You are on page 1of 3

प्लँ चेट

आयष्ु यात प्रत्येकाचं एक स्वप्नं असतं ते स्वप्नं धरून ती व्यक्ती जगत असते. स्वप्नीलच हि
लहानपणापासन ू एक स्वप्नं होतं इन्स्पेक्टर होण्याचं. स्वप्नील इन्स्पेक्टर तर झाला पण आजवरच्या
कारकिर्दीत त्याला साधा एक पाकीटमार पकडता नाही आला.डिपार्टमें ट कडून आता त्याच्यावर प्रेशर
आलंय कि जर त्याने महिन्याभरात कुठलीही केस सॉल्व्ह नाही केली तर हे ड ऑफिस सरळ त्याची बदली
गडचिरोलीला करणारे ., हे ऐकून स्वप्निलच्या पायाखालची जमीन सरकली. एरवी चोर चिट्ठ्या
खेळताना सद् ु धा शिपाई न झालेला स्वप्नील वशिल्याने इन्स्पेक्टर झाला पण त्याच्या पोस्टिं गमळ ु े
गन्ु हे गारांचीच जास्त चांदी झाली. काही पोलीस असतात हफ्ते घेणारे नागरिकांकडून सद् ु धा आणि
चोरांकडून सद् ु धा. स्वप्नील त्याच्याच पगारातन ू काही पैसे चिंधी चोरांना द्यायचा या साठी कि बाबा रे मी
तलु ा फालतू गन् ु ह्या खाली पकडेल आणि तंबी दे ऊन सोडेल. तेवढं च माझं चौकीत नाव होईल. पण नाव
राहील बाजल ू ा बदनामीच जास्त झाली. चोरांवर तसंही कोण विश्वास ठे वतं हल्ली, नक ु ताच एक खन ू
झालाय चौकीच्या हद्दीत स्वप्नील घटनास्थळी जातो आणि त्याच्या डोक्याला मंग्ु या येतात. आयष्ु यात
पहिल्यांदा तो डेडबॉडी पाहतोय. तिला पहिल्या पहिल्या तो कोसळतो. हवालदार त्याच्यावर पाणी
मारतात आणि तो घटनास्थळाची पाहणी करायला लागतो. त्याला कळतं कि हि केस सॉल्व्ह करणं सोप्प
नाहीये. घटनास्थळाची पर्ण ू पाहणी करून सापडलेले परु ावे घेऊन स्वप्नील चौकीत जातो. ती डेडबॉडी
पोस्टमोर्टम साठी पाठवण्यात येत.े

स्वप्नील चहा पिण्यासाठी टपरीपाशी येतो तेव्हा त्याला तिथे एक पॅम्प्लेट दिसतं. त्यावर लिहिलेलं असतं
"बाबा सफर शाह पंजाबी" आमच्या इथे तम ु च्या सगळ्या समस्यांचं समाधान करून मिळे ल.,आम्ही मत ृ
आत्म्यांना सद्ु धा बोलावतो .! हे वाचल्यावर स्वप्निलच्या डोक्यात ट्यब ू पेटते. त्याला वाटतं ज्या
व्यक्तीचा खन ू झालाय डायरे क्ट त्याच्या आत्म्याला तो बोलवेल आणि त्याला विचारे ल कि बाबा रे तझ ु ा
खन ू कोणी केला आहे तर तो सांगेल कि खरा खन ु ी कोण आहे करून. केस सोल्व्हड गडचिरोली कॅन्सल.!!
स्वप्नील ने स्वतःचीच पाठ थोपटली आणि दिलेल्या नंबर वर कॉल केला. पलीकडून आवाज आला " बोल
बालका" स्वप्नील ने नसलेल्या आवाजातल्या बेस ला काढून म्हं टलं " बाबा मला खन् ु याला शोधायचंय "
पलीकडून बाबा म्हणतात " शप्पत सांगतो हो मी खन ु ी नाहीये " सगळे खनु ी असंच म्हणतात कि मी खन ु ी
नाहीये करून.. स्वप्नील असं म्हणताच बाबा फोन कट करतात. मग स्वप्नील ला आठवतं मला खन् ु याला
शोधायचंय पण बाबांना तर आत्म्याला शोधायचंय त्यांना पियर प्रेशर दे ण्यात काहीच अर्थ नाही.

तो मांत्रिकाला पन्
ु हा कॉल करतो आणि सांगतो कि बाबा मला एका आत्म्याला बोलवायचंय. मांत्रिक
म्हणतो कि आत्म्याला बोलावणं सोपं काम नाहीये. आपण प्रयत्न करू शकतो आपल्याला हव्या
असणाऱ्या आत्म्याला बोलावण्यासाठी पण मी या गोष्टीची शाश्वती नाही दे ऊ शकत कि तम् ु हाला हवी
असणारीच आत्मा येईल करून. कोणाचीही आत्मा येऊ शकते. आणि जो पर्यंत तम् ु हाला हवी असणारी
आत्मा इथे येऊन इतर आलेल्या आत्म्यांना घालवणार नाही तोपर्यंत कुठलीच आत्मा इथन ू जाऊ
शकणार नाही. तम् ु हाला मान्य असेल तरच मी आत्म्याला बोलावतो. स्वप्नील विचार करून हो म्हणतो
आणि ते प्लँ चेट साठी स्थळ आणि वेळ ठरवतात. स्वप्नील ठरलेल्या वेळेत पोहोचतो एक मोडकळीस
पडलेला वाडा पाहताच क्षणी वाटतं कि भत ु ांची पिढीजात वस्ती असावी तिथे. तो आत प्रवेश करतो तेव्हा
सगळी कडे सांगाडे पडलेत एका सांगाड्यावर त्याचा पाय पडतो तेव्हा " आई आई गं " असा आवाज
त्याला येतो. जणू त्या सांगाड्यात कोणाचा जीव असावा. स्वप्नील त्या सांगाड्या कडे पाहून म्हणतो "
काळजी नका करू काका .. चांगल्या हाडांच्या डॉक्टरचा नंबर दे तो मी तम्
ु हाला " सांगाड्यातन
ू आवाज
येतो "मळ
ु व्याधाचा डॉक्टर असेल तर त्याचा हि द्या " स्वप्नील ठीके म्हणत पढ ु े जातो.

मांत्रिक हवन करत असतो. गेल्या गेल्या हवनासमोर तो नमस्कार करतो तेव्हा मांत्रिक म्हणतो " हे तम् ु ही
काय करताय .?" स्वप्नील म्हणतो हवनाला नमस्कार करतोय. मांत्रिक म्हणतो " छे हो हे हवन नाहीये ..
मच्छर जास्त झाले म्हणन ू मी आपलं हे उगाच पेटवलंय" मांत्रिक जी माझ्या कडे वेळ फार कमीये.
मांत्रिक म्हणतो " तम्
ु हाला कॅन्सर झालाय का .? " स्वप्नील म्हणतो तम्ु ही मांत्रिक असनू सद्
ु धा मला
पाण्यात कसं पाहू शकता ओ.? तम् ु ही तर आशीर्वाद द्यायला हवेत. मांत्रिक म्हणतो " चला कामाला
सरु वात करूयात एक तर शेवटची बस गेली तर ओला करून घरी जायला परवडत नाही. तो खाली प्लँ चेट
आखतो. स्वप्नील खाली बसतो मांत्रिक काहीतरी फंु कतो आणि वाड्यातले दिवे लक ु लक
ु ायला लागतात.
तेवढ्यात समोर ताजमहाल बनवणाऱ्या हात नसलेल्या मजदरु ाची आत्मा येत.े

मजदरु ाला पाहिल्याबरोबर स्वप्नील म्हणतो " अरे शोलेतला ठाकूर इथे काय करतोय" मजदरू म्हणतो "
तम्
ु हाला लाज नाही वाटतं एका कलाकाराची मस्करी करताय .?" स्वप्नील म्हणतो तम् ु हाला हि मराठी
येते .? मजदरू लगेच उत्तर दे तो " तम्
ु हाला तम ु च्या भाषेत उत्तर दे ता यावं म्हणन
ू मी क्रिएटिव्ह लिबर्टी
घेतली" मांत्रिक म्हणतो " झाला तम ु चा फालतप ू णा करून .?" ताजमहाल बनवलाय हो त्याने थोडतरी
गांभीर्य दाखवा.त्या आत्म्याला स्वप्नील खन् ु याला शोधण्याची विनंती करतो पण तो ठरला ताजमहाल
बनवणारा कारागीर तो म्हणतो साहे ब फार फारतर तम ु च्या घराच्या इंटिरियर डिजाईन साठी मी मदत
करू शकतो पण हे खन् ु याला शोधण्याचं कामं काही माझं नाही. एक तर मला आठवत सद् ु धा नाही कि
माझे हात कोणी कापले आहे त करून.

स्वप्नील आणि मांत्रिक ठरवतात कि नाही याची काही आपल्याला मदत होणार नाही . ते दस ु ऱ्या
आत्म्याला बोलावतात प्रेमात आत्महत्या केलेल्या एका कवीची आत्मा तिथे येत.े आल्या आल्या तो
कविता करायला लागतो "डोळे किती भोळे शोधतात आजही तल ु ा यावेळी पावसाळी भेटशील का गं तू
मला" मांत्रिक मधेच त्याला टोकतो अहो कवी जी ते अंजली या नावावरून एक कविता करा ना स्वप्नील
त्याला विचारतो अहो हे काय मधेच मांत्रिक सांगतो अहो बायको सोबत भांडण झालंय ७ दिवस झाले
आज माझ्या सोबत बोललीच नाहीये ती. म्हं टलं तेवढं च कविता करून इंप्रेस केलं असतं तिला. स्वप्नील
जोर जोरात रडायला लागतो. इथे माझ्या जॉब वर सगळं आलंय आणि तम् ु हाला कविता कसल्या सच ु त
आहे त.स्वप्नील म्हणतो तम्
ु ही फ्रॉड मांत्रिक आहात मला वाटतं हे कामं काही तम ु च्याकडून होणार नाही
मला माझे पैसे वापस द्या. मांत्रिक म्हणतो तम् ु हाला काही पैसे वापस मिळणार नाही थोडं धीर धरा येईल
आत्मा त्या मेलेल्या माणसाची. अहो लहानपणापासन ू धीरच धरतोय ओ मी. मला असं वाटतं गडचिरोली
कनफर्म आहे .

मांत्रिक पन्
ु हा आत्म्याला बोलावतो तेव्हा त्या मेलेल्या माणसाची आत्मा येत.े ती आत्मा प्रचंड दारू
प्यायलेली आहे . आल्या आल्या ती आत्मा म्हणते ए वेटर पेग भर स्वप्नील त्याचा पेग भरायला जाणार
तेवढ्यात त्याला आठवतं तो तर पोलीस आहे .लहानपणापासन ू इतका न्यनू गंड भरलाय ना अंगात पोलीस
असन ू सद्
ु धा मी वेटरच आहे कि काय असं सतत वाटतं राहतं. स्वप्नील त्या बेवड्याला विचारतो खरं खरं
सांगा काल चौकात तझ ु ाच खनू झालेला ना. बेवडा खप ू मोठा पॉज घेतो जणू दे शाच्या अर्थव्यवस्थे विषयी
त्याला कोणी त्याचं मत विचारलंय. मग तो म्हणतो खन ू नव्हता झाला माझा. स्वप्नील ला राग येतो तो
म्हणतो हे कसं शक्य आहे एवढा हातभार चाकू तम ु च्या पोटात होता हि कुठली आत्महत्या असं थोडी
असतं क्राईम पेट्रोल चे १००० एपिसोड पाहिलेत मी असा थोडी खन
ू असतो. तेव्हा बेवडा म्हणतो तम्
ु ही
३८९ वा एपिसोड पहिला होता का .? स्वप्नील म्हणतो नाही हो माझ्या साल्याची हळदी होती त्या दिवशी
बेवडा म्हणतो म्हणन ू तम्ु हाला केस चा तपास लावता नाही आला ते झालं असं कि मी एक पस्
ु तक लिहीत
होतो. "चाकू वापरण्याचे १०१ उपाय" १०० तर लिहले मी पण १०१ वा उपाय मला सापडताच नव्हता मग
काय मी चाकू सरळ माझ्याच पोटात घातला. हे ऐकून स्वप्नील बेशद् ु ध पडतो.

सकाळ झालेली असते पडक्या वाड्यात कोणीच नसतं हवालदार एक कागद घेऊन स्वप्नील पाशी येतो
आणि म्हणतात. साहे ब हे घ्या तम
ु ची ट्रान्सफर झालीये गडचिरोलीला आणि प्लिज ऍटलीस्ट तिथे दारू
पिऊ नका ड्यट
ु ी वर असताना नाहीतर सस्पें डच करतील. हवालदार निघन ू जातो स्वप्नील बदलीच्या
कागदाकडे पाहत राहतो.

- दर्शन पाटील

६ फेब्रव
ु ारी २०२४ रात्री ११:३० मिनिटं .

You might also like