You are on page 1of 6

खूप दिवसांपासून दुनियादारी चा एक किस्सा मना मध्ये पिंगा घालत होता, पण लिहिण्यासाठी वेळ काही मिळत नव्हता किबहुना

correct वेळच येत नव्हती. दुनियादारी च्या


ह्या अंकात Emotion आहे drama आहे fight आहे पण Movie सारखा शेवट काही गोड नाही. कॉलेज जीवनात २ मारामारींचा साक्षीदार मी होतो ज्यात मी प्रत्येक्ष
लढलो नसेल पण लढणारे माझे मित्र च होते.

ह्या किस्सयातील काही पात्रांची नवे जाणून बाजून बदलेली आहेत कारण not sure ते लोक आता ह्या प्रसंगांना कसे react करतील. वेळ हि इतका गेलाय कि काही नाती
हल्ली mute च झाली आहेत. बघू हे किस्से वाचून कोणी unmute होते का ते?

Fight- १

दहावी चांगल्या मार्काने पास झालो, कॉलेज ला जाणार याची Excitement होतीच पण दुख वाटत होते को दहावी “क” चा group आता विस्कळीत होणारा होता, कारण
मी Science ला Admission घेतली होती देवचंद ला.

शाळेचा आणि कॉलेज चा Campus जवळच होता,पण बिल्डिंग बदलल्या आणि वातावरणही. आमच्या कॉलेज मध्ये क्लासेस आडनावाप्रमाणे बनतात, माझा दिविसिओन ३
मध्ये नुम्बेर होता, दहावीतले काही ओळखीची मुले माझ्या क्लास मध्ये होती, त्यातल्या त्यात राम्या आणि रावल्या (राहुल रक्ताडे) सोबत wavelenght जमली.

रावल्या हुशार पण थोडा विक्षिप्तच होता, सहज त्याचे कु णा सोबत जमायचे नाही पण knoweldeble होता तो. राम्या जरा Unrealistic आदर्शवादी होता, नको तिथे
lectur हाणायची सवय. कमाल म्हणजे माझ्यात राम्या आणि रावल्या सारखेच गुण (अवगुण)होते पण control मध्ये.

अवधूत चिकोर्डे (अवध्या) ह्या कथेतील अजून एक पात्र, शाळेत ओळख होती आमची पण इतकी खास नव्हती पण कॉलेज मध्ये माझे ह्याच्याशी पण जमायचे. ह्या fight मध्ये
आणि पुढच्या fight मध्ये आम्ही दोघेच common.

राम्या आणि अवध्या हे शाळेत असताना एकाच तुकडीत होते पण ह्याचे जास्त काय जमायचे नाही, शालेय जीवनापर्यंत दोन मुलांमध्ये भांडण असायचे एकच कारण असते “मुलगी”
असो. त्यांची स्टोरी हा आपल्या किश्याचा Scope नाही आणि इतक्या वर्श्यानी त्यावर comment मी नके लेलाच बर.

अकरावी ला आलो, तरी ह्या दोघांत (राम्या आणि अवध्या) खुन्नस कायमच होती, Class मध्ये दोघांच्यात काही तरी खटका उडाला, दोघेही भनकले होते, कॉलेज चे
वातावरणच असेच असते, तिथे प्रत्येकाला आपली रग दाखवायची असते. अवध्या संध्याकाळी गावात भेटला “महान्त्या, तुज्या मित्राला सांग नको तिथे शहाणपण करू नको
म्हणाव, माझा group तुला माहित आहे, कोणी त्याला रस्त्यात मारली तर मी जबाबदार नाही”. मी “काय बे अवध्या एकाच शाळेतले आपण, कसले भाडता आपसात, ठीक
आहे बोलतो मी त्याच्या शी”

मी राम्या रावल्या भेळ गाड्यावर भेटलो, रावल्या पण मी Background दिलेच होते.

रावल्या राम्याला “गांधीबाबा कि जय, ईन्क़िलाब झिंदाबाद”,

राम्या “येडा झाला रे ह्यो, कु ठे पण काय पण बोलालाय, लोक बघालेत बे”.

रावल्या “राम्या येडा तू झालयीस, कु ठे पण काय पण तू बोलतोस, अवध्या बदल त्या मास्तर ला काय सांगितलाय रे तू”.

राम्या “मी कु ठे काय सांगितलेय”.

मी “अवध्या ने सांगितलेय मला, तुज्या बरोबर तो चम्या असतो ना तुमच्या Tuition मध्ये त्याने पण हेच आम्हाला सांगितले”

“त्यो चम्या दुतोंडा आहे एकदेचे तिकडे करायची सवय आहे साल्याला , जपून जरा त्याच्या पासून”.

राम्या “तुम्ही शिकवू नका मला काय करायचे ते”.

रावल्या “आता कळले का गांधीबाबा कि जय का म्हणालो, गांधी सारखे आहे तुजे मी म्हणतो तेच खर, माझीच लाल”.

सगळेजण हसायला लागलो भेळ संपवला.


दुसऱ्या दिवशी सकाळची lectur संपवली दुपारी Biology प्रक्टीकल होते आमच्या Batch चे, त्या मुळे आम्हाला late थांबावे लागणार होते. मी रावल्या राम्या
college बाहेरच्या टपरी वर चाह प्याय गेलो. अवध्याचा साखरवाडी group हि तिथेच होता, त्यांचे आज प्रक्टीकल नव्हते आणि सेकं द हाल्फ मध्ये पण काहीच नव्हते,
त्यामुळे त्यांची जोरात मस्ती चालली होती. आम्ही तिकडे येताच थोडी comment बाजी झाली, राम्या आणि अवध्यात खुन्नस नजरांचे देवाणघेवाण झाली.

आम्ही जरा वेळ बसलो चहा पिला, आम्हाला सत्या (सतीश फे गडे) ने जॉईन के ले थोड्या वेळाने मी आणि राम्या कॉलेज कडे निघालो, रावल्या आणि सत्या तिथेच थांबले.

आज कसले तर Dissection निकाळजे सर दाखवणार होते. सर्व मुले आपापले niddles घेउवून मेल्याला उंदराला उचाकाण्यासाठी तय्यार होते. मी Biology थोडा
जबरदस्ती नेच घेतला होता त्यामुळे मला कधी अमिबा/स्पिरोगयारा ने दर्शन दिले नाही कि उंदराच्या Kidney चा साक्षात्कार झाला नाही, फक्त माझ्या slide मध्ये
bubble च यायच्या.

अर्धा तासाने सर निघून गेले, तोच रावल्या Lab मध्ये घुसला त्याने मला आणि रम्याला बाहेर बोलावत होता, आमचा “हरिश्चंद्र” उंदीर फडन्यामध्ये गुंग होता, मी एकटाच Lab
च्या बाहेर निघून गेलो.

रावल्या “राम्या आज मार खाणार वाटते”

मी “काय झाले बे”

रावल्या “साखरवाडी group चे बोलणे ऐकले, राम्याने कु ठल्या तर मुली समोर अवध्या बद्दल काही तरी बोलले वाटते”

मी “मग”, रावल्या “अरे ती साखरवाडी वरची पोरे जाब विचाराय आलेत, त्यांना काय बे कॉलेज वर नुसता गोंधळ घालय पाहिजे”

मी ”अवध्या काही बोलला नाही का मग” रावल्या “तो म्हणत होता फक्त विचारा राम्याला, त्याने तसे बोलेय का ते? बाकी काही करू नका, पण ती पोरे येडी आहेत मारामारी
होणार वाटते”.

मी “रावल्या सत्या हाय का ते बघ, त्याला म्हणाव जत्रात वेशी वरची पोरे असतील तर थांबव, त्यांना बघून तर मारामारी नाही व्हायची, वेशीत आणि वाडीत आताच
Settlement झालीय ”

रावल्या “होय मी सत्याला हुडकतो, तू रम्याला कॉलेज च्या बाहेर येऊ देऊ नकोस, मी येतो library जवळ”. इतके बोलून रावल्या Fielding लावण्या साठी निघून गेला.
प्रक्टिकल संपले.

मी आणि राम्या Lab च्या बाहेर आलो. मी “राम्या library कडे चल, जरा वेळाने जाऊ घरी” राम्या “का?”.

मी “अवध्याने वाडी वरची पोरं आणलीत”

राम्या “मी काय भितो काय कु णाला? सरांना परत सांगतो मी अवध्या बद्दल”

मी “अब्ये आईक जरा library कडे चल”. रम्याला घेऊन library कडे आलो रावल्या आला.

रावल्या “अब्ये gate च्या बाहेर वाडी वरची १५-२० पोर जमलेत”

राम्या “मग?”

मी “गप्प बे राम्या तू. सत्या भेटला का?”

राम्या “सत्या कश्याला पाहिजे, मी सरांपाशी Complaint करतो”

रावल्या “अब्ये आता कॉलेज मध्ये कोणीच नाही gate च्या आत काही झाले तरच कोणी तरी Help करेल gate च्या बाहेर नाही. नीट बाहेर निघायचे असेल तर सत्याचा
group पाहिजे तिघे जन येवड्या लोकांना face नाही करू शकत”.

राम्या “मारामारी नाही, हे काय मी नाही करणार बाबा”.

मी “तुला मारामारी कर कोण म्हणताय फक्त सत्याचा मुलांच्या सोबत gate च्या बाहेत निघायचे Highway पर्यंत, तिथून पुढे कोण काही नाही करू शकणार”

राम्या “मी नाही करणार हे ”


रावल्या “खाज आली काबे तुला मार खायची, नको तिथे शहाणपण करू नको सांगतो ते ऐक”

राम्या “तू लई शिकवू नको बघतो माझे मी” राम्याचे हे बोलणे ऐकू न रावल्या निघून गेला

मी “राम्या बघ तुला मारामारी कर नाही म्हणत, पण इथून निघायचे कसे ते ठरवावे लागेल, एक काम कर माझी Cycle घे तू आणि कॉलेज च्या माघून निघून जा तुजी Cycle
शेड मध्ये आहे, हे बघून त्यांना वाटेल तू कॉलेज मध्येच आहेस”

राम्याने माझी Cycle घेतले आणि ठरल्या प्रमाणे कॉलेज च्या माघून तलाव कडू न जायला निघाला. थोडावेळ राम्याला follow के ले तो ओढ्या काढू न जातोय हे पाहिल्यावर
कॉलेज मध्ये आलो, कॉलेज मध्ये रावल्या भेटला त्याला ठरलेला Plan सांगितला. थोडा वेळ आम्ही बसलो तिथेच, १०-१५ मिन्तानी शाळेच्या दिशे जाणार्या पोरांचा घोळका
दिसला, ते बघून मी आणि रावल्या धावलो, पाहतो तर काय राम्या सोबत ४-५ मुले हाणामारी करत होती, आम्ही पोह्लो, अवद्याच्या च्या मदतीने सर्व भांडण आवरले राम्याला
बाजूला घेतले , त्याला घेऊन आम्ही तिथून निघून घेलो.

नंतर कळले राम्या तलाव कडू न न जाता शाळेच्या मागून घरी निघाला होता आणि त्याला कोणी तरी पहिले आणि साखरवाडी वरच्या पोरांनी घेरले.

ह्या भांडणं नंतर राम्याच्या मनात त्या “चम्याने” असे भरवले कि मी आणि रावल्याला Help नाही के ली तिथूनमग आमच्या मैत्रीची विन सैल व्हयायला सुरु झाली, आम्ही आता
हि भेटतो पण पूर्वी सारखा तो पणा मात्र नाही.

अशी “चम्या” सारखी संधी साधु गिधाडे आपल्या भोवताली नेहमीच घिरट्या घालत, मैत्रीत एकच गोष्ट पाहिजे विश्वास, तो एकदा हरवला कि मग झाले........
Fight- 2

प्रत्येकाची शालेय जीवनात कोणी न कोणी “ती” असतेच, वयच असते ते, काही लोक त्याला प्रेम समजतात, काही लोक आकर्षण आणि काही Distraction, माझी हि
अशीच एक So Called “ती” होती कु छ कु छ होता है ची राणी मुखर्जी . पण कधी अशी फालतू ची आशिकी गिरी वगैरे के ली नाही समोरून आली कि चोरून पाहणे बस
तिथे पर्यंतच आपली मजल होती, धाडसच नाही के ले. पण आता लिहून हे जे धाडस करतोय, बायको ने वाचल्यावर काही खैर नाही but सांभाळ लेंगे 

तर अशी “ती”, शाळा झाली कॉलेज सुरु झाले, थोडी बहुत मिसुरडी फु टलं, पंख हि फु टले पण “ती” च्या topic वर काही प्रगतीच नाही झाली ३-४ वर्ष्या पासून आपली
गाडी आजून एकाच स्टेशनात अडकली होती, “बोलू कि नको”.

मला वाटते आपल्या पैकी बर्याच लोकांना ह्या स्टेशन चा अनुभव असणार. 

दोस्तान कडू न “ती” च्या प्रगती चे किस्से ऐकाय मिळायचे पण जोवर स्वतःच्या डोळ्याने बघत नाही, कानाने ऐकत नाही, तोवर मित्राच्या त्या गोष्टीना पाय खेचू पणाच म्हणून
उडवून लावले होते. आपली कहानी अशीची मागे पुडे करत तिथल्या तिथेच रेंगाळली होती. “ती”ची गोष्ट अशी public domain मध्ये सांगायचे कारण म्हणजे हीच गोष्ट
नंतर घडलेली हाणामारी आणि गैर समजाला कारण झाली होती.

सुमित माझा ११-१२वी चा सर्वात जवळचा मित्र, तो होस्टेल ला राहायचा, तो आमच्या Batch मधला one of the chocolate boy. त्याच्या शी चांगले जमायचे,
माझा कॉलेज पेक्षा होस्टेल वरच मुक्काम जास्त. वासिम,गोरख,अल्ताफ विनायक आणि सुमित असा चांगला group होता, मस्त गप्पा मारणे झोप काढणे हे आमचे आवडते छंद,
कधी मधी एखादे lectur attend हि करत होतो

Chemestry चे Lecture संपले, आता माझे मराठी चे आणि सुमित चे हिंदी चे lecture होते आता, दोघांनी हि दांडी मारायची ठरवले. college च्या बाहेर एक
चहा ची टपरी सरळ तिकडे निघालो.

सुमित “मान्त्या तुला काही तरी सांगायचे आहे”, मी “काय बे?”,

सुमित “मी एका मुलीला काही दिवसांपूर्वी propose के ले आणि ती काल मला हो म्हणाली”,

मी “माकडा आज सांगतोस व्हय हे. कोण आहे? मुलगी कु ठे भेटली?”

सुमित “नाही रे,तिचा काही response नव्हता तर सांगण्यात काही point नव्हता, तू ओळखतोस तिला, Chemistry tuition ला असते माझ्या सोबत”

मी “कोण रे?”

सुमित “तुमच्या शाळेतच होती ती, XXX”.

XXX म्हणजे “ती”!

बोंबला, एवढ्या मुलीत ह्याला पण तीच आवडली. साजन मधला संजू बाबाची एकदम फिलिंग आली, मनाशीच म्हंटले चला आपण तरी कु ठे propose के ले होते , एकदम
दिलजले होऊन मी सुमित ला म्हणालो “भारी आहे बाबा, बाहेरून येऊन निपानीची पोरगी कटवलीस, पार्टी पाहिजे!!” सुमित “देऊ की”. चहा सोबत कांदा भजी ची टपरी वरची
पार्टी खाल्ली आणि घरी निघालो.

काही दिवसानंतर...

मी वासिम/गोरख च्या रूम वर होतो, सुमित आला “मान्त्या जरा बाहेर चल” मी “बस बे इकडे बाहेर कु ठे जातोस”, सुमित “काम आहे Urgent बाहेर चल जरा” मी “यायला
दुपारची कसली urgent काम काढता रे तुम्ही, ते वश्या आणि गोरख्या पण नाहीत चल दाराला कडी लावू आणि जावू बाहेर”

होस्टेल च्या बाहेर आलो सुमित “काय बे मान्त्या, मला सांगितला नाहीस व्हय?” मी “सगळा सांगय तू काय माझी बायको आहेस, काय सांगितले नाही ते स्पष्ट बोल”

सुमित “काल रमेश पटेल भेटला होता तुझा मित्र, त्याने सर्व सांगितले”

मी “काय? काय सांगितले त्याने?”.


रमेश पटेल उर्फ रम्या माझा एकदम खास मित्र बऱ्याच secrete ह्याला माहित काय सांगितले देव जाणे, मला काही सुचतच नव्हते. काही तरी असेच उडावे म्हणून मी म्हणलो
“काय नाही बे फे कतो तो, नाही ते आंबे टाकतो”

सुमित “खोटे नको बोलू, त्यानेसांगितले शाळेत असताना तू XXX वर line मारायचे म्हणून”.

बोंबला ह्याने तर अणुबॉम्ब च टाकला.

खरतर रम्या ने खोटच सांगितले होते फक्त शाळेतच नाही तर आता पण आपण तिथेच अडकलो होतो.

मी “अरे ते शाळेतले प्रेम बीम काय खर असतंय होय, विचार त्या XXX ला कि मी कधी बोललो का तिच्या शी, कि तिच्या कडे बघितले, फे कातेय बे त्यो रम्या” .

सुमित “अरे हो, तसा नाही वाटत तू”.

तसा नाही वाटत मी म्हणजे मला काही समजले नाही पण त्याचा मुद्दाच पुडे रेटत “मग जाऊ दे सोड दोस्त आहे आपला तू मित्रा च्या डाव वर कधी line मारते का कोणी”.

देव जाणे line माम्राने हि संज्ञा कोणी प्रचारात आणि पण त्या वेळी हि टर्म खूप जोरात होती आता कसे ”goosebump” “hypocrat”, “intolerance”
चालतंय तसाच.

काही दिवसा नंतर.....

मी आणि अवध्या संध्याकाळचा निपाणी तला फे रफटका मारून पप्य्याच्या हॉटेल कडे चाललो होतो, तितक्यात सुमित आम्हाला एका Awkward ठिकाणाहून दबकत बाहेर
येताना दिसला. अवध्याने सुमित ची cycle अडवली , अवध्या “काय इकडे कु ठे?” सुमित घाबरला त्याला काय बोलावे सुचेना, लवंगी फटाकडी च्या शेजारी जर सुतळी बॉंब
लावला तर लवंगी चा आवाज दबला जातो तसाच situation मारून नेण्यासाठी सुमित ने एक बॉंब टाकला “अरे अवध्या, जग्या XYZ ला उद्या propose करणार आहे”.

बोंबला XYZ अवधूतची “ती” , झाले आता परत राडा होणार,

अवध्या “कोण सांगितले तुला?” सुमित “आरे त्याने XYZ प्रक्टिकल ची वही घेतली त्यातूनच तिला तो उद्या Physics Practical नंतर letter देणार आहे” अवध्या
“काय बे तुला कसे काय माहित एवडे detail मध्ये, ह्यातले एक शब्द जर खोटे निगाला तर तुजी काही खैर नाही”

सुमित “बस काय अवधूत. मी कशाला खोटे बोलेल होस्टेल वर सगळे कळते काय जग्याच सांगत होता आम्हाला”

उद्याचा दिवस उजाडला आज माझी सर्व first half मध्ये lectures होती. माझे, वश्याचे Defaulters मध्ये नाव होते, इथून पुढे मोस्टली सर्व lecture करावी
लागणार होती, सकाळी सकाळी Physics, Math’s आणि इंग्लिश चे lectur आटोपले, आता जावीर सरांचे Chemistry चे lecture होते, मोस्टली सर्व लोक
ते lecture दांडी मारायची, मास्तर काय बोलतात ते पहिल्या बेच वर पण ऐकु य नाही यायचे सुमित lecture start व्हायच्या आधीच खिडकीतून निघून गेला, वासिम,मी
आणि गोरख attendance साठी lectur ला बसलो.

lectur संपल्यावर बाहेर आलो तर अल्ताफ भेटला, त्याने सांगितले सुमितला आणि जग्याला साखरवाडी वरच्या पोरांनी मारले. आयला परत??.

आम्ही पटकन सुमित कडे गेलो. सुमित कोपऱ्यात एकटाच बसला होता, मी “काय बे सुम्या काय झाले?”

सुमित “ काय झाले म्हणून काय विचारतोस, अवध्याला च्या मित्राकडू न तूच मला मारय सांगितलेस न?”

मी “काही पण बोलू बे.”

सुमित “XXX चे आणि माझे सुरु झाले म्हणून तूच हे के लेस”.

मी “नाही बे तसे नाही, मला तर माहितच नव्हते”.

वासिम “अब्ये सुम्या काही पण नको बोलू आम्ही इकडे lectur मध्ये होतो” कसे बसे सर्वांनी सुमित ला समजावले. थोड्या वेळाने सर्व शांत झाले.
विशाल भेटला त्याने मारामारीचा पूर्ण हवाला सांगितला, अवधूत चा मित्र विज्य्याने सुमितला आणि जग्या letter बद्दल बोलाल्यला होस्टेल बाहेर बोलावले होते, जग्या आणि
सुमित बाहेर आले, जग्ग्यात आणि विजय मध्ये बाचाबाची झाले आणि कोणी कु णाला कसे मारले हे काही कु णालाच समजले नाही सर्व गोंधळाचे वातावरण होते, थोडा वेळाने शिपाई
आले अन मग सर्व मुलांची पांगापांग झाली. सगळी कडे हीच बातमी झाली, जग्ग्या ला आणि सुमित ला साखरवाडी वरच्या पोरांनी मारले.

पण त्या दिवसापासून शंका आणि गैरसमजाने सुमित च्या मनात घर के ले होते, हळहळू आमच्या तील अंतर वाढत गेले, नंतर बारावी च्या Exam चे वारे व्हावू लागले, सर्व
वातावरण एकदम परीक्षामय झाले. Preparation साठी हॉटेल मधून काही मुले आपापल्या गावी गेली, सुमित पण गेला, आता कॉलेज, होस्टेल, सगळा campus एकदम
भकास वाटत होता, एक रुक्षपण वातावरणात जाणवत होतो, सर्व focus exam कडे वळवला, exam आल्या सुमित ने होस्टेल सोडले होते मामा कडे राहता होता तो,
Exam दिली आणि न भेटताच निघून गेला. गैर समज अशेच असतात, सारासार विचार करायची शक्तीच मारून टाकतात. नंतर कधीच भेटला नाही.

मी खूप सुमित ला शोधत होतो पण काही कळायला source नव्हता, काही दिवसांनी तो Orkut वर सापडला, ओर्कु ट वर friend बनला पण परत तोच मित्र बनेल का या
बद्धल खात्री नव्हती, काही दिवसांनी तो मला पुण्यात होस्टेल वर भेटाय आला, मी त्याला Situation clear करण्याचा प्रयत्न के ला त्याला हि समजले होते, पण मैत्रीतला
पूर्वी सारखा तो पण आता हरवला होता, ४ वर्ष्याच्या अंतराने बरेच अंतर आणले होते, नेहमी हे असेच होते वेळीच गैर समज मिटवलेले बरे असतात. पण हे असते उशिरा सुचलेलं
शहाणपण....

You might also like