You are on page 1of 6

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील १)

आईवडील
जगामधे जजथं आपलं मस्तक नम्रपणानं झुकवावं असं आपलं पजिलं श्रद्धास्थान म्हणजे आपले
आईवडील. तुकाराम मिाराज त्ां च्याजवषयी म्हणतात,


मायबापे केवळ काशी |
तेणें न नदीने तीर्ाासी || १ ||
पुंडलीकें काय केले ? |
परब्रह्म उभे ठे ले || २ ||
तैसा होई सावधान |
ह्रदयी धरी नारायण || ३ ||
तुका म्हणे मायबापे |
अवघी दे वाची स्वरुपे || ४ ||
(अभंग क्र. २९०६)

आईवडील म्हणजे शुद्ध काशी िोत. जो मनुष्य आईवडीलां च्या सिवासात असेल, त्ानं काशीची
तीथथयात्रा केल्यासारखं िोतं . त्ानं तीथथयात्रेला जाण्याची गरज नसते . अशा वेळी पुंडजलकानं काय
केलं ते ध्यानात घ्यावं . तो आईवडीलां ची सेवा करणं थां बवून दे वाकडं धावला नािी. त्ानं
दे वालाच उभं रिायला लावलं. तेव्हा, प्रत्ेकानं पुंडजलकाप्रमाणं सावध रिावं . ईश्वराला आपल्या
ह्रदयात ठे वावं , पण त्ाला प्राप्त करण्यासाठी आईवडीलां ची सेना करणं थां बवू नये . कारण,
आईवडील म्हणजे पूणाां शानं ईश्वराचं स्वरुप िोत. तुकाराम मिाराज आपल्याला सां गत आिे त, की
आईवडीलां ची सेवा िीच ईश्वराची पूजा िोय.

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील २)

करावे गोमटें | बाळा, माते ते उमटे ||१||


1
Page

आपुललया जीवाहूनी | असे वाल्हे ते जननी ||२||


लवयोग ते लतस | त्याच्या उपचारें ते लवष ||३||
तुका म्हणे पायें | डोळा सुखावे ज्या न्यायें ||४||
(अभंग क्रं. २६५)

आपल्या मुलां साठी कािीतरी गोडधोड करावं , असं आईला वाटत असतं . जतला आपलं मूल
आपल्या जीवापेक्षािी अजधक जप्रय वाटत असतं . त्ाच्यासाठी कािी चां गलं-चुंगलं करता आलं
नािी, त्ाचा जवयोग झाला, तर ती घटना जतला जवषासारखी वाटते . याउलट, त्ाच्यासाठी कािी
चां गलं करता आलं, तर त्ाला जमळालेल्या आनंदानं जतचा जीव सुखावतो. जतच्या या सुखाचं वणथन
करताना तुकाराम आपल्या नेिमीच्या अनुभवातलं एक सुरेख उदािरण दे तात. कष्टाची कामं
करताना उन्हा-तान्हात जिं डल्यामुळं एखाद्याचे डोळे जळजळू लागले असतील आजण अशा वेळी
त्ाच्या डोळ्ां वर कािी उपचार करण्याऐवजी त्ाच्या पायां ना थंडगार तेल वगैरे चोळलं, तर
डोळ्ां ची जळजळ थां बते आजण ते सुखावतात. उपचार पायां वर आजण सुख मात्र डोळ्ां ना, िा
आपला अनुभव आिे . मायलेकरां च्या बाबतीत असं च घडतं . उपचार मुलावर आजण सुख आईला,
असंच िे आगळं -वेगळं नातं आिे ..

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील ३, ४)

(आईवडील) अभंग ३

लागललया मुख स्तनां | घाली पान्हा माऊली ||१||


उभयतां आवडी लाडें |कोडें कोड पुरतसे ||२||
मेळलवता अंगे अंग | प्रेमें रं ग वाढतो ||३||
तुका म्हणे जड भारी | अवघे लशरी ं जननीचे ||४||

(अभंग क्र. ८३१)

(आईवडील) अभंग ४

न लगे मायेसी बाळें लनरवावे |


आपुल्या स्वभावें ओढे त्यासी ||१||
मज का लागला करणे लवचार ? |
ज्याचा त्याचा भार त्याचे मार्ां ||२||
गोड धड त्यासी ठे वी न मागता |
समाधान खाता नेदी मना ||३||
खेळता गुंतले उमगूनी आणी |
बैसोलनया स्तनी ं लावी बळें ||४||
त्याच्या दु ुःखेपणें आपण खापरी ं |
2

लाही तळी ं वरी होय जैसी ||५||


Page
तुका म्हणे दे ह लवसरे आपुला |
आघात तो त्याला लागो नेदी ||६||

(अभंग क्र. १२३३)

दू ध जपण्यासाठी मूल आईच्या छातीला तोंड लावतं आजण आईला पान्हा फुटतो, िा मुलाचं मूलपण
आजण आईचं आईपण तृप्त करणारा एक उदात्त आनंदसोिळा असतो. तु काराम मिाराजां नी इथं
त्ा सोिळ्ाचं जचत्रच आपल्या डोळ्ां पुढं उभं केलं आिे . आई मुलाचे जे लाड करते , त्ामुळं
उभयतां ना आनंद िोतो. ती कौतुकानं त्ाला अंगावर पाजतो, तेव्हा मायलेकरां ना िोणारा
एकमेकां चा स्पशथ िा वात्सल्याला उत्कट बनजवणारा असतो. खरं तर आई आजण मूल यां चं नातंच
असं आिे , की मुलाला कशाचीिी जचंता करावी लागत नािी. जे कािी जड जाणारं असेल, भारी
पडणारं असेल, त्ाची दे खील त्ाला काळजी नसते . त्ा सगळ्ाचा भार आईनं आनंदानं आपल्या
डोक्यावर घेतलेला असतो.

जवठ्ठलाने आपला म्हणजे तुकारामां चा भार स्वतःच्या मस्तकावर घ्यावा, त्ां ना स्वतःला कसली
काळजी करायला लावू नये , असं त्ाला जवनवताना तुकाराम आईचं उदािरण दे तात. आपल्याला
अमुक एक गोष्ट िवी, असं मुलानं आईला सां गण्याची वेळ दे खील येत नािी. आई आपल्या
आईपणाच्या स्वभावानंच त्ाला जवळ ओढून घेते. खरं तर मूल जतच्या गभाथ त असतं , तेव्हापासूनच
जतनं त्ाचा भार आपल्या मस्तकावर घेतलेला असतो. त्ानं कािी माजगतलेलं नसताना ती
त्ाच्यासाठी गोडधोड ठे वते . त्ानं पोट भरुन खाल्लं , तरी जतचं समाधान िोत नािी, त्ानं
आणखी खावं असं जतला वाटत राितं . ते खेळण्यात गुंतलेलं असलं, तरी ती त्ाला समजावून
आणते आजण जबरदस्तीनं त्ाला अंगावर पाजते . त्ाला कािी दु ःख झालं, तर लाह्या भाजण्याच्या
खापरावर लािी जशी वरखाली िोते, तसा जतचा जीव वरखाली िोतो. ती आपलं शरीर जवसरुन
जाते , परं तु त्ाला कसलािी आघात पोचू दे त नािी. आईच्या प्रेमाची जनरपेक्षता आजण
समपथणशीलता खरोखरच पराकाष्ठे ची असते .

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील ५,६)

संतां बरोबरचं आपलं जजव्हाळ्ाचं नातं स्पष्ट करताना तुकारामां ना अनेकदा मायलेकरां च्या
नात्ाची आठवण िोते . ते म्हणतात,

मातेलचये लचत्ी ं | अवघी बाळकाची व्याप्ति ||१||


दे ह लवसरे आपुला | जवळी ं घेता सीण गेला ||२||
दावी प्रेमभाते | आलण अंगावरर चढते ||३||
तुका संतांपुढे | पायी ं झोंबे लाडें कोडें ||४||
(अभंग क्र. २७७६)
3


Page
लेकराचे लहत | वाहे माउलीचे लचत् ||१||
ऐसी कळवळ्याची जाती | करी लाभेंलवण प्रीती ||२||
पोटी ं भार वाहे | त्याचे सवास्व ही साहे ||३||
तुका म्हणे माझे | तैसे तुम्हा संतां ओझे ||४||

(अभंग क्र. १७४१)

आईच्या मनामधे इथून-जतथून बाळ व्यापून रािते . त्ाचा जवचार करताना ती आपलं दे िभान
जवसरुन जाते . त्ाला जवळ घेतल्यावर जतचा शीण जातो. जतनं मायेनं त्ाला खाऊ
दाखवला, की ते जतच्या अंगावर झेपावतं . आपण या मुलाप्रमाणं संतां च्या पायां ना लाडानं ,
कोडकौतुक करुन घेण्याच्या इच्छे नं झोंबतो, असं तुकाराम म्हणतात.
लेकराचं जित व्हावं, िाच जवचार माउलीच्या मनामधे असतो. जतच्या मनातील या कळवळ्ाची
जातकुळी अक्षरशः जगावेगळी असते. कसल्यािी फायद्याची, परतफेडीची अपेक्षा न बाळगता प्रेम
करणं म्हणजे काय, याचं आईच्या प्रेमाइतकं दु सरं उत्तम उदािरण असू शकत नािी. आधी ती
आपल्या उदरात त्ाचा भार वािते आजण नंतर आयुष्यभर त्ाचं सवथ कािी सिन करते .
तुकारामां च्या दृष्टीनं संत िे आईसारखे असल्यामुळं ते त्ां ना आपला भार वािण्याची जवनंती करीत
आिे त.

संत तुकारामांचे अभंगशतक (आईवडील ७)

गभथवती स्त्रीला िोणारं सोलीव सुख जतच्या डोिाळ्ां मधून कसं प्रकट िोतं , त्ाचं भावस्पशी वणथन
तुकारामां नी एका अभंगात केलं आिे . ते म्हणतात,


आवडी येते गुणें | कळो, लचन्हे उमटती ||१||
पोटीचे ओठी ं उभे राहे | लचत् साहे मनासी ||२||
डोहोलळयाची भूक गभाा | ताटी ं प्रभा प्रलतलबंबे ||३||
तुका म्हणे मानोन घ्यावे | वाटे खावे वाटते ||४||

(अभंग क्र. ३२७६)

गभथवतीच्या वागण्यातून जे गुण प्रकट िोतात, त्ावरुन जतला काय आवडतं , म्हणजेच जतला
कोणते डोिाळे लागले आिे त, ते कळू न येतं. जतच्या अंगी त्ाची जचन्ह उमटतात. जतच्या पोटात
जतची आजण गभाथ ची जी इच्छा जनमाथ ण झालेली असते , ती जतच्या ओठां वर येते, ती आपल्या तोंडानं
ती इच्छा बोलून दाखवते . जतच्या मनात जी इच्छा उद्भवलेली असते , ती स्पष्टपणे बोलून
दाखजवण्यास जतचं जचत्त जतच्या मनाला सािाय्य करतं . जतची जचंतनशक्ती मनातील इच्छे ला
शब्दरुप दे ते. गभाथ ची जी भूक असते , जी इच्छा असते , ती डोिाळ्ाच्या रुपानं व्यक्त िोते .
चंद्राच्या वा सूयाथ च्या जबंबाची प्रभा पाण्यानं भरलेल्या ताटात प्रजतजबंजबत व्हावी, तशीच गभाथ ची इच्छा
आईच्या डोिाळ्ामधे प्रजतजबंजबत िोते. म्हणूनच, गभथवतीला जे कािी खावंसं वाटतं , ते जतनं
4
Page
जवनासंकोच मागून घ्यावं, असं तुकाराम मिाराज म्हणतात. अथाथ त, घरच्या लोकां नीिी जतची इच्छा
पूणथ करावी, िे ओघानंच आलं.

तुकारामां नी आईच्या वात्सल्याप्रमाणंच वजडलां च्या प्रेमाचािी मोठा गौरव केला आिे . ते
म्हणतात,


बाप करी जोडी लेकराचे ओढी | आपुली करवंडी वाळवूनी ||१||
एकाएकी केला लमरासीचा धनी | कलडये वागवूनी भार खांदी ं ||२||
लेवऊनी पाहे डोळां अळं कार | ठे वा दावी र्ोर करुलनया ||३||
तुका म्हणे नेदी गांजूं आलणकांसी | उदार जीवासी आपुललया ||४||
(अभंग क्र.३२६८)

बाप लेकराच्या प्रेमापोटी संपत्ती जमवत राितो. त्ासाठी कष्ट करतो, पोट खनपटीला जाईपयांत
उपासमार सिन करतो. त्ाला कडे वर घेतो, खांद्यावर बसवतो आजण मग एकदम आपल्या
सगळ्ा वैभवाचा, साधनसामग्रीचा मालक बनवून टाकतो. आपल्या कष्टातून जमळवलेलं सगळं
त्ाला आयतं दे तो. त्ाच्या अंगावर दाजगने घालतो आजण आपल्या डोळ्ांनी ते दृश्य पाहून
त्ाला डोळ्ां चं पारणं जफटल्यासारखं समाधान िोतं . आपल्याकडच्या संपत्तीचं भां डार जेवढं
वाढवता येईल, तेवढं वाढवून तो ते त्ाला दाखवतो, त्ाच्या स्वाधीन करतो. तो स्वतःच्या जीवावर
उदार िोतो, आपल्या प्राणां ची पवाथ करीत नािी, पण दु सर्‍या कोणाला आपल्या लेकराच्या वाटे ला
जाऊ दे त नािी, त्ाचा छळ करु दे त नािी.
आईवडील आजण मुलं यां च्या या अजतशय जजव्हाळ्ाच्या नात्ाचा जवचार करताना दोन
पैलूंकडे आपण सवाां नी लक्ष जदलं पाजिजे. आपण मुलां साठी इतकं सारं केलं आिे , म्हणून त्ां नी
सदै व आपल्या मुठीत राजिलं पाजिजे , आपण म्हणू ते ऐकलं पाजिजे , आपण सां गू तसंच वागलं
पाजिजे, असा िट्ट धरुन आईवजडलां नी मुलां चं स्वातंत्र्य कदाजप जिरावून घेता कामा नये . त्ां ना
पंख द्यायचे, ते पंख बळकट करण्यासाठी त्ां ना सवथ प्रकारची मदतिी करायची, परं तु त्ाबरोबरच
त्ां ना उड्डाणाचं स्वातंत्र्यिी द्यायचं , तरच आपण त्ां च्यासाठी घेतलेल्या कष्टां चं खरया अथाथ ने चीज
िोतं.
दु सरया बाजूनं मुलां नीिी आईवजडलां नी आपल्यासाठी जे कािी केलं आिे त्ाची जाण सदै व
ठे वली पाजिजे. त्ां च्याजवषयी अपार कृतज्ञता बाळगली पाजिजे . कृतज्ञता िा माणसाच्या
काळजाचा सुगंध असतो, असं म्हणतात. मुलां नी आईवजडलां च्या बाबतीत िे वचन सदै व स्मरणात
5

ठे वावं . कािी बाबतीत त्ां च्याशी मतभेद िोऊ शकतात आजण तसे मतभेद िोणं िा कािी त्ां चा
Page

अनादर नव्हे . परं तु मतभेद िोणं िी गोष्ट वेगळी आजण कृतघ्न बनणं िी गोष्ट वेगळी. आपल्या
जीवनाचे जनणथय प्रसंगी त्ांच्या जवरोधात जाऊनिी घ्यावे लागले, तर ते जरुर घ्यावेत. परं तु तसं
करताना त्ां नी आपल्यासाठी जे कािी केलेलं असतं , त्ासाठी आयुष्यभर त्ां च्याजवषयी कृतज्ञ
मात्र जरुर रिावं.(संग्रािक:- संजय दत्तात्रय सोमवंशी-पाटील ९४२२३४५३६८)

6
Page

You might also like