You are on page 1of 50

सर्वां साठी खगोलशास्त्र

- एक सुरुवात

विकसन व लेखन
नवनिर्मिती लर्निंग फाउं डेशन टीम

‘आयसॉनवर नजर’ या मोहीमेसाठी विज्ञान प्रसारच्या मदतीने


1
सर्वांसाठी खगोलशास्त्र - एक सरु
ु वात
विनानफा शैक्षणिक कामासाठी हे पुस्तक जसेच्या तसे भाषांतरित, प्रकाशित, वितरित
करण्याचा हक्क कोणाही व्यक्ती / संस्थेला देण्यात येत आहे. याचप्रकारच्या कॉपी लेफ्ट
सूचनेसह ते के ले पाहिजे. मूळ कामाच्या नामोल्लेखाचे स्वागत आहे. बाकी सर्व हक्क
नवनिर्मिती लर्निंग फाउं डेशन व लेखकांकडे सुरक्षित.

लेखक गट –
डॉ. विवेक मॉंटे रो
विपुला अभ्यंकर
गीता महाशब्दे

मराठी भाषांतर – विपुला अभ्यंकर

पुस्तक डिझाइन –
डॉ. चैतन्य गुत्तीकर
आर्या रोठे

मुखपृष्ठ व मलपृष्ठ डिझाइन - आर्या रोठे

मुखपृष्ठावरील फोटो – आश् ना चेवली (वय वर्षे १०)

मलपृष्ठावरील फोटो – चारूचंद्र किं जवडेकर

फोटो –
डॉ. चैतन्य गुत्तीकर, आश् ना चेवली (वय वर्षे १०)
एच. बी. मुरलीधरा, उमेश रस्तुगी

चित्रे व आकृ त्या - डॉ. चैतन्य गुत्तीकर

साहाय्य – स्वाती जोशी, वर्षा खानवेलकर

प्रथमावृत्ती – 2013

नवनिर्मिती लर्निंग फाउं डेशन


‘समतेसाठी गुणवत्ता’ कें द्राच्या वर
564 ब / 2 शनिवार पेठ
रमणबाग चौक, पुणे 411030
फोन – 020 24471040, 9850303396

इमेल – navnirmitilearning@gmail.com

वेबसाइट –
www.navnirmitilearning.org
www.daytimeastronomy.com
सर्वांसाठी खगोलशास्त्र
एक सरु
ु वात
प्रत्येक शाळे त सोपे खगोलशास्त्र

विकसन व लेखन
नवनिर्मिती लर्निंग फाउं डेशन टीम

‘आयसॉनवर नजर’ या मोहीमेसाठी विज्ञान प्रसारच्या मदतीने


डॉ. नरें द्र दाभोळकर
१.११.१९४५ - २०.०८.२०१३

अर्पणपत्रिका
निर्भीड शहीद डॉ. नरें द्र दाभोळकर यांना लोकविज्ञान चळवळ
आदरांजली वाहत आहे.

धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा आणि द्वेष पसरवणे आणि


धर्मांधता यांना विरोध करून वैज्ञानिक विवेकवादाचा प्रसार
करण्यासाठी डॉ. दाभोळकरांनी आयुष्यभर निस्वार्थीपणे काम
के ले.

प्रत्येक नागरिकामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करून


डॉ. दाभोळकरांचे कार्य आणि विचार आम्ही अधिक जोमाने
आणि निर्धाराने पुढे नेऊ अशी आम्ही प्रतिज्ञा करीत आहोत.
सर्वांसाठी खगोलशास्त्र- एक सरु
ु वात

हे पुस्तक कशासाठी?
२०१० साली शिक्षण हक्क कायद्याच्या रुपानं भारतातल्या प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा
हक्क मिळाला. आता प्रश्न येतो, आपल्या देशातल्या प्रत्येक बालकाला गुणवत्तापूर्ण विज्ञान शिक्षण कसं
मिळे ल? गुणवत्तापूर्ण विज्ञान शिक्षणाचं सार्वत्रिकीकरण करणं शक्य आहे का?
या प्रश्नाचं ‘होय’ असं एक सकारात्मक उत्तर आहे, आणि ते ‘विश्व सार्वत्रिक करून’ घडेल. आपण कोठे ही
राहत असलो तरी निसर्गाच्या आणि विश्वाच्या चमत्कारांनी सतत वेढलेले असतो. या विस्मयकारक
विश्वाचा शोध घेण्यासाठी डोळे , कान, हात आणि मुख्य म्हणजे मन अशी काही दमदार साधनंही आपल्या
प्रत्येकाकडे असतातच. सभोवतालच्या गोष्टींबरोबर प्रयोग करणं, विचार करणं, अंदाज बांधणं, थोडीशी
आकडेमोड करणं हा दर्जेदार विज्ञान शिक्षणाचा रस्ता आहे. याला आपण ‘सर्वांसाठी खगोलशास्त्र’ म्हणू
शकतो.
गुणवत्तापूर्ण विज्ञान शिक्षणासाठी महागडी साधनं लागत नाहीत. अनेक महत्त्वाचे आणि रोचक प्रयोग व
प्रकल्प अत्यंत स्वस्त साधनं वापरूनही करता येतात. आपल्या देशात इतरत्र राहणाऱ्या विज्ञानमित्रांशी
देवाणघेवाण करतही काही प्रयोग करता येतात. कारण विज्ञान वैश्विक असतं, विज्ञान स्वतःच सार्वत्रिक
असतं.
विश्वाचा अभ्यास करताना आपण हजार, कोटी, अब्ज अशा मोठ्या संख्यांना भीत नाही. पृथ्वीचा व्यास
१३ हजार किलोमीटर आहे. सूर्य आपल्यापासून १५ कोटी किलोमीटरवर आहे. आपल्या आकाशगंगेत
१०० अब्ज तारे आहेत.
सार्वत्रिकीकरण करण्यासाठीही आपल्याला अशाच मोठमोठ्या खगोलीय संख्या हाताळाव्या लागतील.
आपल्या शाळे त हजार विद्यार्थी आहेत. भारतातील शालेय विद्यार्थ्यांची संख्या २० कोटीच्या वर आहे.
आपल्या देशात एक अब्जाहून जास्त लोक आहेत... याप्रमाणे.
‘सर्वांसाठी विज्ञान’ हे ध्येय घेऊन लोकविज्ञान चळवळ कार्यरत आहे. सार्वत्रिकीकरणासाठी
खगोलशास्त्राचा प्रसार करावा या हेतूने या चळवळीतील अनेक संस्था-संघटना एकत्र आल्या आहेत.
सूर्यग्रहणे, आंतरराष्ट्रीय खगोलवर्ष २००९, शुक्राची दोन अधिक्रमणे आणि आता आयसॉन धूमके तूच्या
निमित्ताने यांनी एकत्र येऊन विज्ञानप्रसाराच्या व्यापक मोहीमा राबवलेल्या आहेत.
आपण जर प्रत्येक शाळे पर्यंत पोहोचू शकलो, प्रत्येक शाळे त आसपासच्या सर्वांसाठी खगोलजत्रा आयोजित
करू शकलो तर आपण खऱ्या अर्थाने ‘लोकांच्या, लोकांसाठी, लोकांनी तयार के लेल्या’ विज्ञान शिक्षणाची
रचना करू शकू .
हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्याचा ही पुस्तिका हा एक नम्र प्रयत्न आहे.
प्रत्येक शाळे त खगोलजत्रा कशी आयोजित करावी?

तुमच्या शाळे त खगोलजत्रा आयोजित करण्यासाठी फारसे पैसे लागणार नाहीत. सगळीकडे उपलब्ध
असलेल्या काही स्वस्त साधनांद्वारे तुम्ही अनेक रोचक प्रयोग करू आणि दाखवू शकाल.

या पुस्तिके तील सर्व प्रयोग खगोलजत्रेत


मांडता येऊ शकतील.
खगोलजत्रेत कोण सहभागी होऊ शके ल?
प्रत्येकजण. कोणत्याही वयाचे.
प्रत्येक विद्यार्थी
प्रत्येक शिक्षक आणि मुख्याध्यापक
प्रत्येक कर्मचारी
सर्व पालक
सर्व नागरिक.

खगोलजत्रा के व्हा भरवावी?


आत्तापासून दिवाळीपर्यंत के व्हाही. मात्र २८
नोव्हेंबर २०१३ या तारखेच्या आधी. कारण त्या
दिवशी आयसॉन धूमके तू सूर्याच्या जास्तीतजास्त
जवळ पोहोचला असेल.

ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पावसाळा संपलेला


असेल आणि आकाश निरभ्र असेल त्यामुळे ते दोन
महिने खगोलजत्रेसाठी जास्त चांगले.

1
खगोलजत्रेतील प्रयोग

तुमच्या खगोलजत्रेत पुढील प्रयोग करता येतील –

१. आयसॉन धूमके तूबाबतचे पोस्टर प्रदर्शन ठे वणे.


२. उत्तर दिशा शोधणे.
३. चेंडू-नळीच्या आधारे ध्रुवतारा पाहणे.
४. ताठ उभ्या असलेल्या काठीच्या किं वा खांबाच्या सावल्या वापरून इमारतीची उं ची
मोजणे.
५. चेंडू आरशाचा सूर्यदर्शक वापरून सूर्याची प्रतिमा घेणे.
६. पृथ्वीचे परिवलन दाखवणे.
७. उलटा रं गीत टी. व्ही. तयार करणे.
८. तुमचा स्वतःचा दूरदर्शक तयार करणे. दूरदर्शकाच्या आत काय आहे, हे पाहणे.
९. १०० मीटरवरील वर्तमानपत्र या दूरदर्शकाच्या सहाय्याने वाचणे.
१०. या दूरदर्शकाच्या सहाय्याने चंद्रावरील खड्डे पाहणे.
११. या दूरदर्शकातून शुक्र आणि त्याच्या कला पाहणे.
१२. सूर्याभोवती फिरणाऱ्या आयसॉन धूमके तूची प्रतिकृ ती तयार करणे.
१३. नॅनो सूर्यमाला तयार करणे.
१४. सूर्याभोवती ५ ग्रह आणि आयसॉन धूमके तू मांडून त्यांचे स्थान दाखविणारा नकाशा
(रांगोळी) जमिनीवर काढणे.
१५. सूर्यचष्म्यातून सूर्य पाहणे.
१६. तुमच्या दूरदर्शकाने सूर्याची प्रतिमा घेणे आणि सूर्यडाग पाहणे.
१७. जादूई आरशाचा प्रयोग करणे.
१८. सूर्यसंदेश कार्डाचा प्रयोग करणे.
१९. आयसॉन धूमके तू पाहणे.

2
कृती १

उत्तर – दक्षिण आणि पूर्व – पश्चिम दिशा


शोधा.

पध्दत १ – ताठ उभ्या असलेल्या काठीची


सावली वापरून.
शाळे चे मैदान किं वा गच्ची, अशी एखादी सपाट
जागा निवडा.
दिवसभर ऊन येईल अशा ठिकाणी एक काठी ताठ
उभी करा. (दोऱ्याला दगड बांधून तयार के लेला
वळं बा वापरून काठी सरळ आहे का ते तपासता
येईल).

सकाळी सुमारे १० वाजता या काठीच्या सावलीच्या टोकाशी खडू ने खूण करा. पुन्हा १०.१५ वाजता
सावलीच्या टोकाशी खूण करा. दुपारी २ वाजेपर्यन्त दर १५ मिनिटांनी अशा खुणा करा. या सर्व
खुणांमधून जाणारी वक्ररे षा काढा. ती पसरट ‘C’ च्या
आकाराची दिसेल .

काठी हा कें द्र मानून कोणत्याही त्रिज्येचे एक वर्तुळ काढा.


सावलीच्या खुणांनी बनलेल्या वक्र रे षेला त्याने छे दले पाहिजे.
हे वर्तुळ या वक्र रे षेला दोन ठिकाणी छे दते .

हे दोन छे दन बिंद ू वर्तुळाच्या कें द्राशी सरळ रे षेने जोडा. या


दोन त्रिज्यांनी एक कोन तयार होतो.

हा कोन दुभागा.  

कोनदुभाजक उत्तर-दक्षिण दिशा दर्शवतो.

उत्तर – दक्षिण दिशा दर्शवणारी रे षा काढा.

पूर्व – पश्चिम रे षा काढा.

किती वाजता सावली सर्वात लहान होती?

बरोबर दुपारी १२ वाजता की आणखी


के व्हा?

3
पध्दत २ : ध्रुवताऱ्याच्या सहाय्याने

उत्तर गोलार्धातील शाळांसाठी रात्रीच्या खगोलशास्त्राची ही कृ ती आहे.

चुंबकसूची वापरून अंदाजे उत्तर दिशा शोधा.


सूर्य मावळल्यानंतर उत्तरे कडे असा तारा शोधा की जो रात्रभर आपली जागा सोडत नाही. तोच ध्रुवतारा.

या ताऱ्याच्या दिशेने जमिनीवर एक दिशादर्शक बाण काढा. ही बरोबर उत्तर दिशा असते. आता एक
उत्तर-दक्षिण रे षा काढा.

या उत्तर-दक्षिण रे षेला एक लंब रे षा काढा. ही लंब रे षा पूर्व पश्चिम दिशा दर्शविते.


पूर्व- पश्चिम आणि उत्तर-दक्षिण दिशा दर्शविणाऱ्या कायमच्या खुणा जमिनीवर करून ठे वा.

कृती २
विज्ञान दोस्ती

तुमच्याच वयाच्या आणि तुमच्याच इयत्तेत


शिकणाऱ्या पण इतर राज्यात राहणाऱ्या
तीन विद्यार्थ्यांशी संपर्क करून त्यांच्याशी
“विज्ञान दोस्ती” करा. तुमचा वर्ग आणि
त्यांचा वर्ग, तुमची शाळा आणि त्यांची
शाळा यांच्यामध्ये सुद्धा अशी
विज्ञान दोस्ती करता येईल.

तुम्ही दक्षिण भारतात रहात


असाल, तर तुमचे विज्ञानदोस्त
असे असतील :
एक पूर्वेकडू न (आसाम, बंगाल
येथून); एक उत्तरे कडू न (जम्मू-
कश्मिर-लडाख किं वा पंजाब येथून)
आणि एक पश्चिमेकडू न (कच्छ,
गुजरात, राजस्थान येथून)

जर तुम्ही उत्तरे कडे रहात असाल


तर तुमचे विज्ञान दोस्त असतील दक्षिण, पश्चिम
आणि पूर्वेकडू न.. याप्रमाणे.

4
तुमच्या विज्ञान दोस्तांशी मोबाईल फोनवरून संपर्कात रहा. प्रयोग करताना तुम्हाला ताबडतोब
एकमेकांशी बोलता येईल.

एक उदाहरण म्हणून तुम्ही खालील प्रयोगापासून सुरूवात करू शकाल –


सर्ू योदय के व्हा झाला? सर्या
ू स्त के व्हा झाला? सर्ू योदयानंतर किती तासांनी सर्या
ू स्त झाला?
पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर सगळीकडचे विज्ञान दोस्त आपापल्या मोबाईल फोनमधील वेळ
एकसारखी लावून घेतील. सगळ्यांच्या घड्याळांनी एका क्षणी एकच वेळ दाखविली पाहिजे. एका
ठराविक दिवशी चौघेही सूर्योदयापूर्वी एकाच वेळी उठतील. सर्वांनी आपापल्या गावी सूर्य उगवला की
त्याची वेळ नोंदवायची आणि फोन करून दोस्तांना ती वेळ नोंदवायला सांगायची. या चार ठिकाणच्या
सूर्योदयाच्या वेळांची तुलना करा.

याच दिवशी चौघांनीही सूर्यास्ताच्या वेळांचीही नोंद करा.


प्रत्येक ठिकाणचा सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेतला फरक काढा.
हाच प्रयोग एक महिन्यानंतर पुन्हा करा.

कृती ३

दर आठवड्याला सर्ू योदय कोठे होतो?

सूर्योदय पूर्वेला होतो हे सगळ्यांना माहीत सप्टें बर


असतं. या आधीच्या कृ तीमध्ये आपण पूर्व जून मार्च डिसेंबर
दिशा अचूकपणे निश्चित करून आखून
ठे वलेली आहे.

सूर्योदय नेमका कोठे होत आहे ते आता


बारकाईने पहा.

रोज शाळा भरताच एका विशिष्ट वेळी,


एका विशिष्ट जागी उभे राहून, पूर्वेकडची
झाडे, खांब, घरे यांच्या संदर्भात सूर्य कोठे
आहे ते पहा.

आपल्याला असं दिसतं की, २१ मार्च आणि


२१ सप्टें बर सोडल्यास इतर कोणत्याही
दिवशी सूर्य बरोबर पूर्वेला उगवत नाही.

२१ जून ते २१ सप्टें बर, हे तीन महिने


सूर्य पूर्व-पश्चिम रे षेच्या उत्तरे ला उगवतो.
२१ सप्टें बरला तो बरोबर पूर्वेला उगवतो.
5
२२ सप्टें बर ते २१ डिसेंबर, हे तीन महिने तो पूर्व-पश्चिम रे षेच्या दक्षिणेला उगवतो.
२२ डिसेंबर ते ते २१ मार्च, हे तीन महिने सूर्य पूर्व-पश्चिम रे षेच्या दक्षिणेला उगवतो.
२१ मार्चला तो बरोबर पूर्वेला उगवतो.
त्यानंतरचे सहा महिने, म्हणजे २१ मार्च ते २१ सप्टें बर, सूर्य पूर्व पश्चिम रे षेच्या उत्तरे ला उगवतो.

दर आठवड्याला सर्या
ू स्त कोठे होतो?
सूर्य नेमका कोठे मावळतो ते जर आपण पाहिलं, तर आपल्या लक्षात येईल की तो दररोज बरोबर
पश्चिमेला मावळत नाही.
२१ जून ते २१ सप्टें बर, हे तीन महिने तो पूर्व-पश्चिम दिशेच्या उत्तरे ला मावळतो.
२१ सप्टें बरला तो बरोबर पश्चिमेला मावळतो.
२२ सप्टें बर ते २१ डिसेंबर, हे तीन महिने तो पूर्व-पश्चिम दिशेच्या दक्षिणेला मावळतो.

कृती ३ ब: विचार आणि चर्चेसाठी प्रश्न.

सूर्यास्तानंतर सूर्योदयापर्यंतच्या मधल्या वेळेत रात्री सूर्य कोठे जातो?


पहाटे ६ च्या सुमाराला सूर्य पूर्वेला उगवतो. दिवसभरात हळू हळू अनेक तासांचा प्रवास करून तो
पश्चिमेला जातो. संध्याकाळी ६ च्या दरम्यान तो पश्चिमेला दिसेनासा होतो, मावळतो.
नंतर आणखी बऱ्याच तासांनी, दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्य पूर्वेला उगवतो.
रात्रीच्यावेळी सूर्याचं काय होतं? सूर्यास्तानंतर तो दिसेनासा होतो, तेव्हा तो कोठे जातो?

कृती ४
शाळे साठीचा प्रकल्प

उभ्या काठीची सावली

ताठ उभ्या असलेल्या काठीच्या सावलीचा अभ्यास करा.


शाळे चे मैदान किं वा गच्ची, अशी एखादी सपाट जागा निवडा.
दिवसभर ऊन येईल अशा ठिकाणी एक काठी ताठ उभी करा. (दोऱ्याला दगड बांधून तयार
के लेला वळं बा वापरून काठी सरळ आहे का ते तपासता येईल).
सकाळी सुमारे १० वाजता या काठीच्या सावलीच्या टोकाशी खडू ने खूण करा. पुन्हा १०.१५
वाजता सावलीच्या टोकाशी खूण करा. दुपारी २ वाजेपर्यन्त दर १५ मिनिटांनी अशा खुणा करा.
किती वाजता सावली सर्वात लहान होती? बरोबर १२ वाजता की इतर वेळी?

दुपारी १२ वाजताची सावली शून्य लांबीची होती का? नसेल, तर तसे का? अन्य कोणत्या वेळी सावली
शून्य लांबीची होती का?

6
वर्षभर वेगवेगळ्या दिवशी कमीतकमी लांबीच्या सावलीची नोंद करण्यासाठी पुढील प्रयोग
करा.

प्रकल्प १
दर आठवड्याला काठीच्या सर्वात लहान सावलीची
लांबी मोजा.
ती कोणत्या दिशेला होती?
सावली बरोबर शून्य किं वा अगदी शून्याजवळ असलेला
कोणता दिवस आहे का?
सर्वात छोटी सावली उत्तर दिशेला असलेला कोणता
दिवस आहे का?
सर्वात छोटी सावली दक्षिण दिशेला असलेला कोणता
दिवस आहे का?
प्रकल्प २ –
चारही विज्ञान दोस्तांनी एकाच दिवशी हा प्रयोग करून, आपल्या नोंदी व आकडे एकमेकांना मोबाइल
किं वा ई-मेलद्वारे कळवायचे आहेत.
सर्वांनी एक मीटर उं चीच्या काठीची लहानात लहान सावली मोजा.
इतर विज्ञान दोस्तांच्या निरीक्षणांशी तुलना करा.
एक मीटर उं चीच्या लहानात लहान सावलीच्या नोंदींमध्ये फरक आढळे ल कारण तुम्ही आणि तुमचे
दोस्त गोल पृथ्वीवर वेगवेगळ्या अक्षांशांवर आहात.

कृती ५
भिन्न उंचीच्या दोन काठ्यांच्या सावल्या

भिन्न उं चीच्या दोन काठ्या घ्या. उन्हात एखाद्या


सपाट जागी त्या शेजारी शेजारी ताठ उभ्या करा.
सकाळी साधारण १० वाजता या काठ्यांच्या
सावल्यांचे निरीक्षण करा.
दोन्ही काठ्यांची उं ची आणि त्यांच्या सावल्यांची
लांबी मोजा.
प्रत्येक काठीच्या उं चीला तिच्या सावलीच्या
लांबीने भागा. (उं ची/सावली)
दोन्ही काठ्यांची उं ची भिन्न असली तरी त्यांचे
(उं ची/सावली) हे गुणोत्तर साधारणतः सारखेच
असेल.
हे उं ची/सावली गुणोत्तर स्थिर असते. ते काठीच्या उं चीवर अवलंबून नसते.
साधारण एका तासानंतर हाच प्रयोग पुन्हा करा.
सूर्य जसा आकाशात जसजसा पुढे सरकत जाईल तसतसे उं ची / सावली गुणोत्तर बदलत जाईल.
मात्र, एका विशिष्ट वेळी हे गुणोत्तर कोणत्याही उं चीच्या काठ्यांसाठी सारखेच असते आणि ते काठीच्या
उं चीनुसार बदलत नाही. यावरून असे दिसते उभ्या काठ्या आणि त्यांच्या सावल्या यांचे समरूप
त्रिकोण बनतात.

7
हा प्रयोग शतक-दशक-एकक संचातील दशकाचे दांडे वापरून के ला तर अतिशय सोपा होतो. एक दांडा
जमिनीवर उभा के ला की एक काठी बनते. दोन दांडे एकावर एक ठे वून अधिक लांबीची दुसरी काठी
तयार करता येते. त्यांच्या सावल्या एककाचे ठोकळे वापरून मोजता येतात. (सोबतचे छायाचित्र पहा.)

तुमच्या विज्ञान दोस्तांसमवेत हाच प्रयोग पुन्हा करून पहा.


एकाच विशिष्ट वेळी सगळ्यांनी आपापल्या जागी हा प्रयोग करा. तुमची निरीक्षणे पडताळू न पहा. एका
विशिष्ट वेळी सर्व मित्रांचे उं ची/ सावली हे गुणोत्तर सारखेच आले आहे काय?

कृती ६

इमारतीवर चढून न जाता तिची उंची मोजा.


जमिनीवर ताठ उभ्या असलेल्या एखाद्या काठीचे उं ची/ सावली हे गुणोत्तर मोजा.
इमारतीच्या जमिनीवर पडलेल्या सावलीची लांबी मोजा.

काठीच्या उं ची/सावली गुणोत्तराने


इमारतीच्या सावलीच्या लांबीला गुणले की
आपल्याला इमारतीची उं ची मिळे ल. इमारत
म्हणजेच जमिनीवर ताठ उभी असलेली
दुसरी एक काठी आहे असे आपण येथे मानत
आहोत.
आता त्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन
एका दोऱ्याला दगड बांधून तो जमिनीला
टे केपर्यंत खाली सोडा. दोऱ्याची लांबी मोजून
इमारतीची उं ची निश्चित करा.

तुमचे आधीचे उत्तर याच्याशी जुळले काय?


नसेल, तर का नाही?

तुम्हाला तुमची स्वतःची उं ची माहीत आहे.


तुमच्या सावलीची लांबी किती येईल?
एका काठीच्या उं ची/सावली या गुणोत्तरावरून गणित करून ते शोधून काढा. नंतर तुमच्या सावलीची
लांबी प्रत्यक्ष मोजा. तुमचं गणित बरोबर होतं का?

यापुढील काही प्रयोग करण्यासाठी तुम्हाला काही साधे साहित्य लागेल. प्रत्येक प्रयोगात त्याची माहिती
दिलेली आहे. ‘सूरज जमीन पर’ या दृश्यपटांमध्ये मुलांनी के लेले हे प्रयोग दाखवलेले आहेत. पुढील
वेबसाइटवर या चित्रफीती उपलब्ध आहेत.

www.daytimeastronomy.com
www.vigyanprasar.gov.in

8
कृती ७
चेंडूचा माउंट तयार करा.

एक प्लॅस्टिकचा चेंडू घ्या. कटरचा वापर करून चित्रात दाखविल्याप्रमाणे चेंडूवर एक छोटी खिडकी
तयार करा. चेंडूमध्ये वाळू भरा. त्यामुळे चेंडू जड व स्थिर होईल. खिडकी टे पने बंद करा.

हा स्थिर चेंडू एखाद्या योग्य आकाराच्या वाटीवर / रूं दशा रिं गवर
ठे वून टे बलावर किं वा स्थिर पृष्ठभागावर ठे वा. तुमचा चेंडूचा माउं ट
वापरण्यास तयार झाला.

कृती ८

चेंडू-आरशाचा सर्यू दर्शक बनवा आणि सर्या


ू ची
प्रतिमा मिळवा
चेंडूचा माउं ट घ्या. आता एक छोटा आरसा घ्या.
मध्यभागी गोल भोक असणारा खाकी रं गाचा कागद
आरशावर चिकटवा. चित्रात दाखवल्याप्रमाणे हा
आरसा चेंडूच्या माउं टवर चिकटवा.

हा सूर्यदर्शक एका रिं गवर ठे वून तो उन्हात स्थिर जागी


ठे वा. असा हा तयार झाला ‘ चेंडू आरशाचा सूर्यदर्शक’.

या सूर्यदर्शकाच्या सहाय्याने कवडसा पाडू न सूर्याची


प्रतिमा मिळवा. सूर्यदर्शक अशा कोनात फिरवा की
सूर्याची प्रतिमा एखाद्या अंधाऱ्या जागी किं वा अंधारपेटीत असलेल्या पांढऱ्या कागदाच्या पडद्यावर
मिळे ल.
चेंडू-आरशाचे पडद्यापासूनचे अंतर ३०-४० मीटर इतके वाढवा. तुम्हाला सूर्याची मोठी, साधारण ३०
सेमी व्यासाची रे खीव प्रतिमा मिळे ल.

या प्रतिमेचे नीट निरीक्षण करा. ती एकाच जागी स्थिर आहे, की सरकते? प्रतिमा का सरकते?

9
कृती ९

कोठे ही सहज नेण्याजोगी अंधारपेटी बनवा

तुमच्या चेंडू-आरशाच्या सूर्यदर्शकाने सूर्याची स्पष्ट व रे खीव प्रतिमा मिळण्यासाठी, ही प्रतिमा शक्य
तितक्या अंधाऱ्या खोलीत घेतली पाहिजे.
सहजपणे कोठे ही नेण्याजोगी अंधारपेटी कशी बनवायची ते पाहू.
टीव्हीच्या खोक्यासारखं एक पुठ्याचं मोठ्ठं खोकं घ्या. खोक्याच्या आत एका बाजूवर पांढरा कागद
चिकटवा. हा आपला पडदा असेल.
त्याच्या विरुध्द बाजूवर साधारणपणे ३०-४० सेमी व्यासाचे गोल भोक पाडा. प्रकाश किरण या
भोकातून आत जाऊन सहजपणे पडद्यापर्यंत पोहचतील.
खोक्याच्या सर्व बाजू, कोपरे चिकटपट्टीने अशा प्रकारे बंद करा, की आपण बनवलेले गोल भोक सोडू न
इतर कोठू नही प्रकाश आत जाणार नाही.
खोक्याच्या आतील, पडदा सोडू न, इतर बाजूना काळा कागद चिकटवून ही पेटी आपण अधिक अंधारी
बनवू शकतो. अशी तयार झाली आपली
सहजपणे नेण्याजोगी अंधारपेटी. तिच्या
एका बाजूला आहे पडदा तर त्याच्या विरुध्द
बाजूला आहे प्रकाश आत जाण्यासाठी भोक.
खोक्याच्या उरलेल्या चार बाजूंपैकी,
कोणत्याही एका बाजूवर चाकू च्या सहाय्याने,
उघडता झाकता येईल अशी एक छोटी खिडकी
तयार करा ज्यामधून आपल्याला पडदा दिसू
शके ल.
आपली अंधारपेटी वापरासाठी तयार झाली.
ही पेटी कोठे ही स्टुलावर ठे वून मैदानावरील
सार्वजनिक कार्यक्रमासाठी तुम्ही वापरू
शकाल.

कृती १०

११० का?

सूर्याच्या प्रतिमेचा व्यास मोजा.


चेंडू- आरश्यापासून सूर्याची प्रतिमा घेतलेल्या पडद्याचे अंतर मोजा. (दोन्ही अंतरे मीटर मध्ये मोजा.)
पुढील गुणोत्तर काढा :
चेंडू- आरश्यापासनू सर्या
ू ची प्रतिमा घेतलेल्या पडद्याचे अंतर
--------------------------------------------------------------
सर्या
ू च्या प्रतिमेचा व्यास
10
हे गुणोत्तर जवळपास ११० इतके आहे का? चेंडू-आरशाचे पडद्यापासूनचे अंतर बदलून हा प्रयोग पुन्हा
करा.
जास्त अंतरावरून आपल्याला मोठी प्रतिमा मिळते. कमी अंतरावरून लहान प्रतिमा मिळते.
ही अंतरे मोजा आणि वरील प्रमाणे अंतर/व्यास हे गुणोत्तर काढा. आतासुध्दा हे गुणोत्तर जवळपास
इतके च मिळते का?
वेगवेगळ्या वेळी मोजल्यास हे गुणोत्तर बदलते का?
महिन्याभरानंतर हे गुणोत्तर बदलते का?
तुमच्या सर्व विज्ञान दोस्तांनाही
हेच गुणोत्तर मिळते का?
चेंडू-आरशाचा सूर्यदर्शक वापरणे
ही सूर्याची प्रतिमा मिळवण्याची
सर्वात सोपी पध्दत आहे.
सूर्यप्रकाशाच्या प्रखरतेमुळे ते
शक्य होते.

कृती ११

जादूई आरसा तयार करा.

जरा जाडसर काळ्या कागदाचा १५ सेमी बाजू


असलेला चौरस घ्या.

प्रत्येक कोपऱ्यातला ५ सेमी बाजूचा चौरस कापून


टाका. मोठ्या अधिकच्या चिन्हासारखा आकार
उरे ल.

या कागदाच्या बाहेरील चार चौरसांमध्ये चौरस,


चांदणी, वर्तुळ आणि त्रिकोण अशा आकारांची भोके
कापून घ्या.

आरशावर झाकण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.

11
मधल्या चौरसात ३ सेमी बाजू असलेला चौरसाकृ ती
आरसा चिकटवा. (तुमच्याकडील आरसा वेगळ्या
मापाचा असेल तर त्याप्रमाणात कमी-जास्त
मापाचा चौरस घ्या).

चौरसाकृ ती भोकाने आरसा झाकू न बाहेर उन्हात


धरा.

तुमच्याजवळ उभ्या असलेल्या मित्राच्या शर्टावर


किं वा जवळ धरलेल्या कागदावर आरशाने कवडसा
पाडा (१ मीटर किं वा त्यापेक्षा कमी अंतरावर).

प्रतिमा पहा.

तिचा आकार कसा आहे?

इतर आकारांची भोके आरशावर धरून प्रयोग


करा.

आरशावर चौरस आकाराचे भोक धरले तर चौरस


प्रतिमा मिळते, त्रिकोणी आरशाने त्रिकोणी
आणि वर्तुळाकार आरशाने गोल, चांदणीने
चांदणीसारखी. यात नवल वाटण्यासारखे फारसे
काही नाही.

आता या प्रत्येक आकाराच्या आरशाने जरा लांबवर


असलेल्या भिंतीवर (साधारणपणे २० मीटरवर)
कवडसा पाडा. काय दिसते?

नवल वाटले ना?

लांब अंतरावर कवडसा पाडला तर कोणत्या


आकारांच्या प्रतिमा मिळतात?

आरसा चौरस किं वा त्रिकोणी असला तरीही जास्त


अंतरावर घेतलेली प्रतिमा वर्तुळाकार आहे.

12
कृती १२
(रात्रीचे खगोलशास्त्र - दूरदर्शकाशिवाय)

रात्रीच्या वेळी एक तारा सोडल्यास बाकीच्या सर्व चांदण्या आकाशात सरकताना दिसतात.
मोठ्या वहीचा किं वा A4 आकाराचा कागद घ्या. त्याची गुंडाळी करून चिकटपट्टीने किं वा
डिंकाने चिकटवून घ्या. नळीचा व्यास २ सेमी पेक्षा लहान असला पाहिजे. त्यातून पलीकडचे
दिसेल इतपत मोठाही.

फोटोत दाखवल्याप्रमाणे ही नळी चेंडूच्या माउं टवर चिकटवा.

रात्रीच्या वेळी या नळीतून कोणतीही एक चांदणी दिसेल अशा रीतीने ती ठे वा.

दहा मिनिटांनी चेंडू किं वा नळी न हालवता पुन्हा नळीतून पहा. चांदणी अजूनही दिसते का?
नाही, ती सरकली. (पृथ्वी फिरल्यामुळे)

आता ध्रुवतारा शोधा आणि या नळीतून ध्रुवतारा दिसेल अशा रीतीने चेंडूचा माउं ट व नळी
ठे वा.

दहा मिनिटांनी नळीतून परत पहा. ध्रुवतारा अजूनही दिसतो का? एक तासाने पहा.

चेंडू नळी न हालवता दुसऱ्या दिवशी नळीतून पुन्हा पहा. ध्रुवतारा तेथेच आहे का?

13
चर्चा – ध्रुवतारा त्याच जागी का दिसतो?

आपण नाट्यरूपात हे समजून घेऊ शकतो.

वर्गाच्या छताला एका छोट्या दोरीने एक चेंडू


टांगा.

बरोबर चेंडूच्या खाली जमिनीवर एक खूण करा.

त्या खुणेवर उभे राहून वर चेंडूकडे पहा.

चेंडू बरोबर डोक्यावर दिसेल.

आता नजर चेंडूवर तशीच ठे वून स्वतःभोवती फिरू


लागा. पाय बरोबर खुणेवरच राहिले पाहिजेत.

खोलीतल्या इतर सर्व गोष्टी फिरताना दिसतात.

तुमच्या बरोबर डोक्यावर असलेला चेंडू सोडू न


सगळं फिरताना दिसतं.

परं तु तुमच्या फिरण्याच्या अक्षाच्या रे षेत (तुमचं


शरीर) असलेली वस्तू (तुमच्या डोक्यावरील चेंडू)
मात्र स्थिर असल्यासारखी दिसते.

14
कृती १३

महिनाभर रोज चंद्राचे निरीक्षण करणे.

तो के व्हा दिसतो, कोठे दिसतो, त्याचा आकार कसा असतो?


एक महिनाभर किं वा त्याहून जास्त दिवस रोज दिवसा व रात्री चंद्राचे निरीक्षण करा.
सूर्यास्ताच्या वेळी तो कोठे आहे?
सूर्योदयाच्या वेळी तो कोठे आहे?
तो रोज त्याच वेळी त्याच ठिकाणी दिसतो का? प्रत्येक दिवशी काय बदल दिसतो?
दररोज त्याचा आकार पहा. (चंद्राच्या कला)
रोजची तारीख घालून त्याच्या आकाराचे चित्र काढा.
चंद्राच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या गडद-फिक्या आकारांचे निरीक्षण सलग काही दिवस करा. त्यांचा
आकार, माप आणि जागा बदलत नाही असे तुमच्या लक्षात येईल. चंद्राच्या चेहऱ्यावरचे कायमस्वरूपी
चित्र असल्यासारखे ते दिसतात.
पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची फक्त एकच बाजू दिसते. पृथ्वीवरच्या कोणत्याही भागातून, भारत,
जपान, चीन, आफ्रिका, युरोप, अमेरिका कोठू नही पाहिलं तरी चंद्राची तीच बाजू दिसते.
कधीकधी चंद्र सकाळी दिसतो हे तुमच्या लक्षात येईल.
चंद्र दिवसा का दिसतो?
‘सूर्य दिवसा दिसतो’ हे विधान बरोबर आहे, परं तु ‘चंद्र रात्री दिसतो’ हे विधान बरोबर आहे का?
महिन्यातले किती दिवस चंद्र रात्री दिसतो?
महिन्यातले किती दिवस तो दिवसा दिसतो?
तुमच्या विज्ञानदोस्तांना तुमची निरीक्षणे दाखवा. त्यांनाही तुम्हाला दिसणाऱ्या आकाराचाच चंद्र
दिसतो का?

15
कृती १४

एका भिंगाचा रंगीत प्रक्षेपक (रंगीत टी. व्ही.) तयार करा.

दूरच्या गोष्टी जवळ दिसाव्यात यासाठी भिंगे वापरून दूरदर्शक तयार करता येतो.

दूरदर्शकाचं काम समजावून घेण्यासाठी आपण आधी एका भिंगाचा प्रक्षेपक तयार करू.

साधारणपणे ५० सेमी नाभीय अंतराचं बहिर्वक्र भिंग घ्या. सुमारे ५ सेमी किं वा २ इं च व्यासाचे असेल
तर चालेल. तुमच्या शाळे तील विज्ञान प्रयोगशाळे त किं वा विज्ञान साहित्याच्या दुकानात ते मिळे ल.

आधी आपण एका खोक्याची सहज हलवता येण्यायोगी अंधारपेटी तयार के ली होती. तशीच अंधारपेटी
करायची आहे, फरक इतकाच की
समोरच्या बाजूला मोठे गोल भोक
पाडण्याऐवजी छोटे भोक पाडायचे
आहे.

साधारणपणे ४० सेमी लांबीचे एक


खोके घ्या.
पडदा
त्याच्या आत एका बाजूला पांढरा
कागद लावा. हा झाला पडदा.

या पडद्याच्या समोरच्या बाजूला


एक षटकोनी भोक पाडायचे आहे.
भिंग बसवलेल्या पुठ्ठ्याच्या
नळीपेक्षा किं चित जास्त व्यासाचं.
ही नळी कशी बनवायची ते आपण
पाहणार आहोत.

षटकोनी भिंगधारक

तुमचं भिंग ५ सेमी व्यासाचं आहे


षटकोनी नळी
िखडकी असं मानू. ४ सेमी बाजू असलेले
दोन षटकोनी पुठ्ठे घ्या. त्यांच्या
मध्यभागी ४.५ सेमी व्यासाची गोल
भोके पाडा. या दोन पुठ्ठ्यांच्या
षटकोनी िभंगधारक मध्ये भिंग धरून ते एकमेकांना
चिकटवून टाका.

16
भिंगाची नळी

दुसरा एक पुठ्ठा वापरून एक


षटकोनी नळी तयार करा.
या नळीच्या एका टोकाला
तुमचा षटकोनी भिंगधारक
घट्ट बसला पाहिजे. तसेच
तुमच्या अंधारपेटीला पाडलेल्या
षटकोनी भोकात ही नळी
बरोबर बसली पाहिजे. या
नळीची लांबी साधारण १५
सेमी असावी. षटकोनाची प्रत्येक
बाजू साधारण ४ सेमी.

खोक्याच्या भोकात नळी अशा प्रकारे बसवा की भिंग खोक्याच्या बाहेरच्या बाजूला राहील.

भिंग बसवलेली नळी खोक्याच्या भोकात आत बाहेर सरकवता येईल. त्यामुळे पडद्याचं भिंगापासूनचं
अंतर बदलता येईल. हे अंतर नाभीय अंतराइतकं झालं की भिंगाच्या समोरच्या बाजूच्या देखाव्याची
रे खीव प्रतिमा पडद्यावर दिसेल. ही प्रतिमा उलटी असेल.

आता षटकोनी भोक सोडू न सर्व बाजूंनी खोके चिकटपट्टीच्या सहाय्याने बंद करून टाका. म्हणजे इतर
कोठू नही प्रकाश आत जाणार नाही.

खोक्यातली प्रतिमा पाहण्यासाठी भिंगाच्या शेजारी एक लहानशी खिडकी करा.

तुमचा रं गीत टी. व्ही. / कॅ मेरा तयार झाला.

खोक्याच्या आतल्या सर्व बाजूंना तुम्ही काळा कागद चिकटवू शकाल. आत जितका अंधार असेल तितकी
सुंदर प्रतिमा मिळे ल.

तुमच्या पाठीमागच्या बाजूला


भिंग येईल अशा रीतीने तुमचा
रं गीत टी. व्ही. खांद्यावर धरा.
तुमच्या भोवतीचं सगळं जग
तुम्हाला दिसेल, पण खाली
डोकं वर पाय के लेलं!

17
कृती १५

एका बहिर्वक्र भिंगातून प्रतिमा

आधीच्या कृ तीत आपण एका भिंगाचा प्रक्षेपक (रं गीत टी. व्ही.) तयार के ला. यात आपण भिंगाने प्रतिमा
घेतली. ती प्रतिमा उलटी होती. अशा प्रतिमेला ‘वास्तव प्रतिमा’ म्हणतात. ती पडद्यावर घेता येते.
भिंगाचा उपयोग आपण विशालक म्हणूनही करू शकतो. तुमच्या डोळ्याजवळ एक बहिर्वक्र भिंग धरा
आणि एखाद्या वस्तूकडे पहा. ती वस्तू तुम्हाला उलटी दिसणार नाही, पण नुसत्या डोळ्यांनी दिसते
त्यापेक्षा मोठी दिसेल.
बहिर्वक्र भिंग वापरण्याच्या या दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि त्यांनी मिळणाऱ्या प्रतिमाही दोन
वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत.

दोन बहिर्वक्र भिंगांच्या सहाय्याने प्रतिमा


आपल्या रं गीत टी. व्ही. च्या मागच्या बाजूला एक छोटं भोक पाडू न छोटं बहिर्वक्र भिंग तिथे बसवलं
तर काय होईल ते पाहू. आता आपण दोन भिंग वापरली आहेत. काय दिसेल?
मोठी प्रतिमा दिसेल का? आपल्या उलट्या टी. व्ही. च्या
पडद्यावर बसवलेल्या भिंगातून पाहू. खरे च! उलटी प्रतिमा
दिसते. मोठी झालेली.
आपल्या उलट्या रं गीत टी. व्ही. चा खराखुरा दूरदर्शक
झाला!
काही अंतरावर लावलेलं उलटं वर्तमानपत्र आपण वाचू
शकतो. दूरदर्शक कसा बनवायचा ते आता तुम्हाला समजलं.
पुढच्या प्रयोगात आपण दोन भिंगांचा खरा दूरदर्शक तयार
करणार आहोत.

कृती १६
गॅलिलिओस्कोप
दूरदर्शक तयार करणारा गॅलिलिओ हा काही पहिला माणूस
नव्हे. हॉलंडमधील लिपरशेयसारख्या इतर काही जणांनी आधी
दूरदर्शक बनवला होता. परं तु दूरदर्शक आकाशाकडे फिरवणारा
आणि खगोलशास्त्रासाठी वापरणारा गॅलिलिओ हा पहिला माणूस
होता.

हा गॅलिलिओच्या दूरदर्शकाचा फोटो आहे. दूरदर्शकाचा सर्वात


महत्त्वाचा भाग म्हणजे प्रकाशिकी (optics) - त्याची भिंगे.
गॅलिलिओच्या दूरदर्शकाला दोन भिंगे होती. पुढचं भिंग म्हणजे
18
पदार्थभिंग आणि मागचं भिंग म्हणजे नेत्रिका. पदार्थभिंगाचं नाभीय अंतर जास्त असतं आणि नेत्रिके चं
नाभीय अंतर कमी असतं.

दोन भिंगं आणि पुठ्ठा वापरून तुम्हीही तुमचा स्वतःचा फोटोत दाखवल्यासारखा दूरदर्शक तयार करू
शकाल. या दूरदर्शकाने तुम्हाला चंद्रावरचे खड्डे व डोंगर पाहता येतील.

चेंडूला चार दोऱ्या बांधून तुम्हाला दूरदर्शकासाठीचा चेंडूचा माउं ट तयार करता येईल. चेंडूमध्ये वाळू
भरण्याआधी या दोऱ्या बांधून घ्याव्या लागतील. दूरदर्शकातून पाहताना तो स्थिर ठे वण्यासाठी या
चेंडूच्या माउं टचा उपयोग करा.

भिंगे मिळवण्यासाठी आणि इतर माहितीसाठी संपर्क साधा –


‘समतेसाठी गुणवत्ता’ कें द्र, नवनिर्मिती लर्निंग फाउं डेशन, पुणे – 020 24471040
‘डिस्कवर इट’ कें द्र, नवनिर्मिती एज्युक्वालिटी, मुंबई – 022 25786520

कृती १७
साध्या दूरदर्शकातून चंद्राचे निरीक्षण करणे.
दररोज दर तासाला चंद्र आकाशात निरनिराळ्या जागी दिसतो.

साध्या दूरदर्शकाच्या सहाय्याने आपल्याला चंद्रावरचे खड्डे व डोंगर पाहता येतात. चंद्र जेव्हा थोड्या
मोठ्या कोरीच्या आकारात असतो तेव्हा हे खड्डे फार सुंदर दिसतात. साधारणपणे चतुर्थीपासून ते
एकादशीपर्यंतचे ७-८ दिवस.

19
सर्या
ू स्तानंतर सधं ्याकाळच्या आकाशात साध्या दूरदर्शकाने चंद्रावरचे खड्डे पाहण्यासाठीचा
सर्वोत्तम काळ पुढीलप्रमाणे –

२०१३ मध्ये –
१२ जुलै ते १८ जुलै
१० ऑगस्ट ते १७ ऑगस्ट
९ सप्टें बर ते १६ सप्टें बर
९ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर
७ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर
७ डिसेंबर ते १४ डिसेंबर

२०१४ मध्ये –
५ जानेवारी ते १३ जानेवारी
४ फे ब्रुवारी ते ११ फे ब्रुवारी
६ मार्च ते १३ मार्च

कृती १८
सर्यू माला आणि सहा ग्रहांची जमिनीवर
प्रतिकृती तयार करणे. (ग्रहांची रांगोळी)

इथे दाखवलेल्या आकृ तीसारखे सहा ग्रहांचे व


सूर्यमालेचे तक्ते या पुस्तकाच्या पाठीमागे जोडले
आहेत.

ग्रह सूर्याभोवती फिरतानाचे त्यांचे स्थान या


आकृ त्यांमध्ये दिसत आहे. सूर्य कें द्रस्थानी आहे.
ग्रहांच्या कक्षा साधारणपणे वर्तुळाकार आहेत.
सर्व ग्रह जवळपास एकाच प्रतलात फिरत आहेत.
त्यामुळे या आकृ त्या म्हणजे सूर्यमालेचे बऱ्यापैकी
जवळचे चित्र आहे. ६ ऑगस्ट २०१३ पासून २
फे ब्रुवारी २०१४ पर्यंत दर पंधरवड्याचे ६ ग्रहांचे
सूर्याभोवती फिरतानाचे स्थान या तक्त्यांमध्ये
दिले आहे.

आयसॉन धूमके तूचा आपल्या सूर्यमालेतील


प्रवासही या आकृ त्यांमध्ये दाखवलेला आहे.

दर पंधरा दिवसांनंतरचे ग्रहांचे स्थान पहा.

20
मैदानावर किं वा वर्गात जमिनीवर ग्रहांच्या कक्षांची मोठी आकृ ती (रांगोळी) काढा.

सूर्य कें द्रस्थानी ठे वा.

बुधाची कक्षा म्हणून ६ सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा.

शुक्राच्या कक्षेची त्रिज्या ११ सेमी असेल.

पृथ्वीच्या कक्षेची त्रिज्या १५ सेमी.

मंगळाची २३ सेमी.

गुरू ७८ सेमी त्रिज्येच्या वर्तुळावर.

आणि शनी १४२ सेमी त्रिज्येच्या वर्तुळावर.

जवळ आलेल्या तारखेची आकृ ती निवडा.

त्या आकृ तीनुसार प्रत्येक ग्रहाच्या स्थानी एक रं गीत गोटी किं वा चेंडू ठे वा. ग्रहांसाठी वापरलेल्या गोट्या
निरनिराळ्या रं गांच्या असाव्यात.

दर १५ दिवसांनी तक्त्यानुसार ग्रहांच्या आणि आयसॉन धूमके तूच्या जागा बदला.

21
कृती १९

दर आठवड्याला ग्रहांचे निरीक्षण करणे.


नुसत्या डोळ्यांनी आपल्याला सहा ग्रह पाहता येतात – बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ,
गुरू, शनी.
वर्ष आणि महिन्यानुसार काही ग्रह संध्याकाळच्या आकाशात दिसतात, काही
पहाटे च्या आकाशात दिसतात. काही आठवडे काही ग्रह अजिबात दिसत नाहीत.
पृथ्वी, सूर्य आणि त्या ग्रहाचे स्थान यानुसार ग्रह संध्याकाळी सूर्योदयानंतर किं वा
पहाटे सूर्योदयापूर्वी दिसतात.
ग्रह जेव्हा सूर्याच्या मागे जातात किं वा सूर्याच्या समोर येतात तेव्हा काही आठवडे
ते सूर्याच्या प्रखरतेमुळे दिसत नाहीत.
एखाद्या दिवशीच्या ग्रहांच्या चित्रात, उदा. १४ नोव्हेंबर २०१३ च्या चित्रात,
पृथ्वी आणि सूर्य जोडणारी रे षा विचारात घ्या. या रे षेच्या एका बाजूला असलेले
सर्व ग्रह संध्याकाळच्या आकाशात दिसतील आणि रे षेच्या दुसऱ्या बाजूचे सर्व ग्रह
पहाटे च्या आकाशात दिसतील.
एका ठराविक काळात तुम्हाला प्रत्यक्ष आकाशात कोणते ग्रह कोणत्या वेळी
दिसतात ते पहा. तुमच्या सूर्य-ग्रहांच्या चित्रावरून काय दिसते त्याच्याशी याची
तुलना करा.

२०१३ साठीचा ग्रह मार्गदर्शक

बुध –
पहाटे च्या आकाशात – जुलै ते ऑगस्ट; संध्याकाळच्या आकाशात – सप्टें बर व
ऑक्टोबर;
सकाळच्या आकाशात – नोव्हेंबर व डिसेंबर

शुक्र –
संध्याकाळच्या आकाशात – जुलै ते डिसेंबर

पृथ्वी –
या ग्रहावरच आपण राहतो त्यामुळे तो आपल्याला रात्रंदिवस दिसतच असतो.

मंगळ –
जुलै अखेरीपासून डिसेंबरपर्यंत पहाटे च्या आकाशात.

गुरू –
जुलै मध्यापासून डिसेंबरपर्यंत पहाटे च्या आकाशात.

शनी –
जुलै ते सप्टें बर – संध्याकाळच्या आकाशात; ऑक्टोबरमध्ये तो सूर्याच्या पाठीमागे
जाईल. नोव्हेंबर मध्यापासून तो पुन्हा पहाटे च्या आकाशात पुन्हा दिसू लागेल.

22
कृती २०

साध्या दूरदर्शकातून शुक्राचे


निरीक्षण करणे.
जुलै २०१३ ते डिसेंबर २०१३
या काळात शुक्र संध्याकाळी
दिसेल.

सोबतच्या तक्त्यांवरून असं


दिसतं की ऑक्टोबर २०१३ ते
डिसेंबर २०१३ हे शुक्राच्या कला
पाहण्यासाठी अनुकूल महिने
आहेत.

साध्या दूरदर्शकाने शुक्राच्या


कला पाहणे ही तुमच्या खगोल
जत्रेतली एक अत्यंत रोमहर्षक
गोष्ट असेल.

तुमचा दूरदर्शक कदाचित


वर्णविपथन (क्रोमॅटिक अबरे शन)
दाखवेल. भिंगामुळे प्रकाश
विविध रं गांमध्ये विभागला
जातो आणि त्यामुळे शुक्राची
प्रतिमा धूसर आणि विरूपित
झालेली दिसते.

एका साध्या पद्धतीने वर्णविपथन


खूपसे कमी करता येते.

भिंगावर लावता येईल असं एक


वर्तुळाकार कार्ड तयार करा.
त्याच्या मध्यभागी साधारण १५
सेमी व्यासाचं गोल भोक पाडा.
शुक्र पाहताना भिंगाच्या समोर
हे कार्ड धरा. याने वर्णविपथन
खूपसे कमी झाल्याचे तुमच्या
लक्षात येईल. तुम्हाला शुक्राची
रे खीव प्रतिमा मिळे ल आणि
शुक्राच्या कला पाहता येतील.

23
कृती २१

सर्या
ू चे निरीक्षण करणे
सूर्याकडे कधीही नुसत्या डोळ्यांनी थेट पाहायचे
नाही. तसे के ल्यास डोळे जळू शकतात.

डोळ्यांवर सुरक्षित सूर्यचष्मा लावून आपण


सूर्याकडे पाहू शकतो. सुरक्षित सूर्यचष्मा
सूर्यप्रकाशाची प्रखरता १ लाख पटींनी कमी
करतो. तुमचा सूर्यचष्मा सुरक्षित आहे याची
खात्री करून मगच त्यातून सूर्याकडे पहा.

सर्या
ू ची प्रतिमा घेऊन सर्या
ू चे निरीक्षण करणे
पडद्यावर सूर्याची प्रतिमा घेणे ही सूर्याची निरीक्षणे करण्याची सर्वोत्तम पद्धत आहे. तुमच्या दूरदर्शकाने
तुम्हाला सूर्याची सुंदर, सुस्पष्ट प्रतिमा कागदावर घेता येईल.

दरू दर्शकातनू कधीही सरू ्याकडे पाहू नका.


तुमच्या चेंडूच्या माउं टवर
तुम्ही तयार के लेला दूरदर्शक
लावा आणि कागदावर सूर्याची
प्रतिमा घ्या. रे खीव प्रतिमा
मिळे पर्यंत दूरदर्शकाची नळी
आत बाहेर हलवा. सूर्याच्या
प्रतिमेवर तुम्हाला कदाचित
काही छोटे डाग दिसतील. हे
सूर्यडाग आहेत.

24
कृती २२

नॅनो सूर्यमालेची प्रतिकृ ती तयार करा.


किती मोठी? किती दूर?

आपली पृथ्वी गोलाकार आहे आणि तिचा व्यास १२७५६


किमी आहे हे आपण शाळे त शिकतो. १२७५६ किमी इतके
मोठे आहेत की कल्पना करायला फार कठीण. तिला थोडी
आकुं चित करूया आणि तिचा व्यास १००० पटींनी कमी
करूया. एक किलोमीटरचा एक मीटर होईल. १००० पटीने
आकसलेल्या व्यासाच्या या पृथ्वीला मिलीपृथ्वी म्हणता
येईल.
मिलीपृथ्वीचा व्यास १२७५६ मीटर आहे. म्हणजे जवळपास
१३ किलोमीटर. हे सुद्धा कल्पना करायला कठीण आहे. तिला
पुन्हा आकुं चित करूया आणि व्यास पुन्हा १००० पटींनी
कमी करूया. १२००० चे १२ होतील.
आता आपली पृथ्वी मायक्रोपृथ्वी झाली. १० लाख पटींनी
आकसलेल्या व्यासाची. मायक्रोपृथ्वीचा व्यास १२.७५६
मीटर होतो, म्हणजे साधारणरणे १३ मीटर.
आता आपण पृथ्वीचा व्यास आणखी १००० पटींनी कमी
के ला तर? १ मीटरचा मिलीमीटर होतो. एका छोट्याशा
गोटीएवढा गोल, १२.७५६ मिलीमीटर व्यासाचा. म्हणजेच
१.२७ सेमी व्यासाचा. ही नॅनोपृथ्वी. ज्याचा व्यास खऱ्या
पृथ्वीपेक्षा (१००० x १००० x १०००) पटींनी म्हणजेच १
अब्ज पट कमी के ला आहे अशी पृथ्वी.




 

 1392000 139.2 0

 4880 0.488 58


 12100 1.21 107
 12756 1.28 150
 6794 0.68 227

 143200 14.32 777

 120000 12 1426


 51800 5.18 2870

 49500 4.95 4496

25
आपल्याला इतर ग्रहांची मापेही माहीत आहेत. नॅनो बुध,
नॅनो शुक्र इत्यादी मापेही आपण गणिताने काढू शकतो. नॅनो
पृथ्वीचा व्यास काढला त्याच पद्धतीने.

नॅनो सर्यू के वढा आहे?

सूर्याचा व्यास १००००००००० पटींनी कमी के ला तर


आपल्याला १३९.२ सेमी हा आकडा मिळतो. नॅनो सूर्य
१३९ सेमी व्यासाचा आहे. शाळे तल्या एखाद्या मुलाच्या
उं ची इतका.

सोबतच्या तक्त्यात नॅनो ग्रहांची मापे दिलेली आहेत. यात


एक अब्ज पटीने व्यास कमी के लेला आहे. पहिल्या स्तंभात
प्रत्येक नॅनो ग्रहाचा व्यास दिलेला आहे. दुसऱ्या स्तंभात नॅनो
सूर्यमालेतील नॅनो सूर्यापासून तो नॅनोग्रह किती दूरवर असेल
ते अंतर दिलेले आहे.

(नॅनो गुरू हाताळू न पाहताना)


नॅनो सर्यू मालेची प्रतिकृती तयार करणे –

नॅनोसूर्यमालेची प्रतिकृ ती तीन प्रकारांनी तयार करता येईल. सूर्य हा एक मोठ्ठा फु गा असेल (इतका
मोठ्ठा फु गा सहजासहजी मिळत नाही) किं वा फ्लेक्सवर छापलेलं चित्र असेल किं वा एखाद्या मोठ्ठ्या
चादरीवर शिवलेला मोठ्ठा पिवळा गोल असेल.
1. पृथ्वी आणि शुक्रासाठी मणी किं वा गोट्या; बुध आणि मंगळासाठी मणी; युरेनस, नेपच्युन, गुरू
आणि शनीसाठी प्लॅस्टिकचे चेंडू
2. भाज्या आणि फळे वापरून : बुध – मिरी, मंगळ – वाळलेला हिरवा वाटाणा; शुक्र आणि पृथ्वी
– बोर; युरेनस आणि नेपच्यून – मोठे लिंबू किं वा चिक्कू ; शनी – खरबूज; गुरू – गोल कलिंगड
किं वा कोबी.
3. शाडू ची माती वापरून सर्व ग्रह तयार करता येतील.
ग्रहांच्या प्रतिकृ ती तयार करताना नेमके व अचूक मोजमाप करणे महत्त्वाचे आहे.
मोठ्या मैदानाच्या एका टोकाला नॅनो सूर्याचे पोस्टर लटकवा. सूर्यापासून सरळ रे षेत ५८ मीटर चालत
जा. तेथे नॅनो बुध ठे वा. सूर्यापासून १०७ मीटरवर नॅनो शुक्र ठे वा आणि १५० मीटरवर नॅनो पृथ्वी ठे वा.
नॅनो नेपच्यून ठे वायला तुम्हाला ४.५ किमी चालत जावे लागेल! फारच दूर!
नॅनो पृथ्वीपर्यंतचे ग्रह तरी मांडा.
आता तुम्हाला लक्षात आले का, आपल्या ग्रहांची मापे आणि अंतरे किती मोठी आहेत!

26
कृती २३
चुंबकीय लंबकाचा आयसॉन धूमके तू – सर्या
ू भोवतीच्या प्रवासाची प्रतिकृती
मध्यभागी भोक असलेली चकतीच्या आकाराची
तीन चुंबके घ्या. चकतीचा एक पृष्ठभाग उत्तर
ध्रुव आणि एक दक्षिण ध्रुव असला पाहिजे.

यातील एक चुंबक टे बलावर ठे वा. त्याच्या


भोकावर छोटासा दगड, गोटी किं वा बॉल
बेअरिं ग ठे वा. एका अगदी पातळ कापडाच्या
चिंधीमध्ये त्याची पुरचुंडी बांधा. बॅंडेजचे
जाळीदार कापड किं वा अस्तराचे पातळ कापड
चांगले.

गोटी-चुंबकाचा लंबक तयार करायचा आहे. त्यातली


चुंबकचकती जमिनीला समांतर राहिली पाहिजे.

दाराच्या चौकटीला किं वा छतातल्या एखाद्या


खिळ्याला हा लंबक दोऱ्याने टांगा. लंबकाचा
दोरा जितका लांब तितके चांगले. चुंबकचकती
जमिनीपासून साधारण १ सेमी उं चीवर जमिनीला
समांतर असावी.

उरलेली दोन चुंबके चिकटपट्टीने जमिनीवर


चिकटवायची आहेत. लंबकापासून ५-१० सेमी
अंतरावर. लंबकातील चुंबक आणि जमिनीवर
चिकटवलेली चुंबके यांच्यात आकर्षण असेल अशा
रीतीने ती ठे वा.

लंबक मोकळा फिरू शकला पाहिजे. आणि जेव्हा तो


जमिनीवरील चुंबकांच्या जवळ येईल तेव्हा तो परत
न जाता त्याच जागी तरं गत राहिला पाहिजे. अशा
रीतीने दोऱ्याची लांबी कमीजास्त करा. (फोटो पहा)

चुंबके एकमेकांना चिकटतील इतकीही दोरी लांब


नको.

जमिनीवरची चुंबके म्हणजे स्थिर सूर्य आहे. लंबकाचा


चुंबकीय गोळा म्हणजे फिरणारा धूमके तू आहे.
27
लंबकाला झोका देऊन निरनिराळ्या प्रकारे खेळून
पहा. सूर्याच्या गुरूत्वीय आकर्षणाने धूमके तू
सूर्याजवळ कसा येतो, सूर्याभोवती चक्कर कशी
मारतो ते पहा. धूमके तू सूर्याच्या फारच जवळ गेला
तर सूर्य त्याला पकडू न खेचून घेईल. हे धूमके तूच्या
वेगावरही अवलंबून आहे.

या प्रतिकृ तीत सूर्य आणि धूमके तूमधलं गुरूत्वीय


आकर्षण हे जमिनीवरचा स्थिर चुंबक आणि
लटकलेला चुंबक यांच्यातील चुंबकीय आकर्षणाने
दर्शविलेले आहे.

कृती २४
तुमच्या खगोलजत्रेचा अहवाल पाठवा.

तुमचा अहवाल पुढील पत्त्यांवर पाठवा :


विज्ञान प्रसार
A – 50, इन्स्टिट्यूशनल एरिया, सेक्टर 62
नोयडा, - 201309, उत्तर प्रदेश, भारत.
फोन नंबर – 0120-2404430, 31, 35, 36
फॅ क्स नंबर - +91-120-2404437
www.vigyanprasar.gov.in

नवनिर्मिती लर्निंग फाउं डेशन


‘समतेसाठी गुणवत्ता’ कें द्राच्या वर
५६४ ब / २ शनिवार पेठ, रमणबाग चौक
पुणे – ४११०३०
फोन नंबर – 020-24471040
इमेल – navnirmitilearning@gmail.com

28
कृती २५
सर्यू सदं ेश कार्ड

या पानावरील कार्ड कापून घ्या. कटरच्या साहाय्याने मधल्या भागातील निरनिराळी चिन्हे काळजीपूर्वक
कापून घ्या. उन्हात जमिनीजवळ कार्ड धरा. कार्डाच्या सावलीचे निरीक्षण करा. कार्डावरील निरनिराळी
चिन्हे जमिनीवर पडलेली दिसतील.

आता हळू हळू कार्ड जमिनीपासून वरवर सूर्याच्या दिशेला न्या. जितकं जास्तीतजास्त उं च नेता येईल
तितकं . सगळी चिन्हे एकसारखी होतात. ते सगळे प्रकाशगोल होतात. आपल्या रूं दावणाऱ्या जाणीवांचे
द्योतक. आणखी उं च गेल्यावर ते सगळे गोल एकमेकांना स्पर्श करतात. आपली एकता, आपलं एकत्र
येणं व्यक्त करीत. मानव म्हणून, धर्मनिरपेक्ष भारताचे नागरिक म्हणून आणि धरित्रीचे नागरिक म्हणून
आपण सगळे मुळात एकच असल्याचं व्यक्त करीत.

हा चमत्कार नाही, तर हा एक वैज्ञानिक आविष्कार आहे. जमिनीवर दिसणारे प्रकाशगोल म्हणजे


सूर्याच्या प्रतिमा आहेत. सूर्य गोल आहे म्हणून त्या गोल आहेत. म्हणून कार्डावरच्या कवितेत ‘अनेक
चिन्हे एक सूर्य’ असे आहे. याला पिनहोल प्रोजेक्शन किं वा पिनहोल कॅ मेऱ्याचं तत्त्व असं म्हणतात.

सूर्य संदेश
तमसो मा ज्योतिर्गमय

अनेक शाळा एकच प्रयोग

अनेक चिन्हे एकच सूर्य

अनेक धर्म एकच ईश्वर

अनेक वंश एकच मानव

अनेक संस्कृती एकच राष्ट्र

अनेक राष्ट्रे एकच जग

अनेक समस्या एक निर्धार

चला एकत्र ये ऊन घडवू अधिक चांगले जग


29
30
सहा ग्रह आणि आयसॉन धूमके तूचे ऑगस्ट २०१३ ते जानेवारी २०१४ पर्यंतचे स्थान

आकृती प्रमाणात नाही.


६ ऑगस्ट २०१३

सूर्य बुध पृथ्वी गुरू

आयसॉन धूमके तू शुक्र मंगळ शनी


सूर्य आणि ग्रहांचे व्यास प्रमाणात नाहीत. अंतरे प्रमाणात आहेत.

32
२६ ऑगस्ट २०१३

सूर्य बुध पृथ्वी गुरू

आयसॉन धूमके तू शुक्र मंगळ शनी


सूर्य आणि ग्रहांचे व्यास प्रमाणात नाहीत. अंतरे प्रमाणात आहेत.

33
१५ सप्टें बर २०१३

सूर्य बुध पृथ्वी गुरू

आयसॉन धूमके तू शुक्र मंगळ शनी


सूर्य आणि ग्रहांचे व्यास प्रमाणात नाहीत. अंतरे प्रमाणात आहेत.

34
५ ऑक्टोबर २०१३

सूर्य बुध पृथ्वी गुरू

आयसॉन धूमके तू शुक्र मंगळ शनी


सूर्य आणि ग्रहांचे व्यास प्रमाणात नाहीत. अंतरे प्रमाणात आहेत.

35
२५ ऑक्टोबर २०१३

सूर्य बुध पृथ्वी गुरू

आयसॉन धूमके तू शुक्र मंगळ शनी


सूर्य आणि ग्रहांचे व्यास प्रमाणात नाहीत. अंतरे प्रमाणात आहेत.

36
१४ नोव्हेंबर २०१३

सूर्य बुध पृथ्वी गुरू

आयसॉन धूमके तू शुक्र मंगळ शनी


सूर्य आणि ग्रहांचे व्यास प्रमाणात नाहीत. अंतरे प्रमाणात आहेत.

37
४ डिसेंबर २०१३

सूर्य बुध पृथ्वी गुरू

आयसॉन धूमके तू शुक्र मंगळ शनी


सूर्य आणि ग्रहांचे व्यास प्रमाणात नाहीत. अंतरे प्रमाणात आहेत.

38
२४ डिसेंबर २०१३

सूर्य बुध पृथ्वी गुरू

आयसॉन धूमके तू शुक्र मंगळ शनी


सूर्य आणि ग्रहांचे व्यास प्रमाणात नाहीत. अंतरे प्रमाणात आहेत.

39
१३ जानेवारी २०१४

सूर्य बुध पृथ्वी गुरू

आयसॉन धूमके तू शुक्र मंगळ शनी


सूर्य आणि ग्रहांचे व्यास प्रमाणात नाहीत. अंतरे प्रमाणात आहेत.

40
२ फे ब्रुवारी २०१४

सूर्य बुध पृथ्वी गुरू

आयसॉन धूमके तू शुक्र मंगळ शनी


सूर्य आणि ग्रहांचे व्यास प्रमाणात नाहीत. अंतरे प्रमाणात आहेत.

41
धूमके तूचा मार्ग

सूर्य आणि ग्रहांचे व्यास प्रमाणात नाहीत. अंतरे प्रमाणात आहेत.

42
43
सर्वांसाठी खगोलशास्त्र - एक सरु
ु वात
आपल्या सभोवतालचं जग ही एक वैश्विक विज्ञान प्रयोगशाळा आहे,
कोणत्याही देशाला तयार करायला परवडणार नाही अशी प्रयोगशाळा!
तरीही ती जगातल्या प्रत्येक शाळे तल्या प्रत्येक शिक्षकाला आणि
प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत उपलब्ध आहे. जगातल्या अशा सर्व
छोट्या वैज्ञानिकांसाठी आणि खगोलशास्त्रज्ञांसाठी हे पुस्तक!

You might also like