You are on page 1of 2

नाटकाशी निगडित कलाव्यवहारात सादरकर्ते, प्रेक्षक आणि सादरीकरणाची जागा या तीन बाबी सर्वात महत्वाच्या मानल्या जातात.

नाटक या कलेसाठीच्या पायाभतू सवि ु धा उभ्या करत असताना या तत्वाचा मल


ू भतू विचार आवश्यक असायला हवा. यापर्वी ू अनेकदा
विशेषतः महाराष्ट्रात नाट्यगृहे उभी करताना या बाबींचा विसर पडत असल्यासारखी ती बांधली गेली आहेत की काय अशी शक ं ा
उत्पन्न होते. नाट्यकलाव्यवहार भविष्यात कसा कसा होत जाऊ शके ल, वेगवेगळ्या पद्धतीने नाटक सादर होताना त्याला आवश्यक
पायाभतू सविु धा नेमक्या काय असायला हव्यात, त्यात बदलासं ाठी त्या सज्ज असायला हव्यात हे मद्दु पे ण लक्षात घेतलेले दिसत
नाहीत. मग नेमके काय व्हायला हवे आहे?
नाटकासाठी पायाभतू सवि
ु धा म्हणजे नाटक सादर करायच्या अथवा नाटक सादर करता येईल अशा सोयीच्या जागा, तांत्रिक संसाधने
आणि मनष्ु यबळ अशी त्रिमित रचना आपण पाहायला हवी.
सर्वप्रथम नाटक आज कसे कसे सादर होते, कुणाकुणाला ते पाहावेसे वाटते, कोणत्या पद्धतीच्या तांत्रिक तयारीने ते सादर होते याचा
मल
ू भतू अभ्यास आवश्यक आहे. हा अभ्यासच आपल्याला आजच्या कलाव्यवहाराला पोषक आणि उद्यासाठी सज्ज अशा
नाट्यगृहांची निर्मिती करायला सक्षम करू शकतो. १९५० किंवा १९७० सालच्या आडाख्यांबरहुकूम ते करून चालणार नाही.
आजचे नाटक हे पूर्वीप्रमाणे एकाच पद्धतीने सादर होत नाही. नाटकाचे स्वरूप पालटत आहे आणि तसेच पालटले आहेत ते प्रेक्षकही.
आजचे नाटक प्रामख्ु याने साहित्यस्वरूप किंवा सहि
ं ताप्रधान उरलेले नाही. अनेक तात्रि
ं क अगं ाचं ा अतं र्भाव ते सहजी आणि प्रभावीपणे
करून घेते. व्यावसायिक आणि हौशी असे दोनच वर्ग न उरता आता त्याखेरीज समांतर, प्रायोगिक, मध्यममार्गी असे वेगवेगळ्या
पठडीतील वर्ग आता कार्यरत दिसतात. प्रत्येक पद्धतीची नाटके वेगळ्या आर्थिक आणि कलात्मक जाणिवा, समीकरणे आणि
आडाख्यानं ी उभी राहतात, चालवली जातात. प्रेक्षकही त्या त्या वर्गातील नाटक वेगळ्या जाणिवानं ी आणि अपेक्षानं ी पाहू लागले
आहेत. असे असताना, जन्ु याच आडाख्यांबरहुकूम सर्व करत राहाणे शहाणपणाचे नाहीच तर संसाधने, वेळ आणि संपत्तीचा अपव्यय
आहे.
द बॉक्सच्या निर्मितीनतं र आमच्या आवारातील एका जागेत आणखी एक छोटे नाट्यगृह उभे राहिले. आज परिस्थिती ही आहे की
दोन्ही नाट्यगृहांमध्ये सादर होऊ शकतात, खल
ु तात अशी भरपरू नाटके सातत्याने दोन्हीकडे सादर के ली जात आहेत.
नाटकाच्या कलाव्यवहारातील नाट्यगृह हा कें द्रबिंदू आहे. सादरकर्ते आणि प्रेक्षक या दोन्हींची कदर तेथे राखली जाणे यासाठी
महत्वाचे ठरते. नाट्यगृहाचं ी सक
ं ल्पना, रचना, कार्य आणि प्रगती साधताना हे कें द्रस्थान ढळू देता नये. द बॉक्सच्या निर्मितीसाठी
नियोजन करताना यातील प्रत्येकासाठी काय अनभु वनिर्मिती आपण करणार आहोत हे आम्ही विचारात घेतले होते. उद्दिष्ट काय आहे
आणि ते कसे व कुणी साध्य करायचे यांतील गल्लत हेच नाट्यगृहांची दरु ावस्था होण्याचे मख्ु य कारण आहे.
नाट्यगृहात कलाकार वापरतात त्या जागा म्हणजे पार्किं ग, रंगभषू ा – वेषभषू ा कक्ष, प्रसाधनगृह, विश्रातं ी कक्ष, भोजनगृह, विगं ा आणि
रंगमंच तर पार्किं ग, प्रतीक्षा दालने, प्रसाधनगृह, उपहारगृह आणि प्रेक्षागृह या जागा प्रेक्षक वापरतात. रंगमंच, ध्वनी-प्रकाश व्यवस्था
कक्ष, पिट, मंचाच्या आजबू ाजच्ू या जागा, रंगमंचावरील अवकाशातील जागा तंत्रज्ञ वापरत असतात. काळ, काम वेगाची गणिते या
सर्वांसाठी वेगवेगळी आणि वेगवेगळ्या तातडीकीची असतात. या सर्व बाबींचा उहापोह नीट करून के वळ निर्मिती किंवा
नियोजनातली सोय / पळवाट याकडे लक्ष न देता या सर्व ठिकाणांचे नियोजन आणि कामकाज करावे लागते.
आणखी एक महत्वाचा भाग या सर्वात असायला हवा, तो म्हणजे नाटकाच्या कलाव्यवहाराबाबतची आणि नाटकाबाबतची आस्था !
ती नियोजकांपासनू ते व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांपर्यंत असणे अनिवार्य आहे. आस्थायक्त ु मनष्ु यबळ हा एक महत्वाचा घटक आहे.
नसु त्या इमारती किंवा तंत्रज्ञानातनू काहीही चांगले उभे राहू शकत नाही त्यांत कार्यरत मनष्ु यबळ हेच अंती महत्वाचे ठरते.
के वळ मोठा अवकाश, मोठ्या इमारती आणि भव्यता यांच्या मागे न लागता किमान आवश्यक गोष्टी उत्तमरित्या मिळवणे आणि त्या
कार्यरत राखणे ही खरे तर अत्यतं आवश्यक गोष्ट आहे. किमान गोष्टींमध्ये स्वच्छता, पाणीपरु वठा, वातावरणातील ससु ह्यता, दृकश्राव्य
अनभु वात सस्ु पष्टता, सुविधांमधील सल ु भता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकूण व्यवस्थेतील परिवर्तनशीलता-लवचिकता या सर्व
गोष्टी मळ
ू आराखड्यापासनू ते अंतिम कार्यकारी संचालनापर्यंत अंतर्भूत नसतील तर नाट्यगृहे या के वळ भाड्याने वापरासाठी दिल्या
जाणाऱ्या वास्तू उरतात. त्याचं ी दरु ावस्था मग क्रमप्राप्त होऊन बसते.
आज या कलेच्या एकूण व्यवहारातील बदल पाहाता कमानी रंगमंचाच्या विशाल आणि अतिविशाल जागा एकापढु े एक निर्माण करत
राहण्यात काही हश ं ील नाही. पणु े शहरापरु ते बोलायचे झाल्यास, सदु र्शन रंगमंचसारखी किमान पंधरा छोटी प्रेक्षागृह,े ज्योत्स्ना भोळे
सभागृह किंवा द बॉक्ससारखी मध्यम आकाराची किमान सहा ते आठ प्रेक्षागृहे असणे ही नाट्यकलेसाठीच्या पायाभतू सवि ु धांची
आवश्यकता वाटते. आणि म्हणनू च शासकीय पातळीवर जेव्हा नाट्यगृहे निर्मिली जातात तेव्हा “या कलेची वितरण व्यवस्था” म्हणनू
त्यांचा विचार व्हायला हवा. नाट्यगृहांची व्यवस्था नियमित कर्मचाऱ्यांना आस्थेने करता येत नसेल, शक्य होत नसेल तर आस्था हा
मळू मद्दु ा नक्कीच असेल अशा नाट्यसंस्थांकडे नाट्यगृहांची व्यवस्था हस्तांतरित करता येण्याचा पर्यायही आजच्या काळात उपलब्ध
असू शके ल हे विसरून चालणार नाही.

You might also like