You are on page 1of 20

भाग-२ वाचन करण्‍यासाठी

"सत्‍ता आणि संपत्‍ती ह्या अशा गोष्‍टी आहेत ज्‍या प्राचीन काळापासून मानवाला हव्‍या-हव्‍याश्‍या होत्‍या, आहेत

आणि राहणार आहेत. कारण सत्‍ता ही शक्‍तीचं प्रतीक आहे आणि प्रस्‍थापित व्‍यवस्‍थेमध्‍ये/समाजामध्‍ये

आपल्‍या मनासारखे परिवर्तन घडवून आणू शकते तर परिवर्तन आणि बदल आणण्‍यासाठी संपत्‍ती महत्‍वाचे

साधन आहे."

सत्‍ता-साम्राज्‍य-शासन-अधिकार यांना प्राप्‍त करण्‍याची लालसा म्‍हणणे योग्‍य आहे का नाही माहित नाही परंतू
परिवर्तनासाठी सत्‍तेचा उपयोग झाल्‍याचे इतिहास सांगतो.

आज आपण ज्‍या पुस्‍तकाचे सारांश पाहणार आहोत त्‍यालादेखिल प्राचीन आणि मध्‍ययुगीन इतिहासाची
पार्श्‍वभुमीचा वापर के ले ला आहे. सत्‍ता-अधिकार प्राप्‍तीचे ४८-सुत्रे (48-Laws of Power) ह्या पुस्‍तकाचे
ले खक आहेत रॉबर्ट ग्रीन ज्‍यांनी पाच जागतीक स्‍तरावर गाजले ली पुस्‍तकं लिहिली आहेत. ही पुस्‍तक रॉबर्ट

ग्रीन यांची पहिली पुस्‍तक होती ज्‍यामुळे ले खक म्‍हणून त्‍यांच्‍या जीवनात महत्‍वाची भुमिका निभावली.

रॉबर्ट ग्रीन यांच्‍या ह्याच पुस्‍तकामुळे ब-याचशा विवादांचा सामना करावा लागला. तरीदेखिल ले खक आपल्‍या
कल्‍पनेसोबत नेहमीच ठाम राहिले .

सत्‍ता प्राप्‍तीचे ४८-सुत्रे

सत्‍ता प्राप्‍तीचे ४८-सुत्रे ही पुस्‍तक अशा ४८-मार्गांना समजण्‍यासाठी आहे ज्‍यांद्वारे आपण कसे आपण आपल्‍या
शक्‍तीचा वापर करू शकतो आणि त्‍या शक्‍तीला वाढवू शकतो.
हे ४८-सुत्र अशा कृ ती-कल्‍पना आणि डावपेच ह्यांपासून बनले आहेत जे सत्‍तेचे खेळ खेळण्‍यासाठी वापरले

जातात.
ले खक सजगपणे आणि चांगल्‍यारितीने समजतात आणि दाखवतात की कसे सत्‍ता तुमच्‍या व्‍यवसाय आणि

कार्यक्षमतेला परिणामकारक बनवते.


ही पुस्‍तक व्‍यावसायिक पुढारी आणि उद्योगजगतामध्‍ये अतिषय प्रसिद्ध व पसंत के ली गेली आणि पुरस्‍कृ त
के ली गेली आहे.

ह्या सारांशामध्‍ये रॉबर्ट ग्रीन यांच्‍या सर्व ४८-सुत्रांना समजून घेणार आहोत. ले खक प्राचीन व मध्‍ययुगीन
छोट्या-छोट्या कथा-दंतकथा यांचा वापर करून समजावले असून ज्‍याद्वारे आपण सत्‍तेचे गुढ जाणून घेणार
आहोत.
काही सुत्रे किं वा नियम खुपच बेधडक आहेत. असेही होऊ शकते की सर्वजन त्‍यांच्‍याशी सहमत असतीलच

असे नाही. परंतू सारांशाचा आमचा हेतू पुस्‍तकाला जसेच्‍या तसे सादर करण्‍याचा आहे. याची सुजान वाचकांनी
नोंद घ्‍यावी.

चला तर मग सत्‍तेची सुत्रे हातात घेण्‍यासाठी नियम बघुया... !

Book Summary in Marathi of 48-Laws of


POWER

सुत्र क्र.१ - आपल्‍या वरिष्‍ठांपेक्षा जास्‍त चमकू नका: (Never Outshine the Master)

पुस्‍तकातील नियम क्रमांक एक असे सांगतो की, कार्य, व्‍यवसाय, संस्‍था, संघटना येथील वरच्‍या पदावरचा
व्‍यक्‍ती तुमच्‍यापेक्षा चांगला-सरस आहे. हे लक्षात ठे वणे गरजेचे आहे की, तुम्‍ही त्‍यांच्‍याखाली काम करत

आहात. आणि हिच गोष्‍ट त्‍यांनासुद्धा आठवन करून देत जा.

आपल्‍या बुद्धीला आणि कौशल्‍यांना दाखविणे अगदी सोपे आहे. परंतू एक गोष्‍ट नेहमी लक्षात घ्‍या की असे
करून तुम्‍ही तुमच्‍या वरिष्‍ठांना कमी ले खत तर नाही. असे वाटू देत असाल.
ले खकांचं असं म्‍हणणं आहे की, जर तुम्‍ही तुमच्‍या वरिष्‍ठांना असं वाटू दिलात की, ''ते जसे आहेत त्‍यापेक्षा आणि

तुमच्‍यापेक्षा अधिक चांगले आहेत.'' तेंव्‍हा असे करून तुम्‍हाला पुढे जाण्‍याची शक्‍ती मिळे ल. जर तुम्‍ही त्‍यांना
असे वाटू दिलात की, त्‍यांच्‍या भुमिके वर आणि त्‍यांच्‍या शक्‍तींवर तुम्‍हाला शंका आहे तर असे करून तुम्‍हालाच

नुकसान होईल. आणि तुम्‍ही मागे राहुन जाल.

सुत्र क्र.२- आपल्‍या मित्रांवर विसंबून राहू नका, शत्रूंचा वापर करायला शिका:

(Never put too much trust in friends, learn how to use enemies)

ले खक नियम क्रमांक-२ नुसार असे सुचवितात की, आपल्‍या मित्रांवर विशेषकरून जवळील मित्रांवर
अत्‍याधिक विश्‍वास न ठे वण्‍याची चेतवानी देतात. ले खक म्‍हणतात, तुमच्‍या मित्रांना तुमच्‍यासोबत खुप
सोप्‍यापद्धतीने मत्‍सर निर्मान होऊ शकतो आणि ज्‍याचा परिणाम संधी मिळताच विश्‍वासघातामध्‍ये होतो.

तुमच्‍या मित्रांना तुमचा हेवा वाटू शकतो आणि ज्‍याचे रूपांतर धोका देण्‍यामध्‍ये होऊ शकतो.

ले खक म्‍हणतात तुमचे जुने शत्रू तुमच्‍या नव्‍या मित्रांपेक्षा अधिक चांगले असू शकतात. असं यासाठी कारण, जो
तुमचा शत्रू आहे त्‍याला खूपकाही सिद्ध करावे लागते.

तुम्‍ही पाहिलं असेल की नेहमी असे लोकं तुमच्‍याजवळू न आदर आणि विश्‍वास जिं कण्‍यासाठी/
मिळविण्‍यासाठी खुप श्रम-मेहनत करतात आणि त्‍यामुळे ते चांगले सहयोगी आणि चांगले कर्मचारी बनतात.

रॉबर्ट ग्रीन म्‍हणतात,

"तुम्‍हाला तुमच्‍या मित्रांपासून घाबरायला पाहिजे,


आपल्‍या शत्रूंपासून नाही."

किं वा

"मुझे अपने दोस्‍तों से बचाव, दुश्‍मनोंसे मैं खुद निपट लूंगा |"

सुत्र क्र.३ - आपले प्रयोजन नेहमी झाकू न ठे वा: (Conceal your intentions)

हा नियम असं सांगतो की, आपल्‍याला आपल्‍या मनातील मनसुबे किं वा हेतू लोकांना सांगायला नाही पाहिजे.

खरं तर तुमचे कार्य हेच तुमच्‍या हेतूंची झलक दाखवत असतात. तरीसुद्धा त्‍यांना समजू देऊ नये.

लोकांना अंधारात ठे वण्‍याचा अर्थ आहे की ते स्‍वतःला तयार करू शकनार नाहीत आणि उत्‍तर देण्‍याच्‍या वेळे स
ते तयार राहणार नाहीत.

ग्रीन असा सल्‍ला देतात की, लोकांना चुकीची माहिती देवून, आपण लोकांना असं दाखवू की आपण एखाद्या

चुकीच्‍या दिशेने जात आहोत, आणि ते त्‍यामध्‍येच फसून राहतील. आणि जोपर्यंत त्‍यांना तुमच्‍या हेतूबद्दल
कळाले असेल तोपर्यंत खूप उशीर झाले ला असेल आणि ते काहीच करू शकनार नाहीत.
सुत्र क्र.४ - आवश्‍यकतेपक्षा कमी बोला: (Always say less than necessary)

हा नियम तिस-या नियमासोबत जोडले ला आहे. आवश्‍यकतेपेक्षा जास्‍त कधीच बोलू नका. जेवढं शक्‍य आहे
तेवढं कमी बोला. ले खक म्‍हणतात, तुम्‍ही अधिक बोलू न आपली स्‍वतःची वाईट प्रतिमा निर्माण करता आणि
जास्‍त चौकशी करण्‍याची संधी देता. आणि एखादी नकोशी गोष्‍टसुद्धा तोंडातून निघू शकते.

शक्‍तीशाली व्‍यक्‍ती कमी बोलतात, आणि नेहमी आपलं बोलनं अस्‍पष्‍ट (Vogue) आणि एका खुल्‍या-

बंदिस्‍ततेने (Open Ended) मुक्‍तपणे बोलतात. त्‍यांचं असं करणं धोकादायक आणि प्रभावी/परिणामकारक
असू शकतो.

📕📙📘📗
👉अधिक वाचाः नेमके काय बोलावे-भुरळ घालणारे जादुई शब्‍द
👉अधिक वाचाः देहबोलीः आधुनिक संवाद-संभाषण चातुर्य कला

सुत्र क्र.५ - किर्तीवर सर्वकाही अवलंबून असते, प्राणपणाने किर्तीची रक्षा कराः

(So much depends on reputation, guard it with your life)

आपणांसर्वांना हे माहितच आहे की, आपले नाव आणि पत-प्रतिष्‍ठा घडवू शकते आणि बि-घडवू सुद्धा शकते.
व्‍यक्‍तीची शक्‍ती त्‍याच्‍या नावावरून आणि त्‍याच्‍या प्रतिष्‍ठे वर टिकले ली असते.

जर तुमचं खूप नाव असेल तर तुमच्‍यामध्‍ये एक प्रभावशाली शक्‍ती असते. तर जर तुमचं नांव मोठं आणि
मजबूत नसेल तर तुम्‍ही सोप्‍या पद्धतीने लोकांच्‍या जाळ्यात ओढल्‍या जाऊ शकता. सोबतच स्‍वतःवर हल्‍ला

करण्‍याची संधीसुद्धा देत असता.

ग्रीन येथे आपल्‍याला स्‍वतःचे नांव मजबूत बनविण्‍यावर जोर देतात. जर तुम्‍हाला एखादी समस्‍या समोर दिसली
तर त्‍याचा स्‍वतःवर प्रभाव टाकण्‍याअगोदर त्‍या समस्‍येचा सामना करा.

आपल्‍या शत्रूच्‍या कमजोरीला समजणे आणि त्‍यांच्‍या स्‍वतःच्‍या नावाला खराब करण्‍याची गोष्‍ट समजावली

आहे. जर तुमचं खूप नाव असेल तर तुमच्‍यामध्‍ये एक प्रभावशाली शक्‍ती असते.

सुत्र क्र.६ - कोणत्‍याही किं मतीवर लक्ष वेधून घ्‍या: (Court attention at all cost)

जेवढे आवश्‍यक तुमचे नांव आहे तेवढेच आवश्‍यक हे आहे की लोकं तुमच्‍याकडे कसे पाहतात.
रॉबर्ट येथे समजावतात की तुम्‍हाला सर्वसामान्‍यांसोबत सहजच मिळू न-मिसळू न राहायला नाही पाहिजे.
(हरवून जायला नाही पाहिजे). हे तुमच्‍याच हातात आहे की तुम्‍ही स्‍वतःला 'वेगळे ' कसे दाखवता, आणि कसे
लोकांच्‍या नजरेत येत असता. जर असं करण्‍यासाठी तुम्‍हाला काही मोठं करायला लागलं तर तसं अवश्‍य

करा.

आपल्‍या मनासारखे लक्ष वेधून घेण्‍यासाठी आपल्‍या बोलण्‍यामध्‍ये थोडेसे रहस्‍य बनवून ठे वा.

सुत्र क्र.७ - तुमच्‍यासाठी इतरांना कामे-श्रम करू द्या, परंतू श्रेय स्‍वतःकडे येऊ द्या:
(Get others to do the work for you, but always take credit)

हे नियम असे सांगते की, इतरांकडू न कामे करवून घेतली जाऊ शकतात. लोकांजवळ ज्ञान, बुद्धी, कौशल्‍य,
प्रतिभा यांसारख्‍या अनेक गोष्‍टी आहेत दाखविण्‍यासाठी.

ज्ञान, बुद्धी, कौशल्‍य, प्रतिभा -Knowledge, Wisdom, Skill, Talent

ग्रीन असे सांगतात की आपल्‍याला दुस-या लोकांचा पुरेपुर फायदा घ्‍यायला पाहिजे. आपल्‍याला ती कामे

करायला नाही पाहिजे जी इतर लोकं सुद्धा करू शकतात. दुस-याकं डू न कामे करवून घेऊन तुम्‍ही आपला वेळ

वाचवत असता आणि अधिक परिणामकारकसुद्धा बनता. परंतू लक्षात ठे वा की तुम्‍ही त्‍या कामाचे श्रेय घेतले
पाहिजे आणि असे समजू द्या की सा-या मेहणतीवर-श्रमावर तुमचेच हात आहेत.

सुत्र क्र.८ - लोकांना तुमच्‍याकडे येऊ द्या, आवश्‍यक असल्‍यास आमिष दाखवा:

(Make other people come to you, use bait if necessary)

दुस-यांकडू न कामे करवून घेऊन तुम्‍ही नियंत्रण तुमच्‍या हाती घेता. तुम्‍हाला कळसुत्रीची बाहुली चालवणा-या

निष्‍णात/प्रविण सारखे बनायला पाहिजे. तुम्‍ही स्‍वतः लोकांपर्यंत जाऊ नये, लोकांना आपल्‍यापर्यंत येण्‍यासाठी
प्रोत्‍साहित करायला पाहिजे. गरज पडल्‍यास प्रलोभण आणि आमिष दाखवण्‍याचा सहारा घ्‍या.

एकदा का समोरील व्‍यक्‍ती स्‍वारस्‍य दाखविल्‍यास आपल्‍या प्रभाव आणि शक्‍ती-सत्‍तेचा-अधिकाराचा वापर

करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवायला पाहिजे. परिस्थितीचे नियंत्रण आपल्‍या हातात घेऊ शकता.

पत्‍ते नेहमी तुमच्‍या हातामध्‍ये असायला पाहिजे.

सुत्र क्र.९ - वायफळ (युक्‍तीवाद) बडबडीपेक्षा आपल्‍या कृ तीने जिं का:


(Win through your actions, never through argument)
तुम्‍हाला एका युक्‍तीवादाने मिळाले ले एका क्षणाचेसुद्धा यश हे काही कामाचे नाही. ले खक असे मानतात की

तुम्‍हाला दुस-यांचा विश्‍वास जिं कायला आणि आपल्‍या सोबत करायला आपल्‍या शब्‍दांचा नाही तर आपल्‍या
कार्याचा वापर करायला पाहिजे.

वर सांगितल्‍याप्रमाणे, ''तुम्‍हाला एका युक्‍तीवादाने मिळाले ले एका क्षणाचे यश सुद्धा बेकार आहे.''

दुस-यांचा विश्‍वास संपादन करायला आणि त्‍यांना आपल्‍या सोबत येण्‍यासाठी आपल्‍या शब्‍दांचा नाही तर

आपल्‍या कार्याचा वापर करायला पाहिजे. युक्‍तीवाद करणे आपल्‍या शक्‍तीचा वापर करण्‍याची योग्‍य पद्धत

नाही. तुम्‍हाला के वळ आपल्‍या कार्यानेच इतरांना प्रभावित करायलाआले पाहिजे.

सुत्र क्र.१० - संसर्ग: दुःखी आणि दुर्दैवी लोकांचा सहवास टाळा


(Infection: Avoid the unhappy and unlucky people)

ले खक रॉबर्ट ग्रीन येथे आपल्‍याला सुःख-आनंदी आणि भाग्‍यशाली-सुदैवी लोकांच्‍या गराड्यात राहण्‍याच्‍या

गोष्‍टीवर भर/जोर देतात. असे करून तुम्‍ही तुमच्‍या आनंद आणि यशाला वाढविता. जर तुम्‍ही नेहमी स्‍वतःला
दुःखी आणि दुर्दैवी लोकांत घेरुन राहिलात तर असेही होऊ शकते की तुम्‍ही त्‍यांचे दुःख स्‍वतःवर घ्‍याल.

इतरांच्‍या चिं तेत/काळजीत स्‍वतःला चिं तीत करणे/काळजीत टाकणे खुप सोपे आहे. तर त्‍यांच्‍यापासून दूर
राहणे कधीही चांगले .

सुत्र क्र.११ - लोकांना आपल्‍यावर अवलंबून ठे वायला शिका:

(Learn to keep people dependent on you)

सत्‍तेचा ११ वा नियम त्‍या इतर लोकांशी संबंध प्रस्‍थपित करण्‍याविषयी आहे जे तुमच्‍यावर निर्भर आहेत. नेहमी
लोकांमध्‍ये आपली गरज बनवून ठे वल्‍यासच तुम्‍ही तुमच्‍या शक्‍ती-सत्‍तेला आणि स्‍वातंत्र्याला बनवून ठे वू

शकता. जर इतर लोकं खुपच जास्‍त स्‍वतंत्र आहेत आणि त्‍यांना तुमच्‍या सल्‍ल्‍याची आणि मदतीची गरज नाही
तर ते स्‍वतः अधिक शक्‍तीशाली होतील.

आपल्‍या सोबत काम करणा-या लोकांना सर्वकाही शिकवू नये आणि त्‍यांना सर्वकाही करण्‍याची संधीसुद्धा
द्या. त्‍यांना नेहमी कोणत्‍याही गोष्‍टीसाठी तुमची गरज असायला पाहिजे.

सुत्र क्र.१२ - निवडक प्रामाणिकपणा आणि औदार्य यांचा वापर करा, तुमच्‍या सावजास निःशस्‍त्र करा:

(Use selective honesty and generosity to disarm your victim)

एक प्रांजळ आणि प्रामाणिक कृ ती डझनभर अप्रामाणिक खेळींना झाकू न ठे वते.

खुल्‍या मनाने/हृदयाने/दिलाने आणि खरेपणासोबत तुम्‍ही कित्‍येक लोकांना आपल्‍यासमोर नतमस्‍तक होऊ

देऊ शकता. ले खकांचं असं म्‍हणण्‍याचा अर्थ आहे की, तुम्‍ही अनंतवेळा बेईमान-अप्रामाणिक होऊ शकता.
फक्‍त एकावेळे स प्रामाणिकपणा दाखवून तुम्‍ही त्‍यावेळे ससुद्धा लोकांची मने जिं कू शकता जेंव्‍हा तुम्‍ही
अप्रामाणिक राहता.

जर तुम्‍ही आपल्‍या प्रामाणिकपणाचा चांगल्‍या पद्धतीने वापर के ला तर लोकं तुम्‍हाला विश्‍वासास पात्र आहात
असं समजतील.

जोवर समोरच्‍याला तुमच्‍या त्‍याच्‍या स्‍वतःकरिता त्‍यातून काहीही फायदा दिसत नाही, तोवर तुमच्‍या निकडीचा
ते तिरस्‍कार करतील. काहीही घेण्‍यापुर्वी देण्‍यास शिकले पाहिजे. त्‍यामुळे तुमच्‍या संपर्कातील लोकांमध्‍ये

मऊपणा, लवचिकता येतो. देण्‍याच्‍या अनेक पद्धती असू शकतात. जे जे लागेल ते ते द्यावयास पाहिजे. जसे-
व्‍सतुरूप भेट, चांगुलपणाची कृ ती, औदार्य, एक विशेष प्राधाण्‍य, एक प्रांजळ कबुली.

निवडक प्रामाणिकपणा हा परिचयाच्‍या प्रथम भेटीत वापरणे सर्वोत्‍तम ठरते असे ले खकाचे म्‍हणणे आहे.

सुत्र क्र.१३ - मदत मागताना लोकांच्‍या स्‍वार्थाला याचना करा:


(When asking for help, appeal to people's self-interet)

हे तर निश्‍चति आहे की, कधी ना कधी तुम्‍हाला मदतीची गरज पडेलच. जेंव्‍हा कें व्‍हा तुम्‍ही असे कराल तेंव्‍हा

तुम्‍ही मागे के ले ल्‍या चांगल्‍या कामाचा सहारा किं वा मदत कधीही घ्‍यायला नाही पाहिजे. खरंतर अशी गोष्‍ट

त्‍यांच्‍या समोर ठे वा की इतरांनाही त्‍यांचा त्‍या गोष्‍टीमध्‍ये फायदा दिसेल. कारण असे के ल्‍यास लोकं मदत
करण्‍यासाठी लवकर तयार होतात.

जरी त्‍यांचा खरा फायदा त्‍यामध्‍ये होत नसेल, परंतू आपल्‍या विनंतीला असे फिरवायला पाहिजे की, त्‍यांना
त्‍यामध्‍ये त्‍यांचा फायदा दिसेल.

सुत्र क्र.१४ - मित्रासारखे वागा, हेरासारखे कार्य करा:

(Pose like as a friend, work as a spy)

तुम्‍हाला तुमच्‍या शत्रूंना समजावणे किती आवश्‍यक आहे, तुम्‍हाला त्‍यांच्‍या शक्‍तींची आणि कमजोरींची माहिती

असायला पाहिजे. याची सर्वांत चांगली पद्धती ही आहे की, तुम्‍ही एका गुप्‍तचरासारखे बनले पाहिजे.
लोकांकडू न माहिती काढायला शिका. त्‍यांना योग्‍य वेळी योग्‍य प्रश्‍न विचारायला पाहिजे. जर तुम्‍ही काय

करत आहात याचा थांगपत्‍ता त्‍यांना लागायला नको पाहिजे असेल तर गोल-फिरवून बोला.

कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम हेरगिरीसाठी मिळाले ल्‍या संधीसारखे वापरले गेले पाहिजे.

सुत्र क्र.१५ - तुमच्‍या शत्रूला पूर्णपणे चिरडून टाका :

(Crush your enemy totally)


हा नियम खूपच साधारणसा आहे. हे सुनिश्चित करा की तुमचा शत्रू पुर्णपणे समाप्‍त झाला आहे.

तुम्‍हाला हे सुनिश्चित करायला पाहिजे की तुमचे शत्रू पूर्णपणे पिचले -दबले गेले आहेत, नाहीतर ते पुन्‍हा उठू न
उभे राहतील आणि सूड-बदला घेण्‍याचा प्रयत्‍न करतील. तुम्‍हाला ह्या सूड घेण्‍याच्‍या धोक्‍यापासून वाचून

राहिले पाहिजे. एकदा जर का तुम्‍ही तुमच्‍या शत्रूला दाबायला सुरूवात के ली तर थांबायला नाही पाहिजे.
त्‍यांना प्रतिहल्‍ला करण्‍याची कोणतीही संधी देऊ नका.

सुत्र क्र.१६ - आदर आणि मानसन्‍मान मिळविण्‍यासाठी अनुपस्थितीचा वापर करा:


(Use absence to increase respect and honour)

गुढ असण्‍याबद्दल देखिल बरेच काही सांगता येते. जसे की ले खकांनी आपल्‍या अगोदरच्‍या नियमांमध्‍ये
सांगितले लं आहे- तुम्‍ही स्‍वतः अधिक दिसणे आणि स्‍वतःविषयी अधिक ऐकवण्‍यापासून वाचवत असता कारण,

ह्यामुळे तुम्‍ही स्‍वतःला सर्वसाधारण बनवत असता, सोबतच कोणीही तुमच्‍यापर्यंत सहजतेने पोहोचू शकतो.

समाजापासून थोडं दूर राहा. आणि तुम्‍हाला असं जाणवेल की लोकं तुमच्‍याबद्दल उत्‍सुक असतील, बोलतील
आणि विचार करतील की तुम्‍ही पुढे काय करणार आहोत.

सुत्र क्र.१७ - इतरांना निलं बित दहशतीखाली ठे वा, अनिश्चिततेच्‍या हवेची मशागत करा:
(Keep others in suspended terror, cultivate an air of unpredictability)

मनुष्‍य आपल्‍या सवयींचा गुलाम आहे. तो सवयींपासून मजबूर आहे. आणि त्‍याला इतरांच्‍या कामामध्‍ये

डोकावण्‍याची लालसासुद्धा असते. तुमची निश्चितता त्‍यांना तुम्‍हाला नियंत्रित ठे वण्‍याची जाणिव करून देते.
बाजू बदला आणि जाणून-बुजून अजाणते बना. काहीच माहित नसल्‍यासारखे वागा.

रॉबर्ट येथे सांगतात की आपण मानव असल्‍यामुळे आपण अपेक्षा ठे वतो. आणि हेच कारण आहे की
आपल्‍याला होणा-या गोष्‍टी-घटनांविषयी अंदाज लावणे आपल्‍याला आवडते.

जर तुम्‍ही तुमच्‍या हेतू/मनसुब्यांचा अंदाज त्‍यांना लागू न दिल्‍यास ते हैराण/आश्‍चर्यचकित होतील. जर त्‍यांना
तुमच्‍या योजनांविषयी माहिती नसेल तर ते तुमच्‍यापासून घाबरून राहतील.

सुत्र क्र.१८ - : स्‍वतःला वाचवण्‍यासाठी स्‍वतःभोवती गढी उभारणे टाळा- पूर्ण वेगळे पण धोकादायक आहेः

(Do not build fortresses to protect yourself- Isolation is dangerous)


ग्रीन असे सांगतात की, आपल्‍याभोवती गढी किं वा किल्‍ला बनवून घेणे चांगले वाटते. परंतू असे करण्‍यामध्‍ये

तुम्‍ही स्‍वतःला वेगळे करून घेता आणि स्‍वतःला पूर्णपणे वेगळे करणे धोकादायक असते. याचा अर्थ
तुमच्‍याजवळ जी माहिती आहे ती सिमित आहे आणि तिचा वापर सोपं नाही.

असं करणे तुम्‍ही स्‍वतःवर इतरांचे ध्‍यानआकर्षि क करता आणि तुमच्‍यावर हल्‍ला करण्‍याची संधीसुद्धा देत
असता. तुम्‍ही एक सहजसोपे लक्ष बनून जाता.

तुम्‍ही स्‍वतःला आपल्‍या सोबती आणि लोकांसह वेढू न ठे वायला पाहिजे, असे के ल्‍याने तुम्‍ही आणि तुमच्‍या

शत्रूदरम्‍यान अनेक लोकं असतील.

सुत्र क्र.१९ - कोणाबरोबर वाटाघाटी करताय ते जाणून घ्‍या-चुकीच्‍या माणसाला दुखवू नकाः

(Know who you're dealing with- do not offend the wrong person)

जसं की यापुर्वीच सांगितले लं आहे की, तुम्‍हाला आपल्‍याशी जोडले ल्‍या लोकांना, सोबत काम करणा-या
लोकांना आणि आपल्‍या शत्रूंना समजणे खूप गरजेचे आहे. ही माहिती तुम्‍हाला शक्‍ती देईल. सर्वजण विशिष्‍ट-

वेगळे आहेत आणि तुम्‍ही सर्वांवर एकाच प्रकारच्‍या पद्धतींचा वापर करू शकत नाही.

अशी कोणतीच पद्धत नाही जी सर्वांवर लागू होईल.

ले खक आपल्‍याला अशा लोकांपासून सावधान राहण्‍याची चेतावनी देतात जे धोका खाल्‍ल्‍यानंतर आपला

सूड-बदला घेण्‍याचा प्रयत्‍न करत असतात जोपर्यंत त्‍यांना शांती-समाधान मिळत नाही तोपर्यंत ते असेच करत
राहतात. ही ती माणसं नाहीत ज्‍यांच्‍याशी तुम्‍ही भांडलात.

कोणतेही पाऊल उचलण्‍याअगोदर हे लक्षात ठे वा की तुम्‍ही कोणाचा सामना करणार आहोत.

सुत्र क्र.२० - कोणालाही शब्‍द किं वा वचन देऊ नकाः (Do not commit to anyone)

तुम्‍हाला तुमच्‍या स्‍वातंत्र्याला एक सामर्थ्‍य समजायला पाहिजे, कमजोरी नाही. कोण्‍या एका व्‍यक्‍तीसोबत

किं वा कोण्‍या एका बाजूला असण्‍याच्‍या सापळ्यात फसायला नाही पाहिजे. नेहमी आपल्‍या आणि आपल्‍या

उद्देशासोबत मजबुत बनून राहा.

स्‍वतंत्र राहिल्‍याने तुमच्‍या हातात सत्‍ता राहिल, लोकं तुमच्‍या मागे येतील आणि तुमच्‍याशी युक्‍तीवाद करायला

इच्छितील. ही गोष्‍ट तुम्‍हला अशी व्‍यक्‍ती बनवेल ज्‍याच्‍याजवळ सर्व शक्‍ती आहेत.
सुत्र क्र.२१ - दुधखुळे वागून दुधखुळ्याला आकर्षि ककरा- इयत्‍तेपेक्षा बुद्धू दिसाः
(Play a sucker to catch a sucker- seem dumber than your mark)

हे तर सगळ्यांना माहिती आहे की, आपण सर्वजण बुद्धीमान जाणवू इच्छितो. तुम्‍ही काही मुर्खासारखे बोलला
असाल किं वा काही के लं असेल असे जाणून घेण्‍यापेक्षा अधिक वाईट काहीच होऊ शकत नाही. रॉबर्ट ग्रीन

तुम्‍हाला आपल्‍याच निर्णयासाठी समजूतदार बनन्‍याचा बढावा देतात.

आपल्‍या शत्रूंबद्दल विचार करा आणि त्‍यांना हे विश्‍वास येऊ द्या की ते तुमच्‍यापेक्षा कितीतरी अधिक समजूतदार
आहेत. जर तुम्‍ही असं के ल्‍यास त्‍यांच्‍या मनात तुम्‍ही खोटा विश्‍वास तयार करालआणि ते तुमच्‍यावर यानंतर

कधीही शंका घेणार नाहीत.

सुत्र क्र.२२ - शरणागतीची युक्‍ती वापरा- दैन्‍याचे बलामध्‍ये परिवर्तनकराः


(Use the surrender tactic: Transform weakness into power)

जर तुम्‍ही कमजोर बाजूचे असाल तर नेहमी लढण्‍यासाठी उत्‍सुक असाल. भले ही ते तुमच्‍या अहंकाराला पुर्ण
करण्‍यासाठी का असेना. ले खक अशा परिस्थिमध्‍ये आत्‍मसर्पण करण्‍याची किं वा शरणागती पत्‍कारण्‍याचा

सल्‍ला देतात. अशाने तुम्‍हाला पुर्ववत व्‍हायला वेळ मिळतो. आणि अशी आशा असते की तुमच्‍या शत्रूची
शक्‍ती संपले ली असेल. आणि ते वेळे सोबत चिड-चिडे-संतप्‍त होतील.

त्‍यांना सावरूण उभे टाकण्‍यामध्‍ये आणि तुम्‍हाला हरविण्‍याअगोदर तुम्‍ही मोठे व्‍हा आणि तिथून दूर व्‍हा. ही एक

अशी युक्‍ती आहे जे ब-याच लोकांना समजत नाही. आणि हे तुमच्‍या फायद्याचे होईल.

सुत्र क्र.२३ - तुमच्‍या शक्‍तीवर चित्‍त एकाग्र कराः (Concentrate your forces)

जर तुम्‍हाल पैशाने भरले ली एखादी खदान मिळाली आणि तुम्‍ही अधिकाधिक खोलवर खोदून काढली तर
तुम्‍हाला जास्‍तीतजास्‍त पैसा मिळत जाईल. आणि जर तुम्‍ही खुपच कमी पैशांच्‍या अधिक वेगवेगळ्या
खदानीमध्‍ये जाल तर तुम्‍हाला कमी यश मिळे ल.

विस्‍तार तीव्रतेला हरवतो आणि हेच तुम्‍हाला तुमच्‍या मनामध्‍ये ठे वायला पाहिजे.

जेंव्‍हा तुम्‍हाला शक्‍तीचे एखादे साधन मिळे ल तर त्‍याला जाऊ द्यायला नाही पाहिजे, आणि त्‍याचा मागोवा घेत
राहायला पाहिजे. इतर कोणत्‍या‍ही साधनाच्‍या मागे जाऊ नये जर पहिल्‍यापेक्षा उत्‍तम साधन तुमच्‍या समोर
आहे.
सुत्र क्र.२४ -उत्‍कृ ष्‍ट प्रियाराधन कराः (Play the perfect courtier)

काही लोकं फक्‍त अशाच जगात यशस्‍वी आहेत जेथे सर्वकाही शक्‍ती-सत्‍ता आणि कौशल्‍याच्‍या आजूबाजूला
फिरत असते. त्‍यांनी चुकीच्‍या दिशेने फिरवण्‍याच्‍या कले मध्‍ये प्राविण्‍य मिळविले ले आहे. ते आपल्‍या सत्‍तेला

सर्वांत योग्‍य-उत्‍कृ ष्‍ट पद्धतीने वापरतात.

ह्या नियमाला वापरायला शिका आणि यानंतर तुम्‍हाला वर उठण्‍यासाठीची कोणतीच सिमा राहणार नाही.

भाग-२ वाचन करण्‍यासाठी


खालील दिले ल्‍या लिं कवरून पुस्‍तकाची मराठी आवृत्‍ती खरेदीकरू शकता.

मराठी भाषेत पुस्‍तक खरेदीसाठी

पुस्‍तक: सत्‍ता-अधिकार प्राप्‍तीचे ४८- सुत्रे

ले खक: रॉबर्ट ग्रीन

ऑनलाईन पुस्‍तकः अमेझाॅन फ्लिपकार्ट किं डल-ई-बुक ऑडियो-बुक

________
☯ ई-वाचनालय | www.evachnalay.in
________

सामाजिक कौशल्‍ये संबंधितः

दृष्‍टीकोन बनण्‍याचे रंजक गणित


दृष्‍टीकोन बदला आयुष्‍य बदला
मित्र जोडा आणि प्रभावी बना-डेल कार्नेगी- हाऊ टू विन फ्रें डस् & इन्‍फ्यूएन्‍स पीपल
देहबोली- आपल्‍या शरिराची भाषा -संवाद साधण्‍याचे आधुनिक पद्धत

अर्थ विषयक व इतर संबंधितः


भाग-२

भाग-१ वाचण्‍यासाठी

मित्रांनो सत्‍ता-अधिकार प्राप्‍तीचे ४८-सूत्र-नियम ह्या पुस्‍तकाच्‍या सारांशातील २४-सूत्र-नियम आपण भाग-१

मध्‍ये पाहिले ली आहेत. उर्वरित सूत्रे पुढील प्रमाणे आहेतः

सुत्र क्र.२५ - स्‍वतःची पुनर्निर्मिती करा (Re-create yourself)

समाज तुमच्‍यावर काही अपेक्षांना थोपविण्‍याचा प्रयत्‍न करेल परंतू तुम्‍हाला ते मान्‍य
करण्‍याची गरज नाही. तुमच्‍याजवळ स्‍वतःला घडविण्‍याचे सामर्थ्‍य आहे. तुम्हाला जे
व्‍हायचं आहे ते तुम्‍ही होऊ शकता. कोणालाही असे बोलण्‍याचा हक्‍क देऊ नका की, तुम्‍ही
कोण आहात आणि तुम्‍हाला कसे काम करायला पाहिजे.

तुम्‍हाला असा व्‍यक्‍ती बनायला पाहिजे जो ध्‍यान देतो आणि ज्‍याचे चरित्र मजबुत
आणि शक्‍तीशाली आहे.

सुत्र क्र.२६ - तुमचे हात निष्‍कलंक असू द्यात: (Keep your hands clean)

तुम्‍हाला एखादे चांगले सन्‍मानीय आणि उत्‍तम वर्तणुक असणा-या नागरिकासारखे


दिसायला पाहिजे. त्‍यांना कधीही याची जाणीव होऊ देऊ नये की तुम्‍ही तुमचे हात
भ्रष्‍टाचार आणि चतुराई करुन आपले हात खराब के ले ले आहेत. तुमचा देखावा तुमच्‍या
सत्‍तेसाठी आवश्‍यक आहे आणि तुम्‍हाला आपल्‍या नावाला आणि इज्‍जतीला पकडू न
ठे वायला पाहिजे.

ले खकांनी सल्‍ला दिला आहे की, दुस-यांना त्‍यांच्‍या वाईट कृ त्‍यांचा दोष घेऊ द्या
आणि सार्वजनिकरित्‍या/सर्वांसमक्ष आपले हात कधीही खराब करू नये.

सुत्र क्र.२७- विश्‍वास ठे वण्‍याच्‍या लोकांच्‍या गरजेवर खेळी खेळा, व्‍यक्‍तीपूजक


अनुयायांचा संप्रदाय निर्माण कराः (Play on people's need to believe to create
a cult-like following)

प्रत्‍येकजण स्‍वतःला कोणाशी तरी जुळले ले राहावे असे त्‍यांना वाटत असते. आणि
सर्वजण असे मानतात की ते ज्‍या गोष्‍टींशी जुळले ले आहेत ती गोष्‍ट त्‍यांच्‍यापेक्षाही मोठी
आहे. लोकं नेहमी एखाद्या वस्‍तू किं वा माणसाचा शोध घेत असतात जेणेकरुन त्‍यांच्‍या
गरजा किं वा ईच्‍छांचा फायदा उचलू शकतील.

अशा लोकांना मिळविण्‍यासाठी त्‍यांना खूपसा-या अपेक्षांची वचने द्या. उत्‍सुक बना आणि
लोकांना अनुसरण करण्‍यासाठी नवनवीन गोष्‍टी देत जा. लोकांना चालव‍िण्‍यासाठी
बलिदान देण्‍यासाठी त्‍यांना तयार करा.

अशाप्रकारे तुम्‍ही विश्‍वास आणि तुम्‍हाला प्रेम करणारे भक्‍त बनवू शकता.

सुत्र क्र.२८- कृ तीच्‍या रिंगनात बेधडक उतराः (Enter actions with boldness)

ह्या नियमामध्‍ये नेहमी आपल्‍या हेतू/उद्देश आणि आत्‍मविश्‍वास यांच्‍यासोबत राहण्‍याच्‍या


आवश्‍यकतेवर भर दिले ला आहे. जर तुम्‍ही निश्चित नाही तर काहीही सुरू करू नका.
कोणतीही शंका तुम्‍हाला निष्‍कर्ष मिळवून देणार नाही.

साहस तुम्‍हाला खूप शक्‍ती देईल.

सुत्र क्र.२९- अंतिम परिण‍तीच्‍या क्षणापर्यंत नियोजन कराः (Plan all the way to the
end)

कोणत्‍याही कार्याला सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत नियोजन करा. हे आवश्‍यक आहे की


तुम्‍ही शेवटच्‍या उद्देशाचा पहिल्‍यापासूनच अनुमान लावा, जेणेकरून पुढे येणा-या
समस्‍यांना समजण्‍यास/ओळखण्‍यास मदत होईल. नियोजनामुळे तुम्‍ही उत्‍कृ ष्‍ट कार्य
करण्‍यासाठी नेहमी तयार राहाल.

कोणत्‍याही गोष्‍टीत विना तयारीचे जाऊ नका. नेहमी शेवटच्‍या लक्ष्‍याचा विचार करा
आणि काही पाऊल पुढे चाला.

सुत्र क्र.३०- तुमचे संपादित सामर्थ्‍य हे विनासायास आहे, असे वाटू द्याः
(Make your accomplishments seem effortless)

भले ही तुम्‍ही एखाद्या कार्याला करण्‍यासाठी कितीही वेळ, शक्‍ती आणि श्रम लावले ले
असेल तुम्‍ही इच्‍छा कराल की तुमचे ते निष्‍कर्ष असे दिसायला पाहिजे की जसे ते
नैसर्गि करित्‍या आणि सहजतेणे पूर्ण झाले ले आहे. असे दाखविणे की कमी श्रम करूनही
तुम्‍ही कितीतरी अधिक मिळवू शकता तुमच्‍या शक्‍तीला वाढवत असते.
आणि जेंव्‍हा तुम्‍हाला असं विचारले जाईल तेंव्‍हा सांगू नका की तुम्‍ही तिथंपर्यंत कसे
पाहोचलात किं वा तुमची काम करण्‍याची पद्धत काय इत्‍यादी स्‍पष्‍टपणे काहीही सांगू नये.
आणि लोकांना तुमच्‍या यशाने/निष्‍कर्षाने अचंबित होऊ द्या.

आपली माहिती उघड करू नये, रहस्‍ये उजागर होऊ देऊ नये.

सुत्र क्र.३१- पर्यायांवर तुमचे नियंत्रण राहू द्या, तुमच्‍या कामाचे पत्‍ते इतरांनी पीसू द्याः
(Control the options: Get others to play with the cards you deal)

लोकांसोबत बोलत असताना तुम्‍हाला असे वाटू द्यायचे आहे की, त्‍यांना असं वाटायला हवं
की त्‍यांच्‍याजवळ आनखिनही पर्याय आहेत, त्‍यांना असं वाटू द्या की नियंत्रण त्‍यांच्‍या
हातात आहे खरं तर नियमं तुम्‍ही बनवत आहात. जर तुम्‍ही एखादे पर्याय दोन
निष्‍कर्षांसहित देऊ शकता तरीही फायदा तुम्‍हालाच होईल, कारण तुमच्‍या शत्रूला असे
वाटेल की त्‍याने निर्णय घेतले ला आहे आणि हेच तुमच्‍या शासन करण्‍याचे कारण ठरेल.

असं समजा की तुम्‍ही त्‍यांना दोन वाईट गोष्‍टींमधून कमी वाईट असले ल्‍या गोष्‍टीला
निवडण्‍याची संधी दिली.

सुत्र क्र.३२- लोकांच्‍या कल्‍पनांसोबत खेळाः (Play to people's fantasies)

सत्‍य नेहमीच वाईट, निराशाजनक आणि अत्‍याधिक आकर्षक नसतो. यासाठी कित्‍येक
बाबींमध्‍ये सत्‍यापासून बचाव करणे हाच एक चांगला पर्याय असतो. लोकांना सत्‍य
सांगणे त्‍यांना नेहमी संताप आणि त्रास देणारा ठरत असतो. यापेक्षा बरं होईल की एखादे
खोटे सत्‍य (A False-Truth) उपस्थित करायला पाहिजे. खोटे-सत्‍य, जे की अधिक
चांगले आहे खरं सांगण्‍यापेक्षा.

अशावेळी तुम्‍हाला लोकांच्‍या कल्‍पनांसोबत खेळायला आले पाहिजे. विचार करा की


त्‍यांना काय ऐकायला आवडते, त्‍यांना स्‍वतःविषयी काय ऐकायची ईच्‍छा आहे आणि त्‍यांना
तेच ऐकवा.

सुत्र क्र.३३- प्रत्‍येक व्‍यक्‍तीची एक कमजोरी शोधाः (Discover each man's


thumbscrew)

जगामध्‍ये प्रत्‍येक व्‍यक्‍तीची एखादी कमजोरी असतेच. कोणतीही कमजोरी नसने


अशक्‍य आहे.
हे माहित करणे की त्‍याची कमजोरी काय आहे, एका शत्रूला समाप्‍त करण्‍याची किल्‍ली
आहे. कमजोरी कोठे ही शोधली जाऊ शकते. एकदा का तुम्‍ही कोणाची कमजोरी शोधली,
तर त्‍याला आपल्‍या फायद्यासाठी उपयोग करा.

सूत्र क्र.३४- आपल्‍या स्‍वतःची ओळख, चाल एका राजपरिवारातील व्‍यक्‍तीसारखी बनवाः

राजासारखे वागा म्‍हणजे राजासारखे वागवले जाईल (Be Royal in your own
fashion: Act like a king to be treated like one)

आपल्‍या सर्वांनीच ही म्‍हण ऐकली असेल की, दुस-यांसोबत तसेच वागा किं वा वर्तन करा
जसे तुम्‍ही त्‍यांच्‍याकडू न अपेक्षा ठे वली असेल. Treat others how you want to be
treated before".

रॉबर्ट ग्रीन ह्या म्‍हणीच्‍या पुढे आपल्‍याला घेऊन जातात आणि म्‍हणतात की, तुम्‍हाला
अशापद्धतीने कार्य/कृ ती के ली पाहिजे जशी तुम्‍हाला इतरांकडू न करून घेण्‍याची ईच्‍छा
आहे. जर तुम्‍ही शक्‍ती-स्‍फु र्तीने कार्य/कृ ती आणि आत्‍मविश्‍वासाने करत असाल तर
लोकं सुद्धा तुमचा सन्‍मान असं करतील जसे तुम्‍ही एखादे राजे आहात.

जर तुम्‍ही चिं तित असाल आणि गुमान-थंड साध्‍या पद्धतीने कार्य-कृ ती करत असाल
तर, लोकं तुमची जास्‍त इज्‍जत-सन्‍मान करणार नाहीत.

आपल्‍या कार्य/कृ तींबद्दल सन्‍मान मिळवा. (Demand respect & portray this
through your actions)

सुत्र क्र.३५- वेळ साधण्‍यात नैपुण्‍य मिळवा/वेळे चे नियोजन करण्‍यात पटाईत व्‍हाः
(Master the art of timing)

स्‍वतःला एका आजारी व्‍यक्‍तीसारखे दर्शवा, आणि कधीही घाई-गडबडीत राहू नये. घाई-
गडबडीमध्‍ये राहणे असं दर्शविते की तुम्‍ही नियंत्रण हरवले लं आहे आणि तुम्‍ही स्‍वतःला
आणि वेळे ला नियोजित करू शकत नाही. योग्‍य वेळे चे गप्‍तहेर व्‍हा, योग्‍य वेळे ला
हेरायला शिका ज्‍यामुळे तुम्‍हाला शक्‍ती मिळे ल.

जोपर्यंत योग्‍य वेळ येत नाही तोपर्यंत गप्‍प राहायला शिका. आणि जसही योग्‍य वेळ
येईल जोराचा आघात/वार करा.
सुत्र क्र.३६- तुम्‍ही प्राप्‍त करू शकत नाही त्‍या गोष्‍टींची तुच्‍छता बाळगा, दुर्लक्ष हीच
बदल्‍याची उत्‍तम रीत आहेः (Disdain things you cannot have: ignoring is the
best revenge)

समोर येणा-या कोणत्‍याही समस्‍येला नजरअंदाज करा, दुर्ल क्षीत करा. असे के ल्‍याने
समस्‍येकडे तुमचे लक्ष कमी लागेल आणि हळू हळू ती समस्‍या नाहीशी होईल, समाप्‍त
होईल. आणि जर तुम्‍ही समोर येणा-या समस्‍येकडे लक्ष द्याल तर ती अजून मोठे रूप
धारण करेल.

अशाच पद्धतीने आपल्‍या शत्रूंसोबतही विचार करा. त्‍यांच्‍यावर लक्ष कें द्रित करून त्‍यांची
शक्‍ती वाढू देण्‍यापेक्षा चांगले होईल की तुम्‍ही त्‍यांना दुर्ल क्षित करा. असे के ल्‍याने तुमच्‍या
शत्रूंना तुमचा त्‍यांना नजरअंदाज करण्‍याचा स्‍वभाव खले ल, ते तडफडतील. अशा पद्धतीने
त्‍याच गोष्‍टींसोबत करा जे तुम्‍हाला मिळविण्‍याची ईच्‍छा आहे परंतू, मिळवू शकत नाही.

कधीही लोकांना हे कळू देऊ नका की, तुम्‍ही असे काहीतरी मिळवू ईच्छिता जे
तुमच्‍याजवळ नाहीए. त्‍यामध्‍ये कोणतेही रूची दाखवू नका. आणि अशाप्रकार
तुम्‍हीसुद्धा एका शक्‍तीशाली आणि मोठ्या व्‍यक्तिला बघू शकाल.

सुत्र क्र.३७- नजरेला कै द करणारा भव्‍य देखावा निर्माण कराः (Create compelling
spectacles)

जसं की आपण मागील नियमांमध्‍ये बघितले लं आहे, तुम्‍ही कसं बघता यावरच सर्वकाही
आहे. (your appearance is everything). तुम्‍हाला स्‍वतःच्‍या रूपाला आणि तुमच्‍या
जवळपासच्‍या/सभोवतालच्‍या वातावरणाला सुंदर कल्‍पनांनी आणि मोठ्या बातांनी/
गोष्‍टींनी आणि मोठ्या हावभावांनी उत्‍कृ ष्‍ट बनविले पाहिजे.

लोकांना मोठ-मोठे दृश्‍य दाखवून आकर्षि त करा. हा डोळे दिपवून टाकणारा


दृश्‍यरूपी ''चष्‍मा'' तुमच्‍या ख-या हेतूं/उद्देशांपासून इतरांचे लक्ष विचलीत करण्‍याच्‍या
कामी येईल.

सूत्र क्र. ३८- रुचेल तसा विचार करा, पण आचरण मात्र इतरांसारखेच कराः
(Think as you like but behave like others)

जर तुम्‍ही वेळे च्‍या विरुद्धा जाऊन देखावा करााल,आपल्‍या जुन्‍या विचारांना आणि
पद्धतींना दाखवाल तर लोकं विचार करतील की तुम्‍ही हे सर्व फक्‍त ध्‍यान आकर्षि त
करण्‍यासाठी करत आहात. लोकांचा लक्ष तुमच्‍याकडे वेधण्‍यासाठी आणि तुम्‍ही त्‍यांचा
अपमान करण्‍यासाठी असे करत आहात असे त्‍यांना वाटेल.
गर्दीमध्‍ये मिळू न-मिसळू न जाणे सोपे आहे. जेंव्‍हा तुम्‍ही लोकांच्‍या गराड्यात असाल तेंव्‍हा
त्‍यांच्‍या आचार-विचारांना समजून घ्‍या.

जोपर्यंत तुमचे खास मित्र आणि सोबती तुमच्‍या बोलण्‍याला समजून घेत नाही
तोपर्यंत आपले सत्‍य समोर ठे वू नये.

सूत्र क्र.३९- मासे पकडण्‍यासाठी पाणी ढवळू न काढाः (Stir up waters to catch
fish)

नेहमी शांत बनून राहण्‍याचा प्रयत्‍न करा.

ले खक सांगतात की राग, द्वेष यांसारख्‍या भावनांना दाखविल्‍याने कधीही मनासारखे


निष्‍कर्ष किं वा यश मिळत नाही. जर तुमचा शत्रू राग करत असेल तरीही तुम्‍ही शांत राहून
पुढे चालत राहाल तर तुमच्‍याजवळ सर्व सत्‍ता राहील आणि सर्व फायदा तुम्‍हाल मिळे ल.

सूत्र क्र.४०- मोफतच्‍या जेवणाचा तिरस्‍कार कराः (Despise the free lunch)

कोणतीही ठे वण्‍यालायक वस्‍तूची किं मत चुकवावीच लागते. आणि जी वस्‍तू मोफत आहे
ती ठे वण्‍यासारखी नाही. मोफत किं वा फु कटात मिळणा-या कोणत्‍याही गोष्‍टीमध्‍ये
लपव‍िले ले काम किं वा भटकविणारी चाल लपवून ठे वले ली असते.

जर तुम्‍ही ह्या गोष्‍टीला लक्षात ठे वलात की, तुम्‍ही प्रत्‍येक वस्‍तू किं वा गोष्‍टीची किं मत
चुकवत असता, तेंव्‍हा तुम्‍ही आत्‍मविश्‍वासी बनता आणि सोबतच तुम्‍ही कोणत्‍याही
धोक्‍यापासून स्‍वतःचा बचाव करता. मोफतमध्‍ये मिळणा-या कोणत्‍याही वस्‍तू-गोष्‍टीची
पूर्ण किं मत तुम्‍हाला चूकवायला पाहिजे.

विना-मोलभाव करता आपल्‍या संपत्‍तीने उदार आणि आत्‍मविश्‍वासी बनने तुम्‍हाला


अधिक शक्‍तीशाली दर्शविते.

सूत्र क्र.४१- महान व्‍यक्‍तीची भूमिूका गिरविणे टाळाः (Avoid stepping into a
great man's shoes)

ले खक स्‍वीकार करतात की, अतिश्रीमंत आई-वडिलांचे होणे अवघड गोष्‍ट असू शकते
आणि असा व्‍यक्‍ती बनने जो महान आणि प्रभावशाली आहे आवश्‍यक आहे की तुम्‍हाला
त्‍यांच्‍या यशाने घाबरायला नाही पाहिजे आणि त्‍यांच्‍या
सावलीतच अडकू न पडू नये.
तुम्‍ही स्‍वतःच्‍या यशासाठी आणि नाव कमविण्‍याचे हक्‍कदार आहात. त्‍यांना मागे
टाकण्‍यासाठी तुम्‍हाला त्‍यांच्‍यापेक्षा अधिक सफल/यशस्‍वी व्‍हावे लागेल. तुम्‍ही असे
करण्‍याच्‍या लायकीचे आहात आणि असे के ल्‍याने तुमची शक्‍ती/सत्‍ता (१०) दहा पट
वाढेल.

सूत्र क्र. ४२- मेंढ्या विखुरण्‍यासाठी मेंढपाळाला दणका हाणाः


(Strike the shepherd & the sheep will scatter)

सत्‍ताधारी आणि शक्‍तीशाली व्‍यक्‍ती अभिमानी असेल आणि सर्वसाधारणपणे समस्‍यांना


सामोरे जाईल. असे व्‍यक्‍ती ब-याचशा चिं तेचे स्‍त्रोत असतात. अशा लोकांना स्‍वतः
तुम्‍हाला प्रभावित करण्‍याची संधी देणे हानीकारक आहे. आणि त्‍यामुळे तुम्‍हाला अनेक
समस्‍यांचा सामना करावा लागू शकतो.

खरं तर अशा लोकांशी तुम्‍ही बोलचाल करत नसता, अशा लोकाना स्‍वतःपासून दूर
करायची गरज आहे. इतरांनाही त्‍यांच्‍याजवळ जाऊ देवू नये.

सूत्र क्र.४३- इतरांच्‍या हृदयाचा ठाव घ्‍या, त्‍यांच्‍या मनावर प्रभुत्‍व मिळवाः
(Work on the hearts & minds of others)

बळजबरी किं वा जबरदस्‍ती (coercion) आणि प्रलोभन (Seduction) यामध्‍ये एक


मुलभूत फरक आहे, बळजबरी किं वा जबरदस्‍ती तुमच्‍या मनाविरूद्ध कार्य करते तर
प्रलोभन लोकांना जाणिव न होऊ देता, न सांगता त्‍यांची दिशाभूल करतो. त्‍यांना
प्रोत्‍साहित करतो.

जर तुम्‍ही कोणाला यशस्‍वीपूर्वक प्रलोभन देऊ शकलात तर ते तुमच्‍यासाठी एकनिष्‍ठ


राहतील. प्रलोभन देण्‍याचा सर्वात परिणामकारक पद्धत आहे की, हे माहित करणे की
त्‍यांची कमजोरी काय आहे, त्‍यांच्‍यात कमकु वतपणा कोठे आहे. लक्षात राहू द्या की,
प्रत्‍येकजण वेगळा-एकमेव आहे, आणि तुम्‍ही एकाच पद्धतीने दोन्‍ही व्‍यक्‍तींना प्रलोभन
देऊ शकत नाही. लक्षात ठे वा की त्‍यांच्‍यासाठी काय आवश्‍यक आहे आणि ते कशाने
घाबरतात.

प्रलोभन ही एक किल्‍ली आहे तर बळजबरी फक्‍त शत्रू बनवित असते.

सूत्र क्र. ४४- ''प्रतिबिं ब-प्रभावाचा'' परिणाम साधा, शत्रूला क्रोध आणून निःशस्‍त्र कराः
(Disarm and infuriate with the mirror effect)
मिरर इफे क्‍ट म्‍हणजेच प्रतिबिं ब-प्रभावाचा एका अवजारासारखे वापर करा.

आरसा दाखविणे म्‍हणजे तुमच्‍या शत्रूंना त्‍यांचीच खरी प्रतिमा दाखविणे, त्‍यांचाच खरा रूप
त्‍यांना दाखविणे. जर तुम्‍ही तसेच कृ ती करता जसे तुमचे शत्रू करत असतात तर ते
गोंधळतील आणि तुमच्‍या हेतूंना समजू शकनार नाहीत.

दुसरीकडे, प्रतिबिं ब-प्रभाव हे एक असे अवजार आहे जे तुमच्‍या शत्रूंची थट्टा करणे आणि
अपमान करण्‍यासाठी मदत करू शकतो. अशारितीने ते स्‍वतःला आणि आपल्‍या कृ तीला/
कार्याला पाहू शकतात ज्‍यांच्‍यावर ते अधिकतरवेळा लक्ष देत नाहीत. ही एक प्रलोभन
देण्‍याची पद्धतसुद्धा आहे.

तुम्‍ही त्‍यांना पटवून सांगू शकता की, तुम्‍ही त्‍यांच्‍यासारखेच आहात, आणि असे
के ल्‍याने ते तुमच्‍यावर सहजतेने प्रभावित होतील.

सूत्र क्र.४५- बदलाच्‍या आवश्‍यकतेचा उपदेश करा, पण एकाएकी खूप सुधारणा आणू
नकाः
(Preach the need for change, but never reform too much at once)

कोणत्‍याही विकास आणि सुधारणेसाठी किं वा उत्‍कृ ष्‍टतेसाठी बदल अतिशय गरजेचे आहे.
त्‍यासोबतच हेदेखिल लक्षात ठे वणे गरजेचे आहे की एक मानव असण्‍याच्‍या नात्‍याने
आपण आपल्‍या सवयी आणि दिनचर्येच्‍या बळावर यशस्‍वी होत असतो.

खूप जास्‍त प्रमाणात बदल लोकांना चिं तीत करू शकते.

जर तुम्‍ही आता एखाद्या नव्‍या अवतारात पाऊल ठे वले असेल तर अतिजलद होणा-या
बदलांपासून बचाव करा. पुर्वी झाले ल्‍या बदलांचा आदर करा आणि नविन बदलांना हळू -
हळू आत्‍मसात करा. असे के ल्‍याने लोकं तुम्‍हाला अधिक सन्‍मान देतील.

सूत्र क्र. ४६- कधीही अतिप्रवीण व पारंगत दिसू नकाः ( Never appear too perfect)

अधितर लोकं असं विचार करतात की ते पारंगत होण्‍यासाठी कार्य करत आहेत आणि
खरंतर ते तिथपर्यंत कधीही पाहेाचतच नाहीत. ग्रीन असे म्‍हणतात की, जर तुम्‍ही खुपच
कमकु वत दिसून येत असाल किं वा अति-चांगले दिसून येत असाल तर तुम्‍ही स्‍वतःला
धोक्‍यामते टाकत आहात.

मत्‍सर किं वा हेवा ही एक सर्वसाधारण गोष्‍ट आहे आणि लोकांकडू न अतिषय


धोकादायकपणे कार्य-कृ ती करू घालते. जर तुम्‍ही परिपुर्ण दिसाल तर तुम्‍हाला
लोकांच्‍या मत्‍सराचा सामना करावा लागेल. लोकं तुमच्‍या परिपूर्णतेला पाहून
जळफळाट करू शकतात. आणि जर तुम्‍ही आपल्‍या कमकु वतपणा लोकांना दाखवता
तेंव्‍हा लोकं तुमच्‍याजवळ सहजतेने वावरतात आणि तुमच्‍यावर विश्‍वास करतात.
परिपूर्णता ही एक अशी गोष्‍ट आहे जी फक्‍त परमेश्‍वराचे आणि मृत व्‍यक्‍तींचे गुणधर्म
असतात.

सूत्र क्र.४७- हेतूच्‍या नक्‍की के लेल्‍या निशाणापलीकडे जाऊ नका, विजयाच्‍या क्षणी कु ठे
थांबायचे ते शिकाः
(Do not go past the mark you aimed for, in victory, learn when to stop)

हा नियम नेहमी एखाद्याला समस्‍यांतून उभारणारा असू शकतो. प्रत्‍येकजन यश आणि


काही जिं कण्‍याच्‍या जाणीवतेने प्रेम करत असतो. अशा वेळी नेहमी एक पाऊल पुढे राहणे
खूप आवश्‍यक आहे. ले खकांनी अगोदरच उल्‍ले ख के ले ले आहे की, पूर्ण योजना आणि
शेवटच्‍या उद्देशाला जाणणे अतिशय गरजेचे आहे. जेंव्‍हा तुम्‍ही तया उद्देशापर्यंत किं वा
लक्ष्‍यापर्यंत पाहेाचाल तेंव्‍हा थांबून जा.

कोणत्‍याही गोष्‍टीला अधिक दूर घेऊन जाण्‍याने तुमचे शत्रू वाढू शकतात. जे तुमच्‍या
यशाला थांबवू शकतात. धोरणे आणि नियोजनाला दुसरा कोणताही पर्याय नाही.

एक लक्ष निर्धारित करा आणि जेंव्‍हा तेथे पाहोचाल तेंव्‍हा तिथे थांबून जा.

सूत्र क्र. ४८- निराकरत्‍वाचा बहाणा कराः (Assume formlessness)

ह्यामध्‍ये रॉबर्ट ग्रीननी आपल्‍याला लक्षात ठे वायला सांगितले आहे की, काहीही
नेहमीसाठी एकसारखे नसते आणि सर्वकाही बदलू शकते. ह्याच कारणामुळे तुम्‍ही
तुमच्‍या नियोजनाला दाखवू शकत नाही. आपले नियोजन उघड के ल्‍याने तुम्‍ही कमकु वत
होता आणि तुमच्‍या शत्रूंना हे समजेल की तुमच्‍यावर कसा हल्‍ला करावा.

ग्रीन सांगतात की तुम्‍हाला अनुकू ल बनून राहायला पाहिजे जो कोणत्‍याही निष्‍कर्षावर


प्रतिक्रिया देऊ शके ल. ते पुढे म्‍हणतात की तुम्‍ही स्थिरतेवर निर्धारित राहू शकत नाही
कारण काहीही स्थिर नाही.

तुम्‍ही जास्‍त आरामदायक बनाल आणि तुम्‍ही अधिक आरामदायक बनल्‍यामुळे


तुम्‍ही स्‍वतःला कमकु वत करत असता.

तर लक्षात ठे वा वाचकांनो तुमचे नांव आणि अब्रु हाच तुमचा सन्‍मान आहे. त्‍यामुळे
जास्‍तीत जास्‍त आपल्‍या नावाला आणि इज्‍जतीला जपण्‍याचा प्रयत्‍न करा.

📘📗📙📖📕🔖📑

You might also like