You are on page 1of 172

मराठी भाषिक संज्ञापनकौशल्ये -

नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांसाठी


मराठी

B. A. (Marathi)
Second Year
MIL 1

SAVITRIBAI PHULE PUNE UNIVERSITY


School of Open Learning
(Distance Education Program)
लेखक

प्रा. डॉ. वर्षा तोडमल


(varsha.todmal@gmail.com)
मराठी विभाग प्रमुख,
आबासाहेब गरवारे महाविद्यालय,कर्वे रोड,पुणे -०४

प्रा. डॉ. मोरेश्वर नेरकर


(msnerkar@gmail.com)
सहाय्यक प्राध्यापक,मराठी विभाग,झुलाल भिलाजी पाटील महाविद्यालय,धुळे-०५

All rights reserved. No part of this publication which is material protected by this copyright notice may be reproduced
or transmitted or utilized or stored in any form or by any means now known or hereinafter invented, electronic, digital
or mechanical, including photocopying, scanning, recording or by any information storage or retrieval system, without
prior written permission from the Publisher.

Information contained in this book has been published for School of Open Learning, Savitribai Phule
Pune University, Pune by VIKAS Publishing House Pvt. Ltd. and has been obtained by its Authors from
sources believed to be reliable and are correct to the best of their knowledge. However, the Publisher and
its Authors shall in no event be liable for any errors, omissions or damages arising out of this information
and specifically disclaim any implied warranties or merchantability or fitness for any particular use.

Vikas® is the registered trademark of Vikas® Publishing House Pvt. Ltd.


VIKAS® PUBLISHING HOUSE PVT. LTD.

E-28, Sector-8, Noida - 201301 (UP)

Phone: 0120-4078900 • Fax: 0120-4078999

Regd. Office: A-27, 2nd Floor, Mohan Co-operative Industrial Estate, New Delhi 1100 44

• Website: www.vikaspublishing.com • Email: helpline@vikaspublishing.com


मराठी भाषिक संज्ञापनकौशल्ये - नवमाध्यमे
आणि समाजमाध्यमांसाठी मराठी
अभ्यासक्रम

प्रकरण क्र. घटक पृष्ठ क्र.

भाग- १ मराठी भाषिक संज्ञापनकौशल्ये 9

घटक १
१.१ भाषा आणि व्यक्तिमत्त्व विकास : सहसंबंध
१.२. लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि प्रसारमाध्यमे
१)
घटक २ प्रसारमाध्यमांसाठी लेखन
२.१ वृतपत्रांसाठी बातमीलेखन आणि मुद्रितशोधन
२.२. नभोवाणीसाठी भाषणाची संहितालेखन
२.३ दूरचित्रवाणी - माहितीपटासाठी संहितालेखन

87
भाग- २ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांसाठी मराठी

घटक १
१.१. भाषा, जीवनव्यवहार आणि नवमाध्यमे/समाजमाध्यमे
१.२. नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे प्रकार : ब्लॉग, फेसबुक,
ट्विटर
२) १.३ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांविषयी साक्षरता, दक्षता, वापर
आणि परिणाम

घटक २
२.१ वेबसाईट आणि ब्लॉग, ट्विटरसाठी लेखन
२.२. व्यावसायिक पत्रव्यवहार
मराठी भाषिक संज्ञापनकौशल्ये - नवमाध्यमे
आणि समाजमाध्यमांसाठी मराठी
अनुक्रमणिका

घटक १ 9
१.१ भाषा आणि व्यक्तिमत्त्व विकास : सहसंबंध
१.२. लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि प्रसारमाध्यमे
१.१. प्रस्तावना  9
१.२. उद्दिष्टे  10
१.३. भाषेच्या व्याख्या  11
१.४. भाषा आणि व्यक्तिमत्व विकास : सहसंबंध 21
१.५. सारांश  26
१.६. महत्वाचे शब्द  26
१.७. सरावासाठी प्रश्न  27
१.८. अधिक वाचनासाठी पुस्तके 27
१.२. लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि प्रसारमाध्यमे 28
१.२.१ प्रस्तावना  28
१.२.२. उद्दिष्टे 30
१.२.३ लोकशाहीतील जीवनव्यवहार 30
१.२.४. प्रसारमाध्यमे 35
१.२.५. भारतीय राज्यघटना आणि प्रसारमाध्यमे 36
१.२.६. लोकशाहीचा चौथा खांब  37
१.२.७. प्रसारमाध्यमांचे ठळक विशेष 38
१.२.८. प्रसारमाध्यमे आणि संसदीय विशेष अधिकार 38
१.२.९. प्रसारमाध्यमे आणि न्यायालये 39
१.२.१०. प्रसारमाध्यमे व इतर कायदे 39
१.२.११. प्रसारमाध्यमाची तत्त्वे 40
१.२.१२. सारांश  40
१.२.१३. महत्वाचे शब्द 41
१.२.१४. सरावासाठी प्रश्न  41
१.२.१५. अधिक वाचनासाठी पुस्तके 41

घटक २. प्रसारमाध्यमांसाठी लेखन 43


२.१ प्रस्तावना  43
२.२. उद्दिष्टे  44
२.३. वृत्तपत्राचे स्वरूप 44
२.४ बातमीची भाषा 53
२.५. बातमी लेखन करताना पाळावयाची पथ्ये 54
२.६. सारांश 54
२.७. महत्वाचे शब्द 58
२.८. सरावासाठी प्रश्न 58
२.९. अधिक वाचनासाठी पुस्तके 58

२.२. नभोवाणीसाठी भाषणाची संहितालेखन 59


२.२.१. प्रास्तावना  59
२.२.२. उद्दिष्टे  60
२.२.३. भाषण लेखन : स्वरुप व तंत्र  61
२.२.४. आकाशवाणीवरील भाषणाचे स्वरूप  61
२.२.५. भाषण लेखनाचे तंत्र  61
२.२.६. आकाशवाणीवरील भाषण : 62
२.२.७. आकाशवाणीवरील भाषण, चर्चा व मुलाखत : 63
२.२.८. नभोभाषणाची भाषाशैली : 63
२.२.९. नभोभाषणाची सुरुवात आणि शेवट : 64
२.२.१०. नभोभाषणाचे विषय  64
२.२.११. नभोभाषणासाठी सूचना  65
२.२.१२. नमुना भाषण  67
२.२.१३. सारांश  71
२.२.१४. महत्वाचे शब्द 71
२.२.१५. सरावासाठी प्रश्न 71
२.२.१६ अधिक वाचनासाठी पुस्तके 71

२.३ दूरचित्रवाणी - माहितीपटासाठी संहितालेखन 73


२.३.१. प्रस्तावना : 73
२.३.२. उद्दिष्टे  74
२.३.३. संहिता आणि तिची गरज 74
२.३.४. माहितीपटासाठी संहिता लेखन  75
२.३.५. संहितालेखनाचे तंत्र  77
२.३.६. माहितीपट (डॉक्युमेंटरी) म्हणजे काय ?  77
२.३.७. माहितीपटाची निर्मितीची प्रक्रिया  78
२.३.८. माहितीपटासाठी संशोधन  80
२.३.९. माहितीपटाची रचना  80
२.३.१०. माहितीपटाचे निवेदन  81
२.३.११. माहितीपटाचे संहितालेखन  82
२.३.१२. सारांश 84
२.३.१३. महत्वाचे शब्द 85
२.३.१४. सरावासाठी प्रश्न 85
२.३.१५. अधिक वाचनासाठी पुस्तके 85

भाग-२ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांसाठी मराठी 87


१.१. भाषा, जीवनव्यवहार आणि नवमाध्यमे/समाजमाध्यमे 87
१.१.२. उद्दिष्टे  88
१.१.३. समाज, व्यक्ती आणि भाषा : 88
१.१.४. भाषा आणि प्रशासकीय व्यवहार  90
१.१.५. भाषा आणि माध्यमे  91
१.१.६. जीवन व्यवहार आणि नवमाध्यमे 93
१.१.७. नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे (सोशल मीडिया) 98
१.१.८. सारांश  100
१.१.९. महत्वाचे शब्द  100
१.१.१०. सरावासाठी प्रश्न 101
१.१.११. अधिक वाचनासाठी पुस्तके  101

१.२ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे प्रकार – ब्लॉग, फेसबुक, ट्विटर 102


१.२.१ प्रास्ताविक 102
१.२.२ उद्दिष्टे  103
१.२.३ समाजमाध्यमे म्हणजे काय? 104
१.२.४ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे प्रकार  104
१.२.५. ब्लॉग 105
१.२.६. फेसबुक 108
१.२.७. ट्विटर  113
१.१.८. सारांश  118
१.१.९. महत्वाचे शब्द  118
१.१.१०. सरावासाठी प्रश्न 119
१.१.११. अधिक वाचनासाठी पुस्तके  119

१.३ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांविषयी साक्षरता, दक्षता, वापर आणि परिणाम


120
१.३.१ प्रस्तावना  120
१.३.२. उद्दिष्टे 121
१.३.२ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे साक्षरता 121
१.३.३ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्या वापरातील दक्षता 122
१.३.४ समाजमाध्यमांचा वापर 124
१.३.५ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे परिणाम 127
१.३.६ सारांश  129
१.३.७ महत्वाचे शब्द  129
१.३.८ सरावासाठी प्रश्न 129
१.३.९ अधिक वाचनासाठी पुस्तके 129

घटक २ वेबसाईट आणि ब्लॉग, ट्विटरसाठी लेखन 131


२.१.१ प्रस्तावना 131
२.१.२ उदिष्टे  132
२.१.३ वेबसाईट म्हणजे काय? 132
२.१.४ मराठी वेबसाईटची गरज 132
२.१.५ वेबसाईटचे प्रकार 133
२.२.१ ब्लॉग 149
२.२.२ ब्लॉग लेखन म्हणजे काय?/Marathi Blog Writing 149
२.२.३ ब्लॉग कसा तयार करावा? 150
२.२.४ विविध ब्लॉग मध्ये कशा प्रकारे पोस्ट करता येतील  150
२.२.५ काही ब्लॉगची उदहरणे  153
२.२.६ ब्लॉग लेखनाचे फायदे 156
२.२.७. ट्वीटर  156
२.२.८ ट्विटरचा उपयोग  157
२.२.९ रँकिंग्स 158
२.२.१० मायक्रोब्लॉगिंग सेवा (Microblogging service) 159
२.२.११ सारांश  161
२.२.१२ महत्वाचे शब्द  161
२.२.१३ सरावासाठी प्रश्न 161
२.२.१४ अधिक वाचनासाठी पुस्तके  161

२.३. व्यावसायिक पत्रव्यवहार 163


२.२.१. प्रस्तावना  163
२.३.२ उद्दिष्टे 164
२.३.३ पत्रलेखनाचे मुख्य प्रकार 164
२.२.४. पत्रलेखन कसे करावे? 167
२.२.५. सारांश  170
२.२.६. महत्वाचे शब्द  170
२.२.७. सरावासाठी प्रश्न 170
२.२.८. अधिक वाचनासाठी पुस्तके  171
१.१ भाषा आणि व्यक्तिमत्त्व विकास : सहसंबंध
१.२. लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि प्रसारमाध्यमे
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
घटक १ विकास : सहसंबंध

NOTES

१.१ भाषा आणि व्यक्तिमत्त्व विकास : सहसंबंध


१.१. प्रस्तावना
१.२. उद्दिष्टे
१.३. भाषेच्या व्याख्या
१.३.१ भाषिक कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास
१.४. भाषा आणि व्यक्तिमत्त्व विकास : सहसंबंध
१.४.१. 'व्यक्तिमत्त्व' या संज्ञेची व्याख्या
१.४.२. व्यक्तिमत्त्वाचा विकास
१.४.३. व्यक्तिमत्त्वविकासात भाषेचे स्थान
१.५. सारांश
१.६. महत्वाचे शब्द
१.७. सरावासाठी प्रश्न
१.८. अधिक वाचनासाठी पुस्तके

१.१. प्रस्तावना
'बृहदारण्यकोपनिषदा'त जनकाने याज्ञवल्क्य याला विचारले होते: सूर्य अस्ताला
गेल्यावर, अग्नि विझल्यावर माणसाजवळ कोणता प्रकाश असतो? तेव्हा याज्ञवल्क्याने
उत्तर दिले होते: भाषा हा आपला प्रकाश असतो. कारण अंधारात काम करताना आपले हात
दिसत नाहीत, पण आपण ऐकू शकतो आणि त्या दिशेने जाऊ शकतो. हे वाचताना लक्षात
येते की भाषेच्या अंगची प्रकाशमानता हा तिचा महत्त्वाचा गुणधर्म आहे. भाषेद्वारेच
आपल्याला जगाची जाणीव होत असते.
भाषा हीच मुळात व्यक्तीच्या भावजीवनाचे अस्तर असते. साहित्य, समाज अथवा
कला, संगीत ,नाट्य, चित्रपट, रंगभूमी, व्यवहार, बाजारपेठा ,सण-उत्सव काहीही घ्या...
या सर्वच क्षेत्रात भाषेचे स्थान निर्विवाद व्यापक व प्रभावी आहे.
शब्द हे अर्थाचे वाहक होत सहाजिकच ज्ञानप्राप्तीचे साधन शब्दच ठरतात.
विद्यार्थीदशेमध्ये शब्दब्रह्माची उपासना करायची ती त्यासाठीच. भाषेतील प्रकाशाचा
अनुभव उपनिषद आकारांनी जसा वर्णन केला आहे, तसाच संत ज्ञानेश्वरांनी ही तो अनुभव
वेगळ्या प्रकारे वर्णन केला आहे. ते लिहितात:
" जैसे बिंब तरी बचके एवढे ! परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे !
शब्दांची व्याप्ती तेणे पाडे ! अनुभवावी !!"
( ज्ञानेश्वरी : अध्याय ४ ओवी २१५ ) Self-Instructional
Material 9
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
विकास : सहसंबंध या ओवीतील दृष्टांतातून ज्ञानेश्वरांनी भाषेतील प्रकाश तत्वाचे सूचन केले आहे. भाषेचे,
शब्दांचे सामर्थ्य स्पष्ट केले आहे. शब्दांमध्ये अपार अर्थवत्ता ठासून भरलेली असते. तेव्हा
NOTES सध्याच्या स्थित्यंतरातून जाताना भाषेच्या अंगचा अमीट प्रकाश आपल्याला दिशा देईल.
शब्द सामर्थ्याचे मोजमाप जरी अशक्यप्राय असले तरी शब्दांच्या अंतरंगात शिरकाव
करून घेण्याची युक्ती हस्तगत झाली, तर ज्ञानाच्या महालाची कवाडे सताड उघडी होतात.
असा ज्ञानदेवांचा निर्वाळा आहे.
मक्याच्या कणसांची सालं काढल्याखेरीज आतील दाण्यांचे दर्शन होत नसते. तशीच
ही शब्दार्थाला भिडण्याची प्रक्रिया. लौकिक काय अथवा पारलौकिक काय, ज्ञान
संपादनाच्या प्रांतात शब्दांचे आणि पर्यायाने भाषेचे पायाशुद्ध ज्ञान अनिवार्य ठरते ते यासाठी.
आमच्या भाषांना खरंतर हजारो वर्षांची समृद्ध वांग्मयीन परंपरा आहे. हा मोठाच
सांस्कृतिक वारसा आहे. पण आपला भाषाविषयक दृष्टिकोन भाषांच्या विकासाला पूरक
असायला हवा. शिक्षणतज्ज्ञ वा. ब. पटवर्धन यांनी म्हटले आहे की, आपल्या भाषा या
आपल्या पूर्वजांच्या आत्म्याचे नि:श्वास आहेत.
एकंदरीत ,प्रत्येक भारतीय व्यक्तीने आपली भाषा ही आपली चौथी मुलभूत गरज आहे
अशा विचारातून वागायला सुरुवात केली पाहिजे. भाषा आणि साहित्य यांची पालखी
समर्थपणे पुढे नेणारे भोई तयार होणे गरजेचे आहे.
भाषेद्वारे माणसाच्या भावभावना व्यक्त होत असतात. मनातील विचार एकमेकांना
सांगता येतात. म्हणून समाजातील व्यवहार भाषेशिवाय होऊ शकत नाही. आज काळ
बदलला आहे. भाषेमध्ये खूप बदल झालेलाही आपल्या लक्षात येतो आजचे जागतिकीकरण,
उदारीकरण, खाजगीकरण ह्या गोष्टीचा भाषेवरही परिणाम झालेला आहे. म्हणून आजच्या
या २१ व्या शतकामध्ये मानवी समाजाकडे पाहिल्यानंतर माणूस भाषेशिवाय राहू शकत नाही
हे तेवढेच सत्य आहे.

१.२. उद्दिष्टे
१. प्रगत भाषिक कौशल्यांची क्षमता विकसित करणे.

२. प्रसारमाध्यमांतील संज्ञापनातील स्वरूप आणि स्थान स्पष्ट करणे.

३. व्यक्तिमत्त्व विकास आणि भाषा यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करणे.

४. लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि प्रसारमाध्यमे यांचे परस्परसंबंध स्पष्ट करणे.

५. प्रसारमाध्यमांसाठी लेखनक्षमता विकसित करणे.

भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. व्यक्ती आणि समूह या मध्ये भाषा ही दुवा
म्हणून ओळखली जाते. संदेश प्रक्रिया ही विकसित करण्यासाठी भाषेची गरज आहे. भाषा
Self-Instructional विज्ञानाच्या अभ्यासकांनी भाषेच्या काही व्याख्या केल्या आहेत. त्या आपल्याला पुढील
Material 10 प्रमाणे सांगता येतात :
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
१.३. भाषेच्या व्याख्या विकास : सहसंबंध

NOTES
१. डॉ. ना. गो. कालेलकर
मूळ आशयाशी कार्यकारण संबंध नसलेल्या ध्वनी संकेतांनी बनवलेली, समाज
व्यवहाराला साहाय्यभूत अशी ‘भाषा’ ही एक पद्धती आहे.

२. एडवर्ड सपिर
कल्पना, भावना, इच्छा दुसऱ्याला सांगण्याचे व स्वतःच्या इच्छेवर असणारे मानवी
साधन म्हणजे भाषा.

३. नॉम चॉमस्की
अगदी मोजके नियम वापरून अगणित वाक्य तयार करणारी व्यवस्था म्हणजे भाषा.

४. सोस्यूर
भाषा ही एक चिन्हव्यवस्था आहे. ती कोणत्याही कारणपरंपरेने तयार झालेली नाही. ती
एक सर्वाधिक महत्त्वाची समाजाच्या धारणेसाठी आवश्यक असणारी सामाजिक व्यवस्था
आहे.

५. हॉकेट
भाषा ही परंपरेने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते. भाषेच्या वापराचे
रितीरिवाज समाजाकडून व्यक्तीला मिळतात. भाषेचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे दुसऱ्याला
काही देणे, आपले विचार ऐकविणे यासाठी होतो. म्हणून भाषा ही एक संप्रेषण व्यवस्था
आहे आणि ती अधिक गुंतागुंतीची व सक्षम आहे.

६. कृ. पां. कुलकर्णी


भाषा म्हणजे व्यवहारास प्रवृत्त करणाऱ्या सार्थ व अन्वित ध्वनींचा समूह होय.

७. श्री. न. गजेंद्रगडकर
यादृच्छिक ध्वनी संकेत यावर आधारलेली आणि समाज व्यवहाराला साहाय्यभूत अशी
पद्धती म्हणजे भाषा होय.

८. गं. ब. ग्रामोपाध्ये
भाषा म्हणजे साध्या व विपक्षितार्थरहित अशा नादलहरीपासून संपूर्ण व अर्थपूर्ण अशा
वाक्यरचनेपर्यंत चढत जाणाऱ्या आकृतिबंधाच्या श्रेणी व त्या सर्वांची मिळून झालेली
एकजीव संघटना होय.

९. प्र. न. जोशी
मनातील विचार आणि कल्पना व्यक्त करण्यासाठी मुखावाटे निघालेल्या ध्वनीचा सार्थ Self-Instructional
समूह म्हणजे भाषा. Material 11
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
विकास : सहसंबंध १०. भाषा म्हणजे केवळ शब्द नसून मनातील भाव समोरच्यापर्यंत पोहचविण्याचे
माध्यम म्हणजे 'भाषा' होय .
NOTES
११. ध्वनी व अर्थ यांची सांगड घालणारी चिन्हांकित व्यवस्था म्हणजे भाषा होय.
प्रस्तुत व्याख्यांमधून भाषेच्या स्वरूपाविषयी माहिती मिळते. आपल्या मनातील आशय,
विचार, भावना व्यक्त करणारे व परस्परांशी संवाद साधणारे ते एक प्रभावी माध्यम आहे.
म्हणून भाषेद्वारे भाषिक कौशल्याचाही विचार आपण करणे गरजेचे आहे, त्यासाठी आपण
भाषिक कौशल्याचा परिचय थोडक्यात करुन घेणार आहोत.

१. भाषिक कौशल्याचा वापर स्वरूप मानवाला कोणत्याही विषयांचा अभ्यास


करण्यासाठी करावा लागतो. हा अभ्यास करण्यासाठी भाषेचे ज्ञान अवगत करणे गरजेचे
असते, कारण भाषा हे विचार-विनिमयाचे साधन आहे. कसब, कारागिरी, खुबी, चातुर्य,
तरबेजपणा, नैपुण्य, पारंगतता, हातोटी यालाच ‘कौशल्य’ असे म्हणतात.
तसेच थोडक्यात, कोणत्याही शास्त्राचे, कलेचे किंवा हस्तकलेचे सादरीकरण व
व्यावहारिक जीवनात उपयोजन करण्याची क्षमता म्हणजे कौशल्य होय. आपले अनुभव,
विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आपण भाषेचा वापर करत असतो. भाषा आणि
समाज एकमेकांशी जोडले गेलेले असतात. समाजाशी संवाद साधत असताना भाषिक
कौशल्याचा वापर केल्यास तो प्रभावी ठरतो. भाषा हे मानवाला घडविण्याचे काम करत
असते. नवनवीन विचार भाषेद्वारे आत्मसात केले जातात . भाषा ही एक सामाजिक संस्था
आहे. स्वतःचे विचार , भावना दुसऱ्याला कळविण्यासाठी भाषा महत्त्वाचे कार्य करत
असते. म्हणूनच भाषा है कौटुंबिक व सामाजिक व्यवहाराचे साधन आहे. आपणाला श्रवण,
वाचन, लेखन, संभाषण, भाषण ही कौशल्ये आत्मसात करण्यासाठी भाषा महत्त्वाची
भूमिका बजावत असते.

भाषिक कौशल्ये :
व्यक्तिमत्त्व विकासासाठी भाषिक कौशल्ये अवगत करणे गरजेचे असते. व्यक्तिमत्त्व
विकास आणि भाषिक कौशल्ये यांचा परस्परसंबंध आहे. या कौशल्याने व्यक्तिमत्त्वाची
योग्य अशी जडण - घडण होते. भाषिक कौशल्याच्या मदतीने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व
विकासात विशेष भर पडते. भाषिक कौशल्यात श्रवण, वाचन, लेखन, संभाषण, भाषण ही
प्राथमिक कौशल्ये आहेत. त्यांचा आपण येथे विचार करणार आहोत. ' आपल्याला काय
येते' , यापेक्षा काय येत नाही; हे ज्याला ठाऊक तो खरा ज्ञानी!' असे एका विचारवंताने
म्हटले आहे. ज्ञान हे माणसाला घडविते, पंख देते आणि ज्ञानभरारी घेण्यास प्रवृत्त करते;
म्हणून ज्ञान अवगत करण्यासाठी काही कौशल्यांची गरज असते. पूर्वापार वाचन, लेखन व
आकडेमोड ही तीन कौशल्ये सांगण्यात आलेली आहेत. या घटकांच्या अंतरंगात आपण
डोकावलो की, आपला या कौशल्याच्या बाबतीत विकास होत जातो. भाषिक कौशल्ये ही
नुसती शिकण्यासाठीच उपयोगी पडतात असे नाही तर हीच जीवन व्यवहाराची सुद्धा
कौशल्ये ठरतात. ज्ञान आणि जीवन यांची एकत्रित गुंफण करण्यासाठी त्यांचा आपणाला
Self-Instructional नक्कीच उपयोग होतो. आपण जेव्हा श्रवण करत असतो, तेव्हा त्या गोष्टीत एकरूप होणे
Material 12 महत्त्वाचे असते. बोलताना मनातले विचार स्पष्ट व प्रामाणिकपणे इतरांना सांगणे महत्त्वाचे
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
ठरते. लेखन करताना त्यातील आशय वाचकांपर्यंत पोहोचला पाहिजे, याचे भान ठेवायला विकास : सहसंबंध
हवे. याच पद्धतीने इतर कौशल्यांची तंत्रे आत्मसात करावी लागतात.
NOTES
भाषिक कौशल्ये

वाचन कौशल्य लेखन कौशल्य श्रवण कौशल्य

१.३.१ भाषिक कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्व विकास


व्यक्तिमत्त्व उठून दिसण्यासाठी भाषेवर प्रभुत्व असले पाहिजे. माणसामध्ये नेहमी
कोणते ना कोणते कौशल्य असते, परंतु तो ते पाहत नाही. व्यक्तीमध्ये कौशल्ये उपजत जरी
नसली तरी तो ती कौशल्ये साध्य करू शकतो. म्हणून श्रवण, वाचन, संभाषण, लेखन
आणि भाषण ही भाषेची प्राथमिक कौशल्ये म्हणून ओळखली जातात. ह्या कौशल्यांचा
विकास आणि व्यक्तिमत्त्वाचा विकास यांचा परस्परसंबंध आहे. ह्या कौशल्यांच्या विकासाने
व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण होण्यास मदत होते. भाषेच्या विकासासाठी या प्राथमिक
कौशल्यांचा विकास होणे आणि तिचे उपयोजन होणे गरजेचे असते. शालेय, महाविद्यालयीन
जीवनातच या भाषिक कौशल्यांच्या वापराने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मदत
होऊ शकते.
१. श्रवणकौशल्य
श्रवण हे भाषिक कौशल्यांमधील पायाभूत कौशल्य आहे. अर्थात, पायाभूत कौशल्य
जेवढे अधिक चांगले तेवढी त्यावर आधारलेली इतर कौशल्ये प्रभावी ठरतील. बोलता न
येणारे लहान मूल श्रवणातूनच भाषेतील शब्द, शब्दसमूह, वाक्याची रचना ओळखते व नंतर
आत्मसात करून वापरू लागते. हा अनुभव भाषाविकासातील श्रवण कौशल्याचे महत्त्व
स्पष्ट करतो.
प्रभावी श्रवणकौशल्य स्वत:कडे असणे म्हणजेच समाजात वावताना लागणाऱ्या
विचारांच्या आदान-प्रदानाचे एक महत्त्वाचे साधन स्वत:कडे असणे. श्रवणकौशल्यात
आकलन व अर्थीकरण या दोन्ही क्रियांना स्थान दिले आहे. म्हणजेच श्रवण ही निष्क्रियपणे
घडणारी क्रिया नसून ती आपल्या सक्रिय सहभागाने घडणारी क्रिया आहे, हे लक्षात घेतले
पाहिजे.
बहिरेपण नसलेल्या व्यक्तीपैकी प्रत्येक जण श्रवण करू शकतो, असे असले तरी
फारच थोड्या व्यक्तींकडून दर्जेदार श्रवण घडते. संशोधनाने असे सिद्ध झालेले आहे की,
बऱ्याच व्यक्तींमध्ये श्रवणक्षमता अल्प प्रमाणात व निकृष्ट प्रतीची असते; यातून एक गोष्ट
लक्षात येते की, श्रवणक्षमता निसर्गदत्त नाही. आपल्याला ऐकू येते म्हणजेच श्रवणही करता
येते असे नाही. श्रवणकौशल्ये शिकलो तर मात्र आपण फलदायी श्रवण निश्चितच करू
शकू.
श्रवण हे कौशल्य आहे. तो शरीराचा अवयव किंवा ती जन्मजात सवय नाही. चांगले Self-Instructional
श्रवण करता यावे, अशी इच्छा बाळगणाऱ्यांना सतत प्रयत्न केला तर श्रवण कौशल्ये Material 13
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
विकास : सहसंबंध आत्मसात करणे शक्य आहे. अभ्यासक्रम घेऊन, पुस्तके वाचून व तंत्रे शिकून श्रवणकौशल्ये
आपोआप वाढतील असे नाही. श्रवणासंबंधी मिळविलेले ज्ञान, श्रवण करण्यासाठी
NOTES मिळणाऱ्या प्रत्येक संधीत वापरण्याचा अनुभव घेतला तरच श्रवणकौशल्ये वाढतील.
बोलणाऱ्याला तीच गोष्ट पुन्हा सांगण्याची वेळ जो येऊ देत नाही, त्याचे श्रवण कौशल्य
निश्चितच चांगल्या प्रतीचे आहे असे समजावे. कारण, बोलणाऱ्याचा वेळ व शक्ती त्यामुळे
वाचविली जाते. दुसरे असे की, बोलणे जर भावनेने (राग, संताप, निराशा, दुःख, आनंद,
इ.) ओथंबलेले असेल तर बोलणाऱ्यांकडून त्याची पुनरावृत्ती जशीच्या तशी होऊ शकत
नाही; म्हणून श्रवण करणाऱ्याने मिळणारी ही संधी पहिली व शेवटची संधी आहे याचे भान
ठेवून श्रवण करणे महत्त्वाचे आहे.
श्रवण प्रक्रियेत येणारे मुद्दे
दोन व्यक्तींमध्ये काही कारणाने ध्वनींचे वहन योग्य प्रकारे होत नसेल, तर श्रवणक्रियेत
अडथळा येतो.

• वक्ता जर फार भरभर किंवा फार सावकाश बोलत असेल, तर श्रवणात अडथळा
येतो.

• वक्त्याच्या उच्चारांत दोष असेल तर श्रोत्यांचे श्रवण परिणामकारक होऊ शकत नाही.

• श्रोत्याने वक्त्याचा विषय स्वत:ला न आवडणारा असल्याचा ग्रह करून घेतला तर


श्रवणक्रिया नीट होऊ शकत नाही.

• फारच क्षुल्लक कारणांनी अवधान विचलित होऊ देण्याची खोड श्रवणाला मारक
ठरते. सभागृहात ये-जा करणे, कुजबुज करणे इ. मुळे वक्त्याकडे दुर्लक्ष होते.
त्यामुळे श्रवण परिणामकारक होत नाही.

• श्रोता कधी कधी वक्त्याच्या बोलण्याचे-विचारांचे मूल्यमापन न करता वक्त्याचेच


मूल्यमापन करण्यात मग्न होतो. त्यामुळे श्रवण घडत नाही.

• काहीवेळा जाणीवपूर्वक श्रवण करीत असल्याचा फक्त देखावा करतात. नजर


वक्त्याकडे असते. चेहऱ्यावर औत्सुक्य असते. परंतु मन वक्त्याच्या विचारांशी
फटकून वेगळ्याच विचारात गढलेले असते.
श्रवणकौशल्य सुधारण्याचे उपाय
• अवधान केंद्रित करणे.

• प्रकटीकरणाच्या शैलीपेक्षा विषयाकडे लक्ष देणे.


Self-Instructional
Material 14 • नावडत्या विषयात रस घ्यायला शिकणे.
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
• वक्त्याचे मूल्यमापन न करता विषयाचे मूल्यमापन करणे. विकास : सहसंबंध

• भावनांच्या आहारी न जाता श्रवण करणे. NOTES

• टीपण करण्यासाठी योग्य पद्धत वापरणे.

• सर्व शक्ती एकवटून श्रवण करणे.

• श्रवणात येणाऱ्या प्रक्षोभक शब्दांवर विजय मिळविणे.


श्रवणाचे फायदे
• ध्येय समजून घेणे व ध्येयांची पूर्तता करणे.

• व्यक्तिमत्त्वविकास साधणे.

• कौटुंबिक संवादातून कुटुंबाला एकत्र ठेवणे.

• समाजात परस्परसंबंध टिकवणे.

• अध्ययन करणे.
२. संभाषणकौशल्य व भाषणकौशल्य
संपर्क साधण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात आपण बोलण्याच्या क्रियेचा वापर करतो.
संभाषणाचे किंवा बोलण्याचे कौशल्य आपल्याला अवगत असेल तर आपले हेतू साध्य
व्हायला त्यांची मदत होते. आपण बोलतो तेव्हा हेतुपूर्वक तर बोलतोच, परंतु ते बोलणे
विचारपूर्वकही करतो. विचारपूर्वक बोलण्यामागे आपली अनुभवाने, सरावाने संपादन
केलेली कौशल्ये असतात. चांगल्या बोलण्याच्या कौशल्यामुळे आपण यशस्वी होतो.
वक्तृत्व व संभाषण या मानवी जीवनातील महत्त्वाच्या कला आहेत. या स्पर्धात्मक
जगामध्ये परिश्रम जेवढे आवश्यक, तेवढेच तुमचे चांगले बोलण्याचे कौशल्यही आवश्यक
ठरते. एखाद्याकडे आकर्षक व्यक्तिमत्त्व नसेल तर त्याची उणीव रसाळ वाणीने, मुद्देसूद व
आकर्षक भाषण/संभाषण शैलीने भरून काढता येईल. तुमचे व्यक्तिमत्त्व आकर्षक असेल,
परंतु वाणी नीरस व भाषणशैली निष्प्रभ असेल, तर तुम्हाला फारसे यश मिळणार नाही.

I. संभाषण / भाषण दोन्हींमध्येही बोलणे परिणामकारक


बोलणे हे एखाद्या दुसऱ्या व्यक्तिसमोर चालले असेल, तर त्याचे स्वरूप अनौपचारिक
व व्यक्तिगत असते. या स्वरूपाच्या बोलण्याला ‘संभाषण’ म्हणतात. असे बोलणे प्रसंगोपात्त
व उत्स्फूर्त असते. त्याला वेळेचे फारसे बंधन नसते. अशा संभाषणात आपली भूमिका
वक्ता-श्रोता अशी दोन्ही असते. अशा बोलण्याला विषयाचे फारसे बंधन नसते. ज्याकरिता Self-Instructional
बोलायचे तो हेतू जेणेकरून साध्य होईल अशा प्रकारच्या परिणामकारक बोलण्याच्या Material 15
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
विकास : सहसंबंध शैलीला उत्तम संभाषण म्हणता येईल.
बोलणे जर व्यक्तींच्या छोट्या-मोठ्या समूहांसमोर असेल, तर त्याचे स्वरूप
NOTES अनौपचारिक राहत नाही. त्याचा विषय, कालावधी, वेळ निश्चित असतो. अशा औपचारिक
बोलण्याला ‘वक्तृत्व’ असे म्हणतात. वक्तृत्वाचा हेतू समाजप्रबोधन हा असतो. आपले
विचार जोरदारपणे, स्पष्टपणे व योग्य शब्दांच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीच्या मनावर
ठसविणे यासाठी वक्तृत्वाची गरज असते.

II. बोलण्याच्या कौशल्यात भाषेचे स्थान


कमीतकमी दोन तरी व्यक्तींना एकत्र आणणे, हाच मुळी भाषेचा मूलभूत हेतू आहे.
भाषा केवळ क्षणिक गरजा भागविण्यासाठीच उपयोगी आहे असे नाही. भाषा अधिक
अर्थवाहक, आशयपूर्ण आणि कार्यक्षम बनविता येते. भाषेतील विविध शब्दांचे उच्चार-
ज्ञान, त्यातील शब्दांच्या विविध संदर्भातील अर्थच्छटा, भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणारे
अलंकार, सुभाषिते, म्हणी यांचे ज्ञान वक्त्याजवळ असेल तर संभाषण व वक्तृत्व ओघवते
व रसाळ होईल.

III. भाषण कौशल्यासाठी काय हवे ?

• आधी उत्तम वाचक बनले पाहिजे.

• स्मरणशक्ती व आत्मविश्वास हे वक्त्याचे दोन पंख आहेत.

• जे सांगायचे ते सुसूत्रपणे सांगता आले पाहिजे.

• सभाधारिष्ट् हवे.

• काही तरी सांगण्यासारखे स्वत:जवळ असायला हवे.

• जसे जीवन, जशी साधना तसे वक्तृत्व घडते. शास्त्र, तंत्र व मंत्र नेपथ्यासारखे त्याच्या
मदतीसाठी उभे राहते.

• वक्तृत्व अंत:करणापासून यावे लागते.

• वक्तृत्वात विचार महत्त्वाचा असतो.

• वैचारिक बैठक पक्की हवी. तिचा विकास व प्रवास हा वाचन, चिंतन, अनुभव किंवा
अनुभूती यावर अवलंबून असतो.
३. वाचन कौशल्य
Self-Instructional वाचन म्हणजे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा....खरंतर वाचन हे परीक्षेसाठी नसते.
Material 16 अक्षर समजणे व ते वाचता येणे  हा कौशल्याचा एक भाग आहे. पण वाचलेल्या गोष्टीमुळे
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
ज्ञान मिळणे ,त्यामुळे विचार प्रवृत्त होणे, चिंतनशीलतेकडे झुकणे इत्यादी गोष्टी जेव्हा विकास : सहसंबंध
घडतात तेव्हा वाचन प्रक्रिया पूर्णत्वाला पोहोचते व हेच वाचक समाजात वैचारिक चळवळ
घडवू शकतात. असे वाचक स्वतः वाचलेले आणि त्यानंतर काही सुचलेले विचार NOTES
समाजापुढे वैशिष्ट्यपूर्ण शैलीत मांडतात. त्यातूनच पुढे सामाजिक उत्थानाची प्रक्रिया सुरू
होते. आशयसंपन्न पुस्तकांनी वाचक घडतो, तसेच या घडलेल्या वाचकांकडून दुसरी
आशयसंपन्न साहित्यनिर्मिती देखील होते म्हणजे या क्रिया परस्परपूरक आहेत.
भाषेच्या एका अंगाचा वाचनाचा प्रधान हेतू हा देवाण-घेवाण हाच राहणार आहे.
वाचकांकडून लेखकाच्या लिपिबद्ध संदेशाला मिळणारे वेगवेगळे प्रतिसाद   एकापुढे एक
मांडत गेलो. वाचन प्रक्रियेच्या प्रमुख पायऱ्या म्हणजे अक्षरे, शब्द, वाक्य, त्याचा उच्चार,
त्याचे आकलन, अर्थात अर्थ समजून घेणे व त्यावर स्वतःच्या बुद्धीनुसार क्रिया प्रतिक्रिया
व्यक्त करणे व जे काही त्यातून बोध होईल त्यानुसार वर्तनात बदल करणे.
विद्यार्थ्यांची स्वतःची विचारशक्ती व शिक्षकाने त्याची जागृत केलेली चिकित्सक वृत्ती
या दोहोंचा योग्य संगम घडला की वाचक घडण्याची प्रक्रिया योग्य दिशेने सुरू होते. 'सुजाण
वाचकत्व' ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे .वाचन हे एका रात्रीत जन्माला येणारी
गोष्टच नाही.त्यासाठी अनुभव व प्रयत्न या दोहोंची सांगड घालावी लागते.
वाचनावर काहीसे प्रभुत्व आल्यानंतर लिखित शब्द आणि अर्थ या दोन्हींच्या मधल्या 
दुव्याच, उच्चारित शब्दांचे प्रयोजन संपून जाते आणि प्रवास भरभर होऊ लागतो. लिखित
शब्द समोर दिसता क्षणी  संलग्न अर्थ आपल्या मनात उमटतो. प्रथम शब्द भरभर वाचता
येतात. मग सोप्या वाक्यातल्या शब्दांचे अर्थ जुळवता येतात. त्यानंतर गुंतागुंतीची वाक्य ,
समग्र परिच्छेदाचे अकलन, लेखाच आकलन, एकूण पुस्तकाचे आकलन, अशी क्रमाक्रमाने
व्याप्ती वाढत जाते.
क्षमतापूर्ण वाचनासाठी वेगवेगळ्या वेगाने वाचण्याचा सराव केला पाहिजे. कारण
गणिताचे सूत्र, कायदेविषयक लिखाण काळजीपूर्वक वाचावे लागते तर मनोरंजनात्मक
कथा, कादंबरी झटकन वाचता येते .वाचन कौशल्याचे शास्त्रीय ज्ञान प्राप्त करण्यासाठी,
पुस्तक चाळून त्यातील सर्वसाधारण कल्पना समजून घेऊन त्यासंदर्भात पडलेल्या प्रश्नांची
नोंद करणे गरजेचे असते  व नंतर प्रश्नांची उत्तरे मिळाली की आशयाची पुनरावृत्ती करून
ग्रहण क्षमता वाढवणे शक्य असते साहित्य वाचन प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा घटक
गुणवत्तापूर्ण वाचन महत्त्वाचे असते. वाचकाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य, त्याच्या
आवडीचे विषय, त्याची बुद्धिमत्ता व संवेदनशीलता, त्याचे अनुभव समजून घेण्याची
प्रगल्भता, पुरेशी एकाग्रता, त्याचा भावनिक विकास, वाचनासाठी वेळ मिळेल तेव्हा तत्पर
असणे. विषयाचे आणि भाषेचे पूर्वज्ञान आणि वाचण्यामागचे मागचे उद्दिष्ट किंवा हेतू.
लेखक आपल्या कल्पनेच्या जोरावर प्रतिसृष्टी निर्माण करत असतो, विचारांचे नवीन
नवीन अनुबंध मांडत असतो, आपल्या वाचन कौशल्याच्या जोरावर ती प्रतिसृष्टी
कल्पनाविश्व पुन्हा निर्माण करत असतो. विचारांचे अनुबंध उलगडत असतो. म्हणून वाचन
ही एक सर्जनशील कला आहे. ग्रंथ आपले मित्र आहेत की शत्रू.... हे विशिष्ट ग्रंथ कसे
,कोणत्या हेतूने लिहिले आहेत यावर अवलंबून आहे. चिरंतन मूल्यांचा वारसा जपणारे
दर्जेदार अभिजात साहित्य कोणते आणि पोकळ विचारांचे सवंग उथळ, साहित्य कोणते
त्याची पारख करण्याची जबाबदारी वाचन प्रक्रियेत घडत असते. अशी पारख करता
येण्यासाठीच वस्तुनिष्ठ, तर्काधिष्ठित ,शास्त्रीय विचारसरणीची गरज असते .म्हणूनच Self-Instructional
चिकित्सा प्रधान वाचन हे उच्च पातळीचे वाचन कौशल्य अवगत करणे महत्त्वाचे. Material 17
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
विकास : सहसंबंध साहित्य वाचनात अगणित व्यक्तिगत फायदे व सामाजिक फायदे दडलेले असतात.
वाचनाची सवय होणे यासाठी सातत्याने प्रयत्न करावे लागतात. सवय लागल्यानंतर  अधिक
NOTES आशयपूर्णपूर्ण, अर्थपूर्ण वाचनाकडे वळता येते.
चिकित्सक विचार करण्याची पात्रता येण्यासाठी एकूण साहित्यिक वाचन दांडगे असावे
लागते. उघड्या डोळ्यांनी जगाचा अनुभव घेण्याची संवेदनशीलता असावी लागते. व्यापक
दृष्टिकोन ,अनुभव आणि चिंतनशील वृत्ती यांचा विकास होण्यासाठी साहित्य वाचनाची
प्रक्रिया आणि आवश्यकता समजून घेणे महत्त्वाचे ठरते.
वाचन हे एक महत्त्वाचे अभ्यास कौशल्य आहे. वाचन म्हणजे छापलेल्या मजकुराचा
अर्थ लावणे अशी आपली एक कल्पना आहे. वाचनाची क्रिया दिसते तितकी साधी नसते.
वाचन प्रक्रिया गुंतागुंतीची असते. आपण वाचतो तेव्हा आपणाला अक्षराच्या आकारावरून
अक्षरे कळतात. अक्षरावरून शब्दबोध होतो. शब्दाचा अर्थ लावताना आपले पूर्वज्ञान,
आपल्या कल्पना आणि हेतू यांच्या साहाय्याने मजकुराचे आकलन होते. मजकुराच्या
आकलनाबरोबर महत्त्वाच्या मुद्द्यांची गुंफण होऊन विचारसूत्र तयार होते. ह्या विचारसूत्रांच्या
साहाय्याने मजकुराचा एकेक भाग क्रमाक्रमाने ग्रहण केला जातो. आपली बौद्धिक पात्रता,
मानसिक घडण, शारीरिक क्षमता, आजूबाजूचे वातावरण ह्यांचा आपल्या वाचनक्षमतेवर
कमी- अधिक प्रमाणात प्रभाव पडत असतो. वाचन ही काही निसर्गदत्त देणगी नसून ते एक
कौशल्य आहे आणि म्हणूनच ते अभ्यासाने प्रयत्न करून आत्मसात करता येते

वाचनप्रक्रियेतील घटक :-
शब्दबोध वाचनदिशा पुनर्दृष्टिक्षेप

वाचनप्रक्रियेतील घटक
दृष्टीचा आवाका आकलन

शब्दोच्चारण आस्वादन शब्दसंग्रह

रसग्रहण पातळी

बोधण पातळी तर्क


आकलन पातळी

मूल्यमापन पातळी

Self-Instructional
Material 18
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
वाचनाचे फायदे विकास : सहसंबंध
• बहुश्रुतता वाढते.
• जिज्ञासापूर्ती होते. NOTES
• भाषाकोश समृद्ध होतो.
• शब्दांचे विविध प्रकारचे उपयोग समजतात.
• कल्पनाशक्तीचा विकास होतो.
• संस्कृती आणि परंपरेची ओळख होते.
४. लेखन कौशल्ये
आपल्या मनातील विचार इतरांना सहज समजतील अशा त-हेने योग्य शब्दात लिहिणे
म्हणजे ‘लेखनकौशल्य’ होय. लेखनप्रक्रिया घडविण्यासाठी प्रथम माहितीचे ग्रहण,
आकलन व्हावे लागते. आकलनासाठी पुन:पुन्हा वाचन, श्रवण व चिंतन व्हावे लागते.
मनात निश्चित हेतू ठेवून, आत्मविश्वासाने, संदर्भ पुरेसे तयार झाल्यावर व भाषिक तयारी
असल्यास लेखन होते.

लेखनाचे महत्त्व
• माहिती सुसूत्रपणे स्मरणात ठेवण्यासाठी
• पुनरावलोकनासाठी
• माहिती दीर्घकाळ जतन करण्यासाठी
• प्रसारित करण्यासाठी
• वेळ वाचविण्यासाठी
• व्यवहार सुकर, नेटका व व्यक्तिगत जवळीकीचा वाटण्यासाठी
• आत्माविष्कार व स्वयंमूल्यमापनासाठी

लेखनातील अडचणी
• मानसिक तयारी नसणे.
• आत्मविश्वास नसणे.
• न्यूनगंड वाटणे.
• लिहिण्यायोग्य विषय स्वत:जवळ नसणे.
• लिहिण्याची गरज वाटत नसणे.
• पूर्वतयारी केलेली नसणे.
• तंत्रपद्धती माहिती नसणे.
• पुरेसा वेळ नसणे.
• फार मोठे कष्ट वाटणे.
• परिश्रम करण्याची तयारी नसणे.
• दृष्टीदोष,श्रवणदोष असणे.
• योग्य वातावरण,पुरेसे लेखनसाहित्य, जागा नसणे.

लेखन अडचणी सोडविण्याचे उपाय Self-Instructional


• मनोबल वाढविणे सकारात्मक भूमिका ठेवणे. Material 19
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
विकास : सहसंबंध • लिहिण्याचा हेतू नक्की करून पुरेशी संदर्भसामग्री जमा करणे.
• पुरेसा वेळ देण्याची व परिश्रम करण्याची तयारी ठेवणे.
NOTES • लिहिण्याचे तंत्र समजून घेणे.
• लेखनाचे लक्ष्य निश्चित करून आराखडा तयार करणे.

लेखनासाठी प्राथमिक कौशल्ये


चांगले हस्ताक्षर, अचूक व शुद्धलेखन, विरामचिन्हांचा उपयोग आणि गतिलेखन अशी
प्राथमिक कौशल्ये आपली लेखनक्षमता वाढविण्यास साहाय्यकारी होतात. योग्य शब्दांचा
वापर, लेखनशैली हेही लेखन कौशल्याचे मूलभूत घटक आहेत. हे आत्मसात करणे कठीण
नाही.

१. लेखनाला गती येण्यासाठी पुढील उपाय


• जे लेखन पाहून लिहावयाचे आहे, ते लिहिण्यापूर्वी एकदा वाचून काढणे.
• स्वत: विचार करून लिहावयाचे तर गती मंदावते; पण विषयाची पूर्ण तयारी असेल,
आराखडा तयार असेल, वेळेचे बंधन असेल तर लेखनाला गती येते.
• ऐकत असताना लिहिण्याचा सराव करणे.

२. डोळ्यांना सहज दिसेल असे स्पष्ट, सुटे, मोकळे, सुवाच्य लिहिणे म्हणजे
सुलेखन होय.
• वाचता येईल असे सुवाच्य मोठे अक्षर असावे.
• सुटे, सरळ, एकसारखे अक्षर असावे.
• नवीन माहितीची भर घालण्यासाठी पुरेशी जागा हवी.
• आवश्यक तेथे अधोरेखा, अंक, चौकटी, रंगीत पेन यांचा वापर करावा.
• शब्दांत, वाक्यांत, परिच्छेदात पुरेसे अंतर हवे.
• सर्व बाजूंनी पुरेसा समास असावा.

३. लेखनाची महत्त्वाची अंगे


लेखनाचा प्रकार, हेतू कोणताही असो; त्याची मुख्य अंगे पुढीलप्रमाणे सांगता येतील.
• बाह्यरचना - परिच्छेद, शीर्षके, उपशीर्षके, वाक्यरचना,शुद्धलेखन
• आशय - लेखनात व्यक्त झालेले विचार, भावना
• सुसंबद्धता - विचारांची सुसंगत, तर्कशुद्ध व परिणामकारक मांडणी
• अभिव्यक्ती/आविष्कार - विचार व्यक्त करण्याची शैली, भाषा व वाचकांशी सवाद

४. परिणामकारक लेखनासाठी पाळावयाची पथ्ये


• मुद्द्यांची मांडणी योग्य व स्पष्ट हवी.
• लेखन शुद्ध असावे.भाषाशैली बोजड नसावी.
Self-Instructional • लेखकाला जे सांगावयाचे आहे, ते वाचकास कळेल असे लिहावे.
Material 20 • लेखनात विचार संगतवार मांडला पाहिजे. विवेचनात सूत्र व संबंध असायला हवा.
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
अशा प्रकारे श्रवण, संभाषण, भाषण, वाचन व लेखन ही कौशल्ये विकसित झाली विकास : सहसंबंध
असता व्यक्तिमत्त्वविकास घडून येतो. त्यासाठी त्या-त्या लेखनकौशल्याची चांगली ओळख
करून घेणे व त्याचे प्रत्यक्ष उपयोजन करणे गरजेचे असते. NOTES

१.४. भाषा आणि व्यक्तिमत्व विकास : सहसंबंध


दैनदिन व्यवहारात ‘व्यक्तिमत्व’ या शब्दाचा खऱ्या अर्थाने विचार केला, तर
मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून या शब्दाचा अर्थ व्यावहारिकदृष्ट्या भिन्न आहे. तसेच
व्यक्तीमत्व म्हणजेच काय? भाषेच्या दृष्टिकोनातून त्याचे उपयोजन काय आहे. याचे
सविस्तर विवेचन पुढे पाहूया.
सर्वसाधारण व्यक्तिमत्त्व म्हणजे काय? असा जर विचार केला तर आपण त्याचा संबंध
देह्बोलीशी लावला जातो. आपण एखाद्यावर छाप पाडण्यासाठी बाह्य स्वरूपावर जास्त
लक्ष केंद्रित करत असतो. परंतु सर्वसामान्य लोक तसा अपसमज करून घेतात. म्हणून
मानससशास्त्रीयदृष्ट्या व्यक्तिमत्त्व कशाला म्हणतात, हे पाहणे गरजेचे आहे. ’व्यक्तिमत्त्व’
ह्या शब्दाला इंग्रजीमध्ये ‘Personality’ हा शब्द वापरला जातो. हा शब्द ‘Persona’ या
लॅटिन शब्दाला रोमन लोकांनी ‘व्यक्ती कशी दिसते’ हा अर्थ प्राप्त करून दिला. त्यातूनच
‘Personality’ हा शब्द तयार झाला. व्यक्तिमत्त्व या संज्ञेसाठी ‘Personality’ हा
प्रतिशब्द वापरला जातो. तो व्यापक अर्थाने योजला जातो. त्यामुळेच व्यक्तिमत्त्व या
संकल्पनेत व्यक्तीच्या शारीरिक घडणीबरोबर तिच्या मानसिक घडणीचाही समावेश होतो.
व्यक्तिमत्त्वाच्या ज्या व्याख्या उपलब्ध आहेत; यावरून शारीरिक दृष्टीकोनाबरोबरच
मानसिक दृष्टीकोनाचाही समावेश केला जातो.
मानवाची जडण-घडण होत असताना, त्याच्या आसपासची सामाजिक, सांस्कृतिक,
धार्मिक, भौगोलिक इत्यादी परिस्थिती यांचा फार मोठा समावेश असतो. म्हणजेच आई –
वडिलांकडून त्याला शरीराची ठेवण, मूळप्रवृत्ती व काही जन्मजात प्रेरके प्राप्त होतात. हे
सामाजिक गुण ते हळूहळू समाज व संस्कृती यांच्या ज्या आंतरक्रिया त्याच्यावर होतात,
त्यापासून शिकते. जन्मापासून मृत्यूपर्यंत मूल समाजात वाढते. त्याचा परिणाम होऊन
त्याच्या अभिरुची, बौद्धिक सामर्थ्य, सवयी, श्रद्धा व मूल्ये विकसित होतात. या सर्व
वैशिष्ट्यांचे संघटित मूळ किंवा समग्र रूप म्हणजे 'व्यक्तिमत्त्व' होय.
व्यक्तिमत्त्वामध्ये काही परंपरागत अनुवंशिक बदल हा मूळ स्वरूपातच असतो त्याचा
परिणाम त्याच्या व्यक्तिमत्त्वावर होतांना दिसतो. व्यक्तिमत्त्वाची घडण ही सामाजिक,
सांस्कृतिक घडामोडींवर अवलंबून असली तरी व्यक्तिमत्त्वाची काही लक्षणे बाह्य म्हणजे
वरवरची दिसणारी सुद्धा असतात. उदा., पोशाख, आवडी-निवडी इ., पण व्यक्तिमत्त्वाचा
खरा गाभा म्हणजे व्यक्तीचा स्वभाव, वृत्ती, सहज-प्रवृत्ती इ. होय. व्यक्तिमत्त्व वैयक्तिक व
सामाजिक अशा दोन्ही प्रेरणांनी घडत असते, म्हणून व्यक्तिमत्त्वाच्या घटकात दोन्ही
प्रेरणांचा समावेश होतो.
व्यक्ती ही दैनंदिन जीवनामध्ये अनेक संघर्षांना व समस्यांना सामोरी जात असते. अनेक
प्रकारच्या समस्या ह्या व्यक्तीच्या जीवनात बालपणापासूनच घडत असतात. यामधूनच
व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि घडण होत असते. बालपणापासून प्रौढपणापर्यंत Self-Instructional
अनेक अवस्थांमधून व्यक्तिमत्त्वाचा विकास होत असतो. ही कल्पना प्रथमतः फ्रॉइडने Material 21
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
विकास : सहसंबंध मांडलेली आहे.
व्यक्तिमत्त्वासंबंधीच्या अपसमजामुळे केवळ व्यक्तीची शारीरिक ठेवण, व्यक्तीची
NOTES वेशभूषा आणि तिचे दृश्य-स्वरूप यावर भर दिला जातो; परंतु खऱ्या व्यक्तिमत्त्वात व्यक्तीची
मानसिक जडण-घडण आणि अंत:स्वरूपाचाही समावेश होतो.

१.४.१. 'व्यक्तिमत्त्व' या संज्ञेची व्याख्या


'व्यक्तिमत्त्व' या संज्ञेच्या विविध मानसशास्त्रीय अभ्यासकांनी त्यांच्या दृष्टीकोनातून
केलेल्या व्याख्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे :

१. ऑलपोर्ट: 'ज्यांच्यामुळे व्यक्तीला सभोवतालच्या वातावरणाशी वैशिष्ट्यपूर्ण


समायोजन साधता येते, अशा तिच्यामधील मानसभौतिक व्यवस्थांचे गतिशील संघटन
म्हणजे व्यक्तिमत्त्व’ होय’.

२. मन (Munn): 'मनुष्याची शरीररचना, त्याच्या वर्तनपद्धती, अभिरुची, अभिवृत्ती,


बौद्धिक सामर्थ्य व निरनिराळ्या योग्यता, पूर्ववृत्ती आणि इतर प्रकट वैशिष्ट्यांच्या समय
संघाताला किंवा संश्लिष्ट रूपाला व्यक्तिमत्त्व म्हणतात’.

३. प्रिन्स मोर्टन: 'संपूर्ण जैविक गुण आणि अर्जित प्रवृत्ती ह्यांच्या समग्रतेला व्यक्तिमत्त्व
म्हणावे.'

४. डेव्हर: 'व्यक्तिमत्त्व म्हणजे शारीरिक, मानसिक, नैतिक आणि सामाजिक गुणांचे


एक सुसंघटित व गतिशील संघटन असून, ते व्यक्ती आणि समाज यांच्या आदान-
प्रदानातून अभिव्यक्त होते.’

५. मिचेल: अलीकडच्या काळात केलेली व्याख्या अशी, 'जीवनातील प्राप्त परिस्थितीशी


समायोजन दर्शविणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनपद्धतीलाच (तिचे विचार व भावनांसह)
बहुधा व्यक्तिमत्त्व म्हणता येईल.' (पृष्ठ क्र १,२,३)

वरील दिलेल्या व्याख्यांवरून असे म्हणता येईल की, प्रत्येक माणसाचे आंतररुप आणि
बाह्यरूप हे त्याच्या व्यक्तीमत्वाचे गुण दोष असे म्हणता येईल. हे गुणविशेष लक्षात घेऊन
गुणविशेषांचा संघटित आकृतिबंध म्हणजे व्यक्तिमत्त्व असे म्हटले जाते. असेही म्हणता
येईल की, व्यक्तिमत्त्व म्हणजे आनुवंशिक व सामाजिक प्रक्रियाद्वारा संपादन केलेल्या
गुणांचे व लक्षणांचे सुसंघटित, गतिशील असे समग्ररूप होय.

१.४.२. व्यक्तिमत्त्वाचा विकास


सुप्रसिद्ध आशावादी सौंदर्यवादी कवी म्हणजे बा. भ. बोरकर.आपल्या कवितेत
Self-Instructional म्हणतात....
Material 22
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
देखणे ते चेहरे जे प्रांजळाचे आरसे । विकास : सहसंबंध
गोरटे की सावळे या मोल नाही फारसे ॥
देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे । NOTES
मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळॆ ॥
देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती ।
वाळवंटातूनसुद्धा स्वस्तिपद्मे रेखिती ॥
देखणी ती जीवने जी तॄप्तीची तीर्थोदके ।
चांदणॆ ज्यातुन वाहे शुभ्र पार्यासारखे !!

देखणेपणा कुणाला आवडत नाही? पण बोरकरांच्या बाबतीत मात्र इथे देखणेपणाची


व्याख्याच बदलून जाते. बोरकर या कवितेत बाह्य सौंदर्याचा संबंध माणसाच्या गुणसंपन्नतेशी
कसा जोडलेला आहे याचे एक मनोहर चित्र रेखाटतात. याचा अर्थ त्यांना बाह्य सौंदर्याची
जाण नाही, असा नसून त्याच्यातील एक चिंतनशील गुणग्राहक माणसाच्या सौंदर्याचा एक
वेगळाच चिरंतन सोहळा आपल्यापुढे उभा करतात.
प्रांजळपणा लबाडी माहीत नसते. डोंगही ठाऊक नसते. हे जसे आहे तसे त्या चेहऱ्यावर
ओसंडू लागते आणि असा निर्व्याज चेहरा अधिक सुंदर वाटतो. तो सावळा की गोरा याला
त्या निरागसपणापुढे फारसा अर्थच उरत नाही. त्यांची ही कविता मानवी व्यक्तिमत्त्वाच्या
अर्थपूर्ण साफल्याची ग्वाही देत असते.
साधारणत: व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा होतो याबाबत सांगायचे झाले तर कोणत्याही
दोन व्यक्तींमध्ये जरी एकबीज असले तरी ते त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये, भाषेमध्ये फरक
जाणवतो कोणत्याही दोन व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व संपूर्णत: सारखे आढळत नाही. एकबीज
जुळ्यांच्याही व्यक्तिमत्त्वात फरक जाणवूत अनुवंश व जन्मपूर्व परिवेशामुळे प्रत्येक मूल
दुसऱ्या मुलापेक्षा निराळे दिसते. व्यक्तिमत्त्वाचा मूळ गाभा जन्मतःच अस्तित्वात असतो.
व्यक्तीच्या जसजशी वाढू लागते तसतशी काही व्यक्तिमत्त्व लक्षणे विकसित होऊ लागतात.
वय जसजसे वाढत जाते तसतसे अनेक लक्षणांचा परिपोष होऊ लागतो. तसेच वयाच्या
अनेक पातळ्यांवर व्यक्तिमत्वाची नवीन लक्षणे निर्माण होऊन व्यक्तिमत्त्वाची संश्लिष्ट
घडण होत असते. व्यक्तिमत्त्वाचे मूळ केंद्र हे सुप्त घटकांनी तयार झालेले असून त्याचे
स्वरूप प्रेरणात्मक असते. व्यक्तिमत्त्वाचा हा प्रमुख प्रवाह होय. ह्या प्रमुख प्रवाहाभोवती
निरनिराळी लक्षणे संयुक्त होऊन व्यक्तिमत्त्वाला वैशिष्ट्यपूर्ण आकार प्राप्त होतो.
व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी काही महत्त्वाचे सामाजिक घटक प्रभावित करणारे
असतात. ते घटक पुढीलप्रमाणे आपल्याला सांगता येतात.

१. घरातील वातावरणाचा प्रभाव :-


कोणत्याही व्यक्तीवर घरच्या परिस्थितीचा त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासावर आणि
जडणघडणीवर परिणाम होत असतो. ज्याच्या कुटुंबात एकत्र कुटुंबव्यवस्था आहे किंवा
विभक्त कुटुंबव्यवस्था आहे, यावरूनही त्याच्या जगण्यामध्ये बराचसा फरक दिसून येतो.
तसेच एखादे मूल एकुलते-एक असणे, पुष्कळ भावंडे असणे, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती,
तो ज्या वातावरणात राहतो; या सर्व घटकांचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर, जीवनावर विकासावर
तीव्रतेने परिणाम होत असतो. Self-Instructional
आई-वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर पडत असतो. कदाचित Material 23
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
विकास : सहसंबंध तो सकारात्मक किंवा नकारात्मकचअसू शकतो. त्यांच्या वर्तनाचा ठसा मुलांच्या
व्यक्तिमत्त्वावर उमटतो. त्याचा विकास होत असताना मुलांचे आदर्श, त्यांची जीवनमूल्ये,
NOTES त्यांची सामाजिक अभिवृत्ती व भोवतालच्या एकंदर परिस्थितीत स्वत:च्या भूमिकेसंबंधीच्या
कल्पना हळूहळू आकार धारण करून विकसित होत असतात. ज्या संस्कृतीत मूल वाढते
तसेच काही आदर्शांचा विकास ही वेगवेगळ्या रीतीने होत असतो. सांस्कृतिक भिन्नतेनुसार
एका समाजात ज्या गोष्टी वाईट समजल्या जातात, त्याच गोष्टी दुसऱ्या समाजात चांगल्या
समजल्या जातात. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासात सामाजिक, सांस्कृतिक घटक अत्यंत
महत्त्वाचे ठरतात.

शारीरिक मानसिक आध्यात्मिक

व्यक्तिमत्व विकास
भावनिक सामाजिक

आर्थिक परिस्थितीप्रमाणे कुटुंबातील व्यक्तींच्या परस्परसंबंधांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर


मोठा प्रभाव पडतो. एका दृष्टीने आर्थिक परिस्थितीपेक्षाही कुटुंबातील व्यक्तींचे परस्परसंबंध
अधिक महत्त्वाचे असतात. घराण्यातील वातावरण सलोख्याचे असेल व सर्व कुटुंबघटकांचे
आपसातील संबंध प्रेमळपणाचे असतील तर ही परिस्थिती व्यक्तिमत्त्वाच्या योग्य विकासाला
पोषक ठरते. वरील गोष्टींशिवाय आई-वडिलांचा श्रमविषयक दृष्टीकोन, सांस्कृतिक
चालीरीतींसंबंधीचे त्यांचे धोरण, यांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर सतत परिणाम होत असतो.
आई-वडिलांचे मुलांशी कशा प्रकारचे संबंध आहेत, या गोष्टीला व्यक्तिमत्त्वविकासाच्या
दृष्टीने फार महत्त्व आहे. घरात आई-वडिलांकडून मुलाला मिळणारे प्रेम व वात्सल्याचा
लाभ, त्याच्या भावनात्मक विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. ज्या पालकांचे
वर्तन भावशून्य असते, अशा पालकांच्या मुलांमध्ये बहुधा अपराध प्रवृत्ती आढळून येते.

२. शाळा, महाविद्यालय याचा व्यक्तिमत्त्व विकासातील प्रभाव:-


शाळा व महाविद्यालयाच्याद्वारा मुलाचा कुटुंबबाह्य जगाशी संबंध येतो. त्याच्या
व्यक्तिमत्त्वावर शालेय वातावरणाचा फार प्रभाव पडतो. शाळेत त्याला सवंगडी लाभतात.
नवीन वातावरण लाभते. शालेय जीवनात त्याला शिस्त व नियमितपणाचे धडे मिळतात,
अभ्यासाची सवय लागते. लेखन व वाचनाची गोडी लागते. वक्तशीरपणा व नियमितपणा
यांचे महत्त्व कळू लागते. शिक्षकाच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडतो. शिक्षक हा त्याचा
आदर्श बनतो. शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व व त्यांच्याकडून दिली जाणारी वागणूक, या गोष्टी
मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतात. शिक्षकाला आदर्शरूप समजून त्यांच्यासारखे
ज्ञान, बुद्धी व बळ प्राप्त करावे, अशी मुलांच्या मनात इच्छा निर्माण होते. शिक्षकांचे
व्यक्तिमत्त्व प्रभावी असेल तर मुलांच्या व्यक्तिमत्त्वालाही योग्य वळण लागते; परंतु
शिक्षकाचे व्यक्तिमत्त्व प्रभावी नसेल, तर मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर त्याचा ठसा उमटू शकत
Self-Instructional नाही. शिक्षकाच्या विचारांचा व नैतिक आचरणाचा मुलांच्या विचार व भौतिक आचरणावर
Material 24 प्रभाव पडतो. शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाचे जे गुण-दोष मुलांशी घडणाऱ्या त्यांच्या वागणुकीतून
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
प्रकट होतात, त्या सर्व गुण-दोषांचा मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर चांगला-वाईट परिणाम होत विकास : सहसंबंध
असतो. जिव्हाळ्याने मुलांना शिकविणारा शिक्षक मुलांच्या मनात तोच जिव्हाळा निर्माण
करतो, उलट दुष्ट वर्तन करणारा शिक्षक मुलांच्या मनात दुष्ट वर्तनाचे बीजारोपण करतो. NOTES
शिक्षकाबरोबरच मित्रांचा सहवासही त्याच्या व्यक्तिमत्त्वविकासाला कारणीभूत ठरतो.
आपल्या वर्गातील इतर विद्यार्थ्यांशी अभ्यासाच्या बाबतीत मुलगा स्पर्धा करू लागतो. या
स्पर्धेमुळे द्वेष, असूया किंवा वैरभाव वाढण्याची शक्यता असते, त्याचप्रमाणे परिश्रमशीलता
व चिकाटी वाढीला लागते. अभ्यासाव्यतिरिक्त क्रीडासमूहात विद्यार्थ्यांचे जे परस्परसंबंध
येतात, त्याचा मुलाच्या व्यक्तिमत्त्वावर मोठा प्रभाव पडतो. शिक्षक व मित्रपरिवार यांचा
मुलांच्या सामाजिक जीवनावर फार तीव्र परिणाम होऊ शकतो. मुलाच्या व्यक्तिमत्त्वविकासावर
आणि चारित्र्य संपादनावर कमी-अधिक प्रमाणात स्थायी स्वरूपाचा प्रभाव पाडणारे हे
शालेय वातावरणातील प्रमुख घटक आहेत.

३. समाजाचा प्रभाव :-
व्यक्ती हा समाजाशिवाय राहू शकत नाही. अनादी काळापासून व्यक्तीला समूह करुन
राहण्याची सवय आहे. म्हणून व्यक्ती आणि समाज यांचा परस्पर संबंध आहे. व्यक्तीचा
जसा समाजावर प्रभाव पडतो तसाच समाजाचा व्यक्तीवर प्रभाव पडत असतो. समाजात
प्रत्येक व्यक्तीचा निरनिराळा दर्जा असतो व त्या दर्जानुसार त्याची कार्ये ठरतात. भारतासारख्या
देशात विविध जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक राहतात म्हणून या देशामध्ये सामाजिक दर्जा
व्यवसायानुसार आणि जातीनुसार या दोन पातळ्यांवर ठरतो. व्यक्तीच्या दर्जानुसार समाजात
व्यक्तीला कार्य करावे लागते. समाजाचे व्यक्तीवर नियंत्रण असते. रूढी, परंपरा, सामाजिक
नीतिनियम इ. चा व्यक्तीच्या जीवनशैलीवर व्यापक प्रभाव पडतो. समाजाच्या नियमांचे
उल्लंघन करून मनाला वाटेल तसे मनुष्याला वागता येत नाही. समाजात राहून मनुष्याला
सामाजिक आदर्शांचा अंगीकार करावा लागतो. समाजात काही लोक प्रस्थापित नियमांना
विरोध करणारे असतात, तर काही परंपराप्रिय असतात. व्यक्ती व समाजाच्या अशा
संघर्षामुळे व्यक्तिमत्त्वविकासात अनेक अडचणी निर्माण होतात. प्रत्येकजण आपापल्या
सदसद्विवेकाला अनुसरून ह्या अडचणीचे निवारण करण्याचा प्रयत्न करतो व त्यातून
त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप निश्चित होते.

१.४.३. व्यक्तिमत्त्व विकासात भाषेचे स्थान


मानवाच्या जीवनात मातृभाषेचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. मातृभाषेचे संस्कार
मनाच्या गाभ्यात इतके खोल रुजतात, पूर्वानुभवांशी इतके एकरूप होतात की, व्यक्तिमत्त्वाचा
ते अविभाज्य घटकच बनून जातात. मनुष्य कितीही बहुभाषी झाला तरी खऱ्या जिव्हाळ्याचा
आणि जिव्हारीचा उद्गार त्याच्या मातृभाषेतूनच प्रकट होतो.
मानवी उत्क्रांतीच्या क्रमात वाचाशक्ती प्राप्त झाली ती फक्त मानवालाच; आणि तिच्या
जोरावरच मनुष्याने निसर्गावर विजय मिळवला. भोवतालच्या सृष्टीशी झगडताना मिळालेले
बरे-वाईट अनुभव भाषेत शब्दरूपाने त्याने ग्रंथित केले. प्रत्येक पिढीने त्या अनुभवांची
जपणूक केली आणि आपल्या अनुभवांची त्यात भर घातली. या ज्ञान भांडारात केवळ
भौतिक सृष्टीचेच ज्ञान नव्हते. मानवाच्या कौटुंबिक भावना, सामाजिक जीवनाविषयक Self-Instructional
कल्पना व ध्येये, आत्मविकासाच्या व मुक्तीच्या आकांक्षा ही सारी त्यात सामावलेली होती. Material 25
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
विकास : सहसंबंध अशा तऱ्हेने नवनवे अनुभव घेत, नवनवी शारीरिक व मानसिक पराक्रमाची क्षितिजे शोधीत
मानव आपले जीवन समृद्ध करतो. या समृद्धीला ‘अक्षर’ रूप भाषा देते.
NOTES भाषा एक प्रकारे व्यक्तीला घडविण्याचे कार्य करते. इतरांशी येणाऱ्या संपर्कातून व
होणाऱ्या विनिमयातून इतरांचे विचार, भावना ग्रहण केले जातात. शब्द विचारक्रियेला
उपयुक्त ठरतात. नवनवे विचार भाषेद्वारा आत्मसात केले जातात. विचारशक्तीचे सामर्थ्य
त्यामुळे वाढीस लागते. दुसऱ्या बाजूने भावजीवनही समृद्ध होते. भाषेने विशेषत: नव्या
पिढीच्या सहजप्रेरणांना वळण लावण्याचे, त्याचे उन्नयन व उदात्तीकरण करण्याचे सामर्थ्य
भाषेत आहे. या दृष्टीने विचार करता मानव ज्याप्रमाणे भाषेचा निर्माता आहे, तशीच भाषा
हीदेखील मानवाची निर्माती व धात्री आहे. मानवाचा भाषेशी जो अतूट संबंध आहे तो असा.

१.५. सारांश
भाषा भावनाविकासाला साहाय्य करणारी आहे. बुद्धीबरोबर भावनेचा विकास होणे,
व्यक्तिविकासाच्या दृष्टीने आवश्यक आहे. अंत:करण संवेदनक्षम असणे, इतरांच्या सत्प्रवृत्त
भावनांशी समरस होता येणे, हीच सुसंस्कृतता आणि रसिकता हे भाषेमुळे सहजशक्य आहे.
त्यातूनच व्यक्तिमत्त्वविकास घडून येतो. भाषा ही प्रामुख्याने सामाजिक विनिमयासाठी आहे.
त्या विनिमयाला आरंभ आत्मनिवेदनापासून होतो. स्वत:च्या गरजा, विचार व भावना
दुसऱ्याला कळवून त्याचे लक्ष स्वत:कडे वेधून घ्यावयाचे, त्याला आपल्या गरजा तृप्त
करण्यासाठी प्रवृत्त करावयाचे, हा भाषेचा प्रमुख उद्देश आहे; तर दुसऱ्या बाजूने इतरांचे
मनोगत जाणून घेऊन त्यानुसार आपल्या विचार वर्तनांत बदल करावयाचा, हेही भाषेचेच
कार्य आहे. अशा त-हेने भाषा, व्यक्तीचा समाजाशी संबंध प्रस्थापित करते. व्यक्तीला
विचार करण्यास माध्यम म्हणून उपयोगी पडणे हे भाषेचे दुसरे कार्य आहे. मानवांना होणारे
ज्ञान, त्यांच्या इच्छा-आकांक्षा व संकल्प भाषाच प्रकट करते. व्यावहारिक जीवनाच्या
पातळीवर दैनंदिन जीवनाच्या गरजा पार पाडण्यासाठी भाषेचा उपयोग प्रामुख्याने होतो.
भाषा हे कौटुंबिक व सामाजिक व्यवहाराचे साधन आहे. ते यशस्वी व परिणामकारक रीतीने
हाताळता येण्यासाठी एक साधणीभूत विषय म्हणून श्रवण, वाचन, संभाषण, भाषण, लेखन
ही कौशल्ये विकसित व्हायला हवीत. त्यातूनच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडण-घडण
होऊन त्यांचा विकास होऊ शकतो.

१.६. महत्वाचे शब्द


१. प्रांजळ- प्रामाणिक
२. व्यक्तिमत्त्व- जे व्यक्त होते ते

Self-Instructional
Material 26
भाषा आणि व्यक्तिमत्त्व
१.७. सरावासाठी प्रश्न विकास : सहसंबंध

१) भाषा म्हणजे काय? NOTES


२) भाषेच्या कुठल्याही दोन व्याख्या लिहा.
३) व्यक्तिमत्त्व या संज्ञेच्या कुठल्यातही दोन मानसशास्त्रज्ञांच्या व्याख्या लिहा.
४) व्यक्तिमत्त्व विकासात कुठल्या घटकांचा समावेश होतो व कसा?
५) व्यक्तिमत्त्व विकसात भाषेचे स्थान स्पष्ट करा.
६) श्रवणकौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासाचा सहसंबंध स्पष्ट करा.
७) वाचनकौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासाचा सहसंबंध स्पष्ट करा.
८) संभाषणकौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासाचा सहसंबंध स्पष्ट करा.
९) लेखनकौशल्य व व्यक्तिमत्त्व विकासाचा सहसंबंध स्पष्ट करा.

१.८. अधिक वाचनासाठी पुस्तके


१. कालेलकर नारायण गोविंद, भाषा आणि संस्कृती, मौज प्रकाशन, पुणे.
२. डॉ. मधुकर मोकाशी, व्यक्तिमत्त्व विकास, प्रतिमा प्रकाशन, पुणे.
३. अहिरे प्रतिभा, सामिजिक भाषा विज्ञान, डायमंड प्रकाशन्, पुणे.
४. डॉ. संदीप सांगळे, व्यावहारिक उपयोजित मराठी, डायमंड प्रकाशन्, पुणे.
५. डॉ. गीतांजली चिने, डॉ. हरेश शळके, ‘आधुनिक भारतीय भाषा :
मराठी’,.प्रशांत प्रकाशन, पुणे.
६. प्रा. डॉ. उज्ज्वला भोर : प्रसारमाध्यमे आणि मराठी, प्रशात प्रकाशन, पुणे.

Self-Instructional
Material 27
१.२. लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि
लोकशाहीतील
जीवनव्यवहार...
NOTES प्रसारमाध्यमे
१.२.१. प्रस्तावना
१.२.२. उद्दिष्टे
१.२.३. लोकशाहीतील जीवनव्यवहार
१.२.४. प्रसारमाध्यमे
१.२.५. भारतीय राज्यघटना आणि प्रसारमाध्यमे
१.२.६. लोकशाहीचा चौथा खांब
१.२.७. प्रसारमाध्यमांचे ठळक विशेष
१.२.८. प्रसारमाध्यमे आणि संसदीय विशेष अधिकार
१.२.९. प्रसारमाध्यमे आणि न्यायालये
१.२.१०. प्रसारमाध्यमे व इतर कायदे
१.२.११. प्रसारमाध्यमाची तत्त्वे
१.२.१२. सारांश
१.२.१३. महत्वाचे शब्द
१.२.१४. सरावासाठी प्रश्न
१.२.१५. अधिक वाचनासाठी पुस्तके

१.२.१ प्रस्तावना
भारत देशाचा व्यवहार हा लोकशाहीच्या माध्यमातून चालत असतो. स्वातंत्र्यापूर्वीच्या
कालखंडामध्ये देश गुलामीच्या छायेत जगत होता. १९ व्या शतकात अनेक समाजसुधारकांनी
आपल्या लेखणीमधून प्रबोधनाचे काम केले. यासाठी आपले विचार जनसामान्य माणसापर्यंत
पोहचविण्यासाठी ‘वृत्तपत्र’ या माध्यमाचा आधार घेतला. या प्रसारमाध्यमाचा उपयोग पुढे
जाऊन झाला. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून प्रसारमाध्यमांना आपल्या लोकशाहीत स्थान
आहे. या सगळ्याचे विवेचन पुढे सविस्तरपणे आपल्याला पाहता येते.
स्वातंत्र्यापूर्वीच्या कालखंडात इंग्रजांनी जरी आपल्या सोयीसाठी संदेशनाचा शोध
लावला. तरी त्याचा फायदा भारतीयांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर स्वातंत्र्यानंतर घेतला.
वृत्तपत्रातून, आकाशवाणीतून, दूरदर्शन या सगळ्या प्रसारमाध्यमांचा वापर करून जनतेला
बळ देण्याचे काम केले.
भारतीयांच्या मनात राष्ट्रवादाची भावना निर्माण व्हावी आणि सर्व भारतीयांनी एक होऊन
परकीय सत्तेची हकालपट्टी व्हावी, या हेतूने तत्कालीन समाजसुधारकांनी-देशभक्तांनी
आपल्या लेखणीचा वापर केला. त्यावेळी वृत्तपत्रे हे एकमेव प्रसारमाध्यम असे सशक्त
प्रसारमाध्यम होते. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपल्याला अनेक वर्तमानपत्रांच्या योगदानाचा विचार
Self-Instructional करावा लागतो. त्यामध्ये आपले विचार सर्वसामन्य जनतेकडे पोहचावेत यासाठी महाराष्ट्र
Material 28 बालशास्त्री जांभेकर यांनी ‘दर्पण’ नावाचे पहिले मराठी वृत्तपत्र काढले. त्यानंतर विष्णुशास्त्री
लोकशाहीतील
चिपळूणकर, म. फुले, लो. टिळक, गोपाल आगरकर, डॉ. बाबासहेब आंबेडकर अशा जीवनव्यवहार...
अनेक समाजसुधाराकांमुळे समाजप्रबोधन झाले.
स्वातंत्र्यानंतर मात्र ‘नभोवाणी’चा सर्व कार्यभार हा सरकारच्या नियंत्रणात आणला गेला NOTES
कारण दुसऱ्या महायुद्धात आकाशवाणीने महत्त्वाची भूमिका पार पाडली. म्हणून भारताचे
पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्व हक्क सरकारच्या नियंत्रणात घेतले.
अनेक आकाशवाणी केंद्रातून वेळोवेळी देशाच्या कल्याणाच्या संदर्भाच्या सूचना देण्यात
आल्या. म्हणून प्रसारमाध्यमांना खूप मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत गेले.
आजच्या काळात विविध क्षेत्रामध्ये प्रसारमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर झालेला
दिसतो. तसेच जनसामान्यांवर सुद्धा याचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर पडलेला आहे. तसेच
वृत्तपत्र, आकाशवाणी आणि दूरदर्शन ह्या प्रसारमाध्यमांचा प्रभाव खूप काळापर्यंत
समाजामध्ये टिकून आहे. परंतु आजच्या अत्याधुनिक जगामध्ये एका बाजूने सामाजिक
माध्यमांचा प्रभाव ही तेवढाच जलद गतीने लोकांच्या मनात रुजला आहे. आज सोशल
माध्यमांचा प्रसार जागतिकीकरणामुळे अधिकच घट्ट होत चाललेला आहे. आजच्या
अत्याधुनिक युगामध्ये माहितीचा विस्फोट होत चालेला आहे. म्हणून संदेशवहन इतक्या
जलद गतीने होत आहे की एक-दोन सेकंदात काय घडले आहे, याची इत्यंभूत माहिती
तत्काळ फेसबुक, टेलिग्राम, ट्विटर, इस्टाग्राम, व्हॉटस्अॅप सारख्या सोशल मीडियावर
पोहचत असते. अशा या सोशल माध्यमाच्या जलद संदेशनामुळे सर्व लहानांपासून थोरांपर्यंत
आकर्षित झाले आणि साहजिकच वृत्तपत्र, आकाशवाणीसारख्या अगोदरच्या प्रसारमाध्यमांना
नकळतपणे उतरती कळा लागली. मात्र स्वातंत्र्योत्तर काळानंतर भारतीय संविधानाने प्रदान
केलेल्या मूलभूत हक्कांपेक्षा ‘अभिव्यक्ती’ स्वातंत्र्याचा लाभ घेऊन एक नवी जीवनदृष्टी
लाभल्यामुळे भारतीय प्रसारमाध्यमांनी आपले महत्त्वपूर्ण स्थान निर्माण केले. ब्रिटिश
राजवटीमध्ये भारतामध्ये लागू करण्यात आलेल्या गोपनीय कायद्यामुळे प्रशासकीय
स्तरावरील कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत किंवा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत
नव्हती.
इ.स. २००० नंतर भारत सरकारने सर्व भारतीयांना माहितीचा अधिकार प्राप्त करुन
दिला. या अधिकारामुळे आपण कोणत्याही प्रकारची राजकीय, सामाजिक अथवा
प्रशासकीय माहिती केवळ स्वबळावर मिळवू शकतो. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या
देशात संविधानाने दिलेली मूलभूत हक्क आणि कर्तव्य ही त्या-त्या नागरिकाची जबाबदारी
आहे. हवी ती माहिती मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारचे आमिष न देता मिळवता येते. या
माहिती अधिकारामुळे प्रसारमाध्यमांचेही स्थान मजबूत झाले. भारतीय नागरिकांच्या मूलभूत
हक्कांना देखील अधिक बळकटी प्राप्त झाली. माहिती अधिकाराच्या माध्यमातून सर्वसामान्य
जनतेला आपल्या हक्कांची-अधिकारांची जाणीव होऊन त्यांच्यात अपेक्षित जागरूकता
निर्माण झाली. त्यामुळेच अन्यायाविरुद्ध आवाज उठवून आपल्याला हवे ते मिळविण्याच्या
सर्वसामान्यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने सामाजिक विकासाला गती मिळाली आणि
सर्वांगीण विकासाचे चक्र गतिमान झाले व त्याआधारे सामूहिक विकासाची फळे समाजातील
शेवटच्या घटकांपर्यंत पोहचली जाऊ लागली. तसेच लोकशाहीमुळे सर्वसामान्यांच्या
जगण्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आला. या जगण्याच्या जीवनमूल्यामुळे भारतासारखा
देश समता बंधुतेने राहू लागला. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारामुळे
विकसनशील राष्ट्र विकसित होण्याच्या मार्गावर आहेत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही. Self-Instructional
Material 29
लोकशाहीतील
जीवनव्यवहार... १.२.२. उद्दिष्टे
NOTES १. लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि प्रसारमाध्यमे यांचे परस्परसंबंध स्पष्ट करणे.
२. प्रसारमाध्यमांसाठी लेखनक्षमता विकसित करणे.
३. लोकशाहीतील जीवन कसे चालते आणि आजची स्थिती स्पष्ट करणे

१.२.३ लोकशाहीतील जीवनव्यवहार


आज भारतातील प्रसारमाध्यमे स्वातंत्र्यापूर्वीच्या सर्व बेड्या तोडून लोकशाहीत अपेक्षित
असलेले स्वातंत्र्य उपभोगत आहे. भारताला जगातील सर्वात विशाल आणि विविधतापूर्ण
लोकशाहीसंपन्न असलेला देश म्हणून ओळखले जाते. अशा या लोकशाही संपन्न देशात
अगदी स्थानिक स्वराज्य संस्थापासून पंतप्रधान पदापर्यंत किंवा गावातील ग्रामपंचायतीच्या
निवडणूकीपासून ते देशातील जनतेच्या संरक्षणासाठी, हितासाठी कायदे बनवणाऱ्या
संसदेच्या निवडणूकांपर्यंत, जनमताचा कौल घेण्यापासून ते मतदार फोडण्यापर्यंत,
सर्वसामान्य जनतेचा आवाज सत्ताधारी शासनापर्यंत पोहचविण्याचे काम प्रसारमाध्यमे करत
आहे. याचे एकमेव कारण म्हणजे स्वातंत्र्योत्तर कालखंडात भारतीय संविधानाने लोकशाहीच्या
जपणूकीसाठी प्रसारमाध्यमांना दिलेले अगणित स्वातंत्र्य हे होय. यामुळेच खऱ्या अर्थाने
लोकशाहीला बळकटी प्राप्त होते. त्याआधारेच समाजातील सर्व घटकांचे स्वाथ्य सुधारते व
त्यानुसार सर्व जनतेचे सर्व स्तरावरील जीवनव्यवहार सुधारतात. आजच्या प्रसारमाध्यमांची
जबाबदारी स्पष्ट करताना श्री.पोपटराव यमगर लिहितात की, “स्वतंत्र भारतामध्ये
प्रसारमाध्यमांची भूमिका ही देशातील सर्वसामान्य नागरिकांचा आवाज, त्यांचे प्रश्न
सरकारच्या कानापर्यंत पोहचविण्यासाठी आणि राष्ट्रीय विकासाच्या पूर्ततेसाठी लोकांना
प्रेरित करणारी असावी. तसेच लोकशाही व्यवस्थेला सुदृढ बनविण्याची जबाबदारीही
प्रसारमाध्यमांवरच आहे.” (चिने आणि शेळके पृ. क्र. २६)
म्हणून आज प्रसारमाध्यमांची भूमिका ही लोकशाहीला चालना देणारी आहे. सर्व
सामान्यजनतेचे प्रश्न सरकारपर्यंत पोहचवण्याचे काम प्रसारमाध्यमे करत असतात. म्हणून
‘लोकशाहीचा चौथा खांब’ असे त्यांना ओळखले जाते. त्याचप्रमाणे लोकशाहीमध्ये
प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आजच्या प्रसारमाध्यामांनी लोकशाहीच्या भूमिकेसाठी महत्त्वपूर्ण
भूमिका बजावली आहे.
लोकशाहीमध्ये विचारस्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला एक महत्त्वपूर्ण आणि
विशेष स्थान आहे. अभिव्यक्तीचे व्यासपीठ म्हणून प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण
मानली जाते. कारण त्याआधारेच जनतेचे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य राखले जाते. आज
एकविसाव्या शतकात अर्थात माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र
परिवर्तन झालेले आहे. सोशल मीडियाने प्रत्येकाच्या जीवनावर आपले प्रभुत्व सिद्ध केलेले
आहे. तंत्रज्ञानाने युक्त असलेला सामाजिक सोशल मीडिया हा प्रत्येकाच्याच जीवनाचा
अपरिहार्य भाग बनलेला आहे. त्यामुळेच जगाच्या, देशाच्या कानाकोप-यात घडणाऱ्या
सर्वच घटना सर्वांपर्यंत क्षणार्धात पोहचतात. त्यामुळेच प्रत्येकाच्या जीवनव्यवहारात जगण्या-
Self-Instructional वागण्यात वैविध्यपूर्णता असूनदेखील एकात्मता पाहायला मिळते. कारण सर्वांपर्यंत
Material 30 पोहचणारा सोशल मीडिया हा सारखाच आहे. सोशल मीडिया वरील अनेक घटकांचे
लोकशाहीतील
सररासअनुकरण होताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक बाबींच्या मार्गदर्शक सूचना जीवनव्यवहार...
त्याआधारे दिल्या जातात, ज्याद्वारे लोकांचे व्यावहारिक जीवन आमूलाग्र बदलत आहे.
म्हणजेच प्रसारमाध्यमांनी मानवी जीवनाभोवती घातलेला गराडा आणि त्यामध्ये गुरफटलेला NOTES
माणूस हे कोणत्या प्रकारचे बंधन म्हणून नाही तर लोकशाहीमध्ये त्यांना भारतीय संविधानाने
दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच आहे. हे आपल्याला याठिकाणी विचारात घेणे गरजेचे आहे.
स्वातंत्र्यामुळेच व्यक्तिविकासाच्या अनेक दिशा खुल्या झालेल्या आहेत. त्यामुळेच
सर्वसामान्य माणूसदेखील आपल्या कर्तृत्वाच्या बळावर असामान्य पदापर्यंत पोहचलेला
आहे, त्याचे हे असामान्यत्व संपूर्ण जगासमोर मांडण्यामध्ये प्रसारमाध्यमांनी निभावलेली
भूमिका महत्त्वाची ठरते, हेही वास्तव नाकारता येणार नाही.
लोकशाहीतील प्रसारमाध्यमांचे महत्त्व विशद करताना प्राचार्य डॉ.नामदेव सानप
लिहितात की, "आजचे युग हे स्पर्धेचं युग आहे. संवादक्रांतीचे युग शास्त्रीय युग म्हणून
ओळखलं जात असलं तरी यशाची पहिली पायरी म्हणून माहितीचे स्थान आजही कायम
आहे. शास्त्रातील अनेक नवनव्या शोधामुळे जग लहान बनत चालले आहे. संवाद क्रांतीमुळे
प्रसारमाध्यमांचे तर माहिती अधिकार प्रदान झाल्यामुळे माहिती या दोन्ही क्षेत्राचे महत्त्व
अधिकच वाढले आहे. आजच्या या आधुनिक युगातही ज्ञान, माहिती, संपर्क आणि प्रचार-
प्रसाराच्या माध्यमातून अधिकाधिकांचे अधिकतम कल्याण साध्य करण्यासाठी तसेच
अधिकाधिकांना अधिकाधिकांशी जोडण्यासाठी व संबंधित घटकांत परस्परांविषयी
विश्वासार्हता निर्माण करण्याबरोबरच सामूहिक विकासाच्या योजना अखेरच्या घटकांपर्यंत
पोहचविण्यात, सामाजिक शिक्षण साकारण्यात, यशाचा आलेख उंचविण्यात तसेच
लोकशाही शासनप्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी भारतीय प्रसारमाध्यमांची भूमिका
प्रारंभापासूनच महत्त्वपूर्ण राहिली आहे." प्राचार्य डॉ.नामदेव सानप यांच्या वरील
विवेचनावरून निश्चित असे म्हणता येते की, लोकशाहीमुळे बदलत्या काळात ज्ञान-विज्ञान
आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही अफाट बदल झाले. त्या माध्यमातून लोकांचा
एकमेकांशी संपर्क मोठ्या प्रमाणात वाढला. तो केवळ स्थानिक संपर्क वाढला असे
अजिबात नाही. याउलट विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, सोशल मीडीयाच्या माध्यमातून हे
संपर्क इतके व्यापक झाले आहेत की एका देशातील सर्वसामान्य व्यक्तीची दुसऱ्या देशातील
असामान्य व्यक्तीपर्यंत पोहच गेलेली आहे. साहजिकच सर्व बाबी व्यक्तिविकासाच्या
दृष्टीकोनातून महत्त्वाच्या आणि जीवनव्यवहार सुरळीत अथवा अधिक सुस्थिर होण्याच्या
दृष्टीकोनातून, त्यात विश्वासार्हता निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहेत.
अर्थातच लोकशाहीतील जनतेचे जीवनव्यवहार अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून
आणि लोकशाही शासनप्रणाली अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रसारमाध्यमांची भूमिका
महत्त्वपूर्ण आहे, असे याठिकाणी ठामपणे म्हणता येईल.
तसेच भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला प्राप्त
झालेल्या मूलभूत अधिकारांपेक्षा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले
व त्यामुळेही सर्वांच्याच जीवनाला एक नवा आयाम आणि एक वेगळी दृष्टी प्राप्त झाली .
प्रत्येक व्यक्तीच्या विचारस्वातंत्र्यामुळे आपले मत ठामपणे मांडता येण्याचा अधिकार प्राप्त
झाला आणि हे मांडलेले मत सरकारपर्यंत पोहचविण्याचे काम प्रसारमाध्यमांनी चोखपणे
बजावले. भारत सरकारने संपूर्ण जनतेला माहितीचा अधिकार प्रदान केल्यामुळे प्रत्येक
व्यक्तीच्या विचारस्वातंत्र्याला एक नवी दिशा मिळाली. अर्थातच त्यामुळे प्रशासकीय Self-Instructional
कामकाज पूर्णतः पारदर्शी झाले. त्यामुळे सामूहिक विकासात अडसर ठरणाऱ्या अनेक Material 31
लोकशाहीतील
जीवनव्यवहार... नकारात्मक बाबींना विरोध होऊन, त्याची सत्यता समोर येऊन, त्यातील अनिष्ठता समोर
येऊन त्यांचे अस्तित्व संपविण्यात आले. या कामी माहितीचा अधिकार आणि प्रसारमाध्यमांची
NOTES भूमिका दोन्हीही विचारात घेणे क्रमप्राप्त ठरते.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगभर विकसित झालेल्या प्रगत ज्ञान शाखांपैकी ‘विकाससंवाद’
ही जी एक मौलिक ज्ञान शाखा आहे. तिचीही भूमिका व्यक्तिविकासाच्या दृष्टीने महत्त्वाची
आहे. यासंदर्भात प्रसिद्ध माध्यमतज्ज्ञ वि.ल.धारूरकर असे लिहितात की, "समाजात घडत
असलेले रचनात्मक बदल नोंदविणे व ते गतिमान करणे हा विकाससंवादाचा आत्मा आहे.
विविध क्षेत्रात प्रसारमाध्यमे विकासाला पोषक वातावरण निर्माण करतात आणि अशा
वातावरणातून संस्थात्मक जीवनाचे बदलते चित्र व सामाजिक बांधिलकीची भावनाही रूजू
लागते. विकसनशील राष्ट्रामध्ये नवीन जीवनमूल्ये रूजविण्याचे काम प्रसारमाध्यमे करतात.
ही प्रसारमाध्यमे प्रतिमा निर्माण करणारी असतात. प्रसारमाध्यमांच्या शक्तीमुळेच माध्यमक्षेत्र
ही एक लोकशाही समाजरचनेतील अत्यंत प्रभावी सत्ता झाली आहे. प्रसारमाध्यमांना अर्थात
‘पत्रकारिता’ ही चौथी सत्ता मानली जाते. परंतु ती हळूहळू अप्रत्यक्षरीत्या पहिली सत्ता
बनताना दिसत आहे. कारण प्रसारमाध्यमांनी काय द्यावे, कोणती माहिती द्यावी, कशा
स्वरूपात द्यावी, यावर प्रसारमाध्यमात ग्राहकांचा काहीही अधिकार किंवा नियंत्रण राहत
नाही." त्यांच्या विवेचनावरून आपल्याला निश्चितपणे असे सांगता येते की, लोकशाहीमधील
जीवन व्यवहार सुरळीत, सुस्थिर, भक्कम आणि बळकट करण्याच्या दृष्टीकोनातून
प्रसारमाध्यमांची भूमिका ही अनन्यसाधारण अशी आहे आणि सामूहिक समाज विकासाच्या
दृष्टिकोनातून अशा भूमिकेमुळेच ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ म्हणून ओळखली जाणारी
‘पत्रकारिता’ ही अप्रत्यक्षरीत्या पहिलाच स्तंभ असल्याची भूमिका निभावताना दिसतात.
अर्थातच इतके महत्त्व या लोकशाही काळात पत्रकारितेला प्राप्त झालेले आहे व त्याच
दृष्टीकोनातून लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि त्यांचा सामूहिक विकास हा पूर्णत:
प्रसारमाध्यमांवरच अवलंबून आहे. कारण, प्रसारमाध्यमे ही अस्तित्व निर्माण करण्यात,
प्रतिमा निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे स्पष्ट होते. वास्तवस्थितीचा
विचार केल्यास आपल्याला हे स्पष्टपणे जाणवते ते म्हणजे कोणत्याही स्तरावरचे राजकारण
असू द्या; समाजकारण, धर्मकारण असू द्या अथवा सांस्कृतिक- शैक्षणिक बाबी असू द्या;
सर्वसामान्य व्यक्तीपासून तर असामान्य व्यक्तीपर्यंत सर्वांचीच प्रतिमा समाजासमोर
आणण्याचे आणि त्यांचे अस्तित्व ठामपणे सिद्ध करण्याची जबाबदारी नकळतपणे
प्रसारमाध्यमांनीच स्वीकारल्याचे दिसते. प्रत्येक व्यक्तीला नावीन्यपूर्ण आणि प्रभावी ओळख
निर्माण करून देण्याचे काम हे प्रसारमाध्यमे करत असतात हे निर्विवाद सत्य नाकारता
येणार नाही हे नक्की.
आजची प्रसारमाध्यमे ही केवळ माहिती देणे किंवा प्रचार-प्रसार करणे यांच्यापुरतेच
मर्यादित काम करतात असेही नाही. ते जनशिक्षणापासून ते जनकल्याणापर्यंत आणि
ज्ञानदानापासून ते मार्गदर्शनापर्यंत, राजकारणापासून ते समाजकारणापर्यंत आणि सहकार,
औद्योगिक आणि शिक्षण क्षेत्रापर्यंतच्या सर्वच बाबींमध्ये प्रसारमाध्यमांनी आपली नवी
ओळख, आपले अस्तित्व सिद्ध केलेले आहे. हे वास्तव सत्य आहे. त्यामुळे लोकशाही
देशात असणाऱ्या राजकीय पक्षाच्या अथवा संघटनांच्या ध्येयाप्रमाणे (अजेंडा) कार्य करत
असतात. त्या दृष्टीकोनातून जनमत बनविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. या कामी
Self-Instructional प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची ठरते. बऱ्याचदा जनमत घडविण्याकामीच प्रसारमाध्यमे
Material 32 महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कोणत्याही राजकीय, सामाजिक बाबींच्या
लोकशाहीतील
जडणघडणीमध्ये माध्यमांचे आधिपत्य असणे महत्त्वाचे ठरते. माध्यम सत्ता अनुकूल जीवनव्यवहार...
असली तरच आपले म्हणणे दुसऱ्याच्या सहज गळी उतरविता येते अन् असे जनमत तयार
करणे हे लोकशाहीत अपेक्षित असते. हे काम प्रसारमाध्यमे प्रभावीपणे करत असतात. NOTES
प्रतिमा बनविण्यासाठी माध्यमे किती महत्त्वाची ठरतात व त्यानुसार लोकशाही
जीवनव्यवहाराची दिशा कशी निश्चित होते.
प्रसारमाध्यमे हे लोकमानसाची, लोकमताची जशी प्रतिमा बनविणारे असतात. तसेच ते
निर्माण केलेल्या प्रतिमा उद्ध्वस्त देखील करू शकतात. किंबहुना प्रतिमा उद्ध्वस्त करण्याच
काम माध्यमाद्वारे होत असते. त्याचप्रमाणे शासन किंवा सत्ताधाऱ्याची निर्मिती ज्याप्रमाणे
प्रसारमाध्यमे करत असतात. त्याचप्रमाणे सत्ताधारी शासनाला उद्ध्वस्त करण्याचे काम
देखील तीच प्रसारमाध्यमे करत असतात. माध्यमांच्या या शक्तीमुळेच माध्यमक्षेत्रही
लोकशाही समाजरचनेतील अत्यंत प्रभावी सत्ता झालेली आहे. कारण ‘लोकांनी लोकांसाठी
चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही’ अशी जी लोकशाही प्रणालीची प्राथमिक व्याख्या
केली जाते. ही लोकशाही संपूर्ण जगात आदर्श मानली जाणारी लोकशाही प्रणाली आहे.
कारण या लोकशाही शासनप्रणालीमध्ये तिच्या जडणघडणीमध्ये नागरिकांचा
प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सहभाग असतो. त्यामुळेच हा कारभार कसा चालतो हे पाहण्याचा
अधिकारसुद्धा त्या नागरिकांना प्राप्त होतो. शिवाय देशाच्या, राज्याच्या कारभाराची माहिती
मिळविणे, प्रशासन यंत्रणेतील कारभाराची पारदर्शकता तपासून पाहणे हादेखील त्याच्या
मूलभूत अधिकाराचा भाग असल्यामुळे सर्वसामान्य जनता आपल्या लोकप्रतिनिधीची
पारदर्शकता, विश्वासार्हता केव्हाही तपासून पाहू शकते, यासाठी त्यांना मिळालेला माहितीचा
अधिकार हा त्याच्या जीवनव्यवहाराला दिशादर्शक ठरणार आहे. अर्थात त्यामुळे लोकशाहीची
मूल्ये जपण्यासाठी लोकांना माहितीचा अधिकार असला तरच लोकांच्या मूलभूत हक्कांचे
संरक्षण करणे शक्य होणार आहे. म्हणूनच माहितीचा अधिकार हा समृद्ध लोकशाहीचा पाया
आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. अर्थातच या समृद्ध लोकशाहीच्या पायाची जाणीव
आणि त्याविषयीची योग्य ती जागरूकता केवळ प्रसारमाध्यमांद्वारेच सर्वांपर्यंत येत असते
हेही तितकेच वास्तव सत्य आहे.
थोडक्यात माहितीचा अधिकार प्रदान केला गेल्यामुळे भारतीय प्रसारमाध्यमांचे स्थान
आणि नागरिकांचे मूलभूत हक्क यामध्ये माहितीच्या अधिकारामुळे लोकांच्या वर्तन
व्यवहारात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल झालेले असून सर्व नागरिकांचे मूलभूत हक्क
अधिक मजबूत झालेले आहे. लोकशाहीमध्ये लोकांना विविध प्रकारची माहिती मिळविणे,
त्यावर स्वत:चे मत व्यक्त करणे, स्वत:च्या मतांचा, विचारांचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे
प्रचार-प्रसार करणे यासारख्या मूलभूत बाबींची प्राप्ती करून देणाऱ्या प्रसारमाध्यमांनी
लोकशाहीमध्ये महत्त्वाचे स्थान पटकाविले आहे. त्यामुळे लोकांना प्राप्त झालेला माहितीचा
मूलभूत हक्क आणि प्रसारमाध्यमांद्वारे प्राप्त झालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची योग्य सांगड
घालून अधिकृत माहितीचा योग्य ठिकाणी योग्य तो वापर करून संबंधित घटकांमध्ये
अपेक्षित ते यश मिळवून स्व-जीवनात परिवर्तन आणता येणे सहज शक्य आहे व त्याद्वारेच
सामूहिक विकासप्रक्रियेला देखील गती देवून शासकीय आणि निमशासकीय क्षेत्रातील
कारभारावर नियंत्रण ठेवून लोकप्रतिनिधींमार्फत त्या बाबी शेवटच्या घटकापर्यंत पोहचविता
येवू शकतात. ही किमया फक्त लोकशाहीतील माहिती अधिकार व प्रसारमाध्यमे यांच्यात
आहे. या दोन्हीही बाबी एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्या परस्परावलंबी आणि Self-Instructional
परस्परपूरक असून आजच्या लोकशाहीतील जीवनव्यवहार आणि समाज विकासाच्या Material 33
लोकशाहीतील
जीवनव्यवहार... दृष्टीने आधुनिक युगातील साधने म्हणून प्रसारमाध्यमांचे स्थान अद्वितीय आहेत हे नक्कीच.
लोकशाहीतील जीवनव्यवहाराला आणि वर्तन व्यवहाराला खऱ्या अर्थाने महत्त्व येते ते
NOTES माध्यमांमुळेच, म्हणून अशा माध्यमांच्या नीतीमूल्यांचे महत्त्व सांगताना जगद्विख्यात पत्रकार
‘वॉल्टर लिपमन’ म्हणतात की, "स्वतंत्र पत्रकारिता ही चंगळ नसून महान लोकशाही
समाजाची गरज आहे." अर्थातच सामान्य जनतेची पिळवणूक होऊ नये, शोषण होऊ नये
किंबहुना जास्तीत-जास्त सुरक्षित आणि सुस्थिर सर्व जनतेला लाभावे म्हणून प्रयत्नरत
असणारी राज्यव्यवस्था म्हणजेच लोकशाही असे मानले जाते. त्यादृष्टीने लोकशाही
संस्थांचा विकास आणि आधुनिक पत्रकारितेचा विकास हा हातात हात घालून झाला पाहिजे.
दोन्हीही बाजूंनी समान विकास झाला तर त्यातील जनताही मजबूत राहू शकेल. लोकशाहीमूल्ये
समाजात नीटपणे रुजली नाहीत तर स्वतंत्र पत्रकारिता निर्माणही होऊ शकत नाही आणि ती
टिकूही शकत नाही. साहजिकच स्वतंत्र पत्रकारिता नसेल तर लोकशाहीमूल्ये निर्माण होऊ
शकत नाही असे लिपमन यांचे म्हणणे यथार्थ वाटते. शिवाय लोकशाहीमध्ये ज्याप्रमाणे
प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य वाढले, महत्त्व वाढले त्याचप्रमाणे त्यांची जबाबदारीही वाढल्याचे
आपल्याला सांगता येईल, कारण केवळ बातम्या देणे किंवा माहिती पुरवणे एवढेच काम
प्रसारमाध्यमे करत नाहीत किंवा ते तेवढ्यापुरतेच मर्यादित राहिलेले नाही. तर त्याही पुढे
जावून प्रसारमाध्यमांनी जनतेला माहिती देऊन त्याचे विश्लेषण केले पाहिजे. त्याचा नेमका
अर्थ समजावून सांगितला पाहिजे. सद्य:स्थितीला नेमके काय होत आहे, काय व्हायला हवे,
काय व्हायला नको यासारख्या प्रश्नांवर योग्य ती चर्चा करणे आवश्यक आहे. लोकमताला
योग्य दिशा देण्याची, आकार देण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांची आहे. त्यातून लोकशिक्षण
घडवून आणणे, लोकचळवळींना प्रवृत्त करणे, समाजाच्या विविध घटकांतील संतुलन नीट
ठेवणे; राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक इत्यादी क्षेत्रातील प्राधान्यक्रम ठरविणे.
यासारख्या अनंत जबाबदाऱ्यांना समर्थपणे पेलत वृत्तपत्रांनी हा लोकशाहीचा चौथा खांब
अधिक भक्कम बनवून लोकशाही व्यवस्थेला अधिक बळकटी प्राप्त करून देणे गरजेचे
असते आणि आजमितीला वृत्तपत्रे ही जबाबदारी समर्थपणे पेलताना दिसतात. त्यामुळेच तर
लोकशाही प्रणालीत सर्वसामान्य जनतादेखील अनेक स्तरावरील व्यक्ती स्वातंत्र्याचा
मनसोक्त उपभोग घेताना दिसते. थोडक्यात आजची प्रसारमाध्यमे ही एका प्रचंड सामाजिक
शक्तीत रूपांतरित झालेली असून मानवी विकासाला ती समर्थपणे हातभार लावत आहे.
कारण कोणत्याही घटकाचे जेव्हा सामर्थ्य वाढते तेव्हा त्यांची जबाबदारीही वाढते आणि
त्याच्या वाढत्या शक्तीचा उपयोग समाजहितासाठी होणे सर्वार्थाने महत्त्वाचे ठरते. त्या
अर्थाने आजचे युग हे अधिक व्यापक आणि मोकळे झाल्याचे दिसते. माहितीचा प्रचार-प्रसार
इतक्या तातडीने होतो की त्याच्या इतकी व्यापकता आज कशाचीच नाही. काही माहितीची
तत्परता पाहिली तर क्षणभर सारे जगच एक झाल्याचा भास होतो. कोणतीच माहिती
मिळविणे, कुणासाठीच अशक्य राहिलेले नाही. इतकी सर्वव्यापी प्रसारमाध्यमे आज भारतात
आहेत. १९७५ पर्यंत दूरचित्रवाणी नव्हती पण आज मात्र त्याच दूरचित्रवाणीवर केवळ
भारतामध्ये ८०० पेक्षा जास्त वाहिन्या आहेत आणि ते आपापल्या भाषेतील, प्रांतातील,
विषयातील विविध घटकांना अनुसरून माहिती देण्याचे काम करत आहे. शिवाय वृत्तपत्रे
वेगळीच आहेत. तेही आपापल्या-परिने योग्य ती माहिती योग्य त्या वेळेत अपेक्षित
लक्ष्यगटापर्यंत पोहचविण्यात कार्यमग्न असतात यात शंका नाही.
Self-Instructional
Material 34
लोकशाहीतील
१.२.४. प्रसारमाध्यमे जीवनव्यवहार...

या जगात प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा संदर्भ प्रत्येक देशातील संविधानात NOTES
आढळतो. या संविधानात काही कलमे अशी आहेत त्यामुळे प्रत्येक पत्रकार आपले कार्य
सुव्यवस्थितपणे करू शकतो. प्रसारमाध्यमांतील लोकांना जे स्वातंत्र्य मिळते त्यावरून त्या
देशातील नागरिकांचे स्वातंत्र्य ठरते. आज भारतातील प्रसारमाध्यमे लोकशाहीत अपेक्षित
असलेले स्वातंत्र्य उपभोगत आहे. भारतात वृत्तपत्राची सुरूवात मुख्यत्वेकरून स्वातंत्र्यपूर्व
काळात इंग्रजांच्या जुलूम व अत्याचारापासून बचावासाठी झाली. सर्वप्रथम प्रसारमाध्यमातील
पत्रकाराच्या लेखणीचे अस्त्र म्हणून इंग्रजांना विरोध दर्शविण्यासाठी २९ जानेवारी १७८०
मध्ये ‘जेम्स हिकी’ यांनी 'बेंगॉल गॅझेट' नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केले. १७८९ मध्ये
बॉम्बे मध्ये 'बॉम्बे हेरॉल्ड' नावाच्या वृत्तपत्राची सुरुवात झाली.
वृत्तपत्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी ईस्ट इंडीया कंपनीच्या काळात ‘लॉर्ड वेलस्ली’ याने
सन १७९९ मध्ये 'प्रेस रेग्युलेटिंग अॅक्ट' म्हणजे प्रेस नियंत्रण अधिनियम लागू केला. या
अधिनियमामुळे वृत्तपत्रात संपादक, मुद्रक आणि मालकाचे नाव यांचा स्पष्टपणे उल्लेख
करणे असे बंधनकारक करण्यात आले. १८ जून १८५७ मध्ये इंग्रज सरकारने “गेगीग
अॅक्टची” सुरूवात केली. इ.स. १८७८ च्या अधिनियमाद्वारे वृत्तपत्रावर कठोर निर्बंध
लादण्यात आले. मॅजिस्ट्रेटना ‘व्हर्नाक्युलर अॅक्ट’मुळे सर्वाधिकार मिळाले. प्रादेशिक
भाषेतील वृत्तपत्रासाठी हे अधिनियम लागू करण्यात आले. व्हर्नाक्युलर अॅक्टमुळे
वृत्तपत्रासंबंधीचे सर्व अधिकार मॅजिस्ट्रेटकडे असल्यामुळे, मॅजिस्ट्रेटचा निर्णय हा अंतिम
निर्णय असे, त्याच्या विरोधात कोणतीही अपील करण्याची परवानगी नसे. परंतु हा नियम
इंग्रजी वृत्तपत्रांना लागू करण्यात आला नव्हता.
लॉर्ड हेस्टिंग याच्या विरोधात लॉर्ड एडम्स यांनी सन १८२३ मध्ये नियम केले. यानुसार
परवाना नसताना प्रकाशन केल्यास ४०० रु. दंड व नियमाचे उल्लंघन केल्यास मॅजिस्ट्रेट
मुद्रणालय जप्त करीत असे. कोणाचेही परवाना जप्त करण्याचा अधिकार मॅसिस्ट्रेटला होता.
त्या अधिकारामुळेच राजा राममोहन रॉय बांचे 'मिरात-उल-अखबार' हे वृत्तपत्र बंद पडले.
सन १८३५ साली गव्हर्नर जनरल चार्ल्स मेटकाफ यांनी १८२३ चे नियम रद्दबातल ठरवून
भारतीय भाषेतील वृत्तपत्रांना स्वातंत्र दिले.
सन १८५७ मध्ये भारतीय भाषेतील वृत्तपत्रावर पुन्हा एकदा ‘गदर’च्या कारणामुळे
निर्बध घालण्यात आले. वृत्तपत्राच्या प्रकाशनापूर्वी सरकारकडून नियमानुसार परवानगी घेणे
बंधनकारक होते. वृत्तपत्राने वृत्तपत्राच्या प्रकाशनापूर्वी प्रत्येक मुद्रित सामग्री, प्रकाशन आणि
मुद्रण संस्थेचे नाव देणे बंधनकारक होते. याच नियमानुसार पुस्तक प्रकाशनापूर्वी एक
महिना अगोदर पुस्तक सरकारकडे द्यावे लागत. १८७० च्या अधिनियम द्वारा ‘भारतीय दंड
संहिता कलम १२४-ए’ द्वारे राजद्रोहात्मक सामग्री प्रकाशित करणाऱ्या व्यक्तीला आजीवन
कारावास शिक्षा करण्यात येत असे.
या सर्व अधिनियमाद्वारे सरकारने वृत्तपत्रीय कायद्यात कठोर निर्बंध आणले. त्यामुळे
मॅजिस्ट्रेटला सर्वाधिक अधिकार होते. लॉर्ड कर्झनने वृत्तपत्र कायद्यात बदल घडवून त्यातील
अधिनियम अधिक कडक करण्यात आले. मॅजिस्ट्रेटला सर्वतोपरी अधिकार म्हणजेच
एखाद्या वृत्तपत्रात आपत्तीजनक मजकूर छापून आल्यास किंवा सरकार विरोधात बातमी
आल्यास वृत्तपत्राची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार देण्यात आला. पुढील काळात ‘भारतीय Self-Instructional
रक्षा विनिमय कायदा सन १९९४’ मध्ये अमलात आणला. त्यामुळे भारतातील वृत्तपत्रावर Material 35
लोकशाहीतील
जीवनव्यवहार... कडक नियंत्रण ठेवण्यात आले. त्याचेच रूपांतर १९३१ साली ‘भारतीय प्रेस अधिनियम’ व
त्यापुढील काळात १९३५ मध्ये पूर्ण स्वरूपात त्याचे रूपांतर करण्यात आले. तत्कालीन
NOTES पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी २६ जून १९७५ साली आणीबाणी लागू केल्यानंतर
वृत्तपत्रावर कठोर निर्बंध लागू केले. आणीबाणी संपुष्टात आल्यानंतर १९७५ मध्ये ‘नवा
प्रेस अधिनियम’ अमलात आला.

१.२.५. भारतीय राज्यघटना आणि प्रसारमाध्यमे


प्रसारमाध्यम हे भारतीय लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून गणले जाते. एकविसावे
शतक हे माहिती-तंत्रज्ञान व प्रसारमाध्यमाचे युग म्हणून ओळखले जाते. खरे तर आजची
सर्व प्रसारमाध्यमे ही सामाजिकदृष्टीने प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घर करुन बसली आहेत.
प्रसारमाध्यमांमुळे जगातील प्रत्येक गोष्ट ही प्रत्येकास कळते. आजच्या परिस्थितीत खूप
अपेक्षा वाढलेल्या आहेत. भारतीय राज्यघटनेमध्ये सांगितले गेले आहे की, प्रसारमाध्यम हे
लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. स्वातंत्र्याबद्दलचा त्याच्या अधिकाराबद्दलचा उल्लेख
आढळतो. यावरून आपणास प्रसार व प्रसिद्धी माध्यमाचे अन्ययसाधारण महत्त्व समजते.

भारतामध्ये २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना पूर्णत्वास आली. राज्यघटन मसुदा


समितीच्या अध्यक्षतेखाली पार पडली. दि. २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटना लागू
करण्यात आली. मुलभूत हक्क ही भारतीय संविधानातील ‘मुलभूत सनद’ आहे. ही सनद
भारतीयांना ‘भारतीय नागरिक’ म्हणून त्यांचे आयुष्य शांतता आणि समानतेने व्यतीत
करण्याचे नागरी अधिकार प्रदान करते. या मूलभूत हक्कांपुढे कायद्यापुढे समानता, उच्चार
आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, शांततेने कोठेही उपस्थित राहण्याचे व सभा स्वातंत्र्य आणि
नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी संवैधानिक प्रतिकारासाठी ‘habeas corpus’ यासारख्या
याचिकांचा अधिकार असे उदारमतवादी लोकतांत्रिक देशांमध्ये असलेल्या अधिकारांचा
Self-Instructional समावेश होतो. या अधिकारांचा भंग केल्यास न्यायालयाच्या विवेकानुसार भारतीय दंडविधान
Material 36 संहितेखाली शिक्षा होऊ शकते. मुलभूत मानवी अधिकाराखाली भारतीय नागरिकाच्या
लोकशाहीतील
व्यक्तिमत्त्वाच्या योग्य आणि मैत्रीपूर्ण प्रगतीसाठीचे हक्क अशी भारताच्या मूलभूत हक्कांची जीवनव्यवहार...
व्याख्या केली जाऊ शकते. हे हक्क संपूर्ण जगात वंश, जन्माचे ठिकाण, धर्म, जात,
संप्रदाय, रंग, लिंग यात भेदभावाशिवाय सर्व नागरिकांना लागू आहेत. काही बंधने वगळता NOTES
हे अधिकार न्यायालयाद्वारे सर्व ठिकाणी लागू आहेत. इंग्लंडचे हक्कांविषयीचे विधेयक,
अमेरिकन संयुक्त राज्यांचे हक्कांविषयीचे विधेयक आणि फ्रान्सचे माणसाच्या अधिकाराच्या
घोषणा यांमध्ये भारताच्या मूलभूत अधिकारांचे मूळ आहे. भारतीय संविधानाने प्रदान केलेले
सात मूलभूत अधिकार खालील प्रमाणे आहेत.

१. समानतेचा हक्क

२. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क

३. शोषणापासून संरक्षणाचा हक्क

४. धार्मिक निवड व स्वातंत्र्याचा हक्क

५. सांस्कृतिक व शैक्षणीक हक्क

६. संवैधानिक प्रतिकाराचा हक्क

७. मालमत्तेचा हक्क (हा हक्क ४४ व्या संवैधानिक दुरुस्तीनुसार मुलभूत अधिकारातून


वगळून कायदेशीर अधिकार म्हणून नमूद करण्यात आला आहे.)

खासगी व समुदायाच्या भल्याकरता असणाऱ्या स्वातंत्र्याला ‘हक्क’ असे संबोधले


जाते. भारतीय घटनेने प्रदान केलेले हक्क हे भूभागाचे मुलभूत कायदे यामध्ये अंतर्भूत.
प्रत्येक नागरिकास राज्यघटनेमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने
बोलण्याचा अधिकार व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे परंतु प्रसारमाध्यमांना तो
अधिकार दिलेला नाही. कलम १९ मध्ये या संदर्भातील सविस्तर विवेचन केलेले आहे. या
कलमाद्वारे प्रत्येकास मतस्वातंत्र्य व भाषणस्वातंत्र्य असण्याचा अधिकार आहे. या
अधिकारात कोणतीही ढवळाढवळ न होता मत बाळगण्याच्या स्वातंत्र्याचा, तसेच कोणत्याही
माध्यमातून व सीमांचा विचार न करता माहिती व विचार ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे, ती
मिळवणे व इतरांना ती देणे या संबंधीच्या स्वातंत्र्याचा समावेश होतो.

१.२.६. लोकशाहीचा चौथा खांब


वृत्तपत्रकारितेद्वारे वाचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या वृत्त विषयक गरजा भागविणारी माध्यमे
म्हणजे वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमे होत. या माध्यमांच्या संदर्भात
लोकशाहीत राज्यव्यवस्थेची इमारत कायदेमंडळ, राज्य शासन किंवा कार्यकारी मंडळ व Self-Instructional
न्यायसंस्था व पत्रकारिता या चार आधारस्तंभांवर उभी असते; ही कल्पना प्रथम मेकॉलेने Material 37
लोकशाहीतील
जीवनव्यवहार... १८२८ मध्ये आपल्या 'कॉन्स्टिट्यूशनल हिस्टरी' या निबंधात मांडली. वृत्तपत्रांच्या संदर्भात
त्याने 'चौथी शक्ती' असा शब्दप्रयोग केला होता. तसेच, कार्लाइलने 'हिरो वर्शिप अँड
NOTES हिरोइक इन हिस्टरी' (१८४१) या आपल्या ग्रंथातील 'द हिरो अॅज मॅन ऑफ लेटर्स' या
प्रकरणात एडमंड बर्कचे पुढील उद्गार उद्धृत केले आहेत. "मानवी जीवनाचे नियमन
करणाऱ्या धर्मसत्ता (लॉर्डस स्पिरिच्युअल), राजसत्ता (लॉर्डस टेम्पोरल) व लोकसत्ता
(कायदेमंडळ) या तीन शक्तींप्रमाणे नव्हे; त्यांच्यापेक्षाही अधिक महत्त्वाची शक्ती म्हणजे
पत्रकारिता (प्रेस गॅलरी) होय." यावरून या माध्यमात चालणाऱ्या कार्यपद्धतीचे व त्यात
काम करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचे स्वरूप आणि महत्त्व ध्यानी येऊ शकते. माहिती देणे,
उद्बोधन करणे व मनोरंजन करणे ही कार्ये पार पाडताना या माध्यमावर अनेक प्रकारचे
दबाव येत असतात. ते झुगारून किंवा त्यांना सामोरे जात नि:पक्षपातीपणे काम करणारी
माध्यमे ही लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मोठा हातभार लावत असतात.

१.२.७. प्रसारमाध्यमांचे ठळक विशेष


प्रसारमाध्यमांचे हे सर्वसाधारण स्वरूप लक्षात घेता पुढील ठळक विशेष म्हणून सांगता
येतात.

• आधुनिक प्रसारमाध्यमे ही जनसंपर्काची गतिशील व प्रभावी माध्यमे आहेत.

• सर्वदूर व सर्वांपर्यंत तत्काळ संदेश/माहिती पोहोचविणे हे, प्रसारमाध्यमांचे ठळक व


महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

• जगाला जवळ आणण्यात प्रसारमाध्यमांचा मोठा वाटा आहे.

• तात्कालिकता, ताजेपणा, तत्परता हे सर्वच प्रसारमाध्यमांचे विशेष आहेत.

• प्रसारमाध्यमे ही जगाचे दर्शन घडवणारी खिडकी आहे.

• माहिती, मनोरंजन, मार्गदर्शन, मतप्रदर्शन व सेवा ही प्रसारमाध्यमांची कार्ये आहेत.

• शासनसंस्थेवर अंकुश ठेवणे आणि जनमत व जागृती घडविणे हे प्रसारमाध्यमांचे


कर्तव्य आहे. (प्रसारमाध्यमे आणि मराठी, उज्वला भोर, पृष्ठ क्र. ३४)

१.२.८. प्रसारमाध्यमे आणि संसदीय विशेष अधिकार


आदर्श आणि मजबूत लोकशाहीकरिता जनता आणि जनमत असणे आवश्यक आहे.
Self-Instructional प्रसारमाध्यमाचे महत्त्वाचे कार्य म्हणजे जनतेला जागृत करणे व जनमत तयार करणे होय.
Material 38 संसदीय कामकाजाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविणे. संसदेतील लोकसभा
लोकशाहीतील
आणि राज्यसभा हे दोन्ही सभागृहे व त्यातील सदस्य आणि विविध समित्या यांना मुक्तपणे जीवनव्यवहार...
बोलण्याचा अधिकार आहे. त्यांना आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. संविधानातील
अनुच्छेद १०५ नुसार संसदेमध्ये वाक्स्वातंत्र्य, संसदेतील कोणत्याही सदस्याला एखाद्या NOTES
विषयावर स्वतंत्र्यपणे आपले मत मांडण्याचा अधिकार आहे.
भारतातील प्रसारमाध्यमांमुळे संसदेचे कामकाज, कार्यवाही, कोर्टाची कार्यवाही
निर्भीडपणे प्रकाशित आणि प्रशासनाचे अनेक कायदे तयार होण्यास मदत झालेली आहे .
तसेच त्यात फेरबदल देखील करण्यात आले आहेत.

१.२.९. प्रसारमाध्यमे आणि न्यायालये


भारतीय न्यायव्यवस्थेची संविधानानुसार एक स्वतंत्र व स्वायत्त प्रणाली आहे.
त्याचप्रमाणे न्यायालय आणि प्रसारमाध्यमांचा जवळचा संबंध आहे. न्यायालयाचे वार्तांकन
करण्याअगोदर त्याचे वार्तांकन खूप काळजीपूर्वक, जबाबदारीने करावे लागते. कारण
थोडीशी चूकदेखील न्यायालयाचा अवमान ठरू शकते. न्यायालयाचा अवमान होऊ नये
म्हणून १९७१ मध्ये नया अधिनियम लागू करण्यात आला. त्यास ‘न्यायालयाचा अवमान
अधिनियम १९७१’ असे संबोधले जाते. या अधिनियमानुसार खालील कृत्यांमुळे न्यायालयाचा
अवमान होऊ शकतो.

१. न्यायालयाचा अथवा माननीय न्यायाधीशांची निंदा करणे.

२. न्यायालयावर पक्षपातीचा आरोप करणे.

३. न्यायालय अथवा न्यायालयीन प्रक्रियेत हस्तक्षेप करणे.

४. न्यायालयीन प्रशासनात हस्तक्षेप किंवा न्यायालयीन कामकाजात अडथळा किंवा


विरोध करणे.

५. दिवाणी किंवा सिव्हील न्यायालय अवमान


वरील सर्व कृत्ये करणे म्हणजे न्यायालयीन अवमान करणे होय. प्रसारमाध्यमातील
एखाद्या व्यक्तीने जन न्यायालयीन आदेशाचे, निर्णयाचे विश्लेषण करत असेल तर त्याचा
अवमान होतो. न्यायालयांचा उपरोधिक अवमान हा गंभीर स्वरूपाचा अपराध मानला जातो.

१.२.१०. प्रसारमाध्यमे व इतर कायदे


भारतीय तार अधिनियम १८८५, भारतीय सरकारी रहस्य अधिनियम १९२३, वृत्तपत्र
नियतकालिके नोंदणी, पुस्तक पंजीकरण, प्रेस पुस्तक पंजीकरण अधिनियम १८६७,
श्रमजीवी पत्रकार अधिनियम १९५५, पुरस्कार प्रतियोगिता अधिनियम १९५५, श्रमजीवी Self-Instructional
पत्रकार गैरप्रकार अधिनियम १९५५, कॉपीराईट अॅक्ट १९५७, प्रसारभारती संबंधित Material 39
लोकशाहीतील
जीवनव्यवहार... अधिनियम, संसद कार्यवाही (प्रशासन व संरचना) विधेयक १९७७, माहितीचा अधिकार
१९९६ इ. इतर माध्यमासंबंधित कायदे आहेत.
NOTES

१.२.११. प्रसारमाध्यमाची तत्त्वे


स्वातंत्र्यपूर्व काळात प्रसारमाध्यमांचा (वृत्तपत्रे) वापर जुलमापासून बचावासाठी होता.
परंतु आजच्या युगात ती व्यवसायाच्या माध्यमातून सर्वसामाण्यांसमोर येत आहे. ज्याप्रमाणे
अन्य व्यावसायिक समूहाची काही आचारसंहिता असते त्याचप्रमाणे प्रसारमाध्यमांची काही
मार्गदर्शक तत्त्वे आहेत. प्रसिद्धी माध्यमे किंवा प्रसारमाध्यमे कोणत्याही गोष्टींशी जोडले
गेले असले तरी त्यांना आपल्या मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करावेच लागते. भारतात तसेच
इतर देशात असे अनेक कायदे आहेत जे प्रसारमाध्यमांना लागू आहेत. त्यांचे पालन
प्रसारमाध्यमांशी जोडल्या गेलेल्या सर्वच व्यक्तींना करावेच लागते. त्याच आधारे
प्रसारमाध्यमाची काही मार्गदर्शक तत्त्वे ही पुढीलप्रमाणे आहेत.

१. आपल्या लेखणीचा उपयोग सदैव राष्ट्रहित, समाज आणि मानवहितासाठी करणे.

२. माध्यमातील लिखाण हे तथ्यावर आधारित तसेच पुराव्यानिशी असावे.

३. राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनातूनच काही गोष्टीची गोपनीयता बाळगणे.

४. वैयक्तिक स्वार्थासाठी पत्रकारितेचा वापर न करणे.

५. व्यक्तीगत जीवनातील निराधार गोष्टी प्रकाशित न करणे.

६. निष्पक्षता आणि आत्मसन्मान पत्रकाराचा प्राथमिक गुण असला पाहिजे.

७. पत्रकारांनी राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक आधारावर मानव जातीतील भेद


करू नये.

१.२.१२. सारांश
एकूणच लोकशाहीमध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका ही ‘ओपिनियन् मेकर्स’ अर्थात मत
निर्मात्याची आहे हे निर्विवाद आहे. त्यामुळे जनमत तयार करण्यापासून तर जनतेचा आवाज
सत्ताधारी शासनापर्यंत पोहचविण्याचे काम प्रसारमाध्यमाद्वारेच केले जाते. ज्यामुळे
लोकशाही शासनप्रणाली बळकट होण्यास मदत होते. नागरिकांचे सार्वभौमत्व अबाधित
ठेवून लोकशाही व्यवस्था ही जिवंत ठेवण्याचे महत्कार्य आज प्रसारमाध्यमांद्वारे होत आहे.
Self-Instructional त्यादृष्टीने विचार केला तर लोकशाही व्यवस्थेमध्ये व्यक्तीला सर्वतोपरी व्यक्तिविकासाच्या
Material 40 दृष्टीने प्रवृत्त करणे, त्याचे व्यक्तिस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवून त्याचे
लोकशाहीतील
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैचारिकदृष्ट्या दृढीकरण करण्याची जीवनव्यवहार...
जबाबदारी प्रसारमाध्यमांनी स्वीकारलेली आहे. त्यामुळेच प्रसारमाध्यमांचे लोकशाही
व्यवस्थेमध्ये असणारे महत्त्व हे त्रिकालाबाधित आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. NOTES
त्यायोगेच मानवी आणि नैतिक मूल्यांची पाठराखण होवून लोकशाहीमूल्ये विकसित होतात
आणि लोकशाही व्यवस्थेचा पाया असणारे 'लोक' हे सर्वार्थाने बळकट होतात.

१.२.१३. महत्वाचे शब्द


१. प्रेस पुस्तक पंजीकरण अधिनियम : पुस्तक प्रकाशन व्यवसायाबाबत नियम
२. कॉपीराईट अॅक्ट : एखाद्या पुस्तकासंदर्भात किवा वस्तू संदर्भातील हक्क
३. माहितीचा अधिकार : एखाद्या विषयावर सखोलपणे माहिती मिळण्यासाठीचा कायदा

१.२.१४. सरावासाठी प्रश्न


१. भारतीय राज्यघटना आणि लोकशाही याबाबत थोडक्यात सांगा.
२. प्रसारमाध्यम हे भारतीय लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणून का गणले जाते.
३. प्रसारमाध्यमाचे ठळक विशेष सांगा.
४. प्रसारमाध्यमांची काही मार्गदर्शक तत्त्वे सांगा.

१.२.१५. अधिक वाचनासाठी पुस्तके


१. डॉ. संदीप सांगळे, व्यावहारिक उपयोजित मराठी, डायमंड प्रकाशन्, पुणे
२. डॉ. गीतांजली चिने, डॉ. हरेश शळके, ‘आधुनिक भारतीय भाषा :
मराठी.’,प्रशांत प्रकाशन, पुणे.
३. प्रा. डॉ. उज्ज्वला भोर : प्रसारमाध्यमे आणि मराठी, प्रशात प्रकाशन, पुणे.
४. जोंधळे राजू वामनराव : प्रसारमाध्यमे आणि सामाजिक परिवर्तन,
लेख- २०१२
५. करंजाळकर मंदार : चित्रपट क्षेत्रातील करिअर : एक उत्तम संधी,
response.lokprabha@express.india.com
६. चव्हाण हर्षल : ‘संहिता’ माझ्या नजरेतून, लेख- १९ ऑक्टोंबर २०१३
७. भारत सत्य न्यूज २०२० : 16th Mumbai International Film Festival
2020 (MIFF)
८. नंदेश्वर संदीप : प्रसारमाध्यमे संचालित लोकशाही, नागपूर २०१४
९. प्रकाशबाळ : अक्षरनामा, आजच्या भारतातील प्रसारमाध्यमं एक दृष्टिक्षेप, १७
ऑक्टोंबर २०२०
१०. बहेती खुशालचंद : Indian Streams Research Journal, Vol. 3, Self-Instructional
Issue –12, Jan-2014. Material 41
प्रसारमाध्यमांसाठी लेखन
प्रसारमाध्यमांसाठी
घटक २. प्रसारमाध्यमांसाठी लेखन लेखन

२.१ वृतपत्रांसाठी बातमीलेखन आणि मुद्रितशोधन


NOTES

२.१ प्रस्तावना
२.२. उद्दिष्टे
२.३. वृत्तपत्राचे स्वरूप
२.३.१. बातमीचा अर्थ
२.३.२. बातमी म्हणजे काय
२.३.३. बातमीबाबत
२.३.४ बातमी शोधण्यातील कौशल्य
२.३.५. बातमीची रचना (घटक)
२.४.. बातमीची भाषा
२.५ वृत्तपत्रासाठी बातमीचे विषय
२.६. सारांश
२.७. महत्वाचे शब्द
२.८. सरावासाठी प्रश्न
२.९. अधिक वाचनासाठी पुस्तके

२.१ प्रस्तावना
प्रसारमाध्यमांची विभागणी ही दृक् प्रसारमाध्यमे आणि श्राव्य प्रसारमाध्यमे अशी केली
जाते. दृक् प्रसारमाध्यमांमध्येच अंतर्भूत असलेले माध्यम म्हणजे- मुद्रित माध्यम, प्रिंट
मीडिया. यात वृत्तपत्राचा समावेश होतो. आकाशवाणी हे श्राव्य माध्यम आहे. विविध
वाहिन्या, संगणक आणि दृक्-श्राव्य माध्यमांमध्ये विभागली जातात. या सर्व माध्यमांची
आपापली स्वतंत्र वैशिष्टे आहेत. मात्र या सर्व माध्यम प्रकारांचा समाजावर बरा-वाईट प्रभाव
पडत असतो. ‘प्रसारमाध्यम’ हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो. आजच्या
आधुनिक काळात लोकशाही व्यवस्थेमध्ये अत्याधुनिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी विविध
माध्यमांच्याद्वारे शोध घेतला जातो. ज्ञानप्राप्ती आणि ताज्या घडामोडींची माहिती देण्यासाठी
प्रसारमाध्यमे महत्त्वाची भूमिका पार पाडतात. एक व्यक्ती म्हणून व्यक्तिमत्त्व संपन्नता आणि
देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून आत्मविश्वासाने उभे राहण्यासाठी सामान्य माणूस ते
बुद्धिमंत हे प्रसारमाध्यमावरच अवलंबून असतात, असे म्हटल्यावर वावगे ठरणार नाही.
कारण प्रसारमाध्यमे हे लोकशिक्षणाची भूमिका पार पाडत असतात.हे खरे असले तरी मुद्रित
माध्यमांनाही काही लेखनकौशल्ये आपल्या माध्यमातून मांडावी लागतात.
सकाळी उठल्याबरोबर आपण चहा घेतल्यानतंर आपल्या हातात वृत्तपत्र हवे असते.
वृत्तपत्रे ही वाचकांची कुतूहलता निर्माण करणारे साधन आहे. देशाच्या सर्व कानाकोपऱ्यातील
घटना सर्वसामान्यपर्यंत पोहचवण्याचे काम हे माध्यम करत असते. म्हणून आपल्याला Self-Instructional
वृत्तपत्रात येणाऱ्या बातम्या या सर्व समावेशक असल्याकारणाने वृत्तपत्रातील लेखन आजच्या Material 43
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन स्थितीला महत्त्वपूर्ण ठरते.
अ) बातमी म्हणजे काय? ब) बातमीची भाषा आणि मांडणी, क) एकूण माध्यमातील
NOTES बातमीचे महत्व, ड) बातमीची रचना आणि तिचे वेगळेपण या सर्वांचाच आपण अभ्यास
करणार आहोत.
‘वृत्तपत्र' म्हणजेच बातमी अथवा वृत्त देणारे पत्र म्हणजेच बातम्या देणारे, माहिती
देणारे साधन-वर्तमानपत्र होय. कोणत्याही वर्तमानपत्राचे मुख्य भांडवल असते ती बातमी.
एखाद्या चांगल्या, चवदार, चमचमीत भोजनासाठी मसाला आणि मीठ आवश्यक असते,
तसेच चांगल्या वर्तमानपत्रासाठी बातम्या आवश्यक असतात. या मूळ भांडवलावरच
वृत्तपत्राची रचना होत जाते आणि ती पूर्णत्वाला नेता येते.

२.२. उद्दिष्टे
• वृत्तपत्रांचे स्वरूप स्पष्ट करता येईल.
• वृत्तपत्रांचा इतिहास सांगता येईल.
• प्रमुख वृत्तपत्रे व त्यांचे कार्य स्पष्ट करता येईल. मराठीतल्या पत्रसृष्टीचा बदल कसा
होत गेला ह्याचे विवेचन करता येईल.
• स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर पत्रसृष्टीच्या स्वरूपातील भेदाची कारणमीमांसा करता
येईल

२.३. वृत्तपत्राचे स्वरूप


एक वृत्तपत्र आणि एखाद्या विशिष्ट भाषेतील वृत्तपत्रे यांच्या विचारातून वृत्तपत्राचे व
वृत्तपत्रसृष्टींचे स्वरूप स्पष्ट होत असते. एका वृत्तपत्राचे स्वरूप तपासत असताना खालील
वृत्तपत्रीय बाबी लक्षात घ्याव्या लागतात. त्यामध्ये - अ) वृत्तपत्रीय आशय, ब) वृत्तपत्राची
रचना, क) वृत्तपत्राची मांडणी या घटकांचा विचार करावा लागतो. या तीन घटकांच्या
समन्वयातून कोणत्याही 'वृत्तपत्राचा चेहरा' प्रकट होत असतो. या तीनही घटकांमध्ये काही
तांत्रिक बाबींचाही समावेश केला जातो. वृत्तपत्र वर्षानुवर्षे आपला चेहरा टिकवून ठेवते,
तेव्हा या वरील तीन घटकांचाही सातत्याने आणि यथोचित वापर होत होता हे आपोआपच
सिद्ध होते.
उदा. भांडवलशाहीवादी दैनिक

लोकशाहीवादी दैनिक

समाजवादी दैनिक

कष्टकरी - कामगारांचे दैनिक


Self-Instructional
Material 44 पक्षीय विचारधारांचा पुरस्कार करणारे दैनिक
प्रसारमाध्यमांसाठी
लोकांच्या इच्छा, लोकांचे विचार, लोकांचे प्रश्न समजावून घेण्याचे व त्यांना वृत्तपत्रातून लेखन
अभिव्यक्त करण्याचे कार्य वृत्तपत्र करते. समाजाचेराजनैतिक, आर्थिक, सामाजिक प्रबोधन
करणे, जनता आणि शासन यांच्यातील दुवा बनून सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे, प्रसंगी NOTES
प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे कार्यही वृत्तपत्र करत असते. समाज आणि राष्ट्र याच्या
विकासात वृत्तपत्रांचा महत्त्वाचा सहभाग असतो. अशा विधायक दृष्टीच्या लेखनामधून
वृत्तपत्राला आपला चेहरा अबाधित राखता येतो.
भारतासारख्या विकसनशील देशात वृत्तपत्रांची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे.
लोकशिक्षणाचे प्रभावी माध्यम म्हणून वृत्तपत्राला महत्त्व आहे. साधारणपणे बातम्यांचे
विविधांगी स्वरूप, संपादकीय पानांची विशिष्ट रचना, छायाचित्रांचा सुबकपणे केलेला
वापर या सर्वांमधून वृत्तपत्र आकार घेते. त्यामुळेच आजवर वृत्तपत्रात छापल्या जाणाऱ्या
सर्वच मजकुरावर लोकांचा जो विश्वास आहे तो यत्किंचितही ढळलेला नाही. मराठी
वृत्तपत्रांचा उगमही ही सामाजिक भूमिकेतून झाला आहे.

२.३.१. बातमीचा अर्थ :-


१. बातमी म्हणजे जाहिररीत्या सांगितलेली गोष्ट
२. चारही दिशांकडून (संकलित) माहीत होणारी सत्य गोष्ट म्हणजे बातमी.
३. एखादया गोष्टीबद्दल जिज्ञासा वाटते ती बातमी.
४. घटना घडल्यानंतर ती लोकांच्या दृष्टीने महत्त्वाची असल्यास तिचे नि:पक्षपाती व
काटेकोर निवेदन म्हणजे बातमी.

२.३.२. बातमी म्हणजे काय ?


सर्वसाधारणपणे ‘बातमी म्हणजे काय’ या सर्वसमावेशक गोष्टीचा विचार करीत
असतांना त्याचे आधारभूत घटकांचा विचार करणे गरजेचे आहे. बातमी ज्यातून तयार होते,
असे पाच 'क'कार आहेत. ते आपण लक्षात घेतले पाहिजे.

Self-Instructional
Material 45
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन 'कोण', 'काय', 'कोठे', 'केव्हा' आणि 'का' हे ते प्रसिद्ध 'क'कार आहेत. या सगळ्यांची
एकत्र बांधणी केली की, बातमी होऊ शकते. रोजचा अंक/वर्तमानपत्र वाचतानाही
NOTES आपल्याला त्याची कल्पना येऊ शकते. संपूर्ण जगभरातील पत्रसृष्टीत हे पाच 'क'कार
सर्वमान्य आहेत. त्यांपैकी एकही 'क'कार नसला तरी बातमी अपुरी, अर्धवट राहण्याची
शक्यता असते. याच्याच बरोबरीने हे सारे 'कसे' घडले हेही सांगण्याची आवश्यकता असते.
त्या दृष्टीने 'कसे' हाही घटक महत्त्वाचा असतो. याचाच अर्थ एकूण 'क' कार ६ होतात.
त्यांची उत्तरे असणारे तपशील बातमीच्या इंट्रोमध्ये देणे आवश्यक असते. यातील काही
उत्तरे बातमीतल्या तपशिलात येतात, ज्याने बातमीला पूर्णता प्राप्त होते.
सुरवातीला ताज्या घडामोडी म्हणजे बातमी होय. बातमी अथवा वृत्त देणारे पत्र म्हणजेच
वृत्तपत्र होय. सगळीकडच्या बातम्या देणारे पत्र म्हणजेच वृत्तपत्र. एका वाहिनीवर मध्यंतरी
NEWS या शब्दाची फोड करताना ‘North (उत्तर), East (पूर्व), West (पश्चिम)
आणि South (दक्षिण) या दिशांचा उल्लेख करून सर्व दिशांचे कव्हरेज आम्ही करतो’,
अशी जाहिरात केलेली पाहायला मिळाली. वृत्तपत्रांचे सामर्थ्य, त्यांची शक्ती बातम्यांच्या
संकलनात, सर्वप्रथम, अधिकाधिक बातम्या देण्याच्या एकूण व्यापक यंत्रणेशी जोडलेली,
सामावलेली असते.
डॉ . प्रकाश मेदनकर यांनी 'उपयोजित मराठी' या त्यांच्या ग्रंथात बातमीच्या
व्याख्या दिलेल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे...
• “बातमी म्हणजे अनेक लोकांना ज्यात रस वाटेल अशा नुकत्याच घडलेल्या घटनेची
वस्तुनिष्ठ माहिती”
• “घटना घडल्यावर ती महत्त्वाची असल्यास तिचे नि:पक्षपाती, काटेकोर निवेदन
म्हणजे बातमी.”
• “पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण (पू.प.उ.द.) या चारही दिशांच्या कक्षेत पडणारा
महत्वपूर्ण (हल्ली अंतराळात घडलेल्या घडामोडींचीही बातमी असते.)”

वरील सर्व व्याख्यांवरून घटना घडली तरच बातमी होऊ शकते, म्हणजेच समाजात
उत्सुकता व कुतूहल निर्माण करणाऱ्या घटना घडल्यानंतर ती बातमी होऊ शकते हे स्पष्ट
होते. म्हणजेच जॉन बी बोगार्टच्या मते, '’कुत्रा माणसाला चावला. ही बातमी होऊ शकत
नाही; पण माणूस कुत्र्याला चावला, ही घटना मात्र बातमी होऊ शकते.' ज्याप्रमाणे 'बातमी
म्हणजे एखादी अनपेक्षित घटना. त्या घटनेत एक वेगळेपण असणे गरजेचे आहे. एखादी
घटना लोकांना कळावी म्हणून तिची वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याजोगी माहिती म्हणजे
बातमी. अशा प्रकारे मेदनकारांच्या व्याख्यांचा ऊहापोह करता येतो.

२.३.३. बातमीबाबत :
बातमी देणे म्हणजे वस्तुस्थितीचे चित्रण करणे होय, आपले कोणतेही पूर्वग्रह बातमी
लिहिताना ठेवणे म्हणजे व्यावसायिक प्रतारणाच म्हणावी लागेल. म्हणूनच असे म्हटले जाते
की, 'Facts are sacre , but comment is free.’ म्हणजेच वस्तुस्थिती पवित्र आहे,
पण त्यावरची मते मुक्त असू शकतात. येथे वस्तुस्थिती म्हणजे घडलेली घटना अर्थात
Self-Instructional बातमी असा अर्थ अपेक्षित आहे. Facts च्या जागी आपण News हा शब्द घेऊ शकतो.
Material 46 वृत्तपत्रासंबंधी लिहिल्या गेलेल्या अनेक पुस्तकांमधून वर्तमानातील ताज्या घडामोडीबाबत
प्रसारमाध्यमांसाठी
सांगण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. लेखन

(१) बातमीचे स्तोत (News sources) NOTES

'द न्यूजपेपर्स हॅण्डबुक' चे लेखक रिचर्ड कीबल यांनी म्हटल्याप्रमाणे वृत्तपत्राच्या


बातम्यांची उगमस्थाने प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरची असतात. प्राथमिक अथवा पहिल्या
टप्प्यातील स्रोत हे थेट स्वरूपाचेच असतात. बहुतेक सगळ्या घडामोडी त्यातूनच शब्दबद्ध
अथवा वार्ताच्या रूपाने दिल्या जातात. हे स्रोत कोणते असतात? केवळ कीबलच नव्हे तर
अनेक वृत्तपत्रविद्या विषयावरील लेखकांनी या स्रोतांचा उल्लेख केला आहे. हे स्रोत असे
:

(१) संसद भवन

(२) विधान भवन

(३) न्यायालये

(४) महापालिका अथवा नगरपालिका

(५) पोलीस आयुक्त अथवा पोलीस अधीक्षक कार्यालये

(६) खेळांची मैदाने

(७) उद्योग क्षेत्रातील ‘चेंबर्स ऑफ कॉमर्स’सारख्या संघटना

(८) शेती-सहकार, शिक्षण-आरोग्य यांच्याशी संबंधित प्रमुख सरकारी कार्यालये

(९) वाङमयीन संस्था, विद्यापीठे, परीक्षा मंडळे, नाट्यनिर्मिती संस्था, आदी स्रोत

(१०) राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नेते, तसेच कामगार संघटनांचे नेते आणि
पदाधिकारी

(११) अलीकडच्या काळात बिगर शासकीय स्वयंसेवी संघटना अथवा कृतिगट यांनाही
बातम्यांचे स्रोत मानावे लागेल. सरकारी धोरणांचा, कायद्याच्या अंमलबजावणीचा एकूण
परिणाम, त्याचे जनजीवनावरील परिणाम या सर्वांबाबत वृत्तपत्रांकडे तपशीलवार माहिती
अशा संघटनांकडून अथवा कृतिगटांकडून येत असते.

(१२) न्यायालयांचे निवाडे : सामाजिक - राजकीय गुन्हेगारी संदर्भातील अनेक महत्त्वपूर्ण


निवाडे बातम्यांचे स्रोत ठरतात. Self-Instructional
Material 47
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन बातमीच्या उगमस्थानांचा विचार करताना दुसऱ्या स्तरावरील घटकात यांचा समावेश
करता येईल ते पुढीलप्रमाणे :
NOTES
१) स्थानिक दृष्ट्या महत्त्वाचे असणारे विषय व त्यासंदर्भात.

२) विविध क्षेत्रातील दबावगटाकडून बातम्या मिळतात. समाजात विविध स्वरूपात


दबावगट काम करीत असतात. त्यांच्या संघटना कार्यरत असतात. त्यांच्याकडून बातम्या
मिळू शकतात. सरकारी कर्मचारी, हमाल-मापाडी, रिक्षा व्यावसायिक, व्यापारी, फेरीवाले,
कारखान्यातील कामगार, शेतकरी याच्या संघटना आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी,
अस्तित्व दृढ करण्यासाठी आंदोलने करीत असतात. त्यांच्या बातम्या या विविध
दबावगटांकडून येत असतात.

३)विश्वसनीय सूत्र - विश्वसनीय गोटातून मिळणारी बातमी: अशा गोटातून मिळणाऱ्या


बातम्या विश्वासाने, खात्रीने दिल्या जातात. प्रत्येक वृत्तपत्राचे, पत्रकारांचे असे काही
'Source' (स्रोत) असतात की, ज्यांच्यावर विश्वास ठेवून कोणताही अधिकृत हवाला न
देता या बातम्या दिल्या जातात. या बातम्यांना विशेष महत्त्व असते. कारण त्याच्यानंतर
पुढचे कवित्व सुरु होत असते.
याखेरीज आजच्या सद्यस्थितीमध्ये महत्त्वाचा स्रोत म्हणून विविध क्षेत्रांतील 'Celebrity'
व्यक्तींच्या जीवनाकडे निर्देश करता येईल. या सुप्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनातील सुखदुःखाचे
क्षण टिपण्यासाठी वृत्तपत्रांपासून सर्वच प्रसारमाध्यमे उत्सुक असतात. राजकारण, चित्रप,
क्रीडा क्षेत्र आणि आर्थिक जगतातील नामवंत अशा साऱ्यांचा समावेश या घटकात होतो.
त्यांच्या जीवनातील छोटी - मोठी घटना वृत्तपत्रात छायाचित्रासह येते. इतके त्याचे वेगळेपण
आता निर्माण झाले आहे. प्रसार माध्यमांच्या दृष्टीने या नामवंतांचे यश - अपयश बातमीचा
महत्त्वाचा स्रोत म्हणून रूपांतरित झाले आहे. अमिताभ बच्चनसारख्या मोठ्या पडद्यावरील
कलावंताने यशस्वी कारकीर्द पूर्ण केल्यावर 'कौन बनेगा करोडपती' या चित्रवाणीच्या
कार्यक्रमात संचालन करायचे ही बातमी त्यामुळे खूपच महत्त्वाची ठरते.

२.३.४. बातमी शोधण्यातील कौशल्य :-


अधिकृत, औपचारिक आणि कागदपत्रांच्या आधारे दिल्या जाणाऱ्या बातम्या त्या त्या
महत्त्वाप्रमाणे दिल्या जातात.मात्र जिथे विश्वास, आपुलकी यांचा आधार घेऊन,
सरकारीनिर्बंधाचा , नियमांचा ससेमिरा चुकवून बातमी मिळवायची आहे, तेथे बातमीदाराचे
कौशल्य पणाला लागते. व्यावसायिक कुशलतेचा हा एक आविष्कार असतो.
१) HARD NEWS: म्हणजे अतिशय ताजी, महत्त्वाची, वातावरण बदलणारी
घटना. या घटनेची बातमी सर्वाधिक महत्त्वाची मानली जाते. या बातमीच्या तपशिलात बदल
होत जातो, परिणामी आणखी नवी घडामोड बातमीच्या अग्रभागी येते. एखाद्या दिवसाची
HARD NEWS म्हणून त्या त्या वेळी ताज्या, महत्त्वाच्या बातमीकडे लक्ष वेधले जाते.
घडलेल्या घटनेचा तपशीलच यात इतका महत्त्वाचा असतो की, तो अधिकाधिक देणे
Self-Instructional महत्त्वाचे असते. उदा. निवडणूक निकालाच रंग बदलणारी आकडेवारी, एखादा भीषण
Material 48 अपघात.
प्रसारमाध्यमांसाठी
२) SOFT NEWS: एखादी अनपेक्षित राजकीय घडामोड किंवा तत्सम घटना लेखन
या अशा स्वरूपाच्या असतात. या स्वरूपाच्या बातम्या मुख्यतः सांस्कृतिक-शैक्षणिक
संदर्भातल्या असू शकतात. एखाद्या वक्त्याचे वसंतोत्सव व्याख्यानमालेत भाषण अथवा NOTES
एखाद्या लोकप्रिय गायकाची रंगलेली मैफल, पुस्तक प्रकाशन, वाङ्यमयीन चर्चा, अशा
सर्वच बातम्या या स्वरूपात मोडतात. या बातम्या समाजाचे एकूण स्वास्थ्य दर्शविणाऱ्या
असतात; हे आपल्या लक्षात येईल. एखाद्या कलावंताचा, लेखकाचा वाढदिवस अथवा
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा वाढदिवस यांच्या बातम्या SOFT NEWS मध्येच
मोडतात. वर्तमानपत्राचा तोल हा अशा बातम्यांच्या आधारे उभा असतो; असे म्हटले तरी
हरकत नाही.

(३) न्यायालयीन कामकाजाच्या बातम्या:


याखेरीज काही विशेष महत्त्वाचे विषय बातमीच्या दृष्टीने लक्षात ठेवावे लागतात.
न्यायालयीन निवाडे, कामकाजाच्या बातम्या हा आजच्या काळात सर्वाधिक जिज्ञासेचा
विषय बनला आहे. अनेक महत्त्वाच्या विषयांमध्ये न्यायालयीन हस्तक्षेप केल्यामुळे गंभीर
गोष्टींकडे समाजाचे लक्ष वेधले गेले आहे. त्यामुळे न्यायालयीन बातम्यांना विशेष महत्त्व
आले आहे. भ्रष्टाचारापासून न्यायसंस्था अलिप्त आहे; असा विश्वास जनसामान्यांमध्ये
असल्यामुळे या बातम्यांना सामाजिक महत्त्व आले आहे.
न्यायालयीन बातम्यांचे क्षेत्रही विस्तारले आहे. खाजगी कच्चे दावे यांपासून ते जनहितार्थ
असलेल्या प्रश्नांपर्यंतचे खटले त्यात येतात. शिवाय सरकारी स्तरावरील काही विषयही येत
असतात, याबाबत न्यायालयाला निर्णय द्यावा लागतो. या बातम्या देताना कोणती काळजी
घ्यावयाची, त्याचे निकष कोणते, त्याबाबत अन्य निर्बंध आहेत का, याचा विचार करावा
लागतो. कायद्याची भाषा ही मुळात नियम-पोटनियम, दुरुस्त्या आणि नेमकी शब्दरचना
यांनी बनलेली असते. त्या दृष्टीने काळजी घ्यावी लागते. या बातम्या देताना ‘न्यायालयाचा
अपमान होणार नाही, त्याबाबत सूचक टिप्पणी होणार नाही,’याची दक्षता घ्यावीच लागते.
अन्यथा संबंधित वर्तमानपत्रे, संपादक यांना तत्संबंधी खटल्या देण्याची वेळ येते.
लोकशाहीवादी समाजाच्या दृष्टीने न्यायालयाचे महत्त्व अबाधित आहे. पोलिस, समाज,
गुन्हेगार आणि न्यायालयीन निर्णय या सर्वांचे समग्र दर्शन न्यायालयाच्या बातम्यांमधून
मिळत असते. कायद्याची किमान माहिती, भाषेची अचूक जाण असणाऱ्या बातमीदारांच्या
दृष्टीने 'न्यायालय’ अत्यंत महत्त्वाचे ठरते आणि त्याचा वृत्तपत्रालाही उपयोग होतो. वृत्तपत्रात
काम करणाऱ्या पत्रकारांना-बातमीदारांना या स्वरूपाच्या बातम्या देताना समाजाचे व्यापक
भान ठेवावे लागते. या गोष्टी कायद्याच्या तांत्रिकतेच्या पलीकडे बघाव्या लागतात. कायद्याचा
गैरवापर करू पाहणारे राजकारणी, अधिकारी हितसंबंधी गट या सर्वांना न्यायालयीन
बातम्यांमुळे, त्यातील निर्देशामुळे रोखले जाते.अलीकडच्या काळात कायद्याची भाषा
वापरून भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांनी किती प्रभावीपणे
निवडणूक यंत्रणा राबवली, याची आठवण नव्याने करून देण्याची गरज नाही. सगळी
प्रशासकीय यंत्रणा, राजकीय पक्षांचे नेते, त्यांचे कार्यकर्ते या सर्वांना या निवडणूक कायद्याने
शिस्त लागली. निवडणूक खर्च म्हणून अवाच्या सवा पैसे उधळणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना
लगाम लागले. जातीचा - धर्माचा आधार घेऊन प्रचार करणाऱ्यांना लोकप्रतिनिधित्वाच्या
कायद्यानुसार आपले स्थान सोडण्याची वेळ आली. अशा अनेक घटनांचे वार्ताकन करताना Self-Instructional
बातमीदारावर खूप मोठी जबाबदारी येते. Material 49
प्रसारमाध्यमांसाठी २.३.५. बातमीची रचना (घटक)
लेखन
वृतपत्रासाठी बातमी लेखन करतांना बातमीची रचना किती आणि कशी वेगळी असेल,
NOTES असा प्रश्न साहजिकच तुमच्या मनात येतो. बातमीची रचना करणे हे कौशल्य आहे.
वृत्तपत्रांमध्ये जागेची मर्यादा पाहून वृत्तपत्रातील बातमी दिली जाते. बातमीचे स्वरूप, त्यांचे
विषय या सर्व गोष्टी मूळ गाभा म्हणून महत्त्वाच्या आहेत. मात्र तिची रचना ही एखाद्या
चांगल्या पोशाखाप्रमाणे विचारात घ्यावी लागते. बातमीच्या रचनेवर तिचे एकूण स्वरूप
आपल्याला लक्षात येऊ शकते.
परंपरागत बातमीची रचना ठरली असली तरी सद्यस्थितीत त्यात मोठया प्रमाणात बदल
होत आहे. शीर्षकापासून ते तपशिलापर्यंत नवनवे प्रवाह त्यात आलेले दिसतात. विशेषतः
इंग्रजी वृत्तपत्रात हे जास्त जाणवते. बातमी लिहिताना त्या घटनेतील सर्वात महत्त्वाची गोष्ट
अग्रभागी यायला हवी. त्याच्या मोजक्या तपशिलातच बातमीचे शीर्षक सापडले पाहिजे.
म्हणजेच बातमीचा जो इंट्रो किंवा लीड आहे, त्यातच या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या
पाहिजेत. यासाठी आपण पुढील उदाहरणे लक्षात घेऊ या. ही उदाहरणे विविध वृत्तपत्रांतून
येथे घेतली आहेत. काहींची शीर्षके, काहींचे लीड तर काही बातमीतला तपशील या
सगळ्यांचा सर्वांगीण विचार तुम्हांला करता येईल.

१. बातमीचा शिरोभाग लिहिताना तो साधा लिहायचा की सारांशात्मक लिहायचा हे निश्चित


करणे गरजेचे आहे.

२. काही वेळा, कोण, केव्हा, कोठे, कसे, काय, कधी आणि का ? या 'क' कारांनी
बातमीचा शिरोभाग लिहिणे अपेक्षित असते.

३.कधी कधी काही बातम्यांना वाङ्मयीन किंवा ऐतिहासिक संदर्भ असतात. त्यांचा
उल्लेख प्राधान्याने शिरोभागातच करणे आवश्यक असते.

४. कधी कधी एखाद्या बातमीमध्ये विरोधाभासात्मक आशय दडलेला असतो तर काही


बातम्यांमध्ये प्रश्नार्थक घटक दडलेले असतात. बातमीदाराने त्यातील योग्य-अयोग्याची
पारख करून त्या बाबी शिरोभागात मांडणे गरजेचे असते.

शिरोभागात अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश होतो. म्हणून बातमीच्या शिरोभागाची


योग्य रचना झाल्यानंतर त्याखाली एका पाठोपाठ एक बातमीच्या मूल्यानुसार त्यातील मुद्दे
येणे अपेक्षित असते. म्हणजे शिरोभागामध्ये
१. अत्यंत महत्वाचे आणि लक्षवेधक असे मुद्दे
२. त्यानंतर त्याच्याशीच निगडीत आणखी काही माहिती
३. त्यानंतर पूरक पार्श्वभूमी सांगणारे मुद्दे
४. त्यानंतर कमी महत्त्वाची व गरजेची माहिती
५. किरकोळ तपशील
६. सरतेशेवटी अत्यंत कमी महत्त्वाची माहिती
Self-Instructional वर दिलेल्या क्रमाने बातमी रचना करून बातमी लेखन झाले तरच वृत्तपत्रामध्ये ती
Material 50 बातमी वाचकप्रिय होऊ शकते.
प्रसारमाध्यमांसाठी
या बातमीचे तपशील देताना कोणते बदल केले आहेत, हे लक्षात घ्या. पहिले पान लेखन
१ वाजता दिले. त्यानंतर दुसरे पान २ वाजता दिले आणि तिसरे पान पहाटे ५ वाजता दिले.
हे लक्षात घ्या. यात लक्षात हे घ्यायला हवे की, रात्रपाळीची धावपळ कशी होते ते वेळापत्रक NOTES
सांभाळायचे असते.

उलटा पिरॅमिड/उलटा त्रिकोण/Inverted Pyramid

याप्रमाणे बातमीची रचना असते. ही रचना परिच्छेदात्मक असते आणि त्याचबरोबर


क्रमवार असते. बातमीतील महत्त्वाचे मुद्दे हे क्रमाने मांडले जातात. बातमीतील सर्वात
महत्वाचे मुद्दे हे पहिल्याच परिच्छेदात मांडले जातात. या परिच्छेदाला ‘अग्रपरिच्छेद’ असे
म्हणतात. वृत्तपत्राच्या परिभाषेत त्याला ‘लीड’ किंवा ‘इंट्रो’ असे म्हटले जाते. अग्रपरिच्छेदाला
बातमीच्या रचनेत महत्त्वाचे स्थान असते. यात सहा 'क' काराची उत्तरे मिळाली पाहिजेत.
हे सहा 'क' कार म्हणजे कोण? केव्हा? कुठे? काय? का? कसे? हे सहा प्रश्न होय.
घटनेला हे सहा प्रश्न विचारले म्हणजे घटनेतील महत्त्वाचा तपशील मिळतो. शिवाय घटनेची
मध्यवर्ती कल्पनाही येते. प्रत्येक बातमीला मजकूर हा त्या बातमीच्या प्रकृतीनुसार तयार
होत असतो. अग्रपरिच्छेदाची भाषा ही त्यानुसार बदलत जाते.

२.३.६. बातमीची भाषा :


वृत्तपत्रांमधून सोपे शब्द वापरताना बातमीतील तपशील किंवा त्यातील गुंता याबाबत
वाचक अडखळणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागते. सध्या काही दैनिके स्वतःची
शैली-पुस्तिका तयार करतात. त्यामुळे वृत्तपत्रांनी बातम्यांत व लेखनात कोणते शब्द
वापरावयाचे, याचा एक आराखडाच समोर उपलब्ध होतो. यातून बरेच नवे शब्द तयार
होतात आणि त्यांचा वापरही वाढतो. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषाशुद्धीचा आग्रह धरला
होता. 'मेयर' या शब्दासाठी त्यांनी 'महापौर' हा पर्यायी मराठी शब्द सुचवला. आज तो
सर्वमान्य झाला आहे. 'Count down' या शब्दाचा उपयोग मुख्यतः उपग्रहांच्या
प्रक्षेपणांच्या बातम्या देताना पूर्वी येत असे. त्याला आता मराठी पर्यायी शब्द 'क्षण मोजणी'
हा उपलब्ध झाल्याने तो वापरला जातो आहे. 'यूनो' म्हणजे अर्थातच संयुक्त राष्ट्रसंघ. Self-Instructional
आपण एरव्ही व्यवहारात बोलताना 'यूनो' असा शब्द प्रयोग वापरतो. मात्र 'संयुक्त राष्ट्रसंघ' Material 51
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन हे त्याचे मराठी रूपांतर वापरणे आता रूळलेले दिसते. शैली-पुस्तिका बनवणे आणि
त्यानुसार आपापल्या वृत्तपत्रातील बातम्यांची आणि लेखनाची भाषा विकसित करणे ही
NOTES गोष्ट त्या दृष्टीने अनिवार्य झाली आहे. बहुतेक आघाडीची वृत्तपत्रे त्याबाबत काळजी
घेतात.

२.३.७. वृत्तपत्रासाठी बातमीचे विषय


• अनेक स्तरावरील सामाजिक विषयावरील बातमी:
महागाई, भ्रष्टाचार, आंदोलने, मोर्चे, आर्थिक उलाढाली, पैशाचे व्यवहार, शेअर
बाजार, सोने-चांदी बाजारातील चढ-उतार, गुंतवणुकदार, जकात (टॅक्स) इ.

• विविध प्रकारच्या राजकीय बातम्या :


सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, स्थानिक सत्ता, निवडणूका, निवडणूकांतील यश-
अपयश, निवडणूकांतील पळवापळवी, आरोप-प्रत्यारोप, विविध नेत्यांची भाषणे,
राजकीय चळवळी आणि आंदोलने, राज्यसभा, लोकसभा, मंत्रीमंडळ, मंत्री परिषद,
आमदार-खासदार, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान, सरपंच, विविध स्थानिक संस्थांचे
सभापती, पदाधिकारी, अध्यक्ष, कार्यकर्ते, मतदान, मतमोजणी इ.

• आरोग्य विषयक बातम्या:


विविध आजार, त्यावरील उपायात्मकऔषधे, प्रकृतीच्या तक्रारी, त्यासंदर्भातील
लसीकरणे इ.

• अनपेक्षित घटनांविषयक बातम्या:


अपघात, बॉम्बस्फोट, दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस, भूकंप, चक्रीवादळे,
ढगफुटी, ज्वालामुखी यासारख्या अनेक नैसर्गिक आणि आकस्मिक आपत्ती, अकाली
होणाऱ्या काही मोठ्या व्यक्तीचे निधन, अचानक उद्भवलेले संसर्गजन्य रोग, अनेक
रोगांच्या साथी, कला-क्रीडा क्षेत्रातील होणाऱ्या अपेक्षित घडामोडी इ.

• अनेक महनीय व्यक्तींच्या संदर्भातील बातम्या:


विविध राजकीय नेते, धार्मिक नेते, चित्रपटसृष्टीतील तारका, उत्कृष्ट कलाकार,
उत्कृष्ट गायक-नर्तक, नावलौकिक मिळविलेले समाजसेवक, कार्यकर्ते, कारखानदार,
वैज्ञानिक संशोधन यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण व्यक्ती.

• पोलिसांशी संबंधित बातम्या:


खून, मारामाऱ्या, डाका-दरोडे, चोऱ्या-दंगली, अपघात, आत्महत्या इ.

• संशोधन किंवा विविध शोधांशी निगडीत बातम्या:


अवकाश संशोधनासंबंधित, ग्रह-उपग्रहांच्या संदर्भातील बातम्या इ.
Self-Instructional
Material 52 यासारख्या विविध विषयांवर अनेक स्तरावर वृत्तपत्रामध्ये बातमी लेखन होऊ शकते
प्रसारमाध्यमांसाठी
आणि ते केलेही जातात. फक्त त्यासाठी गरज आहे चौकस आणि चाणाक्ष बातमीदाराची. लेखन
बातमीदाराने आपल्या चौकस बुद्धीने चौफेर बातम्या हेरल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून
कोणत्या विषयावर किती भर द्यायचा, कोणता विषय वगळायचा आणि किती दर्जेदार NOTES
बातमी देऊन संबंधित विषय वाचकांच्या मनात कसा रुजवायचा याची सर्वस्वी जबाबदारी
बातमीदाराची असते. वरीलपैकी कोणत्याही क्षेत्रातील कशाही स्वरूपाच्या बातम्या त्या त्या
वृत्तपत्राला एका विशिष्ट उंचीपर्यंत पोहचविण्याचे काम हे बातमीदार करत असतो. म्हणून
वृत्तपत्रामध्ये बातमी आणि बातमीदार हे दोन्ही घटक म्हणजे ‘वृत्तपत्राचा गाभा’ असतात.
एका अर्थाने ते वृत्तपत्राचा प्राणच असतात. बातमी आणि बातमीदाराशिवाय वृत्तपत्र ही
संकल्पना पूर्णत: अपूर्ण ठरते. म्हणून बातमीदाराने योग्य पद्धतीने बातमीचे लेखन करणे
अपेक्षित ठरते.

२.४ बातमीची भाषा


बातमी लेखनात भाषेला अनन्यसाधारण महत्त्व असते. म्हणून बातमी लेखनात भाषा
वापरताना पुढील काही पथ्य पाळणे गरजेचे आहे.

१) बातमीची भाषा ही साधी, सोपी व सुटसुटीत असावी. क्लिष्ट व अनाकलनीय भाषेचा


वापर टाळावा.

२) बातमी लिहिताना अलंकारीक शब्दांचा वापर टाळावा.

३) बातमी ही पाल्हाळीक व लांबलचक नसावी.

४) बातमीतील बाक्ये ही लहान व अर्थपूर्ण असावीत.

५) बातमी ही सूचक नसावी तर स्पष्ट असावी त्यात शब्दाच्या ‘अभिधा’ शब्दशक्तीचा


वापर व्हावा.

६) इंग्रजी किंवा इतर भाषेतून बातमी ही भाषांतरित होत असेल तर वाचकाला आकलन
होईल अशी शब्दयोजना त्यात असावी.परभाषेतील शब्दांना पर्याय देताना स्वभाषेतील
प्रचलित शब्दांचाच वापर करावा.

७) बातमी ही घटनेने कथन करणारी असते. म्हणून मग निवेदनात्मक विवेचन हवे,


वर्णनात्मक नको.

८) बातमीत घटनेचे कथन करताना निष्कर्षाची भाषा वापरणे अयोग्य आहे.

९) बातमीच्या भाषेमुळे वाचकाच्या मनात संभ्रम अथवा भीती निर्माण होईल, अशी Self-Instructional
भाषिक योजना करू नये. Material 53
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन १०) वृत्तपत्रांचा वाचक हा सर्वच वयोगटातील व सर्व स्तरांतील असतो. त्यामुळे प्रत्येक
वयोगटाला साजेल अशा स्वरूपाची वाक्यरचना हवी.
NOTES

२.५. बातमी लेखन करताना पाळावयाची पथ्ये


बातमी लेखन करताना पुढील काही पथ्ये पाळणे गरजेचे आहे.

१) बातमी ही वस्तुनिष्ठ असावी. जशी घटना घडलेली असेल तसेच तिचे निवेदन
बातमीत असावे.

२) बातमी ही ऐकीव माहितीवर नसावी तर ती सत्यावर आधारित असावी. वार्ताहराने


बातमीची स्वतः शहानिशा करून घटनेतले तथ्य जाणून घेणे गरजेचे आहे. अन्यथा घटना
घडलेलीच नसेल नुसती अफवा असेल तर समाजात चुकीचा संदेश जातो.

३) काहीतरी सनसनाटी छापावयाचे आहे. म्हणून काल्पनिक, खोट्या, चुकीच्या बातम्या


छापू नये.

४) बातमीमुळे जातीय दंगली, दोन धर्मात तेढ निर्माण होवून सामाजिकस्वास्थ बिघडणार
नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे.

५) बातमीमुळे एखाद्या सामान्य किंवा प्रथितयश व्यक्तीची किंवा संस्थेची हेतु पुरस्पर
बदनामी होता कामा नये.

६) बलात्कार, घरगुती हिंसा, महिलांवरील अत्याचार यांचे भडक वर्णन बातमीत करू
नये. बलात्कार किंवा अन्याय झालेल्या महिलेचे खरे नाव, पत्ता यांचा बातमीत उल्लेख
करू नये त्यासाठी काल्पनिक नाव वापरावे व तसा काल्पनिक नाव वापरल्याचा निर्देशही
करावा.

७) वाचकाचा स्तर पाहून बातमीचे लेखन करावे.

२.६. सारांश
अशाप्रकारे ऐकूण, पाहून व नोंद घेऊन लिहिलेला वृत्तांन्त हा खरा अधिकृत वृत्तांन्त
असतो. अशा वृत्तांन्त प्रश्नचिन्ह उभे केले गेले तरीही वृत्तांन्तवरील खरेपणाचा तपशील
नोंदवता येऊ शकतो. बातमी लेखन करताना वर उल्लेखिलेलेली पथ्य पाळली गेली तर
बातमी लेखनाचे कौशल्य सहज हस्तगत करता येते.
Self-Instructional अजून काही उदाहरणे पुढीलप्रमाणे :
Material 54
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन

NOTES

Self-Instructional
Material 55
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन
NOTES

Self-Instructional
Material 56
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन

NOTES

Self-Instructional
Material 57
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन २.७. महत्वाचे शब्द
NOTES १. मुद्रित माध्यम : MAULTI MEDIA
२. प्रिंट मीडिया : मुद्रण माध्यम
३. बातमीचे स्त्रोत्र : News sources
४. HARD NEWS : अतिमहत्वाचे
५. SOFT NEWS : क्रीडा, मनोरंजन, पुरस्कार याबाबतच्या बातम्या

२.८. सरावासाठी प्रश्न


१. बातमी म्हणजे काय?
२. उलटा पिरॅमिड म्हणजे काय?
३. वृत्तपत्राचे स्वरूप थोडक्यात सांगा.
४. बातमी लेखन करताना पाळावयाची पथ्ये कोणती?
५. बातमीची भाषा सांगा.
६. बातमीची रचना सांगा.

२.९. अधिक वाचनासाठी पुस्तके


१. वृत्तपत्रांचे संपादन : यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.
२. खोरे अरुण : मुद्रित मध्यमांसाठी लेखन कौशल्य, यशवंत चव्हाण महाराष्ट्र मुक्त
विद्यापीठ, नाशिक.
३. मोरळे महालक्ष्मी : वृत्तविदयेची ओळख, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाअंतर्गत प्रकल्प.
४. कुलकर्णी एस. के. (संपा.) : पावले पत्रकारिता, सकाळ चॅरिटी ट्रस्ट
प्रकाशन, चौथी आवृत्ती २००१.
५. प्रा. डॉ. उज्ज्वला भोर : प्रसारमाध्यमे आणि मराठी, प्रशात प्रकाशन, पुणे.

Self-Instructional
Material 58
प्रसारमाध्यमांसाठी
२.२. नभोवाणीसाठी भाषणाची लेखन

संहितालेखन NOTES

२.२.१. प्रास्तावना
२.२.२. उद्दिष्टे
२.२.३. भाषण लेखन : स्वरुप व तंत्र
२.२.४. आकाशवाणीवरील भाषणाचे स्वरूप
२.२.५. भाषण लेखनाचे तंत्र
२.२.६. आकाशवाणीवरील भाषण
२.२.७. आकाशवाणीवरील भाषण, चर्चा व मुलाखत
२.२.८. नभोभाषणाची भाषाशैली
२.२.९. नभोभाषणाची सुरुवात आणि शेवट
२.२.१०. नभोभाषणाचे विषय
२.२.११. नभोभाषणासाठी सूचना
२.२.१२ नमुना भाषण
२.२.१३. सारांश
२.२.१४. महत्वाचे शब्द
२.२.१५. सरावासाठी प्रश्न
२.२.१६ अधिक वाचनासाठी पुस्तके

२.२.१. प्रास्तावना
भाषण, चर्चा व मुलाखती हा
नभोवाणी प्रसारणाचा महत्त्वाचा भाग आहे.
वेगवेगळ्या प्रासंगिक महत्त्वाच्या विषयांवर
व प्रश्नांवर तज्ज्ञ व्यक्तींच्या भाषणातून
श्रोत्यांना उपयुक्त माहिती मिळते. ही
भाषणे सुलभ भाषेत आटोपशीर व
आकर्षक शैलीत असतात. समाजात
वेळोवेळी काही वाद, समस्या उत्पन्न होतात,
न्यावर तज्ज्ञांची चर्चा घडवून आणून
संबंधित प्रश्नांच्या वेगवेगळ्या पैलूंवर
प्रकाश टाकता यावा यासाठी चर्चा आयोजित केल्या जातात. चर्चेचे सूत्रसंचालन करणाऱ्यांची
भूमिका महत्त्वाची असते. चर्चा नियोजित आराखड्याप्रमाणे चालेल व त्यात सर्व महत्त्वाच्या
मुद्यांचा ऊहापोह होईल याची काळजी त्याने घ्यावयाची असते. नभोवाणीवरून विविध
प्रकारच्या मुलाखतीही प्रसारित होतात. त्यातून श्रोत्यांना एखाद्या प्रश्नाची, योजनेची माहिती, Self-Instructional
विशेष कर्तबगारी गाजवणाऱ्या व्यक्तीचे मनोगत, इत्यादी समजू शकते. थोडक्यात, माहिती Material 59
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन देणे, घडलेल्या घटनांच्या विविध बाजू व दृष्टिकोन पुढे आणणे या हेतूने नभोवाणीवर
भाषण, चर्चा व मुलाखत अशा विविध आकृतिबंधातून संप्रेषण घडवून आणले जाते.
NOTES नभोवाणीवरील भाषण हे साधारणत: १० मिनिटांचे असते. त्यापुढे त्याचा अवधी गेला
की तो कंटाळतो, म्हणून अगदीच अपवादात्मक परिस्थितीत १५ मिनिटांचे भाषण प्रसारित
केले जाते. नभोवाणीवरील भाषण हे लिहून काढलेले असले तरी ते निबंधवजा असून चालत
नाही. ते संभाषणवजा, अनौपचारिक शैलीतील असावे लागते. निबंध अथवा लेख हा वाचून
समजावून घ्यायचा असतो. त्यामुळे त्यात लांब पल्लेदार वाक्ये, अवघड शब्द, अवघड
युक्तिवाद, तपशीलवार माहिती आणि आकडेवारी यांचा समावेश केला तरी चालतो.
वाचकाला एखादा मुद्दा समजला नाही तर तो तेवढा भाग पुन्हा वाचू शकतो, एखादा शब्द
अडला तर शब्दकोशात त्याचा अर्थ पाहू शकतो. मुळातच लेख वाचताना त्याचे सर्व लक्ष
त्यात एकवटलेले असते. नभोवाणीच्या श्रोत्याची मन:स्थिती एवढी स्वागतशील असेलच
असे नाही. शिवाय नभोवाणीवरील भाषणातील एखादा शब्द, एखादा वाक्यांश त्याला
समजला नाही तर तेवढा भाग पुन्हा ऐकून तो समजावून घेण्याची सोय नसते. नभोभाषणातील
भाषा अतिशय सोपी असावी. त्यात अवजड कृत्रिम अलंकारिक वाक्यरचना असू नये.
लेखात ‘खालीलप्रमाणे', 'वरीलप्रमाणे', 'मागीलप्रमाणे’, असे संकेत चालू शकतात.
नभोभाषणात ते चालत नाहीत कारण नभोभाषण हे डोळ्यांऐवजी कानातून मनात उतरत
असते. लिखित मजकुरात 'व' सारखे उभयान्वयी अव्यय चालू शकते; परंतु नभोवाणीवर‘
आणि 'हे अधिक ठसठशीत, स्पष्ट अव्यय वापरणे इष्ट असते.

२.२.२. उद्दिष्टे

• नभोवाणीवरील भाषण व सभेतील भाषण यांतील फरक सांगता येईल.

• नभोवाणीवरील भाषणाची वैशिष्ट्ये व त्याच्या मर्यादा स्पष्ट करता येतील.

• नभोवाणीवरील भाषण लिहिताना, तसेच ते सादर करताना कोणती काळजी घ्यावयाची


त्याचे विवेचन करता येईल.

• नभोवाणीवरील भाषण व चर्चा यांतील फरक स्पष्ट करता येईल.

• नभोवाणी चर्चेतील सहभागी व्यक्ती व सूत्रधार यांच्या जबाबदाऱ्या कोणत्या त्या


सांगता येतील.

• नभोवाणीवरील मुलाखतींचे प्रकार व त्या कशा घेण्यात येतात यांची माहिती सांगता
येईल.

Self-Instructional • मुलाखत घेणाऱ्याने कोणती पथ्ये पाळावीत त्याच्या नोंदी करता येतील.
Material 60
प्रसारमाध्यमांसाठी
नभोवाणीवरील भाषणात फार सूक्ष्म तपशील, आकडेवारी अथवा नावांच्या याद्या लेखन
चालत नाहीत, एखाद्या प्रकल्पाचा खर्च १३२ कोटी ९७ लाख ३ हजार २३२ रुपये असा
असेल तर नभोवाणीवर सांगताना ही रक्कम १.३२ कोटी ९७ लाख रुपये अशी सांगणे उचित NOTES
ठरेल. आकडेवारी व तपशिलाचा भडिमार केला तर तो श्रोत्याच्या लक्षात तर राहत नाहीच,
उलट त्याने श्रोता कंटाळून रेडिओ बंद करतो किंवा दुसरे केंद्र लावतो. अशा प्रकारे
आपल्याला आकाशावाणी वरील भाषणाची संहिता तयार करण्याविषयीचे विस्तृत विवेचन
पुढे पाहूयात.

२.२.३. भाषण लेखन : स्वरुप व तंत्र


संवादाचे प्रभावी माध्यम म्हणजे भाषण होय. भाषण म्हणजे बोलणे पण हे बोलणे
निरर्थक नव्हे, तर हेतुपूर्वक बोलणे होय. विशिष्ट विषयाची केलेली तर्कशुद्ध मांडणी म्हणजे
भाषण असे आपण म्हणू शकतो.

२.२.४. आकाशवाणीवरील भाषणाचे स्वरूप


व्यवहारात भाषण हा शब्द आपण अनेकदा ऐकत असतो. विशेषतः राजकीय पक्ष,
उत्सव, सभा - संमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध वक्त्याकडून दिल्या जाणाऱ्या
व्याख्यानाच्या संदर्भात अशावेळी संबंधित निमंत्रिताचे व्याख्यान ऐकण्यासाठी मोठा समूह
श्रोता म्हणून जमा होतो. त्यामुळेच भाषण म्हणजे मोठ्या जनसमुहासमोर विशिष्ट विषयावर
केलेले विचार प्रगटीकरण असेही म्हणता येईल. आकाशवाणीवरील भाषणाच्या संदर्भात
जेंव्हा आपण विचार करतो तेव्हा सभा, समंलेनातील भाषणांपेक्षा आकाशवाणीवरील
भाषणाचे स्वरूप हे वेगळे दिसते. सभा संमेलनातील होणाऱ्या भाषणामध्ये मोठा श्रोता
समूहासमोर बसलेला असतो. तर आकाशवाणीवरील भाषणाच्यावेळी वक्त्यासमोर श्रोते
नसतात. ‘श्रोतावृंद समोर बसलेला आहे’, हे गृहीत धरून आकाशवाणीवर वक्त्याला भाषण
करावे लागते. हे भाषण लिखित स्वरूपाचे असते. सभासंमेलनातील भाषण हे लिखित
असेलच असे नाही. येथे सहज, उत्स्फूर्तता असते. आकाशवाणीवर मात्र उत्स्फूर्तता नसते.
आकाशवाणीवरील भाषण हे पूर्व नियोजित असते. येथे विषय दिलेला असतो व त्या
विषयाच्या अनुषंगानेच विचार प्रकट झाले पाहिजेत यावर आकाशवाणीचा कटाक्ष असतो.
आकाशवाणीवरील भाषण हे वाचून दाखवायचे असल्यामुळे व त्यातल्या त्यात वेळेची
मर्यादा असल्याने भाषण वेळेत संपवले जाईल असे भाषणाचे स्वरूप असते.

२.२.५. भाषण लेखनाचे तंत्र


आकाशवाणीवर भाषण करताना ‘भाषण कसे असावे’? या विषयीची माहिती आपण
जाणून घेतली . आकाशवाणीसाठी भाषण-लेखन करताना व भाषण सादर करताना विशिष्ट Self-Instructional
तंत्राचा अवलंब करावा लागतो ते तंत्र खालीलप्रमाणे आहे. आकाशवाणीवर भाषण करताना Material 61
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन वेळेची मर्यादा लक्षात घ्यावी लागते.

NOTES १. आकाशवाणीवरील भाषण हे साधारण १० मिनिटांचे असते. १० मिनिटांच्यावर अवधी


गेला की श्रोता कंटाळण्याची शक्यता असते. त्यामुळे १० ते १५ मिनिटे (१५ मिनिटेही
अपवादात्मक स्थितीत) या वेळेत भाषण संपवले गेले पाहिजे.

२. वेळेची मर्यादा लक्षात घेतली म्हणजे मग एका मिनिटाला १०० ते १२० शब्द बोलता
येतात त्यानुसार वाक्यरचना असावी.

३. भाषण हे आटोपशीर व सुटसुटीत असावे.

४. भाषण हे कागदाच्या एका बाजूला स्पष्ट व सुवाच्य अक्षरात लिहिलेले असावे.


त्यामुळे ध्वनिमुद्रणावेळी वाचन करताना अडचण येत नाही.

५. भाषणाचे ध्वनिमुद्रण होत असताना मायक्रोफोनमध्ये कागदाचा फर्र फर्र असा


आवाज ध्वनित होणार नाही याची काळजी घ्यावी. त्यासाठी संहितेचे सर्व कागद सुटे
करून, क्रमवार लावून ठेवावेत व भाषण करताना कागदावरील मजकूर संपल्यावर तो
कागद अलगद बाजूला ठेवावा.

६. संहितेचे प्रत्येक पान हे परिपूर्ण असावे. पानाच्या शेवटी वाक्य अर्धवट ठेवू नये.
वाक्य पूर्ण करून कागदावरील मजकूर संपवावा.

७. प्रसारित होणाऱ्या भाषणाच्या ध्वनिमुद्रणापूर्वी संहितेचा काळजीपूर्वक व मोठ्या


आवाजात वाचनाचा सराव करावा. उच्चारणाला कठीण जाणाऱ्या शब्दांऐवजी पर्यायी
शब्द वापरता येत असतील तर तशी दुरूस्ती करावी.

२.२.६. आकाशवाणीवरील भाषण :


परस्परांशी संपर्क, संवाद, संप्रेषण करण्याच्या गरजेतून माणसाने भाषा निर्माण केली.
या मौखिक किंवा बोलीभाषेचा वापर दैनंदिन व्यवहारात तो जेव्हा एकमेकांशी बोलण्यासाठी
करू लागला. तेव्हा या बोलण्याला 'संभाषण' म्हटले गेले. माणसाच्या या बोलण्याच्या
कलेतूनच समाजविकास साधताना आपले विचार वा म्हणणे दुसऱ्याला ऐकवण्यातून
‘भाषण' या प्रकाराचा जन्म झाला.
आकाशवाणीचे भाषण पूर्वनियोजित, प्रसारणापूर्वी लिहून काढलेले असे असते. त्यामुळे
या लेखनाचेही एक तंत्र असते. ते लक्षात ठेवून 'भाषण संहिता' लिहावी लागते. आकाशवाणीचे
भाषण, लिखित संहितासमोर ठेवून केले जात असले तरी इथे लेखनाची भाषा लिखित किंवा
ग्रांथिक असून चालत नाही. त्यामुळे प्रकट भाषणाची सर्व वैशिष्ट्ये लक्षात घेऊनच हे
Self-Instructional भाषण लिहावे लागते . वेळ मर्यादेत भाषण पूर्ण करण्यासाठी ते नीटपणे वाचताही आले
Material 62 पाहिजे. त्यासाठी हे लेखन स्पष्ट, खाडाखोड नसलेले, दोन शब्दांत योग्य अंतर असलेले,
प्रसारमाध्यमांसाठी
ठळक असे असावे लागते. कधी-कधी भाषण लिहून देणाराच ते सादर करतो असे नाही. लेखन
अशावेळी भाषण वाचणाऱ्या त्या दुसऱ्या व्यक्तीलाही ते अर्थ व भावासह समजले पाहिजे.
यासाठी विरामचिन्हांचा योग्य त्या ठिकाणी, उचित वापर करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. NOTES
यामुळे वाचणाऱ्याला शब्दाचा योग्य उच्चार करून आवाजात चढ-उतार करणे शक्य होते.

२.२.७. आकाशवाणीवरील भाषण, चर्चा व


मुलाखत :
आकाशवाणीवरील प्रसारणात भाषण, चर्चा, मुलाखत यांनादेखील महत्त्वाचे स्थान
आहे. सामाजिक-सांस्कृतिक घडामोडी जाणून घेण्याकरिता या आकृतिबंधाचा वापर करून
घेतला जातो. कधी प्रासंगिक विषयांवर एखादे भाषण आयोजित केले जाते; तर कधी
सामाजिक समस्यांच्या संदर्भात तज्ज्ञांची चर्चा घडवून आणली जाते. कधी एखाद्या क्षेत्रातील
कर्तृत्ववान, व्यक्तींची मुलाखत देखील प्रसारित केली जाते.

२.२.८. नभोभाषणाची भाषाशैली :


नभोवाणीवरील भाषा ही दैनंदिन वापरातील भाषा असावी; परंतु ती उथळ किंवा असभ्य
असता कामा नये. विषय कितीही अवघड असला तरी सोप्या, बोली, परिचित शब्दांमध्येच
मांडावा लागतो. 'झाडावर बसलेला पक्षी मला दिसत आहे’. हे वाक्य ‘वृक्षावर विराजमान
झालेला खग मजसी दृग्गोचर होत आहे' असे म्हटले तर कसे वाटेल? नाटकात किंवा काही
विशिष्ट प्रसंगी नाटकी, कृत्रिम भाषा शोभून दिसते. एखादा नेता युद्धासारख्या प्रसंगी
नभोवाणीवरून जनतेला उद्देशून आवाहन करतो, तेव्हा अशी अलंकारिक भाषा चालते, परंतु
एरवी रोजच्या व्यवहारात ती खटकेल.
नभोवाणीवर बोजड भाषा वापरू नये. फार मोठी लांबलचक वाक्ये असली तर त्यांचा
अन्वयार्थ लावता लावताच श्रोता रडकुंडीला येण्याची शक्यता असते. त्याऐवजी छोटी छोटी
वाक्ये असली तर ती श्रोत्याच्या मनात पटकन रुजतात. म्हणून भाषा ही साधी सोपी असावी.
भाषण शैली म्हणजे वक्त्याचे व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित करणारा जणू आरसाच. एकच
मुद्दा वेगवेगळा वक्ता आपापल्या विचारशक्तीनुसार, मनोधर्मानुसार वेगवेगळ्या प्रकारे
मांडतो. दत्तो वामन पोतदार यांच्यासारख्या परंतु काहीशा फटकळ विद्वानाची भाषाशैलीही
तशीच परखड; तर नरसिंह चिंतामण केळकर अथवा यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या
सौम्य व्यक्तिमत्त्वाच्या वक्त्यांची शैलीही तशीच मृदू, प्रसन्न, कोणालाही न दुखावणारी अशी
असते. साने गुरुजींच्या भावुक स्वभावाप्रमाणे त्यांची शैलीही हृदयाला हात घालणारी तर
आचार्य विनोबा भावे किंवा लोकमान्य टिळक यांचे लिखाण त्यांच्या स्वभावानुसार
तर्ककठोर, रोखठोक आणि खंबीर बाणा दर्शविणारे, आचार्य अत्रे यांची शैली त्यांच्या
व्यक्तिमत्त्वाप्रमाणेच आक्रमक, दिलदार आणि प्रसंगी सालडी सोलून काढणारी तर श्री. म.
माटे यांची शैली त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे खटकेबाज, येथील लोकपरंपरेत मुरलेली, Self-Instructional
अस्सल आणि कसदार! Material 63
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन नभोवाणीवरील भाषणही असेच आकर्षक शैलीदार असावे लागते. नीरस, स्वतंत्र
चेहरामोहरा नसलेले भाषण कोण ऐकणार? म्हणून भाषा ही रटाळ असू नये. जेणे करू
NOTES श्रोता हा आनंदी आणि विचारमग्न होईल. याचा विचार करुन भाषा असावी. ‘भाषण’
मुळात आपल्याला ती नभोवाणीची असो किवा दूरचित्रवाणीमध्ये असो, ते संभाषण हे
साध्या, सोप्या आणि रुचेल अशा शैलीत असावे.

२.२.९. नभोभाषणाची सुरुवात आणि शेवट :


कोणत्याही कार्यक्रमाचा आणि कार्याचा प्रारंभ चांगला, मनासारखा झाला ते कार्य निम्मे
साध्य झाल्यासारखे होते. नभोवाणीवरील भाषणाबाबत तर हे विशेषत्वाने खरे आहे. कारण
नभोभाषणाचा प्रारंभ हा श्रोत्याचे लक्ष वेधून घेऊ शकला नाही, तर पुढचे भाषण ऐकण्याचा
प्रश्नच उद्भवत नाही.
एखाद्या भाषणाची सुरुवात ही एखाद्या प्रवेशद्वारासारखी असते. प्रवेशद्वारामुळे लोकांचे
लक्ष आकर्षिले जाते आणि आतील वास्तूची ढोबळ कल्पनाही पाहणाऱ्याला येते. भाषणाचा
प्रारंभही असाच एकाचवेळी लक्षवेधक आणि भाषणविषयाची ओळख करून देणारा असावा
लागतो. श्रोत्याचे लक्ष वेधून घेण्यासाठी एखादे सुंदर सुभाषित, एखादी चारोळी, एखादी
चटकदार म्हण, एखाद्या प्रसिद्ध गीतातील ओळ यांचा उपयोग होऊ शकतो. काही गंभीर
प्रश्नावर चर्चा उदाहरणार्थ, प्लेगविषयीच्या एखाद्या भाषणाची सुरुवात "बरं झाले बुवा
ब्लड फ्लू ची साथ आली" अशी केली तर श्रोता स्वाभाविकपणेच आश्चर्यचकित होऊन
सावधपणे ऐकू लागतो.
त्याचे कारण ‘ब्लड फ्लू साथ’ ही बाब चांगली आहे अशातला भाग नाही, त्यामुळे
असे प्रतिपादन जर कोणी करू लागला तर कुतूहलतेने श्रोता ऐकू लागतो. भाषणाच्या
प्रारंभाप्रमाणेच शेवटही आकर्षक असावा लागतो. भाषणातील शेवटची वाक्ये श्रोत्याच्या
मनात बराच काळ रेंगाळत राहतील, त्याच्या मनात निनादत राहतील अशी असावीत.

२.२.१०. नभोभाषणाचे विषय


नभोवाणीवरील भाषणासाठी कुठल्याही प्रकारचे विषय चालू शकतात. आपल्या
श्रोतृगटाला कोणत्या विषयात रस वाटेल याचा विचार भाषणाचा विषय ठरवताना केला
जातो. विषयाची निवड करताना त्याची प्रासंगिकता, सामाजिक गरज इत्यादी निकषांचाही
विचार करावा लागतो. मग तो विषय एखाद्या काल्पनिक जगातील असो किवा वास्तविक
जगातील असो. विषय हा श्रोतु वर्गाला आवडायला हवा.
महिलांसाठी भाषण ठेवताना त्यांना दैनदिन जीवनात रोज येणाऱ्या अडचणी, त्यांचे
आरोग्य, बालसंगोपण, मुलांसाठी योग्य आहार, नवीन पाककृती इत्यादी विषय हे भाषणासाठी
उपयुक्त ठरतील. तर युवक आणि युवतीसाठी फॅशन्स, क्रीडा स्पर्धा, व्यायाम, चित्रपट-
नाटक, पराक्रमी महापुरुष आणि स्रिया अशा नानाविविध विषय रोचक ठरतील. लहान
Self-Instructional मुलांसाठी गंमतीदार खेळ, कोडी, थोरामोठ्यांची चरित्रे, नवीन वैज्ञानिक शोध असे विषय
Material 64 तर कामगारांसाठी कामगारविषयक नवीन कायदे, नवीन औद्योगिक उत्पादने, औद्योगिक
प्रसारमाध्यमांसाठी
विकासाविषयी शासनाच्या योजना, कारखान्यातील सुरक्षितता, कामगार चळवळी, इत्यादी लेखन
विषयांवरची भाषणे आवडतील.
काही वेळा सर्व समाजाला आकर्षित करणारी किंवा संपूर्ण समाजावर परिणाम करणारी NOTES
घटना असते. अशा वेळी सर्वच श्रोतगटांसाठी त्या विषयावर भाषण ठेवावे लागते.
दिवाळीसारखा सण असेल किंवा चित्रपटातील नवनविन वादअसतील अथवा करोनासारखी
आपत्ती असेल, अवकाळी पाऊस’ असेल अशा विषयांमध्ये सर्वच श्रोतृगटांना रस असतो.
त्यांच्या दृष्टीने उपयुक्त अशा पैलूंवर भाषण ठेवण्यात येते. दिवाळीचाच विषय घेतला तर
लहान मुलांसाठी दिवाळीचे किल्ले, आकाशकंदिल, फटाके उडविताना घ्यावयाची काळजी,
महिलांच्या कार्यक्रमात अभिनव पाककृती, घरांची सजावट, कामगारांसाठी बोनसचा योग्य
उपयोग, असे विषय घेता येतील. करोनासारख्या साथीविषयी सर्वसाधारण प्रौढ श्रोत्याला
या रोगाची माहिती देता येईल, तसेच लहान मुलांच्या बुद्धीला चालना देणारे कार्यक्रम
आपली निगा आपण कशी राखावी या विषयवार भर द्यावा लागेल.
मे महिन्यात भारतीय शास्त्रज्ञांनी राजस्थानात पोखरण येथे दुसऱ्या अणुस्फोटाची यशस्वी
चाचणी केली तेव्हा संपूर्ण राष्ट्र अभिमानाने फुलून गेले होते. अशावेळी युवकांसाठी भाषण
ठेवताना देशाभिमान, स्वयंपूर्णता या पैलूंवर भर देता येतो तर प्रौढ श्रोत्यांसाठी अणुविज्ञान,
त्याचे विविध क्षेत्रातील उपयोग, इत्यादी पैलू महत्त्वाचे ठरतील. विशेष प्रगल्भ व निवडक
श्रोतृवर्ग असेल तर या अणुस्फोट चाचणीचे आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील परिणाम, अणुऊर्जा,
अण्वस्त्रनिर्मिती, इत्यादी मुद्यांचा अधिक तपशिलाने विचार करता येईल. भाषणाचा विषय
ठरवताना श्रोतृवर्गाची बौद्धिक व मानसिक कुवत पाहून तसेच त्यांचे वयोगट, त्या त्या
गटातील श्रोत्यांची गरज इत्यादी बाबी विचारात घ्याव्या लागतात.
नभोवाणीवरील भाषणामध्ये आपण ज्या विषयावर बोलणार आहोत त्या विषयाचा
संपूर्ण अभ्यास आणि नोंदीचा तपशील अगदी बिनचूक असावा लागतो. चुकीची माहिती
दिली तर अजाण श्रोत्याच्या मनात गोंधळ उडतो आणि जाणकार श्रोता असेल तर त्याला ती
चूक लक्षात येऊन, वक्त्यावरचा व नभोवाणी या माध्यमावरचा त्याचा विश्वास कमी होऊ
लागतो. एखादा तपशील अचूक आहे की नाही याची खात्री नसेल तर तो पूर्णपणे गाळला
तरी चालेल; परंतु चुकीची माहिती प्रसारित होऊ देऊ नये. नभोवाणी या माध्यमाचा प्रसार
फार व्यापक असल्यामुळे प्रक्षोभक किंवा खळबळजनक, सनसनाटी विधानेही शक्यतो
करू नयेत.

२.२.११. नभोभाषणासाठी सूचना

१. आपले भाषण कागदाच्या एका बाजूला स्पष्टपणे मोठ्या अक्षरात लिहावे म्हणजे
ध्वनिमुद्रणाच्या वेळी वाचन करताना अडचण येणार नाही.

२. भाषण कागदाच्या अर्ध्या तुकड्यांवर लिहावे. छोटे कागद हाताळणे सोपे जाते.

३. ध्वनिमुद्रणापूर्वी सर्व कागद सुटे करून, क्रमवार लावून ठेवावेत. वाचताना कागदांचा Self-Instructional
फर्र-फर्र आवाज होणार नाही याची काळजी घ्यावी. Material 65
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन ४. प्रत्येक पानावरील शेवटचे वाक्य त्याच पानावर करावे, अर्धवट वाक्य तोडून पुढील
पानावर नेले तर वाचन करताना कदाचित खंड पडण्याची शक्यता असते.
NOTES
५. ध्वनिमुद्रणापूर्वी संहितेचे काळजीपूर्वक वाचन करावे आणि त्यात अवघड उच्चार
असलेले शब्द त्याचप्रमाणे महत्त्वाचे वाक्यांश अधोरेखित करावेत. स्वल्पविराम,
पूर्णविराम, उद्गार-चिन्ह, प्रश्नचिन्ह, इत्यादी चिन्हेही स्पष्टपणे लिहावीत म्हणजे वाचन
करताना त्यांचा योग्य वापर करता येईल.

६. ध्वनिमुद्रणाच्या वेळी आपल्या श्वासोच्छ्वासाचा आवाज होऊ देऊ नये.


मायक्रोफोनला कागद अथवा हाताचा धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी.

७. संपूर्ण भाषण एकाच वेगात वाचावे. मध्येच भरभर किंवा संथ वाचन करू नये.
आवाजाची तीव्रताही समान ठेवावी.

८. वाचताना तोंडाचा मचमच किंवा मिटक्या मारल्याचा आवाज होऊ देऊ नये.

९. तोंडापासून मायक्रोफोन फार जवळ अथवा फार दूर ठेवू नये. साधारणपणे १० ते १२
इंचांवर मायक्रोफोन ठेवावा.

१०. ध्वनिमुद्रणाच्या वेळी कागद फार विखरून दूरदूर ठेवू नयेत. तसे केले तर तोंड
मायक्रोफोनपासून दूर जाण्याची आणि आवाजाच्या पातळीत फरक पडण्याची शक्यता
असते.

११. आकाशवाणीवरील भाषणात नुसती माहिती लिहून चालत नाही. तर ज्यांना उद्देशून
ती माहिती सांगायची आहे, त्यांच्याशी ‘मित्रहो’, वगैरेसारखी संबोधने वापरून संवाद
साधायचा असतो. अधूनमधून ‘आता तुमच्या हे लक्षात आलं असेल’ अशासारखे
वाक्यप्रयोग करून हा संवाद सतत बोलता ठेवायचा असतो.

१२. लोक व्यवहारात प्रचलित असलेल्या वाक्प्रचारांचा आणि म्हणींचा वापरकरावा


लागतो.

१३. 'असे', 'तसे', 'घेणे', 'देणे' यांऐवजी ‘असं’, ‘तसं’, ‘घेणं’, ‘देणं’ असे बोलीभाषेतील
शब्द वापरलेले आहेत.

१४. मोठी लांबलचक वाक्ये न वापरता छोटी श्रवण सुलभ वाक्ये वापरलेली आहेत.

१५. आशयाची मांडणी पहिल्या उताऱ्यात ऐतिहासिक क्रमाने केली आहे. पण नंतरच्या
भाषणात त्याचा क्रम उलटा आहे. आजच्या संदर्भाकडून भूतकाळाकडे व परत वर्तमान
Self-Instructional संदर्भाकडे असा त्याचा प्रवास आहे. त्यामुळे श्रोत्यांची उत्सुकता वाढण्यास मदत झाली
Material 66 आहे.
प्रसारमाध्यमांसाठी
१६. भाषणाच्या शेवटी सर्व विवेचनाचा मथितार्थ सांगून ‘नाणी ही राजकीय व सांस्कृतिक लेखन
इतिहासाची प्रतिनिधी कशी असतात’, हा मुद्दा ठसठशीतपणे लक्षात आणून द्यावा लागतो.
अशा प्रकारे आपल्याला नभोवाणीच्या भाषणासंदर्भात काही महत्त्वाच्या बाबी लक्षात NOTES
घ्याव्या लागतात.

२.२.१२. नमुना भाषण


नभोवाणीवरील भाषणाची वैशिष्ट्ये आपण पाहिलीत. आता नमुन्यादाखल भाषणाची
एक संहिता आपण पाहणार आहोत, ती आपण काळजीपूर्वक वाचून घ्या. डॉ. रमेश वरखेडे
यांनी लिहिलेले हे भाषण ‘जळगाव आकाशवाणी केंद्रा’वरून प्रसारित झाले होते. हे भाषण
बहिणाबाईच्या कवितेतील स्री जीवनाचा परिचय करून देणारे आहे. अशा भाषणांमध्ये
उगाच सोपेपणासाठी सोपेपणा आणण्याचा खटाटोप करणे उचित नसते. फक्त ते आशयसंपन्न
व उदाहरणांसह असले पाहिजे. अशा भाषणाचा प्रारंभ साधा सरळ असला तरी परिणामकारक
असावा लागतो. त्या दृष्टीने ह्या संहितेचा आपण अभ्यास करूया.

‘बहिणाबाईंच्या काव्यातील स्त्रीजीवन’


कवयित्री बहिणाबाई केवळ खानदेशालाच नव्हे तर साऱ्या महाराष्ट्राला परिचित आहेत.
जात्यावरच्या ओवीतून, झोक्यावरच्या गाण्यातून आणि नदीकाठच्या कुजबुजीतून स्त्रियांनी
आपल्या मनातल्या सुख - दुःखांना वाट करून दिली आहे. नित्य कर्म करताना सोशिक
मनाने जे अनुभवलं, पाहिलं, भोगलं ते जात्यातून पीठ पड़ावं इतक्या सहजतेनं पोटातून
ओठावर आलं. मराठीतील या अपौरुषेय साहित्याचं प्रातिनिधिक रूप बहिणाबाईंच्या
कवितेच्या माध्यमातून पुढे आलं आहे. स्त्रीमनाची नानाविध छायारूपं स्फुट स्वरूपात
ऐकायला मिळणं हे बहिणाबाईंच्या कवितेचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.
एकाच आयुष्यात सासर-माहेरच्या दोन जगात वावरणारी, चार भिंतीआडच्या
चाकोरीबद्ध जीवनात संसाराची सुंदर रांगोळी रेखाटणारी आणि त्याच वेळी कामधंद्यासाठी
रानावनात, नदीकाठी निसर्गाशी आत्मसंवाद साधणारी ग्रामजीवनातील स्त्रीची मानसरूपं हा
बहिणाबाईंच्या कवितेचा मध्यवर्ती आशय आहे.

अरे छापीसनी आलं। मानसाले समजलं


छापीसनी जे राह्यलं। देयालेच उमजलं

स्त्रीमनाची स्पंदनं ही अशी अप्रगटच राहिली. साहित्यविश्वात:मुद्रित स्वरूपात न


आल्यामुळे तिची मनोगतं एक तिला अन् दुसऱ्या देवालाच काय ती ठाऊक होती. परंतु
बहिणाबाईंच्या कवितेमुळे ही स्पंदनं आता आपल्याला ऐकायला मिळाली आहेत.
माझं दु:ख, माझं दुःख
जसी अंधारली रात
माझं सुख, माझं सुख Self-Instructional
हातातली काडवात Material 67
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन माझं दुःख, माझं दुःख। तय घरात कोंडते
माझं सुख, माझं सुख। हांड्याझुंबरं टांगले
NOTES
असं बहिणाबाईंनीच म्हणून ठेवलं आहे. स्त्रीचं, सुखाचं रूप तेवढंच आपल्याला
समजतं, दिसतं. तिच्या मनाच्या नेणिवेतलं दु:ख कधी बाहेर येत नाही. ते ओठावर येतं तेव्हा
ती एकटी दळत बसलेली असते. तिच्या बाह्य दर्शनी साज शृंगाराच्या रूपाशी ह्या दुःखाचा,
ह्या मनोगतांचा काहीही संबंध असत नाही. बहिणाबाई म्हणतात,

गानं आलं कानामधी। बुगडीले काय त्याचं


वास येला नाकामधी। नथनीले काय त्याचं

जो भाग आपल्या वाट्याला आला आहे, तो ज्याचा त्यालाच कळणार. बहिणाबाईंची


कविता ही अशी आत्मप्रत्ययाची, स्व-संवादाची स्वी मनातल्या छायारूपांची अनुभवस्पर्शी
कविता आहे.
कन्या, पत्नी, आई, सून, सासू अशा नाना भूमिकांतून स्त्री जगत असते. तिच्या
जगण्यातल्या ह्या नानाविध भूमिकांतील नाना कळांचे दर्शन त्यांच्या कवितेतून घडते.

उठ सासुरवाशिन बाई
उठ मध्यम राती मांड दयन तू नीट
अन् चालव बाई घरोद

असा मध्यरात्रीलाच सासुरवाशिनीचा दिवस सुरू होतो. रामप्रहरी कोंबड़ा आरवतो


तेव्हा ती डोक्यावर घडा घेऊन पाण्याला निघते, सूर्योदयाच्या वेळी स्वयंपाकासाठी चूल
पेटवीत असते.
उठ सासुरवाशिन बाई
उठ जानं शेती, कामाचा किति घोर
तू गोठ्यामधलं ढोर

गोठ्यातल्या ढोरासारखी ती राबराब राबत असते. आणि थोडं कुठे कमी-अधिक झालं
तर सासूची वटवट सुरू होते. डोळ्यांतले आसू आपले आपणच पुसून तिला कामाला
लागावं लागतं. तिला कुठलंही स्वातंत्र्य नाही. तिला आपलं म्हणणं मांडण्याची सोय नाही.
तिनं सगळं मुक्तपणे सोसायचं आणि पेलवेनासं झालं तर माहेरची आठवण काढून स्वत:च
स्वत:ची समजूत काढायची. म्हणून बहिणाबाई म्हणतात,

उठ सासुरवाशिन बाई
घे सोशीसन घे घालू नको नोवाद
कर माहेराची याद

Self-Instructional स्त्रीजीवनातल्या नित्य कर्माच्या अनुभूतीतील कित्येक क्षणचित्रे बहिणाबाईंनी


Material 68 टिपली आहेत. उदाहरणार्थ, चूल पेटत नाही आणि घरभर धूर दाटतो तेव्हा तिची जी तगमग
प्रसारमाध्यमांसाठी
होते. त्या अस्वस्थतेचं रेखाचित्र. घरात सगळ्यांना भुका लागल्या आहेत, धुराने डोळे लाल लेखन
झाले आहेत, पुन्हा पुन्हा उगाळून आगपेटीतल्या काड्या संपल्या आहेत, तेव्हा नाठाळ
मुलावर ओरडावं तशी ती चुल्हयावर ओरडते- NOTES

पेट पेट धुक्क मेला । किती घेसी माझा जीव


आरे इस्तवाच्या धन्या । कसं आलं तुले हीव !

आणि ह्या सगळ्या दिव्यातून जात असतानाच हरवलली फुकणी सापडते आणि सारे
चित्रच पालटून जाते. फुंकून फुंकून आग पाखडली जाते. तडा तडा विस्तव वाजू लागतो
आणि चुल्ल्यावर ताजी भाकर शिजू लागते. स्त्रीमन एवढ्याशा स्थितिबदलानंही हरखून
जातं. जसजशी भाकरीची टोपली भरत जाते तसतसं तिचं मनही फुलत जातं आणि ज्या
चुल्यावर ती ओरडलेली, खेकसलेली असते त्या चुल्याची मुद्रा तिला आता प्रसन्न, हसरी
वाटू लागते.
घराचं घरपण राखण्यात, त्याला सजवण्यात, त्याच्यात चैतन्याचे प्राण फुकण्यात
आयुष्यभर धडपडत असते. गुढीपाडव्याचा सण आला की घरातली पडझड दुरुस्त करा,
घर पोतारून काढा आणि सडा सारवण करून दाराशी गुढी उभारा यात ती मग्न असते.
पोळ्याचा सण आला की बैलांना पुरणाच्या पोळ्यांचा नैवद्य करताना ती बैलांच्या कष्टमय
जीवनाशी एकरूप होते. ढोरासारखं राबणाऱ्या स्त्रीला बैल हा आपला समदु:खी प्राणी
वाटतो आणि पुरणाच्या पोळ्या रांधून झाल्यावर ती एकच मागणं मागते-

"खाऊ द्या रे पोटभर । होऊ द्या रे मगदूल


बशीसनी यायभरी । आज करू द्या बागूला
आता ऐका मनातलं । माझं येळीचं सांगनं
आज पोयाच्या सनाले । माझं एवढं मागनं
कसे बैल कुदाळता । आबादीची आवड
वझं शिंगाले बांधता । बाशिंगाचं डोईजड
नका हेंडालू बैलाले । माझं ऐका जरासं
व्हते आपली हाऊस । आन बैलाले तरास"

अक्षय्यतृतीयेचा सण हा तिच्या लेखी सुगीचा दिवस. त्या दिवशी ती माहेरची असते.


आपल्या मूळ रूपात, आनंदभाविनी होऊन ती त्या दिवशी जगून घेत असते. निंबाच्या
झाडावर झोका बांधून ती वाऱ्याबरोबर खेळत राहते. झोक्याच्या आंदोलनांबरोबर सासर-
माहेरची आवर्तने ती मोजत राहते. ती मनखुरी बनते. तिची तीच स्वत:शी खेळ मांडते,
आत्मसंवादाचा चिंतनचाळा करीत राहते.

गेला झोका गेला झोका । चालला माहेराले जी


आला झोका आला झोका । पलट सासराले जी

भूक-तहानेचा विसर पाडणाऱ्या ह्या झोक्याच्या आंदोलनांनी तिचं पोट भरतं. ती तृप्त होते. Self-Instructional
आखाजीच्या दिवशी ती गौर सजवते, सखी-साजणींना बोलावते, टिपऱ्या फुगड्यांत नादावते. Material 69
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन इतकी खेळते, इतकी खेळते की खेळून खेळून तिचे हातपाय आंबतात. हे विसाव्याचे चार
दिवस संपले की पुन्हा शेतीच्या मशागतीला ती ताजीतवानी होऊन सरसावते. पुन्हा एकदा
NOTES आखाजीची वाट पाहत ती वर्षभर कष्टत राहते. स्त्रीचं आयुष्य पराधीन असते. नवऱ्याच्या
हातावर तिच्या सौभाग्याची रेखा आखलेली असते. तो असतो तो पर्यंत सर्व कष्ट मंगलमय
असतात. तो गेला तर कुंकवाखालची रेघ उघडी पडते, तळहातावरची धनरेषा अर्थशून्य
बनते. तेव्हा अगतिक होऊन ती विव्हळते

देवा, तुझ्या बी घरचा । झरा धनाचा आटला


धन-रेखाच्या चयनं । तयहात रे फाटला.

रडून रडून तिचे अश्रू सुकून जातात आणि एकच प्रश्नचिन्ह तिला सतावत राहतं -

सांग सांग धर्ती माता । अशी कशी जादू झाली


झाड गेलं निंघीसनी । माघे सावली उरली.

एवढं असले तरी स्त्री सोशिक आहे, समजूतदार आहे. दु:ख गिळून वर्तमान साजरा
करायची तिला जी सवय आहे, ती अशा वेळी स्वत:ची समजूत काढते आणि भविष्यात
काहीही वाढून ठेवलेलं असो, ज्योतिषाजवळ ती एकच मागणी मागते

"राहो दोन लाल सुखी । हेच देवाले मांगनं


त्यात आलंरे नशीब । काय सांगे पंचागनं"

आणि मग कुंकू पुसलं गेलं तरी गोधन उरलेलं असतं, बांगड्या फुटल्या तरी मनगटातलं
कर्तृत्व शिल्लक राहिलेलं असतं, मंगळसूत्र तुटलेलं असलं तरी गळ्याची शप्पथ मागे
राहिलेली असते आणि ह्या मागे राहिलेल्या खुणांच्या जोरावर भविष्याला ती सामोरी जायला
तयार होते. एकटेपणाने, अगदी एकटेपणानं. म्हणून आजूबाजूच्या सहानुभूती दाखवणाऱ्यांना
ती म्हणते
"नका नका आयाबाया। नका करू माझी कीव
झालं झालं समाधान । आता माझा माले जीव"

स्त्रीजीवनाच्या आणि स्त्री मनाच्या तळघरातलं हे दडलेलं लेणं असं बहिणाबाईच्या


शब्दांतून काहीसं प्रगटलं. ते केवळ एका बहिणाबाई चौधरी नावाच्या एका स्त्रीचं गाणं नाही
तर गावागावातल्या घरोटावर बसलेल्या स्त्रियांचं प्रातिनिधिक गाणं आहे. अनेकांच्या
पोटातलं सुख-दुःख बहिणाबाईंच्या ओठांतून बाहेर पडलं आणि चिरंजीव झालं.

सदर दिल्या गेलेल्या उदाहरणात हे स्रीच्या जीवनातील वास्तव मांडले गेले आहे. परंतु
साहित्यक्षेत्रातील असून बहिणाबाई यांच्या ‘जात्यावरच्या ओव्या’ आपले खरे जीवन
जगण्याच्या अर्थाचे विवेचन अभ्यासकाने या कवितेतून केले आहे.
Self-Instructional
Material 70
प्रसारमाध्यमांसाठी
२.२.१३. सारांश लेखन

आकाशवाणीचे भाषण पूर्वनियोजित, प्रसारणापूर्वी लिहून काढलेले असे असते. त्यामुळे NOTES
या लेखनाचेही एक तंत्र असते. ते लक्षात ठेवून 'भाषण संहिता' लिहावी लागते. आकाशवाणीचे
भाषण, लिखित संहितासमोर ठेवून केले जात असले तरी इथे लेखनाची भाषा लिखित किंवा
ग्रांथिक असून चालत नाही. त्यामुळे प्रकट भाषणाची सर्व वैशिष्ट्ये लक्षात घेऊनच हे
भाषण लिहावे लागते. वेळ मर्यादेत भाषण पूर्ण करण्यासाठी ते नीटपणे वाचताही आले
पाहिजे. त्यासाठी हे लेखन स्पष्ट, खाडाखोड नसलेले, दोन शब्दांत योग्य अंतर असलेले ,
ठळक असे असावे लागते. कधी-कधी भाषण लिहून देणाराच ते सादर करतो असे नाही.
अशावेळी भाषण वाचणाऱ्या त्या दुसऱ्या व्यक्तीलाही ते अर्थ व भावासह समजले पाहिजे.
यासाठी विरामचिन्हांचा योग्य त्या ठिकाणी, उचित वापर करणे अतिशय महत्त्वाचे ठरते.
यामुळे वाचणाऱ्याला शब्दाचा योग्य उच्चार करून आवाजात चढ-उतार करणे शक्य होते.
आकाशवाणीचे भाषण हे श्रोत्यांशी संवाद साधणारे, संभाषणवजा असते. त्यामुळे यात
‘असे, तसे, इथे-तिथे, घेणे-देणे’ असे ग्रांथिक शब्द न वापरता ‘इथं-तिथं, असं-तसं, घेणं-
देणं, राहिलं-झालं’ असे बोलीभाषेचे शब्द वापरायचे असतात. श्राव्य माध्यमासाठीचे,
श्रोत्यांना ऐकवण्याचे हे भाषण असल्याने त्याला ‘खालीलप्रमाणे, वरीलप्रमाणे, मागीलप्रमाणे’
असे शब्द चालत नाहीत. तसेच या ‘भाषणात' व 'ऐवजी' आणि हे अधिक स्पष्ट व
ठसठशीत अव्यय वापरणे योग्य ठरते.

२.२.१४. महत्वाचे शब्द


१. नभोवाणी : आकाशवाणी
२. मायक्रोफोन : लहान आकाराचे फोन
३. खग : पक्षी
४. घरोटा : जात्यावर दळताना असतो त्याला घरोटा असे म्हणतात

२.२.१५. सरावासाठी प्रश्न


(१) नभोवाणीवरील भाषण व सभेतील भाषण यांतील फरक स्पष्ट करा.
(२) नभोवाणीवरील भाषणात 'विरामा' चे महत्त्व काय ते सांगा.
(३) नभोवाणीवरील भाषण वाचताना कोणती काळजी घ्यावी.

२.२.१६ अधिक वाचनासाठी पुस्तके


१. शेळके भास्कर : प्रसारमाध्यमे आणि मराठी भाषा, स्नेहवर्धन Self-Instructional
२. प्रकाशन, पुणे. Material 71
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन ३. नामजोशी प्रसाद : शॉर्टकट, मनोविकस प्रकाशन, पुणे.
४. सरकटे सदाशिव, भरत हंडिबाग, ‘दृक-श्राव्य मध्यमांसाठी लेखन
NOTES कौशल्य’, औरंगाबाद.
५. यमगर पोपटराव : विकासपिडीया (www.vikaspedia.com)
६. देशपांडे अभिजित : मराठी विश्वकोश (ज्ञानमंडळ)
७. जकाते प्रसन्ना : महाराष्ट्र टाइम्स – १२ जुलै २०१७.
८. कॅस्टेलिनो गीता (अनुवाद गीत सोनी): प्रसारमाध्यमातील प्रगतीच्या
९. संधी, लेख- २१ ऑक्टोंबर २०१३.
१०. गंधे रविराज: माध्यमरंग, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, २५ डिसेंबर २०१८.
११. बोराटे योगेश: सोशल मीडिया, अथर्व प्रकाशन, जळगाव.
१२. डॉ. कल्याण काळे : आधुनिक भाषाविज्ञान, प्रतिमा प्रकाशन, पुणे.
१३. खोरे अरुण: ‘मुद्रित प्रसारमाध्यमांसाठीचे लेखन कौशल्ये’, मानव्यविद्या व
सामाजिक शास्त्रे विद्याशाखा. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक - जून
२००६.
१४. गोखले किरण (संपादक): ‘पत्रकारिता विद्या’, मॅजेस्टिक प्रकाशन, गिरगाव - मुंबई
फेब्रुवारी २००३.
१५. डोळे जयदेव, समाचार, लोकवाङमय गृह प्रकाशन, मुंबई, दुसरी आवृत्ती, एप्रिल
२०११.
१६. तावरे स्नेहल (संपा.) व्यावहारिक मराठी, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, १९९५.

Self-Instructional
Material 72
प्रसारमाध्यमांसाठी
२.३ दूरचित्रवाणी - माहितीपटासाठी लेखन

संहितालेखन NOTES

२.३.१. प्रस्तावना
२.३.२. उद्दिष्टे
२.३.३. संहिता आणि तिची गरज
२.३.४. माहितीपटासाठी संहिता लेखन
२.३.५. संहितालेखनाचे तंत्र-
२.३.६. माहितीपट (डॉक्युमेंटरी) म्हणजे काय ?
२.३.७. माहितीपटाची निर्मितीची प्रक्रिया
२.३.८. माहितीपटासाठी संशोधन
२.३.९. माहितीपटाची रचना
२.३.१०. माहितीपटाचे निवेदन
२.३.११. माहितीपटाचे संहितालेखन
२.३.१२. सारांश
२.३.१३.महत्वाचे शब्द
२.३.१४ सरावासाठी प्रश्न
२,३,१५ अधिक वाचनासाठी पुस्तके

२.३.१. प्रस्तावना :
श्राव्य माध्यमे मानवी संपर्क प्रक्रिया दिवसेंदिवस अधिक विकसित करीत आहेत.
मानवी संपर्क प्रक्रियेत हळूहळू होत गेलेले क्रांतिकारक बदल हे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होत
असलेले आपल्याला दिसतात. मुद्रित साधनांप्रमाणेच दृक-श्राव्य माध्यमांचेही जनसंपर्क
प्रक्रियेमध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आपल्याला नाकारता येत नाही. डॉ. वि. ल. धारूरकर
दृक्-श्राव्य साधनांचे महत्त्व सांगताना म्हणतात की, “वृत्तपत्रे, गृहपत्रे, इतर जनसंपर्कपत्रिका
इत्यादीमध्ये संदेशांचे वहन होऊ शकत नाही. निरक्षरांच्या संवाद मर्यादांना छेदून जाऊन
हजारो लोकांपर्यंत पोहोचण्याचे सामर्थ्य केवळ दृक-श्राव्य साधनांमध्ये असते.”
एकाचवेळी अमर्याद लोकांपर्यंत पोहोचण्याचे दृक-श्राव्य माध्यमांच्या क्षमतेमुळेच
नभोवाणी व दूरचित्रवाणी या माध्यमांचे महत्त्व वाढलेले आहे. लोकांशी संपर्क करण्याचे हे
अत्यंत प्रभावी व परिणामकारक तसेच वेगवान माध्यम आहे. दृक्-श्राव्य साधनांमध्ये
आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, माहिती, दूरध्वनी, इंटरनेट इत्यादींचा समावेश होतो.
एखाद्या विशिष्ट संस्थेला आपला हेतू, ध्येय आणि उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या माध्यमांचा
उपयोग करणे गरजेचे वाटू शकते. या माध्यमांच्या उपयोगातून ते अधिक लोकांपर्यंत या
गोष्टी पोहोचवू शकतात. म्हणून आजचे युग हे माध्यमांचे युग आहे आणि या माध्यमांच्या
युगामध्ये लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीची तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगती झालेली आहे. Self-Instructional
चित्रपट हे दृक्-श्राव्य माध्यमांपैकी अत्यंत महत्त्वाचे माध्यम होय. चित्रपटाचा Material 73
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन जनमानसांवर होत असलेला प्रभावी असा परिणाम आपण नेहमीच पाहत असतो. साहित्य
हा समाजाचा आरसा आहे. तसेच चित्रपट सुद्धा समाजाचा एक आरसा आहे, हे म्हणणे
NOTES अतिशयोक्त ठरणार नाही. लोकांपर्यंत एखादा विषय पोहोचविण्याच्या दृष्टीने चित्रपट
अनेक दृष्टीकोनातून फायदेशीर ठरत असतात. कारण संवादाच्या प्रभावी माध्यमांपैकी
चित्रपट हे महत्त्वाचे माध्यम मानले जाते. अनेक शास्त्रज्ञांच्या मते, कानावर ऐकलेल्या
गोष्टींपेक्षा डोळ्याद्वारे पाहिलेल्या गोष्टींचा परिणाम हा अधिक असतो आणि चित्रपटातून
डोळ्यांवर दिसणाऱ्या व्हिज्युअलच्या माध्यमातून हा परिणाम अत्यंत वेगात साधला जातो.
डोळे आणि कान म्हणजे दृष्टी आणि श्रवण या दोन्ही संवेदना एकाचवेळी काम करत
असतात.

२.३.२. उद्दिष्टे

१. संहितालेखनाची पूर्वतयारी व या माध्यमातील तंत्रांची माहिती सांगता येईल.

२. संहिता म्हणजे काय व तिची आवश्यकता कोणती हे स्पष्ट करता येईल.

३. हे लेखन करताना दर्शकांचा विचार का व कसा करायचा, हे समजावून सांगता

येईल.

४. लेखनाची उद्दिष्टे व प्रकार कसे निश्चित करायचे, याची माहिती सांगता येईल.

५. संहितेची भाषा कशी असायला हवी व संहितालेखनाचे तंत्र कोणते हे स्पष्ट करता
येईल.

६. दृक्-श्राव्य रूपात कार्यक्रमाची निर्मिती कशी होते, याची माहिती देता येईल .

२.३.३. संहिता आणि तिची गरज


कार्यक्रमाच्या चित्रीकरणासाठी आपल्या मनातली कल्पना किंवा विषय कोणत्या
दृश्यांमधून मांडायचा आहे, त्यांच्याबरोबर कोणत्या प्रकारचे निवेदन किंवा संवाद हवे व
इतर कोणत्या ध्वनींचा वापर करायचा आहे. या संबंधीच्या तपशीलवार व क्रमशः सूचनांनी
युक्त असे विशिष्ट पद्धतीने केलेले लेखन म्हणजे 'कार्यक्रम संहिता' होय.
या संहितेतील आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचे काम निर्मात्याला इतरांकडून करून
घ्यायचे असते. ते करून घेताना ध्वनी, दृश्य, प्रकाश, चित्रे, तक्ते इ. बाबतच्या नेमक्या
Self-Instructional सूचना निर्मात्याला आपले सहकारी तंत्रज्ञ यांना द्याव्या लागतात. यांचा उल्लेख तंत्रज्ञांना
Material 74 समजणाऱ्या परिभाषेत, संहितेतच केलेला असेल तर निर्मितीचे काम वेगात व चांगल्या
प्रसारमाध्यमांसाठी
रीतीने होते. म्हणून लेखकाने लिहिलेली संहिता निर्मात्याला समजेल अशी असणे महत्त्वाचे लेखन
आहे. यासाठी निर्मात्याला जशी संहितेची गरज कळायला हवी तशीच, संहिता लिहिणाऱ्यालाही
कळायला हवी. म्हणून संहिता लेखकाने पुढील तीन प्रश्नांची उत्तरे मनाशी निश्चित करून NOTES
मगच, संहिता लिहायला हवी.

१) आपल्याला जे सांगायचे ते कोणासाठी? म्हणजेच या कार्यक्रमाचा प्रेक्षक किंवा


दर्शक कोण असणार आहे?

२) आपल्याला काय सांगायचे आहे? म्हणजेच संहिता लेखनाचा हेतू/ उद्दिष्ट कोणते?

३) जे सांगायचे ते कसे सांगायचे? त्यासाठी कोणता प्रकार निवडायचा?


उदा. शेती- मातीविषयक कार्यक्रमाचा दर्शक हा प्रामुख्याने ग्रामीण भागातील असतो.
नवनवीन प्रयोगांची माहिती देऊन त्याला प्रेरित, प्रोत्साहित करीत शेतीचा विकास साधणे हे
कार्यक्रमाचे उद्दिष्ट असते. त्यामुळे या कार्यक्रमातून जे सांगायचे ते या ग्रामीण दर्शकाला
आवडेल, समजेल अशा प्रकारे आणि त्यांच्याच भाषेशी जवळीक साधत सांगावे लागते.
यादृष्टीने डी. डी. सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या 'आमची माती, आमची माणसं'
सारख्या कार्यक्रमांचा संहितादृष्ट्या विचार करणे उचित होईल.

२.३.४. माहितीपटासाठी संहिता लेखन


आजचे युग हे माहितीचे युग आहे. प्रत्येक व्यक्तीला आपल्या दैनंदिन जीवनात
कुठल्यातरी विषयासंबंधित माहितीची गरज भासत असते. तंत्रज्ञानाने मानवाच्या हाती
दिलेल्या मोबाईलच्या माध्यमातून जगभरातल्या ज्ञानाचे भांडार त्याच्या हाती आलेले आहे.
कोणत्याही विषयावरची माहिती गुगलच्या सर्च बॉक्समध्ये टाकल्यानंतर क्षणात मिळते. त्या
माहितीसाठी कुठलाही आर्थिक व्यवहार प्रत्यक्षरीत्या होत नसल्यामुळे माहिती मिळवण्याचे
गुगल हे अत्यंत सुलभ सोपे व अखर्चिक असे साधन मिळालेले आहे. मानवाला कुठलाही
निर्णय घ्यायचा असल्यास त्यासंबंधीची माहितीची आवश्यकता भासत असते. ही माहिती
कोणत्याही व्यक्तीकडून मौखिक अथवा लिखित स्वरूपामध्ये दुसऱ्या व्यक्तीस मिळत
असते. विविध विषयांवर माहिती देणारे वेगवेगळे लेख, कार्यक्रम, अथवा माहितीपट यांचे
पीक आजच्या युगात आलेले आहे. शासकीय स्तरावरून सुद्धा विविध योजनांची माहिती
दूरचित्रवाणीवरील तसेच नभोवाणीवरील जाहिरातींच्या माध्यमातून शासन सर्वसामान्य
माणसांपर्यंत पोहचवण्याचे कार्य करताना दिसते. त्यामुळे आजच्या या माहितीच्या युगामध्ये
विविध प्रसारमाध्यमे तसेच आधुनिक समाजमाध्यमांना खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. जगाच्या
कानाकोपऱ्यात घडत असणारी कोणतीही घटना दुसऱ्याच क्षणी जगाच्या दुसऱ्या टोकावर
कळते. या माध्यमांच्या साहाय्याने ती पोहोचवली जाते. त्यामुळे आधुनिक प्रसारमाध्यमांचे
व समाजमाध्यमांचे महत्त्व मानवी जीवनात वाढले आहे.
माहितीपट हा एक महत्त्वाचा आणि स्वतंत्र कलाप्रकार म्हणून सर्वमान्य झालेला आहे.
तसेच सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक, राजकीय आणि व्यक्तिगत जीवनावरील आधारित Self-Instructional
घटनांचे दर्शन आपल्याला माहितीपटातून पाहवयास मिळतो. अवकाळी पाऊस असेल, Material 75
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन शेतकऱ्यांच्या समस्या, अंधश्रद्धेचे दर्शन, महिला अत्याचारासंबंधीचे, देशातील
बेरोजगारीसंबंधीचे, विद्यार्थी व त्यांच्या शैक्षणिक जीवनातील समस्यांचे अशा विविध
NOTES विषयावरील माहितीपट आज निर्माण होत आहेत. माहितीपटाची संहिता लिहिताना काही
महत्त्वपूर्ण बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

१. ज्या विषयावर माहितीपट निर्माण करायचा आहे त्या विषयावर आधारित सर्वच
मुद्द्यांचे संशोधन करणे.

२. आपल्या संशोधनाच्या आधारे, संभाव्य मुलाखती, कथानके, संभाव्य संघर्ष आणि


लोकांच्या संवेदनशीलतेशी जुळलेले मुद्दे शोधणे.

३. आपल्या माहितीपटाचे नेमके स्वरूप कसे असावे यासंबंधी काही एक निश्चित करणे
आवश्यक असते. त्यासाठी विविध माहितीपट पाहून आपल्याला आपली दृष्टी निश्चित
करावी लागते. इंटरनेटवर अनेक विषयांवरचे विविध माहितीपट उपलब्ध आहेत त्याद्वारे
आपला गृहपाठ काही प्रमाणात होऊ शकतो.

४. कथानकाची रचना झाल्यानंतर आपल्याला प्रत्यक्ष चित्रीकरण करावे लागते. परंतु


त्याआधी त्याचे चित्रीकरण याची सुद्धा एक स्वतंत्र संहिता तयार केल्यास चित्रीकरण
अधिक सुटसुटीत व व्यवस्थित होते.

५. आपल्या सर्जनशीलतेला जागृत करणे अत्यंत गरजेचे असते.

६. माहितीपटाची संहिता लिहिताना त्या विषयासंबंधीचे विपुल वाचन करणे अत्यंत


आवश्यक आहे. विषयाचा आवाका लक्षात घेऊन या माहितीपटाची रूपरेषा आखून
चित्रीकरणाचा कच्चा आराखडा तयार करणे, ज्या गोष्टी चित्रीत करायचे आहे त्यांची
माहिती मिळविणे, ज्या विषयावर आपल्याला भाष्य करायचे आहे तो नेमकेपणाने
सांगण्यासाठी त्या विषयाच्या संदर्भात सर्व दृष्टीकोनातून विचार करणे या काही पायऱ्या
अत्यंत महत्त्वाच्या ठरू शकतात.

७. एक चांगली कथा एका सर्वसामान्य प्रेक्षकांना नेहमीच खिळवून ठेवत असते. त्यामुळे
त्याच्या भावनेला स्पर्श करेल असे कथाविषय माहितीपटासाठी निवडणे आवश्यक आहे.

८. संहितालेखन करताना साहित्याची भाषा साधी, प्रवाही आणि आवश्यक तेथे बोली
स्वरुपाची असायला हवी. क्लिष्ट आणि अलंकारिक भाषा ही सामान्य प्रेक्षकाच्या
आकलना पलीकडची असते.

Self-Instructional
Material 76
प्रसारमाध्यमांसाठी
२.३.५. संहितालेखनाचे तंत्र लेखन

संहितालेखनासाठी आवश्यक असलेल्या अशा महत्त्वाच्या गोष्टींची माहिती आपण NOTES


घेतलेली आहे. पूर्वतयारी, यंत्रसामग्रीची ओळख यांच्याबरोबरीने या लेखनात असलेले
महत्त्वाचे घटक विचारात घेतले. आता प्रत्यक्ष संहितालेखन करण्यासाठी आपली भूमिका
तयार झाली आहे, असे म्हणता येईल. संहितालेखनाचे एक विशिष्ट तंत्र तर आहेच, पण
शिवाय काही टप्प्यांनी करण्याचा हा एक प्रवास आहे. मनात एखादी कल्पना आल्यापासून
सुट्या-सुट्या दृश्यविभागणीपर्यंत आपण कसे येऊन पोचतो हे पाहणार आहोत. याबाबत
तंत्र आपल्याला पाहता येतात.

२.३.६. माहितीपट (डॉक्युमेंटरी) म्हणजे काय ?


माहितीपट हा स्वतंत्र कलाप्रकार. महत्त्वाच्या ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय घटनांचे
समग्रदर्शन घडविणाऱ्या माहितीपटांचे मूल्य अधिक आहे, कारण बातम्यांप्रमाणे त्यातील
आशय त्वरित शिळा, कालबाह्य होत नाही. अनेक वर्षांनंतरही हे माहितीपट महत्त्वाचे संदर्भ
आणि माहितीस्रोत म्हणून उपयोगी पडतात. मुलाखत आणि माहितीपट या दोन कार्यक्रम
प्रकारांत सहज सहभागी होणे वर्तमानपत्रातील पत्रकारांनाही शक्य आहे. त्यामुळे त्यांची
सविस्तर ओळख करून घेणे भावी दूरचित्रवाणी पत्रकार आणि अन्य माध्यमांतील व्यक्ती
या सर्वांच्या फायद्याचे आहे. म्हणून प्रथमतः आपण माहितीपट म्हणजे काय हे पाहूयात.
‘प्रत्यक्ष घडलेल्या घटना नोंदविणारा दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम प्रकार म्हणजे
माहितीपट होय’. बातमीपत्रे ही पण सत्य घटनांची माहिती देतात. परंतु बातमीपत्रात एखादी
घटना हाताळण्यासाठी मर्यादित वेळ उपलब्ध असतो. बातमीचे संपादनही अल्पावधीत
करावे लागते. या तुलनेत माहितीपट अधिक लांबीचा असतो व त्याचे चित्रीकरण, संपादन
यांसाठीही अधिक वेळ उपलब्ध असतो. एखादे माहितीपट तयार करण्यासाठी त्यातील सत्य
शोधणे खूप महत्त्वाचे आहे.
सद्य:स्थितीतील सामाजिक प्रश्न हाताळणे, त्या प्रश्नाचा विविधांगी विचार करुन तो
प्रश्न मांडणे, त्याच्या चांगले-वाईट गोष्टींवर पण एक दृष्टीक्षेप टाकणे, त्याविषयीची
जनजागृती लोकांमध्ये निर्माण करणे व त्यासंबंधी प्रत्यक्ष कृती करण्यास त्यांना उद्युक्त
करणे हे काही माहितीपटांचे मुख्य उद्दिष्ट असते. असे माहितीपट प्रभावी होण्याकरिता
मांडणी कलात्मकरीत्या केली जाते. माहितीपटांचे महत्त्वाचे उद्दिष्ट एखाद्या विषयाचे
भौगोलिक, शास्त्रीय, सांस्कृतिक इत्यादी सखोल संशोधन करून त्याची माहिती प्रेक्षकांना
देणे हे असते. परंतु सत्य घटना हाच सर्व प्रकारच्या माहितीपटांचा आत्मा असतो. काल्पनिक
प्रसंगांना त्यात स्थान नसते. म्हणून माहितीपटाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.

Self-Instructional
Material 77
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन २.३.७. माहितीपटाची निर्मितीची प्रक्रिया
NOTES (१) प्रत्यक्ष चित्रीकरण :
प्रत्यक्ष चित्रीकरण करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते. एखादी घटना
घडत असताना घेतलेली दृश्ये माहितीपटात अधिक प्रभावी ठरतात. उदाहरणार्थ : नर्मदा
बचाव आंदोलनाविषयी माहितीपट बनविण्याचे १९९८-१९९९ साली ठरले असते, तर
माहितीपटाच्या निर्मात्याला/दिग्दर्शकाला चित्रीकरणाच्या काळात घडलेल्या विविध घटनांचे
प्रत्यक्ष चित्रण करता आले असते. पुराच्या पाण्यात डोमखेडी गावात निर्धाराने थांबलेले
आंदोलक, मेधा पाटकर यांची भाषणे इत्यादी घटनांचे चित्रण करणे शक्य होते. या घटना
घडतील तसे त्यांचे चित्रण करावे लागते. निर्मात्याच्या सोयीने त्या घटना घडू शकत नाहीत;
परंतु त्या घटनांबद्दलचे आंदोलकांचे अथवा अन्य अधिकारी व्यक्तींचे भाष्य मात्र निर्माता
स्वत:च्या सोयीने, हव्या त्या वेळेस, हव्या त्या पार्श्वभूमीवर घेऊ शकतो.
एखाद्या वृद्धाश्रमावर, त्या संस्थेच्या इतिहासावर नव्हे, तेथील व्यवस्थापनेवर माहितीपट
बनविणे चित्रणाच्या दृष्टीने सामाजिक चळवळीवरील माहितीपटाच्या तुलनेत अधिक सोपे
असते.

उदाहरणार्थ :
एखाद्या वृद्धाश्रमावर माहितीपट बनविताना आवश्यक ते सर्व प्रसंग निर्माता व
संस्थाचालक यांच्या परस्परसोयीने चित्रित करता येतात. गरज वाटल्यास त्याकरिता काही
प्रसंग (पूर्णपणे सत्यावर आधारित) मुद्दाम घडवून आणून चित्रित करणे शक्य असते.

उदाहरणार्थ :
त्या वृद्धाश्रमातील दिवाळी वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरी होत असेल व दिवाळी नुकतीच
होऊन गेली असेल, तर (खर्च परवडणार असेल तर) दिवाळीतील ते वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम
मुलांकडून पुन्हा करून घेतले तरी चालू शकते; पण हा उपाय वरचेवर वापरला जात नाही.
चित्रणाचे योग्य नियोजन असेल तर तशी वेळही येत नाही. प्रसंगांची पुनर्निर्मिती करण्याच्या
मुद्याची नैतिकतेच्या दृष्टीनेही चाचपणी केली पाहिजे. अन्यथा सत्य घटनांचे वास्तववादी
चित्रीकरण या माहितीपटाच्या मूळ हेतूलाच तडा जाण्याची शक्यता असते.

Self-Instructional
Material 78
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन

NOTES

(२) उपलब्ध चित्रण


वरील उल्लेख केलेल्या प्रारंभीची पाच-सहा वर्षांपूर्वीची दृश्ये निर्मात्याने स्वत: घेतलेली
असणे जवळपास शक्य नाही. अशा वेळेस त्याला अन्य साधनांवर अवलंबून राहावे लागते.
त्या साधनांत अन्य व्यक्ती, वाहिन्या, संस्था यांनी पूर्वी केलेल्या चित्रणाच्या चित्रफितींचा
समावेश होतो. ‘फिल्म डिव्हिजन’सारख्या अनेक वर्षे वृत्तपट आणि माहितीपट बनविणाऱ्या
संस्थेचे सहकार्य अशा वेळेस घेता येते. ऐतिहासिक स्वरूपाच्या अथवा एखाद्या व्यक्तीच्या
चरित्रात्मक माहितीपटासाठी अशा स्रोतांची बहुधा आवश्यकता भासते. आधुनिक काळात
बनविल्या गेलेल्या माहितीपटात अशी जुनी दृश्ये वापरली, तर जुने व नवे चित्रण यांच्या
दर्जात मोठा फरक जाणवण्याची शक्यता असते.
(३) छायाचित्रे व दस्तऐवज
घडून गेलेल्या घटनांचे चलचित्रीकरण उपलब्ध नसल्यास छायाचित्रांचाही कल्पकतेने
वापर करता येतो. प्रसिद्ध व्यक्तींबद्दल माहितीपट करताना छायाचित्रांच्या माध्यमातून त्या
व्यक्तीचा जीवनपट उलगडता येतो. छायाचित्रे उपलब्ध नसल्यास पूर्वी वर्तमानपत्रात प्रसिद्ध
झालेल्या बातम्या, पुस्तके, चित्रे यांचे स्थिर चित्रण करूनही वापरता येते.

(४) संबंधित व्यक्तींचे भाष्य


घडून गेलेल्या घटनांचे चित्रीकरण अथवा अन्य दृश्यात्मक साहित्य उपलब्ध नसेल,
तर ती घटना अथवा विषयवस्तू यांच्याशी जवळून परिचय असणाऱ्या व्यक्तींचे भाष्य
प्रभावीरीत्या वापरता येते. घटनेच्या साक्षीदाराकडून मिळणाऱ्या माहितीचा समावेश निवेदनात
करण्याऐवजी आणि ते सलगपणे ऐकविण्याऐवजी, विषय पुढे सरकेल त्याप्रमाणे छोट्या-
छोट्या तुकड्यांत विविध ठिकाणी ते वापरता येते. उदाहरणार्थ, एखाद्या प्रसिद्ध
व्यक्तीविषयीच्या माहितीपटात त्या व्यक्तीच्या एखाद्या कुटुंबीयाचे भाष्य त्या व्यक्तीच्या
आयुष्यातील विविध कालखंडांबद्दल असू शकते. ते विभागून समर्पक जागी वापरणे अधिक
चांगले. Self-Instructional
Material 79
प्रसारमाध्यमांसाठी (५) प्रसंगांची पुनर्निर्मिती
लेखन
ही पद्धत प्रचलित माहितीपटात जरी नाही, तरी ‘डॉक्युड्रामा’ या प्रकारात वापरली जाते.
NOTES उदाहरणार्थ, भूतकाळात घडलेल्या प्रसंगाची माहिती वर उल्लेखिलेल्या (क, ख, ग) तंत्रांचा
वापर करून प्रेक्षकांना देण्याऐवजी तो प्रसंग कलावंतांकरवी जसाचा तसा प्रेक्षकांसमोर उभा
करण्याचा प्रयत्न केला जातो. त्याकरता मूळविषयाबरहुकूम नेपथ्य, वेशभूषा, रंगभूषा,
भाषा, इत्यादी साकारण्याचा प्रयत्न केला जातो. अशा प्रसंगाच्या चित्रणात काल्पनिकतेला
वाव असत नाही.

२.३.८. माहितीपटासाठी संशोधन


माहितीपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यापूर्वी सर्व प्रथम आपण जो माहितीपट
तयार करणार आहोत त्याचे समग्र संशोधन करणे आवश्यक असते. प्राथमिक संशोधनात
विषयाची पायरी म्हणजे माहितीपटाद्वारे नेमके काय सांगायचे आहे, ते ठरविणे व त्या
अनुषंगाने मनात उत्पन्न होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधणे. त्यासाठी विषयासंबंधी विपुल वाचन
करणे आवश्यक असते. विषयाचा आवाका लक्षात घेऊन माहितीपटाची रूपरेषा आखणे,
चित्रीकरणाचा कच्चा आराखडा तयार करणे ही त्यानंतरची पायरी, ज्यांची भाष्ये चित्रित
करायची त्यांची माहिती मिळविणे, त्यांना विषयाची कल्पना देणे, उपलब्ध संग्रहातून
चलचित्रे वापरावयाची असल्यास त्याविषयीचा तपशील जमा करणे इत्यादी कामे
नियोजनपूर्वक पार पाडावी लागतात.

२.३.९. माहितीपटाची रचना


सर्वसाधारणपणे माहितीपटाची रचना एखाद्या माहितीपूर्ण भाषणाप्रमाणे अथवा
लेखाप्रमाणे असते, कारण माहिती देणे अथवा क्रिया करण्यास उद्युक्त करणे हा त्यामागील
प्रमुख उद्देश असतो. नाटकाप्रमाणे गोष्ट सांगणे किंवा मनोरंजन करणे हा उद्देश नसतो.
उपलब्ध साहित्याची तर्कसंगत मांडणी करणे त्यासाठी आवश्यक असते. अशा मांडणीमुळे
विषयाशी संबंधित विविध घटकांतील व मुद्यांतील परस्परसंबंध सहजी स्पष्ट होतो. त्यासाठी
वर उल्लेख केलेली रूपरेषा काळजीपूर्वक आखावी लागते. माहितीपटात सुलभता,
तर्कसंगती, एकसूत्रीपणा आणि सुस्पष्टता ही वैशिष्ट्ये असणे आवश्यक आहे. माहितीपटाच्या
तपशिलाची मांडणी अनेक पद्धतींनी करता येते :
• कालानुक्रमे - व्यक्तीचे जीवनचरित्र तिच्या बालपणापासून मांडणे
• स्थळानुसार - अनेक ठिकाणी कार्यरत असलेल्या कार्यालयाची माहिती देणे.
उदाहरणार्थ : भोपाल वायुगळतीचा रहिवाश्यांवर परिणाम: बालके, तरुण व वृद्ध यांच्यावर
भिन्न परिणाम झाले असतील व तज्ज्ञांच्या भाष्यात विविध घटकांचा स्वतंत्रपणे विचार झाला
असेल, तर मांडणी करताना तीच वर्गवारी कायम ठेवणे.

Self-Instructional
Material 80
प्रसारमाध्यमांसाठी
२.३.१०. माहितीपटाचे निवेदन लेखन

निवेदनाची भूमिका कितपत महत्त्वाची आहे, हे माहितीपटातील दृश्य घटकांवर NOTES


अवलंबून असते. माहितीपटात मोठ्या प्रमाणावर दृश्ये व भाष्ये असतील तर निवेदन अल्प
प्रमाणात असते. त्याउलट दृश्ये व घटनाक्रम गुंतागुंतीचे असतील तर ते स्पष्ट करणाऱ्या
निवेदनाची आवश्यकता असते. तरीही माहितीपटाची मुख्य संकल्पना स्पष्ट करणे व
दृश्यांना पूरक माहिती देणे एवढेच निवेदनाचे मर्यादित उद्दिष्ट असले पाहिजे. उत्तम
निवेदनामुळे (लिखित संहिता व तिचे वाचन) माहितीपटात नाट्यमयता निर्माण करायला
किंवा ती वाढवायला मदत होते. घटनास्थळावरील नैसर्गिक आवाजांखेरीज संपादित
चित्रफितीला समर्पक संगीताची जोड देता येते. निर्मात्याच्या मनातील रूपरेषा संकलित
चित्रफितीच्या रूपाने प्रत्यक्षात उतरली की निवेदन-लेखनाचे काम सुरू होते. कारण कोणत्या
दृश्यांना पूरक निवेदनाची गरज आहे, हे तेव्हाच स्पष्ट होते. दृश्यांना पूरक निवेदन
लिहिण्यासंबंधी आधीच्या घटकांत पाहिलेली मार्गदर्शक तत्त्वे येथेही लागू पडतातच.
माहितीपट विशिष्ट लक्ष्यगटासाठी बनविण्यात आला असेल, तर त्या लक्ष्यगटाला समजायला
सोपी जाईल अशी भाषा वापरणे आवश्यक असते.

• माहितीपट निर्मितीचे हेतू :


माहितीपट निर्मितीमागे नेमकेपणाने हेतू कोणता आहे हे आपल्याला पुढील दिलेल्या
मुद्य्यानुसार सांगता येते. ते पुढीलप्रमाणे
१. प्रत्येक दिग्दर्शकाचा/ लेखकाचा माहितीपट निर्मितीचा हेतू वेगवेगळा असतो.
२. कोणत्याही विशिष्ट व्यक्तीची, घटकांची वास्तव आणि सत्य माहिती सर्वदूर
पोहचवणे.
३. समाजप्रबोधन अथवा प्रेरणादायी वातावरण निर्माण करणे अपेक्षित असते. उदा.
एखाद्या शैक्षणिक संस्थेला किंवा एखाद्या वृत्तपत्राला शंभर वर्षे पूर्ण झाली असतील तर
त्यांच्या वाटचालीचा वाढता आलेख चित्रित करण्यासाठी माहितीपटांची निर्मिती केली
जाते.
४. एखाद्या व्यक्तीच्या महनीय कार्याची ख्याती आणि त्यांचे कर्तृत्व इतरांपर्यंत पोहचवावे,
अशा हेतूनेही अनेक माहितीपटांची निर्मिती होत असते.
५. काही माहितीपटांच्या शीर्षकातून आपल्याला माहितीपट निर्मितीचे हेतू निश्चितपणे
समजण्यास मदत होईल.
अशाप्रकारे आपल्याला काही हेतू माहितीपटाबाबतीत आपल्या सांगता येतील. अजून
काही हेतू संदर्भात आपल्याला डॉ. गीतांजली चिने आणि डॉ. हरेश शेळके लिखित
‘आधुनिक भारतीय भाषा : मराठी’ या संपादित ग्रंथात काही हेतू पुढीलप्रमाणे :
१.बदलती शिक्षणपद्धती : दूरदर्शन सह्याद्री निर्मित 'बदलती शिक्षणपद्धती' या
माहितीपटात आजकालची बदलती शिक्षण पद्धती, तिची गरज व त्यामध्ये कोणते बदल
व्हावे याविषयीची माहिती दिलेली आहे.
२. कॅशलेस बॅकिंग एक पाऊल प्रगतीचं : कॅशलेस व्यवहार कसे करायचे तसेच
त्याचे सद्यस्थितीतील महत्त्व याविषयीची माहिती या माहितीपटात आहे. Self-Instructional
Material 81
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन ३. संगणकीय बॅकिंग व्यवहार : यामध्ये ऑनलाईन बँकिंगविषयी माहिती दिलेली
आहे.
NOTES ४. कौशल्य विकासाद्वारे करिअरच्या संधी : या माहितीपटात कौशल्य विकासाद्वारे
करिअरच्या विविध संधीविषयी माहिती दिलेली आहे.
५. तंत्रज्ञान आणि सामाजिक बदल : तंत्रज्ञानात होणारे विविध बदलाविषयी माहिती.
अशा प्रकारे माहितीपटांचे संहितालेखन नेमके कसे केले जाते? त्याची भाषा कशी
असणे अपेक्षित आहेत? त्यासाठी कोणकोणती कौशल्ये असणे अभिप्रेत आहे? यासारख्या
विविध घटकांविषयी माहिती घेणे प्रत्येकाच्याच दृष्टीने महत्त्वाचे आहे. माहितीपट लेखनाच्या
संदर्भात विस्तृत माहिती आणि मार्गदर्शन करणारे ‘शॉर्टकट' हे प्रसाद नामजोशी यांचे प्रसिद्ध
पुस्तक आहे. त्यामध्ये त्यांनी माहितीपटाच्या श्रीगणेशापासून करावी लागणारी सर्व तयारी,
विविध पथ्ये, विविध कौशल्ये, माहितीपट लेखनाच्या विविध पायऱ्या याविषयी विस्तृत
मार्गदर्शन केलेले आहे.
अर्थात भविष्यात ज्या ज्या तरुणांना सिनेसृष्टीत जायचे आहे किंवा सिनेमा निर्मितीमध्ये
पाऊल ठेवायचे आहे त्यासाठी हे सहजसुलभ आणि सोप्या भाषेत हे अतिशय महत्त्वाचे
आहे. कारण लेखक प्रसाद नामजोशी हे काही काळ कार्यकारी निर्माता म्हणून एका
चॅनलमध्ये काम करत होते. आजवर त्यांनी जवळपास शंभराहून अधिक माहितीपट,
लघुपटांचे लेखन आणि दिग्दर्शन केलेले आहे. म्हणून त्यांनी माहितीपट लेखनासाठी अत्यंत
उत्तम असे मार्गदर्शन केले आहे.
याविषयाच्या संदर्भात डॉ. चिने आणि डॉ. शेळके यांचे मत योग्य वाटते. त्यांनी
सांगितल्याप्रमाणे माहितीपटांचे संहितालेखन कसे या बाबतीत आपल्याला पुढील घटकांमध्ये
सांगता येईल.

२.३.११. माहितीपटाचे संहितालेखन


प्रथमतः माहितीपटाचे संहितालेखन आधी लेखकाने लेखन करतेवेळी विषय नीट
समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. लेखनावेळी त्याविषयी संदर्भग्रंथाचे वाचनही करणे
आवश्यक आहे. काही महत्वाचे मुद्दे काढणे आवश्यक आहे. म्हणजेच माहितीपट लेखनाचा
संपूर्णता कच्चा डाटा लेखकाकडे असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे लेखकाला
लेखनासाठी खूप वेळ द्यावा लागतो. अनेक विषय माहितीपट लेखनासाठी होऊ शकतात.
उदा. सामाजिकचित्रणात्मक माहितीपट, प्रवासवर्णनात्मक माहितीपट, कथात्मक माहितीपट,
चरित्रात्मक माहितीपट, ऐतिहासिक माहितीपट, सांस्कृतिक माहितीपट, राजकीय माहितीपट,
व्यक्तीपर माहितीपट इत्यादी. यांसारख्या असंख्य माहितीपटाचे विषय काय, कोणकोणते
असू शकतात कारण माहितीपटाचे लेखन करत असताना प्रकारानुसार त्याची भाषा ही
बदलत असते. म्हणून आशय विषयानुसार माहितीपटाचे काही महत्त्वाचे प्रकार आपल्याला
सांगता येतात.
माहितीपट हा कमीतकमी वेळेत करायचा असेल तर लेखकापुढे ते मोठे आव्हानच
असते. त्यामुळे त्याने एक एक शब्द घासून-पुसून, विचार करूनच लिहिणे अपरिहार्य
Self-Instructional असते. कमीतकमी शब्दात जास्तीत जास्त आशय कसा पोहचविता येईल याकडे लेखकाचा
Material 82 कटाक्ष असणे गरजेचे असते. त्यामुळे संहिता लेखनावर कसून मेहनत घेतली जाणे अपेक्षित
प्रसारमाध्यमांसाठी
असते. कधीकधी एका पानात मावणारा आशय अर्ध्या पानातच कसा आणता येईल याकडेही लेखन
लक्ष देणे गरजेचे आहे. याठिकाणी त्या लेखकाचे कसब पणाला लागत असते. कधीकधी
एका वाक्यात सामावलेला आशयही विस्ताराने सांगावा लागतो ही किमयाही लेखकाला NOTES
साधावी लागतेच. शिवाय माहितीपटाचे शीर्षकही त्यादृष्टीने महत्त्वाचेच असते. त्यामुळे
त्याठिकाणी लेखकाने परिपूर्ण विचार करून ते शीर्षक देणे गरजेचे असते. हे सर्व करण्यासाठी
माहितीपट संहितालेखकाची भाषा ही फार महत्त्वाची असते. ती सरळ, साधी, अनलंकृत
आणि सर्वांना आकलनीय असणे गरजेचे आहे.

• माहितीपटाची संहिता लेखनाच्या तीन पायऱ्या

१. थीम निवडणे
काही माहितीपट फक्त काही विशिष्ट गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करतात. कदाचित
अशी एखादी घटना असू शकते की, जी बहुतेक लोकांना ठाऊक नसते. एक अनोळखी
व्यक्ती ज्याची एक आकर्षक जीवनकथा किंवा वेळेत हरवलेल्या इतिहासाचा एक मनोरंजक
कालावधी असतो. या प्रकारच्या दस्तऐवजीकरणाची उत्तम उदाहरणे जगाच्या कार्यपद्धती
किंवा मूळ लोक कसे आहेत याबद्दल अधिक सामान्य मुद्दे दर्शविण्यासाठी मूळ थीम
वापरतात. म्हणून कोणत्याही विषयाची निवड करण्यापूर्वी त्याची थीम निवडणे आवश्यक
आहे. त्यायोगे माहितीपट लेखन कोणत्या दिशेला न्यायचे हे ठरविता येते. तसेच त्या
थीमसाठी आपल्याला शक्य तेवढी जास्तीत जास्त माहिती मिळवणे आवश्यक आहे.
माहितीपटातील लोक, ठिकाणे याबद्दल जाणून घेण्यासाठी काही पुस्तके, इंटरनेटवरील
माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे.

२. नियोजन आणि स्क्रिप्टिंग


जरी माहितीपटांना सहसा स्क्रिप्टची आवश्यकता नसते. तरीही त्या चांगल्या प्रकारे
नियोजित केल्या पाहिजेत. नियमित चित्रपटांप्रमाणेच माहितीपट प्रेक्षकांना युक्तिवाद
दर्शविण्यासाठी व्हिज्युअल आख्यान तंत्र वापरत असतात. माहितीपटांमध्ये चित्रीकरणाचा
काही भाग आपल्यासमोर उत्स्फुर्तपणे घडणाऱ्या घटनांमधून येऊ शकतो हेही लक्षात ठेवून
त्यानुसार स्क्रिप्टिंग करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे आयोजित केलेले वेळापत्रक सेट
करणे महत्त्वाचे आहे. कारण सामान्य चित्रपटांप्रमाणेच बहुतेक माहितीपटांना चित्रीकरण
योग्यरीत्या केले गेले आहे आणि सर्व /उदिष्टे साध्य केली जातात हे सुनिश्चित करण्यासाठी
टाईम लाईनची आवश्यकता असते. वेळापत्रकात आपण घेतलेल्यांच्या सर्व मुलाखतीची
यादीदेखील समाविष्ट केली पाहिजे. म्हणजेच जेव्हा आपण चित्रीकरण सुरु करण्याचा Self-Instructional
विचार करता तेव्हा मुलाखतीची योजना आधीच केली पाहिजे. त्यानंतर माहितीपटात Material 83
प्रसारमाध्यमांसाठी
लेखन वापरण्यासाठी आवश्यक त्या सर्व कथनाची स्क्रिप्ट तयार करणे अपेक्षित आहे. स्क्रिप्ट
म्हणजे माहितीपटातील कोणत्याही प्रकारचे कथन. त्यामुळे संपादकाला किंवा अॅनिमेटरला
NOTES मजकुरात काय समाविष्ट करावे हे माहित असेल . बऱ्याचदा काही माहितीपटात विशेषतः
ऐतिहासिक लोक किंवा घटनांबद्दलच्या कलाकारांमध्ये पुनर्संचयनाचा समावेश असतो. जर
त्यात वेगवेगळे संवाद समाविष्ट असतील तर त्या कलाकारांना आगाऊ अभ्यास करण्यासाठी
स्क्रिप्टची आवश्यकता असते. म्हणून सर्व बाबींचे आणि घटकांचे यथायोग्य नियोजन
आणि स्क्रिप्टिंग करणे आवश्यक असते.

३. माहितीपट बनविणे
माहितीपटाला प्रत्यक्षात उतरविण्यापूर्वी स्वत:लाच अनुसरून काही प्रश्न विचारा,
त्यायोगे माहितीपट बनविताना अधिक सुलभ होईल.
उदा .
१. मी दाखवित असलेल्या कार्यक्रमाबद्दल किंवा व्यक्तींबद्दल प्रेक्षकांना कसे वाटेल?
२. प्रत्येक दृश्यातून मी कोणता संदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत ?
३. दृश्यांना व्यवस्थित करण्याचा उत्तम मार्ग कोणता आहे ? जेणेकरून संदेश ओलांडू
शकेल?
४. माहितीपटातील ध्वनी आणि प्रतिमा कशा वापरल्या तर त्या अधिक प्रभावी
ठरतील?
यासारखे काही प्रश्न स्वत:च स्वत:ला विचारून त्याच्या अपेक्षित उत्तराच्या अनुषंगाने
माहितीपट बनविल्यास प्रेक्षकांपर्यंत योग्य तो संदेश नक्कीच पोहचला जाईल आणि
माहितीपटाला यशस्वी करता येईल. अर्थातच माहितीपटाच्या संहितेसाठी विषयाची निवड,
सादरीकरण ते सादरीकरणाचे विविध टप्पे, दृश्य माध्यमांचा प्रभाव, शब्दांचा वापर आदी
विषयांवर सांगोपांग विचार करून माहितीपटाचे संहितालेखन होणे अपेक्षित आहे.

२.३.१२. सारांश
मराठी प्रसारमाध्यामांचा विचार करता आपल्याला जीवनात जर पुढे काही करायचे
असेल तर भाषेवर आपले प्रभुत्व असणे गरजेचे आहे. त्यासाठी माणसाकडे कोणते ना
कोणते भाषिक कौशल्य उपजत किवा आत्मसात करता येतात. मग ती भाषा कुठलीही असो
आपल्या व्यक्तिमत्त्व विकासात त्याचे स्थान महत्त्वाचे आहे. भाषा ही सामाजिक संस्था
आहे कारण भाषेशिवाय कोणताही व्यक्ती जगू शकत नाही. आज लोकशाहीमध्ये जगत
असताना आपल्या जीवनव्यवहारात प्रसारमाध्यमांना महत्त्वाचे स्थान आहे. लोकशाहीमध्ये
प्रसारमाध्यमांना चौथा खांब आहे असे आपण मानतो. जरी आपल्या राज्यघटनेमध्ये स्वतंत्र
स्थान नसले तरी, प्रसारमाध्यमांना आज खूप महत्त्व दिले जाते.
प्रसारमाध्यमांसाठी लेखन या घटकामध्ये समाविष्ट असणारी वृत्तपत्रे, नभोवाणी आणि
दूरचित्रवाणी या दृक्-श्राव्य माध्यमांविषयी अधिक विस्ताराने जाणून घेण्याचा प्रयत्न आपण
केलेला आहे. त्याचबरोबर वृत्तपत्रांतील बातमी लेखन करताना मुद्रितशोधनाची आवश्यकता
Self-Instructional का असते हेही विस्ताराने अभ्यासलेले आहेत. वृत्तपत्रामध्ये बातमीलेखन, नभोवाणीसाठी,
Material 84 संहितालेखन आणि माहितीपटाचे संहितालेखन करताना अनेक महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास
प्रसारमाध्यमांसाठी
करून त्याच्या विविध पायऱ्यांचे अनुकरण करत हे संहितालेखन होणे अपेक्षित आहे. लेखन
तद्नुसार सर्वच घटकांचे संहितालेखन कसे व्हावे याविषयी विवेचन केलेले आहे.
NOTES

२.३.१३. महत्वाचे शब्द


१. दूरचित्रवाणी : दूरदर्शन
२ स्क्रिप : संहितालेखन
३. डॉक्युमेंटरी : माहितीपट
४. दृकश्राव्य : दिसणे आणि ऐकणे

२.३.१४. सरावासाठी प्रश्न


१. नभोवाणीवरील भाषण व सभेतील भाषण यांतील फरक स्पष्ट करा.
२. माहितीपटाचे संहितालेखन कसे करतात.
३. माहितीपट निर्मितीची रचना सांगा.
४. माहितीपट निर्मितीचे हेतू सांगा.
५. माहितीपट (डॉक्युमेंटरी) म्हणजे काय?

२.३.१५. अधिक वाचनासाठी पुस्तके


१. मराठी भाषा: उपयोजन आणि सर्जन, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर
२. प्रा. डॉ. उज्ज्वला भोर : प्रसारमाध्यमे आणि मराठी, प्रशात प्रकाशन, पुणे.
३. शेळके भास्कर : प्रसारमाध्यमे आणि मराठी भाषा, स्नेहवर्धन
४. प्रकाशन, पुणे.
५. डॉ. संदीप माळी, उपयोजित मराठी, अक्षरवेध प्रकाशन, पुणे
६. प्राचार्य. डॉ. सानप नामदेव : माहिती अधिकार आणि प्रसारमाध्यमे, लेख- ३०
सप्टेंबर २०१२.
७. www.profyogeshhande.blogspot.com
८. www.vishwakosh.marathi.gov.in
९. www.shodhganga.inflibnet.com

Self-Instructional
Material 85
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी मराठी
नवमाध्यमे आणि
भाग-२ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांसाठी...

समाजमाध्यमांसाठी मराठी NOTES

१.१. भाषा, जीवनव्यवहार आणि


नवमाध्यमे/समाजमाध्यमे
१.१.१. प्रस्तावना
१.१.२. उदिष्टे
१.१.३. समाज, व्यक्ती आणि भाषा
१.१.४. भाषा आणि प्रशासकीय व्यवहार
१.१.५. भाषा आणि माध्यमे
१.१.६. जीवन व्यवहार आणि नवमाध्यमे
१.१.७. नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे (सोशल मीडिया)
१.१.८. सारांश
१.१.९. महत्वाचे शब्द
१.१.१०. सरावासाठी प्रश्न
१.१.११. अधिक वाचनासाठी पुस्तके

१.१.१. प्रस्तावना
भाषेला मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. कारण भाषा ही मानवी
व्यवहारातील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. परस्परांशी संवाद साधणारी सर्वमान्य अशी
भाषा लोकसमूह तिला स्वीकारतो. ‘भाष’ म्हणजे बोलणे या संस्कृत धातूपासून ‘भाषा’ हा
शब्द तयार झाला आहे. मानवी समूह भाषेशिवाय जीवनाच्या विविध क्षेत्रांत काम करू
शकत नाही. या अर्थाने भाषा ही जीवनातील अपरिहार्य घटक आहे. जीवन व्यवहारात
जितक्या मोठ्या प्रमाणात भाषेचा वापर होतो, तेवढी ती समृद्ध होते. माणूस भाषेशिवाय राहू
शकत नाही. कारण आपण एकमेकांचे भाव-भावना, संवेदना, सुख-दु:ख अशा नानाविविध
गोष्टी भाषेच्या माध्यमातून व्यक्त करू शकतो.
भाषा दळणवळणनाचे साधन आहे. हे अनादी काळापासून चालत आलेली परंपरा आहे.
सुरुवातीला माणूस हावभावाची भाषा बोलत होता. नंतर तो समूह करू लागला. नंतर त्या
समूहाची एक भाषा तयार केली. दळणवळण होण्यासठी त्याने भाषेचा वापर केला. नंतर
हीच भाषा पुढे त्या समूहाची मुख्य भाषा म्हणून ओळखली जाऊ लागली. एखाद्या समूहाची
त्या परिसरात वापरली जाणारी भाषा ही त्या समूहाची मातृभाषा असते. त्याला आपण समूह
भाषा असेही म्हणत असतो. मराठी ही आपली मातृभाषा आहे. त्या भाषेला प्रमाणभाषा
म्हणून ओळखतो. दैनदिन जीवनात आपण संदेशनाचे कार्य याच प्रमाणभाषेतून करत
असतो. Self-Instructional
Material 87
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात जग खूप जवळ आले आहे. जगाबरोबर
आपल्याला स्पर्धा करण्यासाठी आपल्याला अत्याधुनिक तंत्रज्ञान ही अवगत हवे आहे.
NOTES सुरुवातीला अनेक नविन प्रसारमाध्यमाची आपली ओळख झाली. आज जागतीकीकरणामुळे
आजून नवसमाज माध्यमांची नव्याने ओळख झाली. उदा. whatssapp, websites,
twitter अशा अनेक नव समाज माध्यमांची ओळख करुन घेणे गरजेचे आहे.

१.१.२. उद्दिष्टे

१. भाषा हे जीवन जगण्याचे महत्वाचे साधन आहे.

२. दैनदिन जीवनात भाषेचे महत्व समजून घेणे

३. नवसमाज माधम ही काळाची गरज आहे ते समजून घेणे

४.आजच्या नवसमाज माध्यमांची गरज.

१.१.३. समाज, व्यक्ती आणि भाषा :


समाज

व्यक्ती भाषा

भाषेविषयीचे कुतूहल प्राचीन काळापासून माणसाला वाटत आले आहे. अगदी


पूर्वीपासूनच लोकपरंपरेत भाषेच्या उगमाबद्दल, शक्तीबद्दल विविध आख्यायिका, कहाण्या
प्रचलित होत्या, तो त्या कुतूहलाच्याच पूर्तीचा प्रयत्न होय. भाषा हे आपल्या अंतरंगातील
मनोगत, भावना, विचार इत्यादि प्रकट करण्याचे साधन आहे, ही जाणीव तर पूर्वीपासून
होतीच. पण या साधनाचे स्वरूप नेमके कसे आहे, हे स्पष्ट करण्याचे प्रयत्न आधुनिक
कालखंडात विशेषत्वाने होऊ लागले. त्यातूनच भाषाविज्ञान ही ज्ञानशाखाही विकसित होत
Self-Instructional गेली. बदलत्या काळानुसार भाषेत बदल होत गेल्याचे आपणास दिसून येते. वेगवेगळ्या
Material 88 जाती धर्माची भाषा वेगवेगळी असू शकते.
नवमाध्यमे आणि
मराठीतील भाषा हा शब्द मूळ संस्कृत भाषेतील भाष् (म्हणजे बोलणे) या धातूवरून समाजमाध्यमांसाठी...
तयार झालेला तत्सम शब्द आहे. भाष्य, भाषक, भाषण, संभाषण, भाषीय हे या धातूपासून
निर्माण होणारे भाषेशी निगडित विविध संकल्पना सूचित करणारे शब्द आहेत. या मूळ NOTES
संदर्भामुळे 'भाषा' ही संज्ञा 'बोलणे' या अर्थाने सर्वसाधारण व्यवहारात वापरली जाणे
स्वाभाविक होय. कोणता ना कोणता आशय दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा उपयोगात
येत असते. हे तिचे आशयवाही माध्यम हे स्वरूप लक्षात घेऊन काही वेळा पशुपक्ष्यांची
भाषा, नजरेची भाषा, प्रेमाची भाषा असे शब्दप्रयोगही केले जातात. काही वेळा विशिष्ट अर्थ
व्यक्त करण्यासाठी भाषा विशिष्ट शब्द म्हणजे विशिष्ट खुणा अथवा संकेत वापरत असते,
या वैशिष्ट्यावर भर देत करपल्लवी, नेत्रपल्लवी या भाषा आहेत, असे म्हटले आहे.
संगणकाची भाषा असाही शब्दप्रयोग होतो. थोडक्यात भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे
मानवी समाजाने संदेशनाचे माध्यम म्हणून भाषेचा स्विकार केलेला आहे. मानवी
अनुभव, विचारांनी भाषा विकसीत झाली आहे. त्यामुळे मानवी समाज जीवन ही विकासीत
होत गेले. भाषा ही दैनदिन व्यवहार उपयोगी असे साधन ही आहे.
मानव हा समाजशील प्राणी आहे. जगण्यासाठी जशी श्वासाची आवश्यकता असते
तशीच भाषेचीही आवश्यकता असते. समाजाशिवाय तो जगू शकत नाही. मानवाची
समाजशीलता ही त्याच्या भाषिक अविष्काराशी जोडलेली असते. म्हणजेच मानव स्वतःला
व्यक्त करण्यासाठी समाजाचा आधार घेतो. त्याला व्यक्त व्हायचे असते म्हणूनच तो
समाजामध्ये राहणे पसंत करत असतो. किंबहुना तीच त्याची गरज असते. म्हणूनच माणूस
भाषेशिवाय सुद्धा जगू शकत नाही. समाजाने ठरवून दिलेल्या संकेत व्यवस्थेमध्ये माणूस
आपला भाषिक व्यवहार संपन्न करत असतो. सामान्यतः भाषाव्यवहार ही एक दैनंदिन
प्रक्रिया आहे. कोणत्याही समाजातील भाषाव्यवहार हा अखंडपणे सुरू असतो. या भाषा
व्यवहारामुळे सामाजिक व्यवहाराला चालना मिळत असते. वैचारिक व भावनिक देवाण-
घेवाण भाषेच्या माध्यमातून समाजात सहजरित्या होत असते. कोणत्याही व्यक्तीशी संपर्क
साधण्याचे अत्यंत सहज सुलभ माध्यम म्हणून भाषेचा उपयोग क्षणोक्षणी होत असलेला
दिसून येतो. त्यामुळे संप्रेषणाचे भाषा हे सर्वश्रेष्ठ साधन आहे, असे म्हणता येईल. भाषेच्या
माध्यमातूनच मानवाद्वारे भाषिक संप्रेषणाच्या साधनांची निर्मिती झालेली आहे. यामध्ये
विविध संकेत, चिन्ह, हावभाव, हातवारे इत्यादींचा समावेश होतो. भाषा व्यवहाराच्या
बाबतीत डॉ. रमेश धोंगडे लिहितात की, व्यक्तीच्या भाषा व्यवहाराचा गट असतो व अशा
छोट्या गटांची भाषाव्यवहार जाळी तयार होतात. व्यक्तीचा प्रत्यक्ष भाषा संपर्क येतो तो
लोकसमूह फार लहान असतो. मात्र, लोकांच्या व्यवहाराची भाषाव्यवहार जाळी अमर्याद
असतात. भाषिक समाज ही मर्यादा घालणारी संकल्पना आहे, तर भाषकांचे छोटे गट आणि
एकमेकांना जोडली जाणारी भाषा व्यवहार जाळी हे अमर्याद असे वास्तव आहे.
तसेच जीवनव्यवहार, शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, संस्कृतीचे
हस्तांतरण इत्यादी सर्वच भाषेच्या माध्यमातून चालते. समाजाशी संबंधित सर्वच घटकांना
भाषा ही पुढे घेऊन जात असते. आपल्या साहित्यामध्ये भाषेचे प्रारूप हे महत्वाचे असते.
आपल्या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी भाषा ही महत्वाची आहे. ती एका
पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्याचे जतन व्हावे यादृष्टीने आपण विचार करणे अत्यंत
महत्त्वाचे आहे. म्हणून कोणत्याही प्रदेशातील भाषा ही त्या प्रदेशाच्या सभोवतालचे विश्व,
तेथील लोकजीवन, लोकव्यवहार आणि लोकसंस्कृती यांचे जतन करत असते. Self-Instructional
मानवी समाजात जीवन जगत असताना एकाहून अधिक भाषांशी मानवाचा नेहमी संपर्क Material 89
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... येत असतो. या भाषिक संपर्काची प्रक्रिया ही अव्याहतपणे घडत असते. कारण कोणताही
भाषिक समाज हा केवळ त्या एकाच भाषेवर सामाजिक व्यवहार अथवा जीवन व्यवहार
NOTES पूर्ण करू शकत नाही अशावेळी त्याला दुसऱ्या इतर भाषांचा आधार घेणे क्रमप्राप्त ठरते.
भारतासारख्या बहुभाषिक देशामध्ये व्यक्तीला दोन किंवा त्याहून अधिक भाषा येत असतात.
किमान लौकिक भाषिक व्यवहाराच्या पातळीवर तरी दोन किंवा दोनपेक्षा अधिक भाषांचे
ज्ञान मानवाला असते. विविध सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक,
कौटुंबिक कारणांमुळे माणूस इतरांच्या संपर्कात येत असतो. विविध समाजाचे लोक एकत्र
आले की ते त्यांच्या समाजाच्या बोलीभाषेतून अभिव्यक्त होऊ पाहतात. ही अभिव्यक्त
होण्याची प्रक्रिया एका भाषेला दुसऱ्या भाषेशी जोडत असते. म्हणून भाषा संपर्क ही प्रक्रिया
अटळ अशी आहे. प्रत्येक भाषा ही समाजाच्या मालकीची असली तरी तिचा वापर
व्यक्तीकडूनच होत असतो. प्रत्येक व्यक्ती भाषा आपापल्या पद्धतीने उपयोगात आणत
असते. त्यामुळे ग्रामीण अथवा शहरी भागातील स्त्री अथवा पुरुष यांचे भाषाव्यवहार अत्यंत
व्यापक आणि गुंतागुंतीचे झालेले असतात.

मानवाच्या माणूसपणाचे लक्षण : भाषा


मानव आणि मानवेतर प्राण्यांमध्ये भाषेमुळेच मोठा फरक करता येतो. भाषेचे संवाद
प्रभावी माध्यम मानवाजवळ आहे. ते माध्यम मानवेतर प्राण्यांच्या जवळ नसल्यामुळे
त्यांच्या संदेशवहनात अनंत अडचणी निर्माण होतात आणि म्हणूनच मानवाने भाषेच्या
माध्यमातून आपली प्रगती साधली आहे. कारण भाषेच्या माध्यमातून तो एकमेकांशी आपले
विचार व्यक्त करू शकला. त्यातून त्याला चिंतन करणे शक्य झाले आणि म्हणूनच त्याच्या
चिंतनाची प्रक्रिया पृथ्वीच्या उगमापर्यंत पोहोचली. भाषा अवगत नसती तर कदाचित
मानवाला इतकी प्रगती साधणे शक्य झाले नसते. पूर्ण कारण भाषा ही फक्त संदेशवहनाचे
व भाषा व्यवहाराचे साधन नाही तर ते विचार करण्याचे चिंतन करण्याचे सुद्धा साधन आहे.
या गोष्टी मानवाला शक्य आहेत. परंतु विवि मानवेतर प्राण्यांना या गोष्टी शक्य नाही म्हणून
या सृष्टीतील सर्व सजीवांमध्ये मानव भाषेन हा सर्वात जास्त प्रगत सजीव मानला गेलेला
आहे.

१.१.४. भाषा आणि प्रशासकीय व्यवहार


आपल्या या भाषिक व्यवहारात अनेक बदल आणि स्थित्यंतरे होतांना दिसतात. तसेच
भाषिक व्यवहारात बोलताना होणारा बदल, भाषा वापरण्यात होणारी काटकसर या सगळ्या
गोष्टींचा प्रभाव हा भाषिक व्यवहारावर होताना दिसतो.
मानवाचे जीवन हे गतिमान आहे. त्याच्या गतिमानतेमुळे जीवनामध्ये दैनंदिन सामाजिक
व्यवहार संपन्न होत असतात. या व्यवहारांची प्रतिपूर्ती भाषेच्या माध्यमातून होते. सामाजिक
जीवन व्यवहारातील पूर्तीसाठी अविष्कार आणि अभिव्यक्तीच्या माध्यमातून भाषेची
आवश्यकता निर्माण होते. मानवाला विविध ठिकाणी व्यवहार भाषेच्या माध्यमातून संपन्न
Self-Instructional करावे लागतात. विविध शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय संस्था, ग्रामपंचायत,
Material 90 पंचायत समिती, नगरपंचायत, महानगरपालिका, जिल्हा परिषद इत्यादी क्षेत्रांमध्ये भाषा
नवमाध्यमे आणि
व्यवहार हा केला जात असतो आणि त्या भाषा व्यवहाराच्या अनुषंगाने दैनंदिन कामकाजाचे समाजमाध्यमांसाठी...
व्यवहार चालत असतात. तसेच विविध प्रसार माध्यमांमध्ये भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात
होत असतो. म्हणून, हे एक महत्वाचे विनियोगाचे साधन म्हणून ओळखले जाते. भाषा ही NOTES
मानवाला मिळालेली अमुल्य देणगी आहे त्यामुळे एकमेकांच्या संवाद प्रक्रियेसाठी भाषेचे
ज्ञान असणे गरजेचे आहे.
प्रशासकीय व्यवहारांमध्ये भाषा वापरत असताना भाषेशी संबंधित कौशल्य आत्मसात
करणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी लेखन, वाचन, संभाषण इत्यादी भाषिक कौशल्य
अंगीकृत केल्याशिवाय त्या व्यक्तीला कुठे, कसा, कोणता, कशासाठी संवाद करायचा आहे
हे लक्षात येणार नाही. मसुदा लेखन, भाषांतर, अर्ज लेखन, सारांश लेखन, अनुवाद इत्यादी
गोष्टी कार्यालयीन व्यवहारात करत असताना नेमका मुद्दा मूळ तसेच विविध नव शब्दनिर्मिती
ज्ञान माणसाकडे असावे लागते. कार्यालयीन व्यवहारांमध्ये भाषेचा वापर करत असताना
पारिभाषिक संज्ञा उपयोगात आणाव्या लागतात. तसेच प्रशासकीय कार्यालयामध्ये भाषा
कशी वापरावी या संदर्भात डॉ. संदीप माळी लिखित ‘उपयोजीत मराठी’ या पुस्तकात ते
म्हणतात की,
i) प्रशासनिक लेखनात जोडाक्षरे टाळावीत. नवा बोजड शब्द वापरावा लागला तर
कंसात त्याचा वर्णनात्मक अर्थ द्यावा.
ii) वाक्य छोटी-छोटी असावीत. त्यामध्ये पंधरा ते वीस शब्द असावेत. परिच्छेद छोटे-
छोटे करावेत. महत्त्वाचा मुद्दा असलेला परिच्छेद अगोदर लिहावा. ज्या अर्थी, याखेरीज
अशा शब्दांनी सुरुवात करू नये.
iii) मजकुरातील हजार पर्यंतच्या संख्या अंकात लिहा व त्याबद्दल मोठ्या संख्या अक्षरी
लिहाव्या.
iv) सुलभ वाचनासाठी विरामचिन्हांचा वापर करावा. शुद्धलेखनाच्या नियमांचे पालन
करावे.
v) कोणताही तपशील संदर्भ टाळून लिहू नये, संदिग्ध लिहू नये. स्पष्ट व शक्यतो
उदाहरणे देऊन लिहावे.
या पद्धतीच्या विविध सुचनांचे पालन प्रशासकीय क्षेत्रामध्ये भाषा वापरतांना करावे लागते.

१.१.५. भाषा आणि माध्यमे


आजच्या काळात विविध प्रसारमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असलेला दिसून
येतो. जनसामान्यांवरसुद्धा या प्रसारमाध्यमांचा प्रभाव पडलेला असतो. वृत्तपत्र, आकाशवाणी
व दूरदर्शन ही अत्यंत प्रभावी अशी प्रसारमाध्यमे खूप काळापासून समाजात रुजलेली
आहेत. परंतु आज आधुनिक समाज माध्यमांच्या माध्यमातून अधिक वेगवान असे
प्रसारमाध्यम सर्वांना परिचित झालेले आहे. फेसबूक, ट्विटर, व्हाट्सअप, ब्लॉग,
वेबसाईटवरील लेखन, इंटरनेटवरील लेखन इत्यादी लेखनामुळे संपूर्ण विश्व एक खेडे बनले
आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील क्रांतीचा हा परिपाक म्हणता येईल. या सर्व प्रसारमाध्यमांनी
जागतिक पातळीवर आपली अपरिहार्यता स्पष्ट केली आहे. या सर्व माध्यमांचा समाजमनावर
मोठ्या प्रमाणात परिणाम होत असलेला दिसून येतो. Self-Instructional
व्यक्ती आणि समाज यांची मानसिक गुंतवणूक या विविध प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या Material 91
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... प्रमाणात झालेली दिसते. मुद्रित माध्यम मधून वृत्तपत्र आजही अत्यंत महत्त्वाचे असे
प्रसारमाध्यम आहे. माणूस हाच या माध्यमाच्या केंद्रस्थानी असल्यामुळे दैनंदिन व्यवहाराची
NOTES भाषा या माध्यमाची परिभाषा म्हणून प्रस्थापित होत गेलेली दिसते. म्हणूनच वृत्तपत्र हे लोक
संवादाचे आणि संपर्काचे महत्त्वाचे माध्यम बनले आहे. विविध लोकांच्या सहकार्यातून
वृत्तपत्राची उभारणी होत असते, त्या सर्वांचा थोड्या कमी अधिक प्रमाणात वृत्तपत्राच्या
भाषेवर प्रभाव पडतच असतो. काळानुसार वृत्तपत्रांनीही कूस बदललेली आहे. वृत्तपत्र
कार्यालयात कार्यरत विविध विभागांच्या माध्यमातून वृत्तपत्र अधिक आकर्षकपणे
आपल्यापर्यंत पोहोचत असते. दैनंदिन जीवन व्यवहार, सांस्कृतिक व्यवहार, सामाजिक
आणि साहित्यिक व्यवहार इत्यादी सोबतच, विज्ञान, वाणिज्य, अर्थकारण, राजकारण,
शेती, उद्योग, संस्कृती, क्रीडा, महिला, बालविश्व, कामगार, विज्ञान, तंत्रज्ञान इत्यादी
क्षेत्रातील माहिती वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकांपर्यंत पुरविली जाते. ही माहिती भाषेच्या
सहाय्याने आशय संपन्न करण्याचा प्रयत्न केला जातो. फीचर लेखन, स्तंभलेखन, संपादकीय,
अग्रलेख, वाचकांचा पत्रव्यवहार, मते-मतांतरे इत्यादी घटकांच्या माध्यमातून भाषिक वापर
परिणामकारकपणे केलेला पाहायला मिळतो. म्हणून वृत्तपत्रात भाषा वापरायची संकल्पना
थोडी वेगळ्या पद्धतीने दिसून येते. वृत्तपत्र सृष्टीमुळे भाषेत बरीच घडामोड झालेली आहे.
विविध शब्दांचे आगमन वृत्तपत्रांमुळे भाषेत झालेले आहे. संपादक, उपसंपादक, मुद्रित
शोधक, वार्ताहर, बातमीदार, विशेष प्रतिनिधी या सर्वांनी लोकमानसामध्ये वृत्तपत्रांच्या
माध्यमातून विविध शब्दांची पेरणी केलेली आहे.
माध्यमे ही माहितीच्या प्रसाराबरोबरच भाषेचाही प्रसार करीत असतात. अनेक नवे शब्द
आणि संज्ञा तयार करून त्या वापरात आणण्यामध्ये प्रसारमाध्यमांचा मोठा वाटा असलेला
दिसून येतो. माध्यमे भाषेच्या साहाय्याने वाचकांशी, श्रोत्यांशी, जन-सामान्यांशी संवाद
साधत असतात. भाषा हे संवादाचे प्रमुख साधन/माध्यम आहे. तसेच विचार करणे, संवेदना
किंवा जाणीव होणे आणि प्रतिसाद देणे या सर्वांचे साधन/माध्यम म्हणूनही भाषेचा उपयोग
आपण मोठ्या प्रमाणात करतो. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व घडविण्यामध्ये भाषा सर्वात महत्त्वाचे
कार्य करत असते. दृष्टी, क्षमता, वृत्ती, आवड आणि मूल्ये यांच्यासह व्यक्तिमत्त्व भाषेतूनच
घडत असते. माध्यमे ही समाजाचा आरसा आहेत. भाषेच्या माध्यमातून समाजजीवनाचे
प्रबोधन करण्याचे काम, मनोरंजन करण्याचे काम, नवनवीन माहिती देण्याचे काम
प्रसारमाध्यमे करीत असतात. आकाशवाणी, दूरदर्शन, वृत्तपत्रे, इंटरनेट, मोबाईल, चित्रपट,
नाटक, ब्लॉग, ट्वीटर, फेसबुक इ. अशी अनेक माध्यमे आपल्या रोजच्या जीवनाशी प्रत्यक्ष
संबंध प्रस्थापित करतात. आपल्या विचाराला आणि कृतीला ती जोडली जातात. महत्त्वाची
गोष्ट म्हणजे ही सारी प्रसारमाध्यमे भाषेच्या कौशल्यावर उभी आहेत. भाषा हेच या
माध्यमांचे बलस्थान आहे. प्रत्येक माध्यमामध्ये भाषा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोगात
आणली जाते. म्हणजे थोडक्यात काय तर इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि प्रिंट माध्यमे यामध्ये
भाषेचे बदलते स्वरूप आपल्याला काळानुरूप अनुभवायास मिळते. भाषा ही परिवर्तनशील
असते. कारण समाज जीवनात, समाज व्यवहारातही परिवर्तनाची प्रक्रिया ही चालूच असते.
त्यामुळे भाषेचा उपयोग विविध प्रकारे विविध माध्यमांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने
झालेला दिसून येतो. आज इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे जग फार झपाट्याने बदलत आहे. तेथे
भाषेचा उपयोग करताना विविध पद्धतींचा, लकबींचा उपयोग केलेला आपणाला दिसून
Self-Instructional येतो. थोडक्यात काय तर भाषेमुळेच माध्यमांची समाजात एक स्वतंत्र ओळख तयार होत
Material 92 असते.
नवमाध्यमे आणि
१.१.६. जीवन व्यवहार आणि नवमाध्यमे समाजमाध्यमांसाठी...

समाज जीवन हे सातत्याने बदलत असते. तसेच त्या-त्या समाज घटकातील जीवन NOTES
व्यवहारही बदलत राहतात. या बदलत्या जीवन-व्यवहाराचा माध्यमांवरही परिणाम होणे
स्वाभाविक आहे. माध्यमे ही जगभर घडणाऱ्या घटनांची माहिती आपल्यापर्यंत पोहचवीत
असतात. प्राचीन काळापासून आपले विचार एक दुसऱ्याला समजावेत, कळावेत, आपल्या
कुटुंबातील, गावातील खुशाली दुसऱ्यांना कळावी म्हणून निरोप्याच्या हस्ते निरोपाची देवाण-
घेवाण करून प्रसारमाध्यमांचेच काम साधले जात असे. पुढे हेच कार्य लोककलांच्या
माध्यमातून घडू लागले. उदा. कीर्तन, प्रवचन, लोकनाट्य, भारूड, भजन इत्यादी सर्व
प्रकारातून श्रोत्यांच्या मनावर उत्तम संस्कार घडविले जात असत. एका अर्थाने माध्यमांचा
उपयोग हा आपल्याकडे पूर्वीपासून चालत आलेला आहे.
समाज परिवर्तन-बदल-विकास हा जसजसा होत गेला तसतशी विविध प्रकारची संवाद
माध्यमे निर्माण होत गेलेली आपल्याला दिसून येतात. आपल्या अवती-भवती घडणाऱ्या
नवनवीन घटना, होणारे बदल, शासनाबद्दलची माहिती, बदलते हवामान अशा विविध
घटकांची अतिशय मौल्यवान माहिती समाजापर्यंत तत्काळ पोहचवण्यासाठी त्या-त्या
टप्प्यावर दृक, श्राव्य, दृक-श्राव्य अशा विविध प्रकारांतील माध्यमांची निर्मिती होण्यास
सुरूवात झाली. म्हणूनच ही सर्व माध्यमे महत्त्वाची आहेत.
सुरूवातीच्या काळात वृत्तपत्रे, नभोवाणी (रेडिओ), दूरदर्शन यांचा उल्लेख आपल्याला
करावा लागेल. समाजात परिवर्तन व्हावे, लोकांना विज्ञानवादी, भौतिकवादी बनविणे,
समाजातील अज्ञान नष्ट करून समाजात विचार जागृती घडवून आणणे समाजाचे वैचारिक
भरण-पोषण करणे, समाजामध्ये रुढी, परंपरा या विषयीचे मूलभूत चिंतन मांडणे, शिक्षणाचे
महत्त्व पटवून देणे असे विविध महत्त्वाचे हेतू ठेवून या माध्यमांची निर्मिती झालेली दिसून येते.
आपण सुरुवातीला कोणती माध्यमे प्रामुख्याने महत्त्वाची ठरली त्यांची ओळख करून घेऊ.

सुरूवातीची माध्यमे

सुरुवातीच्या माध्यमांचा आपण विचार केला तर असे दिसून येते की, या माध्यमांमधूनही
समाजजागृतीचे, लोकजागृतीचे कार्य मोठ्या प्रमाणावर घडून आलेले दिसते. त्यामध्ये
वृत्तपत्र, नियतकालिके, आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांनी सुरूवातीच्या काळात Self-Instructional
अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसून येते. Material 93
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... • वृत्तपत्र
NOTES आपल्या समाजाची जनजागृती व्हावी या उद्देशातून वृत्तपत्राचा जन्म झाला. शासन
आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून वृत्तपत्रांचा विकास झाला. वृत्तपत्रातून अगदी
समाजातील छोट्या-छोट्या गोष्टींपासून ते एखाद्या महत्त्वाच्या विषयावरील वैचारिक आणि
प्रबोधनात्मक लेखन करुन जनतेमध्ये प्रबोधन आणि जागृती करण्याचे काम केले आहे.
सर्वप्रथम विचार केला तर वृत्तपत्रातून १९ व्या शतकामध्ये प्रबोधनात्मक महाराष्ट्र
म्हणून पुढे येत होता. अनेक समाजसुधारकांनी स्वतः वृत्तपत्र काढून जनतेपर्येंत आपले
विचार करून लेखन होऊ लागले. त्यामुळे समाज परिवर्तनाच्या चळवळीचे अत्यंत प्रभावी
असे साधन म्हणून वृत्तपत्राकडे पाहिले जाते. आजही वृत्तपत्र हे माध्यम प्रभावीपणे
समाजामध्ये लोकजागृती करण्याचे कार्य करत आहे. या संदर्भात काही महत्वाच्या बाबी
आपल्याला सांगता येईल. ते पुढीलप्रमाणे

• वर्तमानपत्रातून आजूबाजूच्या जगातल्या विविध घटना व घडामोडी सतत वाचकांच्या


समारे येत असतात. या घडामोडींमधूनच वृत्तपत्रीय लेखांसाठी विषय मिळत असतात.

• विविध लेख, अग्रलेख, माहितीपर लेखन, वृत्तपत्रातील विविध स्तंभ वा सदरे हे ज्ञान,
प्रबोधन आणि माहिती देत असतात.

• भारतीय परंपरेत आधुनिक काळात वृत्तपत्रांना विशेष महत्त्वाचे स्थान आहे. कारण
याच काळामध्ये अनेक वृत्तपत्रांनी समाजमनाला प्रबोधीत केले. स्वातंत्र्याची ज्योत
मनामध्ये पेटवली. समाजसुधारकांचे म्हणणे सामान्यांपर्यंत पोहचवले. त्यामुळेही
समाजसुधारणेची चळवळ सक्षम बनू शकली.

• वृत्तपत्रांना आपल्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखले जाते कारण


वृत्तपत्रांची प्रभावक्षमता ही मोठी असते. सर्वसामान्यांपर्यंत पोहचून त्याला विशिष्ट
विषयाच्या बाबतीत जागरूक करण्याचे कार्य वृत्तपत्रे करत असतात. त्यामुळे या माध्यमाचे
महत्त्व अधोरेखित होते.

• अनेक लोकांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून मनोरंजन आणि मनोरंजनातून प्रबोधन अशा


प्रकारे कार्य केलेले आहे. रोज अनेक विध विषयांवर प्रसिद्ध होणारे लेख हे त्या त्या
विषयाच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देणारे असतात. त्यामुळे वाचकांनाही विषयाची
विविधता मिळते आणि अनेक विषयांच्या संदर्भात महत्त्वाची माहितीसुद्धा या लेखांच्या
आधारे मिळते.

• सार्वजनिक लढ्याचे महत्त्वाचे हत्यार म्हणून वृत्तपत्राचा आपल्या इतिहासात वापर


केलेला आहे. महात्मा फुलेंपासून ते बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांनी वृत्तपत्रांना
समाजमन प्रबोधनाचे माध्यम म्हणून वापरले.
Self-Instructional
Material 94 • देशाचा किंवा समाजाचा सामाजिक, राजकीय, साहित्यिक, सांस्कृतिक आणि
नवमाध्यमे आणि
आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी वृत्तपत्रांची स्वतंत्रता फार महत्त्वाची असते. समाजमाध्यमांसाठी...
वृत्तपत्रीय लेख हे कार्य सहज करू शकतात.
उदा., NOTES

• आकाशवाणी
लिखित स्वरूपातला मजकूर, माहिती लोकांपर्यंत पोहोचली आणि आकाशवाणीसारख्या
श्राव्य माध्यमाच्या शोधामुळे माणसाचे जगणे सोपे झाले. समाजात घडणाऱ्या गोष्टी
आकाशवाणीच्या माध्यमातून खेड्यापाड्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे माणसाच्या दैनंदिन
जगण्याला गती मिळाली. समाजाच्या सर्व स्तरातील माहिती आकाशवाणीवरून प्रसारित
होणाऱ्या कार्यक्रमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत झाली. मुद्रित माध्यम हे दीर्घकाळ
टिकणारे असले तरी त्याचा वाचक हा थोडाफार का होईना साक्षर असणे गरजेचे होते; परंतु
आकाशवाणीच्या श्रोत्याला साक्षर असणे गरजेचे नसून तो एखादी माहिती ऐकून घेऊन त्या
ज्ञानाचा, मनोरंजनाचा फायदा त्याला घेता येतो. अशा या माध्यमाचा शोध जी. मार्कोनी यांनी
लावला. या केंद्राची सुरुवात भारतात १९२६ ला झाली. ‘इडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी' या
एका खासगी कंपनीने पहिले प्रसारण मुंबई येथे केले. भारतातील पहिले रडिओ प्रसारण केंद्र
२३ जुलै १९२७ रोजी मुंबई येथे सुरू झाले. या केंद्राचे कार्यक्षेत्र ४८ कि. मी. इतके होते व
यानंतर कोलकता, अलाहाबाद, डेहराडून इ. ठिकाणी रेडिओ केंद्रे सुरू झाली. स्वातंत्र्योत्तर
कालखंडात आकाशवाणी या माध्यमाने आपला 'बहुजन हिताय-बहुजन सुखाय' या
ब्रीदवाक्याने जनमानसाच्या मनात आपले स्थान निर्माण केले. २१ व्या शतकातही रेडिओचे
विविध चॅनल्स सुरू झाले व आकाशवाणीवर एफ. एम. रेडिओ, रेडिओ मिर्ची, रेडिओ
टोमॅटो, विविधभारती यांसारखी चॅनल्स सुरू झाला. रेडिओच्या माध्यमातून प्रसारित होणारी
माहिती, कार्यक्रम यांतून लोकांची करमणूक होऊ लागली. सर्वसामान्यांना परवडेल असे हे
माध्यम असल्याने घराघरांत आकाशवाणी प्रसारित झाली.
आकाशवाणीसाठी लेखन : आकाशवाणी हे माध्यम श्राव्य असल्याने आकाशवाणीवरून
प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची उद्घोषणा केली जाते. उद्घोषनेतून श्रोत्यांना माहिती पुरविली
जाते. सध्या आकाशवाणीची विविध प्रसार केंद्रे सुरू झाली आहेत, श्रोता एखाद विशिष्ट
असे प्रसारकेंद्र ऐकत असतो. म्हणून श्रोत्यांना त्या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची
माहिती पुरविणे गरजेचे आहे. हे सर्व निवेदनाच्या माध्यमातून केले जाते. आकाशवाणीसाठी
लेखन करताना त्यामध्ये कल्पकता, योजकता व सहजता येणे अत्यंत गरजेचे आहे.
आकाशवाणीवर प्रसारित या सर्व कार्यक्रम बोल्याने ऐकलेच पाहिजेत असे नमून, जे
श्रोत्याच्या मनावर अवलंबून आहे. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या बातम्या, कार्यक्रम
श्रोते ऐकतीलच असे नाही, म्हणून महत्त्वाच्या बातम्यांची शीर्षक (Lead) अगोदर घ्यावीत
व त्यानंतर बातमीच्या शीर्षकाचा पुनरुच्चार करून बातमीचा तपशील द्याचा. आकाशवाणीचा Self-Instructional
श्रोतृवर्ग हा सर्वसामान्य असल्याने व संमिश्र वर्गातला असल्याने बातमीची भाषा त्यांना Material 95
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... समजेल, उमजेल अशी साधी व सोपी असावी लागते. एकसारखे निवेदन असल्याने ते
अॅक्सिलेटर सारखे असावे लागते. बातम्या व श्रुतीकालेखनासारखे कार्यक्रम हे श्रोत्यांना
NOTES प्रबोधनात्मक सामाजिक माहिती पुरवत असतात. आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या या
कार्यक्रमांच्या संदर्भात पु. ल. देशपांडे म्हणतात, "संवाद आणि निवेदन यांचे प्रमाण अगदी
व्यवस्थित असले पाहिजे. निवेदन हे अललश्रशी सारखे असावं, लीशरज्ञ सारखं असू नये.
चतुर ड्रायव्हर गिअर बदलताना जसा बदलतो, तस निवेदकानं नाट्याच गिअर बदलले
पाहिजे. रेडिओ श्रुतीकेत अपरिहार्य म्हणून निवेदन करताना निवेदकाने घ्यावयाची काळजी
देशपांडे यांनी सांगितली आहे. दिवसभरात प्रसारित होणारे कार्यक्रम हे निवेदनात्मक
असल्याने देशपांडे याची ही प्रतिक्रिया रास्त आहे. प्रसारमाध्यमे जनसामान्यांच्या दैनंदिन
जीवनात संदेशवहनाचे कार्य करतात, त्यामुळे त्यांना अनन्यसाधारण असे महत्व आहे.
परंतु, प्रत्येक माध्यमांना काही ना काही मर्यादा पडतात.
भारतातील आकाशवाणी हे पहिले प्रसारमाध्यम आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार
नाही. स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून आकाशवाणीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. भारतात
वर्तमानपत्रांची सुरूवात अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाली असली तरी 'श्राव्य' माध्यम
म्हणून आकाशवाणीने केलेले कार्य भरीव असे आहे. जेव्हा कोणतीच सुविधा पोहचलेली
नव्हती अशा काळात आकाशवाणीने लोकांचे मनोरंजन, प्रबोधन करण्याचे महत्त्वपूर्ण काम
केलेले दिसून येते. श्राव्य माध्यम म्हणून नंतर
आकाशवाणीची लोकप्रियता खूपच वाढत
गेलेली दिसून येते. महाराष्ट्रासारख्या राज्यात
तर १९७२ पर्यंत म्हणजेच दूरदर्शनचे
आगमन होईपर्यंत आकाशवाणी हे राज्यात
एकमेव प्रभावी जनसंपर्क माध्यम
स ा म ा न ्यां स ा ठ ी घराघरात उपलब्ध होते.
स म ा ज ा च ्या ज ड ण घ ड ण ी त
आकाशवाणीचा वाटा मोठा आहे. नवभारतीयांच्या
मनातली, विचारातली राष्ट्रीय अस्मिता फुलविण्याचे, टिकवण्याचे कामही रेडिओने केलेले
दिसून येते. भारताच्या स्वातंत्र्योत्तर नियोजनबद्ध वाटचालीत, विकासात रेडिओने एक
जबाबदारी पार पाडली आहे. पंचवार्षिक योजना, लोककल्याणकारी योजना, कुटुंबकल्याण,
अंधश्रद्धा निमूर्लन, साक्षरता, विज्ञाननिष्ठा या बाबी ग्रामीण समाज जीवनापर्यंत पोहचविण्याचे
व रुजविण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आकाशवाणीने केलेले दिसून येते.
सद्य: स्थितीतही आकाशवाणी आपले वेगळेपण जपून आहे. आजही आकाशवाणीसारख्या
माध्यमाचा उपयोग बरेचसे लोक प्रवास करताना, निवांत असताना, घरामध्ये करमणूक,
मनोरंजनात वेळ घालविण्यासाठी, चांगले कार्यक्रम आवर्जून ऐकण्यासाठी करताना दिसून
येतात. आकाशवाणी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून काळानुरूप बदल घडवून आणत
आहे. आज वेब-रेडिओ नावाचा नवा प्रकार अस्तित्वात आलेला आहे. चोवीस तास
चालणारा एक युथ व्हाइस हा वेब रेडिओ लोकाप्रिय ठरत आहे. त्याचबरोबर चोवीस तास
मनोरंजन करणारे एफ.एम. चैनल्स आकाशवाणी प्रसारित करीत आहे. एकूणच आपण
विचार केला तर असे दिसून येते की, बदलत्या काळातही आकाशवाणी आपले अस्तित्व
Self-Instructional टिकवून आहे.
Material 96
नवमाध्यमे आणि
• दूरदर्शन समाजमाध्यमांसाठी...

भाषण, चर्चा व मुलखाती हा नभोवाणी प्रसारणाचा महत्वाचा भाग आहे. मनोरंजनाचे NOTES
सर्वात जुने, स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारे माध्यम म्हणजे नभोवाणी होय. आजही
खेड्यापाड्यातून तसेच शहरातही आकाशवाणीची लोकप्रियता टिकून आहे. १९२६ साली
“इंडियन ब्रॉडकॉस्टिंग कंपनी” या खाजगी संस्थेमार्फत भारतामध्ये आकाशवाणी प्रसारणाला
सुरूवात झाली होती. तत्कालीन ब्रिटिश राज्यकत्यांनी त्याबाबत करार करून भारतातील
मुंबई या ठिकाणी २३ जुलै १९२७ रोजी पहिले नभोवाणी केंद्र स्थापन झाले व त्यांनीच या
केंद्राला 'आकाशवाणी' हे नाव दिले. 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' हे ब्रीदवाक्य घेवून
आकाशवाणीची वाटचाल सुरू झाली. भारत सरकारनेही 'आकाशवाणी' हे नाव आवडीने
स्वीकारले. १९२७ साली अवघे मुंबई हे एक केंद्र असणाऱ्या आकाशवाणीची आज चारशेहून
अधिक केंद्र स्थापन झालेली आहे. त्यामध्ये काही पूर्ण केंद्रे आहेत तर काही सहक्षेपण
केंद्रांचाही समावेश आहे.
दूरदर्शनवर कला, संगीत, गीत, नाट्य, चित्रपट, क्रीडा, वृत्त घडामोडी इ. सर्वच
क्षेत्राला स्थान मिळाले. त्यामुळे विविध स्तरातील लोकांना दूरदर्शनने आकर्षित केले. एका
अर्थाने सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा या सर्वच क्षेत्रांना दूरदर्शनने
कवेत घेतले त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत लोकांना लोकप्रियता मिळविण्यामध्ये
दरदर्शनने कमी काळात आघाडी घेतलेली दिसून येते. योग्य ती माहिती, ज्ञान देण्याचे कार्य
दूरदर्शनने केलेले दिसून येते. १९८०-९० नतरच्या कालखंडात ग्रामीण भागापर्यंत दूरदर्शन
संच पोहचले. त्यामुळे ग्रामीण जीवनातही प्रचंड वेगाने बदल घडवून आणण्याचे कार्य
दूरदर्शनने आपल्याला केलेले दिसून येते.
१९९० नंतर मात्र मनोरंजन क्षेत्रात तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांमुळे नवे परिवर्तन घडून
येण्यास प्रारंभ झाला. विविध भाषांतील प्रादेशिक वाहिन्या सुरू झालेल्या दिसून येतात.
त्यामुळे आज तर २४ तास वृत्त प्रसारण करणाऱ्या वाहिन्यांत दिवसेंदिवस भरच पडत आहे.
त्यामुळे दूरदर्शन पाहणाऱ्यांची संख्या आज मर्यादित झालेली दिसून येते. आज तंत्रज्ञानामध्ये
गतीने होणाऱ्या बदलांमुळे मोबाईलवरही आपल्याला अनेक वृत्तवाहिन्या सहजपणे पाहता
येतात. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान हे जसजसे बदलत जाईल तसतशी आपल्याला नवनवीन
आव्हाने पेलावीच लागतील किंबहुना त्यांना सामोरे जाण्याशिवाय पर्याय नाही.

Self-Instructional
Material 97
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... १.१.७. नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे (सोशल
NOTES मीडिया)
नवमाध्यमे, समाजमाध्यमांकडे पाचवा स्तंभ म्हणून पाहिले जात आहे. हा पाचवा
स्तंभही लोकशाहीच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाऊ लागला आहे; मात्र अनेकदा
आशयाच्या मुद्द्यावरून पारंपरिक माध्यमे विरुद्ध नवमाध्यमे अशी परिस्थिती निर्माण होऊ
लागली आहे. माध्यमांमधील हे कलह सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असले, तरी त्याचे
परिणाम मात्र या माध्यमांचे ग्राहक मानल्या जाणाऱ्या सर्वसामान्यांवरही होत आहेत.
त्यामुळेच त्यांचा व्यापक विचार करणे आवश्यक आहे.
सुदृढ लोकशाहीसाठी प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हा तसा आपल्याकडचा एक निर्विवाद
मुद्दा. माध्यमांवरील बंधनांचा संबंध थेट आणीबाणीशी जोडला जाण्याचा आपल्याकडचा
इतिहास विचारात घेता, प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याला तसे कोणीही नाकारत नाही.
लोकशाहीच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांनी या पूर्वीच्या काळात केलेले कार्य पाहता,
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणूनच आपल्याकडे त्यांचा विचार केला जातो. त्याच अनुषंगाने
आता नवमाध्यमे, समाजमाध्यमांकडे पाचवा स्तंभ म्हणूनही पाहिले जात आहे. चौथ्या
स्तंभापाठोपाठ आलेला हा पाचवा स्तंभही आपल्याकडे लोकशाहीच्या विकासासाठी म्हणून
महत्त्वाचा मानला जाऊ लागला आहे. असे असताना आता अनेकदा आशयाच्या मुद्द्यावरून
पारंपरिक माध्यमे विरुद्ध नवमाध्यमे अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. आशयाला
आव्हान दिले जात असताना, त्यातून माध्यम प्रकारांच्या विश्वासार्हतेलाही आव्हान दिले
जाऊ लागले आहे. माध्यमांमधील हे कलह सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असले, तरी
त्याचे परिणाम मात्र या दोन्ही प्रकारच्या माध्यमांचे ग्राहक मानल्या जाणाऱ्या सर्वसामान्यांवरही
होत आहेत. त्यामुळेच या कलहांचा व्यापक विचार करणे महत्त्वाचे ठरत आहे.
माध्यमांच्या स्वरूपांचा विचार करता पारंपरिक माध्यमे आणि नवमाध्यमे ही तशी
पूर्णपणे वेगळी. त्यामुळे दोन भिन्न प्रवृत्तीच्या माध्यमांमध्ये असलेल्या अंतर्गत कलहाला
उगाचच असे महत्त्व देणे ही बाब सर्वसामान्यांच्या लेखी तशी चुकीचीही ठरू शकते. असा
कलह वास्तवात आहे की नाही, हा प्रश्नही सर्वसामान्यांना पडू शकण्याइतकी वेगळी
परिस्थिती आपल्या आजूबाजूला आपण अनुभवत आहोत; मात्र ‘दोघांच्या भांडणात
तिसऱ्याचा लाभ’ या उक्तीचा विचार या ठिकाणी करायचा झाल्यास, या भांडणाचा लाभ
होणारा तो ‘तिसरा’ कोण, या प्रश्नाचे उत्तर हा मात्र सर्वांसाठीच तितकाच महत्त्वाचा आणि
गंभीर मुद्दा ठरू शकतो. लोकशाही व्यवस्थेमध्ये माध्यमांना चौथ्या स्तंभाचा दर्जा मिळत
असताना उर्वरित तीन स्तंभ कोणते, हे पाहणे या निमित्तानेच उचित ठरते. या तिन्ही स्तंभांचा
आणि चौथ्या-पाचव्या स्तंभांच्या उभारणीसाठी झटू पाहणाऱ्यांचा या दोन स्तंभांच्या भांडणाने
काही फायदा-तोटा होऊ शकतो का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यास, आपण
एका वेगळ्या निष्कर्षापर्यंत निश्चितच पोहोचू शकतो. 
आताच्या वाढत्या औद्योगिकीकरणाच्या युगात तंञज्ञानाचा प्रसार देखील झपाट्याने होत
आहे. आताची पिढी म्हणजे अगदी आताच्या या युगाला सुट होणारीच म्हणावी लागेल.
त्यात भरीसभर म्हणजे, आज कालची लहान मुले ही असामान्य व्यक्तिमत्वात गणली गेली
Self-Instructional पाहिजेत. आधुनिक तंञज्ञानाने तर अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत काही गोष्टींचे सर्वांना
Material 98 वेड लावले आहे. मग तो मोबाईल असो वा काँम्प्युर, हल्ली तर आय-पॉड, 
नवमाध्यमे आणि
आय-पॅड, आय-फोन  यांसारख्या गोष्टी फार प्रचलित आहेत. परंतु या सर्व गोष्टींच्या समाजमाध्यमांसाठी...
वापरामध्ये मोठ्यांपेक्षा लहानांचा वाटा जास्त अहे. आजच्या पिढीला ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान
हे सर्व साधारण माणसापेक्षा जास्त आहे. या सर्व गोष्टीमध्ये दिवसेंदिवस होणारे नवनविन NOTES
बदल हे देखिल आजच्या पिढी साठी साधारण आहे.
आधुनिक तंञज्ञानामुळे आपल्याला नवनविन गोष्टी पहावयास तसेच अनुभवायला
मिळतात. यामुळे मिळणारे ज्ञान देखील अत्यंत महत्वाचे ठरते. अशा ह्या तंञज्ञानाच्या
जोरावर सध्या जगाच्या चारही दिशांना फिरत आहेत ते सोशल नेटवर्कींगचे वारे. सोशल
नेटवर्कींगचे हे वारे प्रत्येक घरात देखील घुमत आहेत. जर आपल्याला सोशल नेटवर्कींग
बद्दल विचारले तर आपल्याला बोटावर मोजता येईल एवढेच उत्तरे सांगु शकतो, परंतू ते
तितकेच नसुन त्याहुन अधिक आहे.
सोशल नेटवर्कींगकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोण हा वेगळा आहे. कोणी या
सोशल नटवर्कींगला व्यसन ह्या दृष्टीकोणातून पाहतात तर कोणी काळाची गरज ह्या
दृष्टीकोनातून पाहतात.परंतु वस्तुस्थिती ही वेगळीच आहे.ही काळाची गरज तर आहेच पण
काहीजण त्याला व्यसन म्हणून स्विकारतात. आज आपल्या जगाच्या कानाकोपऱ्यात
घडणाऱ्या गोष्टींची माहीती सोशल नेटवर्कींद्वारे कोणत्याही वेळी मिळवता येते.तसे पाहता
आपल्या जीवनात काही गोष्टींमुळे तोटेही होतात अथवा फायदेही होतात तसेच या सोशल
नेटवर्कींमुळेही फायदे ही आपल्याला होऊ शकतात किंवा तोटेही होऊ शकतात.
२१ व्या शतकाच्या प्रारंभी व तंत्रज्ञानाद्वारे आलेले डिजिटल माध्यम, हे आतापर्यंतच्या
सर्व माध्यमांना कवेत घेऊ पाहणारे आर्थिक, सामाजिक, राजकीय व वैश्विक दृष्ट्याही
क्रांतिकारक बदल घडविणारे माध्यम आहे. या माध्यमाचा झपाट्याने विस्तार होण्यात
समाज माध्यमांची मोलाची भूमिका आहे. काही तज्ज्ञांच्या मते 'सिक्सडिग्रीज कॉम' हे
पहिले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे. हे संकेतस्थळ १९९७ साली सुरू झाले. सर्वप्रथम
येथे सदस्यांना 'प्रोफाईल' म्हणजे 'माहिती पान' उघडण्याची व मित्र मंडळ तयार करण्याची
मुभा दिली. त्यानंतर १९९८ मध्ये मित्रमंडळ तयार करण्याची व मित्रमंडळ सूची शोधण्याची
मुभा दिली. मात्र या संकेतस्थळाला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. तथापि, या संकेतस्थळाच्या
निर्मिती आधी देखील या प्रकारचा ऑनलाईन संवाद अथवा देवाण-घेवाण घडत असे.
प्रोफाईल व संवाद साधणे हे जरी या सेवेचे मूळ उद्दिष्ट असले तरी सोशल नेटवर्किंग
संकेतस्थळांची सुरूवात वेगवेगळ्या हेतूंनी झाली. उदा . 'सायवर्ल्ड' हा कोरियन परिसंवाद
मंच होता. स्कायरॉक ही सुरुवातीला फ्रेंच ब्लॉगिंग सेवा होती. एकविसाव्या शतकाबरोबरच
आलेली, डिजिटल तंत्रज्ञानाची देण असलेली ही समाज माध्यमे प्रारंभी 'सोशल नेटवर्किंग
प्लॅटफॉर्म' असे तांत्रिक नाव धारण करून आली. समाजाकडून होणारा वाढता वापर व
लोकप्रियता यातून या माध्यमांना 'समाज माध्यमे' असे नाव रूढ झाले. एक प्रकारे, "मुक्त
अशा व्यासपीठावर अप्रत्यक्षपणे एकत्र येऊन समानधर्मी लोकांनी संदेश वा इतर बाबींची
देवाण-घेवाण करण्यासाठी महाजालाआधारे निर्माण केलेले समूहगट म्हणजे समाज
माध्यम”. अशी या समाज माध्यमाची व्याख्या करता येईल. इंटरनेटवर उपलब्ध असणारा,
विविध व्यक्तींशी संपर्क साधू देणारा व ते जपू देणारा मंच म्हणजे सोशल नेटवर्क सेवा. '
सोशल नेटवर्क अथवा सामाजिक जाळे म्हणजे असे गट जिथे आंतर महाजालाद्वारे समान
विचारांची, सारख्या आवडी-निवडीची माणसे एकत्र येतात. ही सेवा मुख्यतः इंटरनेटवरवरील
विविध संकेतस्थळांच्या मार्फत पुरवली जाते. अशा संकेतस्थळांना 'सोशल नेटवर्किंग Self-Instructional
संकेतस्थळे' असे म्हणतात. Material 99
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... एखाद्या सोशल नेटवर्क सेवेचा पाया म्हणजे एखाद्या व्यक्तीने त्या सोशल नेटवर्किंग
संकेतस्थळावर तयार केलेले 'प्रोफाइल' अर्थात व्यक्तिगत माहितीचे 'माहिती पान'. एखाद्या
NOTES व्यक्तीचा इंटरनेटवरील आविष्कार म्हणजे हे प्रोफाईल पान होय. सोशल नेटवर्किंग
संकेतस्थळे व्यक्तीला अशा प्रकारची प्रोफाईल बनवण्याची, त्या संकेतस्थळावरील इतर
व्यक्तींशी ओळख व मैत्री करण्याची; तसेच विविध माहितीची देवाण-घेवाण करण्याची
संधी देतात. वेळेची मर्यादा, निवडीची अट नसलेल्या पण सर्व प्रकारच्या अभिव्यक्तीला
सामावून घेईल, अशा मोठ्या माध्यमाच्या गरजेतून समाज माध्यमांची निर्मिती झाली.
अप्रत्यक्षरित्या परस्परांच्या किंवा आपल्या समूहाच्या संपर्कात राहून, संदेशांची देवाणघेवाण
करण्याच्या, अभिव्यक्तीच्या, निर्मितीच्या हेतूने या समाज माध्यमांचा वापर करणाऱ्यांची व
त्यांच्याद्वारे माहिती मिळविणारे, माहितीची देवाण-घेवाण करणाऱ्यांची संख्या दररोज लाखाने
वाढते आहे. १९८९ ला इंटरनेटचा जन्म झाल्यानंतर, भारतात संगणक आयात करू पाहणाऱ्या
टाटा समूहास सरकारने परवानगी नाकारली होती. संगणकास यंत्र मानण्यास तयार नसलेल्या
सरकारकडून त्यावेळी संगणक आयातीवर मूळ किमतीच्या ३०० टक्के कर होता. आज
मात्र, भारतासह एकूण जगात या नवमाध्यमांचा वापर करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस
लाखोने वाढते आहे. जागतिक पातळीवर इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वापराचे
सर्वेक्षण व विश्लेषणात्मक अभ्यास करणाऱ्या 'हुटसूट' कंपनीच्या जानेवारी २०१८ च्या
अहवालानुसार भारतात, एकूण लोकसंख्येपैकी ३४ टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात.
दरवर्षी ३ ते ४० टक्क्यांनी यात वाढ होते. सोशल मीडियाचा वापर करणारे लोक दररोज
सरासरी २.३६ मिनिट यासाठी वेळ राखून ठेवतात.

१.१.८. सारांश
जगातील इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येचा अभ्यास करणाऱ्या ‘सॅटीस्ट' या वेबसाईटच्या
अंदाजानुसार भारतात ३७ कोटींहून अधिक लोक या माध्यमांचा वापर करतात. यांच्या
अंदाजानुसार येत्या पाच वर्षात भारतात प्रत्येक घरात समाज माध्यमांचा वापर होईल. हे
लक्षात घेता, वापरकर्त्यांना त्याबद्दलची माहिती असणे आवश्यक आहे. किंबहुना, साक्षर-
शिक्षित असणे एवढेच या डिजिटल युगात पुरेसे नाही; तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे अपत्य
अशा फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, चार्ट-लाईक, युट्युब.. या समाज
माध्यमांबद्दल व त्यांच्या वापराबद्दल साक्षर असणे आवश्यक आहे.

१.१.९. महत्वाचे शब्द


स्कायरॉक : ही सुरवातीला फ्रेंच ब्लॉगीन सेवा आहे.
सिक्सडीग्रीज कॉम : हे पहिले सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ आहे
वेबसाईड : संकेतस्थळ
tiwter : चीरवीर असे म्हणतात
Self-Instructional
Material 100
नवमाध्यमे आणि
१.१.१०. सरावासाठी प्रश्न समाजमाध्यमांसाठी...

१. भाषा एक सामाजिक संस्था असे का म्हटले जाते. NOTES


२. नवसमाज माध्यमे कोणती.
३. सुरवातीच्या समाजमाध्यमे थोडक्यात सांगा.
४. फेसबुक या माध्यमाबद्दल सांगा

१.१.११. अधिक वाचनासाठी पुस्तके


१. डॉ. गीतांजली चिने, डॉ. हरेश शळके, ‘आधुनिक भारतीय भाषा :
मराठी.’,प्रशांत प्रकाशन, पुणे.
२. प्रा. डॉ. उज्ज्वला भोर : प्रसारमाध्यमे आणि मराठी, प्रशात प्रकाशन,
पुणे.
३. www.vishwakosh.marathi.gov.in
४. www.youtube.com
५. www.shodhganga.inflibnet.com

Self-Instructional
Material 101
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी...
१.२ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे
NOTES प्रकार – ब्लॉग, फेसबुक, ट्विटर
१.२.१ प्रास्ताविक
१.२.२ उद्दिष्टे :
१.२.३ समाजमाध्यमे म्हणजे काय?
१.२.४ नवमाध्यम आणि समाजमाध्यमांचे प्रकार
१.२.५ ब्लॉग
१.२.६ फेसबुक
१.२.७ ट्विटर
१.१.८. सारांश
१.१.९. महत्वाचे शब्द
१.१.१०. सरावासाठी प्रश्न
१.१.११. अधिक वाचनासाठी पुस्तके

१.२.१ प्रास्ताविक
नवमाध्यमे, समाजमाध्यमांकडे पाचवा स्तंभ म्हणून पाहिले जात आहे. हा पाचवा
स्तंभही लोकशाहीच्या विकासासाठी महत्त्वाचा मानला जाऊ लागला आहे; मात्र अनेकदा
आशयाच्या मुद्द्यावरून पारंपरिक माध्यमे विरुद्ध नवमाध्यमे अशी परिस्थिती निर्माण होऊ
लागली आहे. माध्यमांमधील हे कलह सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असले, तरी त्याचे
परिणाम मात्र या माध्यमांचे ग्राहक मानल्या जाणाऱ्या सर्वसामान्यांवरही होत आहेत.
त्यामुळेच त्यांचा व्यापक विचार करणे आवश्यक आहे.
लोकशाहीच्या विकासासाठी प्रसारमाध्यमांनी या पूर्वीच्या काळात केलेले कार्य पाहता,
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणूनच आपल्याकडे त्यांचा विचार केला जातो. त्याच अनुषंगाने
आता नवमाध्यमे, समाजमाध्यमांकडे पाचवा स्तंभ म्हणूनही पाहिले जात आहे. चौथ्या
स्तंभापाठोपाठ आलेला हा पाचवा स्तंभही आपल्याकडे लोकशाहीच्या विकासासाठी म्हणून
महत्त्वाचा मानला जाऊ लागला आहे. असे असताना आता अनेकदा आशयाच्या मुद्द्यावरून
पारंपरिक माध्यमे विरुद्ध नवमाध्यमे अशी परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. आशयाला
आव्हान दिले जात असताना, त्यातून माध्यम प्रकारांच्या विश्वासार्हतेलाही आव्हान दिले
जाऊ लागले आहे. माध्यमांमधील हे कलह सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचे असले, तरी
त्याचे परिणाम मात्र या दोन्ही प्रकारच्या माध्यमांचे ग्राहक मानल्या जाणाऱ्या सर्वसामान्यांवरही
होत आहेत. त्यामुळेच या कलहांचा व्यापक विचार करणे महत्त्वाचे ठरत आहे.
यापूर्वीचा तो काळ आणि सध्याचा काळ यामधील एक महत्त्वाचा फरक म्हणजे
नवमाध्यमांचे वा समाजमाध्यमांचे अस्तित्त्व. यापूर्वी अशी लोकांच्या थेट हातात गेलेली माध्यमे
Self-Instructional अस्तित्वात नव्हती. त्यामुळे लोकांना म्हटले तर लोकशाही मार्गाने वा म्हटले तर अगदीच
Material 102 झुंडशाही करत विशिष्ट निर्णय प्रक्रियेला विरोध करण्याची, तशा प्रक्रियेमध्ये थेट हस्तक्षेप
नवमाध्यमे आणि
करण्याची संधी कधीही मिळालेली नव्हती. समाजमाध्यमांच्या येण्याने ती मिळाली आहे. समाजमाध्यमांसाठी...
पर्यायाने ‘पूर्वीच्या काळात पारंपरिक माध्यमांनी आपल्याला अशी संधी नाकारली,
समाजमाध्यमांनी ती मिळवून दिली, हीच खरी लोकशाही,’ अशी एक वेगळी भावनाही आता NOTES
तीव्र होऊ लागली आहे. ही जाणीव तीव्र करून त्याचा पुन्हा स्वार्थासाठी वापर करून घेऊ
शकणाऱ्यांना यामुळे एक मोठी संधी निर्माण झाली आहे. अशी संधी पारंपरिक माध्यमांनी त्यांना
अवचितच कधी दिली असती. त्यातूनच समाजामध्येही पारंपरिक माध्यमे विरुद्ध नवमाध्यमे
असा एक वेगळा संघर्ष सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. अर्थात तो सुरू
होण्यापेक्षाही तो सुरू होण्याला चालना दिली जात आहे, हेही आपण लक्षात घ्यायला हवे. 
ट्विटर, फेसबुक, ब्लॉग, ई-पेपर, व्हिडिओ कॉन्फरसिंग अॅप, मायस्पेस यांसारख्या
सोशल नेटवर्किंग साईट्सचा आजच्या तरुणांवर मोठा प्रभाव पडत आहे. त्यामुळे एका
बाजूला माहिती - तंत्रज्ञानाचा वेगाने होणारा प्रसार लक्षात घेता आपल्याकडे ही नवमाध्यमे
व समाजमाध्यमे कशा पद्धतीने वापरायला हवीत यादृष्टीने प्रबोधन होणेही आवश्यक आहे.
या प्रबोधनाची सुरुवात आपल्या कुटुंबापासून व्हायला हवी, कारण आज प्रत्येक कुटुंबात
ही माध्यमे आहेत. त्यामुळे ही सर्व माध्यमे वापरताना आपण व्यवस्थितपणे विचार करणेही
तितकेच आवश्यक आहे.
समाजमाध्यमांवर आपले अस्तित्व तर जाणवले पाहिजे पण लिहित बसायला वेळ
नाही, टाईप करायचा कंटाळा आहे, काहीजण तर मराठी टायपिंग फार कंटाळवाणे आहे
म्हणून लिहित नाही. मग अशावेळी समाजमाध्यमांवर आपले अस्तित्व दाखवण्याचा एकमेव
पर्याय असतो. फॉरवर्ड आणि शेअरिंग त्यातही उजवे-डावे गट ठरलेले असतात, मग
आपापल्या गटाकडून आलेली कुठलीही गोष्ट डोळे झाकून शेअर करत राहणे हे कर्तव्य
होऊन बसते आणि येथेच समाजमाध्यमे जनतेच्या मनाचा खरा अंदाज येण्यापासून दूर
राहतात, मग हा अंदाज येणार कसा? म्हणूनच नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे हाताळताना
आपण विचारपूर्वक, डोळसपणे विचार करायला हवा. आपल्याला व्यक्त व्हायचे साधन
मिळाले म्हणजे सर्वकाही झाले असे नाही तर व्यक्त होणे ही जरी आपल्या दृष्टीने सहज
कृती असेल तरी आपण जेव्हा व्यक्त होतो तेव्हा आपण व्यक्त केलेले मत, विचार क्षणार्धात
लाखो लोकांपर्यंत पोहचत असतात.

१.२.२ उद्दिष्टे

१. संज्ञापनातील नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे स्वरूप आणि स्थान स्पष्ट करणे.

२. भाषा, जीवनव्यवहार आणि नवमाध्यमे, समाजमाध्यमांचे परस्परसंबंध स्पष्ट करणे.

३. नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांसाठी लेखनक्षमता विकसित करणे.

४. नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांविषयक साक्षरता निर्माण करणे.


Self-Instructional
५. नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचा वापर आणि परिणाम याबद्दल चर्चा करणे. Material 103
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... १.२.३ समाजमाध्यमे म्हणजे काय?
NOTES

“इंटरनेटवर आधारित जी माध्यमे आहेत, त्यासाठी ‘सोशल मिडिया’ किंवा ‘समाज


माध्यमे’ हा शब्द वापरला जातो. ‘फेसबूक, ट्विटर, यु-ट्यूब, whatsapp, instagram’
अशा अनेक माध्यमांचा सोशल मीडियात समावेश होतो. एका प्रकारे असे सांगता येईल
की, लोकांनी वा इतर बाबींची देवाण-घेवाण करण्यासाठी महाजालाच्या आधारे निर्माण
केलेले समूहगट म्हणजे समाज माध्यमे होय.” जसे तुम्ही छापील वर्तमानपत्र हातात घेऊन
थेटपणे हातात घेऊन वाचू शकता तसे एखादी सीडी किंवा पेनड्राईव्ह घेऊन थेटपणे पाहू
शकत नाही तर त्यासाठी तुम्हाला सीडी प्लेअरची किंवा संगणकाची गरज भासते. त्याचप्रमाणे
सोशल मीडिया वापरण्यासाठी आपल्याकडे किमान मोबाईल फोन असणे अत्यंत आवश्यक
आहे.

१.२.४ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे प्रकार


जनसंपर्काची साधने जसजशी बदलत गेली, तसतसे प्रसारमाध्यमाचे स्वरूप व कार्य
यांतही बदल होत गेला. त्यामुळे प्रारंभी ज्ञानेंद्रियावर आधारित वर्गीकरण केले जाऊन
प्रसारमाध्यमांचे पुढील प्रकार कल्पिले गेले.
१. परंपरागत माध्यम : कठपुतळी, लोकनृत्य, लोककला इ.
३. मौखिक माध्यम : गोष्ट, जनसभा, प्रवचन इ.
३. मुद्रित माध्यम : वृत्तपत्रे, नियतकालिके, भित्तीपत्रके इ.
४. श्राव्यमाध्यम : आकाशवाणी/रेडिओ, टेप रेकॉर्डर/ध्वनिमुद्रक, लाऊड स्पिकर/
ध्वनिक्षेपक, ध्वनिमुद्रिका/ऑडिओ सिडी इ.
५. दृक श्राव्य माध्यम : दूरचित्रवाणी, चित्रपट, व्हीडिओ/चित्रफित इ.

तंत्रज्ञानावर तसेच ज्ञानावर आधारभूत असे...


मुद्रित/छापील माध्यम
इलेक्ट्रिक माध्यम
इलेक्ट्रॉनिक माध्यम
असेही मुख्य प्रकार एकेकाळी कल्पिले जाऊन प्रचलित झाले. हे सर्व प्रकार पुढील
Self-Instructional आकृतीद्वारे दाखविले आहेत.
Material 104
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी...

NOTES

आज मात्र, आधुनिक तंत्रज्ञानामुळे हा फरकही पुसला गेला आहे. कारण सर्वच संपर्क
माध्यमे इलेक्ट्रॉनिक तंत्राद्वारे चालविली जात आहेत. चित्र, अक्षरलेखन व व्यंगचित्रे सुद्धा
आज या इलेक्ट्रॉनिक तंत्राच्या साहाय्याने तयार होत आहेत. संपर्क क्षेत्र तज्ज्ञ पॉल गिल्स्टरने
म्हटल्याप्रमाणे, “आपल्या जगात काहीतरी प्रचंड गहन फेरफार घडत आहेत." त्यामुळे या
बदलांना आपण फार तर ‘इलेक्ट्रॉनिक क्रांती' व 'डिजिटल क्रांती' असे म्हणू शकतो आणि
याद्वारे आलेल्या संपर्क माध्यमांचे वर्गीकरणही ‘इलेक्ट्रॉनिक माध्यमे' व 'डिजिटल माध्यमे'
असे करू शकतो.

१.२.५. ब्लॉग
ब्लॉग हे एक ऑनलाइन जर्नल किंवा माहिती देणारी वेबसाइट आहे ज्यामध्ये जुन्या
पोस्ट खाली जातात आणि नवीन पोस्ट वरती दिसतात. हा एक प्लॅटफॉर्म आहे ज्यामध्ये
लेखक स्वत:ची किवा अन्य माहिती तुमच्या द्वारे पोचवण्याचा प्रयत्न करत असतात. ११९४
मध्ये ब्लॉग ची सुरुवात झाली व सुरुवातीला यामध्ये स्वत: विषयी माहिती शेअर केली जात
होती.
तुम्ही जेव्हा इंटरनेटवर कोणत्याही विषयाची माहिती शोधत असता व त्या माहितीचे
उत्तर एका लेखा स्वरूपात तुम्हाला भेटते. यालाच आपण 'ब्लॉग ' म्हणतो. समजा तुम्हाला
'ऑनलाइन पैसे कसे कामवायचे ' याविषयी माहिती पाहिजे तेव्हा तुमच्या समोर गूगलचे
बरेचसे पेजेस ओपन होतात त्या माहितीलाच आपण ब्लॉग म्हणू शकतो.
तसेच आपल्या मनामध्ये विचार येत असतात की ब्लॉग कोणत्या विषयावर लिहायचा.
आज इंटरनेटवर दररोज लाखो ब्लॉग अपलोड होत असतात. यामध्ये ' पर्सनल ब्लॉग '
:आपल्या स्वत:विषयी माहिती लिहिणे, टेक्नॉलजी विषयी माहिती, हेल्थ विषयी, पॉलिटिक्स,
विविध प्रॉडक्ट चे रिव्यू करणे, इत्यादी.

Self-Instructional
Material 105
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... 'ब्लॉग' हे असे माध्यम आहे जिथे तुम्ही सहजपणे व्यक्त होऊ शकता. आज जगभरात
कोट्यवधी माणसे ब्लॉग वाचतात, लिहितात.त्यामध्ये अगदी खाद्यपदार्थांपासून ते राजकीय
NOTES गोष्टींपर्यंत सगळ्या विषयावर लिहिले जाते. ब्लॉगचा फायदा असा की, तुम्ही तुमचे विचार
जगभरातील लोकांपर्यंत पोहचवू शकता. पैसे मिळविण्याचा विषय फार नंतरचा आहे. पण
आता ब्लॉगच्या माध्यमातून 'व्यक्त होणे ' आवश्यक आहे. पण जर तुम्हाला लिहायची
इच्छा नसेल, मात्र वेगवेगळ्या विषयांवर वाचायला आवडत असेल किंवा एखाद्या विषयावर
जास्त माहिती हवी असेल तर त्या विषयाचा गुगलवर शोध घेऊन इतरांनी लिहिलेले ब्लॉग
तुम्ही नक्कीच वाचू शकता. यामध्ये साहित्याबरोबरच ट्रव्हल, फुड, चित्रकला, शिक्षण,
निसर्ग, पर्यावरण, शेती, व्यवसाय, आवडते छंद अशा अनेक विषयांवर ब्लॉग असतात.
डॉ. संदीप माळी लिखित 'उपयोजित मराठी ' या पुस्तकामधून ब्लॉग पोस्ट बद्दलच्या
पायऱ्या पुढील प्रमाणे :-
• ब्लॉग लेखनाची रचना
• मथळा
आपल्या ब्लॉग पोस्टचे शीर्षक संभाव्य वाचकांचे लक्ष वेधून घेईल असे असावे.
लोकांनी गुगल सर्च किंवा कुठल्याही सर्च इंजिनमध्ये एखाद्या विषयासंदर्भात शोध
घेतला तर आपला विषय आकर्षक मथळ्याने त्यांच्यासमोर आला पाहिजे. आपण
लिहित असलेल्या विषयाचा शोध घेताना लोक सामान्यपणे वापरू शकणारे मुख्य
कीवर्ड (वाक्यांश) आपल्या ब्लॉगच्या मथळ्यामध्ये असल्याची खात्री करा.

• प्रकाशित तारीख
आपल्या ब्लॉगची प्रकाशित तारीख शक्यतो लिहिताना नोंदवावी. आपण वारंवार
आपला ब्लॉग अद्ययावत केल्यास, पोस्ट तारखांमुळे आपल्या वाचकांना अलीकडील
नवीनतम पोस्ट कोणती आहे, हे निश्चित करण्यात मदत करू शकतात.

• ब्लॉगपोस्टची वर्गवारी
आपण तयार केलेल्या प्रत्येक ब्लॉग पोस्टसाठी श्रेणी - tag - वापरण्याची पद्धत
आहे. ज्यामुळे आपल्या ब्लॉगचे वाचन करणारे आणि आपला ब्लॉग अॅक्सेस करणारे
जे इंटरनेट सर्फर्स असतात त्यांना जास्तीतजास्त वेळ आपल्या ब्लॉगवर ऑनलाइन
थांबणे भाग पडते.

• परिचय
आपल्या ब्लॉग पोस्टचा पहिला परिच्छेद असा लिहावा की, जो लोकांना खिळवून
ठेवेल आणि लोकांना पूर्ण ब्लॉग पोस्ट वाचण्याची इच्छा होईल. तसेच पूर्ण ब्लॉग
पोस्ट वाचल्यानंतर कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा लोक त्यांची मते नोंदवतील.

• मुख्य सामग्री
ब्लॉग पोस्ट मधील हा अत्यंत महत्त्वाचा भाग असतो कारण या मुख्य सामग्रीमध्ये
Self-Instructional ब्लॉग पोस्ट - मुख्य मजकूर - समाविष्ट असतो. इंटरनेट वापरकर्त्याने त्याच्या
Material 106 आवश्यक असणाऱ्या माहिती संदर्भात शोध घेताना त्याला आपला ब्लॉग सापडलेला
नवमाध्यमे आणि
असतो. त्यामुळे आपली माहिती अधिकाधिक परिपूर्ण असावी आणि परिचयाच्या समाजमाध्यमांसाठी...
परिषदांमध्ये आपण ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांची पूर्तता या मुख्य सामग्री
मध्ये झाली पाहिजे, याची दक्षता ब्लॉगरने घेणे अत्यंत गरजेचे आहे. NOTES

• उप-मथळे
ब्लॉग पोस्ट मध्ये उप-मथळे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असतात. या उप-मथळ्यांच्या
माध्यमातून अत्यंत सुव्यवस्थितपणे विषयाची मांडणी करता येते. आजच्या
धकाधकीच्या जीवनात एखाद्या वाचकाला नेमका विषय शोधायचा असेल तर उप-
मथळे त्याला ब्लॉगपोस्ट वाचताना फायदेशीर ठरत असतात. त्यामुळे वाचकांनी
पूर्णवेळ ब्लॉग वाचून त्याचा जास्त वेळ घालवण्यापेक्षा अतिघाईतल्या वाचकांसाठी
हे उप-मथळे फायदेशीर ठरतात.

• ठळक मजकूर
आपल्या ब्लॉग पोस्ट मधील जो मजकूर अत्यंत महत्त्वाचा असेल तो - बोल्ड करणे
- ठळक करणे - गरजेचे असते किंवा त्याला एका विशिष्ट square बॉक्स मध्ये
विशिष्ट रंगाचे बॅकग्राऊंड टाकून मांडणे महत्त्वाचे असते. आपल्या ब्लॉग पोस्ट
मधील हा जो मजकूर आहे तो हायलाईट झाला पाहिजे म्हणजे महत्त्वाचे मुद्दे वाचकाच्या
नजरेतून सुटणार नाही. अशी काळजी ब्लॉगरने घेणे गरजेचे आहे.

• माध्यम
आपल्या ब्लॉग पोस्ट मधील मजकुराच्या आणि सामग्रीच्या अनुषंगाने त्याच्याशी
संबंधित प्रतिमा (इमेजेस) आणि व्हिडिओ यांचा वापर केला पाहिजे. जेणेकरून
आपल्याला जो मुद्दा चर्चेला घ्यायचा आहे त्यासंबंधी अधिक सविस्तर माहिती
वाचकाला होईल.

• निष्कर्ष
ब्लॉग पोस्ट मध्ये जो मजकूर आपण मांडलेला आहे त्याचा थोडक्यात सारांश ब्लॉग
पोस्टच्या शेवटी असावा. हे साधारण एक ते दोन परिच्छेद असावे. जेणेकरून आपण
कोणतीही सामग्री वाचलेली आहेत हे वाचकाला समजेल.

• ब्लॉग पोस्टचा हेतू


ब्लॉग पोस्टचा मुख्य हेतू म्हणजे मनोरंजनातून उद्बोधन. सोबतच आपल्या वाचकांना
आनंदित करणे, त्यांच्या समस्यांबद्दल त्यांना मदत करणे, गोष्टी कशा करायच्या हे
शिकविणे, आपल्याशी आणि एकमेकांशी संपर्क साधण्यास आणि आपल्या समविचारी
लोकांचा समुदाय तयार करण्यात मदत करणे असा सांगता येईल. आपल्याला माहिती
असलेल्या नवीन ज्ञानापासून वाचकांना अवगत करणे.

Self-Instructional
Material 107
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... १.२.६. फेसबुक
NOTES आपल्या भारताची खरी ओळख म्हणजे आपली संस्कृती. या संस्कृतीला समोर ठेवूनच
भाषा, सण-उत्सव, राहणीमान, पेहराव, अन्न कृती इ. गोष्टींचा समावेश त्यात होतो.
महिलाविषयक संस्कृती दर्शनाबद्दल 'Social media today.com' या
संकेतस्थळामध्ये अनेक गोष्टी अंतर्भूत केल्या आहेत. ' युनेस्को'च्या सांस्कृतिक विकासाच्या
प्रकियेला फेसबुकने गती दिली. शब्द, चित्र व व्हिडिओ यांच्या एकत्रित वापरातून फेसबुकने
व इतर सोशलमीडीयाने संस्कृतीला, मानवजीवन शैलीला समृद्ध केले. सांस्कृतिक संवर्धन
हा एकमेव उद्देश फेसबूकचा नसला मानवी संस्कृतीचे मूळ येथे मोठ्या प्रमाणात दिसते.

याबाबत फेसबुकच्या झुकेनबर्गनने सी.एन.ए.ला दिलेल्या मुलाखातीमध्ये खूप चांगले


म्हटले की," मानवी संस्कृतीचा जगभर प्रसार करण्यासाठी फेसबुक नेहमीच पुढाकार
घ्यायला तयार आहे. पाच बिलीयन लोकांपर्यत फेसबुक पोहचवून आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक
सलोखा स्थापण्याचा माझा मानस आहे." गावाची शेती,सरपण, पोळा, शेतकरी जनजीवन
हे आपले अँग्री-कल्चर असताना शहरी चोचले फेसबुकवर पुरवून फालतू गप्पा मारण्यात
कसली आलीय संस्कृती? असे काही टीकाकार म्हणतात, परंतु शेतकरी जनजीवनाची
ओळख व कृषी संस्कृतीचा मानाचा तुरा ग्रामीण युवकांनी फेसबुकवर आणून या टीकास्त्राची
धार कमी केली.
'समाजमाध्यमे' हे २१ व्या शतकाच्या प्रारंभी व तंत्रज्ञानाद्वारे आलेले डिजिटल माध्यम-
आतापर्यंतच्या सर्व माध्यमांना कवेत घेऊ पाहणारे-आर्थिक, सामाजिक, राजकीय, व
वैश्विक दृष्ट्या क्रांतिकारक बदल घडविणारे माध्यम आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम,
युट्युब इ. समाजमाध्यमांचा वाढता वापर आणि लोकप्रियता यातून या माध्यमांना
समाजमाध्यमाचे नाव रूढ झाली आहे.
हे जगातील एक लोकप्रिय 'सोशल नेटवर्किंग संकेतस्थळ' आहे. हे इंटरनेटद्वारा
आधारित नि:शुल्क सामाजिक नेटवर्किंग सेवा देणारे असे माध्यम आहे. ज्याद्वारे या सेवेचे
सदस्य असणाऱ्याला आपल्या मित्र व परिवारातील सदस्यांशी संपर्क साधता येतो. फेसबुक
कंपनीद्वारे कार्यरत या माध्यमांचा प्रारंभ २००४ ला 'Horward University' तील एक
विद्यार्थी-मार्क झुकेरबर्ग-यांनी केला. २००८ पर्यंत ते सर्वाधिक वापराचे सोशल नेटवर्किंग
साईट बनले. कॉलेज परिसरापुरतीच सेवा देणारे हे माध्यम त्यांनी काहीच महिन्यात आपले
जाळे मोठ्या प्रमाणात पसरविले . जगाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. आता
फेसबूकचे १ अब्ज वापरकर्ते आहे. २०१२ मध्ये फेसबुक ने 'इंस्टाग्राम ' ही प्रणाली
विकत घेतली. या प्रणालीमध्ये असंख्य छायाचित्रे आणि व्हिडीओ टाकता येतात. २०१४
साली फेसबुकने 'whatsapp ' ही लोकप्रिय त्वरित संदेशप्रणाली विकत घेतली. २०१३-
Self-Instructional १४ मध्ये भारतासह ४० देशातील मोबाईल कंपन्याशी फेसबुकने करार केले आहे. नुकतेच
Material 108 रिलायन्स कंपनीसोबत फेसबुकने ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केलेली आहे.
नवमाध्यमे आणि
फेसबुक ही एक खाजगी कंपनी आहे. इंटरनेट, संगणक, मोबाईल कंपनी या उद्योगक्षेत्रात समाजमाध्यमांसाठी...
फेसबुकचे वर्चस्व आहे. फेसबुकचे मुख्यालय मेन्लो पार्क, कॅलिफोर्निया (अमेरिका) या
ठिकाणी आहे. ही कंपनी मार्क झुकेरबर्ग व त्यांचे सहसंस्थापक यांद्वारे चालवली जात NOTES
आहे. २००९ मध्ये या कंपनीचे महसुली उत्पन्न अंदाजे ८०० दशलक्ष अमेरिकन डॉलर इतके
आहे. या कंपनीमध्ये २०१४ साली आठ हजार ३४८ कर्मचारी काम करत आहेत.
सद्य:स्थितीत याची गणना केली तर फेसबुक हे एक लोकप्रिय माध्यम ठरलेले असले तरी
२०२० साली फेसबुकपेक्षा इतर माध्यमांकडे लोक जास्त वळताना दिसत आहे.

• फेसबुक अॅप: डाऊनलोड कसे करावे व कसे वापरावे याबद्दल


१) अॅप डाऊनलोड करणे
आपल्या स्मार्टफोनमध्ये गुगल प्ले स्टोअर मधून फेसबुक अॅप डाऊनलोड करा. अॅप
ओपन करण्यासाठी फेसबुक च्या आयकॉनवर tap करून अॅप ओपन करा.

२) सेवा शर्तींना मान्यता द्या


सेवाशर्ती आणि गोपनीयता धोरण वाचा व त्यानंतर 'सेवाशर्ती मान्य आहेत/सहमत आहेत'
आणि 'पुढे सुरू ठेवा’ यांवर क्लिक करा.

३) नोंदणी करा
फेसबुकमध्ये आपल्या मोबाईल नंबरची नोंदणी करा. फेसबुकवर प्रवेश करताच, पहिले
पान उघडेल त्यास ' होम पेज '(मुखपृष्ठ) असे म्हणतात.

४) फेसबुकमधील होमपेज (मुखपुष्ठ)


या पानावर सदस्याच्या मित्रमंडळींनी प्रकाशित केलेले संदेश, घोषणा व फोटो दिसतात.
या घोषणांवर व फोटोंवर सदस्य आपले मत देऊ शकतात. सदस्याने जर आपल्या घोषणा
तसेच फोटो सर्वांकरिता प्रकाशित केले तर त्या सदस्याच्या सर्व मित्रमंडळींना त्यांच्या
होमपेजवर (मुखपृष्ठ) त्या घोषणा दिसतात.

५) फेसबुक वरील दुसरे पेज


प्रोफाईल ते चार भागांत विभागले आहेत.
i) माहिती पान :- या पानावर सदस्याची माहिती असते. उदा., सदस्याचे नाव, पत्ता
,जन्मतारीख, निवास-स्थान, आवडी-निवडी इत्यादी.
ii) अल्बम :- या पानावर सदस्य झालेल्या मित्रांचे फोटो दिसत दिसतात.
iii) फ्रेंड्स :- सदस्याच्या फेसबुकवरील मित्र-मंडळीची सूची या पानावर दिसते.
iv) vol :- सदस्य मित्रांनी लिहिलेल्या घोषणा, संदेश या पानावर दिसतात.

• फेसबुकमधील इतर सुविधा


१) ग्रुप तयार करणे :सर्वसामान्यत: तेरा वर्षाहून मोठ्या वयाच्या कोणात्याही
व्यक्तीला फेसबुक सदस्य म्हणून नोंदणी करता येते. सदस्यांना आपल्या अनेक जुन्या Self-Instructional
मित्रांना जोडणे, एखाद्या घोषणा, फोटो याच्यावर प्रतिक्रिया देणे ,लाईक करणे अशा Material 109
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... विविध सुविधा आहेत.

NOTES २) गोपनीयता : फेसबुकवर वैयक्तिक प्रोफाईल बरोबर प्रायव्हसी सेटिंग ग्रुप आणि
पॅसेज म्हणजे पब्लिक क्लोज सिक्रेट ग्रुप, पोस्ट (संदेश). पोस्ट ची लांबी, पोस्ट करण्याची
वेळ पोस्टमधील सातत्य प्रतिपादन, त्याची उपयुक्तता इत्यादी सुविधा असतात.

३) भाषा : फेसबुकमध्ये इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती इतर अनेक भाषांमधून संपर्क
साधण्याची सुविधा उपलब्ध आहे. फेसबुकमध्ये 100 हून अधिक भाषा आहेत. यामुळे
फेसबुकचा जगभरातील लोक वापर करतात.

• फेसबुकचे फायदे
१. या वापरामुळे व्यक्ती, व्यापार आणि समुदाय हे एकत्र येतात. समान रुची असणाऱ्या
व्यक्तींचा समूह अधिकांश वेळा फेसबुक ग्रुप बनवतात. या ग्रुपद्वारे सदस्य एकत्र येऊन
माहितीची देवाणघेवाण (शेअर) करतात आणि आवडीच्या विषयांवर चर्चा करतात.

२. सामान्यतः ग्रुप एखाद्या विषयावर, घटना -संकल्पनांवर आधारित असतात आणि


राजकीय संघटना त्यांच्या गतिविधींचे समन्वय करण्यासाठी व माहिती शेअर करण्यासाठी
फेसबुक पेजचा मोठ्या प्रमाणात वापर करतात.

३. सार्वजनिक क्षेत्रातील लोक जसे -राजकीय नेते व अभिनेतेदेखील त्यांच्या


मतदारसंघांच्या आणि चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी फेसबुक पेज तयार करतात.
प्रमोटर्स संगीतकार व इतर प्रसिद्ध लोकांच्या स्व प्रचारासाठी फेसबुक वापर करतात.

४. फेसबुक समाजमाध्यमाचा वैयक्तिक, सामाजिक उपयोगाबरोबर व्यावसायिक


उपयोगही  करून घेतला जातो. आज अनेक व्यावसायिक कंपन्या व संघटना या
समाजमाध्यमाचा वापर आपल्या कंपनीविषयक माहिती, कंपनीतील वस्तूची माहिती
यांचा प्रचार -प्रसार करण्यासाठी वापरत आहे.

५. फेसबुकच्या माध्यमातून नोकऱ्यांच्या जाहिराती,बाजारातील वस्तूंच्या जाहिराती


केल्या जातात. त्यातून जाहिरातीद्वारे प्रचंड पैसा मिळतो. त्यातून ते आपला नफा मिळवत
असतात.

६. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, ऐतिहासिक इ.क्षेत्राच्या विकासासाठी


फेसबुकसारख्या समाजमाध्यमांचा उपयोग केला जातो.

७. फेसबुकच्या होणाऱ्या फायद्यामुळे भारतात एकूण फेसबुक वापरकर्त्यांच्या  77 टक्के


वापरकर्ते हे पुरुष आहेत. फेसबुक वापर करणाऱ्यांमध्ये पुरुषांच्या संख्येबाबत भारताचा
Self-Instructional जगात सातवा क्रमांक आहे.
Material 110
नवमाध्यमे आणि
• तोटे समाजमाध्यमांसाठी...
फेसबुक वापराचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे काही तोटेही पाहवयास मिळतात.
NOTES
१. फेसबुकच्या माध्यमातून फसवी मैत्री आणि फेक अकाउंटच्या माध्यमातून
ब्लॅकमेलिंग चे प्रमाण वाढले आहेत.

२. वरील काही सहभाग असलेले व्यक्ती तिची माहिती पोस्ट, फोटो, व्हिडिओ टाकत
असतात, यामुळे इतर फेसबुक वापर करताना जवळच चुकीची माहिती जाते.

३. आपली माहिती फोटो चोरून तिचा दुरुपयोग करण्यासारखेच सायबर गुन्हे यांनी ही
वाढले आहेत

४. दूरचे मित्र, मित्रपरिवार जवळ येतात, पण आपल्याजवळ असलेल्या व्यक्तीपासून


यासारख्या समाज माध्यमामुळे आपण दूर जातो

५. फेसबुक इतर प्रसारक समाज माध्यमाचा अतिरिक्त वापरामुळे मानवाला शारीरिक व


मानसिक त्रास होत असतो.

६. समाज जीवनावर व मानवी जीवनावर खोल परिणाम झालेले आहेत.

अशा प्रकारे फायद्यासोबत तोटे ही आपल्याला सांगता येतात.

फेसबुक आपण वापरतो तर फेसबुक विषयी काही गोष्टी जाणून घेऊयात.


फेसबुक ही आपल्या दैनंदिन जीवनाची गरज बनली आहे. जेव्हा मार्क झुकरबर्गने
फेसबुकाचा आविष्कार केला होता तेव्हा त्याला सुद्धा वाटले नव्हते ही गोष्ट इतका धुमाकूळ
घालेल. फेसबुकबद्दल काही गोष्टी जाणून घेऊयात.

• फेसबुकच्या लोगोचा व इतर ठिकाणी असलेला निळा रंग का ठेवण्यात आला आहे,
हे तुम्हाला माहित आहे का? फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग ला कलर ब्लाइंडनेस
आहे. फक्त निळा रंग त्यांना नीट दिसू शकतो व ते ओळखू शकतात. म्हणूनच
फेसबुकचा रंग निळा ठेवण्यात आला आहे.

• फेसबुकवर एक अशी व्यक्ती आहे की, ज्या व्यक्तीला आपण कधीही ब्लॉक करू
शकत नाही. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग यांच्या प्रोफाईलला आपल्याला
कधीही ब्लॉक करता येणार नाही.

• फेसबुकचा वापर करोडो युजर्स करतात. दुनियेतील जवळपास प्रत्येक देशात


फेसबुकचा वापर केला जातो. पण चीन, इराण आणि उत्तर कोरिया यांसारख्या देशात
फेसबुक बँन आहे. Self-Instructional
Material 111
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... • फेसबुकवर ‘पोक' नावाचं एक ऑप्शन आहे. त्याचा अर्थ व उपयोग काय हे
अजूनही अनेकांना माहिती नाही. पण वास्तवातही या मागे काहीही अर्थ नाही. मार्क
NOTES झुकरबर्गला फेसबुकमध्ये काहीही उपयोग नाही असे एक ऑप्शन हवं होतं. म्हणून
त्याची निर्मिती झाली.

• फेसबुकवर सध्या आपल्याला जे लाईक करण्याचं ऑप्शन येते, त्याचे नाव आधी
AWESOME’ असे होते. ते बदलून ‘LIKE’ केले गेले.

आज फेसबूकच्या जमान्यात नवविवाहीत जोडपे आपल्या जोडीदाराला समजून


घ्यायला फेसबुकवर त्याचे/तिचे अपडेटस्, फेन्डस ग्रूप व कोणत्या विषयाला कसे लाईक/
कमेन्ट दिले आहेत, यावरून एकमेकांबद्दल निष्कर्ष लावतात. वैवाहिक जीवन, कुटूंबकलह,
केवळ फेलबूकच्या संशयावर होत नसली तरी भारतीय कुंटूबव्यवस्थेमध्ये संस्कृतीच्या
ऱ्हासाचे एक प्रमूख कारण म्हणून F.B पुढे येत आहे. तेव्हा संस्कृतीक रक्षक केव्हा
संस्कृतीक भषक होईल कळणारही नाही. विदेशी संस्कृतीचे द्योतक ठरलेल्या फ्री टॉक व
फ्री मिटींग्सना आजच्या भाषेमध्ये अफेअर म्हणतात. पीढी बदलली, असे म्हणतात. पण
पीढी बदलवण्यात फेसबुकचा मोठा हात आहे, हे नक्की.
आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सर्वात चिंतीत असलेला घटक म्हणजे पालक. आपल्या
पाल्यास लागलेल्या सोशलमिडीयाच्या वेडामुळे ते नेहमीच हैराण झालेले आपण पाहिलेच
असेल. परंतू चिंतीत असलेले हेच पालक आज चक्क  सोशल मिडीयापैकी असलेल्या
फेसबुकचेच युजर्स आहेत.
आज सोशल मिडीया मुळे एक मोठी बाजारपेठच निर्माण झाली असून तीने ग्राहकांच्या
थेट खिशातच स्थान मिळवले आहे. प्रत्येक स्मार्टफोन म्हटला की आपसूकच
सोशलमिडीयाचा वापर हा आलाच, याचाच पुरेपुर वापर करतानां सध्या ग्राहक दिसतो.
दैनंदीन अपडेट्स मध्ये साधा ताप आला किंवा मुड नाही अशा भावना सुद्धा हल्ली
फेसबुकवरुन झळकु लागतात.
मुलींच्या बाबतीतील कोणतेही अपडेट्स जसे, अघोषित नियमाप्रमाणे जर कधी एखाद्या
मुलीने आपल्या भावना सोशलमिडीयावर विशेषतः फेसबुकवर व्यक्त केल्या की, मग
कॉमेन्टस् चा ओघ ही मोठ्या प्रमाणात असतो. जणु प्रत्येकालाच तिची काळजी लागुन
राहिलेली असते. अशा प्रकारे भावना व्यक्त करण्यासाठी हल्ली सोशल मिडीयाचा वापर
मोठ्या प्रमाणात केला जातो.
भावना व्यक्त करण्यासाठी जसे नवतरुण उत्सुक असतात त्यामध्ये लहानांपासुन
जेष्ठांपर्यत सर्वच उत्सुक असतात. आपल्या भावना ,मते फेसबुकसारख्या माध्यमातुन
लोकांपर्यत पोहचवण्यासाठी सर्वच जण उत्सुक असतात. आताची लहानमुले तर आपल्याला
हवी असलेली व्हिडीओ गेमची सिडी ज्यांच्याकडे असेल त्यांनी कृपया मला द्यावी, चक्क
अशा मागण्या करतानां दिसतात. त्यांबद्दल काय म्हणायचे, लहानच आहेत ते पण तरुणांचे
काय.. पचपचीत पाणी केसानां लावुन वेड्यावाकड्या पोझ मध्ये काढलेल्या फोटोनां येणारे
लाईक्स बघुन किंवा कमेन्ट्स बघुन भलतेच खुष होतात. यामध्ये मुलींची संख्या यापेक्षा
कैकपटीने जास्त आहे. ज्या महिला फेसबुकवर आहेत त्या त्यांच्या प्रत्येक पाककलाकृतीचे
Self-Instructional आकर्षक फोटो काढुन फेसबुकवर अपलोड करतात.
Material 112 अशा प्रकारे समाजातील प्रत्येक व्यक्ती हा फेसबुक सारख्या सोशल मिडीयाचा आधिन
नवमाध्यमे आणि
झाला आहे. असे म्हटले तरी अयोग्य ठरणार नाही. पण त्याच्या बेसुमार वापरांमुळे आपली समाजमाध्यमांसाठी...
खासगी माहिती कळत नकळत सार्वजनिक होऊन जाते आणि याचेच दुष्परिणाम आपल्याला
सोसावे लागतात. NOTES
इंटरनेटच्या वाढत्या प्रभावाने त्याचा नको असलेला मोह आवरता घेत सोशल मिडीयाचा
आपल्या खासगी अशा सुंदर जिवनात होणारा प्रवेश/ आगमन आपणच रोखु शकलो तरच
आपण या सोशल मिडीया नावाच्या आजाराचे वैद्य बनु शकतो.

१.२.७. ट्विटर
ही एक विनामूल्य सोशल नेटवर्क सेवा आणि मायक्रो ब्लॉगिंग सेवा आहे. तिच्या
वापराद्वारे वापरकर्ता त्यांचे ट्विट्स म्हणजेच संदेश वा माहिती अद्ययावत इतरांना पाठवू
शकतात, वाचण्यास प्राप्त करून देऊ शकतात. या माध्यमाद्वारे किंवा वेबसाईटद्वारे असे
संदेश पाठविता व इतरांचे वाचता येतात. तसेच, फोटो जीआयएफ प्रतिमेत रूपांतरित केले
जाऊ शकतात. अमित मिश्रा यांच्या मते जर तुम्ही समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक
किंवा खाजगी क्षेत्रातील कंपनीला सातत्याने ईमेल अथवा पत्रव्यवहार करून थकला असाल
किंवा संबंधितांना भेटूनही ते काम जैसे थेच राहत असेल तर, तुम्हाला ट्विटरची मदत
घ्यावीच लागेल. त्यांच्या मते, आपल्या समस्या संबंधितांपर्यंत पोहोचविण्यासाठी ट्विटर हे
आता नव्या जमान्याचे हत्यार म्हणून उदयाला येत आहे. ट्विट, ट्विटरहॅण्डल, ट्वीट लिस्ट,
फॉलोअर्स, संदेश सेवा (शोर्ट मेसेज सर्विस), रिट्विट हे या माध्यमातील काही महत्त्वाचे
घटक होत. ट्विट (संदेश) करताना २८० अक्षरांची मर्यादा पाळावी लागते. परंतु, लांबलचक
वाक्य टाकायची असतील तर त्यासाठी जो पर्याय उपलब्ध आहे त्याला 'ऑनलाईन ट्वीट'
असे म्हणतात. त्यासाठी एक ट्वीट केल्यानंतर १. असा आकडा टाकायचा, याचाच अर्थ
या नंतर आणखी एक ट्विट येणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. पुढचे ट्वीट टाकल्यानंतरही
ते पूर्ण झाले नसेल तर त्यापुढे २. असा आकडा टाकायचा असतो. थोडक्यात, विषयावर
खूप माहिती द्यायची असेल तेव्हाच अशा प्रकारच्या इनलाइन ट्वीट ची गरज असते.
बोलीभाषेत यूजर नेमलाच ‘ट्विटर हँडल' म्हटले जाते. ट्वीटर हँडल चे महत्त्व यासाठी
आहे की, जेव्हा कुणाला तक्रार नोंदवायची असते; त्यावेळी संबंधित व्यक्ती ट्विटर हँडलद्वारे
तक्रारीची नोंदणी करते.

ट्विटरवर उपस्थित असणारी आणि तुमचे अनुकरण करणारी मंडळी म्हणजे तुमचे
'फॉलोअर' होय. ही मंडळी तुमचे विचार वाचण्यासाठी कायम उत्सुक असतात. तुम्हालाही
जर कोणाचे विचार पटत असतील तर, तुम्हीही संबंधितांना फॉलो करू शकता. जर कोणाला Self-Instructional
फॉलो करायचे असेल तर त्याच्या अकाउंटवर जाऊन उजव्या बाजूला दिलेल्या फॉलो Material 113
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... बटणावर क्लिक करावे लागते. ज्यावेळी आपण दुसऱ्या कुणाच्या अकाउंटवरील ट्विट
आपल्या अकाउंटवरून पुन्हा करतो त्याला 'रिट्विट' असे म्हणतात, दुसऱ्या भाषेत फॉरवर्ड
NOTES करणे. कुणीही अथॉरिटी आपल्या अकाउंटवर येऊन प्रतिक्रिया देते किंवा त्याला रिट्विट
करते. 'निळा पक्षी' हा ट्विटरचा लोगो किंवा सांकेतिक ओळख आहे. या ‘ट्विटर बर्ड' द्वारे
आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर ट्विटर या समाज माध्यमांची ओळख बनली आहे.
इंटरनेटवर २००८ मध्ये या सेवेची सुरुवात झाली. विशेषत: तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या
या माध्यमाचा वापर आपले मत व प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी अमिताभ बच्चनसारखे
अनेक सेलिब्रिटी करताना दिसतात. २८० शब्दांच्या मर्यादेत ट्विटरवर दृश्य व्यक्त केले
जाऊ शकते. वापरकर्त्याला आपल्या बद्दलच्या ताज्या बातम्या यावरून प्रसिद्ध केल्या जात
असतात. त्यामुळे सचिन तेंडुलकर, अभिषेक बच्चन, ऋतिक रोशन असे अनेक तरुण-
तारांकित या माध्यमावर दिसून येऊ लागले आहेत.

• ट्विटर काय आहे?


ट्विटर हे फेसबुक प्रमाणेच एक सोशल नेटवर्किंग वेबसाइट आहे. ज्याचा वापर करून
आपण त्यावरील लोकांशी संपर्क साधू शकतो. देशातील आणि जगातील सर्व लोक
ट्विटरचा वापर करतात. ट्विटरला मार्च 2006 मध्ये लॉन्च करण्यात आले, त्याचे मुख्यालय
सेन फ्रान्सिस्को कॅलिफोर्निया येथे आहे. 2006 पासून ट्विटरची लोकप्रियता अधिक
प्रमाणात वाढली आहे त्यामुळे ट्विटरचा वापर आजकाल सर्वजण करतात. ट्विटर वापरून
आपण दररोज देश व जगात सर्वाधिक चर्चा होणाऱ्या सर्व विषयांबद्दल जाणून घेऊ शकतो,
तसेच त्या विषयावर आपण आपले विचार, आपले मत व्यक्त करू शकतो.

• ट्विटरचे ट्विट म्हणजे काय?


ट्विटर ट्विट करतो म्हणजे आपण एक संदेश शेअर करतो आणि आपल्याला जे
फॉलो करतात त्यांना तो संदेश पाठविला जातो. बरेच वापरकर्ते त्यांच्या आवडी-निवडीच्या
लोकांना फॉलो करतात, जेणेकरून ते एकमेकांशी संवाद साधून बोलू शकतील. ट्विटरचे
प्रोफाइल तयार केले जाते त्यावेळेस ते काही सार्वजनिक असतात. आपण जगाच्या
कोणत्याही कोपऱ्यात असलो तरी आपण ते प्रोफाइल पाहू वाचू शकतो. जर कोणाची
प्रोफाइल प्रायव्हेट असेल तर आपण ती प्रोफाईल पाहून शकत नाही.

• ट्विटर कोणी तयार केले?


2006 मध्ये इव्हान विल्यम्स (Evan Williams) आणि बिझ स्टोन (Biz Stone)
यांनी ही सेवा तयार केली होती. या माध्यमाच्या निर्मात्यांनी असे म्हटले होते की, त्यांना
खरोखर एक अशी सेवा बनवायची आहे, ज्यामध्ये लोक आपल्या मित्रांना काय करीत
आहेत? कुठे फिरत आहेत? याबद्दल माहिती होईल व ते एकमेकांशी संवाद साधू शकतील.
ट्विटर टीम चे म्हणणे आहे की त्यांनी प्रथम त्यांचे नाव ट्विट ठेवले नंतर त्याचे नाव ट्विटर
असे झाले. जर आपण ऑक्सफर्ड डिक्शनरी मध्ये त्याचा अर्थ पाहिला तरी त्याचा अर्थ
‘खूप वेगवान बोलणे’ हा देखील होऊ शकते. ट्विटरचे सी ई ओ जॅक दोरसी आहेत. त्यांचा
जन्म 19 नोव्हेंबर 1976 रोजी झाला. हे एक अमेरिकन संगणक प्रोग्रामर आणि इंटरनेट
Self-Instructional उद्योजक आहेत.
Material 114
नवमाध्यमे आणि
• रँकिंग्स् समाजमाध्यमांसाठी...
ट्विटरचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्नियामध्ये ७९५, फ़ॉल्सम स्ट्रीटवर आहे.
ट्विटर ही अलेक्सा इंटरनेटच्या वेब यातायातच्या विश्लेषणाद्वारे विश्वभरातील सर्वात NOTES
लोकप्रिय वेबसाईटच्या रूपात २६व्या श्रेणीवर आली आहे. तसे अनुमानित दैनिक
वापरकर्त्यांची संख्या बदलत राहते, कारण कंपनी सक्रिय खात्यांची संख्या देत नाही. तसे
फेब्रुवारी २००९ मध्ये compete.com ब्लॉग द्वारे ट्विटरला सर्वात जास्त प्रयोग करणारे
सामाजिक नेटवर्कच्या रूपात तिसरे स्थान दिले आहे. त्यानुसार नवीन सभासदांची संख्या
साधारण ६० लाख आणि मासिक निरीक्षणकांची संख्या ५ कोटी ५० लाख आहे. प्रत्यक्षात
मात्र फक्त ४०% नियमित वापरकर्ते आहेत. मार्च २००९ में Nielsen.com ब्लॉगने
ट्विटरच्या सदस्य समुदायाची नोंदणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी ट्विटर वर पण काही असुरक्षितता च्या बातम्या येत होत्या. ट्विटर
एका आठवड्यात दोनदा फिशिंग स्कैम च्यात आले. या मुळे ट्विटर द्वारा उपयोक्ताला
सावधानतेचा इशारा देण्यात आला की ते डायरेक्ट मेसेज वर या कोणत्याही संदिग्ध लिंक
ला क्लिक करू नये. साइबर अपराधी उपयोक्ता लोकांना फसवणूक करून उपयोक्ता नाव
आणि पासवर्ड इत्यादी ची चोरी करतात त्यांच्या द्वारे उपयोक्ता ला ट्विटर वर आपल्या
मित्रांकडून डायरेक्ट मेसेज च्या आत छोटेसे लिंक मिळते त्या वर क्लिक करताच उपयोक्ता
एक खोट्या वेबसाइट वर पोहोचतो. हे एकदम ट्विटर च्या होम पेज सारखे दिसते. इथेच
उपयोक्ता ला आपली लॉग-इन माहिती एंटर करण्यासाठी म्हणटले जाते, ठीक तसेच जसे
की ट्विटर च्या मूळ पृष्ठ वर असते आणि या प्रकार ही माहिती चोरली जाते. एक
उपयोक्ता, डेविड कैमरन ने आपल्या ट्विटर वर जसेच एंटर की दाबली तो खराब संदेश
त्यांच्या ट्विटर मित्रांच्या यादीतील उपयोक्ता पर्यंत पोहचला. त्यामुळे हे स्कैम दुनियेतील
इंटरनेट पर्यंत पोहोचले. सुरक्षा विशेषज्ञा अनुसार साइबर अपराध्याने चोरलेलेल्या माहिती
चा प्रयोग बाकीच्या खात्या ला ही हैक करण्यात करू शकतात किंवा याने कोणत्या तरी दूर
च्या कंप्यूटर मध्ये जपून ठेवली असलेली माहिती ला हैक करू शकतात. या पासून
वाचण्यासाठी उपयोक्तांना आपले खात्याचे पासवर्ड कोणते तरी कठिन शब्द ठेवून ठेवायला
हवे आणि सर्व दूर एकच पासवर्ड चा प्रयोग करू नये. जर एखाद्याला जर हे कळाले की
त्यांच्या ट्विटर खात्यातून संदिग्ध संदेश पाठवले जाते तर आपल्या पासवर्ड ला लगेच
बदलने महत्त्वाचे आहे. असेच आपल्या ट्विटर खात्याची सेंटिंग्स किंवा कनेक्शन एरिया
पण तपासा. जर तिकडे कोणत्या थर्ड पार्टीची ऐप्लिकेशन संदिग्ध वाटते तर त्या खात्याला
एक्सेस करण्यासाठी परवानगी देऊ नये. ट्विटरने पण सुरक्षा कडक करण्यासाठी पासवर्डच्या
रूपात प्रयोग होणारे ३७० शब्दांचा निषेध करून त्या अनुसार पासवर्डच्या या शब्दांच्या
बद्दल अनुमान लावणे सोपे आहे.

• ट्विटर कसे कार्य करते ?


ट्विटर ही टेक्नॉलॉजी फ्रेमवर्क वेब इंटर्फेस हाय होमवर्क चा वापर करते. ट्विटरचे
पोस्ट हॅंडलिंग सॉफ्टवेअर द्वारे केले जाते, त्याच्या प्रोग्रामिंग भाषेला स्केलासह लिहिले
जाते. हे फ्रेमवर्क व अतिरिक्त वेब सेवा आणि अप्लिकेशनला ट्विटरसह परस्पर संवाद
साधण्याची व एकत्रित करण्याची अनुमती देते. ट्विटर सर्च कार्यक्षमता विशिष्ट संदेश
शोधण्यासाठी हॅशटॅग चा वापर केला जातो. Self-Instructional
Material 115
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... हॅशटॅग (#) हे एक चिन्ह सिम्बॉल असते. या शब्दाला हॅशटॅग (#) हे चिन्ह लावून
सर्च केले जाते. तर त्यासंबंधी आपल्याला पोस्ट उपलब्ध होतात. भारतात सर्वात जास्त
NOTES ट्विटर फॉलोअर्स नरेंद्र मोदींचे आहे. नरेंद्र मोदींच्या फॉलोअर्स संख्या ६३.३ पॉइंट दशलक्ष
आहे

• ट्विटर अकाऊंट कसे तयार करावे ?

ट्विटरवर अकाऊंट तयार करण्यास आपल्याला मोबाईल मध्ये क्रोम ब्राउजर वा ट्विटर
अॅप वापरू शकतो. आपण ट्विटर अकाउंट तयार करण्यास क्रोम ब्राउजर चा वापर शकतो.

i) ट्विटर अकाऊंट तयार करण्यास सर्वप्रथम क्रोम ब्राउजर उघडा.

ii) https://mobiletwitter.com ही साईट गुगल वर सर्च करून साईनअप


ला क्लिक करा.

iii) नंतर या स्टेप ला फॉलो करा. तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाका.

iv) नंतर नेक्स्ट ला क्लिक करा.

v) परत साईनअप ला क्लिक करा आणि व्हेरिफाय फोन ओके करा.

vi) नंतर आपल्या मोबाइल नंबरवर verification कोड येईल. तो कोड तेथे टाका.

vii) नेक्स्ट ला क्लिक करा.

viii) आता ८ अंकी पासवर्ड टाका.

ix) नेक्स्ट करून प्रोफाइल पिक्चर अॅड करा. व स्कीप फॉर नाऊ वर क्लिक करा.

x) नंतर आपली भाषा निवडा व नेक्स्ट वर क्लिक करा.

xi) नंतर तुमचा इंट्रेस्ट अॅड करा वा स्कीप फॉर नाऊ वर क्लिक करा.

xii) तुम्हाला ट्वीटरचे अॅप डाउनलोड करायचे असेल तर डाउनलोड नाऊ वर क्लिक
करा. किंवा नॉट टूडे ला क्लिक करा.

आता तुमचे ट्वीटर अकाऊंट तयार झालेले असेल.

Self-Instructional ट्विटर अकाऊंट वापरण्यासाठी आपल्याला पुढील गोष्टी माहीत असणे आवश्यक
Material 116 आहे.
१. ट्विटर युजर नेम नवमाध्यमे आणि
२. ट्विटस समाजमाध्यमांसाठी...
३. रिट्वीट
४. फॉलोवर्स अँड फॉलोविंग NOTES
५. हॅशटॅग

१. युजर नेम :- ट्वीटर आपल्याला प्रत्येक नावाच्या पुढे @ चे चिन्ह (@) पाहायला
मिळते. हे चिन्ह वापरकर्त्याला युजर नेम समोर वापराली जाते

२. ट्विटस :- जेव्हा आपण ट्विटर वर काही लिहतो वा पोस्ट करतो त्यास ट्विटस असे
म्हणतात

३. रिट्वीट :- हे अगदी शेअर करण्यासारखे आहे जेव्हा आपल्याला एखाद्याचे ट्विट


आवडते तेव्हा आपण ते रि ट्वीट करू शकतो असे केल्याने ते आपल्याला टाईमलाईन
वर दिसण्यास सुरुवात होते जे आपल्याला फॉलो करणाऱ्या लोकांपर्यंत पोहचते.

४. फॉलोवर्स अँड फॉलोविंग :- ट्वीटर आपल्याला वापरकर्त्यांच्या प्रोफाईल वर


फॉलो बटन मिळते. आपण या फॉलो बटन वर क्लिक केले की या वापरकर्त्याच्या प्रत्येक
ट्विट बदल आपल्याला माहिती मिळते. म्हणजेच आपण त्या व्यक्तीला फॉलोवर्स आहोत.
जे लोक आपल्याला प्रोफाईलवर येतात व आपल्या प्रोफाईल वर असलेल्या फॉलो
बटनावर क्लिक करतात तर ते वापर करते आपले फॉलोवर्स असतात.

५. हॅशटॅग :- (#) ट्विटरवर पोस्ट लिहिताना याचा वापर केला जातो व जे लोक
हॅशटॅग वापरतात तेव्हा ते ग्रुप सारखेच कार्यकर्ते ज्यात लोक त्या विषयावर चर्चा करतात
या हॅशटॅग कहा वापर करून कोणीही सहभागी होऊ शकते

ट्वीटर अकाउंट कसे चालवावे ?

१. जेव्हा आपण ट्विटर उघडतो तेव्हा आपल्याला प्रथम होम बटन दिसते त्यावर
आपल्याला आपण करीत असलेल्या सर्व लोकांचे ट्विट्स पाहायला मिळतात

२. सर्च हे सर्व बटन वापरून आपण आपल्या मित्रांना व मैत्रिणींशी संपर्क साधू शकतो

३. नोटिफिकेशन बेल आपल्याला सर्व प्रकारच्या सूचना मिळतात. जसे की कोणीतरी


आपल्याला फॉलो केली ट्विट केले रिट्विट केले याबाबत माहिती मिळते.

४. ट्विटरच्या मदतीने मेसेज या बटनावर क्लिक केलं तर आपल्याला पाठवलेले सर्व


संदेश पाहायला मिळतात.

५. ट्विट बटनावर क्लिक केले तर आपण आपल्या ट्विटर खात्यावर ट्विट करून आपले Self-Instructional
विचार शेअर करू शकतो. Material 117
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... • ट्विटरचे फायदे
NOTES १. ट्विटरच्या मदतीने प्रसिद्ध आणि आपल्या आवडीच्या कलाकारांची आपल्याला
संवाद साधता येतो आणि माहिती मिळते.

२. ट्विटरच्या मदतीने आपण आपले मित्र व नातेवाईकांशी जोडून राहतो.

३. तसेच देश-विदेशाची माहिती जाणून घेण्यासाठी त्याचा फायदा होतो.

४. प्रचार करण्यास ट्विटर हे सर्वात मोठी प्रभावी समाज माध्यम आहे.

५. आपले फेवरेट सेलिब्रिटींना फॉलो करून त्यांच्याबाबत जास्तीची माहिती प्राप्त करू
शकतो.

५. आपले मतप्रदर्शन व आपले मत परावर्तित आपण करू शकतो.

• तोटे
१. ट्विटरवर काही पारिभाषिक शब्द असल्याने ते शब्द समजण्यात गोंधळ होतो तसेच
काही वेळेस त्याचा वेगळा अर्थ देखील काढला जातो.
२. ट्विटरच्या बाबत जास्त माहिती नसल्याने काही वेळेस लोकांना व्हेरिफाईड खाते
ओळखता येत नाही.
३. शब्दमर्यादेमुळे काही ट्विटरचा वापर करण्यास टाळतात किंवा घाबरतात.
४. ट्विटर मधून बऱ्याच काही गोष्टींच्या अफवाही उडवल्या जातात.
५. बराच वेळ त्या सोशल माध्यमांमध्ये आपण अडकून असतो.

१.१.८. सारांश
अशाप्रकारे ट्विटर बाबतीत माहिती आपल्याला सांगता येते. ट्विटरच्या दृष्टिकोनातून
आजच्या या समाज माध्यमाचा उपयोग आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये बऱ्याच अंशी
होतांना दिसतो. परंतु त्याचे काही गुणदोष आहे. आपण त्याचा किती काळ किती वेळ
उपयोजन करायचा हे ठरवले पाहिजे व तेवढाचया सोशल माध्यमांचा उपयोग कसा व
कशासाठी केला पाहिजे याचं भान आजच्या तरुण पिढीला असणे गरजेचे आहे.

१.१.९. महत्वाचे शब्द


Self-Instructional मायक्रो ब्लॉगिंग म्हणजे : कमीत कमी शब्दात आपले म्हणणे मांडणे.
Material 118 डिजिटल लॉगीन : इलेक्ट्रोनिक संसाधन या माध्यमातून पाहता येणारी माध्यमे होय.
नवमाध्यमे आणि
१.१.१०. सरावासाठी प्रश्न समाजमाध्यमांसाठी...

१. समाजमाध्यमे म्हणजे काय? NOTES


२. नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे प्रकार सांगा.
३. ब्लॉग म्हणजे काय ? ते सांगून त्याची रचना स्पष्ट करा.
४. फेसबुक अॅप कसे डाऊनलोड कारावे व कसे वापरावे.
५. ट्विटरचा संक्षिप्त इतिहास सांगून त्याचे फायदे व तोटे लिहा.

१.१.११. अधिक वाचनासाठी पुस्तके


१.शेळके भास्कर : प्रसारमाध्यमे आणि मराठी भाषा, स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे.
२. गंधे रविराज : माध्यमरंग, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, २५ डिसेंबर २०१८.
३. बोराटे योगेश : सोशल मीडिया, अथर्व प्रकाशन, जळगाव.
४. www.twitter.com
५. www.saptahisakal.com
६. www.marathi.jag.com
७. www.wikipedia.org

Self-Instructional
Material 119
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी...
१.३ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांविषयी
NOTES साक्षरता, दक्षता, वापर आणि परिणाम
१.३.१ प्रस्तावना
१.३.२. उद्दिष्टे
१.३.३ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे साक्षरता
१.३.४नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्या वापरातील दक्षता
१.३.५ समाजमाध्यमांचा वापर
१.३.६नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे परिणाम
१.१.७ सारांश
१.१.८ महत्वाचे शब्द
१.१.९ सरावासाठी प्रश्न
१.१.१० अधिक वाचनासाठी पुस्तके

१.३.१ प्रस्तावना
आज आपण पाहतो आपले जीवन माहिती तंत्रज्ञानाशी अगदी घट्टपणे जोडलेले आहे.
किंबहुना आपणही अपरिहार्यपणे जोडले गेलो आहोत. परंतु ही नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे
जेव्हा आपण वापरतो, हाताळतो, आपल्या मुलांच्या हातामध्ये देतो तेव्हा आपण ज्ञान,
माहिती, मनोरंजन इ. हेतू या माध्यमांचे डोळ्यासमोर ठेवलेले असतात. पण या माध्यमांची
दुसरी एक महत्त्वाची बाजू आहे ती म्हणजे ही माध्यमे वापरताना आपण ती कशा प्रकारे
उपयोगात आणायची आहेत. याविषयी ज्ञान मिळविणेही तितकेच आवश्यक आहे तसेच ही
माध्यमे हाताळताना वेगवेगळ्या गोष्टींची दक्षता घेणेही अत्यावश्यक आहे. या नवमाध्यमे व
समाजमाध्यमे यांचे फायदे आणि परिणाम यांचाही विचार करण्याची आज तर मला वाटत
नितांत गरज आहे. कारण आज प्रत्येकाकडे किंबहुना प्रत्येक घराघरात, कुटुंबात ही
समाजमाध्यमे पोहचलेली आहेत. या माध्यमांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर आज विशेषतः
तरुणाई मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहे. हा वाढता वापर लक्षात घेता या माध्यमांच्या
वापराविषयी एक प्रकारची चांगली समज समाजामध्ये निर्माण होणे ही काळाची गरज आहे.
कारणमाध्यमाचा प्रभाव मानवावरहोण्याऐवजी मानवाचा जर ही माध्यमे वापरण्यावर प्रभाव
राहिला तर ते अधिक योग्य होईल. आत्ताचे तंत्रज्ञान इतके विकसित झाले आहे की , समाज
माध्यमाचा वापर करण्यासाठी संगणकाची सुद्धा गरज पडत नाही. व्यक्तिबरोबरच नव्हे तर
अनोळखी लोकांपर्यंत पोहचण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. व्यावसायिक फायद्यासाठी
या माध्यमाचा चांगला उपयोग करता येतो. तसेच ग्लोबल स्तरावर पोहचण्यासाठी हे एक
शक्तीशाली साधन आहे. म्हणूनच नवमाध्यमे व समाजमाध्यमे ही मानवाच्या प्रगतीसाठी खूप
दिशादर्शक अशी माध्यमे आहे. परंतु या माध्यमाविषयक साक्षर, दक्ष असणेही तितकेच
Self-Instructional आवश्यक आहे. या घटकात आपण नवमाध्यमे व समाजमाध्यमांविषयक साक्षरता, दक्षता,
Material 120 वापर आणि परिणाम याविषयी चर्चा करणार आहोत.
नवमाध्यमे आणि
१.३.२. उद्दिष्टे समाजमाध्यमांसाठी...

NOTES
१.नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्या वापरातील दक्षताघेणे.

२. ग्रुप अॅडमीन, ग्रुप निर्माते यांनी कोणती काळजी घ्यावी हे समजीन घेणे.

३. समाजमाध्यमांचा वापर आपण कोणत्या कामासाठी करुन घेणे

४. नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचेयांचा परिणाम आज कसा आहे ते समजून घेण.

१.३.२ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे साक्षरता


२१ व्या शतकात विज्ञान व तंत्रज्ञाने फार मोठी प्रगती केलेली आहे व ती प्रगती दिवसें-
दिवस अधिक वेग घेत असतांना आपल्याला दिसत आहे. आज या माहिती तंत्रज्ञानाच्या
युगामध्ये विकासाला एक वेगळीच गती मिळाली आहे. सुरवातीला माहितीची देवाण-घेवाण
करण्यासाठी संदेशवाहक, पत्र, लोकसभा, इ. चा वापर होत असे. पण यामध्ये लागणार
वेळ हा फार अधिक असे. त्यानंतर वृत्तपत्र, नियतकालिके, नभोवाणी, नाटक, चित्रपट,
दूरचित्रवाणी इत्यादींच्या माध्यमातून संदेशवहनाचे व ज्ञानदानाचे कार्य होऊ लागले. पण या
मध्यमांनाही सुव्यवस्थित करून प्रकाशित करण्यासाठी एक ठराविक असा वेळ लागतो, हे
आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने आज आपल्या हातात असे
साधन आणून ठेवले आहे ज्याने क्षणाचाही विलंब न होता आपण एक ठिकाणाहून दुसऱ्या
ठिकाही माहितीची देवाण-घेवाण करू शकतो. तेच साधन म्हणजे आधुनिक समाज माध्यमे
होय.
या आधुनिक समाजमाध्यमांमध्ये प्रमुख्याने फेसबूक, ट्विटर, व्हॉट्सअॅप, ब्लॉग, इ.
चा समावेश होतो. आज हे समाजमाध्यमे धाकटयांपासून थोरल्यांपर्यंत सर्वचजन वापरतांना
आपल्याला दिसून येतात. त्यातल्या त्यात तरुणांना या समाजमाध्यमांनी जास्तच वेड
लावलेल आपल्याला दिसून येत. या समाजमध्यमांमुळे संपूर्ण जगाचे एका खेड्यात रूपांतर
झाले आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. परंतु ज्या प्रमाणे प्रत्येक नाण्याला दोन बाजू
असतात, त्याचप्रमाणे आधुनिक समाजमाध्यमांनाही आहेत. या जागतिक खेड्याचे
आपल्याला फायदे दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे त्याचे काही तोटेही आहेत, ज्याकडे
दुर्लक्ष करणे आपल्याला धोकादायक ठरू शकते. कारण ज्या समाजमाध्यमांचा वापर
करतांना आपण माहितीची देवाण-घेवाण करणे, मित्र-परिवार जोडणे, आपली कामे
लवकरात-लवकर होणे, दुरवरील आप्तजणांशी जोडून राहणे अशा प्रकारचे उद्देश आपण
डोळ्यांसमोर ठेवत असतो त्याव्यतिरिक्तही त्याचा वापर अनेक अनिष्ट गोष्टी करण्यासाठीही
केला जाऊ शकतो यापासून आता आपण कोणीही अपरिचित नाही. कारण, आज याच
आधुनिक समाज माध्यमांच्या माध्यमातून आपल्याला फार मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हे
होतांना दिसून येत आहे. ज्यात, आपली गोपनीय महिती चोरणे, आपली व्ययक्तिक चर्चा Self-Instructional
वाचने, अश्लील फोटोज्, विडियोज् पाठविणे, आपल्या अकाऊंटचा वापर अनिष्ट Material 121
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... कामांसाठी करणेइ. गोष्टींचा समावेश होतो.
त्यामुळे या समाजमाध्यमांचा वापर करत असतांना त्याविषययीची साक्षरता आपल्याकडे
NOTES असणे नितांत गेरजेचे आहे. परंतु वास्तव दृश्य वेगळेच काही दिसून येते. ज्या प्रमाणात
आपण या आधुनिक समाजमाध्यमांचा तीव्र गतीने स्वीकार केला आहे त्या गतीने आपण
त्याच्या साक्षरतेच्या माहितीचा स्वीकार केलेल्या दिसून येत नाही.
उदाहरणार्थ., आपण व्हाट्सअप, फेसबुक यांसारख्या माध्यमांतून आलेले संदेश,
माहितीयांची कुठलीही सत्यता पडताळून न पाहता, त्यावर कुठल्याही प्रकारे विचार-विमर्ष
न करता आलेली माहिती अगदी जशी आहे तशी दुसऱ्यांना फॉरवर्ड करतअसतो. वास्तविक
असे करणे चुकीचे आहे. कारण माहितीची पडताळणी करणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य
आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमावर आपण कशाला लाईक करतो, कोणत्या गोष्टीना
प्रतिक्रिया देतो हे जाणून घेणे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. कारण आपण ज्यावेळी एखाद्या
गोष्टीला लाईक करतो किंवा प्रतिक्रिया देतो तेव्हा त्या माहितीची पडताळणी करणे ही
सर्वस्व आपली जबाबदारी असते. त्यामुळे येथून पुढे कधीही लाईक करताना,प्रतिक्रिया
देताना आपण माहितीची व्यवस्थित पडताळणी केल्याशिवाय लाईक व प्रतिक्रिया देऊ नये.
याबाबतीत साक्षर असणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. तसेच समाजमाध्यमांवरील
आपल्या खात्यांची प्रायव्हसी (गोपनीय) सेटिंग योग्य ती असणेही गरजेचे आहे. याबरोबर
आपल्या वैयक्तिक खात्यांचा पासवर्ड वेळोवेळी बदलणे आवश्यक आहे. आधुनिक
समाजमध्यमांद्वारे आलेल्या प्रयत्तेक प्रकारच्या आपण व्यवस्थितपणे त्यावर सारासार
विचारपूस करून, जाणून घेऊन, चिकित्सा करून, प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे समजून
घ्यायला हवीव त्यानंतरच तिच्यावर विश्वास ठेवायल हवा अथवा ती इतरांना पाठवायला
हवी.
समाजमध्यमांविषयीची साक्षरता यासाठी आवश्यक आहे की, समाजमाध्यमांमध्ये
असणारे समज-गैरसमज या बाबतीत आपल्याला भान येण्यासाठी साक्षरता असणे गरजेचे
आहे. जी काळाची आज गरज आहे. त्याविषयी सविस्तरपणे विवेचन आपण पुढीलप्रमाणे
संगत येतील.

१.३.३ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमे यांच्या


वापरातील दक्षता
आजकाल नवमाध्यमे व समाजमाध्यमांविषयी आजची पिढी कुणीही अपरिचितनाही.
जवळ-जवळ आज प्रत्येक व्यक्तीकडे android mobile आहे. पूर्वीच्याकाळी जसे अन्न,
वस्र, निवारा या जशा मानवाच्या गरजा होत्या त्याप्रमाणे आज mobile ही सुद्धा काळाची
गरज म्हणून त्याचा वापर केला जातो. आज समाज माध्यमांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर
होतांना दिसतोय. त्यामुळे घराघरातव्हाट्सअॅप, फेसबुक, यु ट्यूब, ट्विटर, इन्स्ट्राग्राम या
समाज माध्यमांचादिवसभरातील कमीत कमी ३० मिनिटेतरी वापर करत असतो. परंतु ही
Self-Instructional लोकप्रिय माध्यमे हाताळताना, वापरताना प्रत्तेकचजन दक्षताघेतो असे नाहीये. किंवाहूणा
Material 122 समाजमाध्यमां विषयीच्या दक्षता घेणाऱ्यांची संख्या नगण्यच म्हणावी लागेल. पण
नवमाध्यमे आणि
त्याविषयीची दक्षता घेणे आपली व काळाची गरज बनली आहे. समाजमाध्यमांसाठी...
सोशल माध्यमांवर आपण व्यक्त होताना,कशाप्रकारे व्यक्त होतो, मत मांडतो याविषयी
जागरूक असणे आवश्यक आहे. कारण आपले मत व्यक्त करत असताना,आपण दुसऱ्यांचे NOTES
व्हिडिओ, मेसेजेस् वाचून आपले मत व्यक्त करत असतो. तसेचकाहीवेळा आपण दुसऱ्यांची
मते जशीच्या तशी इतरांनापाठवतअसतो. ते चुकीचे असेल किंवा नाही याची सत्यता न
तपासता आपण जशाचा तसा पाठवत असतो, ज्याने त्याला आपले नाव लागून जाते.
त्याचप्रमाणे समाजमाध्यमांचा वापर हा चुकीच्या माध्यमातून जर झाला तर त्याच्या
परिणामांना आपल्यालाच सामोरे जावे लागते. चुकीच्या, खोट्या बातम्या, विरोध निर्माण
करणारे संदेश, भाषण, चित्र, यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकतो, ज्यापासून आपण
वाचायला पाहिजे.तुम्हाला एखादी माहिती ग्रुपवर किंवा सोशल मीडियावर टाकायची असेल
तर त्या बातमीचा, तपशीलाचास्त्रोत, त्याची सत्यता पडताळून तो तपशील तुम्हाला
अत्यावश्यक वाटला तरच फॉरवर्ड करावा. तसेच समाज माध्यमावर येणारे वेगवेगळे जे
व्हिडिओ आहेत त्याचीही माहिती, सत्यता, त्याचा उद्देश समजून घेऊनच पुढे पाठवावे.
जर आपण कुठल्याही समाज माध्यमांवरअसणाऱ्या ग्रुपचे सदस्य असाल आणि त्या
गुपवर काही खोटी, चुकीची, आक्षेपार्ह संदेश, व्हिडिओज, पोस्ट येत असतील ज्यामुळे
जातीय किंवा धार्मिक तणाव निर्माण होत असतील अथवा समाजात अराजकता निर्माण होत
असेल तर अशा पोस्टबद्दल ग्रुपअॅडमीनला सांगून तुम्ही नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये
तक्रार दाखल करू शकता. तसेच त्याची माहिती ‘सायबर क्राईम’ या संकेतस्थळावरही देऊ
शकता. अशा पोस्ट कोणत्याही ग्रुपवर आणि वैयक्तिकपणे सुद्धा आपण शेअर करू नये.
तसेच तुमच्या मोबाईलमध्येही स्टोअर करून ठेवू नये. त्याचप्रमाणे ग्रुप अॅडमीन, ग्रुप निर्माते
यांनी समाजमाध्यामांवरील काही प्रातिनिधिक नियमांचा विचारही केला पाहिजे. त्यासंदर्भात
डॉ. चिने. आणि डॉ. शळ्के यांनी ग्रुप अॅडमीन, ग्रुप निर्माते यांनी दक्षता कशी घ्यावी
याबाबत काही मत मांडलेली आहे. ते पुढील प्रमाणे.

ग्रुप अॅडमीन, ग्रुप निर्माते यांनी खालीलप्रमाणे दक्षता घ्यावी.

• समाजमाध्यमांवर ग्रुप स्थापन करताना प्रत्येक ग्रुप सदस्य (Member) हा एक


जबाबदार व विश्वासहार्य व्यक्ती आहे याची खात्री करूनच त्याला किंवा तिला
ग्रुपमध्ये सामील अॅडमीन ने सामील करावे.

• ग्रुपमधील सर्व सदस्यांना ग्रुप निर्माण करायचा उद्देश व ग्रुपची नियमावली समजावून
सांगावी.

• सर्व ग्रुप सदस्यांना सूचना द्याव्यात की, जर कोणी ग्रुप सदस्याने सदर ग्रुपवर काही
आक्षेपार्ह पोस्ट, मेसेजेस, व्हिडिओ किंवा तत्सम बाबी पाठवल्या गेल्यास त्या
सदस्याला तत्काळ या ग्रुपमधून वगळण्यात येईल.

• ग्रुप निर्मात्याने ग्रुपवर शेअर होणाऱ्या पोस्टचे नियमितपणे परीक्षण केले पाहिजे. Self-Instructional
Material 123
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... • ग्रुप निर्मात्याने परिस्थितीनुसार गरज पडल्यास ग्रुप सेटिंग बदलून ‘ओन्ली अँडमीन’
(Only Admin) असे करावे. जेणेकरून अनावश्यक मेसेज ग्रुपवर टाळता येतील.
NOTES
• जर काही सदस्य सूचना देऊन सुद्धा आक्षेपार्ह पोस्ट टाकत असतील तर त्यांना
ग्रुपवरून काढून टाकावे किंवा त्यांची तक्रार नजीकच्या पोलीस ठाण्यात करावी.

• सर्वप्रथम, ग्रुप अॅडमीन ने ‘व्हॉट्सअॅप ग्रुप रुल्स’ नावाची जी पीडीएफ फाइल आहे
तिला डाउनलोड करून घ्यावी, व त्यातले जे नियम आपल्या ग्रुप साठी योग्य वाटेल
त्यांना कॉपी करून घ्यावे. त्यानंतर आपल्या मोबाइल मध्ये व्हॉट्सअॅप ला सुरू
करावे. ज्या ग्रुप मध्ये तुम्ही अॅडमीन आहात त्या ग्रुप मध्ये जावे.

• त्यानंतर ग्रुप मध्ये गेल्यावर वर त्याच्या नावावर क्लिक करावे. नंतर तुम्हाला तिथे
‘अॅड ग्रुप डिस्क्रिप्शण’ या ऑप्शन वर क्लिक करावे. व तुम्ही ज्या नियमांना कॉपी
केल होत त्या नियमांना तिथे पेस्ट करून द्या. याने तुम्ही बनवलेल्या ग्रुप मधील सर्व
सदस्य ते नियम वाचू शकतील व जे नवीन सदस्य ग्रुप चे सभासद होऊ इच्छितात
त्यांनाही ते नियम वाचता येईल.

अशा प्रकार नवमाध्यमेव समाजमाध्यमे वापरताना वापरकर्त्याने चांगल्या प्रकारे दक्षता


घ्यावी.

१.३.४ समाजमाध्यमांचा वापर


२१ वे शतक हे जागतीकीकरणाचे युग म्हणून ओळखतो. या काळात जग जवळ आले
आणि माहितीच्या प्रसारणाचा विस्पोट झाला. या कारणाने समाजमाध्यमांना क्रांतीचे युग
म्हणूनही ओळखले जाते.आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मानवाला स्वतंत्र एक हक्काचे
व्यासपीठ मिळाले. समाजमाध्यमांतून माणूस आपल्या भावनांना वाट मोकळी करून देऊ
लागला. सोशल मीडियामुळे जगभरातील माहिती एका क्लिकवर मिळणे सहज शक्य झाले.
माहितीच्या देवाणघेवाणचा वेग प्रचंड वाढला. आज एक व्यक्ती जगातील कुठल्याही
कोपऱ्यातून दुसऱ्या व्यक्तीशी फेसबुक, ट्रीटर, व्हाट्सअॅप, इन्स्ट्राग्राम यासारख्या सोशल
नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून सहज संवाद साधू शकतात. थोडक्यात काय तर,
समाजमाध्यमे हा मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला, समाजमाध्यमांचे हे जरी काही
चांगले फायदे असले तरी तसेच काही तोटेही आहेत. ते आता आपण पुढीलप्रमाणे पाहू...

• फायदे
• सोशल मीडिया मुळे लोकांमध्ये समनुभूती वाढतांना आपल्याला दिसून येत आहे.
बातमी वाचल्यापेक्षा प्रत्यक्षात तिचे फोटो बघितल्याने माणूस जास्त द्रवीत होतो ज्याने
Self-Instructional त्यातील इतरांप्रति समामुभूती वाढण्यास मदत होते.
Material 124
नवमाध्यमे आणि
• सोशल मीडियामुळे समजसेवेला वेळ आलेला आपल्याला दिसून येत आहे. सुरुवातील समाजमाध्यमांसाठी...
कुठे दुर्घटना झाली तर तिची माहिती आपल्याला मिळण्यास फार वेळ लागत होता,
पण आता तीच माहिती तत्काल मिळाल्याने योग्यवेळी योग्य त्यांना मदत करणे शक्य NOTES
झाले आहे.

• समाजमाध्यमे हे अनेकांसाठी हक्काचे व्यासपीठ बनले आहे. अनेकजण असे असतात


की ज्यांच्यात आत्मविश्वासाची कमी असल्याने त्यांना लोकांसमोर बोलायला,
आपल्या गुण-कौशल्यांचे सादरीकरण करायला आवड नाही. पण या समजमाध्यमांमुळे
त्यांना हाव तस व्यासपीठ मिळाल्याने त्यांच्या व्यक्तिमहत्व विकासास चालना
मिळाली.

• अनेकांना आपली एक वेगळी ओळख निर्माण करणे या समाज मध्यमांमुळेच शक्य


झाले.

अशाप्रकारे सामाजमाध्यामांचे फायदे आपल्याला सांगता येतात. त्याचप्रमाणे डॉ. चिने.


आणि डॉ. शळ्के यांनीही काही फायदे आपल्याला सुचवले आहेत, ते पुढील प्रमाणे.

• समाजमाध्यमांमुळे लोकांना ज्ञानाची देवाण-घेवाण करणे सोपे झाले.

• समाजमाध्यमांमुळे जे लोक एकमेकांपासून खूप दूर राहतात ते सहजपणे एकमेकांशी


संवाद साधू शकतात.

• सोशल मीडियाने जगाला जागतिक गाव बनविलेले आपणाला दिसून येते.

• समाजमाध्यमांच्या वापरामुळे विद्यार्थ्यांमधील काही गुणांचा विकास होतो तसेच


त्यांचे त्यांच्या वर्गमित्रांसोबत ऑनलाईन का होईना संवाद वाढतात.

• समाजमाध्यमांच्या वापराचा जास्तीत-जास्त फायदा व्यापारी जगताला होताना दिसतो.


जसे की, त्यांच्या व्यवसायाची जाहिरात करायची असल्यास सोशल मीडियासारखी
अति जलद सुविधा त्यांच्याकडे उपलब्ध आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना
आपल्या व्यवसायाची जाहिरात किंवा माहिती अत्यंत कमी वेळात जास्तीत-जास्त
लोकांपर्यंत पोहचवता येते.

• मुलांनी संगणकासमोर वेळ घालवल्यामुळे त्यांची नवीन तंत्रज्ञानाशी चांगलीच ओळख


होते. शैक्षणिक आणि व्यावसायिक प्रगतीसाठी संगणक किंवा इंटरनेट हे अतिशय
मोलाचे माध्यम आहे. त्याद्वारेअनेक विद्यार्थ्यांचे कौशल्यही विकसित होताना दिसून
येत आहे.

• इंटरनेटच्या वेगामुळे दूरवरची सर्व कामे सोपी झाल्यामुळे याचा आबालवृद्धांना Self-Instructional
चांगलाच उपयोग झाल्यामुळे समाजमाध्यम जगातील सर्वांच्या आवडीचे अतिशय Material 125
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... महत्त्वाचे माध्यम झाले आहे.

NOTES • समाजमाध्यम पैसे मिळविण्याचे माध्यम बनले आहे. डिजिटल माध्यमाद्वारे तुम्ही
अनेक पद्धतीने पैसे कमवू शकता.

• तोटे
• समाजमाध्यमांच्या अतिवापरमुळे तरुणांमध्ये चिड-चिडेपान वाढत चालला आहे,
त्यांच्यातील संयम हरवत चाललेला आहे.

• समजमध्यमांद्वारे संभाषण साधने आणि प्रत्यक्ष भेटूण गप्पा करणे यात फरक
असल्याने, समजमध्यमांमुळे नात्यांमधील गोडवा कमी झालेला आपल्याला दिसून
येतो.

• सोशल मीडियावर आभासी ओळख निर्माण करणे सोपे जाते आणि सोशल मीडियावर
फेसलेस राहता येते. कारण खोट्या नावाने अकाऊंट उघडून आणि टोपण नावाने
टाकलेली पोस्ट पटकन कुणाला कळत नाही. या कारणांमुळे गुन्हेगार बिनधास्त गुन्हे
करतात.

• सोशल मीडियावर अनेकदा आपल्याला माहितीचा गैरवापरही झालेला दिसून येतो.


उदाहरणार्थ आपण फेसबुकवर आपल्याला काय आवडते, आवडते सिनेमे, पुस्तके,
फोन, पत्ता हे सार आपण जगाला उघड करतो. या माहितीचा गैरवापर करणाऱ्या
अनेक टोळ्या तयार झाल्या आहेत.

• सोशल मीडियामुळे माणुसकी हरवत चाललेली आपणाला दिसून येते. उदाहरणार्थ,


लोकांना मदत करण्यापूर्वी फोटो काढण्यामध्येच अनेक लोक व्यस्त असलेले दिसून
येतात. त्यामुळे लोक फोटो काढण्यातच समाधान मानू लागले आहेत.

• सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या बनावट व्हिडिओमुळे दंगलभडकल्याचीही


काही उदाहरण आपल्यासमोर आलेली दिसून येतात. सोशल मीडियाचा असाच वापर
करून हिंसाचार घडवला गेलेला आहे.हे थांबावयाचे असेल तर सोशल मीडियाचा
गैरवापर थांबवण्याचे मार्गशोधण्याचीही आता आवश्यकता आहे.

• सोशल मीडिया हा आपल्या विचारांना बिनधास्त अभिव्यक्तकरण्याचे व्यासपीठ


आहे. ही त्याची ओळख जपणे गरजेचे आहे. या मीडियाचा उपयोग एकात्मता आणि
बंधुभाव वाढविण्यासाठी व्हायला हवा.मात्र अलीकडे चुकीच्या पद्धतीने याचा वापर
केला जात आहे असे दिसते. खोटी प्रोफाईल बनवून त्रास देण्याचे प्रकार घडत
असलेले आपणाला दिसून येतात.
Self-Instructional
Material 126 • जरी दूरच्या लोकांना समाजमाध्यमांनी एकमेकांजवळ आणले आहे परंतु एकमेकांच्या
नवमाध्यमे आणि
शेजारी बसलेल्या लोकांमध्ये आज सोशल मीडियामुळे अंतर पडत असलेले आज समाजमाध्यमांसाठी...
दिसून येते.
NOTES
• समाजमाध्यमांच्या अतिवापरामुळे प्रत्येक वयोगटातील लोकांमध्ये डोळे व मान
दुखण्याचा त्रास निर्माण झाला आहे.

१.३.५ नवमाध्यमे आणि समाजमाध्यमांचे परिणाम


समाजमाध्यमे हे आपल्या दैनंदिन जीवनाचे एक अविभाज्य अंग बनले आहे. त्यामुळे
कळत-नकळत त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव हा आपल्या खाजगी व सार्वजनिक जीवना
वरीही पडत असतो. एवढंच नाही तर आपल्या करियरवर ट्रीटर, फेसबुक, व्हाट्सअॅप,
मायस्पेसयासारख्या समाजमाध्यमांचा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो.
समाजमाध्यमांचा आपल्या व्याववहारीक/सामाजिक जीवनावर कसा प्रभाव पडतो हे आपण
पुढील प्रमाणेसकारात्मक व नकारात्मक अर्थाने जाणून घेऊया.

• सकारात्मक परिणाम
१. एखादी माहिती आपल्या नोकरी संदर्भात असेल किंवा योग्य दिशा देण्यासंदर्भात
असेल तर ते मिळवण्यासाठी कोणती कौशल्य व कोणती माहिती आवश्यक आहे ते यातून
मिळवता येते.

२. एखाद्या घटनेविषयी सद्य स्थितीला काय चाललेले आहे याची अद्ययावत माहिती या
समाज माध्यमांद्वारे आपण कितीही दूर असू किंवा देशाच्या बाहेर असू तरीही ती माहिती
आपल्याला तात्काळ मिळत असते.

३. स्वताची ओळख निर्माण करणे शक्य. या समाज माध्यमांमुळे अनेकांना आपली


ओळख निर्माण करणे, आपले कला-गुण सादर करणे शक्य झाले आहे.

४. एखाद्या गोष्टीची आवडछंदनिवडी यांच्या आधारे आपले ग्रुप्स, पेजेस निर्माण करू
शकतात. याद्वारे विचारांनी देवाण-घेवाण करुन अपारंपरिक करियरची माहिती त्याद्वारे
मीळू शकते.

५. डिजीटल साक्षरता. आजच्या जगात क्षेत्र कुठलेही असो, पण त्याची पहिली मागणी
ही तुम्ही डिजीटल साक्षरता ही आहे. याच समाजमाध्यमांमुळे आपल्याला डिजीटल
साक्षरता प्राप्त करणे सहज शक्य होते.

Self-Instructional
Material 127
नवमाध्यमे आणि
समाजमाध्यमांसाठी... • नकारात्मक परिणाम
NOTES डॉ. चिने. आणि डॉ. शळ्के यांनीही काही नकारात्मक परिणाम सांगितले सुचवले
आहेत, ते पुढील प्रमाणे.

१. अभ्यास करताना सोशल मीडिया साइट्स चेक करत राहण्यामुळे एकाग्रता भंग
पावते. परिणामी अभ्यासातील लक्ष कमी-कमी होत जाताना दिसते.

२. सायबर चोरीच्या माध्यमातून गुन्हेगार तयार होण्यासाठी हे एक माध्यम कारण ठरू


शकते.

३. हँकिंग सारख्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून यामुळे पैसे मिळवण्याचे
अनेक गैरमार्ग मुलांना समजू लागले आहेत जे योग्य नाहीत.

४. सोशल मीडियावर मिळणारी ठरावीक प्रकारची उत्तरे, कोणताही विषय समजून


घेण्याची जाणीव नसणे यामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे तितक्याशा गांभीर्याने पाहत नाही.
सोपे आणि कमी कालावधी असणारे अभ्यासक्रम निवडून करिअर करण्याचा शॉर्टकट हे
विद्यार्थी निवडतात.

५. तत्काळ कोणतीही शहानिशा न करता समाजमाध्यमांद्वारे आलेली बातमी प्रसारित


करण्याने समाजामध्ये तेढ निर्माण होते.

६. आर्थिक व सामाजिकदृष्ट्या प्रगतीसाठी विशिष्ट प्रकारच्या अफवा/भीती तयार


करून वाचकांवर त्याचा चुकीचा परिणाम होत असल्याचे दिसत आहे.

७. नवमाध्यमांचा वापर चुकीची माहिती प्रसारित करून एखाद्या विशिष्टव्यक्तीला


समाजामध्ये चांगली, योग्य असल्याचे भासवले जात आहे.

८. नवमाध्यमांद्वारे माहिती चुकीची प्रसारित केली असता त्याचा परिणाम समाजमनावर


खुपच मोठ्या प्रमाणामध्ये व जलद गतीने होत आहे.अशा माहितीमुळे वाचकांची मते
टोकाची झालेली दिसत आहेत.

९. नवमाध्यमांद्वारे माहिती वाचकाला सत्य वाटते व त्यावरून त्याची मते तो तयार करत
असतो. त्यामुळे कोणतीही बातमी व त्याची सत्यता पडताळणी अवघडच झालेली आहे.
चुकीच्या माहितीवरून वाचकांची मते तयार झाल्यास त्याचा समाजावर मोठा परिणाम होतो.

१०. नवमाध्यमांद्वारे व समाजमाध्यमांद्वारे विद्यार्थ्यांवर शैक्षणिकदृष्ट्या होणारे परिणाम:-


१) स्मरणशक्ती कमी होणे २) एकलकोंडेपणा येणे ३) अभिरूची कमी होणे ४) अद्भूत
Self-Instructional आणि रोमांचक वातावरणाची सवय होणे ५) मानसिक स्वास्थ्य बिघडणे ६) चिडचिडेपणा
Material 128 येणे, इ.
नवमाध्यमे आणि
१.३.६ सारांश समाजमाध्यमांसाठी...

अशाप्रकारे आपल्याला नवमाध्यमे व समाजमाध्यमे यांचे समाजजीवनावर, व्यक्तीवर NOTES


होणारे जे सकारात्मक व नकारात्मक परिणाम आहेत ते पाहता येतात. तसेच आज समाज
माध्यम हे कसे तरुण मनावर प्रभावी ठरत आहे हे समजून येते.

१.३.७ महत्वाचे शब्द


१. ‘व्हॉट्सअॅप ग्रुप रुल्स’ नावाची जी पीडीएफ फाइल आहे तिला डाउनलोड करून
घ्यावी, व त्यातले जे नियम आपल्या ग्रुप साठी योग्य वाटेल त्यांना कॉपी करून घ्यावे.
२. ‘अॅड ग्रुप डिस्क्रिप्शन’ग्रुप मध्ये गेल्यावर वर त्याच्या नावावर क्लिक
केल्यावरऑप्शनवर गेल्यावर आपल्याला माहिती मिळत असते.

१.३.८ सरावासाठी प्रश्न


१. नवमाध्यमां विषयीची साक्षरता म्हणजे काय?
२. नवमाध्यमे वापरतांना कुठली दक्षता घ्यावी?
३. ग्रुप अडमिन व ग्रुप वापरकर्त्यांनी कुठली काळजी घ्यावी?
४. नवमध्यमांचे फायदे व तोटे स्पष्ट करा.
५. नवमाध्यमे आणि समजमाध्यमांचे सकारात्मक व नकारात्मक परिणाम स्पष्ट करा.

१.३.९ अधिक वाचनासाठी पुस्तके


१. डॉ. गीतांजली चिने, डॉ. हरेश शळके, ‘आधुनिक भारतीय भाषा :
२. मराठी.’, प्रशांत प्रकाशन, पुणे.
३. प्रा. डॉ. उज्ज्वला भोर: प्रसारमाध्यमे आणि मराठी, प्रशात प्रकाशन, पुणे.
४. www.twitter.com
५. www.marathi.jag.com
६. www.wikipedia.org
७. www.saamana.com

Self-Instructional
Material 129
वेबसाईट आणि ब्लॉग, ट्विटरसाठी लेखन
वेबसाईट आणि ब्लॉग,
घटक २ ट्विटरसाठी लेखन

२.१ वेबसाईट आणि ब्लॉग, ट्विटरसाठी


NOTES

लेखन
२.१.१ प्रस्तावना
२.१.२ उद्दिष्टे
२.१.३. वेबसाईट म्हणजे काय?
२.१.४ मराठी वेबसाईटची गरज
२.१.५ वेबसाईटचे प्रकार
२.२.१. ब्लॉग
२.२.२. ब्लॉग लेखन म्हणजे काय?
२.२.३. ब्लॉग कसा तयार करावा?
२.२.४ विविध ब्लॉग मध्ये कशा प्रकारे पोस्ट करता येतील
२.२.५काही ब्लॉगची उदाहरणे
२.२.६ ब्लॉग लेखनाचे फायदे
२.३.१. ट्वीटर
२.३.२ ट्विटरचा उपयोग
२.३.३. रँकिंग्स
२.३.४. मायक्रोब्लॉगिंग सेवा (Microblogging service)
२.३.५. सारांश
२.३.६. महत्वाचे शब्द
२.३.७ सरावासाठी प्रश्न
२.३.८ अधिक वाचनासाठी पुस्तके

२.१.१ प्रस्तावना
आज आपण अनेक प्रकारच्या वेबसाईटचा वापर आपल्या विविध कामांसाठी करत
असतो. पण तरीही अनेकांना ‘वेबसाईट म्हणजे काय?’ हा प्रश्न विचारल्यास तारांबळ
उडते. कारण बहुतेक जणांना ते ज्या साईटचा वापर आपले काम करण्यासाठी करत
असतात, ती नेमकी काय आहे हेच माहीत नसते. त्यामुळे नेमकी वेबसाईट म्हणजे काय?
हे सोप्या पद्धतीने समजून घेण्यासाठी आपण खालील काही व्याख्यांची मदत घेऊ.

Self-Instructional
Material 131
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन

NOTES

२.१.२ उदिष्टे
१. मराठी वेबसाईटची गरज आज काय आहे ते समजून घेणे.
२. ब्लॉग कसा तयार करावा त्याची गरज काय
३. विविध ब्लॉग मध्ये कशा प्रकारे पोस्ट करता येतील याचा उपयोग का
केला जातो
४. ब्लॉग लेखनाचे फायदे काय आहेत ते समजून सांगणे
५. ट्विटरचा उपयोग आज कशासाठी केला जातो.
६. मायक्रोब्लॉगिंग सेवा

२.१.३ वेबसाईट म्हणजे काय?


“वर्ल्ड वाईड वेब (W.W.W.) वरील अनेक पानांचा एक गट, एकल अस्तित्व
म्हणून ओळखला जातो. जो सामान्यतः एक व्यक्ती, समूह किंवा संस्था यांच्याद्वारे एक
विषयावर अनेक बाजूंनी विचार करून बनवलेला असतो, त्यास ‘वेबसाईट’ असे म्हणतात.”
“अनेक वेबपृष्टे आणि संबंधित माहितीचा संग्रह ज्यास ‘डोमेन’ असे म्हटले जाते व
जो कमीतकमी एक वेबसर्वरवर प्रकाशित केला जातो, त्याला ‘वेबसाईट’ असे म्हणतात.”
“इंटरनेटशी जोडलेली असे साधन जिथे एखादी कंपनी, संस्था इत्यादीची माहिती वर्ल्ड
वाईड वेबवर आढळू शकते त्यास ‘वेबसाईट’ असे म्हणतात.”
वरील व्याख्यांवरून आपल्याला ‘वेबसाईट म्हणजे नेमके काय’ ? याची कल्पना
नक्कीच आली असेल. ढोबळमानाने म्हणायला गेल्यास, वेबसाईट म्हणजे असे ठिकाण
जिथे एकाच ठिकाणी एक विशिष्ट विषयावरील सर्वसमावेशक अशी माहिती आपल्याला
एक टॅबवर पाहावयास मिळते.

२.१.४ मराठी वेबसाईटची गरज


वेबसाईट ही आजच्या काळात काळाची गरज बनलेली आहे. २१ व्या शतकाकडे
वाटचाल करताना तंत्रज्ञानाने कमालीची प्रगती केलेली आहे. आज प्रत्येक घराघरात
संगणक, इंटरनेट पोहचले आहे. शिवाय स्मार्टफोनने तर एक क्रांतीच केलेली आहे. आज
Self-Instructional प्रत्येकजण इंटरनेटच्या माध्यमातूनच जगाशी जोडून राहण्याच्या प्रयत्नात आहे. आजचे युग
Material 132 हे स्पर्धेचे युग आहे. सगळ्या क्षेत्रात आपल्याला जीवघेणी स्पर्धा दिसून येते. उद्योग,
वेबसाईट आणि ब्लॉग,
व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्रातही स्पर्धा पाहायला मिळते. तुमचा उद्योग, व्यवसाय मोठा असो ट्विटरसाठी लेखन
की छोटा स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर गरज असते ती आपले उत्पादन, आपले नाव
लोकांपर्यंत पोहचवण्याची आणि यासाठी आपण आपल्या व्यवसायाची जाहिरात करतो. NOTES
जसे की वृत्तपत्रे, नियतकालिके, फ्लेक्स, बॅनर लावणे, पॅम्प्लेट छापणे, टी.व्ही., रेडिओ
यांसारख्या जाहिरात माध्यमातून आपण आपल्या व्यवसाय उत्पादनाची जाहिरात करत
असतो. हे सर्व मार्ग खर्चीक तर असतातच पण यांचा प्रभाव हा अल्पकाळासाठीच पडतो.
थोडक्यात सर्व माध्यमे मर्यादित असतात. मात्र वेबसाईटचे तसे नाही. कारण मुळातच
वेबसाईट बनविण्याचा खर्च आपल्या कुवतीनुसार कमी व खिशाला परवडणारा असतो व
इतर माध्यमांपेक्षा वेबसाईटवर आपल्याला अधिक माहिती देता येते. आपण आपल्या
मनाप्रमाणे वेबसाईट बनवू शकतो. इंटरनेटवर आपल्या व्यवसायाची प्रतिमा दाखवू शकतो.

२.१.५ वेबसाईटचे प्रकार


१९९१ साली पहिली वेबसाईट चालू झाली. ‘टीम बर्नर्सली’ यांनी ही वेबसाईट चालू
केली ती आजतागायत सुरूच आहे. आज जवळजवळ १.७ अब्ज ऑनलाईन वेबसाईट
आहेत, ज्या आपल्याला आपल्या विविध कामांसाठी, अभ्यासासाठी वेगवेगळ्याप्रकारची
माहिती पुरवत असतात. परंतु वेबसाईटची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने
‘कोणत्या प्रकारची वेबसाईट आणि रचना प्रत्यक्षात आपल्या कामासाठी येईल’ याविषयी
प्रचंड गोंधळ घालतात.
त्यामुळे या गोंधळातून सुटण्यासाठी व योग्य त्या वेबसाईटचा वापर करून योग्य ती
माहिती (ज्ञान) आत्मसात करण्यासाठी आपल्याला वेबसाईटच्या प्रकारांचे ज्ञान असणे
अत्यंत आवश्यक आहे. ‘एक विद्यार्थी, एक शिक्षक, एक व्यावसायिक, एक अर्थतज्ज्ञ,
एक समाजसेवक म्हणून आपल्याला नेमकी कोणत्या प्रकारची वेबसाईट कामी येईल’.
याविषयी माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे नेमके वेबसाईटचे कोण-कोणते प्रकार
आहेत व ते आपल्याला कोण-कोणत्या प्रकारची माहिती देऊ शकतात याविषयी आपण पुढे
जाणून घेऊ.

• वेबसाईटचे प्रकार पुढीलप्रमाणे


वेबसाईटचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात.
१) स्टॅटिक वेबसाईट
२) डायनॅमिक वेबसाईट

१) स्टॅटिक वेबसाईट :- Static वेबसाईटला ‘स्थिर वेबसाईट’ असे म्हणतात. या


प्रकारामध्ये वेबसाईटची बनावट ही स्थिर स्वरूपात असते. Static वेबसाईट मधील वेब
पेजेसचा HTML कोड हा वेब सर्व्हरमध्ये साठवलेला असतो. वेबसाईटवर येणाऱ्या प्रत्येक
व्यक्तीसाठी वेबसाईट ही सारखीच दिसते. Static वेबसाईटला वेब प्रोग्रॅमिंग किंवा डेटा
बेस डिझाईनची गरज नसते. Static वेबसाईट हा वेबसाईट सर्वात मूळचा भाग असतो
आणि हा बनवायला सोपा असतो. Self-Instructional
छोट्या वेबसाईटसाठीStatic वेबसाईट वापरणे उत्तम असते आणि जर मोठी वेबसाईट Material 133
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन बनवायची असेल तर dynamic वेबसाईट बनवावी लागते. तर आता आपण dynamic
वेबसाईट काय असते हे पाहुयात.
NOTES
२) डायनॅमिक वेबसाईट :- Dynamic वेबसाईटसाठी वेब प्रोग्रामिंग आणि डेटाबेस
डिजाईन ची गरज असते. या प्रकारच्या वेबसाईटमध्ये माहिती साठवलेली असते आणि यात
बदल होत असतो. Dynamic वेबसाईट मधील माहिती साठवण्यासाठी Content
Management System चा वापर केला जातो. जसे ब्लॉगर, वर्डप्रेस, विक्स असे काही
Content Management System आहेत. 
जेव्हा वेबसाईटला कोणी व्यक्ती भेट देतो, तेव्हा वेबसाईट त्याच्यासाठी वेगळी माहिती
दर्शवते. जसे फेसबुक प्रत्येक व्यक्तीला वेगळ्या पोस्ट दाखवते. Dynamic वेबसाईट
वापरण्याचा फायदा असा की ही हाताळायला सोपी असते आणि तोटा असा की वेबसाईट
बनवायला जास्त खर्च येतो.

या व्यतिरिक्तही वेबसाईटचे अनेक प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे :-


१. मासिक वेबसाईट:- मासिकाच्या वेबसाईटमध्ये माहिती, शैक्षणिक असे लेख,
फोटो आणि व्हिडिओ समाविष्ट आहेत. गेल्या वीस वर्षांत मासिकाचे उद्योग मुद्रण-केवळ
प्लॅटफॉर्मवरून मोठ्या प्रमाणात डिजिटल स्वरूपात बदलले आहेत. मासिक वेबसाईट
प्रकार माहितीविषयक वेबसाइट्स, विशेषत: विद्यापीठे आणि संस्था यांच्या प्रकाशनांसाठी
चांगले कार्य करते.आपण मासिकाची साईट तयार करण्याच्या विचारात असताना, मूलभूत
चौकट तयार करुन प्रारंभ करा. वापरकर्त्यांनी आपल्या मुख्यपृष्ठावर कोणत्या दिवशी
उतरले तरी एक समान लेआउट पहावा आणि प्रत्येक लेखात समान लेआउट आणि
नेव्हिगेशन असणे आवश्यक आहे. डेस्कटॉप आणि स्मार्टफोन दोन्हीवर आपली सामग्री
सहजपणे वाचनीय आहे याची खात्री करण्यासाठी विविध स्क्रीन आकारांसाठी एकूण
डिझाइन किती जबाबदार आहे हे लक्षात ठेवा. उदा.,
अर्बन ओम्निबस मासिका वेबसाईट -
अर्बन ओम्निबस बर्याच पारंपारिक मासिक लेआउटसह एक ऑनलाईन मासिक
वेबसाईट आहे. त्यांच्या वर्तमान समस्येची थीम एका नायकाच्या प्रतिमेसह आणि विशिष्ट
लेखात काय आहे त्याचे वर्णन करणार्या बॉक्ससह ठळकपणे दर्शविली जाते. वैशिष्ट्यीकृत
पोस्ट अंतर्गत मासिकातील प्रत्येक स्तंभाचे ग्रीड लेआउट आहे ज्यात प्रतिमा, शीर्षक आणि
वाचकांना प्रत्येक लेखात काय सापडते याचे संक्षिप्त वर्णन आहे.

२) ई-कॉमर्स वेबसाईट :- ई-कॉमर्स वेबसाईट एक ऑनलाईन शॉपिंग डेस्टिनेशन


आहे, जेथे वापरकर्ते आपल्या कंपनीकडून उत्पादने किंवा सेवा खरेदी करू शकतात. एक
मजबूत ई-कॉमर्स वेबपृष्ठ उत्पादने ब्राउझ करणे, श्रेणीनुसार फिल्टर करणे, विशेष विक्री
ठळक करणे आणि खरेदी करणे सुलभ करते. प्रारंभ करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे
फुल-सोल्यूशन, शॉपिफाई किंवा स्क्वेअरस्पेस सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे आपण
आपला कार्यसंघ सहजपणे ऑनलाईन यादी अद्यतनित करू शकतो आणि नवीन उत्पादनाची
यादी करू शकतो. तसेच, ही प्रणाली एकमेकांशी जोडलेली असल्याने विक्री, लॉजिस्टिक्स
Self-Instructional आणि मार्केटींग या सर्वांना काय चांगले काम करीत आहे याची माहिती दिली जाते.
Material 134 डिझाइनच्या अग्रभागावर, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर बरीच टेम्पलेट्स ऑफर केली जातात जी
वेबसाईट आणि ब्लॉग,
जवळजवळ कोणत्याही व्यवसायाच्या प्रकाराशी जुळतात. उदा., ट्विटरसाठी लेखन
फ्लिपकार्ट ईकॉमर्स वेबसाईट -
फ्लिपकार्ट अनेक प्रकारची उत्पादने विकतो, म्हणजे त्यांच्या मुख्यपृष्ठावर बर्याच वस्तू NOTES
वैशिष्ट्यीकृत असतात. ते आयटम विशिष्ट श्रेणींमध्ये कसे मोडतात हे लक्षात घ्या परंतु
त्यांच्या मुख्यपृष्ठावर दिवसाचे हायलाइट केलेले सौदे देखील ऑफर करतात. प्रत्येक
प्रतिमा व्यावसायिक आहे असे स्पष्टपणे दर्शवितात, पृष्ठाच्या सुरुवातीस उत्पादनाविषयी
थोडक्यात वर्णनही असते, उत्पादनांच्या पृष्ठावरील अधिक तपशीलांसह.

३) पोर्टफोलिओ वेबसाईट :-एक पोर्टफोलिओ वेबसाईट सर्जनशील व्यावसायिकांना


त्यांच्या उत्कृष्ट कार्याचे प्रदर्शन करण्यासाठी एक स्थान प्राप्त करून देते. हे कलाकार,
लेखक, डिझाइनर, चित्रपट निर्माते, फर्निचर बिल्डर्ससाठी योग्य आहे. तसेच त्यांना या
क्षेत्रातली अधिक माहितीही प्राप्त करून देण्यास मदत करते.
आपण पोर्टफोलिओ तयार करता तेव्हा आपण कधीही काम केलेला प्रत्येक प्रकल्प
जोडण्याची आवश्यकता नाही. त्याऐवजी, आयटमची श्रेणी तयार करण्यावर लक्ष केंद्रित
करा आणि प्रत्येक प्रवर्गातील सर्वोत्कृष्ट कार्य हायलाइट करा. एक पोर्टफोलिओ वेबसाईट
स्वभावाने थोडी अधिक सर्जनशील आहे, म्हणूनच अनन्य लेआउट्स वापरण्याची आणि
रुचीपूर्ण वैशिष्ट्ये जोडण्याची ही जागा आहे. उदा.,
गॉटीयर मेलार्ड पोर्टफोलिओ वेबसाईट -
डिझायनर गॉटीयर मेलार्डसाठी ऑनलाईन पोर्टफोलिओ ही सर्जनशीलता आणि उत्कृष्ट
प्रकल्प हायलाइट्सचे परिपूर्ण मिश्रण आहे. वापरकर्ता पृष्ठ खाली स्क्रोल करीत असताना,
भिन्न प्रतिमा हायलाइट केल्या जातात. कोणत्याही प्रतिमेवर क्लिक करा आणि आपल्याला
प्रकल्पावरील जाहिरात मोहिमा दिसतील. आपल्याला डिझायनरबद्दल अधिक जाणून
घेण्याची इच्छा असल्यास, वरच्या उजव्या कोपर्यातील नेव्हिगेशन बटणावर क्लिक करा
आणि जाणून घ्या की तो पॅरिसमध्ये राहतो, तो कुठे अभ्यासला आहे आणि त्याने कोणत्या
प्रकल्पांवर काम केले आहे.

४) सोशल मीडिया वेबसाइट्स :-सोशल मिडीयावर जवळपास 2.77 अब्ज लोक


व डझनभर वेगवेगळे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. आपले लक्ष्यित प्रेक्षक कोण आहेत याची
पर्वा नाही, आपण त्यांना कदाचित फेसबुक किंवा ट्विटर किंवा इंस्टाग्राम किंवा स्नॅपचॅट
किंवा लिंक्डइनवर शोधू शकाल. आपण स्वत: प्लॅटफॉर्मचे पुन्हा डिझाइन करू शकत
नसले तरीही आपल्याकडे आपल्या पृष्ठाच्या स्वरूपाचे काही नियंत्रण आहे आणि आपण
अशी सामग्री तयार करू शकता ज्यामुळे सोशल मीडिया सामायिकरणे तयार होतील.
आपल्या सर्व सोशल मीडिया पृष्ठांवर आणि वेब पृष्ठांवर निरंतर लक्ष द्या, जेणेकरून
पृष्ठामागे आपला ब्रँड आहे हे वापरकर्त्यांना त्वरित कळेल. समान लोगो आणि रंग निवडी
वापरा. एक विशिष्ट आवाज आणि व्यक्तिमत्त्व निवडा जे सर्व सामग्रीवर चमकत असेल.
सामग्री तयार करताना, मनोरंजक व्हिडिओ, इन्फोग्राफिक्स, मेम्स, सखोल अहवाल आणि
विनामूल्य ऑफर यासारख्या सोशल मीडियावर सामायिक होण्याची उच्च क्षमता असलेल्या
गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. या सर्वगोष्टी जर आपण करत नसू, तर या गोष्टी शिकण्यासाठी
आपल्याला सोशल मीडिया या वेबसाईट कसा उपयोग होऊ शकतो. याचे एक उदा., Self-Instructional
Material 135
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन न्यूटेला फेसबुक सोशल मीडिया वेबसाईट -
न्यूटेलाच्या फेसबुक पृष्ठामध्ये सामग्रीचे एक मनोरंजक मिश्रण दर्शविले गेले आहे जे
NOTES सर्व एकंदर रंग पॅलेट आणि ब्रँडच्या देखाव्यासह संरेखित करते. त्यामध्ये “आज, मी माझा
न्यूटेला सामायिक करीन” यासारख्या सोशल मीडियासाठी खास बनवलेल्या मेम्स
वैशिष्ट्यीकृत आहेत, तथापि, त्यांचे उत्पादन अद्वितीय मार्गाने कसे वापरावे यासाठी
व्हिडिओ आणि कल्पना देखील देतात. त्यांच्या वेबसाईटवर सोशल मीडिया बटणे देखील
कशी वैशिष्ट्यीकृत करतात ते लक्षात ठेवा जेणेकरुन वापरकर्ते त्यांना भिन्न प्लॅटफॉर्मवर
सहजपणे शोधू शकतील.

५) निर्देशिका आणि संपर्क पृष्ठे :-निर्देशिका किंवा संपर्क पृष्ठ असे एक स्थान
आहे जेथे वापरकर्ते आपल्याशी किंवा इतरांशी संपर्क साधू शकतात.जेव्हा आपल्याला
संस्थेमधील व्यवसाय किंवा लोकांच्या भांडारांची यादी करायची असते तेव्हा या प्रकारची
वेबसाईट चांगली कार्य करते. उदाहरणार्थ, स्थानिक रेस्टॉरंट निर्देशिका मध्ये मेनू, किंमतीची
श्रेणी, फोन नंबर आणि पुनरावलोकने असलेले खाद्यपदार्थ आहेत. संस्थेचे स्वरूप निर्देशिका
वेबसाईटसाठी संधी तयार करते. उदाहरणार्थ, शहरातील स्थानिक दंतचिकित्सकांची एक
संघटना प्रत्येक सदस्याची यादी करू शकते, त्यांचे कौशल्य क्षेत्र आणि त्यांची संपर्क
माहिती ही इतरांसाठी कामी येऊ शकते.
मानता निर्देशिका वेबसाईट -
मानता एक व्यवसाय निर्देशिका आहे जी स्थानावर आधारित लहान व्यवसाय दर्शविते.
कीवर्ड शोध क्षमतेव्यतिरिक्त, साईट रेस्टॉरंट्स, कंत्राटदार आणि डॉक्टर यासारख्या क्षेत्रात
श्रेणी ब्राउझिंग प्रदान करते. कंपन्या निर्देशिकेत प्रवेश जोडू शकतात आणि जाहिरातींद्वारे
साईट पैसे कमवू शकते.

६)वेब पोर्टलवेबसाईट :- वेब पोर्टल म्हणजे एका विशिष्ट प्रकारचे ग्राहक किंवा
वापरकर्ते एकत्र येऊन अशा प्रकारची वेबसाईट वापरत असतात. जसे की कॉलेज, शालेय
पोर्टल, बी.एस.एन.एल.चे पोर्टल, एच.पी. गॅसचे पोर्टल इ.

७) प्रॉडक्ट रिव्हिऊ वेबसाईट :- या प्रकारच्या वेबसाईट ह्या फक्त नवनवीन उत्पादने


व त्यांच्याबद्दल ग्राहकांच्या काय प्रतिक्रिया आहेत. या प्रकारच्या माहितीने भरलेल्या
असतात. अशा प्रकारच्या वेबसाईटचा उपयोग जर तुम्हाला काही खरेदी करायची असल्यास
ते खरेदी करण्यापूर्वी खूप चांगला उपयोग होतो. मेक माय ट्रिप (www.makemytrip.
com), झोमॅटो (www.zomato.com), ट्रिप अँडव्हायझर डॉट.कॉम (www.
tripadvisor.com) या अशा काही वेबसाईट्स आहेत त्या आपल्याला रिव्हिऊ आणि
रेटिंग सांगत असतात. त्या वेबसाईट वाचून आपल्याला पाहिजे असलेली माहिती मिळते,
कळते. तसेच ऑनलाईन बुकिंग आणि भरघोस सूट सुद्धा मिळवता येते.

८) कंपनी/कॉर्पोरेट वेबसाईट :- या प्रकारात मोडणाऱ्या वेबसाईट शक्यतो प्रायव्हेट


कंपनीच्या असतात. या प्रकारच्या वेबसाईटवर कंपनीबद्दलची संपूर्ण माहिती जसे की,
Self-Instructional कंपनीची स्थापना, मॅनेजमेंट, कंपनीची उत्पादने, कंपनीची वार्षिक उलाढाल, कंपनीविषयी
Material 136 बातम्या इ. माहिती दिलेली असते.
वेबसाईट आणि ब्लॉग,
९) डिस्कशन फोरम (चर्चा गट) :- डिस्कशन फोरम हे विशिष्ट विषयावर किंवा ट्विटरसाठी लेखन
एकत्रित विषयावर चालू असणारी लिखित स्वरूपातील वेबसाईट असते. हे फोरम दोन
प्रकारचे असतात. एक म्हणजे खाजगी व दुसरे म्हणजे सार्वजनिक. खाजगी फोरम हे एका NOTES
विशिष्ट कंपनीचे किंवा कंपनीच्या ग्राहकांसाठी असतात. ज्याद्वारे ग्राहकांच्या विविध सूचना,
प्रश्नांवर चर्चा लिखित स्वरूपात केलेली असते. सार्वजनिक फोरम हे सर्वांसाठी खुले
असते. त्यामध्ये वापरकर्ते त्यांचे अनुभव लिखित स्वरूपात कळवतात. एखादा विषय घेऊन
त्यावर चर्चा केली जाते.

१०) क्लासिफाइड वेबसाइट्स :- क्लासिफाइड म्हणजे जाहिरात आपण ज्याप्रमाणे


घर घेण्यासाठी वर्तमानपत्र वाचतो. वर्तमानपत्रात जाहिरातीसाठी विशेष पान असते.
त्याचप्रमाणे इंटरनेटवर या जाहिराती देण्यासाठी क्लासिफाइड वेबसाइट्स असतात.
उदाहरणार्थ ओ.एल.एक्स.इन (www.olx.in) अशा प्रकारच्या अनेक वेबसाईट इंटरनेटवर
उपलब्ध आहेत. या वेबसाईटवर मोबाईलपासून घरापर्यंत सर्वकाही विकत घेता येते व
विकता येते.

११) व्हिडिओ वेबसाईट :- आपल्या आयुष्यात अनेक सुखाचे क्षण येत असतात. हे
क्षण जतन करून ठेवण्यासाठी फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्ड करून आपण ठेवतो. जसे की
युट्यूब कॉम. (www.youtube.com) या व्हिडिओ वेबसाईटवर आपण व्हिडिओ
अपलोड करू शकतो. इतर वापरकर्त्यांनी अपलोड केलेले व्हिडिओ पाहू शकतो. या
वेबसाईडचा वापर उत्पादनाची माहिती, चित्रपट, गाणी, पर्यटन स्थळे इ. विषयी व्हिडिओ
स्वरूपात मिळते.
वरील प्रमाणे वेबसाईटचे महत्त्वपूर्ण प्रकार आपल्याला पाहावयास मिळतात.

• स्वत:ची वेबसाईट कशी तयार कराल?


स्वतःची वेबसाईट बनविणे एकदम सोपे झाले आहे. तथापि, वेबसाईट बनविण्यापुर्वी
तुम्हांस पुढीलप्रमाणे काही पूर्वतयारी करावी लागेल.
१. (http:/www.gmail.com) वर जाऊन एक ई-मेल अकाउंट तयार करायला
लागेल. वेबसाईट बनवताना इमेल अकाउंटचा उपयोग होतो.
२. वेबसाईटमध्ये (यामध्ये कोणता मजकुर प्रसिद्ध करायचा ?) हे प्रथम कागदावर तयार
करावे. म्हणजे वेबसाईट प्रसिद्ध केल्यानंतर त्यात काय पाहायला मिळेल, हे ऐन वेळी
ठरवावे लागत नाही.वेबसाईट वर काय प्रकाशित करावे हे ठरवता येत नसेल तर त्यासाठी
इंटरनेटवरील काही वेबसाईटवर तयार असणारे लेख आपण वापरू शकतो.
लेखाचा विषय निवडताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी लागेल -
• बेकायदेशीरव्यवसायांची प्रसिध्दी होऊ नये.
• इतरांची कल्पनाकॉपी करू नये.
• क्षुल्लक गोष्टीची जाहिरातबाजी करू नये.
• कोणावरही टीका- टिप्पणी करणारा मजकूर असू नये.
• अश्लील बाबींचे प्रदर्शन होऊ नये. Self-Instructional
• कसल्याही प्रकारचे व्यसन करण्यास प्रोत्साहन मिळू नये. Material 137
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन • वेबसाईट तयार करणे.
NOTES वेबसाईट तयार करण्यासाठी प्रथम http://www.blogger.com/ ही वेबसाईट
उघडावी. यामध्ये लाल रंगाने चौकोन केलेल्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक ती माहिती
भरावी लागेल किवा केवळ क्लिक करायला लागेल. ती माहिती खालील दृश्यांमध्ये दिली
आहे. ती पुढीलप्रमाणे:-
१) या ठिकाणी हिन्दी असे निवडावे, म्हणजे वेबसाईट तयार करण्यासाठीची सर्व माहिती
हिंदीमधुन दिसू लागेल.

२) येथे Gmail.com मध्ये तयार केलेला इ-मेलचा पत्ता व त्याचा पासवर्ड टाइप करा.

१) येथे क्लिक करा, म्हणजे तुम्ही साइन इन व्हाल. म्हणजेच वेब साईट बनविण्याची
प्रक्रिया सुरु होईल.

आता तुम्हाला खालीलप्रमाणे दृश्य दिसेल.


१. येथे तुमचे नाव टाईप करावे
२. क्लिक करा.

Self-Instructional
Material 138
३. वेबसाईटवर प्रसिद्ध करावयाच्या विषयास अनुसरून ब्लॉग (शीर्षक) येथे टाइप वेबसाईट आणि ब्लॉग,
करावे. ट्विटरसाठी लेखन
४. तुम्हाला हवा असणारा तुमच्या वेबसाईटचा पत्ता येथे तयार करावा लागतो, त्यासाठी
एखादा शब्द किंवा शब्दसमूह येथे टाईप करा. शब्दांमध्ये स्पेस सोडू नये. समजा तुम्ही येथे NOTES
‘myblog’ असे टाईप केले, तर तुमच्या वेब साईटचा पत्ता http://www.myblog.
blogspot.com/ असा होईल.
तुम्ही टाइप करत असलेला शब्दसमूह अगोदर इतर कोणी वापरला नसेल, तरच
तुम्हाला त्या नावाचा पत्ता मिळतो, अन्यथा हा पत्ता उपलब्ध नाही, असे सांगितले जाते.
यासाठी या पर्यायाच्या खाली दिलेला "उपलब्धता जाँचे" हा पर्याय वापरुन तुम्ही टाइप
केलेला पत्ता उपलब्ध आहे की नाही, हे प्रथम तपासावे. नसेल तर दुसरा शब्दसमूह टाइप
करावा लागेल.

३) क्लिक करा.

१. (टेम्पलेट्स) यासाठी तयार डिझाइन्स दिलेले आहेत. येथे वेबसाईटची रंगसंगती


निश्चित केली जाते. यातील एक टेम्पलेट निवडा.

अशा पद्धतीने तुमची वेबसाईटतयार झालेली आहे. पण त्यामध्ये कसल्याही प्रकारचा


मजकुर प्रसिद्ध झालेला नाही. वेबसाईटमध्ये मजकूर प्रसिद्ध करण्यासाठी तुम्हाला "ब्लॉगिंग
आरंभ करे" वर क्लिक करावे लागेल.
मॉनिटरच्या स्क्रीनवर पुढीलप्रमाणे दृश्य दिसेल.

Self-Instructional
Material 139
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन

NOTES

१) वेबसाईट मध्ये प्रसिद्ध करावयाच्या मजकुराचे शीर्षक येथे टाईप करावे.


२) प्रत्यक्ष मजकूर येथे टाइप करून वर दिलेल्या फॉरमॅटींग टूल्सच्या साहाय्याने त्याचे
फॉरमॅटींग करावे.
३) टाईप केलेला मजकुर वेबसाईटमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी येथे क्लिक करावे.
आता खालीलप्रमाणे दृश्य स्क्रीनवर दिसू लागेल.

१. आता जर तुम्हाला (वेबसाईट कशी दिसते, हे पाहायचे असेल तर येथे नवीन विंडो
चालू होऊन त्यामध्ये तुमची वेबसाईट दिसू लागेल.
२. वेब साईटवर प्रसिद्ध केलेल्या मजकुरामध्ये बदल करायचा असेल तर येथे क्लिक
करा. आवश्यक ते बदल केल्यानंतर पुन्हा वर क्लिक करावे. “पोस्टप्रकाशित करे” वर
क्लिक करावे.
३. वेब (साईटमध्ये जर मराठी किंवा हिंदी मजकुर प्रसिद्ध करायचा असेल, तर त्याबद्दल
माहिती समजून घेण्यासाठी येथे क्लिक करावे.
तुमची वेबसाईट तयार झाली आहे, पण त्यामध्ये अजुन अॅडसिन्स प्रसिद्ध
केलेल्या नाहीत.

• गुगलवर मोफत वेबसाईट कशी बनवू शकता?


पुढील पायऱ्यांनुसार तुम्ही मोफत वेबसाईट बनवू शकतात.
Self-Instructional
Material 140 i) सर्वप्रथम गुगलवर www.wix.comया वेबसाईट जावे.
वेबसाईट आणि ब्लॉग,
ii) तेथे सर्वप्रथण START NOW वर क्लिक करावे. ट्विटरसाठी लेखन

iii) त्यानंतर तिथे आपली माहिती भरावी. ज्यात आपला ई-मेल अॅड्रेस, पूर्ण नाव, फोन NOTES
नं. याप्रकारची माहिती येत असते.

iv) ही सर्व माहिती भरली गेल्यानंतर तिथे आपल्याला अनेक प्रकारांचे पर्याय येतात.
जसे, व्यावसायिक, वैयक्तिक, डिजायनर, ब्लॉग, गाणे, कार्यक्रम इ. येत असतात.

v) यातून आपल्याला आपल्या कामासाठी ज्या प्रकारची वेबसाईट उपयोगाची असेल


त्या प्रकारची निवड करायची आहे.

vi) या वेबसाईटची स्वतःची अशी कृत्रिम बुद्धिमत्ताही (Artificial Intelligence)


आहे. ज्याद्वारे आपली वेबसाईट आपोआपही तयार होऊ शकते. किंबहुना आपण ती
स्वतःही तयार करू शकतो.

vii) यानंतर यातही वेगवेगळे असे टॅम्प्लेट असतात, ज्यात व्यावसायिक, शैक्षणिक,
मनोरंजन इ. असतात. त्यातील आपण आपल्याला हवा तो टॅम्प्लेट निवडू शकतो.

viii) त्यानंतर ‘सुरू करा’वर क्लिक करावे.

ix) नंतर वेबसाईटच एक प्रतिरूप येईल. ज्यात आपल्याला हवे तसे बॅकग्राउंड बदलणे,
प्रोफाइल फोटो बदलणे, साईज बदलणे इ. बदल करू शकतो.

x) त्यानंतर प्रोफाइल फोटो वगैरे लावल्या गेल्यावर aboutme मध्ये तुम्ही


तुमच्याविषयी माहिती देऊ शकतात.

xi) त्यानंतर तुम्ही त्यात तुमचे गुण-कौशल्यही लिहू शकतात.

xii) त्यानंतर Contact me मध्ये तुम्ही तुमचा फोन नं., पत्ता, इ. गोष्टी देऊ
शकतात. ज्याच्या मदतीने तुमच्या वेबसाईटवर कोणाला काही अडचणी येत असेल तर
ते थेट तुमच्याशी संवाद साधून त्या दूर करू शकतात.
या प्रकारे तुमची फार कमी वेळेत व विनामूल्य स्वतःची वेबसाईट तयार झालेली
असेल. तुम्ही नंतर काळानुसार तिच्यात सुधारणाही (Update) करू शकतात.

• व्यावसायिक वेबसाईट तयार करण्यासाठी पुढील मुद्यांचा


विचार करू या –
१. आपल्या ब्रँडची रणनीती बनवणे :- आपले प्रथम कार्य तपशीलवार ब्रँडिंग
धोरण तयार करणे आहे. आपल्यास साईटचा उद्देश, हेतू, मार्गदर्शित व्हिज्युअल, Self-Instructional
तत्वज्ञानाविषयी किंवा व्हॉईसची एक ठोस कल्पना येण्यापूर्वी आपण वेबसाईट तयार करणे, Material 141
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन प्रारंभ करणे योग्य ठरत नाही. आपण पुढील गोष्टींचा पाठपुरावा करीत असताना या सर्व
गोष्टी आपल्यासाठी स्पष्ट झाल्या पाहिजेत:
NOTES • आपल्या लक्ष्यपूर्तीची बाजारपेठ ओळखा:- ते कोण आहेत?ते कोणत्या
लोकसंख्याशास्त्रीय गटाचे आहेत? त्यांना काय करायला आवडेल? ते स्वत: ला
कसे पाहतील?आपला व्यवसाय किंवा वेबसाईट त्यांच्या जीवनावर कसा प्रभाव
पाडेल?
• आपल्या प्रतिस्पर्धींवर संशोधन करा :- स्पर्धा काय करीत आहे, त्यांची शक्ती आणि
दुर्बलता काय आहे आणि आपण क्षेत्रात स्वत:ला कसे बनवू शकाल. याबद्दलच्या
भावना जाणून घेण्यासाठी बाजारपेठ संशोधन करा.
• आपली ब्रँड ओळख परिभाषित करा :-आपण आपल्या ब्रँडचे वर्णन तीन शब्दांत
करायचे असल्यास ते काय होते? आपल्या ब्रॅंडला प्रेरणा देणारी दृष्टी काय आहे?
आपल्या ब्रँडच्या व्यक्तिमत्त्वाचा विचार करा आणि त्यातून ब्रँड रंग, शब्दसंग्रह आणि
शैली यासारखे मूर्त गुण मिळवा.
• सुसंगत ब्रँडिंग सामग्री तयार करा :-आता आपल्या साईटवर आणि आपल्या इतर
ब्रँडिंग मालमत्तेवर वैशिष्ट्यीकृत सामग्री तयार करण्याची वेळ आली असेल. आपला
स्वत:चा लोगो तसेच प्रतिमा, घोषणा, व्हिडिओ, मजकूर सामग्री आणि बरेच काही
आपण येथे तयार करू शकतो. हे घटक आपल्या ब्रँड ओळखीशी संबंधित असले
पाहिजेत आणि आपला ब्रँडिंग रणनीती सादर करतील असेच असावे.

२) डिझाइनकडे जा :-योग्य वेबसाईट रंग योजना निवडण्यापासून आपल्या साईटसाठी


योग्य लेआउट तयार करण्यापर्यंत, वेबसाईट डिझाइनमध्ये लक्षात घेण्यासारखे बरेच घटक
आहेत. जर आपल्याला आधीच विक्स वेबसाईट कशी तयार करावी हे माहीत असेल आणि
मागील अनुभव असेल तर आपण रिक्त कॅनव्हासपासून आपली साईट तयार करू शकता
किंवा आपण त्याऐवजी इच्छित असल्यास, आपण व्यावसायिक डिझाइन केलेले टेम्पलेट
निवडू शकता जे आपल्या डिझाइनचा आधार म्हणून कार्य करेल. आपण पुढील पायऱ्या
निवडल्यास आपण तीन सोप्या चरणांमध्ये व्यावसायिक वेबसाईट तयार करण्यास सक्षम
असाल.
• एक टेम्प्लेट निवडा :- वेबसाईटटेम्प्लेट आपल्याला आपल्या साईटच्या डिझाइनसाठी
एक भक्कम पाया देते. Wix थीम, शैली आणि हेतूंच्या श्रेणीसाठी व्यावसायिक
वेबसाईट टेम्प्लेट्सची विस्तृत निवड प्रदान करते. आपण एखादी वैयक्तिक वेबसाईट
तयार करत असाल तर, ऑनलाईन स्टोअर किंवा इतर कोणत्याही प्रकारची साईट,
आपल्या दृष्टीस अनुकूल असलेले टेम्प्लेट शोधा. नंतर, आपण निवडलेल्या
आधीपासूनच्या आपल्या गरजा आणि आपल्या ब्रँडिंग धोरणाच्या अनुरूप रचना
दिली जाईल.
• आपले टेम्पलेट सानुकूलित करा :- एकदा आपले हृदय एखाद्या टेम्प्लेटवर सेट
झाल्यानंतर सानुकूलित आणि संपादन करून ते आपल्या स्वतःच्या साईटवर
बदलण्याची वेळ आली आहे. मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ, दुवे आणि ऑडिओयांसह
आपल्या सर्व सामग्रीमध्ये जोडा. पुढे, रंगसंगती, पृष्ठ क्रम, आकार, फॉन्ट निवड
Self-Instructional आणि बऱ्याच इतर बाबींसह आपला ब्रॅंड फिट करण्यासाठी डिझाइन परिष्कृत करा.
Material 142 आपले सानुकूलित करणे आपल्याला पाहिजे तितके मूलभूत किंवा विस्तृत असू
वेबसाईट आणि ब्लॉग,
शकते. प्रेरणेसाठी, तीन भिन्न टेम्प्लेट्समधून तयार केलेल्या स्ट्राइकिंग विक्स ट्विटरसाठी लेखन
वेबसाईटच्या या निवडीवर एक नजर टाका. मूळ टेम्पलेट्स अद्वितीय, वैयक्तिकरीत्या
डिझाइन केलेल्या साइट्सच्या परिणामी कसे तयार केले गेले आहेत ते पहा. NOTES
• देखावा चिकटवा :- फक्त सर्वोत्तम फॉन्ट, रंग आणि प्रतिमा निवडण्यासोबत वेबसाईट
तयार करण्यामध्ये बरेच काही आहे. आपल्या एकूण वेबसाईटचे सौंदर्य वाढविण्यासाठी
आपण विविध माध्यम वैशिष्ट्यांचा समावेश करू शकता. आपल्या हालचालीसांठी
आपल्या वेबसाईट डिझाइनमध्ये पार्श्वभूमी व्हिडिओ किंवा अॅनिमेशन इ. जोडण्याचा
प्रयत्न करा.

३) उपयोजनला प्राधान्य द्या :- आपल्या वेबसाईटवर कोणत्याही संभाव्य ग्राहकाचे


लक्ष वेधून घेणे आवश्यक आहे, तसेच आपल्या ग्राहकाला/वापरकर्त्याला सकारात्मक
अनुभव देखील प्रदान करणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे आपण आपली व्यावसायिक
वेबसाईट तयार करताना खालील महत्त्वपूर्ण मुद्द्यांकडे लक्ष द्यावे.
• नॅव्हिगेशन फ्लो :-इष्टतम वेबसाईट नेव्हिगेशनसाठी, साईटची रचना स्पष्ट आणि
अंतर्ज्ञानी असल्याचे सुनिश्चित करा. अभ्यागत मुख्य मेनू किंवा अंतर्गत दुवे वापरून
पृष्ठे आणि उपपृष्ठांमध्ये सहजपणे नेव्हिगेट करण्यास सक्षम असतील असे असावे.
• सामग्री श्रेणीक्रम: पदानुक्रम हे डिझाइनच्या सात तत्त्वांपैकी एक आहे, म्हणूनच
आपण त्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. आपल्या साईटवर अभ्यागतांना आपल्या
स्वारस्याच्या क्रमाने योग्य प्रकारे मार्गदर्शन करणे हा आपला हेतू आहे.
• आपल्या वेबसाईट लेआउटची योजना आखत असताना, सर्वात महत्त्वपूर्ण पैलू सर्वात
प्रमुख असल्याचे सुनिश्चित करा. पृष्ठावर आकार, रंग आणि प्लेसमेंटद्वारे सर्वात
महत्वाच्या घटकांवर जोर देऊन, आपल्या डिझाइनमध्ये हे श्रेणीक्रम प्रतिबिंबित करा.
उदाहरणार्थ, आपण लोकांना आपल्या सेवेची सदस्यता घेऊ इच्छित असल्यास
पृष्ठावरील आपले "सदस्यता घ्या" बटण उभे असल्याचे सुनिश्चित करा.
• कॉल-टू-अॅक्शन :- सीटीए हे एक लहान संदेश आहेत जे साईट अभ्यागतांना थेट
कारवाईसाठी आमंत्रित करतात. ते अभ्यागतांना "विनामूल्य नोंदणी करा," "आजच
आपले व्हा" किंवा "सदस्यता घ्या" यासाठी प्रोत्साहित करू शकतात.थोडक्यात,
त्यांनी अभ्यागतांना आपण काय करावे असे स्पष्टपणे सांगितले आणि बटणावर
क्लिक केल्यावर काय होईल यावर विश्वास ठेवणे त्यांना सुलभ करते.
• वाचनीयता :- आपली सामग्री व्यावहारिकदृष्ट्या अयोग्य असेल तर वेबसाईट
असण्यात काय अर्थ आहे? वाचनीयता हे टायपोग्राफीचे एक मूलभूत तत्त्व आहे.
स्पष्ट मजकूर आणि आरामदायक फॉन्ट आकार वापरला आहे याची खात्री करुन
घ्या, तसेचमजकूर रंग पार्श्वभूमीच्या रंगांपेक्षा चांगले आहे आणि आपल्या लेखी
सामग्रीच्या आसपास रिक्त जागा (“व्हाइटस्पेस”) आहे.
• तळटीप (फूटर) :- आपल्या साईटच्या तळाचा भाग वेबसाईट तळटीप म्हणून
ओळखला जातो (शीर्षस्थानी “शीर्षलेख” आहे).साईटवरील अभ्यागतांना त्वरित
तळटीप दृश्यमान नसते, परंतु त्यांचा उपयोगिता वर्धित करण्यासाठी अनेक मार्गांनी
वापरले जाऊ शकते.फुटरवर आपली संपर्क माहिती जोडण्याचा विचार करा, सोशल
मीडिया चॅनेलशी दुवा साधणार्या बटणासह. आपण आपल्या सर्व पृष्ठांवर दुवा Self-Instructional
साधणारी सोपी साईट, नकाशा तसेच आपण कोण आहात याबद्दलचे स्पष्टीकरण Material 143
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन किंवा साईट अस्वीकरण मजकूर देखील प्रदर्शित करू शकता.

NOTES ४) शोध इंजिनची तयारी करा :-आपल्या रहदारीस (वापरकर्ते) वाढवण्याचा सर्वात
मौल्यवान मार्ग म्हणजे आपल्या शोध परिणामांवर आपली साईट मिळवणे.यासाठी आपली
साईट तयार करण्याच्या सुरुवातीच्या काळात Search Engine Optimization
(C.E.O) विचारात घेणे महत्त्वाचे आहे. ऑनलाईन विपणनाचा एक महत्त्वाचा भाग,
एसईओ हे स्वतः एक विज्ञान आहे. त्याचे मुख्य घटक पुढीलप्रमाणे आहेत.
• कीवर्ड संशोधन :- आपल्या संभाव्य साईट अभ्यागत किंवा क्लायंटच्या भूमिकेमध्ये
स्वत:ला ठेवा. ते Google वर कोणते प्रश्न किंवा वाक्ये शोधतील जे त्यांना
आपल्या वेबसाईटवर घेऊन जाऊ शकतात?त्यांच्या शोध क्वेरीमधील कीवर्ड आपल्या
एसईओ धोरणाला मार्गदर्शन करतील. कीवर्ड रिसर्च टूल्सचा वापर करून, आपण
कोणत्या कीवर्डला लक्ष्य केले पाहिजे यावर आपण माहिती देण्यास सक्षम असाल.
• मजकूर :- आपल्या मेनूपासून आपल्या सामान्य प्रश्न, पृष्ठ, ब्लॉग, फूटर किंवा
बायो सेक्शनपर्यंत आपल्या वेबसाईटवरील प्रत्येक मजकुराचे एसईओ लक्षात घेऊन
लिहिले जावे.आपल्या वेबसाईटला चालना देण्यासाठी एसईओच्या अनेक टिप्स
असताना, गुणवत्तेवर कोणतीही तडजोड न करता आपल्या कीवर्डला आपल्या
साईटच्या मजकूर सामग्रीमध्ये समाकलित करण्यासाठी सूक्ष्म आणि मोहक मार्ग
शोधणे ही सामान्य कल्पना आहे. शोध इंजिन क्रॉलर हुशार आहेत आणि जर
आपल्याला एखाद्या जाहिरातीसारखे वाटत असेल तर ते आपल्याला खाली स्थान देऊ
शकतात.
• मेटा टॅग :-Google सारख्या शोध इंजिनने आपला मेटाडेटा वाचला. ते काय
पाहतात ते काय आहे आणि ते शोध परिणामांमध्ये आपली साईट कशी सादर करतात
यावर नियंत्रण ठेवणे आपल्यावर अवलंबून आहे. आपली सामग्री अनुकूलित
करण्याच्या आणि आपल्या पृष्ठांमध्ये काय आहे हे शोध इंजिनला मदत करण्याच्या
उद्देशाने आपल्या साईटवर सानुकूल मेटा टॅग जोडण्यासाठी वेळ देणे चांगले आहे.
• Alt मजकूर :-आपल्या एसइओ प्रयत्नांमध्ये ‘प्रतिमा’ देखील प्रमुख भूमिका
निभावतात. आपण आपल्या वेबसाईटवर अपलोड केलेल्या प्रत्येक प्रतिमेमध्ये ‘Alt
मजकूर’ (‘पर्यायी मजकूरासाठी छोटा’) असावा. Alt मजकूर एक अतिशय लहान
ओळ आहे जी शोध इंजिनला प्रतिबिंबित करतात त्यानुसार स्पष्ट करते. त्याऐवजी हे
आपल्या प्रतिमा शोध परिणामांमध्ये ‘सापडले’ म्हणून अनुमती देते, म्हणूनच आपल्या
सर्व प्रतिमांसाठी एसईओ अनुकूल एलईडी मजकूर लिहिणे महत्त्वाचे आहे.
• दुवा इमारत :- मोकळेपणाने सांगायचे तर आपल्याकडे आपल्या साईटशी दुवा
साधणारी अन्य वेबसाईट असल्यास शोध इंजिनच्या परिणामावरील आपले रँकिंग
सुधारण्याची शक्यता आहे. आपण आपली वेबसाईट डिरेक्टरीमध्ये सबमिट करुन
आपली सर्व सोशलमीडिया प्रोफाइल आपल्या साईटशी लिंक करत असल्याचे
सुनिश्चित करुन आणि साईट अभ्यागतांना आपली सामग्री सामायिक करण्यास
प्रोत्साहित करुन प्रारंभ करू शकता.
हे लक्षात ठेवा की एसईओ ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे जी एकदा आपली
Self-Instructional वेबसाईट सुरू झाल्यानंतर समाप्त होत नाही. टिकाऊ परिणाम जिंकण्यासाठी आपल्याला
Material 144 त्यास परिष्कृत करणे आवश्यक आहे.
वेबसाईट आणि ब्लॉग,
५. आपल्या साईटला व्यावसायिक बनवा :- आपल्या व्यवसायाचा किंवा सेवेचा ट्विटरसाठी लेखन
ऑनलाईन चेहरा म्हणून काम करण्याव्यतिरिक्त, आपण स्वत:ला विचारावे की आपली
वेबसाईट आपल्या व्यावसायिक यशामध्ये आणखी वृद्धी कशी करू शकते. आपल्या NOTES
उद्योगावर किंवा क्षेत्रावर अवलंबून आपली साईट असंख्य वैशिष्ट्ये ऑफर करीत आहे जी
आपल्या लक्ष्य बाजाराला अधिक आकर्षित करेल. उदाहरणार्थ.,
• wix बुकिंग :- अपॉइंटमेंट्स ऑनलाईन बुक करण्यासाठीचा एक उत्तम उपाय जो
तुम्हाला बुकिंग घेण्यास आणि पेमेंट्स मिळविण्यात मदत करतो, तसेच आपले
वेळापत्रक अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापित करते आणि त्यांच्या सेवा सर्वोत्कृष्ट
प्रकाशात दाखवतो.
• विक्स स्टोअर्स :- ऑनलाईन स्टोअर तयार करणे आणि व्यवस्थापित करण्याचा
सर्वात सोपा मार्ग, ज्यात प्रगत विपणन साधने, सुरक्षित ऑनलाईन देयके आणि
एकाधिक विक्री चॅनेल यासारख्या व्यावसायिक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. आपण
आपली उत्पादने अत्यंत मोहक मार्गाने सादर केल्याची खात्री करण्यासाठी शेकडो
डिझाइन वैशिष्ट्ये आहेत. आपण सुरुवातीपासून आपली वेबसाईट तयार करण्यास
प्रारंभ करू शकता किंवा यापैकी ऑनलाईन स्टोअर टेम्पलेट्सपैकी एक निवडू
शकता.
• विक्स फिटनेस:- फिटनेस तज्ज्ञासाठी एक शक्तिशाली सर्वसमावेशक समाधान. प्रगत
जिम व्यवस्थापन सॉफ्टवेअर, ऑनलाईन बुकिंग आणि देयके आणि सोयीस्कर
कर्मचारी आणि वेळापत्रक व्यवस्थापन आपल्याला आपला व्यवसाय सहजतेने
चालविण्यात मदत करतात. आपण काही काळ उद्योगात आला असलात किंवा
फिटनेस व्यवसाय कसा सुरू करायचा याचा विचार करत असाल, तर हे व्यासपीठ
आपल्याला आवश्यक असलेली व्यावसायिक साधने देईल.
• विक्स म्युझिक :- संगीतकारांसाठी एक अत्याधुनिक व्यासपीठ आहे. ज्यांना त्यांच्या
संगीताची ऑनलाईन जाहिरात करण्याची इच्छा आहे, ते याद्वारे संपूर्ण सर्जनशील
स्वातंत्र्य राखून त्यांचे प्रेक्षक वाढवू शकतात. विक्स म्युझिक आपल्याला आपल्या
वेबसाईटवर आपले संगीत थेट विकण्याची आणि १००% नफा ठेवण्याची परवानगी
देते.
• अत्यावश्यक अॅप्स :- विक्स अॅप मार्केटमध्ये अॅप्सची एक मोठी निवड आहे जी
आपल्याला आपल्या वेबसाईटची जास्तीत जास्त क्षमता पूर्ण करण्यात मदत करेल.
उदाहरणार्थ, आपल्या अभ्यागत विश्लेषकांचा मागोवा घेण्याचे साधन, आपली विक्री
वाढविण्यात मदत करण्यासाठी एक काउंटडाउन टाइमर, आपल्या अभ्यागतांना
प्रभावित करण्यासाठी अत्याधुनिक मजकूर अॅनिमेशन आणि बरेच काही.

६. मोबाइल जा :- डेस्कटॉपवरील आपली वेबसाईट मोबाईलवर देखील आहे तसेच


आपली वेबसाईटकाय कार्य करते हे सुनिश्चित करणे महत्त्वपूर्ण आहे. खरे तर, ‘मोबाइल
वापर आकडेवारी’ असे दर्शविते की जगभरात वेबपृष्ठ दृश्यांपैकी ५२% मोबाइल डिव्हाइस
आहेत. इतकेच नाही तर Google ने मोबाईल-प्रथम अनुक्रमणिका लागू केल्यापासून
वेबसाईटना त्यांच्या मोबाइल आवृत्त्यांद्वारे प्राधान्याने शोध परिणामांवर स्थान दिले जाते.
स्पष्टपणे, आपल्या मोबाइल वेबसाईटचे ऑप्टिमाइझ करण्यात आपला वेळ घालवणे Self-Instructional
फायदेशीर आहे. Material 145
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन आपण Wix वापरून आपली साईट तयार करत असल्यास, मोबाइल संपादक
आपोआप आपल्या डेस्कटॉप डिझाइनला मोबाइल-अनुकूल साईटमध्ये रूपांतरित करते.
NOTES त्यानंतर आपण वाचनीयता, मजकूर आकारबदलणे आणि नेव्हिगेशनकडे विशेष लक्ष देऊन
मोबाईल डिव्हाइसेसच्या अनुरुप लेआउट आणि डिझाइन समायोजित करू शकता.
ब्रेकपॉइंट्सवर पूर्ण नियंत्रण शोधत असलेल्या वापरकर्त्यांसाठी, एडिटर एक्स हा विक्सचा
एक प्रगत क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्म आहे जो केवळ डिझाइनर आणि एजन्सीसाठी बनविला गेला
आहे. हे लवचीक नवीन कॅनव्हासवरील अंतर्ज्ञानी ड्रॅग-एंड-ड्रॉपसह अत्याधुनिक,
प्रतिसादात्मक डिझाइनची जोड देते. हे आपल्याला परिपूर्ण डिझाइन नियंत्रण देते, जेणेकरून
आपण आपल्या साईटला कोणत्याही व्ह्यूपोर्ट आकारात पाहू आणि डिझाइन करू शकता.

७. अभ्यागतांना व्यस्त ठेवा :- एकदा आपली वेबसाईट सेट झाल्यावर आपल्याला


दिसेल की मुख्य आव्हान अभ्यागतांना आकर्षित आणि देखभाल करण्यासाठी बदलते.
अभ्यागतांना सक्रियपणे पोहोचणारी आणि आपली ऑनलाईन सामग्री गतिमान ठेवणारी
वैशिष्ट्ये जोडून आपण या कार्याची तयारी करू शकता.
• वृत्तपत्र :- Wix चे ई-मेल विपणन समाधान आपल्याला पूर्णपणे सानुकूल
करण्यायोग्य लेआउट,विपणन ऑटोमेशन साधने, वाचण्यास-सुलभ आकडेवारीचा
मागोवा आणि बरेच काही वापरून प्रभावी मोहीम तयार करू देते.
• ब्लॉग :- ब्लॉग सुरू करणे. आपला वेळ आणि मेहनत योग्य आहे याची खात्री देते.
आपल्या ब्लॉगची कमाई करण्याच्या दिशेने आपण कार्य करू शकता याशिवाय
ब्लॉग असणे आपल्या साईटच्या रहदारीवर सकारात्मक परिणाम करू शकते. विस्तृत
विषयांचे आवरण देऊन आपण अधिक वाचकांमध्ये आणि अधिक वापरकर्त्यांना
आपल्या उत्पादनास किंवा सेवेकडे आकर्षित करू शकता.
• सामग्रीनिहाय, आपला स्वतःचा ब्लॉग असण्यामुळे आपल्याला आपला संदेश आणि
कल्पना अधिक वैयक्तिक स्वरात संप्रेषित करू देतील तसेच आपल्या क्षेत्रातील
व्यावसायिकतेची पातळी देखील दर्शविली जाईल. आपण प्रारंभ करण्यापूर्वी, उच्च
गुणवत्तेच्या ब्लॉग उदाहरणांची ही निवड ब्राउझ करा.
• सामाजिक फीड :- आपल्या साईट अभ्यागतांना इतर प्लॅटफॉर्मवर आपल्याशी संपर्क
साधण्यास प्रोत्साहित करुन त्यांना कळवा. आपल्या साईटवर सोशल बार जोडण्याच्या
शीर्षस्थानी, विक्स ऑफर असलेल्या सामाजिक अनुप्रयोगांची तपासणी करा, ज्यामुळे
आपण आपल्या साईटला आपल्या सामाजिक खात्यांसह दुवा साधू शकता किंवा
आपल्या साईटवर आपल्या सामाजिक कार्य थेट प्रदर्शित करू शकता.
अशा प्रकारे आपण एक सर्वोत्तम व्यावसायिक वेबसाईट तयार करू शकतो.तसेच
आपण पैसे ही या माध्यमातून मिळत असतो . तसेच आपले विचार ही पोहचण्यासाठी होत
असतो.

Self-Instructional
Material 146
वेबसाईट आणि ब्लॉग,
• खालील वेबसाईट्सना नक्की भेट द्या ट्विटरसाठी लेखन

१) www.maayboli.com NOTES

२) www.maitrin.com

३) www.marathicorner.com

Self-Instructional
Material 147
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन ४) www.collegecatta.com

NOTES

५) www.marathimati.com

६) www.kaustubhkasture.com

Self-Instructional
Material 148
वेबसाईट आणि ब्लॉग,
७) www.aathvanintligani.com ट्विटरसाठी लेखन

NOTES

२.२.१ ब्लॉग
‘ब्लॉग’ हे एक ऑनलाईन जर्नल किवा माहिती देणारी वेबसाईट आहे ज्यामध्ये जुन्या
पोस्ट खाली जातात आणि नवीन पोस्ट वरती दिसतात. सुरुवातीला ब्लॉगमध्ये स्वत:विषयी
माहिती शेअर केली जात होती. तुम्ही जेव्हा इंटरनेटवर कोणत्याही विषयावर माहिती शोधत
असता व त्या माहितीचे उत्तर एका तुम्हाला लेखा स्वरुपात भेटते. गूगलच पेज ओपन
होतात त्या माहितीलाच आपण ‘ब्लॉग’ म्हणू शकतो. तसेच आपल्या मनामध्ये विचार येत
असतात की ब्लॉग कोणत्या विषयावर लिहायचा. टेक्नॉलजी विषयी माहिती, हेल्थ विषयी,
पॉलिटिक्स, विविध प्रॉडक्टचे रिव्हिव्यू करणे, इत्यादीविषयीची माहिती लिहिण्यासाठी
वापरले जातात.

२.२.२ ब्लॉग लेखन म्हणजे काय?/Marathi Blog


Writing
वर आपण ब्लॉग म्हणजे काय याविषयी बघितले. ब्लॉग लेखन म्हणजे आपण
आपल्याविषयी किंवा अन्य विषयावर माहिती लिहणे. आपल्याविषयी माहिती लिहिणे
म्हणजे आपल्या जीवनातील एखादा प्रसंग, आपण आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे संघर्ष
केला, आपल्या जीवनातील एखादा प्रसंग जो लोकांना आवडेल इत्यादी विषयी तुम्ही लिहू
शकता.
ब्लॉग लेखन म्हणजे कोणत्याही एका विषयावर लेखन करणे. ब्लॉग लेखन म्हणजे
त्या विषयावर डीटेलमध्ये माहिती देणे. उदाहरण घ्यायचे झाल्यास मला कम्प्युटरविषयी Self-Instructional
माहिती लिहायची आहे, तर मी त्यामध्ये ‘संगणक काय आहे? त्याचा इतिहास, त्याचे पार्ट Material 149
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन कोणते आहेत. संगणकाचे फायदे आणि तोटे’ याविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करेन
यालाच आपण ब्लॉग लेखन म्हणू शकतो.
NOTES

२.२.३ ब्लॉग कसा तयार करावा?


‘ब्लॉग म्हणजे काय आहे’ याविषयी आपण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
आता आपण ‘ब्लॉग कसा तयार करता येईल’ ह्या विषयी टप्याटप्याने प्रोसीजर जाणून
घेणार आहोत. ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्ही फ्रीच्या गुगलच्या ब्लॉगर मध्ये किवा होस्टिंग
विकत घेऊन वर्डप्रेस मध्ये ब्लॉग बनवू शकता.
ब्लॉग सुरू करण्यासाठी टप्याटप्याने प्रोसीजर काय आहे हे आपण बघूया.

• ब्लॉग सुरू करण्यासाठी तुम्ही पाहिल्यादा नीट टॉपिकची निवड करा.

• त्यानंतर तुमच्या विषयी टॉपिक वर डोमेन विकत घ्या.

• होस्टिंगसाठी तुम्ही गूगल चे ब्लॉगर जे फ्री प्रॉडक्ट आहे याचा किंवा काही पैसे
इन्वेस्ट करून वर्डप्रेस मध्ये वेबसाईट बनवू शकता.

• नंतर एक चांगली Theme Select करून तुमच्या ब्लॉगचे setup करा.

• तुमच्या रेलटेड टॉपिक वर ब्लॉग पोस्ट लिहायला सुरुवात करा आणि वेळेवर तुमच्या
वेबसाईट वर अपलोड करत रहा.

• जर तुम्ही एफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमवत असाल तर ठीकआहे नाही तर


adsense द्वारे तुमचा ब्लॉग monotization करू शकता.

२.२.४ विविध ब्लॉग मध्ये कशा प्रकारे पोस्ट करता


येतील
जर तुमच्या मनामध्ये शंका असेल की, ब्लॉग सुरू केल्यावर त्यात काय करायचे,
कुठल्या प्रकारचा ब्लॉगमध्ये कशाप्रकारे लिखाण करता येईल याविषयीची माहिती पुढील
प्रमाणे:

१.न्यूज वेबसाईट :- हा सध्या मुख्य आणि ट्रेडिंग मध्ये टॉपिक आहे. न्यूज वेबसाईट
सुरू करण्यासाठी तुम्हाला एक टिमची आवश्यकता असते, पण तुम्ही wordpress
Self-Instructional मध्ये प्लगिन च्या मदतीने Automode मध्ये तुमची वेबसाईट सुरू करू शकता. यासाठी
Material 150 तुम्हाला एक चांगली होस्टिंग आणि प्लुगिनसाठी पैसे invest करावे लागतात.ही
वेबसाईट आणि ब्लॉग,
वेबसाईट सुरू करण्यासाठी तुम्ही एका परटिक्युलर टॉपिक वर सुरू करू शकता. ट्विटरसाठी लेखन
उदाहरणार्थ फक्त स्पोर्ट्स, हेल्थ न्यूज, पॉलिटिक्स, बिजनेस रेलटेड किवा सर्व टॉपिक
तुम्ही एकाच वेबसाईट वर कवर करू शकता. याविषयी अधिक माहितीसाठी तुम्हाला NOTES
यूट्यूबवर खूप विडियो भेटतील याच्या मदतीने तुम्ही न्यूज वेबसाईट सुरू करू शकता.

२. गव्हर्नमेंट जॉब्स साईट :- गव्हर्नमेंट जॉब्स साईटवर महिन्याला मिलियन मध्ये


ट्रॅफिक आहे. गव्हर्नमेंट जॉब्स साईट सुरू करण्यासाठी तुम्हाला डेलि साईटवर जॉब्स
पोस्ट करावे लागतील. जेवढे तुम्ही फास्ट आणि पहिल्यांदा जॉब पोस्ट कराल तेवढ्या
प्रमाणात तुमच्या साईटवर ट्रॅफिक वाढेल. तुमच्या मनामध्ये एक शंका किंवा प्रश्न येत
असेल की ‘जॉब्स पोस्ट पहिल्यांदा कोठून पोस्ट करणार’, यासाठी तुम्हाला chorme
browser चे एक एक्सटेन्शन आहे. याच्या मदतीने तुम्ही प्रत्येक गव्हर्नमेंट साईट वर
वॉच ठेवू शकता. जसे काही अपडेट त्या साईटवर झाले की तुम्हाला लगेच अपडेट भेटून
जाईल. 
३. हेल्थ विषयी माहिती :- हेल्थविषयी साईट सुरू करणे सध्या एक चांगला ऑप्शन
आहे. य टॉपिकवर महिन्याला मिलियन सर्च होत असतात. हेल्थ ब्लॉग सुरू करण्यासाठी
तुम्हाला एक काळजी घ्यावीलागेल ती म्हणजे तुम्हाला एक प्रॉपर Disclaiminar द्यावे
लागे. यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या टॉपिकवर माहिती देऊ शकता एक उदाहरण घ्यायचे
झाल्यास आता COVID-19 कोरोना संपूर्ण जगामध्ये पसरला आहे व लोक
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तुम्ही याविषयी माहिती लिहू शकता.
हा एक चांगला ब्लॉग टॉपिक आहे. 

४. टेक्नॉलॉजी विषयी माहिती :- टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही विविध सॉफ्टवेअर आणि


हार्डवेअर याविषयी माहिती लिहू शकतो. तसेच संगणक काय आहे?त्याच्या पार्ट
विषयी, मोबाइल विषयी माहिती, एखादे नवीन अॅप्लिकेशन लॉंच झाले तर त्याविषयी
माहिती असे बरेच विषय आहेत. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे.

५. शेअर मार्केट :- यामध्ये तुम्ही शेअर मार्केट काय आहे? शेअर मार्केटमध्ये पैसे कसे
गुंतवायचे? म्युचअल फंड काय आहे? एसआयपी काय आहे? इत्यादीविषयी माहिती
तुम्ही लिहू शकता.

६. सरकारी योजना:- आज भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारद्वारे विविध प्रकारे


सरकारी योजनाराबवल्या जात आहे, तुम्ही या योजनेविषयी माहिती आपल्या ब्लॉग मध्ये
लिहू शकता.

७. शेती विषयक माहिती :- यामध्ये तुम्ही शेतीविषयक माहिती, टॉप १० कृषीवर


आधारित बिजनेस कोणते आहेत, पारंपरिक शेती कशा प्रकारे केली जाते, त्याद्वारे शेतीसाठी
कोणत्या योजना राबवल्या जात आहेत, इत्यादीविषयी माहिती तुम्ही तुमच्या वेबसाईटवर
लिहू शकता.
Self-Instructional
८. पॉलिटिक्स :- हा एक चांगला आणि लोकांना आवडणारा विषय आहे. तुम्ही सध्या Material 151
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन जगामध्ये काय चालले आहे. यविषयी माहिती मिळवू शकतात. तसेच चालू पॉलीटिकल
घडामोडींविषयी माहिती तुम्ही तुमच्या वेबसाईटवर अपलोड करू शकता.
NOTES
९. रेसीपी विषयी माहिती :- यामध्ये तुम्ही वेगवेगळे पदार्थकसे बनवायचे याविषयी
माहिती लिहू शकता किवा ऑनलाईन व्हिडियो यूट्यूब वर बनवून तुम्ही वेबसाईट मध्ये
Attach करू शकता.

१०. प्रॉडक्ट रिव्यू :- तुम्ही कोणत्याही एका प्रॉडक्ट विषयी माहिती लिहू शकता. या
ब्लॉग मध्ये तुम्ही दोन प्रकारे पैसे कमवू शकता एक Adsense आणि दूसरा एफिलिएट
मार्केटिंग करून, यासाठी तुम्हाला एक चांगला ऑप्शन आहे. अॅमझोनचा एफिलिएट
मार्केटिंग प्रोग्राम जॉइन करून तुम्ही प्रॉडक्ट विषयी माहिती तुमच्या वेबसाइट वर अपलोड
करू शकता.

११. ट्रॅवल ब्लॉग :- हा एक चांगला टॉपिक आहे. ट्रॅवल ब्लॉग मध्ये तुम्ही भारतामधील
किवा जगामधील ठिकाणाबद्दल माहिती लिहू शकता. यामध्ये तुम्ही दोन प्रकारे तुमच्या
ब्लॉगला monitisation करू शकता एक म्हणजे  एफिलिएट मार्केटिंग आणि
दूसरा adsense द्वारे.

१२. इतिहास विषयी माहिती :- हा एक चांगला टॉपिक आहे व तुम्हाला जास्त सर्च
करावे लागणार नाही. आज इतिहास विषयी एवढे टॉपिक आहेत की तुम्ही यामध्ये
चांगल्या लिहू शकता आणि सध्या लोक इतिहास वाचणे पसंत करत आहेत. हा एक
चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे. 

१३. करमणूक (Entertainment) :- यामध्ये तुम्ही मूव्हीज विषयी रिव्हीव्यू, टीव्ही


सिरियल रिव्हीव्यू, एखाद्या मूव्ही किवा टीव्ही सिरीयल विषयी माहिती लिहू शकता. तसेच
नवीन मूव्ही किवा सिरियल रीलीज झाल्यावर त्या मूव्ही किवा टीव्ही सिरियलचे रिव्यू
तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये लिहू शकता. मित्रांनो ह्या टॉपिक वर मिलीयन मध्ये सर्च होत
असतात आणि हा एक चांगला टॉपिक आहे व तुम्हाला जास्त शोध घ्यावा लागणार नाही. 

१४. गेमिंग :- टप्याटप्याने विडियो गेम विषयी गाइड, गेम विषयी रिव्हीव्यू, एखादा
नवीन गेम लॉच झाल्यावर त्याच्या विषयी माहिती हे सगळे टॉपिक तुम्ही आपल्या ब्लॉग
मध्ये समाविष्ट करू शकता. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक आहे. 

१५. ग्रीन ब्लॉग :- ग्रीन बिल्डिंग ब्लॉग हा एक चांगला विषय आहे, यामध्ये तुम्ही एक
चांगले आणि इको फ्रेंडली घरांविषयी माहिती लिहू शकता, तसेच तुम्ही एफिलिएट
मार्केटिंग करून इको फ्रेंडली प्रॉडक्ट कोणते आहेत त्याचे रिव्हीव्यू आपल्या ब्लॉग मध्ये
लिहून पैसे कमवू शकता. तसेच यामध्ये इको फ्रेंडली घर काय आहे याविषयी टिप्स,
त्याच्या मटेरियल विषयी माहिती, साऊंड प्रूफ मटेरियल आयडिया इत्यादी विषयी माहिती
Self-Instructional तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये लिहू शकता. हा एक चांगला Marathi Blog साठी टॉपिक
Material 152 आहे.
वेबसाईट आणि ब्लॉग,
१६. शिक्षण आणि करिअर ब्लॉग :- विशिष्ट नोकरी किंवा उद्योगांसाठी करिअर ट्विटरसाठी लेखन
सल्ला, करिअर कोचिंग, नवीन नोकरी मिळविण्यासाठी नवीन कौशल्ये शिकणे, हायस्कूल
किंवा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अभ्यास स्वयंरोजगार, इत्यादी टॉपिक्स तुम्ही यामध्ये NOTES
कवर करू शकता. हा एक ब्लॉगसाठी उत्तम असा टॉपिक आहे.

• अन्य टॉपिक्स :- ब्लॉगसाठी आणखी कोणते टॉपिक आहेत हे बघूया.


• गिफ्ट आयडिया
• इन्फोग्राफिक्स
• फिटनेस
• ग्राहकांच्या यशोगाथा
• एडवाइस
• फॅशन
• पर्सनल फायनॅन्स
• लाइफस्टाईल
• छंद
• फूड
• पाळीव प्राणी ब्लॉग, इ.

२.२.५ काही ब्लॉगची उदहरणे


आपण वर वेगवेगळ्या विषयांवर कशा पद्धतीने ब्लॉग लिहायचे हे बघितले. आता
आपण उदाहरणादाखल काही ब्लॉग बघू या.
१. marathiblog.co.in

या वेबसाइटवर तुम्हाला विविध टॉपिकवर माहिती वाचायला भेटेल. यामध्ये तुम्ही


टेक्नॉलजी विषयी माहिती, ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल माहिती, शेअर मार्केट,
क्रिप्टोकरन्सी, हेल्थ विषयी माहिती, पॉलिटिक्स, भारत सरकारच्या सरकारी योजना आणि
महाराष्ट्र सरकारच्या सरकारी कोणत्या आहे याबद्दल माहिती, कृषी  विषयक माहिती, चालू Self-Instructional
घडामोडी इत्यादी या वेबसाइटमध्ये तुम्हाला वाचायला भेटेल. या वेबसाइटचे लेखक नितिन Material 153
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन आहेत जे तुमच्या पर्यत्न एक चांगल्या प्रकारे माहिती देण्याचा प्रयत्न करत असतात. या
वेबसाइटचा कमाईचा विचार केला तर Adsence हा स्त्रोत आहे. ही एक Marathi
NOTES Blog वेबसाइट आहे.  

२. www.alotmarathi.com:

अ-लॉट मराठी :-अ-लॉट मराठी या वेबसाईटवर तुम्हाला वेगवेगळ्या विषयावर


माहिती वाचायला भेटेल. यामध्ये तुम्हाला पोलिटिक, टेक्नॉलजी, हेल्थ, इत्यादी विषयी
माहिती यामध्ये दिली गेली आहे. या वेबसाईटच्या लेखकाचा तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा
हा एक प्रयत्न आहे. एक चांगल्या प्रकारे माहिती देण्यासाठी marathi Blog वेबसाईट
आहे.

३. inmarathi.com :-

या वेबसाईट वर तुम्हाला हेल्थ, हिस्ट्री, पॉलिटिक्स, ट्रॅव्हलिंग याविषयी माहिती तुम्हाला


वाचायला मिळेल. तसेच या वेबसाईटवर इंग्लिश मध्ये तयार होणारे चित्रपटांची माहिती,
विविध कादंबर्याविषयीची माहिती तुम्हाला वाचायला मिळेल. 
Self-Instructional
Material 154
वेबसाईट आणि ब्लॉग,
४. Rightagnles.in :- ट्विटरसाठी लेखन

NOTES

ही एक मराठी वेबसाईट आहे. ज्यामध्ये तुम्हाला पॉलिटिक्स विषयीची माहिती वाचायला


भेटेल. तसेच या वेबसाईट वर राजकारण, शेती विषयक प्रश्न, अर्थव्यवस्था, परराष्ट्र
व्यवहार इत्यादी विषयी माहिती दिले आहे.

५. marathiblog.in :-

ह्या ब्लॉग मध्ये विविध टॉपिक वर माहिती शेअर केली आहे. यामध्ये तुम्हाला ललित,
ग्रेट मराठी, साहित्य, टेक्नॉलजी, मनोरंजन, हेल्थ, निसर्ग, इत्यादी विषयी माहिती वाचायला
भेटते.
६. bhavamarathi.com :-ही एक साईट वेगवेगळ्या टॉपिकवर लेख
लिहित असते. यामध्ये हेल्थ, लेटेस्ट न्यूज, ट्रॅवल याविषयीची माहिती, असे बरेच विषय
या ब्लॉग मध्ये समाविष्ट केले जातात.
७. yuvrajpardeshi.com :-या वेबसाइटचे लेखक डॉ. युवराज परदेशी
आहेत. यांच्या वेबसाईट मध्ये बिजनेस, फेसबूक लाईव, जनरल माहिती, पोलोटिकल 
विषयी माहिती, टेक्नॉलजी माहिती, सोशल माहिती विषयीची इत्यादी माहिती तुम्हाला या
वेबसाइटवर वाचायला भेटेल. ही एक  Marathi Blog वेबसाईट आहे.  
८. www.historicalmaharashtra.info: महाराष्ट्राचा इतिहास
:-महाराष्ट्राचा इतिहास या वेबसाईटवर आपल्या महाराष्ट्र राज्याविषयी लेख वाचायला Self-Instructional
मिळतील. यामध्ये महाराष्ट्रातील थोर विचारांबद्दल माहिती, महाराष्ट्रातील कवी ग्रंथाबद्दल Material 155
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन माहिती, पॉलिटिक्स विषयी माहिती तुम्हाला या वेबसाईटवर वाचायला मिळेल.
९. techvarta.com :-या वेबसाईटमध्ये वेगवेगळे टॉपिक समाविष्ट केले गेले
NOTES आहेत, यामध्ये संगणकाविषयी माहिती, स्मार्ट फोन, सोशलमीडिया, चालू घडामोडी,
विविध गॅझेट विषयी माहिती, इत्यादी विषयी माहिती तुम्हाला या वेबसाईट वर वाचायलामिळेल.
१०. mr.vikaspedia.in:-या वेबसाईट वर विविध सरकारी योजनाबद्दल
माहिती वाचायलामिळेल. नवीन सरकारी योजनेविषयी माहिती, विविध सरकारी स्कीमबद्दल
माहिती तुम्हाला या वेबसाईट वर वाचायला मिळेल.इ.

२.२.६ ब्लॉग लेखनाचे फायदे


• कोणत्याही विषयावर व्यक्त होता येते.
• लेखन, छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती अशा कोणत्याही माध्यमातून ब्लॉग तयार करता
येतो.
• तुमचे लेखन देशातच नव्हे तर जगभरातील लोकांपर्यंत पोहचवता येते. इ.

२.२.७. ट्वीटर

रुबी ऑन रेल्स (Ruby on Rails) वापरून ट्विटरची निर्मिती करण्यात आली आहे.
रुबी संगणक प्रोग्रामिंग भाषेसाठी रुबी ऑन रेल्स हा एक विशेष वेब-अनुप्रयोग
फ्रेमवर्क(Web-application framework) वापरून तयार केले गेले होते.हे संवाद
किंवा संप्रेषण साधणारे साधन अन्य ऑनलाईनसेवांसह मुक्तपणे रूपांतरित करण्यास आणि
समाकलनास अनुमती देते. 2006 मध्ये इव्हान विल्यम्स (Evan Williams) आणि बिझ
स्टोन (Biz Stone) यांनी ही सेवा तयार केली होती, त्या प्रत्येकाने याअगोदर गुगलसह
काम केले होते. विल्यम्सज्यांनी यापूर्वी लोकप्रिय वेब ऑथोरिंग टूल ब्लॉगर तयार केले
होते, त्यांनी ऑडिओच्या (Audio) एका प्रकल्पासह प्रयोग करण्यास सुरुवात केली –
शॉर्ट मेसेज सर्व्हिस एस.एम.एस. (SMS) ज्याला नंतर ‘ट्विटर’ म्हणतात. उत्पादनाचे
भविष्य पाहून विल्यम्सने ऑडिओ विकत घेतले आणि त्याचा विकास करण्यासाठी
ऑब्व्हियस कॉर्पोरेशनची सुरुवात केली. नंतर अभियंता जॅक डोर्सी (Jack Dorsey)
व्यवस्थापन गटात सामील झाले आणि मार्च-2007 मध्ये ट्विटरची निर्मित आवृत्ती ऑस्टिन,
टेक्सास येथे एका परिषदेत झाली.त्यानंतरच्या महिन्यात ट्विटर, इन्कॉर्पोरेट यांची निर्मिती
Self-Instructional केली गेली.त्याच्या स्थापनेसाठी ट्विटर हा मुख्यत: सोशल नेटवर्किंग घटकांसह एक
Material 156 विनामूल्य एसएमएसची सेवा देत असे. ट्विटर मध्ये बॅनर जाहिरीती किंवा सदस्यता
वेबसाईट आणि ब्लॉग,
शुल्कातून थेट महसूल उत्पन्न मिळणे याचा अभाव होता. 2009 मध्ये  अभ्यागतांच्या ट्विटरसाठी लेखन
संख्येत 1300 टक्के वाढ होत असताना, ट्विटर ही एक महत्त्वाची उत्सुकतेपेक्षा जास्त
असल्याचे स्पष्ट झाले.तथापि, एका वर्षामध्ये सोशल नेटवर्किंगची जुगलबंदी फेसबुकने NOTES
पहिल्यांदाच नफ्यात बदलली, एप्रिल-2010 मध्ये ट्विटरने “जाहिरात केलेले ट्विट” –
शोध परिणामात दिसणार्या जाहिराती – त्याचे प्राथमिक कमाईचा स्रोत म्हणून अनावरण
केले.  
ट्विटरचा वापर मायस्पेस आणि फेसबुकसारख्या अनेक सामाजिक आंतरजाल
संकेतस्थळांवर लोकप्रिय आहे.कोणी निश्चित व्यक्ती कोणत्या वेळेत काय काम करत
आहे, हे जाणणे ट्विटरचे मुख्य काम आहे.ही मायक्रो-ब्लॉगिंग सारखी आहे. या ठिकाणी
कोणीही आपले विचार थोडक्यात व्यक्त करू शकतो. ट्विटरच्या साहाय्याने अगदी कमी
शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करता येतात, किंवा संवाद साधता येतो. ट्विटरवर मात्र अधिकाधिक
२८० शब्दांची मर्यादा आहे.
ट्विट्स ही २८० (पूर्वी १४०) अक्षरापर्यंतची लिखित पोस्ट असते. लेखक ही पोस्ट
आपल्या पानावर प्रकाशित करतो आणि ती कोणीही वाचू शकतो. वेबसाईट, लघु संदेश
सेवा (SMS), किंवा बाह्य अनुप्रयोगांच्या माध्यमातून ट्विट पाठवता येते आणि तिचे उत्तर
मिळवता येते. इंटरनेटवर ही सेवा नि:शुल्क आहे. परंतु एस.एम.एस. च्या माध्यमातून
पाठविल्यास फोनचा चार्ज पडतो. ट्विटरवर लाईव्ह फोटोना सरळ Gif (Graphics
Interchange Format) इमेजमध्ये बदलता येते, व यासाठी कोणत्याही अॅपची गरज
नसते.

२.२.८ ट्विटरचा उपयोग


ट्विटरचे वापरकर्ते वेगवेगळ्या पद्धतीने आपले खाते अद्यावत करू शकतात. वेब
ब्राउझरने संदेश पाठवून आपले ट्विटर खाते अद्यावत करता येते. त्याशिवाय ईमेल किंवा
फेसबुक सारख्या विशेष आतरजालाचे अनुप्रयोगाचे (वेब अॅप्लिकेशन्स) प्रयोगही करता
येतात. जगभरात अनेक लोक एका तासात अनेक वेळा आपले ट्विटर खाते अद्यावत करत
राहतात. या संदर्भात अनेक विवाद पण झाले आहेत, कारण अनेक लोकांना या अत्याधिक
संयोजकतेला (ओवरकनेक्टिविटीला) सतत आपल्याशी संबंधित ताज्या सूचना देणे
कटकटीचे वाटते. मागील वर्षापासून जगातील अनेक व्यवसायात ट्विटर सेवेचे प्रयोग
ग्राहकांना लगेच अद्यतन करण्यासाठी केला जातोय. अनेक देशांमध्ये समाजसेवी याचा
प्रयोग करत आहेत. अनेक देशांमध्ये सरकार आणि मोठ्या सरकारी संस्थांमध्येही याचा
चांगला प्रयोग आरंभ झालाय.
ट्विटर समूह हे लोकांना विभिन्न आयोजनांची सूचना प्रदान करत आहेत. अमेरिकेमध्ये
२००८ च्या राष्ट्रपती निवडणुकांत दोन्ही गटातील राजकीय कार्यकर्ते सामान्य जनतेपर्यंत
ट्विटरच्या माध्यमातून पोहचले. माइक्रोब्लॉगिंग विख्यात व्यक्तीनाही आकर्षित करत आहे.
म्हणून ब्लॉग अड्डाने अमिताभ बच्चनच्या ब्लॉगनंतर त्यांच्या साठीची माइक्रोब्लॉगिंग ही
सुविधा सुरू केली. ‘बीबीसी’ व ‘अल ज़जीरा’ यासारख्या विख्यात समाचार संस्थांसुद्धापासून
अमेरिकेचे राष्ट्रपतिपदाचे इच्छुक बराक ओबामा ट्विटरवर असतात. शशी थरूर, ऋतिक Self-Instructional
रोशन, सचिन तेंडुलकर, अभिषेक बच्चन, शाहरुख खान, इत्यादीही साईटवर दिसतात. पूर्वी Material 157
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन ही सेवा इंग्रजीमध्येच उपलब्ध होती, नंतर ती अन्य भाषांतही उपलब्ध झाली आहे. ती
स्पॅनिश, जपानी, जर्मन, फ्रेंच आणि इटालियन या भाषेत उपलब्ध आहेत.
NOTES

२.२.९ रँकिंग्स
ट्विटरचे मुख्यालय सॅन फ्रान्सिस्को, कॅलिफोर्नियामध्ये ७९५, फ़ॉल्सम स्ट्रीटवर आहे.
ट्विटर ही अलेक्सा इंटरनेटच्या वेब यातायातच्या विश्लेषणाद्वारे विश्वभरातील सर्वात
लोकप्रिय वेबसाईटच्या रूपात २६व्या श्रेणीवर आली आहे. तसे अनुमानित दैनिक
वापरकर्त्यांची संख्या बदलत राहते, कारण कंपनी सक्रिय खात्यांची संख्या देत नाही. तसे
फेब्रुवारी २००९ मध्ये compete.com ब्लॉग द्वारे ट्विटरला सर्वात जास्त प्रयोग करणारे
सामाजिक नेटवर्कच्या रूपात तिसरे स्थान दिले आहे. त्यानुसार नवीन सभासदांची संख्या
साधारण ६० लाख आणि मासिक निरीक्षकांची संख्या ५ कोटी ५० लाख आहे. प्रत्यक्षात
मात्र फक्त ४०% नियमित वापरकर्ते आहेत. मार्च २००९ मध्ये Nielsen.com ब्लॉगने
ट्विटरच्या सदस्य समुदायाची नोंदणी केली आहे.
काही दिवसांपूर्वी ट्विर वर पण काही असुरक्षिततेच्या बातम्या येत होत्या. ट्विटर एका
आठवड्यात दोनदा ‘फिशिंग स्कॅम च्यात आले. यामुळे ट्विटरद्वारा उपयोक्ताला सावधानतेचा
इशारा देण्यात आला की ते ‘डायरेक्ट मेसेज’वर या कोणत्याही संदिग्ध लिंकला क्लिक
करू नये. साइबर अपराधी उपयोक्ता लोकांना फसवणूक करून उपयोक्ता नाव आणि
पासवर्ड इत्यादीची चोरी करतात त्यांच्याद्वारे उपयोक्ताला ट्विटरवर आपल्या मित्रांकडून
डायरेक्ट मेसेजच्या आत छोटेसे लिंक मिळते. त्यावर क्लिक करताच उपयोक्ता एक खोट्या
वेबसाईटवर पोहोचतो. हे एकदम ट्विटरच्या होम पेज सारखे दिसते. इथेच उपयोकत्याला
आपली लॉग-इन माहिती एंटर करण्यासाठी म्हटले जाते, ठीक तसेच जसे की ट्विटर च्या
मूळ पृष्ठ वर असते आणि या प्रकारे ही माहिती चोरली जाते. एक उपयोक्ता डेविड कैमरन
ने आपल्या ट्विटरवर जसेच एंटर की दाबली तो खराब संदेश त्यांच्या ट्विटर मित्रांच्या
यादीतील उपयोक्ता पर्यंत पोहचला. त्यामुळे हे स्कॅम जगातील इंटरनेटपर्यंत पोहोचले.
सुरक्षा विशेष तज्ज्ञा अनुसार साइबर अपराध्याने चोरलेलेल्या माहितीचा प्रयोग बाकीच्या
खात्याला ही हॅक करण्यात करू शकतात किंवा याने कोणत्या तरी दूरच्या कंप्यूटरमध्ये
जपून ठेवली असलेल्या माहितीला हॅक करू शकतात. यापासून वाचण्यासाठी उपयोक्तांचा
आपल्या खात्याचा पासवर्ड कोणता तरी कठीण शब्द ठेवून ठेवायला हवा आणि एकच
पासवर्डचा प्रयोग करू नये. जर एखाद्याला हे कळाले की त्यांच्या ट्विटर खात्यातून संदिग्ध
संदेश पाठवले जाते तर त्याने आपल्या पासवर्डला लगेच बदलणे महत्त्वाचे आहे. तसेच
आपल्या ट्विटर खात्याची सेंटिंग्स किंवा कनेक्शन एरिया सुद्धा तपासा. जर तिकडे कोणत्या
थर्ड पार्टीची ऐप्लिकेशन संदिग्ध वाटते तर त्या खात्याला एक्सेस करण्यासाठी परवानगी
देऊ नये. ट्विटरने पण सुरक्षा कडक करण्यासाठी पासवर्डच्या रूपात प्रयोग होणारे ३७०
शब्दांचा निषेध करून त्या अनुसार पासवर्डच्या या शब्दांच्या बद्दल अनुमान लावणे सोपे
आहे.

Self-Instructional
Material 158
वेबसाईट आणि ब्लॉग,
२.२.१० मायक्रोब्लॉगिंग सेवा (Microblogging service) ट्विटरसाठी लेखन

वैयक्तिक संगणक किंवा भ्रमणध्वनीद्वारे संदेश वितरीत करणारी ऑनलाईन लघु स्तंभ NOTES
लेखन सेवा ट्वीटरमध्ये मायस्पेस (Myspace) आणि फेसबुक (Facebook) यांसारख्या
सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांसारखे त्वरित संदेशवहन इन्स्टंट मॅसेजिंग; (instant
messaging) या तंत्रज्ञानाचा समावेश करून संक्षिप्त संदेशाद्वारे किंवा “ट्विट” करून
दिवसभर संवाद साधू शकणाऱ्या वापरकर्त्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे.
वापरकर्ता भ्रमणध्वनीचा कळफलक (कीपॅड) किंवा संगणकावरुन संदेश तयार करतो
आणि ट्विटरच्या सर्व्हरवर पाठवितो, पाठविणाऱ्याच्या यादीमध्ये असणाऱ्या इतर
वापरकर्त्यांना पुढे तो संदेश forward करण्यात येतो. संदेश मिळणाऱ्या वापरकर्त्यास
अनुयायी म्हंटले जाते. Followers. यासोबतच वापरकर्ता विशिष्ट विषयांवर मागोवा ठेवू
शकतो, संवादावर प्रतिक्रिया नोंदवू आणि दिलेल्या ट्विटर फीडवरील लाखो अनुयायांना
प्रेषित करू शकतो.ट्विट कोणत्याही विषयावर असू शकतात परंतु ते २८० अक्षरांपेक्षा जास्त
असू शकत नाहीत.

• ट्विटर अकाउंट तयार करण्याचे टप्पे :


१)ट्वीटरच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी(https://twitter.com).
२) ट्वीटर वर खाते उघडण्यासाठी साईन अप यावर दाबावे.
३) आपले नाव व भ्रमणध्वनी तेथे नोंदवा.
४) आपल्या भ्रमणध्वनीची पडताळणी करावी.
५) आपला password आणि keyword तयार करावा व नोंदवावा.
६) आपल्या आवडी निवडाव्या.
७) अनुसरून करण्यासाठी आपल्या आवडीचे लोक निवडावे.
८) आपला ई-मेल तपासून घ्यावा.

• ट्विटर अकाउंट वापरण्याचे फायदे 


१) संबधिताला आपली माहिती गरजेनुसार सहजतेने प्रोत्साहित करण्यासाठी, उदा.,
आपले स्तंभ लेखन, कथा, संशोधन लेख आणि बातम्या इ. सामायिक करण्यासाठी याचा
उपयोग होतो.
२) ट्विट आणि रिट्विटद्वारे पटकन मोठ्या संख्येने लोकांपर्यंत पोहोचता येते.
३) आपल्या क्षेत्रातील इतर तज्ञांच्या कार्यांचे अनुसरण करता येते. तज्ज्ञ आणि इतर
अनुयायांशी संबंध निर्माण करता येतो. नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचता येते. ट्विटरमुळे
राजकीय आणि सामाजिक विषयांबद्दल जागरूकता वाढते, राजकीय संदेश देता येतो
आणि सामूहिक कृतीत समन्वय साधता येतो.
४) ट्विटरमुळे समाजाचे मत जाणून घेता येते इत्यादी.
खालील काही ट्विटर अकाऊंटला तुम्ही भेट देऊ शकतात.

Self-Instructional
Material 159
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन १) www.memarathi.com

NOTES

२) www.departmentforeducation.com

3) www.barkhdutt.com

Self-Instructional
Material 160
वेबसाईट आणि ब्लॉग,
२.२.११ सारांश ट्विटरसाठी लेखन

आपल्या सर्व विवेचनातून असे दिसून येते की आज या समाज माध्यम यांचा वापर NOTES
कसा केला जात आहे. जगासोबत जगण्यासठी या सर्व नव समाजमाध्याम यांची हाताळणी
आपल्याला जमली पाहिजे तेव्हा आपण काळाबरोबर चालू शकतो. आज वेब, tiwter,
ब्लॉग यांसारख्या माध्यमांची गरज आपल्याला आहे. टी एक जगण्याची आणि संपर्काचे
माध्यम झाले आहे.

२.२.१२ महत्वाचे शब्द


• Static वेबसाईटला ‘स्थिर वेबसाईट’ असे म्हणतात
• CMS : Content Management System
• ई-कॉमर्स वेबसाईट एक ऑनलाईन शॉपिंग डेस्टिनेशन आहे
• फ्लिपकार्ट अनेक प्रकारची उत्पादने विकतो
• पोर्टफोलिओ वेबसाईट सर्जनशील व्यावसायिकांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याचे प्रदर्शन
करण्यासाठी एक स्थान प्राप्त करून देते
• कृत्रिम बुद्धिमत्ताही : Artificial Intelligence
• ऑनलाईन लघु स्तंभ लेखन सेवा ही ट्वीटरमध्ये मायस्पेस (Myspace) आणि
फेसबुक (Facebook) या मध्ये आहेत.

२.२.१३ सरावासाठी प्रश्न


१. वेबसाईट म्हणजे काय?
२. वेबसाईट ची गरज स्पष्ट करा.
३. वेबसाईटचे ५ प्रकार सांगून त्यांचे स्पष्टीकरण करा.
४. स्वतःची वेबसाईट कशी तयार कराल?
५. ब्लॉग म्हणजे काय ते सांगून ब्लॉगचे प्रकार स्पष्ट करा.
६. ब्लॉगचे फायदे विशद करा.
७. ट्विटर म्हणजे काय ते सांगून ट्विटर वापराच्या पद्धती स्पष्ट करा.

२.२.१४ अधिक वाचनासाठी पुस्तके


१. प्रा. डॉ. उज्ज्वला भोर : प्रसारमाध्यमे आणि मराठी, प्रशात प्रकाशन, पुणे.
२. सायबर संस्कृती, डॉ. रमेश  वरखडे
३. उपयोजित मराठी, संपादक डॉ. केतकी मोडक, संतोष शेणई, सुजाता शेणई
४. ओळख माहिती तंत्रज्ञानाची,  टिमोथी जे. ओ. लिअरी Self-Instructional
५. संगणक, अच्युत गोडबोले, मौज प्रकाशन, मुंबई Material 161
वेबसाईट आणि ब्लॉग,
ट्विटरसाठी लेखन ६. इंटरनेट, डॉ.  प्रबोध चोबे, मनोरमा प्रकाशन, मुंबई
७. व्यावहारिक मराठी, डॉ. ल. रा. नसिराबादकर, फडके प्रकाशन,  कोल्हापूर
NOTES ८. आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात, शिक्रापूर दीपक, मराठे उज्वल, उत्कर्ष
प्रकाशन, पुणे
९. www.twitter.com
१०. www.marathi.jag.com
११. www.wikipedia.org
१२. www.saamana.com

Self-Instructional
Material 162
व्यावसायिक
२.३. व्यावसायिक पत्रव्यवहार पत्रव्यवहार

NOTES
२.३.१ प्रस्तावना
२.३.२. उद्दिष्टे
२.३.३ पत्रलेखनाचे मुख्य प्रकार
२.३.४. पत्रलेखन कसे करावे?
२.३.५. सारांश
२.३.६. महत्वाचे शब्द
२.३.७. सरावासाठी प्रश्न
२.३.८. अधिक वाचनासाठी पुस्तके

२.२.१. प्रस्तावना
सामान्यत: आज आपण तंत्रज्ञानाच्या युगात पत्रव्यवहार करणे विसरून गेलो आहेत.
आज त्याची जागा सामाजिक माध्यमांनी घेतली आहे. एखादा एस. एम. एस. तत्काळ
पाठवता येतो. संगणकीय माध्यमामुळे एखादे पत्र आपण तात्काळ ईमैल च्या माध्यमातून
तात्काळ पाठवू शकतो. पूर्वी हाताने लिहिलेली पत्रे वाचण्यासाठी जी आतुरता असायची ती
आता राहिली नाही. पत्रलेखन लिहण्यासाठी जी शैली, जो आपलेपणा लिहिण्यात असायचा
ती परिस्थिती आता राहीली नाही. एक साचलेपण आणि मर्यादा आलेल्या दिसतात.
एकमेकाशी बोलण्यासाठी संवाद करण्यासाठी वेळ नाही. म्हणून पूर्वी जो आपलेपणाचा
भाव पत्रलेखनात आशयाचा तो आज दिसत नाही. कारण संवाद हा फक्त सामाजिक
माध्यमानुसार होतांना दिसत आहे. तसेच प्रेम, आपुलकीची भावनाही बोथट होत चालली
आहे.
एखाद्या वेळेस आपण पूर्वी पत्रलेखन करतांना ज्या आठवणी आठवून आठवून
लिहायचो त्या गोष्टी आज कमी होतांना दिसत आहे. पत्रलेखन हा एकमेकांची विचारांची
देवाणघेवाण करण्यासठी मह्त्वाचे माध्यम आहे. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी,
समाजात जागरूकता पसरविण्यासाठी एक अतिशय सर्वोत्तम मार्ग आहे.
‘महोदय’- सारखा निर्देश त्यात पुरेसा असतो. मायना लिहिण्याच्या पूर्वी पुष्कळदा
पत्राचा विषय आणि पूर्वकालीन पत्राचा संदर्भ एकाखाली एक देण्याची पद्धत आढळते (३)
मसुदा : हा पत्राच्या मजकुराचा भाग असतो. सामान्यपणे सुस्पष्टता, समर्पकता, संपूर्णता,
सविनयता, संक्षिप्तता, संभाषणात्मकता व समंजसपणा असे सप्त ‘स’ गुण पत्राच्या मजकुरात
असावेत अशी अपेक्षा असते (४) समाप्तीचा मायना : पत्राचा मजकूर समाप्त झाल्यावर
स्वतःची स्वाक्षरी करण्यापूर्वी  पत्रलेखकाला समाप्तीचा मायना लिहावा लागतो. आईवडिलांना
व इतर वडीलधाऱ्यांना लिहिलेल्या पत्राचा शेवट पुष्कळदा  ‘आपला आज्ञाधारक’ या
वचनाने केला जातो. याशिवाय ‘आपला’, ‘आपलाच’, ‘तुझा’, ‘तुझाच’, ‘आपला
स्नेहांकित’, ‘आपला स्नेहाकांक्षी’ असेही समाप्तिचे मायने वापरले जातात. व्यावसायिक
पत्रलेखनात ‘आपला’, ‘आपला विश्वासू’ यांसारखे प्रयोग केले जातात (५) स्वाक्षरी : पत्राच्या Self-Instructional
शेवटी उजव्या बाजूला खाली पत्रलेखकाची स्वाक्षरी असते.  Material 163
व्यावसायिक
पत्रव्यवहार परिणामकारक पत्रलेखन करणे, ही एक कला मानली जाते. पत्रलेखनासाठी वापरण्याचा
कागद वा छापील पत्रशीर्षे, टपाल खात्याकडून उपलब्ध होणारी कार्डे अंतर्देशीय पत्रे व
NOTES पाकीटे यांतून योग्य त्या प्रकाराची करावयाची निवड, पत्रलेखनातील हस्ताक्षर, भाषाशैली,
मसुद्यातील परिच्छेदयोजना, पत्र हस्ताक्षरात लिहावयाचे की टंकलिखित करून घ्यावयाचे
याचा विवेक व पत्रावर पत्ता लिहिण्याची पद्धती यांसारख्या अनेक दृष्टींनी परिणामकारक
पत्रलेखनाचा विचार करण्यात येतो. या सर्व अंगोपांगांचा काटेकोर विचार करणारे
पत्रलेखनाचे एक शास्त्रच जणू आधुनिक काळात उदयास आले आहे.
आज आपण पाहतो मोबाईल, इंटरनेट, फेसबुक, व्हाट्सअॅप, ट्वीटर या नवमाध्यमे व
समाजमाध्यमांमुळे आपण यावरील माध्यमांद्वारेच संवाद साधत असतो. परंतु आजही
खेडेगावात, ज्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे, ज्यांना लेखनाची आवड आहे, ज्यांना चांगले
नवनवीन संदेश समाजाला द्यायचे आहेत असे लोक पत्रलेखन आवर्जून करताना दिसून
येतात. पत्रलेखनात शब्दांच्या माध्यमातून आपल्याला विचार, भावना आणि संवेदना अत्यंत
तीव्रपणे प्रकट करता येतात. एका अर्थाने पत्रलेखन करणाऱ्या व्यक्तीचा पत्रवाचकावर
नक्की प्रभाव पडतो. म्हणूनच पत्र हे अभिव्यक्तीचे एक शक्तिशाली आणि सुलभ असे
माध्यम आहे.

२.३.२ उद्दिष्टे

१. व्यावसायिक लेखनासाठी मराठी भाषचे उपयोजन करण्यास शिकणे.

२. पत्रलेखनाचे स्वरूप जाणून असे लेखन करणे.

३. व्यावसायिक पत्रलेखनप्रक्रियेची माहिती घेणे.

४. व्यावसायिक पत्रव्यवहाराचा दैनदिन जीवनात महत्त्व

२.३.३ पत्रलेखनाचे मुख्य प्रकार


पत्रलेखनाचा प्रमुख हेतू जे प्रत्यक्षात बोलून दाखविणे शक्य नसते, ते लिहून कळविणे
हाच असला, तरी पुष्कळसा पत्रव्यवहार हा लिखित स्वरूपातच असणे आवश्यक मानले
जाते. पहिल्या प्रकारात बहुतेक सर्व खाजगी पत्रलेखन व दुसऱ्या प्रकारात बहुतेक सर्व
व्यावसायिक पत्रलेखन अंतर्भूत होते. खाजगी पत्रलेखन हे खाजगी संभाषणासारखे असून
त्यातून विशिष्ट निमित्ताने केलेले अनौपचारीक व मनमोकळे निवेदन आढळते. पत्रलेखक
व पत्रवाचक यांच्यात ज्या प्रकारचे संबंध असतील, त्यांवर या निवेदनाचा आशय व
भाषाशैली अवलंबून असतात. खाजगी पत्रांतही औपचारिक प्रश्न संभवतातच, पण त्यांतून
Self-Instructional व्यक्तिगत जवळीकच व्यक्त होते. व्यावसायिक पत्रलेखनाची व्याप्ती फार मोठी आहे.
Material 164 नोकरीसाठी अर्ज, शासकीय कार्यालयातून व खाजगी संस्थांतून केला जाणारा विविध
व्यावसायिक
प्रकारचा पत्रव्यवहार तसेच व्यापारी कंपन्या, छोटेमोठे दुकानदार, कारखानदार, बँका पत्रव्यवहार
यांसारख्या सार्वजनिक क्षेत्रांत काम करणाऱ्या घटकांचा पत्रव्यवहार या सर्वांचा अंतर्भांव
व्यावसायिक किंवा सार्वजनिक पत्रलेखनात होतो. हे पत्रलेखन सामान्यतः औपचारिक NOTES
स्वरूपाचे असते. त्यातील एक भाग हा प्रपत्ररूप असतो. त्याची लेखनपद्धती ठराविक
प्रकारचीच असते.
‘महोदय’- सारखा निर्देश त्यात पुरेसा असतो. मायना लिहिण्याच्या पूर्वी पुष्कळदा
पत्राचा विषय आणि पूर्वकालीन पत्राचा संदर्भ एकाखाली एक देण्याची पद्धत आढळते.

(१) मसुदा : हा पत्राच्या मजकुराचा भाग असतो. सामान्यपणे सुस्पष्टता, समर्पकता,


संपूर्णता, सविनयता, संक्षिप्तता, संभाषणात्मकता व समंजसपणा असे सप्त ‘स’ गुण
पत्राच्या मजकुरात असावेत अशी अपेक्षा असते.

(२) समाप्तीचा मायना : पत्राचा मजकूर समाप्त झाल्यावर स्वतःची स्वाक्षरी करण्यापूर्वी 


पत्रलेखकाला समाप्तीचा मायना लिहावा लागतो. आईवडिलांना व इतर वडीलधाऱ्यांना
लिहिलेल्या पत्राचा शेवट पुष्कळदा  ‘आपला आज्ञाधारक’ या वचनाने केला जातो.
याशिवाय ‘आपला’, ‘आपलाच’, ‘तुझा’, ‘तुझाच’, ‘आपला स्नेहांकित’, ‘आपला
स्नेहाकांक्षी’ असेही समाप्तिचे मायने वापरले जातात. व्यावसायिक पत्रलेखनात ‘आपला’,
‘आपला विश्वासू’ यांसारखे प्रयोग केले जातात.

(३) स्वाक्षरी : पत्राच्या शेवटी उजव्या बाजूला खाली पत्रलेखकाची स्वाक्षरी


असते. परिणामकारक पत्रलेखन करणे, ही एक कला मानली जाते. पत्रलेखनासाठी
वापरण्याचा कागद वा छापील पत्रशीर्षे, टपाल खात्याकडून उपलब्ध होणारी कार्डे अंतर्देशीय
पत्रे व पाकीटे यांतून योग्य त्या प्रकाराची करावयाची निवड, पत्रलेखनातील हस्ताक्षर,
भाषाशैली, मसुद्यातील परिच्छेदयोजना, पत्र हस्ताक्षरात लिहावयाचे की टंकलिखित करून
घ्यावयाचे याचा विवेक व पत्रावर पत्ता लिहिण्याची पद्धती यांसारख्या अनेक दृष्टींनी
परिणामकारक पत्रलेखनाचा विचार करण्यात येतो. या सर्व अंगोपांगांचा काटेकोर विचार
करणारे पत्रलेखनाचे एक शास्त्रच जणू आधुनिक काळात उदयास आले आहे.

• पत्रलेखनाचे प्रकार
i) औपचारिक पत्र
ii) अनौपचारिक पत्र

१.औपचारिक पत्रलेखन (व्यावसायिक पत्रलेखन)

Self-Instructional
Material 165
व्यावसायिक
पत्रव्यवहार सरकारी कार्यालये, प्राचार्य, प्रकाशक, व्यावसायिक संस्था, दुकानदार इत्यादींसाठी
लिहिले जाणारे जे पत्रलेखन असते त्याला औपचारिक पत्रलेखन असे म्हणतात.
NOTES
व्यावसायिक पत्रलेखन करताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात.

• व्यावसायिक पत्रात पत्राच्या वरच्या भागात 'llश्रीll' वगैरे शुभदर्शक काहीही


लिहिण्याची गरज नाही.

• पत्राची सुरूवात करताना वरती उजव्या कोपऱ्यात पत्ता लिहिण्यापूर्वी आपले पूर्ण नाव
लिहावे. त्याखाली पूर्ण पत्ता पिनकोडसहित लिहावा.

• पत्र ज्याला लिहायचे आहे त्याचे नाव आणि संबंध लक्षात घेऊन मायना लिहावा.

• त्याखाली पत्राचा विषय व काही संदर्भ असल्यास तो सुद्धा लिहावा. योग्य, नेटक्या
शब्दांत मजकूर लिहावा. परिच्छेद पाडावेत. पाल्हाळ असू नये.

• आपला विश्वासू, आपला कृपाभिलाषी या शब्दांनी शेवट करून स्वाक्षरी करावी.

२. अनौपचारिक पत्रलेखन (कौटुंबिक/घरगुती पत्रे)


जवळचे नातेवाईक, मित्र, परिचित, इत्यादींसाठी लिहिलेल्या पत्रलेखनाला अनौपचारिक
पत्रलेखन असे म्हणतात.
अनौपचारिक पत्रलेखन करताना पुढील गोष्टी लक्षात घ्याव्यात.

• पत्राच्या वरच्या बाजूस उजव्या कोपऱ्यात पत्रलेखकाचे नाव, पत्ता, तारीख लिहावी.

• पत्र कोणाला लिहित आहोत, हे लक्षात घेऊन मायना लिहावा.

• पत्रातील मजकूर लिहिताना योग्य तेथे परिच्छेद पाडावेत.

• पत्राचा समारोप योग्य प्रकारे करावा.

• आईवडिलांना शिरसाष्टांग नमस्कार किंवा शि.सा.नमस्कार आणि कुटुंबातील इतरांना


सा.न./साष्टांग नमस्कार/नमस्कार/ आशीर्वाद यांपैकी योग्य ते शब्द लिहावेत.

• समारोपाचा योग्य मायना असावा.

• पत्राची भाषा सहज बोलल्यासारखी व घरगुती असावी.

Self-Instructional
Material 166
व्यावसायिक
३. चांगले पत्रलेखन करण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्यात पत्रव्यवहार

• आपल्या पत्राचे लेखन प्रभावी असायला हवे. NOTES

• पत्र सर्वांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत व शैलीत लिहावे.

• पत्रलेखन हे थोडक्यात असावे, अनावश्यक मजकूर शक्यतो टाळावा.

• पत्रलेखनात शुद्धलेखन हे अचूक असायला हव

चांगला पत्र लिहिण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा

• प्रभावी लेखन: आपला पत्र प्रभावी टाकणार असला पाहिजे 

• सोपी भाषा शैलीः वाचक समजू शकेल अशी सोपी भाषा वापरा.

• थोडक्यात: पत्र नेहमी थोडक्यात लिहावे, अनावश्यक उघड करू नका.

• क्रमिकरण: विषयानुसार पत्र क्रमवारीत लिहा.

• • शब्दलेखन सुधारणाः मात्रा आणि विरामचिन्हे यांच्यात चुका करू नका.

२.२.४. पत्रलेखन कसे करावे?


व्यावसायिक पत्रलेखन नमुना
१.पुस्तक विक्रेत्याकडून पुस्तक पाठविण्याची विनंती या विषयावर पत्रलेखन करा.

डॉ.निखील पाटील,
ग्रंथपाल,
ग्रंथालय विभाग,
झुलाल भिलाजीराव महाविद्यालय, देवपूर, धुळे.
दि.१० फेब्रुवारी २०२१

प्रति,
मा. प्रकाशक,
शब्दवैभव प्रकाशन, पुणे.
Self-Instructional
विषय : मराठी विषयाची पुस्तके पाठवणेबाबत... Material 167
व्यावसायिक
पत्रव्यवहार महोदय,
उपरोक्त विषयानुसार आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयासाठी शैक्षणिक वर्षे २०२०-
NOTES २१ साठी मराठी विषयाची काही निवडक पुस्तके खरेदी करावयाची आहेत. तुमच्या
प्रकाशनाची सूची आम्हाला पाहण्यास मिळाली आहे. त्या यादीतील काही निवडक पुस्तके
आम्ही खरेदी करू इच्छित आहोत. कृपया ती पुस्तके लवकरात लवकर ग्रंथालयासाठी
पाठवावीत. ही विनंती.
खरेदी करावयाच्या पुस्तकांची यादी पुढीलप्रमाणे :-

क्र. पुस्तकाचे नाव लेखकाचे नाव प्रती

१. श्यामची आई साने गुरुजी १५

२. रारंग ढांग प्रभाकर पेंढारकर २०

३. तणकट राजन गवस १०

४. नटरंग आनंद यादव १०

५. साहित्याचा अवकाश नागनाथ कोत्तापल्ले ०५

६. आलोक आसाराम लोमटे ०५

वरील पुस्तके तातडीने पाठवून आम्हाला सहकार्य करावे. तसेच आपण महाविद्यालयाच्या
ग्रंथालयासाठी सवलतीच्या दरात देण्यात यावी ही विनंती.
पुस्तके मिळाल्यानंतर त्वरित आपले बिल आर टी जी एस ने पाठवीण्यात येईल, याची
नोंद घ्यावी.
आपला विश्वासू
डॉ. निखिल पाटील

२. कर्ज मिळण्यासाठी बँकेला विनंती पत्र लिहा.



मोहन सूर्यवंशी
शिरपूर, ता. शिरपूर,
जि. धुळे- ४१४३०३
दि. १० फेब्रुवारी २०२१
प्रति,
मा. शाखाधिकारी,
स्टेट बैंक ऑफ इंडिया, शिरपूर
Self-Instructional
Material 168 विषय : घर बांधण्यासाठी कर्ज मिळणेबाबत...
व्यावसायिक
महोदय, पत्रव्यवहार
मी मोहन सूर्यवंशी, शिरपूर येथील रहिवासी असून एका शासकीय कार्यालयात काम
करत NOTES
आहे. मला घर बांधण्यासाठी आपल्या बैंककडून कर्ज घ्यावयाचे आहे. मी आपल्या
बँकेच्या नियमानुसार सर्व कागदपत्रांची पूर्णता करन लवकरात लवकर आपल्याला फाईल
सादर करील तरी माझ्या अर्थ परिस्थितीचा व गरजेचा सकारात्मक विचार करून आपण
मला कर देण्यासाठी सकारात्मक विचार करावा ही विनंती.
आपला विश्वायू
मोहन सूर्यवंशी

उदाहरणासाठी काही पत्रांचे विषय पुढे देत आहे. तुम्ही या विषयांवर पत्रलेखन
लिहिण्याचा प्रयत्न करा.
१. बोनाफाईड प्रमाणपत्र मिळावे यासाठी पत्रलेखन करा.
२. तुमच्या परिसराच्या स्वच्छतेसाठी आरोग्य अधिकारी यांना पत्र लिहा.
३. तुमच्या क्षेत्रातील वाढलेल्या अनियमित बीज-भारनियम संकटाबद्दल वीज अधिकान्यांना
पत्र लिहा.
४. वाढत्या जलप्रदूषणाबद्दल नियंत्रण विभागाला पत्र लिहा.
५. बस थांबा सुरू करण्यासाठी आगारप्रमुखांना पत्र लिहा.

कौटुंबिक / घरगुती पत्रलेखन नमुना


१. नोकरी मिळाल्यानंतर अभिनंदनपर पत्र लिहा.


मयूर सोनवणे
हडपसर, पुणे
दि. ०९ एप्रिल २०२१
प्रति,
मा. संचालक,
स्थानिक स्वराज संस्था,
शाखा –कोथरूड
महोदय,
मा. संचालक साहेब आपण आपल्या संस्थेत मला काम करण्याची संधी दिल्याबद्दल
सुरूवातीला मी आपला मनापासून आभारी आहे.
माझ्या शैक्षणिक पात्रतेचा सकारात्मक विचार करून आपण माझ्यावर जो विश्वास
दाखवला आहे, त्या विश्वासास मी नक्की पात्र ठरेन अशी मी आपल्याला ग्वाही देतो. मी
पुन्हा एकदा आपले मनापासून खूप आभार मानतो. धन्यवाद.
आपला विश्वासू
मयूर सोनवणे Self-Instructional
Material 169
व्यावसायिक
पत्रव्यवहार २. मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे पत्र लिहा.
दीपक मोरे
NOTES साक्री रोड, धुळे,
जिल्हा धुळे– ४२४००१

प्रति,
मित्रवर्य, मुकुंद
यास नमस्कार,
मुकुंद सर्वप्रथम तुला वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. तू लहानपणापासूनचा माझा
बालमित्र आहे. तुझा स्वभाव हा मनमिळावू, सर्वांना मदत करणारा, सर्वांशी प्रेमाने वागणारा
असा आहे. तू आता आयुष्याच्या खूप महत्त्वाच्या टप्प्यावर आहेस. आता तुला तुझ्या
करिअरची दिशा ठरविण्याचाही हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे तू आता खूप अभ्यास
कर, चांगले कष्ट घे आणि तुझं आयुष्य उज्वलपणे उभं करण्याचा प्रयत्न कर.
आजच्या तुझ्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला मला माझ्या वैयक्तिक कारणामुळे
उपस्थित राहता येत नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. त्यामुळेच मी हे पत्र तुझ्यासाठी
लिहिले आहे. पुढील वाढदिवसाच्या निमित्ताने नक्की भेटू. धन्यवाद!

आपला विश्वासू
दीपक मोरे

२.२.५. सारांश
अशा प्रकारे आज आपण व्यवसायिक पत्रव्यवहार कसा करू शकतो ते आपण उदा.
पहिले त्यामध्ये सुरुवातीला औपचारिक आणि अनपाचारिक पत्र लेखन पहिले परतू आज
नविन इमेल किवा एस एम एस आपण पत्र लेखन करू शकतो. म्हणून आज व्यवसायिक
पत्र लेखन आज online मध्यामाद्व्रारे केले जातात. त्याचे उपयोजन करणे आज गरजेचे
आहे.

२.२.६. महत्वाचे शब्द


• औपचारिक पत्रलेखन (व्यावसायिक पत्रलेखन)
• अनौपचारिक पत्रलेखन (कौटुंबिक/घरगुती पत्रे)

२.२.७. सरावासाठी प्रश्न


Self-Instructional १. क्रिडा क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळाल्याबाबत आपल्या मित्राला अभिनंदन पर पत्र
Material 170 लिहा.
व्यावसायिक
२. आपल्या महाविद्यालयात शैक्षणिक साहित्य पुरविण्याबाबत व्यावसयिक पत्र लिहा. पत्रव्यवहार
३. तुमच्या मित्र-मैत्रणीस सुट्टीनिमित्त तुमच्या घरी आमंत्रण देण्याचे पत्र लिहा.
४. शैक्षणिक गणवेश पुरविण्याबाबत व्यावसयिक पत्र लिहा. NOTES

२.२.८. अधिक वाचनासाठी पुस्तके


१. जोंधळे राजू वामनराव : प्रसारमाध्यमे आणि सामाजिक परिवर्तन
२.व्यवहारिक मराठी,पुणे विद्यापीठ प्रकाशन, पुणे.
३. व्यवहारिक मराठी, डॉ.कल्याण काळे, डॉ. दत्तात्रेय पुंडे, निराली प्रकाशन, पुणे.
४. व्यवहारिक मराठी, डॉ. लीला गोविलकर, डॉ. जयश्री पाटणकर, स्नेहवर्धन
प्रकाशन.
५. व्यावहारिक मराठी, डॉ. सयाजी राजे मोकाशी, डॉ. रंजना नेमाडे
६. व्यवहारिक मराठी, डॉ. ल. रा. नसिराबादकर, फडके प्रकाशन, कोल्हापूर.
७. मराठी भाषा उपयोजन आणि सर्जन, प्रा. सुहासकुमार बोबडे

Self-Instructional
Material 171

You might also like