You are on page 1of 19

माओ ची गोष्ट

रमा दत्तात्रय गर्गे.


माओ ची गोष्ट ::भाग  १.................................................................................................................................2

माओ ची गोष्ट. भाग २.....................................................................................................................................3


माओ ची गोष्ट .भाग ३....................................................................................................................................5
माओ ची गोष्ट. भाग ४.....................................................................................................................................6
माओ ची गोष्ट .भाग५......................................................................................................................................8
माओ ची गोष्ट. भाग ६...................................................................................................................................11
माओची गोष्ट. भाग ७.....................................................................................................................................13
परिशिष्ट १.(माओ ची गोष्ट.).............................................................................................................................15
माओची गोष्ट : परिशिष्ट २...............................................................................................................................17
माओ ची गोष्ट ::भाग  १.

शूर विक् रमादित्य पु न्हा एकदा झाडाजवळ गे ला.झाडावरील प्रेत त्याने खां द्यावर टाकले आणि तो
चालू लागला..इतक्यात प्रेतात बसले ला वे ताळ त्याला म्हणाला…"विक् रमा,तु झ्या चिकाटीचे मला फार
कौतु क वाटते .फॉर अ चें ज ,आज मी तु ला आधी प्रश्न विचारणार आहे ,आणि तू योग्य उत्तर दिले स
तर गोष्ट सां गणार आहे .प्रश्न नीट ऐक.रशियात ले निन,स्टॅ लिन यांनी साम्यवाद राबवला तर चीन
मध्ये माओने !!मग माओच्याच साम्यवादाला ''माओवाद'' असे वे गळे नाव का आहे ?सां ग.""

विक् रम :: याचे रहस्य माओच्या "हुनान प्रबं धात"आहे .हुनान प्रांतातील शे तकऱ्यां च्या जीवनाचा
माओने ते थे राहन
ू अभ्यास केला.शे तकरी हा समाजातील असं तुष्ट घटक आहे व साम्यवादी क् रांतीचे
बीज (potential) त्यां च्यात आहे ; असे त्याच्या लक्षात आले .

मात्र  हा प्रबं ध साम्यवादी चौकटीत बसणारा नव्हता.त्यावर खूप टीका झाली.कारण जे थे साम्यवाद
रुजला होता ते थे फक्त कामगार वर्गाचे च सं घटन केले गे ले होते .शे तकरी हा जमीन मालक
असल्याने ,आणि त्याच्यासमोर भांडवलदारासारखा शत्रू नसल्याने ,तो साम्यवाद्यां च्या "सर्वहारा"वर्गात
बसत नव्हता.मात्र माओच्या मते ज्या त्या दे शानु सार अन्यायग्रस्त,शोषित लोक साम्यवादी क् रांतीचा
कच्चा माल आहे त,ज्या मु ळे सर्वं कष सत्ता हाती ये ते. या मु ळे साम्यवादाची केवळ कामगार सं घटन ही
व्याख्याच बदलली. हाच आहे माओवाद!!""

वे ताळ ::: वा!विक् रमा उचित उत्तर दिले स.वचन दिल्या प्रमाणे आता तु ला गोष्ट सां गतो. नीट ऐक.

माओ त्से तुं ग याची गोष्ट..

 माओचा जन्म शे तकरी कुटूं बात २६डिसें बर१८९३ ला शाओशान या गावी झाला.त्याचे वडील माओ त्से
शें ग हे शे तीची कामे सं पली की धान्याचा व्यापार करीत. त्यामु ळे इतर शे तकरी कुटु ं बापे क्षा माओच्या
घरची परिस्थिती चां गली होती.

त्या काळात शिक्षण म्हणजे कन्फ्यु शिअसचे तत्वज्ञान व जमाखर्च कळावा इतपत गणित!!माओने
आठव्या वर्षापर्यं त हा अभ्यास केला.पण त्याची पारायणे त्याला आवडे नाशी झाली.मग तो
कन्फ्यु शिअसच्या पु स्तकांत इतिहासाची पु स्तके दडवून वाचू लागला.कथा कादं बऱ्या वाचू लागला.

 या वाङ्मयात त्याला राजे राण्या, सरदार,जमीनदार यां च्याच गोष्टी आढळल्या.शे तकरी कामकरी
लोकां च्या कथा त्यात नव्हत्या.त्यामु ळे त्याला या उच्चभ्रू वर्गाबद्दल घृ णा निर्माण झाली.

बालपणापासूनच अत्यन्त टोकाची विचारसरणी असले ला हा सामान्य मु लगा आधु निक चीनच्या
इतिहासाचा अनन्यसाधारण घटक असे ल असे ते व्हा कोणाला वाटले ही नसे ल.

           (क् रमशः)

  डॉ.रमा दत्तात्रय गर्गे


माओ ची गोष्ट. भाग २.

  वे तळाने दीर्घ पॉझ घे तला.त्या सरशी विक् रमाने मान वळवून एकदम वर पाहिले … धडपडत, पु न्हा
माने वर खां द्यावर पकड घट् ट करीत वे ताळ मोठ्याने म्हणाला,""सबूर!,सबूss र!अरे
विक् रमादित्या,तु मच्यासारखे गु रूत्वाकर्षण नसते बाबा आम्हां ला. तरं गायला लागे न मी.आणि मग पु न्हा
झाडाची शोधाशोध!"

तु ला पु ढची गोष्ट ऐकायची आहे ना?

मग माझा प्रश्न ऐक.

"जसा भारत एकोणिसाव्या शतकात इं गर् जां च्या अधिपत्याखाली होता;तसे चीनवर कोणी राज्य केले ?
सां ग पाह.ू "

विक् रम ::: एकोणिसाव्या शतकात सारी  साम्राज्यवादी राष्ट् रे चीनकडे आशाळभूत नजरे ने पहात
होती.त्यावे ळच्या मांचू राजवटीत व्यापार उदीम फार चालत नसे . चीनवर फार आधीपासून ब्रिटिशांचा
डोळा होता.रे शीम,चहा यांची निर्यात चीन करीत असे .मात्र वस्तु विनिमय नाही,तर सोने चांदी घे ऊन
विक् री होई.दुसऱ्याचा माल चीनीलोक खरे दी करत नसत.

धूर्त ब्रिटिशांनी नवा डाव आखला. मांचू राजवटीतील भ्रष्ट प्रांताधिकाऱ्यांना हाताशी घे ऊन
इं गर् जांनी चीनी तरुणांना अफू चे व्यसन लावले .भारतात अफू पिकवायची आणि चीन मध्ये विकायची !!!

या व्यसनाचा विळखा एवढा जबरदस्त होता की त्याने चीन पोखरून निघाला.आर्थिक घडी
विस्कटली.लोक अफू साठी एकमे कां च्या उरावर बसू लागले .अं दाधुं द माजली.

मग राजाला जाग आली.त्याने राणी व्हिक्टोरियाला पत्र लिहिले .पण उपयोग झाला नाही.शे वटी छापे
टाकू न त्याने चोरट्या अफू चा प्रचं ड मोठा साठा समु दर् ात लोटू न दिला.आणि १८४२ पासून मग
लागोपाठ तीन यु द्धे झाली,जी अफू ची यु द्धे म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे त.

यांत साम्राज्यवादी दे श जिं कले .इं ग्लं ड, फ् रांस पोर्तुगाल या दे शांनी चीनचे आश्रित दे श बळकावले .

(आजदे खील चीन ऐतिहासिक काळात साम्राज्यवादी दे शांनी चीनपासून तोडू न घे तले ला मु लुख ,या
सोज्वळ परिभाषे त सीमारे षा आखतांना दिसतो.लाओस कंबोडिया आसाम ने फा सु यक
ू बे ट यांची त्यात
गणती करतो.असो.)

तर या पश्चिम राष्ट् रांनी नु कसानभरपाई या नावाने चीनचे अने क लचके तोडले .जाचक व्यापारी अटी
लादल्या गे ल्या.

विदे शी मालाच्या बाजारपे ठा तयार झाल्या.स्थानिक उद्योग बं द पडले .मिशनरी लोकांनी आपले काम
सु रू केले .धर्मांतरित लोकांना सवलती मिळू लागल्या.ब्रिटन,

फ् रान्स, पोर्तुगाल सगळे आपापल्या हिश्यांचे शोषण करू लागले .नं तर या स्पर्धेत जपानही सामील
झाला.

तर वे ताळा,कोण्या एकाने चीनवर सार्वभौम राज्य केले   नाही,तर अने कांनी चीनचे वे गवे गळ्या प्रकारे
शोषण केले ."

वे ताळ ::     छान!! विक् रमा,योग्य उत्तर!!


चल तु ला आता पु ढची गोष्ट सां गतो.

ते रा वर्षांचा झाल्यावर दोन ,तीन वर्षे माओने शे ती केली.पण वडिलां च्या सां गण्यावरून पु न्हा तो
सोळाव्या वर्षी शिक्षणाकडे वळला. त्या काळात चीन मध्ये पाश्चात्य साम्राज्यवाद्यांचा प्रवे श झाला
होता.अफू ची यु द्धे,तायपिं ग चे बं ड होऊन गे ले होते .चीनमध्ये आता जागृ ती निर्माण करण्यासाठी सु धारक
झटत होते .लियां ग ची चाओ, कां ग यु वी हे विचारवं त वृ त्तपत्र, नियतकालिके यात ले खन करून समाज
जागृ ती करत असत. ये न फु या आद्य सु धारकाने पूर्वी केले ले अरण्यरुदन आताशा लोकांना जाणवू
लागले .

मिशनच्या शाळा,विदे शातील शिक्षण याने ठराविक वर्गात जागृ ती ये त होती.या सगळ्याचा प्रभाव
माओ वर पडत होता.

हुनान प्रांतातील चां गशा या शिक्षण केंद्रात त्याने उच्च शिक्षणासाठी प्रवे श घे तला.हा कालखं ड
राजकीय अस्थिरते चा कालखं ड होता.डॉ.सन् यत से न या पाश्चात्य शिक्षण घे तले ल्या तरुणाने ,आपल्या
दे शात प्रजासत्ताक स्थापन करण्याची पराकाष्ठा लावली होती.तुं ग में ग हुई म्हणजे society for
regeneration of china ही सं घटना स्थापन केली होती.

माओ दे खील या काळात मांचवि ू रोधी चळवळीत सामील झाला होता.""मिन लिपाओ"या
नियतकालिकातील से न यांचे सं पादकीय वाचून सतरा वर्षाचा माओ प्रभावित झाला होता.त्याने
तत्कालीन राजकीय परिस्थितीवर भित्तीपत्रक तयार करून शाळे त लावले होते .

नं तर तो चळवळीतून बाहे र पडला.हन ू ान नॉर्मल स्कुल ये थे तो आता दाखल झाला.ये थेच यां ग चे न ची
या प्राध्यापकाच्या भे टीने त्याच्या आयु ष्याला कलाटणी मिळाली.नितीशास्त्राचे हे आवडते प्राध्यापक
पु ढे त्याचे सासरे बु वा झाले .त्यां च्या कन्ये शी माओने विवाह केला.

  (क् रमशः)

  

   डॉ.रमा दत्तात्रय गर्गे.


माओ ची गोष्ट .भाग ३.

वे ताळ ::: विक् रमा,वाईट वाटतं रे चीन साठी.नु सती मु स्काटदाबी !!भयग्रस्त जीवन!अरे प्रचं ड भौतिक
प्रगती म्हणजे सर्वां गीण विकास नाही.

या माओ ची गोष्ट सां गतांना मलाच एक लांब झे प घ्यावीशी वाटते य.आणि त्याच्या विचित्र
योजने ची, "Great leap forward" ची कहाणी सां गावीशी वाटते य.

 निरं कुश माओ ने राबवले ली ही विक्षिप्त योजना होती.शे तीचे उत्पादन घसरले ते व्हा शे तीला
लावण्यासाठी लागणारा पै सा पोलाद निर्मितीतून कमवायचा!!हे सगळं विकेंद्रीत. गावां गावात भट् ट्या
सु रू झाल्या. किती? दोन लाख! त्यातून दररोज दोन हजार टन पोलाद निर्माण होऊ लागले . कच्चा माल
नसे ल तर घरातील लोखं डी वस्तू,पाते ले, तवे ,पलं ग,शे तीची अवजारे भट् टीत पडू लागली.माओ ने
सां गितले ते वढे पोलाद काही करून करत राहणे आवश्यक होते . नाहीतर ले बर कॅम्प* ची वारी
ठरले ली!! ,मी  सां गतोच नं तर त्या बद्दल ,कसले कॅम्प होते ते !!

१९५८ ते १९६०चीन धगधगत्या ज्वाले समोर बसले ला होता. ६०साली ही योजना मागे घे तली कारण
रशियाने आपले तं तर् ज्ञ माघारी बोलावले .पोलादाचा प्रमाणिकरणा अभावी कचरा झाला.पोलाद निर्मिती
कुटिरोद्योग म्हणून करणे हा शु द्ध आचरटपणा होता.शे ती ओसाड माळरान बनली.लोक हवालदिल झाले .

असा हा भीषण साम्यवाद!!! या साम्यवादाचा आणि माणसालाही क् रांतीचा कच्चा माल समजणारा
चे अरमन माओ याचा उदय झाला नसता,जर एक ऐतिहासिक चूक घडली नसती.

ती चूक कोणती आणि करणारे कोण ते सां ग .मग तु ला पु ढची गोष्ट सां गतो.

विक् रम:: डॉ.सन् यत से न प्रखर लोकशाहीवादी होते .समर्पित होते . पण जे व्हा प्रजासत्ताकाची स्थापना
करतांना त्यांनी पाश्चिमात्य राष्ट् रांची मदत मागितली ते व्हा केवळ निराशा पदरात पडली.

हे सगळे दे श स्वतःच्या राष्ट् रात लोकशाही मार्गाने चालतात पण बाहे र साम्राज्यवादि !!

या घडामोडींवर बारीक लक्ष ठे ऊन असणाऱ्या रशियाने ,बोल्वे शिक सरकारतर्फे मदतीचा हात पु ढे
केला.पण मला चीनमध्ये लोकशाही हवी आहे असे से न रशियन प्रतिनिधी अडल्फ जोफे यांना
सां गितले . आमचा लढा साम्राज्यवादाशी आहे ,तु मचे प्रजासत्ताक जपले जाईल असा करार रशियाने
केला.सरळ मनाच्या से न यांची ही चूकच पु ढे चीनच्या लोकशाहीचा गळा घोटणारी ठरली.धूर्त रशियाचा
साम्यवादी डाव त्यां च्या लक्षात आला नाही.लिखित करार कोण कशाला मोडे ल असे से न यांना वाटले
पण !!! समोर साम्यवादी होते ,केसाने गळा कापणारे ..

:वे ताळ :: बरोबर विक् रमा!!

ऐक, माओच्या सासऱ्यांना; यां ग चे न ची यांना, पे किंग विद्यपीठात प्राध्यापकाची नोकरी मिळाली. माओ
आणि त्याची पत्नी त्यां च्यासमवे त पे किंग ला आले .ये थेच माओला सहायक ग्रन्थपाल म्हणून नोकरी
मिळाली.

माओ या काळात मार्क्सवादी विचारवं तां च्या सहवासात आला. ली टा चाओ, चे न तू त्सु ,डॉ.हं ू शिह
यां च्या चर्चा विचार एकू न त्याची साम्यवादाची बै ठक पक्की होत गे ली.  या काळात त्याने कम्यु निस्ट
मॅ निफेस्टो वाचून काढला. प्रजासत्ताक वाद्यांपासून लपवून कम्यु निस्ट पक्षाचे काम चालत असे . या
गु प्तकामात रशियाचे पूर्ण सहकार्य होते .

पे किंग नं तर चां गशा, शांघाय,कँन्टोंन,व्यूहान या शहरांतही साम्यवादी अभ्यासमं डले सु रू झाली.सु शिक्षित
लोक एका स्वप्नवत विचाराने भारावून जाऊ लागली.हाच शहरी साम्यवाद.नु सताच विचार आणि
स्वप्नांचा पोकळ डोलारा.
आता उद्या टीम ,ब्रिगे ड ,कम्यु न अशी साम्यवादात असणारी असाम्यवादी रचना आणि age of
disorder, age of order, age of gret peace या साम्यवादी अफू च्या गोळ्यांची माहिती आणि सरोवराच्या
मध्यभागी काय घडले ते सां गेन.(क् रमशः)

माओ ची गोष्ट. भाग ४.

विक् रम चालता चालता एकदम थांबला.तसा वे ताळ त्याला म्हणाला,"काही बोलायचं आहे का
विक् रमा?बोल!या माओ एपिसोड मध्ये तु ला बोलायची फुल्ल परवानगी आहे . काss ही तु झ्या मस्तकाची
शकले होऊन तु झ्या पायां वर पडणार नाहीत!"

    विक् रम ::: विचार करत होतो रे ..चीनी शे तकरी  ज्याच्या घामाच्या आणि रक्ताच्या जोरावर ही
साम्यवादी क् रांती झाली ,त्याला विचारण्यात आलं होतं का कधी ,की बाबारे असे कम्यु न उभे
करणार,असे लॉ ंग मार्च मध्ये तु ला चालवणार,एक लाखापै की तु म्ही फक्त वीस हजार जीवन्त
पोहोचणार,बाकीचे हालहाल होऊन मरणार..आहे स का तयार?"

वे ताळ ::: विक् रमा,बाबा तीच तर शोकां तिका आहे या साम्यवादाची.वर्गसं घर्ष यांनी गृ हीतच धरलाय
आणि शोषित वर्ग म्हणजे यां च्या क् रांतीचा कच्चा माल,तो ही गृ हीत धरलाय.

      

       उं च मनोऱ्यातील विचारवन्त एकत्र ये णार.योजना ठरवणार,कार्यक् रम आखणार.ही झाली यांची


टीम.मग त्या खालचे म्हणजे निम्नस्तरीय ब्रिगे ड!!हे लोक म्हणजे दादा टाईप!योजना राबवून
घे णारे .टीम ला उत्तरदायी!!आणि मग तिसरा घटक भावी कम्यु न मधले साधे सुधे लोक.ज्यां च्या समोर
काल्पनिक शत्रू उभा केले ला असतो आणि ज्यांना स्वर्गाच्या राज्याचे स्वप्न दाखवले ले असते .त्यांना
हवे तसे वापरायचे .आणि याला साम्यवाद म्हणायचं !!कहर आहे ..!"

विक् रम :: सदै व प्रस्थापितां विरुद्ध क् रांती हाच एककलमी कार्यक् रम.नीती नको,शिक्षण नको, शांती
नको,कला नको,शिल्प नको!!सगळं यां च्या दृष्टीने बु ss झ्ss र्वा !! 

    जाऊदे ,तू पु ढची गोष्ट सां ग.काय झालं होतं सरोवराच्या मध्यभागी?माओ होता का तिथे ?

 वे ताळ :: वा!बोल म्हटलं तर प्रश्न ही विचारू लागलास की विक् रमा!!चल सां गतो.

    

      रशियाने से न-जोफे कराराच्या माध्यमातून चीन मध्ये चं चप ू र् वे श केला.चँ ग काई शे क हा लष्करी


प्रशिक्षण घे ण्यासाठी रशियाला रवाना झाला.से न यां च्या तें ग में ग हुई चा आता कोमिं गटां ग पक्ष
झाला होता.या पक्षाची घटना सु द्धा कम्यु निस्ट पक्षाच्या धर्तीवर करण्यात आली.
      हळू हळू चीनमध्ये साम्यवादी विचारांची मं डळी वाढली.त्यांना गु प्तपणे कोमिं गटां ग मध्ये काम करणे
नकोसे झाले .पण पक्ष जाहीरपणे स्थापन करणे शक्य नव्हते .से न-जोफे करारानु सार कम्यु निस्ट पक्ष
स्थापन करण्यास बं दी होती.

     मग ही निवडक मं डळी १९२१ साली जु लै महिन्यात चाह्यसिं ग शहराजवळील सरोवरात होडीत बसून
गे ली.आणि सरोवराच्या मध्यभागी चीन कम्यु निस्ट पक्षाची स्थापना करण्यात आली.ली टा चाओ,चे न
टू त्सु , माओ झे डोंग*(त्से तुं ग चा चीनी उच्चार!) हे सगळे उपस्थित होते .आं तरराष्ट् रीय कम्यु निस्ट
सं घटना कोमिं टर्नला तसे कळवण्याचे ठरले .

     १९२४ मध्ये से न यांचे निधन झाले . पक्षाची कमान चँ ग काई शे क कडे आली.तो कम्यु निस्ट विरोधी
होता.त्याला लोकशाहीवादी पक्षातील कम्यु निस्ट खटकत होते .त्याने कम्यु निस्ट विरोधी मोहीम राबवली

       या दरम्यान जपानचे आक् रमण झाले ,ते व्हा शे क म्हणाला,"हे आक् रमण त्वचा रोगासारखे आहे पण
चीन मधील कम्यु निस्ट हे हृदय रोगासारखे आहे त."

     ह्या शे क शी लढण्यासाठी माओ ने लाल से ना कशी उभारली आणि लॉ ंग मार्च कसा काढला ते
तु ला उद्या सां गतो.(क् रमशः)

    डॉ.रमा दत्तात्रय गर्गे.


[23/06, 1:33 am] Rama Garge: : माओ ची गोष्ट .भाग५.

वे ताळ :: विक् रमा,थकलास का रे ?

      आपला पण लॉ ंग मार्च सु रू असतो,नाही?अगदी असं च साम्यवादाचे भूत मानगु टीवर बसवून,गरीब


शे तकरी महिला,पु रुष, मु ले,म्हातारे यांना सहा हजार मै ल चालण्याची सक्ती केली गे ली.

      

       सगळं च अतर्क्य!!त्यात एक मे ख होती.माओला लोक का भितात व तो विरोधक कसे सं पवतो हे


बऱ्याच काळानं तर नं तर एका योजने ने लक्षात आले .

    

    त्या योजने चे नाव आणि माहिती सां ग, मग पु ढची गोष्ट सां गतो.

विक् रम :: त्या योजने चे नाव होते ,

   

      "ले ट अ हं ड्रेड फ्लॉवर्स ब्लूम!!"

ू न
       १९५७ सालात माओच्या सु पीक में दत ू आले ली ही कल्पना!!

        पे किंग यु निव्हर्सिटी कम्यु निस्ट पु ढाऱ्यांची जन्मदात्री.दहा हजार चिनी विद्यार्थी व दोनशे च्या
आसपास विदे शी विद्यार्थी ते थे होते .पण सारे एकाकी जीवन जगत.प्राध्यापक विद्यार्थी या प्रत्ये काला
दुसऱ्याबद्दल सं शय वाटे .

      या काळातील ही योजना.सगळ्यांनी आपले विचार मोकळे पणाने मांडा असे घोषित करण्यात
आले .एका रात्रीत विद्यापीठाच्या भिं ती पोस्टर्सने भरून गे ल्या.

    

         बु द्धिवादी पु ढे सरसावले ,पक्षाचे प्रतिनिधी ये ऊन दिवस दिवस चर्चासत्रात सहभागी होऊ
लागले .मनमोकळ्या चर्चा घडू लागल्या.शिक्षण  आणि पक्ष हे एकत्र नको.स्वतःच्या मनाप्रमाणे
लोकशाही की कम्यु निझम हे निवडण्याचे स्वातं त्र्य हवे ;असे प्राध्यापक विद्यार्थी हिरिरीने मांडू
लागले .आणि लोकां च्या न कळत माओ विरोधकां च्या याद्या तयार होत होत्या.त्यां च्यासाठी शिक्षा ठरत
होत्या.कुणालाच हा डाव लक्षात आला नाही.

      

       आणि मग हत्याकांड आणि ले बर कॅम्पचे भयं कर सत्र सु रू झाले !!!.विरोधकांना निवडू न वे चनू ठार
करण्यात आले .काहींची रवानगी विचार शु द्धी साठी श्रम छावणीत करण्यात आली.कित्ये क ते थन ू परत
आले च नाहीत.शिक्षक, विद्यार्थ्याना ठराविक दिवस शे तीत व कारखान्यात कामाला धाडण्यात आले .
    "सहमत असतील ते जगतील, प्रश्नकर्ते यमयातना भोगतील"हा कम्यु निस्ट लोकांचा नारा!!अशी ही
न फुलले ली ,कोमे जले ली फुले !!

 वे ताळ ::: हम्म्म!आता एका लॉ ंग मार्चची कहाणी ऐक.

       किआं ग्सी प्रांतात माओने लालसे ना उभी केली.पण चँ ग काई शे क थे ट रशियातून प्रशिक्षण घे ऊन
आले ला होता.त्याने साम्यवाद्यांची कोंडी केली.नव्या प्रांताचा शोध घे ण्यासाठी माओ दक्षिणे कडू न
उत्तरे कडे निघाला.या प्रदीर्घ यात्रेलाच लॉ ंग मार्च म्हणतात.

       रातोरात हजारो लोक निघाले .लाल से नेचा आदे श.गावे च्या गावे ओस पाडण्यात आली.किडु क मिडु क
घे ऊन गरीब,भु केले ले, स्त्री पु रुष,मु ले, म्हातारे !!गर्द झाडीतून ,नद्या,डोंगर,वाळवं ट पार करीत निघाले .

      शे कडो मै ल दलदलीचा प्रदे श तु डवला.अन्न पाण्याअभावी काही मे ले,तर काही दलदलीत रुतून
मे ले,रानटी टोळ्यांनी काहींना मारले तर काही साथीच्या रोगात मे ले.तर हिमालयाच्या बर्फात काही
गाडले गे ले.

     चॅ ं गच्या चार डिफेन्स लाईनला चु कवत हे लोक पु ढे जात होते .

        माओचे लाल सै निक रस्त्यात लागणाऱ्या खे ड्यात, पं चायत कार्यालयात घु सन


ू ,ते थील कागदपत्रे
जाळत असत.जमीनदाराला लु टत असत.'सर्व शे ती आता सामु दायिक आहे 'असे घोषित करून ; ते थील
मजूर गरिबांना मोर्च्यात सामील करून घे त.मग पु ढे निघत असत.

     "ब्र"काढण्याची कुणाची हिं मत नाही.शे जारचा चालणारा लाल सै निक असे ल तर!??आजचे मरण
उद्यावर ढकलणे आणि चालत रहाणे एवढे च माहीत.

       वर्षभरात सहा हजार मै ल हे लोक चालले व अकरा प्रांत त्यांनी ताब्यात घे तले .

        लाखभरातील केवळ दहा हजार लोक शान्सीला पोहोचले .नं तर चीन जपान  यु द्ध झाले .चावू एन
लाय याच्या मध्यस्तीने चीनी सं युक्त आघाडी जापानशी लढली.

     मात्र नं तर माओने सर्व उत्तर चीन व पे किंग ताब्यात घे ऊन "चीन सोव्हिएट"स्थापन केले .

    आता Cultural Rivolution नामक विचित्र प्रयोगाची माहीत उद्या दे तो.


    (क् रमशः)

   डॉ.रमा दत्तात्रय गर्गे.


[23/06, 1:33 am] Rama Garge: माओ ची गोष्ट. भाग ६.
 

  वे ताळ ::: विक् रमराव!वर नका हो पाह!ू जरा सां गा, 'बिन बां धाची शे ती' म्हणजे काय?मग सां गतो पु ढची
गोष्ट..

विक् रम ::: चीनी कम्यु न म्हणजे "बिन बां धाची शे ती."

            माओच्या डोक्यात अफाट कल्पना ये त असत.

     

     कम्यु न हा  कम्यु निस्ट पक्षाचा मूलभूत घटक!!जो कधीही कोणत्याही सोव्हिएट मध्ये साध्य झाला
नाही.१८७१ चे पॅ रिस कम्यु न,१९३० चे रशियन कम्यु न अयशस्वी ठरले .पण दुसऱ्यावरून शिकेल तो
माओ झे डोंग कसा?

           १२ कोटी कुटूं बे ,

         २६,००० कम्यु न्स

        ४०लाख भोजनालये ,

         ५०लाख बालसं गोपनगृ हे!!

 असला भयं कर पसारा या कम्यु न्सचा!!

       २८ऑगस्ट १९५८ रोजी चिनी कम्यु निस्ट पॉलिटब्यु रोने कम्यु न चा ठराव सं मत केला.

        सामान्य स्वरूपाच्या कम्यु न मध्ये ५०००कुटूं बे असत,त्यांतील धडधाकट १०,००० स्त्री पु रुष श्रमिक
म्हणून काम करत.

      आजूबाजूची शे त जमीन कसणे , खताचे कारखाने चालवणे ,कपडे शिवणे ,अन्न शिजवणे ,बालसं गोपन
इ.कामे वाटू न दिली जात असत.१०/१२तास काम झाल्यावर पु न्हा पक्षाची प्रवचने ,पथनाट्य असे .

   

    आठवड्याला एका पिशवीतून काही गरजे चे व्यक्तिगत सामान दिले जाई.बाकी जे वणखाण
भोजनालयात, ठराविक प्रमाणात.

      अत्यन्त निरस असे हे जग सशस्त्र लालसै निकां च्या धाकावर चालत असे .
     १९६२ पर्यं त हा प्रयोग कागदोपत्रीच चां गला चालले ला दिसतो,प्रत्यक्षात दुष्काळ,अराजक,
टोळधाड,अशांतता आणि सहा कोटी लोकसं ख्यावाढ हे च या योजने चे फलित होते !!नं तर ही योजना
मागे घे तली गे ली.

वे ताळ ::: आणि आता मी तु ला सां गतो १९६६ मधील "सां स्कृतिक क् रांती" बद्दल!!

      

       एकाच दिवसात माओचे दोन प्रयोग समजून घे णं,जमे ल ना रे आपल्याला??

      माओला पक्षातच विरोधक निर्माण होत होते .एकीकडे कम्यु न मध्ये अपयश,रशियाने पाठ
फिरवले ली,'लिओ शाऊ ची'हा प्रतिस्पर्धी समोर ठाकले ला.

    अशा वे ळी माओने एक खे ळी केली..तरुणाईला साद घातली. सां स्कृतिक क् रांती असे तिचे नाव."रे ड
गार्ड आर्मी" निर्माण झाली."जु ने जाऊ द्या मरणालागु नी, जाळू न अथवा पु रोन टाकू .""हा मं तर्
दिला.रे डबु क्स वितरित करण्यात आले ,चामखीळ असले ले माओचे छायाचित्र जिथे तिथे झळकू
लागले .भिं तीवर माओची वचने रं गवली गे ली.जु नी पु स्तके,राजवाडे ,शिल्पे ,

विचार,ज्ञान, सारे सारे बूरज्वा ठरवण्यात आले .

       लाल तारा असले ली खाकी टोपी,दं डाला लाल पट् टा अशा वे शातील तरुणाई ,हातात रे डबु क घे उन
"माओ माओ" असे ओरडत फिरू लागली.

       शाळा कॉले ज ओस पडू लागले ,शिक्षक ,पालक कुणीही विरोधात बोलला तर तक् रार केली जात
असे .

       लगे च ले बर कॅम्प मध्ये रवानगी होत असे .शिक्षक माओचे विचार शिकवत नसे ल तर त्याच्या
डोक्यावर विदष ू की टोपी घातली जात असे .

     अराजक आणि मोडतोडीचा हा कालखं ड.

     'हॅ री वु ' या ले बर कॅम्प ची शिक्षा भोगले ल्या चिनी ले खकाने "ट् रबलमे कर"या पु स्तकात त्या
काळातील अनु भव सां गतले आहे त.

   

    वे ताळ असूनही थकलो बाबा!!माओही आता गोष्टीत सत्तरीला आलाय.बाकी कहाणी उद्या.(क् रमशः)

 डॉ.रमा दत्तात्रय गर्गे.


[23/06, 1:33 am] Rama Garge: माओची गोष्ट. भाग ७.

विक् रम :::: वे ताळा,धन्यवाद.तू मला माओ ची गोष्ट सां गतो आहे स.मी एक शासक आहे ,तु झ्या माओ
मु ळे मला बऱ्याच टिप्स मिळाल्या.पण मला सां ग तु ला इतकं सगळं कसं कळालं ?

वे ताळ ::: ते खरं म्हणजे गु पित आहे विक् रमा.अरे मरणोत्तर रीतसर क्रियाकर्म किंवा मानवोपयोगी
दे हदान, हे झालं नाही की प्रेतात समं ध निर्माण होतो.माओ च्या समं धाने सां गितलं असं समज हवे
तर!!

       १९६६ ते १९७६ ही दहा वर्षे म्हणजे चीनच्या इतिहासातील गुं डगिरी, हाणामारी,आराजकाची वर्षे
होती.

    आपली आषाढीची वारी असते ना तशी वारी निघायची  "शाओशान"ला.माओचे जन्मस्थान!

    "सूर्य उगवला पहा इथे ,या आपल्या शाओशानला"

       अशी गीते गात, हातात रे डबु क घे ऊन खां द्यावर लाल पताका घे ऊन रे ड आर्मी चे हजारो जवान
वारी करत.त्याच्या घरात त्याचा पलं ग,खे ळणी,पाटी, दप्तर असे सर्व ठे वले ले असे .तो ज्या चु लीवरचे
अन्न खातो ती चूल,ते अं गण असे सर्व पहाण्यासाठी लोक भक्ती भावाने ते थे जात.हे सगळं माओ
जिवं त असतांना!!

    

       असे दे व्हारे माजवणे साम्यवादाच्या कोणत्या व्याख्ये त बसत होतं ते माओ जाणे आणि त्याची रे ड
आर्मी जाणे !!

      माओ काव्यरचना करीत असे . "द ईस्ट इज रे ड" हे क् रां तिगीत स्मारके, इमारतींची तोडफोड
करण्याआधी गायले जायचे .

      भय कसं असतं बघ,आजही त्या कालखं डावर चिनी माणूस मोकळं बोलू शकत नाही.

        अखे रीस १९७६ ला बु द्धिभ्रष्ट होऊन माओ वारला. बिजिं गच्या तिआन मे न चौकात त्याचे
स्मारक आहे .सु रेख काचे च्या शवपे टीकेत त्याचे शव जतन केले आहे .रात्री ते बर्फात ठे वलं जातं आणि
दिवसभर दर्शनासाठी!!

        माओ ची वचने ,कविता ते थे लिहिल्या आहे त.दिवसभर लोक ते थे गर्दी करतात.


      कागदी फुलांचे गु च्छ विकत घे तात व त्याच्या शवाजवळ ठे वतात.

        या माओ मु ळे चीनचे झाले ले नु कसान न भरून ये णारे आहे . त्याच्या  धोरणांमुळे चीन महासत्ता
बनला हे मात्र खरं .

     चिनी लोक म्हणतात माओ ७०%  बरोबर होता,३०% चु कला!!

     आपल्या दे शाच्या बाबतीत म्हणशील तर त्याच्यामु ळे सीमावाद पे टत राहिला.खरं की नाही?

विक् रम :::: हो ना,माओ म्हणे ल तो नकाशा .असं असल्यावर दुसरं काय होणार?

वे ताळ ::: हा: हा:हा:!!विक् रम तू बोला, मैं चला !!

विक् रम ::: अरे पण ठरलं होतं ना की या एपिसोड मध्ये मी बोललो तर चाले ल,मग शब्द कसा
फिरवतोस?

वे ताळ ::: अरे माओची कथा होती.इथे शब्द पाळणे ,यु द्धनीती पाळणे म्हणजे मूर्खपणा!

 ।।।आता तरी सु धारा!!तु म्ही #हिं दी चिनी भाई भाई..चे नारे लावत होतात ते व्हा काय घडले ?इतिहास
लक्षात ठे वून रहा!!

(आणि वे ताळ प्रेतासह अदृश्य झाला व झाडाला जाऊन लटकू लागला)

   * साम्यवादी चिनमधील कुटूं बव्यवस्था व भारत चीन सीमा प्रश्न या दोन परिशिष्टा नं तर मालिका
सं पेल.

  

   डॉ.रमा दत्तात्रय गर्गे.


[23/06, 1:33 am] Rama Garge: परिशिष्ट १.(माओ ची गोष्ट.)
साम्यवादी चीन मधील कौटु ं बिक जीवन ::

( सं दर्भ :: श्रीमती मीना व्होरा यांचे मु बंई आकाशवाणी वरील २४ मे १९६३ चे भाषण.प्रसिद्धी विभाग
,महाराष्ट् र शासन,मु बंई.)

    पे किंग विद्यापीठात शिकत असतानाच्या आठवणी.

    चीनच्या नव्या समाजात व्यक्तिवै शिष्ट्याला स्थान नाही.आजच्या चीन मध्ये भावु कते ला स्थान
नाही.

   पे किंग विद्यपीठाच्या मु ख्य प्रवे शद्वाराजवळ थं ड पे याचे दुकान एक चिनी महिला चालवीत असे .

     एक दिवस मी आणि माझे पती रात्री उशिरा फिरायला बाहे र पडलो.ते वढया रात्रीही ते दुकान
सु रू असल्याचे पाहन
ू आम्ही थं ड पे याची ऑर्डर दे ऊन तिच्याशी बोलु लागलो.

      माओच्या हनु मान उडी योजने मुळे तिला सकाळी ७ ते रात्री११ पर्यं त काम करावे लागे .

    "तु मचे लग्न झाले य का?"मी तिला विचारले .त्यावर मोठ्या अभिमानाने ती म्हणाली,"हो
कॉम्रेड,मला तीन मु ले दे खील आहे त,५, ३आणि १ वर्षांची."

   मी तिला चकित होऊन विचारले ,'"घरापासून दरू दुकानात तु म्ही इतका वे ळ काम करता,यजमानही
नोकरी धं दा करत असणार,मग मु लांचं कसं ?जे वण कोण करते आणि भरवण्याचं काय?"

    ती म्हणाली,"रोज सं ध्याकाळी माझे यजमान आधी घरी जाऊन जे वण बनवतात व सकाळचे मी


बनवून ये ते.थोरला पाच वर्षांचा आहे ,तो दोघांचं बघतो."

    हे मला अजब वाटलं .ती लहान मु ले एकमे कांना कशी सां भाळणार?दुखापत झाली तर वास्तपु स्त कोण
करणार?त्यांना न्हाऊमाखू कोण घालणार?

     तिला बहुदा माझ्या चे हेऱ्यावरचे भाव कळले असावे त.ती रडू लागली आणि म्हणाली,"कॉम्रेड,सबं ध
दिवस माझं अं तःकरण मु लांसाठी तळमळत असतं . गे ल्या तीन महिन्यांत मी त्यांना नीट भे टलीच
नाहीये .मी जाते ते व्हा ती जे वनू झोपले ली असतात.आणि ये ते ते व्हा उठले ली नसतात. पण हे ग्रेट
लीप फॉरवर्ड साठी आहे ".आणि तिने अश्रू पु सले .
     जिची लहानगी बाळे प्रेमाला पारखी आहे त.जिच्या माये च्या स्पर्शासाठी आसु सली आहे त,ती
शोकविव्हल माता पार्टी ने तृत्व आणि ग्रेट लीप बद्दल बोलत होती.तिचा चे हरा मी कधीही विसरणार
नाही.चिनी कुटूं बसं स्थे ची परवड कशी झाली आहे याचे तो अश्रू भरले ला चे हरा प्रतीक आहे .

 सं कलन:::;

  ...रमा दत्तात्रय गर्गे.


[23/06, 1:33 am] Rama Garge: माओची गोष्ट : परिशिष्ट २.

               भारत चीन सीमावाद

(सं दर्भ:: पां . वा.गाडगीळ यांचे भाषण.मु बंई आकाशवाणी वरील २जून१९६३चे ध्वनिक्षे पण.प्रसिद्धी विभाग
महाराष्ट् र शासन,मु बंई.)

       सीमा ठरवण्याच्या सर्वसामान्य तत्वांचा विचार केला तर भारत चीन सीमा प्रश्न फार सोपा आहे .

        पं चविसशे मै ल लांब इतकी ही सीमा आहे . या सीमे वर हिमालयाच्या रां गा व हिमालयाची उं च उं च


शिखरे पसरली आहे त.

      पर्वतां च्या लांबच लांब रां गांनी जे दोन दे श विभागले जातात,ते थे पाणलोट विरुद्ध दिशांनी जाणाऱ्या
अत्यु च्च पर्वतराजीवर दोन दे शांची सरहद्द आखण्याची इतिहाससिद्ध रीत आहे .

     १९१४ साली त्यावे ळच्या ब्रिटिश सरकारने तिबे टशी करार करून हिमालयातल्या पूर्व भागात अशी
सीमारे षा आखली.

         त्यावे ळच्या जबाबदार ब्रिटीश अधिकाऱ्याच्या नावावरून ही सीमारे षा "मॅ कमहॉन सीमा" म्हणूच
ओळखली जाते .बाकीची सीमारे षा इतिहासकालीन वहिवाटे ने आखल्यासारखी आहे .

      अशा दुर्गम प्रदे शात दोन्ही राष्ट् रे मित्रभावाने वागणारी असतील तर सीमे बाबत वाद असण्याचे
कारण रहात नाही.

       परं तु चीन सरकारने भारतातील ने फा प्रदे श चीनच्या नकाशात त्यां च्या दे शात दाखवला.१९५८-५९
च्या दरम्यान चीनने काश्मीरच्या इशान्ये कडचा लडाख मधील अक्साई स्वतःचा म्हणून
व्यापला.स्वतःच्या दे शात वृ त्तपत्र व आकाशवाणीवर भारताविरुद्ध जनमत तयार करू लागला.

      भारताच्या तक् रारीनं तर दिल्ली व पे किंग ला प्रतिनिधी बै ठका झाल्या.पण मॅ कमहॉन रे षे ला चीनची
कधीच सं मती नव्हती असे चीनने सां गितले .

        तिबे टशी भारताचा व्यापार खूप जु ना आहे .त्याला आधी चीनने हरकत घे तली नव्हती.पण आता
आमचे च नकाशे खरे असे म्हणून भारतावरच सीमाभं गाचा आरोप चीन करत आहे .
      हा प्रश्न चीन सतत चिघळत ठे वत असतो.

     (माओ ची गोष्ट ही मालिका समाप्त.)

रमा दत्तात्रय गर्गे.

You might also like