You are on page 1of 5

संस्कृत सु भाषिते : १

चिन्ता चिता समानाऽस्ति बिन्दुमात्रविशे षतः |


सजीवं दहते चिन्ता निर्जीवं दहते चिता ||

अर्थ : चिन्ता आणि चिता सारखी आहे फरक फक्त अनु स्वाराचा. चिन्ता [काळजी] जिवं त
माणसाला जाळते तर चिता जीव निघून गे ल्यावर [मृ ताला] जाळते

विद्या शस्त्रस्य शास्त्रस्य द्वे विद्ये प्रतिपत्तये |


आद्या हास्याय वृ द्धत्वे द्वितीयाऽद्रियते सदा ||

अर्थ : शस्त्रविद्या आणि शास्त्रविद्या [ज्ञान] दोन्ही विद्या कीर्ति मिळवून दे णाऱ्या आहे त
[परं तु] पहिली म्हातारपणी हास्यास्पद ठरते तर दुसरीचे ने हमी कौतु क होते .

नाप्राप्यमभिवाञ्छन्ति नष्टं ने च्छन्ति शोचितुम् |


आपत्स्वपि न मु ह्यन्ति नराः पण्डितबु द्धयः ||

अर्थ : विद्वान् माणसे न मिळण्याजोग्या [अशक्य] गोष्टीची इच्छा करीत नाहीत, नाश
पावले ल्या गोष्टीबद्दल दुःख करीत नाहीत आणि सं कटकाळी डगमगत नाहीत.

नष्टं द्रव्यं लभ्यते कष्टसाध्यम् , नष्टा विद्या लभ्यते ऽभ्यासयु क्ता |


नष्टारोग्यं सूपचारै ः सुसाध्यम् नष्टा वेला या गता सा गतै व ||

अर्थ : [खूप] कष्ट करून गे लेली सं पत्ति मिळवता ये ते. [विसरल्यामु ळे] गे लेली विद्या
अभ्यास करून [पु न्हा] मिळवता ये ते. तब्बे त खराब झाली तर चां गले उपचार करून ति
सु धारता ये ते. पण वे ळ [वाया] घालवला तर तो गे ला तो गे लाच. [वे ळ वाया घालवण
टाळावं ]
यत्र विद्ववज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्राल्पधीरपि |
निरस्तपादपे दे शे एरण्डोऽपि द्रुमायते ||

अर्थ : ज्या ठिकाणी विद्वान लोक नाहीत त्याठिकाणी कमी बु द्धी असणारा माणूस दे खील
स्तु तीला पात्र ठरतो. जसे [मोठे ] वृ क्ष नसले ल्या प्रदे शात एरं डसु द्धा वृ क्ष म्हणून मिरवतो.

वाच्यं श्रद्धासमे तस्य पृ च्छकस्य विशे षतः |


प्रोक्तं श्रद्धाविहीनाय ह्यरण्यरुदितं भवे त्‌ ||

अर्थ : ज्याचा [आपल्यावर] विश्वास आहे आणि जास्तकरून ज्याने आपल्याला [त्याबद्दल]
विचारले ले आहे अशा [माणसालाच उपदे श] सां गावा पण विश्वास नसणाऱ्याला सां गितले
तर ते कष्ट व्यर्थ जातील.

अवज्ञात्रुटितं प्रेम नवीकर्तुं क ईश्वरः |


सन्धिं न यान्ति स्फुटितं लाक्षाले पेन मौक्तिकम् ||

अर्थ : अपमानामु ळे तु टले ले प्रेम पु न्हा निर्माण करण्यास कोण बरे समर्थ आहे ? [एखाद्याचा
अपमान झाल्यावर त्याच्याशी पु न्हा जवळीक होत नाही] जसे फुटले ले मोती लाखे च ले प
लावून सां धता ये त नाहीत.

श्व:कार्यमद्य कुर्वीत पूर्वां ण्हे चापराण्हिकम् |


न हि प्रतीक्षते मृ त्यु ः कृतमस्य न वा कृतम् ||
अर्थ : उद्या करायचे काम आज करावे आणि दुपारनं तर करायचे काम सकाळीच करावे .
कारण ह्या माणसाचे काम झाले आहे किंवा नाही याची मृ त्यु वाट पाहत नाही.

यथा खनन् खनित्रेण नरो वार्यधिगच्छति |


् षुरधिगच्छति ||
तथा गु रुगतां विद्यां शुशरू

अर्थ : ज्याप्रमाणे कुदळीने [सतत] खणत राहणाऱ्या मनु ष्याला [विहिरीचे ] पाणी मिळते ,
त्याप्रमाणे गु रूंची [निष्ठे ने ] से वा करणाऱ्या [व त्यां च्याकडू न विद्या मिळवू इच्छिणाऱ्या]
विद्यार्थ्याला गु रुकडे असले ली विद्या मिळते .

त्वयि मे ऽनन्यविषया मतिर्मधु तेऽसकृत् |


रतिमु द्वहताद्धा गङ्गे वोघमुदन्वति || कुन्ती भागवत १ स्कंध ८ अध्याय

अर्थ : हे मधू राक्षसाचा वध करणाऱ्या श्रीकृष्णा, गं गेचा प्रवाह ज्याप्रमाणे [न थांबता,


सतत ] समु दर् ाकडे झे प घे तो त्याप्रमाणे तु झ्याविषयी माझ्या मनात एकान्तिक [दुसरा
कुठलाही विचार न ये ता फक्त तु झे च चिं तन एवढा एकच] विचार ये वो
विपदः सन्तु नः शश्वत्तत्र तत्र जगद्गरु ो |
भवतो दर्शनं यत्स्यादपुनर्भवदर्शनम् || कुन्ती भागवत १स्कन्ध ८ अध्याय.

अर्थ : हे या जगात श्रेष्ठ असणाऱ्या श्रीकृष्णा, आम्हाला सतत सं कटे ये वोत [कि
ज्यामु ळे तु झे स्मरण होईल व त्यामु ळे ] जन्ममृ त्यूचा फेरा सं पवणारे तु झे दर्शन होईल.

संस्कृत सु भाषिते : २

भाग्यवान् जायतां पु तर् ः मा शूरो मा च पण्डितः |


शूराश्च कृतविद्याश्च रणे सीदन्ति मत्सु ताः ||कुन्ती महाभारत
अर्थ : मु लगा नशीबवान असावा शूर किंवा विद्वान् असण्याची [जरूर] नाही [कारण] शूर
आणि ज्ञानी [असूनही] माझे पु त्र यु द्धात कुजून जात आहे त.

सामै व हि प्रयोक्तव्यमादौ कार्यं विजानता |


सामसिद्धानि कार्याणि विक्रियां यान्ति न क्वचित् ||
अर्थ : काम [चां गले कसे करावे हे ] जाणणाऱ्याने पहिल्यांदा गोड बोलून समजावून सां गावे .
अशाप्रकारे सामाचा उपयोग करून पूर्ण केले ली कामे कधीही बिघडत नाहीत.

नौमीड्य ते ऽभ्रवपु षे तडिदम्बराय गु ञ्जावतंसपरिपिच्छलसन्मुखाय |


वन्यस्रजे कवलवे तर् विषाणवे णुलक्ष्मश्रिये मृ दुपदे पशु पाङ्गजाय || भागवत
अर्थ : हे परमे श्वरा, घनश्यामा, ज्याचे मस्तक गु ं जानी सु शोभित केले आहे . अशा, वस्त्रे
ते जस्वी असणाऱ्या, स्निग्ध आणि सुं दर मु ख असणाऱ्या, वनमाला धारण करणाऱ्या,
बासरी, शिं ग, वे त एका हाती घास यामु ळे सुं दर दिसणाऱ्या, कोमल चरण असणाऱ्या
गोपराजाच्या मु लाला [श्रीकृष्णाला, दे वा तु ला] मी वन्दन करतो.

सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहे तवे |


तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः || भागवत मङगल १ . १
अर्थ : विश्वाची उत्पत्ति, स्थिति, प्रलय वगै रेना कारणीभूत असणाऱ्या, सत्, चित् आणि
आनं द हे च स्वरूप असणाऱ्या, भगवान श्रीकृष्णाची आम्ही अध्यात्मिक, आधिभौतिक,
आधिदै विक तापनिवारणासाठी स्तु ती करतो.

पिकस्तावत्कृष्णः परमरुणया पश्यति दृशा परापत्यद्वे षी स्वसु तमपि नो पालयति यः |


तथाप्ये षोऽमीषां सकलजगतां वल्लभतमो न दोषा गण्यन्ते खलु मधुरवाचां क्वचिदपि ||
अर्थ : खरोखर कोकीळ हा [अन्तर्बाह्य] काळाकुट् ट आहे , तो तांबड्या लाल डोळ्यांनी
[रागाने च] बघतो. दुसऱ्यां च्या पिल्लांचा द्वे ष तर करतोच, पण स्वतःच्या पिलांचा दे खील
सां भाळ करीत नाही. तरीसु द्धा तो सर्व जगाचा अत्यं त आवडता असतो. मधाळ
बोलणाऱ्यां च्या दोषांचा कधीही विचार केला जात नाही. [साखरपेर् ‍या भाषे मुळे लोक
फसतात आणि त्यांची गै रकृत्य लपतात.]

अहो खलभुजङ्गस्य विचित्रोऽयं वधक् रमः |


अन्यस्य दशति श्रोत्रमन्यः प्राणै र्वियु ज्यते ||
अर्थ : दुष्ट मनु ष्य रूपी सापाची मारण्याची रीत केवढी विचित्र आहे ! तो [वे गळ्याच]
एकाच्या कानात [चाहाडीचे विष घालून] चावतो, [आणि ज्याच्याबद्दल चाहाडी केली
असे ल तो] दुसराच प्राणांना मु कतो.

ं ामसमर्थानामु पद्रवायात्मनो भवे त्कोपः |


पुस
पिठरं क्वथदतिमात्रं निजपार्श्वाने व दहतितराम् ||
अर्थ : दुबळ्या माणसांचा सं ताप हा त्यांना स्वतःलाच त्रासदायक होतो. [जसे ] अतिशय
तापले ले पाते ले त्याच्या जवळ असणार्‍यांनाच होरपळू न टाकते .

संस्कृत सु भाषिते : ३
परस्परविरोधे तु वयं पञ्च च ते शतम् |
परै स्तु विग्रहे प्राप्ते वयं पञ्चाधिकं शतम् || यु धिष्ठिर महाभारत
अर्थ : एकमे कात भांडण झाल्यास, आपण [पांडव] पाच आणि ते कौरव शं भर आहे त. पण
दुसऱ्या [शत्रूशी] यु द्ध असताना आपण एकशे पाच [पांडव अधिक कौरव] आहोत.

गु णेष्वनादरं भ्रातः पूर्णश्रीरपि मा कृथाः |


सम्पूर्णोऽपि घटः कू पे गु णच्छे दात्पतत्यधः ||
अर्थ : हे बन्धो, अतिशय श्रीमं त असलास तरी गु णांचे [सं वर्धन करण्यात] दुर्लक्ष करू
नकोस. घडा [विहिरीतून काढताना पाण्याने ] पूर्ण भरला असला तरी गु ण [गु ण किंवा
पोहोऱ्याचा दोर] तु टल्यास खाली कोसळतो.

जगतीह बन्धु भावं विजयं जयं च लभताम् |


मम राष्ट्रमानचिह्नं राष्ट्रध्वजं नमामि ||
अर्थ : या जगामध्ये बं धुभाव [प्रेम] पसरो. [सत्याचा निश्चितपणे ] विजय होवो. [मी]
राष्ट् राचे मानचिह्न असणाऱ्या राष्ट् रध्वजाला वन्दन करतो.

अकुतोभयं मनो मे , त्वयि नित्यमे व रमताम् |


सत्यं शिवं च हृद्यं , लब्धु ं सदा प्रयतताम् ||
अर्थ : अत्यं त निर्भय असे माझे मन तु झ्या [निरीक्षणात] ने हमी आनं दी होवो ने हमी
शाश्वत सत्य, मनोहर कल्याण मिळवण्याचा प्रयत्न करो.

मरुता प्रकम्पमानं, उच्चै र्विराजमानम् |


रुचिरं त्रिवर्णकान्तं, राष्ट्रध्वजं नमामि ||
अर्थ : ते जस्वी अशा, तीन रं गानी शोभून दिसणाऱ्या, [खूप] उं चावर वाऱ्याच्या वे गामु ळे
फडफडणाऱ्या राष्ट् रध्वजाला मी वन्दन करतो.

कोलाहले काककुलस्य जाते विराजते कोकीलकू जितं किम् |


परस्परं संवदतां खलानां मौनं विधेयं सततं सु धीभिः ||
अर्थ : कावळ्यां च्या घरट्यात काव काव चालू असताना, कोकीळपक्षाचे कुहू कुहू गायन
शोभून दिसते काय? [ते लोपून जाते तसं च] दुष्ट लोक परस्परां शी बोलत असताना विचारी
माणसाने गप्प बसावे . [त्यांचा फक्त अपमान होईल]

अल्पाक्षररमणीयं यः कथयति निश्चितं स खलु वाग्मी |


बहुवचनमल्पसारं यः कथयति विप्रलापी सः ||
अर्थ : थोडक्यात आणि सुं दर भाषे त जो सां गतो तो खरोखर [चां गला-फर्डा] वक्ता होय.
खूप बडबड करून त्यातून थोडासाच अर्थ निघत असे ल तर त्याला वाचाळ म्हणावे .

सन्तश्च लु ब्धाश्च महर्षिसंघा विप्राः कृषिस्थाः खलु माननीयाः |


किं किं सामिच्छन्ति तथै व सर्वे ने च्छन्ति किं माधवदाघयानम् ||
अर्थ : चित्रकाव्याच्या विविधप्रकारापै की ‘ अन्तरालाप ‘ नावाचा एक चमत्कृतिपूर्ण
काव्यप्रकार आहे . अन्तरालापाच्या एकच श्लोकात प्रश्न व त्या प्रश्नांची दडले ली उत्तरे
असतात. प्रस्तु त श्लोकात सज्जन, लोभी, ऋषीसमूह, ब्राह्मण, शे तकरी आणि मान्यवर
हे सहाजण कशाची इच्छा करतात? असा एक प्रश्न आणि या सहाहि जणांना नको
वाटणारी एकच गोष्ट कोणती? असा दुसरा प्रश्न विचारला आहे .

सम्पन्नतरमे वान्नं दरिद्रा भु ञ्जते सदा |


क्षु त् स्वादु तां जनयति सा चाढ्येषु सुदुर्ल भा ||
अर्थ : गरीब लोक ने हमी अतिशय चां गल असं अन्न भक्षण करतात. कारण भूक ही सुं दर
चव आणते की जि [गोष्ट] श्रीमं तां च्या बाबतीत दुर्मिळ असते .

पठतो नास्ति मूर्खत्वं जपतो नास्ति पातकम् |


मौनिनः कलहो नास्ति न भयं चास्ति जाग्रतः ||
अर्थ : शिकत राहणाराला मूर्खपणाचा धोका नसतो. जप करणाराला पाप लागण्याचा धोका
नसतो. मौन बाळगणाऱ्याला भांडणाची भीती नसते . दक्ष राहणार्याला कसलीच भीती
नसते .

You might also like