You are on page 1of 3

हिरकणी:- प्रत्येक स्त्री

महाराष्ट्राचे आराध्यदै वत छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करुन मी माझ्या


लेखनास सरु
ु वात करतो. खरं तर विषयाला कुठून सरु
ु वात करु कळत नाहीए. स्त्रीयांच्या
धडाडीपणापासन
ू कि त्यांना आडवणा-या त्या घाणेरड्या नजरांपासन
ू , स्त्रीयांच्या शौर्यापासन
ू कि
त्यांच्यावर होणा-या अत्याचारापासन
ू , सकल स्वराज्याला आपल्या पंखाखाली घेऊन मातत्त्ृ वाची ऊब
दे णा-या राजमाता जिजाऊ पासून कि एकविसाव्या शतकात हुंड्यासाठी सुनेचा छळ करणा-या
सासूपासून, जगातील कर्तत्ववान स्त्रीयांच्या संख्येपासून कि सध्याच्या घडीला बलात्कार व
अत्याचाराने पिडीत त्या असंख्य स्त्रीयापासून. खरं च विषय खूप खोल आहे . हजारो अनुत्तरीत प्रश्न
डोळ्यासमोर उभा करणारा.
आजच्या काळात एकीकडे स्त्री प्रगतीचा उच्चांक गाठत असताना, दस
ु रीकडे तिच्यावर
होणा-या अत्याचाराचाही उच्चांक पार करावा. याचा आनंद व्हावा कि द:ु ख, अभिमान वाटावा कि
लाज. ५००० वर्षांहून अधिक जूनी संस्कृती असणारा आपला दे श, स्त्रीला सर्वोच्च स्थानी अर्थात
दे वी मानून तीची पूजा करणारा दे श आज इतक्या खालच्या, निकृष्ट पातळीला कसा जाऊ शकतो.
ज्या दे शाला राणी पद्मावती, राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ, आहिल्यादे वी होळकर,
सावित्रीबाई फुले, इत्यादी कर्तृत्ववान व धडाडी महिलांचा सुवर्ण इतिहास लाभला आहे , त्याच
दे शाने स्त्रीयांचे महत्त्व विसरुन त्यांच्यावर इतके अत्याचार करावेत? एकीकडे पी. व्ही. सिंधू,
सायना नेहवाल, रितू क्रिधाल, मेरी कॉम यासारख्या सव
ु र्णकन्या दे शाचं नाव लौकीकास आणत
असताना दस ु रीकडे याच दे शाच्या रस्त्यांवर अंधाराचा फायदा उचलत प्रियांका रे ड्डी सारख्या हुशार
पशुवैद्यशास्त्राच्या विद्यार्थीच्या अब्रच्
ु या चिंद्ड्या व्हाव्यात! का? कधी थांबणार हे . या सर्व
घटनांना नेमकं जबाबदार कोण?
कधी कधी वाटतं की याला जबाबदार आहे ती आपली परु
ु षप्रधान संस्कृती. होय.
सुरुवातीपासूनच आपल्या समाजात, संस्कृतीत स्त्रीला खालच्या पातळीची समजली जाते व केवळ
उपभोगाची वस्तू म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं, परं तु आपण हे विसरतो की त्याच स्त्रीने
आपल्याला आपल्या गर्भाशयात स्थान दिलं, तिनेच आपल्याला जन्म दिला आणि तिनेच
आपल्याला लहानाचं मोठं करुन विचार करण्याच्या लायकीचे बनवले आणि आज आपणच
तिच्याबद्दल असा विचार करतो आहे . याचा विसर आपल्याला पडतो तरी कसा? खाऊ, पिऊ
घालायला आई पाहिजे, लाड करायला बहीण पाहिजे, प्रेम करायला पत्नी पाहिजे पण मग जेव्हा
वेळ मल
ु ीची येते तेव्हा यांच्या मनात नकार घंटा का वाजावी? रस्त्यावर दस
ु -या स्त्रीला छे डताना
त्या ठिकाणी आपली आई किंवा बहीणही असती तर? तरीही असंच केलं असतं का आपण? याचा
विचार एकदाही करत नाही का आपण? अरे जेव्हा कल्याणच्या सभ
ु ेदाराची सन
ू जेव्हा छत्रपतींच्या

Page 1 of 3
पुढे नजराणा म्हणून नेण्यात आली तेव्हा महाराजांचे उद्गार होते, "अशीच असती आमुची माता,
तर आम्हीही संद
ु र झालो असतो." इतकी अद्वितीय त्यांची विचारसरणी, म्हणन
ू कोणत्याही
स्त्रीला, मल
ु ीला छे डण्याआधी शिवछत्रपतींना याद करा.
पण फक्त आपली संस्कृतीच जबाबदार आहे का? तर आपली न्यायव्यवस्थाही तितकीच
जबाबदार आहे . रामशास्त्री प्रभन
ु े, न्यायमर्ती
ु रानडे इत्यादींसारखे कटाक्षाने व योग्य न्यायदान
करणा-या विभत
ु ी जिथे होऊन गेल्या त्याच आपल्या दे शातील न्यायव्यवस्थेची दशा आज
एखाद्या अपंग व हतबल वयोवद्
ृ धासारखी झाली आहे . आज आपल्या दे शात बलात्काराने पिडित
महिलांची संख्या लाखांमध्ये आहे . त्यातील काही हजार गन्
ु हे न्यायालयात दाखल आहे , त्यातूनही
९०% गुन्हे अजूनही रखडलेले आहे त. यांमधील शेकडो पिडितांनी आपला जीव गमावला परं तु
शेवटपर्यंत न्याय काही मिळाला नाही. बरे च पिडित महिला आपल्या इज्जतीस घाबरुन गुन्हे ही
दाखल करीत नाहीत. त्यांचही काय चुकतं म्हणा? जर कायद्याचे रक्षकच कायद्याचे भक्षक बनून
त्यांच्या जखमांवरचे खपले वारं वार काढत असतील तर कशाला न्यायदानावर विश्वास असेल
त्यांचा? बर जरी त्यांनी हिंमत बांधून गुन्हा दाखल जरी केला तर काही निर्लज्ज वकील!... होय
निर्लज्ज! त्या अपार कष्टातून जाणा-या पिडितालाच पुन्हा पुन्हा प्रश्न करुन त्यांच्या इज्जतीची
चेष्टा करतात. या मानसिक आणि शारीरीक छळाला कंटाळून त्या मूली आत्महत्येसारखं टोकाचं
पाऊल उचलतात.
परं तु आज स्त्रीयांच्या या अवस्थेला केवळ समाज आणि न्यायव्यवस्थाच जबाबदार नाही
तर स्वतः स्त्रीयाही तितक्याच जबाबदार आहे त. स्त्रीभण
ृ हत्या प्रकरणात एका आईला तिच्या न
जन्मलेल्या मुलीची हत्या करायला, तिची सासू जी स्वतः एक स्त्रीच आहे ती स्वतः प्रवत्त
ृ करते.
का? तर यांना वंशाचा दिवा हवा असतो. परं तु ते हे कसे विसरतात की हाच दिवा तेवत
ठे वण्यासाठी ज्या पणतीची साथ हवी असते ती कशी मिळणार? काही मुली निर्लज्जपणे
पार्ट्यांमध्ये अश्लिल प्रकारचे काम करतात. यामुळे संपुर्ण स्त्री जातीला त्याचे परीणाम भोगावे
लागतात. अशा ठिकाणी मुलांचेही शारिरीक व लैंगिक शोषण केले जाते त्यामुळे संपुर्ण पुरुष वर्गच
अत्याचारी असतो हे म्हणणेही अयोग्यच आहे .
महिलांवरील हे सर्व अत्याचार थांबवण्यासाठी आजच्या घडीला गरज आहे ती
शिवशासनाची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायव्यवस्थेची. छत्रपतींचा आपल्या सैन्याला सक्त
आदे श होता की, "जेव्हाही मोहिमेवर जाल अथवा कोणत्याही परप्रांतात छापा टाकाल तेव्हा तेथील
शेतक-याच्या गवताच्या काडीला आणि आई-बहिणीच्या साडीलाही धक्का लागता कामा नये .
परस्त्री मातेसमान मानावी. आणि जर कोणी याचे उल्लंघन केले तर त्याला शिक्षा एकच
‘कडेलोट’." याच्या मागचे कारण म्हणजे शिवरायांना जिजाऊंची शिकवणच होती, "गोठ्यातील
गाय, अंगणातील तळ
ु स व घरातील माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याची
गय केली जाऊ नये ." म्हणन
ू च म्हणतो स्त्रीवर हात टाकणा-या नराधमांचा चौरं ग करणारे तेच

Page 2 of 3
शिवशासन आज हवे आहे .
परं तु आजची प्रत्येक स्त्री ही एक हिरकणी आहे , प्रत्येक स्त्री एक शिवकन्या आहे . घर,
मल
ु ं, नातेवाईक, काम, इत्यादी सर्व आघड्या एकाच वेळी लिलया पेलते. कदाचित आजच्या
परु
ु षालाही हे मेरुपर्वतच भासेल. आजच्या स्त्रीच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाथेंबात जिजाबाई,
आहिल्यादे वी व हिरकणीचा अंश आहे . म्हणन
ू च ती आज बसमधील गैरवर्तन करणा-या है वानास
चोपते व दिवसभरात परु
ु षांच्या ढासळलेल्या नजरे ची बरु
ु जं उतरून पन्
ु हा संध्याकाळी आपल्या घरी
परतते. म्हणतो

प्रत्येक स्त्री ही ‘हिरकणी’ असतेच.

शिवरायांचा मावळा म्हणून याक्षणी थांबतो पण पुन्हा अन्यायाविरूद्ध निधड्या छातीने


उभा राहिन पण हातात तलवार नाही तर लेखणी घेऊन.
:- अनिकेत आनंद जगताप

Page 3 of 3

You might also like