You are on page 1of 13

!! सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र !!

(घेतला वसा दर्ग


ु संवर्धन चळवळीचा)

गडकोट म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या व
आपल्या बापजाद्यानी गाजविलेल्या अतल ु नीय पराक्रमाचा वारसा सांगणारी शिल्पे. हे गडकोट
आपल्या महाराष्ट्राचा आत्मा आहेत. ह्या गडकोटांसाठी महाराजांनी व मावळ्यांनी वेळप्रसंगी रक्त
सांडवून हे गडकोट राखले आहेत. महाराज हे गडकोट अगदी प्राणांच्या पलीकडे जपत होते. “सह्याद्री
प्रतिष्ठान” हि संस्था महाराजांच्या ह्याच विचारावर गडकोटांच्या संवर्धन कार्यासाठी सदैव कटिबद्ध
आहे. आज संस्थेच्या माध्यमातून हे दुर्गसंवर्धन कार्य अविरत अन अहोरात्र सरुु आहे. यासाठी
संस्थेचा प्रत्येक दुर्गसेवक वचनबद्ध आहे.

1
!! सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र !!
सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेल्या गडकोटांच्या संवर्धन कार्याचा वारसा पुढे घेऊन
मार्गक्रमण करणारी संस्था आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात संस्थेच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याची अतुलनीय गाथा सांगणाऱ्या
गडकोटांचे संवर्धन कार्य अविरत सुरु आहे. हे कार्य यापुढेही असेच अविरत सुरु असेल. आपला अतुलनीय अनमोल ऐतिहासिक वारसा
असाच आपल्या पुढच्या पिढ् यांना दाखवता यावा यासाठी असलेला हा अट्टाहास. अन हा वारसा टिकवून ठेवण्यासाठी आपलाही
हातभार असावा म्हणूण संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक दुर्गसेवक या कार्यासाठी सदैव कटिबद्ध आहे.

छत्रपती शिवराय त्यांच्या विचारातून आणि कार्यातून आजही जिवंत आहेत, पण आज एकाच गोष्टीचे वाईट वाटते कि इथल्या
प्रत्येक माणसाची मने मेलल े ी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे प्रत्येक मरगळलेल्या माणसाला नेहमीच प्रेरणा देत आहे
आणि यापुढेही राहील. त्याच विचारांवर त्यांची प्रेरणा घेऊन सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र वर्षभर छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य
घरोघर पोहचविण्याचे काम करत आहे. यामध्ये आपणही सहभागी व्हा.

ु असलेले कार्य !!
!! सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून सरु
1) दुर्गसंवर्धन मोहीम – छत्रपती शिवाजी महाराज व आपले बापजादे यांनी वेळप्रसंगी आपले प्राण जोखमीत घालून हे
गडकोट राखलेत. ह्याच पवित्र गडकोटांच्या साथीने महाराजांनी अठरापगड जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन हे हिंदवी
स्वराज्य उभारलं. त्याच हिंदवी स्वराज्याच्या अतुलनीय पराक्रमाचा वारसा सांगणारे गडकोट आपल्या पुढच्या पिढ् यांना
अभ्यासण्यासाठी जिवंत ठेवायचे असतील तर मग मात्र त्यांचे संवर्धन हे आपल्यालाच करावे लागणार आहे. ह्याच पवित्र
गडकोटांची पराक्रमी माती सदैव आपल्याला त्या अतुलनीय पराक्रमाची प्रेरणा देणार आहे. म्हणूनच ह्या सर्व गडकोटांचे
संवर्धन करणे हे आपणा सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. ह्या दुर्गसंवर्धन कार्यासाठी आम्ही सह्याद्रीचे दुर्गसेवक गेली १२ वर्ष हे
कार्य अगदी अविरतपणे व अव्याहतपणे हे दुर्गसंवर्धन कार्य करत आहोत. इतकंच नव्हे तर आम्ही सह्याद्रीचे दुर्गसेवक हे करत
असलेलं दुर्गसंवर्धन कार्य आमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील प्रत्येक गावात पोहचविण्यासाठी सज्ज आहोत. आजवर
संस्थेच्या माध्यमातून ९०० हून अधिक दुर्गसंवर्धन मोहीम महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांवर राबविण्यात आलेल्या आहे. ह्या
दुर्गसंवर्धन कार्यात गडावरील पाण्याच्या टाक्यांमधील गाळ, माती काढणे, गडावरील प्रवेशद्वार यांमधील असलेले दगड,
माती बाजूला करणे, तटबंदीवर असणारी अनावश्यक झुडपे काढू न टाकणे. संस्थेच्या माध्यमातून हे सर्व कार्य भारतीय
पुरातत्व सर्वेक्षण विभाग, राज्य पुरातत्व विभाग, वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहोत.

2) दुर्गदर्शन मोहीम – संस्थेच्या माध्यमातून आजवर १७०० हून अधिक दुर्गदर्शन मोहिमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मोहिमेचा प्रमुख उद्देश म्हणजे देशातील वेगवेगळ्या राज्यातील गडकोट यांचा अभ्यास करणे, या गडकोटांची बांधणी
पद्धत, संरक्षणदृष्ट् या असलेलं महत्व, या गडकोटांची दुर्गमता हि सर्व वैशिष्ट् ये यांचाही अभ्यास करण्यात येत आहे. तसेच सर्व
गडकोटांची छायाचित्र घेऊन भविष्यात त्या छायाचित्रांच्या माध्यमातून संस्थेच्या इतर सदस्यांना त्याचा अभ्यास करता यावा
हाही एक मुख्य उद्देश आहे. सदर सर्व अभ्यास मोहीम ह्या संस्थेचे संस्थापक श्री. श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या
मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. आजवर राबविण्यात आलेल्या या दुर्गदर्शन मोहिमेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश,
गुजरात, राजस्थान, बिहार, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू , केरळ या राज्यात असणाऱ्या गडकोटांचा अभ्यासपूर्ण
दौरा यशस्वीपणे पूर्ण करण्यात आलेला आहे.

3) शिवरथ यात्रा – काय आहे शिवरथ यात्रा ??? तर शिवरथ यात्रा म्हणजे देशातील मानाचा पहिला पालखी सोहळा.

2
अखंड महाराष्ट्राला अनेक वर्षाच्या गुलागिरीच्या जोखडातून मुक्त करून येथील शेतकऱ्यालाचा आपल्या स्वतःच्या
संरक्षणासाठी शेताच्या बांधावर हातात शस्त्र देऊन खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य म्हणजेच हिंदवी स्वराज्याची स्थापना
करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पालखी सोहळा. आज आपल्या देशात आषाढ महिन्यात आळं दी ते पंढरपूर, देहू ते
पंढरपूर, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, सासवड ते पंढरपूर, मुक्ताईनगर जळगाव ते पंढरपूर, पैठण ते पंढरपूर, शेगाव ते पंढरपूर,
नांदडे ते पंढरपूर अशा अनेक संतांच्या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून वारी सोहळ्याचे आयोजन केले जाते. ह्या वारी
सोहळ्याच्या माध्यमातून लाखो भाविक अखंड नामाचा गजर करत पंढरपूर ला अखंड महाराष्ट्राचे दैवत असलेल्या विठोबा
रखुमाई च्या दर्शनासाठी जात असतात. तसेच कार्तिक महिन्यात संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांचे समाधीस्थळ आळं दी
याठिकाणी महाराष्ट्रातून अनेक गावातून भाविक वारी सोहळ्याचे आयोजन करत असतात, तसेच देहू येथे जगदगुरू श्री.
तुकाराम महाराज यांच्याही दर्शनासाठी वारी सोहळ्याचे आयोजन होत असते. हाच उद्देश मनात ठेऊन मोगली सत्तांच्या
गुलागिरीच्या जोखडातून रयतेची मुक्तता करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हि पालखी सोहळा असावा या उद्देशातून
ह्या शिवरथ यात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या माध्यमातून सन २०११ पासून सुरु करण्यात आला. तसेच ह्या
पालखी सोहळ्याचा महत्वाचा उद्देश म्हणजे संस्थेच्या माध्यामतून सुरु असलेले दुर्गसंवर्धन कार्य व त्या माध्यमातून सुरु
केलेली दर्ग ु संवर्धन चळवळ हि गावोगावी पोहचावी व त्या चळवळीत लोकसहभाग वाढावा. ह्या दर्ग ु संवर्धन कार्यासाठी
समाजातील तरुणाई सहभागी व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा पालखी सोहळा शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी ते
दर्ग ु श्वर किल्ले रायगड असा आयोजित केला जातो. या पालखी सोहळ्यादरम्यान अनेक शिवप्रभूंच्या इतिहासाची
ु दर्गे
व्याख्याने, शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, शाहिरी पोवाडे, संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या दुर्गसंवर्धन कार्याची
माहिती या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत.े ह्या पालखी सोहळ्याचे आयोजन दरवर्षी दिनांक ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी
दरम्यान करण्यात येत.े राज्यातील संस्थेच्या माध्यमातून काम करणारे सह्याद्रीचे दुर्गसेवक ह्या पालखी सोहळ्यात सहभागी
होत असतात.

“संपूर्ण राज्याचे सार ते दर्ग


ु ”
अखंड हिंदुस्थानच्या रक्षणासाठी धावले ते आमचे बापजादे मराठेच.... अन ह्या आमच्या ह्या बापजाद्यांच्या अतुलनीय
पराक्रमाची गाथा सांगणारे अन आपल्या पराक्रमी इतिहासाची महती आजही टिकवून ठेवणारे हे गडकोट...
सह्याद्रीच्या कुठल्याही शिखरावर उभं राहून सभोवार नजर जरी फिरवली तर दर चार-दोन शिखरांआड एखादं शिखर
तटाबुरुजांचं शेला-पागोटं चढवून उभं राहिलेलं आढळतं.... आज ह्या दर्गां
ु मधील बहुतक े दर्गां
ु नी छत्रपती शिवाजी महाराजांची
पायधूळ आपल्या मस्तकी धरण केलेली आहे. पवित्र अशा शिवस्पर्शानं पावन झालेली हि महाराष्ट्राची धारातीर्थे आहेत. ह्या सर्व
धारातीर्थांची संवर्धनाची जबाबदारी आपलीच आहे. आपणच सर्वजण ह्या सर्व धारतीर्थ असणाऱ्या गडकोटांचे वारसदार आहोत.
आपणही ह्या पवित्र दुर्गसंवर्धन कार्यात सहभागी होऊ शकता.
सहभागी होण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करावा.
संपर्क क्रमांक – ९७७३६९४८७७, ९६८९०१७७३३, ७३८७४९४५००

4) मिशन ३०० - “संकल्प स्वराज्यसिद्दीचा”


या संकल्पनेच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेल्या स्वराज्याची शपथ दिनाचे औचित्य साधून दिनांक
३० मार्च २०१६ रोजी या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. ज्या गडकोटांच्या साथीने महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य
स्थापन करण्याची शपथ ज्या रायरे श्वराच्या साक्षीने घेतली त्याच रायरे श्वर किल्ल्याला साक्ष ठेवून या मोहिमेच्या अंतर्गत
महाराष्ट्रातील ३०० किल्ल्यांवर भगवा ध्वज व सफाई मोहीम प्रतिष्ठान च्या माध्यामतून राबविण्यात आली होती. या
मोहिमेत मोहीम घेतलेल्या प्रत्येक गडावर स्वच्छता मोहीम राबवून त्याठिकाणी असणारा सर्व कचरा जमा करून तो सर्व
कचरा योग्य ठिकाणी नष्ट करण्यात आला. तसेच सायंकाळी ठीक ४ वाजता मोहीम घेतलेल्या प्रत्येक गडावर भगवा ध्वज
फडकविण्यात आला. या मोहिमेत एकूण १३५० सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या मोहिमेची
लिम्का बुक ऑफ रे कॉर्ड या राष्ट्रीय रे कॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.

3
5) एक हात मदतीचा – “ज्या मातीतून आपण जन्माला येतो, ज्या समाजात आपण राहतो, त्या मातीशी अन समाजाशी
आपली सामाजिक बांधिलकी असते. त्या समाजाचे, मातीचे आपल्यावर ऋण असतात. प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गसंवर्धन
चळवळीचे कार्य करत असताना सामाजिक बांधिलकीची जाणीव जपत समाजातील अतिशय दर्ल ु क्षित व गरजू कुटुबं ाना,
तसेच गडकोटांच्या पायथ्याशी असलेल्या अतिशय दुर्गम भागातील विद्यार्थी, नागरिक यांना संस्थेच्या माध्यमातून आजवर
हजारो कुटुब
ं ांना शालेय साहित्य, गणवेश, जिवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, कपडे, दिवाळी सणासाठी लागणारे साहित्य
वाटप करण्यात आले आहे. तसेच सन २०१९ च्या पावसाळ्यात कोल्हापूर सातारा सांगली याठिकाणी आलेल्या महापुरात
अडकलेल्या बांधवांसाठी संस्थेच्या माध्यमातून मदतकार्य करण्यात आले. तसेच रोजच्या वापरासाठी लागणाऱ्या वस्तू,
धान्य, कपडे इत्यादी वस्तूंचे वाटपही करण्यात आले.

6) शौर्या तुला वंदितो – आपण ज्या देशात राष्ट्रात राहतो, त्या राष्ट्राच्या देशाच्या सीमा ह्या संरक्षित नसतील तर आपण आपलं
जीवन सुखाने जगू शकत नाही. हाच उद्देश डोळ्यासमोर “शौर्या तुला वंदितो” ह्या उपक्रमाची सुरवात करण्यात आली.
म्हणूनच राष्ट्राच्या संरक्षणासाठी सदैव तैनात असलेले जवान म्हणजे राष्ट्राचे प्रमुख आधारस्तंभ. त्यांच्या या कार्याच्या प्रती
कृतज्ञता म्हणून, तसेच सन १९६५ चे भारत पाकिस्तान युद्ध, सन १९७१ चे पाकिस्तान विरूद्धचे युद्ध, सन १९९९ चे
कारगिल युद्ध. या युद्धात शौर्य गाजवून नीच वृत्तीच्या पाकिस्तान सारख्या देशाला नामोहरम करणाऱ्या भारतमातेच्या वीर
जवानांचा ऐतिहासिक कृतज्ञता सन्मान म्हणून शौर्या तुला वंदितो या कृतज्ञता सन्मान सोहळ्याचे आयोजन संस्थेच्या
माध्यमातून करण्यात येत असते. तसेच देशाच्या अंतर्गत संरक्षणासाठी असलेल्या, तसेच नक्षलवादविरोधी सदैव लढणाऱ्या
पोलीस अधिकारी व जवानांचा सन्मान ह्या सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. इतकंच नाही तर वीरमाता,
वीरपत्नी यांचाही सन्मान ह्या ऐतिहासिक कृतज्ञता सन्मान सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आला आहे. याच बरोबर
प्रत्यक्ष युद्धभूमीवर घडलेले प्रसंग प्रत्यक्ष त्या जवानांच्या तोंडू न ऐकण्याचं सद्भाग्य आम्हा सर्व सह्याद्रीच्या दर्ग
ु सेवकांना ह्या
ऐतिहासिक कृतज्ञता सन्मान सोहळा म्हणजेच शौर्या तुला वंदितो च्या माध्यमातून ऐकण्यास मिळत असते.

7) जागर दुर्ग इतिहासाचा - गडकोट हे आपल्या राष्ट्राचा आत्मा आहेत. आज इतिहासातून हे गडकोट इतिहासातून बाजूला
केले तर आपल्या इतिहासाला कसलाही अर्थच राहणार नाही. आजही कित्येक गडकोट पाहण्यास गेले असता अनेक
ऐतिहासिक वास्तू आपल्याला समजतही नाही. करण त्यांच्याजवळ त्यांची माहिती अथवा त्या वास्तूचे नाव नसते. हा सगळा
अभ्यास करून संस्थेच्या माध्यामतून “जागर दुर्ग इतिहासाचा” या उपक्रमाची सुरवात करण्यात आली. या उपक्रमाच्या
अंतर्गत महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यावर प्रतिष्ठान च्या माध्यामतून किल्ल्यावर ऐतिहासिक माहिती फलक, सूचना फलक,
किल्ल्याकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक, किल्यावर असणाऱ्या ऐतिहासिक वास्तूंसाठी स्थळ दर्शक फलक लावण्यात
आले आहेत. तसेच या मोहिमांच्या माध्यामतून राज्यातील किमान १०० हून अधिक किल्ल्यांवर अशा मोहीम राबविण्याचा
प्रतिष्ठान चा मानस आहे.

8) स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले तुंग – राज्यातील गडकोटांवर दर्ग ु संवर्धन कार्य करत असताना या अतुलनीय
पराक्रमाचा वारसा सांगणाऱ्या ह्या गडांना दरवाजा असण म्हणजे गडकोट हे अगदी रुबाबात आपला वारसा सांगत आहे हे
येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला. अन मग सुरवात झाली “स्वराज्याचे प्रवेशद्वार” ह्या उपक्रमाची . अन पहिला दरवाजा
बसविण्याचं ठरलं ते पवन मावळ चा मानबिंदू अन शिवकाळात तुंगारण्यावर देखरे ख ठेवणारा सह्याद्रीचा एक महत्वाचा
शिलेदार म्हणून असणाऱ्या किल्ले तुंग उर्फ कठीणगडाला. अगदी नावाप्रमाणेच हा कठीण असा गड. चांगल्या चांगल्याचा दम
जिरवणारा. सोशल मीडियाच्या माध्यामतून निधी संकलनासाठी आवाहन करण्यात आल. ह्या उपक्रमाला लोकसहभागातून
अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. अन दरवाजा बसविण्याचा मुहूर्तही ठरला तो दसरा म्हणजेच विजयादशमीचा. दिनांक ३०
सप्टेंबर २०१७ रोजी विजयादशमी म्हणजे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या गडावर महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग यांच्या
मार्गदर्शनाखाली तुंग गडाच्या प्रवेशद्वाराला लाकडी सागवानी कवाड बसवून अनेक मान्यवर व सह्याद्रीचे दुर्गसेवक यांच्या
उपस्थितीत त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. शिवकाळा नंतर कोणत्याही संस्थेच्या माध्यामतून गडास दरवाजा
बसविण्याची हि इतिहासातील पहिलीच वेळ होती.

4
9) स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले तिकोणा – “स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून दुसरा दरवाजा
बसविण्याचा मान मिळाला तो पवन मावळचा दुसरा मानबिंदू म्हणून असलेल्या किल्ले तिकोणा उर्फ वितंडगडाला.
शिवकाळातील अनेक ऐतहासिक घडामोडींची साक्ष देणारा हा किल्ले तिकोणा. किल्ला अगदी रुबाबात उभं राहिलेल्या
पहारे कऱ्यासारखा. कणखर असलेल्या या किल्ल्याच्या बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराला
दिनांक ८ जून २०१८ रोजी लोकसहभागातून निधी उभारून लाकडी सागवानी कवाड बसविण्यात येऊन त्याचा लोकार्पण
सोहळा अनेक मान्यवर व सह्याद्रीचे दुर्गसेवक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

10) स्वराज्याचा तोफगाडा – किल्ले सिंहगड – “स्वराज्याचा तोफागडा” या उपक्रमाच्या माध्यामतून पहिला मान मिळाला
तो किल्ले सिंहगडावरील तोफेला. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा, छत्रपती राजाराम महाराजांची
समाधी असलेली पावन भूमी, अन सरदार नावजी बलकवडे यांच्याही पराक्रमाची साक्ष देणारा, तसेच अनेक ऐतिहासिक
घडामोडींचा राखणदार अन पुणक े रांचा सगळ्यात आवडता किल्ला म्हणून किल्ले सिंहगडकडे पहिले जाते. या किल्ल्यावर
असणारी एक साधारणपणे २टन वजनाची तोफ अशीच मातीवर धूळ खात पडू न होती. राज्य पुरातत्व विभागाकडे वारं वार
पाठपुरावा करूनही त्यांच्याकडू न कसलाही प्रतिसाद न मिळाल्याने प्रतिष्ठान च्या माध्यामतून लोकसहभागातून निधी उभा
करून त्या तोफेसाठी एक लाकडी सागवानी तोफगाडा दिनांक १८ जून २०१८ रोजी बसवून तो राज्य पुरातत्व यांना दान
करण्यात आला व त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आला.

11) किल्ले लोह्गड तोफसंवर्धन मोहीम – किल्ले लोहगड या ठिकाणी अनेक तोफा अशाच बेवारस पडू न असल्याचे
प्रतिष्ठानचे पदाधिकारी यांच्या लक्षात आले. शिवाय त्यापैकी काही तोफांवर एक अवाढव्य दगड पडलेला आहे. त्यामुळे
तोफांना नुकसान होऊ शकते हि बाबा लक्षात आल्यावर यावर तत्काळ कार्यवाही करत केंद्रीय पुरातत्व विभाग यांच्या
परवानगीने या तोफा सर्व एका ठिकाणी ठेवण्याचे ठरले. तसेच ज्या तोफांवर जो दगड पडला होता तोही हलविण्यात आला.
यासाठी अनेक दुर्गसेवक उपस्थित होते.

12) स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले गोरखगड – “स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून तिसरा दरवाजा
बसविण्याचा मान मिळाला तो बुलंद असलेल्या गोरखगडला. कल्याण नाणेघाट जुन्नर ते प्रतिष्ठान (पैठण) या सातवाहन
कालीन व्यापारी मार्गावर देखरे ख ठेवणारा, तसेच नवनाथ संप्रदायातील गोरक्षनाथ यांच्या साधनेचे ठिकाण असलेला हा
किल्ले गोरखगड. या गडावरील प्रवेशद्वारास लाकडी सागवानी कवाड दिनांक १८ ऑक्टोबर २०१८ रोजी विजयादशमी
म्हणजेच दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर स्वराज्यासाठी लोकार्पण करण्यात आले. या दरवाजासाठी आलेला सर्व खर्च हा
लोकसहभागातून निधी उभारून करण्यात आला आहे.

13) कायमस्वरूपी राष्ट्रध्वज तिरं गा लावणे – किल्ले जंजिरा – छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्श न झालेला
एकमेव अपवित्र किल्ला, नरवीर कोंडाजी फर्जंद यांच्या रक्ताने अभिषेक झालेली हि भूमी, स्वतंत्र हिंदुस्थानचा भाग असूनही
ु थानचे अस्तित्व नाकारणारा हा किल्ले जंजिरा. पर्यटन क्षेत्रात मात्र ह्या किल्ल्याला यात्रेचे स्वरूप असते. म्हणूनच इथं
हिंदस्
येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या अन प्रत्येक पर्यटकाच्या मनात कायम राष्ट्रप्रेमाची भावना तेवत राहावी म्हणून या ठिकाणी
आपल्या हिंदस् ु थानचा राष्ट्रध्वज कायमस्वरूपी फडकत राहावा यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यामतून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण
विभाग मुंबई कार्यालय यांचक े डे प्रयत्न सुरु झाले. हे प्रयत्न सुरु असताना याला पाठींबा म्हणून महाराष्ट्रातील
लोकप्रतिनिधी, सन्माननीय व्यक्ती, संस्था, मंडळे यांचे पाठपुरावा पत्र घेण्यास सुरवात केली. हि सर्व पाठपुरावा पत्र भारतीय
पुरातत्व सर्वेक्षण विभाग मुंबई कार्यालय यांच्याकडे देण्यात आली. त्यास अनुकूल प्रतिसाद देत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण
विभाग यांनी कायमस्वरूपी राष्ट्रध्वज तिरं गा यास परवानगी दिली. त्यानंतर दिनांक २८ ऑक्टोबर २०१८ रोजी मोठ् या
दिमाखदार सोहळ्यात कायमस्वरूपी राष्ट्रध्वज तिरं गा किल्ले जंजिरा त्याठिकाणी फडकविण्यात आला.

14) स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले कर्नाळा - “स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून चौथा दरवाजा
बसविण्याचा मान मिळाला तो अगदी आभाळाला भिडणाऱ्या किल्ले कर्नाळाला. मुंबई गोवा हायवे पासून हाकेच्या अंतरावर
उभा असलेला अन शिवकाळातील अनेक घडामोडींची साक्ष देणारा हा किल्ले कर्नाळा. ह्या किल्ल्यावरील प्रवेशद्वारास लाकडी
सागवानी कवाड लोकसहभागातून निधी उभारून बसविण्यात आले. दिनांक २५ नोव्हेंबर २०१८ रोजी हा लोकार्पण सोहळा

5
आयोजित करण्यात आला.

15) स्वराज्याचा तोफगाडा – किल्ले कुलाबा – “स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यामतून दस ु रा मान मिळाला
तो सिंधूसागरातील आरमाराची राजधानी असलेल्या किल्ले कुलाबा येथील तोफांना. सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या
अतुलनीय पराक्रमाची साक्ष देणारी हि पवित्र भूमी म्हणजेच किल्ले कुलाबा. या किल्यावर अशाच धूळ खात पडलेल्या तोफांचे
संवर्धन व्हावे तसेच त्या दिर्घकाळ टिकाव्यात म्हणून प्रतिष्ठान च्या माध्यामतून अन लोकसहभागातून निधी उभारून
सागवानी तोफगाडे बसविण्यात आले. या किल्ल्यावरील एकूण ३ तोफांना तोफगाडे बसविण्यात आले. दिनांक २० जानेवारी
२०१९ रोजी हा लोकार्पण सोहळा करण्यात आला.

16) स्वराज्याचा तोफगाडा – किल्ले कोथळीगड – “स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यामतून तिसरा मान
मिळाला तो कोथळीगडावरील तोफेला. कर्जत तालुक्यातील असणारा हा दर्ग ु , येथे एक तोफ अनेक वर्षापासून अशीच धूळ
खात पडू न होती. तिचे संवर्धन व्हावे, तसेच ती दिर्घकाळ टिकावी यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने लोकसहभागातून निधी उभा
करून दिनांक १७ फेब्रुवारी २०१९ रोजी तोफगाडा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

17) स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले तोरणा – “स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून पाचवा दरवाजा
बसविण्याचा मान मिळाला स्वराज्याचे तोरण म्हणून ज्या किल्ल्यावर पहिल्यांदा भगवा ध्वज उभारला गेला. जो किल्ला
महाराजांनी पहिल्यांदा जिंकला आणि हिंदवी स्वराज्याची घोडदौड सुरु झाली. असा हा सगळ्यांचा लाडका किल्ला म्हणजेच
तोरणा उर्फ प्रचंडगड या गडावरील महादरवाजाला. स्वराज्याचं तोरण म्हणून प्रख्यात असलेल्या या किल्ल्याला प्रतिष्ठान
च्या वतीने लोकसहभागातून निधी उभारून गडाच्या बिन्नी दरवाजाला सागवानी लाकडी प्रवेशद्वार बसविण्यात आले आहे.
दिनांक ३१ मार्च २०१९ रोजी हा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

18) राजगड राजसदर मोहीम – किल्ले राजगड येथे महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या वतीने पद्मावती माचीवर
असणाऱ्या राजसदरे चे काम पुन्हा करण्यात आले होते. परं तु यासाठी वापरण्यात आलेल्या लाकडांना तडे गेले होते. ते अजून
खरब होऊ नये म्हणून राज्य पुरातत्व विभ्हागाचे सहाय्यक संचालक श्री. विलास वहाने यांच्या मार्गदर्शनाखाली
प्रतिष्ठानच्या माध्यामतून मोहीम राबविण्यात येत आहेत. या मोहिमेच्या दरम्यान तेथील तडे गेलल्े या लाकडांन पॉलिश
पेपरने घासून त्यात फेविकॉल व भुसा यांचे मिश्रण भरून त्यास पुन्हा वाळवी लागू नये म्हणून केमिकल चा थर लावून पुन्हा
त्यास पॉलिश लावण्यात आले आहे. यासाठी प्रतिष्ठान च्या वतीने आतापर्यंत ५ मोहीम राबविल्या आहेत.

19) किल्ले कोथळीगड तोफ संवर्धन मोहीम – कर्जत जवळ असणाऱ्या कोथळीगड किल्ल्यावर पायथ्याशी असणाऱ्या पेठ
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शोध मोहीम घेतली असता तिथे एका दगडाखाली तोफ आढळू न आली आहे. ती तोफ
बाहेर काढण्यासाठी दिनांक ७ एप्रिल २०१९ रोजी मोहिमेचे आयोजन करण्यात आले. तसेच त्या माध्यामतून तोफेला मोकळा
श्वास देण्यात आला. लवकरच या तोफेलाही तोफगाडा बसविण्यात येणार आहे.

20) स्वराज्याच्या पायऱ्या - किल्ले कण्हेरगड चाळीसगाव – चाळीसगाव जवळ असणारा हा किल्ला. ह्या किल्ल्यावर
जाण्यासाठीचा मार्ग काही सोपा तर काही अवघड असा. या मार्गातील दुसऱ्या टप्प्यात कातळ खडक असल्याने पायऱ्याच
नव्हत्या. हि अडचण लक्षात घेऊन प्रतिष्ठान च्या माध्यमातून या ठिकाणी पायऱ्या करण्याचे ठरले. यासाठी लागणारा सर्व
निधी लोकसहभागातून उभारण्यात आला. दिनांक १४ एप्रिल २०१९ रोजी या दुर्गार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले
होते. ह्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून अनेक सभासद उपस्थित होते.

21) स्वराज्याचा तोफगाडा – किल्ले वेताळवाडी – “स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यामतून चौथा मान
मिळाला तो संभाजीनगर जिल्ह्यातील वेताळवाडी किल्ल्यावरील असलेल्या अतिशय वजन असलेल्या तोफेला. वेताळवाडी ह्या
किल्ल्यावर भव्य अशी दोन टन वजनाची तोफ या ठिकाणी अशीच जमिनीवर पडू न होती. तिची दुरावस्था प्रतिष्ठान च्या
लक्षात येताच त्या तोफेसाठी देशातील पहिलाच युरोपीय पद्धतीचा तोफगाडा बनवून बसविण्याचे ठरले. यासाठी लागणारा
सर्व निधी लोकसहभागातून उभा करण्यात आला. या तोफगाड् याचा दर्गा ु र्पण सोहळा हा दिनांक २८ एप्रिल २०१९ रोजी
करण्यात आला.

6
22) स्वराज्याचा तोफगाडा – किल्ले कोर्लई – “स्वराज्याचा तोफागडा” उपक्रमाच्या माध्यामतून पाचवा मान मिळाला तो
रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टीवरील अन स्वराज्याच्या आरमारातील एक अतिशय महत्वाचा असलेल्या किल्ल्यावरील
तोफांना. ह्या किल्ल्यावर अनेक ऐतिहासिक तोफा अशाच धूळखात पडू न आहेत. त्यापैकी ६ तोफांना प्रतिष्ठानच्या वतीने
सागवानी लाकडाचे तोफगाडे बसविण्यात आले. सदर तोफगाड् यासाठी लोकसहभागातून निधी उभारण्यात आला. महाराष्ट्र
दिन दुर्गदिन दिनांक १ मे २०१९ रोजी चे औचित्य साधत हा दुर्गार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता.

23) स्वराज्याचा तोफागडा – किल्ले औसा लातूर – “स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यामतून सहावा मान
मिळाला तो लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील औसा किल्ल्यावर असणाऱ्या तोफांना. प्रतिष्ठान च्या माध्यमातून
लोकसहभागातून निधी उभारून सागवानी तोफगाडे बसविण्यात आले. त्याचा दुर्गार्पण सोहळा १२ मे २०१९ रोजी आयोजित
करण्यात आला होता.

24) स्वराज्याचा तोफगाडा – किल्ले पद्मदर्ग ु – “स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यामतून सातवा मान मिळाला
तो जंजिऱ्यावरील मुजोर सिद्दीला कायमचा आळा बसावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिती केलेल्या पद्मदुर्ग
किल्ल्यावरील तोफांना. पद्मदुर्ग किल्ल्यावर असणार्या तोफा अशाच बेवारस पडू न होत्या. प्रतिष्ठानच्या लक्षात हि बाब
आल्यावर त्या तोफांना हि तोफगाडे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी लागणारा निधी हा लोकसहभागातून
उभारण्यात आला. हा दुर्गार्पण सोहळा दिनांक २६ मे २०१९ रोजी आयोजित करण्यात आला.

25) स्वराज्याचा तोफगाडा – किल्ले संग्रामदुर्ग – “स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यामतून आठवा मान
मिळाला तो शाहिस्तेखान सारख्या मस्तवाल शत्रूला त्याची औकात दाखवून देणाऱ्या संग्रामदुर्ग किल्ल्यावरील तोफांना.
चाकण शहराच्या मधोमध असलेला पुणे जिल्ह्यातील एक भुईकोट किल्ला. शाहिस्तेखानला दोन महिने झुंजायला लावणारा
हा दुर्ग. ह्या किल्ल्यावरअसणाऱ्या दोन तोफा ह्या सिमेंटच्या चौथऱ्यावर ठेवण्यात आल्या होत्या. त्यासाठी प्रतिष्ठान कडू न दोन
तोफगाडे अर्पण करण्यात आले. ह्यासाठी लागणारा सर्व निधी हा लोकसहभागातून उभारण्यात आला. हा दर्गा ु र्पण सोहळा
दिनांक २ जून २०१९ रोजी आयोजित करण्यात आला.

26) स्वराज्याच्या तोफगाडा – किल्ले कोथळीगड – “स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यामतून नववा मान
मिळाला तो कोथळीगडवरील तोफांना किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या गावकऱ्यांनी दिल्लेल्या माहितीप्रमाणे इतिहासाला
अज्ञात असलेली तोफ प्रतिष्ठानच्या दुर्गसेवकांनी मातीतून बाहेर काढू न व्यवस्थित ठेवली होती. तसेच पायथ्याशी असलेल्या
गावात एक उखळी तोफ होती या दोन्ही तोफांना तोफगाडे प्रतिष्ठान च्या माध्यमातून बसविण्यात आले. यासाठी लागणारा
सर्व निधी हा लोकसहभागातून उभारण्यात आला. हा दुर्गार्पण सोहळा दिनांक ९ जून २०१९ रोजी आयोजित करण्यात आला.

27) स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले सज्जनगड - “स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून सहावा दरवाजा
बसविण्याचा मान मिळाला संत श्री. रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेली हि भूमी असलेल्या किल्ले सज्जनगडला.
ह्या गडावरील महादरवाजास लाकडी प्रवेशद्वार बसविण्यात यावे. हि संकल्पना मांडण्यात आली. त्यासाठी लागणारा सर्व
निधी हा लोकसहभागातून उभारण्यात आला. तसेच येथील प्रवेशद्वारावर छत्रपतींच्या एकेरी नावाचा उल्लेख होता तोही
बदलून त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार असे नामकरण करण्यात आले. या दुर्गार्पण सोहळ्यासाठी छत्रपती
उदयनमहाराज भोसले स्वतः उपस्थित होत. विशेष म्हणजे ह्या सोहळ्यास स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी मालिकेतील
अनाजी पंत यांची भूमिका केलेले श्री. महेश कोकाटे, हिरोजी फर्जंद यांची भूमिका केलेले श्री. रमेश रोकडे, तसेच बाल रामराजे
यांची भूमिका केलेले ओम चंदने हे देखील उपस्थित होते. हा दर्गा
ु र्पण सोहळा दिनांक १५ सप्टेंबर २०१९ रोजी साजरा
करण्यात आला.

28) स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले सरसगड – “स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून अनुक्रमे सातवा व
आठवा दरवाजा बसविण्याचा मान मिळाला रायगड जिल्ह्यातील अष्टविनायक गणपतीचे असलेले पाली अन त्याच परिसरात
असलेल्या सरसगडला. ह्या किल्ल्याच्या दोन्ही प्रवेशद्वाराना सागवानी दरवाजे बसविण्यात आले. आतापर्यंत च्या स्वराज्याचे
प्रवेशद्वार या संकल्पनेत पहिल्यांदाच एकाच वेळी दोन दरवाजे बसवून त्याचा दुर्गार्पण सोहळा आयोजित करण्यात आला
होता. दसरा सणाचे औचित्य साधत दिनांक ८ ऑक्टोबर २०१९ रोजी हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. ह्या वेळी

7
स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत सिद्दी ची भूमिका करणारे श्री. विश्वजित फडते, ज्यांच्या दातृत्वातून हे दरवाजे उभे राहिले ते
उद्योजक श्री. किशोर धारिया, तसेच वनविभागाचे अधिकारी श्री. सुनील लिमये साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

29) स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले सिंहगड – “स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून नववा दरवाजा
बसविण्याचा मान मिळाला तो राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांचा आवडता असलेला, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या रक्ताने
विजयगाथा लिहिलेला, सरदार नावजी बलकवडे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारा, छत्रपती राजाराम महाराज यांची
समाधीभूमी, पुणे जिल्ह्यातील पुणक
े रांचा सगळ्यात आवडत्या असलेल्या सिंहगड. प्रतिष्ठान च्या माध्यमातून
लोकसहभागातून निधी उभारून गडाच्या पुणे दरवाजास सागवानी दरवाजा बसविण्यात आला. हा दुर्गार्पण सोहळा दिनांक
१३ ऑक्टोबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आला होता. ह्या सोहळ्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील पुतळा
बाईसाहेब यांची भूमिका केलेल्या पल्लवी वैद्य, कोंडाजी बाबा फर्जंद यांची भूमिका केलेले आनंद काळे , बहिर्जी नाईक यांची
भूमिका केलेले अजय तापकिरे , सरदार पिलाजीराव जाधवराव यांचे वंशज समीर जाधवराव हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
तसेच किल्ले सिंहगड च्या परिसरातील सर्व मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

30) मराठ्यांचे शस्त्रागार – “शस्त्र दर्शन” - ज्या शस्त्रांनी इतिहास घडविला, जी शस्त्रे हिंदवी स्वराज्याची दौलत राखण्याच्या
कामी आली. त्या ऐतिहासिक सरदार घराण्यांच्या दुर्मिळ ऐतिहासिक शस्त्रांचं “शस्त्र दर्शन” ह्या कार्यक्रमाचे आयोजन
संस्थेच्या संकल्पनेतून अन हिंदवी स्वराज्य महासंघ यांच्या सहकार्यातून पुणे येथील बालगंधर्व कलादालन याठिकाणी २२
नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर २०१९ या कालवधीत करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. डॉ. रवींद्र शिसवे
(सहपोलीस आयुक्त पुण)े , श्री. संजयजी केळकर (आमदार ठाणे विधानसभा), फत्तेशिकस्त मधील सर्व कलाकार व या
उपक्रमात सहभागी झालेली सर्व सरदार घराणी यांचे वंशज उपस्थित होते. या उपक्रमात पुढे दिलेली घराणी व त्यांचे वंशज
सहभागी झाले होते. १) सरदार मेहंदळे २)सरनोबत येसाजी कंक ३) सरदार वरघडे ४) सरदार कोंडे देशमुख ५) पंत अमात्य बावडेकर ६)
राजेशिर्के घराणे ७) सरदार गोदाजीराजे जगताप ८) सरदार मुरारबाजी देशपांडे ९) जहागीरदार बारगळ संस्थान १०) खाडे घराणे ११)
सरसेनापती खंडरे ाव दाभाडे १२) सरदार रामजी पांगरे ा १३) सरदार गंधे घराणे १४) राजे पवार घराणे १५) शिरोळे घराणे १६) सरदार विठ्ठल
शिवदेव विंचूरकर १७) सरसेनापती हंबीरराव मोहिते १८) सरदार सोमजी गरुड घराणे १९) नाईक निंबाळकर घराणे वैराग २०) राजे
जाधवराव घराणे २१) सरदार साबुसिंग पवार २२) बर्गे घराणे २३) सरनोबत गोळे घराणे २४) सरदार मानाजी पायगुडे २५) इब्राहीम खान
गारदी २६) सरदार राऊतराव ढमाले देशमुख

31) जागतिक वारसा सप्ताह – महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग यांचे वतीने दरवर्षी दिनांक १९ नोव्हेंबर ते २५
नोव्हेंबर या कालवधीत जागतिक वारसा सप्ताह चे आयोजन करण्यात येत असते. या उपक्रमाच्या माध्यमातून दिनांक २४
नोव्हेंबर २०१९ रोजी राज्य पुरातत्व विभाग व सह्याद्री प्रतिष्ठान यांचे संयक्त
ु विद्यमाने राज्यातील पुढील किल्ल्यांवर
मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते. किल्ले पूर्णगड – रत्नागिरी, किल्ले शिवडी – मुंबई, किल्ले मच्छिं द्रगड – सांगली, किल्ले
कण्हेरगड – चाळीसगाव, किल्ले माहु ली – शहापूर, किल्ले गोरखगड – मुरबाड, किल्ले अजिंक्यतारा – सातारा, किल्ले विश्रामगड –
अकोले अहमदनगर, किल्ले चंदरे ी – अंबरनाथ ठाणे.

32) शौर्या तुला वंदितो – दिनांक १६ डिसेंबर १९७१ हिंदुस्थानच्या इतिहासातील सर्वोच्च गौरवशाली दिवस. याच दिवशी
भारतीय सेनन े े पाकिस्तानच्या लाहोर येथे आपला राष्ट्रध्वज तिरं गा फडकवत पाकिस्तानी सैन्याचे ९३ हजार जवान बंदी
बनविले होते. याच अतुलनीय विजयाचा उत्सव म्हणून संस्थेच्या माध्यमातून १६ डिसेंबर या दिवशी विजय दिन साजरा
करण्यात येतो. या दिवशी त्या युद्धात प्रत्यक्ष लढलेल्या जवानांचा सन्मान करण्यात आला. ह्यावेळी ह्या कार्यक्रमासाठी
प्रमुख पाहुणे म्हणून चक्रवर्ती सम्राट पृथ्वीराज चौहान यांचे वंशज पद्मश्री श्री. महाराजा रघुवीरसिंह व पद्मश्री श्री. मुरलीकांत
पेटकर उपस्थित होते. ह्या सोहळ्यासाठी महाराष्ट्रातून संस्थेचे अनेक दुर्गसेवक उपस्थित होते.

33) मिशन भगवा – स्वराज्याची राजपताका – मुजोर सिद्दीला अन त्या बेलाग किल्ले जंजिराला कायमचा वचक बसावा
म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः या किल्ले पद्मदुर्गची उभारणी केली. सरत्या २०१९ या वर्षाच्या अखेरीस सूर्य
ग्रहणाच्या मुहूर्तावर सूर्य मावळतीकडे जात असतना हे पवित्र कार्य पूर्ण केले. हा ध्वज उभारण्याचा उद्देश म्हणजे महाराजांनी
स्वतः बांधून घेतलेला किल्ला असल्याने इथे पर्यटक यावेत. तसेच दिनांक ३० मार्च २०१६ रोजी मिशन ३०० च्या वेळी
हिंदस्
ु थानातील एकमेव अपवित्र किल्ला किल्ले जंजिरा जिथे भगव्या ध्वजाचा अपमान झालेला. हा अपमान पुसून
टाकण्यासाठीच तेव्हाच संस्थेचे संस्थापक श्री. श्रमिक गोजमगुंडे यांनी संकल्प केला कि ह्याच जंजिरा किल्ल्याच्या समोर

8
असलेल्या किल्ले पद्मदुर्ग किल्ल्यावर हिंदुस्थानातील सर्वात उं च भगवा ध्वज कायमस्वरूपी उभा करायचा. तो संकल्प
दिनांक २६ डिसेंबर २०१९ रोजी श्री. श्रमिक गोजमगुंडे व सह्याद्रीचे दर्ग
ु सेवक यांच्या साक्षीने हे परमपवित्र कार्य पूर्ण झाले.

34) स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले कोथळीगड – “स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून दहावा दरवाजा
बसविण्याचा मान मिळाला तो रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोथळीगडला. आजवर ह्या गडाने सन २०१९ ह्या
वर्षात दोन दुर्गार्पण सोहळे अनुभवले अन हा तिसरा सोहळा गडावर साजरा होत आहे. राज्यातील एकमेव गड जिथे आजपर्यंत
३ दुर्गार्पण सोहळे साजरे झालेत. गडावरील प्रवेशद्वाराला दरवाजा बसविण्यात आला. दिनांक २९ डिसेंबर २०१९ रोजी त्याचा
दुर्गार्पण सोहळा आयोजित करण्यात आला होता. संस्थेच्या कर्जत विभागाच्या वतीने ह्या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले
होते. ह्यासाठी लागणारा सर्व निधी हा लोकसहभागातून उभारण्यात आला.

35) स्वराज्याचा तोफगाडा – किल्ले उं दरे ी – “स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यमातून दहावा मान मिळाला तो
महाराष्ट्रातील जलदुर्ग किल्ल्यांच्या यादीतील नावाजलेला किल्ला असलेल्या किल्ले उं दरे ी येथील तोफांना. या किल्ल्यावरील
बेवारस पडलेल्या तोफांपक ै ी ३ तोफांना तोफगाडे बसविण्यात आले. हा दुर्गार्पण सोहळा दिनांक ५ जानेवारी २०२० रोजी
आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास प्रमुख उपस्थिती हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व रे गे या चित्रपटांचे
दिग्दर्शक श्री. अभिजित पानसे, महाराष्ट्र वन विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री. सुनील लिमये साहेब यांची होती.

36) स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले हरिहर – “स्वराज्याचे प्रवेशद्वार” या उपक्रमाच्या माध्यामतून अकरावा दरवाजा
बसविण्याचा मान मिळाला नाशिक जिल्ह्यातील अतिशय नावाजलेला अन भटक्या मंडळींच्या आवडीचा किल्ला म्हणजे
हरिहरला. किल्ल्यावर चढायचं म्हणजे वाऱ्याशी स्पर्धा करण्यासारखंच. चढाई अतिशय अवघड असलेल्या ह्या गडावरील
प्रवेशद्वारास दरवाजा दिनांक १२ जानेवारी २०२० रोजी संस्थेच्या नाशिक विभागाच्या वतीने लोकसहभागातून निधी
उभारून बसविण्यात आला.

37) स्वराज्याचा तोफगाडा – किल्ले चावंड – “स्वराज्याचा तोफगाडा” या उपक्रमाच्या माध्यमातून अकरावा मान मिळाला
तो इसवीसन पूर्व काळापासून ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या अन छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या
शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील एकमेव तोफ असलेल्या किल्ले चावंड असलेल्या तोफेला. किल्ले चावंड याठिकाणी
कातळात अनेक वर्ष गाडू न उभी होती. कधी काळी त्याच तोफेला दोर बांधून गावकरी गडावर जात असत. हा ऐतिहासिक
वारसा असाच गाडू न ऊन वारा व पावसाचा मारा घेत मोकळा श्वास घेण्याची वाट पाहत होता. हि तोफ बाहेर काढू न तिला
पुन्हा मानाचे स्थान मिळावे म्हणून सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी स्वतः निधी उभारून त्या तोफेस तोफगाडा बसवत तिला तिचा
सन्मान मिळवून दिला. हा सन्मान सोहळा दिनांक १९ जानेवारी २०२० रोजी फत्तेशिकस्त व फर्जंद चित्रपटांचे दिग्दर्शक श्री.
दिग्पाल लांजक े र, महाराष्ट्राची लोकधारा चे शाहीर श्री. बाळासाहेब काळजे पाटील, चावंड गावचे सरपंच श्री. रामा भालचीम
यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला.

38) सह्याद्रीची यशोगाथा – सह्याद्री प्रतिष्ठान च्या माध्यामतून गेली १२ वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या गडकोटांच्या
सहाय्याने हे हिंदवी स्वराज्य म्हणजेच रयतेचे राज्य स्थापन केले, त्याच गडकोटांच्या संवर्धनासाठी अविरतपणे कार्य करत
आहेत. महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर हि कामे सुरु आहेत. संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेले कार्य, आमच्या दुर्गसेवक
सहकारी यांच्या कष्टाचा लेखाजोखा “सह्याद्रीची यशोगाथा” ह्या कार्यक्रमातून पुण्यातील बालगंधर्व कलादालन येथे दिनांक
८, ९, १० मार्च २०२० या कालावधीत मांडण्यात आला. ह्या कार्यक्रमाचे उद्घाटन हे अभिनेत्री साक्षी चौधरी, संस्थेचे कार्याध्यक्ष
आमदार श्री. संजय केळकर, संस्थेचे संस्थापक श्री. श्रमिक चंद्रशेखर गोजमगुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक ८ मार्च
२०२० रोजी सकाळी १० वाजता झाले. ह्यावेळी संस्थेचे अनेक दर्ग ु सेवक ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

39) गाव तिथं दर्ग


ु सेवक – सह्याद्री प्रतिष्ठान च्या माध्यामतून दर्ग
ु संवर्धन कार्य करत असताना गडकोटांच्या संवर्धनासाठी
मोहीम सुरु असतानाच संस्थेच्या कार्यात हक्काचे दुर्गसेवक असावेत या भावनेतून सुरु केलेला हा उपक्रम. मार्च महिन्याच्या
अखेरीस अखंड जगाला कोरोना महामारी चा विळखा पडला अन सगळं जग थांबलं. त्यामुळं दुर्गसंवर्धन मोहीमही थांबल्या.
सगळे च अगदी घरात बसले. पण थांबणं हा पर्याय नव्हता. म्हणूनच सोशल मिडीयाच्या माध्यमातून “गाव तिथं दुर्गसेवक” हा
उपक्रम राबविण्यास सुरवात केली. हा उपक्रम राबवत असताना राज्यातील ३६ जिल्ह्यांपक ै ी एकूण ३० जिल्ह्यातील ३५० हून

9
अधिक तालुक्यात आज संस्थेचे १० हजारहून अधिक अधिकृत दुर्गसेवक आहेत. हे सगळं शक्य झालं ते सर्व जिवलग
दर्ग
ु सेवक सहकाऱ्यांच्या अनमोल सहकार्यानेच.

40) एक हात मदतीचा – कोरोनाच्या संकटकाळात पूर्ण देशात टाळे बंदी जाहीर करण्यात आली. सर्व कामधंद े उद्योग बंद
करण्यात आले. पण या अचानक आलेल्या संकटामुळे हातावर पोट असलेल्या अनेक कुटुब ं ांचे हाल होऊ लागले. हि बाब लक्षात
आल्यानंतर संस्थेच्या पेण विभाग व पुणे विभागाच्या वतीने १००० हून अधिक गरजू कुटुब ं ाना १५ दिवस पुरेल इतके किराणा
सामान देण्यात आले. तसेच इतकच करून न थांबता कोरोना टाळे बंदीच्या काळात नागरिकांच्या संरक्षणासाठी तैनात
असलेल्या पेण तालुक्यातील पोलीस स्टेशन मधील पोलीस बांधवाना २५०० मास्क व सॅनिटायझर संस्थेच्या पेण
विभागाच्या मध्यातून देण्यात आले. तसेच पेण तालुक्यातील चार आरोगकेंद्रांना ऑक्सिजन कीट देण्यात आले. तसेच पेण
तालुक्यातील कोविड सेंटर ला १०० पीपीई कीट पेण विभागाच्या वतीने देण्यात आले. इतकच नाहीतर पूर्ण टाळे बंदी असताना
कोकणात पायी जाणाऱ्या नागरिकांना मोफत गाडीची व्यवस्था तसेच सलग १०० हून अधिक दिवस कोरोना टाळे बंदी च्या
काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवाना रोज पिण्याचे पाणी व ओआरएस पेण विभागाच्या वतीने देण्यात आले.

41) महाराक्तदान शिबीर – जागतिक कोरोना महामारी संकटकाळात पूर्णपणे टाळे बंदी असल्याने रुग्णालयातील इतर
अतिशय आवश्यक उपचारांसाठी रक्तपुरवठा कमी पडू लागला. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय श्री. उद्धवजी
ठाकरे साहेब यांनी पूर्ण महाराष्ट्रातील रक्तदात्यांना रक्तदान करण्यासाठी आवाहन केले. त्या आवाहनास सकारात्मक
प्रतिसाद म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान च्या माध्यमातून राज्यातील एकूण ७५ विभागांच्या मार्फ त रक्तदान शिबीर हा सामाजिक
उपक्रम मार्च, एप्रिल, मे, जून, जुल ै या महिन्यात राबविण्यात आला. या सर्व शिबिरांच्या माध्यामतून १०००० हून अधिक
रक्तदात्यांनी उस्फुर्त प्रतिसाद देत हा उपक्रम यशस्वी केला. यासाठी मेहनत घेऊन हा उपक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व
जिवलग दर्ग ु सेवक सहकाऱ्यांच्या सदैव ऋणात आहोत.

42) स्वराज्याचे प्रवेशद्वार – दर्गु राज राजगड पाली दरवाजा – स्वराज्याचे प्रवेशद्वार या उपक्रमाच्या माध्यामतून बारावा
मान मिळणार आहे तो दुर्गराज राजगड च्या पाली प्रवेशद्वाराला. महाराजांच्या जीवनातील अनेक घडामोडीचा अन महाराजांनी
स्वतः बांधून घेतलेला हा दुर्गराज राजगड. स्वराज्याची २६ वर्ष राजधानी म्हणून मान मिळवलेला हा दुर्गराज राजगड. या
गडाच्या पाली प्रवेशद्वारासाठी आर्थिक निधी हा लोकसहभागातून उभारण्यात आलेला आहे. या दरवाजाचे काम प्रगतीपथावर
आहे. लवकरच ह्या गडाच्या दरवाजाचा दुर्गार्पण सोहळा साजरा करण्यात येईल.

43) स्वराज्याचे प्रवेशद्वार – किल्ले हडसर – स्वराज्याचे प्रवेशद्वार या उपक्रमाच्या माध्यमातून तेरावा मान मिळणार आहे
किल्ले हडसर च्या महादरवाजाच्या प्रवेशद्वाराला. शिवजन्मभूमीच्या दुर्गवैभवातील मानाचं पान म्हणजे किल्ले हडसर,
स्थापत्यशास्त्रातील बांधकामाचा उत्कृष्ट नमुना असलेला हा किल्ले हडसर दुर्गभटक्या मंडळीचा अतिशय लाडका गड.
यागडाच्या प्रवेशद्वाराजवळ गेली कित्येक वर्ष दगडांचा खच पडू न होता. संस्थेच्या शिवजन्मभूमी विभगातील सह्याद्रीच्या
दर्ग
ु सेवकांनी मोठ् या कष्टाने हे दगड फोडू न ह्या प्रवेशद्वाराला मोकळा श्वास दिला आहे. ह्या दरवाजासाठी लागणारा सर्व
आर्थिक निधी हा लोकसहभागातून उभारण्यात आला असून ह्याही दरवाजाचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच ह्या
प्रवेशद्वाराचा दर्गा
ु र्पण सोहळा आयोजित करण्यात येणार आहे.

44) किल्ले प्रतापगड संवर्धन – किल्ले प्रतापगड जावळीच्या घनदाट निबिड अरण्यातील अतिशय महत्वाचा असलेला गड,
शिवकाळातील शिवप्रताप पराक्रमाचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेला हा किल्ले प्रतापगड. ह्या गडाच्या तटबंदीचा पाया
असलेल्या डोंगराचा काही भाग हा अतिवृष्टीमुळे कोसळला आहे, त्याचे भूस्खलन झाले आहे. त्यामुळे गडाच्या तटबंदीला
पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. हि तटबंदी पडू न गडाचे नुकसान होऊ नये म्हणून सह्याद्री प्रतिष्ठान च्या माध्यामातून
गडाच्या संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या सर्व विभागांच्या परवानग्या घेऊन तसेच राजमाता कल्पनाराजे भोसले
आईसाहेब व खासदार छत्रपती उदयनमहाराज भोसले यांच्या अधिकृत परवागी घेऊन तसेच आमदार शिवेंद्रराजे भोसले
यांचीही अधिकृत परवानगी घेऊन हे प्रतापगड संवर्धन कार्य लोकसहभागातून निधी उभारून करण्यात येणार आहे.
त्यासाठी निधी उभारण्याचे काम सुरु आहे. सदर कार्य हे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. अखंड
महाराष्ट्रातूनच नव्हे तर परदेशातूनही ह्या दुर्गसंवर्धन कार्यासाठी आर्थिक निधी संकलन सुरु आहे. लवकरच आर्थिक निधी
संकलन कार्य तडीस जाऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात होईल. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने व सहकार्याने हे कार्य लवकरच
पूर्ण होईल.

10
45) किल्ले वसंतगड – बुरुज संवर्धन – सातारा जिल्ह्यातील तळबीड गावाजवळ असलेला हा किल्ला. गेल्या दोन दिवसात
झालेल्या अतिवृष्टीमुळे गडाच्या गोमुखी दरवाजाजवळ बुरुज ढासळला आहे. लवकरच ह्या बुरुजाचे संवर्धन कार्य टीम
वसंतगड यांच्या सहकार्याने सुरु करत आहोत.

प्रतिष्ठान च्या माध्यामतून सामाजिक आणि सांकृतिक बांधिलकी जपत राबविण्यात येणारे उपक्रम
1) नटवर्य श्रीराम गोजमगुंडे रं गकर्मी सन्मान सोहळा - मराठवाड् याचे सुपत्र ु कलाक्षेत्रातील एक दिग्गज नटवर्य श्रीराम
गोजमगुंडे यांच्या नावाने पुरस्कार देऊन या सोहळ्याच्या माध्यमातून कलाक्षेत्रातील अनमोल योगदान देणाऱ्या कलाकार
मंडळींना सन्मानित करण्यात येत.े
2) सह्याद्री वियार्थी अकादमी – दर्ग ु संवर्धन चळवळीचे काम करत असताना गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी असणाऱ्या ग्रामीण
भागातील शाळे तील विद्यार्थ्यांसाठी आपणही काहीतरी करावे या संकल्पनेतूनच संस्थेच्या अंगीकृत सह्याद्री विद्यार्थी
अकादमी ची स्थापना करण्यात आली. या संस्थेच्या माध्यमातून समाजातील गोर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सहकार्य
करत असताना विविध शालेय साहित्य वाटप करण्यात येत आहेत.

प्रतिष्ठान च्या माध्यामतून नियमित राबविण्यात आलेले उपक्रम आणि मोहीम


!! गड-किल्ल्यांच्या बाबतीत उदासीन पुरातत्व खाते तसेच झोपेचे सोंग घेणारे महाराष्ट्र सरकार यांना जागे करण्यासाठी शिवदर्ग
ु अस्मिता
आंदोलनाच्या माध्यमातून निदर्शने, उपोषणे, जेलभरो, रास्तारोको अशा आंदोलनातून जनजागृती करण्याचे प्रयत्न केले जातात. !!

!! महाराष्ट्रातील ४०० किल्ल्यांचे संवर्धन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून सह्याद्री प्रतिष्ठान
कायदेशीर लढा देत आहे. या जनहित याचिकेवर सरकारने मुंबई उच्च न्यायालयात १२ नोव्हेंबर २०१३ रोजी प्रतिज्ञापत्र सादर करत महराष्ट्रातील
४६ गड-किल्ले यांच्यासाठी ४७ कोटी मंजूर केले आहेत. !!

!! सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र च्या साथीने दर्ग


ु संवर्धन कार्यात तसेच आंदोलन साठी सहकार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था, प्रतिष्ठान, ग्रुप यांना
सह्याद्री विशेष सन्मान, सह्याद्री पुरस्कार, शिवदर्ग ु अस्मिता पुरस्कार, शिवरथ पुरस्कार या पुरस्काराने गौरविण्यात येत.े

!! छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सह्याद्री
प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेकडू न भक्ती शक्ती उद्यान निगडी पुणे ते रौद्रशंभो जन्मभूमी किल्ले पुरंदर असे स्वाभिमान यात्रेचे आयोजन करण्यात
येत.े !!

!! महाराष्ट्रातील ४०० किल्ल्यांचे ४५००० फोटोंचे लिम्का बुक ऑफ रे कॉर्ड मध्ये नोंद झालेलं प्रदर्शन अगदी मोफत भरविले जाते. यापुढेही अजून
एक पाऊल टाकत सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र हि संस्था येत्या वर्षभरात भारत देशातील २००० किल्ल्यांच्या २ लाख छायाचित्रांचे प्रदर्शन भरवून
त्याची गिनीज बुक ऑफ रे कॉर्ड यामध्ये नोंद करण्याचा संस्थेचा मानस आहे. !!

ु प्रेमी यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र, गड-किल्ल्यांचे महत्व, दर्ग
!! शिवप्रेमी व दर्ग ु संवर्धन
कार्याची ओळख आणि गरज यांसारखे विषय समजून देण्यासाठी प्रसिद्ध इतिहासकारांची व्याख्याने व मार्गदर्शन असे अनेक उपक्रम सह्याद्री
प्रतिष्ठान महाराष्ट्र कडू न राबविण्यात येत आहेत. !!

!! गड-किल्ल्यांची माहिती असलेली विविध पुस्तके प्रतिष्ठानकडू न प्रकाशित करून ती दुर्गप्रेमींना मोफत वितरीत केली जातात. !!

!! सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन प्रतिष्ठानकडू न आरोग्य, शैक्षणिक, पर्यावरणविषयक कार्यक्रम असे अनेक उपक्रम वर्षभर राबविले
जातात. !!

11
!! महाराष्ट्राच्या इतिहासात एक पाऊल पुढे टाकत एक नवीन इतिहास घडविण्याचा पराक्रम सह्याद्री प्रतिष्ठानने केला आहे, तो म्हणजे दुर्गसंवर्धन
चळवळ या विषयवार १२ पोवाड् यांची निर्मिती आणि प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान याचे रे कॉर्डिंग करण्यात आले असून त्याच्या सी
डी अगदी माफक दारात दुर्गप्रेमींना उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. !!

!! छत्रपती संभाजी महाराजांची जन्मनोंद शालेय पाठ् यपुस्तकात व्हावी म्हणून आंदोलन करण्यात आले होते. सन २०१४ च्या पाठ् यपुस्तकात
जन्मतारखेची नोंद याचे लेखी पत्र प्रतिष्ठानला मिळाले. !!

!! सिंहगड किल्ल्यावरील कल्याण दरवाजा यासाठी यशस्वी आंदोलन मुख्यमंत्री विशेष निधीतून १ कोटी ७५ लाख निधी मंजूर करण्यात आला. !!

!! दुर्गसंवर्धन चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचावी या हेतूने प्रतिष्ठानकडू न दुर्गसंवर्धन या विषयावर व्याख्यानांचे आयोजन अगदी मोफत
करण्यात येत आहे. !!

संस्थेच्या कार्याची माहिती जाणून घेण्यासाठी व संस्थेच्या दर्ग


ु संवर्धन कार्यात आर्थिक निधी सहकार्यासाठी व
सहभागी होण्यासाठी
श्री. गणेश दत्ताराम रघुवीर श्री. गौरव शामकांत शेवाळे श्री. निलेश हनुमंत जेजुरकर पाटील श्री. यज्ञेश राजेंद्र सुंबरे

दुर्गसंवर्धन विभाग अध्यक्ष खजिनदार कार्याध्यक्ष प्रसिद्धीप्रमुख

९७७३६९४८७७ ९६८९०१७७३३ ७३८७४९४५०० ७०४०१९१०१०

संस्थेच्या दर्ग
ु संवर्धन कार्यात दर्ग
ु सेवक म्हणून सहभागी होण्यासाठी

महाराष्ट्र राज्य प्रशासक


श्री. संगमेश्वर स्वामी – ९६५७७२६९१५

1) पश्चिम महाराष्ट्र – (पुण,े सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर) –


श्री. हरिश्चंद्र बागडे ९८६९३४१९९२
2) उत्तर महाराष्ट्र – (अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव नंदुरबार) – (प्रभारी कार्यभार)
श्री. निलेश हनुमंत जेजुरकर पाटील – ७३८७४९४५००
3) पश्चिम विदर्भ – (बुलढाणा, वाशीम, अकोला, अमरावती) –
श्री. सचिन बाहेकर – ७५८८८४६४७३
4) पूर्व विदर्भ – (नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, यवतमाळ, वर्धा) –
श्री. दिलीप रिं गणे – ९१५८३६६८६६
5) उत्तर मराठवाडा – (जालना, संभाजीनगर, बीड, परभणी) –
श्री. पवन गिरी – ९६३७४७४७४६
6) दक्षिण मराठवाडा – (लातूर, नांदडे , हिंगोली, धाराशिव) –
श्री. रघुनाथ वाघमारे – ७३७८५४५०००
7) उत्तर कोकण – (ठाणे, पालघर) –
श्री. नरे श विशे – ७७५७९३८०४१
8) मुंबई प्रांत – (मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई) –
श्री. नितीन पानवलकर – ८६५२०४६०८९
9) रायगड जिल्हा –
श्री. रितेश कदम – ९८३३२०४३२१
10) रत्नागिरी जिल्हा –

12
श्री. नंदकुमार साळवी – ९९७५८४६४६३

13

You might also like