You are on page 1of 11

पुस्तक परीक्षण

सध
ु ीर मुळे
विभाग प्रमुख सगं णक अभियांत्रिकी
शासकीय तंत्रनिके तन., अहमदनगर
सारांश
• प्रख्यात कादबं रीकार कै . श्री. सहु ास शिरवळकर उर्फ सशि
ु यांची
‘म्हणून' ही कादबं री एक रहस्यकथा आहे . ज्यांना रहस्यकथा
आवडतात त्यांना ही कादबं री नक्की आवडेल.
• कोमल नावाची निराधार तरुणी गावाकडून मुंबईला नोकरीच्या
शोधात येते. मुंबईत आल्यानंतर एका लेडीज होस्टे लमध्ये राहून
अनेक दिवस अथक प्रयत्न के ल्यानंतर तिला एका कंपनीत
स्टे नोची नोकरी मिळते.
• मात्र एक दिवस तिच्या रूममधून तिच्या सर्व सामानाची चोरी
झालेली तिला आढळते .
• दुस-या दिवशी घालण्यासाठीदेखील तिच्याकडे कपडे उरत
नाहीत.
सारांश
• नोकरीला लागून के वळ पंधराच दिवस झालेले असल्यामुळे
तिच्याकडे पैसेदेखील नसतात.
• त्यामुळे ती पब्लिक बुथवर जाऊन आपल्या साहेबाला म्हणजे
एल.पी. ला फोन करते. तो तिला एका मोठ्या दुकानाचा सदं र्भ
देऊन तिच्या खरेदीची व्यवस्था करतो.
• ती तरुणी जेव्हा खरेदी करून बाहेर पडत असते तेव्हाच एक
सर्यू वंशी नावाची स्त्री आपला नुकताच खरेदी के लेला चंद्रहार
चोरीला गेल्याची आरडाओरड करून सगळयांची झडती
घ्यायला लावते.
• नेमकं त्या झडतीत या तरुणीच्या बास्के टमध्ये तो हार सापडतो.
• ती स्त्री तरुणीला पोलिसांकडे देते. दरम्यान तरुणीने जामिनासाठी
आपल्या बॉसला बोलावून घेतलेले असते. तोही येतो
सारांश
• पण तिच्या बास्के टमध्ये हार सापडल्याचं कळताच तो तिला जामीन
तर देत नाहीच पण तिला तिथल्यातिथे नोकरीवरून काढून टाकतो.
त्याच ठिकाणी शैलेश नावाच्या पत्रकाराची तिला मदत होते.
• तुरुंगात असताना तिथल्या जेलर खन्नांच्या वाईट नजरेचा तिला
सामना करावा लागतो. स्वतःला वाचवत ती कसेबसे दिवस काढते.
शिक्षा सपं लयानंतर शैलेश तिला न्यायला येणार असतो. मात्र खन्ना
जेलर तिची सटु का तीन दिवस आधीच करण्याची व्यवस्था करतो.
त्यामुळे शैलेशशी तिची भेट होऊ शकत नाही. ती त्याच्या शोधात
वणवण भटकत असतानांच त्याच्याशी तिची भेट होते.
• मात्र त्यानंतर सतत तिला मारण्याचे प्रयत्न होतात. त्यामागे एल.पी
असतो की जेलर खन्ना? की सर्यू वंशी नावाची ती बाई? तिच्या
सारख्या निरुपद्रवी तरुणीला मारण्याचं कोणाला काय कारण असतं ?
या उत्सक ु तेपोटी वाचक पुढे पुढे वाचत राहातो
महत्त्वाची पात्रे
• कोमल ही नायिका.
• शैलेश नावाचा पत्रकार हा नायक
• एल.पी. सिघं ल कोमलचा साहेब
• जेलर खन्ना
• जया सर्यू वंशी नावाची बाई. हिचा चंद्रहार चोरीला गेलेला असतो.
• साळवी हा दुकानाचा मॅनेजर. याचा उपयोग विनोद निर्मितीसाठी
• कुमार भिडे नावाचा पोलीस इन्स्पेक्टर
पॉइ ट

टर्निं ग
• कोमल खरेदी करण्यासाठी 'जाझ' नावाच्या डिपार्टमेंटल
स्टोअरमध्ये जाते .
• त्या ठिकाणी सर्यू वंशीबाईच्या हाराची चोरी होते .
• सर्यू वंशीबाईच्या आग्रहावरून सगळया हजर असलेल्या लोकांच्या
सामानाची झडती घेतली जाते .
• जेव्हा कोमलच्या बास्के टमध्ये तो हार सापडतो तेव्हा कथानकाला
कलाटणी मिळते.
• कोमलच्या फोनवरून तिचा बॉस तिला जामीन देण्यासाठी
स्टोअरमध्ये येतो खरा, पण तिच्या बास्के टमध्ये हार सापडल्याचं
त्याला जेव्हा समजतं तेव्हा तो तिला जामीन देण्याचं नाकारतो.
• तिला पोलीस पकडून नेतात तिथून कथानक एकदम वेगळं वळण
घेतं.
काय पटत नाही?

• जेव्हा 'जाझ' मध्ये चोरी होते आणि कोमलच्या बास्के टमध्ये हार
सापडतो, तेव्हा तिथे हजर असलेला शैलेश नावाचा पत्रकार तिच्या
बाजूने उभा राहातो.
• दोघेही एकमेकांना ओळखत नसतात.
• तरीही शैलेश तिच्याबद्दल ती चोर नसल्याबद्दल इतका ठाम असतो
हे पटत नाही.
• मात्र लेखकाचं स्वातंत्र्य म्हणून आपल्याला ते मान्य करावं लागतं
पुस्तकाची बलस्थाने
• लेखक सहु ास शिरवळकर हे सिद्धहस्त लेखक म्हणून प्रसिद्धच आहेत.
त्यामुळे लेखनशैली वाचकांना खिळवून ठे वणारी आहेच .
• कथानकाची मांडणी नेहमीप्रमाणेच उत्तम आहे.
• एके क प्रसगं हळूहळू मांडण्याची लेखकाची हातोटी चांगली आहे.
• व्यक्तिचित्रण उत्कृष्ट आहे.
• लेखकाने के लेल्या वर्णनांमुळे पात्रं आणि घटना डोळयांसमोर उभ्या
राहातात.
• सवं ादांमधून कथा पुढे सरकत राहाते.
काय खटकलं ?

• सहु ास शिरवळकर यांनी त्यांच्या लेखनाची सरुु वातच


रहस्यकथांपासनू के ली. त्यांच्या 'मास्टर प्लान ', 'पांचाली ',
स्टुपिड ', ब्लॅक कोंब्रा' , 'तो' इत्यादी रहस्यकथांच्या तुलनेत ही
कादबं री मला किंचित डावी वाटते.
• कदाचित कोमलला मारण्याचं कारण मनाला पटण्यासारखं
नसल्यामुळे असं वाटत असावं.
• तसच ं शैलेश कोमलच्या एकदम इतक्या जवळ कसा येतो हेही
पटत नाही.
पुस्तक का भावले?
• हे पुस्तक लिहिण्याचा हेतूच निव्वळ मनोरंजन आहे. त्यात
लेखक यशस्वी होतो. पुस्तक हातात घेतल्यानंतर ते वाचून
पूर्ण के ल्याशिवाय वाचक पुस्तक खाली ठे वत नाही.
• लेखकाच्या शैलीमुळे ही कादबं री भावनात्मकरित्या भावते.
• अभियांत्रिकी अध्यापन करताना या पुस्तकातील विनोदी
किस्से सांगून अध्यापन मनोरंजक करता येऊ शके ल.
लेखक: सहु ास शिरवळकर लेखकाची इतर
प्रकाशक: धनंजय खेडेकर ,
निशिगंध
पुस्तके
दुनियादारी * कोवळीक * मुक्ती
प्रकाशन , ७०८,
* हमखास * कळप * सत्र *
घोरपडे पेठ, पणु े थोडक्यात असं * मधुचंद्र *
मख ु पष्ठृ : श्रीकृष्ण ढोरे काटेरी * सनसनाटी * सालम
* वेशीपलीकडे * ऑपरेशन
पष्ठृ े : १७२ म्हणून (कादबं री)
बुलेट* मर्डर हाऊस *
किंमत: रु. १४०/- फक्त
काळंशार * समथिंग *
रूपमती * काळं –बेरं

धन्यवाद!

You might also like