You are on page 1of 3

October Support Worksheet – 1 Std – 8 2022-23

● श्रवण - https://www.youtube.com/watch?v=oUmVFeHMcgk
● वाचन -

लेखन

● इंग्रजी शब्दांचे उताऱ्यातन


ू मराठी अर्थ शोधन
ू लिहा .

immemorial,culture,country,people,great,spiritual teacher,education,education
center,business center,goodes,famous,road and
waterways,purchase,export,technician,scientist,abroad,work

● उताऱ्यातन
ू शोधलेले मराठी शब्द वापरुन एक एक वाक्य लिहा . (एक शब्द -एक वाक्य)
● वाचनासाठी 2 वर्णनात्मक निबंध दिले आहे त ते वाचा आणि नंतर कोणताही एक वर्णनात्मक निबंध लिहा .
माझ्या मराठी वर्गाच्या आठवणी किंवा प्रथम सत्र परीक्षेसाठी मी केलेली तयारी

माझे आदर्श गाव मराठी वर्णनात्मक निबंध -

महाराष्ट्रातील अनेक छोट्या गावांसारखाच एक गाव – खेडग े ाव. गाव कसले काही कुटुंबांची एक
छोटीशी वस्ती. जेमतेम ६०-६५ कुटुंबे येथे एकमेकांच्या आधाराने राहतात. त्यांच्या शब्दांत
सांगायचे तर ‘६५ उं बरा’ असलेली वस्ती. कंु डलवाडी हे गावाचे नाव. पण आता या गावाला सगळे
ओळखतात ते ‘लहूंबाईचं गाव’ म्हणन ू च. येथे साधारण तीनशे-साडेतीनशे लोकांची वस्ती असेल.
दोन हजार सालापर्वी
ू या गावाचा मख ु डा इतर गावांसारखाच होता. आजार, अंधश्रद्धा,
अशिक्षितपणा यांचे येथे साम्राज्य होते. भांडणे, वादावादी यांना महापरू आला होता. सगळीकडे
अस्वच्छता होती. कुठे ही संडासाची सोय नव्हती. त्यामळ ु े नाकावर फडके धरल्याशिवाय येथे येणे
कोणालाही शक्य नव्हते. काड्याकाटक्यांच्या जळणावर चल ु ी पेटत, त्यामळ
ु े दप
ु ारी व रात्री
सगळीकडे धरु ाचे साम्राज्य असे.

या गावाच्या रूपात अचानक बदल कसा झाला? हा बदल एकदम झाला नाही, हळूहळूच झाला.
त्याचे श्रेय जाते ते लक्ष्मीबाईकडे म्हणजे गावाच्या लहूंबाईकडे. लक्ष्मीबाईयेथील येथील
माहे रवाशीण आणि येथील सासरु वाशीणही. त्यामळ ु े येथील परिस्थिती, लोकांच्या सवयी तिला
अचक ू माहीत होत्या. त्यात तिला तिच्या दोन्ही घरांकडून पाठबळ मिळाले.

लहूंबाईंनी सगळ्या बायकांना एकत्र केले. घरटी एक माणस ू असा ६० माणसांचा गट तयार केला व
श्रमदानाला सरुु वात केली. प्रत्येकाने आपले घर, अंगण, स्वच्छ नीटनेटके ठे वायचे. गाडगेबाबा स्वच्छता
अभियानाचे बक्षीस मिळवायचेच अशी सर्वांनी जिद्द ठे वली. प्रथम तालक ु ा स्तरावरील पंचवीस हजाराचे
बक्षीस मिळाले. त्यामळु े सर्वांचा उत्साह वाढला. लहूंबाईंनी ही रक्कम ‘यशवंत ग्रामसमद्ृ धी योजनेत ‘
टाकली. मग शेतीसाठी पाणी मिळावे म्हणन ू १.५ लाख रुपये मंजरू करून घेतले. हे पैसे व गावकऱ्यांचे
श्रमदान यातन ू नदीला, ओढ्याला बंधारे घातले. त्यातन ू १५ लाख रुपये मिळाले. ‘शेतीसाठी पाणी’ ही
योजना मंजरू झाली. त्यामळ ु े सगळ्यांची जमीन ओलिताखाली आली.

मग लहूंबाईने जिद्दीने गावाला हगणदारीमक् ु त केले. ‘घर तिथं शौचालय बांधण्यात आले.
सांडपाण्यासाठी गटारे बांधली. त्या सांडपाण्यावर गावात चार परसबागा लावण्यात आल्या. या बागांमध्ये
केळी, चिकू इत्यादी फळे , विविध फुलझाडे फुलू लागली. घर तिथे गोबरगॅस योजना राबवली. वाया
जाणाऱ्या शेण-कचऱ्याचा उपयोग होऊ लागला. जंगलतोड थांबली. गावाचा परिसर निर्मळ झाला.
रोगराई पळून गेली. राष्ट्रपतींनी गौरव केला. अनेक मोठ्या लोकांनी या गावाला भेटी दिल्या.

“आता येथे शाळा आहे , सभागह


ृ आहे . प्रार्थनामंदिर आहे . सावकारीला, दारूला बंदी आहे . सगळे जण
एकजट
ु ीने राहतात आणि लहूंबाईला गौरवतात आणि विकासाच्या पथावर पावले टाकतात.”

माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय प्रसंग

माझ्या छोट्याश्या आयष्ु यात, एक असा प्रसंग आला, ज्याची गोड आठवण मला नेहमी आनंददायी
ठे वते.आमच्या शहरातील सर्व शाळांसाठी ‘आंतर-विद्यालयीन वादविवाद स्पर्धा’ आयोजित करण्यात
आली होती. आमच्या शाळे तच स्पर्धा होणार होती. विषय असा होता: ‘परु ु ष स्त्रियांपेक्षा अधिक हुशार
असतात’. मी माझ्या शाळे तल्या अनेक विद्यार्थ्यांसह त्यात भाग घेतला.
स्पर्धेसाठी अर्ज भरल्यानंतर मी या विषयाची तयारी सरू ु केली. स्पर्धेचा दिवस जसजसा जवळ येत होता
तसतसे आनंदाने माझे हृदयाचे ठोके वाढत होते. मी परिपर्ण ू तयारी केली होती, परं तु बोलताना माझे मन
ठप्प तर होणार नाही असे माझ्या मनात येत असे.
स्पर्धेच्या दिवशी शाळे चे सभागह ृ प्रेक्षकांनी भरलेले होते. स्पर्धेत मल
ु ी जास्त होत्या. परीक्षक हे दोन
प्रसिद्ध मराठी कथाकार होते. स्पर्धा योग्य वेळी सरु ु झाली. प्रथम एक मल ु गा स्पर्धेच्या विषयाच्या
बाजन ू े बोलला. स्त्रियांपेक्षा परु
ु ष जास्त बद् ु धिमान असतात हे सिद्ध करण्याचा त्याने प्रत्येक मार्गाने
प्रयत्न केला. मग एका मल ु ीची पाळी आली. तिने इतिहासाची आणि पौराणिक कथांची पाने उघडी केली.
सावित्री, द्रौपदी, राणी लक्ष्मीबाई, चांदबीबी, इंदिरा गांधी इत्यादी प्रसिद्ध महिलांच्या जीवनाची उदाहरणे
दे ऊन त्यांनी स्त्रियांची बद्
ु धिमत्ता आणि हुशारपणाचे असे वर्णन केले की सगळे स्तब्ध झाले. मग अजन ू
दोन वक्ते आले. पाचवे नाव माझे होते. जेव्हा माझे नाव पक ु ारले गेले, तेव्हा माझे शरीर थरथर कापले.
कसेबसे धाडस करत मी स्टे जवर गेलो आणि बोलू लागलो.
मी साहित्य, संस्कृती, कला, विज्ञान, संगीत इत्यादी सर्व विषयांमध्ये परु ु षांच्या बद्
ु धिमत्तेचे पर्ण
ू समर्थन
केले. मी ठामपणे सिद्ध केले की ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासामध्ये परु ु षांची मजल महिलांच्या
तल ु नेत बर्‍
याच वेळा जास्त आहे . मी बोलत राहिलो आणि टाळ्या वाजल्या. खरोखर, तो माझ्या
आयष्ु यातील सर्वात महत्वाचा क्षण होता. हृदय धडधडत होतं, पण मन मात्र नाचत होतं.
उर्वरित स्पर्धक माझ्या नंतर बोलले. सम ु ारे पाच मिनिटांनंतर स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यशस्वी
वक्त्यांमध्ये माझे नाव पहिले होते. शिक्षक आणि वर्गमित्रांनी माझे अभिनंदन केले. विजेत्याचे
पारितोषक माझ्या शाळे ला दे ण्यात आले आणि मला प्रथम परु स्कार दे ण्यात आला. माझ्या मनाला काय
म्हणावं अस झाल होतं? यानंतर माझ्या आयष्ु यात असे अनेक अविस्मरणीय प्रसंग आले, पण त्या
दिवसाचा आनंद माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला.

You might also like