You are on page 1of 5

स्थळ - राष्ट्रीय नाट् य विद्यालयातील अभिमंच नावाचं मोठं नाट् यगृह.

मोहितने एन एस डी रिपेर्टरीसाठी उभ्या के लेल्या ‘कॉम्रेड कंु भकर्ण’च्या एकूण सहांपैकी पहिली रंगीत
तालीम संपलेली ! मोहित आणि माझ्यातल्या काही थोड् याफार चर्चा होत्या त्या संपेपर्यंत एक व्यक्ती, थोडी दरू , मी मोकळा व्हायची वाट पाहात उभी आहे हे मला
कळलेल.ं मोहित माझ्या कामाबद्दल चागं लाच समाधानी असल्याने आमची चर्चा लगेच सपं ते. मी प्रथमच 75 दिवे वापरून काम के लं असल्याने त्यावर मोहित खषू आहे
याचं काहीतरी उत्तम मनात तयार होत असतानाच, ती इतका वेळ शांत थांबलेली व्यक्ती पढु े होते.
“यह डिझाइन आप का था? आप ही ने ऑपरे ट किया?” ती व्यक्ती.
“जी हां”, मी.
“पचहत्तर लाईटे यजु हुई । पचहत्तर?”
“हां जी – कुछ मेरे से ...” मी जरासा अचंब्यात. काहीतरी चक ु लंय वाटतं .. असं माझ्या मनात ... तेवढ्यात ती व्यक्ती शेक-हॅन्ड साठी हात पढु े करते. एन एस डी रिपेर्टरीचे
तेव्हाचे प्रमख
ु असलेली ही व्यक्ती हसू लागते आणि म्हणते, “ मझु े जब पता चला के कोई पचहत्तर लाईटे यजू कर रहा है, तो मैं सोचने लगा की यह व्यक्ती लाईट डिजाईन
जानता भी है या नहीं? इस लिये चपु चाप वहां कोने में बैठे देखता रहा ....” या सराच्ं या पढु ल्या अस्ताव्यस्त बडबडीत मला हे कळलं की आजवर विद्यालयात आणि
रिपेर्टरीत अनेकांनी, सातत्याने, मी वापरले होते त्याच्या कमीतकमी तिप्पट दिवेच वापरले होते. त्यामळ ु े इतके कमी दिवे वापरून काम करतोय बापडा, तर याला माहित तरी
आहे का त्याचं काम, असा प्रश्न पडायची वेळ आली. त्या नाट् यगृहात 170 च्या आसपास दिवे सतत उपलब्ध असतात. मी जेवढे दिवे वापरल्याबद्दल म्हणनू मला भीती
वाटत होती, तेवढे दिवे या आधीच असलेल्या दिव्यात आणखी मागवनू लोक काम करत असतात हे ऐकून मी थक्क झालो होतो.
*******
खपू वर्षं आधी. स्थळ : दौंड मधली एक रे लवेची शेड. रंगवर्धन महोत्सवात मोहितच्याच ययातीचा प्रयोग. फळकुटानं ी तयार के लेल्या स्टेजवर . ६ स्पॉट आणि 2 हॅलोजन
असे एकूण दिवे. डीमर्सची संख्या आवश्यकतेपेक्षा कमीच. मी दपु ारी दौंडच्या मार्के टमधनू आणलेले रे ग्यल
ू ेटर्स स्टेजच्या खांबांना बांधनू मी तयार. प्रयोग संपेपर्यंत सर्व
रे ग्यल
ू ट
े र्स बाद होत होत मी प्रयोग स प
ं वले ल ा !!
********
असाच एक प्रयोग. बालगंधर्व रंगमंदिर, पणु े इथे. गजब कहाणी या आमच्या नाटकाचा प्रयोग. आमचा प्रयोग रात्री 9.30 चा, पण आधी मराठी गाण्यांचा एक नामांकित
कार्यक्रम. हा कार्यक्रम संपल्यावर म्हणजे 8 वाजता आम्हाला रंगमंच ताब्यात मिळणं अपेक्षित. गजब कहाणीचं अवाढव्य नेपथ्य आणि त्यासाठी चाळीसएक दिव्यांची
प्रकाशयोजना. त्यामळ ु े प्रत्येक सेकंद महत्वाचा आणि 8 काय, 8.30 झाले तेव्हा आधीचा कार्यक्रम संपला. आम्हाला रंगमंच संपर्णू पणे मोकळा मिळण्याच्या सर्व आशा
मिटल्याचा अदं ाज साधारण पावणे आठलाच आला होता. आणि यद्ध ु पातळीवर काम करून आपलं साध्य कसं शक्य आहे याचा प्लॅन मी तयार के ला. आधीचा कार्यक्रम
चालू असतानाच एकीकडे विंगांमधनू आणि फूट म्हणनू ठे वायचे दिवे जोडायला घेतले. ते कुणाच्या अध्यात मध्यात येणार नाहीत असे बाजल ू ा ठे वनू दिले. पॉवरपॅक पासनू
ओढायच्या के बल्स ओढून ठे वल्या, आणि दिव्यानं ा आवश्यकतेनसु ार क्लॅम्पस् आधीच लावनू ठे वले. साधारण 45 टक्के काम असं साधनू घेतलं आणि 8.30 वाजता तो
प्रयोग संपताच, त्यांचं प्रकाशयोजनेचं साहित्य त्याच्या तंत्रज्ञाला काढून देण्याचं काम करत करतच आमचं उरलेलं कामही के लं, करवलं. सरतेशेवटी 9 वाजनू 25 मिनिटांनी
माझं काम संपलं होतं आणि मी कंसोलवर बसलो होतो. 9.30 ला पहिली घंटा देऊन झाल्यावर चहाचे घोट घेत घेत कंसोलवरची डिमर्सची नावं लिहीत तिसऱ्या घंटेपर्यंत
प्रयोगासाठी सिद्ध झालो.
********
या तिन्हींही उदाहरणामं ध्ये प्रकाशयोजना आपला अपेक्षित प्रभाव राखनू किंवा त्यापेक्षा जास्त प्रभावाने झाल्यामळ
ु े , प्रयोगानतं र अभिनदं न घेताना अपरिहार्यपणे माझं मन
विचार करत होतं ते संसाधन-श्रीमंत आणि संसाधनक्षम (resource rich असणं आणि resourceful असणं) असण्याबाबत.
आज, ही (आणि अशी माझ्या आयष्ु यातली अनेक) उदाहरणं माझा संसाधनांबाबत किंवा नाट् यच नाही तर सगं ीत-नृत्यासहित सादरीकरण-कलाक्षेत्रातल्या एकूण पायाभतू
सवि
ु धांबतचा एकूण विचार घडवत गेली आहेत. द बॉक्सच्या निर्मिती, नियोजन, व्यवस्थापन आणि आजवरच्या यशस्वी वाटचालीत या चिंतनाने मला दिलेला प्रकाशच
महत्वाचा ठरत आला आहे. या सर्व बाबतीत चिंतनातनू तयार झालेलं सांगण्यासारखं बरंच आहे, परंतु या लेखात मला प्रकाशयोजनेवर भर द्यायचा आहे. सबब, तेच बोल.ू
नाटकाच्या प्रकाशयोजनेबाबत आपल्याला या क्षेत्राच्या आवाक्याप्रमाणे विविध प्रकारे विचार करावा लागेल. याबाबत एकूणात मला जे काही जाणवतं ते असं ….
1. आपल्या नाटकाच्या एकूण कलाव्यवहारात प्रकाशयोजनेला आपण देत असलेलं स्थान.
मी नाट् यक्षेत्रात आलो तेव्हापेक्षा गेल्या तीस वर्षांत प्रकाशयोजनाकाराला चागं ल्या प्रमाणात जास्त ग्लमॅ र आणि महत्व मिळू लागलं आहे हे नक्की पण अनेक
ठिकाणी अजनू ही प्रकाशयोजनाकार हा तालमींच्या शेवटच्या दिवशी येणारा माणसू म्हणनू च काम करतो.
अनेक तरूण दिग्दर्शक नाटकाच्या दृश्यात्मक भागाकडे जाणीवपर्वू क लक्ष देत असल्यामळ ु े आजच्या नाटकांत प्रकाशयोजनेचा विचार पर्वी
ू पेक्षा जास्त
सकारात्मकरित्या होतो हे जरी खरं असलं तरी बऱ्याचदा प्रकाशयोजनाकारांचं वेगळं बिऱ्हाड नाटकाला जोडून असल्यागत परिस्थिती असते. म्हणजे प्रकाशयोजना
तिचं स्वतत्रं अस्तित्व दाखवण्यासाठीच के वळ असते असं जाणवत.ं म्हणजे अस,ं की त्या त्या नाटकाच्या काळ, काम, वेगाच्या गणिताचा भाग होऊन येणारी
प्रकाशयोजना नाटकाच्या रसास्वादाशी थेट जोडली जाणार असते. पण बऱ्याचदा, नाटकांच्या एकूण काळ, काम, वेगाच्या गणिताला प्रकाशयोजनेने उगाचच जडत्व
प्राप्त करून दिलं आहे की काय असं जाणवणारी कामं वारंवार समोर येताना मी पाहातो. स्पर्धांच्या वेळेच्या गणितात बसवताना दहा मिनिटांत जे सर्व होत असतं ते ते
नाटक स्पर्धेबाहेर काढल्यानंतरच्या प्रयोगांना दोन दोन तास घेऊनही पर्णू होताना दिसत नाही.
कोणत्या प्रकारचे दिवे, का वापरायचे, कोणते रंग आणि ते का वापरायचे हे सर्व एका बाजलू ा जरी आपल्या सौंदर्यदृष्टीचा भाग असले तरीही नाटकाच्या एकूण
अनभु वात थेट बदल घडवणारे असतात. आणि कधीकधी त्यातले काही निर्णय हे तितके टोकदारपणे न घेऊनही चालणार असतं. मी या क्षेत्रात आलो तेव्हा जनरल
लाईटची संकल्पना नाकारली जाऊ लागली होती आणि तीन घमेल्यांसारख्या हडं ् यांची जागा एकूण 9 स्पॉट् सनी घ्यायला सरुु वात के ली होती. “मी जनरल लाईट
वापरत नाही” हे प्रकाशयोजनाकाराचं ं छाती किंवा कमीतकमी नाक फुगवनू म्हणायचं वाक्य होऊन बसलं होत.ं पण हे नऊ स्पॉट् स वापरूनही जर आपण सपं र्णू
रंगमंच एकसमान सपाट प्रकाशाच्या तीन एरियांमध्ये विभाजित करण्यापलीकडे काहीच करत नसू तर काळ-काम-वेग आणि आर्थिक कारणांमळ ु े हे असं न करण्यात
शहाणपणा आहे असं माझं स्पष्ट मत होतं. मी त्या काळातही आवश्यक नसेल तरी उगाचच छाती किंवा नाक फुगवता यावं म्हणनू जनरल लाईटला फाटा दिला नाही.
अगदी आजही, नाटकाच्या तगण्याच्या दृष्टीने वेळ किंवा पैशांची बचत करायच्या उद्देशाने हॅलोजन लाईट् स पण मी नाकारत नाही.
आपण कितीही नाही म्हटलं तरी नाटक कलेचा सामना हा ओटीटी आणि चित्रपटांच्या दृश्यात्मकतेशी लागतोच. प्रेक्षक आणि आपल्याही नजरे त, दृश्यात्म भाषेवर
ही दोन माध्यमं सतत आघात करणारी असल्याने हे होतचं . भारतात रंगीत टीव्ही आल्यानतं र त्याच्या चमके शी रंगमचं ावरची चमक आपणही कळत-नकळत तोलनू
पाहू लागलो आणि म्हणनू च 500 वॉट किंवा 650 वॉटचे दिवे आपण नाकारू लागलो. हळूहळू नव्हे तर बऱ्यापैकी वेगाने 1000 वॉटचे दिवे आपल्या क्षेत्रात
सगळीकडे स्थिरावले. आज अशी परिस्थिती आहे की छोट् या नाट् यगृहामं ध्येही 300, 500 किंवा 650 वॉटचे दिवेच खरंतर चालू शकतील, योग्य ठरतील, असं
असनू ही हे दिवे बाजारात उपलब्धच राहिलेले नाहीत किंवा अभावाने मिळतात आणि मिळतात त्यांची खात्री दिली जात नाही. म्हणनू के वळ छोट् या
नाट् यगृहांमध्येही हजार वॉटचे दिवे लावले जातात. हा असाच बदल आता एल ई डी दिव्यांच्या बाबतीत होऊ लागला आहे आणि तो आणखी दहा एक वर्षांत
स्थिरावेल. याबाबतीत मात्र आपलं भाग्य तसं बरं म्हटलं पाहिजे कारण एल ई डी दिव्यांमधे निरंतर चाललेलं संशोधन आणखी 4 ते 5 वर्षांत आपल्या क्षेत्राला
तंत्रज्ञानदृष्ट्या काही फायदेच करून देईल अशी चिह्ण आहेत.
आपला, एक क्षेत्र म्हणनू , या पहिल्या मद्यु ाबाबत सर्वात अधिक कस लागतो तो नाट् यगृहामं ध्ये. म्हणजे आपण आपली नाट् यगृहं कशी बाधं तो? त्यानं ा तत्रं दृष्ट्या यक्त

कशी करतो, राखतो? एकूणात नाट् यगृहांमध्ये प्रकाशयोजनेला काय स्थान मिळतं? याबाबत खेदाने असंच म्हणावं लागेल की बहुतांश आर्कि टेक्ट मंडळींना एफ ओ
एच किंवा फ्रंट ऑफ हाउस नावाचा एक किंवा असे दोन बार लाईट् स लावण्यासाठी द्यायचे असतात हेच अजनू ही माहित नाही. हजार लोकासं ाठी नाट् यगृह
नियोजित करत असताना, ही बाब खर्चाच्या दृष्टीने खरंतर अत्यंत छोटी असायला हवी, असते. पण हा असा एखादा बार महाराष्ट्रातल्या एकाही नावाजलेल्या
नाट् यगृहात नाही. पडद्याच्या आत असलेल्या पहिल्या बारपासनू दिवे देण्यावाचनू पर्यायच ठे वलेला नसतो. याचा अर्थ असा होऊन बसतो की पडद्यापासनू पहिल्या
विंगच्या वेशीपर्यंतच्या भागात नटाला मिळणाऱ्या प्रकाशाची दिशा व्यवस्थित नसते. डोळ्याच्या खाचा असल्यागत तिथे सावल्या पडण्याची शक्यता अधिक
असते. रंगमंचावरून एखाद्या अभिनेता-अभिनेत्रीला प्रेक्षकांना नीट दाखवायचं असेल तर प्रकाश त्याच्या-तिच्या चेहऱ्यावर 45 अंशांत पडणं आवश्यक आहे. ही
नाट् यकलेची मल ू भतू गरजही किती आर्कि टेक्ट मडं ळींनी तपासलेली, अभ्यासलेली असते याबाबत शक ं ा निर्माण व्हावी अशीच आपली सर्व नाट् यगृहं आहेत.
अपवाद आठवत नाही आहेत म्हणजे नसतील असं नाही, पण जवळपास सर्व महत्वाच्या नाट् यगृहांबाबत विचार करून नंतरच मी हे लिहीत आहे.
एफ ओ एच प्रमाणेच प्रकाशयोजनाकाराची बसण्याची जागा कुठे असावी याबाबतही काही नाट् यगृहांत आर्कि टेक्ट लोकांनी काढलेल्या तोडग्यांकडे पाहून थक्क
व्हायला होतं. दोष फक्त आर्कि टेक्टचा असेल असं नाही. म्हणजे नाट् यगृह काही ते एकटे रचत किंवा बांधत नसतात. पण नाट् यगृहाचा संकल्प करणाऱ्या व्यक्ती,
संस्थेपासनू च्या उतरंडीत कुणालाही हे साधे सामान्य ज्ञानाचे प्रश्न पडत नाहीत.
खाजगी, महापालिका किंवा सरकारी – व्यवस्थापन कोणतंही असो, प्रकाशयोजनेचं व्यवस्थापन एखाद्या कंत्राटदाराकडे देणं सोयीचं मानण्याकडेच एकूण कल आहे.
नाटक करणाऱ्या मंडळींनी के लेलं या तांत्रिक बाबीचं व्यवस्थापन हे कधीही उत्तमच ठरतं. सरकारी नाट् यगृहांमध्ये हे कंत्राटदार फारच अपवादात्मक प्रमाणात
आस्थेसह काम करताना दिसतात. एखाद्या सरकारी नाट् यगृहाचं उद्घाटन होत असताना कितीही उत्तम दिवे तिथे असले तरीही दोन वर्षांत ते सर्व वैभव लोपतं आणि
दिवे आहेत पण त्यात बल्ब नाहीत, ते घाला आणि वापरा या शैलीत उत्तरं मिळे पर्यंतचा प्रवास हे कंत्राटदार उत्तमरित्या “मॅनेज” करतात.
या सगळ्याचं एक महत्त्वाचं कारण मला हे वाटतं की नाटक म्हटलं की त्याचा श्राव्य अनभु व जितका महत्वाचा वाटतो तितकं महत्वाचं स्थान आपण दृश्यात्मक
बाजलू ा देताना दिसत नाही, हेच खरं आहे.
आणि दसु रीकडे फार कमी नाटकांमध्ये रंगांचा किंवा नाटकाच्या दिव्यांचा वापर मद्दु ाम टाळण्याचा ‘विचार’ दिसतो. रंगांबाबत मी एकदोनदा इथे उल्लेख के ला
त्याबाबत सांगणं आवश्यक आहे. रंगांच्या अनावश्यक वापराने उगाच के ली जाणारी उत्तेजना नाटकाच्या कलव्यवहारात सपकता आणते हे एक, तर दसु रीकडे 1000
वॉटचे दिवे वापरायला लागल्यापासनू आपल्यासमोर असलेले रंगवापराचे पर्याय अधिकाधिक महागडे होत आहेत किंवा ते टाळायचं तर जे पर्याय आहेत ते
तंत्रदृष्ट्या हलक्या दर्जाचे आहेत. पर्वी
ू प्रमाणे जिलेटीन पेपरवर काम भागत नाही. जिलेटीन पेपर सरु क्षेच्या दृष्टीने घातक आहेत हे वेगळंच. हा मद्दु ा आपल्याला
प्रकाशयोजनेच्या अर्थकारणापाशीही नेतोच.
पण वरील विवेचनात तरीही वेगवेगळ्या अर्थी आपण नाटकाच्या एकूण व्यवहारात प्रकाशयोजनेला देत असलेलं स्थान आपण तपासायला हवं आहे असचं वाटतं.
2. नाटकाच्या प्रकाशयोजनेचं अर्थकारण
नाटकाची प्रकाशयोजना शिकवताना माझा हा आग्रह नेहमीच होता आणि असेल की दिवा लावण्यापासनू तो चालवनू विशिष्ठ परिणाम साधण्यापर्यंतच्या संपर्णू प्रवासाचा
दोन ते तीन वर्षांचा अनभु व प्रत्येक प्रकाशयोजनाकार होऊ पाहणाऱ्या व्यक्तीने घ्यायला हवा. आपल्या नाटकाचं अर्थकारण के वळ काही वेळाच उत्तम असलेलं दिसेल पण
एकूणात आपल्या (मराठी) नाटकाची आर्थिक स्थिती ही काही सबु त्तेची नसते (अगदीच अपवादाने ती तशी असेल).
अगदी अनदु ानं देणाऱ्या, मंजरू करणाऱ्या व्यक्ती, संस्था यांच्या नाटकाच्या व्याख्येत प्रकाशयोजनेला त्यांनी कुठे ठे वलं असेल यावर प्रकाशयोजनेचे ‘चोचले’ परु वले जाऊ
शकणार की नाही हे ठरणार. पण काही मल ू भतू विचार, प्रकाशयोजनेच्या एकूण पायाशी आहेत हे जर आपण लक्षात घेतलं तर आणि तरी, आपण संसाधनं म्हणनू , या सर्व
सामग्री आणि कुशलतेकडे पाहताना आपण जरा जबाबदारीने पाहू.
आपल्या बऱ्याचशा नाट् यगृहांत त्यांचे असे मालकीचे दिवे नाहीत किंवा विनामल्ू य दिवे मर्यादित असल्याने दिवे असले तरी त्यांचा आर्थिकदृष्ट्या विचार करावा लागतोच.
एक दिवा बाहेरून आणनू लावायचा तर 150 ₹ भाडं कमीतकमी ठरलेलं. आपण असं धरू की आपल्या नाटकाला 20 दिवे लागतात आणि त्यापैकी 6 दिवे नाट् यगृह
आपल्याला विनामल्ू य देतंय. 14 दिवे बाहेरून आणनू लावण्यासाठी आपल्याला साधारणपणे 4000 रुपये तरी खर्च येईल. (मी या गणितात पॉवरपॅक, स्टॅन्ड, अतिरिक्त
साहित्य आणि एकापेक्षा जास्त लाईटमन धरलेले नाहीत) शिवाय बरीचशी नाट् यगृहं एका दिव्यामागे कंझम्प्शन चार्जेस म्हणनू वीज वापराचे 100 ₹ घेत असतात. त्यावर
जीएसटी आहेच.(काही ठिकाणी स्पॉट भाडं आणि कंझम्प्शन हे दोन्हीही 200-200 ₹ आहे)
एकूणात मला 20 दिव्यांचा प्रकाशयोजना प्लॅन वर म्हटल्याबरहुकूम राबवण्यासाठी माझ्या नाटकाचे (200 ₹ तिकीट धरल्यास) प्रत्येक प्रयोगांचे 30 प्रेक्षक खर्ची पडतात.
माझ्या नाटकाच्या एकूण अर्थकारणात हे नक्की कसं काय आहे?
पस्तीस-चाळीस दिवे, प्रोफाइल सारखे महागडे दिवे जिथे उपलब्ध नाहीत तिथेही आणनू वापरण्याचा अट्टाहास आपण ज्या आपल्या ‘कलात्मक निर्णयापोटी’ घेणार किंवा
घेतो तो निर्णय नाटकाच्या तगनू राहण्यालाच खीळ घालणारा तर ठरत नाही ना?
यात एक मद्दु ा असा निघतो आणि मला सतत हा प्रश्न अनेकांना विचारावासा वाटतो. नाटकाच्या त्या त्या वेळच्या आर्थिक / काळ-काम-वेग किंवा अन्य बाबींमळु े निर्माण
होणाऱ्या विपरित किंवा अत्यत्तु म स्थितीप्रमाणे, प्रकाशयोजनेत काय काय राखायचं नि काय काढायचं याचा निर्णय घेता येईल, असा आपला प्रकाशयोजनेचा फे रविचार
करता येण,ं हा तिचा अगं भतू गणु त्याच्ं याकडून राखला जातो का? आर्थिक परिस्थितीबाबत रडगाणं गाणाऱ्या अनेक नाटकाचं ी प्रकाशयोजना खर्चिक असताना दिसते
तेव्हा प्रकाशयोजनेचा हा हिशेबी भाग आपल्याला विसरून चालणार नाही याची संबंधितांना आठवण करून द्यावीशी वाटते.
याबाबतीत अर्थकारण पर्णू पणे धाब्यावर बसवनू एका अर्थी बेजबाबदार वागणाऱ्याचं ा द बॉक्समध्ये मला आणखी एक वेगळाच अनभु व आला आहे. द बॉक्स मध्ये भरपरू
दिवे बकि ु ं गचा भाग किंवा नाट् यगृहासोबत विनामल्ू य मिळतात. पण म्हणनू व्हेन्यू स्पॉन्सर म्हणनू बॉक्सचा विचार करताना नाटकातील अत्यंत प्रशिक्षित व्यक्तीही, फक्त
त्यांना आवश्यक वाटणाऱ्या तीन ते चार, प्रसंगी सहा-सात रंगीत तालमींचाच विचार करताना मला दिसल्या आहेत. इथे माझा मद्दु ा त्यांची तक्रार करण्याचा नाहीच. पण
क्षेत्र म्हणनू संसाधनं वापरत असताना एखाद्या नाट् यगृह व्यवस्थापनाने आपल्याला दिलेला खल्ु या दिलाचा प्रवेश (आर्थिक बाजल ू ा) अरबाच्या उंटाच्या धर्तीवर तर आपण
वापरत नाही ना? हा विचार व्हायला हवा असं मला वाटतं.
प्रकाशयोजनेची आर्थिक बाजू ही खपू कटकटींची आहे. प्रत्येक नाट् यसस्ं थेने के वळ आपल्या मालकीचे दिवे किंवा पॉवरपॅक घेऊन ती सटु णारी नाही. उलट, असे दिवे
किंवा अन्य साहित्य घेणं हे वेगळ्या दष्टु चक्रात आपल्याला अडकवणारी बाब ठरू शकते. कारण तांत्रिक बाबींची मौज अशी आहे की के वळ त्या आपल्याकडे असनू
भागत नाही तर त्यांवर ताबा असणाऱ्या कुशल व्यक्तीही त्यांच्यासोबत असणं आवश्यक असतं.
काहीजण म्हणतील की हे सर्व विवेचन प्रायोगिक नाटकांच्या बाजनू े चाललं आहे. व्यवसायिक नाटकाचं काय? त्या बाबतीत मी आता जे लिहिणार आहे त्यालाही
अपवाद असतील (तशी शक्यता कमीच आहे, तरीही म्हणयू ा असं, आशेने) पण प्रकाशयोजनाकार म्हणनू तंत्रज्ञांना खरं मल ु ख
ु मैदान मिळतं ते प्रायोगिक नाटकातच.
व्यवसायिक नाटकात मळ ू संकल्पना बांधनू देऊन झाली की प्रकाशयोजना कुणा ऑपरे टरच्या ताब्यात जाते. प्रकाशयोजनकार दरवेळी प्रयोगाला जाऊन प्रकाशयोजना
करत बसला आहे हे नाटकाच्याही आणि प्रकाशयोजनाकाराच्याही वैयक्तिक अर्थकारणात न बसणारंच ! तर पहिले काही प्रयोग हे सर्व हस्तांतरण करे पर्यंत
प्रकाशयोजनाकार त्या प्रक्रियेत अपेक्षित असतो. साधारण त्या समु ारास त्याला त्याचं एक गठ्ठा मानधन मिळणं अपेक्षित असत.ं नतं रच्या प्रयोगामं ध्ये निर्मात्याकडून
कंत्राटात बांधल्या गेलेल्या सामग्री परु वठादाराकडून ती प्रकाशयोजना सांभाळली जाते. एक लसावि काढला तर साधारण 15 ते 20 दिव्यांचा संसार इथे उभा करता येतो.
त्यात 10 ते 12 स्पॉट् स आणि उरलेले पार कॅ न्स ! व्यवसायिक नाटकांच्या प्रकाशयोजना करणारा माझा एक मित्र सांगतो की तो अनेकदा डिझाइन असंच करतो की बजेटचे
मद्दु े यायला लागले की काय काय कमी करायचं हे ही आधीच सांगितलेलं असतं. तसं नाही के लं तर दसु ऱ्या कुणाच्या डोक्याने हे परस्पर होण्याची जोखीम असते. 500 ते
1000 रुपये दर प्रयोगाला ऑपरे टरला मिळतात आणि 25 ते 50 हजार रुपये एक रकमी डिझाइन के ल्याबद्दल प्रकाशयोजनाकाराला मिळतात या पलिकडे, या
कालाव्यवस्थेत व्यावसायिक या लेबलपलिकडे काहीही फार बदलत नाही. वास्तविक पाहायचं तर 40, 50 आणि कधी अगदी 60-70 दिवेसद्ध ु ा लावण्याचं स्वातंत्र्य
प्रकाश योजनेत एखाद्या तंत्रज्ञाला प्रायोगिक नाटकच देत आलं आहे आणि अद्यापही बऱ्याच प्रमाणात ते तसंच आहे. ही एक मौज आहे. प्रायोगिक नाटकाला जसं काही
असेल तसं हे गणित बसवता येतयं हे मात्र खरं आहे. व्यावसायिक रंगभमू ीवर नफातोट् याच्या गणितात बाधं लं जायची वेळ येते तेव्हा नाटकाच्या आकंु चन पावाव्या
लागणाऱ्या अंगांमध्ये प्रकाशयोजना आघाडीवर असते हे मात्र नक्की.
माझ्या अंदाजाप्रमाणे प्रकाशयोजनाकाराला पर्णू पणे स्वातंत्र्य दिलं जातंय आणि शेवटच्या प्रयोगापर्यंत ते तसंच अबाधित आहे असं चित्र प्रायोगिक नाटकात मबु लक आणि
व्यावसायिक नाटकात मात्र अभावाने किंवा अपवादाने पाहायला मिळण्याची कारणं मळ ु ातच वर उल्लेखलेल्या पहिल्या मद्यु ातल्या विवेचनापाशी आणि अर्थकारणाशी
येऊन थांबतात.
3. संकल्पना, प्रशिक्षण आणि साधना
नाटकाची प्रकाशयोजना ही बाब संकल्पना म्हणनू नीट कळायची आणि अशा नीट कळण्यातनू ती व्यक्त व्हायची असेल, तर त्या व्यक्तीला एकाच वेळी कवी मन, हिशेबी
मन आणि तत्रं ज्ञ मन असावं लागतं हे मी अनेकदा सागं त आलो आहे. माझ्या कोणत्या सृजनात्मक निर्णयाला कोणत्या पद्धतीचा दिवा कसा वापरल्याने तो निर्णय एकाच
वेळी सृजनात्मक आणि व्यावहारिक शहाणपणाचा ठरे ल हे कळण्याची आवश्यकता आहे, तशीच प्रत्येक दिव्याला शक्यतो एकापेक्षा जास्त कामं, आपल्या एकूण
नियोजनात नेमनू देण्याची खबु ी जमत जायला हवी. यासाठी मग एका नाटकाचे अधिक प्रयोग होणं, किंवा कमीतकमी दोनचार रंगीत तालमी होणं यातच ते लक्षात येत
जाण्याची शक्यता अधिक. माझ्या नाटकांच्या प्रकाशयोजनेत फक्त एखाद्या छोट् याशा कामासाठीच येऊन जाणाऱ्या आणि तेवढंच काम असणाऱ्या एखादया दिव्याचा मला
अतोनात त्रास होत आला आहे. असा एखादा दिवा कितीही संदु र इफे क्ट देत आला असला तरी ‘या एका इफे क्टसाठी दोन प्रेक्षक गिळतो’ म्हणनू मी त्याचं काय वेगळं
करता येईल यावर काम करत आलो आहे, आणि हा घोषा मनाला लावनू त्यावर तोडगेही काढत आलो आहे. नाटकाच्या प्रकाशाबाबत नाटक चालू नसताना होणारा
विचार, सतत प्रकाशाकडे ‘उघड् या डोळ्यांनी’ पाहण्यासाठी मन तयार करत राहणं, ठे वणं ही आपली साधना ! कविता, चित्रं, फोटोज् यांचा अभ्यास ही ही साधनाच.
आणि दसु ऱ्याचं ी नाटकं, त्याच्ं या दिवे नसलेल्या तालमी पाहणं आणि त्याच्ं यावर आपला एक प्लॅन तयार करण,ं पढु े त्याच्ं या प्लॅनशी आपला प्लॅन ताडून पाहणं अशा
काही साधना आपण विकसित करू शकतोच. मद्दु ा हा आहे आणि उरतो, की आपण हे करतो का?
‘व्हॉट वर्क्स वर्क्स अँड दॅट इज माय मेथड’ असं छाती ताणनू म्हणणारे आहेतच, असतातच. झाली ना प्रकाशयोजना, मग झालं तर, असं आपण म्हणनू टाकतो. मोकळे
होतो. पण एक व्यक्ती दिवे लावते आणि दसु री तेच काम पहिलीपेक्षा वेगळं करते, त्यामळ
ु े मद्दु ा दिवे लावणाऱ्या एका व्यक्तीला बाजल
ू ा करून दिवे लावणाऱ्या दसु ऱ्या एका
व्यक्तीला तिथे आणनू बसवण्याचा नसतो. ती मात्र एक ठराविक काम साधणारी व्यक्ती नसते, तो एक अनभु व घेणारा, आणि प्रकाशाच्या अंगाने आपल्याला समजलेलं जग
आपल्या जाणीव-नेणिवेतनू परावर्तित करणारा, तिपेडी किंवा बहुपेडी मेंदू असतो !
4. कुशल कामगार उपलब्धता आणि याबाबतचं भविष्य
जर आपल्याला दिवे देणारी नाट् यगृहं देता येत नसतील तर आपल्याला दिवे देणाऱ्या आणि काढून नेणाऱ्या व्यवस्था आपल्याशा कराव्या लागतील आणि तेच आपण
करतो आणि करत आलो आहोत. पण दिवे लटकावनू देणं, त्यांचे वीज जोड मनासारखे करून देणं, ते काळजीपर्वू क वाहून नेणं, त्यांची निगराणी राखणं यासाठी तयार
कारागीर आता तितक्या प्रमाणात तयार होताना दिसत नाहीत. मळ ु ात हे काम कमी दर्जाचं आहे हे मानलं जातंय, जाऊ लागलंय. प्रत्येकाला ऑपरे टर व्हायचं आहे, रिगिंग
आणि पॅचिंग हे सेटअपचं काम कमी दर्जाचं ! परदेशात अतिशय तडफदार तरुण तरुणी एका नाट् यगृहांत एके कट् यानेच हे सर्व करताना मी पाहिले आहेत. आपल्याकडे
नोकरवर्ग असू शकतो, त्यांच्याकडे लोकसंख्या कमी असते, लेबर महाग पडतं वगैरे सगळी समर्थनं आपण करत राहतो, पण शिडीवर चढून लाईट लावणारा माणसू
आपल्याला कमी दर्जाचा मानायची सवय असते आणि बव्हश ं ी म्हणनू आपल्याला ते करायचं नसत.ं
आता याबाबत इथलं एक उदाहरण घ्यायचं तर आज पण्ु यामध्ये हे सर्व काम करणारी जी 30-40 माणसं आहेत त्यांचं सरासरी वय 30-35 आहे. म्हणजे आणखी 10 ते 15
वर्षांत उंच शिडीवर चढायला हे सर्व अयोग्य किंवा असमर्थ होऊ लागतील. दिवे परु वणाऱ्या व्यक्ती, कंपन्यांना या सर्वांना तसंच वापरत, त्याच प्रमाणात काम करत राहता
येणार नाही. स्पर्धा वाढणार आहे आणि काम वाढवावं लागणार आहे. अशात वयाने वाढणाऱ्या या माणसांऐवजी काही नवी माणसं तरी किंवा तंत्रज्ञान तरी आणायला हवं.
किंवा द बॉक्सपेक्षाही चांगल्या सवि
ु धा मांडूनच देणाऱ्या पायाभतू सवि
ु धा कुणीतरी उभ्या के ल्या पाहिजेत. पण हे शेवटचं तर कठीणच आहे.
पण म्हणजे याबाबत मलू भतू विचार होताना दिसत नाही. नेपथ्य आणि प्रकाश या दोन्ही क्षेत्रांत कुशल कामगारांची किंवा कारागीरांची नवी फळी जाणीवपर्वू क तयार
करायला घेण्याची नितांत आवश्यकता आहे.
5. काय काय करता येईल?
के वळ प्रकाशयोजना या क्षेत्राबाबत काही म्हणायचं झाल्यास आधीच्या पिढीने आपल्याला उमजलेल्या गोष्टी के वळ बढाईखोर चर्चा-किंवा गप्पा-स्वरूपात न मांडता
त्यांची मांडणी अनभु व किंवा तांत्रिक तपशिलांनी यक्त
ु ज्ञानाच्या स्वरूपात करायला हवी.
आपल्या एकूण नाट् यव्यवहारात प्रकाशयोजनेचं काय स्थान आहे (किंवा आपण देत आलो आहोत) आणि काय असू शके ल याचं एकूण नीटस भान येण्यासाठी काही
कार्यक्रम, कार्यशाळा प्रकाशयोजनाकारांपेक्षा दिग्दर्शकांसाठी व्हायला पाहिजेत.
निर्माता संघ किंवा नाट् य परिषदेसारख्या शीर्षस्थ संस्थानी नाट् यगृहांसाठी तांत्रिक मार्गदर्शक संहिता तसंच किमान सविु धा आणि त्यावर आधारित रे टिंग सारखी काही
व्यवस्था किंवा पाहणी, निरीक्षण इत्यादी करण्याची आवश्यकता आहे. इतकंच नाही तर कमीतकमी अमक ु साहित्य-सामग्री प्रकाशयोजनेसाठी उपलब्ध ठे वण्यासाठी
नाट् यगृह व्यवस्थापनानं ा उद्यक्त
ु कसं करता येईल याची काही योजना असायला हवी. प्रायोगिक नाटकासं ाठी तरी कंझम्प्शन चार्जेस प्रति लाईट 100 किंवा 200 रुपये इतके
भयंकर न घेता, मीटर रीडिंग आधारे च घेतले जायला हवे. द बॉक्समधे वर्षा-दीड वर्षात याबाबतच्या अनभु वानसु ार मीटर रीडिंगच्या आधारे कंझम्प्शन चार्जेसमध्येच
कितीतरी बचत प्रायोगिक संस्थांना करून देता येईल.
नेपथ्य आणि प्रकाश या क्षेत्रात कुशल कारागीर तयार करण्यासाठी काही उपक्रम आयोजित होण्याची नितांत आवश्यकता आहे.
के वळ प्रकाशयोजना नव्हे तर एकूण संसाधनांचा समग्र विचार के वळ एक नाट् यकलाकार किंवा एक नाट् यसंस्था म्हणनू करत असतानाच दसु रीकडे क्षेत्र म्हणनू एक विचार
आपल्या सर्वांच्या मनात सशक्त व्हायला हवा.
आणि क्षेत्र म्हणनू विचार करताना मला सतत महत्वाचा वाटतो तो नाट् यानभु वाचा विचार. इव्हेंट्स, सिनेमा, टीव्ही, सर्क शी, फोर - फाईव्ह डी मनोरंजन, डिजिटल गेम्स
इत्यादी सर्व गदारोळात आपण निवडलेली ही कला आहे, नाटक ! आपली वाटते ही कला म्हणनू आपण इथे आहोत.
या क्षेत्राची जी जी मर्यादा आहे असं तल
ु नात्मक दृष्टीने आपल्याला वाटतं तीच या क्षेत्राची झेप आहे आणि तीच या सर्व इतर गदारोळातही आपल्याला तगनू ठे वणार आहे
याचं नीट भान जर आपण विकसित के लं, तर आपल्या हातात असलेलं, नसलेलं एके क संसाधन त्या अस्सल, रसरशीत आणि स-इद्रि ं य अनभु व निर्मितीसाठी करण्याकडे
आपण लक्ष देऊ लाग.ू अधिक सजगतेने, अधिक जबाबदारीने संसाधनं वापरू … वापरून टाकणार नाही. कलाव्यवहारात के वळ स्वतःच्या जगण्या-तगण्याची फिकीर
असलेली धडपड करत राहणार नाही तर सहवेदना आणि समवेदनेतनू क्षेत्र म्हणनू काही साधत राहू, साध्य करून देत राहू शकू.
अशा व्यापक भानासह उभे राहिलो तर एका माणसाच्या मनीचं दसु ऱ्या माणसाच्या मनी पोहोचवण्यासाठी निर्माण झालेल्या या आदिम कलेसाठी आपण जे जे करू, ते
के वळ उजेड या अर्थी प्रकाशाची तिरीप किंवा चारदोन किरण देण्यासाठी नव्हे तर या एकूण कलाव्यवहाराला तमसो मा ज्योतिर्गमय म्हणता येणारी वैश्विक ऊर्जा देण्यासाठी
!
- प्रदीप वैद्य
- 9822059429
- vaiddya@gmail.com

You might also like