You are on page 1of 2

एक वडाचे झाड होते.

त्याच्या आजूबाजूला हिरवळ होती, गवत होते.

ते झाड त्या गवताला हिणवुन म्हणायचे “अरे काय तुमची पद्धत? तिकडुन वारा आला कि वाकले इकडे,
इकडून आला कि वाकले तिकडे.. मी बघा माझ्या जागी स्थिर असतो. त्यामुळे लोक माझा आसरा घ्यायला
येतात.”

काही दिवसांनी एक मोठे चक्रीवादळ आले. त्याच्या जोराने अनेक झाडे उन्मळून पडली. वटवृक्षाची
सुद्धा तीच गत झाली.

वादळ ओसरल्यावर गवत मात्र बुत होते.

कधी कधी मोडेन पण वाकणार नाही असा ताठर बाणा आपले जास्त नुकसान करतो.
एकदा एका नदीतुन दोन भांडे वाहत चालले होते.

एक भांडे मातीचे होते.

एक भांडे पितळेचे होते.

पितळी भांडे मातीच्या भांड्याला हाक मारून म्हणाले “बरं झालं तू तरी आहेस सोबत. नाहीतर जमिनीवर
पोहचेपर्यंत एकट्याने फार कंटाळा आला असता. जरा जवळ ये, गप्पा मारूया.”

मातीचे भांडे म्हणाले “आपण जरा दूर राहिलेलंच बरं. तु म्हणतोयस ते ठीक आहे, पण एखादी लाट
जोरात आली आणि आपण एकमेकांवर आपटलो तर माझे तर तुकडेच होतील. त्यापेक्षा कंटाळा आला तर
हरकत नाही, पण जमिनीवर पोहचेन तरी.”

You might also like