोलीमागे बांधलेलं लहान कुत्र्याचं पिल्लू रात्री उचलून नेणं,
मस्त आत्मविश्वासानं भरलेल्या ताठ चालीनं चालणाऱ्या
सरपंच मुकणेबाई सारख्या बायकांशी ओळख होणं, मग
महिला सरपंचांवर अविश्वासाचा ठराव आणून पंचायतीत
महिलांना काम करणं अशक्य करणारी इथली पितृसत्ताक व
जातीयवादी व्यवस्था यांचा चक्षुर्वैसत्यम अनुभव घेणं, अशा
तिला यापृवी कधीच माहीत नसलेल्या गोष्टींशी तिचा संबंध
येतो. शिबीराला आलेल्या स्त्रिया गातात, बोलतात. आणि हा
आवाज ‘‘राजकारणातील स्त्रिया'' या विषयाचे पैलू
उलगडतो. तिला नवीनवी माहिती मिळत जाते. राजकारणात
स्त्रिया हा एक फार्स असतो आणि राजकारण बाजूला राहनू
चर्चेत उरतं ते स्त्रीत्व, म्हणजे तिच्या तथाकथित कमजोऱ्यांचा
आलेख. महिला सरपंच नावाला आणि उपसरपंचच कारभार
चालवतात. कायद्याचं, घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन
करतात. बहसं ु ख्य महिला सरपंचांना वाचता येत नाही मग
कोऱ्या लेटरहेडवर त्यांचे अंगठे घेऊन ठे वले जातात.
जबरदस्तीनंही घेतले जातात.
या पहिल्या भागात प्रफुल्लाच्या मनात शिबिरातल्या
स्त्रियांचे अनुभव नोंदले जातात. पितृसत्ताकतेचा जळजळीत
अनुभव खाजगी जीवनात घेतलेली प्रफुल्ला आता तिच्या
आयुष्याशी काडीमात्र संबंध नसलेल्या स्त्रियांच्या सार्वजनिक
जीवनातल्या सहभागाला ही पितृसत्ताकता कशी काडी लावते
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 111
याचा अनुभव घेते. तिला जातीसंस्थेच्या पाशवी पकडीचा
अंदाज यायला लागतो. टोकरपाडय़ाची कडुबाई सांगते की
तिला ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधून हाकलून लावलं. इंदिरा
आवास योजनेची घरकुलं मंजरू करताना होणारा भ्रष्टाचार
कडुबाईच्या ध्यानात यायला लागतो. पैसव े ाले लोकच यादीत
असतात. या योजनेचा विचार गावासाठीही झाला पाहिजे
असं तिला वाटू लागतं. तिने तसे सांगताच उपसरपंच
पायातली वहाण उचलतो. शिव्या देतो व पुन्हा ऑफिसमध्ये
पाय न टाकायची धमकी देतो! ती गटविकास अधिकाऱ्याला
बोलावते, कोंबडी मारते आणि शेवली बाई या गरीब स्त्रीला
घरकुल मंजरू करून देते. मग ती अधिकाऱ्याला लागू
असल्याची भूमका उठवली जाते आणि त्यानंतर अविश्वासाचा
ठरावही येतो. अशा अनेक स्त्रियांचे अनुभव प्रफुल्लाची
जाणीव विकसित करत जातात. आपल्या कह्यात न राहणाऱ्या
सरपंच बायांना भयानक क्लृप्त्या वापरून नामोहरम केले
जाते. चान्नी सारख्या सरपंच बाईला गावच्या पाटलाने जो
विरोध केला, आणि त्याविरुध्द तिचा लढा थरारक आहे.
विरोधक सरपंचबाईच्या कुटुंबालाही कसं तिच्याविरुध्दच्या
कटात सामील करणे, समाजाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवर
चालणारं सत्ताकारण दाखवणे आणि त्यातून बायांना पध्दतशीर
पणे बाजूला टाकणे. कधी चारित्र्य, कधी कटकारस्थानं, कधी
अधिकाऱ्यांना लाचलुचपतीने आपल्या बाजूला वळवणे हे
सारे जग विलक्षण वेगळे व दाहक आहे. निवडून आली
म्हणून बाईच्या मागचा घरकामाचा बोजा, - स्वयंपाक, पाणी
भरणं, कपडे धुणं - सरत नाही., तो उचलावाच लागतो.
पुरुषांसारखं एकटं ऑफिसमध्ये बसता येत नाही. दप्तर
पाहणं, हिशेब तपासणं, वाडय़ापाडय़ांवर फिरून गरीदारी
जाऊन लोकांच्या अडचणी समजावून घेणं व कामाचा
पाठपुरावा करून ते तडीस नेणं, हे सारं विलक्षण आव्हानात्मक
आहे आणि या बायका ते पेलण्याचा जो प्रयत्न करतात
त्यातून उमेद हरवलेली बाई उभी रहाते. मुलीच्या बापाला
देज देऊन आणलेली मुलगी राजकारणात भाग घ्यायला
लागली तर ‘‘यासाठी तुला कणग्या रिकाम्या करून आणलं
112 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
होतं का?'' असे सासू विचारते. पितृसंस्थाक कुटुंबसंस्थेचा
फास स्त्रियांच्या गळ्याला सातत्याने काचत असतो. घरची
जमीन असेल तर शेताची, नसेल तर मजुरीची कामं, त्यात
सरपंच म्हणून मीटिंगा अटेंड करताना मजुरी बुडणार.
व्यसनासक्त मारहाण करणारे नवरे, संशय घेणारे नातेवाईक,
बाईच्या कर्त्तुत्वाला बहरू न देणारे छप्पन घटक आहेत.
खोटय़ा पोलीस तक्रारी, भयंकर मारहाण, रात्रीअपरात्री
चौकीवर नेण,े लाच खाणे, नाहीतर अडकवून ठे वणे यात
बेगम ु ान सत्ता गाजवणारी राजकीय धेंडे, भ्रष्ट नोकरशाही
यंत्रणा आणि त्यांच्या तळी उचलून धरणारे, कायदा व
सुव्यवस्था यांचे तथाकथित संरक्षक पोलीस.... पितृसत्ता
आणि कुटुंबव्यवस्था यांच्या बरोबरच याही यंत्रणांच्या व्यवस्था
राजकारणात येऊ पाहणाऱ्या स्त्रीच्या पायातल्या भक्कम
बेडय़ा आहेत हे सत्ताभान प्रफुल्लाच्या जाणिवेचा अतूट भाग
बनते. .
त्यात तिला मध्यमवर्गीय बामणी व्यवहारांचेही अनुभव
येतात. इतके वेगळे की जणू ही दोन जगे संपूर्णपणे वेगळ्या
अवकाशांमध्ये असावीत. विधवा तारूबाईच्या हातून कं ु कू
लावले म्हणून तारांगण करणारी आणि कुलगुरुंच्या हाताला
धरून ओढत नेणारी त्यांची फणफणणारी बायको हा एका
अर्थाने प्रफुल्लाच्या पूर्वायुष्याला जोडणारा दवा
ु आहे तो
तिला त्या जगाचे फोलपण दाखवतो. महिला विकासाची
कामं, शौचालयं, ग्रामपंचायतींच्या कामाच्या यादीत येत
नाहीत. महिला विकासाच्या कामांना योग्य दिशा लभलेली
नाही याचे भान तिला तिची वर्गीय जाणीव विसरायला
लावते. पण स्त्रियांचे आत्मभान वाढते आहे . ग्रामसभा
घ्यायला लावणे, झेंडावंदनाला जाणे, सरपंच बाईच्या हस्ते ते
करणे, ग्रामसभेला न बोलावले तर बीडीओकडे तक्रार करणे
यातून बायका आत्मनिर्भर होताहेत याचे संकेत तिला
मिळतात.
याच भागात प्रफुल्ला तिच्या बदलाच्या प्रक्रियेत
पिढय़ांच्या बदलत्या जाणिवांचाही चिकित्सक वेध घेते. मुक्त
विचारमंथन करते: ‘‘स्वातंत्र्यपूर्व काळात सामाजिक कार्य
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 113
करणारी आदर्शवादी माणसं ... राजकारणात न जाता
समाजकारणात राहिली.. ती आता वृद्ध आहेत. त्यांच्या
पासून प्रेरणा घेऊन सामाजिक कार्य करणारी माणसं एकतर
व्यावसायिकतेच्या चक्रात अडकली आहेत किंवा राजकारणात
प्रवेश कर्ती झाली आहेत, किंवा नैराश्यानं घेरली...
स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्यानंतर तीसेक वर्षांपर्यंत
एखाद्या विचारसरणीशी बांधिलकी राखून ... माणसं
कार्यप्रवृत्त राहिली आहेत... पण त्यानंतरची पिढी म्हणजे
माझ्या वयाचे या क्षेत्रातील लोक गोंधळलेले तरी आहेत
किंवा साळ बीएसडब्ल्यू किंवा एमएसडब्ल्यू अशा पदव्या
घेऊन तद्दन नोकरी म्हणून सामाजिक कार्य करताहेत. ...
तुमच्या पिढीसारखे कुठलेही विचारप्रवाह आज आमच्यासमोर
नाहीत. समाजवाद, मार्क्सवाद न् हिंदत्ववाद ु अशा सगळ्या
वादांमधला फोलपणा आमच्या पिढीसमोर आहे. ... हे
विचारप्रवाह मागे पडले पण त्यांची जागाघेणारे नवे
विचारप्रवाह जोरकसपणे आमच्यासमोर आले नाहीत...
सगळं वाचून, ऐकून, समजावून घेऊन आपल्या विचारप्रवाहांना
ठाम केलंय असे कितीकजण आहेत या पिढीत? कामं
करण्यासाठी निश्चित विचारांचा पाया नसेल तर भिंती
तकलाद ू होतात, कामं संकुचित होतात. '' (२७)
काम करताना आदिवासी पाडय़ावरील भयविहीन मुक्तीचा
अनुभव, देखण्या पुरुषाकडे टक लावून पहात रहावं... हा
सुखद लैंगिकतेचा मुक्त विचारांचा अनुभव पहिल्यांदाच एका
रमणीय संध़्याकाळी समोरचे रान पहाताना तिला येतो आणि
एका मोकळ्या अवकाशाचे शारीर भान तिच्यात उमलू
लागते. स्वत:च्या लैंगिकतेला, शारीर उर्जांना मुक्तपणे
सामोरे जाता येणे हाही तिच्या प्रवासाचा एक महत्वाचा भाग
आहे.
आता कामांमध्ये प्रफुल्लाची फुलाताई होते. ती वैचारिक
भाषेची अनोळखी सवय अंगात बाणवते. संघटनेच्या कामाची
लिहिण्याची शिस्त (नवऱ्याला सारे न सांगता आता ते
लिहायला शिकणे हे स्थित्यंतर) शिकते. राजकारणातल्या
स्त्रिया: कावेरीबाई महिलांच्या गरजांचा क्रम उलटा लावतात
114 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
ही ‘राजकीय’ समज तिला येतेय. संडास आरोग्य, पाणी,
रोजगार, गरिबीमुळे होणारी उपासमार आणि कुपोषण हा
त्यांचा क्रम चुकीचा. कुपोषण आधी. राजकीय पक्ष आता
बदलताहेत, आता स्त्रीच्या क्षमतेबद्दल ते पूर्वीइतके साशंक
नाहीत. यातून तिच्या संघटनेचा सर्व्हे करण्याचा विचार
जन्माला येतो. . बायका राजकारणात प्रवेश करायला किती
उत्सुक आहेत? मतदानाबाबत त्या कसे निर्णय घेतात?
निवडणुकीला उभं रहाणं त्यांना आवडतं का? आपले
अधिकार आणि कर्तव्यं त्यांना माहिती आहेत का? यावर
प्रश्नावली तयार करणे. अगोदर प्रश्नावली तयार करणे मग
सर्वे, मग निर्वाचित स्त्रयांसाठी शिबिरे गावकऱ्यांचे प्रबोधन
असा संशोधन प्रकल्प तिची संस्था हाती घ्यायचे ठरवते.
लग्न न करता रहायची प्रथा काही समाजात: वारली, महादेव
कोळी, इथे कुटुंबसंस्था व विवाहसंस्थेचा काही संबंध नाही.
विवाह ही धार्मिक घटना, सामाजिक नव्हे. (३७)
बायकांबरोबरच्या चर्चांमधून तिला त्यांचे बाळं तपणाचे प्रश्न,
आरोग्य, रस्ते होण्याचे महत्व लक्षात येते. प्रफुल्लाची जाणीव
विकसते आहे: किती प्राथमिक गोष्ट आपल्या लक्षात येत
नाहीत. कसले प्रश्न विचारतो आहोत आपण... पण सगळं
कसं समजेल एकदम? पस्तीस वर्षं एका विशिष्ट पध्दतीनं
आयुष्य जगल्यावर असं सुटं कसं होता येईल आपल्याला
लगोलग सगळ्या गोष्टींपासून?'' (४१)
मात्र तरीही या राऊंडवरून परत आल्यावर तिला प्रश्न
पडतो: ‘‘वाटतंय की आपण हे सारे काम आता करतो
आहोत ते ठीक आहे. पण काय अर्थ आहे त्याला? मला
नेमकं काय करायचं होतं? जे करायचं होतं ते हेच आहे
का? आणि जर नसेल, तर आपल्याला नको असलेल्या
गोष्टी का करायच्या आपण? त्यापेक्षा आता मरून जावं हे
उत्तम. नेमकं कशासाठी जगायचं हे कळत नसेल तर मरून
गेलल े ंच चांगलं!'' (४२)
प्रफुल्ला ला तिच्या आजवरच्या जगण्याने फक्त भीती
शिकवलेली आहे. आपल्यावर सत्ता गाजवणारे कुटुंबीय
आपल्यावर सतत नजर ठे वन ू आहेत हे भय आहे. घाबरणं
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 115
बंद करायला हवं हा विचार पहिल्यांदा ती करते. (४६)
त्याची सुरुवात तिला घटस्फोट दिलेला नवरा अजूनही
तिच्या घरी सोयीसाठी रहायला येणार आहे त्याला स्पष्ट
‘‘नाही'' म्हणून करते. ‘‘आणि अजून एक, यापुढे मी कुठे
जाते, कुणासोबत जाते काय करते असे प्रश्न मला विचारायचे
नाहीत. आता तुमच्या अशा प्रश्नांना उत्तरं द्यायला मी बांधील
नाही'' असे ती त्याला सांगते. ‘‘साली... हलकट...
कुणाच्या जिवावर उडय़ा मारतेस? माझीच पोटगी खाऊन
जागतेय... रांड साली...'' (४७) यावर ती स्पष्टपणे
सांगते: ‘‘शिव्या देऊ नका... तुम्ही पोटगी देताय म्हणजे
काही उपकार करत नाहीआहात. इतकी वर्षं संसार केलाय
तुमचा आणि गरज होती तेव्हा कमावलेलं आहे नोकरी
करून निव्वळ तेवढी नोकरी जरी करत राहिले असते ना,
तर आज तुम्ही पोटगी म्हणून जे देताय त्यापेक्षा कितीतरी
जास्त कमावलं असतं. तुम्हीच सोडायला लावलीत नोकरी.
त्यावेळी घरात जास्त वेळ राबायला हवं होतं म्हणून. आणि
जर ही व्यवस्था केली नसतीत तर लगेच घटस्फोट मिळेल
याची खात्री वाटत होती का तुम्हाला? तुम्हाला घाई झाली
होती दसऱ्या
ु लग्नाची म्हणून केलंत सारं . त्यामुळे हे पुन्हा
ऐकवू नका. आणि यापुढे कारणाशिवाय इथं फोनही करू
नका.'' (४७) तिच्यामधले हे परिवर्तन चित्तथरारक आहे.
आता तिला प्रश्नही पडू लागले आहेत. चळवळी
करणाऱ्या संघटना आणि विकासात्मक काम करणाऱ्या
संघटना ... किती फरक आहे? : हे सगळं आपल्या देशात
कधी न कसं सुरू झालं? महाराष्ट्रात कुठे कुठे कोणकोणत्या
स्वयंसेवी संघटना आहेत? या संस्थांच्या कामाचं स्वरूप
काय आहे? कोणत्या व्यक्ती आज या क्षेत्रात पूर्णवेळ
कार्यरत आहेत? सणघतनात्मक काम कोणत्या दिशेनं
चाललं आहे? शैक्षणिक क्षेत्रात, आरोग्य क्षेत्रात महिला
विकासाबाबत, ... पर्यावरणाबाबत शेतीबाबत काय काय
नवं घडतंय? आदिवासीं, दलितांचे झोपडपट्टीवासियांचे
प्रश्न, महिलांचे प्रश्न... या प्रश्नांवर वर्षानुवर्षं कामं सुरू
आहेत आज या प्रश्नांची स्थिती काय आहे? हे सारे प्रश्न ती
116 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
सुमेधला विचारते. हा सारा तिचा रोमॅन्टिकपणा आहे असे
त्याला वाटते. खरे तर ही तिच्या स्वयंसेवी संस्थांच्या
अंतर्गत राजकारणातली दृष्टी तिला मिळण्याची सुरवात
आहे.
आता राजकीय पक्षांमधल्या स्त्रियांच्या निवडणुका तिला
दिसतात. बायकोला पायाखाली घेणारे नवरे; त्याच्या
मर्जीखातर तिने मनात नसताना उभे रहायला हवे म्हणून
मुसळाने मारणारा नवरा; बायको निवडून आल्यावर स्वत:ची
गुलाल फासून मिरवणूक काढून घेणारा नवरा; विजयी
नंदाबाई एकटय़ाच बसतात नि नवरा त्याच्या जय़घोषात
दंग. तरीही निवडून कोण आलंय, बाई की तिचा नवरा? हे
संतापून विचारणारी एकटी मघाबाई तिला भेटते. आणि
‘‘माझ्या मनात तसंच उगवलं'' म्हणणाऱ्या प्रफुल्लावर तुटनू
पडते. ‘‘इतका वेळ मिरवणूक अडवून मी भांडत होते एकटी
तवा का खाली आली नाहीस बाई?'' असे तिला सात्विक
संतापाने विचारते. ‘‘मग प्रश्न कशाला गंमत म्हणून विचारत
होती? आणि बाईच आहे ना ती? मग बाईचा प्रश्न आहे तर
तिनं ‘काय संबंध’ कसं म्हणावं? साथ दिलीच पाहिजे.
शिकलेली आहे शहरातली आहे, कळलंय की पुन्हा तिला
काय झालंय ते। कळलं नाही म्हणावं तर तसंही नाही''
(५३) यावर प्रफुल्लाकडे अज्ञान प्रगट करण्याखेरीज उत्तर
नाही. काही न करता आल्याची मूठभर हताशा पदरात बांधून
ती फक्त मध्यमवर्गीयतेने उदास होते.
आता तिला सेमिनारच्या निमित्ताने दिल्लीला जाऊन पेपर
सादर करायची संधी येते. ती स्वयंसेवी संस्थांच्या गाभ्यात
चालली आहे. डॉ दयाळ हे सिनियर कार्यकर्ते तिथे असणार
आहेत; हेच तिच्या मनात दडून बसलेल्या प्रियकराचं रूप
आहे. त्यावेळी ‘साहेब’ आत येऊन तिला लाथ घालतात.
तुडवतात. पुन्हा हिंसक वागणूक वाटय़ाला येते. आणि तरी
त्याला ती हाकलून लावते. हा मूलगामी बदल तिच्यात
आणखी स्पष्ट होतो. पण वेदना सहन करत ती दिल्लीला
जाते. रक्ताळलेल्या पाठीने सेमिनारमध़ये सहभागी होते.
दयाळांना पत्नी आहे, एंजला. ती तिच्या नग्न शरीराला
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 117
तपासते. (५७)
तिच्यापुढे प्रश्न आहेत: माझी पदवी चित्रकलेची, अनुभव
स्टेनोटायपिस्टचा, या दोन्ही गोष्टी सोडून कितीतरी वर्षांची
गॅप. सामाजिक, राजकीय काम स्वयंसेवी संस्था दसऱ्याच ु
जगातल्या. त्यातून काय निष्पन्न होणार? मात्र या गोंधळात
दयाळ कामाची पुढची दिशा स्पष्ट करतात: स्वयंसेवी
संस्थांनी नुसती निवडून आलेल्या बायकांची शिबिरं घेण्यापेक्षा
त्यांच्या पुढे जाऊन सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडवण्यासाठी
काय केलं पाहिजे, स्थानिक समस्यांबद्दल आपण काय
भूमिका घ्यायच्या, प्रश्नांची सोडवणूक कशी करायची हे
त्यांना हळूहळू उलगडत गेलं पाहिजे. त्यांच्या राजकीय
जाणिवा विकसित होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हे
दयाळांचे मत आहे. तीही तिचे निवडणुका लढवलेल्या,
जिंकलेल्या, हरलेल्या स्त्रियांबद्दलचे अनुभव सांगते. प्रत्यक्ष
निरीक्षण व टेबलवर्क यांची सांगड कशी घालता येईल हा
मुद्दा तिला नव्याने उमजतो. दयाळ हे तिचे मार्गदर्शक:
‘‘आपल्या कामामुळे फार मोठं परिवर्तन होईल असा भ्रम
बाळगू नकोस.'' ‘‘मला निराश वाटतं. स्वत:ची खात्री देता
येत नाही अजून.''(६१) स्वत:ची खात्री होण्याइतपत
स्वत:ला काबिल बनवणे'' हा तिचा प्रवास आहे.. ‘‘दयाळ
आधुनिक पिढीची चिकित्सा करतात. इतिहासाचे चटके न
बसलेली ही पिढी, खुल्या अर्थव्यवस्थेच्या झाकोळामुळे
आपल्या भूत वर्तमान भविष्याकडे बघण्याची शक्ती गमावून
बसलेली ही पिढी. (हे तिला या संस्थांना मिळणाऱ्या ग्रॅंटस
वरून लक्षात येतं. धार्मिक उन्माद, खुल्या व्यवस्थेचे
आक्रमण यांचा आणि सेवाभावी संस्थांचा काय संबंध आहे?
जे काम झालंय ते केवळ फंडिंग साठी झालंय हे भान तिला
कामातून येत चालले आहे. पण तिला नव्या पिढील दोष
द्यायचा नाही. या पिढीची स्वत:च्या आत्ममग्नतेतन ू बाहेर
येण्याची तयारी नाही . आणि सेवाभावी संस्थांमध्ये
जवळिकींचा अभाव आहे, हे तिचे रीडिंग आहे. साऱ्या संस्था
केवळ प्रिव्हेंटिव केअरसाठी पैसे देतात पुढच्या काही गोष्टींची
गरज वाटत नाही. आपल्यालाही आपला खारीचा वाटा
118 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
उचललाच पाहिजे हे तिला कलाच्या मुलीच्या मरणानंतर
कळते कारण तिला डॉक्टर नाहीत, कमी वजनाची मुलगी,
पण इनक्युबेटर नाहीत, या अगणित अडचणी समोर आहेत.
मुकणेबाई या सभापती स्त्रीचा अवघड प्रवास तिला
समजतो. ती आता इतरांबरोबर वाद करू शकते. दम भरू
शकते. आदिवासी स्त्रियांच्या गाण्यातून त्यांच्या व तिच्या
द:खाची
ु जातकुळी एकच आहे मात्र तरीही त्या किती
जोमदार आहेत याचा तिला अनुभव येतो. जिजा ही नवऱ्यानं
सोडलेली बाई, पण तिनं जागरूक आदिवासी संघटनेचं काम
आपल्या भागात सुरू केलं. गावात दारूबंदी केली, बायकांची
मोठी फळीच उभी केली.
स्त्रियांच्या आणि आदिवासी स्त्रियांच्याही जीवनातील
हिंसाचाराची वेगवेगळी रूपे तिची जीवनाविषयीची समज
सखोल करतात. तिचे हिंसाचाराबद्दलचे अनुभव तिला
साऱ्या बायांशी जोडतात. त्या तिची समष्टी होतात. गाडी
पकडण्याच्या धांदलीत आईच्या थोबाडीत मारणारा मुलगा
आणि ‘‘हाऊ बोअर यू आर'', असे तिला सांगणारा तिचा
मुलगा हे एकाच विचारसरणीचे पुरस्कर्ते आहेत. तिचा
मुलगा बापाच्या छटेलपणाचं, त्याच्या मारहाणीचं समर्थन
करतो. (नंतर तोही तिच्यावर हात उगारणार आहेच)। तिचा
भाऊ तिला सोसाव्या लागलेल्या कौटुंबिक हिंसाचाराबद्दल
तिलाच दोषी मानतो. दळभद्री म्हणतो. तिच्या कुटुंबातीले
भोवतालचे पुरुष स्वार्थी, हिंसाचारी, अन्यायी, बेपर्वा आणि
बायकांचाच सारा दोष असतो असे मानणारे आहेत. अगदी
बायकांचा देखील याला अपवाद नाही. तिच्या प्रिय
बालमैत्रिणीच्या रेवतीच्या निधनानंतर तिची जागा घेणारी
पारं परिक करुणा, तिची बहीण, हे याचे उत्तम उदाहरण
आहे. कॉनरॅड रिक्टरच्या कादंबरीतले खारींचा मृत्यूचे दृश्य
जसे, तसाच या मैत्रीणीचा मृत्यू. प्रसंग तोच. खारींची व
बायांची मरणे एकाच त-हेने होतात: जीव वाचवण्यासाठी.
‘‘खारीसारखी चपळाई देहात मुरवलेल्या या तमाम नोकरदार
बायका. जिवंत डोळ्यांच्या झुबकेदार कर्तृत्वाच्या. त्यांना
मृत्युच्या हवाली व्हावे लागते. तिचा नवरा दिनेश. सात
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 119
वर्षाच्या संसारानंतर देहात देह मिसळणारा नवरा नाही
ओळखू शकला तिला. तीच तिला ओळखते. रेवती म्हणाली
होती, ‘‘आपल्या बायकांचं आरशासारखं अस्तंय बघ.
दसऱ्यांचे
ु चेहरे े दाखवणं हेच आपलं अस्तिव. अगदी कुणी
नसलं समोर तरी भिंत तरी दिसतेच समोर. आपल्या काचेला
कायम पारा लावलेला. नात्यांचा, परं परांचा नीतिनियमांचा.
कुठलाही प्रकाशकिरण आरपार जाऊ नाही शकत कधी
आपलं स्त्रीत्व पारदर्शक अनुभवत. पण कधीतरी जाद ू होते.
आणि आत्ममग्न होतो आरसा स्वत:तच वळून पहात.
कुठल्याही प्रतिबिंबाचं लादलेपण नसलेला मुक्तमोकळा
काळ.'' (६८) हे स्वत:त वळून पहाणं महत्वाचं आहे.
आता तिचा स्वत:च्या सोबतीतला प्रवास सुरु झाला आहे.
दयाळ ही हिरवळ आता तिच्या आयुष्यात काही मुलायम रं ग
भरते आहे. ती दयाळांना पत्र लिहिते. आपल्या मनाला
आपणच घातलेले टाके कळवते. तिची वेगवेगळ्या लोकांशी
मैत्री होते प्रिया, श्रीनिवास, परितोष, त्यांना ती आपल्या
खाजगी आयुष्याचं निवेदन करते. हा मोकळेपणही नवीन
आहे.
प्रस्थापित विचारसरणी स्त्री व पुरुषांना सत्तेच्या उतरं डीला
अशा खुबीने बांधते की त्यात काही गैर नसून हे नैसर्गिकच
आहे असे दोघेही मानतात. त्या पगडय़ातून वाचकांना खेचन ू
बाहेर काढणारी व प्रश्न विचारायला उद्युक्त करणारी प्रक्षोभक
विचारसरणी प्रफुल्लाच्या मनात तिच्या आदिवासी स्त्रियांच्या
जीवनदर्शनानंतर धगधगायला लागते, हे कादंबरीच्या
पहिल्या भागातले सूत्र आहे.
दसऱ्या
ु भागात आता प्रफुल्लाचे भान आता अधिक
टोकदार होताना दिसते. आता तिला प्रवासाचा धाक वाटत
नाही. आता तिची कामाची पध्दतही बदलली आहे. ती दौरा
आखायला शिकली आहे. गटचर्चा सराईतपणे घेते.आता
सारी गावं तिला आपलीच वाटतात. बायका तिला त्यांच्या
समस्या सांगताहेत. कातकरी समाजातल्या प्रथा. एक बायको
हयात असताना दसरी ु बायको करतात जर मूल झाले नाही
तर. पण मुलगाच पाहिजे असे काही नाही. ग्रामपंचायतीत
120 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
बसणाऱ्या बायकांची ही पहिली पिढी. पण बायकांना अजूनही
आत्मभान नाही. त्यादरम्यान ती दयाळांचेही काम बघायला
जाते. आजारी पडल्यावर एंजेला तिची सेवा करते. त्यात
दयाळबरोबरच्या चर्चेत तिला लोकसंघर्षाचा इतिहास कळतो.
वेठबिगारी, झोपडपट्टी वासियांचे हक्क, आदिवासी
शेतमजुरांचे संघटना स्त्रियांवरील अन्याय. तिच्या जाणिवा
आता या इतिहासाच्या माहितीमुळे अधिक विस्तारत आहेत.
तिला ‘मोकाट’ सुटल्यासारखं झालंय. जुन्या रुळलेल्या
नियमांची तिला आता पर्वा वाटत नाही. घर, स्वच्छता,
दिनक्रम बिनमहत्वाचे होतात. घराची, त्याच्याशी बांधलेपणाची
गुलामी संपते. ती घर या मिथकाच्या बाहेर पडतेय. अधिक
मोकळेपणा अनुभवते.
दारू व मारहाण हे आदिवासी स्त्रियांचे रोजचे प्रश्न.
मारहाणीची कारणेही किरकोळ. दारू व मारहाण या परं परा
आहेत. ‘‘खऱ्या परं परा कोणत्या? हे आपण कधी पहाणार?''
हा तिचा प्रश्न. आता तिची जाणीव अधिक समृध्द झाली
आहे आणि स्त्रीशक्तीही. ती तहसीलदाराशी सहज पंगा घेते,
ब्युरॉक्रसी कशी वेळकाढू व भ्रष्टाचारानं बरबटलेली याची
माहिती तिला स्वानुभवाने होते. चतुर रणनीती वापरून
मध्यमवर्गीय पोशाखात जाऊन तहसीलदार ऑफिसमध्ये
प्रत्येक कामासाठी पैसे खातात हे सुनावते. त्याला दाबात
घेऊन बोलते. भगताबरोबर वाद घालून त्याला बिलकुल न
जुमानता भुताळी ठरवल्या गेलले ्या जयाबाईला हॉस्पिटलमध्ये
नेते. जयाबाई निवडणुकीला उभी राहिली होती फार आवाज
करते, न झालेल्या ग्रामसभेबद्दल थेट वरपर्यंत तक्रार करते
ही तिच्या सामूहिक छळाची मूळ कारणे आहेत. भगताच्या
‘‘वाटोळं होईल तुझं'' या धमकीला भीक न घालता ‘‘माझं
जे काय वाटोळं व्हायचं ते होऊन गेलंय... तुमच्या शापांना
अर्थ नाही'' हे शांतपणे सांगते. हा आत्मविश्वास नवीन
आहे. हॉस्पिटलमधल्या साऱ्या कटकटी मुळे डॉक्टरसीही
आवाज चढवून बोलते. दसरीकडे ु रेवतीच्या नावाने खडे
फोडणाऱ्या आपल्या बहिणीला, करूणा हे नाव न शोभणाऱ्या
बहिणीलाही, दोन शब्द सुनावते. सेक्स सारख्या विषयावर
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 121
सारखी बायकोबद्दल तक्रार करणाऱ्या व तिला जनावरासारखं
वापरणाऱ्या दिनेशबद्दल तिचा संताप होतो. तिच्या ‘स्व’भानात
आता इतर परिघाबाहेरच्या स्त्रिया सहजगत्या सामावू
लागतात.
तिची व सुमेधशी ओळख कशी झाली? याचा अनुभव
बोलका आहे. ज्या मुलांना काही लिहिता वाचता येत नाही
त्यांची प्रगती चित्रकलेतन ू कळवू अशी एक वा त त्याने
त्याच्या ‘प्रगत’ या संस्थेकरता शोधली होते. प्रफुल्लाचे बी.
ए. चित्रकलेत म्हणून तो तिला मदतीला बोलावतो. इथे
साहेब परमिशन देतात. तिथे त्याचं ‘‘त्यांना जमत नसेल तर
तूच काढून टाक चित्रं; सराईतासारखी नको, जरा खराब
काढ'' हे त्याची पावले कशी पडताहेत ते सांगते. पण तरीही
ती प्रगत मध्ये जाते चित्रही काढते। काम करताकरता तिथले
इतरही काम करते. याच टप्प्यावर तिला संस्था संघटनांच्या
कामांचा स्वरुपाचा व परदेशी पैशाचा अंदाज यायला लागतो.
नोंदणीकृत संस्था आणि त्यांना मिळणारा परदेशी पैसा याचे
प्रमाण १९७० च्या दशकानंतर वाढत गेल।े पावसाळ्यातल्या
कुत्र्याच्या छत्र्या असाव्यात तशा या संघ टना. जागरूक
आदिवासी संघटना या संस्थेशी परिचय. ते कार्यालय जणू
काही पोलिस स्टेशनच आहे. फायलींचे गठ्ठे, गणवेश,
वेगवेगळी टेबले, जाडजूड रजिस्टर्स व फायली. ‘‘रेपकेस''
ची चौकशी ती पाहते. पहिला प्रश्न ‘‘सभासद आहात का
संघटनेच? े '' मग त्या मुलीवर प्रश्नांच्या फैरी. ताई तिला
त्यांना जॉईन व्हायला बोलावतात आणि या संस्थांच्या
कामातली ‘कार्यकर्त्यांची पळवापळवी ‘ करण्याची मनोवृत्ती
तिला उलगडत जाते.
मात्र अजूनही ती गोंधळलेल्या मन:स्थितीतून पूर्णपणे
बाहेर आलेली नाही. अंतर्गत मानसिक ताणाने ती आजारी
पडते. सुमेध सुमित्रा व शांताबाईंच्या मुळे बरी होते. पण
त्यात तिला सुमेध व सुमित्रा यांच्या आंतरजातीय लग्नाची
कथा आणि सुमेधच े जातीयवादी व exploitative वर्तन
कळते. त्याचे मध्यमवर्गीय व उच्च जातीय ढोंगी वर्तन तिला
सहन होत नाही. ती बौध्द, तो सवर्ण आहे मात्र तिच्याशी
122 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
लग्न करून आपण तिचा उध्दार केला असे त्याला वाटते.
त्याचा हा भयंकर ढोंगीपणा तिला खोलवर दखावतो. ु तिच्या
गाण्याचं कौतुक म्हणजे ‘‘महाराघरी गाणं असतंच'' हे!
शिक्षण मिळणं, सुसंस्कृ त होणं याचा पुनर्विचार करण्याची
गरज तिला तौव्रतेने वाटू लागते. तिच्या स्वत:च्या नवऱ्याच्या
साऱ्या करतुती तिला अजूनही अधूनमधून सुन्न करतात.
तिला आता साऱ्याच पुरुषांचा संशय वाटतो. ‘‘कुणी
आपल्याशी कितीही चांगला वागला तरी तो बायकोशी कसा
वागत असेल हेच येतं आधी मनात''. स्त्रीपुरुषांच्या मधे मैत्र
असू शकेल की नाही? हा प्रश्न आता तिला डंख मारतो
आहे.
या प्रश्नांचा सामना करता करता आता ती प्रश्नावली
तयार करणाच्याच्य कामातल्या अडचणी व आव्हाने
समजाऊन घेते आहे. त्या प्रक्रियेत तिला चैत,ू पद्मा या झुंझार
स्त्रिया गवसतात. त्यांचे लढणे तिलाही बळ देते. कोसळलेच
तर पुन्हा मला वर घेईन येणारी माणसं सोबत आहेत याची
आश्वासक जाणीव होते. ‘‘आता आपण स्वत:ही आहोत
आपल्यासाठी ... आपल्यासोबत, इतरांसोबत, इतरांसह,
इतरांसाठीही..''. (१४१) दयाळांचे शिबीर हा या प्रवासाचा
एक महत्वाचा बिंद ू आहे. आंध्राच्या सीमेवरचा आदिवासी
लोकांचा तालुका. तिला भाषा येत नाही तरीही छान वाटते.
,त्यातिला गावठी औषधांची माहिती देतात. तिला त्यांच्या
सारखं व्हायचंय. ‘‘मी परतून इच्छित नाहीये घरी या
पहाडांमधून. मला तुमच्याकडून अजून बऱ्याच गोष्टी
शिकायच्यात बायकांनो. आपल्या शहरी आयुष्यापेक्षा संपूर्ण
वेगळे आयुष्य जगणाऱ्या या आदिवासी बायकांना ती मनोमन
विचारते:
सायाळाच्या अंगावरचे काटे फिस्कारून फेकण्याचं तुमचं
कसब कसं कमवलं आहेय तुम्ही?
लाजेपरु तं चिरगु ट गुंडाळलेल्या तुमच्या कमरेला विळाही
असतो बांधलेला धारदार...
मी हाताळू इच्छितेय हत्यारं आता .... तुमच्यासोबतीनं
मी मिरच्या खुडू इच्छितेय तुमच्यासोबत लालभडक
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 123
मी पिंजू इच्छितेय कापूस शुभ्र, शुभ्र सरकी बाजूला सारत
उफाणू इच्छितेय दाणे टपोर पिवळैधमक भूस उडवत
सुपाटोपल्यांनी
कोरडय़ा पात्रात खड्डा खोदनू मलाही जमवायचंय
तुमच्याप्रमाणेच करवंटीनं वाटीवाटी पाणी घागरीत...''
(१४८)

एंजेला आणि प्रफुल्ला यांचा संवाद तिला वेगळ्या दिशेने


घेऊन जातो. व्यक्तिगत पातळीवरच्या संघर्षा साठी
आपल्याला सामूहिक ताकद उपयोगात आणली पाहिजे.
आपल्यातल्या ज्या गोष्टी आपल्याला नको आहेत त्यांचं
स्वरूपही आपण समजावून घेतले पाहिजेत. त्यावेळची
परिस्थिती आणि शक्तिप्रवाह जाणून घेता आले तर स्वत:त
हवे ते बदल घडवून आणता येतील आणि आपल्याला आपलं
व्यक्तिमत्व जसं हवं तसं बदलता येईल,'' (१५५) ‘‘मनात
आत्महत्येचे विचार येऊ द्यायचे नाहीत प्रफुल्ला आणि दसऱ्याु
कुणाच्या मरणाचे कुणाला मारण्याचे हिंसक विचारही
टाळायचे'' हा दयाळांचा उपदेश. (१५८) रिव्हाइज्ड
प्रश्नावली करण्याची तयारी करताना केलेला ८ जिल्हयांमधला
सारा प्रवास तिला स्वत:चे मानसिक स्थानांतरण, उन्नयनीकरण
करणारा वाटतो.
कादंबरीच्या तिसऱ्या भागात तिची जाणीव एक पुढचे
वळण घेते. स्वयंसेवी संस्थांबद्दल व त्यांच्या कार्यपध्दतीबद्दल
आता तिच्यासमोर खूप प्रश्न उभे रहातात. त्यांना
सदसदविवेकाची धार आहे. पण आदिवासी माणसांविषयी
मात्र विश्वास वाटत रहातो. आता तिला स्वत:चा स्वर
गवसला आहे आणि त्या आवाजात प्रश्न विचारायचे धाडस
तिच्या अंगी वाढते आहे. ‘‘मी आणि माजी संस्था त्यांचे प्रश्न
सोडवणार आहोत, मदत करणार आहोत; म्हणून त्या त्यांची
कामंधामं सोडून माझ्याशी बोलण्यासाठी येताहेत... आणि मी
त्यांच्या पदरात काय घालते आहे... फसवणूक?'' (१५९.)
एकीकडेअपार दारिद्र्य आणि दसरी ु कडे परदेशी पैशानं
ओसंडून वाहणाऱ्या संस्था. महाराष्ट्रात किमान ३५० रुपये
124 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
कोटी येतात. संघटनेकडे गाडय़ा असतात, पण कार्यकर्त्यांना
पगार देतात अतिशय कमी. ७००-८०० ते
१५००/२०००. पण संचालक मात्र विमानाने हिंडतात,
चैन करतात. एकीकडून पैसे मिळेनासे झाले तर दसरीकडू ु न
लगेच मिळतात. ‘‘एक बायको मेल्यावर दसऱ्या ु दिवशीपासून
स्थळं सांगन ू यायला लागतात तसं!'' (१६०) हे सारे
तिला विलक्षण त्रासदायक आहे. कादंबरीच्या सुरवातीला
दृष्टांतपाठातील भींगरुटी म्हणजे गांधीलमाशी आणि कीटकी
यांच्यावरचा एक दृष्टांत आहे. ‘‘गांधीलमाशी कीटकीस दंश
करून आपल्या घरात कोंडून ठे वते. गांधीलमाशी आपल्यास
खाणार या भीतीने कीटकीस तिचे सतत स्मरण होते. तिच्या
या चिंतेनेच तिला पंख फुटतात व ती गांधीलमाशीचे रूप
धारण करते.'' हा दृष्टांत स्वयंसेवी संस्थांना व त्यांच्यामधील
सत्तासंबंधांना लागू पडतो.
सुमेध हा त्याच्या व्यक्तिगत आयुष्यातही एक फ्रॉडच
आहे हे तिला सुमित्राच्या सांगण्यावरुन उमगते. एकीकडे
आंतरजातीय विवाह आणि दसरीकडे ु स्वयंसेवी संस्था व
कार्यकर्ते यांच्या व्यवहारातले कावे बारकावे तिला उमगत
जातात. वरकरणी ज्या उच्चभ्रूंना तो नावे ठे वतो त्यांच्या
सारखेच वागायचा सुमेधही प्रयत्न करतोय. जशा स्वयंसेवी
संस्था कार्यकर्त्यांना माहितीपासून दरू ठे वतात तसें तो त्याच्या
बायकोला त्याच्या व्यक्तिगत बाबींपासून दरू ठे वतो. सुमित्राची
स्थिती कामगारांसारखीच आहे. एखादा भाग हाताळणाऱ्या
कामगाराला तेच काम जसं जन्मभर करावं लागतं, त्याला
पूर्ण यंत्र माहितीच नसतं, तसंच सुमित्रालाही कुटुंबात
नवऱ्याच्या काही विवक्षित क्षेत्रातच प्रवेश करण्याची मुभा
आहे. एकदा प्रेमातली वा विचारांमधली उर्जानिर्मिती संपली
आता कौटुंबिकतेच्या आणि व्यावसायिकतेच्या नावाखाली
स्वत:च्या तुंबडय़ा भरून घेण्याचा उद्योग सुरू होतो.
बाजारावर आधारलेली व्यवस्था हया दोन्ही गोष्टी घडवायला
मदतच करते आहे हे भान तिला येते.
त्यांचा नवा प्रोजेक्ट आहे तो १९९२ सालच्या
घटनादरुस्ती
ु नंतर १० लाख स्त्रिया पंचायत राज्यव्यवस्थेत
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 125
आल्या त्याबद्दल. त्यात महाराष्ट्रीय आणि आदिवासी महिला
किती आहेत हा प्रश्न तिला आता आदिवासी समाजाच्या
गाभ्याकडे घेऊन जातो. महाराष्ट्र सरकारने १९९७ मध्ये
आदिवासी स्वशासन कायदा केला. त्यावर काम करायला
एकीकडे तयार होते आहे. तर नव्या व्यवस्थेत दसरीकडे ु
मात्र सत्ताधारी पुरुषांच्या मोळ्या सुटल्यासारख्याच झाल्या
आहेत हेही तिच्या प्रत्ययाला येते. समाजात बायकांना सर्रास
होणारे घाणेरडे स्पर्श हा सर्वसाधारण स्त्रियांचा अनुभव इथेही
अधोरेखित होतो. ते तिलाही प्रवासात वा निवासात टाळता
येत नाहीत. या साऱ्या प्रवासात तिला एकूणच व्यवस्थेतल्या
लोचट पुरुषांचा अनुभव येतो आणि व्यत्यास म्हणून
दयाळांसारखा माणूस वेगळ्या अर्थाने आपल्याला चांगल्या
पुरुषाची ओळख करून देतो आहे असे तिला वाटते. आणि
त्यातही आदिवासी स्त्रिया, त्यांचे विचार, व्यवहार, त्यांचे
अनुभव तिला प्रेरणा देतात. निवडणुकीला उभे रहायला
विरोध करणाऱ्या नवऱ्याला ‘‘दात काढून हातात दीन'' असं
म्हणणारी वाघेबाई. (१७१) तरीही अर्ज मागेघ्यायला
लागल्यावर ‘‘हे आपलं राजकीय शिक्षणच झालं'' असे
म्हणते हे कार्यकर्त्या आदिवासी स्त्रीचे positive thinking
तिला स्तिमित करते. राखेच्या उबेत झोपणारी माणसं, शेळी
अंगावर मुतते अशी झोपायची जागा आणि कातकरी ठाकूर
या जमातीच्या दिनरात वीटभट्टीवरच्या राबणाऱ्या, पाय व
अंगावरची त्वचा फाटलेल्या बायका, थकवा निघण्यासाठी
दारू पिऊन थकून लास झालेल्या बायका ही तिच्या
अनुभवांना विविध अर्थाने समृध्द करतात आणि आपल्यासमोर
प्रश्नही उभे करतात. धरणग्रस्त लोकांचे प्रश्न घेऊन काम
करणाऱ्या दमाडाबाई,
ु पंचफुला ह्या झुंझार बायका आहेत.
‘‘ही खुर्ची माझ्यासाठीही आहे. ती मला मिळाली म्हणजे
काही कोणी उपकार मेहरबानी केलेली नाही'' ‘‘बाई
निवडून गेली की चांगला फरकही पडतो. पुरुषांची शिवराळ
भाषाही बदलून जाते.'' (१८८) हा आत्मविश्वास तिच्यासाठी
महत्वाचा आहे. त्या तिची शिक्षिकाच बनताहेत. हा
भगिनीभाव तिच्या आत्ममग्नतेला एक बळकट पर्याय देतो.
126 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
स्वयंसेवी संस्थांमधला तिचा अनुभव हा अधिकाधिक
प्रखर होतो आहे. पैशासाठी कामात खोटेपणा करणारे स्त्री-
पुरुष कार्यकर्ते. कुठल्याच गावाला न जाता ऑफिसमध्येच
फॉर्म भरुन घेऊ म्हणणारा unethical सोमनाथ, जयाबाईला
जागरूक संघटनेच्या ऑफिसमध्ये लावून घेणारे लोक, जिजा
आणि तिने मदत करावी म्हणून आणलेल्या पोटुशी राहिलेल्या
सगनीबाईला परत पाठवणाऱ्या संघटनेच्या सर्वेसर्वा ताई.
सगनीबाईचा खरेतर लिलाव होणार आहे. पण केवळ ती
संघटनेशी संबंधित आहे असा संशय येऊ नये म्हणून तिला
परत पाठवण्याचे अमानुष कृत्यही लीलया करणाऱ्या ताई
स्वत:च्या स्वार्थापायी तिची कुत्तरओढ करतात. या
साऱ्यांमधून जातपंचायतींचा भयंकर प्रभाव व स्वयंसेवी
संस्थांचे स्वार्थी राजकारण ही सूत् रे सातत्याने सामोरे येत
रहातात.
दसरीकडे
ु तिच्या खाजगी जगात ती सुमित्राच्या व
सुमेधच्या नात्यात अधिक ताण पहाते आहे. अनुभवते आहे.
सुमित्रा जणू एखाद्या चिंध्यांच्या गाठोडय़ासारखी होत चालली
आहे यावरुन, तिच्या संघटनेतल्या कामावरुन आणि त्याच्या
संशयास्पद व्यवहारांबरुन सुमेध व तिच्यातही आता ताण
वाढते आहेत. सुमेध तिच्या कामावर टीका करत ‘‘आयॅम
फेडप यार'' असे तो म्हणतो. ‘‘तू मला पूरक आहेस असं
वाटलं होतं पण ते तसं नाहीय हे आता कळतंय मला. तू
माझ्या कामाच्या चौकटीत बसत नाहीस. तुझ्या डोक्यात
काहीतरी वेगळंच चाललेलं असतंय. ... या अशा उठाठे वी
करायच्या असतील तर ‘जागरूक आदिवासी संघटनेसारख्या
ठिकाणी काम कर. ‘प्रगत’ मध्ये राहनू हे चालणार नाही.''
(२४८-४९) जी पुरुषी वृत्ती तिला त्याच्या खाजगी
आय़ुष्यात दिसते तीच वृत्ती इथेही तिच्या अनुभवाला येते.
सुमेधचं म्हणणं असं की कार्यकर्त्यानं गबाळं फाटकं राहिलं
पाहिजे, उपाशी निजले पाहिजे ह्या संकल्पना कालबाह्य
झाल्या आहेत. म्हणून त्यांनीही रहाणीमान उंचावलं पाहिजे.
प्रत्यक्षात मात्र रहाणीमान उंचावते ते संस्थेतल्या उच्चभ्रूंचे.
सामान्य कार्यकर्ता तिथेच दारिद्र्यात खितपत रहातो.
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 127
स्वयंसेवी संघटनांना वाहन लागते कारण त्यामुळे कार्यक्षमता
वाढते. पण कुणाची कार्यक्षमता? संस्थाचालकांची? प्रकल्प
प्रमुखांची? ही कार्यक्षमता सामान्य कार्यकर्त्याची कधीच का
नसते? त्यांना किमान वेतनही का मिळत नाही? हे शोषण
नव्हे तर दसरे ु काय आहे? - प्रफुल्लाचे हे प्रश्न त्रासदायक
खरेच, म्हणूनच ते दर्लक्षित
ु रहातात. पण ते या संस्थांचा
गैरव्यवहार चव्हाठय़ावर आणतात.... संघटनेच े लोक आता
आदिवासींच्यात जात नाहीत। का? तर ‘‘आता लोकांना
संघटनेचं महत्व पटलंय. स्वत:हनू येतात अडल्यानडल्याला.
आपण त्यांच्या कडे जायची आवश्यकता उरलेली नाही
आता!'' असे ते समर्थन करतात. स्वयंसेवी संस्थांचे हे मत
प्रतीकात्मक नाही तर प्रातिनिधिक होते आहे हे वास्तव तिला
भयानक वाटते.. ‘‘फंड मिळवायचे आणि तेवढय़ापुरते
प्रकल्प राबवायचे. फंड संपला की प्रकल्प संपला''.
‘‘आपल्या तेजोवलयात इतर कुणाला सहभागी करायची
त्यांची तयारी नाही.'' व्यक्ती लाभार्थी वा ‘केस’ बनून
रहाते, एक क्रमांक बनून रहाते. व्यावसायिकता. सामाजिक
काम हे ‘नोकरी’ बनून जाते. स्वत:चा विकास करणं हे
कार्यकर्त्याचं उद्दिष्ट कसं काय असू शकतं? असे सुमेध
जरी म्हणाला तरी त्याला वेगळे काहीच अभिप्रेत नाही, तो
केवळ वरवरचा एक सोनेरी दिखावा आहे हे तिच्या लक्षात
येते. ‘‘प्रत्येक गोष्टीचं भांडवल कसं करता येईल हे बघतो
तो.'' (२५१) त्याच्या वैयक्तिक आयुष्यातले संस्थात्मक
पारं परिक पुरुषपण आता स्वयंसेवी संघटनेतही परावर्तित
झाले आहे. किं बहनु ा हा अवकाश घराच्या अवकाशाइतकाच
काचणारा बनण्यामागे त्याची एकूणच पारं परिक स्वार्थांधता
आहे. तिला एक नवा रुपबंध मिळाला आहे.
ही पितृसत्ताकता विविध रूपांमधून स्त्रियांच्या प्रत्ययाला
येते. अलिबागला आदिवासी एकजूट संघटनेचं शिबीर होते.
तिथे प्रतिमा ही कार्यकर्ती आहे ती सांगते, ‘‘झेंडावंदन
बायकांच्या हस्ते. पण बाईच्या हाती झेंडय़ाची दोरी येणं हा
समाजाला अजून कमीपणा वाटतो, नामुष्की वाटते. विधवांना
काडीमोड घेतलेल्या तर अधिकारच नाही. बायकांनी झगडून
128 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
झेंडावंदन करण्याचा अधिकार मिळवला आहे. रखमाबाई,
सीताबाई, (ही बायकांना राष्ट्रगीत पाठ करायला लावते व
नंतर सर्व पुढाऱ्यांच्या नाकावर टिच्चून त्यांना ते म्हणायला
ही लावते.) प्रतिमा म्हणते: कार्यकर्त्याचं दारू पिणं आणि
बायकोला मारहाण करणं हे थांबवणं फार अवघड असतं.''
(२५९) पण बायका त्यात वेगवेगळ्या पध्दतींनी हस्तक्षेप
करतात, वातावरण बदलू पहातात. हे त्यांना मिळणाऱ्या
सार्वजनिक अवकाशामधूनच शक्य होते. बायका बंधारे
बांधतात, श्रमदान करायला लोकांना उद्युक्त करतात. पक्षीय
राजकारण वेगळं , गावपातळीवरचं राजकारण वेगळं . ‘जिथं
आर्थिक संबंध येतो तिथे विरोधक मूग गिळून गप्प बसतात’
असे सांगणाऱ्या अंजनाबाई राजकारणातून शिकून शहाण्या
झाल्या आहेत.
आता प्रफुल्लासमोर काही मूलभूत प्रश्न उभे रहातात.
आदिवासींची स्वत:ची अशी एक संस्कृ ती आहे. तिला
एकदम बाजूला कसं काय सारता येईल? त्यांची भाषा,
इतिहास, नैतिक मूल्यं विचारसरणी, त्यांना तथाकथा अडाणी
मागास म्हणतो. त्याचं तत्वज्ञान व भूमिका समजावून घेतो
का? ... बदल घडवायचे ते चुकीच्या समजुती अंधश्रध्दा
आणि निष्क्रीय वृत्ती यांच्यात. त्यांचं पर्यावरणाचं भान,
त्यांच्या समाज एकसंध ठे वण्याच्या वृत्ती. ... ज्या गोष्टींना
आपण विकास मानतो तो त्यांनाही विकास वाटतो का? हे
सामाजिक भान तिला अनेक अर्थांनी जागृत करते आहे.
तीच गोष्ट अन्य राजकीय महिलांच्या संदर्भातही दिसते.
राऊतबाई आमदार आहे. तिच्याकडे काम करणारी बाई
आजारी आहे. पण कार्यकर्त्या पुढारी झालेल्या देऊबाई दोन
किलो जवसाची चटणी तिला कुटायला सांगतात. संस्था
आणि राजकारण यात वेगवेगऴया पध्दतीने वागावं लागतं
हे ज्ञान त्यांना आलंय. ‘‘संस्थेत आपण कार्यकर्ते असतो.
त्यामुळे कुठल्याही विषयावर कसं रोखठोक बोलता येतं.
तसं इथं लोकप्रतिनिधी म्हणून बोलता येत नाही. सर्वांना
सांभाळून घ्यावं लागतं. या दोन्ही जबाबदाऱ्या पेलायच्या
म्हणजे तारेवरली कसरतच...'' (२४०) बचतगटांचं काम
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 129
चांगलं होतं. पण तिथेही फसवणूक आहेच. लोक पैसे गोळा
करून पळून गेल.े पण ही संस्था अजूनही तालुक्याच्या
ठिकाणी काम करते. तिथेही तिच्याबद्दल खूप तक्रारी आहेत.
पण देऊबाई मात्र ‘‘अशा भानगडीमध्ये आम्ही त्यात लक्ष
घालत नाही'' असे सांगतात. (२४३) ‘‘राजकीय
सर्वस्वामुळे श्रीमंत झालेत हे लोक. पण बाकीच्या आदिवासींची
परिस्थिती आजही पूर्वीसारखीच आहे. हे लोक साऱ्या योजना
स्वत:कडे वळवून घेतात. किती योजनांखाली कर्ज घेतात
पण फेडत नाहीत.'' – हे देऊबाईचे स्पष्टीकरण या
राजकारणाचे अनेक गलिच्छ पैलू उलगडते. (२४३)
आणि प्रफुल्लाच्या मनातल्या प्रश्नांना अधिक तीव्र पातळीवर
नेते. ‘‘ग्रामपंचायतीच्या राजकारणाला पक्षीय संदर्भ कितपत
असतो? या प्रश्नाला : ‘‘ती दडच ू (पाण्याच्या घागरीवर
घागरी) असते ना ताई, तसंच... खालपासून वरपर्यंत
रचलेलं असतंय.'' (२३६) असे कुकणा जमातीच्या
देऊबाई बोलतात. तर : ‘‘फरक पडलाय. आता महिलांना
ग्रामपंचायतीत आदरानं वागवलं जातं.'' ‘‘मी प्रस्ताव
मांडला की प्लॉटवाटप महिलांच्या नावानं व्हावं, त्याला
साऱ्यांचा विरोध. मग नवरा बायको दोघांच्याही नावानं
प्लॉटवाटप.'' (२३८) असेही बायकांच्या संघर्षांतन ू
मिळवलेल्या यशाचे अनुभव येतात.
प्रफुल्लाला आता निवड करण्याची आस आहे. बोटचेप,े
खोटे नागर आयुष्य आणि स्वयंसेवी संस्थांचे स्वार्थी राजकारण
या दोन्हींना तिला नकार द्यायचा आहे. आदिवासींच्यात
मिसळून जाणे एकरूप होणे, किमान त्यांच्या आयुष्याचा भाग
होणे हे तिला महत्वाचे वाटते. ‘‘त्यांच्या'' भाषेला आता ती
आपली भाषा म्हणते. तिचे त्यांच्याशी तादात्म्य होते आहे.
. ‘‘आता त्यांचं-आपलं असं काही निराळं वाटतच नाहीय़े.''
(२५४) ‘‘हा मोकळेपणा वडगावच्या डोंगरावर क्षणभर
अनुभवला होता पण आता तोच क्षण माझं जगणं व्यापून
टाकण्याइतका विस्तारलाय.'' (२६८) हे प्रफुल्लाला
मिळालेले यश आहे. परिणामत: प्रफुल्ला तिच्या जुन्या
व्यक्तिगत आयुष्याशी आता संपूर्णपणे फारकत घेते. ती
130 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
घरातले सामान जुन्या फर्निचरवाल्याला देऊन टाकते. रं गांचे
डाग असलेल्या भिंती रं गवणे सुध्दा तिला नको वाटते.
त्याचवेळी तिची सहकारी अनुजा देखील ठरलेलं लग्न
मोडते. कारण त्याची फॅमिली कर्मठ आहे व त्याच्याबरोबर
जमणार नाही ही भीती तिला आहे. (पण असे प्रश्न पडणारी
एकही पुरुष व्यक्ती मात्र तिला भेटत नाही हे नोंदण्यासारखे
आहे.) (२४७) सुमित्राची, सुमेधच्या बायकोची स्थिती
वाईट आहे हे तिला भेटायला गेल्यावर प्रफुल्लाला कळतं.
याचे तिलाही प्रत्यंतर येते. भाग तीन इथे संपतो.
कादंबरीच्या चौथ्या व शेवटाच्या भागात प्रफुल्ला
ग्रामपंचायत आणि स्त्रिया या विषयांवरची तज्ञ म्हणून
ओळखली जाते आहे.तिला तिची स्वतंत्र ओळख मिळाली
आहे. ती टाईम्स साठी तीन अभ्यासपूर्ण लेख लिहिते, हा
तिचा ज्ञानात्मक विकास आहे. तिला सेमिनारची आमंत्रणं
येतात. सोमनाथच्या बायकोच्या ऑपरेशन साठी, सोमनाथच्या
अडचणींसाठी, ती त्याला झेपत नसूनही त्याला १०००
रुपये देते. सुमित्राला सुमेधच े प्रताप माहिती आहेत. दर चार
महिन्यांनी पोरगी बदलतो. ‘‘समाजसेवा हा आर्थिक व्यवसाय
समजतोस ना? मग स्टाफला व्यावसायिकासारखी वागणूक
का देत नाहीस? तिथं त्यांनी कर्मचारी नाही तर कार्यकर्ता
असवं असं वाटतं. त्यांच्या किमान गरजा लक्षात घेऊन
त्यांना बऱ्यापैकी पगार दिलाच पाहिजे....या संस्था म्हणजे
सूज आहे.'' (२८६) या निर्वाणीच्या मताला ती येऊन
पोचते. इथे तिच्या आयुष्याचं एक वर्तुळ पूर्ण होते आहे,
पाठीमागे पडते आहे.
त्याचवेळी तिच्या व्यक्तिगत जीवनात आणि सार्वजनिक
जीवनात आता एक प्रकारचा एकमेळ होऊ लागलाय.
नातेवाईकांपक्षा
े माणसं तिला महत्वाची वाटू लागली आहेत.
भाऊ तिला मुलाच्या मुंजीला बोलावत नाही तेव्हा तिला तिला
माहेरगाव, तिथली माणसं भेटणार नाहीत याचंच द:ख ु होतं.
ती व्यक्तींपेक्षा माणसांशी अधिक जोडली जाते आहे.
‘‘आपल्यातच एकी पाहिजे फुलाताई. आपल्या आतही
आपली एकी पाहिजे. मेळवलं पाहिजे सगळं .'' (२७१) हे
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 131
तिच्या आयुष्याचे सूत्र बनते आहे. पण तिला आता शेवटचा
धागा निर्णायक रीत्या तोडायचा आहे. ती फ्लॅट विकायचे
ठरवते आणि तिचा मुलगा बिट्टू येतो. त्याला तिच्याकडे
एक वर्षभर हक्काने रहायचे आहे. हा धागा तिला तोडायला

हवा आहे. त्याच्या आवाजात गुर्मी आहे. डॅडींच्या पैशाचा


माज आहे. पण ती त्याला बजावते. ‘‘घर डॅडींचं आहे नाही,
होतं. ते कायद्यानं माझं आहे, फक्त माझं. आणि पैसा असेल
तर इथे येण्याची काय गरज?'' ‘‘माझ्याबाबत तुझीही काही
132 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
जबाबदारी आहे की नाही? माझी आई आहेस तू.'' तो
कुत्सितपणाने विचारतो, तिचा इगो प्रॉब्लेम आहे असे समजून
विचारतो, ‘‘मी इथं रहायला येवू का?'' आणि ती त्याला
स्पष्ट शब्दात ‘‘नाही'' असे सांगते. त्याच्या चेहऱे ्यावर
संतापाच्या वेडय़ावाकडय़ा रेषा तरळतात व त्याचा चेहरे ा
अगदी साहेबांसारखा दिसू लागला. ‘‘नालायक साली... ''
असे म्हणून तो हात उगारतो. . पण ती त्याचा हात वरच्यावर
पकडते आणि बळ एकवटून त्याला सांगते, ‘‘यापुढे या
घरात कशासाठीही पाऊल ठे वायचं नाही....'' यावर त्याचे
उत्तर ‘‘तू मेलीस ना तर तुला अग्नी द्यायलाही येणार
नाही...'' जणू ही पितृसत्ताकतेची सर्वोच्च धमकी आहे!
तिला त्याचे हसूच येते. त्याला ती हाकलून लावते. तिच्या
पूर्वीच्या आयुष्याचे प्रकरण आता आता संपूर्ण पणे संपते.
सुमित्राचा ट्रेनखाली येऊन मृत्यू होतो. पण सुमेधला त्याचे
द:खु नाही. तेही प्रकरण आता संपले आहे.
दसरीकडे
ु तिची राजकीय जाणीवही अधिक तीव्र होते
आहे. समाजकारण, राजकारण व स्त्रिया या संदर्भात शहरी
व खेडय़ातल्या बायकांच्या अगदी वेगवेगळ्या म्हणता येतील
अशा प्रतिक्रिया व प्रश्न आहेत. पण संस्थात्मक पितृसत्ताकता
आणि वैयक्तिक पुरुषीपणा दोन्हीही ठिकाणी आहेच.
राजकारणातील महिलांकडे लोक दषित ू नजरेनं पाहतात.
समाजकारणात स्त्रियांना मिळणारा आदरभाव मात्र
राजकारणातल्या महिलांच्या वाटय़ाला क्वचित येतो. पैसा,
गुंडगिरी, दारू, हे निवडणुकीला उभे राहण्याचे निकष. हिंसा
भ्रष्टाचार, जातीयता, धर्मांधता ही राजकारणाला लागलेली
कीड. केवळ स्त्रियांना निवडून दिलं तर प्रश्न सुटतील असं
नाही. त्यांनी स्त्रियांचं राजकारण केलं पाहिजे. (२८२) या
राजकीय मताला ती येऊन ठे पते आहे. ती चिचगुडय़ाला
जाते. तिच्यातला फरक लक्षणीय आहे. तिच्या त्वचेचा रं ग
रापला आहे, केस वेडेवाकडे वाढलेले आहेत, भाषा भयानक
सरमिसळीची झाली आहे. पण ती वेगळी असल्याच्या खुणा
लोपल्या आहेत. कोरून उडवेले टवके पुन्हा चिकटले आहेत.
‘‘मी मूळ पदावर आले आहे'' असे तिला वाटते.. हे मूळ
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 133
पद अस्सल माणूस असण्याचे आहे. ती आणखी नवी भाषा
शिकते. ‘‘या घरांमधून दिसलेली सुसंस्कृ त सहकार्याची
वृत्ती, आदरभावना, विश्वास, आपुलकी प्रेम, आनंद... हे
मला शहरात अभावानंच सापडलं होतं.'' (२९४) हे गाव
आदर्श. एकूण समाजातलं स्त्रियांचं स्थान वरचे. तिला वाटते
की निवडणूक ही इथे बाहेरची, उपरी आणि अस्वाभाविक
गोष्ट आहे. तिच्या बऱ्याच प्रश्नांना इथे अर्थ उरत नाही.
कारण हे गाव सहकार्यावरच चालते. आजवर पाहिलेल्या
साऱ्या विषमतेच्या वातावरणाला हा एक उतारा मिळतो.
मग सातटेकडी हे गाव तिला आतून कोणीतरी हाका
मारतंय असं खोलवरून जाणवतं. ‘‘तूच का नाही येऊन
रहात इथं?'' हा प्रश्न तिला रणीबाई विचारते आणि एक
नवी ठणगी पडल्यासारखं होतं. . ‘‘आपण बाहेरचे आहोत,
त्यांनी सुरुवात करून द्यावी, सहकार्य करावं, त्यांना भान
आलं की दसऱ्या ु ठिकाणाकडे, समूहाकडे वळावं. संस्था
स्थापन करून ती एकाच जागी रुजवली की ती एकछत्री होत
हेत तिचं संस्थान होणं यातूनच टळू शकेल. योग्य माणसं
तयार करणं आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव
करून देणं आणि त्यांच्या हाती काम सोपवून त्यातून आपलं
तनमन अलगद काढून घेणं कार्यकर्त्याला जमलं पाहिजे.''
(३०७)
राजकीय हितसंबंध गुंतलेले लोक दयाळांना अपघातात
मारण्याचा प्रयत्न करतात;, दारू, जंगल, कापणी, तेंद ू पत्ता
त्यांच्याच हाती आहे सगळं . कोणत्याही स्वयंसेवी संस्था
रुजूही शकल्या नाहीत या भागात हे ती जाणते तरीही आता
तिला झोकून देऊन काम करणाऱ्या कार्यकर्त्यासारखं व्हायचं
आहे. ही तिच्या मनात स्वत:ची प्रतिमा आहे. ती प्रगत चा
राजिनामा देते. रं गसामान आणि कागद घेऊन ती आता
तयार आहे जायला. .''सापडत जातील पुन्हा रं गांचे स्रोत!
थांबायचं नाही, वळून पहायचं नाही..तेजाचा पुढचा इवलासा
क्षण झळाळत समोर येईल आणि म्हणेल चल ही तुझी वाट.
आणि मीही सहजपणे निर्णय घेईन''हा त्या तेज:कणाच्या
शोधाचा प्रवास, हा तिचा प्रवाही मानस आहे.
134 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
कादंबरीच्या चार भागात पसरलेली ही कथा अन्यायाविरुध्द
‘ब्र’ उच्चारणाऱ्या अनेक आदिवासी स्त्रियांची कहाणी होते.
ती केवळ प्रफुल्लाची कथा रहात नाही. त्यातून व्यक्ती आणि
समष्टी यांचे एक समृध्द नाते विकसित होत जाते. हा सारा
प्रवास एका अयशस्वी ठरलेल्या बाईचा आहे हे महत्वाचे.
जी बाई कुटुंबव्यवस्थेत गृहिणी म्हणून, आई म्हणून, बहीण
म्हणून इतकी धुत्कारलेली आहे, तीच या नव्या जीवनाचे
नवे रूप व रं ग आपल्या सर्जक होत जाणाऱ्या अस्मिताभानाने
साकारायला सिध्द होते आहे. हा तिचा प्रवास मराठी
कादंबरीत तरी केवळ अपूर्व असाच आहे. नजुबाई गावितांनी
चितारलेल्या आदिवासी समाजाच्या चित्रणापेक्षा हे चित्रण
कितीतरी वेगळे आहे कारण ते एका मध्यमवर्गीय
बिगरआदिवासी स्त्रीच्या नजरेला मध्यवर्ती निवेदकाच्या
भूमिकेत ठे वते. पण म्हणून ते कमी प्रतीचे नाही. नजुबाईंचा
निवेदक आवाज आदिवासी समाजांच्या अंतर्गत चौकटीतला
आहे. तर ब्र मध्ये तो बाहेरुन आतली स्थिती निरीक्षण करून
निवेदन करणारा आहे. मात्र या दोन्ही कादंबऱ्यांमधील
आदिवासी समाज एकच आहेत असाही त्याचा अर्थ नाही.
मध्यमवर्गीय व नागर समाजाच्या चौकटींच्या पलिकडे
जाणारा एक अदभुत प्रवास आणि स्थित्यंतरण या दोन्ही
कादंबऱ्या अतिशय वेगवेगळ्या रीतींनी आपल्याला
घडवतात. त्यांमधून समाजाच्या व आत्मगत अनुभवांच्या
राजकीय स्त्रीवादी विचारांनी केलेल्या विश्र्लेषणाची
संदर्भचौकट अत्यंत पारदर्शकपणे व परखडपणे आपल्या
सामोरी येते.

- माया पंडित
संपर्क : ९९४९४७०४३४

‘w³V eãX Am°JñQ 2020 & 135


कथा ओढाळ काळ

- चित्रा नित्सुरे

डॉ. अ‍ॅलन लाइटमन यांचं ‘आइन्स्टाइन्स ड्रीम्स' हे


पुस्तक या कथामालिकेमागची प्रेरणा आहे.
डॉ. लाइटमन भौतिकशास्त्रज्ञ आहेत. अमेरिकेतील
एम.आय.टी. या नामांकित विद्यापीठात प्राध्यापक
आहेत. अनेक बेस्टसेलर पुस्तकांचे लेखक म्हणून
जनसामान्यांतही ते लोकप्रिय आहेत. विज्ञानातील,
विशेषत: भौतिकशास्त्रातील संकल्पना ते अतिशय
ललितरम्य शैलीत सादर करतात. या विषयातील
शोधांचा मागोवा घेण्यात त्यांना विलक्षण रस आहे.
न्यूटन, आइन्स्टाइन आदी संशोधकांच्या वह्यांवरील धूळ
झटकून वाचता वाचता, अज्ञानजन्य कुतूहलापासून
चाचपडत सुरू झालेला या प्रतिभावंतांचा प्रवास समजून
घेण्याचा प्रयत्न ते करत असतात. आपल्या या प्रयत्नात
ते वाचकालाही सामील करून घेतात. ‘आइन्स्टाइन्स
ड्रीम्स'मध्ये डॉ. लाइटमन यांनी सापेक्षता सिद्धांत
मांडणाऱ्या या सर्जनशील प्रज्ञावंताचं, अभिनव
संकल्पनांशी चाललेलं द्वंद्व चित्रित केलं आहे. ही एक

136 & ‘w³V eãX Am°JñQ 2020


अद्तरम्य
भु कादंबरी आहे, सत्तावीस वर्षांपर्वी
ू लिहिलेली,
तीसहनू अधिक भाषांत अनुवादित झालेली.
आइन्स्टाइनने प्रथमच काळाची शास्त्रशुद्ध व्याख्या
केली. हाच धागा पकडून डॉ. लाइटमन यांनी
‘आइन्स्टाइन्स ड्रीम्स'मध्ये काळाच्या विविध कल्पित
स्वरूपांचं चित्रण केलं आहे.
या कादंबरीतील एकेक सूत्र निवडून कथा
लिहिण्याचा प्रयत्न मी करतेय. आतापर्यंत या
मालिकेत ‘त्रिमिती', ‘निज काल', ‘काल फलित'
आणि ‘आरोहण काळ' अशा चार कथा प्रसिद्ध झाल्या
आहेत. बऱ्याच कालावधीनंतर ‘ओढाळ काळ' ही
कथा सादर करीत आहे.
आइन्स्टाइनने मर्यादित सापेक्षतेचा सिद्धांत मांडला.
त्यानुसार गतिमान असणारी घडय़ाळं असमकालिक,
नॉन-सिंक्रोनाइज्ड होऊन जातात. या सूत्राभोवती
प्रस्तुत कथा रचण्याचा प्रयत्न केला आहे.

दारावरची बेल वाजली. दार खरं तर सताड उघडं होतं.


सोफ्यावरूनच आबा ओरडलेसद्धा ु , ‘‘कोण आहे? थेट या
आत.'' पण तोवर दादा, दीपक, राजीव, शिवम, बेला
मागच्या अंगणातून, बेडरूममधून, गच्चीवरून, असतील
तिथून धावत पोचले होते दाराशी. अनुषा उभी होती तिथे.
किंचित कातावलेली. किंचित त्रासलेली. ‘‘रिक्षावाला पन्नास
‘w³V eãX Am°JñQ> 2020 & 137
रुपये सांगतोय. वीस-बावीसच होतात ना इथपर्यंतचे? मामी
म्हणाली होती मला.'' गेट बाहेर रिक्षावाला खोळं बलेला
दिसला, मोबाइलची स्क्रीन बघत बघत. ‘‘एकटी मुलगी
पाहनू फसवतोय साला. बघाच आता, सरळ करतो की नाही
ते.'' शिवमला चेव चढला. ‘‘फार माजलेत रिक्षावाले
हल्ली. जवळचं भाडं नको असतं यांना.''
‘‘उपकार म्हणून हा आलाय की काय? या गावात
आम्ही नवीन आहोत, तो मागेल तितके पैसे देऊ असं
वाटतंय की काय त्याला?'' दीपकपण चिडून खेकसला.
एवढी सगळी जणं आपल्याकडे येताना पाहनू , त्यांचा
एकूण आविर्भाव पाहनू रिक्षावाला उठला. उभा राहिला. जरा
सावधपणेच.
‘‘काय रे , किती भाडं झालं? नेऊ का पोलिसात?''
बाह्या सरसावत शिवमने रिक्षावाल्याला तडकावलं. वादावादी
रं गणार अशी चिन्हं दिसू लागली.
‘‘पन्नास रुपये. मीटरप्रमाणेच मागितलेत ताईंकडे.''
त्याला कळे ना ही माणसं का संतापलीयेत ते.
‘‘हाउसिंग कॉलनीपासून यायला पन्नास रुपये? अजिबात
देणार नाही. तुझं मीटर धावतंय. तपासून घे.'' भाचीची बाजू
घेत दादा बोलले.
‘‘हाउसिंग कॉलनी? काय बोलताय साहेब? अहो बडा
बजारला त्यांनी रिक्षा केलीये. विचारा ताईंना. तिथपासून
होतंच एवढं भाडं.'' अनुषाच्या शॉपिंग बॅगांकडे बघत
रिक्षावाला करवादला.
‘‘काय गं अनुषा, काय म्हणतोय हा?'' शिवम
हडबडलाच जरा.
‘‘अरे हो, सॉरी सॉरी. मी बडा बजारलाच रिक्षा पकडली
होती.'' अनुषाचं घूमजाव.
‘‘काय गं, गूगल मॅपने गंडवलं तुला की ब्रेनची बॅटरी
ड्रे न झालीये तुझी? कुठून रिक्षात बसलीस तेपण आठवत
नाही?'' शिवम तिच्यावर बरसला.
अनुषाने पटकन पर्समध्ये हात घातला. पन्नासची नोट
काढून रिक्षावाल्याच्या हातावर टे कवली. बॅगा सावरत, पाठ
138 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
फिरवून धावतच ती घरात शिरली. शिवम आणि गँगची
अवस्था हवा गेलेल्या फुग्यासारखी झाली. दादांनी
रिक्षावाल्याची माफी मागितली. मागोमाग सगळे घरात
शिरले. अनुषाची मस्त फिरकी ताणता येईल या विचाराने
बेला फुशारली. फुकाफुकी पचका झाला अनुषामुळे,
म्हणून शिवम चडफडला.
(कृपया कथेच्या या भागाचा पुढच्या भागाशी संबंध शोधू
नये. कारण ही कथा आहे गोधडीसारखी. तुकडय़ातुकडय़ांची.
आत्ताच आपल्याला भेटलेले आबा, दादा, दीपक, राजीव,
शिवम, बेला, अनुषा ही सर्व सांप्रत काळातली नॉर्मल माणसं
वाटली ना? झालं तर. हाच मुद्दा मांडण्यासाठी रचला होता
वरचा प्रसंग. एका कुटुंबातली आहेत ती. आणखी काही
जणं भेटतीलच आता.)
निलिमाने स्वत: फ्रेश फ्रूटकेक केला होता. त्यावर
आयसिंगची सजावट ती करत होती. लेमन कलरच्या
क्रीमची पहिली मुलायम वेलांटी केकवर उमटली. नक्षी
काढता काढता पुढय़ातला फ्रेश फ्रूट केक धूसरला.
निलिमाच्या डोळ्यांना दिसू लागला ऑरें ज केक. त्याची
अनंत प्रतिबिंबं. समोरासमोर मांडलेल्या दोन आरशांमध्ये
जणू तो केक ठे वला असावा. अगणित आकृत्या. एकासमोर
एक रांगेने उभ्या असलेल्या. दरवर ू पसरलेल्या. दृष्टीच्या
टप्प्याच्याही पल्याड पोचणाऱ्या. याच छायांमधून उगवले
स्नेहाळ वत्सल डोळे . प्रतिबिंब अजून स्पष्ट झालं. हातांचे
तळवे मायेने तिच्या गालावरून फिरले. ऐकू आले
पुटपुटणाऱ्या ओठातील ‘‘कल्याणमस्तु!'' चे उद्गार. ऑरें ज
केकचा गंध गुंगवून गेला तिला. गाभ्यातील नरम ओलावा
तिच्या बोटांना स्पर्शू लागला. त्या केकच्या स्वादाची भूल
आजही पडलेली आहे तिच्यावर. मनभर सुखद सय फिरत
राहिली. स्वत:शीच चाललेलं होतं तिचं स्मरणरं जन.
स्वयंपाकघरात उमा, वीणा, अंकिता, बेला आणि अनुषा
यांच्या गप्पा रं गल्या होत्या.
‘‘ए, आले हं मीपण. गाडीच उशिरा आली तासभर.
सॉरी, सॉरी.'' तेवढय़ात उर्मिलाने आपली हजेरी लावली.
‘w³V eãX Am°JñQ> 2020 & 139
टीपॉयवर पर्स टे कवली आणि तडक बाथरूममध्ये ती पाय
धुवायला गेली. बेला तिची बॅग घेऊन आत गेली. पार
मागच्या कोणा एका खेचक क्षणात गुरफटलेली निलिमा
सावरली.
‘‘भोपाळची गाडी आली वाटतं. चला आता कोरम
फुल्ल झाला.'' उमाने उत्साहात उर्मिलाचं स्वागत केलं. या
धाकटय़ा जावेला बऱ्याच दिवसांनी पाहनू आनंद झाला होता
तिला.
‘‘कोरम फुल्ल? विनयदादा कुठे आलाय? कोणी
एकजण तरी अ‍ॅब्सेंट असतो. असंच होतंय हल्ली.'' आपली
सगळी भावंडं एकत्र भेट ू न शकल्याची खंत होती वीणाच्या
आवाजात.
‘‘ए, विनयमामाला का नाही आणलंस मामी?'' अनुषा.
‘‘अगं, आत्ताच तर बदली झालीये. जॉइन होऊन
जेमतेम दोन महिने होतायत. लगेच रजा नाही घेता येत.
इकडे यायचं की प्रवासातच दोन अडीच दिवस जातात.''
अंकितापण ऐकतेय हे पाहनू उर्मिलाचा सूर किंचित पोकळ
झाला. ‘‘पण व्हिडियो चॅट करू या नं जरा वेळानी. आज
रविवार. मुद्दाम घरीच राहणार आहेत ते.'' हे बरं सुचलं
असं वाटून उर्मिलाने फ्रिज उघडला. पाण्याची बाटली तोंडाला
लावली.
‘‘फ्लाइटनी यायचं की. म्हणूनच वीकेन्डला सेलिब्रेशन
ठरवलंय.'' जारमधून वेफर्स काढून घेऊन अनुषा मागच्या
अंगणात पळाली. या टिप्पणीने कितीतरी टाके भसभसा
उसवले गेले. किचनमधला सारा माहौल गोठवला तिच्या
शब्दांनी. वीणा आणि तिच्या तिघी भावजया कावऱ्याबावऱ्या
झाल्या. क्षणापूर्वीचा हसरा, खेळकर मूड पालटून गेला.
आयसिंगचा चुणीदार टपोरा ठिपका केकवर भलत्याच जागी
पडला. पण तो उचलावा हे निलिमाला सुधरे ना. तळणीतला
झारा सटकला. उमाच्या हातावर तेलाचे चारदोन थेंब उडले.
मुकाटय़ाने ती हातावर फं ु कर घालू लागली. बाटलीतलं
पाणी उर्मिलाच्या साडीवर हिंदकळलं. मान फिरवून वीणा
खिडकीबाहेर पाह ू लागली. ‘अशा काय करतायत या
140 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
सगळ्या जणी? काय झालं तरी काय? कोण सांगेल?'
काय करावं ते अंकिताला सुचने ा. शिवमला बोलावण्याचा
बहाणा करत ती बाहेर पडली.
आबांचा आज वाढदिवस म्हणून सारी जमली होती.
दरवर्षीचा शिरस्ता आहे हा. आपल्या जन्मदिवशी कौतुक
करून घ्यायला आवडतं त्यांना. बीजींचं मन निराळ्याच
पातळीवर पोचतं या दिवशी. काळाच्या वाऱ्यासोबत दिवस-
वर्षांची कितीतरी ओली-सुकी पानं उडून गेलीयत. त्यांची
मोजणी त्यांच्या मनात सुरू होते. दादा, दीपक, विनय, वीणा
या चारी मुलांच्या इंद्रधनुषी संसारातल्या रं गरे षा त्यांच्या
डोळ्यांना शांतवत असतात. कधी कधी त्यांच्या प्रपंचातले
क्लेशकारक क्षण त्यांना पाहावे लागतात किंवा त्याविषयी
काहीतरी कानावर येतं. त्यासोबत येते अपार विषण्णता.
अशा वेळी मग बीजींना वाटतं, जणू भर रहदारीच्या रस्त्यावर
आपण आपलं घर थाटलंय. वर्दळीबरोबर येणारा धुरळा
आपल्याला लपेटन ू टाकतोय. मात्र ही धूळ संवेदनांवर साचू
नये यासाठी त्या धडपडत असतात.
‘‘आटोपलं असेल तर वाढायला घ्या गं. औषधाची वेळ
चुकायला नको यांची.'' बीजींच्या हाकेने सगळ्या पुन्हा
भानावर आल्या. लगबग सुरू झाली. हात चटचटा चालू
लागले. सूचनांचा कल्लोळ उठला. औक्षण, केक कापणे,
भरपेट सुग्रास जेवण, मनामनांत आनंद. आबांना केकचं
काही अप्रूप नव्हतं. पण ‘‘नातवंडांच्या आवडीला नावं
ठे वायची नाहीत'' असं बीजींनी बजावलं होतं. म्हणून
हल्लीची ही पद्धत स्वत:ला फारशी पसंत नसूनही त्यांनी
मोडता घातला नाही. आणि ‘‘निलिमाचं कौतुक करायचं
विसरू नका'' ही सूचनापण लक्षात ठे ऊन ते वागले.
मनसोक्त गप्पा झाल्या. उत्सव संपला. परतवेळा झाली. ते
व्हिडियो चॅटचं मात्र राहनू गेलं, अनवधानाने की हेतत ु : ....
मोड यात्रेचे वेध लागले. उमाने हाका मारून आरव
आणि बेलाला बोलावून घेतलं. तोवर दीपक कारच्या चाव्या
घेऊन गेटपाशी पोचला होता. वीणा, राजीव, अनुषा त्यांच्या
गाडीत बसले. गेट लावून मागे वळताना दादाने अंकिताला
‘w³V eãX Am°JñQ> 2020 & 141
हळूच विचारलं, ‘‘निलिमाने केक खाल्ला का गं?''

‘नसेल खाल्ला शिवमच्या आईंनी केक? का बरं ?'


डोळ्यांत प्रश्न साठवून तिने दादांकडे पाह्यलं. मानेनेच
नाही म्हणून ती आपल्या बेडरूमकडे निघाली. शिवम खोली
ठाकठीक करत होता. अंकिताने दार लावून घेतलं, बेडवर
उशा नीट ठे वल्या.
‘‘ए शिवम, बाबा विचारत होते, आईंनी केक खाल्ला
का म्हणून. काही खास कारण आहे का त्यामागे? कोणती
तरी आर्त आठवण वगैरे... म्हणजे नसेल सांगायचं, तरी
ओके.'' सावधपणे अंकिता म्हणाली.
‘‘छे, नो लपवाछपवी. सांगू नये असं काहीच नाही गं.
केवळ तिचा खुळा हट्ट. म्हटलंच तर छोटीशी कहाणी आहे
त्यामागे.'' बिछान्यावर आडवारत शिवम बोलला. त्याच्या
आवाजात छु पपे णा नव्हता. हाताने गादीवर थापटी मारत
त्याने अंकिताला बसायला सांगितलं. ती मांडी घालून समोर
बसली. गुपित जाणून घेण्यासाठी. शिवमने सुरुवात केली.
‘‘ऐक. जुनी गोष्ट आहे. फार इंटरे स्टिं ग वगैरे नाही हं.
आईच्या माहेरी शेजारच्या घरात एक काका-काकू राहायचे.
फक्त दोघंच. आई त्यांचीच लेक आहे असं वाटावं इतके
लाड करत ती दोघं तिचे. त्यांच्या लग्नाचा पन्नासावा
वाढदिवस होता. आठ-दहा दिवस आधीच काकंू च्या
बोलण्यात सारखा त्याचा उल्लेख येत होता. वाटत असावं
त्यांना कुणीतरी या कारणासाठी सेलिब्रेट करावं असं. आई
कॉलेजमध्ये होती. नुकतीच बेकिं ग शिकली होती. केला
तिने काका-काकंस ू ाठी ऑरें ज केक. पहिलाच प्रयत्न होता
तिचा. अप्रतिम झाला होता म्हणे. अजूनही केक म्हटलं ना
की तिला तोच आठवतो. त्याचं रूप, चव मनात पक्की
रुतली आहे तिच्या. तसा केक पुन्हा कधी केलाच नाही म्हणे
तिने.''
‘‘अरे पण यासाठी केक खाणं कायमचं सोडून देणं...
म्हणजे जरा विचित्र नाही वाटत तुम्हा लोकांना?'' अंकिताने
मध्येच तिची शंका व्यक्त केली.
142 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
‘‘अं... हं... म्हणजे बाबांनी प्रयत्न केला बऱ्याचदा
तिला समजावण्याचा. त्याच केकची चव स्मरणात राहावी
असं तिला वाटतं. तो केक तिच्यासाठी ट्रॉफी आहे,
अंतर्मनाच्या शोकेसमध्ये मांडून ठे वलेला आयुष्याचा ठे वा.
संपलं. आमचा विषयच उरत नाही तो. आणि करतेय ना ती
केक सगळ्यांसाठी? डन.'' शिवमचं सांगणं संपलं.
अंकिता विचार करू लागली. केक म्हटलं की आईंचं
मन अजूनही त्या दिवसाच्या खुंटीवर जाऊन अडकावं,
किती जबरदस्त आकर्षण असेल त्या क्षणात. स्वत: अलिप्त
राहनू त्या इतरांसाठी केक करतात. तरी मनातून मात्र त्या
दिवसाचा लिप्ताळा जात नाही. केक या शब्दानिशी
जीवनातील अनुभवाचा एक रसरशीत तुकडा साक्षात
व्हावा? त्याच्या सर्व बारकाव्यानिशी ? छे, फारच
चमत्कारिक!

‘‘झकास झाला कार्यक्रम. दमलो रे देवा बाप्पा. पाकिटं


दिलीस ना प्रत्येकाला? नुसतं घेत राहाणं बरं नाही
मुलांकडून. अप्पलपोटय़ा म्हणायची नाहीतर. तोंडावर नाही,
मागून हळूच कुचकुचतील आपापल्या बायकांजवळ. जग
हे... दिल्य -घेतल्याचे...'' बंडी चढवता चढवता आबा
बोलत होते, म्हटलं तर स्वत:शीच, पण बीजींना ऐकू जावं
इतक्या मोठय़ाने. काहीतरी ऐकायला मिळे ल या आशेने.
दपारपासू
ु न शब्द बोलल्या नव्हत्या तेव्हाच ओळखलं आबांनी
बिनसल्याचं. काय ते कळावं यासाठीच टकळी सुरू केली
त्यांनी.
‘‘आज मध्येच काय काढलं वाढदिवसाचं या मुलांनी?
माझा जन्म मार्गशीर्षातला. अमावस्येच्या आधीचा. तिथी
दशमी, कृष्णपक्षाची. पण दिवस उत्तम. गुरूपुष्यामृत
योगाचा.''
आबांचं जुनं जग त्यांच्या अंतर्मनात दडून बसलेलं होतं.
कुठल्या तरी बहाण्याने रोजच्या रोज ते नव्याने अवतरे . मग
काय, संवत्सर, तिथी, घटका, पळांचा झिम्मा खेळत आबा
तासभर पुढे बोलत बसत. बीजींनी हे अनुभवाने ओळखलं
‘w³V eãX Am°JñQ> 2020 & 143
होतं. काळाच्या अवकाशात उलटय़ा दिशेने सूर मारण्याची
आबांची ही मात्रा आता बरोबर लागू पडली. बीजींनी मौन
सोडलं. त्यांना बोलावंच लागलं.
‘‘इंग्रजी तारखेनं आजच असतो तुमचा वाढदिवस.
म्हणून तर आज जमली सारी. त्यातच आज रविवारपण
होता. सोयीचं झालं की सर्वांना. निराळी सुटी घ्यावी लागली
नाही.''
‘‘आज शुक्ल द्वितीया. नुकताच पौष लागलाय. हा
कुठला मुहर्त ू शोधला? अशा सदोष काळात का कुणी
शुभकार्य साजरं करतं? काळाचं सजग भान ठे वायला हवं
नित्य.''
‘‘म्हणता ना तुम्हीच, व्यवहार चांगला कळतो दादाला.
शिफारसपत्र देत असता नेहमी त्याला. आणि मंगल-अमंगल
काळाचं म्हणाल तर तुमच्या गणिताचा मेळ कसा बसणार
हल्लीच्या कालगतीशी? तारीख आणि तिथी, नुसता
शब्दच्छल फक्त! बाकी कुठल्याही दिवशी पवित्र- अपवित्र
असं काही नसतं. कश्शात कसलं खुसपट शोधाल ते
तुम्हीच जाणता.''
‘‘फार धांदलीचा दिवस होता तो. इकडे आम्ही टय़ॅंह्यॅं
केलं तरी तीर्थरूपांना सवड उसंत नव्हती आमच्याकडे
बघायला. सुवर्णप्राशन विधी होता सूर्योदयानंतर. त्याची
साधनसामुग्री जमवीत असावेत.''
‘‘हे सगळं तेव्हाच कळत होतं तुम्हाला?'' बीजींनी
एरवी अशी फिरकी ताणली असती आबांची. पण आत्ता
विनयची आठवण त्यांना ओढून घेत होती. आबांच्या
स्वगतात एक सेकंदाची गॅप पडली आणि त्या खिंडीतून त्या
सटकल्या, हॉलमध्ये जाण्यासाठी. उर्मिला एकटीच मोबाइल
बघत बसली होती.
‘‘भोपाळस्पेशल वाटतं? छान दिसतेय.'' बीजींचा
आवाज ऐकून तिने मोबाइल खाली ठे वला.
‘‘तिथला बाजारपण पालथा घालून झाला तुझा
इतक्यात? शाबास आहे.'' तिच्या साडीचा पदर हातात घेत
त्या म्हणाल्या.
144 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
‘‘कॉलनीतल्या मैत्रिणी दाखवतात सगळं . खूप मदत
करतात. आता आम्हाला माहीत झालंय, पण सुरुवातीला
...''
‘‘विनयचा मूड बरा असतो ना? आज आला नाही...''
उर्मिलाला मध्येच रोखत बीजी अधीर होऊन विचारत्या
झाल्या. आत बरंच ढवळत होतं, बराच कोलाहल, गोंगाट,
गलबला चाललेला होता. विमानाचा मोठ्ठा आवाज, वाढत
वाढत प्रचंड स्फोटासारखा झालेला, उसळलेला हल्लकल्लोळ,
विहानचा आब्बी, आब्बी असा आक्रोश..., अखेर नांदणारी
सुन्न शांतता. चिरं तन शांतता. अभद्र सत्य ठसवणारी.
किती नाद, किती प्रतिनाद! ते सर्व निश्चयपूर्वक गाळून
कसंबसं इतकंच बोलू शकल्या बीजी.
‘‘मजेत असतो तसा. तेवढा एक विषय फक्त उच्चारला
नाही की सर्व नॉर्मल असतं. मीपण स्वीकारलंय आता.
विहानबद्दलपण बोलू शकतो आता आम्ही. फारसं हळवं न
होता.'' उर्मिलाचं सपाट पट्टीतलं उत्तर.
जगण्याचा अर्थ बदलणारे , दिशा बदलणारे , कितीक क्रू र
क्षण आत्तासुद्धा खुणावू पाहातात उर्मिलाला. त्या क्षणांची
अनिवार वेदना दखवतु राहते तिला. पण ती अडकत नाही,
स्वत:ला कैद होऊ देत नाही या ओढाळ घटकांत.
घडय़ाळाच्या काटय़ांसोबत, कॅलेंडरच्या पानांबरोबर, पुढे
पुढेच जात राहते. साऱ्या कालगतींशी आपली लय जुळवीत.
विनय मात्र रुतून बसलाय विमान अपघाताच्या त्या एका
क्षणात. हवाईप्रवास वर्ज्य करून. प्रवासातल्या आरामावर
फुली मारून. विहानच्या नसण्याचा क्षण ढकलून दरू नाही
सारता आला त्याला. त्या साऱ्या स्मृती ताणताणून धरून
ठे वल्या आहेत त्याने खोल कप्प्यात. वर्षाची बरीच आवर्तनं
झाली तरी. ती द:सह ु वेदना जागवत ठे वलीये त्याने.
मनमुराद जगण्याची चवच आठवत नसावी त्याला. त्या
चिकट क्षणाच्या गाळात आजचं निर्भेळ जगणं गाडलं जातंय
त्याचं. या चिकटय़ातून मुक्त होण्याची शक्यताच शिल्लक
ठे वली नाही त्याने. आणि त्याच कोषातच सुरक्षित वाटतंय
त्याला हे अनाकलनीय वाटतं तिला.
‘w³V eãX Am°JñQ> 2020 & 145
‘‘फ्लाइटने जाऊ या वगैरे नाही सुचवत मी त्याला. पण
त्यामुळे ऑफिसच्या टूरसाठी बरे च तास खर्च होतात फक्त
जाण्या येण्यात. सवय झालीये त्याचीसुद्धा. तुम्ही नका फार
काळजी करू.'' मनातली हरु हरु आवाजात येऊ न देता
उर्मिलाने बीजींना धीर दिला.
‘‘तूही जरा आराम कर आता. लांबचा प्रवास झालाय
तुझा.'' अस्वस्थता लपवत पाठमोऱ्या होत बीजी निघाल्या.
‘‘आबा बरे आहेत ना? नाही म्हटलं तरी दगदग झालीये
आज.'' उर्मिलाचे शब्द त्यांना ऐकूच आले नाहीत.

राजीवची कार हायवेला लागली. बडा बाजारहनू


केलेली खरे दी उपसून बसली होती अनुषा मागच्या सीटवर.
‘‘हा ड्रेस मेंदीच्या वेळी. डीप ब्ल्यू घागरा सेट संगीत
प्रोग्रामसाठी, आणि जरी वर्कचा सूट रिसेप्शनला. छान आहे
ना?'' वीणाने प्रत्येक ड्रेस आवडीने बघितला. ‘‘पुरतील ना
इतके ड्रेस?'' वीणाच्या शब्दांत मध पाझरत होता. ‘‘आधीच
सांगते, मुख्य समारं भाला तुझी पैठणी नेसणार आहे हं.
आमच्या ग्रुपचं ठरलंय तसं.'' अनुषाने बेत जाहीर केला.
पुन्हा पुन्हा नवीन ड्रेसवर हात फिरवत स्पर्श, रं ग मनात
साठवत राहिली. राजीवचं लक्ष होतं दोघींच्या बोलण्याकडे.
कपडय़ांचा ढीग बघितला त्याने समोरच्या आरशातून.
‘‘तरी बरं , मैत्रिणीचंच लग्न आहे. तुझं ठरलं की सारा
बडा बाजारच उचलून आणावा लागेल.'' राजीवकडे बघत
वीणा मुद्दामच थोडं मोठय़ानेच बोलली. त्याने गॉगल चढवला
डोळ्यांवर. कपाळ खाजवण्याचा बहाणा करत. नजरे तली
अढी लपविण्यासाठी. वीणाच्या डोळ्यांनी टिपलं ते.
आक्रसली ती आतल्या आत, गप्प झाली. बांगडय़ा, झुमके,
मॅचिंग सॅन्डल्स... अनुषाचा चिवचिवाट आता सलू लागला
तिला. खटकत राहिला कानात. भयाची एक शिरशिरी
अंगभर सरसरत गेली. राजीवपण घुम्याने गाडी चालवत
राहिला. भीतीचापण एक जबरदस्त कैफ असतो. येणाऱ्या
क्षणांची चित्रफीत हा अंमल दाखवू शकतो. वीणाला दिसला
आपला दमजली ु वाडा. खानदानी आब आणि शान याचं
146 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
मूर्तिमंत स्मारक. गतवैभवाची, आदर-सन्मानाची निशाणी.
मागील शतकाची रुबाबदार झूल पांघरलेला. त्याच शतकात
थांबलेला. सांप्रत काळाशी फटकून राहिलेला. या वाडय़ाच्या
साक्षीने घडणाऱ्या सवाल-जवाबचा रं गलेला प्रयोग तिला
ऐकू येऊ लागला. सवाल राजीवचे आणि मनातल्या मनात
दिलेले जवाब तिचे!
‘‘आपलं काय ठरलंय? विसरतेस कशी तू? अनुषाला
सांगायला हवंय तू.''
‘‘आपलं म्हणजे? तूच एकटय़ाने ठरवलं आहेस. तूच
सांग तिला.''
‘‘आपल्या मुलीचं लग्न होणार नाही, आपण करून
देणार नाही आहोत. ती अविवाहित राहनू ट्रस्टचं काम
बघणार आहे.''
‘‘लग्न झाल्यावरपण ती हे काम करू शकते की.''
‘‘कित्येक पिढय़ांनंतर घराण्यात मुलीचा जन्म झालाय.
अनुषा पहिली कन्या आहे, माझी लेक.''
‘‘तरीदेखील तिच्या संमतीशिवाय काहीतरी लाद ू
पाहातोयस तू तिच्यावर...''
‘‘भाऊसाहेबांना केवढा आनंद झाला होता अनुषाच्या
आगमनाचा.''
‘‘होय, हे मात्र अगदी खरं ...''
‘‘नेहमी म्हणायचे, पोरीला अशी तयार करे न की उत्तम
सांभाळे ल आपला ट्रस्ट ती. राज्यातला नंबर एक सहकारी
ट्रस्ट! मी त्या उद्गारांचा साक्षीदार आहे. ते शब्द सतत
घुमत असतात माझ्या मनात.''
‘‘तान्ह्या नातवंडांना पाहनू अशाच अर्थाचं बोलतात
सगळे आजोबा. फार गांभीर्याने घ्यायची नसतात ही वाक्यं.
अनुषाला आठवतसुद्धा नाहीत भाऊसाहेब, ती वर्षाची
व्हायच्या आतच तर...''
‘‘कळत नाहीये तुला, केवढा सन्मान चालून आलाय
तिच्याकडे.''
‘‘सन्मान की सक्ती? भाऊसाहेबांच्या बोलण्याला
चिकटून नको रे बसूस. सगळे संदर्भ बदललेत, काळ
‘w³V eãX Am°JñQ> 2020 & 147
बदललाय.''
‘‘उद्याच स्पष्ट बोलतो तिच्याशी.''
‘‘भाऊसाहेबांना वचन दिलेलं नव्हतंस तू कधीच. एका
मामुली क्षणाच्या धाकात तूही राह ू नकोस आणि अनुषावरपण
बळजबरी करू नकोस. घडवू दे तिला तिचं भविष्य. थोडा
विश्वास ठे व. थोडा धीर धर. तुला आणि भाऊसाहेबांना
अभिमान वाटे ल असंच काहीतरी करून दाखवेल ती.''
कोण कुठला काळाचा हा सूक्ष्म तुकडा. आगापिछा
नसलेला, बिनमहत्त्वाचा. आगंतक ु बनून आपल्या संसारात
शिरलाय. राजीवलातर पुरतं घेरलंच आहे. आणि आता
लेकीच्या आयुष्यावर आधिकार गाजवायला निघालाय.
वीणाला फार असहाय वाटू लागलं.

उमाला जाग आली. सावध होत तिने अंधाराचा वेध


घेतला. सतार छेडल्याच्या आवाज येतोय. आरव रियाझ
करतोय? झंकार तर परिचयाचा वाटतोय. पहाडी धून? देस
रागाचे आलाप? एकाग्रचित्ताने ती कानोसा घेऊ लागली.
एकेक स्वर गुंजत होता. उमाच्या काळजावरचं ओझं उतरत
गेलं. तिचं मन पिसासारखं तरं गलं. चांद्रभूमीवर वावरत
असल्याप्रमाणे. उल्हसित होऊन ती उठून बसली. आबांचे
आजचे आशीर्वाद इतक्यात सफल झाले? उजाडल्यावर
पहिला फोन करू या त्यांना. तिने पक्कं ठरवलं. त्या
शापित क्षणाच्या बंधातून मोकळा झाला आरव अखेर?
मुक्त झाला अनंत मकाळाच्या दीर्घ कैदेतन ू ? त्या क्षणाचे
तरं ग विस्तारत विस्तारत राहिले. बेहोशीत ठे वलं त्यांनी
आरवला आजवर. त्या मायेतन ू बाहेर पडण्याचा अवधी न
देता. उगम कें द्रापासून पसरत जात भूकंपाने व्यापक परिसर
तीव्र कंपनाच्या विळख्यात घ्यावा तसं. आता ते मोहन
सरलंय. पुन्हा तो स्वरसाधना करू बघतोय. नुकतच वीस
वर्षांचा झालाय आरव. उमेदीची भरपूर वर्षं आहेत त्याच्या
हातात. थोडीच वर्षं तर वाया गेलीयेत. जाऊ देत. बघता
बघता कसर भरून काढेल सगळी. विसावेल पुन्हा तो
स्वरांच्या सावलीत. आरव, संगीत दनिये ु तला उदीयमान
148 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
तारा. उमा सैलावली. स्वरपदावली ऐकण्यास आतुर झाली.
पण छे, सुरावट विरून गेली होती. पुन्हा एकदा स्वर अबोल
झाले होते. फिरून ऐकू आली ती बेसरू सामसूम.
उमाचं अवसान गळालं. म्हणजे... फक्त स्वप्नच होतं
ते. बिछान्यावर काही क्षण बसून राहिली नुसतीच. बधीर
होऊन. दीपकच्या झोपेत व्यत्यय येणार नाही अशा बेताने.
‘किती छान गाढ झोपू शकतो हा. स्वप्नाच्या राज्याची मजा
लुटत. कोणा एका जादईु क्षणाच्या पाशात अडकलेल्या
आपल्या लेकाला विसरून.' तिची खिन्नता आणखीच
वाढली. बाहेर कसलीच चाहल ू नव्हती. किती वाजले
असतील? अडीच, तीन? किती का असेना. पाणी प्यावं
म्हणून ती किचनच्या दिशेने निघाली.
पॅसेज पलीकडच्या खोलीतून उजेड झिरपताना दिसला.
अरे देवा. उमा व्याकुळली. तिथेच घुटमळली. न राहवून
शेवटी तिने दार ढकललं. आरव पाठमोरा बसला होता.
टे बलासमोरच्या खुर्चीवर. पुढे झुकून. उजेडाचा गोल
टे बललॅम्पखाली सांडला होता. मंतरलेपण पसरवत. खोलीचा
कोपरा उजळून झाल्यावर काही तिरपे किरण चुकारपणे
पॅसेजकडे धावले होते. उमाने पुढे झुकून बघितलं. हातातल्या
फोटोवर दृष्टी खिळली होती आरवची. एक क्षण नजर
फोटोवर पडे, दसऱ्या ु क्षणी सतारीवर. ती छबी हळूहळू
आरवच्या खोल मनात झिरपत जात होती. अमृताची गोडी
घुटक्या घुटक्याने अनुभवावी तशी. किती वेळ असा बसला
होता कोणास ठाऊक. उमा पुन्हा एकदा हताशली आतल्या
आत. त्याच्या खांद्यावर हलका स्पर्श केला तिने.
अलवारपणे म्हणाली, ‘‘चल, उठ आता. तिकडे गादीवर
आडवा हो बघू.''
‘‘ग्रेट आर्टिस्ट! ते त्यांचे डोळे बघ आई, किती ममताळू
दिसतायत. होप्स आहेत माझ्याबद्दल खूप त्यांना.'' तंद्रीतून
जागा होत आरव बोलला.
फोटोतला तो क्षण, आत्ता घडत असल्यासारखा त्याच्या
डोळ्यांत जीवंत झाला होता. त्याचे गुरुजी आग्रहाने या
महान कलाकाराकडे आरवला घेऊन गेले होते. चारे क
‘w³V eãX Am°JñQ> 2020 & 149
वर्षांपर्वी
ू . त्यांना वादन ऐकवलं त्याने. काही दिवसांतच
आपल्या खाजगी मैफलीत आरवला संधी दिली त्यांनी.
त्याच दिवसाचा हा फोटो. या थोर कलाकाराचा हात
आरवच्या पाठीवर, आरवची नजर त्यांच्यावर खिळलेली.
आनंदाने खुललेला त्याचा चेहरा. आयुष्यातील श्रेयसाचं
आणि प्रेयसाचं दान एकदमच झोळीत पडल्यासारखा. फोटो
हाती आला आणि आरव तिथेच थबकला. सराव करे नासा
झाला. सतार राहिली गवसणीत.
‘‘सकाळी सहाला अ‍ॅकेडमीत पोचायचंय प्रॅक्टिससाठी.''
हे घडणं शक्य नाही याची स्पष्ट जाणीव असूनही उमा
म्हणाली. रोजच्या सवयीने.
‘‘झोप बघू आता.'' आवाजात निग्रह आणत तिने
आरवला ताकीद दिली.
तोही भानावर आला. निजल्या ठिकाणी नीट दिसेल
अशा बेताने त्याने फोटो टे बलवर ठे वला. पांघरूण
डोक्यापर्यंत ओढून घेऊन बेडवर निजला. स्विच दाबलं.
गडद काळोखाच्या दलईत ु आरवची आकृती झाकली गेली.
उमा तिथेच घोटाळली. कधी संपणार हा स्पेल आरववरचा?
आपण कशासाठी उठलो होतो याचा तिला विसर पडला.
बेलाच्या खोलीत डोकावली ती. उगीचच. पुन्हा आपल्या
खोलीत जाऊन निजली.
तर अशी आहे या कुटुंबाची कथा. शोकांतिका किंवा
सुखांतिका असं लेबल नाही तिला. प्रत्येक जण काळाच्या
निरनिराळ्या तुकडय़ाशी घट्ट बांधला गेलाय. कोणी एखादा
प्रसन्न करणारा, अतीव आनंदाचा क्षण जीवंत ठे वू बघतोय.
तर कोणी खुपणाऱ्या काटय़ाचा सल तीव्र करणाऱ्या क्षणात
रुतून बसलाय. हा क्षण ज्याचा त्यानेच भोगायचाय,
एकटय़ाने. कोणाशीही ही अनुभत ू ी वाटून घेता येत नाही.
गतकाळातला हा क्षण वर्तमानकाळाशी कदापि जोडला जाऊ
शकत नाही. भूतकाळातला त्याचा प्रत्यय वर्तमानास समजून
घेता येत नाही. काळाच्या अथांग सागरात सेकंदाचं,
मिनिटाचं, तासाचं किंवा दिवसाचं एकेक इवलालं बेट गाठून
बसली आहेत सारी जणं. काळाच्या त्या छोटय़ा तुकडय़ाने
150 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
त्यांना काय दान दिलं याचा उघड उच्चार मात्र कोणी करत
नाही. केवळ त्याच क्षणाशी जुळलंय त्यांचं रोमॅन्टिक नातं.
फक्त या कुटुंबालाच काय महीतलावर सगळ्यांनाच
काळाचा शुभ्र झुळझुळीत रे शमी पट मिळतो. कशिद्याने
गुंफून सजवण्यासाठी. अखिल मानवजात क्षणाक्षणाची वीण
गुंफत बसते. आणि ध्यानीमनी नसताना काळाच्या एखाद्याच
नमुन्यात गुंतन ू पडतात सारीजणं. उरलेल्या क्षणांची
कलाकुसर विसरून जाऊन. नंतरचा काळ नुसताच घरं गळत
राहतो उतारावरून, पाऱ्यासारखा.
आइन्स्टाइनने मर्यादित सापेक्षतेचा सिद्धांत मांडला. यात
कालमापन करणारा निरीक्षक, स्थिर संदर्भ चौकटीत राहतो.
या स्थिर चौकटीत असणारी घडय़ाळं एकच वेळ दर्शवतात.
म्हणजेच ती समकालिक, सिंक्रोनाइज्ड असतात. संदर्भ
चौकट गतिमान असली आणि निरीक्षक स्थिर असला तर
मात्र गंमत होते. निरीक्षक नोंदवतो की गतिमान संदर्भ
चौकटीत मूलबिंदपासू ू न निरनिराळ्या स्थानी असणारी
घडय़ाळं वेगवेगळ्या वेळा दर्शवतात. असमकालिक, नॉन-
सिंक्रोनाइज्ड होऊन जातात.
निरनिराळ्या वेळेशी जुळलेल्या या घडय़ाळांसारखीच ही
विगत-क्षण-बद्ध माणसं आहेत. खरं ना?

- चित्रा नित्सुरे
संपर्क ः ९८१९१९२०८०

‘w³V eãX Am°JñQ> 2020 & 151


नव्वदोत्तर स्त्रीकाव्यातील नैतिक
मूल्यसंकल्पनांची नवी घडण

सरिता सोमाणी

पुरुषवर्चस्ववादी मूल्यांच्या प्रभावातून स्त्री व पुरुष दोहोंचे


वर्तनव्यवहार घडतात. त्या व्यवहारामागील नीतिमूल्ये पुरुषहितकर
अशीच असतील तर ती नाकारून नैतिकतेची मूल्यसंकल्पना
नव्याने घडवणे अथवा स्त्रीकडे स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहाताना
न-नैतिक दृष्टिकोन स्वीकारणे हे आवश्यक ठरते. स्त्रियांचे स्वतंत्र
अस्तित्व तर मान्य होणे गरजेच े आहे आणि तरीही त्याला
लिंगभावाचे परिमाण असता कामा नये अशा पर्यायाच्या शोधात
स्त्रीवादी नीतिशास्त्र राहिले. नैतिकतेच्या विचारांत समूहाचे
अस्तित्व महत्त्वाचे असले तरी ज्या व्यक्तींच्या एकत्र येण्यातून
समूह घडतो ती प्रत्येक व्यक्ती नैतिक विचाराची वाहक असते.
त्यामुळे प्रत्येक व्यक्ती कणखर कशी होईल याचा विचार
स्त्रियांच्या स्थानावरून केला गेला पाहिजे असे स्त्रीवादी
विचारसरणीत अभिप्रेत आहे.१ पुरुषसत्ताक समाजव्यवस्थेची
सर्वांगीण चिकित्सा करताना प्रस्थापित नीतिव्यवहारासही नव्वदोत्तर
कालखंडातील स्त्री-कवींनी काव्यगत आशयातून छेद दिला आहे,
हे काही काव्यसंहितांच्या आधारे लक्षात घेता येते.
स्त्री-पुरुष नातेसंबंधांचे सत्य स्वरूप उलगडण्यासाठी स्त्री ही
माणूस आहे; तिचे शरीर, तिचा भूतकाळ, वर्तमान परिस्थिती, तिचे
मनोव्यापार मुक्तपणे व सत्य स्वरूपात समोर आणणे धाडसाचे
152 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
वाटले तरी आवश्यक ठरते. स्त्री-पुरुष संबंधात स्त्री पुरुषाबाबत
तिच्या अनुभवांचा अन्वयार्थ लावते तसाच स्वतंत्र व्यक्ती म्हणून,
माणूस म्हणून स्वतःचाही आतला गाभा सोलत जाते, ‘स्व'चाही
कसून शोध घेते. रजनी परुळेकर लिहितात, ‘पहिल्या समुद्रापाशी
/ एक साधे रोपटेच तेवढे रुजून आले / मैत्रीला फळच धरू दिले
नाही / त्या मित्राने कधी / तशा आल्या मधेमधे दोन-तीन /
इतरही लाटा / परत गेल्या किनाऱ्याला हलकासा / स्पर्श करून
/...दसराु समुद्र पार करताना / मी झोकून दिले होते स्वतःला /
एका समर्थ व्यक्तिमत्त्वाच्या लाटेत / कणवभरल्या डोळ्यांच्या
हाकेत / अल्पकाळाचे शापित पूर्णत्व होते ते / तरीही व्यवहाराचे
भान / नाही रोखू शकले त्यावेळी मला /...आणि तिसऱ्या
समुद्रापाशी भेटलेला / माझा वर्तमानातला प्रियकर / ओठ
आपलेसे करतानाची / त्याच्या डोळ्यांतली प्राणव्याकूळ उत्कटता
/...भूतकाळात दसऱ्या ु समुद्रातील होडीत / राणीच्या दिमाखात
प्रवास केलेली मी / आज वर्तमानात घराच्या वारुळात बसून /
राणी मुंगीप्रमाणे कवितांची वीण वीत आहे /...कोणत्याही मित्राचे
स्वतंत्र व्यक्तिमत्त्व / न स्वीकारण्याचा मी केलेला हा गुन्हा /
नव्हे, त्यांतील प्रत्येकावर / मी केलेला हा बलात्कार /
वर्तमानातल्या प्रियकराला गृहीत धरून / मी घेतलेला इतरांच्या
मानसिकतेचा शोध / परं परेच्या पलीकडे असलेल्या / मूलभूत,
शुद्धनीतिशी मनाने का होईना / पण मी केलेले हे अनेक द्रोह /
प्रिय! माझा भविष्यकाळ, माझी नियती / कितपत क्षमा करील
मला याबद्दल?’ (अखेरचे पत्र, पुन्हा दीर्घ कविता, पृ. २६-३१)
प्रस्तुत कवितेत कवितागत स्त्री मोकळेपणाने अंतरीच्या भावनांसह
स्वतःचे सत्य स्वरूप उघड करते. जीवनाच्या वेगवेगळ्या
वळणावर स्वतःच्या अपेक्षानुरूप स्वेच्छेने पुरुष साथीदाराची निवड
आपण केली हे सांगताना समाजात रुजलेला पुरुषसापेक्ष नैतिक
मूल्यभाव नाकारल्याची स्पष्ट कबुली देते. माणूस म्हणून स्वतःचा
आतला गाभा सोलताना परं परागत मूलभूत शुद्धनीती आपण
नाकारल्याची कबुली ती स्वतःलाच देते. बंदिस्त विवाहसंस्थेत
पुरुष पत्नीच्या भूमिकेतील स्त्रीमध्ये त्याच्याशी तिची एकनिष्ठता
गृहीत धरतो त्या वेळी स्त्रीत्वाच्या सामाजिक-सांस्कृतिक
रचिताखाली तो हे लक्षात घेत नाही की स्त्री हीदेखील माणूसच
आहे; काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षड्‍रिपू तिलाही
सतावतात; मोहाच्या क्षणी संयम राखण्याचे, प्रलोभनांविरुद्ध

‘w³V eãX Am°JñQ 2020 & 153


लढण्याचे क्षण तिच्याही समोर उभे राह ू शकतात; स्त्रीच्या आंतरिक
भावविश्वाची ओळख पुरुषाला फारच कमी असते; तिच्या सुप्त
इच्छा, बालपणीच्या, तारुण्यावस्थेतल्या आठवणी, दिवास्वप्ने,
कल्पनाविश्व ह्याविषयी तो अनभिज्ञच राहतो. पतिव्रता स्त्री,
देवतास्वरूप माता या बिरुदाखाली दबलेल्या व पुरुषाच्या मनातील
स्त्रीच्या आदर्श प्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून, समाजाच्या दृष्टीने
‘अनैतिक’ वर्तन ठरेल या भीतीने स्त्रीही आपले आंतरिक
भावविश्व मिटून घेते, लपवून ठे वते. उपरोक्त काव्याभिव्यक्ती या
दृष्टिकोनातून अपारं परिक आहे. कवितागत स्त्रीने स्वतःचे
मनोव्यापार नि:संकोचपणे प्रकट केले आहेत. विवाहपूर्व वा
विवाहपश्चात आयुष्यात येणाऱ्या परपुरुषाशी प्रीतिभाव जपताना
मनात कोणताही अपराधभाव ती बाळगत नाही. तिच्या भावविश्वात,
स्वतंत्रपणे ती जे काही विचार करते ते पुरुषप्रधान मूल्यव्यवस्थेचे
वाहक असलेल्या स्त्री-पुरुषांना अनैतिक वाटले, अस्वस्थ करणारे
धक्कादायक भासले तरीही निर्भयपणे व्यक्त केले आहेत. उपरोक्त
स्त्रीकें द्री काव्यसंहितेच्या विवेचनाच्या अनुषंगाने वि. का. राजवाडे
यांचे ‘नीती ही वस्तुदेखील उत्क्रमिष्णू आहे. स्वयंभ,ू स्थाणू किंवा
स्थिर नाही.’२ हे विधान लक्षात घेऊन विद्यमान काळात उदयास
येऊ पाहाणाऱ्या व चर्चेत असलेल्या ‘पॉलीअॅमरी’ या व्यवस्थेची
नोंद घेणहे ी येथे महत्त्वाचे वाटते. आज लग्नव्यवस्थेत अभिप्रेत
असलेला ‘व्यवस्था विचार’ विस्तारित स्वरूपात, माणसाच्या
नैसर्गिक ऊर्मींना न्याय देत, स्त्री-पुरुष किंवा समलिंगी नात्यांकडे
गंभीरतेने बघत, लैंगिक इच्छेकडे आणि प्रेमभावनेकडे थिल्लरपणा
म्हणून न बघता या माणसाच्या आंतरिक व सुंदर इच्छा आहेत
अशा दृष्टीने बघत माणसांच्या बहवु िध नात्यांची व्यवस्था
लावण्याचा एक प्रयत्न ‘पॉलीअॅमरी’ या व्यवस्थेतून केला जातो.
‘पॉली’चा अर्थ ‘पुष्कळ’ (एकाहनू जास्त). तर ‘अॅंमोर’ या
लॅटिन शब्दाचा अर्थ ‘प्रेम’! या व्यवस्थेची पहिली अट अशी आहे
की, संबंधित व्यक्तींपैकी प्रत्येकाला प्रत्येकाच्या इतरांशी
असलेल्या प्रेमाच्या नात्याच्या स्वरूपाविषयी पूर्ण कल्पना असेल.
‘पॉलीअॅमरी’ ही माणसांच्या एकाहनू अधिक गंभीर स्वरूपाच्या
नात्यांची व्यवस्था आहे. ‘प्रेम एकाच व्यक्तीला देता येतं आणि
तिथेच ते संपतं’ या प्रस्थापित धारणेला ही व्यवस्था आव्हान देते.
प्रेम अमर्याद आहे आणि एका व्यक्तीवर तुम्ही ज्या तीव्रतेने प्रेम
करता त्याच तीव्रतेने दसऱ्या ु व्यक्तीवरही करू शकता, तुम्ही

154 & ‘w³V eãX Am°JñQ 2020


तुमचं ‘पूर्ण हृदय’ एकाहनू अधिक व्यक्तींना देऊ शकता असं ही
संकल्पना मांडते. मात्र अशा प्रकारच्या नातेसंबंधात असणारे लोक
अतिशय प्रगल्भ असावे लागतात. प्रेमाच्या पारं परिक व्याख्येपासून,
पारं परिक अनुभत ू ीपासून वेगळं होऊन एका नव्या, अधिक
समावेशक, प्रेम आणि लैंगिकतेच्या ‘अहम्’ला बाजूला काढू
शकणाऱ्या अनुभत ू ीपर्यंत ज्यांना जाता येईल तेच अशा व्यवस्थेत
राह ू शकतात. ३

तटस्थ आणि तर्कनिष्ठ सत्यापेक्षा प्रत्येक व्यक्तीच्या


स्वतंत्र परिस्थितीचा, इतिहासाचा, नातेसंबंधांच्या पार्श्व भूमीचा,
तिच्या इच्छाआकांक्षांचा, भावनांचा विचार करून नीतितत्त्वाचा
पुरस्कार करणे हे अधिक नैतिक आहे. भावना विरुद्ध बुद्धी असे
द्वंद्व न मानता त्यांचा एकत्रित विचार हा मानवी नातेसंबंधांची
नैतिकता ठरवण्याचा एक महत्त्वाचा आधार आहे हे स्त्रीवादाने
महत्त्वाचे मानले.४ रजनी परुळेकर यांच्या ‘तोल’ या कवितेकडे
निर्देश करताना स्त्रीविशिष्ट नैतिकतेची मूल्यसंकल्पना
व्यक्तिसापेक्षतेने घडवणे आवश्यक आहे हेदेखील लक्षात घेता
येते. विवाहाची चौकट स्त्रीला वेगवेगळ्या पद्धतीने जाचक ठरू
शकते. विवाहांतर्गत नैतिक घुसमटीची अभिव्यक्ती या कवितेत
प्रकटते. त्या लिहितात, ‘वडिलांनी पसंत केलेला नवरा /
मरतुकडा, लग्नानंतर जुगारी बनलेला / डोळे दखे ु पर्यंत
शिवणकाम / अवघ्या आयुष्याचा जुगार खेळताना / लक्ष्य फक्त
दोन चुणचुणीत मुलं / कुठून आणते ही एवढा हरू ु प? / कसा
सावरून धरते दिवस न् दिवस / मनाचा तोल?’ (तोल, चित्र, पृ.
४२) विवाहांतर्गत बंदिस्त स्त्री-पुरुष नातेसंबंधातला फोलपणा
उघड झाल्यावर आदर्श स्त्री-भूमिकेचा लादलेला भार कवितागत
स्त्री झुगारून देते. ‘गाडीपाशी एक गोंडस, कर्तबगार नातेवाईक
/ ती लटकं रुसते त्याच्यावर / त्याला खेटनू बसते सीटवर /
नवऱ्याच्या नावाने लावलेलं कंु कू / पुसनू जातं त्याच्या शर्टाच्या
बाहीला / ...प्रवासभर त्याच्या अंगावर रेलताना / नीतीचा तोल
थोडासा ढळतो / आणि तिच्या भावजीवनाचा ढासळलेला तोल /
संसारात पुन्हा पाऊल टाकल्यावर / थोडासा सावरलेला असतो’
(तत्रैव, पृ. ४३) वैवाहिक संबंधांना फाजील महत्त्व देऊन त्यातील
आदर्श पत्नी, माता ह्या भूमिका दांभिकपणे निभावत राहणे
नाकारून अपत्यांसाठी, कुटुंबासाठी, स्वतःचा मानसिक-भावनिक
समतोल साधण्यासाठी कवितागत स्त्रीने देहमनाची स्वेच्छेने केलेली

‘w³V eãX Am°JñQ 2020 & 155


फारकत पुरुषहितकर मूल्यदृष्टीस नीतिभ्रष्ट भासली तरी त्या स्त्रीने
तिचे निर्णयस्वातंत्र्य व निवडीचा हक्क बजावून निर्भय मनाने
जबाबदार मैत्रभाव जपणारा साथीदार निवडणे, त्याच्यासोबत
भावजीवनाचे सुख अनुभवणे हे तिची व्यक्ती म्हणून जगण्याची;
आत्मप्रामाण्याने थेट कृतीतून स्वतःला योग्य वाटतील ती मूल्ये
घडवण्याची तयारी दर्शवते.
‘स्त्री चळवळीमध्ये आज फार प्रकर्षाने दृश्य झालेला
एक तडा म्हणजे स्त्रियांवरील लैंगिक हिंसेच्या मुद्यापेक्षा किंवा
मुद्याबरोबरच आता त्यांच्या लैंगिक निवडी, आनंद यावर भर
दिला पाहिजे असा आग्रह. स्त्रियांची लैंगिक मुक्तता ही केवळ
हिंसामुक्त होण्यात नव्हे, तर आपल्या लैंगिक इच्छा कृतिशीलपणे
व्यक्त करण्यात वाव मिळण्यामध्ये आहे असे म्हणत स्त्रियांच्या
लैंगिक कर्तेपणाचा मुद्दा ऐरणीवर आणला जात आहे.’५ या
अनुषंगाने पाहाता स्त्रीजीवनाचा पारं परिक परीघ ओलांडून
व्यक्तिभानाच्या व माणूसपणाच्या दिशेने जगण्याच्या वाटचालीत
सर्व अनुभवांतन ू तावून-सुलाखून निघण्याच्या शक्यता मलिका
अमर शेख काव्यगत आशयाद्वारे पडताळून पाहातात. विवाहातंर्गत
स्त्रीच्या लैंगिकतेवर पुरुषाचे नियंत्रण व नैतिकतेची घुसमट
झुगारून स्त्रीने स्खलनशील होणे, जोडीदाराच्या परवानगीने
प्रतारणा करण्याची भाषा थेट उच्चारणे पुरुषवर्चस्ववादी
नीतिमूल्यव्यवस्थेला हादरा देणारे आहे. त्या लिहितात, ‘माझ्या
नवऱ्याला वाट्टं / की मी त्याच्यावर खूप खूप प्रेम करतेय् /
...मिठीत बेसावध सांगेनही त्याला कदाचित् / तुझ्यापेक्षा देखणा
शिवाय बुद्धिमान / शिवाय समंजस असा तरुण भेटला / तर
चळेनही मी बिनदिक्कत / स्खलनशील असणं सुंदर अनुभवाय् /
जो आजपर्यंत अनेकदा पुरुषांच्याच / आलाय् वाटय़ाला / खरंच
सांगायचं तर / प्रतारणा करायला खूप खूप आवडेल मला / न्
त्यानंतर पण अपराधी वाटणार नाहीच मला / बिलकूलच... /
उलट मी आणखी प्रेम करेन / नवऱ्यावर... / की त्यानं मला
प्रतारणा करू दिली / स्खलनशील होण्याची संधी देऊन माझं
मानवीपण सिद्ध करू दिलं. / ...चार भिंतीच्या सुरक्षित कवचात
/ नवऱ्याच्या उबदार मिठीत / त्याचे श्वास आठवत / मीही
एंजॉय करेन / पुरुषाएवढीच एखादी छान प्रतारणा / ...जगात
प्रत्येक बाईला ती जे इच्छेल ते मिळो / आमेन.’ (माणूसपणाचं
भिंग बदलल्यावर, पृ. ८१, ८२, ८३) प्रचलित व्यवस्थेत

156 & ‘w³V eãX Am°JñQ 2020


पुरुषासाठी लिंगशुचिता हे नैतिक मूल्य दृढमूल नाही; त्याविरोधात
जाऊन स्त्रीने स्त्री-पुरुष प्रेमातील योनिशुचितेच े नैतिक मूल्य
धुडकावून लावणे ह्याकडे स्त्री-कवीचे केवळ धाडस म्हणून पाहाता
येणार नाही तर स्त्री-पुरुष दोहोंसाठी दटप्पी
ु मूल्ये राबवणाऱ्या
नीतिव्यवहारातील विसंगतीवर स्त्री-कवी नेमकेपणाने भाष्य करते.
पतीच्या संमतीने लैंगिक स्वातंत्र्य उपभोगणे या कवितागत
आशयापेक्षाही स्त्रीच्या लैंगिकतेला मातृत्व व विवाहाच्या संकुचित
साच्यांमधून शुद्धतेच्या पुरुषहितकर नीतिकल्पनांमध्ये अडकवून
स्त्रीदास्य घडवले जाते हे समजून घेत स्त्रीच्या लैंगिकतेची
संस्थीकृत व अधिकृत दृष्टी भेदनू विवाह, कुटुंब या संरचनांमध्ये
परिवर्तनाच्या शक्यतांचा शोध घेण;े संकुचित लैंगिक नीतिमत्तेच्या
योनिशुचितेच्या कल्पनांवर आघात करणे; लैंगिक
सत्तासंबंधाविरोधात आवाज उठवणे; लैंगिक बळी होण्यास नकार
देणे हे कवितेमागचे हेतू अधिक महत्त्वाचे ठरतात. समाजात
प्रचलित असलेल्या लैंगिकतेच्या खऱ्या-खोटय़ा नैतिकतेच्या
कल्पनांना छेद देऊन नैसर्गिक मानवी संबंध प्रस्थापित होऊ
देण्याच्या, ‘माझ्या शरीरावर माझा हक्क’ हा विचार मान्य
होण्याच्या शक्यता काव्यगत आशयात प्रतिबिंबित झाल्या आहेत.
स्त्रीला स्वतःची कामप्रेरणा असते हे समजून घेण्याची आवश्यकता
पटवून देण;े व्यक्ती म्हणून तिच्या लैंगिक स्वातंत्र्याचा उच्चार
करणे; विवाहातंर्गत स्त्री-पुरुष संबंधाबाबत लैंगिक एकनिष्ठतेच्या
पारं परिक नीतिनियमांचे कडे भेदनू त्याकडे व्यक्तिनिष्ठ भूमिकेतून
व न-नैतिक दृष्टिकोनातून पाहाणे लक्षवेधी आहे. लैंगिकतेच े व
त्याच्याशी निगडित तथाकथित नीतिमूल्यांचे मनावर कोणतेही
दडपण न बाळगता स्त्री-पुरुष संबंधातील सहमानवी नात्याच्या व
न-नैतिक जगण्याच्या दिशेच े संसूचन मलिका अमर शेख करतात.
भाषिक धाडस, बंडखोर अभिव्यक्ती, स्फोटक आशय हे सारे
बाजूला सारून कवितेचा अंतःस्तर उलगडला तर ते अधिक
स्पष्टतेने मुखर होते. स्त्रीने आपल्या लैंगिकतेचा सहज स्वीकार
करणे वैशिष्टय़पूर्ण ठरते. पती-पत्नी लिंगातीत सहमानवी नात्याचा
उच्चार उपरोक्त कवितेत आहे. त्यासाठी लैंगिकतेला टाळून किंवा
मुक्त लैंगिकतेच े उदात्तीकरण करून नव्हे तर ती सहजतेने
स्वीकारून दोघांनाही पुढे जाता आले पाहिजे. स्त्री-पुरुष
नातेसंबंधातील प्रगल्भतेच े स्वप्न पाहाताना, आदर्श सहमानवी
नात्याचे सूचन करताना वैवाहिक नात्यात सामाजिक नैतिकतेच्या

‘w³V eãX Am°JñQ 2020 & 157


कें द्रस्थानी असलेले ‘लैंगिक निष्ठा’ हे मूल्य कोणताही अभिनिवेश
न आणता स्त्री-कवी बाजूला सारते. विवाहसंस्थेचे सामाजिक
संदर्भ बाजूला पडतात व व्यक्तिकें द्री स्वरूपात ठाम वैचारिक
भूमिका घेत स्त्रीनिष्ठ न-नैतिक मूल्यांची घडण उपरोक्त कवितेत
झालेली दिसून येते.
मानवी हक्कांचा जाणिवेतन ू विचार करता वेश्याव्यवसाय
करणाऱ्या स्त्रियांकडे फक्त बळी म्हणून पाहाण्यापेक्षा माणूस,
नागरिक अशा दृष्टिकोनातून पाहाता स्त्रीच्या लैंगिकतेबाबत वेगळे
आकलन नीरजा यांच्या ‘अनपेक्षित’ या कवितेतन ू समोर येते.
लैंगिक काम करणारी परिघावरची काव्यगत स्त्री ‘तिच्या शरीरावर
तिचाच हक्क, तिची लैंगिक स्वायत्तता व त्याकडे पाहण्याचा
दृष्टिकोनही तिचाच’ असे म्हणते. ‘त्यानंतर ती भेटली / भर
बाजारात; / म्हणाली, / ‘शरीर हलकं झालंय / फुलासारखं /
सगळ्या जखमा उतरवल्यापासून.’ ‘सगळ्या जखमा उतरवणे’
म्हणजे स्वतःकडे केवळ मादी म्हणून पाहाण्यापलीकडे जाणे हा
कवितागत स्त्रीचा प्रयास नोंद घेण्याजोगा आहे. पुरुषवर्चस्ववादी
मूल्यव्यवस्थेने योनिशुचित्वाच्या व संकुचित लैंगिकतेच्या
तथाकथित पावित्र्य-अपावित्र्याच्या निकषांनस ु ार स्त्री-शरीराला
नैतिकतेच्या साच्यात बंदिस्त केले तथापि प्रस्तुत कवितेत ती
एकाच पुरुषाशी एकनिष्ठ पतिव्रताही नाही व अपराधी
व्यभिचारिणीही नाही. ‘इथं येणारा / असतो नवरा / एका रात्रीचा.
/ ...त्याचे भोग तोच भोगतो; स्वतःचे अपराध / माझ्या अंगभर
गोंदनू / येत नाही भर दिवसा / हिशेब मागायला.’ (अनपेक्षित,
वेणा, पृ. २८-२९) प्रचलित व्यवस्थेतील रूढ स्त्री-पुरुष संबंधांना
आव्हान देत वेश्याव्यवसाय स्वीकारलेल्या स्त्रीची स्वतंत्र जीवनदृष्टी
शोधू पाहाता तिचे शरीर हेच जर तिच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे
तर एका रात्रीसाठी एका पुरुषाशी लैंगिक निष्ठेने जोडून घेत ती
त्याला नवरा समजते तरी त्याचा स्वामित्वभाव ती स्वीकारत
नाही. पुरुषी नीतिमत्तेच्या चौकटी भेदनू ‘त्याचे भोग तोच भोगतो’
म्हणत मनाने त्याच्यापासून अलिप्त असणे व स्वतःचे मुक्त असणे
अधोरेखित करते. नैतिकतेची स्त्रीविशिष्ट नवधारणा त्यातून प्रसृत
होते.
मातृत्वविषयक धारणांच्या बाबतीतही स्त्रीने पुरुषवर्चस्ववादी
मूल्यांच्या चौकटीतून स्वतःकडे पाहाणे थांबवावे हे प्रज्ञा लोखंडे
सुचवतात. विवाहित स्त्रीचे मातृत्व वैध, कुमारी माता, परित्यक्ता,

158 & ‘w³V eãX Am°JñQ 2020


विधवा यांचे मातृत्व अवैध, विवाहबाह्य संबंधातून स्वीकृत मातृत्व
अवैध अशी पुरुषहितकर व पुरुषप्रधानतेस सोयीस्कर नीतिमूल्ये
झुगारून स्त्रीने निर्णयाचे स्वातंत्र्य व निवडीचा अधिकार मान्य
करून स्वतःच्या शरीरावर स्वतःचा हक्क हे संमतीचे मूल्य जपत
जैविक सर्जनशीलतेला सामोरे जाणे स्त्री-कवीस अभिप्रेत आहे.
त्या लिहितात, ‘गत्यंतरच नाही तुला, / की नाही कुठलाच /
पैलदू ार पर्याय / असं समजणारे समजोत काही / तावून सुलाखून
निघालेल्या शरीराची बाई / आजवर / त्यांनी पाहिलीच नाही /
संबंधाचं रमल झुगारून / गर्भाची पिशवी / शुभ्र / अनघड रुजवू
पाही...’ (रमल, उत्कट जीवघेण्या धगीवर, पृ. ६१) ‘तावून
सुलाखून निघालेल्या शरीराची बाई’ म्हणताना योनिशुचिता व
लैंगिकदृष्टय़ा एकाच पुरुषाशी एकनिष्ठता या कुटुंबव्यवस्थेतील व
विवाहसंस्थेतील पुरुषप्रधान नीतीमत्तेला स्त्री-कवी छेद देते. विवाह
व मातृत्व यांची सांगड मोडून, प्रजोत्पादनासाठी कायदेशीररित्या
मान्य असे स्त्री-पुरुष संबंध झुगारून स्त्रीच्या जननक्षमतेवर तिचाच
हक्क मान्य करणारी उपरोक्त काव्याभिव्यक्ती स्त्रीविशिष्ट नव्या
नैतिक मूल्यांच्या घडणीचे संसूचन करते.
पुरुषसत्ताक समाजरचनेतील स्त्रियांचे ठरावीक
अनुभवविश्व व त्यातून सर्वार्थाने मुक्त होऊ पाहाणाऱ्या स्त्रियांच्या
अनुभवातील संघर्षस्थानांचा वेध घेणाऱ्या उपरोक्त सर्वच
काव्यसंहिता निश्चितच महत्त्वाच्या आहेत. मानवी समाजातील
कुटुंब, विवाह यांसारख्या संरचनेचा पोकळपणा स्त्रियांनी अनुभवला
तर त्यांना सुरुंग लावून ‘व्यक्ती’ म्हणून जगण्यासाठी
आत्मप्रामाण्यातून योग्य वाटतात ती स्वतंत्र मूल्ये स्त्रिया घडवत
आहेत. स्त्रीवादी समीक्षादृष्टीतून स्त्रीच्या शारीर अनुभवविश्वाकडे
पाहाण्याच्या दृष्टिकोनात बदल घडून येत आहे; त्यामुळे स्त्री-कवी
अधिक धीटपणे हे अनुभवविषय काव्यगत आशयात हाताळत
आहेत असे म्हणण्यास वाव आहे. नैतिकतेच े सांकेतिक निकष
नाकारताना स्त्रियांची अंतःप्रेरणा महत्त्वाची ठरते. प्रस्थापित
व्यवस्थेने पुरुषधार्जिणी नीतिमूल्येच रुजवली आहेत,
पुरुषानुकूलतेनेच ती पोसली आहेत. स्त्री-कवी काव्यगत
आशयाद्वारे त्यांची विनादिक्कत मोडतोड करतात. स्त्रीच्या
शारीरिक, मानसिक, भावनिक गरजानुरूप नैतिकतेच्या नव्या
घडणीची अपरिहार्यता निदर्शनास आणून देतात.

‘w³V eãX Am°JñQ 2020 & 159


संदर्भ
१. भागवत, वंदना व इतर. (संपा.), २०१४, ‘प्रास्ताविक
चिंतन’, संदर्भासहित स्त्रीवाद : स्त्रीवादाचे समकालीन चर्चाविश्व,
शब्द पब्लिकेशन, मुंबई, पृ. ३०
२. राजवाडे, वि. का. १९९४, भारतीय विवाहसंस्थेचा
इतिहास, लोकवाङ्मय गृह, मुंबई, पृ. ३०
३. अधिक माहितीसाठी पाहा. उत्पल, व. बा. ‘पॉलीअॅमरी :
बहवु िध नात्यांची बहपु दरी व्यवस्था’, लोकसत्ता, चतुरंग पुरवणी,
४ नोव्हेंबर २०१७ शिवाय पॉलीअॅमरीबाबत आंतरजालावर
बरीच माहिती उपलब्ध आहे. morethantwo.com ही वेबसाइट
पाहावी. पॉलीअॅमरीबाबतच्या अनेक प्रश्नांची उत्तरं या वेबसाइटवर
मिळतील. यूटय़ूबवर काही फिल्म्स उपलब्ध आहेत.
४. भागवत, वंदना व इतर. (संपा.), ‘प्रास्ताविक चिंतन’,
उनि, पृ. ३१
५. कांबळे, संजयकुमार. ‘भारतीय स्त्रीवाद : बदलते आयाम’,
आमची श्रीवाणी, ऑक्टोबर २०१६ - जानेवारी २०१७, पृ.
१०२

आधारभूत काव्यसंग्रह
१. परुळेकर, रजनी. १९९३, पुन्हा दीर्घ कविता, डिंपल
पब्लिकेशन, वसई.
२. परुळेकर, रजनी. १९९६, चित्र, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई.
३. शेख, मलिका अमर. २००७, माणूसपणाचं भिंग
बदलल्यावर, लोकवाङ्मय गृह, मुंबई.
४. धुळेकर, नीरजा. १९९४, वेणा, नीलकंठ प्रकाशन, पुण.े
५. लोखंडे, प्रज्ञा.२००२, उत्कट जीवघेण्या धगीवर,
लोकवाङ्मय गृह, मुंबई.

- सरिता सोमाणी
चलभाष -८२७५९४५७९२
saritadarak2050@gmail.com

160 & ‘w³V eãX Am°JñQ 2020


प्रतिक्रिया
(मुक्त शब्द मासिक जुलै २०२० च्या अंकात प्रसिद्ध
झालेल्या सरफराज अहमद यांच्या लेखावर प्रतिक्रिया)

कु रूंदकर ः राष्ट्र सेवा दलाचे की राष्ट्रीय


स्वयंसेवक संघाचे? - गोपाळ आजगांवकर

‘मुक्त शब्द'च्या जुलै २०२०च्या अंकात सरफराज


अहमद यांनी ‘नरहर कुरुंदकरांच्या तर्क व्यूहातील मुसलमान
आणि इस्लाम' या शीर्षकाचा लेख लिहिला आहे. लेखाचा
मोठा भाग कुरआन, इस्लामी संस्कृ ती आणि परं परा आणि
भारतीय मुसलमान याबाबतचे कुरुंदकरांचे विवेचन कसे
चुकीचे, अन्याय्य, मुस्लीमद्वेषी आहे हे दाखविणारे आहे. या
भागाबद्दल मी बोलणार नाही. कारण त्याबद्दल माझा अभ्यास
नाही.
मात्र त्याअगोदर अहमद यांनी काही लेखांचे विश्लेषण
केले आहे. अहमद लिहितात, ‘कुरुंदकरांचा अन्वयव्यवहार
सावरकरांच्या वर्णीय हितसंबंधरक्षासाठीच्या परहितद्वेषी
तत्त्वज्ञानावर बेतलेला आहे.' पुढे - ‘कुरुंदकरांसाठी गोडसे
देशभक्त अन्‌आंबेडकर कैलासवासी (जाड ठशात मथळा).'
अहमद लिहितात, ‘कुरुंदकरांनी महात्मा फुले, गांधी,
आंबेडकर, पटेल, टिळक, लोकहितवादी देशमुख या
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 161
महापुरुषांप्रमाणेच' भारतीय इतिहासातील सावरकर, गोडसे,
गोळवलकर या पात्रांचाही अभ्यास केला आहे. यापैकी
दसऱ्या
ु गटातील ऐतिहासिक पात्रांचा उल्लेख करताना
कुरुंदकर त्यांच्यातल्या अपवादभूत गुणांची दखल घेऊन
त्यांना सर्व प्रकारचा राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक सन्मान
देतात. पैकी सावरकरांसाठी तर ते काहीसा शब्दावडंबरही
माजवतात. अनेक ठिकाणी सावरकारांचा निर्देश ते
‘स्वातंत्र्यवीर' या एकाच शब्दाने करतात. लोकहितवादी,
गोखले, आगरकर, लोकमान्य टिळक वगैरेंच्या बाबतही
त्यांचा हाच शिरस्ता आहे. मात्र बहज ु न महापुरुषांविषयी
त्यांची भूमिका या बाबतीत बदलते. शाह ू महाराजांविषयी
कुरुंदकर लिहितात, ‘कोल्हापूरचा राजा ब्राह्मणविरोधी असेल
(असलाच तर), पण तो हिंदविराे ू धी नव्हता. शिवाजीचा
वंशज हाेता.' दसऱ्या ु ठिकाणी गांधींविषयी त्यांचे विधान
आहे, ‘पाकिस्तानला ५५ कोट रुपये देण्याचा प्रयत्न
केल्यामुळे गांधी मेला हा शुद्ध कांगवा आहे.' या दोन्ही
विधानांत टोकाची नकारात्मकता आणि राजर्षी व गांधींविषयीचा
अनादार नाही, असे कोणी म्हणू शकेल?''
आता यातील एकेक मुद्द्याचा विचार करू.
शाहमू हाराजांबद्दल कुरुंदकरांचा मूळ उतारा असा आहे - ‘...
कोल्हापूरच्या राजाने बहज ु न समाजासाठी वसतिगृह,े शाळा,
नोकऱ्या यांची खास सोय केली होती. तसे अस्पृश्यांसाठीही
कोल्हापूरचे शाहमू हाराज झटत होते. कोल्हापूरचा राजा
ब्राह्मणविरोधी असेल (असलाच तर), पण तो हिंदविरोधी ू
नव्हता, शिवाजीचा वंशज होता. हिंदत्ववाद्यांना
ु या राजाविषयी
प्रेम का वाटले नाही?... यात टोकाची नकारात्मकता आणि
अनादर यांचा मागमूस तरी आहे का? हा उतारा ‘श्री
गोळवलकर गुरुजी आणि महात्मा गांधी' या लेखातील आहे.
हा लेख गोळवलकरांनी महात्मा गांधींना श्रद्धांजली केली ती
कशी ढोंगीपणाची आहे याची मुद्देसदू पण आक्रमक शैलीत
चिकित्सा करणारा आहे. हिंदत्ववाद्यांनी
ु बहज
ु न समाजासाठी
काहीही केलेले नाही या पार्श्व भूमीवर उदाहरण म्हणून
कुरुंदकरांनी शाहमू हाराजांच्या कार्याचे उदाहरण दिलेले आहे.
162 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
दसरे
ु विधान - ‘पाकिस्तानला ५५ कोट रुपये देण्याचा
प्रयत्न केल्यामुळे गांधी मेला हा सुद्धा कांगावा आहे.' या
वाक्याच्या पुढील वाक्ये अशी आहेत - ‘लाहोरचा सूड
दिल्लीत घेण्यासाठी हा सज्जन मारणे आवश्यक आहे असा
निर्णय सूडवादी यांनी (हे दोन शब्द जाड ठशात) घेतला.
(याच्याव्यतिरिक्त) दसरे ु स्पष्टीकरण पुराव्याला जुळणारे
नाही. क्षुब्ध जातीयवाद जो सूड इच्छित होता त्याला गांधींच्या
मरणाने मोकळीक सापडेल या अंदाजावर किं बहनु ा खात्रीवर
खुनाची योजना आखण्यात आली.'
यात ‘टाेकाची नकारात्मकता' आणि गांधींविषयी ‘अनादर'
कुठे आहे?
५५ कोटचे वरील विधान ‘गांधीहत्या आणि मी' या
पुस्तकाचा सज्जड समाचार घेणाऱ्या लेखातील आहे. त्यात
लेखाबद्दल सरफराज अहमद लिहितात, ‘या लेखात
कुरुंदकरांनी गांधीहत्येच्या माध्यमातून प्रस्थापित होऊ
पाहाणाऱ्या विचारांचा प्रतिवाद केला आहे, असे वाटण्याची
शक्यता आहे. पण ‘कुरुंदकरांचा संपूर्ण भर या लेखात
सावरकरांचा बचाव करण्यावर आहे.' हे सरफराज अहमद
यांचे विधान अतिशय धक्कादायक आहे. हा लेख पुन्हा
वाचूनही मला असेच वाटले की कुरुंदकरांनी गांधीहत्येच्या
माध्यमातून प्रस्थापित होणाऱ्या विचारांचा प्रतिवाद मुद्देसदू पणे
आणि प्रभावीपणे केला आहे.अर्थात त्या लेखात कुरुंदकरांनी
स्पष्टपणे लिहिले आहे, ‘गांधीजींची हत्या घडली ही घटना
नैतिक दृष्टय़ा सावरकर रास्त मानीत होते की गर्ह्य?
स्वातंत्र्यवीरांच्या' दृष्टीने नथुराम हतु ात्मा होता की खुनी?
याबद्दल गोपाळ गोडसे स्पष्टपणे बोलत नाही. यानंतर
कुरुंदकरांनी पृष्ठक्रमांक उद्‌धृत करून गोपाळ गोडसे हे,
‘सावरकारांच्या दृष्टीने नथुराम हतु ात्मा अाहे, सनातनी
सावरकरांचा नथुराम हा सैनिक आहे असे आडपडद्याने
सुचवत आहेत असे लिहिले आहे. या परिच्छेदातील शेवटचे
वाक्य आहे,' ‘पृष्ठ १३९वर सावरकरांनी सरळच मदनलाल
धिंग्रा आणि नथुराम गोडसे यांना एकत्र गुंफले आहे. जणू
कर्नल वायली आणि महात्मा गांधी हे भारताचे सारखेच शत्रू
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 163
होते, असे सावरकरांचे मत होते.' पुढे कुरुंदकर लिहितात,
‘नथुराम गोडसे याला हतु ात्मा म्हणणे म्हणजे हत्येचा
कायदेशीर सदोषपणा मान्य करणे; पण हत्येला नैतिकदृष्टय़ा
रास्त व समर्थनीय मानणे. स्वातंत्र्यवीर सावरकर ही हत्या
समर्थनीय मानत हाेते काय? असे ते मानत असतील तर ती
फारच द:खद ु बाब म्हटली पाहिजे. हे जर सावरकरांचे
खरोखरच मत असेल तर सावरकरांच्या अनुयायांनी केलेल्या
खुनाच्या दोषारोपात स्वतः सावरकरच नैतिकदृष्टय़ा कटाचे
नेते ठरतील.'
या परिच्छेदातील याच्या पुढचा भाग या खुनाचे नैतिक
समर्थन कसे होऊ शकत नाही याचे विवेचन आहे.
या लेखावर सरफराज अहमद यांचा आणखी एक आक्षेप
आहे. तो म्हणजे कुरुंदकरांनी गाेपाळ गोडसे यांच्या पत्नी
सिंधु गोडसे यांचे त्यांचा करारीपणा स्वाभिमान, जिद्द,
एकनिष्ठता या गुणांसाठी, भरभरून कौतुक केले आहे.
सरफराज अहमद यांना ही गोष्ट धक्कादायक वाटते, तसेच
बहज ु न स्त्रियांविषयी ते आपली भूमिका बदलतात असे त्यांना
वाटते. सरफराज अहमद यांनी हा गुणवर्णनाचा अख्खा भाग
उद्धृत केला आहे. मात्र या गुणवर्णनपर वाक्यांच्या पुढची दोन
वाक्ये वाचली तर कुरुंदकरांना नेमके काय म्हणायचे आहे हे
जास्त स्पष्ट होते. ती वाक्ये अशी - जमल्यास गोडसे यांनी
पुढल्या अावृत्तीत ही व्यक्तिरेखा अधिक तपशिलाने रं गवावी;
कारण या पुस्तकात कौतुक करण्याजोगा भाग एवढाच
आहे!'
आता परत सिंधु गोडसे यांच्याबद्दल कुरुंदकरांनी
काढलेल्या काैतक ु ोद्गारांकडे जाऊया. यात वाचकाला
कुरुंदकरांचा प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता जाणवू
शकते. दसऱ्या ु बाजूने पाहिल्यास हा एक डावपेच, रणनीती
आहे. पुस्तकाचा जाे मुख्य विषय आहे त्यावर टीका
करण्याअगोदर पुस्तकातील अवांतर, बिनमहत्त्वाच्या भागाचे
कौतुक करणे हे त्या पुस्तकाच्या वाचकाला विश्वासात घेऊन
नंतर त्याला अापले मुद्दे पटविणे, असा हा पवित्रा आहे. (या
ठिकाणी मला हिटलरच्या शेवटच्या दिवसांवर आधारलेल्या
164 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
‘डाऊनफॉल' या चित्रपटाची आठवण येत.े हिटलर हा
‘माणूस' होता असे दाखविणारी काही दृश्ये चित्रपटात आहेत.
मात्र संपूर्ण चित्रपट हिटलर हा कसा विकृत, अधम,
असंवेदनशील होता हेच प्रभावीपणे मांडतो. काही समीक्षकांनी
हिटलरच्या ‘माणूस' दाखवण्याला आक्षेप घेतला. तेव्हा
दिग्दर्शकाने सांगितले, ‘Bad people do not walks around
with claws like vicious monsters, even though it
might be comfortable to think so. Everyone
intelliegent knows that - evil comes along with a
smiling face.'
सरफराज अहमद यांचा आणखी एक आक्षेप नथुराम
आणि त्याच्या सहकाऱ्यांना कुरुंदकरांनी ‘देशभक्त' म्हणणे
यावर आहे. कुरुंदकरांचे याबाबतचे म्हणणे त्यांनी उद्धृत केले
आहे. पण हा मुद्दाच गैरलागू आहे. कारण संपूर्ण लेखात
कुरुंदकरांनी नथुरामची आणि हिंदत्ववाद्यांची
ु देशभक्ती ही
कशी चुकीची, ढोंगी आणि विकृत आहे याचेच विवेचन केले
आहे. तसेच, गोडसे हा देशभक्त आहे, हतु ात्मा आहे असा
जो हिंदत्ववाद्यांचा
ु प्रचार असतो त्याला कुरुंदकरांनी उत्तर
दिले आहे. गोडसे हा देशभक्त आहे हे ते मान्य करतात
(विरोधी पक्षाचे मुद्दे आपणच घेऊन त्यांची चर्चा करणे हा
चर्चेचा प्रभावी मार्ग आहे.) पण पुढे लिहितात - ‘जनतेच े प्रेम,
जनतेची श्रद्धा इतकेच ज्याचे एकमेव भांडवल, आत्मक्लेश हे
ज्याचे एकमेव हत्यार, त्याची समाप्ती गोळीने करणारे'
हतु ात्मे ठरू शकत नाहीत! जनतेच े प्रातिनिधिक सरकारसुद्धा
ज्याच्यासमोर नसते, पिसाट सुटलेला क्रोधही ज्याच्यासमोर
शरण जातो - असा गांधी हा भारताच्या उदात्त,
सदसद्‌विवेकबुद्धीचा प्रतिनिधी होता.'
‘गांधीहत्या आणि मी' या लेखाच्या अखेरीस येताना
कुरुंदकर लिहितात, ‘व्यक्तिशः मी महात्मा गांधींना एक
श्रद्धास्थान मानतो' या लेखाचा शेवटचा परिच्छेद आहे -
‘लेखकाजवळ (म्हणजे गोपाळ गोडसे यांच्याजवळ) सत्य
मोडण्याचा प्रामाणिकपणा फारसा नाही. गांधी-हत्या
अभियोगातील पुरावा मांडण्यातील निःपक्षपातीपणा फारसा
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 165
नाही. हौतात्म्याचा दिलेला रं ग समर्थनीय नाही. सरदार,
सावरकर यांच्याविषयीचे उल्लेख बेजबाबदार आहेत. महात्मा
गांधींविषयीचे शेरे पूर्वग्रहदषित
ू आहेत....'
सावरकारांचा उल्लेख कुरुंदकर ‘स्वातंत्र्यवीर या एकाच
शब्दाने करतात' (गंमत म्हणजे याच्यापुढचेच अहमद यांचे
वाक्य, ‘लोकहितवादी, गोखले, आगरकर, लाेकमान्य टिळक
वगैरेंच्या बाबतीतही त्यांचा (कुरुंदकरांचा) हाच शिरस्ता
आहे. म्हणजे सरफराज अहमद स्वत: लिहिताना देशमुख
याच्याऐवजी लोकहितवादी हे अभिधान वापरतात; टिळकांना
केवळ टिळक संबोधण्याऐवजी लाेकमान्य टिळक संबोधतात.)
आता काही अभिधाने आपण सहजपणे वापरतो. उदाहरणार्थ
आचार्य अत्रे, पंडित नेहरू, साने गुरूजी ही चटकन आठवणारी
उदाहरणे. इथे ज्यांच्याबद्दल वापरली आहेत त्यांच्याबद्दल
तुलनेने विशेष आदर दाखविण्यासाठी किंवा ज्यांच्याबद्दल
वापरली नाहीत त्यांच्याबद्दल तुलनेने आदर न दाखविण्यासाठी
असा त्यांचा उद्देश नसतो. (उदाहरणार्थ साने गुरूजींचे साहित्य
रडके आहे असे फडके म्हणत.) शिवाय वर सांगितल्याप्रमाणे
तो एक रणनीतीचा भाग असू शकतो. शिवाय स्वातंत्र्यवीर
असे अभिधान वापरूनही सावरकरांच्या कार्याचे मूल्यमापन
करता येते आणि तसे कुरुंदकरांनी केले आहे.
स्वातंत्र्यवीर हे अभिधान वापरून कुरुंदकरांनी लिहिलेला
परिच्छेद पाहा - ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्यामध्ये या
परिस्थितीची (अस्पृश्यांच्या परिस्थितीची) थोडीफार जाणीव
दिसते. त्यांनी मात्र सर्व सुधारणांचा पुरस्कार आपल्या
भाषणांतनू केला, लिखाणातून केला; पण सामाजिक जीवनात
अशा पुरस्काराला अर्थ नसतो. स्वातंत्र्यवीरांनी एक नवीनच
पतितपावन मंदिर उभे केले ही गोष्ट कौतुकास्पद नसते हेच
पुष्कळांना कळत नाही! अशा घटना चिंताजनक असतात.
सर्व जातीजमातींना मोकळे असणारे मंदिर शेवटी फक्त
अस्पृश्यांचे मंदिर उरते आणि तेही पुढे तेथे जाणे सोडून
देतात!! स्वातंत्र्यवीरांनीसुद्धा हिंदंची
ू प्रतिष्ठित मंदिरे
हरिजनांच्यासाठी मोकळी करण्याचे लढे दिले नाहीत.
सावरकारांवर बंधने होती हे मान्य केले, तरी ही सारी बंधने
166 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
१९३७ ते ४७ ला संपलेली होती. या दशकात सार्वजनिक
विहिरी व तळी हरिजनांना मोकळी व्हावीत, मोठी मंदिरे
हरिजनांना मोकळी व्हावीत यासाठी त्यांना वेळ मिळालेला
दिसत नाही! पंढरपूरच्या विठोबाचे मंदिर हिंद ू हरिजनांकरता
मोकळे करण्याचे काम शेवटी भ्रष्ट साने गुरूजींसारखा
गांधीनिष्ठ करतो. श्रेष्ठ हिंदत्ववाद्यांना,
ु हरिजन बौद्ध झाले
तरीही बौद्ध हरिजन म्हणजे हिंदचू हाेत, असे लेख लिहिण्याने
कर्तव्यकर्म केल्याचे समाधान मिळते!'
सावरकरांचे नाव न घेता कुरुंदकरांनी सावरकरांच्या
राजकारणावर केलेली जहाल टीका पाहा - ‘शनिवारवाडय़ासमोर
हिंदस्थान
ु हिंदओं
ू का अशी घोषणा करणे सोपे होते; पण या
घोषणेवर सिंध, पंजाबच्या निवडणुका कशा जिंकता आल्या
असत्या, याचा विचार करण्यास हिंदत्ववादी ु शुद्धीवर होते
कुठे ? हिंद ू हे एक स्वयंभू राष्ट्र असून मुसलमान हे
आपल्यापेक्षा पृथक राष्ट्र आहे, हेच तर हिंदत्ववाद्यांचे
ु कायमचे
तुणतुणे होते! जर मुसलमान हे वेगळे राष्ट्र असतील तर
त्यांचा बहसं ु ख्य असणारा प्रदेश हिंदस्थानच्या
ु बाहेर जाणारच,
ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ होती.'
कुरुंदकरांनी इतक्या रोखठोकपणे सावरकरांवर लिहिले
असूनही सरफराज अहमद हे कुरुंदकरांनी सावरकरांना
‘स्वातंत्र्यवीर' म्हटले या एकाच गोष्टीवरून अवडंबर माजवीत
आहेत हे स्पष्ट दिसते.
आता शेवटचा मुद्दा. कुरुंदकरांनी ‘महाडचा मुक्तिसंग्राम'
या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना डॉ. आंबेडकरांसाठी
‘कैलासवासी बाबासाहेब आंबेडकर असा शब्दप्रयोग केला
आहे त्याबद्दल सरफराज अहमद यांनी माेठा गहजब केला
आहे.
सरफराज अहमद लिहितात, ‘विचारवंताचे विचार,
महापुरुष अथवा समाजसुधारकाचे कार्य त्यांच्या जीवनाच्या
सीमांपलीकडे विस्तारलेले असते, त्यामुळे त्यांच्या
जीवनासोबत महापुरुषांना मर्यादित करता येत नाही, या
विवेकाला (कुरुंदकरांनी असा शब्दप्रयोग वापरून) तिलांजली
दिली आहे.'
‘w³V eãX Am°JñQ 2020 & 167
(तसेच हा शब्दप्रयोग) संस्कृति-व्यवहाराच्या प्राथमिक
मर्यादांनाच लाथाडणारा आहे आणि बाबासाहेबांविषयीचा
सांस्कृतिक ग्रह स्पष्ट करणारा आहे. त्यातही बाबासाहेबांनी
ज्या संकल्पनांना नकार दिला, त्या संकल्पना त्यांच्यावर
लादणे योग्य की अयोग्य इतका सारासार विचार कुरुंदकर
करत नाहीत.'
आता कुरुंदकरांनी असा शब्दप्रयोग वापरणे निखालास
चूक आहे. पण ही चूक अनवधनाने झालेली दिसते. कारण
जर कुरुंदकरांचा बाबासाहेबांबद्दल ‘सांस्कृतिक ग्रह' असता
तर त्यांनी तो असा मांडला असता का? ‘महाडचा
मुक्तिसंग्राम' असे पुस्तक लिहिणारे कुरुंदकरांकडे प्रस्तावना
मागायला गेले असते का? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे
या आपल्या आरोपाला पुष्टी म्हणून सरफराज अहमद त्या
प्रस्तावनेतील एखादा परिच्छेद का नाही उद्धृत करत?
वस्तुस्थिती अशी आहे की कुरुंदकरांनी आपल्या लेखनातून
आणि भाषणांतनू अनेक वेळा बाबासाहेबांची महानता
प्रभावीपणे मांडली आहे. कुरुंदकरांच्या ‘आकलन' या
पुस्तकात ‘पूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यस्मरणाच्या
निमित्ताने' हा तब्बल चाळीस पानी लेख आहे. दलितांच्या
प्रश्नावर विचारविमर्श करणारे ‘भजन' हे पुस्तक आहे.
मनुस्मृतीची झाडाझडती घेणारे ‘मुनस्मृती : काही विचार' हे
त्यांचे पुस्तक आहे. या साऱ्यामधून कुरुंदकरांचे बाबासाहेब
आणि दलित यांच्याबद्दलचे विचार स्पष्टपणे लक्षात येतात.
एकूण असे दिसते की सरफराज अहमद यांनी कुरुंदकरांवरील
आरोपांसाठी जे पुरावे सादर केले आहेत ते नाममात्र,
कमकुवत आणि फसवे आहेत. मात्र नवख्या वाचकाला
त्यांचा हा लेख वाचल्यावर कुरुंदकर राष्ट्र सेवा दलात हाेते
की राष्ट्रीय स्वयंसेवक संघात हाेते असा प्रश्न पडू शकेल.
एखाद्या वाचकाला असंही वाटू शकेल की कुरुंदकर एवढे
हश ु ार होते की महाराष्ट्रातील पुरोगामी लाेकांना त्यांनी तब्बल
पन्नास वर्षे गंडवलं. पण वस्तुस्थिती अशी आहे की
कुरुंदकरांनी आपल्या व्यासंगाने आणि आक्रमक, तर्क शुद्ध
शैलीने विपुल लिखाण आणि भाषणे करून धार्मिक
168 & ‘w³V eãX Am°JñQ 2020
124) ‘amR>r H$mX§~ar … Ìogð> Vo Voam (g‘rjm) h[aíM§Ð Wmoa
125) XmoZ eVH$m§À¶m gm§Ü¶mdaÀ¶m Zm|Xr (H$Wmg§J«h) ~mbmOrAO H$br‘ gwV
128)126)’o$g~wB§H{S>$Mm ^maVmVrb Iam Mo h am (AZw d mX) ‘y i bo I H$
राजकारणाचे ¶पितळ Z A°{Z‘bउघडे पाडले
’$m‘© (H$mX§ ~ar) आणि धर्माधिष्ठित
n«drU XeaW
राजकारणाला
127) Am{g’$Omhr कायम विरोध… I§S> 1के(B{Vhmg)
ला. त्यांनी बहज ु न-अभिजन
g§nm. ga’$am
A
असा भेद केलेला नाही. ‘अन्वय' या त्यांच्या पुस्तकात H$br‘ AOr
129)128)
A§V¶m©‘r IOw amhmo (H$mX§~ar) dmX) असेJmo nmi AmO
‘राजर्षि शाह’o$'ू g~wतसे च ^maVmVrb
H$Mm ‘कर्मवीर Iam भाऊराव पाटील'
Moham (AZw शाहboू IH$
‘yi
130) Hw§$^‘oim… EH$ Ñ{ï>jon (gm‘m{OH$ Aä¶mg) XrßVr amD$V
आणि भाऊराव पाटील यांच्यावर लेख आहेत. शिवाजी
131) E{bgMr Jmoï> शिवाजी
(H$mX§~[aH$m) A
राजांवर ‘छत्रपती महाराज : जीवन रहस्य'gw‘असे {V à^mH
129) A§ V ¶m© ‘ r IOw a mhmo (H$mX§ ~ ar) Jmo n mi AmO
पुस्तकच
132) Adm©आहे
MrZ.AmaU अशा (g§ कुरुंHद$sU©
करांवर
) जातीयतेचा अरोप àkm करणंX¶m nd
130) Hw § $ ^‘o i m… EH$ Ñ{ï> j o n (gm‘m{OH$ Aä¶mg) XrßVr amD$Vb
हास्यास्पद
133) VgZgआहे
gm{h˶H¥ .
(H$mX§
$VtMo ~dmMZ
ar) Am{U {Zd©MZ (g‘rjm) ‘.gw
131) E{bgMr Jmoï> (H$mX§~[aH$m)
Amgmam‘
. nmQ>
gw‘{V à^mH
rb
134)सरफराज Adm©अहमद
ào‘gmYZm
132) M(b{bV)
rZ AmaU यांन(g§ा Hजर $sU©)आपण केलेले आरोप àkmखरेZmdao
eaX X¶m nd
वाटत
135) असतील
VgZg तर
(H$mX§ ~त्यांनी
ar) खरे आणि भक्कम पु
र ावे द्यावे
Amgmam‘त.
Amgmam‘ b
133) VgZg (H$mX§~ar)
- गोपाळ आजगांवकर Ab
संपर्क ः ९९६७७७१९६०
इ मेल ः ajgaonkar.gopal@gmail.com ‘m
‘m{
A
‘m{gH$ {Xd
{Xd
‘m{
‘m{
{ddoH$erc
‘m{gH$ {XdM
{Xd
‘w³VVo
{ddoH$erc ‘w³VVoM
g‘mO Am{U g§ñH¥$Vr ¶m§À¶m{df¶r
g‘mO
(10 A§H$ +Am{U
1 {Xdmirg§ñA§H¥H$)$Vr ¶m§À¶m{df¶r
dm{f©H$ dJ©Ur(10 :A§H$ + é.1 850/-
{Xdmir A§H$) g§ñWogmR>r P
dm{f©H$ dJ©Ur : é.é.é. 600/-
850/- 춊VrgmR>
1000/- g§ñWogmR>rr P
VrZ dfmªgmR>r : é. 2250/- é.é.750/-
600/- g§ 춊VrgmR>
ñWogmR>rr E{àb
VrZ dfmªgmR>r : é. é. 1500/-
é. 2250/-
2700/- 춊VrgmR>
g§ñWogmR>rr 2020
n¶ªVM
ghm dfmªgmR>r : é. é. é. 1500/-
1900/-
4000/- g§ì¶ŠVrgmR>
ñWogmR>rr dJ©UrMo X
ghm dfmªgmR>r : é. é. é. 4000/-
2700/-
5000/- g§ñWogmR>rr
춊VrgmR>
é.é. 2700/-
3300/- 춊VrgmR>r
9/10,
E/201,Hw$càoOZH$ë¶mU,
‘ gmo
E/201,gm¶Q> r,d{Pam
d{Pam
OZH$ë¶mU, ZmH$m, ~mo~moaa
d{Pam ZmH$m,
ZmH$m,
g§nH©$ : 022 28332639, 8657515804, 98201 ZmH$m,
9/10,
E/201,Hw $ cào ‘ gmo
OZH$ë¶mU,
~mo a g
rdcr m¶Q> r ,
(npíM‘), d{Pam
d{Pam
‘w § ~ B© ZmH$m,
400 47284
091 ~mo~moaar
g§nH©$ : 022 28332639, 8657515804, ‘mo~mBc : 865759820115804 / 47284
98201 47284
Email : muktashabd@gmail.com

‘w³V eãX Am°JñQ 2020 & 169


प्रतिक्रिया

(मुक्त शब्द मासिक जुलै २०२० च्या अंकात प्रसिद्ध


झालेल्या सरफराज अहमद यांच्या लेखावर प्रतिक्रिया )

लेख अभ्यासपूर्ण आणि नेमका आहे. महाराष्ट्रातील तथाकथित


विचारवंत आपली constituency नक्की करतात. तिला छानपणे
कुरवळतात जावळी परिवारातील दोघांनी टिळक व सावरकर
असे वाटून घेतले आहेत! कुरुंदकर फार चलाख!
‘सोबत' माध्यमातून ते हिंदत्ववादी
ु मंडळींना गोंजारत राहिले.
आणि गाफील परिवर्तनवादी मंडळी त्यांना आपले मानत राहिली.
भयावह गोष्ट म्हणजे मे. पुं. रेगे, जे प्राचार्य होते तत्त्वज्ञानाचे
मान्यवर प्राध्यापक होते, साहित्य संस्कृ ती मंडळाचे अध्यक्ष होते
आणि नवभारत मासिकाचे संपादक होते, त्यांच्या टीकेला उत्तर न
देण्याची मग्रुरी कुरुंदकरांनी दाखवली, ज्याला चर्चेतून पळ काढणे
म्हणतात, त्यांचे भक्तगण त्याचेही समर्थन करतात! हा लेख
लिहिल्याबद्दल लेखकाचे अभिनंदन!

- दत्तप्रसाद दाभोळकर
संपर्क ः९८२२५०३६५६

170 & ‘w³V eãX Am°JñQ 2020


विलास सारंग यांचे सावितय

रूद्र चलचहत्ा लेखकािं वािन चिरं तनािा गंध


(कादं बरी) (समीक्ा) (कथासंग्रह)

मूल्यः मूल्यः मूल्यः


110 160 110
रु््ये रु््ये रु््ये

36 463 4

34
46
36

अम्ायाद अाहे बुद्ध तंदरू च्ा चिणग्ा घडत्ा इचतहासािी वाळू


(कादं बरी) (कादं बरी) (कवितासंग्रह)

मूल्यः मूल्यः मूल्यः


180 125 70
रु््ये रु््ये रु््ये
2018Mm
2018Mm h.
h. Zm.
Zm. AmnQ>
AmnQ>oo amÁ¶
amÁ¶ nwnwaañH$maàmá
ñH$maàmá H$mX§
H$mX§~~arar
A{^Z§XZ
Mukta Shabd : ISSN 2347-3150
Mukta Shabd : ISSN 2347-3150
2018Mm Mukta
2018Mm ‘hmamï´
‘hmamï´ ’$m¢SS>oe>oeShabd
> > ’$m¢ Z,A‘o
Z, : ISSN
A‘o[[aH$m
aH$m 2347-3150
nwnwaañH$maàmá
ñH$maàmá H$mX§~~arar
H$mX§

...दररोज असंख्य नवनव्यया उत्यादनयांच्यया जयाहिरयाती ्येऊन


आदळत आिेत. तणयावमुक्त कसे जगया्यचे िे सयांगणयारे
लोकिी³esगललोगलली
Leer} meeefnहदसू l³eke=लयागले
ÀleeR®es आिे
ce.megत.. ‘सवयास्थ्यकयारक’
Heeìer} ³eebveer
ìer} kesÀ}s}वयाट्े
जगण्ययासयाठी s Jee®eve met#ce Deens
ल हततकया DeeefCe DeLe&
्ैसया मोजया्यलया efveCe&त्ययार
लोक ³eve
eg.Hee
ce.m
ce.megce.meg

आिेत.yeng
अशया -Debसगळ्यया
ieer Deensसु.खयासीन,l³eeb®eerआतममगन
meceer#ee जगयात
l³ee झो् l³ee
. Heeìer
. Heeìer

उडवणयारे
meeef, nसवयास्थ्य
l³eke=Àleerिरवू
®ee नmeKees
्याकणयारे
} JesOकयािी
e Iesles‘सवयास्थ्यियारक’
DeeefCe efle}e
}}

}s Jee®eve
. l³eeb®eer
les DeeefCe ce.meg.Heeìer} ्ुढय़यात³eLees
आले तर v³ee³e
ef®ele कसे वया्े oslलes.?ner meceer#ee DeLe&efveCe&³eve
e&efveCe&³evee
ev
s Jee® ³eee,r
}µeeðeer keÀjleevee meeefnl³eke=Àleer®³ee ceeieCeerHe´ceeCes
...अंतमुमुख करणयारे, कधी आतल्यया आत सवतःलयाच

eR.®eel³eepemee e
eeefC
}les DpeieCese&³eve ceevemeµeeðeer³e, DeeefoyebOeelcekeÀ, ªHeefve<þ
त्यासया्यलया लयावणयारे, सयाचले्णयालया जरया खरवडून
meeefmeeef

e&efveCveeep³ee
ceOet
r³e,Jee
nl³eke=

[}s µeeð}peemee Fl³eeoer


कयाढणयारे , गोठलेmeceer
ल्यया#हसनगधते
ee¢<ìeR®लeeया pemee DeJe}byअसे
हवतळहवणयारे e keÀjles ,
कयािी
nl³eke=

ee µeesOe
eReeb®®ee eieCes
ÀleeRÀ®leeRes ®Jee®eve

तरी ्ेरlemee®e peieCes DeeefCe Yee<es


उद्ेlश
eer}िोतया...
peieCesअरयामु
³eeb®तeener
p
} p³ee
e
ceOetv e Jee यावे िया ्यया लेखनयामयागचया कयािी
es Jee®eve

चयांगले efउगवू
Je®eejन ्येkeÀjles
ण्ययासयाठीच.
s}
[} µeesOe . Deµee Yee<esceO³es ceOetve ceOetve p³ee
DeeefDeeef

®eve
ee
Ceeb®
Ce CefveeJe&efv®eJe&eve®eve

e R ® es Jee HeÀìer efomeleele l³eeble [eskeÀeJeC³ee®es DeeefCe


...एकयाo[}sअरयामु}नeे िेJee
वंहचतयां चे वतमु
=Àl e e o[Je}s }मe यानDeLe&
आिेng.[‘धू ळ्ेर’ करतयानया
keÀC³ee®es Je
l³eke Je&®ev मयाती कोरडी असते. ्याऊस नकककीच ्येईल िया आशयावयाद
meeefn eefCe efve l³eeceeieer } le= < Ceeb ® ee µees O e Ies C ³ee®es keÀecener ner
BN 978-93-82364-57-3

on
्ेरणी करतयानया असतो. हि्ययाणे जसे कोरडय़या मयातीत
e
7- 3

meeeDfnl³eke=ÀleeR®es Jee®eve meceer #eeन keÀjles . कधी तरी ्डणयाऱ्यया ्यावसयाच्यया


ani Nirwach an-5
64

सवतःलया गयाडू घेते आहण


-823
8-93
N 97
789382 364580
SB

्याण्ययाने जी ओल हनमयामुण िोईल त्ययावर अंकुरण्ययाची उमेद


6-2

DeeefCe efveJe&®eve
80
45n
2 36ha
on 9 38wac

ियाळगते अगदी तशीच भयावनया सगळ्यया वंहचतयांच्यया


9 78 Nir
i
an

मूल्यः
2 04962

6-2 जगण्ययाच्यया िुडयाशी असते... जरया डोळे उघडे ठे वले,


gm{h˶H¥$VtMo dmMZ
62
04
96
2

धूळपेर 250
रु््ये
वेदनेची भयाषया समजून घेतली आहण एखयाद्याच्यया दुःखयाची
Am{U {Zd©MZ
गयाज ऐकण्ययासयाठी मनयाची, आ्ल्यया अरमु्ूणमु िसतक्े्याची
[a¨JmU (H$mX§~(लेar)खसंग्रह) (g‘rjm)
त्ययारी ठे वली तरीिी खू् झयाले. संवेदनेच्यया वया्े वरचे आ्ण
H¥$îUmV ImoV सिप्रवयासी आिोत कयारण आ्ल्ययालया ियांधणयारया कयाळ एक
‘.gw.nmQ>rb
‘yë¶ : 220/- आिे... ‘yë¶ … 375 én¶o
www.shabdbooks.com
www.shabdpublication.com आसाराम लोमटे - ‘धूळ्ेर’मधून

{Z^©¶ {dMmam§Zm n§I Am{U


Am{U
{ZIi {Z{‘©Vrcm AmH$me XoUUma§ma§
website : www.shabdbooks.com
www.shabdpublication.com www.shabdbooks.com
www.muktashabd.com
àoàoffH$H$ :… ‘w‘w³³VV eãX ~w~wHH$-nmo
$-nmoññQ>Q>
mXH$ ‘w‘wÐÐH$H$ Am{U àH$meH$
g§g§nnmXH$ ¶emoYYZZ nmQ>
àH$meH$ ¶emo nmQ>rb
rc ¶m§¶m§ZZr r à{V,
"‘w"‘w³³VV eãX'
eãX' ho ‘m{gH$ - E-203,d{Pam ZmH$m,OZH$ë¶mU,
~moardcr
(n.),
d{Pam ‘wZmH$m,
§~B© 400 091 (n.),
~moardbr ¶oWyZ ‘wà{gÕ Ho$co091
§~B© 400 .
Xÿ¶oaWÜdZr : 022-2833
yZ à{gÕ Ho$bo. 2640 /
98201 47284.
g§nH©$ … 8657515804
Email::muktashabd@gmail.com
Email
Email
Email muktashabd@gmail.com

‘w‘wÐUñWi : {gÕr{dZm¶H$ {gÕr{dZm¶H$ AmQ>AmQ>©²g©²g,, XþXþHH$mZ$mZ Z§Z§.. 3,


3, amO amO {H« {H«$$ñQ>
ñQ>cc
{~pëS>¨J¨J,, am°am°¶¶cc H$m°
{~pëS> H$m°ååßco
ßco³³g,
g, S>S>°â°â’$mo
’$mo{{S>S>c
c hm°
hm°QQ>>oc
ocg‘mo
g‘moaa,, am°am°¶¶c
c ìho ìhoOO
{Q´{Q´>Q>Q> > hm°
hm°QQ>oc
>oc˦m
˦m ~mOy
~mOyc cm,m, E³ga
E³ga amoamoSS>>,, ~mo
~moaardcr
rdcr (n.),(n.), ‘w‘w§~§~B©B© 91 91

You might also like