You are on page 1of 12

‘अपे क्षा करणे ’ या अहं च्या पै लच

ू ी व्याप्ती, अपे क्षांचे प्रमाण अधिक असल्यास त्यामु ळे होणारी हानी


आणि अपे क्षा न्यून करण्यासाठी उपाय

१. ‘अपे क्षा करणे ’ या अहं च्या पै लच


ू ी व्याख्या आणि त्याचे स्वरूप

१ अ. व्याख्या

‘माझ्या मनाला अनु कूल अशी कृती इतरांनी करायला हवी’, असा विचार मनात ये णे, म्हणजे अपे क्षा
करणे .

१ आ. स्वरूप

‘अपे क्षा करणे ’, हा अहं चा एक पै लू आहे . अपे क्षा करतांना स्वतःला अधिक महत्त्व दिले जाते . अपे क्षा
इतरांकडू न आणि स्वतःकडू नही केल्या जातात. स्वतःकडू न अपे क्षा करतांना मनात स्वतःविषयीच्या
प्रतिक्रिया उमटले ल्या असतात. दुसर्‍याकडू न अपे क्षा करतांना ‘माझ्या मनात जे विचार आणि कल्पना
आहे त, त्याप्रमाणे घडावे ’, असे वाटत असते . त्या वे ळी इतरां च्या स्थितीचा आणि अडचणींचा विचार
होत नाही. ‘ज्या गोष्टीची किंवा कृतीची अपे क्षा आपण करतो, त्याचा सर्वां गीण अभ्यासही आपल्याकडू न
होत नाही.

२. अपे क्षांचे प्रमाण अधिक असण्याची कारणे

अ. ज्याच्या मनात विकल्प किंवा नकारात्मक विचार अधिक ये तात, त्याच्या मनात अपे क्षा अधिक
असतात. ज्याच्यात तीव्र अहं आहे , त्याच्यात अन्य स्वभावदोषांसह ‘अपे क्षा करणे ’ हा अहं चा पै लह
ू ी
तीव्र असतो. त्याच्यावर रज-तमाचे आवरण इतके घट् ट असते की, वारं वार चु कांची जाणीव करून
दे ऊनही त्याला त्यांची जाणीव होत नाही.

आ. अपे क्षेचे विचार ये ण्यास स्वतःच्या आवडी-निवडींचा भाग कारणीभूत असतो. ‘मला आवडते , तशी
कृती किंवा विचार समोरच्या व्यक्तीने करावा आणि ‘मला जे आवडत नाही, ती कृती करू नये ’, असा
त्यामागे हे तू असतो.

इ. कुटु ं बातील, ने हमी सहवासात असणार्‍या, तसे च जवळच्या व्यक्ती यां च्याकडू न अपे क्षांचे प्रमाण
अधिक असते . इतरांकडू न अपे क्षांचे प्रमाण अल्प असते किंवा नसते ही.

ई. एकमे कांमधील दे वाण-घे वाण हिशोब अधिक असल्यास, उदा. पती-पत्नी, आई-मु लगा या नात्यांत
अपे क्षांचे प्रमाण अधिक असते .
उ. कार्यालयातील अधिकारी व्यक्तींना कर्मचार्‍यांकडू न काम करून घे ण्याविषयी पु ष्कळ अपे क्षा असतात,
तर ‘कार्यालयात अधिक काम करावे लागू नये ’, अशी कर्मचार्‍यांची अपे क्षा असते .

३. अपे क्षांची पूर्ती न झाल्याने व्यक्तीवर होणारे परिणाम

अ. घरात पती-पत्नी एकमे कांकडू न अपे क्षा करतात. त्यांची पूर्तता ने हमीच होणे शक्य नसते . त्यामु ळे
पतीला किंवा पत्नीला राग ये तो. त्या रागाचे कधी प्रकटीकरण होते , तर कधी ती व्यक्ती आतल्या आत
धु मसत रहाते . त्याचा कधीही स्फोट होण्याची शक्यता असते .

आ. एकमे कां विषयी पूर्वग्रह निर्माण होऊन मनमोकळे पणाने बोलणे होत नाही. त्यामु ळे दुरावा निर्माण
होऊन एकमे कां विषयी नकारात्मक विचार ये तात. ‘एकमे कांपासून दरू राहिल्यास बरे ’, असे विचार ये ऊ
लागतात. केवळ प्रतिमा जपण्यासाठी कृती केल्या जातात.

इ. ‘समोरच्या व्यक्तीने अपे क्षांची पूर्ती का केली नाही ?’, या विचारां च्या मागे धावण्यात मनाची ऊर्जा
आणि वे ळ यांचा अपव्यय होतो. यामु ळे दुःख होते आणि मनात विचारांचा गोंधळ चालू होतो.

ई. अयोग्य अपे क्षा केल्यास समोरच्या व्यक्तीच्या मनात प्रतिक्रिया उमटू न दोघां च्याही साधने ची हानी
होते .

४. अपे क्षा का केली जाते ?

अ. मनात स्वतः किंवा अन्य व्यक्ती यां च्याविषयी काही आदर्श, कल्पना, तसे च पूर्वजन्मीचे सं स्कार
यां च्या आधारे एक विशिष्ट चौकट किंवा प्रतिमा बनले ली असते . त्यामु ळे मनात ‘त्याला अनु रूप अशा
सर्व गोष्टी घडाव्यात’, अशी सु प्त इच्छा असते . त्या विचारां च्या आधारे इतरांना तसे करण्यास आणि
वागण्यास सु चवले जाते . असे सु चवणे , म्हणजे च ‘अपे क्षा करणे ’ होय.

आ. अपे क्षा व्यक्त होऊन सं बंधित व्यक्तीपर्यं त पोहोचल्यास त्याविषयी कृती करण्यासाठी ती व्यक्ती
विचार करते . जर अपे क्षा सं बंधितांपर्यं त पोहोचल्या नाहीत, तर त्यांची पूर्ती न होऊन अशा अपे क्षांची
सं ख्या वाढत जाते . अशा अपे क्षांची मनात गर्दी होऊन त्यात मनाची पु ष्कळ ऊर्जा आणि वे ळ वाया जातो.

इ. चित्तावर ‘अपे क्षा’ करण्याचा पूर्वसं स्कार दृढ असल्यास अपे क्षा करण्याचे प्रमाण अधिक असते .

ई. ‘माझ्याकडे सत्ता आणि अधिकार आहे ’, ‘मी इतरांपेक्षा कुणीतरी वे गळा आहे ’ इत्यादी अहं चे पै लू
ज्याच्यात अधिक, तितकी तो इतरांकडू न अधिक अपे क्षा करतो.

उ. दे वाण-घे वाण हिशोब पूर्ण होईपर्यं त सं बधितांकडू न अपे क्षा करण्याचा भाग अधिक असतो.
ऊ. एखाद्या प्रसं गात स्वतःला काही करायची इच्छा नसल्यास ‘इतरांनी काहीतरी करावे ’, असा विचार
प्रबळ होऊन इतरांकडू न अपे क्षा केल्या जातात.

ए. प्रतिमा जपण्याचे विचार जे वढे अधिक, ते वढ्या स्वतःकडू न अपे क्षा करण्याचे प्रमाण अधिक असते .

ऐ. ‘अनोळखी किंवा ज्या व्यक्तीशी नवीन ओळख झाली आहे , अशांकडू न अपे क्षा करण्याचा भाग न्यून
असतो.

ओ. आळशी मनु ष्य ‘इतरांनी मला साहाय्य करावे ’, अशा प्रकारे अधिक अपे क्षा करतो.

औ. परिस्थिती स्वीकारता न आल्यास किंवा अडचणी समजून न घे तल्यास अपे क्षा करण्याचे प्रमाण
वाढते .

५. स्थळ, काळ आणि व्यक्ती यांना अनु सरून साधकांकडू न केल्या जाणार्‍या अपे क्षांची उदाहरणे

५ अ. से वेचे ठिकाण

१. सर्व साधक आणि सहकारी यांनी से वेच्या ठिकाणी वे ळेत उपस्थित रहावे . आपल्या अनु पस्थितीविषयी
पूर्वकल्पना द्यावी. तसे त्यांनी फलकावर लिहन
ू जावे .

२. त्यांनी वे ळेचा अपव्यय टाळू न से वेची फलनिष्पत्ती वाढवावी.

३. साधकांनी एकमे कां शी मिळू न मिसळू न रहावे .

४. सहसाधकाने से वेत साहाय्य करावे . स्वतःच्या अनु पस्थितीत ‘अन्य साधकांनी प्रलंबित से वा पूर्ण
करावी.

५. ‘एखाद्या से वेतील सर्व बारकावे मला ठाऊक आहे त. त्यामु ळे सहसाधकांनी मला से वेतील अडचणी
आणि नियोजन यां विषयी विचारावे . मी सर्वांत मोठा असल्याने सर्वांनी मला मान द्यावा’, असा विचार ये णे.

६. मला शारीरिक कष्टाची से वा सां गू नये .

७. उत्तरदायी साधकाने तत्परते ने निर्णय द्यावा आणि माझ्या अडचणी सोडवाव्यात.

८. ‘पूर्वनियोजन न करता एखादी गोष्ट तातडीने करायची आहे ’, असे साधकांनी सां गू नये .

९. से वा सां गतांना साधकाने मला त्या पाठीमागचा उद्दे श आणि मनाची विचारप्रक्रियाही सां गावी.

१०. एखादी से वा करण्याच्या सं दर्भात साधकाने मला माध्यम न बनवता सं बंधित साधकाला थे ट सां गावे .

११. साधकां च्या वे ळेचा विचार करून त्यां च्या से वेचे नियोजन करावे .
५ आ. निवासस्थान

१. खोलीतील साधकांनी एकमे कां शी अनौपचारिकपणे बोलावे . सहसाधकां च्या चु का वे ळच्या वे ळी प्रेमाने
सां गाव्यात.

२. सहसाधकाला अडचण असल्यास साहाय्य करावे . रुग्णाईत साधकाची काळजी घ्यावी.

३. खोलीतील साधकांनी आवरण्याचे आणि झोपण्याचे नियोजन करावे .

४. ‘साधक झोपले असल्यास त्यांची झोपमोड होणार नाही’, याची काळजी घ्यावी.

५ इ. आश्रम

१. आश्रम व्यवस्थापनातील आणि अन्य साधकांनी माझी ये ता-जाता विचारपूस करावी. मी घरी जाऊन
आल्यावर माझी विचारपूस करावी.

२. से वांचे नियोजन करतांना माझी शारीरिक क्षमता आणि वय यांचा विचार करावा.

३. ‘दिसे ल ते कर्तव्य’ यानु सार कुठे काही अयोग्य, अव्यवस्थित किंवा अस्वच्छ दिसत असल्यास
माझ्यासह सर्वांनी ते तत्परते ने दुरुस्त करावे .

४. ‘कार्यपद्धतीचे पालन करणे ’, हे सूतर् विभाग, खोली, आश्रम आणि अन्य ठिकाणी प्रत्ये क क्षणी
साधकांनी कृतीत आणावे .

५ ई. कुटु ं बीय

‘भावनाशीलता’ अधिक असल्यास कुटु ं बियांकडू न अधिक अपे क्षा असतात.

१. कुटु ं बियांनी वरचे वर माझी विचारपूस करावी. मी घरी गे ल्यावर मला वे ळ द्यावा. माझ्याशी बोलावे .

२. घरी होणारे विशे ष कार्यक् रम, प्रसं ग आणि घटना यां विषयी मला सां गावे .

३. कुटु ं बीय आणि नाते वाईक यांनी साधना करावी. व्यवहारातील किंवा माये तील गोष्टी बोलण्यापे क्षा
त्यांनी साधने विषयी बोलावे .

४. मी घरी आल्यावर ते थे अधिक काळ रहाण्यासाठी आग्रह करू नये .


६. साधकांकडू न अपे क्षा

अ. महत्त्वाची से वा चालू असतांना साधकांनी घरी जाऊ नये . घरी जातांना हातातील से वा पूर्ण करून
अन्य से वांचे हस्तांतरण करावे .

आ. सहसाधकाने वे ळेत निरोप द्यावा. त्याने वे ळेत नियोजन आणि कृती करावी. त्याने आयत्या वे ळी कृती
करायला सां गू नये .

इ. एखाद्या साधकाने ‘अमु क से वा करतो’, असे सां गितले आणि काही कारणाने ती से वा करणे त्याला शक्य
होणार नसे ल, तर त्याने तसे कळवावे .

ई. साधकाला पाठवले ली धारिका/वस्तू मिळाल्याचे त्याने कळवावे .

उ. साधकांनी ‘मिस्ड कॉल’ किंवा लघु संदेश यांना त्वरित प्रतिसाद द्यावा.

ऊ. मी एखादी से वा किंवा कृती चां गली केल्यास इतरांनी माझे कौतु क करावे , मला चां गले म्हणावे .

७. अपे क्षा न्यून करण्यासाठी उपाय

अपे क्षांची पूर्ती न झाल्यास नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढते . समोरच्या व्यक्तविषयी पूर्वग्रह निर्माण
होतो. ‘अमु क व्यक्ती अशीच आहे , तशीच आहे ’, असे विचार मनावर बिं बले जातात. ‘खरे तर मनु ष्याच्या
स्थितीत क्षणोक्षणी पालट होत असतो’, हे लक्षात घे ऊन सं वाद साधायला हवा. कर्तृत्ववान मनु ष्य
साहाय्याची अपे क्षा न करता स्वतःच कृती करून फलनिष्पत्ती वाढवतो. साहजिकच तो इतरांकडू न अपे क्षा
करण्याचे टाळतो. अपे क्षा न्यून करण्यासाठी पु ढील प्रयत्न करून पहावे त.

७ अ. मनाच्या स्तरावर

१. ‘अपे क्षा करणे ’ या अहं च्या पै लव ू ना दिल्याने अपे क्षा न्यून होतात.
ू र स्वयं सच

२. पूर्ण न झाले ल्या अपे क्षांचा मनाच्या स्तरावर आढावा घे ऊन अवाजवी अपे क्षा, ज्यांची पूर्ती होणार नाही
अशा अपे क्षा, तसे च ज्यापासून काही लाभ होणार नाही, अशा अपे क्षा करणे सोडू न दे णे आणि त्यांची
नामोनिशाणी मनाच्या पटलावरून पु सून टाकणे , हाच सर्वोत्तम उपाय आहे . क्षारयु क्त पाणी जसे
अकार्यक्षम असते , तसे अपे क्षायु क्त मन अकार्यक्षम असते . ‘अपे क्षा करणे टाळल्यास मनाच्या ऊर्जेची
पु ष्कळ बचत होईल’, याची मनाला जाणीव करून दिल्यास अपे क्षा करण्याचे प्रमाण उणावे ल. अशा
रितीने मनाची स्वच्छता प्रतिदिन केली पाहिजे .
३. साधकांची मने एकमे कां शी जु ळल्यास एकमे कांकडू न अपे क्षा करण्याचा भाग न्यून होतो. ‘छोट्या
छोट्या कृती इतरांनी कराव्यात’, अशी अपे क्षा करण्यापे क्षा ‘या कृती मलाच करायच्या आहे त’, अशी
ू ना द्यावी.
स्वयं सच

४. ‘एखादी कृती करण्याइतपत माझी शारीरिक क्षमता चां गली असतांना मी ‘प्रकृतीला कुरवाळत बसणे ’
टाळायला हवे ’, याची मनाला सातत्याने जाणीव करून दिल्यास छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरां वर
ू रहाणे किंवा त्यां च्याकडू न अपे क्षा करणे न्यून होते .
अवलं बन

५. ‘प्रत्ये काची साधना आणि कृती त्याच्या प्रकृतीनु सार होत असतांना मी त्याच्याकडू न अपे क्षा करणे
चूक आहे ’, याची मनाला सतत जाणीव करून दे णे

६. प्रेमभाव असल्यास अपे क्षा करण्याचे प्रमाण न्यून असते . यामु ळे एकमे कांची विचारपूस करून
प्रेमभाव वाढवायला हवा. अहं अल्प असले ल्या साधकात प्रेमभाव अधिक असल्याने तो अपे क्षा
करण्याऐवजी ‘मी इतरांसाठी काय करू शकतो ?’, असा विचार करतो.

७. पू. सं दीप आळशी यांनी सां गितल्याप्रमाणे ‘दुसर्‍याने आपल्याला समजून घ्यावे , यापे क्षा आपण दुसर्‍
याला समजून घ्यायला हवे ’, असा दृष्टीकोन ठे वल्यास अपे क्षा करण्याचा भाग न्यून होतो.

८. ‘इतरां च्या ठिकाणी स्वतः आहोत’, असा विचार करणे

९. समोरच्या व्यक्तीने ‘काय करावे किंवा काय करू नये ’, असा विचार करतांना ‘त्या व्यक्तीवर माझी
ू नाही’, याची जाणीव ठे वणे
साधना अवलं बन

१०. स्वीकारण्याची वृ त्ती वाढवणे . ‘दे व परिस्थिती निर्माण करून ती स्वीकारून मला स्थिर रहाण्याची सं धी
दे त आहे ’, असा विचार करणे

११. वास्तव परिस्थितीचा अभ्यास करणे , नकारात्मकता अल्प करून सकारात्मकता वाढवणे , ‘स्व’ला
विसरणे , तसे च आसक्ती न्यून करणे , यांसाठी प्रयत्न वाढवावे त.

१२. नम्रता, नियोजनक्षमता, शिकण्याची वृ त्ती असणे , तत्त्वनिष्ठता, निरपे क्ष वृ त्ती आदी गु ण अं गी
बाणवल्यावर अपे क्षांचे प्रमाण न्यून होऊ लागते .

१३. ‘आपले वागणे योग्य नसल्यास इतरांकडू न साहाय्याची अपे क्षा करण्यास आपण अपात्र आहोत’,
याची जाणीव होऊन अपे क्षा करण्याचे प्रमाण न्यून होते .

१४. मनु ष्य साक्षीभावाच्या टप्प्याला गे ल्यावर त्याला कुठल्याच गोष्टीविषयी काहीच वाटत नाही.

७ आ. आध्यात्मिक स्तरावर
१. व्यष्टी आणि समष्टी साधना चां गली असले ल्या व्यक्तीकडू न अपे क्षा केल्या जात नाहीत.

२. प्रार्थना आणि कृतज्ञता यांची सं ख्यात्मक वाढ झाल्यावर अपे क्षांचे प्रमाण उणावते .

३. साधक दै नंदिन जीवनातील प्रत्ये क कृतीचे अध्यात्मीकरण करायला शिकल्यास, तसे च प्रत्ये क कृती
साधना म्हणून करू लागल्यास अपे क्षा न्यून होतात.

४. धर्माचरण करणार्‍या व्यक्तीत दे वाप्रती श्रद्धा अधिक असल्याने अपे क्षा अल्प असतात.

५. मोकळे पणाने बोलणे आणि अं तर्मुखता या गु णांची वृ द्धी झाल्यावर अपे क्षा करणे न्यून होते . ‘स्वतःचे
कुठे चु कते ?’, याचे चिं तन वाढवल्यास अपे क्षा करणे उणावते .

६. दै निक सनातन प्रभातमधील साधने विषयीची सूतर् े जो दै नंदिन कृतीत आणतो, म्हणजे जीवनाचे पूर्ण
अध्यात्मीकरण करतो, त्याच्यातील ‘अपे क्षा करणे ’ हा अहं चा पै लू न्यून होतो.

७. ‘एखाद्या प्रसं गात मला काय अपे क्षित आहे ’, असा विचार करण्यापे क्षा ‘दे वाला काय अपे क्षित आहे
?’, असा विचार करावा.

८. भावजागृ तीचे प्रयत्न वाढवल्यावर माये तील गोष्टींत माणसाचे मन गु ं तन


ू रहात नाही आणि
भक्तीभाव निर्माण होतो. भक्ताच्या पाठीशी दे व असतो. मग त्या भक्ताला कुणाकडू नही अपे क्षा कराव्या
लागत नाहीत; कारण त्याच्या अपे क्षांची पूर्ती दे व आधीच करतो. त्यामु ळे भक्तांना कसलीच चिं ता किंवा
ताणतणाव यांना सामोरे जावे लागत नाही.

९. ‘दे व सतत समवे त आहे आणि दे वच सर्व करतो’, असा ज्याचा भाव असतो, तो कधीही अपे क्षा करत
नाही.

१०. आर्तते ने दे वाचा धावा करणार्‍या व्यक्तीच्या सर्व आवश्यकता दे व पूर्ण करतो. सतत दे वाच्या
अनु संधानात रहाणार्‍या व्यक्तीला इतरांकडू न अपे क्षा करण्याची आवश्यकता भासत नाही.

११. ‘जे होते , ते माझ्या भल्यासाठीच होत आहे ’, असा भाव असणार्‍याच्या मनात अपे क्षा नसतात.

१२. प.पू. पांडे महाराज यांनी सां गितल्याप्रमाणे ‘सर्वत्र भगवं ताचे आत्मचै तन्य कार्यरत आहे ’, असा
भाव ठे वल्यास साधकाच्या मनात समोरच्या व्यक्तीकडू न अपे क्षा करण्याचा विचार ये त नाही.

१३. ज्या व्यक्तीला ईश्‍वरप्राप्तीची तळमळ अधिक आहे , त्याच्या सर्व आवश्यकता दे व पूर्ण करतो.

१४. दे वाला आपल्या मनातील प्रत्ये क विचार कळतो. तो आपली इच्छापूर्ती करण्यास आतु र असतो.
आपण शरणागत भावाने आपले स्वभावदोष आणि अहं नष्ट करण्यासाठी आर्तते ने प्रार्थना केल्यास
‘अपे क्षा करणे ’ हा स्वभावदोषही न्यून झाल्याचे लक्षात ये ते.
‘काही वे ळा अपे क्षांचे स्वरूप योग्य असते , उदा. सर्व साधक आणि सहकारी यांनी से वेच्या ठिकाणी वे ळेत
उपस्थित रहावे . आपल्या अनु पस्थितीविषयी पूर्वकल्पना द्यावी. असे असले तरी त्याप्रमाणे न झाल्यास
स्वतःच्या मनात प्रतिक्रिया उमटणे अथवा पूर्वग्रह निर्माण होणे आदी नकारात्मक परिणाम होतात. या
अनु षंगाने ‘अपे क्षा करणे ’ या अहं च्या पै लच्ू या अं तर्गत प्रयत्न करता ये तील.

यासारख्या अन्यही प्रसं गांत समष्टी स्तरावर निर्माण होणारी असु विधा टाळण्यासाठी सं बंधित साधकाला
साहाय्य म्हणून हे सूतर् योग्य पद्धतीने सां गता ये ईल.’

व्यक् ‍तीमध्ये अहं चा थोडा जरी अं श असला, तर तिला ईश्‍वरप्राप्ती होणार नाही. यासाठी साधना करत
असतांना अहं -निर्मूलनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्‍न करणे आवश्यक असते . प्रार्थना, कृतज्ञता, शारीरिक
से वा यांसारख्या कृतींनी अहं अल्प होण्यास मदत होते .

१. अहं चे दुष्परिणाम

१ अ. अहं मुळे दुःख होणे

मी करता म्हणशी । ते णे तू दुःखी होशी ।

राम करता म्हणता पावशी । यश कीर्ती प्रताप । – दासबोध, दशक ६, समास ७, ओवी ३६

भवार्थ : अहं जितका जास्त, तितकी व्यक् ‍ती जास्त दुःखी होते . मनोरुग्णांचा अहं सर्वसाधारण व्यक् ‍
तीपे क्षा जास्त असल्यामु ळे ते जास्त दुःखी असतात. माझी सं पत्ती, माझे शरीर असे विचार असले , तर
स्वतःची सं पत्ती न्यून झाली किंवा स्वतःच्या शरिराला रोग झाला, तर व्यक् ‍ती दुःखी होते ; पण दुसर्‍
यांसंबंधी तसे घडल्यास ती व्यक् ‍ती दुःखी होत नाही. अहं मुळे मनाला होणारे दुःख हे काही वे ळा शारीरिक
वे दने पेक्षाही अधिक त्रासदायक असते . याउलट सं त सर्वच परमे श‍व
् राचे समजतात, स्वतःचे काहीएक
समजत नाहीत; म्हणून ते कधी दुःखी होत नाहीत, ने हमीच आनं दात असतात.

१ आ. अहं कार हाच सर्व दुःखांचे मूळ

`वासना आहे म्हणून आसक् ‍ती आहे , अहं कार आहे . अहं कार म्हणजे च स्वार्थ, अभिमान, दे हबु द्धी. अहं कार
हाच घाव आहे , हीच आग आहे . अहं कारच दुःख आणि पीडा दे तो. अहं कारच पु नर्जन्माचे मूळ आहे . एक
अहं कार नष्ट झाला की, सगळी दुःखे समूळ नष्ट होतात. अहं कार गे ला की, प्रसन्नता, शांती, विश्रांती
आणि आनं द लाभतो.’
१ इ. अहं मुळे खर्‍या अर्थाने सु ख उपभोगता न ये णे

अहं चा त्याग केल्याविना सामान्य सु खसु द्धा उपभोगता ये त नाही, उदा. आवडता पदार्थ खायचे सु ख
उपभोगतांना आपण एखादे मोठे प्राध्यापक, श्रीमं त मनु ष्य अथवा कोणीतरी मोठे आहोत, याची आठवण
ठे वली, तर ते सु ख कधीच उपभोगता ये णार नाही. कोणते ही भौतिक सु ख उपभोगतांना जर आपल्याला
आपले पद वा विद्वत्ता यांचा विसर पडला, तरच ते सु ख खर्‍या अर्थाने उपभोगता ये ते.

१ ई. अहं युक्‍त कर्माचा नाश, तर निष्काम भावाने केले ले कर्म अमर होणे

अहं युक्‍त कर्माच्या सं दर्भात ‘कालः पिबति तद् रसम् ।’; म्हणजे ‘काळ त्याचा रस पिऊन टाकतो’, असे
सां गितले आहे . याचाच अर्थ अहं युक्‍त कर्म काळाच्या ओघात नाश पावते . याचे महत्त्व पूर्वीच्या काळी
ठाऊक असल्याने ऋषीमु नीच नव्हे , तर प्रत्ये क जणच स्वतःचे नाव किंवा कीर्ती यांची यत्किंचितही
अपे क्षा न ठे वता निष्काम भावाने कर्म करत. याचे उत्तम आणि सर्वश्रेष्ठ उदाहरण म्हणजे आपले वे द अन्
प्राचीन शिल्पे . वे दां वर कोणाचे ही नाव लिहिले ले किंवा शिल्पां वर कोणाचे ही नाव कोरले ले नाही; म्हणूनच
वे द अमर आणि शिल्पकृती चिरं जीव आहे त.

१ उ. अहं सर्वच नष्ट करतो

जरा रूपं हरति धै र्यमाशा मृ त्यु ः प्राणान् धर्मचर्यामसूया ।

क् रोधः श्रियं शीलमनार्यसे वा ह्रियं काम: सर्वमे वाभिमानः ।। – महाभारत, उद्योगपर्व, अध्याय ३५, श्‍
लोक ४३

अर्थ : म्हातारपण रूप हिरावून ने ते, आशा धै र्य नष्ट करते , मृ त्यू प्राण हरण करतो, द्वे ष धर्माचरणाचा नाश
करतो, क् रोध सं पत्ती नष्ट करतो, अनार्य (असं स्कृत) माणसांची से वा करण्याने शील भ्रष्ट होते , काम
लज्जा नाहीशी करतो आणि अभिमान (अहं ) हा सर्वच नष्ट करतो.

१ ऊ. दानाचा लाभ न मिळणे

महाभारतात पु ढील कथा आहे . एकदा एक ब्राह्मण आणि त्याचे कुटु ं बीय स्वतः उपाशी असतांना त्यां च्या
वाट्याचे अन्न त्यांनी दारी आले ल्या वृ द्ध अतिथीला भिक्षा म्हणून दे ऊन टाकले . तो वृ द्ध अतिथी अन्न
खाऊन तृ प्त झाला. नं तर त्याने हात धु तले . ते वढ्यात ते थे एक मुं गस
ू आले आणि हात धु तले ल्या ठिकाणी
पाण्यात त्याने अं ग घु सळले , ते व्हा त्या मुं गसाचे अर्धे शरीर सोने री झाले . ही वार्ता सर्वत्र पसरली.
धर्मराजाला हे समजल्यावर त्याच्या मनात विचार आला, ‘आपण तर लक्षावधी लोकांना जे ऊ घालतो. जर
ू आले आणि त्याने शरीर घु सळले , तर मुं गसाचे उरले ले अर्धे शरीरही सोने री होईल.’ मुं गस
ये थे मुं गस ू आले ,
त्याने तसे केले ; परं तु त्याचे अर्धे शरीर सोने री मात्र झाले नाही. धर्मराजाने याचे कारण विचारल्यावर
श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘तु ला अहं झाला आहे की, मीच जे व ू घालू शकतो, अन्नदान करू शकतो. त्यामु ळे
मुं गसाचे शरीर सोने री झाले नाही.’’

१ ए. खरी साधना न होणे


‘मी’पणावीण साधन । करू जाणे तोची धन्य ।

२. अहं अल्प करण्याचे उपाय

ईश्‍वर म्हणजे शून्य अहं ; म्हणून आपल्यातील अहं नष्ट करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ईश्‍वरासारखे
होण्याचा, म्हणजे च ईश्‍वराशी एकरूप होण्याचा प्रयत्‍न करणे . ईश्‍वराशी एकरूप होणे म्हणजे त्याचे
विविध गु ण आपल्या अं गी आणणे होय. यासाठी प्रतिदिन करावयाचे प्रयत्‍न म्हणजे साधना. ही साधना
कशी करायची, हे पु ढे दिले आहे .

२ अ. से वा

१. अमु क एक से वा श्रेष्ठ आणि अमु क एक से वा कनिष्ठ असे न मानता ‘से वा म्हणजे आपले तन, मन,
धन, बु द्धी अन् अहं अर्पण करण्याचे माध्यम आहे ’, असा भाव ठे वावा.

२. से वा करतांना ‘मी से वक आहे ’, असा भाव ठे वावा.

३. शूदर् वर्णाच्या से वेने, उदा. भांडी घासणे , झाडलोट करणे , प्रसाधनगृ हाची स्वच्छताइत्यादींनी अहं
लवकर न्यून होण्यास साहाय्य होते .

२ आ. चूक मान्य करण्याची वृ त्ती ठे वणे

मनु ष्य ईश्‍वरासारखा परिपूर्ण नसल्याने त्याच्याकडू न चु का होणारच. प्रत्ये काकडू नच कोणत्या ना कोणत्या
स्तरावर अल्प- अधिक प्रमाणात चु का होतच असतात; पण बर्‍याचदा सामान्य व्यक्ती अाणि
साधकस्वतःमधील अहं मुळे त्याच्याकडू न एखादी चूक झाल्यास ती मान्य करायला सिद्ध नसतो. चूक
मान्य न करणे म्हणजे स्वतःमधील अहं ला खतपाणी घालणे , तर ‘मी चु कलो’, असे म्हणणे म्हणजे
स्वतःचा अहं अल्प करण्याचा प्रयत्‍न करणे होय. पहिल्या टप्प्यात चूक मान्य करण्यास शिकावे , तर
दुसर्‍या टप्प्यात चु कीविषयी ईश्‍वराची आणि ज्या व्यक् ‍तीच्या सं दर्भात चूक घडली, तिची क्षमा मागावी.
यामु ळे अहं आणखी अल्प होण्यास साहाय्य होते .

२ इ. नम्रता

‘विद्या विनये न शोभते ।’ असे सु वचन आहे . विनय नसला, तर अहं आला, म्हणजे अविद्या ये ते. एखादा
कितीही ज्ञानी झाला, तरी त्याला ईश्‍वराइतके ज्ञान होत नाही; म्हणून ती उणीव विनयाने भरून काढावी,
म्हणजे ईश्‍वराइतके ज्ञान होते . प्रत्ये क व्यक् ‍ती आणि गोष्ट यां च्याविषयी आपण जितके अधिक नम्र
होऊ, तितका आपला अहं लवकर अल्प होतो.

२ ई. सतत दुसर्‍यांना शिकवत रहाण्यापे क्षा इतरांकडू न शिकण्याची वृ त्ती ठे वणे

सतत शिकत रहाणे , हे मनु ष्याच्या स्वभावाचे एक वै शिष्ट्य आहे ; मात्र काही जणांना याचा विसर
पडल्याने ते सतत दुसर्‍यांना शिकवण्याचे च काम करतात. यामु ळे ‘आपण कोणीतरी मोठे आहोत आणि
आपले सर्व जण ऐकतात’, असे वाटू न अहं वाढतो. याउलट जिथे शिकण्याची वृ त्ती असते , तिथे आपल्यात
अज्ञान असल्याची जाणीव असते आणि जिथे अज्ञान आहे , तिथे अहं नसतो.

२ उ. कौतु काची अपे क्षा न ठे वणे

कौतु काची अपे क्षा ठे वणे , हे अहं चेच निर्दे शक आहे . सर्वच गोष्टी गु रूंच्या किंवा ईश्‍वराच्या इच्छे नु सार वा
नियमानु सार होत आहे त, असा भाव ने हमी ठे वला, तर कौतु काची अभिलाषा निर्माण होत नाही. तसे च
एखाद्याकडू न स्वतःचे कौतु क झाल्यास त्या कौतु काचे रूपांतर साधने च्या दृष्टीने काहीतरी शिकण्यात
केले , तर त्या कौतु काचा अहं निर्माण होत नाही.

२ ऊ. स्वतःची तु लना स्वतःपे क्षा श्रेष्ठ लोकां शी करणे

बालपणीची जी अहं रहित वृ त्ती असते , ती मोठे पणी नष्ट होण्यास मु ख्यत्वे दोन गोष्टी कारणीभूत ठरतात
– विद्या आणि पै सा. या दोन्हींमुळे ‘मला काहीतरी कळते आणि मी कुणीतरी श्रेष्ठ आहे ’, ही वृ त्ती निर्माण
होते . हीच वृ त्ती पु ढे घातक ठरते . यासाठी प्रत्ये काने स्वतःची तु लना स्वतःपे क्षा श्रेष्ठ लोकां शी करावी,
उदा. गायनात प्रवीण असले ल्याने आपल्यापे क्षा श्रेष्ठ गायकाशी, कार्यालयात काम करणार्‍याने
आपल्यापे क्षा उच्च पदावर असले ल्याशी स्वतःची तु लना करावी. त्याचप्रमाणे साधकाने आपल्यापे क्षा
उन्नत असले ल्या साधकाशी स्वतःची तु लना करावी. सं त कबीरसु द्धा स्वतःच्या भक्तीची तु लना गोपींच्या
भक्तीशी करतांना पु ढीलप्रमाणे सां गतात – ‘कबीर, कबीर’ म्हणून माझे कौतु क काय करता ? यमु नेच्या
तिरावर जाऊन पहा. एकेका गोपीच्या कृष्णावरील प्रेमात लाखो कबीर वाहन
ू जातील.

२ ए. लहान मु लां शी खे ळणे

लहान मु लां शी खे ळल्याने थोड्या प्रमाणात तरी आपण आपला ‘मोठे ’पणा विसरतो.

२ ऐ. स्वतःविषयी इतरांना काही न सां गणे

स्वतःचे सु ख-दुःख, प्रपं चातील घडामोडी इत्यादी जे व्हा एखादा दुसर्‍यांना सतत सां गतो, ते व्हा
त्याच्यात दे हबु द्धी फार असते . स्वतःविषयी इतरांना काही न सां गितल्याने दे हबु द्धी आपोआप न्यून होऊ
लागते .

२ ओ. कुटु ं बियां शी वागतांना स्वे च्छे पे क्षा परे च्छे ने वागणे

२ औ. ‘मी’, ‘माझे ’ असा उल्ले ख करण्याचे टाळणे

‘मी’, ‘माझे ’ असा उल्ले ख न करण्याने किंवा करायचा झाल्यास ‘तो’, ‘त्याचे ’, ‘गु रूंचे ’ असा तृ तीय पु रुषी
उल्ले ख स्वतःसं बंधी करण्याने ‘मी’ची भावना न्यून व्हायला साहाय्य होते . व्यावहारिकदृष्ट्या तसे करणे
कठीण असले , तरी ते शक्य आहे . ‘ऋषीमु नी, सं तमहात्मे हे सुद्धा ‘मी’चा उल्ले ख करणे कसे टाळायचे ’, ते
पु ढील काही उदाहरणां वरून कळे ल.
अ. पूर्वीच्या बर्‍याच आध्यात्मिक लिखाणांत ऋषीमु नींनी पु ढीलप्रमाणे लिहिले आहे .

१. ‘तू विचारले ला प्रश्‍नच एकाने नारदांना विचारला होता. त्यांनी जे उत्तर दिले , ते च मी सां गतो.’

२. ‘एकदा एकाने ब्रह्मदे वाला हाच प्रश्‍न विचारला होता, ते व्हा ब्रह्मदे वाने असे उत्तर दिले .’

३. ‘पार्वतीच्या प्रश्‍नाला उत्तर दे तांना शिव म्हणाला.’

आ. बर्‍याच ऋषीमु नींनी स्वतःची नावे वे द-उपनिषदांत लिहिले ली नाहीत.

इ. सं त ज्ञाने श‍व
् र उपदे श करतांना ‘निवृ त्ती प्रसादे । ज्ञानदे व बोले ।’, असे सां गायचे .

You might also like