You are on page 1of 2

महाराष्ट्र कृ ष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे

सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, सातारा


कण्हेर कालवे विभाग क्र.2, करवडी (कराड)
कण्हेर कालवे उपविभाग क्र.11,नागठाणे
फोन नं.02164-271467 ई-मेल kcd2karawadi@gmail.com फॅ क्स नं.271338

जा.क्र./ककाउवि-11/प्रशा/ / 2016. दिनांक :- 11/03/2016

प्रती,

मा. सरपंच
मौजे अंतवडी / रिसवड / मसूर / वाघेरी/ वडोली-निळेश्वर/शहापूर/चिखली / किवळ
खोडजाईवाडी / करवडी / राजमाची / वनवासमाची .....ता. कराड जि. सातारा

विषय : जागतिक जल दिनानिमित्ताने दिनांक 16 मार्च ते 22 मार्च


जलजागृती सप्ताह दरम्यान जलजागृती करणेबाबत.

संदर्भ : जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन यांचा शासन निर्णय क्र. संकीर्ण 2016/
(प्र.क्र. 7/16) / लाक्षेवि (आस्था), दिनांक 11/2/2016.

महोदय,
उपरोक्त शासन निर्णयानुसार शासनाने दिनांक 22 मार्च रोजी साजरा करण्यात येणा-या जागतिक जलदिनाच्या निमित्ताने सध्याची दुष्काळी परिस्थिती व पाणी
टंचाई पावसाचे अल्प प्रमाण विचारात घेता प्रतिवर्षी दिनांक 16 मार्च ते 22 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह आयोजित करणेविषयी निर्देश दिलेले आहेत. सदर
निर्देशास अनुसरुन या उपविभागाकडे बांधकाम चालू असलेल्या हणबरवाडी उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रामधील गावामध्ये दिनांक 16 मार्च ते 22 मार्च दरम्यान
जलजागृती सप्ताहानिमित्त जलजागृती अभियान कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
सदरप्रमाणे जलजागृती अभियान कार्यक्रम खालील वेळापत्रकाप्रमाणे आयोजित करण्यात येणार आहे.
अ.क्र. गावाचे नांव दिनांक वेळ स्थळ
1 अंतवडी 16/3/2016 सकाळी 8.00 ग्रामपंचायत इमारत
2 रिसवड सकाळी 11.00
3 मसूर संध्याकाळी 4.00
4 वाघेरी 17/3/2016 सकाळी 8.00 ग्रामपंचायत इमारत
5 वडोली निळेश्वर सकाळी 11.00
6 शहापूर संध्याकाळी 4.00
7 चिखली 18/3/2016 सकाळी 8.00 ग्रामपंचायत इमारत
8 किवळ सकाळी 11.00
9 खोडजाईवाडी संध्याकाळी 4.00
10 करवडी 21/3/2016 सकाळी 8.00 ग्रामपंचायत इमारत
11 राजमाची सकाळी 11.00
12 वनवासमाची संध्याकाळी 4.00
आपले गावचे वेळापत्रकाप्रमाणे गावातील सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, सन्माननीय पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, शेतकरी, विद्यार्थी, इ. संबंधितांना आपले
स्तरावरुन सदर जलजागृती अभियान कार्यक्रमास हजर राहणेविषयी कळविणेत यावे. तसेच सदर कार्यक्रमाबाबत नोटीस बोर्ड व इतर प्रसिध्दी माध्यमातून जास्तीत जास्त
लोकांना सूचना देण्यात याव्यात व मोठया संखेने कार्यक्रमास उपस्थित राहून जलजागृती अभियान यशस्वी करण्यास सहकार्य करावे ही विनंती.

सहाय्यक कार्यकारी अभियंता


कण्हेर कालवे उपविभाग क्र.11
नागठाणे
प्रत :- मा. कार्यकारी अभियंता, कण्हेर कालवे विभाग क्र.2, करवडी, करवडी यांना माहितीसाठी सविनय सादर.
प्रत :- मा. चेअरमन व सदस्य, पाणी वापर सहकारी संस्था / विविध कार्यकारी सहकारी सोसायटी
प्रत :- ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी
प्रत :- गाव कामगार तलाठी
मौजे अंतवडी / रिसवड / मसूर / वाघेरी/ वडोली-निळेश्वर/शहापूर/चिखली / किवळ
खोडजाईवाडी / करवडी / राजमाची / वनवासमाची .....ता. कराड जि. सातारा

गावोगावी एकच नारा ! पाणी वापर संस्था स्थापन करा !

राष्ट्राची उंच करण्या मान ! सिंचन वाढवुन राखा शान !

दुष्काळापासून करण्या रक्षण ! जास्तीत जास्त करा सुक्ष्म सिंचन !

सिंचनाची महिमा न्यारी ! सुख समृध्दी नांदेल घरी !

दुष्काळास बसण्या आळा ! पाणी नाश प्रयत्नपूर्वक टाळा !

You might also like