You are on page 1of 1

प्रति,

मा. संपादक सो.


दैनिक __________________

सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे हि नम्र विनंती.

क्रीडा प्रसिद्धीसाठी

बुद्धिबळातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या यादीत नीरज धगधगे

नंदुरबार – नुकत्याच मुंबई येथे झालेल्या स्टेट अॅमॅच्युअर रेटिंग व तामिळनाडू येथे झालेल्या एम. पी. एल स्कू ल नॅशनल
रेटिंग स्पर्धेत जिल्ह्यातील ए.सी.क्लबचा बुद्धीबळ खेळाडू निरज धगधगे याने आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंना पराभूत करत जागतिक
क्रमवारीसाठीची आपली गुणवत्ता सिद्ध के ली. जागतिक बुद्धिबळ संघटनेने १ जानेवारी रोजी जाहीर के लेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या
मानांकन यादीत निरज धगधगे याला बुद्धिबळाचे आंतरराष्ट्रीय मानांकन प्रदान करण्यात आले.

निरज धगधगे शहरातील अश्वमेघराज चेस क्लब या बुद्धिबळ प्रशिक्षण कें द्रात प्रशिक्षण घेत असून तो चावरा इंग्लिश स्कू लचा
इयत्ता ७ वी चा विद्यार्थी आहे. निरज हा कृ षी विभागात कार्यरत कृ षी अधिकारी जितेंद्र धगधगे यांचा चिरंजीव आहे. निरज ला राष्ट्रीय
प्रशिक्षक व आंतरराष्ट्रीय फिडे आर्बिटर शोभराज खोंडे, प्रशिक्षक प्रा. अश्वमेघराज खोंडे, मेघा खोंडे, विनीत बागुल, सागर महाजन यांचे
मार्गदर्शन लाभत आहे. तर त्याच्या यशाबद्दल नंदुरबार जिल्हा हौशी बुद्धिबळ संघटनेचे चेअरमन डॉ.शिल्पा भंडारी अध्यक्ष शिवछत्रपती
पुरस्कारार्थी बळवंत निकुं भ, उपाध्यक्ष प्रा.डॉ. ईश्वर धामणे, चावरा इंग्लिश स्कू लचे प्राचार्य डॉ. सुनिता अहिरे, क्रिडा शिक्षक दिनेश बैसाणे
यांनी अभिनंदन के ले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आपला विश्वासू

शोभराज खोंडे
राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक
मो. ८४८४८४०९७४

You might also like